Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

ऑन ड्युटी चोवीस तास

0
0
गणेशोत्सवातील बंदोबस्तासाठभ्‍ शहर व उपनगरात सुमारे ८०० पोलिस तैनात आहेत. या काळात सुट्या आणि रजा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्व पोलिस रस्त्यावर दिसून येत आहेत.

आली गौराई अंगणी...

0
0
‘आलीस का गौराबाई, आले गं बाई,’ ‘अशा हाकेला, कशाच्या पायी,’ ‘हळदीकुंकवाच्या पायी, भाजीभाकरीच्या पायी, धनसंपदेच्या पायी, सुखशांतीच्या पायी,’ अशी मांगल्याची साद देत बुधवारी घरोघरी ज्येष्ठा गौरीचे आगमन झाले.

दमदार पावसाने शेतकरी सुखावला

0
0
गणरायाच्या आगमनाबरोबरच पावसाने चांगली सुरूवात केली आहे. गेले तीन दिवस अधून मधून चांगल्या सरी कोसळत आहेत.

जादूटोणा विरोधी कायदा कमजोर नाही

0
0
‘जादूटोणा विरोधी कायदा कमजोर होईल, असे कोणतेही बदल जादूटोणा विरोधी कायद्यात केलेले नाहीत, त्यामुळे कायदा कमजोर नाही,’ अशी माहिती अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक व राष्ट्रीय संघटक प्रा. श्याम मानव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शॉर्ट सर्किटने आग; माणमध्ये तिघांचा मृत्यू

0
0
सातारा जिल्ह्यातील दुष्काळी माण तालुक्यातील शेनवडी येथे मंगळवारी मध्यरात्री घराला शॉर्ट सर्किटने आग लागली. या भीषण आगीत आई, मुलगा आणि मुलगी यांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेने शेनवडी गावावर शोककळा पसरली आहे.

पोलिस भरती फसवणूक; साताऱ्यात ३ अटकेत

0
0
सातारा जिल्हा पोलिस दलाची मे महिन्यात भरती प्रक्रिया झाली. यावेळी भरतीसाठी आलेल्या उमेदवाराने लेखी परीक्षेस आणि मैदानी परीक्षेस दुसऱ्याला बसवून सरकराची फसवणूक केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

कोल्हापूर खंडपीठासाठी विविध संस्थांचे १७५ ठराव

0
0
कोल्हापूर खंडपीठासाठी सांगली जिल्ह्यातील विविध संस्थांनी वकील संघटनेकडे दिलेले १७५ ठराव स्पीड पोस्टाने मुख्यमंत्री आणि हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांना पाठविण्यात आले आहेत.

जेलच्या भिंतीवरून उडी टाकून २ आरोपी फरार

0
0
सोलापूर येथील सबजेलच्या भिंतीवरून उडी टाकून दोन आरोपी फरार झाले. बुधवारी पहाटे जेलच्या दर्शनी भागातील भिंतीवर चढून मुख्य प्रवेशद्वारासमोर उडी मारून आरोपी पळाले असावेत, असा संशय व्यक्त केला जात आहे.

‘दौलत’च्या संचालकांची मालमत्ता जप्त करा

0
0
उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार दौलत सरकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठी दोन दिवसात निविदा प्रसिद्ध करावी व ‘दौलत’ची विक्री करू नये,संचालकांची मालमत्ता जप्त करुन त्यांच्या मालमत्तेवर बोजा नोंद करा अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हा बँकेचे प्रशासक प्रतापसिंह चव्हाण यांच्याकडे केली.

‘AVH‘विरोधातील याचिकेवर २० ला सुनावणी

0
0
हलकर्णी (ता. चंदगड) येथील औद्योगिक वसाहतीमध्ये काम सुरू असलेल्या व्हीएच केमिकल प्रकल्पाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेविरोधात वतीने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर २० सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

जिल्हा परिषदेची स्वच्छ, सुंदर गाव स्पर्धा

0
0
जिल्हा परिषदेमार्फत ग्रामपंचायतींसाठी गणेशोत्सवानिमित्त स्वच्छ व सुंदर गाव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

विवाहिता आत्महत्या : पतीसह ४ ताब्यात

0
0
राजगोळी खुर्द (ता. चंदगड) येथील मदिना उर्फ अर्पिया सिकंदर कांडगावकर (वय २१) या विवाहितेच्या आत्महतेप्रकरणी पती सिंकदर बाबू कांडगावकर, दीर फिरोज, सासू शहीदाबीन व जाऊ यास्मीन फिरोज कांडगावर यांना आज अटक करण्यात आली.

अविश्वास ठरावाआधीच अॅड. शिंदे यांचा राजीनामा

0
0
गेल्या पंधरा वर्षांपासून एकहाती सत्ता असलेल्या आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या अध्यपदाचा अॅड. श्रीपतराव शिंदे यांनी राजीनामा दिला.

हे तर संचालक मंडळाचे नाटक

0
0
अॅड. श्रीपतराव ‌शिंदे यांच्यावरील अविश्वास ठराव हे संचालक मंडळाचे नाटक आहे. भ्रष्ट संचालकांच्या संपत्तीवर टाच आणून प्रशासकाची नियुक्ती करा अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलनाचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्ड्याण्णावर यांनी बुधवारी दिला.

भाकरे मृत्यू : SP कडून चौकशी होणार

0
0
महापालिका कामगार अधिकारी नितीन भाकरे यांच्या मृत्यूप्रकरणी नगरसेवक महेश गायकवाड यांच्याविरोधात आलेल्या अर्जांची पोलिसांकडून चौकशी होणार आहे.

अमित शिंदे खून : ६ जणांना अटक

0
0
अमित चंद्रसेन शिंदे याच्या खूनप्रकरणी सहा संशयितांना गांधीनगर पोलिसांनी बुधवारी अटक केली. संशयितांनी स्वप्नील तहसीलदार याच्या सांगण्यावरून शिंदेचा खून केल्याची कबुली दिली.

ग‌‌णित विषय होणार आवडीचा

0
0
गणिताबद्दलची शाळकरी मुलांच्या मनातील भीती दूर व्हावी यासाठी गणित विषय शिकवणीला रंजकतेची आणि वेगवेगळ्या पध्दतीची जोड दिली जाणार आहे.

मूर्ती विसर्जनासाठी शेततळ्यांचे काम सुरू

0
0
मूर्ती विसर्जनामुळे पंचगंगा नदीचे प्रदूषण होत असल्याने विसर्जनस्थळी विसर्जन कुंड बांधण्यासाठी महापालिकेच्यावतीने गुरुवार (दि.१२) पासून पंचगगा नदी, राजाराम बंधारा व बापट कॅम्प येथे विसर्जनासाठी शेततळी बांधण्याचे काम सुरू होणार आहे.

तेलनाडेच्या घरी तपासणी

0
0
कुख्यात गुंड भरत त्यागी याच्या खूनातील मुख्य सूत्रधार नगरसेवक संजय तेलनाडे याला आज कोल्हापूर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने तपासासाठी इचलकरंजीत फिरवले.

आधारसाठी १०० केंद्रे कार्यरत

0
0
जिल्ह्यातील २२ लाख १५ हजार ३४१ लोकांनी आत्तापर्यंत आधार ओळखपत्रासाठी नोंदणी केली आहे. जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून 'आधार' कार्ड योजनेच्या सध्या दुसऱ्या टप्यात जिल्हयात १०० ठिकाणी नोंदणीचे काम सुरु झाले आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images