Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

इच्छाशक्तीच्या बळावर धेय्याकडे वळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘आपल्याला कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे आहे, याची दिशा कॉलेज जीवनात ठरते. त्यासाठी मनातील निश्चित इतरांना न सांगता टार्गेट फिक्स करा. आपल्या अंगभूत कलागुण आणि इच्छाशक्तीच्या बळवावर हळुवारपणे मार्गक्रमण करताना कधी अपयश आले, तर खचून जाऊ नका’, असा मौलिक सल्ला प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी तरुणाईला मंगळवारी दिला. युवा महोत्सवाच्या बक्षिस वितरण प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रभारी कुलगुरू डॉ. डी. आर. मोरे होते. लोककला केंद्रात विद्यार्थ्यांच्या जल्लोषात बक्षिस वितरण झाले.

अभिनेते शिंदे यांनी पारंपरिक शैलीत भाषण करण्यापेक्षा थेट युवकांशी संवाद साधला. त्यांचा संघर्षमय प्रवास, सामाजिक उपक्रम, मराठी चित्रपटसृष्टीसह हॉलीवूड, टॉलीवूडमधील प्रवासातील आठवणींमुळे त्यांचा संवाद उत्तरोत्तर रंगतदार होत गेला. ‘पदवीच्या प्रथम व द्वितीय वर्षात असताना मी सुरक्षारक्षक म्हणून काम करत होतो. त्याचवेळी अभिनेता व्हायचे ठरवले आणि त्याच दिशेने वाटचाल केली. वयाच्या २० व्या वर्षी धडपड केली, तेव्हा कुठे ४० व्या वर्षी यश लाभले. त्यामळे यशाकडे मार्गक्रमण करताना हळुवार करा, म्हणजे धोका कमी असतो. दादरच्या फुटपाथवर अभिनय साधना पुस्तकाने करिअरचा मार्ग दाखवणारे ठरले. आयुष्यात लहान-मोठा, गरीब-श्रीमंत असे काहीच नसते. आई आणि वृक्ष दोनच गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक जन्म देते आणि दुसरे श्वास. या दोन्ही गोष्टींची उतराई कोणत्याही पद्धतीने शक्य नाही’ असे शिंदे यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी म्हणाले, ‘विद्यार्थ्यांनी आपल्यातले अंगभूत गूण पुढे आयुष्यभर जोपासावेत, त्यांचा विकास करावा. आपले कलागुण कधीही हरवू देऊ नका.’ डॉ. सैनी यांनी अभिनेते शिंदे यांच्या माण, खटाव तालुक्यांतील वृक्षसंवर्धनाच्या कार्यक्रमाचे कौतुक केले.

अध्यक्षीय भाषणात प्रभारी कुलगुरू डॉ. मोरे यांनी राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या संयोजनात मोलाचे सहकार्य करणाऱ्या सर्व घटकांचे आभार मानले. एआययूचे निरीक्षक प्रा. एस. के. शर्मा, मुंबई विद्यापीठाचे नीलेश सावेकर यांची भाषणे झाली. क्रीडा विभागप्रमुख डॉ. पी. टी. गायकवाड, विवेकानंद संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. अभयकुमार साळुंखे, भारती विद्यापीठाचे डॉ. हणमंतराव कदम, ग्रंथपाल डॉ. नमिता खोत, डॉ. डी. के. गायकवाड उपस्थित होते. विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. आर. व्ही. गुरव यांनी अहवाल वाचन केले. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी प्रास्ताविक केले. परीक्षा नियंत्रक महेश काकडे यांनी आभार मानले.

चौकट

नमस्कार कोल्हापूरकर

तेजस युनिर्व्हसिटीच्या संघव्यवस्थापक भुपाली कश्यप यांनी केवळ चार दिवसात मराठी भाषा आत्मसात केल्याचे दाखवून दिले. मनोगताला उभे राहताच ‘नमस्कार कोल्हापूरकर’ अशी साद त्याने घालताच, एकच कल्ला झाला. त्यांनी कॅम्पसमधील हिरवाई टिकऊन ठेवण्याचे आवाहन केले. स्पर्धेच्या निमित्ताने आलेल्या सर्व आठवणींचा ठेवा जवळ ठेवून मार्गक्रमण करणार असल्याचे सांगून त्यांनी उत्कृष्ट नियोजनाबद्दल संयोजकांना दिलखुलास अभिनंदन केले.

कोल्हापुरकांचे आदरतिथ्य

यापूर्वी महोत्सवात पाच विभागातून केवळ विजेत्या, उपविजेत्या संघांना प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळत होती. यावर्षी प्रथमच एआययूने स्पर्धेच्या निकषात बदल करत पहिल्या तीन संघांना प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिली. त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या दीड हजारवर गेली. सर्व विद्यार्थ्यांची निवास व भोजनाची व्यवस्था उत्कृष्ट पद्धतीने केली होती. स्पर्धेतील सहभागानंतर परराज्यातील विद्यार्थ्यांनी कोल्हापूर शहराची सफर केली. विद्यापीठातील व्यवस्था आणि शहर पर्यटनादरम्यान आदरतिथ्याचा चांगला अनुभव आल्याचे अनेक विद्यार्थ्यांनी सांगितले.

सेल्फीची लखलख

बक्षिस समारंभास प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे उपस्थित राहणार असल्याने सकाळपासून लोककला केंद्र विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने हाऊसफुल्ल झाले होते. साडेआकरा वाजता अभिनेते शिंदे यांची एन्ट्री होताच युवकांनी जल्लोष केला. ते व्हीआयपी कक्षात स्थानापन्न झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्यासोबत सेल्फी घेतली. बक्षिस वितरणावेळीही विजेत्या संघांनाही हा मोह आवरता आला नाही. बक्षिस समारंभानंतर ते विद्यार्थ्यांच्या गराड्यातच अडकले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांच्या कारची चोरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील यांच्या रुईकर कॉलनी येथील घरासमोरून अज्ञात चोरट्यांची पाटील यांची इनोव्हा (एम. एच. ०९ बी. एक्स. ६९२९) कार लंपास केली. मंगळवारी (ता. १४) पहाटे पाऊनेतीनच्या सुमारास ही घटना घडली. सीसीटीव्हीमध्ये तीन चोरटे कैद झाले असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. याबाबत शाहूपुरी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे असतानाही चोरट्यांनी रेकी करून कार पळवल्याने चोरट्यांच्या हेतूबाबत शंका उपस्थित केली जात आहे.

ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील यांचे शहरातील रुईकर कॉलनी येथे घर आहे. त्यांच्याकडील कार चालक नीलेश नथुराम नाकती (वय २१, रा. वीरजोगी, ता. रोहा, जि. रायगड, सध्या रा. एन. डी. पाटील यांचे घरी) याने सोमवारी रात्री दहाच्या सुमारास घराबाहेरील भिंतीच्या जवळ इनोव्हा कार पार्क केली होती. मंगळवारी सकाळी उठल्यानंतर घराबाहेर कार नसल्याचे त्याच्या निदर्शनास आले. नीलेशने तातडीने याची माहिती सरोजिनी पाटील यांना दिली. पाटील यांनी शाहूपुरी पोलिसांना घटनेची महिती देताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पोलिस अधीक्षक एम. बी. तांबडे यांनीदेखील पाटील यांच्या घरी जाऊन घटनेची माहिती घेतली.

पोलिसांनी पाटील यांच्या घरातील सीसीटीव्हीची पाहणी केली असता, पहाटे पाऊनेतीनच्या सुमारास चोरट्यांनी कारची काच फोडून बनावट चावीच्या सहायाने कार लंपास केल्याचे दिसले. मूळ कागदपत्रे आणि डॉ. पाटील यांचे ओळखपत्रही कारमध्ये होते. कार घेऊन चोरटे मुख्य रोडच्या दिशेने गेले. हे चोरटे पांढऱ्या रंगाच्या कारमधून आले होते. पाटील यांची कार पळवण्यापुर्वी त्यांनी तीनवेळा परिसरात रेकी केल्याचेही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत आहे. कार चालक नीलेश नाकती याने शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने चोरट्यांचा शोध घेणे सुरू केले आहे. दरम्यान, मुख्य मार्गाला लागून असलेल्या आणि सीसीटीव्हीचा वॉच असलेल्या परिसरातून चोरट्यांनी रेकी करून कार पळवल्याने चोरट्यांच्या हेतूबाबत शंका उपस्थित केली जात आहे.

दोन मिनिटात कार लंपास

तीन वेळा रेकी केल्यानंतर २ वाजून ४६ मिनिटांनी चोरटे डॉ. एन. डी. पाटील यांच्या कारजवळ आले. तीन चोरट्यांपैकी एकाने कारच्या ड्रायव्हर सीटच्या दरवाजाची काच फोडली. बनावट चावीने दरवाजाचा लॉक काढून कारमध्ये प्रवेश केला. काही सेकंद बॅटरीच्या प्रकाशात कारची आतून पाहणी केल्यानंतर चोरटे कार घेऊन मुख्य मार्गाच्या दिशेने निघून गेले. अवघ्या दोन मिनिटात हा प्रकार घडल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे.

पोलिस बंदोबस्ताचे काय झाले?

