Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

​ सेना आमदार पाटीलविरोधात पोलिसात तक्रार

0
0



म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

‘शेतीच्या वादातून पोलिसात दाखल केलेली तक्रार माघार घे, नाहीतर तुला उलट टांगून मारीन,’ अशी धमकी दिल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार नारायण पाटील यांच्याविरोधात एका शेतकऱ्याने केला आहे. आमदार पाटील यांच्यापासून आपल्या जीवाला धोका आहे, असा तक्रार अर्जही शेतकरी रोहिदास राजाराम कांबळे यांनी पोलिस अधीक्षक एस. विरेश प्रभू यांच्याकडे केला आहे. नारायण पाटील करमाळ्याचे आमदार आहेत.

रोहिदास कांबळे यांची करमाळा तालुक्यात मौजे शेटफळ येथे शेतजमीन आहे. या शेतातील पाइपलाइन सचिन नरोटे यांनी फोडली. या विरोधात कांबळे यांनी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. तो गुन्हा माघार घ्यावा म्हणून नरोटे कांबळेंना धमकावत होता. या प्रकरणी शिवसेना आमदार नारायण पाटील यांनीही मोबाइलवरून आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा तक्रार अर्ज शेतकरी कांबळेंनी दाखल केला आहे. आमदारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी कांबळे यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ दहा एकर तुर जाळून टाकली

0
0



म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

तुरीचे भाव पडल्यामुळे काढणी, मळणी आणि आडतीचा खर्चही निघत नसल्यामुळे अक्कलकोट तालुक्यात शेतकऱ्यांने तुरीच्या दहा एकर उभ्या पिकाला आग लावून तूर जाळून टाकली. ही दुर्दैवी बासलेगाव (ता. अक्कलकोट) येथे रविवारी घडली.

अक्कलकोट तालुक्‍यातील प्रयोगशील शेतकरी शशिकांत बिराजदार यांनी काढणी, मळणी, अडतीचा खर्च आणि मिळणाऱ्या उत्पन्नाचा ताळ-मेळ बसत नसल्यामुळे पिकाची काढणी न करता उभे पीक जाळून टाकण्याचा निर्णय घेतला. वर्षभर ज्या शेतीची निगा राखली तीच शेती पेटवण्याची दुर्दैवी वेळ शेतकऱ्यावर आली.

शशिकांत बिराजदार सधन शेतकरी आहेत. अक्कलकोट तालुक्‍यातल्या बासलेगावच्या पंचक्रोशीत ते प्रयोगशील शेतीसाठी प्रसिद्ध आहेत. दर वर्षी साधारण १५० ते २०० क्विंटल तूर उत्पादन ते घेतात. यंदा ही त्यांनी आपल्या शेतात २६ एकर तूर पेरली होती. त्यापैकी १६ एकराची रास करून उत्पादनही घेतले. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात त्यांनी विक्रीला पाठवली. परंतु, अजूनपर्यंत तूर विकली गेली नाही. ३५०० ते ४२००पर्यंत त्यांच्या तुरीला मागणी होती. परंतु सरकारने ५१०० रुपये हमी दराने विकत घ्यायचे धोरण जाहीर केल्यामुळे त्यांनी तुरीची विक्री केली नाही. काढणीपासून विक्रीपर्यंतच्या प्रक्रियेत होणारा खर्च याचा कुठेच ताळमेळ लागणार नाही याचा अंदाज आल्याने दहा एकराच्या तूर शेतीला त्यांनी आग लावली. यंदा केलेली तूर शेती त्यांच्या अंगलट आली आहे.

गेल्यावेळी मिळालेला तुरीचा चांगला भाव पाहून त्यांनी तूर लावली. पण हळूहळू तुरीचे दर कोसळत गेले त्यामुळे बिराजदार यांनी किमान पुढील पिकासाठी शेत तरी मोकळे होईल म्हणून उभे पीक जाळून टाकण्याचा निर्णय घेतला. अक्कलकोट तालुक्‍यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना यंदा चांगलेच नुकसान सहन करावे लागले आहे. हमीभाव देण्याच्या आणि तूर विकत घेण्याच्या सरकारी यंत्रणेवर आता शेतकऱ्यांचा विश्‍वास उडाल्याचेच या घटनेतून समोर आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उजनी काठावर गाळपेरणी सुरू

0
0



म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

उजनी जलाशयातील पाणीसाठा हळूहळू कमी होऊ लागला आहे. जलाशयातील पाण्याने व्यापलेल्या जमिनी आता उघड्या पडल्या असल्याने या जमिनीवर उन्हाळी पिके घेण्याची बळीराजांची लगबग सुरू झाली आहे. करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील कोंढार चिंचोलीसह परिसरात असे चित्र दिसून येत आहे.

उजनी जलाशयामुळे लाखो सजीवांची पाण्याची गरज भागविली जात असतानाच जलाशयातील पाण्याच्या आधारावर हजारो शेतकऱ्यांची उपजीविका अवलंबून आहे. दरम्यान, जलाशयातील पाणी कमी फायद्या शेतकऱ्यांना होते आहे, पाणी घटत असताना उघड्या पडणाऱ्या जमिनीवर शेतकरी उन्हाळी पिकांचे उत्पादन घेतात. यंदाही सद्यस्थितीत उजनी काठावर अशा गाळपेरण्या सुरू आहेत. या पेरण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. या जमिनींची हलकीशी मशागत करताना शेतकरी दिसून येत असून या भागात आता कडवळ, मका, कांदा, भुईमुग, मुग, बाजरी या पिकांची पेरणी होणार आहे.
कसदार जमिनी ठरतायत फायदेशीर

उन्हाळ्यात जलाशयाच्या पाण्याबाहेर पडणाऱ्या या जमिनीत गाळाचे प्रमाण जास्त असल्याने त्या कसदार असतात. या शिवाय जलाशयाकाठच्या या जमिनीत ओलाव्याचे प्रमाण जास्त असल्याने पाण्याची गरज नसते. एकदा पेरणी झाली की खत, पाण्याविना पिके बहारदार येतात. एकूणच अल्प कष्ट व खर्चात चांगले उत्पन्न मिळते. कोंढारचिंचोली, पारेवाडी, उमरड, पोमलवाडी, जिंती, टाकळी, कात्रजसह परिसरातील शेतकऱ्यांना असा अनुभव आहे.

वेगाने पाण्यात घट

यंदा उजनी ११० टक्के भरले होते. मात्र, सद्यस्थितीत पाण्याची घट वेगाने होऊ लागली आहे. मुख्यतः धरणातून खाली सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे जलाशयातील पाणीसाठा पोटाच्या दिशेने खाली सरकत आहे. त्यातच वाढत्या उष्णतेमुळे पाण्याच्या बाष्पीभवनात वाढ होत आहे, अशा स्थितीत जलाशयाने व्यापलेला जमिनीचा भाग उघडा पडण्याचा वेग आता वाढणार आहे. जमिनी उघड्या पडल्या की त्या ठिकाणी गाळपेरणी करण्याची लगबगही वाढणार आहे.
उजनीच्या पाण्याच्या नियोजनाची मागणी

उजनी जलाशयाने शंभरी ओलांडली तरी उन्हाळ्यात जलाशयाची पाणीपातळी वजा होऊन पाण्याची अडचण निर्माण होते. शेती पंपांची वीज कपात केली जाते. परिणामी धरणासाठी त्याग करणाऱ्या शेतकऱ्यांना पिके जगविणे अवघड होते, अशी स्थिती दर वर्षी आढळून येते. यंदा पुन्हा ये रे माझ्या मागल्या प्रमाणेच वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर उजनीच्या पाण्याचे योग्य नियोजन व्हावे, अशी मागणी केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​सातारा झेडपीचेअध्यक्ष संजीवराजे?

