Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

​ सेना आमदार पाटीलविरोधात पोलिसात तक्रार

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

‘शेतीच्या वादातून पोलिसात दाखल केलेली तक्रार माघार घे, नाहीतर तुला उलट टांगून मारीन,’ अशी धमकी दिल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार नारायण पाटील यांच्याविरोधात एका शेतकऱ्याने केला आहे. आमदार पाटील यांच्यापासून आपल्या जीवाला धोका आहे, असा तक्रार अर्जही शेतकरी रोहिदास राजाराम कांबळे यांनी पोलिस अधीक्षक एस. विरेश प्रभू यांच्याकडे केला आहे. नारायण पाटील करमाळ्याचे आमदार आहेत.

रोहिदास कांबळे यांची करमाळा तालुक्यात मौजे शेटफळ येथे शेतजमीन आहे. या शेतातील पाइपलाइन सचिन नरोटे यांनी फोडली. या विरोधात कांबळे यांनी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. तो गुन्हा माघार घ्यावा म्हणून नरोटे कांबळेंना धमकावत होता. या प्रकरणी शिवसेना आमदार नारायण पाटील यांनीही मोबाइलवरून आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा तक्रार अर्ज शेतकरी कांबळेंनी दाखल केला आहे. आमदारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी कांबळे यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


द्राक्षांना गारपिटीचा दणकातासगाव, कवठेमहांकाळ, मिरजेत मोठे नुकसान

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सांगली

सांगली जिल्ह्यातील तासगाव, कवठेमहांकाळ आणि मिरज तालुक्याच्या काही भागाला शनिवारी अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसला. परिसरातील द्राक्षबागांना याचा मोठा फटका बसला आहे. तयार द्राक्षे फुटून फळकूज होण्याची भिती आहे. अनेक भागात बागा भूईसपाट झाल्या आहे. बेदाण्यालाही फटका बसणार आहे. ज्वारी, आंब्याच्या झाडांनाही वादळी वारे आणि पावसाचा फटका बसला आहे.

शनिवारी दुपारी अवकाळीने तासगाव तालुक्याच्या पूर्व भागाला जबरदस्त दणका दिला. काही वेळ गारा, त्यानंतर वादळी वारा आणि जोरदार पाऊस कोसळू लागला. सुमारे तासभर एकसारखा पाऊस कोसळत राहिल्याने द्राक्ष घडांचा बोजा घेऊन कशाबशा तग धरणाऱ्या बागांचे काय होणार, याची काळजी शेतकऱ्यांना लागली आहे. पावसाचा इतका जोर होता की, त्या पावसात बाहेर पडून बागेपर्यंत जाण्याचे धाडसही होईना. वीजांचा कडकडाट उरात धडकी भरवत होता. रात्री उशीरापर्यंत्त पावसाची रिपरिप सुरू होती.

तासगाव तालुक्यातील सावळज, जरंडी, वायफळे, डोंगरसोनी, अंजनी या पट्यात कोसळणारा पाऊस पुढे कवठेमहांकाळ तालुक्यातील घाटनांद्रे, तिसंगी, वाघोली, कुंडलापूर या भागापर्यंत कायम होता. कवठेमहांकाळमध्ये मात्र केवळ रिमझीम येऊन रस्ता भिजवून गेली. परंतु वादळी वाऱ्यांमध्ये जोर होता. त्यामुळेच हिंगणगावमधील माळी यांची द्राक्षबाग जमीनदोस्त झाली. रात्री पुन्हा तासगाव तालुक्यातील हातणूर, कवठेएकंद या भागात गारांचा पाऊस झाला. या अवकाळीमुळे अद्यापही वेलींवर द्राक्षे असणाऱ्या शेतकऱ्यांचे धाबे दणाणले असून, त्यांना मोठ्या नुकसानीचा फटका बसण्याची शक्यता आहे. बेदाण्याचे उत्पन्न घेतल्या जात असलेल्या भागाला शनिवारी सायंकाळपर्यंत तरी अवकाळीने गाठले नव्हते. परंतु, त्या भागाला अवकाळी कोसळला तर द्राक्ष बागाईतदारांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

काही भागात ज्वारीची काढणी सुरू झाली आहे. पाऊस पडल्याने ज्वारी काळी पडणार आहे. वादळी वारे आणि पावसामुळे मोहर गळून आंब्याचे मोठे नुकसान होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ कवठेमहांकाळमध्ये कर्जबाजारीशेतकऱ्याची आत्महत्या

$
0
0



सांगली : मराठवाडा आणि विदर्भातील कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या आत्महत्तेचे लोण आता पश्चिम महाराष्ट्रात पोहोचले आहे. सांगली जिल्ह्यातील दुष्काळामुळे सततच्या नापिकीला आणि विकास सोसायटी, पतसंस्थांच्या कर्जाच्या परतफेडीसाठी लागलेला तगादा याला कंटाळून सोपान श्रीपती शिंदे (वय ७०, घाटनांद्रे, ता. कवठेमहांकाळ) यांनी शनिवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांचा मुलगा संभाजी यांनी वडिलांनी कर्जाला कंटाळूनच आत्महत्या केल्याचे सांगितले आहे.

घाटनांद्रे गावच्या उत्तरेला असलेल्या जाधव मळ्यात वडिलार्जित अडीच एकर जिरायती शेतीवरच त्यांच्या कुटुंबाची गुजराण चालायची. संभाजी यांनी दिलेल्या माहितीनुसार वडिलांनी शेतीकरीता विकास सोसायटीकडून ७५ हजार आणि एका पतसंस्थेकडून ५० हजारांचे कर्ज घेतले होते. दुष्काळामुळे नापिकी शेतीतून कसलेच उत्पन्न मिळत नसल्याने कर्जाचे हप्ते भरलेले नव्हते. गावातीलही काही व्यक्तींकडून हातउसने घेतलेले पैसेही त्यांना परत करता आले नाहीत. सर्वांनीच पैशासाठी तगादा लावला होता. त्यामुळेच वडील सोपान शिंदे यांनी आत्महत्या केली आहे. विजापूर-गुहागर रस्त्यालगतच्या तुकाराम कदम यांच्या शेतातील आंब्याच्या झाडाला सोपान यांचा मृतदेह लटकताना शनिवारी सकाळी दिसला. या प्रकरणी कवठेमहांकाळ पोलिसांत आत्महत्येची नोंद झाली असून, पोलिस निरीक्षक सिराज इनामदार हे अधिक तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खंडपीठप्रश्नी मुख्यमंत्र्यांचे कृती समितीला निमंत्रण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मुंबई हायकोर्टाचे खंडपीठ कोल्हापुरात स्थापन करण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खंडपीठ कृती समितीला बैठकीचे निमंत्रण दिले आहे. बुधवारी (५) दुपारी दोन वाजता मुंबईत कौन्सिल हॉल येथे बैठक होणार असल्याची माहिती खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक प्रकाश मोरे यांनी दिली.

ज्येष्ठ नेते प्रा. एन.डी. पाटील यांनी शनिवारी दुपारी मुंबईत मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत खंडपीठप्रश्नी चर्चा झाल्यावर मुंख्यमंत्र्यांनी प्रा. पाटील यांना कृती समितीस बैठकीस वेळ देत असल्याचे सां​गितले. प्रा. पाटील यांनी निमंत्रक मोरे यांच्याशी संपर्क साधून बैठकीची माहिती दिली. या बैठकीला कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर जिल्ह्यातील कृती समितीचे पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहणार आहे. या बैठकीला जिल्ह्यातील सर्व खासदार, आमदारांनी उपस्थित रहावे, असे आवाहन निमंत्रक अॅड. मोरे यांनी केले आहे. खंडपीठ स्थापनेसाठी गेले अनेक वर्षे सहा जिल्ह्यातील वकील सनदशीर मार्गाने लढा देत आहे. हा लढा तीव्र करण्यासाठी जिल्हा कोर्टाच्या आवारात रोज धरणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला वकिलांसह राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, पक्षकारांचा पाठिंबा मिळत आहे. आमदार राजेश क्षीरसागर यांनी शुक्रवारी विधानसभेत लक्षवेधी मांडली होती. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूर सर्किट बेंचसाठी सरकार आग्रही असून मुख्य न्यायमूर्तींशी चर्चा केली जाईल, अशी ग्वाही दिल्याने खंडपीठ स्थापनेला चालना मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सभापतींसाठी नेत्यांची मोर्चेबांधणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‌जिल्हा परिषदेच्या सभापती निवड उद्या, सोमवारी होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. फोडाफोडीच्या राजकारणाला सुरूवात झाल्याने सतर्कता म्हणून सर्व सदस्यांना सहलींवर पाठवण्यात आले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीचे सदस्य महाबळेश्वरला तर भाजप व मित्रपक्षांचे सदस्य पाचगणीला गेले आहेत. ऐन उन्हाळ्यात थंड हवेच्या ठिकाणी सहलीवर असलेले काँग्रेसचे सदस्य रविवारी तर भाजपप्रणित आघाडीचे सदस्य सोमवारी सहलीहून परततील.

अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीत संख्याबळ कमी असताना मित्रपक्षांच्या मदतीने भाजपने सत्ता स्थापन केली. गटबाजीमुळे विरोधी काँग्रेस, राष्ट्रवादीला सत्ता मिळवता आली नाही. भाजपने सत्ता मिळवण्यासाठी सोबत घेतलेल्या शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, माजी मंत्री प्रकाश आवाडे गट, युवक क्रांती आघाडी, जनसुराज्य पक्षाच्या अनेकांना विविध समित्यांत पदांचे गाजर दाखवले. पदे कमी आणि इच्छुकांची संख्या जास्त झाल्याने भाजपप्रणित आघाडीत असंतोष खदखदू लागला. धूसफूस चव्हाट्यावर आली. साहजिकच सभापती निवडीतही चुरस निर्माण झाली.

समित्यामध्ये बांधकाम सभापतिपदासाठी जनसुराज्य, आवाडे गटांत रस्सीखेच सुरू आहे. महिला बालकल्याण समितीवर ‘स्वाभिमानी’ने दावा केला. बांधकाम, महिला बालकल्याण या वजनदार समित्यांचे सभापतिपद मिळवण्यासाठी आघाडीत टोकाचा संघर्ष सुरू झाला. त्याचा फायदा उठवून समित्यांसाठी संख्याबळ जमवण्यासाठी काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील, राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ जोरदार प्रयत्न करीत आहेत. आघाडातील दोन सदस्य गळाला लागल्याचा त्यांनी दावा केला. त्याची कुणकुण लागताच भाजपचे नेते पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विशेष लक्ष घातले. परिणामी सभापती निवडीही प्रतिष्ठेची झाली आहे.

……………

सोमवारच्या बैठकीत नावे
भाजप्रणित सत्ताधारी आघाडीत कोणत्या गटाला कोणते सभापतिपद द्यायचे हे ठरलेले नाही. सभापतिपदावर कुणाची वर्णी लागणार ही चर्चा मागे पडली. निवडीदिवशी सकाळी पालकमंत्री पाटील यांच्या उपस्थितीत सर्व सहभागी आघाडीप्रमुखांच्या नेत्यांची बैठक होईल. तीत नावे ‌निश्चित होतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विहिरीत बुडून शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू

$
0
0

म.टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

पोहण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. ही घटना गावभागातील ढोल पाणंद परिसरात घडली. आकाश हणमंत पाटील (वय ८ ) व शिवाप्पा कामाण्णा पुजारी (वय १२ ) अशी त्यांची नांवे आहेत. याबाबतची नोंद करण्याचे काम रात्री उशीरापर्यंत गावभाग पोलिस ठाण्यात सुरु होते. शाळकरी मुलांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
नदीवेस नाका परिसरातील मुजावरपट्टी परिसरात राहणारे आकाश पाटील व शिवाप्पा पुजारी हे मित्रांसमवेत ढोले पाणंद परिसरात असलेल्या रुग्गे यांच्या विहिरीत शनिवारी दुपारी पोहण्यासाठी गेले होते. या दोघांनाही पोहता येत नसल्याने रबरी इनरच्या सहाय्याने ते पोहण्यासाठी विहिरीत उतरले. भितीने दोघांनी एकमेकाला मिठी मारल्याने ते पाण्यात बुडाले. त्यांच्यासोबत पोहायला गेलेल्या मुलांनी ही घटना पालकांना सांगितली. माहिती मिळताच पालकांसह भागातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पण, विहीर खोल असल्याने दोघेही आढळून आले नाहीत. मात्र विहिरीवर दोघांचे कपडे आढळून आले. व्हाइट आर्मीचे जवान व अग्निशमन दलाच्या पथकाच्या सहकार्याने शोधमोहीम राबविण्यात आली. रात्री दोघांचेही मृतदेह सापडले. आकाश व शिवाप्पा या दोघांचा मृतदेह पाहताच नातेवाईकांनी आक्रोश केला. आयजीएम रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. आकाश हा एकुलता एक होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपच्या नगरसेविका गीता गुरव यांचे पद रद्द

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अवैध बांधकाम केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका गीता श्रीपती गुरव यांचे पद करण्यात आले आहे. आठवे सहदिवाणी (कनिष्ठस्तर) न्यायाधीश केतकी चव्हाण यांनी हा आदेश दिला. महापालिकेला शनिवारी निकालाची प्रत मिळाली. अवैध बांधकामप्रश्नी नगरसेविकेला पद गमवावे लागल्यामुळे महापालिकेतील अनेक नगरसेवकांनी धास्ती घेतली आहे.

महापालिकेकडून सोमवारी (ता.३) गुरव यांना पद रद्द केल्याची नोटीस लागू करण्यात येणार आहे. दरम्यान, गुरव यांनी जिल्हास्तरावरील वरिष्ठ कोर्टात स्थगितीसाठी याचिका दाखल केली आहे. त्यावर पुढील आठवड्यात सुनावणी आहे. रायगड कॉलनी-बाबा जरगनगर प्रभागातून गुरव भाजपच्या चिन्हावर निवडून आल्या होत्या. त्यांच्याविरोधात काँग्रेसकडून वैभवी जरग यांनी निवडणूक लढवली होती.

गुरव यांनी इमारतीच्या आजूबाजूला अवैधरित्या बांधकाम केल्याची तक्रार जरग यांनी कोर्टात दाखल केली होती. जरग यांच्यावतीने अॅड. सासवडे तर महापालिकेकडून अॅड. अल्ताफ पिरजादे यांनी बाजू मांडली. नगरसेविका गुरव यांचे वकील तेहजील नदाफ एकदाही कोर्टात हजर राहिले नाहीत. बाजू मांडण्यासाठी संधी देऊनही नगरसेविका गुरव यांचे वकील गैरहजर राहिल्याने कोर्टाने अवैध बांधकाम प्रकरणी त्यांचे नगरसेवक पद रद्दचा आदेश दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हायवेवर ८८७ ठिकाणी बाटली आडवी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सुप्रीम कोर्टाने हायवेलगत दारूबंदी करण्याच्या आदेशाची अंमलबजावणी शनिवारपासून तातडीने सुरू करण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यात राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील ५०० मीटर अंतरापर्यत असलेली ८८७ मद्यविक्रीची दुकाने बंद करण्यात आली. त्यात शहरातील १६१ दुकानांचा समावेश आहे. जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने शुक्रवारी मध्यरात्रीपासून दुकाने बंद करण्याची मोहीम सुरु केली. मोठ्या संख्येने मद्याची दुकाने बंद झाल्याने ‘ड्राय डे’ असल्यासारखी स्थिती होती.

सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश जे.एस. केसर यांच्या नेतृत्वाखालील न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड व न्यायमूर्ती एल.एन. राव यांच्या खंडपीठाने १५ डिसेंबर २०१६ रोजी राष्ट्रीय व राज्य महामार्गापासून ५०० मीटर अंतरावरील मद्यविक्रीचे दुकाने बंद करण्याचा आदेश दिला होता. मद्यपान करुन वाहने चालवण्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होतात. त्यामुळे अपघातावर नियंत्रण ठेवण्यासाठी हा आदेश काढला होता. आदेशाला स्थगिती मिळावी यासाठी मद्य व्यावसायिकांनी सरकारदरबारी व कोर्टात प्रयत्न केले होते. कोर्टाच्या निर्णयामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाने ५०० मीटर अंतरापर्यंत दुकानांना परवाना देण्यास नकार दिला आहे.