डॉ. एन. डी. पाटील हे कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे जवळचे मित्र होते. या दोघांनी अनेक चळवळी आणि आंदोलनांचे एकत्रित नेतृत्व केले होते. पानसरे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्यानंतर डॉ. पाटील यांच्या घराच्या परिसरातही पोलिसांचा बंदोबस्त होता. साध्या वेशातील पोलिसांचीही नेमणूक केली होती. कार चोरीच्या घटनेमुळे बंदोबस्तावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्वाभिमानी’त डॅमेज कन्ट्रोल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

घराणेशाहीच्या मुद्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेत उफाळून आलेली फूट सांधण्याचा प्रयत्न खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. ‘मंत्री सदाभाऊ खोत आणि माझ्यात मतभेद नाहीत. त्यांना राजीनामा देण्याची गरज नाही, तसेच राज्य सरकारलाही धोका नाही. माझ्या विधानाचा विपर्यास केला’, असे वक्तव्य करून शेट्टी यांनी डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. सोमवारी ‘मी सांगेन तेव्हा सदाभाऊंना राजीनामा द्यावा लागेल.’ असे वक्तव्य करून खळबळ उडवून दिली होती. स्वाभिमानीचे हे डॅमेज कंट्रोल किती उपयुक्त ठरणार हे मात्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

राजकारणातील घराणेशाहीवरून स्वाभिमानी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर थेट टीका केली होती. ‘सदाभाऊंनी मुलगा सागर खोत याला जिल्हा परिषदेची उमेदवारी दिल्याने त्यांच्या प्रचारासाठी जाणार नाही. संघटना सांगेल तेव्हा सदाभाऊंना राजीनामा द्यावा लागेल, असे जाहीर वक्तव्य करून शेट्टी यांनी खळबळ उडवून दिली होती.’ यावर मंत्री सदाभाऊ खोत यांनीही चाणाक्षपणे रयत विकास आघाडीचे नाव पुढे करून खासदार शेट्टी यांना प्रत्युत्तर दिले. या निमित्ताने स्वाभिमानीतील अंतर्गत खदखद उफाळून आल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली होती, तर निवडणुकीतील उमेदवारांनाही रूखरूख लागली होती. ऐन निवडणुकीच्या काळात सुरू झालेला कलगीतुरा संघटनेसाठी घातक असल्याचे लक्षात येताच खासदार शेट्टी यांनी डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न सुरू केले आहेत.

आधीच्या वक्तव्यावरून घुमजाव करीत खासदार शेट्टी यांनी संघटनेत मतभेद नसल्याचे मंगळवारी सांगितले आहे. ‘सदाभाऊ खोत आणि माझ्यात मतभेद नाहीत. आम्ही एकच आहोत. त्यांनी राजीनामा देण्याची गरज नाही. प्रस्थापितांच्या घराणेशाहीला विरोध असल्याचे मी बोललो होतो. माझ्या विधानाचा विपर्यास झाला.’ खासदार शेट्टी यांच्या नव्या भूमिकेचे स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी स्वागत केले आहे, मात्र या डॅमेज कंट्रोलचा फायदा निवडणुकीत किती होणार हे पाहावे लागणार आहे.

सदाभाऊ आणि माझ्यात मदभेद नाहीत. माझा विरोध प्रस्थापितांच्या घारणेशाहीला आहे. त्यांनी राजीनामा देण्याची गरज नाही. माझ्या विधानाचा विपर्यास झाला. आमचे उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही जोमाने लढू.

खासदार राजू शेट्टी

मुलाच्या राजकीय पुनर्वसनासाठी मी राजकारण करीत नाही. सागर खोत हा आमदार शिवाजीराव नाईक यांच्या रयत विकास आघाडीचा उमेदवार आहे. मी भाजपासह मित्र पक्षांच्या प्रचारासाठी जाणार. सत्ता की संघटना हा माझ्यासमोर प्रश्नच नाही.

सदाभाऊ खोत, कृषी राज्यमंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस गुन्हेगारांचे लक्ष्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कायदा सुव्यवस्था राखणारे पोलिसच शहरात फाळकूटदादांकडून लक्ष्य बनत आहेत. गेल्या तीन महिन्यांत शहरात एकाच ठिकाणी दोन पोलिसांवर हल्ले झाले. पोलिसांच्या अंगावर चाकू घेऊन जाण्यासही फाळकूटदादा घाबरत नाहीत. यातच स्थानिक लोकप्रतिनिधींचे पाठबळ मिळत असल्याने फाळकूटदादांचा आत्मविश्वास वाढला आहे. पोलिस कोठडीतील संशयितांच्या ड्रामेबाजीचा धसका पोलिसांनी घेतल्यानेच गुंडांकडून पोलिस लक्ष्य बनत आहेत. छोट्या टोळक्यांची मुजोरी वाढल्याने आणि पोलिस गप्प असल्याने दादागिरी वाढली आहे.

कोल्हापूर शहरात गेल्या तीन महिन्यात उमा टॉकीज परिसरात दोनवेळा वाहतूक पोलिसांवर हल्ला झाला आहे. या दोन्ही घटनांमध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांनीच पोलिसांना मारहाण केली आहे. तीन महिन्यांपूर्वी पोलिस हेड कॉन्स्टेबल देसाई यांना दुचाकींस्वारांनी दमदाटी करून मारहाण केली. सोमवारी (ता. १३) संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास उमा टॉकीज चौकात कर्तव्य बजावणारे सहायक फौजदार गंगाराम पोवार यांनादेखील असाच अनुभव आला. दुचाकीवरून ट्रिपल सिट जाणाऱ्या तरुणांना अडवल्याच्या रागातून तिघांनी त्यांना शिव‌िगाळ करीत धक्काबुक्की केली. यावरच हे प्रकरण थांबले नाही. मद्यधुंद अवस्थेतील तिघे आणखी दोन मित्रांना घेऊन पुन्हा उमा टॉकीज चौकात आले. या फाळकूटदादांनी थेट पोवार यांच्यावरच चाकूहल्ल्याचा प्रयत्न केला. सुदैवाने याचवेळी प्रशिक्षणार्थी पोलिस उपअधीक्षक बसवराज शिवपुजे उमा टॉकीज चौकातून निघाले होते. त्यांना मारामारीचा प्रकार लक्षात येताच गाडी थांबवून त्यांनी हल्लेखोरांना पकडण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी हल्लेखोरांपैकी तिघांना पकडून पोलिसी खाक्या दाखवण्याचा प्रयत्न केला, पण हल्लेखोर फाळकूटदादांच्या चोहऱ्यावर किंचितही भीती किंवा पश्चाताप दिसत नव्हता.

वरील दोन घटना प्रातिनिध‌िक स्वरुपाच्या आहेत. पोलिसांनी सांगितलेल्या नियमांचे पालन करण्याऐवजी नियम मोडण्याकडेच अनेकांचा कल आहे. विशेषतः वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालण्यातच अनेकजण धन्यता मानतात. ट्रिपल सीट, भरधाव वाहन चालवणे, वन-वेतून जाणे, बेशिस्त पार्किंग करणाऱ्यांवर पोलिस दंडात्मक कारवाई करतात. याचा राग पोलिसांवरच काढण्याचा प्रयत्न होत आहे. विशेष म्हणजे जाणीवपूर्वक पोलिसांना लक्ष्य केले जात आहे. हे पोलिस दलाच्या दृष्टीने अधिक गंभीर आहे. शहरातील फाळकूटदादांकडून अशा घटना वारंवार घडत आहेत. यांना स्थानिक लोकप्रतिनिधींचे पाठबळ मिळत असल्याने घटनांमध्ये वाढ होत आहे.

पोलिसांना धास्ती

कायदा सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिसांचा गुंडांवर धाक असण्याऐवजी पोलिसांवरच कायद्याचा धाक आहे. कराड आणि पेठवडगाव पोलिस ठाण्यातील संशयित आरोपींचे पोलिस कोठडीतील मुत्यू पोलिसांच्या अंगलट आले आहेत. या घटनांमध्ये पोलिसच आरोपीच्या पिंजऱ्यात असल्याने कोठडीत संशयितांना पोलिसी खाक्या दाखवणेही धोकादायक बनले आहे. जुना राजवाडा पोलिस ठाण्यातही अटकेतील एक महिला अत्यवस्थ बनल्याने पोलिसांची तारांबळ उडाली होती. अशा प्रकारांची पोलिसांनीच धास्ती घेतली आहे.

नागरिकांच्या सोयीसाठीच पोलिस आहेत. वाहतुकीची कोंडी होऊन अपघात होऊ नयेत, नागरिकांना सुरक्षित घरी पोहोचता यावे यासाठीच पोलिसांकडून सूचना दिल्या जातात. पोलिसांच्या अंगावर जाऊन कायदा हातात घेणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणारच, त्यामुळे पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे.

भारतकुमार राणे, शहर पोलिस उपअधीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अहवालाची नाबार्डकडून पडताळणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नोटाबंदीच्या कालावधीमध्ये ५० हजारहून अधिक रक्कम जमा केलेल्या जिल्हा बँकेच्या विविध शाखांमधील एक लाख तीन हजार खात्यांच्या केवायसीची नाबार्डच्या सहा अधिकाऱ्यांच्या पथकाने तपासणी सुरू केली. येत्या शुक्रवारपर्यंत ​जिल्हा बँकेच्या मुख्यालयाबरोबरच तालुक्यातील शाखांमध्ये जाऊन हे पथक सर्व खात्यांच्या केवायसीची तपासणी करणार आहे. नाबार्डने यापूर्वी ११ शाखांमधील काही खात्यांची तपासणी केली होती. बँकेने सादर केलेल्या केवायसी अहवालाची पडताळणी केली जाणार आहे.