0
0



सातारा

जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेची रंगीत तालिम सोमवारी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बंगल्यावर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत पार पडले. दोन तासांच्या राजकीय खलबतानंतर संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीवर जवळपास शिक्कामोर्तब करण्यात आले. उपाध्यक्ष निवडीसाठी पाटण तालुक्यातून माजी आमदार विक्रमसिह पाटणकर यांचे समर्थक राजेंद्र पवार व खटाव तालुक्यातून सुरेंद्र गुदगे यांच्या प्रत्येकी सव्वा वर्षे मुदत देण्याच्या चर्चा रंगल्या. या निवडी जवळपास निश्चित असून मंगळवारी प्रत्यक्ष सभेपूर्वी शरद पवार यांच्याकडून निवड जाहीर करणारा दूरध्वनी केला जाणार असल्याची खात्रीशीर माहिती आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासदार उदयनराजेंवर मारहाण, खंडणीचा गुन्हा

0
0

मटा ऑनलाइन वृत्त । सातारा

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर मारहाण आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उदयनराजे भोसले आणि रामराजे निंबाळकर यांच्यातील संघर्षातून हा गुन्हा दाखल करण्यात आला असून या दोन गटांतील संघर्ष पुन्हा एकदा वाढल्याचे समोर आले आहे.

सातारा जिल्ह्यातील लोणंद शहराजवळ सोना अलाईज कंपनीत उदयनराजे यांच्या नेतृत्वात काम करणारी एक माथाडी कामगार संघटना आहे, तर दुसऱ्या संघटनेचे नेतृत्व रामराजे निंबाळकर हे करतात. कंपनी रामराजेंच्या संघटनेला झुकतं माप देते तसेच त्यांना अधिक काम देते, असा उदयनराजे यांचा आरोप होता. त्यामुळे १८ फेब्रुवारीला त्यांनी कंपनीचे अधिकारी राजकुमार जैन यांना सातारा विश्रामगृहात बोलावून घेतले होते.

सातारा विश्रामगृहात आल्यानंतर उदयनराजे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राजकुमार जैन यांना मारहाण केली आणि त्यांच्याकडे असलेला ऐवज काढून घेतला, अशी तक्रार जैन यांनी सातारा पोलीस स्टेशनला दिल्यानंतर उदयनराजे आणि त्यांच्या साथीदारांवर मारहाण आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उदयनराजे यांचे समर्थक अशोक सावंत, रणजीत माने, सुकुमार रासकर, धनाजी धायगुडे, राजकुमार गायकवाड, अविनाश सोनवले, ज्ञानेश्वर कांबळे आणि योगेश बांदल अशा ९ जणांना अटक करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अफजलखानाच्या कबरीभोवतीच्या१९ अवैध खोल्या पाडण्याचे आदेश

0
0



म. टा. वृत्तसेवा, सातारा

किल्ले प्रतापगड येथील अफझलखानाच्या कबरीभोवती वन खात्याच्या भूमीवर बेकायदा बांधण्यात आलेल्या १९ खोल्यांचे बांधकाम काढून टाकण्याचे आदेश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ३० मार्च रोजी वनखाते आणि सातारा जिल्हा पोलिस प्रशासनाला दिला आहे.

विधानभवनातील सुधीर मुनगंटीवार यांच्या दालनात दुपारी तीन वाजता श्री शिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुनगंटीवार यांची भेट घेतली. चर्चेनंतर त्यांनी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना हा आदेश दिला.

या बैठकीला वन विभागाचे सचिव खारगे, मुख्य वनसंरक्षक पाटील, विभागीय वनअधिकारी अंजनकर, श्री शिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलनाचे निमंत्रक आणि सांगलीचे माजी आमदार आणि मनसेचे नेते नितीन शिंदे यांच्यासह विविध संघटनांचे प्रितिनिधी उपस्थित होते.

अफझलखान कबर परिसरातील वनखात्याच्या भूमीवर केलेले बेकायदा बांधकाम त्वरित हटवण्यात यावे, असा आदेश मुंबई हायकोर्टाने सरकारला दोन वेळा दिला आहे. तरीही सरकारने बांधकामे हटविली नाहीत. या पूर्वीच्या सरकारने या विषयी काहीच कृती केलेली नाही. सरकारने संबधित बांधकामे हटवावीत, अशी मागणी नितीन शिंदे यांनी मुनगंटीवार यांच्याकडे केली. त्यांना अवैध बांधकामांची छायाचित्रेही दाखवली.

मुनगंटीवार म्हणाले, ‘वन खात्याच्या जमिनीवरील बेकायदा १९ खोल्यांचे बांधकाम हटवण्यात येईल; मात्र वनखात्याची जमीन सोडून अन्य ठिकाणी असलेले बांधकाम आम्हाला पाडता येणार नाही.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाबळेश्वर बंदला प्रतिसाद

0
0



म. टा. वृत्तसेवा, सातारा

जंगलात चोरून सुरू असलेल्या गोहत्येच्या निषेधार्थ तालुक्यातील ११० गावांनी पुकारलेल्या तालुका बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महाबळेश्वर येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. पोलिसांच्या असमाधानकारक तपासाच्या निषेधार्थ तहसीलदार कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. तेथेच मोर्चाचे रूपांतर सभेत झाले

गोहत्या व धोंडीबा आखाडे यांच्या खुनाचा तपास सीआयडी मार्फत करण्याची मागणी तहसीलदार रमेश शेंडगे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली

गोहत्या बंदी असतानाही महाबळेश्वर तालुक्याच्या ग्रामीण भागात जंगलात गोहत्या केली जात आहे. तसेच देवळी गावातील वृद्ध शेतकरी धोंडीबा आखाडे यांचा खून झाल्याचा संशय व्यक्त करून या दोन्ही घटनांचा परस्पर संबधित आहेत. मात्र, पोलिस या दोन्ही गुन्ह्यांच्या तपासात दिरंगाई करीत आहेत. २५ दिवसांत पोलिस काहीच प्रगती करू शकले नाहीत, त्यामुळे तालुक्यात तीव्र संतापाची लाट पसरली आहे. पोलिसांच्या अशा कामगिरीच्या निषेधार्थ तालुक्यातील ११० गावातील जनतेने आज तालुका बंदची हाक दिली होती. या बंदला तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शुक्रवारी महाबळेश्वर येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. महाबळेश्वर बंद ठेवून तालुक्यातील लोक मोठ्या संख्येने येथीय छ. शिवाजी महाराज चौकात एकत्र आले. तेथे छ. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला वंदन करून मार्चाला प्रारंभ करण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर, माजी नगराध्यक्ष संतोष आखाडे, गणेश उतेकर आदींनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साताऱ्यात पाऊस

0
0


म. टा. वृत्तसेवा, सातारा

पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात उन्हाने अंगाची लाही लाही होत होती. शुक्रवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. अखेर रात्री सात वाजण्याच्या सुमारास सातारा शहरासह परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस कोसळण्यास सुरुवात झाली.

फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच उन्हाची चाहूल जाणवू लागली होती. त्यात मार्च महिन्यातील शेवटच्या आठवड्यात तर उन्हाने अंगाची लाहीलाही होत होती. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर वगळता सर्वत्र पारा ४० अंशावर गेला होता. मात्र, शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता अचानक ढगाळ वातावरण झाल्याने जिल्ह्यातील शेतकरी वर्गाने गवत, काडी, लाकुड फाटा झाकून ठेवण्याची धांदल उडाली. रात्री सातच्या सुमारास सोसाट्याचा वारा आणि पावसाने सुरुवात केली. रात्री उशिरापर्यंत पाऊस कोसळत होता. शाहुपुरी अंजली कॉलनी येथे जोरदार वाऱ्याने वडाचे झाड कोसळले. वीजवाहक तारा तुटल्याने शाहुपुरी करंजे सदर बझार बोगदा-पोवई नाका तसेच प्रतापगंज पेठ येथे सुमारे पाऊण तास वीज गायब झाली होती. संध्याकाळच्या वळीवाने वातावरणात काहीकाळ गारवा निर्माण झाला मात्र, पुन्हा अंगाची काहिली सातारकरांना सहन करावी लागली.

