Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

... तर मंदिराचे दरवाजे बंद करू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या मूर्तीवर डाग आहे. ही मूर्ती बदलण्याचा सर्वांनी विचार करण्याची गरज आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या रासायनिक संवर्धन प्रक्रियेची सीडी, अहवाल सादर करून दोषींवर कारवाई करावी. याबाबत गांभीर्याने विचार न केल्यास मंदिराचे चारही दरवाजे बंद करू असा इशारा शिवसेनेने शुक्रवारी देवस्थान समितीत झालेल्या बैठकीत देण्यात आला.

करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या मूर्तीची झीज होत असल्याचे, मूर्तीवर पांढरे डाग पडल्याचे गेल्या आठवड्यात उघडकीस आले होते. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी झालेली रासायनिक संवर्धन प्रक्रिया फोल ठरल्याचे यावरुन अधोरेखित झाले. याबाबत शुक्रवारी देवस्थान समिती, पुरातत्व विभाग आणि शिवसेनेच्या शिष्टमंडळाची बैठक झाली. बैठकीत पुरातत्व विभागाने दिलेल्या नियमांचे पालन होत नसल्यामुळे मंदिरातील आर्द्रता वाढून मूर्तीवर परिणाम होऊ लागल्याचे पुरातत्व विभागाचे उपाधिक्षक श्रीकांत मिश्रा यांनी सांगितले. यावर शिवसेनेने ‘गेल्या दोन वर्षात नियमांची अमंलबजावणी का केली नाही?’ असा सवाल करत देवस्थान समितीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी, मंदिराच्या गाभाऱ्यातील आर्द्रता अंबाबाईच्या मूर्तीची झीज होण्यास कारणीभूत असल्याचे मत तज्ज्ञांनी मांडले.

संवर्धन समितीने देवीच्या मूर्तीवर पाण्याचा वापर करू नका, ओले हार घालू नये, लाकडी चौकट काढण्यात यावी, गाईचे तूप व दूध वापरावे, गाभाऱ्यात तीन ते चारच श्रीपूजक असावेत यांसह १७ प्रकारच्या नियमावलीवर सांगितल्या होत्या. याची अंमलबजावणी का झाली नाही? असा सवाल शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केला. दोन वर्षांपूर्वी केलेल्या रासायनिक संवर्धन प्रक्रियेची सीडी आणि अहवाल सर्वांनसमोर आणा अशी मागणी जिल्हाप्रमुख संजय पवार व विजय देवणे यांनी केली. दोन वर्षांपूर्वी करण्यात आलेली रासायनिक संवर्धन प्रक्रिया आणि २०१६ मध्ये विनापरवाना मूर्तीवर केलेली लेप प्रक्रिया याची चौकशी करून दोषींवर करावाई करावी, याचा गांभीर्याने विचार करावा. अन्यथा मंदिराचे चारही दरवाजे बंद करून आंदोलन करू’ असा इशारा शिवसेनेने दिला.

यावेळी पुरातत्व विभागाचे उपाधिक्षक श्रीकांत मिश्रा, देवस्थान समितीचे सचिव विजय पोवार, सुदेश देशपांडे, मूर्ती अभ्यासक प्रसन्न मालेकर, सदस्य शिवाजी जाधव, संगिता खाडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, हर्षल सुर्वे आदी पदाधिकारी उपस्थित होते.



दोन वर्षांपूर्वी ज्यांनी रासायनिक संवर्धन प्रक्रिया राबविली, त्यांच्यावर कारवाई करावी. अंबाबाईच्या मूर्तीवर संवर्धनाचे प्रयोग सुरू आहेत. या सर्व बाबींचा विचार करून मूर्ती बदलण्याचा प्रयत्न करावा. दोन वर्षांपूर्वी पुरातत्त्व विभागाचे अधिकारी डॉ. एम. आर. सिंग आणि तत्कालीन देवस्थान व्यवस्थापन समितीच्या सचिव शुभांगी साठे यांनी पदाचा गैरवापर केल्याबाबत त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. संवर्धन प्रक्रियेची सीडी व अहवाल सादर करावा. दोषींवर करावाई करावी.

संजय पवार, जिल्हा‌ प्रमुख, शिवसेना

सन २०१५मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी आणि सचिव शुभांगी साठे यांनी रासायनिक संवर्धनाची प्रक्रिया केली. त्यानंतर २०१६ मध्ये सिंग यांनी मंदिराला घाईघाईने भेट दिली. त्यांनी कोणाच्या सांगण्यावरुन प्रक्रिया केली याची चौकशी झाली पाहिजे. श्रीपूजकांनी १३ मे २०१६ रोजी लेप करण्याची प्रक्रिया राबविली. रासयनिक प्रक्रियेची सीडी देवस्थान समितीच्या लॉकरमध्ये सुरक्षित आहे. सीडीत काय आहे, संवर्धन स​मितीचा अहवाल काय याची माहिती देवस्थानच्या सदस्यांना दिलेली नाही.

संगिता खाडे, सदस्य, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती

पुरातत्व उपाधिक्षक श्रीकांत मिश्रा यांनी आज मूर्तीची पाहणी केली. मूर्ती संवर्धनाबाबत काही पर्यायी उपाय सुचविले आहेत. १३ मे २०१६ रोजी झालेल्या लेप प्रक्रियेला देवस्थान समितीची परवानगी घेण्यात आली नव्हती. त्यामुळे याची चौकशी करून कारवाई करण्यात येईल.

विजय पोवार, सचिव, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती

अध्यक्ष, सचिवांनी राजीनामा द्यावा

गेल्या दोन वर्षात मूर्तीवर केल्या रासायनिक संवर्धनानंतर पुरातत्व विभागाने सुचविलेल्या नियमांची अमंलबजावणी देवस्थान समितीने केलेली नाही. नियमांची अंमलबजावणी करता येत नसेल तर, देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी आणि देवस्थान समितीचे सचिवांनी राजीनामा द्यावा अशी मागणी शिवसेनेने बैठकीत केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लुटारूंची टोळी जेरबंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रात्रीच्या अंधारात नागरिकांना अडवून कोयत्याचा धाक दाखवत लूटमार करणारी टोळी अखेर जेरबंद झाली. एका अल्पवयीन मुलासह अभिजित उर्फ बबन राजू चव्हाण आणि युवराज संजय क्षीरसागर यांना शाहूपुरी पोलिसांनी अटक केले. गेल्या १५ दिवसांत सात गुन्हे करणाऱ्या टोळीकडून पोलिसांनी सुमारे लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला असून, त्यांच्याकडून आणखी काही गंभीर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

गेल्या १५ दिवसांत शाहू मार्केट यार्ड परिसर, लोणार वसाहत, सरनोबतवाडी, राजाराम तलाव परिसरात लूटमारीच्या घटना घडल्या होत्या. कोयत्याचा धाक दाखवून नागरिकांकडे असलेली रोख रक्कम आणि किमती ऐवज लंपास करणाऱ्या टोळीने अक्षरशः दहशत निर्माण केली होती. अखेर ही टोळी पोलिसांच्या हाती लागली आहे. विशेष म्हणजे या टोळीत एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. अल्पवयीन मुलासह अभिजित उर्फ बबन चव्हाण आणि युवराज क्षीरसागर अशी संशयितांची नावे असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. या तिघांनीही सात गुन्हे केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून एक मोटरसायकल (एम. एच. ०९ सी. बी. ७४५८) विविध कंपन्यांचे ११ मोबाइल, चांदीचे ब्रेसलेट, दोन घड्याळे, एक एटीएम कार्ड आणि रोख १९ हजार रुपये असा एक लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या टोळीकडून आणखी काही गंभीर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी वर्तवली आहे.

गुंडांच्या टोळीनेच केले हवाली?

