Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

शिवरायांचा गजर...!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भगवा पताका अन् झेंड्यांनी सजलेले चौक, रांगोळीतून रेखाटलेली शिवरायांची प्रतिमा, शाहिरी पोवाड्यातून शिवरायांचा जागर, मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकांबरोबरच रक्तदान, आरोग्य शिबिर आणि व्याख्यानांच्या माध्यमातून दिवसभर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त अत्यंत उत्साही वातावरण शहर परिसरात होते. ऐतिहासिक शिवाजी चौक, बिंदू चौक, मिरजकर तिकटी येथे पाळणा गीतांतून शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. फुलांच्या पायघड्या, आकर्षक रांगोळी आणि फटाक्यांच्या आतषबाजीमुळे शहर शिवमय झाले होते. विशेषत: तरुणाईचा उदंड उत्साह दिसला.

रविवारच्या (ता. १९ फेब्रुवारी) शिवयजंयतीनिमित्त अनेक तरुण मंडळांनी गेल्या आठ दिवसांपासून जय्यत तयारी केली होती. शुक्रवारी सायंकाळी शिवाजी चौक, बिंदू चौक विद्युत रोषणाईने झगमगला. उत्साही मंडळांनी जिल्ह्यातील विविध गडांवरून मशाल प्रज्वलीत केली. त्यामुळे शुक्रवारी रात्रीच पन्हाळगड, सामानगड, विशाळगडासह रायगड, प्रतापगड, शिवनेरी आदी गडकोट युवकांच्या गर्दीने फुलून गेले होते. ‘शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी जय शिवाजी’ अशा अखंड घोषणांनी किल्ल्यांचा परिसर दुमदुमून गेला होता. पहाटेपासून शिवज्योतीसह युवकांचे आपापल्या मंडळांमध्ये आगमन झाल्यानंतर ढोल-ताशांचा निनाद अन फटाक्यांची आतषबाजी केली जात होती. काही ठिकाणी पहाटे तर काही ठिकाणी दुपारी १२ वाजता शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला.

शिवाजी चौकातील शिवजन्मोत्सवाला महापौर हसिना फरास, खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर, अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, आयुक्त पी. शिवशंकर, स्थायी सभापती डॉ. संदीप नेजदार, नगरसेविका रुपाराणी निकम, अशोक जाधव, आर. के. पोवार, कादर मलबारी, दिलीप पवार आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. शिवाजी पेठेतील उभा मारुती चौकात शिवाजी तरुण मंडळाच्यावतीने सकाळी दहा वाजता शिवजन्मकाळ सोहळा पार पडला. माजी महापौर प्रल्हाद चव्हाण, सुभाष कोराणे, गजानन इंगवले, वस्ताद आनंदराव ठोंबरे आदी यावेळी उपस्थित होते.

शिवजयंतीनिमित्त मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकांनी युवकांमध्ये उत्साह निर्माण केला. शाहिरी पोवाड्यातून इतिहासाला उजाळा मिळाला. दिवसभर पोवाड्यांमुळे युवकांमध्ये स्फुल्लिंग निर्माण होत होते. पारंपरिक कार्यक्रमांबरोबरच अनेक मंडळांनी रक्तदान आणि आरोग्य शिबिरे घेतली. तर काहींनी व्याख्यानाच्या माध्यमातून प्रबोधनाचा जागर केला. काही मंडळांनी वृक्षारोपण केले.

एकाच दिवशी शिवजयंती साजरी करण्यासाठी बिंदू चौक येथे जिल्ह्यातील ३०० तरुण मंडळांना शुक्रवारी शिवमूर्ती भेट देण्यात आल्या. छत्रपती चॅरिटेबल देवस्थान ट्रस्टच्यावतीने भवानी मंडपातून पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. दुपारी नर्सरी बाग येथे पालखी दाखल झाल्यानंतर शिवजयंती सोहळा झाला. मंगळवार पेठेत उत्सव कमिटीच्यावतीने जिलेबी वाटपानंतर शाहीर आझाद नायकवडी यांनी पोवाडा सादर केला. दीपक पोलादे, बाबूराव चव्हाण, स्वप्निल पार्टे, किसन कल्याणकर, जयकुमार शिंदे, प्रशांत जाधव, नीलेश गायकवाड, ओंकार नलवडे, राजू वर्णे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उपाख्यान चित्रप्रदर्शनाचे दालन खुले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भारतीय संस्कृतीत स्त्रीची विविधांगी रूपांना महत्त्व आहे. अदिशक्तीचे रूप असलेली स्त्री वास्तव जीवनात माता, पत्नी, मुलगी अशी अनेक रूपं जगते. जशी या स्त्रिची ही रूपं आहेत, तशी हीच रूपं विविध प्रदेशातील तिच्या राहणीमानानुसार बदलतात.

रानावनात पोटापाण्याची सोय करण्यासाठी भटकणारी, जनावरांची काळजी घेणारी, परंपरागत व्यवसाय करणारी, कलाकारी करणारी स्त्री असो किंवा उंबऱ्याच्या आत दबलेली, निर्णय घेण्याचे स्वातंत्र नसल्याने अडकून पडलेली. या भावनांचे कंगोरे जगणारी स्त्री आपल्याला दिसते. या स्त्री जीवनाचे बोलके प्र​तिबिंब चित्रकार वैशाली पाटील यांच्या रंगरेषांमधून ​उमटले आहे.

उपाख्यान या चित्रप्रदर्शनाचे उदघाटन रविवारी (ता. १९) मधुरीमाराजे छत्रपती, प्रतिमा पाटील, नंदितादेवी घाटगे, ज्येष्ठ चित्रकार जी. एस. माजगावकर आणि चित्रकार, कलाभ्यासक श्यामकांत जाधव यांच्या उपस्थितीत झाले. २५ फेब्रुवारीपर्यंत शाहू स्मारक कलादालन येथे सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत प्रदर्शन सुरू राहणार आहे.

या प्रदर्शनात सत्तरहून अधिक कलाकृती मांडण्यात मांडण्यात आल्या आहेत. कागद आणि कॅनव्हॉसवर ड्रायपेस्टल, अॅक्रॅलिक कलर, इंक आणि चारकोलचा वापर केला आहे. शिव आणि शक्ती, नर-नारी, शैव तत्त्वज्ञान उपासनेची कथन गाथा या चित्र स्त्रीरुपाची कथने या प्रदर्शनात आपल्याला पाहावयास मिळतील. प्रदर्शनातील चित्रांमध्ये काही ड्रॉईंग आहेत, काही पेंटिंग्ज‌ आहेत. चित्रमाध्यमासाठी कागद, कॅनव्हास वापरला आहे. रंग माध्यमासाठी अॅक्रॅलीक कलर, ड्रायपेस्टल, इंकपेनचा वापर केला आहे. प्रत्येक चित्रातील आशयसूत्रता, भारतात शतकानुशतके चाललेली सांस्कृतिक लोकपरंपरेतील स्त्रीवाटचालीची संवेदना आहे. ती या चित्रांतून दिसून येते. चित्रप्रदर्शन आठवडाभर सुरू राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जनता बझारच्या संचालकांवर गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार जनता सेंट्रल को. ऑपरेटीव्ह कंझ्युमर्स स्टोअर्सच्या (जनता बझार) दोन शाखांच्या इमारतींचे नूतनीकरण व सुशोभीकरण करण्याच्या नावाखाली ६४ लाख ७६ हजार ८०० रुपयांचा संगनमताने अपहार केल्याप्रकरणी माजी चेअरमन उदय पोवार, काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांच्यासह ११ जणांविरूद्द रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला. संस्थेच्या लक्ष्मीपुरी मुख्यालयातील किर्दमध्ये खर्च टाकून त्या रक्कमेचा अपहार केल्याचे ‌लेखापरीक्षण अहवालात यापूर्वी स्पष्ट झाले होते.

संस्थेच्या बांधकाम समितीचे माजी चेअरमन प्रकाशराव बोंद्रे, बांधकाम समितीचे माजी संचालक कै. शामराव ‌शिंदे, तानाजी साजणीकर, अरुणराव साळोखे, शिवाजीराव घाटगे, निरज जाजू, व्यवस्थापक ए. बी. फडतरे, कळंबा येथील श्री कात्यायनी मजूर सहकारी संस्था आणि श्री रेवनसिध्द मजूर सहकारी संस्थेचे चेअरमन मधुकर शिंदे यांचा गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, जनता बझारच्या वरुणतीर्थ वेस, राजारामपुरी, रुईकर कॉलनी येथील शाखांच्या इमारत नूतनीकरण व सुशोभिकरण करण्यासाठी अथर्व मार्केटिंग कंपनीने २० वर्षांसाठी करार केला आहे. २०१२ मध्ये वरुण‌तीर्थ वेस व राजारामपुरी येथील शाखांच्या इमारतीचे सुशोभीकरण आणि नूतनीकरण अथर्व कंपनीने केले. त्यासाठी पैसेही त्यांनी‌च दिले. मात्र गुन्हा दाखल झालेल्या पदाधिकाऱ्यांनी सुशोभीकरण, नूतनीकरणासाठी ६४ लाख ७६ हजार ८०० रुपये संस्थेतून काढले. १ एप्रिल २०१२ ते ३१ मार्च २०१५ अखेर झालेल्या लेखापरीक्षण अहवालात या रकमेचा अपहार केल्याचे समोर आले. त्यामुळे पुढील कारवाईसाठी लेखा परीक्षण अहवाल जिल्हा उपनिबंधकांकडे पाठविण्यात आला. उपनिबंधकांनी दोषी पदाधिकाऱ्यांना नोटिसा पाठवून खुलासा देण्याचे आदेश दिले होते. मृत शामराव शिंदे वगळता इतरांनी खुलासे दिले. मात्र ते विसंगत होते. त्यामुळे विशेष लेखापरीक्षक विष्णू गणपती कदम यांनी अपहारास जबाबदार असलेल्यांच्या विरोधात रविवारी लक्ष्मीपुरी पोलिसात फिर्याद दिली.

चेअरमन पोवारांवर ठपका

लेखा परीक्षणावेळी १ लाख १६ हजार ८०० रुपये खर्चाची अधिकृत बिले, संस्थेचे व्यवस्थापक, अकाउंटंट यांच्याकडे मागणी करण्यात आली. त्यावेळी खर्च संस्थेचे चेअरमन पोवार यांच्या सांगण्यावरून केले आहे, असे लेखी उत्तर देण्यात आले. पोकळ खर्च किर्दीला नावे टाकून हात‌शिल्लक घटवून पोवार यांनी स्वार्थापोटी अपहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

घुसडला बोगस ठराव

दोन शाखा इमारतींचे नूतनीकरण, सुशोभीकरणासाठीचा खर्च अथर्व कंपनीने केला आहे. मात्र, बोगस ठरावाव्दारे नूतनीकरण, सुशोभिकरणाचे काम संस्थेने केल्याचे दाखवून ६३ लाख ६० हजार रक्कमेचे काम दोन मजूर संस्थांनी केल्याचे दाखवले आणि त्या रकमेचा अपहार पदाधिकाऱ्यांनी केल्याचे लेखा परीक्षणात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अहिल्याबाईंचे कर्तृत्व असामान्य’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘अहिल्याबाई होळकर म्हटले की एक देशभक्त, हातामध्ये शिवपिंड घेतलेली धर्मपरायण महिलाच समोर येते. परंतु, पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे कर्तृत्व धार्मिक कार्यापुरतेच मर्यादित नव्हते. मल्हारराव होळकरांची अत्यंत तेजस्वी बुद्धीमान आणि पराक्रमी सून असलेल्या अहिल्यादेवींच्या भालाफेकीतील कौशल्याचे टिपू सुलतानानेही वर्णन केलेले आढळते. मध्ययुगीन भारतातली ती एक युद्धकुशल, स्वतंत्रतावादी, कायदेतज्ज्ञ, रसिक-गुणग्राहक, उदयोगांचे महत्त्व समजणारी अशी असामान्य स्त्री होती’, असे होळकरांच्या इतिहासाचे अभ्यासक संजय सोनवणी यांनी व्यक्त केले. शिवाजी विद्यापीठाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन व सामाजिक वंचितता व समावेशक धोरण अभ्यासकेंद्राच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर : एक विचार’ या व्याख्यानामध्ये ते बोलत होते.