औंध परिसरात पावसाचा शिडकावा

शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास औंध परिसरात वादळी वारे, मेघगर्जनेसह काही भागात पावसाच्या हलक्या सरी पडल्या.

औंधच्या उत्तरेकडील जायगाव येथे सुमारे वीस मिनिटे पाऊस पडला. भोसरे, चौकीचा आंबा, वरूड, औंध व अन्य भागात पावसाचा काही प्रमाणात शिडकावा झाला. आकाश काळवंडून आल्याने जोरदार पाऊस होईल व हवेत गारवा निर्माण होईल, अशी आशा नागरिक, शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली होती. मात्र, जोरदार वाऱ्यामुळे पावसाने हुलकावणी दिली. रात्री उशीरा हवेत पुन्हा कमालीचा उष्मा निर्माण झाला होता, तसेच ढगाळ वातावरण होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ डॉ. अशोक चौसाळकरांनामहर्षी शिंदे पुरस्कार जाहीर

0
0



म. टा. वृत्तसेवा, सातारा

रा. ना. चव्हाण प्रतिष्ठान, वाई यांच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा २१वा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार प्रा. डॉ. अशोक चौसाळकर यांना जाहीर झाला आहे. १९८० नंतरच्या काळात मराठी भाषेतील वैचारिक साहित्याच्या क्षेत्रात महत्त्वाची भूमिका डॉ. चौसाळकर यांनी बजावली आहे. प्रतिष्ठानचे ज्येष्ठ विश्वस्त आणि सामाजिक कार्यकर्ते, दलितमित्र संभाजीराव पाटणे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

या पुरस्काराचे वितरण रा. ना. चव्हाण यांच्या २४व्या स्मृतिदिनी, दहा एप्रिल रोजी ब्राह्म समाज रविवार पेठ, वाई येथे सकाळी साडेनऊ वाजता ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व विचारवंत बाबा आढाव यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक प्रा. डॉ. द. ता. भोसले यांच्या हस्ते होणार आहे.

दलितमित्र रा. ना. चव्हाण यांनी ज्यांच्या प्रेरणेने आपले प्रबोधनपर साहित्य समृद्ध व समर्थ केले त्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात, संशोधन क्षेत्रात व साहित्यिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या व्यक्तीस दर वर्षी सन्मानपूर्वक दिला जातो. स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

समाजप्रबोधन पत्रिकेचे संपादक असलेले प्रा. डॉ. अशोक चौसाळकर राज्यशास्त्राचे नामवंत प्राध्यापक आणि राजकीय विश्लेषक म्हणून ओळखले जातात. शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख आणि प्राध्यापक म्हणून ते सेवानिवृत्त झाले आहेत. एक निष्णात राजकीय, सामाजिक विश्लेषक म्हणून ते सतत सक्रिय राहिले असून, त्यांनी संशोधनाच्या व वैचारिक लेखनाच्या क्षेत्रात वेगळा ठसा उमटविला आहे. मराठी व इंग्रजी या दोन्ही माध्यमातून विपुल, अशी ग्रंथसंपदा त्यांनी निर्माण केली आहे. १९व्या शतकातील सामाजिक आणि धर्मविचार हा त्यांच्या चिंतनाचा विषय आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाबळेश्वर@ अशांवर

0
0



म. टा. वृत्तसेवा, सातारा

यंदाच्या उन्हाळ्यात महाबळेश्वर मुंबईपेक्षा जास्त उष्ण आहे. गेल्या चार ते पाच दिवसांत महाबळेश्वरमधील तापमान आयएमडीने मुंबईत नोंदवलेल्या तापमानापेक्षा जास्त आहे. मुंबईतील कुलाबा आणि सांताक्रुझ वेधशाळेने तापमानाची नोंद केली आहे. मुंबईच्या किनारी भागापेक्षा महाबळेश्वरमधील पारा हा सामान्यतः कमी असतो.

महाबळेश्वरमध्ये बुधवारी, बारा एप्रिल रोजी ३५.२ अंश सेल्सिअस तापमान होते, तर मुंबईत ३४.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. गुरुवारी, महाबळेश्वरमध्ये तेरा एप्रिल रोजी ३५.९ अंश सेल्सिअस तापमान होते, तर मुंबईचा पारा ३४.८ अंश सेल्सिअसवर होता. गुजरातमधील सौराष्ट्रमध्ये प्रत्यावर्त (अँटीसायक्लोन) मध्ये असलेल्या ईशान्येकडील उष्ण आणि कोरड्या वाऱ्यांमुळे महाबळेश्वरमधील तापमान वाढल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. पूर्वेकडील वारे ईशान्ये वाऱ्यात मिसळले आहेत. येत्या आठवड्यात हे वारे पुढे सरकल्यानंतर पुन्हा तापमान खालावेल, अशी माहिती आयएमडीने दिली आहे.

सौराष्ट्र आणि कच्छमधून येणाऱ्या वाऱ्यामुळे मुंबईत तापमान ३५ अंशाच्या आसपास आहे. येत्या काही दिवसांत पारा दोन अंशांनी वाढण्याची चिन्हे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्नाटकाला पाणी देण्यास आमदारांचा विरोध

0
0



म. टा. वृत्तसेवा, कराड

कोयना धरणातून कर्नाटकला पाणी सोडण्यास कृष्णा व कोयना नदी काठांच्या गावांमध्ये पाण्याची भीषण टंचाई उद्भवणार आहे. त्यासाठी कोयना धरणातून पाणी सोडण्यात येऊ नये, अशी आक्रमक भूमिका घेत सातारा जिल्ह्यातील आमदारांनी पाणी सोडण्यास तीव्र विरोध दर्शविला आहे.

या बाबत सातारा येथे जिल्ह्याचे पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत आमदारांनी आपली पाणी सोडण्याविरोधी भूमिका मांडली.

दरम्यान, आमदारांचा वाढता विरोध लक्षात घेत विजय शिवतारे यांनी कोयना धरणातून पाणी सोडल्यास महाबळेश्वर, पाटण, व जावली तालुक्यातील किती गावांमध्ये टंचाईचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, याचा अभ्यास करून २४ एप्रिलच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अहवाल सादर करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

सातारा येथे जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पाणीटंचाई आढाव बैठकीत जिल्ह्यातील आमदार शशिकांत शिंदे, मकरंद पाटील, शिवेंद्रराजे भोसले, बाळासाहेब पाटील, जयकुमार गोरे, दीपक चव्हाण, आनंदराव पाटील, मोहनराव कदम यांच्यासह जि.प. अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनी कर्नाटकाला कोयना धरणातून देण्यात येत असलेल्या २.६५ टीएमसी पाणी देण्याच्या सरकारच्या भूमिकेला विरोध केला आहे.

जॅकवेल उघडे पडणार?

