Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

जिल्हा परिषदेत झाडाझडती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषदेतील कार्यालयीन अभिलेख वर्गीकरणाचा आढावा घेण्यासाठी पुणे विभागचे सहायक आयुक्त विलास जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) डॉ. कुणाल खेमनार यांनी गुरुवारी विविध विभागांना भेट दिली. यावेळी कामात हलगर्जीपणा झालेल्या विभागची झाडाझडती घेतली. अभिलेख वर्गीकरणाचे काम काटेकोरपणे न केल्याचे निदर्शनास आल्यामुळे ‌प्राथमिक शिक्षण विभागातील वरिष्ठ सहायक लिपिक विजय माहिते, माध्यमिक शिक्षण विभागातील राजू घोटणे यांच्यावर कारवाई करण्याचा आदेश दिला.

जिल्हा परिषदमधील सर्वच विभागात कार्यालय अभिलेख वर्गीकरणाचे काम आठ दिवसापासून युद्धपातळीवर सुरू आहे. ३१ जुलैपासून हे काम करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले आहेत. त्यामुळे दैनंदिन कामकाज बाजूला सारून सर्व अधिकारी, कर्मचारी अभिलेख वर्गीकरणाचे कामात व्यस्त आहेत. सहा प्रकारे दप्तर ठेवणे, फायलिंगचे वर्गीकरण करून वहित विवरण नोंद करणे, कामांची प्रतीक्षा यादी तयार करणे, प्रलंबित कामांची माहिती संकलित करणे अशी कामे केली जात आहेत. त्यामुळे गेल्या दहा वर्षापासून धूळ खात पडलेल्या अनेक फायली बाहेर काढण्यात आल्या आहेत. सर्वाधिक फायलिंचा ढिग माध्यमिक विभागात पडला आहे.

अभिलेख वर्गीकरण कामाचा आढावा घेण्यासाठी बुधवारपासून सहाय्यक आयुक्त जाधव कोल्हापूर दौऱ्यावर आलेत. गुरूवारी सकाळी बाराच्या सुमारास ते व सीईओ डॉ. खेमनार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांनी प्राथमिक, माध्यमिक, ग्रामीण विकास यंत्रणा, समाजकल्याण, महिला व बालकल्याण विभागची तपासणी केली. त्यावेळी चांगले काम केलेल्या कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. कामात दिरंगाई, दूर्लक्ष केलेल्यांची चांगलीच झडती घेतली. विभागप्रमुखांना लक्ष देण्याची सूचना दिली. अचानकपणे कोणत्याही विभागात जाऊन ते पाहणी करीत असल्याने सर्व अधिकारी, कर्मचारी सतर्क झाले.

प्राथमिक विभागची तपासणी करताना लिपीक मोहिते यांनी अभिलेख वर्गीकरणाच्या कामाकडे दूर्लक्ष केल्याचे निदर्शनास आले. अनेक त्रुटी आढळल्या. ‘माध्यमिक’मधील घोटणे यांचाही कामात हलगर्जीपणा आढळला. त्यामुळे या दोघांही कर्मचाऱ्यांची दप्तर तपासणी करून कारवाई करण्याचा आदेश सीईओ डॉ. खेमनार यांनी दिला.

‘शिक्षण’मध्ये गलथानपणा

प्राथमिक, माध्यमिक शिक्षण विभागाबद्दल प्रचंड तक्रारी आहेत. दोन्ही विभागवर गलथानपणाचा वारंवार आरोप होतो. सहायक आयुक्त जाधव यांच्या तपासणीतही या दोन विभागांतील कार्यालयीन अभिलेख वर्गीकरण काम असमाधानकारक असल्याचे स्पष्ट झाले. तेथील दोन कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचेही आदेश दिले. त्यामुळे शिक्षण विभागमधील गलथानपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला.


उपशिक्षणाधिकाऱ्यांनी नागरिकांना हाकलले

माध्यमिक शिक्षण विभागात नेहमीप्रमाणे अभ्यगतांची गर्दी होती. ती गर्दी पाहून नव्याने रूजू झालेल्या एका उपशिक्षणाधिकाऱ्यांचे पित्त खवळले. ते खुर्ची सोडून विभागात आले. त्यांनी कक्ष अधिकाऱ्यांना ‘सर्व अभ्यगतांना बाहेर काढा. दरवाजा बंद करून घ्या. आमचे कर्मचारी निलंबित होत आहेत. बाहेरच्यांना का आत घेत आहात?’ असे सांगितले. शेवटी त्यांनी स्वतःच अभ्यगतांना बाहेर काढले. त्यावेळी एकाने त्यांच्याशी हुज्जत घालल्याने ते नरमले.

अभिलेख वर्गीकरणाचे कामकाज ३१ जुलैपर्यंत पूर्ण करण्याचा आदेश आयुक्तांनी दिला आहे. त्यानुसार काम सुरू आहे. त्याचा आढावा घेण्यासाठी विविध विभागास भेट दिली. त्यावेळी कामात हलगर्जीपणा केल्याचे दिसून आल्याने माध्यमिक, प्राथमिक शिक्षण विभागातील प्रत्येकी एक अशा दोन कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
- डॉ. कुणाल खेमनार, सीईओ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मराठा मोर्चासाठी सक्र‌िय योगदान द्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्ह्यातील खासदार आणि आमदारांनी मराठा मोर्चासाठी योगदान द्यावे, यासाठी लोकप्रतिनिधींची भेट घेण्याचा निर्णय सकल मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला. गुरुवारी सायंकाळी शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिरात मोर्चाच्या नियोजनासंदर्भात बैठक झाली

आठ ऑगस्ट रोजी मुंबईत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चासाठी कोल्हापुरातील मोठ्या संख्येने मराठा समाजातील लोकांनी उपस्थित राहण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. मुंबई मोर्चासाठी ‘महालक्ष्मी’, ‘सह्याद्री एक्स्प्रेस’ या रेल्वेगाड्या बूक करण्याची सूचना करण्यात आली. मुंबई, ठाणे, उपनगर परिसरात नातेवाईक, मित्रांकडे राहण्यासाठी कोल्हापुरातील नागरिकांनी आठ तारखेला जावे असे आवाहन करण्यात आले. जिल्ह्यातील चंदगड, आजरा, शाहूवाडी, गडहिंग्लज, पन्हाळा तालुक्यातील लोकांची मंडळे असून त्यांची सभागृहे आहेत. या सभागृहात एक दिवस निवासाची सोय व्हावी यासाठी संपर्क साधण्याचा निर्णय झाला. जिल्ह्यातील गोकुळसह अनेक सहकारी संस्था, बँकांची कार्यालये असून तिथे एक दिवस निवासाची सोय होण्याची शक्यताही व्यक्त केली. अशा संस्थांच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा निर्णय झाला. जिल्ह्यात तीन खासदार व बारा आमदारांची भेट घेऊन त्यांना मराठा मोर्चासाठी योगदान द्यावे यासाठी त्यांची भेट घेण्याचा निर्णय झाला. अधिवेशन सुरू असल्याने शनिवारी, रविवारी आमदार, खासदार कोल्हापुरात येतील अशी शक्यता आहे.

बैठकीला माजी नगरसेवक रविकिरण इंगवले, बाबा महाडिक, राजू सावंत, चंद्रकांत पाटील, दिलीप देसाई, फत्तेसिंह सावंत, अवधूत पाटील, सचिन तोडकर, अशोक पाटील, राजू लिंग्रस, नितीन सासने आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंबाबाई मंदिर पुजारी वाद हायकोर्टात?

$
0
0

म.टा. प्रतिनिधी । कोल्हापूर

श्री अंबाबाई मंदिरातील पुजाऱ्यांच्या अधिकारासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे सुरू असलेल्या सुनावणीत पुजारी हटाव संघर्ष समितीने दाखल केलेले तीन थर्डपार्टी अर्ज शुक्रवारी (ता. २८) वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश सी. व्ही. मराठे यांनी फेटाळले. याबाबत संघर्ष समितीच्या सदस्यांनी हायकोर्टात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे. दिवाणी न्यायालयातील पुढील सुनावणी २ ऑगस्टला होणार आहे.