सोनवणी म्हणाले, ‘मध्ययुगीन कालखंडात स्त्रीयांचे जीवन रूढी - परंपराच्या चौकटीमध्ये बांधले गेलेले होते. स्त्रियांचे नखदेखील कुणाला दिसू नये इतके त्यांना 'पडदानशीन' केले गेलेले होते. पण त्याच काळात परंपरेची बंधने झुगारून देणारी आणि प्रसंगी सनातन्यांचा रोष ओढवून घेणारी अहिल्यादेवीही आपल्याला दिसते. जी खरे तर स्वत: एका वंचित समाजातली स्त्री. परंतु केवळ आत्मविश्वास आणि धडाडीच्या जोरावर अहिल्यादेवींनी स्वत:ला मिळालेल्या संधीचे सोने केले.’

‘आपल्या राज्यात विधवांना दत्तकपुत्र घेण्याचा अधिकार देणे, बालविवाहास प्रतिबंध करणे, स्त्रियांचे स्वतंत्र सैनिक प्रशिक्षण केंद्र काढणे व स्त्रियांची बटालियन स्थापन करणे किंवा महिला विणकरांना प्रोत्साहन देणे आणि एका अर्थाने वस्त्रोद्योग व्यवसायाचा पाया घालणे यासारखी त्यांनी महिला सक्षमीकरणासाठी केलेली कामे ही त्यांची दूरदृष्टी आणि कर्तृत्व याची साक्ष देतात. वंचित समाजात जन्माला येऊनही, वंचिततेवर मात करून वंचित समुहांसाठी कार्य केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांवर आजही अधिकृत चरित्रग्रंथ उपलब्ध नाही याची खंतही सोनवणी यांनी व्यक्त केली.

यावेळी डॉ. अवनीश पाटील, डॉ. निलांबरी जगताप, डॉ. चांगदेव बंडगर, रावसाहेब पुजारी, दशरथ पारेकर, अमोल पांढरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या संयोजनासाठी किशोर खिलारे, शरद पाटील, श्रीधर साळोखे यांचे सहकार्य लाभले. सामाजिक वंचितता व समावेशक धोरण अभ्यास केंद्राच्या समन्वयक डॉ. नंदा पारेकर यांनी प्रास्ताविक ले. प्रा. अविनाश भाले यांनी प्रमुख वक्त्यांचा परिचय करून दिला. डॉ. निलिशा देसाई यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ऑक्सफर्डमधील संशोधन संस्कृती अनुकरणीय’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘ऑक्सफर्ड विद्यापीठ ही ज्ञानाची पंढरी असून ज्ञान देणे आणि ज्ञान घेणे, एवढेच कार्य तिथे शतकानुशतके चालू आहे. इंग्लंडच्या ज्ञानाचे व संस्कृतीचे केंद्र असलेल्या या ज्ञानपंढरीत संशोधन-अध्यापन संस्कृती अत्यंत अनुकरणीय आहे’, असे मत शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी शनिवारी व्यक्त केली.

कुलगुरू डॉ. शिंदे हे युरोपियन युनियनच्या ‘नमस्ते’ प्रकल्पांतर्गत इंग्लंडच्या ऑक्सफर्ड विद्यापीठात व्हिजिटिंग स्कॉलर म्हणून एक महिना संशोधन करून नुकतेच परतले. त्यांच्या ऑक्सफर्ड येथील अनुभवाचा लाभ विद्यापीठातील शिक्षक, संशोधक, विद्यार्थ्यांना मिळावा, यासाठी कुलगुरूंचे विशेष व्याख्यान राजर्षी शाहू सभागृहात झाले. त्यावेळी ते बोलत होते.

कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, ‘एक देश, एक भाषा, एक संस्कृती आणि एक कायदा अशा एकात्म सूत्रात ऑक्सफर्डमधील कारभार चालतो. एकूणच तेथील शिस्त आणि संशोधन-अध्यापन संस्कृती अत्यंत अनुकरणीय आहे. संशोधन आणि अध्यापनाची तिथे इतकी अप्रतिम सांगड घातली गेली आहे की, त्यामुळेच या विद्यापीठातून आजपर्यंत ५०हून अधिक नोबेल विजेते आणि जागतिक स्तरावर गौरविले गेलेले शास्त्रज्ञ, साहित्यिक, कलाकार निर्माण झाले. ऑक्सफर्डमध्ये आणि एकूणच इंग्लंडमध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे येथे जनतेच्या प्राधान्यक्रमावर सर्वप्रथम देश असतो, त्यानंतर संस्था, कुटुंब आणि सरतेशेवटी ‘मी’ असतो. या ‘मी’ पणापासून मुक्ती मिळविण्याची शिकवण ऑक्सफर्डने दिल्याचे त्यांनी सांगितले.

कुलगुरू डॉ. शिंदे यांनी पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनद्वारे ऑक्सफर्ड विद्यापीठासह भेटी दिलेली अन्य विद्यापीठे, विविध शहरे, प्रयोगशाळा यांची रंजक माहिती दिली. परीक्षा नियंत्रक महेश काकडे, वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव आदी उपस्थित होते. बीसीयुडी संचालक डॉ. डी. आर. मोरे यांनी स्वागत केले. श्रीमती नंदिनी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रचारतोफा थंडावल्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषदेच्या गट आणि पंचायत समितीच्या गणासाठी गेल्या पाच दिवस रंगलेल्या निवडणुकीतील जाहीर प्रचाराची रविवारी सांगता झाली. रविवारची सुटी साधून प्रचाराचा ‘वॉर’ करण्यात नेते गुंतून गेले होते. दिवसभरात अनेक घडामोडी घडल्या. प्रचार फेरी, कोपरा सभा, पदयात्रा अशा मार्गाने जाहीर प्रचार करतानाच फोडाफोडीच्या राजकारणालाही वेग आला. सायंकाळपासून नाराजांची समजूत आणि मतदानाची टक्केवारी आपल्याकडे वळविण्यासाठीचे काउंटडाऊन सुरू झाले. दरम्यान, रात्री दहा वाजेपर्यंत नेत्यांच्या प्रचारसभा सुरू राहिल्या.

जिल्हा परिषदेच्या यंदाच्या निवडणुकीत प्रचारासाठी मिळालेले पाच दिवस उमेदवारांनी सत्कारणी लावत कुटुंब ते शेताच्या बांधापर्यंत प्रचार यंत्रणा राबविली. आरोप प्रत्यारोपांचाही धुरळा उडाला. हायटेक प्रचारावर सर्वच उमेदवारांचा भर दिला. रविवारच्या जाहीर प्रचाराचाय् अखेरच्या दिवशी सकाळी सहा वाजल्यापासूनच गावागावात रणधुमाळी उडाल्याचे चित्र होते. विरोधकाला मतदान करू नये, यासाठी अनेक गावांत मतदारांना ग्रामदेवतांची शपथ देण्याचेही प्रकार घडले. नेते, उमेदवार आणि कार्यकर्त्यांच्या प्रचारसभा आणि प्रत्यक्ष गाठी-भेटी दिवसभर सुरू राहिल्या. ज्या भागातील बंडखोरी रोखून मते आपल्याकडे वळविण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत, त्या भागात शेवटच्या क्षणापर्यंत प्रचार यंत्रणा राबली. हक्काचे मतदान असलेल्या ठिकाणी उमेदवारांनी समर्थकांवरच जबाबदारी सोपविली. गावागावांत गट-तट, नाराज उमेदवारांची मोट बांधण्याचे प्रयत्नही सुरू राहिले. मतदारांवर साम, दाम, दंड आणि भेदाचा वापरही केला गेला.

प्रचाराचा धडाका

भाजपचे नेते पालकमंत्री, चंद्रकांत पाटील यांच्या प्रचाराची समाप्ती वडणगे येथील प्रचार सभेने झाली. काँग्रेसचे नेते, आमदार सतेज पाटील यांची निगवे खालसा येथे रात्री नऊ वाजता सभा झाली. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने ग्रामीण भागात कोपरा सभा आणि पदयात्रांवर अधिक भर दिला. आपले मतदान चिन्ह लोकांपर्यत पोहोचविण्याची धडपड सुरू राहिली. मतांचे गणीत लक्षात ठेवून विजयासाठी लागणारी मते कशी मिळतील यासाठी कार्यकर्त्यांची आकडेमोड सुरू राहिली.

००

हॉटेल हाऊसफुल्ल

रविवारी रात्री शहरासह परिसरातील आणि ग्रामीण भागातील हॉटेल, धाबे मतदारांच्या गर्दीने हाऊसफुल्ल झाले. अनेक ठिकाणी जेवणावळी सुरू राहिल्या. उमेदवारांवर वॉच ठेवणाऱ्या पथकांनाही हुलकावणी देत भोजनावळी सुरू होत्या. प्रत्येक भागातील मतदारांना परिसरातील हॉटेल्सची कूपन्स देण्यात आली. संबधित हॉटेल मालकांनाही तशा आगाऊ सूचना उमेदवारांनी दिल्या होत्या. टोकाची इर्ष्या असलेल्या मतदारसंघात मताचा आकडाही ठरला.

मतदान : मंगळवारी (ता. २१) रोजी

जिल्हा परिषद : ६७ जागा ३२२ उमेदवार

पंचायत समिती : १३४ जागा ५८३ उमेदवार

मतमोजणी : २३ फेब्रुवारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वातंत्र्यसैनिक कॉलनीत हवी स्वच्छता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

स्वातंत्र्यसैनिक कॉलनी प्रभागामध्ये उच्चभ्रू, सर्वसामान्य वर्ग आणि झोपडपट्टीचा परिसर असा संमिश्र भाग मोडतो. या परिसरात नियमित स्वच्छतेसह अंतर्गत रस्त्यांची कामे होणे गरजेचे आहे. गेल्या वर्षभरात नगरसेविका रुपाराणी निकम यांनी या परिसरातील मोठ्या प्रमाणात नागरिकांना भेडसविणारा पाण्याचा प्रश्न सोडविला आहे. मात्र स्वातंत्र्यसैनिक कॉलनी, साळोखे पार्क, राजेंद्रनगर हौसिंग सोसायटीपासून एसएससी बोर्ड (राजेंद्रनगर परिसर), शेंडा पार्क, भारतनगर असा विशाल परिसर प्रभागामध्ये समाविष्ट आहे. त्यामुळे अन्य पायाभूत सुविधांची पूर्तता करणे गरजेचे आहे.

राजेंद्रनगर परिसरतील काही भागात अस्वच्छतेचे सम्राज्य दिसून येते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉल या परिसरात पोलिस चौकी सुरू करण्यात आली असून या परिसरात कचरा उठाव, दररोज स्वच्छता होणे गरजेचे आहे. काही ठिकाणी अजूनही गटारींचे काम न झाल्यामुळे सांडपाण्याचा प्रश्न उदभवत आहे. तर काही ठिकाणी कचरा उठाव होत नसल्यामुळे रस्त्यावरच कचरा टाकला जातो. कचरा उठाव न झाल्याने कचरा कुंड्याही ओसंडून वाहत असलेल्या दिसतात. परिसरात औषध फवारणी होणे गरजेचे आहे.

गेल्या वर्षभरात स्थानिक पातळीवर पाण्याचा प्रश्न मार्गी लागल्याने तसेच महापालिकेच्या शाळेच्या वर्गात वाढ होऊन परिसरातील मुलामुलींच्या शिक्षणाचा प्रश्न सुटला आहे. त्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. आरक्षित जागेचा वापर करत प्रभागात अद्ययावत उद्यान, विरंगुळा केंद्र, वाचनालय, व्यायामशाळा अशा कामांसाठी मोठी संधी आहे.

पोलिस चौकी कार्यक्षम हवी

राजेंद्रनगर परिसर तसा संवेदनशील. या परिसरात होणाऱ्या चोरीचे प्रमाण लक्षात घेता लोकांच्या मागणीसाठी येथे पोलिस चौकी उभारण्यात आली. मात्र प्रभागात अनेक लोकांना ही चौकी कुठे आहे, हेच माहीत नाही. ज्या इमारतीवर पोलिस चौकी असल्याचा फलक लावण्यात आला आहे, तो लोकांना दिसणार नाही असाच लावण्यात आला आहे. ही चौकी राजेंद्रनगरच्या एका टोकाला असल्यामुळे आणि फलकचा अभाव असल्यामुळे परिसरात चौकी कुठे आहे हेच अनेकांना माहीत नाही. चौकीत पोलिस पूर्ण वेळ नसतात असेही परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.

