Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

पंचगंगा शुद्धीकरणासाठी ७७ कोटी

$
0
0
पंचगंगेचे प्रदूषण रोखण्यासाठी ७७ कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्यावतीने हा प्रस्ताव राज्य सरकारला पाठवण्यात येणार आहे. १७४ गावांपैकी पहिल्या टप्प्यात ३९ गावांतील सांडपाणी रोखण्याबाबत आराखडा करण्यात आला आहे.

रद्दीच्या पैशातून ‘सावली’ला मदत

$
0
0
वाढदिवसाला पुष्पगुच्छ व हाराऐवजी रद्दीच्या रूपाने शुभेच्छा द्यावेत, असे आवाहन आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले. आमदार पाटील यांच्या आवाहनाला नागरिक व कार्यकर्त्यांनी चांगला प्रतिसाद दिला.

दक्षिण कोरियात संशोधनासाठी योगिराज जाधवची निवड

$
0
0
शिवाजी विद्यापीठाचा विद्यार्थी योगिराज जाधव याची संगणकशास्त्रात संशोधनासाठी दक्षिण कोरियातील चौन्नम नॅशनल युनिव्हर्सिटीत निवड झाली. गोपाळकृष्ण गोखले कॉलेज व चौन्नम युनिव्हर्सिटीअंतर्गत झालेल्या करारानुसार त्यांना संशोधनासाठी संधी मिळाली.

‘आव्हानांना सामोरे जा’

$
0
0
भविष्यात येणाऱ्या अडचणी व आव्हानांना सामोरे जात आत्मविश्वासाच्या बळावर परिस्थिती बदलण्याचा दृष्टिकोन ठेवत दैनंदिन कामामध्ये क्रियाशीलता वाढविण्याचा प्रयत्न करा, असे आवाहन प्रशिक्षण तज्ज्ञ सुशील गजवाणी यांनी केले.

इंजिनीअर अडकणार झाडात

$
0
0
शहरातील अनेक झाडांची तोड करण्यासाठी परवानगी मागितली जाते. पण विभागीय कार्यालयातील इंजि​नीअर त्यासाठी जबाबदारी झटकून नामानिराळे राहतात. मात्र यापुढे त्या परवानगीच्या अर्जावर संबंधित इंजिनीअरचा अभिप्राय आवश्यक केला असल्याने आता जबाबदारी झटकता येणार नाही.

‘हृदयस्पर्श’च्या वतीने हरगुडे यांचा सत्कार

$
0
0
राजर्षी शाहू मेमोरियल ट्रस्टचे व्यवस्थापक कृष्णाजी हरगुडे यांच्या एकसष्ठीनिमित्त हृदयस्पर्श सृजनशील सामाजिक व्यासपीठाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

स्वयंसिद्धाचे पुरस्कार जाहीर

$
0
0
डॉ. व्ही. टी. पाटील फाऊंडेशनच्या स्वयंसिध्दा महिला संस्थेचा २१ व्या वर्धापनादिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. स्वयंसध्दाच्या वतीने यंदा सांगलीच्या अपर्णा परचुरे, डॉ. विजय करंडे, आष्ट्याच्या सुनंदा घोरपडे, शीतल कोळेकर आणि सिध्दीविनायक महिला दूध संस्था यांना पुरस्कार जाहीर करण्यात आले.

‘शाडूला पर्याय कागदी लगद्यांचा’

$
0
0
वाढत चाललेले पाणी प्रदूषण रोखण्यासाठी शाडूच्या मूर्ती हा उत्तम पर्याय आहे, पण शाडू उपलब्ध होत नसल्याने वापरल्या जाणाऱ्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे प्रदूषणाचा मुद्दा गंभीर बनत आहे.

पावसाची उघडझाप

$
0
0
दमदार सलामी दिलेल्या पावसाची उघडझाप सुरू आहे. मंगळवारी रात्री व बुधवारी दिवसभर पावसाचा जोर कमी होता. तर गुरूवारी दुपारपासून पुन्हा दमदार पाऊस सुरू झाला.

मेरा अक्स है....

$
0
0
आपण आरशात पाहतो त्यावेळी आपल्याला काय दिसतं? उत्तर खूप सोपं आहे, आपलं प्रतिबिंब दिसतं. अगदी लहानपणी कधीतरी, स्वतःच्या पायावर उभंही राहता येत नव्हतं तेव्हा पहिल्यांदा पाहिलेलं आणि हळूहळू आपल्या परिचयाचं होत गेलेलं, आपलं प्रतिबिंब.