कोर्टाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. सैनी, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली महसूल, उत्पादन शुल्क, सार्वजनिक बांधकाम, महापालिका आणि पालिकांची समिती नियुक्त केली होती. शुक्रवारी मध्यरात्री समितीने शहराचा सर्व्हे करुन दुकान बंद करण्याची मोहीम सुरु केली. रात्री दोन वाजता शहरातील सर्व्हे पूर्ण झाला. शहरातून तावडे हॉटेल ते शिवाजी पूल हा नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग तर अन्य चार राज्य महामार्ग जातात. त्यामुळे या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली. ५०० मीटरच्या कक्षेत येणाऱ्या देशी दारु, वाईन शॉप, परमिट रुम, बिअर शॉपींना नोटिसा देण्यात आल्या. शनिवारी चार पथके रात्री उशिरापर्यंत नोटिसा बजावण्याचे काम करत होती.


बंद झालेली शहर व जिल्ह्यातील दुकाने

दुकानाचा प्रकार शहर ग्रामीण

देशी दारु २७ १६६

वाईन शॉप १७ ३२

परमिट रुम ८८ ४७२

बिअर शॉपी २१७ २९

एकूण ८८७ १६१

०००००

सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यामदतीने चार समित्या नियुक्त केल्या आहेत. या समित्या सर्व्हे करत असून ही दुकाने मध्यरात्रीपासून बंद करण्याची नोटीस दिली आहे. त्यानुसार दुकान बंद केली आहेत.

डॉ. अमित सैनी, जिल्हाधिकारी

००००

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार राज्य उत्पादन शुल्क कार्यवाही करत आहेत. कोर्टाच्या आदेशानुसार राष्ट्रीय व राज्य महामार्गापासून ५०० मीटर अंतरावरील दुकानांचे नूतनीकरण झालेले नाही. त्यामुळे ती दुकाने बंद झाली आहेत.

संजय पाटील, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रेडीरेकनरमध्ये सरासरी ७.३ टक्के वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
राज्य सरकारने रेडीरेकनरमध्ये भरीव वाढ न करता जिल्ह्यात सरासरी ७.३ टक्के वाढ केली. त्यामुळे नोटाबंदीनंतर बांधकाम व्यवसायात आलेली प्रचंड मंदी सावरायला मदत होणार आहे. महानगरपालिका क्षेत्रात अवघा तीन टक्के तर प्रभावक्षेत्रात १०.६३ टक्के अशी भरीव वाढ केली आहे. रेडीरेकनर दरात नैसर्गिक वाढ झाल्यामुळे बांधकाम व्यावसायिकांनी त्याचे स्वागत केले आहे.

दरवर्षी एक एप्रिलला रेडीरेकनरचे दर जाहीर होतात. त्याकडे बांधकाम व्यावसायिकांबरोबर महापालिका व महसूल विभागाचे लक्ष होते. शनिवारी दुपारी राज्य सरकारने रेडीरेकनरचे दर जाहीर केले. प्रभावक्षेत्रात तब्बल १०.६३ टक्के वाढ झाली आहे. रेडीरेकनरपेक्षा ज्या भागात वाढीव दराने जमीन, बंगले, फ्लॅटचे व्यवहार झाले त्या प्रभावक्षेत्राचा सर्व्हे करुन रेडीरेकनरमध्ये वाढ करण्यात आली आहे. कोल्हापुरात रेडझोन क्षेत्र, नागाळा पार्क, ताराबाई पार्क, शिवाजी पार्क, रमणमळा, न्यू पॅलेस परिसर प्रभावक्षेत्र मानले जाते. या परिसरात रेडीरेकरनमध्ये वाढ झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. नगरपालिका क्षेत्रात ५.५ टक्के वाढ झाली आहे.

गेल्या काही वर्षात रेडीरेकनरमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने घराच्या किमती आवाक्याबाहेर गेल्या आहेत. तीन वर्षांपूर्वी रेडीरेकरनरमध्ये २० ते २५ तर गेल्यावर्षी १० ते १५ वाढ झाली होती. यावर्षी बांधकाम व्यवसायात मंदीचे सावट असल्याने रेडीरेकनर दरात जास्त वाढ करु नये, अशी मागणी व्यावसायिकांनी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली होती. पाटील यांनीही सरसकट वाढ केली जाणार नसल्याचे संकेत दिले होते. या पार्श्वभूमीवर शनिवारी रेडीरेकनरच्या दरात माफक वाढ झाल्याने व्यावसायिकांत समाधान व्यक्त होत आहे.

००००००

रेडीरेकनरमध्ये वाढ करु नये, अशी मागणी बांधकाम व्यावसायिकांनी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली होती. सरकारने रेडीरेकनरमध्ये जास्त वाढ केलेली नाही. रेडीरेकनरमध्ये नैसर्गिक वाढ झाल्याने बांधकाम व्यवसायात मंदी हटून ऊर्जितावस्था मिळायला मदत होणार आहे.

महेश यादव, अध्यक्ष, क्रीडाई, कोल्हापूर

असे आहेत रेडीरेकनरचे दर

महापालिका ३ टक्के

नगरपालिका ५.५ टक्के

ग्रामीण भाग १० टक्के

प्रभावक्षेत्र १०.६३ टक्के


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ दहा एकर तुर जाळून टाकली

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

तुरीचे भाव पडल्यामुळे काढणी, मळणी आणि आडतीचा खर्चही निघत नसल्यामुळे अक्कलकोट तालुक्यात शेतकऱ्यांने तुरीच्या दहा एकर उभ्या पिकाला आग लावून तूर जाळून टाकली. ही दुर्दैवी बासलेगाव (ता. अक्कलकोट) येथे रविवारी घडली.

अक्कलकोट तालुक्‍यातील प्रयोगशील शेतकरी शशिकांत बिराजदार यांनी काढणी, मळणी, अडतीचा खर्च आणि मिळणाऱ्या उत्पन्नाचा ताळ-मेळ बसत नसल्यामुळे पिकाची काढणी न करता उभे पीक जाळून टाकण्याचा निर्णय घेतला. वर्षभर ज्या शेतीची निगा राखली तीच शेती पेटवण्याची दुर्दैवी वेळ शेतकऱ्यावर आली.

शशिकांत बिराजदार सधन शेतकरी आहेत. अक्कलकोट तालुक्‍यातल्या बासलेगावच्या पंचक्रोशीत ते प्रयोगशील शेतीसाठी प्रसिद्ध आहेत. दर वर्षी साधारण १५० ते २०० क्विंटल तूर उत्पादन ते घेतात. यंदा ही त्यांनी आपल्या शेतात २६ एकर तूर पेरली होती. त्यापैकी १६ एकराची रास करून उत्पादनही घेतले. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात त्यांनी विक्रीला पाठवली. परंतु, अजूनपर्यंत तूर विकली गेली नाही. ३५०० ते ४२००पर्यंत त्यांच्या तुरीला मागणी होती. परंतु सरकारने ५१०० रुपये हमी दराने विकत घ्यायचे धोरण जाहीर केल्यामुळे त्यांनी तुरीची विक्री केली नाही. काढणीपासून विक्रीपर्यंतच्या प्रक्रियेत होणारा खर्च याचा कुठेच ताळमेळ लागणार नाही याचा अंदाज आल्याने दहा एकराच्या तूर शेतीला त्यांनी आग लावली. यंदा केलेली तूर शेती त्यांच्या अंगलट आली आहे.

गेल्यावेळी मिळालेला तुरीचा चांगला भाव पाहून त्यांनी तूर लावली. पण हळूहळू तुरीचे दर कोसळत गेले त्यामुळे बिराजदार यांनी किमान पुढील पिकासाठी शेत तरी मोकळे होईल म्हणून उभे पीक जाळून टाकण्याचा निर्णय घेतला. अक्कलकोट तालुक्‍यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना यंदा चांगलेच नुकसान सहन करावे लागले आहे. हमीभाव देण्याच्या आणि तूर विकत घेण्याच्या सरकारी यंत्रणेवर आता शेतकऱ्यांचा विश्‍वास उडाल्याचेच या घटनेतून समोर आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तपासणी मोहीम कागदोपत्रीच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

म्हैसाळ येथील गर्भलिंग तपासणी आणि गर्भपाताची घटना समोर आल्यानंतर राज्यभरातील रुग्णालयांची तपासणी करावी, असे आदेश देण्यात आले होते. सध्या या आदेशानुसार आरोग्य विभागाने कोल्हापूर जिल्ह्यात सुरू केलेली तपासणी मोहीम कागदोपत्रीच असल्याचे समोर येत आहे. शिवाय तपासणी मोहिमेला १५‌ दिवस उलटूनही त्यातून फारसे काही हाताला लागले नसल्याचे समजते. या तपासणी मोहिमेबाबत आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता अद्याप तपासणी सुरू असून निष्कर्ष काढले नसल्याचे सांगण्यात आले. १५ एप्रिलप्रर्यत ही मोहीम सुरू राहणार आहे.