श्री अंबाबाई मंदिरात पुजाऱ्यांनी देवीला घागरा-चोळीचा पोषाख परिधान केल्यानंतर मंदिरातील पुजाऱ्यांना हटवून सरकारने पगारी तत्त्वावर पुजाऱ्यांची नेमणूक करावी अशी मागणी पुजारी हटाव संघर्ष समितीने केली होती. या मागणीवरून पुजारी आणि पुजारी हटाव संघर्ष समितीमधील वाद वाढत असल्याने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दोन्ही बाजूचे म्हणणे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्याकडे मांडण्याची सूचना केली होती. पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार सुनावणी सुरू होताच पुजारी गजानन मुनीश्वर यांनी या सुनावणीच्या विरोधात दिवाणी न्यायालयात अपिल दाखल केले होते. ‘मंदिरातील पुजेचे मालकी हक्क पुजाऱ्यांना आहेत. याचे पुरावे पुजाऱ्यांकडे आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत सुनावणी घेण्याचे अधिकार नाहीत, त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांकडील सुनावणी स्थगित करावी,’ अशी मागणी मुनीश्वर यांनी केली होती. या अपिलावर पुजारी हटाव संघर्ष समितीनेही तीन अर्ज दाखल केले होते. आपले म्हणणे एकूण घेतल्याशिवाय निर्णय देऊ नये, अशी मागणी संघर्ष समितीने केली होती.

मंगळवारी (ता. २५) झालेल्या सुनावणीत न्यायाधीश सी. व्ही. मराठे यांनी संघर्ष समितीचे अर्ज दाखल करून घेतले, मात्र शुक्रवारी झालेल्या सुनावणीत दिलीप देसाई-दिलीप पाटील, आनंद माने-निशिकांत मेथे आणि प्रताप नाईक-वरुटे यांचे तीनही अर्ज फेटाळण्यात आले. पुजारी मुनीश्वर यांच्या अपिलावर स्वतंत्र म्हणणे मांडण्याची विनंती करणारा प्रताप नाईक-वरुटे यांचा दुसरा अर्ज मात्र कायम ठेवण्यात आला आहे. यावर बुधवारी (ता. २) सुनावणी होणार आहे. पुजारी मुनीश्वर यांच्या वतीने अॅड. नरेंद्र गांधी यांनी काम पाहिले, तर संघर्ष समितीच्या वतीने अॅड. प्रशांत चिटणीस, अजित मोहिते, सूर्यकांत चौगुले यांनी काम पाहिले. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांकडे सुरू असलेल्या सुनावणीला स्थगिती देण्याबाबत कोर्टाने काहीच निर्णय दिलेला नाही. जिल्हाधिकाऱ्यांकडील सुनावणी नियमित सुरू राहणार आहे, अशी माहिती जिल्हा विधी अधिकारी वैभव इनामदार यांनी दिली. सुनावणीसाठी इंद्रजित सावंत, दिलीप देसाई आनंद माने, गजानन मुनीश्वर, आदी उपस्थित होते.

हायकोर्टात दाद मागणार

पुजारी मुनीश्वर यांच्या अपिलावर दाखल केलेले अर्ज दिवाणी न्यायाधीशांनी फेटाळले असल्याने याविरोधात हायकोर्टात दाद मागण्याचा निर्णय पुजारी हटाव संघर्ष समितीने घेतला आहे. दिलीप देसाई, दिलीप पाटील, आनंद माने आणि निशिकांत मथे हे सोमवारी (ता. ३१) मुंबई हायकोर्टात अर्ज दाखल करणार आहेत. पुजाऱ्यांच्या अपिलावर संघर्ष समितीचे म्हणणे ऐकूण घ्यावे, अशी संघर्ष समितीची मागणी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ डॉ. प्रकाश वडगावकरांनासोलापूर विद्यापीठाचा जीवन गौरव पुरस्कार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर
सोलापूर विद्यापीठाच्या वतीने देण्यात येणारा जीवन गौरव पुरस्कार सोलापूर जिल्ह्याचे सुपुत्र आणि सध्या पुणे येथील सीएसआयआर या संस्थेत पॉलिमर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागात मुख्य शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत असलेले डॉ. प्रकाश पुरुषोत्तम वडगावकर यांना जाहीर झाला आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार यांनी शुक्रवारी या पुरस्काराची घोषणा केली.
सोलापूर विद्यापीठ १४व्या वर्षांत पदार्पण करीत असून, या निमित्त विविध कार्यक्रमांबरोबरच उत्कृष्ट महाविद्यालय, प्राचार्य, गुणवंत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावचे कुलगुरू प्रा. पी. पी. पाटील यांच्या हस्ते एक ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता विद्यापीठ प्रांगणात होणाऱ्या कार्यक्रमात गौरविण्यात येणार आहे.
डॉ. वडगावकर यांनी १९८२पासून एनसीएल व इतर संस्थांमध्ये मागील ३२ वर्षे संशोधन केले आहे. त्यांनी रसायन शास्त्र विषयात एमएससी अभ्यासक्रम शिवाजी विद्यापीठ तर पीएचडीचे संशोधन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पूर्ण केले आहे. या बरोबरच फ्रान्समधील बोर्डोक्स विद्यापीठ आणि इन्स्टिट्यूट ऑफ चार्लस गिहार्डस येथे व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून काम केले आहे. त्यांच्या नावे २३ आंतरराष्ट्रीय व दोन भारतीय पेटंटची नोंद झाली आहे.
२५ हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ, मानपत्र व गौरवचिन्ह, असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या शिवाय कॉलेज आणि प्राध्यापक यांनाही सन्मानित करण्यात येणार असल्याचे डॉ.मालदार यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भारत-चीन तणावावर चर्चा करा ः सुशीलकुमार शिंदे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर
अमेरिका आणि पकिस्तानात जाऊन तेथील पंतप्रधानांची गळाभेट घेण्यापेक्षा भारत आणि चीन यांच्यात सीमेवर सुरू असलेल्या तणावाबाबत प्रत्यक्ष चीनबरोबर चर्चा करावी. देशातील आजची परिस्थिती पाहता भारताला चीनबरोबर युद्ध करणे परवडणारे नाही, असा टोला माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नाव न घेता लगावला.
सोलापुरातील काँग्रेस भवनात पत्रकारांशी बोलताना शिंदे म्हणाले, ‘देशात आज सर्वत्र वातावरण ढवळून गेले आहे. परिस्थिती बिघडली आहे. जातीय दंगली होत आहेत, हे देशाच्या हिताचे नाही. जातीय दंगली वाढत असल्याचे कबूल करणे म्हणजेच हा प्रकार रोखण्यात केंद्र सरकारला अपयश आले आहे. धर्माच्या नावावर काम करणाऱ्या लोकांसोबत नितीशकुमार गेले याचे आश्चर्य वाटण्याचे काहीच कारण नाही. ज्याअर्थी त्यांनी तातडीने राजीनामा देण्याचा निर्णय घेतला त्याअर्थी त्यांचे आणि भाजपचे फार दिवसांपासून गुफ्तगू सुरू होते.’
दरम्यान. हिमाचल प्रदेशमध्ये सध्या कोणतेही बदल होणार नाहीत. तेथील निवडणुका डिसेंबरमध्ये आहेत. तिथेही दर पाच वर्षांनी वेगवेगळे सरकार सत्तेवर येते. कठीण परिस्थिती आहे, मात्र त्यावरही मात करण्यात यशस्वी होऊ, असेही शिंदे म्हणाले.
प्रियांका गांधी सध्यातरी सक्रिय होणार नाहीत
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या भाषणात सर्व पंतप्रधानांची नावे घेणे अपेक्षित असताना त्यांनी पंडित नेहरू यांचे नाव घेतले नाही, कोविंद अद्यापही राजकीय वातावरणात असल्याचे दिसून येते आणि ते देशाचे दुर्दैव आहे, अशी खंतही शिंदे यांनी व्यक्त केली. सोशल मीडियातून गांधी घराण्याची टिंगल करण्याची वाईट सवय काही लोकांना लागली आहे. राहुल गांधी शार्प आणि हुशार आहेत आणि तेच देशातील काँग्रेस पक्षाचे नौका चांगल्या पद्धतीने चालविण्यास समर्थ आहेत. प्रियांका गांधी सध्यातरी राजकारणात येणार नाहीत, असेही शिंदे एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.
सरसंघचालकांबाबतचे आरोप फेटाळले
सरसंघचालक मोहन भागवतांना दहशतवादी ठरवण्याचा प्रयत्न कॉँग्रेसने केला होता, असा आरोप एका वाहिनीने केला होता. त्याबाबत बोलताना शिंदे म्हणाले, ‘२००८ साली मी गृहमंत्री नव्हतो. त्यामुळे हे आरोप चुकीचे आहेत. ज्यांनी कोणी ही बातमी केली त्यांनी याचा विचार करायला हवा होता.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावणे बारा कोटींच्या थकबाकीपोटीरेल्वे विभागाची जलवाहिनी, ड्रेनेज लाइन तोडली

