Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

केएमटी ऑनलाइन

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

महापालिकेच्या परिवहन उपक्रमातंर्गत प्रवासांच्या सोयीसाठी ई तिकिटींग यंत्रणा, मोबाइल अॅपव्दारे तिकीट व पास विक्री, बसमधील जीपीएस यंत्रणा लवकरात लवकर कार्यान्वित करण्याच्या सूचना परिवहन समिती सभेत करण्यात आल्या. सभापती नियाज खान यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन समितीची सभा झाली.

बिंदू चौक येथील पे अँड पार्क योजनेसाठी मागविलेल्या निविदामधील जादा दराची श्रीमती भारती माने यांची निविदा मंजूर करण्यात आली. तसेच शहरांत बीओटी तत्त्वावर उभारलेल्या शेडससंबंधीच्या करारात सुधारणा प्रस्तावास मान्यता देण्यात आली. नगरसेवकांनी प्रवाशांची गर्दी असणाऱ्या लुगडी ओळ, समाधान हॉटेल, मध्यवर्ती बस स्थानक परिसर, पाडळकर मार्केट या थांब्यावर वाहकाव्दारे स्टॉप बुकिंग सुरु करण्याच्या सूचना केल्या. दोन मार्चपासून स्टॉप बुकिंग उपलब्ध करण्यात येईल, असे अतिरिक्त व्यवस्थापक सं​जय भोसले यांनी सांगितले.

प्रशासनातर्फे लवकरच ५० चालकांची कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती करण्यात येईल, असे सांगितले. नगरसेवक सचिन पाटील यांनी बसमधील डिझेल संपण्याच्या प्रकाराबाबत विचारणा केली. चालकांच्या अनुपलब्धतेमुळे वीस बसेस बंद ठेवाव्या लागल्याबाबत सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. नगरसेवक शेखर कुसाळे व चंद्रकांत सुर्यवंशी यांनी दैनंदिन प्रवासी उत्पन्नातील त्रुटींबाबत तीव्र नापसंती व्यक्त केली. चर्चेत नगरसेवक प्रविण केसरकर, सुनंदा मोहिते, लाला भोसले, शोभा कवाळे, विजय खाडे, उमा बनछोडे, सयाजी आळवेकर, सुहास देशपांडे यांनी सहभाग घेतला. यावेळी स्थायी सभापती संदीप नेजदार यांचा सत्कार करण्यात आला. नगरसचिव दिवाकर कारंडे उपस्थित होते.

...........

अनधिकृत प्रवासी वाहतुकीवर कारवाई करावी

शहर व उपनगरातून केएमटी थांब्यावरुन तीन व सहा आसनी रिक्षांकडून मोठ्या प्रमाणात अनधिकृत प्रवासी वाहतूक केली जाते. अशा वाहनांवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन नगरसेवकांनी, वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांना दिले. त्याचबरोबर माधुरी बेकरी ते देवल क्लब या एकेरी मार्गावर व रेल्वे स्टेशन परिसरातून केएमटी बसेसना प्रवेश देण्यात यावा. छत्रपती शिवाजी चौक, लुगडी ओळ, गंगावेश, समाधान हॉटेल या थांब्यावरुन मोठ्या प्रमाणात अनधिकृत प्रवासी वाहतूक होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जि. प.तही पदांची खांडोळी

$
0
0

Sachin.Yadav@timesgroup.com

tweet : @sachinyadavMT

कोल्हापूर: काहीही करायचे पण सत्ता मिळवायची. यासाठी सत्तेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक पक्षाच्या सदस्यांना पदे देण्याची तयारी भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी केली आहे. अध्यक्ष, उपाध्यक्षांसह विषय समित्यांच्या सभापतिपदाचीही खांडोळी होण्याचे संकेत दिले जात आहेत. महापालिकेत सर्वाना खूश करण्यासाठी होणारी पदांच्या खांडोळी करण्याची परंपरा आता जिल्हा परिषदेतही सुरू होणार आहे.

सत्तेत सहभागी झाल्यास त्यांना देण्यात येणारी पदांची यादीही नेत्यांनी तयार केली आहे. पाच वर्षांत जिल्हा परिषदेतील आठ पदे ३४ जणांना देण्याचे नियोजन आहे. संख्याबळ अधिक असलेल्यांना महत्त्वाची पदे देण्याचे नियोजन सुरू आहे. पंचायत समितीची १२ पदांची संभाव्य यादीही तयार असून सत्तेत सहभागास होकार दिल्यास स्वाक्षरीची प्रतीक्षा आहे.

कोल्हापूर जिल्हा परिषदेत कोणत्याही राजकीय पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसल्याने त्रिशंकू अवस्था झाली आहे. त्यामुळे ३४ प्लस संख्याबळ मिळविण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप प्रणित आघाडी कडून प्रयत्न सुरू झाले आहेत. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, अर्थ आणि शिक्षण समिती सभापती, बांधकाम आणि आरोग्य समिती सभापती, समाजकल्याण समिती सभापती, महिला, बालकल्याण समिती सभापती ही विषय समित्यांची पदे आहेत. कृषी, पशुसंवर्धन, दुग्धशाळा विकास समितीचे सभापती पद उपाध्यक्षांच्याकडे असते. जलव्यवस्थापन आणि स्वच्छता समितीचे पद अध्यक्षांकडे असते. नवीन सभागृहात ही पदे स्वतंत्रपणे दिल्यास आठ सभापती होणार आहेत. जिल्हा परिषदेच्या चाव्या मिळविण्यासाठी ३४ प्लस सदस्यांसाठी रस्सीखेच सुरू झाली आहे.

राष्ट्रीय काँग्रेसकडे १४, राष्ट्रवादी काँग्रेसकडे ११ असे दोन्ही काँग्रेस मिळून २५ सदस्य संख्या आहे. बहुमतासाठी दोन्ही काँग्रेसकडून सदस्य मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. आवाडे गटाची कोल्हापूर जिल्हा ताराराणी विकास आघाडीचे २, अपक्ष १ असे तीन सदस्य मिळून २८ संख्याबळ होते. बहुमतासाठी सहा सदस्यांची गरज आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दोन सदस्य आल्यास ३० सदस्य संख्या होते. चार सदस्य मिळविण्यासाठी दोन्ही काँग्रेसकडून शिवसेनेचे काही सदस्य फोडण्याचे प्रयत्न सुरू झाले आहे. मुंबई महानगरपालिकेतील पाठिंबा आणि शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आदेश दिल्यास भाजप- शिवसेना युती शक्य आहे. ही युती तुटल्यास काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना युती झाल्यास पद वाटपाची तयारी करून ठेवली आहे. तीन्ही पक्षांचे संख्याबळ ३८ होते. सत्तेत सहभागी झालेल्यांना वर्षाला आठ पदे दिल्यास पाच वर्षात ४० पदे देता येणे शक्य आहे. त्याची यादीही पक्षप्रमुखांनी तयार केली आहे.

भारतीय जनता पक्षानेही सत्तेत सहभागी होणाऱ्यांना इच्छुकांना पदे देण्याची तयारी दर्शविली आहे. त्यासाठी निवडणुकीत मोलाची मदत करणाऱ्यांची सल्ला घेऊन सदस्याची शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि जबाबदारी सभापती पद सांभाळण्याची तयारी याचा अंदाज घेतला जात आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेतील विविध सभापती आणि पंचायत समिती सभापतींची संभाव्य नावे निश्चित केली जात आहेत. भाजपच्या १४, शिवसेनेच्या १०, जनसुराज्य ६, ताराराणी पक्ष आघाडी ३, शाहू आघाडी २, युवक क्रांती आघाडी २ असे एकूण ३७ संख्याबळाचे गणित मांडले जात आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनाही सत्तेत आल्यास पदे देण्याची तयारी दर्शविली आहे.

२१ मार्चला फैसला

जुन्या सभागृहाची मुदत २० मार्चला संपणार आहे. नवीन सदस्यांची पहिली सभा २१ मार्चला होत आहे. त्यापुर्वीच अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या दोन पदांची नावे निश्चित केली जाणार आहेत. भाजपकडून सत्ता स्थापनेसाठीचा जादूई आकडा दोन मार्चला ठरण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर शिवसेनेच्या पाठिंबाचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बारावी परीक्षेला प्रारंभ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वर्षभराचा अभ्यास, परीक्षेची उत्सुकता, काहीसा ताण अशा संमिश्र वातावरणात मंगळवारी २८ रोजी बारावीच्या विद्यार्थ्यांनी पहिला पेपर दिला. परीक्षा केंद्रावरील परीक्षा क्रमांक शोधण्यापासून ते परीक्षागृहात जाण्यापर्यंतचा तणाव विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. मित्रमैत्रीणींना ‘बेस्ट ऑफ लक’ अशा शुभेच्छा देत बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू झाली. सकाळी दहा वाजल्यापासूनच बारावी परीक्षेच्या केंद्राबाहेरील परिसर गर्दीने गजबजला. विद्यार्थ्यांसोबत आलेले काही पालक दुपारी दोन वाजेपर्यंत केंद्राच्या बाहेर थांबून राहिले.