सरकारने जिल्हा बँकेला जुन्या पाचशे व हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास बंदी केली. तत्पुर्वी बँकांच्या विविध शाखांमध्ये ३०४ कोटी रुपयांच्या या नोटा जमा झाल्या होत्या. त्यातील २७० कोटी रुपयांची रक्कम जिल्हा बँकेच्या मुख्यालयात अजून जमा आहे. सरकारने या नोटा स्वीकारल्या नसल्याने बँकांच्यावतीने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यातील सुनावणीनंतर ​बँकेत जमा झालेल्या या नोटांच्या खात्यांची केवायसी नाबार्डने तपासावी, असे आदेश देण्यात आले होते. त्याप्रमाणे पहिल्या टप्प्यात नाबार्डने अडीच लाखावर रक्कम जमा झालेल्या खात्यांपैकी काही शाखांमध्ये जाऊन काही खात्यांची केवायसी तपासली होती. त्या शाखांमधील खात्यांची तपासणी केली जता असताना त्यामध्ये काही आक्षेपार्ह आढळले नसल्याने त्याबाबतचा अहवालही नाबार्डच्या अधिकाऱ्यांनी सादर केला होता. त्यानंतर बँकेने एक लाख तीन हजार खात्यांची केवायसीची कागदपत्रे नाबार्डकडे सादर केली होती. यामध्ये प्रत्येक खातेधारकाचे आधारकार्ड असल्यास त्याच्या नंबरसह तसेच रेशनकार्ड किंवा निवडणूक ओळखपत्राची व्यवस्थित माहिती समाविष्ट होती.

या कागदपत्रांप्रमाणे केवायसी पुर्ण आहे की नाही याची तपासणी करण्यासाठी नाबार्डचे सहा अधिकाऱ्यांचे पथक सोमवारी जिल्हा बँकेत आले आहे. बुधवारपर्यंत मुख्य शाखेतील खात्यांची तपासणी करण्यात येत आहे. त्यानंतर भुदरगड व शिरोळ तालुक्यातील तसेच अन्य तालुक्यातील खात्यांच्या केवायसीच्या तपासणीसाठी जाणार आहे. यासाठी विविध पथके करुन ही तपासणी केली जाणार आहे. यामध्ये संबंधित खातेधारकाचे आधारकार्ड, रेशनकार्ड, निवडणूक ओळखपत्रापैकी एक पुरावा सोबत जोडला आहे का याची ते पथक स्वतः‍ खात्री करणार आहे. त्यामुळे बँकेने यापूर्वी पाठवलेल्या केवायसी अहवालाची पडताळणी या तपासणीमध्ये होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांची चौकशी ‘इन कॅमेरा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांची चौकशी इन कॅमेरा होणार आहे. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख चौकशी करतील. प्रत्यक्ष चौकशीची प्रक्रिया सुरू झाली आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

शिंदे यांच्याबाबत अर्थव्यवहारासह अनेक तक्रारी जिल्हा परिषदेकडे आल्या आहेत, त्याची दखल घेत सीईओ डॉ. खेमनार यांनी शिंदे यांच्या कामकाजाची चौकशी करण्याचा आदेश दोन दिवसापुर्वी दिला. चौकशीसंबंधी देशमुख यांनी मागर्दशक सूचना डॉ. खेमनार यांच्याकडे मागितल्या होत्या. त्यानंतर चौकशी अधिकारी बदलण्याच्या हालचाली झाल्याचे समजते. खेमणार म्हणाले, शिंदे यांची चौकशी देशमुख हेच करणार आहेत. ही चौकशी ते इनकॅमेरा करतील. इनकॅमेरामुळे सर्व चौकशी ऑन रेकॉर्ड व्हिडिओ फुटेजसह होणार आहे.



अन खुलासा आला

डिसेंबर २०१६ च्या शेवटच्या आठवड्यात सीईओ डॉ. खेमनार यांनी शिंदे यांना नोटीस पाठवली होती. नोटिसीमध्ये सात दिवसांत खुलासा करण्याचा आदेश दिला होता. पण शिंदे यांनी वेळेत खुलासा दिला नाही. त्यानंतर डॉ. खेमनार यांनी शिंदे यांच्या चौकशीसाठी अधिकाऱ्याची नियुक्ती केली. त्यानंतर शिंदे यांनी दिलेला खुलासा मंगळवारी सीईओंना मिळाला. त्यामुळे चौकशीला गती आली आहे.

आत्मदहन प्रकरणाचीही दखल

माध्यमिक शिक्षण विभागाच्या गलथान कामकाजाला कंटाळून सोमवारी एका शिक्षकाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. त्याचीही गंभीर दखल प्रशासनाने घेतली आहे. चौकशीत या प्रकरणाचाही सामावेश केला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भरतीविरोधात हायकोर्टात जाणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेतर्फे सरळसेवा अंतर्गत राबविलेल्या भरती प्रक्रियेत चुकीच्या पद्धतीने उमेदवारांच्या निवडी केल्या आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पुनर्घोषणेच्या निकषानुसार भरती प्रक्रिया राबविणे अत्यावश्यक असताना महापालिकेने त्या नियमांचे पालन केले नाही. यामुळे खुल्या गटातील विशेषत: मराठा समाजातील उमेदवारांचे नुकसान झाले असून त्या विरोधात हायकोर्टात दाद मागणार असल्याचा इशारा सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने दिला. आयुक्त पी. शिवशंकर यांनी सरकारी अध्यादेशाप्रमाणे भरती प्रक्रिया राबवली आहे. यामध्ये कसलाही गैरप्रकार व घोटाळा झाला नसल्याचा खुलासा केला.

मंगळवारी सायंकाळी आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत नगरसेवक प्रा. जयंत पाटील म्हणाले, ‘आमचा भरती प्रक्रियेला, आरक्षणाला विरोध नाही. मात्र महाराष्ट्र लोकसेवा आयोग ही राज्य स्तरावरील भरती प्रक्रिया राबविणारी सर्वोच्च संस्था असताना महापालिका त्यांच्या नियमाची अंमलबजावणी का करत नाही आयोगाच्या पुनर्घोषणेच्या निर्णयानंतर मागासवर्गीय उमेदवारांनी वय, शुल्क व इतर शैक्षणिक पात्रतेविषयी सवलत घेतली असल्यास त्यांची खुल्या गटातून निवड होऊ शकत नाही. मात्र महापालिकेने तशी अंमलबजावणी केली नाही. सरळ सेवा भरतीला सकल मराठा समाजाने आक्षेप घेतल्यानंतर प्रशासनाने पुढील प्रक्रिया थांबवणे गरजेचे होते.’ यावर आयुक्तांनी भरती संदर्भात राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाशी चर्चा झाली आहे. सरकारी अध्यादेशाप्रमाणे कामकाज सुरु आहे. वर्ग दोन, तीनच्या पदावरील भरती संदर्भात राज्य सरकारने धोरण बदलले तर आम्ही त्यानुसार बदल करु, असा खुलासा केला. चर्चेत उपमहापौर अर्जुन माने, सभापती संदीप नेजदार, गटनेते शारंगधर देशमुख, प्रवीण केसरकर, जयेश कदम, बाबा बार्टे, दिलीप पाटील, अजित राऊत यांनी सहभाग घेतला. बैठकीला नगरसेवक अशोक जाधव, लाला भोसले, माजी महापौर बाजीराव चव्हाण, उत्तम कोराणे, विनायक फाळके, भाऊ घोडके, किशोर घाटगे प्रा. आनंदराव पाटील, पृथ्वीराज पाटील, बाबा आमते, विजय जाधव आदी उपस्थित होते.


महापालिकेला मराठा समाजाशी देणेघेणे नाही

अॅड. बाबा इंदूलकर यांनी कायदा व नियमावलीचा आधार घेत भरती प्रक्रियेत चुका झाल्याचे सांगितले. महापालिकेने खुल्या गटातील भरतीत मागासवर्गीयांना सवलती दिल्याने मराठा समाजावर अन्याय होत असल्याचे सांगितले. त्यावर आयुक्तांनी महापालिकेला भरती प्रक्रियेत राज्य सरकारचे नियम लागू होत असल्याचे सांगताच इंदूलकर यांनी महापालिकेला मराठा समाजाशी काही देणेघेणे नाही, अशी टिप्पणी केली.


नियमानुसार काम करणे म्हणजे घोटाळा नव्हे

प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेचे दिलीप देसाई यांनी खुल्या गटातील भरतीत मागासवर्गीय उमेदवारांना सवलती देणे नियमबाह्य आहे. महापालिकेने संबंधित उमेदवारांना वय, शुल्कात सवलती देताना घोटाळा केला आहे. खुल्या गटातील भरतीत समान गुण पडले असताना सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवाराला डावलून मागासवर्गीय उमेदवारांची केलेली निवड ही चुकीची असल्याचे निदर्शनास आणले. त्यावर आयुक्तांनी ‘घोटाळा कसला? नियमानुसार कामकाज करणे म्हणजे घोटाळा काय? ’असा प्रश्न उपस्थित केला. महापालिकेला सरकारी अनुदान मिळत असताना भरती प्रक्रियेची संपूर्ण माहिती माहिती अधिकाराखाली उपलब्ध झाली पाहिजे. प्रशासनाने गोपनीयतेच्या नावाखाली माहिती लपवू नये, असा मु्द्दा उपस्थित केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युवा महोत्सवाचे मुंबई विद्यापीठास विजेतेपद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या ३२ व्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ राष्ट्रीय युवा महोत्सवाचे (शिवोत्सव) सर्वसाधारण विजेतेपद मुंबई विद्यापीठाने पटकावले. तर नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाने उपविजेतेपद पटकावत महोत्सवावर महाराष्ट्राचा दबदबा राखला. शिवाजी विद्यापीठाने मिरवणुकीत चतुर्थ क्रमांक पटकावला. विजेत्या संघाना अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते जनरल चॅम्पियनशीप देऊन गौरविण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या सांगता समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्रभागी कुलगुरू डॉ. डी. आर. मोरे होते. लोककला केंद्रात सांस्कृतिक कार्यक्रमाच्या सादरीकरणानंतर बक्षिस वितरण झाले.