मकरंद पाटील यांनी धरणालगत असलेल्या गावांच्या पाणी पुरवठा योजनांचे जॅकवेल उघडे पडणार आहेत. त्यामुळे तेथील गावांचा पाणी टंचाईचा प्रश्न उद्भवणार आहे. त्यासाठी धरणातून कर्नाटकाला पाणी सोडण्यात येवू नये, अशी मागणी केली. पाटील यांच्या भूमिकेला शिवेंद्रराजे भोसले, बाळासाहेब पाटील व शंभूराज देसाई यांच्यासह सर्वच आमदारांनी पाठींबा दिला.
सिंचन, वीजनिर्मितीसाठी पुरेसा पाणीसाठा

कोयनेचे अभियंता ज्ञानेश्वर बागडेंची माहिती

म. टा. वृत्तसेवा, कराड

‘कोयना धरणात यंदा पुरेसा पाणीसाठा असून, कर्नाटकला दोन टीएमसी पाणी देऊनही जूनपर्यंत सिंचनासह वीजनिर्मितीला पाणी पुरून शिल्लक राहील इतका पाणीसाठा धरणात उपलब्ध आहे,’ अशी माहिती कोयना धरण व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता ज्ञानेश्वर बागडे यांनी ‘मटा’शी बोलताना दिली.

कर्नाटकसाठी अडीच टीएमसी पाणी सोडण्याबाबत राज्य सरकारचा आदेश आल्यानंतर बुधवारी रात्रीपासून कोयना धरणाच्या रिव्हर स्लुईस गेटमधून ९०७ क्युसेक पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे.

बागडे म्हणाले, ‘राज्यात भीषण पाणीटंचाई असताना कर्नाटकाला पाणी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीका होत आहे. मात्र, गेल्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे १०५ टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेले कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. आज रोजी धरणात ३९ टीएमसी पाणी उपलब्ध आहे. वीज निर्मितीला लागणारे पाणी तसेच सिंचन व पिण्याच्या पाण्याची गरज भागून यंदा पावसाळ्यापर्यंत काही पाणी धरणात शिल्लक राहणार आहे. गतवर्षीपेक्षा यंदा याच दिवशी १३ एप्रिल रोजी धरणात ४ टीएमसी जादा पाणी आहे. धरणातील एकूण पाण्यापैकी वर्षभरात सरासरी ६ टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन होत असते. या सर्व बाबींचा विचार करूनच हा निणय घेतला आहे, त्यामुळे येथील जनतेने या बाबत साशंकता बाळगू नये.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेट्रोलवर सरकारचा ‘दारू अधिभार’

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्य सरकारने शुक्रवारपासून राज्यात पेट्रोलवरील व्हॅट तीन रुपयांनी वाढविला आहे. त्यामुळे पेट्रोल तीन रुपयांनी महागले आहे. कोर्टाच्या आदेशानंतर महामार्गावरील दारू दुकाने आणि बार बंद झाल्याने होणारी महसुलातील घट भरून काढण्यासाठी सरकारने हे पाऊस उचलल्याचा आरोप होत असून त्याबद्दल नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

राज्यात पेट्रोलवर सहा रुपये व्हॅट होता. शुक्रवारी सरकारने अधिसूचना काढून तो नऊ रुपये केला आहे. त्यामुळे अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात पेट्रोल महाग झाले. पेट्रोल स्वस्त करण्यासाठी यापूर्वी कर कमी करण्याचे धोरण सरकारकडून घेतले जात होते. मात्र, आता अचानक सरकारने त्यामध्ये तब्बल तीन रुपयांची वाढ केली. या निर्णयाबद्दल शंका घेतल्या जाऊ लागल्या असून नाराजीही व्यक्त होत आहे. कोर्टाने महामार्गालगतच्या दारू विक्री आणि बारवर निर्बंध लादले. त्यामुळे सरकारला मोठा महसूल मिळवून देणारी मद्य विक्री घटली. एक एप्रिलपासून कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे साडेआठशे दुकाने बंद झाल्याने सरकारच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला. अनेक उपाय करूनही सरकारला ही दुकाने सुरू करण्याचा कायदेशीर मार्ग अद्याप सापडलेला नाही. त्यामुळेच सरकारने पेट्रोलवरील अधीभार वाढवून दारू बंदमुळे बुडणारा महसूल सामान्यांच्या खिशातून काढण्याचा प्रयत्न केला आहे, अशा भावना ग्राहकांमधून व्यक्त होत आहेत.

०००

हायवेजवळील दारूची दुकाने बंद झाली. सरकारचे उत्पन्न कमी झाले. ती भरून काढण्यासाठी सरकारने केलेली पेट्रोलची दरवाढ चुकीची आहे. सामान्य पेट्रोल ग्राहकांवर बोजा पडणार आहे. सलग दोनवेळा दरवाढ झाली. यावेळची दरवाढ मोठी आहे. ती सामान्यांना सहन करण्यापलिकडे आहे. पेट्रोल विक्रीवरही दरवाढीचा परिणाम होऊ शकतो.

रवींद्र माणगावे, अध्यक्ष, जिल्हा पेट्रोल-डिझेल डिलर असोसिएशन

अच्छे दिनचे स्वप्न दाखवत भाजप सरकार सत्तेवर आले. मात्र महागाईत सातत्याने भर पडत आहे. पेट्रोलचे भाव वाढविल्याने सामान्यांच्या खिशाला आर्थिक झळ बसणार आहे. महागाई प्रचंड वाढल्याने हेच का अच्छे दिन असा प्रश्न उपस्थित होत आहे. सरकारने पेट्रोलचे दर नियंत्रणात ठेऊन सर्वसामान्यांना आधार देण्याची गरज आहे.

रवींद्र गवळी, नोकरदार

पेट्रोलचे भाव वाढल्यास पुन्हा अप्रत्यक्षपणे महागाई वाढण्यास हात‌भार लागेल. सरकारने ही दरवाढ मागे घ्यावी. दिवसेंदिवस पेट्रोलचे भाव वाढत आहेत. गॅसचीही दर वाढही झाली आहे. यामुळे सामान्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

सुधीर कानडे, शेतकरी

पेट्रोल डिझेल जीवनावश्यक वस्तू झाल्या असून यांचे दर नियंत्रणात राहतील या दृष्टीने सरकारने काही दीर्घकालीन उपाययोजना करण्याची गरज आहे. परंतु सरकार याकडे दुर्लक्ष करून ग्राहकांकडून विविध करांच्या माध्यमातून पैसा वसूल करण्याच्या मागे लागले आहे. तसे झाल्याने सर्वसामान्य जनचेतच्या समोरील अधिक अडचणी वाढत आहेत.

रमेश पाटील, व्यावसायिक

दारूविक्री मधून मिळणारे सरकारचे उत्पन्न हे कमी झाले असल्यामुळे पेट्रोलची दरवाढ करण्यात आली असावी. कारण पेट्रोलद्वारे रोजच्या रोज पैसे वसूल होऊ शकतात. पैसा वसूल करण्यासाठी सरकारचे हे हक्काचे साधन असून त्यामुळेच त्याच दर वाढवले असावेत. अशी दरवाढ अन्यायी आहे.

सचिन चव्हाण, नागरिक



कोल्हापूरमधील इंधनाचे नवीन दर

पेट्रोल ७३.६२ ७६.६४ रुपये

डिझेल ६१.६२ रुपये (जैसे थे)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अविनाश सुभेदार नवे जिल्हाधिकारी

0
0

म. टा. प्रतिनिधी , कोल्हापूर

कोल्हापूरचे नवे जिल्हाधिकारी म्हणून अविनाश सुभेदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दोन वर्षापूर्वी आलेल्या अमित सैनी यांची बदली झाली आहे. सुभेदार यांनी यापूर्वी कोल्हापूर जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केल्याने त्यांना जिल्ह्याची चांगली माहिती आहे. ते सध्या मुंबईत ​रेशनिंग नियंत्रक होते. रेशनिंगच्या राज्याच्या दक्षता पथकाचेही ते अध्यक्ष होते. ते मूळचे सातारा जिल्ह्यातील आहेत.

कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करताना सुभेदार यांनी जिल्हा परिषदेला राज्य व केंद्र सरकारचे अनेक पुरस्कार मिळाले होते. त्यामध्ये त्यांचे मोलाचे योगदान होते. त्यांनी राबवलेली कायापालट योजना राज्यासह केंद्र सरकारनेही स्वीकारली. पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी भरीव कामगिरी करताना त्यांनी अनेक चांगले उपक्रम राबवले. दहा महिन्यांपूर्वी त्यांची मुंबईला बदली झाली. त्याचवेळी त्यांचे नाव कोल्हापूरचे जिल्हाधिकारी म्हणून चर्चेत होते. शनिवारी त्यांची जिल्हाधिकारीपदी नियुक्तीचे आदेश काढण्यात आले.

विद्यमान जिल्हाधिकारी सैनी यांच्या बदलीचे ठिकाण अजून निश्चीत नाही. दोन वर्षात सैनी यांनी कोल्हापुरात भरीव कामगिरी केली. प्रशासनाला शिस्त लावण्याबरोबरच वृक्ष लागवड योजना, पर्यटन विकास, जलयुक्त शिवार अभियान आदींसाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांचाच दोनवेळा दरोडा

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वारणानगरातील शिक्षक कॉलनीत फ्लॅटमध्ये सांगली पोलिसांनी दोनवेळा दरोडा टाकूनन सव्वानऊ कोटींवर डल्ला मारल्याचे तपासात उघड झाले आहे. फ्लॅटमध्ये पैसे एवढे होते की, नोटांची बंडले नेण्यासाठी पिशव्या कमी पडल्यानंतर पोलिसांनी पोत्यातून पैसे नेले अशी माहिती पुढे आली आहे. दरम्यान, कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने आणखी दोघा संशयितांना ताब्यात घेतले. एका संशयितांचे नाव ‘गुंडा’ असल्याचे कळते तर दुसरी व्यक्ती टीप्सर आहे.

मार्च २०१६ मध्ये मैनुद्दीन मुल्लाने केलेल्या तीन कोटी ११ लाख रुपयांच्या चोरीचा छडा लावल्याचा दावा सांगली स्था​निक गुन्हे अन्वेषण विभागाने केला. याबाबत बांधकाम व्यावसायिक झुंझार सरनोबत यांनी फिर्याद दिली. दरम्यान, फ्लॅटमधून जादा रक्कम चोरीस गेल्याची तक्रार सरनोबत यांनी केल्यावर अतिरिक्त पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी तपास केला. त्यात सव्वानऊ कोटींच्या चोरीचे प्रकरण उघड झाले. सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे तत्कालीन निरीक्षक विश्वनाथ घनवट, सहायक निरीक्षक सूरज चंदनशिवे, सहायक फौजदार शरद कुरळपकर, हवालदार दीपक पाटील, शंकर पाटील, पोलिस नाईक रवींद्र पाटील, कुलदीप कांबळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल असून सातही जण फरारी आणि निलंबित आहेत.

दरम्यान कोडोली पोलिस ठाण्यात दाखल चोरीच्या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग करीत आहे. पोलिसांनी मैनुद्दीनचा साथीदार संदीप बाबासाहेब तोरस्कर (वय २६, रा. बापट कॅम्प) याला शुक्रवारी अटक केली. वारणानगरातील ‘गुंडा’ याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. शिक्षक कॉलनीतील त्या फ्लॅटमधील रक्कमेची टीप देणाऱ्या आणखी एकास ताब्यात घेतले आहे.

चौकशीत संशयितांनी त्या फ्लॅटमध्ये एकूण चारवेळा चोरी झाल्याचे सांगितले. मैनुद्दीन याने दोनवेळा चोरी केली. प्रत्येक वेळी त्याने वेगवेगळ्या साथीदारांना नेले. चोरी उघड झाल्यावर सांगली पोलिस मैनुद्दीनला घेऊन पुन्हा शिक्षक कॉलनीतील फ्लॅटवर तपासासाठी गेले. मैनुद्दीनला खोलीत न नेता फक्त पोलिसच फ्लॅटमध्ये गेले. तेथील रक्कम पाहून चक्रावले. त्यांनी कपाटातील नोटांची थप्पी पोत्यात भरून नेली. त्यानंतर दुसऱ्यावेळी पुन्हा सांगलीतील ते पोलिस फ्लॅटवर आले. मात्र त्यांनी मोहिद्दीनला सोबत घेतले नव्हते. फ्लॅटमधील कोट्यवधींची रक्कम पोत्यात घालून नेली. दरम्यान या गुन्ह्याचा गवगवा झाल्यानंतर शाहूवाडी पोलिस ठाण्याचे उपाधिक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली तपासात लॉकरमध्ये सव्वा कोटी रुपये मिळाले होते. त्यामुळे खोलीतील कपाटात रक्कम किती होती, याचा तपास सुरू आहे.

कोल्हापूर पोलिस बचावले

वारणानगर प्रकरणाच्या तपासात कोल्हापूर पोलिसांनी सुरूवातीपासून सावधगिरी बाळगली. फ्लॅटमध्ये तपासावेळी व्हिडीओ चित्रिकरण केले. तपासात धक्कादायक बाबी समोर आल्यावर स्थानिक पोलिस अमिषाला बळी पडू नयेत, गुन्ह्यात अडकू नयेत यासाठी अधिकाऱ्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना सक्त सूचना दिल्या होत्या. सांगली पोलिसाचा गोलमोल उघड झाल्यावर कोल्हापुरातील एका अधिकाऱ्याने ‘तलवार कधीतरी तुटून अंगावर पडणार आहे. काळजी घ्या’ असा सल्ला दिला. त्यामुळे कोल्हापूर पोलिस बचावले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंध करणार जंगल सफर

0
0

Gurubal.Mali@timesgroup.com
Tweet : @gurubalmaliMT
कोल्हापूर

घनदाट वृक्ष, पक्ष्यांचा थवा, विविध प्रकारचे प्राणी, आल्हाददायी वातावरण, मनाला भावणारा निसर्ग हे सारे ‘डोळस’पणे अनुभवण्याची संधी काही अंध बांधवांना मिळणार आहे. दाजीपूर अभयारण्यात रविवारी (२३ एप्रिल) राबविला जाणारा भारतातील हा पहिलाच उपक्रम आहे. ब्रेल, श्रवण, स्पर्श आणि गंध याद्वारे अंध व्यतींना जंगल सफरीचा हा आनंद मिळणार आहे. या प्रायोगिक प्रयोगानंतर देशातील तीस हजारांहून अधिक अंध व्यक्तींना विविध अभयारण्यांत अशा प्रकारची जंगल सफर अनुभवण्याची संधी मिळणार आहे.

अभयारण्यात फिरायला जाण्याची हौस अनेकांना असते. त्यानुसार सहलीही निघतात. अभयारण्यात फिरण्याचा अनुभव काही औरच असतो. केवळ निसर्गाचा आनंदच नाही तर पक्षी, प्राणी पाहण्याचा आनंदही मिळू शकतो. डोळस व्यक्तींना मिळणारा हा अनुभव अंधांनाही मिळावा यासाठी कोल्हापूर वन्यजीव विभाग व प्रेरणा असोसिशन फॉर दि ब्लाइंड या संस्थेने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी ‘वाइल्ड लाइफ एक्स्पिरिअन्स फॉर दि ब्लाइंड’ नावाने हा प्रकल्प तयार करण्यात आला आहे. सर्वसामान्य लोकांप्रमाणे अंधांनाही जंगल सफारीचा आनंद मिळावा यासाठी कोल्हापूर वन्य विभागाच्यावतीने हा प्रकल्प तयार करण्यात आला आहे. त्यासाठी मुख्य वन संरक्षक डॉ. व्ही. केमेंट बेन आणि अंध शिक्षण संशोधक सतीश नवले यांनी विशेष पुढाकार घेतला. त्यांचा हा प्रकल्प तयार असून रविवारी दाजीपूर अभयारण्यात या प्रकल्पानुसार अंध बांधव जंगल सफरीचा आनंद लुटणार आहेत.

