Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

कोल्हापूर-वैभववाडीचे रविवारी भूमिपूजन?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूरकरांसाठी बहुप्रतिक्षित असलेल्या कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गाचे भूमिपूजन रविवारी (ता. ११ जून) होणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. मात्र, कार्यक्रमाला रेल्वेमंत्री सुरेश प्रभू उपस्थित राहणार नसल्याचे सांगण्यात येते. कऱ्हाड रेल्वे स्थानकावर आयोजित एका कार्यक्रमात विविध प्रकल्पांचे उदघाटन करण्यात येणार आहे. त्यात व्हिडिओ लिंकद्वारे कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे प्रकल्पाचे भूमिपूजनही करण्यात येईल अशी माहिती रेल्वेतील सूत्रांनी दिली. मात्र, याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्राशी निगडीत रेल्वेच्या अनेक विकासप्रकल्पांची घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केली आहे. त्यात कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्ग, हातकणंगले-इचलकरंजी तसेच फलटण-पंढरपूर मार्गांचा समावेश आहे. यातील कोल्हापूर-वैभववाडी या १०७ किलोमीटर मार्गाला अंतिम मंजुरी मिळाली आहे. रेल्वेमंत्रालयाने या प्रकल्पासह राज्यातील विविध प्रकल्पांसाठी दहा हजार कोटी रुपयांची तरतूदही केली आहे. कामसाठी जॉईंट व्हेंचर कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे आता केवळ भूमिपूजन करून कामाला सुरुवात करण्याची औपचारिकता राहिली आहे. येत्या रविवारी ही औपचारिकता पूर्ण होऊन काम सुरू होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

पॉवर ग्रीडशी अंतिम करार

रविवारी कोल्हापूर-वैभवाडी बरोबरच पुणे-मिरज-कोल्हापूर मार्गाच्या विद्युतीकरणासाठी पॉवर ग्रीड कार्पोरेशनसोबत अंतिम करार करण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गाच्या विद्युतीकरणाच्या कामासही थेट प्रारंभ होणार असल्याचे समजते. या कार्यक्रमांबरोबरच कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले-इचलकरंजी आणि फलटण-सातारा या मार्गांसाठीची फाइलन लोकेशन पाहणी होणार असल्याची माहिती आहे, हा संपूर्ण कार्यक्रम अजूनही रेल्वेकडून अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अल्पवयीन मल्लाचे लैंगिक शोषण

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सुटीच्या काळात मल्लविद्या शिकण्यासाठी कोल्हापुरात आलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील आठवर्षीय मल्लावर रूममधील अन्य मल्लांवर लैंगिक शोषण केल्याचा धक्क्दायक प्रकार उघडकीस आला आहे. कुस्तीचे धडे घेण्यासाठी तो भवानी मंडप परिसरातील दगडी चाळीतील एका रूममध्ये राहत होता. रूममधील दोन अल्पवयीन मल्लांनी त्याला अमानुष मारहाण करीत शारीरिक आणि मानसिक छळ केल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील एका कुटुंबाने आपल्या आठवर्षीय मुलास एप्रिलच्या अखेरच्या आठवड्यात येथील एका तालमीत दाखल केले. तालमीपासून जवळच असलेल्या दगडी चाळीतील एका रूमध्ये नगर जिल्ह्यातील अन्य मल्लांसह त्याची राहण्याची सोय केली. सुरुवातीचे काही दिवस रूमधील मल्लांनी त्या मुलास सांभाळून घेतले. मात्र काही दिवसातच त्याला भांडी घासायला लावणे, पुरेसे जेवण न देणे, मारहाण, गुप्तांगावर गरम पाणी टाकणे, पार्श्वभागावर चटके देणे असे प्रकार सुरू केले. यामुळे तो मानसिकदृष्ट्या खचला होता. तो आजारी पडल्याने त्याला मंगळवारी सीपीआर रुग्णालयात दाखल केले. हा प्रकार कुणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकीही दोन्ही मल्लांनी दिल्याने त्याने घराकडेही कुणाला याची कल्पना दिली नाही.

त्याची तपासणी केल्यानंतर त्याच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा संशय आल्याने डॉक्टरांनी त्याच्या आई-वडिलांना बोलवून घेतले. बुधवारी त्याचे आई-वडील आल्यानंतर त्याच्याच रूममधील मल्लांनी लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. मुलाचा अमानुष छळ झाल्याचे पाहून कुटुंबीयांनाही मानसिक धक्का बसला.

लैंगिक शोषण करणारे दोन्ही मल्ल त्यांच्या गावी निघून गेले आहेत. पीडित मुलगा व्यायाम करीत नसल्याने त्याला शिक्षा केल्याचे या दोन्ही मल्लांनी पीडित मुलाच्या पालकांना सांगितले. याबाबत पोलिसात तक्रार दाखल झालेली नाही. मात्र इतर नातेवाईकांशी चर्चा करून पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करणार असल्याचे पीडित मुलाच्या वडिलांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.


मानसिक धक्का

महिन्याभरापासून पीडित मल्ल शारीरिक आणि मानसिक अत्याचार सोसत होता. लैंगिक शोषण आणि शारीरिक छळाची माहिती इतरांना सांगितल्यास जिवे मारण्याची धमकीही त्याला दिली होती. त्यामुळे तो कमालीचा घाबरला आहे. आई-वडिलांशीही तो अजून मोकळेपणाने बोललेला नाही. बुधवारी त्याला घरी घेऊन जाण्यासाठी वडील येणार होते, मात्र तत्पूर्वीच रॅगिंगचा गंभीर प्रकार उघडकीस आला. रॅगिंग करणाऱ्या दोघांनी खोटी माहिती देऊन पीडित मुलाच्या आई-वडिलांची दिशाभूल केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साताराः भाजप नगराध्यक्षांना लाच घेताना अटक

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । सातारा

सातारा जिल्ह्यातील वाई नगरपालिकेच्या नगराध्यक्ष डॉ. प्रतिभा शिंदे आणि त्यांचे पती सुधीर शिंदे यांना ठेकेदाराकडून लाच घेताना अटक करण्यात आली आहे.

वाईमध्ये सार्वजनिक शौचालय बांधणाऱ्या ठेकेदाराचा धनादेश काढण्यासाठी प्रतिभा आणि सुधीर शिंदे यांनी लाच मागितली होती. या संदर्भात ठेकेदारानं लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार नोंदवल्यानंतर, अधिकाऱ्यांनी सापळा रचून शिंदे दाम्पत्याला अटक केली. घरासमोरील खासगी दवाखान्यात १४ हजार रुपयांची लाच घेताना त्यांना ताब्यात घेतलं गेलं. या अटकेमुळे सातारा जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

प्रतिभा शिंदे या भाजपच्या नेत्या असून त्यांचे पती द्रविड हायस्कूलमध्ये पर्यवेक्षक आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तुळजाभवानीच्या पुजाऱ्याची भाविकाला मारहाण

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त | तुळजापूर

विठ्ठ्ल मंदिरातील बडव्याने भाविकाला मारहाण केल्याचं प्रकरण ताजं असतानाच, तुळजापूर देवस्थानच्या पुजाऱ्याने क्षुल्लक कारणावरून शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप एका भाविकाने केला आहे. विष्णू भोकरे असं या भाविकाचं नाव असून त्याने या प्रकरणाची तक्रार तहसीलदारांकडे केली आहे.