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर
सोलापूर रेल्वे विभागाकडे त्यांच्या विविध मिळकतींचे सुमारे ११ कोटी ७३ लाख २३ हजार ४०९ रुपये थकले आहेत. ही थकबाकी अनेक वर्षांपासूनची असून वेळोवेळी सांगूनही थकबाकी न भरल्याने शुक्रवारी डीआरएम कार्यालयासमोर हलगीनाद आंदोलन करून रेल्वेची जलवाहिनी आणि ड्रेनेज लाइन भर पावसात जेसीबीने आणि कर्मचाऱ्यांनी तोडली.
दरम्यान, यामुळे सोलापूर ते दिल्ली फोनाफोनी होऊन दोन तासानंतर डीआरएम अजयकुमार दुबे यांना जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांचा फोन गेला आणि भोसले यांनी सभागृह नेते पाटील यांना बोलून रेल्वेकडून आपण काही प्रमाणात थकबाकी भरून घेण्याची जबाबदारी घेतो, असे भोसले यांनी सांगितल्यानंतर आंदोलन थांबले. त्यानंतर पुन्हा पाणी लाइन आणि ड्रेनेज जोडण्याची प्रक्रिया सुरू झाली. हे सर्व आंदोलन आणि कारवाई सुरू असताना डीआरएम अजयकुमार दुबे किंवा अन्य प्रमुख अधिकारी नसल्याने खालच्या अधिकाऱ्यांची पुरती धांदल उडाली. दोन तास अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर हा तमाशा सुरू होता. जेसीबीच्या साहाय्याने ड्रेनेज लाइन तोडत असताना अनेक केबल उचकटल्या. मुख्य प्रवेशद्वाराजवळ मोठा खड्डा पडल्याने संपूर्ण रस्ता बंद झाला होता. सायंकाळपर्यंत पुन्हा पावसातच खड्डा बुजविण्याचे काम सुरू होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संभाजी भिडे यांच्या प्रसंगावधानाने वाचले अनेकांचे प्राण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली
काळ आला होता, पण वेळ आली नव्हती, या म्हणीचा प्रत्यय आणून देणारी आणि थरकाप उडविणारी घटना शुक्रवारी पहाटे मिरज-पंढरपूर रस्त्यावर घडली. श्रीशिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे सांगलीकडे येणाऱ्या एसटीमधून प्रवास करीत होते. पहाटेच्या सुमारास कुची गावाजवळ एसटी चालकाला काहीतरी होत आहे, हे भिडे यांच्या लक्षात आले. त्यांनी चालकाला त्वरीत एसटी रस्त्याच्या कडेला घेण्यास सांगितले. तत्काळ पुढे जाऊन पाहिले तर त्या चालकाला अर्धांगवायूचा झटका आला होता. भिडे यांनी फोनाफोनी करून चालकाला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये हलविले.
विविध कार्यक्रम, व्याख्यान आणि बैठकांच्या निमित्ताने संभाजी भिडे गुरुवारी नांदेड, तुळजापूर, सोलापूर या भागात होते. सोलापूरच्या सभेनंतर पुढे व्याख्यान असल्याने त्यांनी मुक्काम न करता रात्री उशिरा सोलापूरहून एसटीने सांगलीकडे प्रवास करण्याचा निर्णय घेतला. साडेबारा वाजण्याच्या सुमारास ते लातूर-कोल्हापूर ( एमएच २० बीएल ३९१४) या एसटीत बसले. चालकाच्या पाठीमागे असणाऱ्या सीटवर त्यांना जागा मिळाली. रात्रीची वेळ असल्याने सर्व प्रवाशी झोपेत होते. मात्र, भिडे जागेच होते. एसटी मिरज-पंढरपूर महामार्गावर कुची (ता. कवठेमहांकाळ) येथून पुढे जात असताना चालकाला काहीतरी होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. प्रसंगावधान ओळखून त्यांनी चालकाला एसटी बाजूला घेण्यास सांगितले. चालकांने एसटी बाजूला घेऊन रस्त्याकडेला उभी केली आणि त्यांना अर्धांगवायुचा झटका आला. भिडेंनी त्याच्याकडे धाव घेतली. त्यावेळी चालक मोहन चंदनशिवे (वय ५०, रा. लातूर) यांचा उजवा हात आणि पाय लुळा पडल्याचे दिसले. वेळ पहाटे साडेचारची. रस्त्यावर वर्दळ कमी आणि लांब पल्ल्याची गाडी असल्यामुळे तीही उशिराची असल्यामुळे गाडीत मोजकेच प्रवाशी होते. तेही झोपेतच होते. कोणाला काही सुचेनासे झाले होते. इतक्यात भिडे यांनी प्रवाशाच्या मोबाइल वरून कवठेमहांकाळमधील शिवप्रतिष्ठान तालुका अध्यक्ष प्रदीप शिंदे यांना घटनेची कल्पना दिली. ताबडतोब येण्यास सांगितले. सुदैवाने शिंदे हे त्याच महामार्गावर लांडगेवाडी येथे हॉटेल शिवटेक जवळ होते. त्यांनी कवठेमहांकाळमधील कार्यकर्ते प्रवीण देसाई, रोहित जाधव, निलेश पोतदार रणजित माने, संदीप मंडले यांना बोलावून घेऊन गाडीने घटनेच्या ठिकाणी धाव घेतली. प्रवाशी गांगरून गेले होते. रुग्णवाहिका बोलावून चालकाला मिरजेच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये पाठवले. त्यानंतर भिडे यांनी मिरजेचे कार्यकर्ते विनायक महिमकर, प्रमोद धुळूबुळू, नितीन चौगुले यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये जाऊन आवश्यक ती मदत करण्यास सांगितले. भिडे यांनी आगारप्रमुखांना फोनकरून दुसरा चालक बोलावून घेतला. पर्यायी चालक येताच प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला आणि त्याच एसटीने भिडे सांगलीला निघून आले. चालक चंदनशिवे यांच्यावर सरकारी हॉस्पिटलमधील प्राथमिक उपचारानंतर खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. भिडे यांच्या प्रसंगावधानाने एसटी चालक आणि एसटीमधील प्रवाशांचे जीव वाचले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुजाऱ्यांकडून शेतकरी, कामगाराचे शोषण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘व्यक्तीच्या जीवनात निर्माण होणाऱ्या प्रश्नांची सोडवणूक सहजपणे होण्यासाठी तो धर्माचा आधार घेतो. कर्मकांड, प्रार्थना, पूजा व स्वर्ग-नरकाच्या कल्पना त्याचे प्रश्न सोडवतील असे वाटते, पण तो अनुभव भ्रामक असतो. कर्मकांडामुळे आनंद, शांती, सुख मिळते असे वाटते. समाजवृक्षावर पुरोहितांची बांडगुळे शेतकरी, कामगारांचे शोषण करतात. शोषण करताना धर्माचा आधार अफूच्या गोळीप्रमाणे घेतात. या अफूच्या गुंगीत छत्रपती घराण्याप्रमाणे देवस्थान समितीही राहिल्याचा फायदा अंबाबाईच्या पुजाऱ्यांनी घेतला आहे,’ असे मत ज्येष्ठ विचारवंत डॉ. सुभाष देसाई यांनी व्यक्त केले. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात ‘शोध अंबाबाईचा’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अनिल चव्हाण होते.

डॉ. देसाई म्हणाले, ‘तत्वज्ञानाच्या बैठकीमध्ये रामायण, महाभारताबरोबर षङदर्शनाचाही समावेश आहे. त्यामध्ये चार्वाक, जैन व गुजर यांचाही समावेश आहे. धर्म म्हणजे जीवन जगण्याची पद्धत असताना त्याला पुजाऱ्यांनी कर्मकांडाची जोड दिली. धर्माचा स्वीकार अथवा नकार हा व्यक्त‌िगत प्रश्न असला, तरी अंबाबाईच्या लढाईमध्ये सर्वजण का सहभागी होत आहेत, याचाही विचार केला पाहिजे.’