मंगळवारी सकाळी पुन्हा विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारे नृत्य सादर करुन प्रेक्षकांची वाहव्वा मिळवली. पंजाबच्या लवली युनिर्व्हसिटीने पाश्चिमात्य संगीत पेश केले. त्यानंतर केरळच्या कृष्णा युनिर्व्हसिटीने अफलातून पारंपरिक वाद्यांचा गजर केला. पंजाबच्या एज्युकेशन ऑफ टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या गुरुप्रितसिंहने मिमिक्रीच्या माध्यमातून मनोरंजन केले.

त्यानंतर बक्षिस वितरण झाले. मुंबई विद्यापीठाला सर्वसाधारण विजेतेपद जाहीर होताच एकच जल्लोष झाला. त्यानंतर नागपुरच्या राष्ट्रसंत तुकडोजी विद्यापीठाला उपविजेतेपद जाहीर झाले. दोन्ही क्रमांक महाराष्ट्राच्या संघांनी पटकावल्यानंतर विद्यार्थ्यांच्या जल्लोषाने लोककला केंद्रच दणाणले. सर्वसाधारण गटात अमृतसरच्या गुरुनानक देव विद्यापीठाने तृतीय तर पंजाबच्या लव्हली प्रोफेशनल विद्यापीठाने चतुर्थ क्रमांक पटकावला.

शिवाजी विद्यापीठाची भरारी

मिरवणुकीच्या माध्यमातून शिवाजी विद्यापीठाने कोल्हापूर संस्कृतीचे दर्शन घडवले होते. नोटाबंदीनंतर भ्रष्टाचाराच्या भस्मासूराचा वध आणि पर्यावरण रक्षणाची हाक देणाऱ्या संस्कृती रथाने विषेश लक्ष वेधून घेतले होते. विद्यापीठाने वेगळेपण जपल्याने मिरवणुकीमध्ये चतुर्थ क्रमांक पटकावला. मुख्य स्पर्धेत स्पॉट फोटोग्राफीमध्ये प्रथम तर मूकाभिनयामध्ये चतुर्थ क्रमांक पटकावला.

महोत्सवाचा निकाल असा

शोभायात्रेतील विजेते
प्रथम - कृष्णा विद्यापीठ, आंध्रप्रदेश
द्वितीय - गुवाहाटी विद्यापीठ
तृतीय - कुरुक्षेत्र विद्यापीठ
चतुर्थ विभागून - शिवाजी विद्यापीठ व मैसूर विद्यापीठ



महोत्सवातील गटनिहाय विजेते व उपविजेते

संगीत : गुरुनानक देव विद्यापीठ (अमृतसर), मुंबई विद्यापीठ (मुंबई)
नृत्य : मणिपूर विद्यापी (मणिपूर), कुरुक्षेत्र विद्यापीठ (हरियाणा)
साहित्य : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ (नागपूर), गुवाही विद्यापीठ (आसाम)
नाट्य : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (औरंगाबाद), एसएनडीटी महिला विद्यापीठ (मुंबई)
ललितकला : मुंबई विद्यापीठ (मुंबई), गुलबर्गा विद्यापीठ (कर्नाटक)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कर्मचाऱ्यांवर ऑनलाइन वॉच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेतील विविध विभागात सुपरवायझरचे काम करणाऱ्या मुकादम, आरोग्य निरीक्षक, अभियंता यांच्यावर आता ऑनलाइन वॉच राहणार आहे. मोबाइल अॅपच्या माध्यमातून एका क्लिकवर त्या अधिकाऱ्यांचा ठावठिकाणा समजणार आहे. महापालिका प्रशासनाकडून येत्या तीन महिन्यात या प्रणालीची अंमलबजावणी होणार असून पहिल्या टप्प्यात ३०० जण ट्रॅकिंगच्या कक्षेत असणार आहेत.

आरोग्य विभाग, बांधकाम विभाग, विभागीय कार्यालयातील अभियंते अनेकदा कार्यालयीन कामाच्या निमित्ताने ऑफीस बाहेर असतात. मात्र त्यांचा ठावठिकाणा समजत नाही. काही जण कार्यालयीन कामाचे कारण सांगत ऑफीसबाह्य कामे करत असतात. अशा कामचुकारांना मोबाइल अॅपमुळे चाप बसणार आहे. आयुक्त पी. शिवशंकर यांनी ‘एम्प्लाईज ट्रॅकिंग अॅप’ सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासन याकरिता ज्या कर्मचाऱ्याकडे स्मार्ट फोन नाहीत त्यांना स्मार्ट फोन उपलब्ध करुन देणार आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनातून रक्कम कपात केली जाणार आहे. या कामाची निविदा मंजूर झाली आहे. लवकरच वर्क ऑर्डर काढून ट्रॅकिंग सिस्टीमच्या कामाला सुरुवात होईल.

मे महिन्यापासून ट्रॅकिंग सिस्टीमची अंमलबजावणी करण्याचे नियोजन आहे.पहिल्यांदा आरोग्य​ विभागातील मुकादम, आरोग्य निरीक्षकांचा समावेश केला आहे. त्यांनी रोजच्या रोज विभाग प्रमुखांना कामाचा अहवाल द्यावयाचा आहे. मोबाइल अॅपमुळे संबंधित अधिकारी कार्यालयीन वेळेत कुठे कार्यरत आहेत हे समजणार आहे. मोबाइल अॅप गुगल कॅलेंडरशी जोडल्यामुळे आयुक्तांना त्यांच्या कामाची माहिती कळणार आहे. महापालिकेतील सर्वच विभागातील अधिकाऱ्यांना मोबाइल अॅपच्या माध्यमातून ट्रॅकिंग सिस्टीमशी जोडले जाईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मटक्यासह गुटखा तेजीत

$
0
0

कोल्हापूर : शहरात गेल्या आठवड्यात मटका बुकीच्या अड्ड्यावर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईनंतरही अवैध धंदे बंद झालेले नाहीत. पोलिसांच्या नाकावर टिच्चून आजही मटका अड्डे सुरू आहेत, तर गुटख्याचीही विक्री रोखण्यात यंत्रणेला यश आलेले नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कारवाईनंतरही अवैध धंदे सुरूच असल्याने, कारवाईवरच शंका उपस्थित केली जात आहे. अवैध धंदेवाल्यांशी काही पोलिसांचेच साटेलोटे असल्याने कारवाई केवळ फार्स ठरत आहे.

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात गेल्या आठवड्यात अवैध धंदे रोखण्यासाठी पोलिस प्रशासन आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाने मोठ्या दोन कारवाया केल्या. कोल्हापुरातील कारवाईत अप्पर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्या पथकाने मटका बुकीच्या अड्ड्यावरच छापा टाकून पाच लाखांच्या रोख रकमेसह मुद्देमाल जप्त केला. कारवाईत पोलिसांनी १२ संशयितांना अटक केली. दहा पोती मटक्याच्या चिठ्ठ्या सापडल्या. या कारवाईची शहरात जोरदार चर्चा झाली. मात्र अवैध धंदे बंद होण्यास याचा काहीच उपयोग झाला नाही ही वस्तूस्थिती आहे. आजही मटका अड्डे सुरूच आहेत. पेठांसह लक्ष्मीपुरी, जवाहरनगर, संभाजीनगर, वाशी नाका, गांधीनगर आदी परिसरात खुलेआम बुकी फिरताना दिसतात. कारवाईनंतर हे अड्डे बंद होणे अपेक्षित होते. मात्र बुकींसह यंत्रणेवर काहीच फरक पडल्याचे जाणवत नाही. अटकेतील १४ संशयित बुकी जामिनावर बाहेर येताच त्यांचे मूळ उद्योग पुन्हा सुरू झाले आहेत. पोलिसांच्या कारवाईनंतर मटका अड्डे बंद होण्याऐवजी केवळ हफ्त्यात वाढ झाल्याचे बोलले जात आहे.

केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाने सांगली जिल्ह्यातील आरग येथे छापा टाकून गुटखा तयार करणारा कारखानाच सील केला होता. कारवाईत सव्वादोन कोटी रुपयांचा गुटख्याचा कच्चा माल आणि यासाठी वापरली जाणारी सामग्री पोलिसांनी जप्त केली होती. बंदीच्या काळातही किती मोठ्या प्रमाणात गुटखा तयार होतो ते या छाप्यातून स्पष्ट झाले होते. या कारवाईचा गुटखा विक्रीवर मात्र कोणताच परिणाम झालेला दिसत नाही. पान टपऱ्या, छोटी हॉटेल्स, किराणा मालाची छोटी दुकाने यातून गुटखा विक्री सुरूच आहे. पोलिसांकडून किंवा अन्न औषध प्रशासनाकडून कारवाई होईल याची भीतीही विक्रेत्यांच्या मनात नाही. सांगलीतील कारवाईनंतर कर्नाटकातून जिल्ह्यात होणारी गुटख्याची तस्करी रोखण्यासाठी पोलिसांसह अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई करण्याची गरज होती. हातकणंगले, इचलकरंजी परिसरात यापूर्वी गुटखा निर्मितीचे कारखाने सुरू असल्याचे स्पष्ट झाले होते, त्यानुसार पुन्हा कारवाया करणे गरजेचे आहे. यातील काहीच हालचाली प्रशासनाकडून होत नसल्याने अवैध धंदे तेजीत आहेत.