अभिषेकावेळी दुधाचा कलश खाली पडल्याने पुजाऱ्याने आपल्याला शिवीगाळ करत मारहाण केल्याचं विष्णू भोकरे यांनी तक्रारीत म्हटलंय. त्याची गंभीर दखल घेऊन पुजाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

तुळजापूर देवस्थानात पुजाऱ्याकडून भाविकांना धक्काबुक्की आणि मारहाणीचं हे पहिलं प्रकरण नाही. याआधीही पुजाऱ्यांकडून अशाच प्रकारची वागणूक भाविकांना दिली जात असल्याचं पुढे आलं होतं. मात्र, याप्रकरणी आजवर कोणतीही कारवाई झालेली नाही. यावेळी थेट तहसीलदारांकडे पुजाऱ्याविरोधात लेखी तक्रारच दाखल झाल्याने कारवाईची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनवाणी फिरणारे सीमा सत्याग्रही पुजेरी यांचे निधन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, बेळगाव

सीमाप्रश्न सुटेपर्यंत पायात चप्पल घालणार नाही अशी प्रतिज्ञा केलेले ज्येष्ठ सीमासत्याग्रही महावीर पुजेरी यांचे मुतगा येथील राहत्या घरी निधन झाले आहे. ते ७६ वर्षांचे होते. एक विवाहित मुलगा आणि एक मुलगी असा त्यांचा परिवार आहे.

महावीर पुजेरा महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रत्येक आंदोलनात ते सहभागी झाले होते. पोलिसांचा मार खाऊन अनेकदा त्यांनी कारावासही भोगला होता.

पुजेरी हे जैन समाजाचे पुजारी असल्यामुळे त्यांना जैन समाजात तर मान होताच पण एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून ते पंचक्रोशीत प्रसिद्ध होते. अडचणीत असलेला माणूस महावीर यांच्याकडे मदतीसाठी यायचा. १९७८ साली मुंबईत झालेल्या आंदोलनात महावीर पूजेरी यांनी हिरीरीने भाग घेतला होता. तत्कालीन समितीचे आमदार दिवंगत जी. एल. अष्टेकर यांच्या नेतृत्वाखाली ते अनेक आंदोलनात सहभागी झाले होते. वयाच्या ३६ व्या वर्षी त्यांनी पायात चप्पल घालायची बंद केली. तेव्हापासून ऊन, पाऊस असो वा थंडी, महावीर पूजेरी हे शेवटच्या श्वासापर्यंत अनवाणीच फिरले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मान्सून कोल्हापूरच्या उंबरठ्यावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

केवळ शेतकरीच नव्हे, तर सर्वसामान्यांचे डोळे लागून राहिलेल्या मान्सूनचे कोल्हापूर जिल्ह्याच्या उंबरठ्यापर्यंत आगमन झाले असून, तळकोकण आणि संपूर्ण गोवा राज्यात त्याने जोरदार हजेरी लावली. शुक्रवारी दिवसभर कोल्हापुरात ढगाळ वातावरण आणि अधूनमधून स्वच्छ ऊन असे मान्सूनला पूरक असे वातावरण होते. त्यामुळे शहराचे कमाल तापमान ३०.३ अंश सेल्सिअस राहिले. येत्या ४८ तासांत मान्सूनने मध्य महाराष्ट्र व्यापला जाईल, अशी माहिती हवामान शास्त्र विभागाने संकेतस्थळावरून जाहीर केली आहे.

यंदा मान्सूनने सुरुवातीपासूनच दमदार कामगिरीला सुरुवात केली आहे. केरळ, कर्नाटक, तमीळनाडू, आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीचा भाग येथे सलामी देत मान्सूनची आगेकूच सुरू आहे. दक्षिण भारतातील बेंगळुरू, कोचीन, चेन्नई या शहरांत पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. तर, उत्तर कर्नाटक आणि गोव्यातही या पावसाने आपली हजेरी लावली आहे. गेल्या २४ तासांत कोकण, गोवा आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. उद्या (ता. १० जून) मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

मान्सूनच्या या प्रभावामुळे कोल्हापूरची सकाळच ढगाळ वातावरणाने उजाडली. ढगाळ हवामानामुळे वेळेचा अंदाज येत नव्हता. सकाळी अकरा वाजेपर्यंत मुसळधार पाऊस पडेल, असे वातावरण असताना केवळ हलक्या सरी कोसळल्या. या सरींनी रस्तेदेखील ओले झाले नाहीत. नंतर दिवसभर ऊन-सावलीचा खेळ सुरू राहिला. पावसाची शक्यता असल्याने अनेकांनी सकाळी घराबाहेर पडताना रेनकोट, छत्र्यांचा आधार घेतला. तर फेरिवाल्यांनी अचानक पाऊस आला, तर तारांबळ उडू नये, यासाठी खबरदारी घेतली.

बळी राजाचे डोळे आकाशाकडे

पावसाच्या जोरदार सलामीसाठी जिल्ह्यातील शेतकरी आस लावून बसला आहे. जिल्ह्याच्या पूर्वी भागात भाताच्या धूळवाफ पेरण्या झाल्या आहेत. तर, पश्चिमेकडील तालुक्यांमध्ये तरवा टाकून झाला आहे. तसेच सोयाबीन, भूईमुग आणि डाळवर्गीय पिकांचे क्षेत्रही तयार झाली असून, या क्षेत्रावरही पेरणासाठी पहिल्या चांगल्या पावसाची अपेक्षा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दर्शन मंडप, पार्किंगसाठी ३५ कोटी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्य सरकारच्या उच्चाधिकार समितीकडून मंजूर करण्यात आलेल्या ६८ कोटी रुपयांच्या अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामध्ये पहिल्या टप्प्यात दर्शन मंडप, भक्त निवास, पार्किंग अशी ३५ कोटी ५३ लाख रुपयांची कामे करण्यात येणार आहेत. मंदिराजवळ सात कोटी रुपये खर्चाचा दुमजली दर्शन मंडप तसेच ​व्हीनस कॉर्नरनजीक असलेल्या भक्त निवास व पार्किंगचे मोठे काम आहे. यासह सुशोभिकरणाची व इतर सुविधांची कामे करण्यात येणार आहेत.