राज्य माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (एसएससी बोर्ड) घेण्यात येणाऱ्या बारावी परीक्षेला यावर्षी एक लाख ३२ हजार २१८ विद्यार्थी प्रविष्ठ झाले असून, कोल्हापूर विभागांतर्गत सांगली आणि सातारा जिल्ह्यांचाही समावेश आहे. कोल्हापूर, सांगली व सातारा या तीन जिल्ह्यात ५८८ कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी १४९ केंद्रांवर परीक्षेला प्रारंभ झाला.

सकाळी साडेदहा वाजता पहिल्या पेपरची घंटा वाजली आणि केंद्राबाहेर थांबलेल्या विद्यार्थ्यांसह पालकांच्या चेहऱ्यावर परीक्षेबाबतची उत्सुकता ताणली होती. ज्या विद्यार्थ्यांचा क्रमांक बाहेरच्या केंद्रावर पडला होता त्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर परीक्षेचा ताण ​​अधिक जाणवत होता. विद्यार्थी पालकांसोबत सकाळी दहा वाजताच केंद्रात उपस्थित होते. केंद्राच्या बाहेर लावण्यात आलेल्या फलकावर परीक्षा क्रमांक आणि त्याची वर्गखोली यांचा तपशील लिहिण्यात आला होता. त्यामुळे आपला नंबर कुठल्या वर्गात आहे हे पाहण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी झाली.

पोलिस बंदोबस्त आणि आरोग्ययंत्रणा

शहरासह विभागातील संवेदनशील केंद्रावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पहिला पेपर इंग्रजी असल्यामुळे कॉपीमुक्त परीक्षा या मोहिमेतंर्गत अनेक केंद्रावर भरारी पथकाच्या सदस्यांनी भेट देऊन पाहणी केली. उन्हामुळे विद्यार्थ्यांना त्रास जाणवल्यास तातडीने त्यांना उपचार मिळावेत यासाठी अॅम्ब्युलन्स व आयोग्य यंत्रणाही काही केंद्रामार्फत सज्ज ठेवण्यात आली होती.

भरारी पथके तैनात

कॉपीमुक्त परीक्षा मोहीम राबवण्यासाठी यंदाही भरारी पथकांची रचना काटेकोर करण्यात आली आहे. तसेच संवेदनशील परीक्षा केंद्रांवर सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्यामुळे या केंद्रांची पाहणी करण्यात येणार आहे. परीक्षाकाळात विद्यार्थ्यांना अधिकाधिक ताणमुक्त वातावरण मिळावे यासाठी बोर्डातर्फे अधिकृत समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, गारगोटी येथे एका केंद्रावर कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यावर भरारी पथकाने कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारी वकील राणे यांच्या नियुक्तीला आक्षेप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येप्रकरणी सुरू असलेल्या खटल्यातील विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे यांच्या नियुक्तीला आरोपींचे वकील समीर पटवर्धन यांनी आक्षेप घेतला. पोलिस अधीक्षकांना अशी नियुक्ती करता येत नाही, असा दावा त्यांनी सुनावणीवेळी केला. मात्र अॅड. राणे यांनी नियुक्तीचे पत्रे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश एल.डी. बिले यांच्यासमोर सादर केली. खटल्याची पुढील सुनावणी १६ मार्चला होणार असून, यावेळी राणे यांच्या नियुक्तीबाबत निर्णय होणार आहे.

मंगळवारी मुख्य न्यायमूर्ती बिले यांच्यासमोर खटल्यातील प्रमुख आरोपी, सनातन संस्थेचा प्रमुख साधक समीर गायकवाडला हजर करण्यात आले. सुनावणी सुरू झाल्यावर गायकवाडचे वकील पटवर्धन यांनी गृह विभागाचे पत्र सादर केले. विक्रम भावे यांनी माहिती अधिकाराखाली गृहखात्याकडे राणे यांच्या नियुक्तीबाबतची माहिती मागवली होती. त्यात माहिती व कक्ष अधिकारी अ.वि. जोशी यांनी खटल्यात अॅड. राणे यांची गृह विभागाने विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून नियुक्ती केली नसल्याचे स्पष्ट केलेआहे. हे पत्र सादर केल्यावर न्यायाधीश बिले यांनी राणे यांच्याकडे विचारणा केली.

त्यावर राणे यांनी अशी नियुक्ती केलेली दोन पत्रे कोर्टापुढे सादर केली. हिंदू जनजागरण समितीचा डॉ. वीरेंद्रसिंह तावडे याला अटक केल्यानंतर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कार्यालयातील सुनावणीसाठी तत्कालीन पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी १६ ऑक्टोबर २०१६ रोजी ऑर्डर दिली होती. तसेच जिल्हा कोर्टातील सुनावणीवेळी पोलिस अधीक्षक देशपांडे यांनी ३ जानेवारी २०१७ रोजी विशेष सरकारी वकील नियुक्तीचे पत्र दिले होते. ही दोन्ही पत्रे राणे यांनी सादर केली. त्यावर पोलिस अधीक्षकांना अशी नियुक्ती करता येत नाही,, असा अध्यादेश असल्याचा दावा अॅड. पटवर्धन यांनी केला.

आरोपीचे वकील पटवर्धन यांनी गोविंद पानसरे यांनी वीस वर्षांत केलेला पत्रव्यवहार व त्यांच्या बँक खात्याची माहिती मिळावी, अशी मागणी करणारा अर्ज केला आहे. पानसरे यांनी अखंडपणे शोषितांसाठी लढा दिला होता. यादरम्यान त्यांच्याशी कुणाचे वैर निर्माण झाले का? ते तपासता येईल, असे पटवर्धन यांनी सांगितले.

समीरच्या हातात सनातनचा अंक

सनातन प्रभातचा अंक देण्याची मनाई असतानाही पोलिसांच्या उपस्थितीत समीर गायकवाडच्या हातात सनातन प्रभातचा अंक पाहायला मिळाला. समीरने सनातनचा अंक, जपमाळ व अगरबत्तीची मागणी केली होती. कोर्टाने त्याला जपमाळ वापरायला परवानगी दिली होती. पण, मंगळवारी सुनावणीनंतर पोलिस बंदोबस्तात समीरला कळंबा कारागृहात नेताना त्याच्या हातात अंक पाहायला मिळाल्याने खळबळ उडाली.

००००००००००००००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिनी ट्रेन बंद, खेळणी मोडकळीस

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

सुटीच्या दिवशी शहरातील एखाद्या बागेत आवर्जून जावे, अशी ठिकाणे कोल्हापुरात फार कमी आहेत. जी आहेत तेथील खेळण्यांची अवस्था पाहून पालक आपल्या मुलांना पुन्हा तिकडे घेऊन जाणार नाही, अशी परिस्थिती आहे. महावीर गार्डनची सध्याची अवस्थाही त्याहून फार वेगळी नाही.
शहरात १९७२ च्या सुमारास महापालिकेचे तत्कालीन प्रशासक द्वारकानाथ कपूर यांनी पुढाकार घेत पालिकेचा निधी आणि लोकसहभागातून महावीर गार्डनची उभारणी केली. पण, या गार्डनची सध्याची अवस्था फारशी समाधानकारक नाही. गार्डनमधील साहित्य मोडलेले आहे. या मोडलेल्या साहित्यातच मुले खेळताना दिसतात. घसरगुंडी मोडकळीस आल्यामुळे लहान मुलांना अपघात होण्याचा धोका आहे. लहान मुलांना एक चांगला विरंगुळा ठरू शकणारी मिनी ट्रेन कोण जाणे कित्येक महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे येथे ‌खेळायला येणाऱ्या मुलांच्या उत्साहावर पाणीच पडते.
रंकाळा चौपाटी सोडल्यास शहरातील एक मोठे गार्डन म्हणून महावीर गार्डनची ओळख आहे. त्यामुळे रोज हजारो नागरिक सकाळी, संध्याकाळी गार्डनमध्ये येत असतात. गार्डनमध्ये ४०० मीटरचा जॉगिंग ट्रॅक आहे. सकाळी येथे फिरायला येणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे. पण, जॉगिंगची वेळोवेळी देखभाल करणेही गरजेचे आहे. गार्डनमधील कारंजाही सुस्थितीत नाही. लहान मुलांच्या खेळण्याच्या भिंतीमधील सळ्या बाहेर आल्याने ती धोकादायक ठरत आहेत. गार्डनला संरक्षक भिंत नसल्यामुळे गार्डन बंद केल्यानंतरही काही लोक गार्डनच्या मागील बाजूने आतमध्ये जातात. त्यामुळे येथे संरक्षक भिंत तातडीने उभारण्याची गरज आहे. शनिवार, रविवार गार्डनमध्ये मुलांची संख्या लक्षणीय असते. पण, येथे येऊन मनसोक्त खेळल्याचा आनंद त्यांना मिळत नाही, हे कुणीही मान्य करेल. एकूणच महावीर गार्डनला नवसंजीवनी देण्याची आवश्यकता आहे.