वर्षभरात ७० लाखांची कामे पूर्ण

गेल्या वर्षभरात प्रभागाच्या विकासासाठी ७० लाखांची कामे केली आहेत. या प्रभागातील स्वच्छतागृहांचा मोठा प्रश्न असल्यामुळे तो सोडविण्यासाठी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत ६७५ शौचालये बांधण्यात आलेली आहेत. तसेच परिसरात ड्रेनेजच्या पाइपलाइनचे कामही सुरू आहे. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने प्रभागात ३०२५ रोपे लावली होती. त्यापैकी १०२५ झाडांचे संवर्धन केले आहे. प्रभागात लवकरच अद्ययावत आणि प्रशस्त गार्डन साकरण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. परिसरात असलेल्या महापालिकेच्या डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण शाळेचे दोन वर्ग वाढविण्यात आले आहेत. त्यामुळे मुलींची इयत्ता ७वीपर्यंतच्या शिक्षणाची सोय झाली आहे. परिसरातील वाढते चोरीचे प्रकार लक्षात घेता काही दिवसांपूर्वीच या परिसरात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉलमध्ये पोलिस चौकी सुरू करण्यात आली आहे. या परिसरात प्रत्येक घरात शौचालय बांधण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. लवकरच प्रभागात बायोगॅस प्रकल्पही साकारण्यात येणार आहे.
- रुपाराणी निकम, नगरसेविका, स्वातंत्र्यसैनिक कॉलनी

नवी विकासकामेच नाहीत

गेल्या वर्षभरात महापालिकेकडून कोणतेही नवीन बजेट मंजूर झालेले नाही. त्यामुळे सध्या जी कामे प्रभागात केली जात आहेत, ती सर्व यापूर्वीच टेंडर पास करून घेतलेली कामे आहेत. गेल्या वर्षभरात कोणतेच नवीन काम झालेले नाही. पोलिस चौकी उभारुनही फायदा झालेला नाही. चौकीला कर्मचारी नसल्यामुळे ती पूर्ण क्षमतेने सुरू नाही. अनेक कामे ही मी नगरसेविका असताना पूर्ण केलेली आहेत. त्यामुळे या प्रभागातील अनेक विकास कामे आधीच पूर्ण झालेली आहेत.

- जयश्री साबळे, प्रतिस्पर्धी उमेदवार


नगरसेविका निकम यांनी या पसिसरातील पाण्याचा प्रश्न सोडविल्यामुळे सध्या परिसरातील लोकांना एक तासभर पाणी मिळत आहे. या प्रभागातील त्यांनी अनेक विकासकामे केली असून अंतर्गत रस्ते व गटारींचे काम होणे अपेक्षित आहे.
- सुलोचना मिरजकर, रहिवासी


गेल्या वर्षभरात प्रभागात अनेक विकासकामे झाली. नगरसेविका निकम या प्रभागातील ड्रेनेजलाइन, गार्डनसाठी प्रयत्न करत असून अनेक वर्षांची कामे मार्गी लागली आहेत.
- प्रेमा वणकुद्रे, रहिवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शांतता...! तपास सुरू आहे

$
0
0

पानसरे हत्या प्रकरणातील दुचाकी, शस्त्राचा अद्याप शोध नाही

Uddhav.Godase@timesgroup.com

Tweet : @Uddhavg_MT

कोल्हापूर ः कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येला दोन वर्षे उलटली. विविध पुरोगामी संघटनांनी रस्त्यावर उतरून हल्लेखोरांसह सूत्रधारांना गजाआड करण्याची मागणी केली. अतिशय संवेदनशील गुन्ह्यात तपासाच्या पातळीवर मात्र दोन वर्षांनंतरही अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. दोघा संशयितांच्या अटकेनंतरही गुन्ह्यातील शस्त्र आणि दुचाकी पोलिसांना सापडली नाही, त्यामुळे तपास नेमका कोणत्या दिशेने सुरू आहे, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.

१६ फेब्रुवारी, २०१५ रोजी पानसरे यांच्यावर दोघा संशयितांनी गोळ्या झाडल्यानंतर २० फेब्रुवारीला मुंबईत उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने पोलिसांना आव्हान दिले. मात्र, दोन वर्षे उलटली तरीही पोलिसांना हे आव्हान पेलवता आले नाही. राज्य सरकारने एसआयटीची निर्मिती केल्यानंतर समीर गायकवाड हा पहिला संशयित पोलिसांनी ताब्यात घेतला.

समीरवर आरोपपत्र दाखल केले आहे, तर सीबीआयच्या ताब्यातून दुसरा संशयित डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यालाही अटक केली. दोघांवर आरोपपत्र दाखल झाले, पण आरोपनिश्चिती अद्याप होऊ शकली नाही. तपास यंत्रणांनी गांभीर्याने तपास करावा आणि सूत्रधारांनाही अटक करावी यासाठी पानसरे कुटुंबीयांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

हल्ला झाल्यापासून पोलिस गुन्ह्यातील शस्त्र आणि दुचाकीचा शोध घेत आहेत. विविध तपास यंत्रणांसह आसपासच्या राज्यांतील पोलिसांचीही मदत घेतली जात आहे, तरीही एसआयटीला गुन्ह्यातील दुचाकीसह शस्त्र मिळाले नाही. जोपर्यंत या दोन वस्तू मिळत नाहीत, तोपर्यंत तपास पुढे सरकणार नाही, याची एसआयटीलाही जाणीव असली तरी तपासातील गांभीर्य तसे दिसत नाही. पोलिसांनी गांभीर्याने तपास करावा यासाठी पुरोगामी संघटनांनी दबाव तंत्राचा अवलंब केला आहे.

बॅलेस्टिक रिपोर्टचे काय?

गुन्ह्यातील गोळी आणि पुंगळ्यांचा बॅलेस्टिक रिपोर्ट मिळवण्यासाठी सीबीआयने त्या स्कॉटलंड यार्ड पोलिसांकडे पाठवल्या होत्या. सहा महिन्यांनी या गोळ्या तपास अहवालाविनाच परत आल्याचे सीबीआयने न्यायालयाने सांगितले. जर परदेशात या पुंगळ्यांची तपासणी होणारच नव्हती, तर साबीआयने वेळ घालवण्यासाठीच त्या पाठवल्या होत्या काय? असा संतप्त सवाल पानसरे कुटुंबीयांनी उपस्थित केला आहे.

फरार आरोपींचे काय?

एसआयटीने आरोपपत्रात मडगाव बॉम्बस्फोटातील आरोपी सारंग आकोळकर आणि विनय पवार यांचाही उल्लेख केला आहे. राष्ट्रीय तपास एजन्सीने त्यांना फरार घोषित केले आहेत. एसआयटीलाही आकोळकर आणि पवार यांचा सुगावा लागलेला नाही. त्यांच्यापैकी हल्लेखोर कोण आणि सूत्रधार कोण याबाबतही काही उलगडा झालेला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सनातनला सरकारचे बळ; विखेंचा आरोप

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई

शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांची चाड असेल तर सरकारने तातडीने सनातनवर बंदी घालून दाखवावी, असे खुले आव्हान विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहे.

विखे पाटील यांनी आज कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या दुसऱ्या स्मृतिदिनानिमित्त कोल्हापुरात पानसरे यांच्या पत्नी उमाताई यांची भेट घेतली. त्यानंतर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, केंद्रात आणि राज्यात सत्तांतर झाल्यानंतर वैचारिक दहशतवादाला खतपाणी मिळू लागले आहे. त्यामुळेच जो पुरोगामी विचार मांडेल, त्याला संपवणारी प्रतिगामी-मनुवादी मानसिकता बळावताना दिसते आहे. सरकारची या मानसिकतेविरोधी कठोर कारवाई करण्याची भूमिका दिसून येत नाही. वारंवार मागणी केल्यानंतरही हे सरकार सनातनवर बंदी घालायला तयार नाही. ज्या पद्धतीने विविध कारणे सांगून सनातनसारख्या संस्थांवर कारवाई करणे टाळले जाते आहे, ते पाहता या संघटना सत्ताधारी पक्षांच्या बळावरच पोसलेल्या आहेत हे स्पष्ट झाले आहे, असा आरोप त्यांनी केला.

हे सरकार सत्तेत असेपर्यंत सनातनसारख्या संघटनांवर बंदी घातली जाणे शक्यच नाही, असेही विखे पुढे म्हणाले. यावेळी विखे यांच्याबरोबर डाव्या आघाडीचे नेते सतिशचंद्र कांबळे, काँग्रेसचे प्रदेश चिटणीस व नगरसेवक तौफिक मुलानी, सुभाष बुचडे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोलापूर झेडपीसाठी चुरशीने मतदान

$
0
0

सोलापूर झेडपीसाठी चुरशीने मतदान

पंढरपूर

सोलापूर जिल्हा परिषदेसाठी मंगळवारी ७० टक्के भरघोस मतदान झाले. या मतदानाचा फायदा पुन्हा एकदा सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

प्रचाराच्या सुरुवातीपासून शिवसेना आणि भाजपात काडीमोड झाल्यानंतर विरोधक एकत्र येऊच शकले नाहीत. त्याचा फायदा अनेक ठिकाणी एकत्रित सामोऱ्या गेलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मिळाला आहे. माळशिरस, माढा, सांगोला, मंगळवेढा, बार्शी अशा अनेक भागांत राष्ट्रवादीला फायदा मिळाल्याचे मतदानावरून समोर येत आहे.

सकाळपासून मतदान केंद्रे ओस पडल्याने उमेदवारांच्या चिंता वाढू लागल्या होत्या, मात्र सकाळची शेतातली कामे उरकून दुपारी मतदार बाहेर पडले आणि भराभर मतदानाची टक्केवारी वाढू लागली. दुपारी साडेतीनपर्यंत हा टक्का ५० च्या पुढे गेल्यावर मात्र उमेदवार सुखावले. काही ठिकाणी मतदान यंत्राच्या बिघाडामुळे थोडावेळ गोंधळ दिसून आला. मतदानाच्या अखेरच्या टप्प्यात देखील अनेक मतदान केंद्रावर लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून आले. सैनिकांबाबत वादग्रस्त विधान करणारे आमदार प्रशांत परिचारक यांनी पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथे आपल्या मतदानाचा हक्क बजावला.

मंगळवेढ्यात मतदान यंत्रात बिघाड

मंगळवेढा तालुक्यातील खोमनाळ येथील मतदान केंद्रावरील मशीनमध्ये भाजप उमेदवारा समोरील बटन दाबताच दुसऱ्याच उमेदवारापुढील दिवा लागत असल्याचे निदर्शनास येताच येथील मतदान थांबविण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी आणि निरीक्षक या दोघांनीही या केंद्राला भेट दिली. त्यांना संतप्त मतदारांच्या रोषाला सामोरे जावे लागले. मतदान यंत्र बदलून मतदानाची वेळ वाढवून देण्यात आली. पंढरपूर तालुक्यातील उपरी येथील यंत्र सकाळी बंद पडल्याने मतदारांना ताटकळत थांबावे लागले होते.

घड्याळावर लावला चुना

माळशिरस तालुक्यातील वेळापूर जिल्हा परिषदेच्या विझोरी केंद्रावर मतदान यंत्राशी छेडछाड झाली. अज्ञात मतदाराने सर्वच मशीनवरील राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर चुना लावल्याने मतदारांना चिन्हच दिसत नव्हते. याची तक्रार राष्ट्रवादीचे नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी निवडणूक अधिकाऱ्याकडे केली. या बाबत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

राष्ट्रवादीचे तेरा कार्यकर्ते ताब्यात

माळशिरस तालुक्यातील वेळापूर जवळ मंगळवारी पहाटे पैसे आणि मतदारांच्या याद्या घेऊन जाणाऱ्या गाडीला पोलिसांनी ताब्यात घेतले. गाडीतून ६७१०० रुपये आणि मतदारयादी जप्त करण्यात आली. या प्रकरणी १३ जणांना ताब्यात घेतले असून, हे सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असल्याचे सांगण्यात आले.