सूत्रधार मोकाटच

शहरातील मटका अड्ड्यांचे सूत्रधार पोलिसांच्या रडारवर अजूनही आलेले नाहीत. बुकींकडे जमा होणारी मटक्याची रक्कम पुढे कोणाकडे जाते? ती घेणारे कोण आहेत? त्यांचे उद्योग कुठे सुरू असतात? याचा माग काढणे पोलिसांना अवघड नाही. मात्र मुळाशी जाण्याची मानसिकताच नसल्याने केवळ प्राथमिक कारवाई करून सूत्रधारांना मोकाट सोडले जाते.

रेल्वेतही मिळतो गुटखा

राजर्षी छत्रपती शाहू महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकातही गुटखा विक्री सुरू आहे. कोल्हापूर-मिरज रेल्वे प्रवासात गांधीनगर स्टेशनवर पाण्याच्या बाटल्याविकण्यासाठी काही तरुण रेल्वेत चढतात. मिरजला पोहोचेपर्यंत प्रत्येक डब्यात जाऊन ते गुटख्याची विक्री करतात. त्यांच्याकडे मागणीनुसार मावाही मिळतो. हे तरुण पुन्हा दुसऱ्या रेल्वेतून गुटख्याची विक्री करीत गांधीनगरला परततात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारच्या विरोधात निषेध सप्ताह आजपासून

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येला दोन वर्षे उलटूनही तपासाच्या पातळीवर अपेक्षित प्रगती झालेली नाही. दोन संशयितांना अटक केल्याच्या पुढे तपास जाऊ शकला नाही, त्यामुळे कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने शहरात १६ ते २० फेब्रुवारीदरम्यान निषेध सप्ताहाचे आयोजन केले आहे. परिसंवाद, मोर्चा, मॉर्निंग वॉक, व्याख्याने या माध्यमातून राज्य सरकारसह पोलिसांचा निषेध केला जाणार आहे.

कॉम्रेड पानसरे यांच्यावरील हल्ल्याला गुरुवारी दोन वर्षे पूर्ण होत आहेत. गेल्या दोन वर्षांत पोलिसांनी केलेला हल्ल्याचा तपास फारसा समाधानकारक नाही. पोलिसांसह राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी कामगार संघटना संयुक्त कृती समितीने निषेध सप्ताहाचे आयोजन केले आहे. गुरुवार (ता. १६) पासून हा सप्ताह सुरू होत असून २० फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. या काळात गुरुवारी शिवाजी विद्यापीठातील भाषा विभाग, राज्यशास्त्र विभाग, सुटा आणि श्रमिक प्रतिष्ठानमार्फत ‘जागतिकीकरणाचे बदलते स्वरूप आणि आपण’ या विषयावरील परिसंवाद आयोजित केला आहे. सकाळी ११ ते दुपारी चारपर्यंत होणाऱ्या परिसंवादात राज्यातील तज्ज्ञ अभ्यासक सहभागी होणार आहेत.

शनिवारी (ता. १८) कामगार आणि शिक्षक संघटना काळ्या फिती लावून काम करणार आहेत, त्याचबरोबर दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाही काढण्यात येणार आहे. रविवारी (ता. १९) कणेरी येथे ‘शिवाजी ः रयतेचा राजा’ या विषयावरील पानसरे यांच्या भाषणाची चित्रफीत दाखवली जाणार आहे. सोमवारी (ता. २०) मॉर्निंग वॉक होणार असून, कर्नाटक आणि गुजरातमधून साहित्यिक कोल्हापुरात येणार आहेत. संध्याकाळी पाच वाजता शाहू स्मारक भवन येथे भाषा अभ्यासक पद्मश्री गणे देवी, पत्रकार निखिल वागळे यांचे व्याख्यान आणि सभाही होणार आहे, अशी माहिती कृती समितीचे अध्यक्ष दिलीप पवार यांनी पत्रकारांना दिली.

पत्रकार परिषदेसाठी मेघा पानसरे, उदय नारकर, अतुल दिघे, विलास रणसुभे, शिवाजीराव परुळेकर, अतुल दिघे, सुशील यादव, आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फुटपाथ अडवले हॉकर्सनी

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

शहरातील जवळपास सर्व फूटपाथवर अतिक्रमण झाले असून, कुठे फळवाले, कुठे खेळणीवाले, तर कुठे फर्निचरवाल्यांनी अक्षरशः तात्पुरती दुकाने थाटली आहे. यामुळे शहरातील फूटपाथाच श्वास गुदरमत असून, शहराचे सौंदर्य डागाळले आहे. यासंदर्भात पालिकेत अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, नगरसेवकांची कारवाईतील लुडबूड सर्वाधिक कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. या नगरसेवकांनी फेरीवाल्यांना अभय देण्याचे बंद केल्यास ही अतिक्रमणे दूर होतील, आणि फूटपाथ केवळ पादचाऱ्यांसाठी राहतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

नागाळा पार्क, ताराबाई पार्क, शाहू मैदान, मिरजकर तिकटी या परिसरांत, तर उपनगरांत सानेगुरूजी वसाहत रोड अशा ठिकाणी फूटपाथवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे दिसत आहेत. मात्र, पालिकेकडून त्यांच्यावर कारवाई होणारच नाही का? असा प्रश्न उपस्थित होण्यासारखी परिस्थिती आहे. एखाद्याने फूटपाथवरून चालायला सुरुवात केली, तर त्याला अतिक्रमणामुळे रस्त्यावरूनच चालत जावे लागते. पालिकेने काही ठिकाणी कारवाई केली तरी दुसरीकडे अतिक्रमण होत असल्याचे दिसत आहे. महावीर गार्डन परिसरात उद्योग भवनसमोरील अतिक्रमण काही दिवसांपूर्वी हटविण्यात आले. पण, गार्डनच्या दुसऱ्या बाजूच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस फेरीवाल्यांनी फूटपाथ अक्षरशः झाकून टाकला आहे. जयंती नाल्यावरील पुलाच्या दोन्ही बाजूंना थेट दुकानेच थाटण्यात आली आहेत. सावित्रीबाई फुले हॉस्पिटल चौकातही तीच परिस्थिती आहे. फुटपाथ जणू या फेरीवाल्यांसाठीच बांधण्यात आले आहेत की काय असे वाटावे, अशा पद्धतीने शहरात ही दुकाने थाटण्यात आली आहेत.

या अतिक्रमाणांच्या भरीत भर म्हणजे उघड्या टेम्पोमधून भाजी विकणाऱ्यांनी चौकाचौकांत गाड्या थांबवून भाजी विक्री सुरू केली आहे. यामुळे सायंकाळी काही चौकात वाहतूक कोंडी होताना दिसते. चालू स्थितीतील गाड्यांमुळे पालिकेच्या अतिक्रमण विभागाला कारवाईत कायदेशीर अडचणी येत आहेत. त्यामुळे पालिकेने प्रादेशिक परिवहन विभागाकडे ‘या टेम्पो चालकांवर कोणत्या कलमाखाली कारवाई करता येईल,’ अशी विचारणा केली आहे. मात्र, त्यांच्याकडून प्रतिसाद न मिळाल्याने कारवाई थांबली आहे. इतर अतिक्रमणांबरोबच या अतिक्रमणांवरही कारवाई व्हावी, अशी सामान्य माणसांची अपेक्षा आहे.

‘बायोमेट्रिक’वाल्यांवर

कारवाई करू नका

मध्यंतरी शहरात अतिक्रमण विरोधी कारवाई सुरू करण्यात आली होती. त्यावेळी महापौर हसिना फरास यांनी तात्पुरती कारवाई थांबवण्याचे आदेश दिले. सर्वपक्षीय फेरीवाला कृती समितीनेही यात हस्तक्षेप केला. आयुक्त पी. शिव शंकर यांनी २०१५ पर्यंतचे बायोमेट्रिक ओळखपत्र असलेले किंवा बायोमेट्रिकसाठी अर्ज केलेले, अशांचे स्टॉल ठेवून बाकिच्यांचे काढून टाकण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर नगरसेवक आणि महापौरांनी कारवाई थांबवत अर्ज केलेल्या सर्वांचेच स्टॉल ठेवण्यास सांगितले. त्यामुळे गेल्या काही दिवसांत बायोमॅट्रिक ओळखपत्रासाठी फेरीवाल्यांचे अर्ज येऊ लागले आहेत. आता सगळ्यांचे असे अर्ज आले, तर कारवाई करायची तरी, कशी असा प्रश्न उपस्थित होत आहे.

नगरसेवकांची आडकाठी

शहरात कुठेही अतिक्रमण विभागाची कारवाई सुरू झाली की, नगरसेवकांचे संबंधितांशी असणारे हितसंबंध आडवे येतात. यातून कारवाईत अडथळे येत असल्याची तक्रार पालिका कर्मचारी करतात. नगरसेवकांना जुमानले नाही, तर नगरसेवक थेट महापौरांकडे तक्रार करतात. त्यामुळे काही दिवसांपूर्वी सुरू करण्यात आलेली अतिक्रमण विरोधी कारवाई महापौरांच्या आदेशानंतरच थांबविण्यात आल्याचे पालिकेतील कर्मचारी सांगतात. नगरसेवकांच्या कारवाई नाक खुपसण्याची तक्रार आयुक्तांकडेही करण्यात आली आहे. आयुक्त पी. शिवशंकर या संदर्भात ठोस भूमिका घेतील आणि नगरसेवकांची कारवाईतील लुडबूड थांबेल, अशी अपेक्षा सामान्यांकडून व्यक्त होत आहे.