000000000000000000

दिवे लावण्याची गरज

गार्डनमधील अनेक दिवे बंद आहेत. यातील काही फुटले आहेत, तर काही निकामी आहेत. याकडे महापालिकेच्या उद्यान विभागाचे दुर्लक्ष होत आहे. गर्द झाडी असल्याने किडे, सापांची भीती असते. त्यातच अंधारामुळे ही भीती वाढते. त्यामुळे अंधार पडला, की तातडीने मुलांन घेऊन बाहेरच जावे, असा पालकांचा प्रयत्न असतो. गार्डनमध्ये किमान दिव्यांची सोय झाली, तर मुलांना तेथे जास्तवेळ खेळता येईल, अशी पालकांची अपेक्षा आहे.

000000000000000000

जोडप्यांचा उपद्रव

संरक्षण भिंत नसल्याने गार्डन बंद असली, तरी अनेकजण आत घुसतात. त्यात जोडप्यांची संख्या सर्वाधिक आहे. जॉगिंग ट्रॅकवरील दिवे फुटल्याने अनेक ठिकाणी अंधार असतो. याचा फायदा घेत अनेक जोडपी बसलेली असतात. सायंकाळी ट्रॅकवर चालण्यासाठी येणाऱ्यांना याचा त्रास होतो. त्यांना काही बोलताही येत नाही आणि तक्रार करायची तरी कुणाकडे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

000000000000000000

ओपन जिम सुस्थितीत

गार्डनमध्ये काही महिन्यांपूर्वी ओपन जिम सुरू करण्यात आली आहे. गार्डनमध्ये सध्या केवळ ही एकमेव सुविधा सुस्थितीत आहे. सकाळी आणि सायंकाळी या जिममध्ये अनेकजण व्यायाम करताना दिसतात. सायंकाळी विशेषतः महिलांची संख्या लक्षणीय दिसते. त्यामुळे या जिमचा यापुढेही असा मेंटेनन्स रहावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

000000000000000000

हे गार्डन सीएसआरमधून डेव्हलप करण्याचा प्रयत्न आहे. या संदर्भात एका उद्योजकांशी चर्चाही सुरू आहे. त्यांचीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. तत्पूर्वी, गार्डनमधील मिनी ट्रेन सुरू करण्याचे काम हाती घेत आहोत. यासंदर्भात गेल्या आठवड्यातच बैठक झाली आहे. सुमारे ३ लाख ८० हजार रुपये खर्च करून ही ट्रेन पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न आहे.

राहुल चव्हाण, नगरसेवक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सौदे बंद, भाजीपाल्याची उलाढाल ठप्प, २० ते ३० लाखाचा फटका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बाजार समितीतील भाजीपाल्याच्या खरेदीदारांकडून वसूल करण्यात येत असलेल्या सहा टक्के अडतीच्या विरोधात किरकोळ व्यापाऱ्यांनी बुधवारी सकाळी अचानक भाजीपाला खरेदी न करण्याच्या पवित्र्यामुळे भाजीपाल्याचे सौदे बंद पडले. तसेच व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला भाजीपाला बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर अडवल्याने जवळपास २० ते ३० लाख रुपयांची उलाढाल ठप्प झाली. त्यानंतर बाजार समितीत झालेल्या बैठकीनंतर किरकोळ व्यापाऱ्यांनी गुरुवारपासून बेमुदत भाजीपाला खरेदी न करण्याचा व शेतकऱ्यांनाही भाजीमंडईमध्ये भाजी विक्री करु दिली जाणार नसल्याचा निर्णय घेतला. त्यामुळे हा वाद वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, बुधवारी सकाळपासून वाहने अडवण्याचा प्रकार, त्यातून वादावादी व तणाव निर्माण झाल्याने दिवसभर मोठा पोलिस बंदोबस्त होता.

होलसेल व्यापाऱ्यांकडून किरकोळ व्यापारी माल खरेदी करत असताना अडत घेतली जात आहे. या व्यापाऱ्यांनी सातत्याने निवेदन देऊन या प्रक्रियेला विरोध केला होता. २८ फेब्रुवारीपर्यंत निर्णय घेण्याचे पत्र दिले होते. त्यानुसार बाजार समितीने १ मार्चला बाजार समिती व किरकोळ व्यापारी यांची बैठक आयोजित केली होती. मात्र, बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास नेहमीप्रमाणे भाजीपाला घेऊन शेतकरी आले. होलसेल व्यापाऱ्यांकडे विक्रीला ठेवलेल्या मालाचा किरकोळ व्यापाऱ्यांनी उठावच सुरू केला नाही. बहुतांश ठिकाणी किरकोळ व्यापारी माल खरेदी करतात व नंतर सौदे होतात अशी तक्रार आहे. बुधवारी मालाचा उठावच झाला नसल्याने होलसेल व्यापाऱ्यांसमोर सौदे काढून माल कुठे ठेवायचा असा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे त्यांनी सौदे काढले नसल्याने आपोआपच सौदे बंद पडले. या प्रकारामुळे शेतकऱ्यांची अवस्था वाईट झाली. भल्या पहाटे गाडी करुन बाजार समितीत आणलेला माल विक्री होत नसेल तर त्याचा मोठा फटका बसणार असल्याने ते हतबल झाले होते.

काहींची वाहने बाजार समितीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता अनेक गाड्या अडवून ठेवल्या. शेतकरी माल परत घेऊन जात असतील तरच त्यांची वाहने सोडण्यात येत होती. यामुळे वादावादीतून तणाव निर्माण झाला. समितीने तातडीने पोलिस बंदोबस्त मागवला. त्यामुळे काही काळ वाहने बाहेर पडली. दुपारी एकपर्यंत प्रवेशद्वारांवर किरकोळ व्यापाऱ्यांचे गट भाजीपाला बाहेर सोडत नसल्याची परिस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यात ‘गणित’ ठरणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवसेना पक्षप्रमुख आज (गुरुवार) कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते कोल्हापूर जिल्हा परिषदेत उद्धभवलेल्या त्रिशंकू परिस्थितीत कुणाच्या पारड्यात दान टाकायचे? याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हेही ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता असल्याने मुंबई महापौरपदाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षातील तणाव कमी करण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.

आमदार राजेश क्षीरसागर यांचे ज्येष्ठ चिरंजीव ऋतुराज यांचा लग्न समारंभासाठी ठाकरे येत आहेत. त्यांच्यासोबत परिवहन मंत्री दिवाकर रावते, पर्यावरण मंत्री रामदास कदम, उद्योगमंत्री सुभाष देसाई, गृह राज्यमंत्री दीपक केसरकर, सार्वजनिक आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्यासह शिवसेनेचे वरिष्ठ नेतेही येत आहेत. विवाह समारंभानंतर ते जिल्हा परिषदेतील सत्तेत सहभागाविषयी स्थानिक नेत्यांबरोबर चर्चा करणार आहेत. आमदार चंद्रदीप नरके, डॉ. सुजित मिणचेकर, प्रकाश आबिटकर, सत्यजित पाटील, उल्हास पाटील यांच्यासह संपर्क नेते प्रा. संजय मंडलिक, माजी आमदार संजय घाटगे, जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, मुरलीधर जाधव यांच्याकडून ते विधानसभा मतदार संघातील परिस्थितीची माहिती देणार आहेत.

