Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

पंचगंगा इशारा पातळीकडे

0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

धरणक्षेत्रात संततधार सुरू असल्याने जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. पंचगंगेचे पाणी मंगळवारी रात्रीच पात्राबाहेर पडले असून, तिची वाटचाल इशारा पातळीकडे सुरू आहे. बुधवारी रात्रीपर्यंत पंचगंगेची पातळी ३३ फुटांवर गेली होती. नदीची इशारा पातळी ३९ फुटांवर आहे. नदीपात्रातील मंदिरे, नदीघाटावरील समाधी मंदिरे आधीच पाण्याखाली गेली आहेत. पंचगंगेचे पाणी दुधाळी येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्र, शुक्रवार पेठ, करवीर पंचायत समितीचा परिसर, कोल्हापूर-रत्नागिरी रोडवरील केर्ली गावच्या शेतीत पसरले आहे. पंचगंगा घाट परिसर तर नागरिकांसाठी सेल्फी पॉइंट बनला आहे. शिवाजी पुलावरून नदीचे पाणी पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.

बुधवारी दिवसभर पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. पाणी वाढत असल्याने जिल्ह्यातील ५२ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. नऊ मार्गावरील वाहतूक अंशतः बंद झाली आहे. तीन राज्य मार्ग आणि सहा जिल्हा मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. गगनबावड्यात सर्वाधिक १२५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

राधानगरी धरणातून दोन हजार क्युसेक विसर्ग सुरू असून पंचगंगेची पातळी एका तासात एक इंचाने वाढत आहे. पाणी पातळी सातत्याने वाढत असल्याने पाणी अन्यत्र विस्तारत आहे. नदीघाटावर संरक्षक कठड्यापर्यंत पाणी आले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास गंगावेस ते शिवाजी पूल रोडवर पाणी येण्याची शक्यता आहे. जुना बुधवार पेठ, सिद्धार्थनगर परिसर आणि करवीर पंचायत समिती कार्यालयापर्यंतचा परिसर पाण्याने व्यापला आहे. नदीघाटावरील पिकनिक पॉइंटवरही पूर पाहण्यासाठी गर्दी होत आहे. जुना शिवाजी पुलावर पूर पाहण्यासाठी गर्दी होत असल्याने काही काळ वाहतूक कोंडीही झाली. वाहतूक पोलिसांनी या गर्दीला शिस्त लावण्यासाठी कसरत करावी लागली. शिंगणापूर बंधारा रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर बॅरिकेट्स लावण्यात आली आहेत.

दरम्यान, जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्रातही संततधार सुरू आहे. राधानगरी धरणातून २००० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे भोगावती, पंचगंगा नदीच्या पातळीत सातत्याने वाढ होत आहे. बारा तालुक्याच्या धरणक्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. राधानगरी, गगनबावडा, कागल, आजरा, चंदगड तालुक्यात अतिवृष्टी झाली. हातकणंगले, शिरोळ तालुक्यात तुरळक पाऊस झाला. राधानगरीत ८१.५०, कागलमध्ये ६७, आजरा ७०.२५, चंदगड मध्ये ९४ मिलिमिटर पावसाची नोंद झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सचिवांचे पथक यादी तपासणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सोयीच्या‌‌ ठिकाणी राहण्यासाठी काही शिक्षकांनी जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, कारभाऱ्यांना हाताशी धरत सुगम शाळा दुर्गम यादीत घुसडल्या. त्याविरोधात शिक्षण सचिवांकडे मोठ्या संख्येने तक्रारी झाल्या. त्याची दखल सचिवांनी घेतली आहे. दूर्गम यादीच्या चुकीबद्दल प्रशासनावर जोरदार ताशेरे ओढले आहेत. शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले यांच्याकडे विचारणा करण्यात आली असून वस्तूस्थितीची पाहणी करण्यासाठी दोन दिवसांत सचिवालयातील पथक जिल्हा परिषदेत येणार आहे. दरम्यान, बुधवारी दिवसभर सुगम, दूर्गमच्या यादीतील शाळांच्या नावांची पडताळणी जिल्हा परिषदेत सुरू राहिली.

सुगम शाळांतील शिक्षकांची दूर्गममध्ये तर दूर्गम यादीतील शिक्षकांची बदली सुगम भागातील शाळांमध्ये होणार आहे. शहरालगतच्या सुगम प्रदेशातील शाळेत वर्षानुवर्षे काम केलेल्या शिक्षकांची दूर्गम भागातील शाळांत जाण्याची मानसिकता नाही. त्यामुळे शिक्षक नेत्यांतर्फे पदाधिकारी आणि कारभाऱ्यांकरवी सुगम शाळा दूर्गम यादीत टाकण्यात आल्या. परिणामी दूर्गम शाळांची यादी ६४५ वर गेली. यादी वाढल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही संशय आला.

दरम्यान, डोंगराळ भागात काम केलेल्या शिक्षकांनी चुकीच्या यादी‌विरोधात तक्रार केली. त्याची दखल घेतल्याने पुन्हा दूर्गम शाळांची यादी बदलणार आहे.

दरम्यान, आंतरजिल्हा बदलीतून आलेल्या शिक्षकांना सोयीचे ठिकाण देण्यासाठी काही शिक्षक नेत्यांनी अर्थपूर्ण वाटाघाटी केल्या होत्या. हे प्रकरण चव्हाट्यावर आले. शिक्षकांपेक्षा विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार त्या ‌शिक्षकांना शाळा देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. परिणामी प्रशासनाने हा डाव उधळल्याने ते शिक्षक नेते बुधवारी सैरभैर अवस्थेत जिल्हा परिषदेत वावरताना दिसत होते.

मंत्री पंकजा मुंडे यांना निवेदन

दूर्गम तालुक्यातील शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची मुंबईत भेट घेतली. त्यांनी बदल्या १० ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन मंत्री मुंडे यांनी दिल्याची माहिती नागेश शिणगारे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तस्करांनीच दरोडा घातल्याचा संशय

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वन विभागाच्या चिखली (ता. करवीर) येथील नर्सरीत मंगळवारी पहाटे झालेल्या दरोड्यातील चोरटे अद्याप पलिसांच्या हाती लागले नाहीत. मात्र ठोस माहिती मिळाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. केरळ आणि तमिळनाडूतील तस्करांनीच दरोडा टाकल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. दरम्यान, संशयितांचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले आहे.

मंगळवारी पहाटे अडीच वाजता चिखली येथील वनविभागाच्या नर्सरीत सात ते आठ चोरट्यांनी कोयता आणि काठ्यांचा धाक दाखवत वन कर्मचाऱ्यांना डाबून ठेवले. चोरट्यांनी नर्सरीतील चंदन तेलाचे ४ डबे आणि ५ टन चंदनाचे लाकूड लंपास केले. जप्त केलेला मुद्देमाल चोरट्यांनी लांबवल्यामुळे वन विभागामध्ये खळबळ य़डाली आहे. अधिकाऱ्यांनी हा प्रकार गांभीर्याने घेतला आहे. नर्सरीत सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने पोलिसांनी शहरासह वडणगे फाटा, आंबेवाडी आणि रजपूतवाडी येथील सीसीटीव्ही फुटेज मिळवले आहे. फुटेजची पाहणी केल्यानंतर एक संशयित टेम्पो आढळला असून, त्याचा शोध सुरू आहे.

गोकुळ शिरगाव आणि किणी टोल नाक्यावरील कारवाईत वनविभागाने केरळ आणि तमिळनाडूतील तस्करांना ताब्यात घेतले होते. जप्त माल पुन्हा मिळवण्यासाठी तस्करांनीच दरोडा टाकल्याचा पोलिसांना संशय आहे. पेठवडगाव आणि गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यातून तत्कालीन गुन्ह्यांची माहिती घेऊन पोलिसांनी संशयितांचे फोटो मिळवले. यातील काही फोटो चिखली नर्सरीतील वन कर्मचाऱ्यांना दाखवले असता, त्यांनी चोरट्यांना ओळखले. तस्करांमधील काही संशयित दरोड्यात सहभागी असल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले असल्याचे पोलिस निरीक्षक दिलीप जाधव यांनी सांगितले.

चोरट्यांनी टाळला महामार्ग

चोरट्यांनी नर्सरीतील ७० लाखांचा मुद्देमाल टेम्पोतून लंपास केला. पोलिसांकडून नाकाबंदी होईल या संशयाने चोरट्यांनी महामार्गांवरून जाणे टाळल्याचा पोलिसांना संशय आहे.


चोरीच्या घटनेनंतर नाकाबंदी करून संशयित वाहनांची तपासणी केली. मात्र चोरटे सापडलेले नाहीत. चोरीच्या पद्धतीवरून चोरटे नैसर्गिक संपदेची तस्करी करणारे असावेत असा संशय आहे. संशयितांबाबत ठोस माहिती मिळाल्याने लवकरच त्यांना अटक करू.

- सूरज गुरव, पोलिस उपअधीक्षक, करवीर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लेखी पुरावे आणा

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘जिल्हाधिकाऱ्यांसमोर सुनावणी सुरू आहे. तुम्हाला भाविकांचे म्हणणे माहिती आहे. तुम्ही तुमचे म्हणणे, पुरावे, दाखले, कागदपत्रे का आणली नाहीत?,’ असा प्रश्न उपस्थित करत जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी अंबाबाई मंदिरातील पुजाऱ्यांना लेखी पुरावे देण्याची सूचना केली. त्यानंतर, तोंडी माहिती देऊन पुजाऱ्यांनी लेखी पुराव्यांसाठी दोन दिवसांची मुदत मागितली. दरम्यान, संघर्ष समिती करीत असलेली मागणी चुकीची असल्याचे मत यावेळी पुजाऱ्यांनी मांडले. पुजाऱ्यांकडून आता शुक्रवारी (२१ जून) लेखी पुरावे सादर करण्यात येणार आहे.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी २२ जूनला झालेल्या बैठकीत दिलेल्या सूचनेनुसार अंबाबाई मंदिरातील पुजाऱ्यांना हटवून तेथे सरकारी पुजारी नेमण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांपुढे सुनावणी सुरू आहे. सुनावणीत बुधवारी मंदिरातील पुजाऱ्यांच्या करवीर निवासिनी अंबाबाई हक्कदार श्रीपूजक मंडळाला म्हणणे मांडण्यासाठी वेळ दिली होती. यात बाबुराव ठाणेकर, केदार मुनीश्वर, माधव मुनीश्वर, अक्षय मुनीश्वर आदींचा समावेश होता.

सुनावणीसाठी उपस्थित पुजाऱ्यांनी कोणतेही लेखी दाखले, पुरावे आणले नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना ‘लेखी पुरावे का आणले नाहीत?’ असा प्रश्न केला. ‘जिल्हाधिकाऱ्यांसमोर ही सुनावणी आहे. तुम्हाला भाविकांचे म्हणणे माहिती आहे. लेखी पुरावे, दाखले आणायला हवे होते. आता लेखी आणले नसतील, तर तोंडी पुरावे द्या,’ अशी सूचना त्यांनी केली. त्यावर पुजाऱ्यांनी मंदिरातील पूजेचे हक्क कसे मिळाले, पुजाऱ्यांची वंशावळ, दिवाणी दावे, त्यांचे निकाल यांची तोंडी माहिती दिली. हीच माहिती लेखी देण्यासाठी मुदत मागितल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना दोन दिवसांची मुदत दिली. ‘शुक्रवारी तुमच्यापैकी एकाने लेखी पुरावे जमा करावेत,’ असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. पुजाऱ्यांनी ही सूचना मान्य करत शुक्रवारी पुरावे सादर करण्याची तयारी दर्शविली आहे.