‘अतिक्रमण’ला वालीच नाही

शहरात अतिक्रमणांचा प्रश्न सातत्याने चर्चेला येत असताना गेली काही वर्षे पालिकेतील अतिक्रमण विभागाला अधिकारीच नेमण्यात आलेला नाही. विभागप्रमुखाची पोस्ट अधीक्षक पातळीवरची असूनही त्याची नेमणूक करण्यात आलेली नाही. विभागातील कार्मचाऱ्यांच्या जोरावर येथील कारभार चालतो. त्यामुळे कारवाईत अडथळे येतात. नगरसेवकांचा दबावही वाढतो. त्यामुळे विभागात एखाद्या खमक्या अधिकाऱ्याच्या नेमणुकीनंतर शहरातील अतिक्रमणांचा प्रश्न काहीअंशी मार्गी लागले, अशी आशा आहे.


शहरात सर्वत्र मुख्य ठिकाणी फूटपाथवर अतिक्रमणे दिसत आहेत. लोकप्रतिनिधी आणि सर्वपक्षीय फेरीवाला कृती समितीच्या हस्तक्षेपामुळे कारवाईत अडथळे येत आहेत. त्यामुळे ‘कारवाई अशी करावी’, याबाबत मार्गदर्शन करावे, अशा आशयाचे पत्र आयुक्तांना देण्यात आले आहे. या संदर्भात शहर अभियंता नेद्रदीप सरनोबत यांच्याशी चर्चा झाली असून, येत्या दोन दिवसांत या संदर्भात बैठक घेण्यात येणार आहे. त्यात कारवाई संदर्भात ठोस निर्णय होण्याची अपेक्षा आहे.

- पंडित पोवार, कनिष्ठ लिपिक, अतिक्रमण विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेचे २५ प्लस टार्गेट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत सर्वाधिक ४२ उमेदवार रिंगणात उतरवण्याच्या दावा करणाऱ्या शिवसेनेने २५ प्लसचे टार्गेट ठेवले आहे. राज्यपातळीवरील कोणत्याही नेत्यांच्या मदतीशिवाय प्रत्येक तालुक्यात आमदार, माजी आमदार व ​शिवसेनेचे पदाधिकारी किल्ला लढवत आहेत.

२०१२ च्या निवडणुकीत शिवसेनेचे सहा उमेदवार निवडून आले होते. पाच वर्षात लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. एकीकडे काँग्रेस व राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेचे सहा आमदार निवडून आले आहेत. कोल्हापूर शहर वगळता पाच विधानसभा मतदारसंघात शिवसेनेने ४२ उमेदवार रिंगणात उतरविल्याचा दावा केला आहे.

शिवसेनेची यावेळची भिस्त करवीर, कागल, शाहूवाडी तालुक्यावर आहे. करवीर विधानसभा मतदारसंघात गेल्यावेळच्या निवडणुकीत शिवसेनेने पाच सदस्य निवडून आणले होते. यावेळीही शिवसेनेचा गड कायम राखण्याचा निर्धार आमदार ​चंद्रदीप नरके यांनी केला असला तरी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार पी.एन. पाटील विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा झेंडा फडकवण्याचा चंग बांधला असून त्यादृष्टीने बांधणी केली आहे. तरीही कट्टर शिवसैनिक तानाजी आंग्रे यांच्या मुलीला उमेदवारी न मिळाल्याने आंग्रे गटाने बंडखोरी केली आहे.

शाहूवाडी तालुक्यात आमदार सत्यजित पाटील यांनी राष्ट्रवादीबरोबर युती केली असून त्यांना जनसुराज्य शक्ती व काँग्रेसचे तगडे आव्हान आहे. चार मतदारसंघांवर शिवसेनेने दावा केला आहे. पण जनसुराज्य शक्तीपक्षाचे अध्यक्ष माजी आमदार विनय कोरे यांनी पुढील विधानसभेच्या तयारीसाठी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीकड गांभीर्याने लक्ष दिले आहे.

मागील वेळच्या काँग्रेसच्या विजयात मोठा वाटा असलेल्या प्रा. संजय मंडलिक व माजी आमदार संजय घाटगे यांनी शिवसेनेचा भगवा हातात घेतला आहे. पाचही मतदारसंघात त्यांना राष्ट्रवादी व भाजपचे तगडे आव्हान आहे. राष्ट्रवादीचे नेतृत्व आमदार हसन मुश्रीफ तर भाजपचे ​नेतृत्व शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे करत आहेत. त्यामुळे कागल तालुक्यातील तिरंगी लढतीत शिवसेनेला विजयासाठी चांगलेच परिश्रम करावे लागणार आहे.

हातकणंगले तालुक्यात आमदार डॉ. सुजित मिणचेकर तर राधानगरीमध्ये आमदार प्रकाश आबिटकर शिवसेनेचे नेतृत्व करत आहेत. राधानगरीमध्ये शिवसेना स्वबळावर निवडणूक लढवत असली तरी त्यांना राष्ट्रवादी व काँग्रेसचे मोठे आव्हान आहे. भुदरगड तालुक्यात काही ठिकाणी त्यांनी काँग्रेसचे माजी आमदार दिनकरराव जाधव गटाशी आघाडी करत शाहू आघाडीच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. पण भुदरगड तालुक्यात स्थानिक शिवसैनिकांना आघाडीबाबत नाराजी व्यक्त करत सवतासुभा मांडला आहे. हातकणंगले तालुक्यात शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढवताना काही ठिकाणी आघाडीही केली आहे. गडहिंग्लजमध्ये संग्रामसिंह कुपेकर तगडे उमेदवार आहेत. शिरोळमध्ये शिवसेनेचे उमेदवार रिंगणात असले तरी आमदार उल्हास पाटील प्रचारात उत्साही दिसत नसल्याची चर्चा आहे.

...

चौकट

यशाचे गणित ...

शिवसेनेने जिल्हा परिषदेसाठी २५ प्लसचे टार्गेट ठेवले असले तरी तालुक्यातील पक्षाच्या सुभेदारांवरच यशाचे गणित अवलंबून आहे. स्थानिक शिवसैनिकांची नाराजी, तालुक्यातील स्थानिक आघाड्या यातून मार्ग काढत उमेदवार निवडून आणावे लागणार आहेत. त्यामुळे सोयीचे राजकारण सोडून पक्षाचे उमेदवार म्हणून शिवसेना आमदारांना उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बालचित्रपट महोत्सवाला ग्लॅमर देणार’

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

सिनेमा कसा पहावा यासाठी दृष्टी तयार करणाऱ्या बालचित्रपट महोत्सवातूनच भविष्यात दर्जेदार रसिक घडणार आहेत. त्यामुळे अधिकाधिक चांगले सिनेमे महोत्सवात सहभागी होतील यासाठी पुढीलवर्षी पाच प्रयोगशील निर्मात्यांना निमंत्रण देण्यासाठी पुढाकार घेणार असल्याची ग्वाही अभिनेते आणि लेखक प्रियदर्शन जाधव यांनी ​दिली. यानिमित्ताने बाल​चित्रपट महोत्सवाला ग्लॅमर येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीच्यावतीने दुसऱ्या बाल चित्रपट महोत्सवाचे उदघाटन बुधवारी प्रियदर्शन यांच्या हस्ते झाले. यावेळी संवाद साधताना त्यांनी उपक्रमाचे कौतुक केले. शाहू स्मारक भवन येथे १६ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणाऱ्या बालचित्रपट महोत्सवात सहा सिनेमे पाहण्याची पर्वणी मिळणार आहे.

सकाळी दहा वाजल्यापासूनच शाहू स्मारक भवन बच्चेकंपनीच्या गर्दीने फुलून गेले. शाळांमधून मुलांना खास सिनेमे दाखवण्यासाठी आणल्याने मुलांमध्येही सिनेमाची उत्सुकता होती. सकाळी नऊ वाजता कुडस् या सिनेमाने बालचित्रपट महोत्सवाचा पडदा उघडला. दुपारी बारा वाजता रँगो हा सिनेमा पाहण्यात मुलं दंग झाली. महोत्सवाच्या पहिल्या दिवसाची सांगता बॅम्बी या सिनेमाने झाली.

रवींद्र शिंदे, अभय बकरे, गुलाब देशमुख, पद्मा दवे, ​शिवप्रभा लाड, विजय शिंदे, सचिन यादव, अभिजित कांबळे, सलीम महाकवटी, श्रीराम जाधव, रोहित कांबळे, राहुल सुतार यांच्यासह चळवळीतील​ सिनेमाप्रेमींनी संयोजन केले.