‘अंबाबाई अदिशक्तीचे रुप असताना पुजाऱ्यांनी देवीला लक्ष्मी बनवले. लक्ष्मीच्या आशीर्वादाने भरभराट होत असल्याचे मनावर बिंबवल्याने मंदिरात गर्दी होऊ लागली. त्याचवेळी मंदिरातील देवी अंबाबाई असल्याचे प्रबोधनाच्या माध्यमातून सुरुवात केल्यानंतर पुजाऱ्यांनी विरोध करण्यास सुरुवात केली. तिरुपतीशी सांगड घालताना देवळाला एक एटीएम मशीनच त्यांनी बनविले. भाविकांच्या मनाच्या दुर्लबतेचा आधार घेत कर्मकांडात बांधून ठेवले. या कर्मकांडातून बाहेर काढण्यासाठी प्रबोधन आवश्यक आहे असे सांगून त्यांनी सत्यनारायण, श्राद्ध व वास्तूशांती न करण्याचे आवाहन केले.’

अध्यक्षस्थानावरुन बोलताना चव्हाण म्हणाले, ‘पुजाऱ्यांना बहुजनांकडून मिळणारे दान व दक्षिणा चालते, मग त्यांच्याकडून पूजा का चालू शकत नाही? पुजाऱ्यांची पदे सर्व जातीधर्मियांतून भरा, डॉ. दाभोलकर, पानसरे यांच्या खुनाशी संबंधित संघटनांना मंदिर प्रवेश देऊ नका, पुजाऱ्यांच्या उत्पन्नाची चौकशी केली पाहिजे.’

यावेळी गतवर्षी गाभारा प्रवेश करणाऱ्या सीमा पाटील, वैशाली महाडिक, स्नेहल कांबळे, आशा बरगे, रुपाली कदम, मीना चव्हाण, मीनल जाधव, सुनीता अमृतसागर यांच्यासह आंदोलनात सहभागी झालेल्या पूजा पाटील, अनिता जाधव, सुधा सरनाईक, सुनिता पाटील, सुनंदा चव्हाण, सुवर्णा मिठारी, सरिता सासने, स्मिता हराळे, वैशाली जाधव, चारुशीला पाटील, आयशा खान, सारिका पाटील यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार केला. यावेळी उमा पानसरे, बी. एल. बरगे, नामदेवराव गावडे, मिलिंद कदम, चंद्रकांत पाटील यांच्यासह भाकप व जिजाऊ ब्रिगेडच्या महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. प्रास्ताविक सतिशचंद्र कांबळे यांनी केले. विकास जाधव यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


संघर्ष समिती हायकोर्टात दाद मागणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

श्री अंबाबाई मंदिरातील पुजाऱ्यांच्या अधिकारासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे सुरू असलेल्या सुनावणीत पुजारी हटाओ संघर्ष समितीने दाखल केलेले तीन थर्ड पार्टी अर्ज शुक्रवारी (ता. २८) वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश सी. व्ही. मराठे यांनी फेटाळले. याबाबत समितीच्या सदस्यांनी हायकोर्टात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे. दिवाणी न्यायालयातील पुढील सुनावणी २ ऑगस्टला होणार आहे.

मंदिरात पुजाऱ्यांनी देवीला घागरा-चोली पोशाख परिधान केल्यानंतर पुजाऱ्यांना हटवून पगारी तत्त्वावर पुजाऱ्यांची नेमणूक करावी, अशी मागणी संघर्ष समितीने केली होती. यावरून पुजारी आणि पुजारी हटाओ संघर्ष समितीतील वाद वाढत असल्याने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्याकडे मांडण्याची सूचना केली होती. त्यानुसार सुनावणी सुरू होताच पुजारी गजानन मुनीश्वर यांनी या सुनावणीविरोधात दिवाणी न्यायालयात अपिल केले होते. मंदिरातील पूजेचे मालकीहक्क पुजाऱ्यांना आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत सुनावणी घेण्याचे अधिकार नाहीत. त्यामुळे ही सुनावणी स्थगित करावी, अशी मागणी मुनीश्वर यांनी केली होती. त्यावर संघर्ष समितीनेही तीन अर्ज दाखल केले होते. आपले म्हणणे ऐकून घेतल्याशिवाय निर्णय देऊ नये, अशी मागणी समितीने केली होती.

मंगळवारी (ता. २५) झालेल्या सुनावणीत न्यायाधीश सी. व्ही. मराठे यांनी समितीचे अर्ज दाखल करून घेतले. मात्र शुक्रवारी झालेल्या सुनावणीत दिलीप देसाई-दिलीप पाटील, आनंद माने-निशिकांत मेथे आणि प्रताप नाईक-वरुटे यांचे तीनही अर्ज फेटाळण्यात आले. मुनीश्वर यांच्या अपिलावर स्वतंत्र म्हणणे मांडण्याची विनंती करणारा प्रताप नाईक-वरुटे यांचा दुसरा अर्ज मात्र कायम ठेवला आहे. यावर बुधवारी (ता. २) सुनावणी होणार आहे. मुनीश्वर यांच्या वतीने अॅड. नरेंद्र गांधी यांनी काम पाहिले, तर संघर्ष समितीच्यावतीने अॅड. प्रशांत चिटणीस, अजित मोहिते, सूर्यकांत चौगुले यांनी काम पाहिले. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांकडे सुरू असलेल्या सुनावणीला स्थगिती देण्याबाबत कोर्टाने काहीच निर्णय दिलेला नाही. जिल्हाधिकाऱ्यांकडील सुनावणी नियमित सुरू राहणार आहे, अशी माहिती जिल्हा विधी अधिकारी वैभव इनामदार यांनी दिली. सुनावणीसाठी इंद्रजित सावंत, दिलीप देसाई आनंद माने, गजानन मुनीश्वर, आदी उपस्थित होते.

हायकोर्टात दाद मागणार

पुजारी मुनीश्वर यांच्या अपिलावर दाखल केलेले अर्ज दिवाणी न्यायाधीशांनी फेटाळले असल्याने याविरोधात हायकोर्टात दाद मागण्याचा निर्णय पुजारी हटाओ संघर्ष समितीने घेतला आहे. दिलीप देसाई, दिलीप पाटील, आनंद माने आणि निशिकांत मेथे सोमवारी (ता. ३१) मुंबई हायकोर्टात अर्ज दाखल करणार आहेत. पुजाऱ्यांच्या अपिलावर संघर्ष समितीचे म्हणणे ऐकून घ्यावे, अशी संघर्ष समितीची मागणी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वाइन फ्ल्यूने कोपार्डेतील महिलेचा मृत्यू

$
0
0

कुडित्रे

स्वाइन फ्ल्यूमुळे करवीर तालुक्यातील कोपार्डे येथील संगीता युवराज नंदीवाले (वय ३५) या महिलेचा मृत्यू झाला . तर गावातील आणखी एका वृद्ध रुग्णावर खासगी दवाखान्यात उपचार सुरू असल्यामुळे भीतीचे वातावरण पसरले असून गावात आरोग्य खात्याची १० पथके दाखल झाली आहेत.

आरोग्य पथकाकडून घरोघरी जाऊन पाहणी केली जात आहे. या पाहणीत गावात स्वाईन फ्ल्यूचा आणखी एक रुग्ण आढळल्यामुळे त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सांगरुळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. बी. घुणकीकर यांच्या मार्गदर्शनाखाली गावात जनजागृती , तपासणी तसेच उपचार सुरू आहेत.

सांगरुळ फाट्याजवळील नंदीवाले वसाहतीत राहणाऱ्या संगीता नंदीवाले या गेल्याच आठवड्यात जत तालुक्यातील उफळापूर येथून यात्रा करून परत आल्या होत्या. तिकडून आल्यानंतर त्यांना ताप , खोकला सुरू झाला. स्थानिक दवाखान्यात उपचार घेऊनही ताप कमी न आल्याने त्यांना कोल्हापूर येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे तपासणीनंतर संगीता यांना स्वाईन फ्ल्यू झाल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, हा आजाराचे प्रमाण वाढल्यामुळे उपचार सुरु असतानाच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोग्य विभाग खडबडून जागे झाले असून १० आरोग्य पथकांच्या साहाय्याने घरोघरी तपासणी सुरू झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इचलकरंजीत७२ हजारांचा मुद्देमाल लंपास

$
0
0

इचलकरंजी

येथील बंडगर माळ परिसरातील बंद घराचा कडी-कोयंडा उचकटून चोरट्यांनी चारतोळे सोन्याच्या दागिन्यांसह २० हजाराची रोख रक्कम असा ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी तानाजी राजाराम भोसले (वय ४९) यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