सोलापुरात दुपारनंतर
मतदानाला वेग


सोलापूर
सोलापूर महानगरपालिकेसाठी मंगळवारी चुरशीने मतदान झाले. पालिकेच्या १०२ जागांसाठी ६२३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, माकप, एमआयएम, बसपासह छोटे-मोठे पक्ष आणि अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.रविवार १९ फेब्रुवारी रोजी प्रचाराचा धुराळा संपल्यानंतर सोमवारी कोणताही प्रचार न करता उमेदवारांनी मतदारांच्या घरोघरी जाऊन भेटीगाठी घेतल्या. रात्री अनेकांना लक्ष्मी दर्शनही झाल्याचे सांगण्यात आले. मंगळवारचा मतदानाचा दिवस उजाडला. उमेदवारांनी सकाळी लवकर उठून कुलदैवताचे दर्शन घेतले आणि घराबाहेर पडले. आपापल्या भागातील मतदान केंद्रांवर चौघांनी एकत्र जाऊन भेटी दिल्या. प्रभागाचा परिसर लांबच लांब असल्याने आणि एकत्र फिरणे शक्य नसल्याने उमेदवारांनी भाग वाटून घेतला. सकाळी दमानी नगर, देगाव, निराळे वस्ती, कल्पना टॉकीज, पत्रा तालीम, मंगळवेढा तालीम यासह बापूजी नगर, लोधी गल्ली, शास्त्री नगर, नई जिंदगी, कुमठा नाका, विमानतळ या भागात फेरफटका मारला असता मतदान केंद्रांवर मतदारांच्या मोठ्या प्रमाणावर रांगा दिसून आल्या. उमेदवार प्रत्येक मतदान केंद्रांवर फिरताना दिसून येत होते. एमआयएमचे उमेदवार तौफिक शेख आणि राष्ट्रवादीचे उमेदवार माजी उपमहापौर हारुन सैय्यद यांच्यात दोन दिवसांपूर्वी तुंबळ हाणामारी झाल्यानंतर मातदानादिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून नई जिंदगी अमन चौकात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. नई जिंदगीमध्ये एमआयएम आणि राष्ट्रवादी यांच्यात तसेच काही ठिकाणी शिवसेना आणि काँग्रेसमध्ये काट्याची लढत होत असल्याने या भागात प्रत्येक केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. हा भाग मुस्लिम बहुल असल्याने पुरुषांबरोबर महिलाही मतदानासाठी बाहेर पडल्या होत्या. या परिसरात प्रमुख रस्ते आणि गल्लोगल्ली कार्यकर्ते टेबल टाकून मतदारांना माहिती देण्यासाठी बसले होते. पोलिसांची गाडी फिरत असल्याने कोणीही गोंधळ करण्याचे धाडस दाखवले नाही. पोलिसांनी या भागाला वेढाच टाकला होता. बापूजी नगर हा कामगारवर्गाचा भाग असला तरी सुद्धा विडी कामगार महिलांनी मतदानासाठी गर्दी केली होती. लोधी गल्ली परिसरातील एक मतदान केंद्र भर रस्त्यावरच असल्याने मतदारांची रांगही रस्त्यावर आली होती. कायम हा भाग वर्दळीचा असल्याने आणि त्यातच मतदान असल्याने परिसर गर्दीने अधिकच फुलून गेला होता. कार्यकर्त्यांचे जथेच्या जथे रस्त्यावर गर्दीने उभे होते. संवेदनशील भाग म्हणून घोषित केलेल्या प्रभाग क्रमांक सात पत्रा तालीम आणि मंगळवेढा तालीम परिसरात जणू अघोषित संचारबंदीच लागू असल्याचे चित्र होते. या भागातील मतदान केंद्रांवर शांततेत मतदान सुरू होते. या शिवाय याच प्रभागातील निराळे वस्ती परिसरातील शरदचंद्र पवार प्रशाला येथे असलेल्या एकूण आठ मतदान केंद्रावर मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. उमेदवार नगरसेवक मनोहर सपाटे, नगरसेवक देवेंद्र कोठे, अमोल शिंदे, पद्माकर काळे यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते गटागटाने मतदान केंद्राबाहेर थांबून मतदारांना आवाहन करताना दिसून आले. सकाळपासून या मतदान केंद्रावर गर्दी दिसून आली. अश्विनी रुग्णालयाजवळील मतदान केंद्राबाहेर मैदानात गर्दी दिसून आली. या ठिकाणी मतदार कमी आणि कार्यकर्ते जास्त अशी परिस्थिती दिसून आली. शिवसेना नगरसेवक म्हेत्रे यांच्या घराजवळील मतदान केंद्रावर प्रथम मतदानासाठी आलेल्या तरुणींमध्ये उत्साह दिसून आला. सोशल हायस्कूलमधील मतदान केंद्रावर मतदानासाठी उशीर लागत असल्याने महिलांना बसण्यासाठी बाकडे टाकण्यात आले होते. एकूणच शहराच्या काही भागात सकाळच्या सत्रात मतदानासाठी रांगा, दुपारी संथ तर शेवटच्या सत्रात मतदानासाठी जोर आल्याचे दिसून आले.महापौरांना हटकलेमहापौर प्रा. सुशीला आबुटे आयटीआय मतदान केंद्राच्या परिसरात सातत्याने फिरत होत्या. त्यामुळे पोलिस निरीक्षक अंकुशराव यांनी त्यांना हटकले. आपण केंद्राच्या परिसरात न फिरता बाहेर जावे, असे पोलिसांनी त्यांना सांगताच महापौर बाहेर पडल्या. याच केंद्रांवर सकाळची माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि कुटुंबियांनी मतदानाचा हक्क बजावला होता.वृद्धांमध्ये मतदानासाठी उत्साहमतदानासाठी ज्येष्ठ आणि वृद्ध मंडळींनी हिरीरीने सहभाग नोदविला. नई जिंदगी, अश्विनी रुग्णालय परिसरासह अन्य ठिकाणी ही मंडळी आपली मुले, नातवांसमवेत रिक्षामधून, दुचाकीवरून आली होती. एका अपंग मतदाराने व्हिल-चेअरचा आधार घेऊन मतदानाचा हक्क बजावला. कोणी काटी टेकत, कोणी दुचाकीवर तर कोणी आपल्या नातेवाईकांसमवेत मतदानासाठी आले. सकाळच्या सत्रात ज्येष्ठ आणि वृद्ध मंडळी मतदानासाठी बाहेर पडली. परंतु, तरुणाई मतदानासाठी फारशी दिसून आली नाही.मतदान करताना तारेवरची करावी लागली कसरतमतदान प्रक्रिया सुरू झाल्यानंतर काही जणांनी मतदान करण्यासाठी केंद्र गाठले खरे परंतु, मतदान यंत्रासमोर गेल्यानंतर अनेकांची अडचण होऊन बसली. मतदान यंत्रावरील बटन दाबले असतानाही आवाज येत नसल्याने मतदार गोंधळून गेल्याचे दिसून आले. अखेर केंद्रातील अधिकाऱ्यांना लांबून मदत करावी लागली. ज्यांना उमेदवारांचे नाव वाचता आले नाही त्यांनी तर दिसेल त्या बटनावर बोट दाबून मतदान केल्याचे समाधान मानले. काही मतदान केंद्रांवर चार तर काही मतदान केंद्रांवर तीन मशीन ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे मतदार गोंधळल्याचे दिसून आले त्यामुळे क्रॉस मतदानाची भिती व्यक्त करण्यात येत आहे.दिग्गजांनी केले रांगेतून मतदानमाजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, पत्नी उज्वलाताई शिंदे, कन्या आमदार प्रणिती शिंदे यांनी आयटीआय केंद्रावर, पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी आई, मुलगा उमेदवार डॉ. किरण देशमुख आणि सुनबाई यांच्यासमवेत नुमवी प्रशाला येथे मतदानाचा हक्क बजावला. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी पत्नी स्मिता यांच्यासह लिटिल फ्लॉवर हायस्कूल, माजी आमदार नरसय्या आडम यांनी बापूजी नगर येथे पत्नी कामिनी, कन्या आणि चिरंजीवासह मतदानाचा हक्क बजावला. या शिवाय महापौर सुशीला आबूटे यांनीही मतदानाचा हक्क बजावून प्रभागात फेरी मारली. एकूणच दुपारपर्यंत शांततेत मतदान पार पडले.मतदान केंद्रातवृद्धाचा मृत्यूसोलापूर :सोलापूर महानगरपालिकेसाठी मतदान करण्यासाठी मतदान कक्षाकडे जाताना पार्टेक फरशीवरून घसरून पडल्याने गंगाधर आण्णाराव शेटे (वय ७५) यांचे निधन झाले. ही घटना मंगळवारी दुपारी ग. ल. कुलकर्णी शाळेतील मतदान केंद्रात घडली.गंगाधर शेटे सिध्देश्वर यात्रेचे प्रमुख मानकरी होते. मुलासमवेत ते मतदान करण्यासाठी गेले असता ही दुर्घटना घडली. खाली पडल्यानंतर शेटे यांना तातडीने पोलिसांच्या मदतीने अॅम्ब्युलन्समधून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.भाजप उमेदवाराला चोपप्रभाग क्रमांक २५ येथे भाजपचे उमेदवार सुभाष शेजवाल यांना स्लिप वाटप करताना पोलिसांनी लाठीचा प्रसाद दिला. या घटनेमुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता, मात्र काहीकाळानंतर तो निवळला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​साताऱ्यात अंदाजे७० टक्के मतदानउदयनराजे यांच्यावाहनावर दगडफेक

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सातारा

सातारा जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये नशीब आजमावणाऱ्या सुमारे ८१७ उमेदवारांचे राजकीय भवितव्य मंगळवारी मशीनबंद झाले. जिल्ह्यात २,५८३ मतदानकेंद्रांवर सुमारे ११ लाख मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. किरकोळ अपवाद वगळता सर्वच मतदानकेंद्रांवर शांततेत मतदान झाले. मतदान संपता संपता राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठा पणाला लागलेल्या जावली तालुक्यात खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाहनावर खर्शी बारामुरे येथे दगडफेक झाल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला. या घटनेचा अपवाद वगळता मिनीमंत्रालयासाटी सातारा जिल्ह्यात अंदाजे ७० टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

जिल्हा प्रशासनाने जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांच्या आदेशाप्रमाणे सुमारे चार हजार महसूल कर्मचारी निवडणूक मोहिमेवर होते. २५८३ मतदानकेंद्रांवर कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सकाळी आठ वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेऊन होते. सातारा, कराड, जावली, वाई फलटण या पाच तालुक्यातील सुमारे अकराशे मतदानकेंद्रे संवेदनशील असल्याने त्यांच्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले होते.

सातारा व कराड तालुक्यातही मतदानाचा टक्का ६० टक्क्यांच्या पुढे सरकल्याने राष्ट्रवादीची धाकधूक वाढली असून, आमदार गट बाजी मारणार की खासदार गट याविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

सातारा पोलिसांनी बंदोबस्ताची जय्यत तयारी ठेवल्याने फार कोठे तणावाच्या घटना घडल्या नाहीत. मात्र, खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाहनावर झालेल्या दगडफेकीचे पडसाद पडसाद उमटत राहिले. राजे समर्थकांनी खासदारांच्या मोटारीवर दगडफेक करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्याने साताऱ्यातही तणाव होता. पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांनी तसे आश्वासन दिल्याने तणाव निवळला.

उदयनराजे यांच्या

वाहनावर दगडफेक

वली तालुक्यातील म्हसवे गटातील खर्शी बारामुरे येथे राष्ट्रवादीचे नेते वसंतराव मानकुमरे यांच्या समर्थकांकडून खा. उदयनराजे भोसले यांच्या वाहनावर दगडफेक झाली. हे वृत्त संपूर्ण सातारा जिल्ह्यात पसरल्याने जिल्हा परिषद निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात मतदान संपता संपता तणावाचे वातावरण निर्माण झाले. दगडफेकीचे नक्की कारण समजू शकले नाही. आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मेढा पोलिस स्टेशन गाठल्याने दोन्ही नेते पुन्हा एकदा आमने सामने आल्याची चर्चा आहे. तक्रारीची नोंद मेढा पोलिस स्टेशनला करण्यात आली आहे.