बालप्रेक्षकांचा उत्साह शिगेला

महोत्सवात दाखवण्यात येणाऱ्या सिनेमांचे विषय हे शालेय मुलांच्या विश्वाशी निगडीत आहेत. त्यामुळे सिनेमांविषयी प्रचंड कुतूहल महोत्सवात आलेल्या बालप्रेक्षकांच्या चेहऱ्यावर दिसत होते. मुळात ज्यांच्या कुटुंबीयांमध्ये सिनेमा पाहण्याची चैन परवडत नाही अशा कुटुंबातील मुलांना सिनेमा या माध्यमाची जाण यावी आ​णि त्यांच्यातील रसिकता वाढीस लागावी या हेतूने चिल्लरपार्टी विद्यार्थी चळवळ यांच्यावतीने दर महिन्याच्या एका रविवारी चित्रपट दाखवण्यात येतो. महोत्सवाच्यानिमित्ताने ही चळवळ अधिक व्यापक झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आर्थिक घडी विस्कटलेलीच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

केंद्र सरकारने आठ नोव्हेंबर २०१६ रोजी चलनातील जुन्या पाचशे व हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याच्या घेतलेल्या निर्णयाला शंभर दिवस होत आले तरी विस्कटलेली आर्थिक घडी अजून नीट बसलेली नाही. बाजारातील मंदीचा प्रभाव ‘जैसे थे’ असून फार मोठी उलाढाल सुरू झालेली नाही. धान्य बाजारात धान्याची आवक सुरू आहे; पण शेतकऱ्यांना रोख रक्कम देता येत नसल्याने व्यापाऱ्यांची अजूनही अडचण होत आहे. इतरत्र कॅशलेस व्यवहारांना थोडी गती मिळत असली तरी एटीएम कार्डद्वारे देण्यात येणाऱ्या पैशांवर काही बँका शुल्क आकारत असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. नोव्हेंबरमधील परिस्थितीच्या तुलनेत सध्या सहकारी बँकांमधून नागरिकांना एकावेळी २५ ते ३० हजारांपर्यंत पैसे मिळत आहेत इतकीच काय ती समाधानाची बाब.

नोटाबंदीच्या निर्णयानंतर ५० दिवसांनंतर परिस्थिती बदलेल असे सांगण्यात येत होते. मात्र, प्रत्यक्षात जानेवारीपर्यंत चलन तुटवडा जाणवत होता. शंभर दिवस होत आले तरी जिल्ह्यातील बँकिंग क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सहकारी बँकांमधील काही बँकांना अजूनही पाचशे व शंभर रुपयांच्या नवीन नोटांचे वितरण झालेले नाही. यामुळे बँकिंगमधील विस्कटलेली घडी अजूनही बसलेली नाही हेच स्पष्ट होत आहे. बँकिंगमधील या परिस्थितीचे परिणाम सर्व प्रकारच्या व्यवहारांवर झाले आहेत. त्याचा अगदी शेतकऱ्यांपर्यंत फटका बसला आहे. रस्त्यावर बसणाऱ्या किरकोळ विक्रेत्यांपासून ते मोठ्या उद्योजकांपर्यंत आणि गावातील सेवा सोसायटी, दूध संस्थांपासून ते मोठ्या बँक व स्थानिक स्वराज्य संस्थांना नोटाबंदीच्या परिणामांना सामोरे जावे लागले आहेत.

चलनच उपलब्ध होत नसल्याने बाजारात आलेली मंदी अजूनही कायम आहे. नोटाबंदीच्या निर्णयापूर्वी नियमित असलेल्या बँकिंग व्यवहारांपैकी अजूनही ५० टक्के व्यवहार होत नसल्याची परिस्थिती आहे. सहकारी बँकांमध्ये ऊस व दूध दराची आलेली बिले शेतकऱ्यांना अजूनही पूर्णक्षमतेने मिळत नाहीत. मार्च एंडिंग जवळ आला असल्याने कर्जाची आवश्यक असलेली वसुली त्याप्रमाणात होत नाही. जीवनावश्यक असणारे धान्य, भाजी मंडईतील भाव घसरलेले आहेत. त्यामुळे यंदा चांगले उत्पादन होऊनही शेतकऱ्यांना त्याचा फायदा झालेला नाही. अनेक शेतमालाचे पैसे देण्यास व्यापाऱ्यांजवळ चलन नसल्याने शेतकऱ्यांकडे माल पडून आहे.

या कालावधीत कॅशलेस व्यवहारांना चालना देण्यात आली. त्यासाठी अधिकाधिक व्यवहार एटीएम कार्ड अथवा इंटरनेटच्या माध्यमातून करण्यासाठी प्रोत्साहित केले; पण एटीएम कार्डद्वारे केलेल्या व्यवहारांवर शुल्क आकारले जात असल्याने पेट्रोल पंप तसेच विविध खरेदीच्या ठिकाणी ग्राहक नाराजी व्यक्त करताना दिसतात. कॅशलेस व्यवहारांकडे नागरिकांना वळविण्यासाठी प्रोत्साहन देण्याची आवश्यकता असताना कार्डच्या व्यवहारांना शुल्क आकारल्यामुळे नागरिक पुन्हा रोखीच्या व्यवहारांकडे वळण्याच्या मनःस्थितीत​ आहेत.

३० कोटीऐवजी दहा कोटीच

करन्सी चेस्ट बँकांकडून दररोज जिल्हा बँकेला काही लाखांत देण्यात येणारी रक्कम फेब्रुवारीपासून दहा कोटींवर पोहोचली आहे. यामुळे शाखांमध्ये पैशांअभावी उलाढाल थांबण्याचे प्रमाण कमी झाले आहे. जिल्हा बँकेच्या जिल्ह्यात १०२ शाखा आहेत. त्यांना दररोजच्या व्यवहारासाठी किमान ३० कोटी रुपयांहून अधिक रक्कम नोटाबंदीपूर्वी दिली जात होती. पण नोटाबंदीनंतर दररोज केवळ ५० ते ६० लाखापर्यंतची रक्कम दिली जात होती. या अपुऱ्या रकमेमुळे प्रत्येक शाखेला दोन ते पाच लाखापर्यंतच रक्कम पाठवली जात होती. परिणामी खातेधारकांना उपलब्ध रकमेपैकी रक्कम दिली जात होती. त्यामुळे अनेकांच्या हातात दोन हजार रुपये पडत होते. हा प्रकार जानेवारीपर्यंत सुरू होता. ज्यावेळी केंद्र सरकारने रक्कम काढण्याची मर्यादा कमी करण्यास सुरुवात केली, त्यानंतर चलन उपलब्धता वाढू लागली आहे. जिल्हा बँकेला फेब्रुवारीत प्रत्येक दिवसाला दहा कोटी रुपयांहून अधिक रक्कम येऊ लागली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील काही मोठ्या शाखांना पुरेसा निधी मिळत आहे.

कर्जवितरणाला सुरुवात

गेल्या महिन्यापासून परिस्थिती सुधारत असल्याने शाखांमधून परिस्थिती पाहून शेतकऱ्यांना मंजूर कर्जाची रक्कम वितरण करण्यास सुरुवात झाली आहे. कर्ज उपलब्ध होत असल्याने शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला असून पुढील महिन्यात मोठ्या प्रमाणावर कर्ज वितरण होण्याची शक्यता आहे.

नागरी बँकांचे व्यवहार ५० टक्क्यांवरच

व्यवहार थंडावल्याने त्याचा परिणाम बँकांच्या व्यवहारांवर झाला आहे. जिल्हा बँकेला रक्कम मिळत असली तरी अन्य नागरी सहकारी बँकांना पुरेशी रक्कम मिळत नाही. त्यामुळे पैशांच्या उलाढालीवर परिणाम झालेला आहे. बँकेतील पैशांची उपलब्धता पाहून एखाद्या ग्राहकाला एकावेळी २५ हजार रुपयापर्यंत पैसे दिले जात आहेत. या साऱ्या परिस्थितीमुळे कर्जाच्या वसुलीवर मोठा परिणाम झाल्याचे नागरी बँक्स असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी शंकर मांगलेकर यांनी सांगितले.

रोख रकमेचा आग्रह

कर्नाटकातून ज्वारी पाठवणारे शेतकरी मोबदल्यात रोख रकमेचा आग्रह धरत आहेत. किरकोळ बाजारासाठी येणाऱ्या ग्राहकांनाही डेबीट कार्डचा वापर केल्यानंतर शुल्क आकारले जात असल्याने ग्राहकही रोख रकमेतून व्यवहार करण्याच्या मानसिकतेत दिसत असल्याचे व्यापारी वैभव सावर्डेकर यांनी सांगितले.

पेट्रोल खरेदी डेबीट कार्डवर

पेट्रोलसाठी बहुतांश ग्राहक डेबीट कार्डचा वापर करत असल्याचे चित्र आहे. दसरा चौकनजीकच्या पेट्रोल पंपावरून नोटाबंदीपूर्वी दररोज पंधरा हजार रुपयांचा व्यवहार कार्डच्या माध्यमातून होत होता. पण सध्या हे व्यवहार ५५ हजारावर पोहोचल्याचे मालक किरण पाटील यांनी सांगितले.

कांदा, बटाटाचे व्यवहार चेकने

मार्केट यार्डमध्ये येणाऱ्या शेतकऱ्यांपैकी कांदा व बटाटा मालाचे व्यवहार व्यापाऱ्यांनी चेकमधून सुरू केले आहेत. भाजीपाला, फळांचे व्यवहार अजूनही रोख रकमेतूनच व्यवहार होत आहेत. अजूनही बाजारातील मंदी कमी झाली नसल्याचे बाजार समितीचे संचालक सदानंद कोरगावकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


खंडपीठाबाबत पालकमंत्र्यासोबत होणार बैठक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापुरातील मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचा (सर्किट बेंच) लढा तीव्र करण्यासाठी बुधवारी सर्वपक्षीय खंडपीठ कृती समितीने ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील यांची भेट घेतली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना भेटून खंडपीठाचा प्रश्न राज्य सरकारकडे मांडण्याची विनंती करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. रविवारी (ता. २६) फेब्रुवारीला शासकीय विश्रामगृहात पालकमंत्र्यांसोबत बैठक होणार आहे, त्याचबरोबर सर्वपक्षीय मेळावा घेऊन रज्य सरकारचे लक्ष वेधण्याचीही चर्चा करण्यात आली.