लुटारूंच्या टोळीला राजारामपुरीतील एका गुंडाच्या टोळीने पकडून पोलिसांच्या हवाली केल्याचीही चर्चा शहरात सुरू आहे. लुटारूंच्या टोळीने दोन दिवसांपूर्वी लोणार वसाहत येथे रेल्वे गुड्स मार्केट यार्ड परिसरात तीन तरुणांना लुटले होते. यानंतर एका गुंडाच्या टोळीनेच लुटारूंना पकडून गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या हवाली केले. याबाबत पोलिस अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, त्यांनी अधिक बोलणे टाळले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रात्रीत अकरा घरफोड्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरातील घरफोड्यांचे सत्र सुरूच असून, बुधवारी (ता. ३१) रात्री चोरट्यांनी कणेरकरनगर येथे ११ घरफोड्या केल्या. चोरट्यांनी सुमारे ५ लाखांचा मुद्देमाल लंपास केला. काही घरमालक सुटीनिमित्त बाहेरगावी असल्याने चोरीला गेलेल्या मुद्देमालाची नेमकी माहिती पोलिसांना समजू शकली नाही. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू आहे. दरम्यान, बॅग विक्रीच्या निमित्ताने रेकी करून चोरट्यांनी घरफोड्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

मंगळवारी रात्री टाकाळा परिसरात आठ फ्लॅट फोडल्याच्या घटनेनंतर बुधवारी रात्री सलग चोरीच्या घटना घडल्याने नागरिकांतही भीतीचे वातावरण आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार न्यू कणेरकरनगर येथे मारुती मंदिरासमोरील कॉलनीत मूळचे राधानगरी आणि करवीर तालुक्यातील अनेक लोक राहतात. सुटीनिमित्त अनेक कुटुंबे गावाकडे गेली आहेत. हीच संधी साधून चोरट्यांनी ११ ठिकाणी चोऱ्या केल्या.

येथील नागेश सातेरी कदम मुलीच्या लग्नासाठी बेळगाव जिल्ह्यातील मूळ गावी गेले आहेत. त्यांच्यात घरफोडी करून रोख २० हजारासह तीन तोळे दागिने चोरट्यांनी पळवले. नरुल्ला इस्माईल शेख यांच्या घरातील २५ हजाराचा कॅमेरा आणि १० हजाराचा मोबाइल, रामकृष्ण जाधव, आनंद वागरे यांच्या घरातील सुमारे पाच हजारासह किमती ऐवज लांबवला. नागनाथ कांबळे यांच्या घरातील ५ हजारासह २ तोळे सोने चोरट्यांनी लांबवले. शिवाय राजेश ज्ञानदेव भोगम (मूळ गाव भोगमवाडी, ता. करवीर) आणि सर्जेराव श्रीपती पाटील या चांदी कारागिरांच्या घरातही चोरट्यांनी हातसफाई करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या हाती काही लागले नाही. धनाजी केरबा पाटील, युवराज आनंदा बिलावरे, अशोक लोंढे आणि महेश कांबळे यांच्याही घरांमध्ये चोरट्यांनी प्रवेश केला. मात्र किरकोळ वस्तू आणि ऐवज वगळता त्यांच्या हाती फारसे लागले नाही. यातील नागनाथ कांबळे यांच्यासह आणखी दोघे घरमालक उपस्थित नसल्याने नेमका किती मुद्देमाल चोरीस गेला याची माहिती मिळाली नाही.

दरम्यान, परिसरातील नागरिकांनी चोरीच्या घटनांची माहिती देताच जुना राजवाडा पोलिसांनी जाऊन घटनांचा पंचनामा केला. श्वानपथक आणि ठसेतज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले.


बर्मुडा-टी शर्ट गँग

बॅग विक्रीच्या निमित्ताने गेले दोन दिवस काही तरुण शहरासह उपनगरांत फिरत आहेत. घरांमध्ये जाऊन ते बॅग खरेदीचा आग्रह धरतात. दिवसा बॅग विक्रीच्या बहाण्याने रेकी करायची आणि रात्री घरफोड्या करण्याचे काम या टोळीकडून सुरू असल्याचा संशय आहे. यानुसार पोलिस शोध घेत आहेत.

कोट –

वाढत्या चोऱ्या रोखण्यासाठी पोलिस प्रयत्नशील आहेत. चार पथके बेळगाव आणि उस्मानाबादसह कोकणकडे रवाना झाली आहेत. चोरट्यांना पकडण्यात लवकरच यश येईल.

संजय मोहिते, पोलिस अधीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गोकुळ’चे दूध रस्त्यावर ओतले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शेतकरी संपाच्या शुक्रवारी दुसऱ्या दिवशी कुडित्रे फाट्यावर गोकुळकडे येणारे दोन टेम्पो शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सायंकाळी राेखले.खले. दुधाचे कॅन रस्त्यावर ओतून सरकारचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. गोकुळ संघाने दूध संकलन बंद करून आंदोलनाला पाठिंबा द्यावा, अन्यथा गावागावांतून येणारे दुधाचे टेम्पो रोखले जातील, असा इशारा शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे अध्यक्ष अॅड. माणिक शिंदे यांनी दिला. संपामुळे गोकुळचे १ लाख लिटर दुधाचे संकलन कमी झाले. गोकुळने दिवसभर २९ टँकर पोलिस बंदोबस्तात मुंबईला पाठवले. दरम्यान, येथील कृषी उत्पन्न बाजार समितीनेही संपास पाठिंबा दिला आहे.

जिल्ह्यात शुक्रवारपासून संपाची व्याप्ती वाढत असून, शेतकऱ्यांनी स्वतःहून डेअरीला दूध न घालणे, बाजारात भाजीपाला न आणणे या पातळीवर निषेध सुरू केला आहे. करवीर तालुक्यातील कारभारवाडीसह अनेक गावांनी गावातच दुधाचे टेम्पो रोखण्याचे नियोजन केले. कोपार्डे पंचक्रोशीतून कोल्हापूरकडे येणारे दुधाचे दोन टेम्पो कुडित्रे फाट्यावर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रोखले. आक्रमक होत त्यांनी सरकारविरोधात घोषणा दिल्या आणि टेम्पोतील कॅन रस्त्यावर ओतले.

चंदगड तालुक्यातून तब्बल ३८ हजार लिटर दूध गोकुळकडे आले नाही. संघाकडे दहा लाख लिटर दूध संकलन रोज होते. त्यात एक लाखाची घट झाली. त्याचा परिणाम वितरणावर झाला. वारणा संघाचे संकलनही कमी झाले. शेतकरी आक्रमक झाल्याने वारणाचेही १२ टँकर बंदोबस्तात मुंबईला रवाना झाले. शहरातील महत्त्वाच्या तिन्ही भाजी मार्केटमध्ये भाजीपाल्यांची तीव्र टंचाई जाणवली. सर्वच भाज्यांचे दर २० ते २५ टक्क्यांनी वाढले. पाव किलो भाजीसाठी कमीत २० ते ४० रूपये ग्राहकांना मोजावे लागले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शिस्त, समयसूचकतेनेच आपत्तीवर मात शक्य’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘शिस्त, समयसूचकता आणि प्रशिक्षित शरीर व मन या त्रिसूत्रीच्या बळावर जीवनात उद्भवणाऱ्या कोणत्याही आपत्तीवर मात करणे शक्य आहे’, असा मूलमंत्र कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी शुक्रवारी राष्ट्रीय सेवा योजनेच्या राज्यातील स्वयंसेवकांना दिला. शिवाजी विद्यापीठात सुरू असलेल्या दहा दिवसीय ‘आव्हान-२०१७’ या राष्ट्रीय सेवा योजनेच्या राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन नांगरे-पाटील यांच्या हस्ते वटवृक्षास जलार्पण करून झाले. त्यावेळी ते बोलत होते. विद्यापीठाच्या लोककला केंद्रात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते.