कुडाळ गटामध्ये राष्ट्रवादीची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. म्हसवे आणि कुडाळ येथील दोन्ही लढती राष्ट्रवादीने प्रतिष्ठेच्या केल्याने या पार्श्वभूमीवर खा. उदयनराजे भोसले दुपारनंतर जावली तालुक्याच्या दौऱ्यावर होते. संध्याकाळी पाचनंतर खा. उदयनराजे खर्शी बारमुरे येथे आले असता त्यांच्या वाहनावर अचानक दगडफेक झाली. ही दगडफेक राष्ट्रवादीचे नेते वसंतराव मानकुमरे यांच्या कार्यकर्त्यांनी केल्याची माहिती समोर येत आहे.

मेढा पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी खा. उदयनराजे भोसले आले असता, कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. या घटनेचे वृत्त कळताच साताऱ्यातून आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले व वसंतराव मानकुमरे हे सुद्धा तातडीने पोलिस ठाण्यात पोहोचले. दोन्ही गटांनी मेढा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक डी. पी. काठाळे यांच्याशी चर्चा केली. तक्रार दाखल करून घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी ठिय्या दिल्याने रात्री उशिरापर्यंत मेढ्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी बंदोबस्त वाढवल्याने परिस्थिती नियंत्रणात होती.

दगडफेकीचा राजकीय ताण मेढ्याने अनुभवला. तसा त्याचे पडसाद रात्री उशिरा साताऱ्यात उमटले. दगडफेकीचे वृत्त साताऱ्यात पसरताच सुमारे दोन हजार राजे समर्थकांचा जमाव पोलिस मुख्यालय परिसरात जमा झाला. समर्थकांनी मुख्यालय परिसरात तळ देऊन संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. रात्री उशिरा उदयनराजे भोसले साताऱ्यात दाखल झाले. तेव्हा काही काळ समर्थकांची गर्दी आवरता आवरता पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. उदयनराजे यांनी रात्री पोलिस अधिक्षकांची भेट घेतल्याचे वृत्त आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पडद्यामागील राजकीय जोडण्या वेगावल्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी छुप्या जोडण्यांना रात्री वेग आला. गटातटाच्या मतदानांचा मोठा फरक पडणार असल्याने राजकीय पक्षांचे नेते, आघाडी आणि अपक्षांनी रात्रभर एकेक मतदान मिळविण्यासाठी जोडण्या केल्या. पडद्यामागील राजकीय दंगलीला वेग आला.

शंभर टक्के उमेदवार निवडून येण्याची खात्री असलेल्या मतदारसंघाची जबाबदारी स्थानिक कार्यकर्त्यांच्या वर सोपविली. मात्र अटीतटीच्या आणि राजकीय भवितव्य ठरविणाऱ्या लढतीच्या ठिकाणी नेते आणि उमेदवारांनी सोमवारी रात्री छुपा प्रचार केला. अनेक राजकीय खलबते तालुक्यात माजली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि मित्र पक्षांच्या नेत्यांनी ग्रामीण भागात अधिक लक्ष केंद्रीत केले. प्रचाराची रणधुमाळी संपली असली तरी सोमवारचा दिवस राजकीय जुळवाजु‍ळव करण्यात नेत्यांनी घालविला. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे काउंटडाऊन उमेदवारांच्या समर्थकांनी केली. मतांची आकडेमोड सुरू केली. ज्या मतदारसंघात उमेदवाराला कमी मतदान असेल. त्या ठिकाणचे सामाजिक कार्यकर्ते, सार्वजनिक तरूण मंडळाचे कार्यकर्ते, यंग सीनिअर्स, भागात प्रतिष्ठा असणाऱ्या लोकांच्या भेटी घेण्यात आल्या. काही ठिकाणी मतदारांना आर्थिक अमिषे दाखविण्यात आले. मतांसाठी दरही ठरविण्यात आला. त्याची जबाबदारी विश्वासू कार्यकर्त्यांच्यावर सोपविण्यात आली. महिला बचत गटासाठी सहलींचे आश्वासन देण्यात आले. तर उमेदवाराला मतदान करण्यासाठी पतसंस्था, सहकारी साखर कारखाना, मार्केट कमिटी आणि अन्य ठिकाणी नोकरी लावण्याचा शब्दही देण्यात आला. उमेदवारांचे मतदान फिक्स समजण्यासाठी ग्रामदेवतांच्या शपथाही देण्यात आल्या.

भाजप प्रणित आघाडीने काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे मतदान कमी होण्यासाठी प्रयत्न केले. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काही मतदारसंघात एकमेंकांना सहकार्य करण्याची व्यूहरचना करण्यात आली. काही मतदारसंघात आघाड्यांची मते निर्णायक ठरणार आहे. आघाडीची मतदान अबाधित राहण्यासाठी रात्री उशीरापर्यंत जोडण्या सुरू राहिल्या. नेत्यांच्या शब्दाचा मान ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षणाच्या साथीने परिवर्तनाचा वसा

$
0
0

Janhavi.Sarate@timesgroup.com
Tweet : @MTjanhavisarate

कोल्हापूर : शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागसलेला, मर्यादित असूनही काळानुरुप स्वतःसह समाजपरिवर्तन घड‌वत उच्चशिक्षणाची कास धरणारा कोष्टी समाज. लेक वाचवा अभियान, पोटजाती तोडो - समाज जोडो आणि कोष्टी समाज युवा संघटना आणि महिला संघटना गेल्या २५ वर्षांपासून अध्यक्ष-उपाध्यक्षांशिवाय समाजासाठी एकजुटीने कार्य करणाऱ्या कोष्टी समाज अन्य समाजांसाठी आदर्शवत ठरत आहे.

कोष्टी समाजाच्या श्री देवांग कोष्टी समाज चौंडेश्वरी मंदिर व बोर्डिंग, कोष्टी समाज युवा संघटना, ऑल इंडिया देवांग देवांगण कोष्टी कोष्टा फेडरेशन, देवांग कोष्टी समाज, कोष्टी समाज महिला मंडळ अशा संघटना आहेत. कोष्टी समाजाचा पारंपरिक व्यवसाय विणकर असून शहरात समाजाची अडीचशे कुटुंबे असली तरी इचलकरंजी, पेठवडगाव, विटा, ठिपकुर्ली, सरुड, सांगरुळ या परिसरातही मोठ्या प्रमाणात या समाजातील लोकांचे वास्तव्य आहे. समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी राजर्षी शाहू महाराजांनी गंगावेश येथील पाडळकर मार्केटमध्ये वसतिगृहासाठी जागा दिली होती. कालांतराने या जागेवर कुळांनी कब्जा केला. आता समाजातील लोकांनी ही जागा संस्थेच्या ताब्यात घेतली आहे.

शहरात मंगळवार पेठेत कोष्टी समाजाचे वास्तव्य होते. साधारण ७०-८० वर्षांपूर्वी विणकर समाज लहान मागावर, हातमागावर साडी बनविण्याचा व्यवसाय करीत होता. मात्र कोल्हापूरमध्ये या व्यवसायासाठी वातावरण पोषक नसल्याने व्यवसायाचा विस्तार होऊ शकला नाही. त्यामुळे बहुसंख्य लोक कोल्हापुरातून इचलकरंजी शहरात स्थलांतरीत झाले. नंतरच्या काळात कोल्हापुरातील घरोघरचा हातमाग व पॉवरलुम्सचा व्यवसाय बंद झाला.

आता समाजाच्यावतीने गेल्या चार वर्षांपासून लेक वाचवा अभियान राबविले जाते. ज्या दाम्पत्यास पहिली मुलगी जन्माला येईल, त्यांना संस्थेतर्फे अडीच हजार रुपयांचे नॅशनल सेव्हिंग सर्टीफिकट देण्यात येते. तर छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी समाजासाठी केलेल्या मदतीचा विचार करत त्यांच्या नावाने गेल्या १२ वर्षांपासून छत्रपती राजर्षी शाहू पुरस्कार देण्यात येतो. दहावी, बारावी परीक्षेत किमान ९० टक्के गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांना ‌हा पुरस्कार दिला जातो. मंदिर परिसरातील नागरिकांना उत्तरकार्य व वर्षश्राद्ध आदी कार्यांसाठी नाममात्र शुल्कामध्ये संस्थेचा हॉल उपलब्ध करुन दिला जातो. देवांग कोष्टी समाज, चौंडेश्वरी मंदिर व बोर्डिंगच्यावतीने चौंडेश्वरी देवी महोत्सव, वधू-वर परिचय मेळावा, विद्यार्थ्यांना पुस्तके व वह्या वाटप, महाविद्यालयीन विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना असे विविध उपक्रम राबविले जातात.

अध्यक्ष, उपाध्यक्षांशिवाय कार्य

आज कोणत्याही समाजात, संघटनेत अध्यक्ष-उपाध्यक्ष आदी पदांसाठी इर्ष्या दिसते. त्यातून वाद निर्माण होतात. मात्र कोष्टी समाजातील युवा संघटना गेल्या २५ वर्षांपासून तर महिला मंडळ गेल्या २० वर्षांपासून अध्यक्ष-उपाध्यक्षांशिवाय अत्यंत चांगल्या पद्धतीने कार्य करत आहे. प्रत्येक समाजात जाती-पोटजातींना महत्व दिल्यामुळे समाजाचा विकास खुंटलेला दिसून येतो. त्यामुळे कोष्टी समाजाने सर्व पोटजातींना एकत्र आणण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू ठेवले आहेत. यासाठी पोटजाती तोडो, समाज जोडो अभियान राबविले जाते. विणकर समाजात कोष्टी, हालबा कोष्टी, साळी, स्वकुळ साळी, लाड कोष्टी, गडेवाल कोष्टी, देशकर, पद्मशाली, शालेवार, चैन्नेवार, देवांग, कांचीबंदे, पटवी, सतचाले, ताडे, जैन कोष्टी आदी पोटजाती आहेत.

समाजातील प्रति‌ष्ठीत व्यक्ती

बळीराम कवडे, महादेवराव इदाते, कै. महादेवराव बचुडे, कै. सुधाकर दौंडे, राजेश डाके, मोहन हजारे, नामदेवराव रोडे, गजाननराव कांबळे, विठ्ठलराव डाके, शैलेंद्र सातपुते, किशोर मुसळे, आशिष ढवळे आदी.

सामाजिक उपक्रम

कोष्टी समाज युवा संघटनेच्यावतीने शैक्षणिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, सामाजिक उपक्रम राबविले जातात. यातील शैक्षणिक उपक्रमांना महत्व दिले जाते. समाजाच्यावतीने शहरस्तरीय शालेय विज्ञान प्रदर्शन, चित्रकला स्पर्धा, इयत्ता १० वी व १२ वीनंतर काय? याविषयीची मार्गदर्शन शिबिरे, चांद्रयान मोहीम स्लाइड शो, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरे, विविध शालेय क्रिडा स्पर्धा, शाळेबाहेरी कुतुहलाचे जग - कार्यशाळा आदींचे आयोजन करण्यात येते. तर वैद्यकीय उपक्रमांमध्ये समाजातील लोकांसाठी मधुमेह तपासणी, हृदयरोग तपासणी शिबिर, त्वचारोग व दंतरोग तपासणी शिबिर, नेत्र तपासणी आणि चष्मे वाटप असे कार्यक्रम घेतले जातात. प्रदर्शनांच्या माध्यमातून समाजाला विविध घटनांशी जोडले गेले. कैलास मानस सरोवर फोटो प्रदर्शन, दुर्मिळ नाण्यांचे प्रदर्शन, महालक्ष्मी मंदिराचे समग्र छायाचित्रांचे प्रदर्शन, एन.सी.सी. साहित्य व फोटोचे प्रदर्शन, महिलांसाठी विविध स्पर्धा, शहरस्तरीय जलतरण स्पर्धा, दुर्मिळ वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. तर अन्य सामाजिक उपक्रमांममध्ये प्रबोधनात्मक व्याख्याने, होळीविरोधात समाज जनजागृती फेरी, युवा संघटनेची रक्तगट संचयिका, वृद्धाश्रम सुसंवाद व स्नेहभोजन, व्यक्तिमत्व विकास शिबिरे, वक्तृत्व विकास शिबिरे, दुष्काळग्रस्तांसाठी मदत, कमवा व शिका शिबिरे, भ्रष्टाचार विरोधी कॅडल मार्च, युवा व्हीजन, सरकारी योजना व सुविधा याबाबतची माहितीपर व्याख्याने असे उपक्रम राबविले जातात.