म्हैसाळच्या घटनेनंतर प्रशासनाने १५ मार्चपासून जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांची तपासणी मोहीम सुरू केली. मात्र यात प्रशासनही कागदोपत्री अहवालातच अधिक अडकून पडले आहेत. एक महिना ही मोहीम सुरू राहणार असून १५ एप्रिलपर्यंत या मोहिमेला अंतिम मुदत देण्यात आली आहे. या मोहिमेत इमारतीबाहेर रुग्णालयांचा फलक लावून सुरू केलेल्या वैद्यकीय व्यवसायाला परवानगी आहे का याची खात्री करणे, डॉक्टरांची मान्यता, तेथे कार्यरत असलेल्या नर्सिंग स्टाफची विश्वासार्हता तपासणे हे पथकाकडे काम सोपविण्यात आले आहे. महानगरपालिका, ग्रामीण भाग आणि नगरपालिका अशा वेगवेगळ्या ठिकाणी पथके निर्माण करून मोहिमेला सुरुवात झाली आहे. दररोज ही पथके सीपीआरमधील दोन समन्वयकांना अहवाल देतात. हा अहवाल जिल्हा शल्यचिकित्सकांच्या सहीने आरोग्य विभागाला पाठविला जात आहे. मात्र, त्या अहवालाबाबत गुप्तता पाळली असून त्याची माहिती देण्यात येत नाही. शिवाय जे अनधिकृत वैद्यकीय व्यवसाय सुरू आहेत त्याबाबत कोणतीही कारवाई केलेली नाही.

समितीमध्ये हे पदाधिकारी

या समितीमध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे सहअध्यक्ष असून महापालिका आयुक्त, नगरपालिकांचे मुख्याधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता हे सदस्य आहेत. जिल्हा शल्यचिक‌ित्सक सदस्य सचिव म्हणून काम पाहत आहेत.

जिल्ह्यातील सोनोग्राफी केंद्र

१३६

ग्रामीण भाग

११८

कोल्हापूर शहर

वैद्यकीय गर्भपात केंद्रे

१५०

कोल्हापूर ग्रामीण

८३

महानगरपालिका

१०४ बोगस डॉक्टर?

२८ फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय पुनर्विलोकन समितीची बैठक झाली होती. यावेळी वैद्यकीय क्षेत्रातील १०४ बोगस डॉक्टरांच्या विरोधात जिल्हा प्रशासनाकडे तक्रार दाखल करण्यात आली. एका आठवड्यात भरारी पथक स्थापन करून त्याद्वारे बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याचा निर्णय जिल्हास्तरीय पुनर्विलोकन समितीच्या बैठकीत घेण्यात आला. त्याबाबतही अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुटूंबाने अव्हेरले, समाजाने नाकारले

$
0
0

Anuradha.kadam@timesgroup.com

Tweet@:anuradhakadamMT

कोल्हापूर : शहरासह उपनगरात रस्त्यावर फिरणाऱ्या आणि रस्त्याच्या कोणत्याही कोपऱ्यातच रात्र काढून जगणाऱ्या १५७ मनोरुग्ण महिलांच्या सुर​​क्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. या मनोरुग्ण महिलांपैकी ७० टक्के महिला शहराबाहेरील आहेत. अन्न-वस्त्र निवारा (अवनि) या संस्थेच्यावतीने करण्यात आलेल्या पाहणीत हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. कोल्हापूर हे धा​र्मिक स्थळ असल्यामुळे जत्रा, यात्रा, उत्सवानिमित्ताने मनोरुग्ण महिलांना कुटुंबीयांकडून कोल्हापुरात सोडले जात असल्याचे वास्तव या महिलांच्या संवादातून पुढे येत आहे. रस्त्यावर निराधारपणे फिरणाऱ्या मनोरुग्ण महिलांच्या असहाय्यतेचा गैरफायदा काही वासनांध पुरुषांकडून घेतला जात असल्याचेही भीषण वास्तव समोर येत आहे.

गुढी पाडव्यादिवशी विवस्त्र अवस्थेत फिरणाऱ्या एका मनोरुग्ण महिलेला अवनि या संस्थेच्यावतीने सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. गेल्या महिन्यात दोनवेळा या महिलेवर शाहूपुरी परिसरात अतिप्रसंग झाल्याचे लक्षात आले आहे. गेल्या आठवड्यात एका मनोरुग्ण महिलेने वाहनावर दगड मारल्याने तिचा खून झाला. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात भवानी मंडपात एका मनोरुग्ण महिलेची छेड काढण्यात आली. तिने याबाबत परिसरातील ट्रॅफिक पोलिसांना सां​गितले असता तिचीच चेष्टा करत बेदखल केले.

मानसिक असंतुलन झाल्यामुळे फिरणाऱ्या महिलांची वाढती संख्या आणि त्यांच्या या अवस्थेचा गैरफायदा घेऊन त्यांच्यावर होणारे अत्याचार यामध्ये वाढ होत असल्याचेही अवनि संस्थेच्या पाहणीमध्ये दिसून आले आहे. या महिलांवर उपचार करून त्यांचे पुनर्वसन करणे ​किंवा त्यांना त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. रेल्वे स्टेशन, बसस्थानक, मंदिरे, नदी व तलाव परिसर, ऐतिहासिक वास्तू परिसरात मनोरूग्ण आणि निराधार महिला दिसून येत आहेत. दिवसभर शहरात भीक मागत फिरायचे आणि रात्री एखादा आडोसा शोधून झोपायचे असा दिनक्रम सुरू असताना मनोरुग्ण असूनही आपल्यावर कुणी अत्याचार किंवा अतिप्रसंग करणार नाही ना अशा भीतीच्या छायेखाली त्या जीवन जगत आहेत.

विशीपासून सत्तरीपर्यंत

शहरात आढळून येत असलेल्या निराधार मनोरुग्ण महिला या वयाच्या विशीपासून ते सत्तरीपर्यंतच्या आहेत. तरुण महिला या कौटुंबिक आघातामुळे मनोरुग्ण झाल्याचे त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर समोर आले आहे. तर पन्नाशी उलटलेल्या मनोरुग्ण महिला आजारामुळे आलेल्या नैराश्यातून मान​सिक संतुलन गमावल्याचे अवनि संस्थेच्या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या माहितीत अधोरेखित झाले आहे. या मनोरुग्ण महिलांना विश्वासात घेऊन बोलल्यानंतर काही महिलांना त्यांच्या कुटुंबीयांनीच कोल्हापुरात सोडून दिल्याचे सांगितले. मात्र त्यांना घरी परत जाण्याची इच्छा नाही. यापैकी काही महिलांवर शारीरिक अत्याचारही झाला आहे, त्यातूनच त्यांच्या मनावर परिणाम झाल्यामुळे कुटुंबीयांकडून त्यांना सोडून देण्यात आले आहे. तर काही महिलांनी कौटुंबिक छळाला कंटाळून घर सोडले आहे. कोल्हापूरमध्ये बेघरांसाठी निवारा नसल्यामुळे निराधार किंवा मनोरुग्णांवर उपचार होऊन त्यांचे पुनर्वसन होईपर्यंत त्यांच्यावर रस्त्यावर फिरण्याची वेळ येते.

शहरात फिरणाऱ्या मनोरुग्ण महिलांवर उपचार करण्यासाठी पोलिस आणि न्यायालयाची परवानगी असणे आवश्यक आहे. अशा महिलांवर केवळ वैद्यकीय उपचार करणे गरजेचे नसून त्यांना मानसोपचारतज्ज्ञांचीही गरज आहे. मनोविकारातून बाहेर पडल्यानंतर अशा महिलांच्या पुनर्वसनासाठी काम झाले पाहिजे. कोल्हापुरात रिजनल वॉर्ड झाला पाहिजे.

डॉ. शिशिर निरगुंडे, वैद्यकीय अधीक्षक, सीपीआर

शहरात आढळून येणाऱ्या मनोरुग्ण ​व निराधार महिला या आसपासच्या शहरातून, राज्यातून कोल्हापुरात आणून सोडलेल्या आहेत. मानसिक रुग्ण असल्यामुळे त्यांना स्वत:विषयी माहिती देता येत नाही. त्यामुळे अशा महिलांच्या बाबतीत निर्णय घेण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. त्यांनी अशा महिलांना सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल केले पाहिजे. महिला बालकल्याण विभागातर्फे थेट अशा मनोरुग्ण महिलांना ताब्यात घेता येत नाही.