बंडगर माळ परिसरात तानाजी भोसले हे कुटुंबियांसह राहण्यास आहेत. त्यांचे स्वत:चे सलून दुकान आहे. गुरुवारी आजारी नातेवाईकांना पाहण्यासाठी ते कुटुंबियांसह बेळगाव येथे गेले होते. बेळगावहून शुक्रवारी सकाळी परत आल्यानंतर घराचा दरवाजा उघडा असल्याचे दिसून आले.त्यांनी आत जाऊन पाहिले असता तिजोरी फोडल्याचे व आतील लॉकर उचकटल्याचे निदर्शनास आले. त्यांनी या संदर्भातील माहिती शिवाजीनगर पोलिसांना दिली असता घटनास्थळी येऊन पोलिसांनी माहिती घेतली. घरात कोणी नसल्याचे पाहून चोरट्यांनी कडी-कोयंडा उचकटून आतील खोलीतील तिजोरी फोडून लॉकर उचकटून त्यातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केल्याचे दिसून आले. चोरट्यांनी दीड तोळ्याची सोन्याची लगड, सोन्याच्या तीन अंगठ्या व नथ, अर्धातोळ्याचे कानातील सोन्याचे वेल, चांदीचा बाजूबंद व २० हजाराची रोकड मिळून ७२ हजाराचा मुद्देमाल लांबविला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

९४ गावांत दूष‌ित पाणी पुरवठा

$
0
0

Bhimgonda.Desai@timesgroup.com

Tweet : @bhimgondaMT

कोल्हापूर: जिल्ह्यातील तब्बल ९४ गावात दूष‌ित पाण्याचा पुरवठा होत आहे. ऐन पावसाळ्यात या गावातील नागरिकांनी दूषित पाणी प्यावे लागत असून जलजन्य आजारांची लागण होण्याचे प्रमाण वाढले आहे. यापार्श्वभूमीवर आरोग्य विभाग सतर्क झाला असून जागृती करीत आहे. स्वच्छ, निर्जतुंक पाणी पुरवठा करण्याची सूचना सर्व ग्रामपंचायतींना दिल्या असल्या तरी, यंत्रणाच नसल्याने दुष‌ित पाणीपुरवठा होत आहे.

गावपातळीवर आरोग्य सेविका, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागकडील जलरक्षक पाणी नमुणे प्रत्येक महिन्याला घेतात. ते नमुणे सरकारच्या प्रयोगशाळेत तपासले जातात. जून महिन्यातील तपासणी अहवालात ९४ गावात पिण्याचे पाणी दूष‌ित असल्याचे समोर आले. मुख्य किंवा अंतर्गंत नळपाणी पुरवठा होणारी पाइप फुटलेल्या ठिकाणी सांडपाणी मिसळणे, पावसामुळे जलस्रोत दुष‌ित होणे, जलस्रोतांजवळील परिसरातील अस्वच्छता या कारणांमुळे पाणी दूष‌ित झाले आहे. पर्यायी व्यवस्था नसल्याने हेच दूष‌ित पाणी पिल्याशिवाय गत्यंतर नाही.

शुद्ध पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची आहे. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले आहे. शिवाय बहुतांश पाणीपुरवठा योजना नदीकाठावर, ओढ्यांच्या काठावर आहेत. त्यामुळे नद्यांना, ओढ्यांना आलेले दूषित पाणी योजनेद्वारे टीसीएल पावडर टाकून गावाला पुरविले जाते. त्यामुळे पाण्यापासून होणाऱ्या कावीळ, गॅस्ट्रो, अतिसार, पोटदुखी, कॉलरा यांसारख्या आजाराची लागण होत आहे. दूष‌ित पाणी, डासांपासून आजार होऊ नयेत यासाठी केलेल्या उपाययोजना, बाधित रुग्णांचा आढावा घेण्यासाठी ३१ जुलै रोजी सकाळी १० वाजता येथील पिवळावाडा येथे आरोग्य कर्मचाऱ्यांची बैठक बोलावली आहे. दूष‌ित पाणी पुरवठा होत असलेल्या गावांवर आरोग्य विभागाने विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. पाण्यात टीसीएल पावडर टाकून उकळून पाणी प्यावे, असे आवाहन केले आहे.



दूषित पाणीपुरवठा होणारी गावे

करवीर: हसूर दुमाला, ‌गिरगाव, तेरसवाडी, शिंगणापूर.

आजरा : मेंढोली, बोलकेवाडी.

भुदरगड: आदमापूर, कलनाकवाडी, मुदाळ, नवरसवाडी, महाळवाडी, हेदवडे, पाचवडे, तांबाळे, कारिवडे, हुडा, चाफेवाडी, पिंपळगाव, आरळकुंडी, पांगिरे.

चंदगड: मोऱ्याचीवाडी, केंचेवाडी, नागनवाडी, चंदगड, बामणकीवाडी.

गडहिंग्लज : हिरलगे, हुनगिनहाळ, डोनेवाडी, बेकनाळ, शिप्पूर, शेंद्री, शिंदेवाडी, हिटणी, तुपूरवाडी, कडाल, मनवाड, बुगडीकट्टी.

कागल: आणूर, बस्तवडे, म्हाकवे, चिखली, वडगाव, बोळावी, हणबरवाडी, मौजे सांगाव, कसबा सांगाव, वंदूर, सावर्डे, पिराचीवाडी, यमगे.

हातकणंगले: घुणकी, किणी, लाटवडे, भादोले, मौजे वडगाव, अंबपवाडी, तळसंदे, दुर्गेवाडी, यळगुड, रांगोळी, कोडोली, चंदूर.

पन्हाळा: वाळोली, काळजवडे, माले, गिरोली, कुशिरे तर्फे ठाणे, उत्रे, तेलवे.

राधानगरी: अवचीत, म्हासुर्ली, बाजारवाडा, पावदुंकावाडी, पापाचीवाडी, आयरेवाडी, दाउतवाडी, शेळेवाडी, भोपाळवाडी.

शाहूवाडी : बजागेवाडी, सरूड, सुपाली, गोंडोली, सावर्डे खुर्द, उचत, शिराळे तर्फे मलकापूर.

शाहूवाडी : उदगिरी, करूगंळे.

शिरोळ : जुने दानवाड, टाकळी, धरणगुत्ती, टाकवडे, कवठेगुंदल, बुबनाळ, आलास.



१२६२ पाण्याचे नमुने

जून महिन्यात जिल्ह्यातील १२६२ पाण्याचे नमुणे घेण्यात आले. त्यामधील ११७ पाणी नमुणे दूष‌ित मिळाले. हे दूष‌ित नमुणे ९४ गावातील आहेत. याच गावात वारंवार दूष‌ित पाणी पुरवठा होत आहे. त्याकडे ग्रामपंचात प्रशासनाने दूर्लक्ष केल्याने जलजन्य आजाराची लागण होत आहे.


दूष‌ित पाणीपुरवठा होणाऱ्या गावातील ग्रामपंचायतींना सूचना दिल्या आहेत. टीसीएल पावडर टाकून आणि उकळूनच पाणी प्यावे, असे आवाहन केले आहे. दूष‌ित पाणीपुरवठा होणार नाही, याकडे आरोग्य विभागाचे कर्मचाऱ्याही लक्ष देत आहेत.

सुषमा देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (स्वच्छता व पाणीपुरवठा)


दूषीत पाणी व डासांपासून आजारांचा फैलाव होऊ नये, यासाठी आरोग्य विभागने गावपातळीवर नियोजन केले आहे. ग्रामपंचायत प्रशासनाशी पत्रव्यवहार केला आहे. त्यांना सूचना दिल्या आहेत. साथीच्या आजारासंबंधी व्यापक जागृतीसाठी पत्रके वाटप केलेत.

डॉ. संतोष तावशी, जिल्हा साथ रोग तज्ज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तहसीलदारांच्या बदलीसाठी गारगोटीत कडकडीत बंद

$
0
0

गारगोटी

सरसकट कर्जमाफीसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचा अपमान करून ताटकळत ठेवणाऱ्या भुदरगडचे तहसीलदार व नायब तहसीलदार यांची तातडीने बदली करावी, या मागणीसाठी पुकारलेल्या गारगोटी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद ठेऊन कडकडीत बंद ठेवला तर शहरातील शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती.

सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी अन्यायी असून सरसकट कर्जमाफी द्यावी, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी शांततेने मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी शेतकरी आले होते. पण शेतकऱ्यांना तब्बल तीन तास ताटकळत ठेऊन निवेदन स्वीकारले गेले नाही. त्यामुळे आंदोलनासाठी तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शेतकऱ्यांचा अपमान झाला. अशा हेकेखोर तहसीलदार व नायब तहसीलदार यांची तातडीने बदली करावी, या मागणीसाठी गारगोटी बंद पुकारण्यात आला होता. आंदोलनकर्त्यांनी हुतात्मा चौकात तहसीलदार व नायब तहसीलदार यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली.