या उपक्रमात चार माध्यमांतून अंधांना जंगलचा डोळस आनंद अनुभवण्यास मिळणार आहे. ब्र्रेल लिपीद्वारे झाडांची, प्राण्यांची व पक्ष्यांची माहिती मिळेल. ब्रेनवाणीच्या माध्यमातून श्रवणाद्वारे तेथील माहिती अनुभवता येईल. जंगल सफारी​विषयी मुलाखती, संवाद, अनुभव कथन, संगीत, प्राण्यांचे आवाज, गाणी या माध्यमातून त्यांना श्रवणाद्वारे आनंद लुटता येणार आहे. तिसऱ्या व चौथ्या टप्प्यात गंध आ​णि स्पर्शाच्या माध्यमातून विविध प्रकारची झाडे, फुले, बी-बियाणे, पाने याची अनुभूती घेता येईल. २१ किलोमीटरचा ही सफर असून, ती चार टप्प्यांत होणार आहे. ठक्काची वाडा ते सावराई सडा यादरम्यान चार ते पाच तास हा उपक्रम होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कोल्हापूरचा प्रादेशिक विकास आराखडा पुण्यात लटकला

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्याचा प्रादेशिक विकास आराखडा ३१ मार्चपर्यंत राज्य सरकारच्या नगरविकास विभागाला सादर होणे अत्यावश्यक असताना अधिकाऱ्यांच्या गलथानपणामुळे तो अर्ध्यावरच लटकला आहे. अधिकाऱ्यांनी कागदोपत्री घोडे नाचवत अहवालाची एका पानाची प्रत नगरविकासला सादर करून प्रक्रिया पूर्ण करण्याची खेळी केली. मात्र अहवालातील त्रुटी मुदतीत दूर न करता आल्याने पुण्यामध्ये सध्या त्याविषयी काम सुरू आहे. प्रशासकीय पातळीवरील ‘चोरी चोरी छुपके छुपके’ काम करण्याच्या वृत्तीचा काहींनी लाभ उठविण्यास सुरुवात केली आहे. स्वतःच्या सोयीनुसार आराखड्यात फेरफार सुचविले जात असल्याचे समजते. हा प्रकार जिल्ह्याच्या विकासासाठी मारक ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, प्रादेशिक विकास आराखडा चुकीच्या पद्धतीने तयार केल्याचा आक्षेप घेत काहीजणांनी कोर्टात धाव घेतली आहे.

त्रुटींमुळे वादग्रस्त ठरलेल्या कोल्हापूर प्रादेशिक विकास आराखड्याचा घोळ अद्याप संपलेला नाही. सदोष आराखडा सरकारला सादर करू नये, मंजूर होऊ नये यासाठी विविध संघटना, नागरिक, लोकप्रतिनिधींसह असोसिएशन ऑफ आर्किटेक्टस अँड इंजिनीअर्स संस्थेने विरोध केला. लोकप्रतिनिधी आणि संघटनात्मक पातळीवर विरोध होऊनही ३१ मार्चची डेललाइन ओलांडली तर आराखडा रद्द होईल या भीतीने काही अधिकाऱ्यांनी गडबड केली. परिणामी प्रादेशिक विकास आराखडा लटकला आहे. आराखडा ३१ मार्चपर्यंत सरकारकडे सादर केला नाही तर तो रद्द होण्याची टांगती तलवार होती. परिणामी २८ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रादेशिक नियोजन मंडळाच्या बैठकीत उपसमितीने केलेल्या शिफारशींनुसार आराखड्याला अंतिम स्वरुप​ दिले गेले.

आराखड्यात प्रचंड त्रुटी असतानाही प्रशासनाने ३१ मार्चपर्यंत आराखडा सरकारला सादर करून अहवाल दिला. प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आराखड्याची एका पानाची प्रत नगरविकासला पाठविल्याची धक्कादायक माहिती आहे. वास्तविक आराखडा नगरविकास विभागाला सादर झाल्यानंतर तो पुण्यातील नगररचना संचालक कार्यालयाकडे अभिप्रायासाठी पाठविला जातो. मात्र, प्रचंड त्रुटीत दुरुस्ती न झाल्याने पूर्ण आराखडा नगरविकास खात्याकडे सादरच झालेला नाही. २९ ते ३१ मार्च या कालावधीत आराखड्यातील त्रुटींच्या निराकरणाचे काम होऊ शकले नाही. त्रुटी दूर न झाल्यामुळे आजही पुण्यामध्ये त्याच्या दुरूस्तीचे काम सुरू आहे. प्रशासकीय नियंत्रणाखाली हे काम सुरु असले तरी, त्यामध्ये काहीजणांकडून सोयीनुसार फेरफार करण्याचे प्रकार सुरू आहेत. वस्तूतः त्रुटी दूर करण्याचे काम कोल्हापुरातच होणे अत्यावश्यक होते. या क्षेत्रातील काही तज्ज्ञांनी प्रादेशिक योजना कार्यालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र जबाबदार अधिकारी भेटत नाहीत. पुण्यामध्ये आराखडा दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे सांगितले जाते हे धक्कादायक आहे.

प्रादेशिक विकास आराखड्यासंदर्भात सुमारे ५५०० हजार तक्रारी झाल्या होत्या. नागरिक, संघटना व लोकप्रतिनिधींनी मोठ्या प्रमाणात आक्षेप नोंदवले. त्यावर सुनावणी झाली. त्रुटी दूर करून अहवाल नगरविकास खात्याककडे सादर केल्याचे अधिकारी सांगतात. मात्र, नागरिकांनी घेतलेल्या हरकतींवर प्रादेशिक कार्यालयाकडून ज्या शिफारसी केल्या गेल्या त्याचे काय झाले याची माहिती दिली जात नाही. अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ सुरू आहे. आराखडा जिल्ह्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. त्याविषयी पारदर्शकता असलीच पाहिजे.

सुधीर राऊत, अध्यक्ष, असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट अँड इंजिनीअर्स

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देशमुख बंधूंसह सहा पोलिस निरीक्षकांच्या बदल्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्यातील २६७ पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश विशेष पोलिस महानिरीक्षक राजकुमार व्हटकर (आस्थापना) यांनी दिले आहेत. यात कोल्हापुरातील सहा निरीक्षकांचा समावेश असून, जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे वादग्रस्त पोलिस निरीक्षक अनिल देशमुख आणि कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येच्या तपासातील राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अमृत देशमुख यांचाही समावेश आहे. लवकरच हे अधिकारी बदलीच्या ठिकाणी हजर राहणार आहेत.

रिक्त जागांवर गडचिरोलीचे पोलिस निरीक्षक संजय शिवाजीराव मोरे, पुणे शहरातील सुनील दत्तात्रय पाटील आणि गुन्हे अन्वेषण राजीव अनंत चव्हाण यांची कोल्हापूरला बदली करण्यात आली आहे. बदली झालेल्या सर्व अधिकाऱ्यांना तातडीने बदलीच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पोलिस ठाण्यांमध्ये दोन वर्षांचा कार्यकाल पूर्ण केलेल्या २६७ अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे, त्याचबरोबर २११ विनंती बदल्याही केल्या आहेत. या बदल्यांचे आदेश आयजी व्हटकर यांनी गुरुवारी (ता. २०) रात्री उशिरा जारी केले. कोल्हापुरातील राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अमृत देशमुख व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पद्मा कदम यांची तुरची (जि. सांगली) येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात बदली झाली, तर जुना राजवाडा ठाण्याचे अनिल देशमुख यांची बदली राज्य गुप्त वार्ता विभागाकडे झाली आहे. शिरोळ पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाळकृष्ण कदम आणि पोलिस मुख्यालयातील नितीन गोकावे यांची बदली मुंबई शहर येथे, तर जातपडताळणी कार्यालयातील निर्मला माने-लोकरे यांची बदली सांगली येथे करण्यात आली आहे.