000000000000000000000000

‘हे कोर्ट नाही, सुनावणी’

सुनावणीदरम्यान, पुजारी गजानन मुनीश्वर हेही उपस्थित होते. १७ जुलैला दिलेल्या सुनावणीवेळीही त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थिती दर्शविली होती. पुजाऱ्यांकडून नव्हे, तर त्रयस्थ म्हणून बाजू मांडणार असल्याचे सांगितल्यानंतर त्यांनाही बुधवारची वेळ दिली होती. गजानन मुनीश्वर यांनी ‘श्री अंबाबाई मंदिर पुजारी हटाओ संघर्ष समितीने केलेल्या आरोप आणि पुराव्यांची प्रत द्यावी, आम्ही त्यावर म्हणणे मांडू,’ अशी मागणी केली. त्यावर ‘हे कोर्ट नाही, ही केवळ सुनावणी आहे. अशा प्रकारे आरोप आणि पुराव्यांची प्रत देता येणार नाही. तुम्ही तुमचे म्हणणे मांडा,’ असे जिल्हाधिकारी सुभेदार यांनी स्पष्ट केले.

000000000000000000000000

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सुचनेनुसार घेण्यात येत असलेल्या सुनावणीत पुजाऱ्यांनी बुधवारी तोंडी माहिती दिली. त्यांना लेखी माहिती देण्यासाठी दोन दिवसांचा अवधी दिला आहे. शुक्रवार (ता.२१) दुपारपर्यंत पुजाऱ्यांना लेखी म्हणणे मांडण्याच्या सूचना दिल्या आहेत.

अविनाश सुभेदार, जिल्हाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोटाबंदीने घसरला लाभांश

0
0

म. टा. प्रतिनधी, कोल्हापूर

नोटाबंदीच्या निर्णयानंतर बँकेत मोठ्या प्रमाणात जमा झालेल्या रक्कमेवर व्याज द्यावे लागत आहे. शिवाय कर्जावरील व्याजाच्या रकमेतून मिळणाऱ्या रकमेवर मर्यादा आल्यामुळे सर्वच सहकारी, नागरी, ग्रामीण बँका व पतसंस्थांसमोर लाभांश जाहीर करताना अडचणी निर्माण होत आहे. सर्वसाधारण सभांमध्ये गेल्यावर्षी नऊ ते दहा टक्क्यांपर्यंत जाहीर केलेला लाभांश यंदा तब्बल पाच ते सात टक्क्यांवर आल्याने सभासदांमध्ये नाराजीचा सूर आहे. नफ्यापेक्षा बँकांचा खर्च जास्त होत असल्याने आणि कर्जाची मागणी घटल्याने सर्वच बचतीच्या व्याजदरांत बँकांनी कपात केली आहे.

ऑगस्टच्या अखेरपर्यंत सर्वच संस्था वार्षिक सर्वसाधारण सभा घ्याव्या लागतात. सभेमध्ये संस्थेच्या प्रगतीच्यादृष्टीने होणाऱ्या निर्णयांमुळे सर्व सभासदांचे सर्वसाधारण सभेकडे लक्ष लागलेले असते. विशेषत: जाहीर होणाऱ्या लाभांशाबाबत उत्सुकता असते. मात्र, जून व जुलैमध्ये अनेक प्रथितयश बँकांच्या झालेल्या सभेमध्ये लाभांशाच्या टक्क्यांमध्ये घट झाली. त्यामुळे सभासंदामध्ये चिंतेचे आणि नाराजीचेही वातावरण आहे. नोटाबंदीतून धक्क्यातून उद्योजक, व्यापार क्षेत्र हळूहळू रुळावर येत असले, तरी बँकिंग व्यवसाय मात्र अद्यापही या धक्क्यातून सावरलेला नाही.

कोणत्याही बँकेचा नफा कर्जपुरवठा व एनपीवरून ठरतो. कर्जपुरवठा करण्यासाठी सर्वच बचत खात्यांतून जमा झालेली रक्कम कर्जपुरवठा करून त्याप्रमाणात बचत खातेदारांना व्याज दिले जाते. पण नोटाबंदीच्या काळात कर्जखात्यासह बचत खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रक्कम जमा झाल्याने बँकांना व्याजावर मोठा खर्च करावा लागत आहे. तसेच कर्जाची मागणी कमी होऊन बँकांची उलाढाल थंडावल्याचा परिणाम बचत खात्यावरील व्याज व लाभांशावर झाला आहे.

नोटाबंदीपूर्वी अल्प मुदत व बचत खात्यावर ८.५ ते दहा टक्क्यांपर्यंत व्याजदर दिला जात होता, तर ज्येष्ठ नागरिक व महिलांना त्यामध्ये आणखी अर्धा ते एक टक्क्याची सवलत दिली जात होती. नोटाबंदीनंतर दोन्ही बचत खात्यांतील रकमेवरील व्याजदरात कपात झाली आहे. यापूर्वी सेव्हिंग खात्यावरील रकमेचा व्याजदर भारतीय रिझर्व्ह बँक निश्चित करत होती. यामध्ये आता बदल झाला असून सेव्हिंग खात्यावरील व्याजदर ठरवण्याचा अधिकार मिळाल्याने अनेक बँकांनी व्याजदर दोन ते चार टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. त्याचाही परिणाम लाभांशावर झाला आहे. नोटाबंदी निर्णयानंतर छोट्या कर्जदारांनी रक्कम भरली, तरी उद्योग व व्यापर क्षेत्रातील उलाढाल मंदावल्याचा परिणाम एनपीएवर झाला. त्यामुळे सर्वच बँकांच्या लाभांशाला कात्री लागली आहे.

नोटाबंदी काळात डिपॉजिटमध्ये वाढ झाली. परिणामी बँकांच्या व्यवसायाला त्याचा फटका बसला. एनपीएच्या प्रमाणात वाढ झाली. नवीन कर्जाची मागणी कमी झाल्याने संस्था व बँकांच्या सीडी रेशो कमी झाला. त्याचा परिणाम बँका व संस्थांच्या लाभांशावर झाला आहे.

- दीपक फडणीस, सीईओ, पंचगंगा बँक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दीडशे कोटी रुपये लाटण्याचा उद्योग

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

थेट पाइपलाइन योजनेमध्ये जिल्हा दरसूचीमधील तरतुदीचा गैरवापर, एक्सलेशन क्लॉज व अबकारी कराच्या नावाखाली तब्बल १४५ कोटी रुपयांचा वाढीव खर्च दाखविला आहे. ठेकेदार जीकेसी कंपनी आणि सल्लागार युनिटी कंपनीकडून शेकडो कोटी रुपये लाटण्याचा उद्योग झाला असून आयुक्तांनी या संपूर्ण प्रकाराची चौकशी करावी अशी मागणी थेट पाइपलाइन योजना बचाव सर्वपक्षीय कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली. आयुक्त अभिजित चौधरी यांच्या उपस्थितीत महापालिकेतील बैठकीत पदाधिकाऱ्यांनी नियमावली आ​णि ठरावाच्या आधारे युनिटी कन्सल्टंट व ठेकेदारांच्या कंपनीला कात्रीत पकडले. आयुक्तांनी प्रकल्पाचे सल्लागार असलेल्या युनिटी कंपनीला कृती समितीने नोंदविलेल्या आक्षेपाबाबत दहा दिवसांत खुलासा करण्याचे आदेश दिले. आवश्यक कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती जोडाव्यात. त्याची एक प्रत समितीला व दुसरी महापलिकेला सादर करावी असा आदेश दिला.

कृती समितीचे पदाधिकारी बाबा इंदूलकर म्हणाले, ‘प्रकल्पाच्या एकूण किंमतीमधील अंदाजे २५० कोटी रुपये हे स्टील व इतर वस्तूंवर खर्च होणार आहेत. सध्या बाजारात स्टीलचे भाव ४० टक्क्यांनी घसरले आहेत. चांगल्या प्रतीचे स्टील प्रतिटन ४३,००० रुपये दराने मिळते. मात्र निविदेमध्ये स्टीलचा दर ६७ हजार ते ७३ हजार दाखविला आहे. स्टीलचे दर घसरल्याने स्टील व इतर साहित्य खरेदीतील ४० टक्के रक्कम वजा करुन प्रकल्प किंमतीमध्ये १०० कोटी रुपयांची वजावट झाली पाहिजे’असे सुचविले. चर्चेदरम्यान युनिटी कंपनीच्या प्रतिनिधींनी खुलासा करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दोन-तीन महिने पाठपुरावा करुनही अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे मिळत नाही. मुद्देसूद माहिती हवी असल्याचे सांगत अधिकाऱ्यांची कोंडी केली. तासाभराच्या बैठकीनंतर आयुक्तांनी स​मितीच्या आक्षेपांविषयी दहा दिवसांत खुलासा करण्याचे आदेश युनिटीला दिले. चर्चेत बाबा पार्टे, किशोर घाटगे, अॅड. पंडीतराव सडोलीकर, बी.एल. बरगे आदींनी भाग घेतला. यावेळी वैशाली महाडिक, नामदेव गावडे, फिरोज खान, सुभाष जाधव आदी उपस्थित होते.

८० ते १०० कोटीचा घोटाळा

‘पाइपलाइन योजनेत ८० ते १०० कोटीचा घोटाळा झाला आहे. अधिकारी, लोकप्रतिनिधीही यामध्ये सामील आहेत. पाइपलाइन योजनेच्या करार करताना मध्यप्रदेशमधील स्टँम्पपेपर वापरले. कराराची मुद्रांक शुल्ककडे नोंदणी केली नाही. २५ लाख रुपयांचे मुद्रांक शुल्क भरलेले नाही’ असे प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेचे दिलीप देसाई यांनी निदर्शनास आणून दिले.

बचाव समितीचे आक्षेप...

एक्सलेशन क्लॉज (भाव वाढला तर दर वाढविणे व भाववाढ झाली नाही तर दर कमी करणे) नसतानाही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या १७ जुलै २०४ च्या मूल्यांकनाच्या अहवालाच्या आधारे निविदेच्या समर्थनार्थ भाववाढ विचारात घेऊन ४८ कोटी ५५ लाख रुपये रक्कम धरली आणि एकूण प्रकल्पाच्या ४३५ कोटी रुपयांच्या करारात ४५ कोटी ५५ लाख इतकी भाववाढीची रक्कम समाविष्ट करुन ४८३ कोटी ५५ लाख रुपयांचा करार केला.

प्रकल्पातंर्गत ठेकेदार कंपनीला खरेदीवर १५ टक्के केंद्रीय अबकारी करापासून सवलत मिळण्याची तरतूद आहे. ३०० कोटी रुपयांवर १५ टक्के म्हणजे ४५ कोटी इतकी सूट मिळाली असावी. त्यामुळे प्रकल्पाच्या किंमतीतून ४५ कोटी रुपये कमी होणे गरजेचे आहे.

डोंगरी भागासाठी अधिक दर या जिल्हा दर सुचीतील तरतुदींचा चुकीचा अर्थ काढून जीकेसी कंपनीला लाखो रुपये मिळवून दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिरोळमध्ये ‘आपत्कालीन’ रामभरोसे

0
0

अजय जाधव, जयसिंगपूर

शिरोळ तालुक्यात कृष्णा, पंचगंगा, वारणा, दूधगंगा या नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असताना येथील आपत्कालीन यंत्रणा मात्र रामभरोसे आहे. शिरोळ येथील पूरनियंत्रण कक्षास कोणी वालीच नाही अशी स्थिती आहे. आपत्कालीन स्थितीत पूर नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे, मात्र या कक्षाशी दूरध्वनीवरून संपर्क साधल्यानंतर अधिकारी जागेवर नाहीत तर कर्मचाऱ्यांत कोणताच ताळमेळ नसल्याचे स्पष्ट होते.