अंबाबाई मंदिराजवळील दर्शन मंडप -

अंदाजित खर्च सात कोटी रुपये

१७५० चौरस मीटरमध्ये दुमजली बांधकाम

रांगेमध्ये १२५० नागरिकांची व्यवस्था

मंदिराच्या आवारातील दुकानांचे पुनर्वसन

स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची सोय, चप्पल रॅक, लॉकर्स सुविधा

पार्किंग व भक्तनिवास

​व्हीनस कॉर्नर पार्किंग -

८ कोटी ८ लाख रुपयांचा अंदाजित खर्च

८५०० चौरस मीटरमध्ये चारमजली बांधकाम

२४० कार पा​र्किंगची क्षमता

२४० दुचाकी पार्किंगची क्षमता

भक्तनिवास -

१७ काटी २२ लाख रुपयांचा अंदाजित खर्च

१५० चौरस फुटांच्या १३८ रूम

४५० चौरस फुटांचे १० सूट

४५० चौरस फुटांचे १८ हॉल

बिंदू चौक पार्किंग

३ कोटी ९१ लाख रुपयांचा अंदाजित खर्च

४८४१ चौरस मीटरमध्ये बांधकाम

१७० कार पार्किंगची क्षमता

३१५ दुचाकी पार्किंगची क्षमता

सरस्वती टॉकिज पार्किंग

५ कोटी ६ लाख रुपयांचा अंदाजित खर्च

२२०० चौरस मीटरमध्ये बांधकाम

बेसमेंटसह पहिल्या मजल्यापर्यंत बांधकाम

१४० कार पार्किंगची क्षमता

पार्किंगच्या तीनही ठिकाणी भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची, स्वच्छतागृहे, लॉकर्स रूमची व्यवस्था.


बिंदू चौक ते भवानी मंडप पादचारी मार्ग -

२ कोटी १ लाख रुपयांचा अंदाजित खर्च

घडविलेल्या दगडांचा वापर

सहा मीटर रुंदीचा मार्ग

भूमिगत वीज वाहिन्या व दिवे


पाणी व स्वच्छतागृहांचे नियोजन -

दर्शन मंडपाबरोबरच तीनही पार्किंगच्या ठिकाणी पाणी व स्वच्छतागृह, शौचालयांची व्यवस्था

एक कोटी ५ लाख रुपयांचा अंदाजित खर्च

शहरातील महत्त्वाचे चौक व रस्त्यांवर ७५ दिशादर्शक फलक

दिशादर्शक फलकांसाठी ४ लाख ७ हजार रुपयांचा अंदाजित खर्च

सुशोभिकरणासाठी ७५ लाख रुपयांचा अंदाजित खर्च

यामध्ये बिंदू चौकाच्या तटबंदीवर विद्युत रोषणाई व मंदिर परिसराजवळ बैठक व्यवस्था

युटिलिटी शिफ्टिंगसाठी २ कोटी ३३ लाख रुपयांचा अंदाजित खर्च

घनकचरा व्यवस्थापनासाठी ४२ लाख ३५ हजार रुपयांचा अंदाजित खर्च

आपत्ती व्यवस्थापासाठी १ कोटी २८ लाखांचा अंदाजित खर्च

२५ स्पीकर्स, ४० अॅम्प्लिफायर्स, २० कॅमेरे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१०९ जणांनी पाहिले पुन्हा जग

$
0
0

Sachin.Yadav@timesgroup.com

tweet:@sachinyadavMT

कोल्हापूर : निसर्गाने घडविलेल्या अनेक वस्तूंचे सौंदर्य, आकार, विकार, रंग, व्यक्तींचे भाव पाहण्याचे सामर्थ्य डोळ्यांत आहे. मात्र, डोळे नसलेले अनेकजण आहेत. मृत्यूनंतर डोळे मातीमोल होऊ देण्यापेक्षा नेत्रदान करून अनेकांना जग पाहण्याची संधी उपलब्ध होऊ शकते. नेत्रदान करणाऱ्यांना मरणोत्तरही जग पाहता येते. जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत ३०४ जणांनी नेत्रदान केले आहे. त्यामुळे १०९ जणांना दृष्टी मिळाली आहे. नेत्रदानाचा संकल्प एक लाखाहून अधिक लोकांनी केला असला तरी जिल्ह्यात प्रत्यक्षात नेत्रदानाला कमी प्रतिसाद आहे.

राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत १० जून हा दिवस प्रसिद्ध नेत्र शल्यविशारद डॉ. भालचंद्र यांचा स्मृतिदिन म्हणून दृष्टिदिन साजरा केला जातो. सरकारीपातळीवर नेत्रदानासाठी विविध उपक्रम राबविले जातात. त्याला काही खासगी प्रचार संस्थांची जोड मिळते. मात्र, सरकारी पातळीवर आणखी प्रचाराची अजूनही गरज आहे. नेत्रपेढीला दरवर्षी सरासरी शंभर नेत्रजोड मिळतात. मात्र, हा आकडा शंभरीच्या पुढे गेलेला नाही. त्यासाठी प्रचार आणि अंमलबजावणीची गरज आहे. जिल्ह्यातील काही संस्थांना नोंदणीचे प्रमाणपत्र नाही. अनेकदा मृत्यूनंतर नातेवाईक नेत्रपेढीला दूरध्वनी करतात. मात्र, काही वेळा अधिकारी उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते, तर तासाभरात कर्मचारी घरी पोहोचतील, असाही निरोप दिला जातो. सार्वजनिक तरुण मंडळे, वाढदिवस आणि मोठ्या संस्थांमध्ये नेत्रदानाच्या संकल्पाचे हजारो अर्ज भरले जातात. प्रत्यक्षात मात्र त्यावर नातेवाइकांच्या संमतीच्या सह्या नसतात. त्यामुळे केवळ संकल्पच उरतो. सरकारी पातळीवरील प्रयत्नांसह शाहूपुरीतील सर्वमंगल सेवा संस्थाही मोफत नेत्र तपासणी शि‌बिर घेते. संस्थेकडून देहदान, नेत्रदानाचा प्रचार सुरू आहे. संस्थेचे चंद्रकांत मेहता यांच्या प्रयत्नातून दात्यांनी देहदानाचे ५० हजार आणि नेत्रदानाचे ५० हजार फॉर्म भरले आहेत.

वयोमर्यादा नाही

नेत्रदानासाठी वयोमर्यादा नाही. कोणीही नेत्रदान करू शकते. मृत्यूनंतर चार तासांत नेत्रदान करणे आवश्यक आहे. चार दिवसांपर्यंत नेत्ररोपण करता येते. शक्यतो ६० वर्षांच्या आतील व्यक्तींचे डोळे नेत्रदानासाठी चांगले ठरतात. नव्या तंत्रज्ञानामुळे सहा ते आठ दिवसांनंतरही दुसऱ्या व्यक्तीवर नेत्ररोपण करता येऊ शकते. डोळे काढण्याची प्रक्रिया केवळ वीस मिनिटांत होते. काही वेळा कॉर्निया काढला जातो, तर काहीवेळा संपूर्ण डोळा काढून त्यातील कॉर्नियाचे दुसऱ्यावर रोपण केले जाते. उर्वरित डोळ्याचा भाग संशोधनासाठी वापरला जातो.

व्याख्यान, प्रबोधन, जनजागृतीच्या माध्यमातून नेत्रदानाची चळवळ सुरू आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सीपीआर रुग्णालयातर्फे नेत्रदानाची माहिती दिली जात आहे. दाते अवयवदानाच्या अर्जात नेत्रदानाचा पर्याय निवडू शकतात. त्यासाठी www.dmer.org या संकेतस्थळावरूही अर्ज उपलब्ध आहेत.