एस. बी. मोहिते, महिला व बालकल्याण विभाग अधिकारी

मनोरुग्ण असल्यामुळे त्यांच्या मानसिक अवस्थेचा गैरफायदा घेऊन ​अतिप्रसंग होण्याचे प्रमाण वाढले आहे. शारीरिक अस्वच्छतेमुळे आजार वाढतात. अशा महिलांना जगण्याचा अधिकार आहे. त्यासाठी त्यांच्यावर उपचार व त्यांचे पुनर्वसन झाल्यास त्या सुरक्षित आयुष्य जगू शकतात. सध्या कोल्हापुरात अशा महिलांची जबाबदारी घेऊन त्यांना सांभाळणारी कोणतीही संस्था नाही. गेल्या तीन महिन्यात शहर व उपनगरात केलेल्या सर्वेक्षणात दीडशेहून अधिक मनोरुग्ण महिला असल्याचे आढळून आल्यामुळे या प्रश्नाचे गांभीर्य वाढले आहे.

अनुराधा भोसले, संचालिका, अवनि संस्था

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्टॉक संपवण्यासाठी ‘ब्लॅक मार्केट’ची पळवाट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राष्ट्रीय आणि राज्य मार्गांपासून ५०० मीटर अंतरातील दारू दुकाने बंद करण्याच्या न्यायालयाच्या निर्णयाच्या काटेकोर अंमलबजावणीचा फटका शहरातील मोठ्या रेस्टॉरंटसह वाइन शॉप्सना बसला आहे. त्यामुळे विक्रेत्यांसह मद्यपींमध्येही मोठी अस्वस्थता आहे. दारूबंदीची अंमलबजावणी सुरू होताच ‘ब्लॅक’ मार्केटही फोफावले आहे. विक्रेत्यांनी स्टॉक संपवण्यासाठी सोयीच्या ठिकाणी धाव घेतली तर रेस्टॉरंटसह लॉजिंगमध्येही छुपे बार सुरू राहिल्याचे दुसऱ्या दिवशी दिसून आले. शहरातील मैदानांसह मोकळ्या जागांवर ‘ओपन’ बारलाही उधाण आले. विक्रेत्यांसह मद्यपींनी ‘ब्लॅक’ मार्केटची पळवाट शोधल्याचे दिसले.

राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवरील अपघातांचे प्रमाण कमी व्हावे या हेतूने सुप्रिम कोर्टाने महामार्गापासून ५०० मीटर अंतरातील दारूविक्री बंद करण्याचे आदेश दिले. आदेशाला स्थगिती मिळवण्यासाठी, पळवाट शोधण्यासाठी विक्रेत्यांनी अनेक प्रयत्न केले. मात्र, नियमांची अंमलबजावणी रोखण्यात यश आले नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील १३५५ दुकानांपैकी ८८७ दुकानांना या निर्णयाने शनिवारी कुलूप लागले. राष्ट्रीय आणि राज्य मार्गांवर दारूबंदी झाल्याने स्टॉक संपवण्यासाठी विक्रेत्यांची धांदल उडाली. नेहमीची ठिकाणे बंद झाल्याने मद्यपींची अडचण झाली. शहरातील बहुतांश थ्री स्टार आणि फाइव्ह स्टार रेस्टॉरन्ट महामार्गांपासून ५०० मीटरच्या आत आहेत. त्यामुळे यातील परमिटरुम शनिवारपासूनच बंद झाली. रविवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाने वाइनशॉप, परमिट रुम सील केली. मद्याची विक्री न करण्याच्या नोटिसाही बजावल्या.

मात्र कारवाईच्या कचाट्यात सापडू नये यासाठी विक्रेत्यांनी पळवाटा शोधल्या आहेत. परमिटरुमधारकांनी स्वतःच्या किंवा जवळच्या लॉजिंगमध्ये दारू पोहोचवण्याची व्यवस्था केली आहे. बहुतांश विक्रेत्यांनी शुक्रवारी (ता. ३१) रात्रीच दुकानांतील साठे सोयीच्या ठिकाणी हलविले. महामार्गांपासून ५०० मीटरच्या बाहेर असलेल्या दुकानांमध्ये दारूचा साठा पोहोचला आहे. रविवारी संध्याकाळपासून या दुकानांबाहेर स्टॉल लावूनही विक्री सुरू होती.

सद्यस्थितीत शहरातील, पाचशे मिटरच्या अंतराबाहेरील ओपन बार फुल्ल झाले आहेत. मद्यप्राशन करणाऱ्या सुमारे ७० टक्के लोकांना परमिटरुमचाच आधार होता. त्यामुळे काहींनी वेगळे पर्याय शोधले. काहींनी दारू खरेदी करून शहरातील रिकाम्या जागा, पंचगंगा नदी घाट, पिकनिक पॉईंट, रिंगरोडचा मद्यप्राशनासाठी आधार घेतला. काही मद्यपींनी चारचाकी वाहनांचा वापर मद्यप्राशनासाठी केला. दारूबंदीनंतर वापरात येणारे हे सर्व पर्याय बेकायदेशीर आहेत. सामाजिक आरोग्यासाठी ते धोकादायक आहेत. ब्लॅक मार्केटची पळवाट बंद करण्याचे आव्हान राज्य उत्पादन शुल्क विभागासह पोलिसांसमोरही निर्माण झाले आहे.

खरेदीसाठी गर्दी

शहरात वाइनशॉप, परमिट रूम आणि देशी दारूची विक्री करणारी १२० दुकाने आहेत. यातील १६१ दुकाने सीलबंद झाल्याने केवळ ४९ ठिकाणीच दारूविक्री सुरू आहे. शहराबाहेरील महामार्गांवरही या निर्णयाची कोटेकोर अंमलबजावणी सुरू असल्याने रविवारी शहरातील वाईन शॉपमध्ये दारू खरेदीसाठी प्रचंड गर्दी झाली. काही विक्रेत्यांनी तर रात्री उशिरापर्यंत दुकानांच्या बाहेर स्टॉल लावून विक्री केली. काही ठिकाणी चढ्या दराने विक्री सुरू असल्याचीही चर्चा शहरात होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रॅक्स खाणीत कोसळून सात कामगार ठार

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । कोल्हापूर

कागल तालुक्यात शुक्रवारी मध्यरात्री सात कामगारांवर काळाने घाला घातला. बस्तवडे येथे ट्रॅक्स खाणीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात सात कामगार ठार झाले. या अपघातातील अकरा कामगारांना वाचविण्यात यश आले. मात्र घराचा आधार गेल्याने ठार झालेल्या सातही कामगारांची कुटूंबे उघड्यावर आली आहेत.



निपाणीपासून 14 किलोमीटरवर अंतरावर बस्तवडे गाव आहे. या परिसरातील तरुण रोज खासगी ट्रॅक्स करून कागल एमआयडीसीत कामाला येतात. या कामगारांची दुपारी ४ ते रात्री १२ अशी ड्युटी होती. नेहमीप्रमाणे ड्युटी संपवून हे कामगार घराकडे परतत असताना ही दुर्देवी घटना घडली. १८ कामगारांना घेऊन चाललेली ही ट्रॅक्स मध्यरात्री अचानक कागल खाणीत कोसळली आणि सात कामगारांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये किशोर केरबा कुंभार,विनायक विलास चोपडे आणि उदय रघुनाथ चौगुले या हमिदवाड्यातील तिघांसह संदीप सदाशिव लुल्ले, बाबूराव कापडे, आकाश ढोले आणि शहाजी तानाजी जाधव या हळदी येथील चौघांचा समावेश आहे. हे सर्व कामगार एमआयडीसीचे कामगार असून २० ते २७ वयोगटातील आहेत. तर अकरा जणांना वाचविण्यात यश आले.चालकाला थंडीमुळे़ येऊन डूलकी लागल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येते. अपघात झाल्याचे कळताच आसपासच्या गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्यात मदत केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

उन्हाचा वाढलेला कडाका, त्यात आणखी वाढ होण्याची वर्तवण्यात आलेली शक्यता, कमी होत चाललेला पाणीसाठा आणि उपलब्ध पाणी पुढील तीन महिने पुरविण्याचे आव्हान यामुळे कोल्हापूर जिल्ह्याला आतापासूनच पाणी टंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. वाड्या-वस्त्यांवरील पाण्याचे स्रोत आटल्याने पाण्यासाठी पायपीट सुरू झाली आहे. अनेक शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या तलावासह नद्यांची पाणीपातळीही घटली आहे. त्यामुळे कागल, मुरगूड, गडहिंग्लज, इचलकरंजी या नगरपालिकांनी पाणी कपातीला सुरूवात केली आहे. लवकरच शेतीसाठी उपसाबंदीसारखा कठोर निर्णय घेतला जाईल अशी शक्यता नाकारता येत नाही.