कार्यकारणी

महादेव इदाते, पांडुरंग कवडे, विलास मकोटे, योगिराज साखरे, रामचंद्र फातले, अनिल भंडारे, नामदेव रोडे, बळीराम कवडे, शंकरराव कांबळे, संजय मकोटे, गजानन समंग, विशाल मकोटे, सुनिता कांबळे, सुर्यकांत कवडे, राजेंद्र ढवळे, मोहन हजारे, पांडुरंग हावळ, राम मकोटे, प्रशांत आमणे, सुरेश वीर, शैला मोरे, शशांक मकोटे, हरी मुसळे, भाऊ मकोटे, माया तगारे, शोभा गांजवे, रुपेश रोडे आदी.


समाजाची स्थापना दीडशे वर्षांपूर्वी रावसाहेब मंडलिक यांनी केली आहे. समाजातील परितर्वनासाठी आणि एकजुटीसाठी गेल्या काही वर्षांपासून पोटजाती तोडो, समाज जोडो हे अभियान राबविले जात आहे. कोष्टी समाजातील सर्व पोटजातीच्या लोकांना एकत्र आणण्यासाठी हा प्रयत्न केला जात आहे.
- पांडुरंग कवडे, अध्यक्ष

चौंडेश्वर मंदिरातर्फे अनेक धार्मिक कार्यक्रमांबरोबर सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. समाजातील १९ पोटजातींना एकत्र आणण्यासाठी दोन वर्षातून एकदा राज्यस्तरीय वधू-वर मेळावा घेतला जातो. पुरोगामी विचार घेऊनच समाजात आंतरजातीय विवाह लावून दिले जातात.
- सूर्यकांत कवडे, उपाध्यक्ष

चौंडेश्वरी महिला मंडळाची स्थापना ८ मार्च १९९७ रोजी झाली. गेल्या २० वर्षांपासून ही संघटना कोणत्याही अध्यक्ष-उपाध्यक्षांशिवाय काम करते. सर्व महिला एकत्रित कार्य करत आहेत. महिला सबलीकरणाच्यादृष्टीने अनेक उपक्रम राबविले जात आहेत.
- उमा कवडे, महिला सदस्य

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डंपरच्या धडकेत बाप-लेकीचा मृत्यू

$
0
0

जयसिंगपूर

भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने मोटारसायकलला ठोकरल्याने बापलेकीचा मृत्यू झाला. शिरोळ तालुक्यात चिंचवाड-उदगाव रस्त्यावर सोमवारी सकाळी सव्वादहा वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. मिलिंद दशरथ व्हनखंडे (वय २८) आणि तृप्ती मिलिंद व्हनखंडे (वय ४, रा.उदगाव) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेनंतर संतप्त जमावाने डंपर पेटविला तसेच अंकली पुलावर रास्ता रोको केला.

याबाबत पोलिसांतून तसेच घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, मिलिंद व्हनखंडे हे मुलगी तृप्ती हिच्यासमवेत चिंचवाड येथे पाहुण्यांकडे गेले होते. सोमवारी सकाळी पल्सर मोटारसायकलवरून ते उदगावकडे येत होते. यावेळी पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या डंपरने मोटारसायकलला धडक दिली. मिलिंद व तृप्ती हे डंपरच्या चाकाखाली सापडल्याने जागीच ठार झाले. अपघातानंतर डंपर अपघातस्थळी न थांबता अंकलीच्या दिशेने निघून गेला.

दरम्यान, अपघाताची माहिती समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी हृदय हेलावणारे चित्र पाहून संतप्त झालेल्या जमावाने डंपरचा शोध सुरू केला. अंकली येथे वीट भट्टीजवळ डंपर उभा करून चालकाने पलायन केले होते. या डंपरवर जमावाने दगडफेक केली, तसेच डंपर पेटवून दिला. डंपर चालकास तत्काळ अटक करावी या मागणीसाठी अंकली टोलनाक्याजवळ जमावाने रास्ता रोको केला. यामुळे कोल्हापूर सांगली मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. याठिकाणी दुसऱ्या डंपरवर जमावाने दगडफेक केली. अपघाताची वर्दी सलिम महमद पेंढारी यांनी दिली. यानंतर जयसिंगपूर पोलिसांनी डंपर चालकावर गुन्हा दाखल केला.

शोकाकुल वातावरणात मिलिंद व तृप्ती यांच्या पार्थिवावर अंत्यंसंस्कार करण्यात आले. मिलिंद व्हनखंडे हा वाळू भरणीचे मजुरीचे काम करीत होता. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नव्या समीकरणाची नांदी ?

$
0
0

Gurubal.Mali @timesgroup.com
Tweet : @gurubalmaliMT

कोल्हापूर : बहुमताची खात्री नसली तरी प्रत्येक पक्षाला जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन करायची आहे. त्यामुळे प्रत्येकजण इतरांच्या कुबड्या घेण्याच्या तयारीत असल्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी मतदान होणार आहे. मतदारांचा कौल हा जिल्ह्याच्या नव्या राजकीय समीकरणाची नांदी ठरणार आहे. भाजपने प्रथमच ताकद लावल्याने आणि दोन्ही काँग्रेसमध्ये छुपा समझोता झाल्याने महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह खासदार, आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

महापालिका निवडणुकीत सारेच पक्ष स्वतंत्र लढले होते. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व भाजप हे सारे एकमेकांच्या विरोधात लढताना भाजप ताराराणी आघाडीला सत्तेपासून रोखण्यासाठी इतरांनी छुपी आघाडी केली होती. यामुळे अपेक्षेप्रमाणे निकालानंतर दोन्ही काँग्रेसने सत्तेसाठी आघाडी केली. वर्षभराने शिवसेना देखील या आघाडीत अप्रत्यक्षरित्या सहभागी झाली आहे. महापालिकेत दोन्ही काँग्रेसने सेनेला सोबत घेतल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत देखील याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. शिवसेना, स्वाभिमानी व जनसुराज्यला सोबत घेत सत्तेवर येण्याचे भाजपचे नियोजन होते. पण सेना व स्वाभिमानीने निवडणूक पूर्व युती केली नाही. तरीही निकालानंतर हे पक्ष सोबत राहतील अशी भाजपची अपेक्षा आहे.

जिल्ह्यात काही ठिकाणी दुरंगी तर काही ठिकाणी तिरंगी आणि चौरंगी लढत होत आहे. दोन्ही काँग्रेसमध्ये निवडणूक काळातदेखील गटबाजी दिसून आली. या निवडणुकीत ताकदीने राष्ट्रवादीचा प्रचार करणार असल्याचे सांगणारे खासदार धनंजय महाडिक जिल्हाभर फिरलेले दिसले नाहीत. आमदार हसन मुश्रीफांनी कागलला महत्च दिले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी.एन. पाटील यांनी करवीर तालुका सोडला नाही. आमदार सतेज पाटील दक्षिणमध्ये तळ ठोकताना इतर काही ठिकाणी प्रचार केला. प्रकाश आवाडेंनी पक्षाविरोधातच बंड पुकारले. चंद्रदीप नरकेंनी करवीरमध्ये जोरदार प्रचार केला. स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी यांनी शिरोळ व हातकणंगले पिंजून काढला. शिवसेनेचे बहूसंख्य आमदार सोयीने प्रचारात होते.

घरातल्या अध्यक्षपदासाठी जोर

सर्वच पक्षाच्या नेत्यांनी सोयीने प्रचार केला. बहूसंख्य नेत्यांना घरातील व्यक्तीलाच अध्यक्ष करायची इच्छा आहे. यामुळे ते मतदारसंघात अधिक होते. सत्ता येण्यापूर्वी आपला मुलगा, सून निवडून आली पाहिजे यासाठी प्रचारात जोर लावण्यात आला होता. यामुळे निकाल काही लागला तरी अध्यक्षपद या नेत्यांच्या घरातच राहण्याची शक्यता आहे. काँग्रेसची सत्ता आल्यास राहुल पाटील, राहुल आवाडे, भाजपची सत्ता आल्यास शौमिका महाडिक, अरूण इंगवले, शिवसेनेची सत्ता आल्यास अजित नरके, विरेंद्र मंडलिक, अंबरिष घाटगे यांच्या नावाची अध्यक्षपदासाठी चर्चा आहे. राष्ट्रवादीकडे प्रियांका पाटील, सतीश पाटील, मनोज फराकटे वगळता सध्या तरी वारसदारांची नावे चर्चेत नाहीत.

आघाडी कोणासोबत याची उत्सुकता

या निवडणुकीच्या कौलाने जिल्ह्यातील नव्या राजकारणाची नांदी ठरणार आहे. कारण कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहूमत मिळणार नसल्याने कोण कोणासोबत आघाडी करणार याची उत्सुकता आहे. भाजप, ताराराणी आघाडीला सत्तेपासून रोखणे हेच दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांची धडपड राहील. पण कोणाचीही मदत घेत भाजपचा अध्यक्ष करण्याची फिल्डींग पालकमंत्री चंद्रकांत पाटील करण्याची शक्यता आहे. तसे प्रयत्न त्यांचे सुरू आहेत. स्वाभिमानी व शिवसेना हे यामध्ये किंगमेकर म्हणून महत्वाची भूमिका बजावतील. सध्या तरी सत्ता कोणाचीही येवो तेथे हे दोन पक्ष असण्याची चिन्हे अधिक आहेत. जिल्हयाचे राजकारण बदलणारी ही निवडणूक असल्यानेच त्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जि.प. ने काढल्या केडीसीसीतून ठेवी

$
0
0

Bhimgonda.Desai@timesgroup.com

Tweet : @bhimgondaMT

कोल्हापूर: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून जिल्हा परिषदेने आपल्या २९ कोटींच्या ठेवी काढून आरबीएल बँकेत ठेवल्या आहेत. व्याज दर कमी असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. आरबीएल बँकेमध्ये ठेवल्याने दरमहा २५ हजार रुपये पुर्वीपेक्षा जादा व्याज जिल्हा परिषदेला मिळणार आहे. जिल्हा परिषदेला फायदा होणार असला तरी एकाचवेळी इतक्या मोठ्या रकमेची ठेव गमवावी लागल्याने केडीसीसीला फटका बसला आहे. केडीसीसीचे अधिकारी जिल्हा परिषदेकडे हेलपाटे मारून पुन्हा ठेवी मिळवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

जिल्हा परिषदेच्या एकूण १०२ कोटींच्या विविध स्वरुपाच्या ठेवी आहेत. या ठेवी अनेक वर्षापासून वेगवेगळ्या मुदतीसाठी केडीसीसी बँकेत ठेवल्या जातात. मात्र अलिकडे केडीसीसीपेक्षा अधिक व्याज अन्य बँकेत मिळू लागले आहे. परिणामी कमी व्याजाने केडीसीसीत ठेव राहिल्याने जिल्हा परिषदेचे नुकसान होऊ लागले. म्हणून गेल्या सहा महिन्यांपासून मुदत संपलेल्या ठेवी काढून जादा व्याज देणाऱ्या बँकेत ठेवण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. पण सध्याच्या सभागृहातील अनेक सदस्य केडीसीसीच्या राजकारणाशी संबंधित आहेत. तेथील ठेवी काढण्याला सातत्याने विरोध होत राहिला. ठेवी काढता आल्या नाहीत. दरम्यान, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाली आहे. सभागृहाची मुदतही संपत आली आहे. हीच संधी साधत ठेवी काढल्या आहेत.

जिल्हा परिषद अर्थ विभागच्या प्रशासनाने गेल्या आठ दिवसांत मुदत संपतील तशा २९ कोटींच्या ठेवी काढल्या. त्या आरबीएलमध्ये ठेवल्याने ७.२० टक्याऐवजी ८.५० टक्के व्याजाने ‌ठेवण्यात आल्या आहेत. सरासरी एक टक्यांपेक्षा अधिक व्याज मिळणार असल्याने दरमहा २५ हजार अधिकची भर जिल्हा परिषदेच्या उत्पन्नात पडणार आहे.