डॉ. सुजाता वैराट, नेत्र विभाग सीपीआर

००

नेत्रदान म्हणजे काय?

मृत्यूनंतर ताबडतोब डोळे नेत्रपेढीस दान करणे म्हणजे नेत्रदान होय. नेत्रदान मृत्यूपूर्व करता येत नाही. मृत्यूनंतर ताबडतोब नेत्रपिढीला कळविल्यास चार तासांच्या आत डोळे काढून घेतले जातात.

नेत्रदानासाठी काय करावे?

नेत्रदानासंदर्भात नेत्रपेढीला मृत्यूपूर्वी इच्छापत्र भरून देणे. त्या फॉर्मवर जवळच्या नातेवाइकांच्या सह्या घेणे.

नेत्ररोपण म्हणजे काय?

डोळ्यातील पारदर्शक पटल अपारदर्शक झाल्यामुळे अंधत्व आले असल्यास हे पारदर्शक पटल काढून नेत्रदानात मिळालेल्या डोळ्यांचे पारदर्शक पटल बसविले जाते. यामध्ये संपूर्ण डोळा रोपण केला जात नाही.

अंधत्वाचे प्रकार ः मोतिबिंदू, काचबिंदू, खुपऱ्या, डोळे येणे, बुबुळाचे अंधत्व

नेत्रदानाची तयारी ः

मृत्यनंतर मृत्यूचा दाखला तयार ठेवा

नेत्रपेढीला कळवा

नेत्रदान मृत्यूनंतर सहा तासांच्या आत करावे

जिथे मृतदेह असेल त्या ठिकाणचे पंखे बंद करा

पापण्या बंद करून डोळ्यांवरर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवा


नोंदणीकृत नेत्रपेढ्या

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सीपीआर, कोल्हापूर - दूरध्वनी क्रमांक ०२३१- २५२९३४८

प्रगती नेत्ररुग्णालय, राजारामपुरी, ९ वी गल्ली, ०२३१- २ ५२९३४८

आदित्य आय बँक, शाहू पुतळा, इचलकरंजी- ०२३०-२४३१५५२


सीपीआरमधील नेत्रदान व लाभ

२०१४-१५ - नेत्रदान ११२ आणि ४८ जणांना दृष्टी

२०१५-१६- नेत्रदान ९४ आणि ३३ जणांना दृष्टी

२०१६-२०१७- नेत्रदान ९८ आणि २८ जणांना दृष्टी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


समीरच्या जामिनावर शुक्रवारी फैसला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येतील संशयित समीर विष्णू गायकवाड याच्या जामीन अर्जावर शुक्रवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांच्यासमोर साडेतीन तास युक्तीवाद झाला. समीरचे वकील अॅड. समीर पटवर्धन यांचा युक्तीवाद पूर्ण झाला असून, सरकार पक्षाचा युक्तीवाद पुढील शुक्रवारी (ता. १६) होईल. त्यानंतरच समीरच्या जामिनाचा फैसला होणार आहे.

‘समीर गायकवाडला पोलिसांनी अटक करून १ वर्ष ९ महिने उलटले. मात्र गुन्ह्यातील इतर संशयित हल्लेखोर, शस्त्र आणि वाहनदेखील पोलिसांना मिळालेली नाहीत. तपासाच्या नावाखाली पोलिस वेळ वाया घालवून समीरला कारागृहात अडकवून ठेवत आहेत. समीरचा हत्येत प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष सहभाग असल्याचे तपासात स्पष्ट झालेले नाही. अर्थर्व शिंदे या साक्षीदार मुलाने समीरला ओळखले. मात्र त्याचा जबाब संशयास्पद वाटतो. पोलिसांच्या आरोपपत्रानुसार गोळ्या झाडणारे प्रवीण आकोळकर आणि सारंग पोवार होते. संजय साडविलकर यांच्या साक्षीनुसार त्यांनीच पानसरेंच्या दिनचर्येची माहिती घेतली होती. यात समीरचा संबंध नाही’ असा युक्तीवाद अॅड. समीर पटवर्धन यांनी केला. ‘समीर फरार होईल, या भीतीने त्याला जामीन नाकारणे अयोग्य आहे,’ असे मत त्यांनी मांडले. पोलिसांच्या तपासावरही अॅड. पटवर्धन यांनी शंका उपस्थित केली. आता पुढील शुक्रवारची (ता. १६) सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांच्या युक्तीवादानंतर समीरच्या जामिनाचा फैसला होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘तीर्थक्षेत्र’ आराखडा तत्त्वतः मंजूर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिराजवळील दर्शन मंडप, शहरात तीन ठिकाणी पार्किंग, भक्त निवास या महत्वाच्या कामांसह सुशोभीकरणाचा समावेश असलेल्या ६८ कोटी रुपयांच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला राज्याचे मुख्य सचिव सुमित मलिक यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीने शुक्रवारी तत्वतः मंजुरी दिली. विशेष म्हणजे आराखड्यातील समाविष्ट कामांना कात्री लागली नाही. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीच्या मंजुरीची केवळ औपचारिकता शिल्लक राहिल्याचे सूत्रांनी सांगितले. किरकोळ दुरुस्त्या करून पंधरवड्यात हा आराखडा मुख्यमंत्र्यांसमोर अंतिम मंजुरीसाठी ठेवला जाईल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील कामांची मंजुरी वेग घेईल.

मंत्रालयात शुक्रवारी दुपारी मुख्य सचिव मलिक यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीची बैठक झाली. सुरूवातीला २२५ कोटी रुपयांलवर असलेला आराखडा नंतर ९२ कोटी रुपयांवर आणण्यात आला. या आराखड्याची दोन विभागीय आयुक्तांनी छाननी केली होती. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोरही सादरीकरण करण्यात आले होते. त्यावेळीही काही सूचना केल्या गेल्या. त्यानुसार बदल करून शेवटच्या टप्प्यात ६८ कोटी रुपयांचा आराखडा सरकारला सादर केला गेला. या आराखड्याच्या मंजुरीसाठी पहिल्या टप्प्यात शुक्रवारी राज्याच्या उच्चाधिकार समितीसमोर सादरीकरण करण्यात आले. महापालिका आयुक्त डॉ. चौधरी यांनी आराखड्याचे सादरीकरण केले.