सन २००५ व २००६ साली शिरोळ तालुक्यात महापुराने हाहाकार उडाला होता. संथ वाहणाऱ्या कृष्णा नदीने रौद्ररूप धारण केले होते. कृष्णेबरोबरच पंचगंगा, वारणा, दूधगंगा या नद्यांच्या महापुराने तालुक्यात अनेक गावांना वेढा दिला होता. या महापुरात मोठी जिवीत तसेच वित्तहानी झाली होती. कवठेसार, कोथळी, चिंचवाड, शिरटी, घालवाड, कनवाड, कुटवाड, राजापूर, राजापूरवाडी, अकिवाट, हेरवाड, तेरवाड यासह अनेक गावातील नागरिकांनी सुरक्षीतस्थळी स्थलांतरीत व्हावे लागले होते.

आता संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली असल्याचे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी सात जून रोजी नृसिंहवाडी येथे आपत्कालीन व्यवस्थापन आढावा बैठकीत स्पष्ट केले आहे. प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार गजानन गुरव,व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी यंत्रणा सतर्क ठेवण्याची सूचनाही दिली होती. तसेच कृष्णा-पंचगंगा संगमाजवळ यांत्रिक बोटीतून पाहणी केली होती.

कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील पावसाचे पाणी कृष्णा, पंचगंगा वारणा या नद्यातून नृसिंहवाडी येथील संगमाजवळ एकत्र येऊन कर्नाटक राज्यात जाते. यामुळे नृसिंहवाडीत पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होते. गेल्या दोन दिवसापासून संततधार सुरू असल्याने शिरोळ तालुक्यात नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. पूराचे पाणी पात्राबाहेर पडण्याची स्थिती असताना शिरोळ तहसील कार्यालयात मात्र याचे कोणतेच गांभीर्य नसल्याचे चित्र आहे. आपत्कालीन स्थितीत तहसील कार्यालयातील पूर नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन तालुका प्रशासनाने केले आहे. मात्र या कक्षाशी बुधवारी दूरध्वनीवरून संपर्क साधल्यानंतर येथे कोणताच ताळमेळ नसल्याचे चित्र होते. पूर नियंत्रण कक्षाची जबाबदारी असणारे नायब तहसीलदार जे.वाय.दिवे बाहेर गेले होते. पूरस्थितीची माहिती असणारा एकही जबाबदार अधिकारी कक्षात नव्हता. दूरध्वनीचा रिसीव्हर बाजूला उचलून ठेवून अधिकाऱ्यांच्या शोधात गेलेला शिपाई तब्बल पाच मिनिटांनी परतला तसेच त्याने अधिकारी नसल्याचे सांगितले. अनेकदा नियंत्रण कक्षातील दूरध्वनी व्यस्त असतो, यामुळे आपत्कालीन स्थितीत नागरिकांनी करायचे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

..................

चौकट

संपर्कच नाही तर ...

जिल्हा प्रशासनाने गावोगावी आपत्ती व्यवस्थापनाचे धडे दिले आहेत. सुरक्षा यंत्रणा एसएमएस, वॉकी-टॉकी, मोबाइल यासह आधुनिक हायटेक साधनांचा वापर करावा, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. शिरोळ तालुक्यात १४ यांत्रिक बोटी, लाईफ जॅकेट व रिंगा प्रत्येकी २००, सर्च लाईट यासह अन्य साहित्य सज्ज ठेवण्यात आल्याचे आढावा बैठकीत स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र पूरस्थितीत आपत्कालीन यंत्रणेशी संपर्कच झाला नाही तर मदत होणार कशी असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाने जनजीवन विस्कळीत

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गेले तीन दिवस सुरू असलेल्या दमदार पावसाने शहरात ठिकठिकाणी पाणी साचले. व्हिनस कॉर्नर, जिल्हाधिकारी कार्यालयाचे मुख्य प्रवेशव्दार, पारिख पूल, लक्ष्मीपुरी, शाहुपूरी परिसरात पाणी साचले. सिग्नल यंत्रणा बुधवारी बंद राहिल्याने वाहतूकीची कोंडी कायम राहिली. संततधार पाऊस सुरू राहिल्याने जनजीवन विस्कळीत झाले.

ऐतिहासिक रंकाळा तलाव, कळंबा, राजाराम तलावाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली. रंकाळा तलावातील संध्यामठ निम्मा पाण्याखाली गेला आहे. कळंबा तलावाच्या पाणीपातळीतही झपाट्याने वाढ झाली आहे. संततधार पावसामुळे बाजारपेठेवर परिणाम झाला. ऐतिहासिक रंकाळा तलावातही परिसरातून येणाऱ्या पाण्याचे प्रमाण वाढले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास तलावातील संध्यामठ पाण्याखाली जाणार आहे. संततधार पावसाने आणि गटर्स, नालेसफाई नसल्याने स्टेशन रोडवर पाण्याचे तळे साचले. त्याचा पादचाऱ्यांसह वाहनधारकांना त्रास सहन करावा लागला. शहरातील जनजीवन विस्कळीत झाले.


गगनबावड्यात अतिवृष्टी

जिल्ह्यातील बहुतांशी मार्गावरील वाहूतक पर्यायी मार्गे वळविण्यात आली. धरणक्षेत्रातील जोरदार पावसाने बुधवारी सायंकाळीपर्यंत ५२ बंधारे पाण्याखाली गेले. आजरा-हणबरवाडी मार्गावर झाड पडल्यामुळे वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली. दरम्यान कोगे बंधाऱ्यावर पाणी आल्याने बालिंगा पाडळी कोगे मार्गे वाहतूक सुरू आहे. शिंगणापूर (ता. करवीर) रस्त्यावर पाणी पाच फूट पाणी आल्याने शिवाजी पूल ते आंबेवाडी फाटा ते चिखली मार्गाने वाहतूक सुरू आहे. अणदूर (ता. गगनबावडा) बंधाऱ्यावर चार फूट पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक बंद आहे. मांडुकलीपैकी खोपडेवाडीमार्गे

पर्यायी वाहतूक सुरू आहे. साळगाव (ता. आजरा) बंधाऱ्यावर एक फूट पाणी आल्याने वाहतूक बंद आहे. दरम्यान जिल्हा प्रशासनाने खासगी मालमत्ता, घरांची पडझड, गुरे आणि शेतीचे सुमारे १२ लाख ६९ हजारांचे नुकसान झाल्याची नोंद झाली आहे. त्यांना १२ लाख ४३ हजार रुपये नुकसानभरपाई देण्यात आली.

पाण्याखाली असलेले बंधारे

पंचगंगा : राजाराम, सुर्वे, रूई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ, शिंगणापूर, तारळे, शिरगांव. भोगावती : राशिवडे, हळदी, सरकारी कोगे, खडक कोगे. तुळशी : बीड, आरे, बाचणी. कासारी : यवलूज, ठाणे-आळवे, पुनाळ तिरपण. कुंभी : शेणवडे, मांडुकली, वेतवडे, सांगशी. कडवी : पाटणे, सवते सावर्डे, शिरगाव, कोपार्डे, येल्लूर. वेदगंगा : कुरणी, निळपण, वाघापूर, बस्तवडे, सुरूपली, शेणगांव, गारगोटी, म्हसवे. हिरण्यकेशी : ऐनापूर, साळगाव, निलजी, गिजवणे.

महापालिकेने पावसाळ्याच्या अगोदर गटर्स व चॅनेल सफाई न केल्यामुळे शहरातील विविध भागात पाणी ओव्हरफ्लो होऊन रस्ते जलमय बनले आहेत. चॅनेलमधून वाहत आलेल्या प्लास्टिक पिशव्या, बाटल्यांनी चेंबर तुंबण्याचा प्रकार शाहूपुरीत घडला. रस्त्यावर पाणी साचल्याने स्टेशन रोडवरील वाहतूकही विस्कळीत झाली. आरोग्य विभाग व बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दुपारी चेंबरची साफसफाई केल्याने पाण्याचा निचरा होण्याचा मार्ग खुला झाला. मात्र शहरातील नाले सफाईचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला.

शहरातील विविध चौकात आणि प्रमुख रस्त्यावर पाणी साचल्याने पादचाऱ्यांसह वाहनधारकांची मोठी कोंडी झाली.

व्हिनस कॉर्नर येथे दगडी छावण्याचे चेंबर आहे. स्टेशन रोड, व्यापारी पेठ आणि शाहूपुरी पहिली गल्लीमधून चॅनेल व्हीनस कॉर्नरकडे येते. या चॅनेलमधून प्लास्टिक पिशव्या, बाटल्या वाहत व्हीनस कॉर्नर येथील चेंबरमध्ये अडकल्या होत्या. चेंबर तुंबल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी पसरले. शाहूपुरी पोलिस स्टेशनसमोरील चेंबरही ओव्हरफ्लो झाल्यानंतर रस्ते जलमय बनले. रस्त्याकडेला निर्माण झालेला चिखल, जलमय रस्ते यामुळे वाहनधारकांना वाहने हाकताना कसरत करावी लागत होती.

महापौर हसीना फरास, नगरसेवक चव्हाण यांनी अधिकाऱ्यांसह भागाची पाहणी केली. उपशहर अभियंता आर. के. जाधव, मुख्य आरोग्य निरीक्षक विजय पाटील, कनिष्ठ अभियंता बाबूराव दबडे आदींनी तीन ठिकाणी पाहणी करुन चेंबर सफाई व दुरुस्तीच्या सूचना केल्या. आरोग्य विभाग व बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तिन्ही ठिकाणी चेंबरची साफसफाई केली. व्हीनस कॉर्नर परिसरातील पाण्याचा निचरा होण्यासाठी दोन चेंबर बांधण्याचे ठरले. यासाठी चाळीस हजार रुपये खर्च अपेक्षित असून त्याचे एस्टीमेट तयार करुन शुक्रवारच्या स्थायी सभेपुढे ठेवण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जिल्ह्यात पावसाचे ठाण

0
0

कोल्हापूर

सलग तीन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. अनेक बंधारे पाण्याखाली गेले असून नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. आजरा, शाहूवाडी तालुक्यात काही घरांची पडझड होवून नुकसान झाले. तर राधानगरी तालुक्यात भोगावती, तुळशी, दुधगंगा नदीला पूर आला आहे.

.................

इचलकरंजीत पंचगंगा दुसऱ्यांदा पात्राबाहेर

इचलकरंजी -

वरुणराजाने मागील तीन दिवसांपासून शहर व परिसरात दमदार हजेरी लावली असून मंगळवारी संततधार बरसणाऱ्या पावसाने बुधवारी जोरदार हजेरी लावली. या पावसाने शेतकरीवर्ग सुखावला आहे. मात्र अनेक भागात गटारींची स्वच्छता न झाल्याने गटारी तुंबून रस्त्यांना तळ्याचे स्वरुप आले होते. तर पावसामुळे नागरिकांनी घरीच थांबणे पसंत केल्याने रस्त्यांवरील वर्दळ मंदावली होती. सायंकाळी पंचगंगा नदीची पाण्याची पातळी ५५ फुटांवर पोहोचली होती. इशारा पातळी ६८ फुटांवर असून ७१ फुटांवर धोका पातळी आहे.