गेल्यावर्षी पावसाने ओढ दिल्याने धरणांमधील पाणीसाठा कमी होता. उन्हाळ्यामध्ये तो पाणीसाठा वापरण्याचे आव्हान होते. त्यामुळे शेतीसाठी उपसाबंदी लागू केली गेली. अनेक शहरांमध्ये दिवसाआड पाणी पुरविण्यासह पुरवठ्याच्या वेळेत कपात करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर यंदा चांगला पाऊस झाला. धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा होता. मात्र, मार्चच्या सुरुवातीपासून वाढलेल्या उन्हाच्या कडाक्यामुळे पाणीसाठा खालावला आहे. शहरातील कळंबा, पाचगाव आणि कोल्हापूर शहराच्या काही भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या कळंबा तलावाचीही पाणीपातळी झपाट्याने घटली. त्यामुळे तेथील पाणीउपसा बंद करण्यात आला आहे. महापालिकेने गेल्यावर्षीप्रमाणे दिवसाआड पाणी पुरवठा करता येईल का याची चाचपणी केली. मात्र त्यास नगरसेवकांनी विरोध केला. जिल्ह्यातील अनेक नगरपालिकांनी पाणीबचतीचे उपाय सुरू केले आहेत. काही ठिकाणी दिवसाआड पाणी पुरविले जात आहे. पाणी पुरवठ्याच्या वेळेत कपात करण्यात आली आहे.

जयसिंगपुरात एक दिवस पाणीकपात

जयसिंगपुरात पाणी बचतीबरोबरच वितरणातील सुसूत्रतेसाठी आठवड्यातून एक दिवस पाणी कपात करण्यास नगरपालिकेने सुरूवात केली आहे. नगरपालिकेने गेल्या काही वर्षांत शहरातील ९० टक्क्यांहून अधिक नळांना मीटर बसविण्यात आल्याने पाण्याच्या उधळपट्टीला आपसूकच लगाम बसला आहे.

इचलकरंजीत तीन दिवसाआड पाणी

इचलकरंजीतील कृष्णा नळपाणी योजनेच्या वितरण नलिकेला वारंवार लागणाऱ्या गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया जात असतानाच, उपसा आणि पुरवठा यामध्येही ४० टक्के पाण्याची गळती होते. परिणामी शहराला तीन दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागतो. नियोजनाचा अभाव आणि कालबाह्य यंत्रणा यामुळे या योजनेचे तीन-तेरा वाजले आहेत.

पेठवडगावला पुरवठा नियमित

पेठवडगावच्या महालक्ष्मी तलावात शहरवासियांना अजून दोन महिने पुरेल इतका पाणी साठा आहे. मात्र सद्यस्थितीत हा एकमेव आधार असल्याने नगरपालिका प्रशासनाने याचे योग्य नियोजन गरजेचे आहे.

गडहिंग्लज तालुक्यात स्थिती गंभीर

गडहिंग्लज तालुक्यात काही गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे, तर आणखी दोन महिने काढायचे कसे असा प्रश्न आहे. डिसेंबरमध्ये कोरडी पडूनही हिरण्यकेशी नदीत गेल्यावर्षीच्या तुलनेत चित्री धरणामुळे बऱ्यापैकी पाणी आहे. शहरात पूर्वी दिवसातून दोनदा पाणीपुरवठा केला जात होता. मात्र, बचतीसाठी एकवेळ पुरवठा केला जातो.

मुरगूडला गुरुवारी ड्राय डे

शहरासह शिंदेवाडी आणि यमगे गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या मुरगूडच्या सर पिराजीराव तलावात ५० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन मुरगूडमध्ये गुरुवार हा ‘ड्राय डे’ ठेवण्यात आला आहे. शिवाय दररोज सोडण्यात येणाऱ्या पाण्यात दहा मिनिटांची कपात करण्यात आली आहे.

कागलला २२ लाख लिटरची बचत

कागल शहरात भविष्यात होणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईसाठी नगरपालिकेने सोमवार हा बाजाराचा दिवस ‘ड्राय डे’ म्हणून पाळण्याचा निर्णय घेतला आहे. दररोज तीस मिनिटे सोडल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्यातही पाच मिनिटे कपात करून पाणी बचत करण्यात आली आहे. त्यामुळे दररोज ८२ लाख लिटर लागणारे पाणी आता ६० लाख लिटरवर आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


घाटगे, पेरीडकर, माने, शिंदे सभापती शक्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषदेच्या विषय समितीच्या सभापती निवडीसाठी सोमवारी (ता. ३ एप्रिल) निवडणूक होत आहे. भाजप आघाडीने ४० सदस्य सोबत असल्याचा दावा केला आहे, तर शेवटपर्यंत काहीही घडण्याची शक्यता असल्याने प्रयत्न सुरू असल्याचे काँग्रेस आघाडीच्यावतीने सांगण्यात येत आहे. दरम्यान, भाजप आघाडीकडून शिक्षण समितीच्या सभापतिपदी शिवसेनेचे अंबरीश घाटगे, ‘बांधकाम’च्या सभापतिपदी जनसुराज्य शक्ती पक्षाचे सर्जेराव पाटील-पेरीडकर, ‘महिला व बालकल्याण’च्या सभापतिपदी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शुभांगी श‌िंदे, समाजकल्याण सभापतिपदी भाजपचे अशोक माने यांची वर्णी शक्य आहे. सभापतिपदासाठी हे प्रबळ दावेदार आहेत.

भाजप आणि विरोधी काँग्रेस आघाडीमुळे जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापती पदही चुरशीचे बनले आहे. यासाठी सदस्यांना सहलीवर पाठविण्यात आले आहे. भाजपच्या घटक पक्षांकडून होत असलेल्या मागणीच्या पार्श्वभूमीवर नाराजांना सोबत घेऊन भाजपला धक्का देण्याचा प्रयत्न काँग्रेस आघाडीने चालवला होता. पण रविवारी रात्रीपर्यंत काँग्रेस आघाडीकडे फारसे सदस्य हाती लागले नाहीत. प्रकाश आवाडे यांना सोबत घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. आवाडे यांचे दोन सदस्य सोबत आल्यास इतर सदस्यांची जोडणी करण्याचा प्रयत्न होता. आवाडे यांच्या होकारासह सभापती पदासाठी भाजप आघाडीतील उमेदवार समजल्यानंतर घटक पक्षांमध्ये निर्माण होणाऱ्या नाराजीवर काँग्रेस आघाडीची भिस्त आहे.

दरम्यान, बांधकाम सभापतिपदासाठी जनसुराज्यचे सदस्य प्रा. शिवाजी मोरे यांचे नावही आघाडीवर आहे. माजी आमदार विनय कोरे यांनी शाहूवाडी तालुक्याला प्राधान्य देण्याचे ठरवल्यास पेरीडकर यांना संधी मिळेल. राधानगरीसाठी पद देण्याचा निर्णय झाल्यास प्रा. मोरे यांना पद मिळेल. निवडणुकीवेळी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये दाखल झालेले जेष्ठ सदस्य अरूण इंगवले यांनी, आपले जावई अंबरीश घाटगेंना शिक्षण सभापतिपद मिळावे यासाठी राजकीय ताकद वापरली. त्यामुळे या पदासाठी अन्य नावे चर्चेत नाहीत. महिला व बालकल्याण सभापतीपदावर स्वाभिमानीच्या पद्माराणी पाटील इच्छुक आहेत. मात्र संघटनेतून ‌शुभांगी शिंदे यांनाच पद द्यावे, असा दबाव वाढला. त्यामुळे शिंदे सभापती होतील. समाजकल्याण सभापतिपद भाजपचे अशोक माने यांना मिळेल. अशी पदे मिळाल्यास चंदगडच्या युवक क्रांती आघाडी, आवाडे गटाला पदापासून वंचित राहावे लागेल.

तिघे गैरहजर ?