दरम्यान, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपशी युती तोडल्याने दोन्ही पक्षात तणाव निर्माण झाला आहे. मुंबई महापालिकेत महापौरपदावर भाजप व शिवसेनेने दावा केला आहे. मुंबई महापालिकेसह व जिल्हा परिषदेत शिवसेनेशी युती व्हावी यासाठी भाजप नेतृत्वाकडून प्रयत्न सुरू आहेत. शिवसेनेशी बोलणी करण्याची जबाबदारी महसूल मंत्री पाटील यांच्याकडे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपसा बंद, शहरात ठणठणाट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिंगणापूर बंधारा येथील पाणी पातळी खालावल्याने कोल्हापूर शहराच्या पाणी पुरवठ्यावर थेट परिणाम झाला. चारही उपसा केंद्र बंद राहिल्याने बुधवारी पाणी उपसा ठप्प राहिल्याने गुरुवारीही संपूर्ण शहराला पाण्याचा फटका बसणार आहे. बुधवारी शहरातील विविध भागात दिवसभर पाण्याचा ठणठणाट होता. उपसा बंद राहिल्याने पुरवठा विभागाने टँकरचे नियोजन करणे अत्यावश्यक होते. मात्र चालकाअभावी टँकरही उपलब्ध होऊ शकले नाहीत. शहरातील पाणी पुरवठ्याच्या समस्येवरुन महापालिका पदाधिकारी व नगरसेवकांनी आयुक्त पी. शिवशंकर यांची भेट घेतली.

गेले तीन दिवस पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्याच्या नियोजनासंदर्भात अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही. अति​रिक्त आयुक्त, उपायुक्त एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहेत. प्रभारी जल अभियंता सुरेश कुलकर्णी रजेवर आहेत. नागरिक पाण्यासाठी रस्त्यावर उतरत असताना प्रशासन मात्र ढिम्म असल्याचा आरोप उपमहापौर अर्जुन माने, स्थायी सभापती संदीप नेजदार, नगरसेविका वनिता देठे, शोभा कवाळे, धीरज पाटील यांनी केला. आयुक्तांनी या संदर्भात महापालिका व पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. महापालिका अधिकाऱ्यांना गुरुवारपासून पाणी पुरवठा करण्याच्या सूचना केल्या. दरम्यान, पाटबंधारे विभागाने धरणातील पाणी नदीपात्रात सोडले असून बुधवारी रात्रीपर्यंत शिंगणापूर बंधाऱ्यापर्यंत पाणी पोहचेल. रात्री उशिरा पाणी उपसा सुरु होईल, अशी माहिती आयुक्तांनी पदाधिकाऱ्यांना दिली.

कोल्हापूर शहरासाठी रोज १२० एमएलडी पाणी पुरवठा केला जातो. शिंगणापूर आणि बालिंगा पंपिंग स्टेशन येथून पाणी उपसा केला जातो. बालिंगा पंपिंग स्टेशन येथील केंद्रात बिघाड झाल्याने उपसा बंद आहे. शिवाय शिंगणापूर येथील चारही उपसा केंद्रे बुधवारी बंद राहिली. नगरसेवक सातत्याने या प्रश्नाकडे लक्ष वेधत असताना अधिकारी काहीच हालचाल करत नाहीत. प्रशासनातील सावळागोंधळामुळेच नागरिकांचे हाल होत आहेत, असा आरोप उपमहापौर अर्जुन माने व सभापती नेजदार यांनी केला. नगरसेवक ईश्वर परमार यांनीही अधिकाऱ्यांशी संपर्क साधून उपाय योजनांची माहिती घेतली.

………….

पाटबंधारे विभागाला तीन दिवसांपूर्वीच पत्र

पाणी पुरवठा विभागाने तीन दिवसापूर्वीच पाटबंधारे विभागाला नदीत पाणी सोडण्याबाबत पत्र दिले असल्याचा खुलासा प्रशासनाकडून करण्यात आला. नदीपात्रातील पाणी पातळीत वाढ झाली नसल्याने पाणी उपशावर परिणाम झाला आहे. यामुळे गुरुवारी शहरात अपुरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होईल, असा खुलासा पाणी पुरवठा विभागाने कला आहे.

…………..

चालकाअभावी टँकर बंद

पाणी पुरवठा विभागाकडे आठ टँकर आहेत. मात्र चालक उपलब्ध नसल्याने टँकर बंद आहेत. बुधवारी एकच टँकर उपलब्ध असल्याचे कर्मचारी सांगत होते. यामुळे नगरसेवकांना प्रभागात टँकर उपलब्ध होऊ शकले नाहीत, अशा तक्रारी नगरसेविका शोभा कवाळे, वनिता देठे यांनी केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बेळगावात मराठी वज्रमूठ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, बेळगाव

महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत मराठी भाषिक उमेदवारांनी आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवारांवर दणदणीत विजय मिळवून बेळगाव हे महाराष्ट्राचेच असल्याचे दाखवून दिले. महापौरपदी संज्योत बांदेकर यांची आणि उपमहापौरपदी नागेश मंडोळकर यांची निवड करण्यात आली. विरोधी गटातील दोन गटांनी आपापले उमेदवार उभे केल्यामुळे त्यांना पराभव पत्करावा लागला.

महपौर आणि उपमहापौर निवडीसाठी बुधवारी सकाळी दहा ते अकरा या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. दुपारी एक वाजता प्रभारी प्रादेशिक आयुक्त एन. जयराम यांच्या उपस्थितीत निवडणुकीला प्रारंभ झाला. मात्र, गणसंख्येअभावी दहा मिनिटे निवडणूक कार्यक्रम तहकूब केला गेला. मराठी भाषिक सदस्य एकाच वेळी सभागृहात दाखल झाल्यावर तो पुन्हा सुरू झाला.

महापौरपदासाठी मराठी भाषिक गटातून मीनाक्षी चिगरे, संज्योत बांदेकर, मधुश्री पुजारी यांनी अर्ज दाखल केले. विरोधी गटातून जयश्री माळगी आणि पुष्पा पर्वतराव यांनी अर्ज दाखल केले. यापैकी चिगरे आणि पुजारी यांनी अर्ज मागे घेतले. मतदानात संज्योत बांदेकर याना ३२ तर जयश्री माळगी यांना १७ आणि पुष्पा पर्वतराव यांना १० मते पडली.

उपमहापौरपदासाठी मराठी गटातून मोहन भांदुर्गे आणि नागेश मंडोळकर यांनी अर्ज दाखल केले होते. विरोधी गटातर्फे मुजमिल डोणी आणि फईम नाईकवाडी यांनी अर्ज दाखल केले होते. तिरंगी लढतीत मंडोळकर यांना ३२ आणि डोणी यांना १७ तर नाईकवाडी यांना १० मते मिळाली. महापौर आणि उपमहापौर निवडीची घोषणा होताच मराठी भाषिक नगरसेवकांनी टेबल वाजवून आनंद व्यक्त केला.

निवडणुकीला सहा लोकप्रतिनिधींना मतदानाचा हक्क असल्यामुळे आमदार फिरोज सेठ, खासदार प्रकाश हुक्केरी, आमदार सतीश जारकीहोळी, आमदार संभाजी पाटील उपस्थित होते. संभाजी पाटील वगळता अन्य लोकप्रतिनिधी विरोधी गटाचे मतदान वाढविण्यासाठी आले होते. हुक्केरी प्रथमच पालिकेच्या सभागृहात आले होते. मराठी भाषिकांविरोधात मतदान केल्यास भविष्यात मराठी मतांना मुकावे लागेल, या भीतीपोटी भाजपचे खासदार सुरेश अंगडी आणि आमदार संजय पाटील यांनी गैरहजर राहणे पसंद केले.

विकासाला प्राधान्य

संज्योत बांदेकर यांचे माहेर रायगड जिल्ह्यातील महाड आहे. अधिकारपदाची सूत्रे स्वीकारल्यावर संज्योत बांदेकर यांनी आपण शहराच्या विकासाला प्राधान्य देणार असल्याचे सांगितले.

कोट

सीमाप्रश्न सध्या सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. त्यामुळे मराठी भाषिक नगरसेवकांनी मतभेद विसरून महापौर आणि उपमहापौर निवडून आणल्यामुळे आपली बाजू अधिक भक्कम झाली आहे. या निवडीमुळे बेळगाव हे महाराष्ट्राचेच हे सिद्ध करायला मदत होणार आहे.

मालोजी अष्टेकर

सरचिटणीस, महाराष्ट्र एकीकरण समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुंदन लिमकर, राजेंद्र पाटील निलंबित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या आरोग्य विभागातील निरीक्षक राजेंद्र पाटील आणि आस्थापना विभागातील पहारेकरी कुंदन लिमकर या दोघांचे निलंबन करण्यात आले. आयुक्त पी. शिवशंकर यांनी बुधवारी ही कारवाई केली. पाटील आणि लिमकर यांची खातेनिहाय चौकशी होणार आहे. महापालिकेचे आर्थिक नुकसान व लाच मागितल्याच्या कारणावरुन अनुक्रमे पाटील व लिमकर यांच्यावर कारवाई झाली.