यावेळी कॉ.दत्ता मोरे म्हणाले ‘तहसीलदार कार्यालयातील अधिकारी काम कमी व पण हप्ते जमा करण्यात मग्न असतात. जनतेशी उद्धट वागणाऱ्या अधिकाऱ्यांना धडा शिकविण्याची गरज आहे. ’माजी सरपंच सर्जेराव देसाई म्हणाले, ‘तहसीलदारांनी शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारण्यास नकार देऊन शेतकऱ्यांची चेष्टा केली आहे. त्यांची तात्काळ बदली करावी.’ कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष शामराव देसाई यांनी सरकारने सरसकट कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांना साथ द्यावी, असे आवाहन केले. या आंदोलनात तालुका संघाचे तालुकाध्यक्ष बाळ देसाई, कॉ. राम कळंबेकर, मधुकर देसाई, शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रकाश पाटील विश्वनाथ कुंभार, व्ही.जे.कदम, उदय शिंदे, सरपंच गीता चिले, उपसरपंच अरुण शिंदे, राजू काझी, अंकुश चव्हाण,मयूर पाटील आदी सहभागी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दरोड्यातील चंदन तेल मुंबईत, पथक रवाना

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

प्रयाग चिखली (ता. करवीर) येथील वनविभागाच्या नर्सरीत दरोडा टाकून लुटलेले ६० लाखांचे चंदन तेल मुंबईच्या माजगांव परिसरातून ताब्यात घेण्याची प्रक्रिया शुक्रवारी रात्री पोलिसांनी सुरू केली आहे. संशयितांकडून चंदनाची लाकडे आणि तेल ताब्यात घेण्याचे काम सुरू होते. संशयितांनी भाजीपाला वाहतूक करणाऱ्या वाहनांतून लाकडे आणि तेल मुंबईकडे नेल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाल्याचे पोलिसांनी सांगितले. चंदन ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे पथक रात्री माजगांकडे रवाना झाले आहे.

११ जुलै रोजी पहाटे वनविभागाच्या प्रयाग चिखली येथील नर्सरीतून आठ ते दहा चोरट्यांनी पाच टन चंदन आणि चंदन तेलाचे ४ डबे लंपास केले होते. या मुद्देमालाची किंमत ७० लाख रुपये असून, अवैध वाहतुकीच्या संशयावरून वन विभागाने हा मुद्देमाल जप्त केला होता. या नर्सरीतून चंदनाची लाकडे, रक्तचंदन व १०० लिटर चंदन तेल असा ७० लाख रुपयांचा मुद्देमाल लुटून नेला होता. चोरट्यांनी सुरक्षा रक्षकांना दोरीने बांधून ही लूट केली होती. पोलिसांनी या प्रकरणी कोकण, कर्नाटक आणि केरळमधील लाकडाच्या वखारीची तपासणी सुरू केली होती. राष्ट्रीय महामार्गावरील एका धाब्यावर दरोडेखोर जेवणासाठी थांबले होते. तेथे त्यांचे सीसीटीव्ही फुटेज मिळाल्यानंतर करवीर व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पंढरपूर व सांगली येथील चौघा संशयितांना ताब्यात घेतले होते. संशयिताकडून शुक्रवारी रात्री संबंधित तेल मुंबईतील माजगाव येथील तस्कराकडे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या संशयितांपैकी एकाला ताब्यात घेऊन गुन्हे अन्वेषणचे पथक मुंबईला रवाना झाले. तेल ताब्यात घेऊन कोल्हापुरात आणण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याप्रकरणी चंदन तेल तस्करांची मोठी टोळी हाती लागण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इचलकरंजीत काँग्रेसचा धडक मोर्चा

$
0
0

इचलकरंजी

कोलमडलेली रेशनिंग व्यवस्था, झोपडपट्टी पुनर्वसनाचा रेंगाळलेला प्रश्न, संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांचे रखडलेले प्रश्न, घरेलु कामगारांच्या समस्या आणि पंतप्रधान आवास योजनेतील जाचक अटी यासह सर्वसामान्यांशी निगडीत विविध प्रश्नांची निर्गत करुन सर्वसामान्यांना त्यांचा हक्क मिळावा यासाठी इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने प्रांताधिकारी कार्यालयावर प्रचंड धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी निवेदन स्वीकारण्यास प्रांताधिकारी उपस्थित नसल्याने आंदोलकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत उपस्थित अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने प्रकाश मोरे यांच्या नेतृत्त्वाखाली विविध न्याय मागण्यांसाठी शुक्रवारी प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. महात्मा गांधी पुतळा येथून सुरु झालेला मोर्चा प्रमुख मार्गावरुन प्रांत कार्यालयावर आला असता तेथे मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. त्यानंतर प्रकाश मोरे यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळाने तहसीलदार वैशाली राजमाने यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले. वेळ घेऊनही प्रांताधिकारी निवेदन स्वीकारण्यास उपस्थित न राहिल्याने आंदोलकांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत प्रांताधिकारी येईपर्यंत न हटण्याची भूमिका घेतली. त्यावर तहसीलदार राजमाने यांनी समजूत काढत चर्चा केली.

यावेळी बोलताना मोरे यांनी, सातत्याने गाऱ्हाणी मांडूनही सरकारला जाग येत नसल्याने जनतेच्या भावना मांडण्यासाठी हा मोर्चा काढला आहे. लाभदायक योजना बंद करुन भाजप सरकार गोरगरीबांच्या जीवावर उठले आहे. त्यांना केवळ राजकारण करायचे असून जनतेशी काहीही देणे-घेणे नाही. केशरी रेशनकार्डावर पूर्वीच्या काळात मिळणारे धान्य आणि रॉकेल तीन वर्षापासून मिळाले नसल्याने सर्वसामान्यांसह कष्टकरी कामगारवर्गाची परवड होत आहे. ते अन्नधान्य पूर्वीप्रमाणे देण्यात यावे, पंतप्रधान आवास योजनेत लाभार्थ्यासाठी पाच किलोमीटर अंतराची अट घातली आहे. या अटीमुळे लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळणार नसल्याने ती अट शिथिल करण्यात याव्यात, संजय गांधी श्रावणबाळ योजनेसाठी २१ हजार रुपये उत्पन्नाची अट रद्द करुन ती ५० हजार रुपये करावी, प्रति लाभार्थी १२ रुपये सेवा कराची अन्यायी वजावट केली जात असून ती रद्द व्हावी, मुळातच संगांयोमधील अनेक लाभार्थ्यांना ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्याचा घाट घातला जात आहे. पण अनेक लाभार्थी हे अशिक्षित असताना ऑनलाईन पध्दत चुकीची असल्याने पूर्वीप्रमाणेच ऑफ लाईन पध्दत अवलंबावी, वाढत्या महागाईमया काळात संगांयो लाभार्थ्यांना मिळणारे अनुदान तुटपुंजे ठरत असून सर्वच लाभार्थ्यांना १५०० रुपये अनुदान मिळावे, कामगार कल्याण मंडळातर्फे ५५ वय पूर्ण झालेल्या घरेलू महिला कामगार तीन वर्षापासून सन्मानधनापासून वंचित आहेत. लवकरच गणेशोत्सव व त्यानंतर दसरा, दिवाळी असे सण येत आहेत. तत्पूर्वी या सर्व मागण्यांची निर्गत तातडीने करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.

यावेळी अशोकराव सौंदत्तीकर, अशोकराव आरगे, बाळासाहेब कलागते, शामराव कुलकर्णी, अहमद मुजावर, शेखर शहा, विलास गाताडे, सुनिल पाटील, संजय केंगार, नरसिंह पारीक यांच्यासह कार्यकारीणी सदस्य, विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी, नगरसेवक-नगरसेविका, महिला, युवक, एनएसयुआय, सेवादल, झोपडपट्टी, कामगार, विविध सेलचे प्रमुख, विभागप्रमुख यांच्यासह असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डॉल्बीमुक्तीचा निर्धार

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

सार्वजनिक गणेशोत्सवात यंदा एकाही मंडळाने डॉल्बीचा दणदणाट करू नये यासाठी पोलिस प्रशासनाने कंबर कसली आहे. पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन मंडळांना केले जात असून, ध्वनिप्रदूषण करणाऱ्या मंडळांना जबर शिक्षेला सामोरे जावे लागणार आहे, असा इशारा विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी दिला आहे. गतवर्षीच्या डॉल्बीवाल्या १६ मंडळांना कोर्टात खेचल्यानंतर यंदा शंभर टक्के डॉल्बीमुक्तीसाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. पोलिसांच्या डॉल्बीमुक्त उत्सव आवाहनाला मंडळेही सकारात्मक प्रतिसाद देत आहेत.