दरम्यान, धरण पाणलोट क्षेत्रात दमदार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत चालली आहे. पंचगंगा नदी पाण्याची पातळीत मागील चोवीस तासात ९ फुटांनी वाढ झाली असून पाणी दुसऱ्यांदा पात्राबाहेर पडले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नगरपरिषदेची आपत्कालीन यंत्रणा सज्ज झाली असून पूरग्रस्त क्षेत्रातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी विविध उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. पुराचा फटका पहिल्यांदा शेळके मळा, लक्ष्मी दड्ड, नदीवेस, टाकवडे वेस, पी. बा. पाटील मळा व जुना चंदूर रोड आदी भागात बसतो. २००५ च्या पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या भागात पूर्वसूचना देण्यासाठी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचे एक पथक नेमण्यात आले आहे. त्याचबरोबर नागरी वस्तीत पाणी शिरल्यानंतर नागरिकांच्या स्थलांतरासाठीही पथक नियुक्त केले आहे. पूरग्रस्तांच्या स्थलांतरासाठी १२ ठिकाणी छावण्या तयार करण्यात आल्या आहेत. पंचगंगा नदी परिसरात तीन बोटी सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. पालिकेने नुकतीच खरेदी केलेल्या नव्या बोटीचा यामध्ये समावेश आहे. नगराध्यक्षा अलका स्वामी, मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी आढावा बैठक घेऊन संबंधितांना योग्य त्या सूचना केल्या आहेत.

.........

शाहूवाडीत तीन घरांची पडझड

शाहूवाडी

तालुक्यात दोन दिवसांपासून सर्वदूर सुरू झालेल्या संततधार पावसाने शेतशिवार जलमय झाले आहेत. बुधवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या चोवीस तासात तालुक्यात ३२२ मि. मी. पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक ७२ मि. मी. करंजफेण विभागात तर भेडसगांव विभागात सर्वात कमी २२ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. याच काळात जयसिंग शंकर वाघमारे (रा. शिवारे) यांचे राहते कच्चे पूर्ण घर तसेच बाळू बंडू परिट (रा. शित्तूरवारूण) व आनंदा रामचंद्र उदूगडे (रा. शिराळेवारूण) यांच्या घरांच्या काही भागाचे पावसाने नुकसान झाले आहे. महसूल विभागाकडील नोंदीनुसार पडझड झालेल्या सर्व घरांचे मिळून एक लाख २५ हजार रुपये नुकसान झाले आहे.

दरम्यान, कडवी मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात १३० मि. मी. अशी यावर्षीच्या सर्वाधिक पावसाची नोंद झाली असून कडवी नदीवरील सुतारवाडी, वालूर, भोसलेवाडी, येलूर, कोपार्डे, शिरगांव, सौते-सावर्डे, पाटणे हे सर्व बंधारे पाण्याखाली गेले आहेत. मानोली लपा तलावा खालील जावली, घोळसवडे, हुंबवले हे तीन बंधारे व कासार्डे लपा तलावा खालील दोन बंधारेही पाण्याखाली गेले आहेत. शाहूवाडीच्या पश्चिम भागात पावसाची दिवसभर मुसळधार सुरूच होती. पूर्व भागात मात्र दुपारी दोन नंतर पावसाने विश्रांती घेतली होती.

.....



कागल

दमदार पावसामुळे नद्यांच्या पात्रात झपाट्याने वाढ होत असून चिकोत्रा नदीलाही प्रथमच पाणी आले आहे. वेदगंगा नदीवरील बस्तवडे,नानीबाई चिखली,कुरणी आणि सुरुपली या चार बंधाऱ्यांवर पाणी आले आहे. सोमवारी दुपारपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कागल तालुक्यात सर्वत्र पाणीच पाणी झाले असून यंदा प्रथमच ओढे नाले वाहू लागले आहेत. संततधार पावसाने हजेरी लावल्याने माळरानातील भूईमुग सोयाबीनसह ऊस पिकाला योग्य पावसाने साथ दिल्याने बळीराजा सुखावला आहे.

वेगगंगे बरोबरच दुधगंगा नदीच्या पाणीपातळीतही लक्षणीय वाढ झाली असून यंदा प्रथमच दुधगंगेचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. बाचणी येथील दुधगंगा धरणाच्या स्लॅबला पाणी पोहचले असून पावसाचा जोर वाढल्यास सांयकाळपर्यत धरणावरील मार्ग वाहतुकीस बंद होयाची शक्यता आहे.

...........

पन्हाळा तालुक्यात रिपरिप

पन्हाळा

तालुक्यात बुधवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती.पन्हाळा पूर्व भागात सांगली-कोल्हापूर यांना जोडणाऱ्या काखे-मांगले पुलाखालून पाणी जात असले तरी रात्रभर पाऊस सुरु राहिला तर या मार्गावरील वाहतूक बंद होण्याची शक्यता आहे. पन्हाळा पश्चिम भागातील काही बंधारे पाण्याखाली गेले​ आहेत. वारणा नदीही पात्रालगत वाहत आहे. पाऊस मापन केंद्रावर गेल्या चोवीस तासांत नोंदवलेला तालुक्यातील पाऊस मिलिमीटरमध्ये असा : कोडोली-२७ बाजारभोगाव-१९,जोतीबा-१८,कोतोली ३७,पन्हाळा २७. आजअखेर तालुक्यात सरासरी ५७८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

............

चंदगडला चार बंधारे पाण्याखाली

चंदगड

तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. पुरामुळे हिंडगाव व चंदगड पूल पाण्याखाली गेले आहेत. तर गवसे, कोनेवाडी, हल्लारवाडी, कानडी बंधारे पाण्याखाली गेल्याने काही गावांचा संपर्क तुटला आहे. बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत झालेल्या चोवीस तासात चंदगड तालुक्यात सरासरी ९४.०० मिलीमीटर तर आतापर्यंत ८०२.०० पावसाची नोंद झाली आहे. अतिवृष्टीमुळे हेरे येथील हणमंत धोंडीबा गावडे यांच्या रहात्या घराची भिंत पडून ३० हजार रुपयांचे व माणगाव येथील कस्तुरी शिवपुत्र पाटील यांच्याही घराची भिंत पडून ३० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

बुधवारी सकाळपासून चंदगड-हेरे मार्गावरील चंदगड पुलावर पाणी आल्याने चंदगड या मार्गावरील वाहतूक ठप्प होती. गोव्याला जाणाऱ्या बसेस चंदगड पाटणे फाटा ते मोटणवाडीमार्गे गोव्याला जात होत्या. त्यामुळे प्रवाशांना सुमारे तीन किलोमीटरचा अतिरिक्त भर पडत होता.

............

............

हातकणगले तालुक्यात दमदार

हातकणंगले

जोरदार पावसाने तालुक्यात वारणा,पंचगंगा नदीपात्रात पाण्याची धोक्याची पातळी लवकरच ओलांडली जाण्याची शक्यता आहे. मागील २४ तासांतील पाऊस मिमीमध्ये असा ः हुपरी -२८,कबनूर -१६,वाठार तर्फ वडगाव -११, हेरले -३२,वाठार -१५, रूई -२२, पेठ वडगांव -१७ . संततधार पावसाने नदीकाठची पिके पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.

......


भोगावती, तुळशीचे पाणी पात्राबाहेर

कुडित्रे

करवीर तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणक्षेत्रात तसेच नद्यांच्या पात्रातील पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत असून पाणी भोगावती , तुळशी नदीपात्राच्या बाहेर पडले आहे. पावसाचे प्रमाण वाढल्यामुळे कोगे - कुडित्रे व कोगे - बहिरेश्वर हे दोन बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून प्रवासासाठी पर्यायी मार्गाचा अवलंब केला जात आहे.

..........

शिरोळमध्ये नद्यांच्या पाणी पातळीत वाढ

जयसिंगपूर

शिरोळ तालुक्यात बुधवारी पावसाची रिपरीप सुरूच होती. येथे गेल्या चोवीस तासात ८२ मि.मी.पावसाची नोंद झाली. सर्वात जास्त पाऊस नांदणी विभागात झाला. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील दमदार पावसामुळे तालुक्यातील कृष्णा व पंचगंगा नद्यांची पाणी पातळी वाढू लागली आहे.

गेल्या चोवीस तासात शिरोळ येथे नऊ मि.मी., जयसिंगपूर येथे १० मि.मी., कुरूंदवाड येथे १४ मि.मी., नांदणी येथे १९ मि.मी, दत्तवाड येथे १० मि.मी., शिरढोण येथे आठ मि.मी. तर नृसिंहवाडी येथे १२ मि.मी. पाऊस झाला. पावसामुळे जयसिंगपूर शहरातील जनजीवन विस्कळीत झाले. पंचगंगा नदीची पाणी पातळी तेरवाड बंधाऱ्याजवळ ४६.६ फूट, शिरोळ बंधाऱ्याजवळ ३६ फूट, नृसिंहवाडी येथे ३२ फूट तर राजापूर बंधाऱ्याजवळ कृष्णा नदीची पाणी पातळी ३१.१० फूट इतकी होती. तालुक्यातील तेरवाड, शिरोळ व राजापूर हे बंधारे तीन दिवसांपूर्वीच पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प आहे.

..........

आजऱ्यात घरांची पडझड

आजरा

सलग तिसऱ्या दिवशी गवसे भागात तर आजऱ्यात पहिल्यांदाच अतिवृष्टी झाली. दोन्ही ठिकाणी अनुक्रमे ११० व ७३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. दरम्यान, बुधवारी पहाटे येथील साळगाव बंधारा यावर्षी पहिल्यांदाच पाण्याखाली गेला. तर बुरूडेनजिक आजरा-महागाव मार्गावर मोठे झाड कोसळल्याने येथील वाहतूक विस्कळीत झाली. तालुक्यात उत्तूर परिसरात दोन घरांची पडझड झाल्याचेही तहसील कार्यालयातून सांगण्यात आले. तालुक्यात आज सरासरी ७०.२५ मिमी तर आजपर्यंत एकूण ५७३ मिमी पाऊस नोंदला गेला. साळगाव बंधारा पाण्याखाली आल्याने देवकांडगाव, पेरणोली, हरपवडे, कोरीवडे व गारगोटीकडील वाहतूक थांबवून सोहाळेमार्गे वळविण्यात आली. धामणे व मासेवाडी येथे दोन घरांची पडझड होऊन १६ हजार रूपयांचे नुकसान झाले.

....

म्हसवे बंधारा पाण्याखाली

गारगोटी



भुदरगड तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून पावसाची संततधार सुरू असून वेदगंगा नदी इशारा पातळीवरून वाहत आहे. गारगोटीनजीकचा म्हसवे बंधारा पाण्याखाली गेल्याने मिणचे खोऱ्यातील वाहतूक विस्कळीत झाली आहे. पाटगाव धरण क्षेत्रासह तालुक्याच्या पश्चिमेकडील भागात पावसाचा जोर अधिक असल्याने वेदगंगेची पातळी सातत्याने वाढत आहे. तालुका प्रशाशनाने दक्षतेचे आदेश दिले आहेत.

गेल्या दोन दिवसापासून पावसाची संततधार सुरू असली तरी मंगळवारी रात्रीपासून पावसाची गती आणखी वाढली आहे. तालुक्यातील ओढे, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. म्हसवे बंधारा पाण्याखाली गेल्याने मिणचे खोऱ्यातील लोकांना महालवाडी किंवा कुर मार्गे प्रवास करावा लागत आहे. काही ठिकाणी काही काळ वाहतूक ठप्प ठेवावी लागली. गारगोटीत आज ४६ मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली तर पाटगाव धरण क्षेत्रात ९३ मिलीमीटर पाऊस झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयआयआयटी संस्थेची मागणी

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘कोल्हापूरला माहिती तंत्रज्ञान केंद्र बनविण्यासाठी आय. आय. आय. टी. संस्थेची उभारणी करावी’, अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी संसदेत केली. भारतीय सूचना प्राद्योगिकी संस्था-पब्लिक प्रायव्हेट भागीदारी, विधेयक २०१७ यावर संसदेत चर्चा झाली. अर्थसंकल्पीय अधिवेशना दरम्यान हे विधेयक लोकसभेसमोर आले होते. या विधेयकावर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने खासदार महाडिक यांनी चर्चेत सहभाग घेतला.