निलंबित केलेल्या पाटील व लिमकर यांनी रोज महापालिकेत हजेरी द्यायची आहे. तसेच इतरत्र नोकरी, उद्योग व व्यवसाय करायचा नाही असा आदेशही प्रशासनो दिला आहे. आरोग्य निरीक्षक पाटीलने नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात साळोखेनगर प्रभागात कामावर असताना गैरहजर कर्मचाऱ्यांची हजेरी मांडली होती. यासाठी कर्मचाऱ्यांकडून रक्कम उकळल्याचा आरोप नगरसेवकांनी केला होता. स्वच्छता अभियानांतर्गत लोकांकडून अॅप डाऊनलोड करुन घेण्याच्या कामातही त्याने हलगर्जीपणा दाखविला होता. नगरसेवकांच्या तक्रारीनंतर प्रशासनाने या प्रकाराची चौकशी केली. त्यात पाटीलने गैरहजर कर्मचाऱ्यांची हजेरी मांडून महापालिकेचे आर्थिक नुकसान केल्याचा ठपका ठेवला आहे. पाटीलच्या खातेनिहाय चौकशीसाठी विभागीय आरोग्य निरीक्षक जयवंत पवार व अॅड. अशोक पवार यांची नियुक्ती केली आाहे.

आस्थापना विभागातील पहारेकरी कुंदन लिमकरने पगारातील फरकाची रक्कम काढण्यासाठी महापालिकेचेच कर्मचारी अरुण जामदार यांच्याकडे २५ हजाराची लाच मागितल्याची तक्रार केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून लिमकरवर अटकेची कारवाई केली होती. आयुक्तांनी या प्रकारची चौकशी करुन लिमकरलाही निलंबित करण्याचे आदेश दिले. लिमकरवर गंभीर गैरवर्तनाचा आक्षेप ठेवला आहे.


दिवसभराच्या चौकशीनंतर सायंकाळी कारवाई

आयुक्त मंगळवारी कार्यालयीन कामानिमित्त मुंबईत होते. बुधवारी परतल्यानंतर त्यांनी लाचखोरीच्या प्रकरणाची माहिती घेतली. लिमकरबाबत पूर्वीपासून तक्रारी होत्या. शिवाय राजेंद्र पाटीलच्या कामकाजाची चौकशी सुरु होती. या दोन्ही प्रकरणाची सविस्तर चौकशी करुन निलंबनाचा आदेश काढला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेचे ‘वेट अँड वॉच’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सत्ताकारणात कुणाला पाठिंबा द्यायचा याचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी गुलदस्त्यातच ठेवत वेट अँड वॉचची भूमिका घेतली. पाठिंब्याचा निर्णय मुंबईच्या महापौर निवडीनंतर (नऊ मार्चनंतर) घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आणखी काही दिवस पाठिंब्याची उत्सुकता राहणार आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसल्याचे त्रिशंकू स्थिती नि‌र्माण झाली आहे.

या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय जिल्हा परिषदेत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी किंवा भाजप आघाडी यांपैकी कुणालाही सत्ता स्थापन करायची असेल तर शिवसेनेची मदत घेण्याशिवाय पर्यायच नाही, असा अहवाल ठाकरे यांना स्थानिक शिवसेनेच्या नेत्यांनी दिला आहे. प्रा. मंडलिक यांनी जिल्ह्याचा अहवाल दिला. आमदार राजेश क्षीरसागर यांचे चिरंजीव ऋतुराजच्या लग्न समारंभासाठी मुंबईहून खास विमानाने ठाकरे गुरुवारी संध्याकाळी आले होते.

या निवडणुकीत शिवसेनेचे पाच उमेदवार अत्यंत कमी मताने पराभूत झाले. त्यामुळे संख्याबळ १५ पर्यंत गाठू शकलो नाही, याकडेही नेत्यांनी लक्ष वेधले. तसेच प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील विरोधी पक्षांची माहिती ​देण्यात आली. सर्वांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर ठाकरे यांनी नऊ मार्चनंतर पाठिंब्याचा निर्णय मुंबईत घेतला जाईल, असे स्पष्ट केले. तसेच विधानसभा अधिवेशनावेळी आमदारांची भेट घेऊन पाठिंब्याबाबत चर्चा केली जाईल, असेही स्पष्ट केले. जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवड २१ तारखेला होणार असल्याने पाठिंब्याबाबत शिवसेनेचे ‘वेट अॅन्ड वॉच,’ हेच धोरण राहणार आहे.

दरम्यान, विमानतळावरून ठाकरे थेट पंचशील हॉटेल येथे आले. यावेळी आमदार चंद्रदीप नरके, प्रकाश आबिटकर, डॉ. सुजित मिणचेकर, उल्हास पाटील व सत्यजित पाटील तसेच शिवसेना संपर्क नेते प्रा. संजय मंडलिक, माजी आमदार संजय घाटगे, जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, मुरलीधर जाधव यांच्याशी चर्चा केली.

तातडीने मुंबईला रवाना

समारंभानंतर अंबाबाई दर्शन, आमदार व पदाधिकाऱ्यांशी चर्चा असा ठाकरे यांचा कार्यक्रम होता. पण, मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समारंभानंतर ठाकरे यांनी तातडीने मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला. कोल्हापुरात नाईट लँडिगची सोय नसल्याने ते मोटारीने बेळगावला रवाना झाला. तिथून ते मुंबईला रवाना झाले.

बंडखोर उमेदवार भूषण पाटीलही उपस्थित

शिवसेनेचे संपर्क नेते प्रा. संजय मंडलिक यांचा मुलगा वींरेंद्र यांच्याविरोधात भूषण पाटील यांनी या निवडणुकीत बंडखोरी केली होती. पाटील यांच्या बंडखोरीमुळे वीरेंद्र यांचा थोडक्यात पराभव झाला. तरीही भूषण पाटील ठाकरे यांच्या दौऱ्यात नेत्यांसमवेत अग्रभागी होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप पक्षप्रतोदपदी विजय भोजे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भाजप जिल्हा परिषदेच्या पक्षप्रतोदपदी विजय भोजे आणि ताराराणी आघाडीच्या पक्षप्रतोदपदी सुनीता रेडेकर यांची निवड झाली. भाजपच्या नूतन जिल्हा परिषद सदस्यांचा सत्कार आणि पक्षप्रतोद पदांची निवड हॉटेल पॅव्हेलियन येथे झाली. अध्यक्षस्थानी भाजपचे जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके होते.

जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके यांनी भाजपच्या १४ जिल्हा परिषद सदस्यांना पक्षप्रतोद एकमताने निवडण्याचे आवाहन केले. जेष्ठ सदस्य अरुणराव इंगवले यांनी अब्दुललाटमधून निवडून आलेले विजय भोजे यांचे नाव सुचवले. त्याला विजया पाटील यांनी अनुमोदन दिले. ताराराणी आघाडीच्या सदस्यांची स्वतंत्र बैठक झाली. त्यात सुनीता रेडेकर यांची आघाडीच्या पक्षप्रतोद म्हणून निवड करण्यात आली.

आमदार सुरेश हळवणकर म्हणाले, ‘भाजप सरकारने सर्वच क्षेत्रात विकासाचे मुद्दे घेऊन कार्यरत आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली विकासाची गंगा वाहत आहे. निवडून आलेल्या भाजपच्या सदस्यांनी विकासाचा अजेंडा डोळ्यासमोर ठेवून कार्यरत रहावे.’

आमदार अमल महाडिक, संघटनमंत्री बाबा देसाई यांनी मार्गदर्शन केले. जिल्हा परिषद सदस्य विजया पाटील (कबनूर), मनीषा टोणपे (पाचगाव), संध्याराणी बेडगे (दिंडनेर्ली), स्मिता शेंडुरे (हुपरी), अशोकराव माने (शिरोळ), राजवर्धन नाईक-निंबाळकर (नांदणी), महेश चौगले (उचगाव), कल्पना चौगले (यवलूज), शौमिका महाडिक (शिरोली पुलाची), प्रा. अनीता चौगले (बड्याचीवाडी), अॅड. हेमंत कोलेकर (नेसरी), सुनीता रेडेकर (कोळींद्रे) आदी उपस्थित होते. शिवाजी बुवा यांनी सूत्रसंचालन केले. अरुणराव इंगवले यांनी आभार मानले.