भूजल पुनर्भरणासाठी प्रयत्न व्हावेत..

$
0
0
शहरात फिरताना थोडे बारकाईने पाहिले असता एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे निकामी बोअरवेल! उपनगरांत आणि शहराच्या कित्येक भागांत बोअरवेल निकामी झाल्या आहेत. त्यातून पूर्वीइतके किंवा अजिबातच पाणी येत नसल्याची तक्रार नागरिक करत असतात.

कपूर पुतळा ते राजघाट रस्त्यावर खरमाती, कचरा

$
0
0
रंकाळा येथील राज कपूर पुतळ्यापासून ते राजघाटापर्यंतच्या रस्त्याच‌े डांबरीकरण रखडलेले आहे. त्यातच या रस्त्यावर नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर खरमाती टाकण्यास सुरुवात केली आहे.

शिवाजी पेठ परिसरात वाहतूक कोंडी

$
0
0
शिवाजी पेठेतील उभा मारुती चौक आणि अर्धा शिवाजी पुतळा या दोन चौकांत सध्या मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत आहे. चौकात असलेल्या पानटपऱ्या, दुकाने यांच्यासमोर दुचाकी वाहनांच्या बेशिस्त पार्किंगमुळे येथे वाहतुकीची कोंडी होते.

बाबुजमाल दर्गा रस्ता डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत

$
0
0
गंगावेस येथून बाबुजमाल दर्ग्याकडे जाणारा रस्ता अतिशय खराब झाला असून, त्यावर तातडीने डांबरीकरण करावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. तसेच या रस्त्यावर अतिक्रमणेही झाल्याने येथे वाहतुकीला मोठी अडथळा होतो.

असेंब्ली रोडवर दुहेरी-तिहेरी पार्किंगवर हवी बंदी

$
0
0
येथील असेंब्ली रोडवर सध्या सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. या ठिकाणी असलेल्या व्यावसायिक इमारतींचे पार्किंग रस्त्यावरच होत आहे. या ठिकाणी दुचाकांची पार्किंग दुहेरी ते तिहेरी केले जाते आणि त्यानंतर येथे चारचाकी वाहनांचे पार्किंग होते.

फोर्ड कॉर्नरजवळ धोकादायक मॅनहोल

$
0
0
लक्ष्मीपुरी फोर्ड कॉर्नर येथे असलेल्या फेडरल बँकेच्या समोरील मॅनहोलची उंची रस्त्याच्या उंचीपेक्षा किमान दीड फुटाने जास्त असल्याने येथे वाहतुकीला मोठा त्रास होत आहे.

विल्सन पुलावरील सिमेंट पाइपचा वाहतुकीला ठरतोय अडथळा

$
0
0
शहरात आधीच वाहनांच्या प्रचंड संख्येमुळे वाहतूक कोंडी होत असताना विल्सन पुलावर सिमेंटच्या पाइप ठेवण्यात आल्याने वाहतुकीची समस्या आणखी गंभीर बनली आहे. तरी या पाइप तेथून हलवाव्यात, अशी मागणी होत आहे.

जंगल सफारी

$
0
0
पर्यटकांच्या दिमतीला आंब्यात ३३ रिसॉर्टस् आहेत. आंबा घाट ते वाघ झऱ्यापर्यंत उघड्या जीपमधून जंगल सफारीचा आनंद लुटताना देहभान हरपायला होते. निसर्गाची नवलाई आणि सायंकाळी रानगव्यांच्या कळपांचे दर्शन घेण्यासाठी पर्यटक जंगल सफारीला प्राधान्य देत आहेत.

केएमटीचे सुटले स्टेअरिंग

$
0
0
साडे पाच कोटीचे देणे खांद्यावर असताना केएमटीचा रोजचा तोटा वाढत आहे. संचित तोटा वाढत असतानाच सहावा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेऊन परिवहन खाते आणखी दरीत ढकल्याचा प्रयत्न केला.

मेडिकलसाठी ऑनलाइन माहिती प्रक्रिया सुरू

$
0
0
मेडिकलच्या प्रवेशासाठी ऑनलाइन डेटा भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. नेट कॅफेतून www.dmer.org या वेबसाइटवर विद्यार्थ्यांनी डेटा भरला. मेडिकल प्रवेशासाठी यंदा राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (नीट) झाली.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images