चंदगड तालुक्यातील माजी मंत्री भरमू पाटील गटाचे आणि काँग्रेसच्या‌ चिन्हावर निवडून आलेले सचिन बल्लाळ आणि अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीवेळी गैरहजर राहिलेले रेश्मा देसाई, विजय बोरगे (राष्ट्रवादी) हे भाजपच्या आघाडीत दाखल झाल्याची चर्चा रविवारी होती. तसे झाल्यास व्हिप जारी केल्यामुळे कारवाई टाळण्यासाठी तिघेही सदस्य गैरहजर राहतील. त्यामुळे विरोधी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला सभापतिपदाची निवडणूक जिंकण्याचे संख्याबळ मिळवण्यात यश आले नाही. मात्र, नाराजांवर मदार ठेवत सभापतीपदाच्या स्पर्धेत विरोधक राहतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुधाळी प्रभागात नाल्यांच्या देखभालीचे आव्हान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गल्ली बोळांमध्ये वसलेली जुनी वस्ती आणि रंकाळा तलावाशेजारील शेतीमध्ये तयार होत असलेले अपार्टमेंट व बंगले असा परिसर असलेल्या दुधाळी पॅव्हेलियन प्रभागातील बराचसा परिसर सखलामध्ये असल्याने विविध ठिकाणांहून वाहून येणारे सांडपाणी याच परिसरातील मोठा नाला व गटारीतून वाहत असल्याने त्याच्या देखभालीचे मोठे आव्हान आहे. बऱ्याच वर्षानंतर त्यांच्या दुरुस्तीच्या कामांना आता सुरुवात झाली आहे. तसेच रस्त्यांची दुरुस्ती गरजेची असून जुन्या असलेल्या ड्रेनेज लाइनचे नुतनीकरण आवश्यक आहे.

रंकाळ्यालगत असलेल्या प्रभागातून काँग्रेसचे प्रतापसिंह जाधव यांनी भाजपचे हेमंत कांदेकर यांचा पराभव केला. अतिशय दाट लोकवस्ती असलेल्या प्रभागामध्ये जुन्या वस्तीचे प्रमाण प्रचंड आहे. छोट्या गल्ली व बोळांची संख्या जास्त असून या अरुंद रस्ता, पॅसेजमध्ये जुन्या ड्रेनेज लाइन आहेत. दुधाळी मैदानामुळे प्रभागाला दुधाळी पॅव्हेलियन हे नाव देण्यात आले असून आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण केलेली दुधाळी शूटींग रेंज, प्रसिद्ध धुण्याची चावी, विविध प्रकारची हॉस्पिटल्स, शाहू उद्यान, दुधाळी एसटीपी प्लँट भागात आहे.

या परिसरात फिरताना सर्वात जास्त आवश्यक वाटते ती रस्त्यांची दुरुस्ती. अनेक रस्त्यांवर कित्येक वर्षे डांबर पडलेले नाही, असे नागरिक सांगत आहेत. त्यामुळे त्यांची अवस्थाही त्याच प्रकारची आहेत. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कामासाठी करण्यात आलेल्या खोदाईच्या खुणा अजूनही ठिकठिकाणी पहायला मिळतात. त्यांच्यावर फारसे पॅचवर्क झालेले नाही. धुण्याच्या चावीजवळचा एका रस्त्याचे काम केले जात आहे. त्याच्याजवळच असलेल्या व जावळाच्या गणपती मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम आवश्यक आहे. दुधाळी परिसरातील तसेच उत्तरेश्वर भागातील अंतर्गत रस्त्यांचीही दुरुस्ती गरजेची आहे.

रस्त्यांबरोबर दुधाळी परिसरातून जात असलेल्या नाला व गटारीची देखभाल महत्वाची आहे. भागातून मोठा नाला गेला आहे. पावसामध्ये अनेक ठिकाणी पाणी तुंबण्याचे प्रकार नागरिकांना त्रासदायक ठरत होते. काही ठिकाणी अगदी उथळ तर दुधाळी मैदानाशेजारी अतिशय खोल आहे. सध्या शिवतारा हॉटेलजवळील नाला बंदिस्त करण्याचे काम सुरु आहे. तिथून पुढे दुधाळी मैदानाजवळील कोपऱ्यावर कित्येक वर्षापासून ढासळलेल्या भिंतीचे कामही महिनाभरापूर्वी सुरु करण्यात आले आहे. छोट्या गटारींची दुरुस्ती करण्याची गरज आहे. या प्रभागात रंकाळा चौपाटीपासून नागोजीराव पाटणकर हायस्कूलसमोरील प्रचंड वर्दळीचा रस्ता आहे. या परिसरात वाहतूक सुरळीत होण्याच्यादृष्टीने काही उपाययोजना आवश्यक आहेत. महापालिकेच्या मामा भोसले विद्यालयाची जुनी इमारत मोडकळीस आली आहे. मध्यवस्तीत असलेल्या या इमारतीची डागडुजी गरजेची आहे.

निवडून आल्यानंतर प्रभागातील ड्रेनेज, गटारींच्या कामांची गरज लक्षात घेऊन स्वखर्चाने क्रॉसड्रेन, गटारींचे नुतनीकरण, सिमेंट पाइप टाकून देण्याचे काम केले आहे. या परिसरातील धुण्याची चावी हा ऐतिहासिक ठेवा आहे. तो जपण्यासाठी २० लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून तेथील फरशी, वीजेची व्यवस्थाही केली जाणार आहे. १७ वर्षानंतर ही धुण्याची चावी सुरु करण्यात आली आहे. याबरोबर परिसरातून वाहणाऱ्या संपुर्ण दुधाळी नाल्याचे नुतनीकरण करण्यासाठी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर आहे. त्याअंतर्गत काही ठिकाणी मोठ्या पाइप टाकून नाला बं​दिस्त करुन रस्ता प्रशस्त करण्यात आला आहे. तर दुधाळी मैदानाशेजारील पडलेल्या भिंतीचे काम सुरु आहे. विकास विद्यामंदिरसमोरील नाल्याची दुरुस्ती करण्यात आली आहे. दुधाळी पॅव्हेलियनच्या नुतनीकरणासाठी ३ कोटी रुपये मंजूर आहेत. त्याच्याही कामाला लवकर सुरुवात होईल. दुधाळी एसटीपीचे काम सुरु आहे. त्यातून भागात नवीन ड्रेनेज लाइन टाकण्यात येणार आहेत. सध्या नाला, गटारींचे, क्रॉसड्रेनचे काम सुरु असल्याने रस्त्याची कामे केलेली नाहीत. रंकाळावेश स्टँड ते उत्तरेश्वर नाका, हरि मंदिर टॉवर ते उत्तरेश्वर महादेव मंदिर, धुण्याच्या चावीचा रस्त्याची कामे मंजूर आहेत.

- प्रतापसिंह जाधव, नगरसेवक

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या फंडातून काही कामे सुरु आहेत. धुण्याच्या चावीजवळून जावळाच्या मंदिराकडे जाणारा रस्ता करण्याची गरज आहे. मंत्री पाटील, पूर्वीच्या नगरसेवकांनी दिलेल्या तसेच आत्ताच्या नगरसेवकांनी आणलेल्या फंडातून भागात कामे सुरु आहेत. पण रस्त्यांची कामे प्राधान्याचे करण्याची गरज आहे. राजमाता मंडळ परिसरातील भागात जुन्या ड्रेनेज लाईन आहेत. त्यांचे नुतनीकरणही आवश्यक आहे. पूर्वीपासून ज्या पद्धतीने सफाई होत आली आहे, तशीच आताही सुरु आहे.

- हेमंत कांदेकर, प्रतिस्पर्धी उमेदवार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापुरात उष्माघाताचा एक बळी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दिवसभर उन्हात काम केल्यानंतर शनिवारी रात्री शेळके पुलाजवळ बसलेल्या अरविंद शामराव सुतार (वय ५०, रा. कुंभार गल्ली, शाहूपुरी) यांचा मृत्यू झाला. रविवारी (ता. ३ एप्रिल) सकाळी त्यांचा मृतदेह आढळला. सीपीआरमध्ये वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर सुतार यांचा मृत्यू उष्माघाताने झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या घटनेने कोल्हापूर जिल्ह्यात उष्माघाताच्या पहिल्यांदाच एका व्यक्तीची मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

सीपीआरमधील वैद्यकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शाहूपुरीतील कुंभार गल्लीत राहणारे अरविंद सुतार हे फरशी बसविण्याचे काम करतात. अविवाहीत असलेले अरविंद हे भावाकडे राहत होते. शनिवारी दिवसभर काम करून आल्यानंतर त्यांनी रात्री जेवण केले आणि नेहमीप्रमाणे फिरण्यासाठी घराबाहेर पडले. शेळके पुलाजवळील कट्ट्यावर ते रात्री उशिरापर्यंत बसले होते. रविवारी सकाळी बसलेल्या ठिकाणीच त्यांचा मृतदेह आढळला. परिसरातील नागरिकांनी याची माहिती कुंभार यांच्या नातेवाईकांना दिली. शाहूपुरी पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. अरविंद यांच्या नाक व कानातून रक्तस्राव झाल्याचे दिसले. त्यामुळे हा खुनाचा प्रकार आहे का? असा संशय पोलिसांना आला.