विशेष पोलिस महानिरीक्षक नांगरे-पाटील यांनी मुंबईत २००८ साली २६ नोव्हेंबर रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या प्रसंगी हॉटेल ताज येथे दहशतवाद्यांशी दोन हात केले. या हल्ल्याचे आणि त्याला मुंबई पोलिसांनी अत्यंत शौर्याने केलेल्या प्रतिकाराचे वर्णन साक्षात नांगरे-पाटील यांच्या तोंडून ऐकताना उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. केस स्टडी म्हणून उपस्थित शिबिरार्थींना त्यांनी या हल्ल्याचे तपशील सांगताना आपत्तीच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याचा वापर केल्याचे आणि पदोपदी आपत्ती व्यवस्थापनाची जोड दिल्याने दहशतवाद्यांचा यशस्वीपणे मुकाबला करता आल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले..

नांगरे-पाटील म्हणाले, ‘विद्यार्थी दशेतच स्वतःमधील कमजोरी शोधून त्या सुधारण्याकडे लक्ष द्या आणि क्षमता ओळखून त्या अधिक टोकदार बनवा. तसे केल्यास आयुष्यात यश निश्चित मिळेल. पण जेव्हा यशाचे शिखर गाठाल, तेव्हा मात्र सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून समाजाप्रती उत्तरदायित्व निभावण्यासाठी कार्यरत व्हा. बायोडाटा, सीव्ही यांच्यापेक्षाही जीवन जगताना स्वतःच्या तसेच इतरांच्या सामाजिक सुरक्षिततेचा विचार अत्यंत महत्त्वाचा आहे.’

कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, ‘केवळ शारिरीक क्षमता विकसित करणे हे या शिबिराचे उद्दिष्ट नाही, तर कोणत्याही आपत्तीला तोंड देण्याची आणि त्यामध्ये सापडलेल्या लोकांना वाचविण्याची कणखर मानसिकता निर्माण करणे, हे आहे. त्यामुळे त्या दृष्टीने या शिबिरामध्ये सहभागी होऊन त्याचा जीवनात लोकांच्या भल्यासाठी सातत्याने वापर करण्यास सज्ज व्हावे.’

प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी विद्यापीठातील महत्त्वपूर्ण वैशिष्ट्यांची माहिती दिली. एनएसएस हे विद्यापीठाचे अविभाज्य अंग आहे. दरवर्षी सुमारे ३५०० स्वयंसेवक या विद्यापीठात प्रशिक्षण घेतात. यंदा ‘आव्हान’च्या यजमानपदामुळे ही संख्या ५००० झाल्याचे झाली आहे.’

यावेळी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमाचे समन्वयक डॉ. डी.के. गायकवाड यांनी स्वागत केले. एनएसएसचे राज्य संपर्क अधिकारी प्राचार्य डॉ. अतुल साळुंखे यांनी प्रास्ताविक केले. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आभार मानले. डॉ. संजीवनी पाटील व नंदिनी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. परीक्षा नियंत्रक महेश काकडे, प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, एनडीआरएफचे निरीक्षक एस. डी. इंगळे, प्राचार्य डॉ. डी. आर. मोरे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जय महाराष्ट्र’ सह एसटी बेळगावला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बेळगाव आणि कर्नाटकात ‘जय महाराष्ट्र’ म्हटल्यास लोकप्रिनिधीला आपले पद गमवावे लागेल, असा इशारा देणारे कर्नाटकचे मंत्री रोशन बेग यांना शुक्रवारी एसटी महामंडळाने अनोख्या पद्धतीने चपराक दिली. एसटी महामंडळाने आपल्या लोगोमध्येच बदल करून घेऊन, ‘जय महाराष्ट्र’ लिहिलेल्या नव्या लोगोची पहिली गाडी आज, शुक्रवारी बेळगावला पाठविली. कोल्हापुरातून फुलांच्या माळा आणि भगवा झेंडा लावून ही एसटी सायंकाळी सातच्या सुमारास बेळगावला रवाना झाली.

मुंबईहून बेळगावला जाणाऱ्या या बसचे (एमएच २०-बीएल ३९५८) कोल्हापुरात जंगी स्वागत करण्यात आले. सकाळी आठच्या सुमारास मुंबईहून सुटलेल्या या गाडीचे पुणे, सातारा, कऱ्हाड, पेठ नाका येथे जल्लोषी स्वागत करण्यात आले. कोल्हापुरात सायंकाळी साडेचार वाजल्यापासून बसची वाट पाहण्यात येत होती. आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह स्थानिक शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी गाडीच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती. हलगीचा कडकडाट सुरू होता. बस एसटीच्या विभागीय कार्यालयासमोर आल्यानंतर गाडीला पुष्पहार आणि माळा चढविण्यात आल्या. भगवे झेंडे लावण्यात आले. त्यानंतर फटाके फोडण्यात आले आणि उपस्थितांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय,’ आणि ‘जय भवानी, जय शिवाजी,’च्या घोषणा दिल्या.


परिवहन मंत्र्यांनी कर्नाटकच्या मंत्री बेग यांना तातडीने प्रत्युत्तर दिले आहे. गाडीचे ठिकठिकाणी स्वागत होत आहे. आम्हाला याचा अभिमान असून, कर्नाटक सरकारला हा इशारा आहे. महाराष्ट्राच्या नादाला लागाल तर तुम्हाला असेच प्रत्युत्तर द्यावे लागेल.

- राजेश क्षीरसागर, आमदार

‘आम्हाला अभिमान वाटतो’

मुंबईहून निघालेल्या गाडीचे चालक आणि वाहक सातारा येथे बदलण्यात आले. चालक प्रमोद गायकवाड आणि वाहक बबन बोराटे बस पुढे कोल्हापूरकडे घेऊन आले. वाटेत कऱ्हाड, पेठ नाका येथे बसचे असेच स्वागत झाल्याचे या दोघांनी सांगितले. दोघांनाही स्थानिक कार्यकर्त्यांनी भगवे फेटे बांधले होते. गायकवाड आणि बोराटे ही बस उद्या (शनिवार) सातारला घेऊन येतील. दर शुक्रवारी या दोघांची ड्युटी बेळगाव गाडीलाच असते. ‘आज ही बस घेऊन जात असल्याचा अभिमान वाटत आहे,’ अशी प्रतिक्रिया दोघांनी महाराष्ट्र टाइम्सशी बोलताना दिली.

रावतेंनी दिले प्रत्युत्तर

कर्नाटक सरकारच्या जुलमी निर्णयाविरोधात बेळगावमध्ये मोर्चा काढण्यात आला होता. त्याला उपस्थित राहण्यासाठी परिवहन मंत्री दिवाकर रावते कोल्हापूरहून बेळगावला निघाले असता कर्नाटक पोलिसांनी कोगनोळी टोल नाक्यावर रावतेंची गाडी अडविली होती. रावते नाक्यावरून परत कोल्हापूरला आले होते. त्यानंतर तातडीने रावते यांनी एसटीचा लोगोच बदलण्याचा निर्णय घेतला आणि कर्नाटकला अनोख्या पद्धतीने प्रत्युत्तर दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापुरात शेतमाल आवकेत घट

$
0
0

कोल्हापूर ः शेतकऱ्यांचा संपाचा परिणाम आज तिसऱ्या दिवशीही कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात जाणवला. शहरातील बाजारांमध्ये भाज्यांचे दर वाढलेले दिसले, तर जिल्ह्यात काही ठिकाणी रस्ता रोको करण्यात आला. गोकुळ दूध संघाच्या संकलनावरही संपाचा परिणाम दिसून आला. पण, दिवसभरात दूध रस्त्यावर ओतण्याचा कोणताही प्रकार घडला नाही.

