Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

आता लढा इथेनॉलसाठी

$
0
0
अतिरिक्त उसापासून इथेनॉल निर्मिती शक्य आहे. इथेनॉल निर्मितीऐवजी कोट्यवधी रुपयांच्या करासाठी राज्य सरकार दारु उत्पादनाला अधिक पसंती देत आहे.

५ कोटींचा ‘डॉल्बी’वर चुराडा

$
0
0
किरकोळ विक्रेत्यांपासून मोठ्या व्यापाऱ्यांपर्यंत प्रचंड रोजगार व आर्थिक कमाई देणाऱ्या या उत्सवाला कोल्हापुरातील आर्थिक उलाढालीचे अकरा दिवस असे रूप आले आहे.

‘मोहंजोदडो’वर लव्हस्टोरी करायचीय

$
0
0
‘लगान, स्वदेस, जोधा-अकबर’ या सारख्या भव्य सिनेमांची निर्मिती करणारे प्रख्यात दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर आता लव्हस्टोरीवर आधारीत सिनेमाच्या तयारीत आहेत.

‘इंडेक्स टू’ ऑनलाइन

$
0
0
‘इंडेक्स टू’सह मालमत्ताविषयक सर्व कागदपत्रे आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहेत. यासाठी ‘ई-सर्च’ हे सॉफ्टवेअर विकसित करण्यात येत आहे. या माध्यमातून मालमत्ताविषयक सर्व कागदपत्रे ऑनलाइन उपलब्ध होऊ शकतील.

इचलकरंजीत आणखी ९ जणांना अटक

$
0
0
गणेश विसर्जन मिरवणूकीत मूर्ती दुखावल्याच्या कारणावरुन झालेल्या दंगली प्रकरणी पोलिसांची धरपकड मोहिम तीव्र झाली आहे. पोलिस ठाण्यावर दगडफेक आणि पोलिसांवर प्राणघातक हल्ला केल्या प्रकरणी आज आणखी ९ जणांना अटक करण्यात आली.

पत्नी माहेरी गेल्याच्या नैराश्यातून आत्महत्या

$
0
0
किरकोळ भांडणातून पत्नी माहेरी गेल्याच्या विरहातून भूपाल मनोहर रेडेकर (४०, रा. फिरंगाई तालीम) यांनी शनिवारी आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला.

जयसिंगपुरात २ ठिकाणी घरफोडी

$
0
0
जयसिंगपुरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी बंद घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी पाच तोळे सोन्याचे दागिने, मोबाईल व सव्वीस हजाराची रोकड लंपास केली. चोरीच्या या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

डेंगीसदृश आजाराने बालकाचा मृत्यू

$
0
0
डेंगीसदृश्य आजाराने यादवनगर येथील अरमान महम्मंद पिळगावकर या दहा वर्षाच्या बालकाचा शनिवारी मृत्यू झाला. डेंगीसदृश्य लक्षणांमुळे त्याला एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

कॉलेज कॅम्पसमध्ये खंडपीठासाठी जागर

$
0
0
कोल्हापूर खंडपीठाचा जागर शनिवारी शाहू कॉलेजमध्ये करण्यात आला. चारशे विद्यार्थ्यांचा मेळावा घेऊन अॅड. राजेंद्र मंडलिक व त्यांच्या पथकाने खंडपीठाची गरज पटवून दिली.

‘तो’ कॉन्स्टेबल पाय घसरून पाण्यात पडला

$
0
0
नगरसेवकाच्या भावाने एका कॉन्स्टेबलला इराणी खणीत फेकून दिल्याची चर्चा निरर्थक असून तो कॉन्स्टेबल पाय घसरुन पाण्यात पडला असल्याचा जबाब त्याने दिला असल्याची माहिती जिल्हा पोलिसप्रमुख विजयसिंह जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना शनिवारी दिली.