अर्ध्या तासाच्या सादरीकरणात आयुक्तांनी कामांची माहिती दिली. अंबाबाईच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक येतात. नवरात्रोत्सवामध्ये दररोज एक लाख भाविक येत असल्याची नोंद आहे. त्यामुळे त्यांच्या वाहनांच्या पार्किंगचा प्रश्न असतो. दर्शनासाठीच्या रांगांमध्ये उभ्या असलेल्या भाविकांना सुविधा देण्याची आवश्यकता आहे. यानुसार फोट्रेस या सल्लागार कंपनीने तयार केलेल्या आराखड्यांमध्ये अनेक कामे असल्याने भाविक, पर्यटक व शहरवासियांना तातडीने सुविधा देण्यासाठी प्राधान्यक्रमाने आराखडा राबवण्याचे ठरवण्यात आल्याचे आयुक्तांनी सांगितले. या प्राधान्याच्या कामांमध्ये दर्शन मंडप, पार्किंग व भक्त निवास यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे शहरात येणाऱ्या भाविकांच्या अडचणी कमी होतील. तसेच शहरवासियांना भेडसावणाऱ्या वाहतूक कोंडीच्या समस्यांचीही सोडवणूक होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केएमटीखाली सापडून गंगावेशीत महिला ठार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गंगावेश चौकात केएमटी बसखाली सापडून पोस्ट खात्यातील शिपाई महिला मंगल शिवाजी जाधव (वय ५२, रा. कोगे, ता. करवीर) या जागीच ठार झाल्या. शुक्रवारी (ता. ९) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. गर्दीच्या वेळी अपघात झाल्यानंतर या परिसरात वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे काही काळ गंगावेश परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कोगेतील मंगला जाधव या कसबा बावडा येथील मुख्य पोस्ट कार्यालयात शिपाई पदावर काम करीत होत्या. शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता ड्युटी संपल्यानंतर गावी जाण्यासाठी त्या रिक्षाने गंगावेस येथे पोहोचल्या. भाजी खरेदी करण्यासाठी त्या मंडईत गेल्या होत्या. गंगावेस चौकातून रस्ता ओलांडताना समोरून कार आल्यामुळे त्या मागे येत असताना केएमटी बसची त्यांना धडक बसली. त्या खाली पडल्यावर बसचे चाक त्यांच्या अंगावरून गेले. त्या जागीच ठार झाल्या. अग्निशामक दलाच्या गाडीतून मंगला यांचा मृतदेह सीपीआर रुग्णालयात दाखल केला.

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. मंगला जाधव यांच्या अपघाती मृत्यूची माहिती समजताच कोगे येथील त्यांच्या नातेवाईकांनी व त्यांच्या नातेवाईकांनी सीपीआर रुग्णालयात गर्दी केली. त्यांच्या पश्चात दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. काही वर्षापूर्वी त्यांच्या पतीचे निधन झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस कल्याण निधीसाठी मदत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पोलिस कल्याण निधीसाठी चाटे शिक्षण समूहाच्यावतीने पाच लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. शिक्षण समूहाचे संचालक प्रा. भारत खराटे यांनी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडे नुकताच हा धनादेश सुपूर्द केला. याबद्दल आयजी नांगरे-पाटील यांनी चाटे शिक्षण समुहाचे विशेष कौतुक केले.

कोल्हापूर जिल्हा पोलिसांकडे कल्याण निधीचा अभाव होता. पोलिसांसाठी राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांसाठी पुरेसा निधी उपलब्ध नसल्याने उपक्रम रखडले होते. त्यामुळे नागरिक आणि संस्थांनी पोलिस कल्याण निधीसाठी स्वेच्छेने देणगी स्वरुपात रक्कम जमा करण्याचे आवाहन पोलिसांनी केले होते. यासाठी ‘मराठी तारका’ या कार्यक्रमाचेही आयोजन केले होते. १ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अभिनेता अक्षयकुमार यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात चाटे समूहाने पोलिस कल्याण निधीसाठी पाच लाख रुपये देणगी देण्याचे जाहीर करून प्रतिकात्मक धानादेशही मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला. प्रा. भारत खराटे यांनी नुकतीच आयजी विश्वास नांगरे-पाटील यांची भेट घेऊन पाच लाखांचा धनादेश सुपूर्द केला. ‘चाटे समूहाने यापूर्वीही सामाजिक बांधिलकी जपत विधायक उपक्रमांसाठी अनेकदा देणगी स्वरुपात निधी दिला आहे. जे पोलिस नागरिकांसाठी २४ तास सतर्क असतात, त्यांच्यासाठी कल्याण निधी दिल्याने अनोखे समाधान मिळाले’, अशी भावना प्रा. खराटे यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आव्हान’ शिबिरार्थींची रॅली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठात गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या ‘आव्हान-२०१७’ या राष्ट्रीय सेवा योजनेच्या राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन शिबिराच्या समारोप समारंभाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी शिबिरार्थींनी शहरातून जल्लोषात रॅली काढली. यावेळी आपत्ती व्यवस्थापनापासून ते सामाजिक संदेश अभियानापर्यंत विविध सामाजिक विषयांवर जनजागृती केली. शिबिराचा समारोप शनिवारी (१० जून) सकाळी १०.३० वाजता राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते होईल.

शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते फ्लॅग-ऑफ करून रॅलीस प्रारंभ करण्यात आला. यावेळी प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे, प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, अधिष्ठाता डॉ. पी. एस. पाटील, डॉ. वासंती रासम, डॉ. पी. डी. राऊत, डॉ. ए. एम. गुरव, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. आर. व्ही. गुरव, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रभारी संचालक डॉ. डी. के. गायकवाड, क्रीडा अधिविभागप्रमुख डॉ. पी. टी. गायकवाड यांच्यासह राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (एनडीआरएफ) एस. डी. इंगळे यांच्यासह एनडीआरएफचे जवान, एनएसएसचे जिल्हा संपर्क अधिकारी, विद्यापीठाचे शिक्षक, अधिकारी, सेवक व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘आव्हान-२०१७’मध्ये राज्यभरातील चौदा विद्यापीठांतील राष्ट्रीय सेवा योजनेचे सुमारे १२०० स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. १ जूनपासून गेल्या नऊ दिवसांत भूमी, जल, आदी ठिकाणी उद्भवणाऱ्या विविध आपत्ती आणि त्यांचे व्यवस्थापन, मदतकार्य, पुनर्वसन, आदींविषयी एनडीआरएफच्या जवानांच्या सहकार्याने प्रशिक्षण देण्यात आले आहे. या कालावधीतील संपूर्ण प्रशिक्षणावर आधारित लेखी, प्रात्यक्षिक व मौखिक परीक्षाही आज सकाळी घेण्यात आली. मालती अपार्टमेंट, आईचा पुतळा व सायबरमार्गे रॅली पुन्हा विद्यापीठात सांगता करण्यात आली.

ढोलताशांच्या गजरात आणि छत्रपती शिवरायांच्या जयघोषात सुरू झालेल्या रॅलीच्या अग्रस्थानी एनडीआरएफचे आपत्ती व्यवस्थापन सामग्रीने सुसज्ज वाहन होते. त्याबरोबर एनडीआरएफचे जवानही रॅलीच्या अग्रणी होते. रॅलीत विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महाराणी ताराराणी, जिजाऊ, तानाजी मालुसरे, संत गाडगेबाबा, आदींच्या वेशभूषा केल्या होत्या. त्याचबरोबर पर्यावरण संरक्षण व संवर्धन, स्त्री-भ्रूणहत्याविरोधी बेटी बचाओ अभियान, वृक्षसंवर्धन, महिला सन्मान, ग्लोबल वॉर्मिंग, मतदार जागृती, व्यसनमुक्ती, भ्रष्टाचार, शेतकरी आत्महत्या, लष्करी जवानांचा सन्मान अशा अनेक विषयांबाबत प्रबोधन करणारे फलक घेऊन स्वयंसेवक रॅलीत सहभागी झाले होते. राज्यभरातील विद्यापीठ परिक्षेत्रातील संस्कृतीचे दर्शन घडविणारे कलाविष्कारही काही संघांनी सादर केले. रॅलीमुळे ‘आव्हान-२०१७’मधील तरुणाईचा उत्साह आणि जल्लोष अगदी टीपेला पोहोचल्याचे दिसून आले.