राज्यात सर्वत्र मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. अलिकडे मात्र गणेशोत्सवातील विधायक उपक्रमांची जागा डॉल्बी साऊंड सिस्टिम आणि तरुणांच्या नाचगाण्यांनी घेतली आहे. १०० ते १५० डेसिबलपर्यंत आवाज वाढवून कानठिळ्या बसवणाऱ्या डॉल्बीच्या भिंती उभ्या केल्या जातात. डॉल्बीच्या स्पर्धेतून मंडळांमध्ये वाद उद्भवतात. यातून मारामारी होऊन उत्सवाच्या पावित्र्यावर विरजण पडते. २०१५ मध्ये तत्कालीन पोलिस अधीक्षक विजयसिंह जाधव यांनी केलेल्या डॉल्बीमुक्त उत्सवाला मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. यानंतर २०१५ मध्ये काही मंडळांनी ऐनवेळी डॉल्बीचा दणदणाट केला. गेल्यावर्षी तर पोलिसांनी प्रबोधन करूनही १६ मंडळांनी विसर्जन मिरवणुकीत आवाज मर्यादेचे उल्लंघन केलेच.

विघातक प्रकार रोखून गणेशोत्सवानिमित्त तरुणाईची ऊर्जा विधायक उपक्रमांकडे वळवण्याचा प्रयत्न पोलिस प्रशासनाकडून सुरू आहे. यंदा पुन्हा एकदा पोलिसांनी मंडळांना डॉल्बीमुक्त उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. यासाठी डॉल्बीमालकांची बैठक घेऊन ६० डेसिबल आवाजाचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. परिक्षेत्रातील सर्वच ठाण्यांच्या अंतर्गत असलेल्या गणेश मंडळांच्या पदाधिकऱ्यांची बैठक घेऊन त्यांना डॉल्बीऐवजी विधायक उपक्रम राबवण्याचे आवाहन केले जात आहे. शिवाय आवाज मर्यादेचे उल्लंघन केल्यास डॉल्बी सिस्टिम आणि वाहने जप्त केली जाणार आहेत. शिवाय मंडळातील सर्व पदाधिकारी, सदस्य, डॉल्बीमालक, वाहनचालक, जनरेटर मालक यांच्यावरही गुन्हे दाखल केले जाणार आहेत, अशी माहिती नांगरे-पाटील यांनी दिली आहे.

विशेष म्हणजे मंडळांनीही पोलिसांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. डॉल्बीऐवजी पारंपरिक वाद्यांचा वापर करण्यासह विधायक उपक्रमांची जोड देण्याचेही मान्य केले आहे. मंडळांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे यंदाचा गणेशोत्सव डॉल्बीमुक्त साजरा होण्याची आशा वाढली आहे.


दंडावर निभावले

२०१५ च्या गणेशोत्सवात आगमन व विसर्जन मिरवणुकीत ८० मंडळांनी डॉल्बी लावून आवाज मर्यादेचा भंग केला होता. पोलिसांनी ८० मंडळांवर मुंबई पोलिस ॲक्टनुसार कारवाई करून त्यांना कोर्टात खेचले होते. या प्रत्येक मंडळांवर कोर्टाने २१ ते २५ हजार रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाई केली होती. दंडावर त्या मंडळांचे निभावले होते.


१६ मंडळांचे कोर्टात हेलपाटे

गेल्यावर्षी उत्सवापूर्वी दोन महिने पोलिसांनी मंडळांचे प्रबोधन केले. कडक कारवाई होऊ शकते, कायद्याचा भंग करून नका, असे सांगितले जात होते. तरीही शहरातील १६ मंडळांनी विसर्जन मिरवणुकीत डॉल्बीच्या भिंती उभ्या केल्या. पोलिसांनी या मंडळांचे पदाधिकारी, सदस्य, डॉल्बीचालक, मालक, ट्रॅक्टर-ट्रॉलीमालक, ट्रकचालक व मालक अशा ८० जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. कोर्टात हा गुन्हा सिध्द झाला तर प्रत्येक दोषीला दंड व तीन वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयुक्त, अधिकाऱ्यांचे पगार रोखा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहराच्यादृष्टीने महत्त्वाच्या विषयांची चर्चा होणे अपेक्षित असताना बैठकीला गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांबद्दल स्थायी समितीच्या बैठकीत शुक्रवारी तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. समितीच्या बैठकीला गैरहजर राहणारे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांचा आठ दिवसांचा पगार रोखून त्यांची वाहने काढून घेण्याचा ठराव स्थायी समितीच्या बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला. अधिकारी सातत्याने गैरहजर राहत असल्याच्या घटनेचा निषेध त्यांच्या खुर्च्या पुजून करण्यात आला. या घटनेमुळे नगरसेवक आणि प्रशासन आमने सामने आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी सभापती डॉ. संदीप नेजदार होते.

शुक्रवारी स्थायी समितीची बैठक होती. त्याचवेळी सकाळी अकरा वाजता आयुक्त चौधरी यांनी त्यांच्या कार्यालयात फेरीवाला पुनर्वसनाच्या धोरणासंबधी बैठक घेतली होती. दोन्ही बैठका एकाचवेळी असल्याने आयुक्तांसह अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर आणि अन्य अधिकारी स्थायी समितीच्या बैठकीकडे फिरकलेच नाहीत. दुपारी एक वाजेपर्यंत वरिष्ठ अधिकारी उपस्थित नसल्याने सभापती डॉ. नेजदार, नगरसेवक सत्यजीत कदम यांच्यासह स्थायीचे सदस्य आयुक्तांच्या बैठकीत घुसले. अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीबद्दल सदस्यांनी आयुक्तांना धारेवर घेतले. अखेर आयुक्तांनी फेरीवाला पुनर्वसनाची बैठक रद्द करुन अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले.

अतिरिकत आयुक्त पाटणकर, सहायक आयुक्त मंगेश शिंदे, प्रभारी सहायक आयुक्त संजय भोसले, मुख्य लेखा विभाग अधिकारी संजय सरनाईक स्थायीच्या बैठकीत हजर राहण्यासाठी सभागृहात आले. पण, सदस्यांनी त्यांना बैठकीत बसू दिले नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांना दारातच ताटकळत रहावे लागले. सभेला उपस्थित अ​सलेले नगरसचिव दिवाकर कारंडे, नगररचना विभागाचे सहायक संचालक धनंजय खोत, प्रभारी मुख्य आरोग्य निरीक्षक विजय पाटील यांच्यासमवेत सदस्यांनी बैठक घेतली. जे अधिकारी उपस्थित नव्हते त्यांच्या खुर्च्यांना फुले वाहून प्रतिकात्मक निषेध करण्यात आला. त्यानंतर सर्व सदस्यांनी सभेला गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांच्याबद्दल ठराव मांडला. स्थायी सभेला उपस्थित राहण्यासाठी प्रशासनाने सर्व अधिकाऱ्यांना कायदेशीर आदेश काढला असताना स्थायी समितीच्या बैठकीवेळीच फेरीवाला पुनर्वसनाची बैठक घेऊन नियम भंग केला आहे. गैरहजर अधिकारी दोषी ठरत असल्याने त्यांची वाहने आठ दिवस काढून घेण्यात यावीत, पगारवाढ रोखण्याबरोबरच त्यांना आठ दिवस पगार देण्यात येऊ नये, असा ठराव करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे कोणत्याही क्षणी खुले होण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. शुक्रवारी रात्री उशिरा राधानगरी धरण भरण्यासाठी केवळ एक फूट पाणी पातळी कमी होती. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने राधानगर धरणाचे दरवाजे खुले होण्याची शक्यता आहे. रात्री उशिरा या धरणातून १८०० वरून २२०० क्युसेक पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला.