विसर्जन मिरवणुकीत प्रचंड ध्वनिप्रदूषण

$
0
0
सार्वजनिक गणेशोत्सव मिरवणुकीत मुख्य विसर्जन मार्गावर सर्वत्र मोठ्या प्रमाणावर ध्वनीप्रदूषण झाले असल्याचे शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाने केलेल्या अभ्यासात दिसून आले आहे.

नंबरप्लेटचे नियम पाळा, अन्यथा कारवाई

$
0
0
वाहनधारकांकडून गाड्यांच्या नंबर प्लेटबाबत अत्यंत निष्काळजीपणा केला जातो आहे. प्रत्येक पद्धतीच्या वाहनासाठी वेगवेगळ्या रंगातील नंबरप्लेट असतानादेखील त्याचे पालन केले जात नाही.

बोन्साय कल्बचे सदस्य चीनला रवाना

$
0
0
चीन येथे होणाऱ्या सातव्या जागतिक बोन्साय कनव्हेशनसाठी कोल्हापूर बोन्साय कल्बचे १२ सभासद रवाना होत आहेत. हे कनव्हेशन जीतांन येथे तीन दिवस सुरू राहणार आहे.

गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

$
0
0
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला एक महिना पूर्ण झाला. तरी देखील त्यांच्या हत्याप्रकरणातील आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही. याची नैतिक जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी अंनिसच्या कार्यकर्त्यांनी केली.

कायदेशीर प्रक्रियेला सहकार्य

$
0
0
‘गणेशोत्सवात डॉल्बीच्या माध्यमातून संबंधित घटना घडली. आमदार राजेश क्षीरसागर यांना महाराष्ट्र ओळखतो, ते विनयभंगासारखा प्रकार करणे शक्य नाही. यासाठी आम्ही पोलिस अधिकाऱ्यांना भेटलो.

मातीविना शेती

$
0
0
गणेशोत्सवकाळात मंडपातील फुलांच्या सजावटीवर हजारो रुपयांचा खर्च केला जात असताना जवाहरनगरातील राजर्षी शाहू चौक मित्र मंडळाच्या बाप्पांसमोर केवळ भागातील कचऱ्यावर फुलवलेल्या फुलांचे पॉट ठेवून संस्कृती आणि पर्यावरण यांची नाळ जोडण्यात आली.

नोकरी लावण्यावरून सुनेस पेटवले

$
0
0
अनुकंपा तत्वाखाली नगरपालिकेत नोकरीस लावण्याचा आग्रह धरणाऱ्या सुनेला सासू आणि नणंदेने रॉकेल ओतून पेटविले. श्रीमती मनिषा ज्ञानदेव हत्तीकर (वय २५ रा. सहकारनगर साईट नं.१०२) असे जखमी महिलेचे नाव आहे.

पुरावे गोळा करून अटकेची कारवाई

$
0
0
आमदार राजेश क्षीरसागर व त्यांच्या कार्यकर्त्यांवर दाखल केलेल्या गुन्ह्याबाबत पुरावे गोळा करून अटकेची कारवाई केली जाईल, अशी माहिती जिल्हा पोलिसप्रमुख विजयसिंह जाधव यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

गॅस एजन्सीतच आधार नोंदणी

$
0
0
जिल्ह्यात गॅस सबसिडी योजना १ नोव्हेंबरऐवजी १ डिसेंबरपासून सुरु होणार आहे. थेट सबसिडी जमा करण्यासाठी आधारकार्ड आवश्यक असल्याने आतापर्यंत जिल्ह्यातील ३२ हजार गॅस ग्राहक आधार कार्डशी तर १३८ गॅस ग्राहक बँक खात्याशी संलग्न झाले आहेत.

पालिका अधिकारी ‘लॉ’च्या वर्गात

$
0
0
दैनंदिन कामकाज हे कायदे, नियमानुसार काम करावे लागत असल्याने महापालिकेचे अर्धा डझनहून अधिक अधिकारी दैनंदिन कामाचा व्याप सांभाळून कायद्याचे शिक्षण घेत आहेत.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images