राज्यपालांच्या उपस्थितीत आज सांगता

या दहा दिवसीय शिबिराचा समारोप शनिवारी (१० जून) सकाळी १०.३० वाजता महाराष्ट्राचे राज्यपाल तथा शिवाजी विद्यापीठाचे कुलपती सी. विद्यासागर राव, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, महापौर हसीना फरास यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यापीठाच्या लोककला केंद्रात होणार आहे. यावेळी कुलपतींच्या हस्ते उत्कृष्ट स्वयंसेवक, उत्कृष्ट संघ, आदी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अधिविभागाच्या विस्तारित इमारतीचे भूमिपूजन आणि विद्यापीठाच्या परिसरात साकारलेल्या ‘चॅन्सलर्स कोकोनट गार्डन’चे डिजिटल उद्घाटन कुलपतींच्या हस्ते होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चंद्रभागा नदीत बुडून चार मुलांचा मृत्यू

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पंढरपूर

चंद्रभागा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या चार मुलांचा बुडून मृत्यू झाला. पाण्याचा अंदाज न आल्यानं ही दुर्देवी घटना घडल्याचं सांगण्यात येतं.

गवळी समाजातील ही मुले आहेत. ही चारही मुले चंद्रभागा नदी परिसरात गायी चरण्यासाठी घेऊन गेले होते. दुपारी ४.३० वाजता ही मुले चंद्रभागा नदीवरील चंद्रभागा घाटाजवळ पोहण्यासाठी गेली होती. पावसामुळे नदीच्या पाण्याची पातळी वाढलेली होती. पोहताना त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ही चारही मुले पाण्यात बुडाली. उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी चारही मुले मयत झाल्याचे सांगितले. मृतांपैकी दोघांचे वय ८ वर्ष आणि इतर दोघे ६ वर्षाचे होते. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान उपजिल्हा रुग्णालयात डॉक्‍टरांनी व्यवस्थित उपचार केले नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. रुग्णालयासमोर संतप्त नातेवाईकांनी गर्दी केल्‍यामुळे पोलिस बंदोबस्त मागवण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादीकडून ‘बळिराजाची सनद’ जाहीर

$
0
0

म. टा.प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे वर्धापनदिनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलन पुकारताना बळिराजाची सनद ​​जाहीर केली. तसेच राष्ट्रवादीचा वर्धापनदिन शेतकऱ्यांना समर्पित केल्याची घोषणा केली. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देताना सातबारा कोरा करावा, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात व दिवसा वीजपुरवठा करावा, अल्पभूधारकांना किमान तीन लाख रुपयांपर्यंतचा कर्जपुरवठा शून्य टक्के दराने करण्याची मागणी सनदमधून केली.

जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे यांना निवेदन सादर केल्या. बळिराजाची सनदमध्ये बारा मागण्यांचा समावेश आहे. दरम्यान, पक्षाच्या जिल्हा कार्यालयात आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते केक कापून वर्धापनदिन साजरा झाला. जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील अध्यक्षस्थानी होते. आमदार मुश्रीफ म्हणाले, ‘पुरोगामी महाराष्ट्रात शेतकरी संपावर जातात ही लाजिरवाणी घटना आहे. सरकारच्या शेतकरीविरोधी कारभारामुळे शेतकरी देशोधडीला लागला. नोटाबंदीमुळे शेतमालाचे दर कोसळले. न्यायासाठी शेतकरी रस्त्यावर उतरून आदोलन करत आहेत. त्या आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा असून पक्षाचा वर्धापनदिन शेतकऱ्यांना समर्पित करत आहे.’

दरम्यान, पक्षातर्फे बिंदू चौकात महात्मा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन स्वाभिमानी सप्ताहाला सुरुवात झाली. कार्यक्रमाला माजी खासदार निवेदिता माने, आमदार संध्यादेवी कुपेकर, युवराज पाटील, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, शिवानंद माळी, अमरसिंह माने-पाटील, सर्जेराव पाटील-गवशीकर, नेताजीराव पाटील, प्रकाश पाटील, संगीता खाडे आदी उपस्थित होते. जिल्हा सरचिटणीस अनिल साळोखे यांनी स्वागत केले.


‘राष्ट्रवादी सनद’मधील अन्य मागण्या ...

शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाची मोफत सोय करावी

शेतीपूरक दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, शेळीपालन व मत्स्य व्यवसायासाठी विशेष योजना राबवाव्यात

शेतीमालाला आधारभूत किमतीच्या दीडपट किंमत मिळावी

सरकारने शेतमाल खरेदी करून वेळेवर किंमत द्यावी

शेतकऱ्यांना नै​सर्गिक आपत्तीतून बाहेर काढण्यासाठी सरकारने मदत करावी

शेततळ्यासाठी देण्यात येणाऱ्या अनुदानात एक लाखापर्यंत वाढ करावी


शहर राष्ट्रवादी कार्यालयात वर्धापनदिन साजरा

शहर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात ज्येष्ठ कार्यकर्ते टी. बी. पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आर. के. पोवार, महापौर हसीना फरास, शहराध्यक्ष राजू लाटकर यांची भाषणे झाली. कार्याध्यक्ष अनिल कदम यांनी पक्षाच्या स्थापनेपासूनच आढावा घेतला. यावेळी नगरसेवक संदीप कवाळे, सचिन पाटील, सरिता मोरे, शमा मुल्ला विनायक फाळके, जहिदा मुजावर, सुनील देसाई, युवराज साळोखे, निरंजन कदम किसन कल्याणकर, लालासो जगतातप, सुहास साळोखे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आपत्ती व्यवस्थापनची गावागावांत जागृती करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘आव्हान’ प्रशिक्षणांतर्गत प्रशिक्षित झालेल्या युवकांनी गावागावांत जाऊन, आपत्ती व्यवस्थापनविषयक जागृती करावी, असे आवाहन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे केले.

शिवाजी विद्यापीठातील ‘आव्हान-२०१७’ या आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिराच्या समारोप समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, महापौर हसीना फरास, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमनार, आयुक्त अभिजीत चौधरी, राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य संपर्क अधिकारी प्राचार्य डॉ. अतुल साळुंखे, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (एनडीआरएफ) निरीक्षक एस. डी. इंगळे उपस्थित होते.

जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी विद्यार्थ्यांना जिल्हा पातळीवरील आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने माहिती दिली.