पानसरे हत्या तपासातील देशमुख प्रमुख अधिकारी

कॉम्रेड गोविंद पानसरे यांची हत्या झाल्यानतंर घटनास्थळावर पोहोचून तपास सुरू करणारे अमृत देशमुख हे पहिले अधिकारी होते. देशमुख यांनीच पानसरे हत्येचा पंचनामा करून तपासातही महत्त्वाचे योगदान दिले आहे. याशिवाय एसटी गँगवर मोक्काअंतर्गत कारवाई करून टोळीला हद्दपार करण्याचेही काम अमृत देशमुख यांनी केले. अवैध धंदे बंद करूनपरिसरातील गुन्हेगारांवर त्यांनी वचक निर्माण केला होता. वर्षापूर्वीच त्यांच्या बदलीचे आदेश आले होते, मात्र स्थानिक नागरिकांनी विरोध केल्याने ती बदली रद्द केली होती.

राजवाड्याचे देशमुख वादग्रस्त

जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल देशमुख आणि राजारामपुरीचे अमृत देशमुख हे सख्खे भाऊ, मात्र या दोघांच्या कार्यशैलीत जमीन-आसमानाचा फरक असल्याची चर्चा शहरात होती. मटका, जुगार असे अवैध धंदे सुरू असल्याने आयजी विश्वास नांगरे-पाटील यांनीदेखील अनिल देशमुखांना झापले होते. अखेर अनिल देशमुख यांची राज्य गुप्ता वार्ता विभागाकडे बदली करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केएसबीपी लावणार वाहतुक‌ीला शिस्त

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर रस्ते सौंदर्यीकरण प्रकल्प (केएसबीपी) या संस्थेने कोल्हापुरातील रस्त्यांची सुधारणा करण्याचे काम हाती घेऊन दहा महिन्यांचा कालावधी झाला. या प्रकल्पांतर्गत शहरातील विविध रस्ते आणि चौक सुशोभित झाले आहेत. जिल्ह्यातील पर्यटनवाढीसाठी पोषक वातावरण निर्माण करण्याच्या हेतून सुरू असलेले हे काम दिवसेंदिवस अधिक व्यापक बनत आहे. मात्र, दिवसेंदिवस होणारी वाहतुकीची कोंडी आणि त्यातून होणारे छोटेमोठे अपघात दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे केएसबीपीने यापुढील पाऊल म्हणून शहरातील वाहतुकीलाही शिस्त लावण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. या कामातील सातत्यासाठी केएसबीपीला प्रामाणिक मनुष्यबळाची गरज आहे.

आगामी काळात पर्यटन हा रोजगारनिर्मिती आणि अर्थप्राप्तीचा सर्वात महत्त्वाचा मार्ग ठरणार आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कोल्हापूरला समृद्ध निसर्ग आहे. ऐतिहासिक वारसा संगणारी स्थळे आहेत. ऐतिहासिक भव्य इमारतींसह तीर्थस्थळेही आहेत. समुद्र सोडल्यास गड-किल्ले, जंगल, पठार, धबधबे अशी पर्यटकांना आकर्षित करणारी सर्व साधने कोल्हापूर जिल्ह्यात आहेत. याच्या माध्यमातून येणाऱ्या दहा वर्षात कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पर्यटन वाढणार आहे. संपूर्ण राज्यात पर्यटनाची उलाढाल ३० हजार कोटी रुपयांपर्यंत होण्याचा अंदाज आहे, त्यामुळे भविष्याचा वेध घेऊन केएसबीपी संस्थेने काम सुरू केले आहे. गेल्या पाच-सात वर्षांत कोल्हापुरातील विविध आंदोलने, प्रकल्पांना झालेला विरोध यामुळे कोल्हापुरात येणाऱ्या नागरिकांच्या मनात कोल्हापूरबाबत चुकीची प्रतिमा निर्माण होत आहे. नकारात्मक प्रतिमा काढून टाकणे आणि कोल्हापूरकरांच्या मनात सकारात्मक उर्जा तयार करण्याचे आव्हान केएसबीपीने स्वीकारले आहे.

केएसबीपीने शहरातील रस्ते आणि आयलँडच्या सुशोभीकरणापासून या कामाला सुरुवात केली. गेल्या दहा महिन्यांत शहरातील महत्त्वाच्या मार्गांवरील दुभाजक आणि चौकांमधील आयलँड हिरवळीने बहरले आहेत. विद्यापीठ चौकातील प्रशस्त आयलँडमध्ये नेचर पार्क साकारले आहे, तर पोलिस मुख्यालयासमोर पोलिस आणि कॉमन मॅनचे शिल्प नागरिकांना साद घालत आहे. दुभाजकांसह फुटपाथला लागून असलेली हिरवळ केएसबीपीने मोठ्या कष्टाने जपली आणि वाढवली. पोलिस उद्यानात राज्यातील सर्वाधिक उंचीचा ध्वजस्तंभही उभा राहिला आहे.

सध्या शहरातील रस्ते चांगले झाले असले तरी, मोठ्या प्रमाणात वाहनांची संख्या वाढल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. अनेक ठिकाणी सिग्नल असूनही त्याचा वाहतुकीवर फारसा परिणाम होत नाही. शहरातील वाहतूक बेशिस्तीमुळे बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना त्रास सहन करावा लागतो. वाहनधारक वाहतुकीचे नियम पाळत नाहीत, त्यामुळे कोंडीत भरच पडते. यावर उपाय म्हणून केएसबीपीने शहर वाहतूक शाखेच्या मदतीला प्रशिक्षित स्वयंसेवकांची फौज उभी केली आहे. ज्या तरुणांना प्रामाणिकपणे वेळ देण्याची इच्छा आहे, त्यांना वाहतूक शाखेकडून वाहतूक नियमांचे प्रशिक्षण दिले जाते. दिवसाला योग्य मानधन देऊन त्यांची वाहतूक शिस्तीसाठी मदत घेतली जाते. सध्या २० तरुण हे काम करीत आहेत. वेळ देणाऱ्या आणखी मनुष्यबळाची प्रतीक्षा केएसबीपीला आहे.

देणाऱ्याचे हात हजारो…

देणारे कमी नाहीत, मात्र दिलेल्या पैशांचा योग्य वापर होण्याची गरज असते, असा अनुभव केएसबीपीच्या पदाधिकाऱ्यांना येत आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक संस्थांनी केएसबीपीच्या चांगल्या कामाला हातभार लावला आहे. कामातील पारदर्शकता, दर्जा आणि सातत्य यामुळे केएसबीपीने नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे. काही नगरसेवक आणि उद्योजकही यासाठी पुढाकार घेत आहेत.

रस्ते सौंदर्यीकरणापासून सुरू झालेल्या कमाची व्यापकता वाढली आहे. आता आम्ही शहरातील वाहतुकीवर लक्ष केंद्रीत केले असून, पुढे कचरा व्यवस्थापन, उद्याने विकसित करणे आणि ई-टॉयलेट्सची व्यवस्था करणार आहोत. यासाठी कोल्हापूरकरांनी मदत गरजेची आहे.