शेतकरी संपाचा शनिवारचा तिसरा दिवस होता. त्यातच शुक्रवारी पहाटे शेतकऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा गेल्यानंतर संप मागे घेतल्याची घोषणा केली. त्यामुळे कोल्हापुरात सकाळी काहीसे संभ्रमाचे वातावरण होते. पण, रघुनाथदादा पाटील यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी संघटनेने आंदोलनावर ठाम राहण्याची भूमिका जाहीर केल्यानंतर संभ्रम दूर झाला. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजीपाला फेकून लक्ष वेधले. नाशिक आणि नगर जिल्ह्यात आंदोलनाची तीव्रता अधिक असल्याने कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत दिवसभरात कांदा आणि बटाट्याची आवक ठप्प झाली. त्यामुळे येत्या दोन दिवसांत कांदा बटाट्याचे भाव वाढण्याची चिन्हे आहेत. कर्नाटकमधून येणाऱ्या भाजीपाल्याच्या आवकेवर फारसा परिणाम जणावला नसल्याचे बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्ह्याच्या इतर भागातून शहरातील थेट मंडईत येणारी भाजी सुरूच होती. पण, हातकणंगले परिसरातून बाजार समितीत येणारी भाजी कमी आल्याचे बाजार समितीतून सांगण्यात आले.

पेठवडगाव आणि हुपरी येथे शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली. तिसऱ्या दिवशी गोकुळच्या संकलनावरही परिणाम जाणवला. रोजच्या सरासरी संकलनात ५० हजार लिटर कमी दूध संकलित झाल्याची माहिती गोकुळकडून देण्यात आली. दूध रोखण्याचे किंवा रस्त्यावर ओतण्याची प्रकार झाले नसले तरी, वडणगे, निगवे, भुये, शिये येथे नागरिकांनी उत्स्फूर्तपणे दूध संकलन बंद करण्याचा निर्णय घेतला. भुये आणि निगवे येथील आठवडी बाजार शनिवारी भरला नाही. उद्या (रविवार) कसबा बावड्यातील आठवडी बाजार बंद करण्याचा इशारा शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.

सांगरुळात दूध संकलन बंद

‍कुडित्रे: सांगरुळ (ता.करवीर) येथील शेतकरी संघटनेचे नेते तसेच सर्व पक्षीय नेते व ग्रामस्थांनी ग्रामपंचायत चौकात एकत् येत गावातील सर्व दूध संस्थांचे संपूर्ण दूध संकलन बंद करून तसेच भाजीपाला विक्री व्यवहार बंद करून शेतकरी संपाला पाठिंबा दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादीत महापौर बदलाचे वारे !

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

हसीना फरास यांच्या महापौरपदाचा कारकीर्दीला सहा महिन्याचा कालावधी पूर्ण होत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महापौर बदलाचे वारे वाहत आहेत. महापौरपदासाठी इच्छुकांच्या नातेवाईकांकडून नेतेमंडळीच्या भेटीगाटी सुरू केल्या आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची चार दिवसांत या संदर्भात बैठक होईल.

महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. दोन्ही पक्षांमध्ये सत्तेचा फॉर्म्युला ठरला असून काँग्रेसकडे तीन वर्षे तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे दोन वर्षे महापौरपद आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे महापौरपद असून फरास आठ डिसेंबर २०१६ पासून या पदावर आहेत. गेल्यावर्षी राष्ट्रवादीकडे महापौरपद आल्यानंतर फरास, अनुराधा खेडकर, माधवी गवंडी यांनी पदासाठी दावा केला होता. त्यावेळी राष्ट्रवादीतील इच्छुकांची संख्या वाढल्याने सहा-सहा महिन्याचा महापौर करण्याचे ठरले. राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी गेल्यावर्षी महापौरपदाचे नाव घोषित करताना सांगेल त्यावेळी राजीनामा द्यायचा, अशी स्पष्ट सूचना केली होती.

दरम्यान, महापौर फरास यांची महापौरपदी निवड होऊन आठ जूनला सहा महिन्याचा कालावधी पूर्ण होत असल्याने पक्षातील इच्छुक सरसावले आहेत. नगरसेविका अनुराधा खेडकर यांचे पती माजी नगरसेवक सचिन खेडकर यांनी यापूर्वीच मुश्रीफांची भेट घेऊन महापौरपदाची मागणी केली. दरम्यान, मुश्रीफ यांनी शनिवारी (ता.३) राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष आर. के. पोवार, शहराध्यक्ष राजू लाटकर, महापालिकेतील राष्ट्रवादी आघाडीचे नेते प्रा. जयंत पाटील यांच्यासह प्रमुख नगरसेवकांची जिल्हा बँकेत बैठक बोलावली होती. मात्र बैठक अचानक रद्द झाली. मुश्रीफ यांनी पुढील आठवड्यात पुन्हा बैठक घेऊ असे पदाधिकाऱ्यांना सांगितले. येत्या चार दिवसांत बैठक होईल असे संकेत आहेत.

विरोधकांचे आव्हान, जबाबदारी कोण स्वीकारणार

महापालिकेत सध्या भाजप, ताराराणी आघाडीचे प्रबळ आव्हान आहे. विरोधी आघाडीने यापूर्वी दोनदा महापौरपदाची निवडणूक लढवली होती. आता पुन्हा महापौर बदल झाला तर निवडीचा कार्यक्रम लागणार आहे. भाजप, ताराराणी आघाडीकडून पुन्हा निवडणूक लढविण्याचे संकेत आहेत. या पार्श्वभूमीवर नगरसेवकांची सहल, दोन दिवसांचा दौरा असा खटाटोप करावा लागणार असून त्याची जबाबदारी कोण स्वीकारणार? असा सवालही काहीजण करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मुद्रा योजनेतून ५०४ कोटींचे अर्थसाह्य

$
0
0

म टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत ३३ हजार ६९८ लाभार्थ्यांना ५०४ कोटी ६७ लाखांचे अर्थसहाय्य विविध बँकाच्या माध्यमातून करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी दिली. जिल्हाधिकारी सुभेदार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात मुद्रा बँक योजनेच्या जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.

जिल्हाधिकारी सुभेदार म्हणाले, ‘जिल्ह्यात शिशू योजनेंतर्गत २७ हजार ३८१ तरुणांना १२७ कोटी ४४ लाख, किशोर योजनेअंतर्गत ५ हजार २७४ तरुणांना २६५ कोटी १२ लाख आणि तरुण योजनेअंतर्गत एक हजार ४३ तरुणांना ११२ कोटी ११ लाखांचे अर्थसहाय्य करण्यात आले आहे. यात सर्वाधिक म्हणजे ९८ कोटी ८६ लाखांचे सहाय्य बँक ऑफ इंडियाने केले असून, त्याखालोखाल ९५ कोटी ७३ लाखांचे कर्ज बँक ऑफ महाराष्ट्राने उपलब्ध करून दिले आहे.’

प्रारंभी जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांनी स्वागत करुन मुद्रा बँक योजनेची माहिती दिली. या मुद्रा बँक कर्ज योजनेंतर्गत तीन गटांमध्ये कर्ज उपलब्ध करून दिले जात असून, शिशू गटासाठी १० हजार ते ५० हजार, किशोर गटासाठी ५० हजार ते ५ लाख आणि तरुण गटासाठी ५ लाख ते १० लाख रुपये असे कर्ज जिल्ह्यातील सहकारी, राष्ट्रीय, प्रादेशिक ग्रामीण बँका, बिगर बँक वित्तीय संस्थामार्फत उपलब्ध करुन दिले जात आहे. मुद्रा योजनेच्या माध्यमातून छोट्या कारखानदारांना आणि दुकानदारांनाही कर्ज उपलब्ध होऊ शकते. त्याचबरोबरच सुतार, गवंडी काम, कुंभार, सलून, शिंपी, धोबी, भाजीपाला व फळविक्रेते इत्यादी लहान स्वरुपाच्या व्यवसायासाठीही कर्ज देण्याची तरतुद असल्याचे या वेळी सांगण्यात आले.

यावेळी कोल्हापूर विभागाचे माहिती उपसंचालक सतीश लळीत, बँक ऑफ इंडिया या जिल्हा अग्रणी बँकेचे अधिकारी रवींद्र बार्शीकर, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योग केंद्राचे ज. बा. करीम यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते.