…………

सरकारकडून विचारणा

‌राष्ट्रीयीकृतसह अन्य बँकांत केडीसीसीपेक्षा जादा व्याज दर आहे. तरीही केडीसीसीत ठेवी ठेऊन जिल्हा प‌रिषदेचे नुकसान का करीत आहात, अशी विचारणा सरकारकडून ‌झाली आहे. लेखा परीक्षण अहवालात हा मुद्दा उपस्थित झाला आहे. या कारणांमुळे आणि जिल्हा परिषदेच्या आर्थिक हितामुळे ठेवी काढण्यात आल्या आहेत, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.



‘केडीसीसी’वर परिणाम

आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्यासाठी केडीसीसी अधिकाधिक ठेवी गोळा करण्यासाठी एक वर्षापासून संचालक, अधिकारी विशेष प्रयत्न करीत आहेत. अशा परिस्थितीमध्ये २९ कोटींच्या जिल्हा परिषदेच्या ठेवी काढल्या आहेत. त्याचा परिणाम ‘केडीसीसी’वर होणार आहे.


कमी व्याज असल्याने केडीसीसीत ठेव राहिल्याने सरकारकडून विचारणाही झाली होती. जादा व्याज मिळणार असल्याने २९ कोटी आरबीएल बँकेत ठेवण्यात आल्या आहेत. प्रत्येक महिन्याला २५ हजार जादा व्याज जिल्हा परिषदेला मिळेल. आर्थिक हितही साध्य होईल.

गणेश देशपांडे, मुख्य लेखाधिकारी, जिल्हा परिषद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भय इथले संपत नाही...

$
0
0

satish.ghatage@timesgroup.com

twitter:@satishgMT

कोल्हापूर: काही महिन्यांपूर्वी बोंद्रेनगरात एका तरुणीने छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केली. प्रकरण समोर आल्यानंतर संतापाची लाट उसळली. नेत्यांनी घरी भेटी दिल्या. मदतीचे आश्वासन दिले. मुली भयमुक्त असतील अशी आश्वासने दिली. पोलिसांनी काही दिवस घराशेजारी बंदोबस्त ठेवला. पण शहरापेक्षा जरा बाजूला असलेल्या बोंद्रेनगर, फुलेवाडी, क्रांतीसिंह नाना पाटीलनगर आणि अन्य उनपनगरांत अनेक ‌ठिकाणी असलेल्या मुजोर टवाळखोरांना अजूनही लगाम बसलेला नाही. तकलादू कारवाईमुळेच बळ वाढत चाललेल्या या गावगुंडाच्या उन्मादामुळे बोंद्रेनगरमध्ये गीता बोडेकर या तरुणीचा बळी गेला. या परिसरातील लोक ग्रामीण भागातील विस्थापित आहेत. हातावर पोट असलेल्या या नागरिकांना दोन वेळच्या जेवणासाठी दिवसभर राबावे लागते. अशा वेळी विकृत गावगुंडांना येथील धनगरवाडे आयते सापडतात. या परिसरात तरुणी आणि महिलांना मनात भीती घेऊनच वावरावे लागते. गीताच्या मृत्यूनंतर हा परिसर आणखी भीतीच्या छायेखाली गेला आहे.

कोल्हापूर-गगनबावडा रोडला डाव्या बाजूला फुलेवाडी रिंगरोडवरील बोंद्रेनगरातून पाडळीकडे जाण्यासाठी कच्चा रस्ता आहे. याच परिसातील गगनगिरी पार्कजवळ हातावर पोट असलेली धनगर समाजाची वस्ती आहे. याच वस्तीत एकाने घरात घुसून केस ओढून कानशिलात मारल्यानंतर हबकलेल्या २० वर्षाच्या गीता हरी बोडकर या तरुणीने शनिवारी गळफास लावून जीवन संपवले. एका वर्षात पल्लवी बोडेकरच्या पाठोपाठ गीताने आत्महत्या केल्याने बोंद्रेनगर परिसर हबकून गेला आहे. गीताच्या आत्महत्येनंतर बोडेकरांच्या घराच्या आसपास भीतीचे वातावरण आहे. घराशेजारीच असलेले नातेवाईक घोळक्याने दबक्या आवाजात चर्चा करत बसले होते. गीता मृत्यूचा धक्का सर्वांच्याच चेहऱ्यावर जाणवत होता. अनेकजण दहशतीमुळे बोलायलाही तयार नव्हते. मात्र, त्यांच्यात बसून विचारपूस करण्याच्या ओघात ते बोलते झाले आणि काही महिलांनी डोळ्याला पदर लावला. तिच्या आईच्या अश्रूंना तीन दिवस

बोंद्रेनगरात गगनबावडा तालुक्यातील धनगर समाजातील अनेक कुटुंबे उदरनिर्वाहासाठी आली आहेत. छपऱ्याच्या घरासमोर रचलेल्या सडाची उतरण, तोडलेली लाकडे जागोजागी दिसतात. सकाळी सातच्या दरम्यान भाकरी बांधून इथली पुरुष मंडळी लाकडे फोडायला, नारळाची पाने काढून देणे, नारळ काढून देण्यासाठी शहरात येतात. येथील महिला धुणी भांडी करण्यासाठी बाहेर पडतात. घरात असतात ती लहान मुले आणि त्यांना सांभाळणाऱ्या तरुण मुली. काही मुली धुणीभांड्याची कामे करतात. त्या कामासाठी बाहेर पडल्या की, उनाड मुले पाठलाग करतात. येता जाता अश्लील शेरेबाजी होते. कोणी पाठीमागून केस ओढतात. तर कुणी हात धरतात, अशा तक्रारी येथील पालक घाबरत घाबरतच सांगतात. संध्याकाळी घरातील माणसं आली की त्यांना लहान मुले घडलेल्या घटना सांगतात. अशावेळी घाबरून महिलांना, मुलींनाच गप्प बसण्याचा सल्ला देऊन दिवस ढकलले जातात.

गतवर्षी पल्लवी बोडेकरच्या आत्महत्येनंतर या परिसराला भयावह परिस्थितीची चाहूल लागली. या घटनेनंतर आणखीन तीन मुलींवर पल्लवीसारखी परिस्थिती ओढवली होती. पण समाजातील लोकांनी यात हस्तक्षेप करुन छेडछाड करणाऱ्या मुलांना समज दिल्यानंतर परिस्थिती निवळली. गीताने आत्महत्या का केली हे कुणालाच समजत नव्हते. पण दहनविधी संपल्यानंतर गीताच्या शेजारील चुलतीने बाबूराव गावडेने तिला मारहाण केल्याची माहिती दिली. बाबूरावने तिला केस ओढत बाथरुममधून ओढत दारात कानशिलात मारले होते. गेले काही दिवस तिची छेडछाड करत होता. तिला फिरायला येण्यासाठी आग्रह धरायचा, अशी माहिती पुढे आहे. गीताचे वडील, आई, आजोबा हे सकाळीच बाहेर पडायचे. नववीनंतर शाळा सोडलेल्या गीता धुणी-भांडी करायची. घराच्या गरीब परिस्थितीमुळे भावानेही नववी इयत्तेच शाळा सोडून हातगाडीवर कामाला लागला आहे. धुणी, भांडी व घर सांभाळणाऱ्या गीताने छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केल्याने आणखी किती जणांचा बळी जाणार असा सवाल इथल्या लोकांनी केला. आमच्या पोरींची अब्रू स्वस्त झाली आहे, अशी उद्विग्न प्रतिक्रिया महिलांनी दिली. येथे सगळीकडे जंगलराज असल्याचे वातावरण आहे, असे हताश उद्‍गार वयोवृद्धांनी काढले. मुली, युवती व महिलांनी ‘निर्भय’ व्हावे अशी अपेक्षा अनेकजण करत असले तरी बोंद्रेनगरातील धनगरवाडे मात्र दहशतीच्या वरवंट्याखाली रगडत आहेत.



पल्लवीच्या मृत्यूनंतर परिस्थिती सुधारेल असे वाटत होते. दोन तीन महिने शांत गेले पण परिस्थिती पुन्हा चिखळली आहे. उनाड पोरं आमच्या मुलींचा पाठलाग करत आहेत. पल्लवी बोडेकरच्या मृत्यूनंतर पोलिसांनी कडक कारवाई केली असती तर कदाचित गीतावर हात उगारायचे धाडस बाबूरावरने गेले नसते.

धाकलू भागोजी झोरे

आम्ही काबाडकष्ट करुन जीवन जगतो आहे. आमच्याकडे पैसे कमी आहेत. आम्ही पायी चालत कामावर जातो. तर कामांवर जाणाऱ्या आमच्या मुलींच्या मागे मुले मोटारसायकवरून पाठलाग करत त्रास देतात. हे कधी थांबणार? हे थांबले नाहीत तर आम्हाला वेगळा मार्ग चोखाळायला लागणार आहे.

सर्जेराव धाकलू देवणे

पल्लवीच्या मृत्यूनंतर पोलिसांनी दोन ते तीन बैठका घेतल्या. पहिले काही महिने गस्त घातली. पण नंतर सगळे बंद झाले. पल्लवीच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेली मुले आमच्यापुढे गुर्मीत चालतात. आमचे कुणी काहीही करू शकत नाही अशी त्यांची भावना आहे. हे बंद करण्याची ताकद फक्त पोलिसांत आहे. पण पैशापुढे सगळेजण हात टेकतात.

धोंडिराम बाबूराव बोडेकर.


पोलिस चार पाच दिवस येतात. सहानभुती व्यक्त करतात. बैठका घेतात. पोलिस मित्र तयार करण्याच्या घोषणा होतात. पण पुढे काहीच होत नाही. निर्भया पथक स्थापन झाले आहे, असे आम्ही ऐकतो. पण ते पथक बोंद्रेनगरात का फेरी मारत नाही. टंगलटिवाळी करणारीच पोलिसांचे खबरे आहेत. त्यामुळे खबऱ्यांच्यावर पोलिसांची कारवाई होत नाही.

रामजी अंबाजी बोडेकर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बहुजन पुरोहित निर्माण करणारे स्कूल

$
0
0

kumar.kamble@timesgroup.com
Tweet : @kumarkMT

कोल्हापूरचे भाग्यविधाते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या संघर्षमय जीवनातील एक महत्त्वाचा प्रसंग म्हणून ‘वेदोक्त प्रकरणा’ची नोंद घेतली गेली. शाहू महाराज ज्या सांस्कृतिक सत्तांशी संघर्ष करीत होते त्यांपैकी एक धार्मिक सत्ता होती. महाराजांच्या आयुष्यात १८९९ च्या सुमारास घडलेल्या वेदोक्त प्रकरणामुळे महाराष्ट्रात मोठा सामाजिक संघर्ष निर्माण झाला.

‘वेदोक्त’ की ‘पुराणोक्त’ या संघर्षातून महाराष्ट्राचे सांस्कृतिक अवकाश ढवळून निघाले. सर्वसत्ताधीशाला शुद्र मानून त्याच्यासंदर्भातील विधी जर पुराणोक्त पद्धतीने होत असतील तर गरिबी, दारिद्र्य आणि निरक्षरता यात वर्षानुवर्षे पिचलेल्या ब्राह्मणेतर बहुजनांची काय अवस्था असेल, असा विचार शाहू महाराजांनी त्यावेळी केला आणि या सांस्कृतिक सत्तेला शिवाजी वैदिक विद्यालयाची स्थापना करुन मोठा हादरा दिला. तत्कालीन ब्राह्मणी व्यवस्थेचे धार्मिक जोखड फेकून देण्यासाठी महाराजांनी जुलै १९२० ला उचलेले हे पाऊल महाराष्ट्राच्या धार्मिक आणि पर्यायाने सांस्कृतिक सत्ताकारणात उलथापालथ घडवणारे ठरले.

माणसाची धार्मिक भूक भागविण्यासाठी जे-जे विधी केले जातात, त्यासाठी ब्राह्मण भटजीवर अवलंबून रहावे लागत असे. त्यामुळे विधी करण्यासाठी ब्राह्मणेतर समाजाची हरेकप्रकारे अडवणूक केली जात असे. आर्थिक शोषण होत असे. त्यामुळे बहुजनांचे धार्मिक विधी भटजीविना अडू नयेत, यासाठी महाराजांनी हे विद्यालय सुरू केले.