पंचायत समिती पक्षप्रतोद निवडी

करवीर - रमेश चौगले (दिंडनेर्ली),

हातकणंगले - उत्तम सावंत (नागाव)

गडहिंग्लज - विठ्ठल पाटील (कडगाव)

गगनबावडा - आनंदा पाटील (धुंदवडे)

शिरोळ - योगिता कांबळे (शिरोळ)

भुदरगड - आक्काताई नलवडे (आकुर्डे)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टँकरवरुन नगरसेवकांत वादावादी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे टँकर पळवापळवीवरुन नगरसेवक एकमेकांविरोधात उभे ठाकले. कसबा बावडा फिल्टर हाऊस येथून माजी नगरसेवक ​शिवाजी कवाळे दोन टँकर घेऊन जात असताना अन्य नगरसेवकांनी विरोध केला. कवाळे दोन्ही टँकरवर हक्क सांगू लागल्याने वाद वाढला. स्थायी सभापती संदीप नेजदार यांनी कवाळे यांना विरोध केला. नगरसेविका शोभा कवाळे व महिला बालकल्याण सभापती वहिदा सौदागर यांच्यातही वाद झाला. या गोंधळामुळे सकाळी तासभार टँकर थांबून राहिले.

पाणी पातळी खालावल्याने शिंगणापूर बंधारा येथील उपसा ठप्प झाला आहे. त्यामुळे नियोजन विस्कळीत झाले आहे. गेले तीन दिवस विविध भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. बुधवारी शिंगणापूर बंधारा येथील उपसा केंद्र बंद राहिल्याने निम्म्याहून अधिक भागाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला. पाणी पुरवठा विभागाने आठ टँकरव्दारे पाणी पुरवठा करण्याचे नियोजन केले होते. गुरुवारी सकाळी सातच्या अगोदरच नगरसेवक कसबा बावडा फिल्टर हाऊस येथे आले. नगरसेविका कवाळे टँकरसाठी प्रयत्नशील असताना वहिदा सौदागर यांनी कर्मचाऱ्यांना मोबाइलवरुन प्रभागात टँकर पाठविण्याची सूचना केली. त्याला कवाळे यांनी आक्षेप घेतला. मोबाइलवरुनच कवाळे व सौदागर यांच्यात टँकरसाठी वाद सुरू झाला.

सभापतींचा आक्षेप

उपमहापौर अर्जुन माने, स्थायी सभापती संदीप नेजदार, नगरसेवक श्रावण फडतारे सकाळपासून फिल्टर हाऊस येथे थांबून होते. सातच्या सुमारास शिवाजी कवाळे आले. त्यांच्या कार्यकर्त्यांनी दोन टँकरचा ताबा घेतला. त्याला नेजदार यांनी आक्षेप घेतला. एकाच ठिकाणी दोन टँकर देण्यास विरोध केला. यावरुन कवाळे व नेजदार यांच्यात शाब्दिक वाद वाढत गेला. उपमहापौर माने यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. कवाळे यांच्या भागात दोनऐवजी एक टँकर पाठविण्यात आला. श्रावण फडतारे व नगरसेविकेचे पती वैभव माने यांच्यामध्ये तू तू मैं मैं झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खंडपीठ कृती समितीतर्फे पालकमंत्र्यांचे अभिनंदन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापुरातील मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधी व न्याय विभागाच्या मुख्य सचिवांशी खंडपीठ कृती समितीच्या शिष्टमंडळाची बैठक घडवून आणली. मुख्यमंत्र्यांमार्फत मुख्य न्यायमूर्तींकडे हा प्रश्न पोहोचवण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे खंडपीठाचा लढा निर्णायक टप्प्यात आल्याचा विश्वास खंडपीठ कृती समितीने व्यक्त केला आहे. यासाठी पालकमंत्र्यांनी पुढाकार घेतल्याने त्यांच्या अभिनंदनाचा ठराव गुरुवारी (ता. २) खंडपीठ कृती समितीच्या सभेत मांडण्यात आला. खंडपीठाची (सर्किट बेंच) स्थापना होईपर्यंत साखळी उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.

कोल्हापुरातील खंडपीठासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या परवागीवरून खंडपीठ कृती समिती आणि पालकमंत्र्यांमध्ये मतभिन्नता होती. यावर नेमकी माहिती घेण्यासाठी पालकमंत्र्यांनी राज्याच्या विधी व न्याय विभागाचे सचिव एन. जे. जमादार यांची आणि खंडपीठ कृती समितीच्या शिष्टमंडळाची भेट घडवून आणली. मुख्य न्यायमूर्तींसोबत होणाऱ्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी हा विषय मांडावा यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचे आश्वासनही त्यांनी कृती समितीला दिले. पालकमंत्र्यांच्या प्रयत्नांमुळे खंडपीठाचा प्रश्न निकाली निघण्याची शक्यता आहे. त्यामुळे खंडपीठ कृती समितीच्यावतीने निमंत्रक अॅड. प्रकाश मोरे यांनी गुरूवारी न्यायसंकुलातील सभागृहात आयोजित सभेत पाटील यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.

भाजपचे महेश जाधव यांच्यासह अॅड. महादेवराव आडगुळे, सरकारी वकील विवेक शुक्ल, सचिव सर्जेराव खोत, प्रशांत पाटील, मेघा पाटील, संदीप चौगले, राजेंद्र मंडलिक, शिवाजीराव राणे, आदी उपस्थित होते.

दरम्यान, गरूवारी (ता. २) आंदोलनाच्या ९२ व्या दिवशी भाजप कायदा आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी साखळी उपोषणात सहभाग घेतला. ॲड. विठोबा जाधव, गुरुदत्त पाटील, मोहन पाटील, तेजस साठम, मिलिंद जोशी, विवेकानंद पाटील, सत्यजित कुंभार, संदीप पवार, संदेश कुलकर्णी, विजय पाटील, उल्हास पवार, युवराज मस्कर, रोहित पाटील आदींनी उपोषण केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांवर वाढले हल्ले

$
0
0

कोल्हापूर : कोल्हापूर शहरात कायदा सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिसांवरच हल्ले होत आहेत. वाहतुकीचे नियम मोडणारे मद्यपी तरुण पोलिसांना जाणीवपूर्वक लक्ष करीत आहेत. त्यामुळे रस्त्यावर उभे राहून वाहतुकीला शिस्त लावणारे पोलिस असुरक्षित बनले आहेत. हल्लेखोरांवर अटकेच्या कारवाईनंतरही असे प्रकार थांबलेले नाहीत. याउलट गेल्या महिन्यांत तीन पोलिसांवर हल्ले झाले आहेत. याला वेळीच पायबंद न घातल्यास हल्लेखोरांचा आत्मविश्वास वाढण्याचा धोका आहे.

कोल्हापूर शहरात वाहनांच्या वाढलेल्या वर्दळीमुळे रस्त्यांवर वाहतुकीची कोंडीही वाढली आहे. बिंदू चौक, भाऊसिंगजी रोड, महाद्वार रोड, रंकाळा परिसर, गंगावेश, राजारामपुरी, लक्ष्मीपुरी, आदी परिसरात नेहमीच वाहतूक कोंडी होते. ही कोंडी टाळून वाहनधारकांना शिस्त लावण्यासाठी बहुतांश चौकांसह गर्दीच्या रस्त्यांवर वाहतूक पोलिस तैनात केले आहेत. ट्रिपल सिट दुचाकी चालवणे, वनवे तोडणे, बेदरकारपणे वाहन चालवणे, लायसन न बाळगणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्याची मोहीम पोलिसांनी सुरू केली आहे. कारवाईच्या भीतीने वाहनधारकांना शिस्त लागेल अशी पोलिसांना अपेक्षा आहे. मात्र प्रत्यक्षात उलटेच घडत आहे. ‘उलटा चोर कोतवालको डाटे,’ या म्हणीचा प्रत्यय सध्या पोलिसांना येत आहे. वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर कारवाई करताना काही वाहनधारक पोलिसांवरच रुबाब दाखवत आहेत. काही वाहनधारकांची मजल तर थेट गळपट धरून मारहाण करण्यापर्यंत गेली आहे. गेल्या महिन्यांत तीन पोलिसांवर वाहनधारकांचे हल्ले झाल्याने ड्युटीवरील पोलिसांची चिंता वाढली आहे.