‘आव्हान-२०१७’च्या निमित्ताने शहरातून काढण्यात आलेल्या जागृती फेरीदरम्यान सोलापूर विद्यापीठाची स्वयंसेवक विद्या कदम हिने आपत्ती निधी गोळा केला. त्यात श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनीही उत्स्फूर्तपणे आपल्याकडील पैसे या निधीला दिले. कार्यक्रम अधिकारी डॉ. राजेंद्र वडजे यांनी हा निधी जिल्हाधिकारी सुभेदार यांच्याकडे सुपूर्द केला.

यावेळी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी राज्यपालांच्या शुभेच्छा संदेशाचे वाचन केले. डॉ. डी.के. गायकवाड यांनी अहवाल वाचन केले. डॉ. तृप्ती करेकट्टी आणि नंदिनी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आभार मानले.

पुणे व सातारा जिल्हा सर्वोत्कृष्ट

‘आव्हान-२०१७’मध्ये प्रशिक्षणात पुणे व सातारा जिल्ह्याचे संघ अनुक्रमे सर्वोत्कृष्ट ठरले. त्यांना ‘बेस्ट कॉन्टिन्जेन्ट’ फिरता चषक प्रदान करण्यात आला.‘बेस्ट कॉन्टिन्जेन्ट लीडर’साठीचा फिरता चषक नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे प्रा. अतुल अकोठोर आणि पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रा. सारिका पेरणे यांना देण्यात आला. ‘बेस्ट एनएसएस व्हॉलंटिअर’साठीचा फिरता चषक चौघांना देण्यात आला. यामध्ये महेश गणेश बन (महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक), कुणाल मानकर (उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव), हर्षा सुनिल भट्ट (महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक) आणि सामिका सावंत (बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ, दापोली) यांचा समावेश आहे. जनजागृती फेरीमधील सर्वोत्कृष्ट सहभागासाठीचा फिरता चषक मुंबई विद्यापीठाने पटकावला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घागरा-चोळीतील अंबाबाई पाहून भाविक खवळले

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । कोल्हापूर

देशभरातील भाविकांचं श्रद्धास्थान आणि साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्णपीठ असलेल्या करवीरनिवासिनी अंबाबाईला घागरा-चोळी नेसवण्यात आल्यानं श्रद्धाळूंच्या भावना दुखावल्या आहेत. श्री महालक्ष्मीला पूर्वापार काठा-पदराची साडी नेसवली जाते. ही परंपरा मोडण्याचा पुजाऱ्यांना काय अधिकार, असा प्रश्न सोशल मीडियावरून विचारला जातोय.

आदिशक्ती अंबाबाईच्या पेहरावात सणवाराच्या निमित्ताने बदल केले जातात. वेगवेगळ्या रूपात महालक्ष्मीची पूजा बांधली जाते. परंतु, साडी हाच तिचा मूळ पेहराव आहे. त्यात देवी उठून दिसते. तिचं ते रूप भाविकांच्या मनावर ठसलंय. असं असताना, शुक्रवारी अंबाबाईचा घागरा-चोळीमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि खळबळ उडाली. कुणीतरी फोटोशॉप करून हा प्रकार केला असावा, असं सुरुवातीला वाटलं. पण, गाभाऱ्यातील पुजाऱ्यांनीच देवीला घागरा-चोळीचा पोषाख केल्याची माहिती पुढे आली. एका भाविकाने ३५ हजार रुपयांची घागरा-चोळी देवीला अर्पण केली होती, तीच तिला नेसवण्यात आल्याचं देवस्थान समितीतर्फे स्पष्ट करण्यात आलं. त्यावरून पुजाऱ्यांवर टीकेची झोड उठली आहे.

साडी आणि खणा-नारळाने अंबाबाईची ओटी भरण्याची परंपरा कैक वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे देवीला घागरा-चोळी अर्पण करणारा भाविक कोण, पुजाऱ्यांनी ती स्वीकारली इथपर्यंत ठीक, पण ती देवीला नेसवायची काय गरज होती?, असा संतप्त सूर कोल्हापुरात ऐकू येतोय. हा प्रकार करणाऱ्या पुजाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणीही काही संघटनांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'या' रेल्वेमुळे कोकणच्या विकासाचा ट्रॅक खुला

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । कोल्हापूर

कोल्हापूर कोकण रेल्वेला जोडण्याचे गेल्या कित्येक वर्षांचे स्वप्न अखेर पूर्ण झाले. कोकणच्या विकासाचा ट्रॅक खुला करण्यात आला. कराड (जि. सातारा) येथे कोल्हापूर वैभववाडी रेल्वेमार्गाचे भूमिपूजन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते रविवारी दुपारी व्हिडीओ लिंकद्वारे झाले. हातकणंगले- इचलकरंजी मार्गाचे भूमिपूजनही झाले.

कोल्हापूर रेल्वेस्थानकावरील या दोन मार्गांच्या कोनशिलांचे प्रभू यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे अनावरण करण्यात आले. कोल्हापूर आणि सोलापुरात व्हिडिओ लिंकव्दारे कार्यक्रमाचे सादरीकरण झाले. कोल्हापूर पुणे या मार्गाच्या विद्युतीकरणाचा पीजीसीआयएल या कंपनीसोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आल्या. त्यासह घोरपडी (पुणे) येथील पाणी पुर्नवापर प्रक्रिया प्रकल्पाचे लोकापर्ण, फलटण-पंढरपूर, जेऊर -आष्टी या मार्गांचे भूमिपूजनही करण्यात आले. कराड रेल्वे स्थानकाजवळील समर्थ मल्टिपर्पज हॉल येथे कार्यक्रम झाला. कोल्हापूर कोकण व्यापार, उद्योग वाढणार

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू म्हणाले, 'रेल्वे पायाभूत सुविधा देण्यासाठी युद्धपातळीवर कार्यरत आहे. प्रवाशांनाही अधिकाधिक सुविधा दिल्या जाणार आहेत. रेल्वे ही सर्वांत मोठी पायाभूत सुविधा आहे. पश्चिम महाराष्ट्र कोकणला जोडल्याने प्रवासी वाहतुकीसह मालवाहतूकीचा टक्का वाढणार आहे. कोकणला ७२० किलोमीटरची किनारपट्टी लाभली आहे. त्यामुळे भविष्यात जलवाहतुकीला संधी उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनी आधुनिक महाराष्ट्राची कोनशिला बसविली होती. रेल्वेच्या विविध विकास कामाच्या उदघाटनामुळे पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे. नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या मालासाठी कोल्डस्टोअरची व्यवस्था केली जाणार आहे. देशात ४२ टक्के रेल्वेमार्गांचे विद्युतीकरण झाले आहे. नवीन रेल्वेमार्ग, विद्युतीकरणाचे प्रकल्पाचे कामही लवकरच हाती घेण्यात येईल.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आखाड्याबाहेरची ‘मस्ती’ घातक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कुस्तीपंढरी म्हणून देशभरात कोल्हापूरची ओळख असताना येथे मल्लविद्येचे डावपेच आत्मसात करण्यासाठी आलेल्या मुलाचे अमानुष लैंगिक शोषण झाल्याची घटना समोर आली. या घटनेने कुस्तीक्षेत्रात खळबळ उडाली आहे. मल्लविद्येच्या आखाड्याबाहेर ‘रॅगिंग’सारखे प्रकार सर्रास घडत असल्याचे दबक्या आवाजात बोलले जाते. शाळा, कॉलेज किंवा वसतिगृहांसारख्या ठिकाणी घडणाऱ्या प्रकारांप्रमाणे मल्लविद्येसारख्या क्षेत्रातही या प्रकारांचा शिरकाव झाल्याने सर्वांचींच चिंता वाढली आहे.