जवळपास शंभर वर्षे या विद्यालयाच्या माध्यमातून बहुजन-मराठा समाजातील पुरोहित घडविण्याचे काम सुरू आहे. दरवर्षी सुमारे तीस ते पस्तीस विद्यार्थी येथे प्रवेश घेतात. विद्यालयाच्या बिंदू चौकातील इमारतीत रोज संध्याकाळी वर्ग सुरू असतात. थोडेफार लिहिता वाचता येते, अशा कोणत्याही समाजातील व्यक्तीला हे शिक्षण घेण्याची मुभा आहे. आज याच विद्यालयाचे नामकरण शाहू वैदिक विद्यालय असे करण्यात आले आहे.

आजही येथे मोफत शिक्षणाबरोबरच राहण्याची व्यवस्थाही मोफत आहे. त्यामुळे आतापर्यंत शेकडो विद्यार्थी या विद्यालयाने तयार केले असून, अनेकजण बहुजन समाजासाठी धार्मिक कार्य करु लागले आहेत.

शाहू एज्युकेशन सोसायटीच्यावतीने चालविण्यात येणाऱ्या या विद्यालयाच्या अध्यक्षपदाची धुरा किशोर तावडे यांच्याकडे आहे तर विक्रमसिंह यादव सेक्रेटरी आहेत. बाजीराव चव्हाण मुख्य गुरुजी आहेत. येथे शिकविण्यात येणारा अभ्यासक्रम तीन वर्षाचा आहे. श्री गणेशापासून संकल्प, सत्यनारायण पूजा, होमहवन, वास्तूशांती, लग्नविधी, रूद्राभिषेक ते अंतेष्टी, पंचांग असे सर्व विधी ये‌थे शिकवले जातात. त्यानंतर विद्यार्थ्यांची परीक्षा होते. त्यात उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यालयाच्यावतीने त्याला प्रमाणपत्र मिळते.


राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी ज्या हेतूने या विद्यालयाची स्थापना केली, त्याच हेतूने आणि प्रेरणेने या विद्यालयाचे काम सुरू आहे. वैदिक पद्धतीने धार्मिक विधीचे शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या कोणत्याही ‌समाजातील व्यक्तीला येथे मोफत शिक्षणाची व्यवस्था आहे.
- विक्रमसिंह यादव, सेक्रेटरी



संस्थेचे संकल्प

संस्थेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या भविष्यात वाढविण्यात येणार आहे. ग्रामीण भागातही धार्मिक विधी करणाऱ्यांची मोठी गरज असते. त्या भागात प्रशिक्षणाची व्यवस्था गरजेची आहे. त्यादृष्टीने पहिल्या टप्प्यात ग्रामीण भागातील मुलांसाठी संस्कृत श्लोक पठण स्पर्धा घेण्यात येणार आहेत. संस्थेची माहिती सर्व जगभर पोहोचावी, यासाठी लवकरच वेबसाइटही सुरू करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​मेडिकलच्या विद्यार्थिनीवरबेळगावात सामूहिक अत्याचार

$
0
0





म. टा. वृत्तसेवा, बेळगाव

एमबीबीएसच्या पहिल्या वर्षाला शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर पाच जणांनी सामूहिक बलात्कार केला. ही घटना पंधरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी संबधित विद्यार्थिनी मित्रासमवेत काकती परिसरातील डोंगरावर फिरायला गेली असताना ही घटना घडली.

पीडित विद्यार्थिनीने मंगळवारी सकाळी पालकांसह पोलिस ठाण्यात जाऊन पाच अज्ञात व्यक्तींविरोधात तक्रार नोंदवली. पीडित विद्यार्थिनीला त्वरित वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले. पोलिस उपायुक्त जी. राधिका आणि काकती पोलिस ठाण्याचे निरीक्षक रमेश गोकाक यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन विद्यार्थिनीची विचारपूस केली.

शहरातील वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणारी विद्यार्थिनी सतरा वर्षांची असून, मूळची धारवाडची आहे. १५ फेब्रुवारीला सायंकाळी आपल्या मित्रांसमवेत काकती आणि मुत्यानटी गावाच्या मध्यभागी असणाऱ्या डोंगरावर फिरायला गेली होती. त्यावेळी पाच जणांनी तेथे येऊन जबरदस्तीने तिला ओढून नेऊन सामूहिक बलात्कार केला. तिच्या मित्राने त्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केला पण, त्याला मारहाण करण्यात आली.

पीडित मुलीने आणि तिच्या मित्राने दिलेल्या माहितीनुसार आरोपी मुत्यानटी गावचे असून, पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​इस्लामपूरच्या नगराध्यक्षांवरआचारसंहिता भंगाचा गुन्हा

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, इस्लामपूर

इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी मतदारांना पैसे वाटप करून आचारसंहितेचा भंग केल्या प्रकरणी आष्टा पोलिसांनी त्यांच्यासह अन्य चौघांवर आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा नोंद केला आहे. शिगाव येथे बेकायदा जमाव जमवून बंदी आदेशाचा भंग केल्याबद्दल स्वरूपराव बाळकृष्ण पाटील यांच्यासह दहा ते पंधरा जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि जयंत पाटील यांच्यातील संघर्ष रात्री शिगाव येथे उफाळून आला.

बागणी जिल्हा परिषद मतदारसंघातून रयत विकास आघाडीचे उमेदवार कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे पुत्र सागर खोत आहे. मतदारांनी मत द्यावे यासाठी पैशाचे वाटप करीत आचारसंहितेचा भंग केला असल्याची फिर्याद शिगाव येथील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मधुकर रंगराव पाटील यांनी मंगळवारी आष्टा पोलिस ठाण्यात दिली. फिर्यादीवरून पोलिसांनी इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत प्रकाश पाटील (रा. इस्लामपूर), महेश बाळासाहेब पाटील, पांडुरंग हंबीरराव पाटील, विजयकुमार पंडितराव पाटील, निवास शामराव पाटील (सर्व रा. शिगाव, ता. वाळवा) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच शिगाव येथे बेकादा जमाव जमवून बंदी आदेषाचा भंग केल्याची फिर्याद आष्टा पोलिस ठाण्याचे कर्मचारी संजय साताप्पा सनदी यांनी दिली आहे. त्यानुसार स्वरूपराव बाळकृष्ण पाटील, मधुकर रंगराव पाटील, रणजित दत्तात्रय पाटील, शरद पांडुरंग गायकवाड, मोहन शंकर गायकवाड, राजेंद्र केशव भासर, जितेंद्र बाबासाहेब पाटील यांच्यासह दहा ते पंधरा जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मधुकर पाटील फिर्यादीत म्हटले आहे, ‘जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आचारसंहिता जारी आहे. २० फेब्रुवारीला रात्री साडे आठ ते पावने नऊच्या सुमारास मी व पुतण्या रणजित दत्ताजीराव पाटील जनावरांच्या शेडवर वैरण टाकण्यासाठी गेलो असता शिगाव-फार्णेवाडी रस्त्याला पुतण्या महेश बाळासाहेब पाटील याच्या शेडबाहेर बऱ्याच मोटरसायकली, चारचाकी गाड्या थांबलेल्या दिसल्या. मी व रणजित समक्ष त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता सदर शेडमध्ये नगराध्यक्ष निशिकांत पाटील, त्यांच्यासोबत महेश पाटील, पांडुरंग पाटील, विजयकुमार पाटील, निवास पाटील लोकांना यादीनुसार पैसे वाटप करीत असताना दिसले. आम्ही त्यांच्याजवळ जाऊन तुम्ही हे काय करता, प्रचार संपलेला आहे, लोकांना पैसे वाटून मत मागू नका, असे सांगताच, निषिकांत पाटील यांनी कोण पैसे वाटतो, असे म्हणत त्यांच्याजवळ असलेली पैशाची बॅग निवास पाटील यांच्याकडे देऊन त्याला घालवून दिले. त्यांच्याजवळ असलेली मतदारांची पैसे वाटप केलेली यादी, लिहिलेली पाने फाडून टाकली. महेश याने तुम्ही शेडवर का आलात? इथून निघून जा, असे म्हणाला. आमच्यात वाद सुरू असताना पैसे घेत असलेले मतदारही तेथून निघून गेले. त्यानंतर निशिकांत पाटील यांच्यासह चार जण आम्हाला दमदाटी करून निघून गेले.’

संजय सनदी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, ‘ १४ ते २५ फेब्रुवारी पर्यंत जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू आहे. शिगाव येथे सोमवारी रात्री जमाव जमल्याची माहिती मिळाली. पोलिस पथकासह तेथे दाखल झालो. ध्वनिक्षेपकावरून जमाव बंदी असल्याने तेथून जाण्याबाबत सूचना दिल्या. मात्र, स्वरूपराव पाटील, मधुकर पाटील, रणजित पाटील, शरद गायकवाड, मोहन गायकवाड, राजेंद्र भासर, जितेंद्र पाटील वगैरे दहा ते पंधरा जण तेथेच थांबून राहिले. त्यांनी बंदी आदेषाचा भंग केला.

घटनेनंतर आमदार जयंत पाटील, माजी आमदार विलासराव शिंदे यांच्यासह तालुक्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व शिगांवचे ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. आमदार पाटील यांनी ग्रामपंचायत चौकात ठिया मारला. निशिकांत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी ते आग्रही होते. रात्री तीनच्या सुमारास दोन्ही गटांवर गुन्ह दाखल करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत शिगावात तणावाचे वातावरण होते.

जयंत पाटील यांनी पुरावा द्यावा-निशिकांत पाटील

इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील म्हणाले, ‘जयंत पाटील यांनी २४ तासांत एकजरी पुरावा सादर केला तर मी राजकारण सोडतो अन्यथा त्यांनी जनतेची माफी मागावी. मंत्री सदाभाऊ खोत यांच्या बद्दल अत्यंत खालच्या पातळीवर बोलल्या बद्दल त्यांना तशाच भाषेत उत्तरे देणार आहे. जयंत पाटील यांनी मिरज दंगल आणि ऊस आंदोलनात घुसून त्यांचा करेक्ट कर्यक्रम करा, असे आदेश दिले होत, त्यावरुनच त्यांच्या राजकारणाची पातळी दिसून येते. मंत्र्याला गोळया घाला, ही त्यांची भाषा त्यांना शोभणारी नाही. यापुढे जयंत पाटील ज्या भाषेत बोलतील त्याच भाषेत त्यांना उत्तर मिळेल.’

जयंत पाटील यांच्यावरच गुन्हा दाखल करा- खोत

सदाभाऊ खोत म्हणाले, ‘जयंत पाटील यांचे हे कृत्य म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. त्यांच्या डोक्यात सातत्याने मिरज राहिली आहे. मात्र, हे मिरज नाही हा वाळवा तालुका आहे. इथला इतिहास तपासला तर तो वेगळा आहे. हे त्यांच्या लक्षात येत नाही. त्यांनी रात्री केलेला स्टंट म्हणजे माजी आमदार विलासराव शिंदे यांच्या गटाची सहानुभूती मिळवण्याचा केवीलवाण प्रयत्न आहे. निवडणुका येतात जातात पण, तुम्ही काय बोलता याचे भान ठेवा. मंत्र्याला गोळया घाला, मंत्र्याची लायकी काढणे तुम्हाला शोभत नाही. लोक म्हणतात, जयंत पाटील उच्चशिक्षित आहेत, मात्र त्यांची विद्या कलुषित आहे हे जनतेच्या लक्षात आले आहे. आम्ही यंत्रणा वापरली, असा ते अरोप करतात ते पंधरा वर्षे मंत्री होते, त्यांनी काय गुर राखली काय. जयंत पाटील म्हणतात, मला बोलताना त्याच भाषेत बोलाव लागते. तुम्ही जर सज्जन असाल तर मग सज्जनाच्या तोडात ही भाषा शोभते का? राज्याचे पंधरा वर्षे मंत्री असलेले नेते रात्री रस्त्यावर बसतात. इतक्या रात्री तुम्ही शिगावमध्ये काय करीत होता. जमाव जमवून तुम्ही बसला त्यामुळे तुमच्यावरच आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images