‘टाळाटाळ केल्यास गय नाही’

जिल्हाधिकारी सुभेदार म्हणाले, ‘मुद्रा बँक कर्ज योजना प्रधानमंत्र्यांच्या प्राधान्यक्रमाची योजना असून, सर्व बँकांनी या योजनेतून बेरोजगार तरुणांना कुठल्याही प्रकारच्या तारण किंवा जामीनाशिवाय कर्ज पुरवठा करूरुन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सक्रीय योगदान द्यावे.’ या योजनेत हेतुपुरस्पर टाळाटाळ करणाऱ्या बँकांची गय केली जाणार नाही असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रग्गेडियन ‘ट्रेल रन’ला प्रतिसाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठात ‘रग्गेडियन एफएसओएम’ या उपक्रमाअंतर्गत ‘ट्रेल रन’ उपक्रमाचा आनंद रविवारी सकाळी करवीरकरांनी लुटला. शिवाजी विद्यापीठ ते राजाराम तलाव आणि तेथून परत शिवाजी विद्यापीठ अशा चढ-उताराच्या तसेच खडकाळ, डोंगराळ ट्रॅकवर धावण्याची मौज कोल्हापुरकरांनी अनुभवली. एफएसओएम (फर्स्ट संडे ऑफ मॉर्निंग) उपक्रमांतर्गत रग्गेडियन आणि महाराष्ट्र टाइम्स यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे महिन्याच्या पहिल्या रविवारी आयोजन केले जाते.

व्यायाम, खिलाडूवृत्ती आणि क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी रग्गेडियनचा हा उपक्रम आहे. उपक्रमाला कोल्हापुरातील क्रीडा प्रेमी व आरोग्यप्रेमींनी चांगला प्रतिसाद दिला. रविवारी सकाळी शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य फाटकापासून ट्रेल रनला सुरुवात झाली. तत्पूर्वी संयोजकांनी ‘ट्रेल रन’ ही संकल्पना स्पष्ट केल्यावर सर्व वयोगटातील नागरिक धावण्याच्या मोहिमेत सहभागी झाले. विद्यापीठातील डोंगराळ आणि खडकाळ भागातून धावत ही शर्यत राजाराम तलावाच्या मागील बाजूस गेली. तेथील डोंगराळ आणि खडकाळ मार्गाने परत ही ट्रेल रन विद्यापीठाच्या मुख्य दरवाजाजवळ आली. तेथे याची सांगता झाली. पावसाळ्याची चाहुल लागली असल्याने ढगाळ वातावरण होते. कोणी वेगाने तर कोणी सावकाश धावत ट्रेल रनचा आनंद घेतला. या उपक्रमासाठी रग्गेडियनच्यावतीने पुण्याच्या अनुजा मुद्धा यांना आमंत्रित करण्यात आले होते. अनुजा यांनी महिला सक्षमकरणाचा संदेश देण्यासाठी पुणे ते गोवा हे ४२५ किलोमीटर अंतर धावत पूर्ण केले आहे. अनुजा यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. तसेच सिल्व्हर मॅन या श्रेणीसाठी ऑस्ट्रेलियातील स्पर्धेसाठी जाणाऱ्या पंकज उर्फ धीरज रावलू याचा सत्कार करण्यात आला. बेळगाव ते कोल्हापूर हे १२८ किलोमीटर अंतर सायकलने काटणाऱ्या सहा वर्षाच्या वरद वैभव चंदगडकर यांचाही गौरव करण्यात आला. त्यांनी क्रीडाप्रेमी नागरिकांना मार्गदर्शन केले.

‘नियमित व्यायामाची गोडी लागावी व आरोग्याविषयी प्रत्येकाने जागृत रहावे, यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे’, असे रग्गेडियन आकाश कोरगावकर यांनी सांगितले. यावेळी रग्गेडियनचे राज कोरगावकर, शिवानी राय, अलका कुलकर्णी, मिथुन माजगावकर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भूजल पातळीत चिंताजनक घट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गेल्या दोन वर्षात जिल्ह्यातील पावसाने सरासरी पातळी न ओलांडल्याने आणि गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या अमर्याद पाणी उपशामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील भूजल पातळी दोन ते सव्वादोन फुटाने कमी झाली आहे. कागल, पन्हाळा, शाहूवाडी, गडहिंग्लज व चंदगड या पाच तालुक्यांची भूजल पातळी लक्षणीय घटली आहे. त्यातही शाहूवाडी तालुक्यातील स्थिती चिंताजनक आहे. जिल्ह्यातील पाणी पातळी घटल्याने अनेक ठिकाणी बोअरवेल खोदाई ६०० फुटांपर्यंत खाली गेली आहे. अनिर्बंध पाणी उपशामुळे भूजल पातळी घटत असल्याचे मत तज्ज्ञांचे आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी १७७२ मिलीमिटर पाऊस पडतो. मात्र, गेल्या काही वर्षांपासून यात अनियमितता दिसून येते. त्यामुळे जिल्ह्याची पर्जन्यमानाची सरासरी कमी-अधिक होऊ लागली. मात्र सर्व धरणांमध्ये पाणीसाठी पुरेसा होत असल्याने पाणी टंचाई जाणवत नाही. पडणाऱ्या पावसाचा कालावधी कमी झाल्याने, पाणी वेगाने वाहून जाते. याचा परीणाम भूजल पातळीवर होऊ लागला आहे. भूजल पातळी घटल्याचा सर्वाधिक फटका बोअरवेल खोदाईला बसला आहे. यापूर्वी जिल्ह्याच्या कोणत्याही भागात सरासरी १५० ते २०० फुटांपर्यत बोअरवेल खोदाई केली जात होती, पण गेल्या दोन वर्षापासून ही खोदाई ५०० ते ५५० फुटांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे शेतकरी धास्तावले आहेत.

जिल्हा भूजल सर्वेक्षण विभागाच्यावतीने जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत प्रायोगिक तत्वावर सात ते दहा विहिरींचे सर्वेक्षण करण्यात आले. २०१२ ते २०१६ आणि मार्च २०१७ मध्ये केलेल्या सर्वेक्षणामध्ये भूजल पातळी घटल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे. पाच तालुक्यांतील भूजल पातळीत लक्षणीय घट झाली आहे. भूजलपातळी वाढवण्यासाठी ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ अभियानाबरोबरच पाणी उपशावर निर्बंध घालण्याची आवश्यकता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देशी वृक्षलागवडीचे वाढले महत्व

$
0
0

Udaysing.patil@timesgroup.com
Tweet : @udaysingpatilMT

कोल्हापूर : कमी देखभाल,वेगाने वाढ तसेच आकर्षकपणा याऐवजी दैनंदिन जीवनात होणाऱ्या उपयोगाचा विचार करुन वृक्षारोपणासाठी देशी वृक्षांसाठी प्राधान्य देण्यात येत आहे. त्यानुसार कुंपणापासून मोठ्या क्षेत्रावर करायच्या वृक्षारोपणासाठी नागरिकांकडून विचारणा होत असल्याने सरकारच्या नर्सरींबरोबर खासगी नर्सरींमध्येही देशी जातीच्या झाडांची रोपे तयार केली जात आहेत. सणांच्यानिमित्ताने गरज भासणाऱ्या विविध कडुलिंब, वड, आपटा या झाडांचे तसेच घरच्या घरी औषधासाठी लागणाऱ्या गवती चहा, आडुळसा, वेखंड यासारख्या वनस्पतींचे महत्व नागरिकांना समजून येऊ लागले आहे.