सुजय पित्रे, पदाधिकारी, केएसबीपी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अभ्यास कसला करता, कर्जमाफी द्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विधानसभा व विधानपरिषदेत बहुमतांच्या जोरावर आवाज दाबला जात आहे. त्यामुळे लोकांच्या जाऊन संघर्ष केल्याशिवाय पर्याय नाही. सरकार उद्योगधार्जिर्णे धोरण अवलंबत असताना शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करून सहकार चळवळ मोडीत काढली जात आहे. तालुकास्तरांपासून मंत्रालयस्तरांपर्यंत आढावा बैठक होत असताना कसला अभ्यास करता, असा सवाल करत काँग्रेस कमिटीमध्ये झालेल्या मेळाव्यात सरकारवर टीकेची झोड उठविण्यात आली. सरकारला वठणीवर आणून शेतकऱ्यांच्या सात-बारा कोरा करण्यासाठी संघर्षयात्रा सुरू केली आहे. संघर्षयात्रा मंगळवारी (ता. २५) कोल्हापुरात दाखल होत असून संघर्ष यात्रा यशस्वी करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. अध्यक्षस्थानी जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा अंजना रेडेकर होत्या. आमदार सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, पीपल्स रिपब्ल‌िकन पार्टीच्यावतीने संघर्ष यात्रा सुरू झाली आहे. तिसऱ्या टप्प्यात कोल्हापूर येथे मंगळवारी संघर्ष यात्रा दाखल होत आहे. यानिमित्त दसरा चौक, जयसिंगपूर व मुधाळ तिट्टा येथे मेळावा घेण्यात येणार आहे.

आमदार सतेज पाटील म्हणाले, ‘अधिवेशनादरम्यान विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी आमदार निलंबनाचे षडयंत्र रचले गेले. निलंबनानंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संघर्ष यात्रा सुरू केली आहे. संघर्ष यात्रेनंतर सरकारला जाग येऊन अभ्यास करत असल्याचे सांगितले जात आहे. तालुकास्तरांपासून राज्यस्तरांपासून नियमित आढावा बैठका घेतला जात असताना आता कसला अभ्यास करता? जानेवारी व फेब्रुवारी या दोन महिन्यात तब्बल ४०० कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, त्याची आपल्याकडे आकडेवारी नाही का? सरकारने ०.०५ टक्के किसान सेस कर लागू करून आठ हजार कोटी रुपये जमवले आहेत. जमा झालेली रक्कम शेतकऱ्यांसाठी खर्च न करता तब्बल सात हजार कोटी एलबीटीसाठी वर्ग केली आहे. शेतकऱ्यांचा प्रश्नावर अभ्यास करणार असल्याचे सांगत एकप्रकारे त्यांच्या प्रश्नांना बगल दिली जात आहे. गोबेल्स नीतीचा वापर करून वेगळाच विषय उपस्थित करून शेतकऱ्यांच्या प्रश्नावरील लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे ऐतिहासिक शाहूंच्या भूमीत संघर्ष यात्रा येत असून ती यशस्वी करायची आहे.’

इचलकरंजी शहर काँग्रेसचे शशांक बावचकर म्हणाले, ‘केंद्र व राज्यात सत्तेवर आलेल्या सरकार भांडवलदार धार्जीण असून सरकार शेतकऱ्यांपेक्षा भांडवल पोषक वातवरण तयार करत आहे.’

शिरोळ तालुकाध्यक्ष सर्जेराव शिंदे म्हणाले, ‘२००७ मध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांना आधार दिला होता. एकीकडे आघाडी सरकारने शेतकऱ्यांना उभारी देण्याचे काम केले असताना भाजप सरकार मात्र त्यांनी उद्ध्वस्थ करण्याचा उद्योग करत आहे. म्हणूनच सरकारविरोधी संघर्ष सुरू झाला असून सात-बारा कोरा झाल्याशिवाय संघर्ष थांबणार नाही.’

जिल्हा परिषद सदस्य बजरंग पाटील, म्हणाले, ‘केवळ कर्जमाफी हा कळीचा मुद्दा नसून कृषी पंपाच्या वीज बिलांमध्येही दुपटीने वाढ केली आहे. सर्व प्रकारे शेतकऱ्यांना नागवण्याचा विडाच सरकारने उचलला असून केवळ आश्वासने देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे.’ यावेळी जिल्हा परिषद सदस्य उमेश आपटे, माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, शंकर पाटील यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य व महापालिकेचे नगरसेवक उपस्थित होते. नगरसेवक तौफिक मुल्लाणी यांनी प्रास्ताविक केले. सचिन घोरपडे यांनी आभार मानले.

‘....यांना शेतकऱ्यांशी देणे घेणे नाही’

तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव व मनमोहनसिंह अर्थमंत्री असताना रिझर्व्ह बँकेने एक परिपत्रक काढले होते. त्या परिपत्रकाद्वारे केंद्र सरकारने २० लाख कोटी तर राज्य सरकारने ३५ हजार कोटींची कर्जमाफी व करसवलत उद्योजकांनी दिली होती. या परिपत्रकाचा आधार घेत सध्याचे केंद्र व उद्योगपतींचे लांगूलचालन करत आहे. त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर देणेघेणे नाही, अशी टीका संजय पाटील यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाच लाखांच्या आतील कर्जमाफी शक्य

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्यास सरकार सकारात्मक आहे, पण, सरसकट कर्जमाफी दिल्यास ज्यांना कर्जमाफीची गरज नाही, अशा बड्या शेतकर्‍यांनाही त्याचा लाभ होईल. यामुळे राज्यातील ४३ हजार गावांचा सर्व्हे करुन ज्यांना खरेच कर्जमाफीची गरज आहे, अशा शेतकर्‍यांना प्रसंगी ५ लाखांपर्यंतची कर्जमाफी देण्याचा विचार सुरू आहे,’ अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. रविवारी पोलिस उद्यानाची पाहणी केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह विरोधी पक्षांतर्फे मंगळवारपासून (दि. २५) संघर्ष यात्रा काढण्यात येणार आहे. याबाबत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, ‘विरोधकांकडे कोणताच मुद्दा शिल्लक नसल्याने ते संघर्ष यात्रा काढत आहेत. शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्याबाबत सरकार सकारात्मक आहे. केवळ शेतकर्‍यांना कर्जमाफी देऊन हा प्रश्न कायमस्वरुपी निकाली निघणार नाही. यासाठी शेतकर्‍यांना सक्षम करण्याचा विचार सरकार करत आहे. याबाबतच्या योजना सरकारच्या विचाराधीन आहेत. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यापेक्षा राज्यातील ४३ हजार गावांचा सर्व्हे करुन खर्‍या लाभार्थींनाच प्रसंगी ५ लाखापर्यंतची कर्जमाफी करण्याची सरकारची तयारी आहे. या दृष्टीने सरकारचे काम सुरू आहे.’

शेतकऱ्यांच्या रचनात्मक विकासासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. कर्जमाफीचा बोजा शेवटी नागरिकांवरच पडणार असल्याने ज्या शेतकऱ्यांच्या गळ्यापर्यंत कर्ज आले आहे, त्यांनाच हातभार लावण्याचा प्रयत्न असल्याचे पाटील यांनी सांगितले. कर्जमाफीची मर्यादाही सरकारने निश्चित केल्याचे पाटील यांच्या वक्तव्यामुळे स्पष्ट होत आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे किमान ५ लाखांपर्यंतचे कर्ज माफ होण्याची शक्यता बळावली आहे.


संघर्ष यात्रेवरून टोला

राष्ट्रवादी आणि कॉँग्रेसकडून कर्जमाफीसाठी मंगळवारपासून तिसऱ्या टप्प्यातील संघर्ष यात्रा सुरू होणार आहे. यावरून पाटील यांनी विरोधकांकडे कोणताच मुद्दा नसल्याने त्यांनी कर्जमाफीचा मुद्दा अजेंड्यावर आणला आहे. कोल्हापूरसारख्या समृद्ध जिल्ह्यातून कर्जमाफीच्या संघर्ष यात्रेवरून सुरूवात केली जात आहे. येथे याची गरज आहे काय याबाबत त्यांनीच बोललेले बरे, असा टोला लगावला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images