उच्च शिक्षणासाठी हे विधेयक अत्यंत उपयुक्त असल्याने, त्याचे आपण स्वागत आणि समर्थन करत असल्याचे खासदार महाडिक यांनी संसदेत सांगितले. नव्या विधेयकानुसार, हे अधिकार संबंधित संस्थांना मिळतील, ही दिलासादायक बाब असल्याचे सांगून, मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांचे खासदार महाडिक यांनी अभिनंदन केले. तसेच डिसेंबर २०१५ मध्ये नामदार जावडेकर यांनी आणखी तीन इन्स्टिट्यूट उभारणीला मान्यता दिली होती, असे सांगून अशा प्रकारचे इन्स्टिट्यूट कोल्हापूरमध्ये उभारणे अत्यावश्यक असल्याचे नमूद केले.

खासदार महाडिक म्हणाले, ‘ए.आय.सी.टी.ई. ने शिवाजी विद्यापीठाला देशात तिसऱ्या क्रमांकाचे मानांकन दिले आहे. कोल्हापूरच्या परिसरात ७० अभियांत्रिकी महाविद्यालये असून, आय. टी. आणि आय.आय.टी.चे १५० युनिटस्, हार्डवेअरचे ३५० युनिटस्च्या माध्यमातून ४ हजार जणांना रोजगार दिले आहे. कोल्हापूर महापालिकेने आय.टी. पार्कसाठी जागा आरक्षित केली असून, ट्रिपल आय.टी. संस्थेची उभारणी झाल्यास, कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्रातील आय.टी. हब होवू शकेल, असे मत खासदार महाडिक यांनी व्यक्त केले. प्रस्तावित मुंबई-बेंगलोर कॉरिडोरला या संस्थेचा लाभ होऊ शकतो असे त्यांनी संसदेच्या निदर्शनाला आणून दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अकरावीचे १६९९ प्रवेश निश्चित

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अकरावीच्या कला, वाणिज्य आणि शास्त्र या तिन्ही शाखांसाठी बुधवारी १६९९ प्रवेश निश्चित झाले. दरम्यान केंद्रीय प्रवेशप्रक्रियेनुसार कॉलेजप्राधान्यक्रम आणि गुणवत्ता यादीनुसार प्रवेश दिले जात असले तरी यादीनुसार मिळालेल्या कॉलेजबाबत हरकत घेणाऱ्या ९४ तक्रारी आज तक्रार निवारण केंद्रात दाखल झाल्या. यापैकी समितीकडून दहा तक्रारींचे निरसन करण्यात आले.

कट ऑफ यादी जाहीर झाल्यानंतर मंगळवारी अकरावीसाठी प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रियेला सुरूवात झाली. मंगळवारी १०६० विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित होते. दोन दिवसात २७५९ प्रवेश निश्चित झाले. दरम्यान कट ऑफ यादीनुसार निवड झालेल्या कॉलेजमध्ये प्राधान्यक्रमानुसार प्रवेश घेण्यासाठी २१ जुलैअखेर मुदत असून त्यानंतर रिक्त जागांसाठीची प्रवेश प्रक्रिया २४ जुलैपर्यंत सुरू राहणार आहे. ३३ कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेशप्रक्रिया सुरू असून मंगळवारी या प्रक्रियेतील दुसरा आणि महत्त्वाचा टप्पा सुरू झाला. ३ जुलैपासून अर्ज वितरण आणि अर्ज संकलन प्रकिया सुरू झाली होती. त्यानंतर कट ऑफ यादीकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागून राहिले होते. प्रवेश निश्चितीच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी कला शाखेतील इंग्रजी व मराठी माध्यमासाठी १२४ विद्यार्थ्यांनी प्रवेश नि​श्चित केला. तर कॉमर्सशाखेतील इंग्रजी व मराठी माध्यमासाठी ६१० विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला. शास्त्र शाखेतील ९६५ विद्यार्थ्यांनीच प्रवेश निश्चित केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वनखात्याची सुरक्षा वाऱ्यावर

0
0

Sachin.Yadav@timesgroup.com
Tweet : @sachinyadavMT

कोल्हापूर : नैसर्गिक संपदेचे रक्षण आणि संवर्धनासाठी कोल्हापूर वनविभागाकडे सक्षम फिरते पथक नाही. एका पोलिसावरच वनसंपदेची जबाबदारी असल्याचे दिसून येते. चंदन, रक्तचंदन अथवा नरक्याच्या झाडांची सुरक्षितता जपण्यासाठी सीसीटिव्ही कॅमेऱ्यांसह अन्य उपाययोजना नाहीत. वनक्षेत्रातील रेंज फॉरेस्ट ऑफिसरच्या कार्यालयांनाही सुरक्षा व्यवस्था नाही. कोल्हापूर, सातारा, सावंतवाडी, सांगली वनविभाग आणि चिपळूण विभागातही अशीच स्थिती आहे. वन विभागाची नर्सरी, विभागीय कार्यालये, वनसंपदेतील कोट्यावधींची मालमत्तेची जबाबदारी विभागानुसार चार ते पाच कर्मचाऱ्यांवर आहे. वनविभागातील काही कर्मचाऱ्यांचा अप्रत्यक्ष पाठिंबाही चोरट्यांना असल्याची शक्यता आहे.

वनविभागाच्या हद्दीतील एक रोप तोडली तरी गट क्रमांकाच्या शेतकऱ्यांवर फौजदारी दाखल केली जाते. एक फूट अतिक्रमण झाले तरीही हजारो रुपयांचा दंड करून कायदे लागू केले जातात. कोल्हापूर विभागात असे चित्र असले तरी वनविभागाची नर्सरी आणि वन क्षेत्राचे संरक्षण वाऱ्यावरच आहे. चिखली (ता. करवीर) येथील नर्सरीत १७ जुलैला मध्यरात्री चोरट्यांनी सशस्त्र दरोडा घातला. यात नर्सरीतील पाच टन चंदन, चंदन तेलाचे डबे असा सुमारे ७० लाख ५० हजाराचा मुद्देमाल लंपास केला. चोरट्यांनी सुरक्षारक्षकासह वनमजुराला मारहाण करून खोलीत डांबून घातले. या प्रकारानंतर वनविभागाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील नर्सरी सांभाळण्याची जबाबदारी वनाधिकाऱ्यांनी वनमजुरांवर सोपविली आहे. अवैध वाहतुकीच्या संशयावरून वनविभागाने २०१० मध्ये किणी टोल नाक्यावर एक ट्रक पकडला. मात्र, सुरक्षा व्यवस्थाच भक्कम नाही.

विभागाच्या फिरत्या पथकातून जिल्ह्यातील वनक्षेत्रांवर नजर ठेवली जाते. या पथकात वनरक्षक, वनपाल, रेंज फॉरेस्ट ऑफिसर, एक हत्यारी पोलिस, वाहनचालक आहे. जंगलातील दुर्मीळ झाडे तोडून चोरी करणाऱ्या टोळीवर नजर ठेवण्याचे काम ठेवले जाते. मात्र प्रत्यक्षात या पथकातील काही कर्मचाऱ्यांचे लागेबांधे चोरट्यांसोबत असण्याची शक्यता आहे. वनविभागाचा परवाना (पास) देण्यासाठी मोठी आर्थिक ऊलाढाल केली जाते. गगनबावडा, चंदगड, शाहूवाडी परिसरातील जंगलात अजूनही चंदन, नरक्या चोरीचे रॅकेट कार्यरत आहे. बारा वर्षापूर्वी गगनबावडा परिसरात नरक्या तस्करीचे रॅकेट उघड झाले. रॅकेटमध्ये वन विभागाच्या काही कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले होते. सध्या लाकडाची वाहतूक करण्यासाठी पास मिळविण्यासाठी मोठी धडपड करावी लागते. वनविभागाची विभागीय कार्यालये असली तरी वनाधिकारी आणि कर्मचारीही रस्त्यांवर वाहनांची तपासणी करीत नसल्याचे चित्र आहे. दुर्मीळ वनसंपदेचे संरक्षणात वनखात्याची सुरक्षा व्यवस्था पोकळ आहे.


हत्यारी पोलिस वाढविण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाला प्रस्ताव दिला आहे. विभागाच्या अतिसंवेदनशील असलेल्या वनसंपदेच्या कार्यालयाच्या परिसरातील सीसीटिव्ही कॅमेरे, वाय-फाय सुविधा सुरू करण्याचा विचार आहे. मोबाइल स्कॉडमधील कर्मचाऱ्यांची संख्या वाढविली जाणार आहे. चंदनाची लाकडे सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आली आहेत. या ठिकाणी लवकरच सुरक्षेच्या आणखी उपाययोजना केल्या जातील.

- प्रभू नाथ शुक्ल, उपवनसंरक्षक, कोल्हापूर विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जयप्रभा’ वाचला; शूटिंगची प्रतीक्षा

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

छत्रपती राजाराम महाराज यांनी चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांना दिलेली आणि गांधी हत्याकांडानंतर आर्थिक अडचणीतून स्टुडिओ अस्तित्वात राहावा यासाठी भालजींनी लता मंगेशकर यांना विकलेली वास्तू म्हणजे जयप्रभा स्टुडिओ. जयप्रभा स्टुडिओची वास्तू वारसास्थळांच्या यादीत समाविष्ट करण्यास गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी याचिका मागे घेऊन या वास्तूचे अस्तित्व कायम राखण्यातील अडथळा दूर केला असला तरी स्टुडिओची सद्यःस्थिती पाहता येथे चित्रपटनिर्मिती होण्याचा विचार अधांतरी असल्याचे चित्र आहे.

मंगळवारी लता मंगेशकर यांनी सर्वोच्च न्यायालयात जयप्रभा स्टुडिओचा हेरिटेज यादीत समावेश करण्याला विरोध करणारी याचिका मागे घेतल्यानंतर आता जयप्रभा स्टुडिओमध्ये पुन्हा ‘लाइट...कॅमेरा...अॅक्शन’ हे संवाद घुमतील अशा आशा निर्माण झाल्या. मात्र, स्टुडिओच्या सध्या अखत्यारित असलेल्या साडेतीन एकर परिसरात उभ्या असलेल्या इमारतीव्यतिरिक्त चित्रीकरणासाठी आवश्यक असलेली कोणतीही सुविधा कार्यान्वित नाही. प्रवेशद्वारापासून ते बेलबागेतील खणीलगतच्या भिंतीपर्यंतचा सर्व परिसर झुडपांनी व्यापून गेला आहे. गेल्या चार वर्षांपासून स्टुडिओमध्ये चित्रीकरणासाठी वापरले जाणारे साहित्यही नाही. त्यामुळे केवळ भकास इमारती आणि वाढलेल्या झुडपांची दाटी यामुळे स्टुडिओची साडेतीनएकर जागा सद्यस्थितीत चित्रपटनिर्मितीच्या वापरासाठी योग्य नाही.

चार वर्षांपूर्वी जेव्हा या जागेचा व्यवहार कोल्हापुरातील एका स्थानिक बांधकाम व्यावसायिकाशी केला, त्यावेळी कोल्हापुरातील कलाकारांनी लता मंगेशकर यांचा निषेध करत आंदोलन केले. संभाव्य धोका लक्षात घेऊन संबंधित बांधकाम व्यावसायिकाने व्यवहार रद्द केला. तोपर्यंत स्टुडिओची व्यवस्था पाहण्यासाठी मंगेशकर यांनी व्यवस्थापकाची नेमणूक केली होती. तसेच त्यापूर्वी एक ते दोन वर्षांपर्यंत काही मराठी सिनेमे आणि मालिकांचे चित्रीकरणही जयप्रभा स्टुडिओमध्ये झाले. मात्र, याठिकाणी कायमस्वरूपी शूटिंगउपयोगी साहित्य नसल्याने भाडेतत्त्वावर साहित्य मागवून चित्रीकरण करण्यात आले. मात्र, जयप्रभा स्टुडिओच्या उर्वरित साडेतीन एकर जागेच्या विक्रीचा व्यवहार मोडल्यानंतर मंगेशकर यांनी पुढच्या आठवडाभरातच येथील साहित्याची विल्हेवाट लावली आणि स्टुडिओला कुलूप लावले. केवळ अंतर्गत देखभालीसाठी वॉचमनची नेमणूक केली.