कोल्हापूर हे कुस्तीचे माहेरघर म्हटले जाते. येथे स्थानिक मल्लांसह इतर राज्यांतील लहान ते मोठ्या वयोगटातील मल्ल मल्लविद्येचे डावपेच आत्मसात करण्यासाठी कोल्हापूरला पसंती देतात. काहीजण येथील पोषक वातावरणाचा फायदा घेण्यासाठी येतात, तर काहीजण वर्षानुवर्षे येथे वास्तवास असतात. शहरात नावाजलेले आखाडे आणि राहण्याची चांगली सुविधा असल्याने येथे मल्लविद्येचे धडे अनेकजण घेतात. तालमीमध्ये राहण्यास जागा न मिळाल्यास अनेकजण इतरत्र खोली घेऊन राहतात. त्यासाठी अनेक मल्लांचे कुटुंबीय स्वत: येऊन त्यांची राहण्याची व्यवस्था लावून जातात. तर काहीजण ओळखीच्या मल्लांसोबत आपल्या मुलांना ठेवतात. त्यामुळे त्यांच्या जेवणाचा प्रश्न निकालात निघत असला, तरी त्यांच्या मुजबुरीचा फायदा उठवण्याचा प्रकार वरिष्ठ गटातील मल्लांकडून होतो.

छोट्या मल्लांकडून झाडलोट, भांडी घासणे अशी कामे करवून घेणे. शिवाय व्यायामात दुर्लक्ष केल्यास शिक्षा करणे आदी प्रकारे वचक निर्माण करतात. पण अशा दराऱ्यातून रॅगिंगसारखे गंभीर प्रकार घडत असल्याचे बोलले जात आहे. सध्या सोशल मीडियावर याचे अनेक प्रकार पहायला मिळतात. सर्वच पैलवानांकडे स्मार्टफोन असतात. त्यावर दिसणाऱ्या चित्रफितींद्वारे लहान मल्लांचे कसे शोषण सर्रासपणे केले जाते हे दिसते. शहरातील मोजक्यात तालमींमध्ये वास्तव्यासह आखडे सुरू असले, तरी अनेकजण भाडेकरू म्हणून इतरत्र राहतात. त्याठिकाणी असे प्रकार घडत असल्याची चर्चा आहे. घडलेला प्रकार कोणत्याही तालमीमध्ये घडला नसला, तरी अशा प्रकारांना अटकाव घालण्यासाठी प्रत्येक तालमीतील वस्तादांनी करडी नजर ठेवण्याची आवश्यकता आहे.

कुस्तीची पीछेहाट सुरूच

कुस्ती पंढरी, कुस्तीचे माहेरघर अशी अनेक बिरुदावली कोल्हापूरच्या नावामागे लावली जात असली, तरी गेल्या काही वर्षात कुस्तीची प्रचंड प्रमाणात पीछेहाट होत आहे. प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र केसरी किताबाची तर २००७ पासून प्रतीक्षा अद्यापही संपुष्टात आलेली नाही. त्यामुळे अलीकडच्या काळात या क्षेत्रावर चोहोबाजूने टीका होत आहे. मल्लांची तयारी, वस्तादांमधील राजकारण आणि मल्लविद्येचा वाढलेला खर्च अशी अनेक कारणे असताना आता यामध्ये रॅगिंगसारखा नवीन प्रकारच घडत असल्याचे समोर आल्याने संपूर्ण कुस्तीक्षेत्रच शंकेच्या भोवऱ्यात अडकणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे प्रकल्पांना गती देणार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड

‘भारतीय रेल्वेचा संपूर्ण चेहरामोहरा बदलण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने विविध मार्गाने सुमारे ८ लाख ५२ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. देशात साडेसोळा हजार किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम हाती घेतले आहे,’ अशी माहिती रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी दिली. कराड-चिपळूण रेल्वे मार्ग पब्लिक-प्रायव्हेट तत्वावर राबवण्यात येणार आहे. या बाबतची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. मात्र, भूसंपादनासह सर्व बाबींत स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊनच हा प्रकल्प राबविण्यात येईल’, अशी ग्वाहीही प्रभू यांनी दिली.

कराड येथे रविवारी आयोजित पुणे-मिरज मार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरणाकरिता मध्य रेल्वे आणि पॉवर ग्रीड कॉर्पोरेशनबरोबर स्वाक्षरी करार, घोरपडीच्या वॉटर रिसायकलिंग प्लांटचे लोकार्पण, वैभववाडी-कोल्हापूर, हातकणंगले-इचलकरंजी, फलटण-पंढरपूर आणि जेऊर-आष्टी या नवीन मार्गांचा व्हिडिओ लिंकद्वारे पायाभरणी समारंभ असे विविध कार्यक्रम झाले. यानंतर विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

रेल्वेमंत्री प्रभू म्हणाले, ‘केवळ महाराष्ट्रातच एक लाख कोटी रुपये गुंतवणुकीचे विविध मार्ग आणि प्रकल्प सुरू करण्यात येत आहेत. देशात लोकोमोटीव डिझेल इंजिन बनवण्यासाठी दोन परदेशी कंपन्या ४० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत. गेल्या दोन वर्षांत सुमारे ३ लाख ७५ हजार कोटी रुपये किंमतीची कामे ई- टेंडरिंगच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे. मार्गांच्या विद्युतीकरणाचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे. रेल्वे स्थानकांच्या स्वच्छतेचे काम युद्धपातळीवर सुरू असल्यानेच पुणे रेल्वे स्टेशनने देशात अव्वल स्थान पटकावले आहे.’

मंत्री प्रभू म्हणाले, ‘कृषी उत्पादनांची स्टोरेज व्यवस्था सुधारण्याचा प्रयत्न आहे.’

प्रवासी गाड्यांना शेतमालाचा डबा जोडणार

‘नाशिक जिल्ह्यामध्ये कांदा उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. तेथे रेल्वेमार्फत कांदा व इतर शेतीमालासाठी वेअरहाउसेस व गोदामे निर्माण करून तेथून देशातील इतर राज्यामध्ये शेतमाल पाठविण्यासाठी हब तयार करावा. परराज्यात जाणाऱ्या प्रवासी एक्स्प्रेस गाड्यांना राष्ट्रीय कृषी बाजार नावाचा डबा जोडून शेतमाल देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने पुढाकार घेऊन कार्यप्रणाली राबवावी, त्यामुळे शेतमालाला चांगला भाव मिळून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल’, असे मत व्यक्त करीत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी प्रवासी रेल्वेगाड्यांना शेतमालाचा डबा जोडण्याच्या शेतकऱ्यांच्या मागणीला अनुकूलता दर्शविली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live


Latest Images