जंगलांची होत असलेली बेसुमार तोड रोखण्याचे आव्हान अजूनही कायम आहे. तोडल्या जाणाऱ्या झाडांपेक्षा लावल्या जाणाऱ्या झाडांची संख्या कमी असल्याने वृक्षारोपणाचे महत्व सांगण्याची आवश्यकता आजही कायम आहे. पण वीस वर्षापूर्वी वृक्षारोपणाकडे पाहिल्या जाणाऱ्या कुत्सित नजरा सध्या बहुतांशी कमी झाल्या आहेत. त्यासाठी विविध पातळीवरुन केले जाणारे प्रबोधन व वृक्ष तोडीमुळे वैयक्तिकरित्या बसलेले फटके कारणीभूत होते. वृक्षारोपणासाठी नागरिक, नव्या पिढीची मानसिकता तयार करण्याचे आव्हान सरकारच्या पातळीवरुन तसेच स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून केलेल्या प्रयत्नामुळे पेलले गेले आहे. सध्या वृक्षारोपण ही गरज व त्याचे महत्व जवळपास प्रत्येकाला समजून चुकले आहे. अशा टप्प्यावर आता आपली काय गरज आहे व कोणते नको आहे याची निवड करण्याची वेळ आली आहे.

त्याअनुषंगाने २००७ साली महाराष्ट्र वृक्ष दिन साजरा करण्यात येऊ लागला. यानिमित्ताने देशी झाडांच्या लागवडीसाठी प्रोत्साहन देण्यास सुरु झाले. यासाठी आपल्याकडील पारं​परिक झाडे नागरिकांच्या दैनंदिन गरजा कशा भागवतात, त्यांचे महत्व कसे आहे हे पटवून देण्यासाठी येथील निसर्ग मित्र संस्थेने उपक्रम सुरू केले आहेत. यापूर्वी सरकारकडून निलगिरी, गुलमोहोरच्या झाडांची रोपे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करुन दिली जात होती. पण देशी झाडांच्या लागवडीबाबत प्रबोधन करण्यात येऊ लागले, तसे सरकारच्या पातळीवरुन या झाडांची रोपे तयार करण्याचे काम कमी केले आहे. त्याऐवजी वड, पिंपळ, चिंच, जांभूळ, कडूलिंबसारख्या मागणी असलेल्या झाडांची रोपे तयार करण्यात येत आहेत. खासगी नर्सरींमध्येही नागरिक आता देशी झाडांची नावे विचारत असल्याने हे व्यावसायिकही या झाडांची रोपे तयार करत आहेत. यासाठी देशी झाडांच्या बिया संकलनालाही वेग येऊ लागला आहे.


पर्यावरण संरक्षण करण्यासाठी झाडे लावली पाहिजेत हे साऱ्यांना समजले आहे. पण आता कोणती लावावीत, हे सांगण्याची आवश्यकता आहे. अनेक ठिकाणी शोभिवंत झाडांची लागवड होत आहे. त्याऐवजी आपली देशी झाडांची लागवड केल्यास त्याचे पर्यावरणाला व नागरिकांनाही फायदा होतो हे नागरिकांना पटू लागले आहे. त्यामुळे अनेकजण देशी झाडांची लागवड करु लागले आहेत. हा चांगला बदल घडत आहे.

अनिल चौगुले, कार्यवाह, निसर्ग मित्र

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सदाभाऊंना प्रश्न विचारणाऱ्यांना धक्काबुक्की

$
0
0

सांगली :

कृषी राज्यमंत्री सदाभांऊ खोत यांची मुलाखत घेण्यासाठी आलेल्या वृत्तवाहिनीच्या पत्रकारांना मिरज ठाण्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी धक्काबुक्की केली.

कोणाची परवानगी घेऊन आलात, तुम्ही मुलाखत घ्यायची नाही, असं सांगत पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी पत्रकारांना धक्काबुक्की केली.
पत्रकारांना धक्काबुक्की करणाऱ्या पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांचा सांगली जिल्हा पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्यावतीने निषेध करण्यात आलाय. पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांचं वर्तन बघता, या पुढे काय ? पोलिसांची परवानगी घेऊन मंत्र्यांची मुलाखत घ्यायची काय ? असा संतप्त सवाल पत्रकारांकडून उपस्थित होतोय.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारमधून बाहेर पडण्याचा विचार: राजू शेट्टी

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त। कोल्हापूर

राज्यातील सरकार शेतकरीविरोधी आहे असं म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटना सरकारमधून बाहेर पडण्याचा विचार करत आहे. शेतकरी संघटनेचे नेते, खासदार राजू शेट्टी यांनी एक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हे वक्तव्य केलंय. या सरकारला पाठिंबा दिल्याचा आपल्याला मोठा पश्चाताप होत आहे, आता लवकरच राज्य कार्यकारिणीची बैठक घेऊन सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला जाणार आहे अशा शब्दांत शेट्टी यांनी सरकारविरोधी रणशिंग फुंकले आहे. राज्यातील लोकांनी शांततेत बंद ठेवून शेतकऱ्याना पाठिंबा दिल्याचं सांगत शेट्टी यांनी राज्यातील जनतेचे आभार मानले

राज्य सरकार जर शेतकऱ्यांच्या विरोधात गेलं, तर याचे परिणाम वाईट होतील असा स्पष्ट इशाराही शेट्टी यांनी राज्य सरकारला दिले आहेत.

खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी पुणे ते मुंबई अशी पदयात्रा काढून सरकारचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेत काहीही निष्पन्न होऊ शकले नाही. त्यानंतरच शेतकऱ्यांनी संपाची घोषणा केली होती.

राज्यभरात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या संपाला आपल्या संघटनेचा पाठिंबा असून राज्यभरात ठिकठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आंदोलन करत असल्याचेही ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेट्रोल डिलर्सच्या मागण्यांबाबत निर्णय नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सार्वजनिक तेल कंपन्यांकडून कमिशन वाढीच्या मागणीसाठी पेट्रोल डिलर्सला ३० जूनची मुदत दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डिलर्स असोसिएशनची (फामपेडा) पहिली बैठक पेट्रोलियम कंपन्याच्या अधिकाऱ्यांसोबत झाली. यामध्ये कमिशन वाढीचा प्रस्ताव देण्याचे सार्वजनिक तेल कंपन्याच्या प्रतिनिधींनी सांगितले. तर आणखी २५ दिवसांत कमिशनवाढीचा निर्णय न झाल्यास पुन्हा पेट्रोल पंप ठराविक वेळेत सुरू करण्याचे आंदोलन करण्याचा इशाराही बैठकीत देण्यात आला.

पेट्रोल डिलर्संना कमिशन वाढ देत नसल्याच्या निषेधार्थ पेट्रोल डिझेल असोसिएशनने मे महिन्यात आंदोलनाची सुरूवात केली होती. मात्र दोनच दिवसांत पेट्रोलियम कंपन्यांनी कमिशन वाढ देण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे सुरू असलेले आंदोलन तात्पुरते मागे घेतले. पेट्रोलियम कंपन्याची कमिशन वाढ देण्यासाठी ३० जून पर्यंत मुदत मागितली. त्या पार्श्वभूमीवर मुंबईत पहिली बैठक झाली. फामफेडाचे अध्यक्ष उदय लोध आणि देशभरातील प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. यामध्ये अद्याप कमिशन वाढीच्या टक्केवारीवर ठोस निर्णय झालेला नाही. मात्र पेट्रोल डिलर्सची भूमिका विचारात घेतली असल्याचे जिल्हा पेट्रोल डिझेल असोसिएशनचे अध्यक्ष गजकुमार माणगावे यांनी सांगितले. पंपचालकांनी दर रविवारी साप्ताहिक सुट्टी आणि अन्य दिवशी सकाळी नऊ ते सहा या एका शिफ्टमध्येच काम करण्याचा इशारा दिला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विद्यार्थ्यांना मिळाले नॉन क्रिमिलेयर दाखले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

करवीरचे प्रांताधिकारी रजेवर असल्याने रखडलेले विद्यार्थ्यांचे नॉन क्रिमिलेयरचे दाखले रविवारी (४ जून) सुटीच्या दिवशीही ऑनलाइन पद्धतीने देण्यात आले. या संदर्भात ‘महाराष्ट्र टाइम्स’ने २ जून रोजी विशेष वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची गंभीर दखल घेत कार्यालयातून हे दाखले देण्यात आले आहे. प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी विद्यार्थ्यांची गैरसोय लक्षात घेऊन त्यांना तातडीने दाखले मिळतील, अशी व्यवस्था केली.