चार वर्षे स्टु​डिओमध्ये बाहेरील कोणत्याही व्यक्तीला प्रवेशबंदी होती. हेरिटेज यादीबाबतचा दावा मंगेशकर यांनी मागे घेतल्यानंतर बुधवारी स्टुडिओच्या मुख्य प्रवेशद्वाराला लावलेले कुलूप काढण्यात आले असले तरी बाहेरील व्यक्तींना प्रवेशबंदी कायम आहे. स्टुडिओचे व्यवस्थापन पाहणाऱ्या विलास यादव यांनी बुधवारी स्टुडिओच्या परिसराची पाहणी केली. तसेच लता मंगेशकर यांनी हेरिटेज यादीबाबत याचिका मागे घेतल्याच्या पार्श्वभूमीवर काही कायदेशीर बाबींविषयी चर्चा केली.

भविष्यात जयप्रभाच्या परिसरात चित्रपटनिर्मिती होण्याची शक्यता सध्या वर्तवली जात असली तरी या परिसरातील इमारती आणि त्यांची अवस्था पाहता अद्याप देखभाल आणि दुरुस्तीची गरज आहे. तसेच सध्या मराठी सिनेमा ज्या तंत्रज्ञानाच्या निकषावर तयार होत आहे आ​​णि विषयांच्या वैविध्यानुसार चित्रीकरणस्थळांची गरज बदलत आहे, त्याचा विचार करता जयप्रभा स्टुडिओने कात टाकण्याची आवश्यकता सद्यःस्थितीवरून दिसत आहे. यासाठी जो आर्थिक खर्च अपेक्षित आहे तो कोण करणार, हा प्रश्न सध्या तरी ‘जयप्रभा’च्या झुडपांनी वेढलेल्या स्थितीकडे पाहता गंभीर आहे. वारसास्थळांच्या यादीत समावेश झाल्यामुळे जयप्रभाच्या सध्याच्या जागेवर कोणतीही निवासी किंवा व्यावसायिक इमारत बांधली जाणार नाही यावर शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र, राजाराम महाराज आणि भालजी पेंढारकर यांच्या स्वप्नातील चित्रपटनिर्मिती आणि जयप्रभा हे समीकरण भविष्यात कायम राहायचे असेल तर हा परिसर चित्रपटनिर्मितीसाठी विकसित करण्याचे अधिकार आणि त्यासाठीची आर्थिक तरतूद कोण करणार, हा प्रश्नही या वास्तूसंदर्भातील नव्या वळणाने उपस्थित झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बापरे! ‘सात-बारा’त दोन लाख चुका!

0
0

Gurubal.mali@timesgroup.com
Tweet : @gurubalmaliMT

कोल्हापूर : कधी जमिनीचे क्षेत्र कमी लागलेले, जमीन एकाची तर सात बारा मात्र दुसऱ्याच्या नावाचा, कुठे कुळाची नोंद नाही तर कुठे कर्जाचा बोजाच गायब…सात बारा उताऱ्यावरील असंख्य चुका म्हणजे मोठी डोकेदुखी. पण ही डोकेदुखी कमी करण्यासाठी चावडी वाचनाचा उपक्रम राबवला गेला. यामध्ये एक दोन हजार नव्हे तर तब्बल दोन लाखावर चुका असल्याचे स्पष्ट झाले आहे. या चुका दुरूस्त करण्याचे सॉफ्टवेअर दोन दिवसांपुर्वी मिळाले आहे. दहा दिवसांत दोन लाख चुका दुरूस्तीचे न पेलणारे आव्हान प्रशासनासमोर उभे आहे.

सर्व जमिनींची नोंद त्या त्या गावातील तलाठ्याकडे असते. जमिनीची मालकी, क्षेत्रफळ, त्यावर असलेला बोजा, कुळ अशी सर्व नोंद सात-बारा उताऱ्यावर असते. प्रशासकीय कामात तसेच कर्ज काढताना या उताऱ्याला अतिशय महत्त्व असते. पण हे उतारे बिनचूक कमी आणि चुकीचे जास्त असतात. त्यामुळे त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. जमीन एकाची, मात्र उताऱ्यावर मालक दुसराच असतो. जेवढी जमीन प्रत्यक्षात असते, तेवढी जमीन कागदावरच नसते, कुळाची नोंद होत नाही, नाव चुकीचे नोंदवले जाते. एखादा पुरावा म्हणून जेव्हा हा कागद दिला जातो, तेव्हा तो ग्राह्य धरला जात नाही. जमीन विकताना अथवा विकत घेताना नोंदी होण्यास अडचण होते. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सात बारा उतारा बिनचूक करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी महिनाभर प्रत्येक गावात उताऱ्यांचे चावडी वाचन करण्यात आले. यामध्ये मोठ्या प्रमाणात चुका असल्याचे स्पष्ट झाले.

जिल्ह्यात दहा लाखावर सात बारा उतारे निघतात. यातील सर्व उताऱ्यांचे प्रत्येक गावात चावडी वाचन करण्यात आले. साडे चारशे तलाठ्यांच्या मदतीने हे वाचन झाले. यातील १५ ते २० टक्के उताऱ्यांत चुका आहेत. याचाच अर्थ दीड ते दोन लाख उताऱ्यात चुका असल्याचे स्पष्ट झाले आहे. येत्या १ ऑगस्टपासून राज्यात सर्व सात बारा ऑनलाइन देण्याचा आदेश देण्यात आला आहे. हे उतारे बिनचूक असावेत, असाही आदेश दिल्याने चुका दुरूस्त करण्यासाठी सध्या राज्यभर धावपळ उडाली आहे.


दोन दिवसांपूर्वी सॉफ्टवेअर

कोल्हापुरात दोन दिवसापूर्वी दुरुस्तीसाठी सॉफ्टवेअर मिळाले आहे. त्याचे काम अजूनही सुरू झाले नाही. केवळ दहा दिवसांत दोन लाख चुका सुधारण्याचे मोठे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर आहे. या चुका दुरूस्तीनंतर सात बारा उतारा मिळवण्यासाठी तलाठ्याला शोधण्याची अथवा हेलपाटे घालण्याची गरज भासणार नाही. https://mahabhulekh.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन प्रत्येकाला सातबारा काढता येणार आहे.

सात-बारा उतारा बिनचूक असणे आवश्यक आहे. पण त्यामध्ये अनेक चुका व त्रुटी होत्या. या त्रुटी दूर करणे गरजेचे असल्याने प्रशासनाने चावडी वाचनाचा उपक्रम राबवला तो निश्च‌ितच कौतुकास्पद आहे. ऑनलाइन सात-बारा उतारा मिळणार असल्याने शेतकऱ्यांची सोय होणार आहे.

- चंद्रकांत कांडेकरी, पाचगाव

ऑनलाइन सेवा देण्यात कोल्हापूरने पहिल्यापासूनच आघाडी घेतली आहे. सध्या सरकारच्यावतीने जन्म-मृत्यू दाखला व इतर १५ सेवा ऑनलाइन देण्यात येतात, यापुढे सात बारा उताऱ्यासह अन्य काही सेवा ऑनलाइन देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

- अविनाश सुभेदार, जिल्हाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सात टक्के महागाई भत्ता द्या...

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सात टक्के महागाई भत्ता त्वरित अदा करा, गेल्या तीन-चार वर्षांपासूनचे गणवेशाचे कापड द्यावे, यांसह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यालयासमोर गुरुवारी दुपारी ‘चड्डी-बनियन’ आंदोलन केले. मागण्यांकडे महामंडळाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन केल्याचे कर्मचारी संघटनेकडून स्पष्ट करण्यात आले. आंदोलनानंतर संघटनेच्या वतीने मागण्यांचे निवेदन विभाग नियंत्रक नवनीत भानप यांना देण्यात आले.

एसटीच्या खासगीकरणाचा घाट घातला जात असल्याचा आरोप करत विभागीय अध्यक्ष उत्तम पाटील म्हणाले, ‘एसटी महामंडळाच्या खासगीकरणामुळे अनेकांच्या नोकरीवर परिणाम होणार आहे. त्याचसोबत खेड्यापाड्यांतील सामान्य जनता एसटीपासून वंचित राहण्याचा धोका आहे. त्यामुळे आम्ही कर्मचारी हा डाव उधळवून लावू.’ कामागरांनी वारंवार मागणी करूनही प्रशासन दखल घेत नाही. त्यामुळे संपूर्ण राज्यात एसटी कामगारांमध्ये तीव्र नाराजी असल्याचे विभागीय सचिव वसंत पाटील यांनी सांगितले.

आंदोलनात संघटनेचे खजानिस मोहन मगदूम, के. ए. रोटे, अरविंद मोरे, अरुण भास्कर, सुरेश भांदणे, अशोक खापणे, आर. डी. कदम, एकनाथ अतिग्रे, रमेश थोरवत, सुभाष पाटील यांच्यासह बारा आगारांतील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या अशा -

- १ मे २०१६ पासून २५ टक्के अंतरिम वाढ द्या

- वेतन करारातील कलम १४७ चा भंग करून वेळापत्रक अंमलबजावणीसंदर्भात एकतर्फी प्रसारित केलेले परिपत्रक रद्द करा

- चालक कम वाहक पद रद्द करा

- कमी केलेल्या अनुकंपा तत्त्वावरील लिपिकांना टंकलेखनाचे प्रमाणपत्र सादर केल्यावर सेवेत घ्या

- प्रवाशांना दर्जेदार सेवा देण्यासाठी किलोमीटर पूर्ण झालेल्या गाड्या वापरातून बंद कराव्यात

- प्रवाशांना जलद सेवा देण्यासाठी सुरू केलेल्या विनावाहक गाड्या त्वरित बंद करा

- सेवानिवृत्त कर्मऱ्यांना वर्षभराचा मोफत पास द्यावा

- वैद्यकीय अपात्र कर्मचाऱ्यांच्या वारसांना पूर्वीप्रमाणे अनुकंपामध्ये नोकऱ्या द्याव्यात

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अनधिकृत केबिनवरून हल्लाबोल

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर शहरातील वाढत्या अनधिकृत केबिनवरून महापालिकेची सर्वसाधारण सभा गाजली. तीन महिन्यांत ५६० बेकायदेशीर केबिन सुरू झाल्या. चौक आणि प्रमुख रस्त्ये खोक्यांनी व्यापले असून, कोल्हापूर हे ऐतिहासिक शहर आहे की केबिनचे, असा प्रश्न पडत आहे. अनधिकृत केबिन थाटण्यात कुणाचे डोके आहे? अशी केबिन, अतिक्रमणे हटविण्यात प्रशासनाचे हात कुणी बांधलेत? अशा शब्दांत नगरसेवकांनी प्रशासनावर हल्लाबोल चढविला. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर हसीना फरास होत्या.