मात्र, सीपीआरमध्ये मृतदेहाची उत्तरीय तपासणी झाल्यानंतर उष्णता व उकाड्यामुळे मेंदूतील रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. उष्माघाताने त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. शाहूपुरी पोलिस ठाण्यात मात्र आकस्मित मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. अरविंद यांच्या आईचे दोन महिन्यांपूर्वीच निधन झाले होते.


वाढत्या तापमानामुळे माणसाच्या नाक आणि कानातून रक्त बाहेर पडते. अरविंद सुतार यांच्या बाबतीत तसेच झाले आहे. त्यामुळे हा उष्माघाताचा बळी असल्याचे स्पष्ट होते. पीएम अहवालातही याची नोंद आहे.

- डॉ. एल. टी. बोरसे, वैद्यकीय अधिकारी सीपीआर हॉस्पिटल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अक्षता गोळा करून ते चिऊताईला घास देतात!

$
0
0

सोनाळीच्या साबळे यांचा ‘अक्षता’रूपी अनोखा उपक्रम

प्रकाश कारंडे, कागल

एखाद्या लग्नात अक्षता (तांदूळ) पडल्या की, प्रत्येकजण एकतर घरी जाण्याची गडबड करतो अथवा जेवण विभागाकडे धाव घेतो. परंतु कागल तालुक्यातील सोनाळी येथील सुदाम साबळे (वय ७१) हे मात्र पडलेल्या अक्षता गोळा करण्यासाठी थांबतात. माणसांची वर्दळ कमी झाली की पडलेले तांदूळ गोळा करतात आणि चिमण्यांना खाऊ घालतात. आजच्या संगणकीय युगात माणसे स्वत:च्या माणसांपासून दूर चालली असताना चिमण्या पाखरांना मायेची ऊब देवून व पर्यावरण वाचविण्याचे हे काम सोनाळी (ता.कागल) येथील सुदाम तुकाराम साबळे गेल्या ३५ वर्षांपासून अखंडपणे करत आहेत.

साबळे यांचे शिक्षण अवघे सहावीपर्यंतचे. त्यामुळे त्यांनी आपल्या उदरनिर्वाहासाठी बिद्री साखर कारखान्यात नोकरी पत्करली. एकेदिवशी दुपारच्या जेवणानंतर डबा धुताना त्यातील पडलेले जेवण खाण्यासाठी चिमण्या जमा झाल्या. काही दिवस असेच चालल्यानंतर वाढत्या चिमण्यांचा साबळेंना लळा लागला. तेंव्हापासून साबळे जेंव्हा कामावरती जात तेव्हा स्वत:च्या दुपारच्या डब्यातून चिमण्यांसाठी जादा जेवण अथवा वेगळा ‘खाऊ’ घेवून जात असत. जेव्हा ते कामावर हजर व्हायचे तेंव्हा त्यांच्या कामाशेजारी चिमण्यांच चिवचिवाट सुरु व्हायचा. इतर कामगारांना या छंदाचे आश्चर्य वाटायचे. नोकरीतून निवृत्त झाल्यावरही त्यांनी यात खंड पडू दिला नाही. लग्नात आमंत्रण असो अथवा नसो, हॉल अथवा देवळात लग्न असेल तर हमखास साबळे या लग्नाला उपस्थित राहतात. अक्षता पडल्यानंतर तांदूळ गोळा करतात आणि चिमण्यांची सोय करतात. महिन्याकाठी १५ ते २० किलो तांदूळ ते ऐनकेन प्रकारे मिळवतातच. त्यातूनही कमी पडल्यास राईस मिलचालकांना विनंती करुन ते तांदळाची कणी मिळवतात. येथील राहुल तेली महिन्याला ३ ते ४ किलो तांदळाची कणी देवून त्यांच्या या छंदाला थोडासा हातभार लावतात. त्यातूनही तांदूळ कमी पडल्यास साबळे प्रसंगी विकत घेतात, पण चिमण्यांना रिकामे परत पाठवत नाहीत. त्यांच्या घराभोवती चिमण्यांचा वावर नेहमीच असतो.

एवढ्यावरच न थांबता वृक्षारोपणाचे महत्व पटवून देण्याकरिता प्रत्येक वर्षी साबळे हे नवीन वृक्षरोपे लावून त्यांचे संगोपन करत आहेत. १९९४ साली त्यांनी समाज मंदिराच्या परिसरात पिंपळाचे रोपटे लावला. त्याचा आता वटवृक्ष झाला आहे. त्या पिंपळाच्या झाडाचा वाढदिवस गेली २३ वर्षे प्रत्येक १४ जानेवारीला साजरा करुन समाजाला वृक्षसंवर्धनाचा संदेश देत समाजप्रबोधनाचे त्यांचे कार्य अव्याहतपणे सुरु आहे. याबरोबरच गेली २५ वर्षे ते गरीब होतकरु मुलांना आपल्या ऐपतीप्रमाणे पाच डझन वह्याही वाटप करतात. याशिवाय साबळे यांना ‘कविता’ करण्याचाही छंद आहे. त्यांचा कवितासंग्रह मे २०१७ मध्ये प्रकाशित होत आहे.

‘एकीकडे पर्यावरणाचा ऱ्हास होत असताना अशा माध्यमातून प्रत्येक नागरिकाने कर्तव्य म्हणून पुढे आले पाहीजे. लग्न समारंभात अक्षतांसाठी तांदूळ वापरुन ते वाया घालवण्यापेक्षा त्याचा सदुपयोग करुन पर्यावरण रक्षणाला हातभार लावता येतो, हे मी कृतीतून समाजाला दाखवत आहे. माझ्या जीवात जीव असेपर्यंत हा उपक्रम मी करीत रहाणार आहे.’’

- सुदाम साबळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ डॉ. अशोक चौसाळकरांनामहर्षी शिंदे पुरस्कार जाहीर

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सातारा

रा. ना. चव्हाण प्रतिष्ठान, वाई यांच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा २१वा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार प्रा. डॉ. अशोक चौसाळकर यांना जाहीर झाला आहे. १९८० नंतरच्या काळात मराठी भाषेतील वैचारिक साहित्याच्या क्षेत्रात महत्त्वाची भूमिका डॉ. चौसाळकर यांनी बजावली आहे. प्रतिष्ठानचे ज्येष्ठ विश्वस्त आणि सामाजिक कार्यकर्ते, दलितमित्र संभाजीराव पाटणे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

या पुरस्काराचे वितरण रा. ना. चव्हाण यांच्या २४व्या स्मृतिदिनी, दहा एप्रिल रोजी ब्राह्म समाज रविवार पेठ, वाई येथे सकाळी साडेनऊ वाजता ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व विचारवंत बाबा आढाव यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक प्रा. डॉ. द. ता. भोसले यांच्या हस्ते होणार आहे.

दलितमित्र रा. ना. चव्हाण यांनी ज्यांच्या प्रेरणेने आपले प्रबोधनपर साहित्य समृद्ध व समर्थ केले त्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात, संशोधन क्षेत्रात व साहित्यिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या व्यक्तीस दर वर्षी सन्मानपूर्वक दिला जातो. स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

समाजप्रबोधन पत्रिकेचे संपादक असलेले प्रा. डॉ. अशोक चौसाळकर राज्यशास्त्राचे नामवंत प्राध्यापक आणि राजकीय विश्लेषक म्हणून ओळखले जातात. शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख आणि प्राध्यापक म्हणून ते सेवानिवृत्त झाले आहेत. एक निष्णात राजकीय, सामाजिक विश्लेषक म्हणून ते सतत सक्रिय राहिले असून, त्यांनी संशोधनाच्या व वैचारिक लेखनाच्या क्षेत्रात वेगळा ठसा उमटविला आहे. मराठी व इंग्रजी या दोन्ही माध्यमातून विपुल, अशी ग्रंथसंपदा त्यांनी निर्माण केली आहे. १९व्या शतकातील सामाजिक आणि धर्मविचार हा त्यांच्या चिंतनाचा विषय आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images