उमा टॉकीज चौक हा पोलिसांच्यादृष्टीने ड्युटी करण्यासाठी ‘हॉट स्पॉट’ बनला आहे. या परिसरात पोलिसांसोबत वाहनधारकांचे वाद वारंवार होत आहेत. १३ फेब्रुवारीला संध्याकाळी पाचच्या सुमारास उमा टॉकीज चौकात ड्युटीला असताना वाहतूक शाखेकडील सहायक फौजदार गंगाराम भिवा पवार यांच्याशी दुचाकीस्वाराने वाद घातला. मद्यधुंद अवस्थेतील या दुचाकीस्वारांनी काही वेळाने साथीदारांसह पुन्हा उमा टॉकीज चौकात येऊन पवार यांना धक्काबुक्की केली. यातील एका हल्लेखोराकडे चाकू असल्याचेही वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी पाहिले होते. पोलिसांनी तातडीने यातील तीन हल्लेखोरांना पकडून पोलिसी खाक्या दाखवला. मात्र अन्य संशयित पोलिसांच्या हाती लागले नाहीत. या घटनेनंतर अवध्या पंधरा दिवसातच म्हणजे २७ फेब्रुवारीला राजारामपुरीतील जनता बझार येथे ट्रिपल सिट जाणाऱ्या दुचाकीस्वारांना अडवल्याच्या रागातून वाहतूक पोलिस सर्जेराव पाटील यांना धक्काबुक्की झाली. पोलिसांनी यातील संशयितांना समज देऊन सोडले. यानंतर सलग दुसऱ्या दिवशी पोलिसांना वाहनधारकांच्या हल्ल्याचा सामना करावा लागला. मंगळवारी (ता. २८) संध्याकाळी कॉमर्स कॉलेजकडून बिंदू चौकाकडे ट्रिपल सिट जाणाऱ्या तरुणांना महिपती खाडे यांनी रोखले. दंडाची पावती करताच संतापलेल्या तरुणांनी खाडे यांनी शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली. परिसरातील लोकांची गर्दी वाढताच दुचाकीस्वारांनी पलायन केले. मात्र सलग दुसऱ्या दिवशी पोलिसावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेने रस्त्यावर उभे राहून वाहतुकीला शिस्त लावणाऱ्या पोलिसांची चिंता वाढली आहे.


धाक बसणारी कारवाई हवी

वाहतुकीचे नियम मोडणे हा कायदेशीरदृष्या गंभीर गुन्हा आहे. मात्र कडक शिक्षेची तरतूद यात नाही. याचाच गैरफायदा वाहनधारकांकडून घेतला जातो. दंडाच्या रकमेत वाढ झाली आहे. मात्र दंड भरताना एखादा स्थानिक नेता किंवा पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा वशिला वापरून ड्युटीवरील पोलिसाला दमदाटी केली जाते. बेशिस्त वाहनधारकांचा वाढलेला हा आत्मविश्वास धोकादायक बनत चालला आहे.


हल्लेखोरांना खेचावे कोर्टात

पोलिसांना शिवीगाळ किंवा धक्काबुक्की करून पळून जाणाऱ्या वाहनधारकांची संख्या अधिक आहे. अशा हल्लेखोरांकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा त्यंच्यावर वेळीच कारवाई होणे गरजेचे आहे. वाहनांचे नंबर घेऊन थेट कोर्टात तक्रारी केल्यास पुढील कारवाई कोर्टाकडून होईल. कोर्टाकडूनच मोठ्या रकमेचा दंड किंवा काही काळासाठी वाहन जप्तीची कारवाई झाल्यास धाक निर्माण होईल.


जिल्ह्यातील एकूण पोलिस – ३०००

वाहतूक पोलिस ८०

गेल्या महिन्यातील पोलिसांवरील हल्ले ३

हल्लेखोरांना अटक ३


शहरातील वाहतुकीच्या शिस्तीसाठीच पोलिस रस्त्यावर उभे राहून त्यांचे कर्तव्य बजावतात. नियम मोडणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई होणारच. अशावेळी पोलिसांवर हात उगारणाऱ्यांची गय केली जाणार नाही. वाहनधारकांनी पोलिसांच्या सूचना पाळून कटू प्रसंग टाळावेत.

भारतकुमार राणे, शहर पोलिस उपअधीक्षक

०००००००००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


केएमटीत आजपासून ई तिकीट, जीपीएस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

प्रवासांना अधिका​धिक सुविधा देत आक​र्षित करून घेण्यासाठी केएमटी प्रशासनाने पाऊले टाकण्यास सुरुवात केली आहे. त्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून केएमटीतर्फे ई तिकीटींग, मोबाइल तिकीट अॅप, आणि वाहनांना जीपीएस सिस्टीम (व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम) यंत्रणा बसविण्यात येणार आहे. दरम्यान सभापती नियाज खान यांनी गुरुवारी केएमटीच्या वाहक चालकांशी संवाद साधला. ‘हात दाखवा, बस थांबवा’ हा उपक्रम पुन्हा सुरु करण्याचा निर्णय झाला.

केएमटीसमोर आज वडाप व्यावसायिकांचे आव्हान आहे. केएमटी थांब्यावरुन प्रवासीउठाव, चालकांची अपुरी संख्या यामुळे केएमटीचे आर्थिक नुकसान होत आहे. या आव्हानांवर मात करण्यासाठी प्रशासनाने नवीन योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. परिवहन समिती सभापती नियाज खान व अन्य सदस्यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (ता.३) सकाळी ११ वाजता या यंत्रणेचे उदघाटन होणार आहे. मोबाइल अॅपच्या माध्यमातून तिकीट उपलब्ध होणार आहे. ई तिकीटमुळे प्रवासांची नेमकी संख्या समजणार आहे. दिवसभरातील तिकीट विक्री, प्रवासी संख्येची माहिती उपलब्ध होणार आहे.

दरम्यान सभापती खान यांनी गुरुवारी वाहक, चालकांशी संवाद साधत अडचणी जाणून घेतल्या. बस वेळापत्रकाबाबत कर्मचारी प्रतिनिधींशी चर्चा करुन फेर नियोजन करण्याचे ठरले. निवृत्त कर्मचाऱ्यांना कंत्राटी पद्धतीने सामावून घेण्याबाबत चर्चा झाली. कर्मचाऱ्यांचे पगार नियमित करण्यासाठी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिली. चालकांना निश्चित कार्यभार (फिक्स ड्यूटीज) देण्याबाबत चर्चा झाली.यावे लळी वाहतूक निरीक्षक आर.एस. धुपकर, सहायक वाहतूक निरीक्षक बी. एम. मकानदार, एस.के. आकिवाटे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुपारपर्यंत तुटवडा, सायंकाळनंतर पुरवठा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पाटबंधारे विभागाने नदीत पाणी सोडल्यामुळे शिंगणापूर बंधारा येथील उपसा केंद्रे गुरुवारी सकाळी आठ वाजल्यापासून सुरु झाली. यामुळे शहरात दुपारनंतर ​विविध भागात पाणी पुरवठ्याला सुरुवात झाली. पण दुपारपर्यंत शहरात पाण्याचा तुटवडा होता. महापालिकेच्या आठ टँकरच्या ४६ फेऱ्या झाल्या. निम्म्याहून अधिक शहरात टँकरने पाणी पुरविले. नदीपात्रातील पाणी पातळीत वाढ व उपसा सुरु झाल्याने शुक्रवारपासून नि​यमित पाणी पुरवठा होईल असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

कसबा बावडा फिल्टर हाऊस आणि कळंबा फिल्टर हाऊस येथून टँकरने पाणी पुरवठा करण्यात आला. दिवसभरात आठ टँकरच्या ४६ फेऱ्या झाल्या. राजारामपुरी, टेंबलाईवाडी, यादवनगर, विक्रमनगर, लाइनबाजार, राजीव गांधी वसाहत, सरनाईक वसाहत, शिवाजी पार्क, महाडिक वसाहत, दिलबहार तालीम परिसर, जवाहरनगर, राजेंद्रनगर, उद्यमनगर, आपटेनगर, शास्त्रीनगर, जरगनगर, जुना वाशी नाका या परिसरात टँकरने पाणी पुरवठा झाला. ​शहरातील प्रत्येक प्रभागाला टँकर उपलब्ध झाला पा​​हिजे, ठराविक जण चालकावर दादागिरी करुन टँकरची पळवापळवी करतात. प्रशासनाने पाणी वाटपाचे योग्य नियोजन करावे या मागणीसाठी उपमहापौर अर्जुन माने, स्थायी समिती सभापती संदीप नेजदार, उमेश पोवार आदींनी आयुक्त पी. शिवशंकर यांचे निवासस्थान गाठले. प्रशासनाच्या सावळागोंधळामुळे शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत झाल्याचे नगरसेवकांनी सांगितले.

दोघा कर्मचाऱ्यांना नोटीस

नगरसेवकांकडून टँकर पळवापळवीच्या घटना कायम घडतात. अनेकदा चालकांना दमदाटी करत टँकर प्रभागात नेले जातात. अधिकाऱ्यांनी चालक मौलाली कोरवी व शिवाजी चव्हाण यांना गुरुवारी सकाळी टँकर घेऊन कसबा बावडा फिल्टर हाऊस येथे जाण्यास सांगितले होते. मात्र त्यांनी वरिष्ठांना कसलीही पूर्वकल्पना न देता अन्य ठिकाणी टँकर नेले. या कारणास्तव या दोघा कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तीन दिवसात समाधानकारक खुलासा सादर झाला नाही तर कारवाईचे संकेत दिले आहेत. आजी, माजी नगरसेवकांच्या दादागिरीचा फटका कर्मचाऱ्यांना बसत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंबाबाई मंदिराच्या आवारातील दुकाने हटविणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिराला राज्य संरक्षित स्मारक घोषित केल्यानंतर मंदिराच्या आवारातील दुकाने हटवावीच लागतील, असे पुरातत्व विभागाने सुनावणीवेळी स्पष्ट केले. मुंबईत सुनावणीला दुकानदाराच्या प्रतिनिधींसह अन्य हरकतदार उपस्थित होते.