गेले चार दिवस शहर परिसरात पावसाने विश्रांती घेतली असली तरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील दमदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणाचा पाणीसाठा वाढला आहे. राधानगरी धरणासह काळम्मावाडीच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस असल्याने पाणीसाठ्यात सातत्याने वाढ झाली. गेल्या आठवड्यात राधानगरी धरणाचा पाणीसाठा ९० टक्के होता. पाणलोट क्षेत्राला पावसाने झोडपल्याने राधानगरी धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने शुक्रवारी रात्री जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. राधानगरी धरणाचे दरवाजे खुले झाल्यास भोगावती, पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार आहे.

सध्या पंचगंगेची राजाराम बंधाऱ्याजवळील पाणीपातळी २० फूट ९ इंच आहे. धरणाचे दरवाजे खुले झाल्यास पाणी पातळीत झपाट्याने वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचा फटका राधानगरी परिसरातील नदीकाठच्या गावांना बसणार आहे. भोगावती आणि पंचगंगा नदीची पाणीपातळी वाढल्याने नदीचे पाणी इशारा पातळीपर्यंत जाण्याची शक्यता आहे. राधानगरीतील वीजगृहासह धरणांतून २५०० क्युसेक विसर्ग झाल्यास पाणी पातळी वाढण्याची शक्यता गृहित धरून जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना इशारा दिला आहे. आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाने संबधितांना सूचना दिल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापनासाठी तैनात असलेल्या यंत्रणेला सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. पोलिस ठाणे, तहसीलदार कार्यालये, गटविस्तार अधिकारी, तलाठी यांनीही शुक्रवारी रात्री संबधितांना सूचना दिल्या. पुराच्या पाण्यात साहित्य, जनावरे वाहून जाण्याची भीती असल्याने ते सुरक्षितस्थळी हलविण्याच्या सूचना केल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवदर्शनासाठी आलेला तरुण पंचचंगेत बुडाला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जालना येथून देवदर्शनासाठी कोल्हापुरात आलेला योगेश भाऊसो जगताप (वय २०, रा. राजूर गणपती, जि. जालना) हा तरुण पंचगंगा नदीत बुडाला. योगेशसोबत पाण्यात उतरलेला अर्जुन राजेंद्र मसलेकर हा तरुण वाहून जाताना सुदैवाने बचावला. शुक्रवारी (ता. २८) सकाळी ही दुर्घटना घडली. बुडालेल्या तरुणाचा रात्री उशिरापर्यंत अग्निशामक दलाच्या वतीने पंचगंगा नदीपात्रात शोध सुरू होता.

जालना जिल्ह्यातील राजूर गणपती येथील नऊ तरुण शुक्रवारी सकाळी रेल्वेने कोल्हापुरात पोहोचले. पंचगंगा नदीमध्ये आंघोळ करून पुढे ते जोतिबाला जाणार होते, त्यामुळे सकाळी सातच्या सुमारास हे सर्वजण पंचगंगा नदी घाटावर पोहोचले. योगेश जगताप आणि अर्जुन मसलेकर हे दोघे वाहत्या पाण्यात गेल्यानंतर पाण्याच्या प्रवाहाने आत खेचले. दोघेही पाण्यात बुडत असल्याचे लक्षात येताच इतर मित्रांनी या दोघांना वाचवण्याचा प्रयत्न केला. यातील मसलेकर याला वाचवण्यात यश आले, मात्र जगताप हा पाण्यातून वाहून गेला. स्मशानभूमीसमोरील नदीपात्रात तो नाहीसा झाला. नदीवरील नागरिकांना हा प्रकार लक्षात येताच अग्निशामक दल आणि करवीर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. अग्निशामक दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन बुडालेल्या तरुणाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तानाजी कवाळे, अनिल शिनगारे, सुनील काईंगडे, अभिजित पटनाईक, उदय शिंगे, सुरेश जगदाळे या जवानांनी घटनास्थळी शोधमोहीम राबवली. दिवसभरात पंचगंगा नदीघाट ते राजाराम बंधाऱ्यापर्यंत शोध घेण्यात आला, मात्र रात्री उशिरापर्यंत बुडालेल्या तरुणाचा शोध लागला नाही.

देवदर्शनासाठी आलेल्या तरुणांच्या डोळ्यासमोरच मित्र वाहून गेल्याने तरुणांना मोठा धक्का बसला. पोलिसांनी दुर्घटनेची माहिती राजूर गणपती या गावाकडे कळवली असून, नातेवाईक कोल्हापूरला येण्यासाठी निघाले आहेत. दरम्यान, पाण्यात वाहून जाताना बचावलेला अर्जुन मसलेकर याच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चेअरमन,संचालकांवर फसवणूकप्रकरणी गुन्हा

$
0
0

हातकणंगले

मिणचे (ता.हातकणंगले) येथील लक्ष्मी मागासवर्गीय इंडस्ट्रीयल को-ऑप इंडस्ट्रीज या संस्थेत बोगस बिले दाखवून वेळोवेळी खोटी व बनावट कागदपत्रे तयार करुन ५४ लाखांचा अपहार करुन सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी संस्थेचे चेअरमन व जनसुराज्य पक्षाचे माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय विष्णू घाटगे,सचिव विनोद आप्पासाहेब सोनुले यांच्यासह बाराजणांवर पेठ वडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत अप्पर लेखापरीक्षक कृष्णात साताप्पा माळी (रा.जयसिंगपूर) यांनी फिर्याद दिली आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात सर्वात जास्त मागासवर्गीय संस्था हातकणंगले तालुक्यात असून या संस्था बड्या राजकीय नेत्यांशी संबधित आहेत. शुक्रवारी माजी जि.प.सदस्य दत्तात्रय घाटगे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने या संस्थाचालकांचे धाबे दणाणले आहेत.

मिणचे (ता. हातकणंगले) येथे दत्तात्रय घाटगे यांनी लक्ष्मी मागासवर्गीय इंडस्ट्रीयल को-ऑप इंडस्ट्रीज ही संस्था स्थापन केली होती. या संस्थेचे लेखापरीक्षक फिर्यादी कृष्णात माळी हे असून त्यांनी १ एप्रिल २०११ ते ३१ मार्च २०१४ पर्यंत संस्थेचे चाचणी लेखापरिक्षण केले असता त्यामध्ये चेअरमन दत्तात्रय घाटगे व सचिव विनोद सोनुले यांनी युनियन बँक ऑफ इंडिया, शाखा, इचलकरंजी या शाखेतून १७ जानेवारी २०१२ रोजी चेक क्रमांक ४११६२४५८ संस्थेच्या चालू खात्यातून रोख पंधरा लाख रुपये व २१ जानेवारी २०१२ रोजी चेक क्रमांक ४११६२४६० ने एकोणतीस लाख रुपये विजय एन. भिसे यांच्या नावे रोखीने काढले. तसेच या दोन्ही रक्कमा मेघा इलेक्ट्रॉनिक, पुणे यांना न देता त्या फर्मची खोटी पावती चाचणी लेखापरीक्षणास सादर केली होती.

तसेच पेठ वडगावातील दिपक घोदे या कॉन्टॅक्टरना वैयक्तिक कामासाठी दहा लाख रुपये व्याजाने देऊन सरकारी मंजूर अर्थसहाय्य सरकार निर्णयाचे उल्लंघन करुन बारा टक्के व्याज दराने रक्कम संबधिताकडून वसूल करुन अपहार केला. याबाबत संस्थेच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी चेअरमन घाटगे,सचिव सोनुले यांना विरोध न केल्याने या सर्वाची या अपहारास मूकसंमती असल्याचे दिसून आल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये चेअरमन दत्तात्रय घाटगे (मिणचे), सचिव विनोद सोनुले (गडमुडशिंगी),सर्जेराव अशोक घाटगे (मिणचे),बाबू शिवा वाजंत्री (मिणचे),सतीश दत्तू सावळजकर (मिणचे),शरद वसंत घाटगे(मिणचे),तातोबा विष्णू घाटगे(मिणचे),अंकुश सखाराम सकटे(हालोंडी),ज्ञानू चंद्राप्पा कांबळे(आळते),शहाजी मारुती पाटोळे (घुणकी), रेश्मा भिमसेन आवळे (इचलकरंजी), दिपाली बाबासाहेब शिंदे (कोरोची) आदींचा समावेश आहे. सर्व पदाधिकाऱ्यांना हाताशी धरुन खोटी,बनावट कागदपत्रे तयार करून सरकारची फसवणूक केल्याचे कृष्णात माळी यांनी फिर्यादीत म्हटले आहे. जनसुराज्य पक्षाचे माजी जि.प. सदस्य दत्तात्रय घाटगे हे मागील दोन विधानसभेचे उमेदवार होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images