करवारी प्रांत कार्यालयात विद्यार्थ्यांचे नॉन क्रिमिलेयरचे दाखले रखडले होते. प्रांताधिकारी रजेवर असल्याने ही गैरसोय होत होती. पण, कार्यालयात पर्यायी व्यवस्था का नाही, असा प्रश्न उपस्थित होत होता. दहावी आणि बारावीचे निकाल अजूनही हातात यायचे असले, तरी पदव्युत्तर शिक्षणासाठीची काही महाविद्यालयांची प्रवेश परीक्षा सुरू झाल्याने अनुसूचित जाती, जमातीच्या विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश घेण्याची ओढवेल, अशी भीती व्यक्त होत होती. याबाबतचे सविस्तर वृत्त महाराष्ट्र टाइम्समध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर रविवारी नॉन क्रिमिलेयरचे दाखले देण्यात आले.

दाखल्यांची प्रक्रिया ऑनलाइन असल्याने विद्यार्थ्यांना रविवारी अचानक दाखले तयार असल्याचे एसएमएस आले. त्यानंतर ऑनलाइन पद्धतीनेच विद्यार्थ्यांनी हे दाखले डाउनलोड करून घेतले. एमसीएसाठी महाएमसीए संकेतस्थळावर अर्ज करताना टोकन स्वीकराले जात नसल्याने काही विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश घ्यावा लागण्याची भिती वाटत होती. पण, प्रांताधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांची ही अचडण लक्षात घेऊन दाखले देण्याची व्यवस्था केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात बंदला मोठा प्रतिसाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, या प्रमुख मागणीसाठी सोमवारी पुकारलेल्या बंदला जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळाला. बंदमुळे शहरासह जिल्ह्यातील सर्व व्यवहार ठप्प झाले, शाळाही बंद ठेवण्यात आल्या. वडाप, रिक्षा चालकांनीही बंदला पाठिंबा दिला. शहरात सुरू ठेवलेल्या काही चप्पल दुकानांतील साहित्य शिवसैनिकांनी विस्कटून टाकले. आवाहन करूनही प्रतिसाद न देणाऱ्या पेठवडगाव बाजार समितीला संतप्त कार्यकर्त्यांनी टाळे ठोकले, तेथील ‌किरकोळ विक्रेत्यांचा माल विस्कटून टाकण्यात आला. सेनापती कापशी येथे दूध रस्त्यावर ओतून देण्यात आले. बंददरम्यान ठिकठिकाणी निदर्शने, रस्ता रोको आणि रॅलीही काढण्यात आली.

शहरात बंदला चांगला चांगला प्रतिसाद मिळाला. चप्पल लाइनमध्ये सुरू असलेल्या काही दुकानात घुसून शिवसैनिकांनी साहित्याची फेकाफेकी केली. या प्रकारामुळे पळापळ सुरू झाली. परिसरातील दुकाने पटापट बंद झाली. यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला. इतर भागातील सुरू असलेली दुकानांचे शटर त्वरित बंद करण्यात आली. या आंदोलनात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय पवार, दुर्गेश लिंग्रज आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील मिनी बाजार उधळला. मात्र झाकून ठेवलेला शेतमाल विस्कटल्याचा आरोप करीत शेतकरी संघटना युवा आघाडी अध्यक्ष अॅड. माणिक शिंदे यांना व्यापाऱ्यांनी धक्काबुक्की केली. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले. बाजार समितीमध्ये आवक झाली नाही. मात्र काही व्यापारी शिल्लक कांदा, बटाटा व इतर शेतमाल विकत असल्याचे अॅड. शिंदे यांच्या निदर्शनास आले. त्यांनी व्यापाऱ्यांकडून शेतमाल काढून घेऊन तो विस्कटून टाकला. त्यावेळी व्यापाऱ्यांनी एकत्र येत शिंदे यांना धक्काबुक्की केली. संघटनेचे अजित पाटील यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी बाजार समितीमधील मिनी बाजार उधळून लावला.

गोकुळने बंदला पाठिंबा देत दूध संकलन केले नाही. रोजचे १० लाख लिटर दूध संकलन सोमवारी झाले नाही. परिणामी मंगळवारी मुंबई, पुणे, नाशिकसह स्थानिक बाजारपेठेत दुधाची टंचाई भासणार आहे.

शहर, जिल्ह्यात भाजपवगळता सर्वच प्रमुख पक्ष, संघटनांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. इचलकरंजी, जयसिंगपूर, गडहिंग्लज, पेठवडगाव येथील व्यवहार बंद ठेवण्यात आले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली इचलकरंजी प्रांत कार्यालयावर सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. शाहूवाडी तालुक्यात बांबवडे येथे संतप्त शेतकऱ्यांनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. शिवसेनेच्यावतीने टोपजवळ महामार्ग रोखून मागण्यांकडे लक्ष वेधले.

……

दूध टंचाई भासणार

बंदला पाठिंबा देण्यासाठी एक दिवस गोकुळ संघाने संकलन बंद ठेवले. त्यामुळे १० लाख लिटर दूध संकलन झाले नाही. स्वाभिमानी दूध संघानेही १ जूनपासून संकलन बंद ‌केले. त्याचा परिणाम मंगळवारपासून जाणवणार आहे. दरम्यान, वारणा दूध संघाने ३ लाख दुधाचे संकलन केले.

……………..

गरिबांना दूध वाटप

करवीर तालुक्यातील निगवे येथे संकलित केलेले दूध गरिबांना मोफत वाटप करण्यात आले. वडगाव येथे आज आठवडा जनावरांचा बाजार भरला. त्याची माहिती मिळताच ‌‘स्वाभिमानी’चे कार्यकर्ते तेथे दाखल झाले. त्यांनी बाजार गुंडाळायला भाग पडता समिती कार्यालयाला टाळे ठोकले.
खटले मोफत चालवणार

कर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनने पाठिंबा दिला. सोमवारी जिल्ह्यातील ३००० वकील न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहिले. शिवाय आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांवर दाखल होणाऱ्या गुन्ह्यांचे खटले मोफत लढवण्याचा निर्णय घेण्यात आला. सोमवारी न्यायसंकुलातील सभागृहात बैठक झाली. उन्हाळी सुट्टीनंतर पहिल्याच दिवशी वकिलांच्या आंदोलनाने कोर्टाचे कमकाज ठप्प राहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बार असोसिएशनसाठी रंगणार दुरंगी लढत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या संचालक मंडळासाठी १४ जूनला निवडणूक होणार आहे. इच्छुकांकडून पॅनेल बांधणीला सुरुवात झाली आहे. मंगळवारी (ता. ६ जून) अर्ज स्वीकारण्याचा अखेरचा दिवस असल्याने इच्छुकांची धांदल उडाली आहे. अॅड. पीटर बारदेस्कर आणि प्रशांत शिंदे यांच्यात दुरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

२०१६-२०१७ या वर्षातील संचालक मंडळाची मुदत संपल्याने नवीन वर्षासाठी संचालक मंडळाची निवडणूक १४ जूनला होणार आहे. सोमवारपासून (ता. ५) उमेदवारी अर्ज विक्री सुरू झाली असून, मंगळवारी (ता. ६) ४ वाजेपर्यंत अर्ज विक्रीसह अर्ज स्वीकारले जाणार आहेत. बुधवारी (ता. ७) सायंकाळी सहा वाजेपर्यंत उमेदवारी अर्जांची छाननी होईल. गुरूवारी (ता. ८) संध्याकाळपर्यंत उमेदवारांची यादी प्रसिद्ध होणार आहे. शुक्रवारी (ता. ९) दुपारी एकपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येतील. यानंतर दुपारी दोन वाजता उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होणार आहे. बुधवारी (ता. १४) सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत १५७५ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदान झाल्यानंतर रात्री निकाल जाहीर होणार आहे. अॅड. प्रल्हाद बी. पाटील हे निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहत आहेत.

कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचा अध्यक्ष खंडपीठ कृती समितीचा निमंत्रक असतो. खंडपीठ आंदोलनाची धुरा आपोआप जिल्हा बार असोसिएशनच्या अध्यक्षांकडे जात असल्याने या पदासाठी मोठी रस्सीखेच असते. यातच गेल्या सात-आठ वर्षांपासून खंडपीठ आंदोलनाने गती घेतल्याने अध्यक्षपदाला महत्त्व प्राप्त झाले आहे. यंदाची लढत थेट दुरंगी होण्याची शक्यता आहे. वरिष्ठ वकिलांमधील पीटर बारदेस्कर आणि प्रशांत शिंदे यांनी पॅनेल बांधणी सुरू केली असून, ज्येष्ठ वकिलांचा पाठिंबा मिळवण्यासाठी दोन्ही इच्छुकांचे प्रयत्न सुरू आहेत. दोन्ही पॅनेलमध्ये थेट लढत होणार असल्याने निवडणुकीतील रंगत वाढली आहे. यात बाजी कोण मारणार ते मात्र निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आज घुमणार शिवरायांचा जयजयकार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापुरातील विविध संस्था, संघटनांच्यावतीने शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त मंगळवारी (ता.६) विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. शिव प्रतिमा पूजन, मिरवणुका आणि शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष घुमणार आहे.

अखिल भारतयी मराठी महासंघातर्फे मंगळवारी दुपारी ४.३० वाजता मिरवणूक काढण्यात येणार आहे. मंगळवार पेठेतील मराठा महासंघाच्या कार्यालयापासून मिरवणुकीला प्रारंभ होईल. महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, कार्याध्यक्ष मनोहर किणीकर, आमदार अरविंद पाटील, माजी आमदार मालोजी अष्टेकर, प्रकाश मरगाळे यांच्यासह खासदार, आमदार ल नगरसेवकांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराज यांची सिंहासनारुढ मूर्ती, राष्ट्रपुरुषांच्या कार्यावर आधारित चित्ररथ, मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके, लेझीम, झांजपथकाचा समावेश आहे. शिवकालीन वातावरण निर्मितीसाठी नागरिकांनी पारंपरिक वेशभूषा करून मिरवणुकीत सामील व्हावे असे आवाहन मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंत मुळीक यांनी केले आहे.

शिवसेनेच्यावतीने छत्रपती शिवाजी चौक येथे सकाळी दहा वाजाता शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होईल. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन होईल. महिला पथकाच्या लेझीमची प्रात्यक्षिके आकर्षण असणार आहे. राज्याभिषेक सोहळा झाल्यानंतर आतषबाजी करण्यात येणार असून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आमदार क्षीरसागर यांनी केले आहे. शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंचतर्फे विजयदुर्ग येथे शिराज्याभिषेक दिन साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्य गडकिल्ले संवर्धन समितीचे सदस्य प्रमोद पाटील, नेमबाजी प्रशिक्षक युवराज साळोखे, राजीव परुळेकर आदी उपस्थित राहणार आहेत. मंचतर्फे मंगळवारी गड स्वच्छता, गड जागरण, प्रेरणागीते, पोवाडे सादरीकरणाचा कार्यक्रम झाला. मंगळवारी गडपूजन, ध्वजवंदन, मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके, शिवमूर्तीस दुग्धाभिषेक करण्यात येणार असल्याची माहिती शंभूराजे मंचचे अध्यक्ष सूरज ढोली, महेश बिडये यांनी केले आहे. शिवाजी विद्यापीठ येथे सकाळी ७.३० वाजता आव्हान या शिबिरांतर्गत शिवराज्याभिषेक दिन साजरा होणार आहे. शिबिरात १२०० विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. विद्यापीठ आवारातील शिवपुतळ्यास कुलगुरु देवानंद शिंदे यांच्या उपस्थिततीत अभिवादन करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘घोडावत’चा किशन नवाल राज्यात तृतीय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अभियांत्रिकी विद्या शाखेच्या विविध अभ्यासक्रमांसाठी घेण्यात आलेल्या सामाईक प्रवेश परीक्षेचा (सीईटी) निकाल रविवारी जाहीर झाला. यंदा सीईटी परीक्षेत कोल्हापूर विभागातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले असून यामुळे अकरावी प्रवेशाचा कटऑफ वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान संजय घोडावत आय आय टी व मेडिकल अॅकॅडमीच्या किशन नवाल याने सीईटी परीक्षेत २०० पैकी १९५ गुण मिळवत राज्यात तृतीय क्रमांक पटकावला आहे.

शहरातील विवेकानंद कॉलेज, न्यू कॉलेज, चाटे ग्रुप ऑफ एज्युकेशनच्या विद्यार्थ्यांनी सीईटी परीक्षेत यशस्वी कामगिरी केली आहे. कोल्हापुरात ५० परीक्षा केंद्रांवर १५ हजार ३०० विद्यार्थ्यांनी सीईटी परीक्षा दिली होती. स्वामी विवेकानंद कॉलेज व न्यू कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सीईटी परीक्षेत यश मिळवले. विवेकानंद कॉलेजच्या २१ विद्यार्थ्यांनी सीईटी परीक्षेत यशस्वी भरारी घेतली. संस्थेतर्फे यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.

घोडावतचे इन्स्टिट्यूटचे यश

संजय घोडावत इन्स्टिट्यूट संचलित आयआयटी व मेडिकल अॅकॅडमीच्या पाच विद्यार्थ्यांनी २०० पैकी १८५ गुण मिळवले आहेत. संस्थेचे चेअरमन संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले आणि अॅकॅडमीचे संचालक वासू यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. सीईटी व जेईई परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांना दरवर्षी संस्थेतर्फे आर्थिक बक्षीस देण्यात येते. गेल्यावर्षी यशस्वी विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन लाख रूपये रोख बक्षीस देण्यात आले होते. यंदाही यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात येणार असल्याचे संस्थेतर्फे जाहीर करण्यात आले आहे.

चाटेचे १४७ विद्यार्थी सीईटीमध्ये यशस्वी

चाटे शिक्षणसमूह व कोचिंग क्लासेसच्या १४७ विद्यार्थ्यांनी सीईटी परीक्षेत विशेष प्राविण्यासह यश मिळवले. यामध्ये आदिती खुर्द, सायली कुशीरे, मुस्कान नाईक, रोहन पाटील, राजनंदन देसाई, रोहन उपाध्ये, अंजली पाटील, हर्षदा रामदासी, अर्पिता चोपडे, आकाश लोंढे, राजेश्वरी पाटील, ओंकार भोसले, मंजूषा पाटील, मृणाल खाडे, नेहा भोपळे, वैष्णवी आमटे, श्रद्धा काळे, सुदर्शन पाटील, अभिजित गोनुगडे, सुस्मिता मोरे, दर्शन शहा, साहिल शेख, आकाशकुमार रोडे, प्रथमेश कातवरे, शिवम बाजरे, गौरव कांबळे, अफरीन मोमीन, प्रणव पाटील, स्वदेश डाफळे, यशदीप पाटील, सदफ अत्तार, रणजित पाटील, सूरज जाधव, प्रतीक्षा कोथळे, मरसीम सनदी, रोहित जाधव, ऐश्वर्या पोतदार, अनुज्ञा खराटे, सानिका अभ्यंकर, प्रसाद पळसे, निहार सुभेदार, गौरी ढोले, शार्वी माळी, ओंकार तराळ, समिधा वाळवेकर, वृषभ धांडुरे, कणसे ऐश्वर्या, हिना मुल्ला, वेदिका भाट, गणेश पानसकर, सिमरन मोटलाणी, राहुल भोईटे, निहारिका साळुंखे, अनिकेत ​शिंदे यांचा समावेश आहे. कोल्हापूर विभागाचे संचालक भारत खराटे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images