पुरातत्व विभागाकडून अंबाबाई मंदिराला राज्य संरक्षित स्मारक घोषित करण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी २५ हरकती दाखल झाल्या असून त्यापैकी २० हरकती मंदिर परिसरातील पूजेचे साहित्य खरेदी विक्री करणाऱ्या दुकानदारांनी केल्या. पुरातत्व विभागाचे संचालक विलास वहाणे, श्रीशांत गर्दे यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी त्यांनी, एप्रिल महिन्यात अंबाबाई मंदिराला राज्य स्मारक घोषित केले जाईल. स्मारकाची घोषणा झाल्यावर दुकानदारांना मंदिराच्या आवारातून अन्य ठिकाणी जावे लागेल असे स्पष्ट केले. या दुकानांचे महानगरपालिका आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्यावतीने पुनर्वसन केले जाईल अशी शक्यता आहे. यावेळी दुकानदारांच्यावतीने वैभव मेवेकरी, स्वप्निल खांडके, संतोष काटवे उपस्थित होते. पुरातत्व विभागाच्या निर्णयावर आठ दिवसात वकिलांतर्फे म्हणणे मांडले जाईल, असे दुकानदारांनी स्पष्ट केले. आठ दिवसात म्हणणे न मांडल्यास दुकाने बाहेर हटवण्याचा निर्णय कायम ठेवण्यात येईल, असेही पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, श्रीपूजकांतर्फेही एक हरकत घेण्यात आली होती. स्मारकाची घोषणा झाल्यावर पूजा, अर्चेत बाधा येणार का? असा हरकतीव्दारे प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. स्मारकाची घोषणा केल्यानंतर पूजाअर्चेत कोणताही बदल होणार नसल्याचे पुरातत्व विभागाने स्पष्ट केले.

अर्किटेक्चर इल्युमिनेशनची निविदा उघडली

अंबाबाई मंदिराची शिखरे उजळणाऱ्या अर्किक्टेक्चर इल्युमिनेशनची निविदा गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात उघडण्यात आली. एक कोटी ९० लाख रुपयांच्या कामांसाठी तीन निविदा आल्या होत्या. निविदेतील एका नियमात बदल करण्यात आला असून काम करणाऱ्या कंपनीला मेंटनन्सची जबाबदारी एक वर्षाऐवजी तीन वर्षाची करण्यात आली आहे. काम सुरू करण्यापूर्वी समितीचे सदस्य सोलापुरातील मंदिरातील भेट देऊन प्रक्रियेची माहिती घेणार आहेत. बैठकीला देवस्थान समितीचे सदस्य सुभाष वोरा, बी. एन. पाटील, संगीता खाडे, आर्किटेक्ट अमरजा निंबाळकर आदींसह अधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेळकाढूपणा करू नका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी नव्याने बांधण्यात येणाऱ्या कमी क्षमतेच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्राची (एसटीपी) आणि नाले अडविण्याच्या प्रकल्पाच्या अंमलबजावणीचा कृतीबध्द कार्यक्रमच राष्ट्रीय हरित लवादने ठरविला. रंकाळा तलाव व पंचगंगा नदी प्रदूषणमुक्तीसाठी वेळकाढूपणा करु नका असेही लवादने महापालिकेला बजावले. अमृत योजनेंतर्गत मलनिःस्सारणा योजनेसाठी ७२ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

लवादाचे न्यायमूर्ती यू. डी. साळवी आणि पर्यावरणतज्ज्ञ रंजन चटर्जी यांच्यासमोर सुनावणी झाली. लवादने महापालिकेकडे ७२ कोटी रुपयांच्या निविदा प्रक्रिया व सांडपाणी रोखण्यासंदर्भातील उपाय योजनांची विचारणा केली. महापालिकेचे पर्यावरण अभियंता आर. के. पाटील यांनी ७२ कोटी रुपयांच्या निविदा प्रक्रियेची माहिती सादर केली. २३ मार्च रोजी निविदा उघडण्यात येणार असल्याचे सांगून त्यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून छाननी, स्थायीची मान्यता अशी प्रक्रिया राबविणार असल्याचे सांगितले. ७२ कोटी रुपयांच्या माध्यमातून १२० किलोमीटर लांबीची ड्रेनेजलाइन, दोन ठिकाणी कमी क्षमतेचे एसटीपी आणि शहरातील आठ नाले अडवून सांडपाण्याचे शुध्दीकरण या कामांचा समावेश आहे. दुधाळी परिसर आणि कसबा बावडा परिसर येथे अनुक्रमे सहा आणि चार एमएलडी क्षमतेचे एसटीपी प्रस्तावित आहेत. त्यावर लवादने महापालिकेला वेळकाढूपणा नका असे सुचविले. तसेच सांडपाणी रोखण्यासंदर्भातील प्रकल्पांची अंमलबजावणी करण्यासाठी कृती कार्यक्रम निश्चित केला. तसेच या प्रकरणी २७ एप्रिल रोजी पुढील सुनावणी होणार आहे. याचिकाकर्ते सुनील केंबळे यांनी प्रदूषणप्रश्नी याचिका दाखल केली आहे.

लवादने निश्चित केलेला कृती कार्यक्रम

२३ मार्च रोजी निविदा उघडल्यानंतर तीन दिवसात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे तांत्रिक मान्यतेसाठी सादर करावयाचे आहे. एमजीपीकडून ठेकेदाराची पात्रतासह अन्य तां​त्रिक बाबीची तपासणी सात दिवसांत पूर्ण करावयाची आहे. त्यानंतर स्थायी समितीपुढे हा विषय मांडून वीस एप्रिलपूर्वी त्याला मंजुरी घ्यायची आहे. मंजुरीनंतर सात दिवसांत ठेकेदाराला वर्कऑर्डर द्यावयाची आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ज्योती मांढरे अखेर माफीची साक्षीदार

$
0
0



सातारा

वाई हत्याकांड प्रकरणात ज्योती मांढरे ही माफीची साक्षीदार झाल्याचा निर्णय न्यायाधिशांनी दिला आहे. तिला काही अटीही घालण्यात आल्या आहेत. वाई हत्याकांड प्रकरणात एक एक खटला चालवायचा की सर्व खटले एकदम चालवायचे या बाबत सरकार पक्षाला विचार करण्यासाठी वेळ मिळावा, अशी मागणी विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी केल्यानंतर न्यायाधिशांनी २४ मार्च ही पुढील तारीख निश्चित केली आहे.

वाई हत्याकांड प्रकरणी या अगोदर सरकार पक्षाने ज्योतीला माफीचा साक्षीदार करावे, यासाठी युक्तिवाद केला होता, तर ज्योतीला माफीचा साक्षीदार करू नये, असा बचाव पक्षाने युक्तिवाद केला होता. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश कोणता निर्णय देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. न्यायालयात या प्रकरणाच्या कामकाजाला सुरुवात झाली. सुरुवातीलाच न्यायाधिशांनी सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरुन ज्योतीला माफीची साक्षीदार केल्याचा निर्णय दिला. न्यायाधीशांनी तिला माफीची साक्षीदार होणार आहे का? त्यासाठी अटी असून, त्या मान्य आहेत का? असे तिला विचारले. त्यावर ज्योतीने माफीचा साक्षीदार होणार असल्याचे मान्य केले. या वेळी सरकार पक्षाला सर्व खरी माहिती सांगावी तसेच ज्या गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे त्यामधील तुझी व संतोष पोळ याची भूमिका सांगणे, अशा अटी सांगितल्यानंतर तिने त्या मान्य केल्या.

विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम म्हणाले, संशयित आरोपीने पोलिसांकडे सर्व गुन्ह्यांची कबुली दिल्याने त्या बाबतचा बंद लखोटा खुला करावा व तो सरकार पक्षाला द्यावा, अशी विनंती केली. न्यायाधिशांनी तो मान्य करुन सरकार पक्षाला वाचण्यासाठी दिला. मात्र, संतोष पोळ याचा कबुली जबाब इतर ठिकाणी खुला करु नये, असे न्यायाधिशांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images