महापालिकेने दिव्यांगांच्या पुनर्वसनासाठी केबिन पुरविल्या; पण त्यामध्ये काही जणांनी डुप्लिकेट केबिन तयार केल्या आहेत. त्याची तपासणी करण्याची सूचना नगरसेवक सुनील कदम यांनी केली. महावीर गार्डन, आरटीओ रोड, केशवराव भोसले नाट्यगृहाजवळील खाऊगल्ली, सागरमाळ येथील अन​धिकृत केबिनवरून नगरसेवक आक्रमक झाल्यानंतर आयुक्त ​अभिजित चौधरी यांनी सभागृहाने केबिन हटविण्याचा ठराव मंजूर करावा, प्रशासन कारवाई करायला तत्पर असल्याचे उत्तर दिले. त्यावर अ​नधिकृत केबिनला कुठलाही नगरसेवक पाठीशी घालणार नाही. प्रशासनाने अनधिकृत केबिन हटविण्याची मोहीम हाती घ्यावी. केबिनवरील कारवाईत हस्तक्षेप करणाऱ्या नगरसेवकांची नावे जाहीर करावीत, त्यांना अपात्रही ठरवावे असे खुले आव्हान सदस्यांनी प्रशासनाला दिले. नगरसेवक सत्यजित कदम, भूपाल शेटे, राहूल चव्हाण, प्रवीण केसरकर, किरण नकाते, शेखर कुसाळे, सुनील पाटील, छाया पोवार यांनी बेकायदेशीर केबिनप्रश्नी प्रशासनाची चांगलीच कोंडी केली. भविष्यात दिव्यांगांना केबिन देण्याऐवजी रोख स्वरूपात अनुदान देण्याची सूचना नगरसेवकांनी केली. ​

प्रसंगी आयुक्त कार्यालयाला घेराओ

महापालिका चौकात केबिन वाटपावरून अधिकाऱ्यांची गळपट्टी धरण्याचा प्रकार घडला होता. अपंगांची ही कृती चुकीची होती. दिव्यांगांच्या पुनर्वसनासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. त्यांनी अशा प्रकारचे वर्तणूक करू नये अशी सूचना भाजप गटनेते विजय सूर्यवंशी यांनी केली. केएमटीतील कंडक्टर भरती प्रकिया पारदर्शकपणे राबविल्याबद्दल परिवहन समिती सभापती नियाज खान यांनी आयुक्त व इतर अधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यानंतर खान यांनी केएमटीतील कर्मचाऱ्यांना तीन-तीन महिने पगार मिळत नाहीत. सेवा​निवृत्त कर्मचाऱ्यांना पीएफच्या रकमेसाठी महापालिकेसमोर निदर्शने करावी लागतात. पगारातून रक्कम कपात करूनही भविष्य निर्वाह निधीच्या पीएफ खात्यात जमा नाही. केएमटीची बँक खाती सील होतात याला सर्वस्वी अधिकारी जबाबदार आहेत. अधिकाऱ्यांच्या कामकाजात सुधारणा झाली नाही तर सगळ्या कर्मचाऱ्यांना घेऊन आयुक्त कार्यालयात ठिय्या मारू, असा इशारा त्यांनी दिला. नगरसेवक संतोष गायकवाड यांनी केएमटीच्या कारभाराची चौकशी झाली पाहिजे. नवीन बसेस येऊनही उत्पन्नात वाढ नाही. केएमटीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप केला.

ऑफिस प्रस्तावानंतर ‘केएसबीपी’बाबत निर्णय

शहरातील चौक व ट्राफिक आयलँड सुशोभिकरणासाठी केएसबीपीला अशासकीय संस्थांबरोबर करार करण्याची परवानगी द्यावी या सदस्य ठरावावरून सभागृहात जोरदार चर्चा झाली. चौक सुशोभिकरणासाठी विविध संस्था, इंडस्ट्रीज महापालिकेला सहकार्य करण्यास तयार असताना केवळ केएसबीपीशी करार कशासाठी? महापालिकेने स्वत: चौक सुशोभित करावेत. केएसबीपीवर विश्वास नसल्याचे काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख यांनी सांगितले. त्याला भाजप गटनेते विजय सूर्यवंशी यांनी आक्षेप घेतला. एखादी संस्था चांगले काम करत असल्यास त्यांच्यावर विश्वास नाही असे वक्तव्य करणे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले. महापौर फरास यांनीही केएसबीपी चांगल्या पद्धतीने काम करत असून, ठराव मंजूर करण्याचे आवाहन केले. भूपाल शेटे, तौफिक मुल्लाणी यांनी चौक सुशोभिकरणस्थळी महापालिकेच्या नावाचा फलक दर्शनी भागात लावण्याची सूचना केली. अखेर ऑफिस प्रस्ताव सादर करण्याच्या अटीवर या ठरावाला मंजुरी देण्याचा निर्णय झाला.

‘आपत्कालीन व्यवस्थापन’वर प्रश्नचिन्ह

नगरसेविका रूपाराणी निकम यांनी महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापनवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राजेंद्रनगर परिसरात बुधवारी सकाळी घराची भिंत कोसळली. भिंत हटविण्यासाठी जेसीबी पाठविण्यासाठी सकाळी फोन करूनही जेसीबी पाठविला नाही. नगरसेवकांना अशी वागणूक मिळत असेल तर सामान्यांची काय व्यथा ? असा सवाल केला. नगरसेवक मोहन सालपे यांनी वर्कशॉपमधील कर्मचारी डिझेल नसल्याने जेसीबी बंद असल्याचे सांगतात, प्रशासनाने वस्तुस्थिती स्पष्ट करावी अशी सूचना केली. शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी भिंत कोसळल्याची घटना समजल्यानंतर कर्मचारी पाठविले. महापालिकेकडील सहा जेसीबी चालू स्थितीत आहेत. सकाळी अन्य प्रभागात जेसीबी गेल्याने राजेंद्रनगरमध्ये पाठविण्यास विलंब झाल्याचे सांगितले. नगरसेविका महेजबीन सुभेदार यांनी लक्ष्मीपुरीतील रस्त्याच्या दुरुस्तीचा प्रश्न मांडला.

थेट पाइपलाइन योजनेसाठी हुडको या वित्तीय संस्थेशी करार व कर्जाचा परतावा करण्यासाठी निवारण निधी स्थापण्याचा प्रस्ताव मंजूर केला, तर महापालिका ह​द्दीतील खासगी ड्रेनेज, मैला सक्शन करण्यासाठी खासगी प्लंबरना परवानगी देण्याचा प्रस्ताव पुढील मिटिंगमध्ये करण्याचे ठरले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नियुक्ती’चे राजकारण घोंघावणार

0
0


ppasaheb.mali@timesgroup.com

Tweet:@Appasaheb_MT

नव्या विद्यापीठ कायद्यानुसार विविध अधिकार मंडळांसाठी निवडून द्यावयाच्या उमेदवारांइतकीच नियुक्त सदस्यांची संख्या आहे. कुलगुरू आणि कुलपती नियुक्त सदस्य संख्या सुमारे ४१ आहे. कुलगुरू आणि कुलपतीनियुक्त यादीमध्ये आपल्या गटातील व्यक्तींचा समावेश होण्यासाठी प्रत्येक संघटना, आघाडी सक्रिय झाली आहे. संस्थाचालक, प्राचार्य संघटना, आघाड्यांनी पहिल्या टप्प्यात जिल्हानिहाय संभाव्य यादी तयार करत आहेत. दुसरीकडे भाजपही पडद्याआड राहून विद्यापीठातील विविध अधिकार मंडळांवर कार्यकर्त्यांची वर्णी लावण्याच्या तयारीत आहे. राज्यातील सत्ताधारी घटकांशी जवळीक असलेल्या एका विद्यार्थी संघटनेने विद्यापीठ प्रशासनाकडे उमेदवारांची यादी दिल्याची शैक्षणिक वर्तुळात चर्चा आहे.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि संस्थाचालकांची आघाडी म्हणून ओळखली जाणारी शिवाजी विद्यापीठ विकास आघाडी एकत्र आल्याने नियुक्त सदस्य प्रक्रियेत राजकीय वरचष्मा राहील अशी शैक्षणिक वर्तुळात चर्चा आहे. दरम्यान, विविध घटकांना सुटाविरोधात एकत्र आणलेल्या शिवाजी विद्यापीठ विकास आघाडीतही सारे काही आलबेल नसल्याचे वृत्त आहे. आघाडीच्या चार दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत धुसफूस झाल्याची चर्चा आहे. कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तीनही जिल्ह्यांतील संस्थाचालक, राजकारणी विद्यापीठ निवडणुकीसाठी पुढे सरसावले आहेत. राज्यात सत्तास्थानी असलेल्या भाजपने पडद्यामागे राहून विद्यापीठ राजकारणावर वर्चस्व ठेवण्याच्या हालचाली करत असल्याचे चित्र आहे. प्रत्यक्ष निवडणुकीपेक्षा नामनिर्देशित सदस्यांत भाजपला मानणाऱ्या कार्यकर्त्यांची वर्णी लावण्याचा प्रयत्न आहे. या निवडणुकीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने स्वतंत्रपणे मोर्चेबांधणी सुरू केली होती. मात्र ,अंतिमतः त्यांनी​ विद्यापीठ विकास आघाडीसोबत राहण्याचा निर्णय घेतला. तीनही जिल्ह्यांतील दोन्ही काँग्रेसमधील अनेक शिक्षण संस्थाचालक, संघटना आज भाजपच्या वळचणीला जात आहेत. यामुळे नियुक्त सदस्यांमध्ये मूळ भाजपवाले स्थान पटकाविणार की काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कारभाऱ्यांना संधी मिळणार याविषयी आडाखे बांधले जात आहेत.

सिनेटमध्ये १७ जागांसाठी नियुक्ती

संस्थाचालक विरुद्ध शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघ (सुटा) अशी सरळ लढत होण्याची स्पष्ट चिन्हे आहेत. दरम्यान, नव्या कायद्यानुसार प्रत्यक्ष निवडणुकीपेक्षा कुलगुरू आणि कुलपती नियुक्तीला जास्त प्राधान्य आहे. अधिसभेवर तब्बल १७ सदस्य नामानिर्देशित असणार आहेत. कृषीक्षेत्र, समाजकार्य, सहकार, कायदा, फायनान्स, बँकिंग, सांस्कृतिक क्षेत्रातील मिळून चार सदस्यांची नियुक्ती होणार आहे. उद्योग, शिक्षण, विज्ञान, फाइन आर्टस, पर्यावरण या क्षेत्रातील प्रत्येकी एक असे पाच सदस्य असतील. याशिवाय महिला विकास, ज्येष्ठ नागरिक कल्याण, दळणवळण संपर्क, प्रसार माध्यम क्षेत्रातील मिळून एका सदस्याची नियुक्ती होणार आहे. कुलगुरू नियुक्तीच्या अखत्यारित सात जागा आहेत. यामध्ये विद्यापीठ सेवक, महाविद्यालयीन सेवक, महापालिका-नगरपालिका आणि जिल्हा परिषदेमधून प्रत्येकी एक असे तीन सदस्य असतील. याशिवाय विद्यापीठ कार्यक्षेत्रातील दोन आमदार आणि विधानपरिषदेतील एका आमदारांची नियुक्ती होऊ शकते.


चार जागा नामनिर्देशित

व्यवस्थापन परिषदेच्या एकूण २१ जागा आहेत. यापैकी चार जागा नामनिर्देशित आहेत. यामध्ये कुलगुरूनियुक्त दोन डीन, विद्यापीठ अधिविभाग प्रमुख (१) आणि कुलगुरुंनी कुलपतींशी चर्चा करून राष्ट्रीय कीर्तीच्या संस्थेतील एका सदस्याची नियुक्ती करावयाची आहे. ज्यांनी यापूर्वी व्यवस्थापन परिषदेत काम केले आहे, त्यांना पुन्हा संधी नको अशी चर्चा एका आघाडीच्या बैठकीत झाल्याचे संस्थाचालकांनी सांगितले.


विद्या परिषदेत रस्सीखेच

विद्या परिषदेवर २० जागांवर नियुक्ती होणार आहे. कुलगुरुंनी कुलपतींशी विचारविनिमय करून शोध समितीच्या शिफारशीनुसार सदस्य निवडी करावयाच्या आहेत. यामध्ये आठ प्राचार्यांचा समावेश आहे. ‘नॅक’कडून मूल्यांकन झालेल्या कॉलेजच्या प्राचार्यांना संधी मिळणार आहे. आठपैकी सहा प्राचार्य खुल्या प्रवर्गातील, एक महिला प्राचार्य तर एक प्राचार्य एससी, एसटी, एनटी किंवा ओबीसी गटातील आवश्यक आहे. विद्या परिषदेवर दोन प्राध्यापक, मान्यताप्राप्त संस्थेचा प्रमुख एक, संस्था प्रतिनिधी गटातून एका प्रतिनिधीचा समावेश आहे. शिवाय मान्यवर तज्ज्ञ म्हणून आठ जणांची कुलपतींकडून नियुक्ती होणार आहे.


सिनेटसाठी नामनिर्देशित सदस्य संख्या ः १७

व्यवस्थापन परिषद नामनिर्देशित सदस्य संख्या ः ४

विद्या परिषदेवर नामनिर्देशित सदस्य संख्या ः २०

……………………

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यातील सूतगिरण्यांमध्ये खडखडाट

0
0

राजेंद्र पाटील, इचलकरंजी

केंद्र सरकारने कॉटन आणि पॉलिस्टर सूतावर जीएसटी लागू केल्यानंतर राज्यातील सहकारी आणि खासगी सूत गिरण्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. परिणामी जीएसटी प्रणालीतील गुंतागूंत सोडविण्याच्या मागणीसाठी सूत गिरण्या बुधवारपासून बंद ठेवण्यात आल्या आहेत. राज्यभर य सूतगिरण्या शनिवारपर्यंत (ता. २२ जुलै) बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सहकारी व खासगी तत्वावरील सुमारे १४० सूतगिरण्या बंदमध्ये सहभागी झाल्या आहेत. परिणामी १५ लाख चात्या थांबल्या आहेत. दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रातील काही सूतगिरण्या ३१ जुलैपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिणामी हजारो कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.

वस्त्रोद्योग क्षेत्रात निर्माण झालेली मंदी, कापूस आणि विजेचे वाढते दर, महागाईच्या तुलनेत कामगारांना द्यावा लागणारा पगार, सुट्या भागांना लागू झालेली जीएसटी अशा कारणांनी सूतगिरण्यांच्या चाती थंडावत चालल्या आहेत. पूर्वी विदर्भात कापसाचे उत्पादन कमी झाल्याने तुटवडा जाणवत होता. आता कापसाचा दर ४२ हजार ७०० रुपये प्रतिखंडीपर्यंत पोहोचला आहे. आधीच अडचणीत सापडलेल्या सूतगिरण्यांना कापसाच्या वाढीव दराचा सामना करावा लागत आहे. त्यातच जीएसटी करप्रणाली लागू झाल्याने कॉटनवर पाच टक्के तर पॉलिस्टरवर १८ टक्के जीएसटी आकारणी केली जाणार आहे.

राज्यातील सूत गिरण्यांमध्ये ४० टक्के पॉलिस्टर सुताची निर्मिती केली जाते. यामध्ये सूरत, अहमदाबाद व भिलवाडा या प्रमुख केंद्रांमध्ये त्याची विक्री केली जाते. सुरतमध्ये साडीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. भिलवाडात सुटिंगचे व अहमदाबादमध्ये शर्टिंगचे उत्पादन केले जाते. या राज्यांत जीएसटी प्रणालीला मोठा विरोध दर्शविला जात असून त्याविरोधात बाजारपेठ पूर्णत: बंद ठेवण्यात आली. त्यामुळे या राज्यांतून पॉलिस्टर सुताची मागणीच थांबली आहे. त्यामुळे सूतगिरणी चालकांनीही पॉलिस्टर सुताचे उत्पादन बंद ठेवले आहे. कॉटन सुताचे उत्पादन काही प्रमाणात केले जात असून त्यालाही मागणी जेमतेमच आहे. केंद्र सरकार जीएसटी करप्रणातील सुधारणा करेल अशी आशा असल्याने अनेक सूतगिरण्या तसेच कापड व्यापाऱ्यांनीनी जीएसटीएन नंबर नोंदविलेला नाही. त्याचाही काही अंशी फटका या व्यवसायला बसत आहे.

राज्यात एकूण १२२ सहकारी तत्वावरील सूत गिरण्या असून त्यातील ७० सूतगिरण्या चालू आहेत. तर खासगी तत्वावरील सर्व ७० सूत गिरण्यांत १५ लाख चात्यांद्वारे सुताचे उत्पादन घेतले जात आहे. आधीच अडचणीत सापडलेल्या सूत गिरण्यांपुढे जीएसटी करप्रणालीने अडचणी निर्माण केल्या आहेत. त्याचा सामना करण्यासाठी राज्यातील सर्वच सूत गिरण्यांनी चार दिवस सूत गिरण्या बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. तर पश्चिम महाराष्ट्रातील काही सूत गिरण्यांनी ३१ जुलैपर्यंत संपूर्ण उत्पादन बंद ठेवले आहे. परिणामी हजारो कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे.


‘जीएसटी करप्रणातील सुसूत्रता आणण्याबरोबरच गुंतागुंत सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्यावतीने एक शिष्टमंडळ लवकरच मंत्र्यांची भेट घेणार आहे. या संदर्भात प्राथमिक चर्चा झाली असून सहकारमंत्री सुभाष देशमुख व अर्थमंत्री सुधीर मनगुंटीवार यांनी या आठवड्यात बैठक घेण्याचे निश्चित केले आहे. त्यामध्ये राज्यातील सूत गिरण्यांच्या समस्या मांडल्या जाणार आहेत. त्यातून समाधानकारक तोडगा निघण्याची आशा आहे.

- अशोक स्वामी, अध्यक्ष, राज्य वस्त्रोद्योग महासंघ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पंचगंगे’चा धोक्याचा इशारा

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दिवसभर शहरात पावसाचा जोर कमी झाला असला तरी पंचगंगेच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. पंचगंगा नदी इशारा पातळीजवळ पोहोचली आहे. रात्री उशीरापर्यंत पंचगंगा ३७ फुटावर पोहोचली असून इशारा पातळी ३९ फूटावर आहे. धरणक्षेत्रात दमदार झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील नदी आणि बंधाऱ्याच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली असून ७५ बंधारे पाण्याखाली गेले. नृसिंहवाडी येथे दक्षिणद्वार सोहळा झाला.

शहरात पावसाचा जोर कमी असला तरी धरणक्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. शाहूवाडी, राधानगरी, गगनबावडा, कागल, आजरा आणि चंदगड तालुक्यात अतिवृष्टी झाली. वेतवडे (ता.पन्हाळा) येथे डोंगराला भेगा पडल्याने पाच कुटुंबातील २३ जणांना प्राथमिक शाळेत स्थलांतरित करण्यात आले. कळे येथे पाणी आल्याने कोल्हापूर-गगनबावडा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला. बाजारभोगाव अणुस्करा राजापूर-या राज्यमार्गावरील वाहतूक विस्कळित झाली. कुडत्री (ता. राधानगरी) येथे पुलाचा भराव खचला. राधानगरी धरणातून २३०० क्युसेक विसर्ग सुरू झाल्याने परिसरातील नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. वेदगंगा, दूधगंगा, तुळशी नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. गगनबाबडा तालुक्यात १३५ मिलिमीटर असा सर्वांधिक पाऊस झाला. जिल्ह्यात सरासरी ७५. ६५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. गगनबावडा तालुक्यात गेल्या तीन दिवसापासून सलग पाऊस सुरू असल्याने कुंभी, धामणी आणि कासारी या नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत.

पंचगंगा नदीचे पाणी माजी आमदार संजयसिंह गायकवाड यांच्या पुतळ्याजवळ पाणी आल्याने गंगावेश ते शिवाजी पूल वाहतूक बंद झाली आहे. पावसाच्या तडाख्याने प्रायव्हेट हायस्कूलजवळ झाडाची फांदी कोसळल्याने वीजेचा खांब कोसळला. बुधवारी पंचगंगा नदीची पाणीपातळी ३४ फूटावर होती. पाणी नदीकाठा पोलिसांनी लावलेल्या बॅरिकेटपर्यंत होते. गुरूवारी सकाळपासून पातळीत वाढ झाली. दुधाळी येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्र, शुक्रवार पेठ, चिखली, केर्ले परिसर, जुना बुधवार पेठ, करवीर पंचायत समिती कार्यालय, जयंती नाला परिसरात पाणी पसरले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यशासाठी सुसंस्काराची जोड आवश्यक

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘सध्याचा काळ झपाट्याने बदलत आहे. त्याप्रमाणे नवीन पिढीचे विचारांमध्येही वेगाने बदलत होत आहेत. या विचारांना वेसण घालून संस्कारक्षम पिढी घडवण्याची जबाबदारी वडिलधाऱ्यांची आहे. बदलत्या पिढीला संस्काराची जोड असले, तर आयुष्य सुकर बनते आणि संस्कारांमुळे मनुष्य सुसंस्कृत बनतो’, असे प्रतिपादन कोल्हापूर परिक्षेत्रआचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी केले. सहकारशिरोमणी स्वर्गीय एस. आर. पाटील यांच्या १५ व्या पुण्यतिथीनिमित्त एस. आर. पाटील ट्रस्ट आणि रयत सेवा कृषी उद्योग संघातर्फे आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. शाहू स्मारक भवनात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक होत्या.

‘गावाचं गावपण हरवत चाललंय’ विषयावर बोलताना नांगरे-पाटील म्हणाले, ‘काळाप्रमाणे नवीन पिढीमध्ये विचार बदलत आहेत. होकारात्मक, नकारात्मक आणि धोकायदायक अशा तिन्ही पद्धतीने बदल होत आहे. अशा परिस्थितीत अनुभवच सर्वांना शहाण बनवतो. प्रत्येक गोष्टींचा अतिरेक झाल्यास ते विष बनते. त्यामधून केवळ अंतच घडून येतो. त्यामुळे मालकांनी पाल्यांवर चांगले संस्कार करणे जरुरीचे आहे. असे संस्कार करताना पालकांनी स्वत: काय आहोत याचे चिंतन करणेही आवश्यक आहे. कुटुंबातील ज्येष्ठांनी मुली, महिलांचा सन्मान केल्यास युवकांमध्येही आपोआपच तीन भावना निर्माण होईल. भाषावाद, जातीयवाद, प्रांतवाद अशा समस्या निर्माण होत असताना चांगली पिढी घडवण्यासाठी त्याला संस्काराची जोड देणे आवश्यक आहे.’

‘आई-बाबा’ या विषयावर बोलताना डॉ. कालिदास पाटील म्हणाले, ‘आजच्या पिढीवर संस्कार करण्यापूर्वी पालकांनी स्वत:कडे वळून बघण्याची आवश्यकता आहे. त्यातूनच आचार, विचार यांची सांगड घातली पाहिजे. कुटुंबातील सद्स्यांच्या आचार-विचारांमध्ये एक वाक्यता असेल, तर घर समृद्ध बनते. समृद्धीची प्रक्रिया निरंतर सुरू राहिल्यास गाव, जिल्हा, राज्य आणि देश समृद्ध होण्यास मदतशीर ठरते. त्यामुळे आपल्या मुलांनी भविष्यात काहीतरी बनावे असे, वाटत असेल तर चांगल विचार त्यांच्यामध्ये रुजवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.’

माजी आमदार संपतबापू पवार-पाटील, आर. डी. पाटील, नेमगोंडा पाटील, माधुरी पाटील, तानाजी निगडे, चिंतापणी गुरव, उदय पाटील, सचिन पाटील, नामदेवराव कांबळे, बाबासाहेब पाटील, पी. डी. पाटील आदी उपस्थित होते. ट्रस्टचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी स्वागत केले. प्राचार्या मंगला पाटील-बडदारे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images