खंडपीठ कृती समितीने गेल्या ७७ दिवासांपासून साखळी उपोषण करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र सरकार पातळीवर याची फारशी गांभीर्याने दखल घेतली नाही. आंदोलन तीव्र करण्यासाठी सर्वपक्षीय कृती समितीने बुधवारी ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील यांची निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी बोलताना अॅड. महादेवराव आडगुळे यांनी खंडपीठाच्या लढ्याची माहिती देऊन आंदोलनात सहभागी होण्याची विनंती डॉ. एन. डी. पाटील यांना केली. आंदोलन तीव्र करण्यासाठी सर्पक्षीय मेळावा घेणे आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा खंडपीठाचा प्रश्न मांडण्याची गरज सर्पक्षीय कृती समितीचे निमंत्रक आर. के. पोवार यांनी व्यक्त केली. यावर डॉ. पाटील यांनी खंडपीठ आंदोलन ही आपली जबाबदारीच असल्याचे सांगत शेटवच्या श्वासापर्यंत खंडपीठासाठी लढा देण्याचे स्पष्ट केले. पाटील यांनी तातडीने पालकमंत्र्यांशी मोबाइलवरून संवाद साधत बैठकीसाठी वेळ मागितली. पालकमंत्र्यांच्या सांगण्यानुसार रविवारी फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता शासकीय विश्रामगृहात बैठक घेण्याचे निश्चित केले आहे.

डॉ. पाटील म्हणाले, ‘हायकोर्ट ही हस्तीदंती मनोऱ्यात ठेवण्याची बाब नाही. मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरकरांना जाहीर कार्यक्रमातून शब्द दिला आहे. हा शब्द पाळावा आणि खंडपीठाच्या आर्थिक तरतुदीसाठी येणाऱ्या बजेटमध्ये स्वतंत्र खाते सुरू करावे असा आग्रह राज्य सरकारकडे धरण्याची गरज आहे. राज्य सरकारने केलेल्या ठरावातील संदिग्धता दूर करण्याची जबाबदारीही सरकारचीच आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घडवून आणण्याची विनंती आपण पालकमंत्र्यांकडे करू.’

आर. के. पोवार म्हणाले, ‘कोल्हापूर महानगरपालिकेने खंडीपीठाच्या इमारतीसाठी ५५ ते १०० एकर जमीन आरक्षित करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे दिला आहे. आता खंपीठासाठी जनआंदोलनचा रेटा सुरू असल्याने कोल्हापूरच्या मागणीकडे राज्य सरकारसह न्याय यंत्रणेनेही लक्ष देणे गरजेचे आहे. यासाठी लवकरच सर्पक्षीय मेळावा घेण्याचे नियोजन आहे.’ बैठकीसाठी खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक अॅड. प्रकाश मोरे, विवेक घाटगे, दिलीप पवार, अनंत माने, वसंतराव मुळीक, उदय गायकवाड, किशोर घाटगे, चंद्रकांत जाधव, प्रसाद जाधव, बाबा पार्टे आदी उपस्थित होते. चंद्रकांत यादव यांनी आभार मानले.

कोल्हापूरची गरज, पुण्याची चैन

‘मुंबईपासून कोल्हापूरचे अंतर आणि न्याय मिळवण्यासाठी होणारा खर्च, परिश्रम पाहता कोल्हापुरात खंडपीठ होणे ही गरजच आहे. पुणेकरांसाठी मागणी करून कोल्हापूरची रास्त मागणी प्रलंबित ठेवणे योग्य नाही. भौगोलिकदृष्ट्या पुणे मुंबईपासून दूर नाही. सध्याच्या घडीला खंडपीठ होणे ही कोल्हापूरकरांची गरज आहे, तर पुणेकरांसाठी ती चैन आहे. त्यामुळे सरकारने गरजेला प्राधान्य द्यावे’ अशी विनंती डॉ. एन. डी. पाटील यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पवारांचे मांडे पूर्ण होणार नाहीत

$
0
0

Gurubal.Mali @timesgroup.com

Tweet: @gurubalmaliMT

कोल्हापूर : भाजप आणि शिवसेना यांच्यातील वादाची ठिणगी पेटली आहे. या ठिणगीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मध्यावधी निवडणुकीचे संकेत देत तेल ओतण्याचा प्रयत्न केल्याने राज्य सरकारवर अस्थिर असल्याची चर्चा राज्यात वाढली आहे. मुंबई महापालिका निकालावरच राज्य सरकारचे भविष्य अवलंबून आहे. अशी परिस्थिती असली तरी सरकारला कोणताच धोका नाही. युती सरकारच पाच वर्षे सत्तेवर राहील असा निर्वाळा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीत जागा वाटप समाधानकारक न झाल्याने युती तोडल्याची घोषणा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी आणि मंत्री महादेव जानकर सतत भाजपवर टीका करत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारवर टांगती तलवार आहे. मध्यावधी निवडणुकीला तयार असल्याचे सांगत पवारांनी सरकार अस्थिर असल्याची टोला लगावला. भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याची यापूर्वीची घोषणा त्यांनी मागे घेतली. आठ दिवसांवर आलेल्या महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमुळे राज्य सरकार अस्थिर असल्याचे सांगत राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे.

या पार्श्वभूमीवर शिवसेनेला सत्तेत घेताना समन्वयक असलेले महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी, ‘पाच वर्षे ​सेना सरकारमधून बाहेर पडणार नाही’ असे स्पष्ट केले. पाटील हे युतीचे समन्वयक असल्याने सेनेतील अनेक नेत्यांशी त्यांचा संपर्क असतो. ते पाटील म्हणाले, ‘भाजपकडे अपक्षासह सध्या १३३ आमदार असून सेना भक्कमपणे पाठिशी असल्याने मध्यावधी निवडणुकीचे पवारांचे स्वप्न पूर्ण होणार नाही. मुंबई महापालिका निवडणुकीत जागा वाटपावरून वाद झाला. हा वाद तात्विक नसल्याने युतीवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही.’


दर पंधरा दिवसांनी वादग्रस्त विधान करून सतत चर्चेत राहण्याचा शरद पवारांचा प्रयत्न असतो. सरकारविषयी त्यांनी केलेले विधान हा त्यातीलच एक भाग आहे. सरकार पडण्याबाबत त्यांच्या मनातील मांडे कधीच पूर्ण होणार नाहीत. शिवसेना पाच वर्ष आमच्यासोबतच राहील.

चंद्रकांत पाटील, महसूलमंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टार्गेटपुरत्याच होतात कारवाया

$
0
0

Uddhav.Godase@timesgroup.com
Tweet @Uddhavg_MT

कोल्हापूर : राज्य सरकारने गुटखा निर्मितीसह विक्रीवरही बंदी घालून पाच वर्षे उलटली. मात्र गुटख्याची किंमत आणि अधिकाऱ्यांचे हफ्ते वाढण्याखेरीज काहीच फरक पडला नाही. राज्यात उघडपणे सुरू असलेले गुटखा निर्मितीचे कारखाने आता छुप्या पद्धतीने सुरू आहेत. तशीच विक्रीही छुप्या पद्धतीने सुरू आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून टार्गेटपुरत्या कारवाया होतात. त्यानंतर तेरीभी चूप और मेरीभी चूप अशीच गत होते.

गुटखा आणि तंबाखुजन्य पदार्थांमुळे कॅन्सरचा धोका उद्भवतो. कॅन्सरने ओढवणाऱ्या मृत्यूंचे प्रमाणही धक्कादायक आहे. काही राज्यकर्तेही कॅन्सरच्या विळख्यात सापडल्याचे उघड झाले. त्यानंतर २०१२ मध्ये राज्यात गुटखा निर्मिती आणि विक्री करण्यास तत्कालीन आघाडी सरकारने बंदी घातली. बंदीचा निर्णय जितक्या धडाडीने घेतला, तितकी त्याची अंमलबजावणी झाली नाही. केवळ राज्यातील उघड निर्मिती बंद झाली, एवढाच काय तो बदल झाला.

आजही कोल्हापूर जिल्ह्याच्या गावागावात, रस्त्यारस्त्यांवर गुटख्याच्या रिकाम्या पुड्या पडलेल्या दिसतात. पान टपऱ्या आणि दुकानांतून गुटख्याची छुप्या पद्धतीने विक्री कधीच बंद नाही. विक्रेत्यांना दुकानांमध्ये गुटख्याची पॅकेट्स पोहोच करणारी यंत्रणा कार्यरत आहे. विशेष म्हणजे अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांना या पुड्या अपवादानेच आढळतात. केवळ वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारवायांचे उद्दिष्ट दिले आहे, म्हणूनच कारवाया केल्या जातात. महिन्याचे उद्दिष्ट पूर्ण झाले की मग मात्र यंत्रणेला गुटखा विक्री दिसतच नाही. या सोयीस्कर भूमिकेबद्दल नेहमीच आश्चर्य व्यक्त केले जाते.

जिल्ह्यात शाळा, महाविद्यालयांच्या परिसरातही मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री सुरू आहे. किराणामालाची छोटी दुकाने, पानटपऱ्या आणि शाळांच्या बाहेर रस्त्याकडेला बसून खाऊ विकणाऱ्यांकडेही गुटख्याच्या पुड्या मिळतात. विशेष म्हणजे नवख्या माणसांना गुटखा मिळत नाही. नेहमीचे ग्राहक गेल्यानंतर त्यांना काही सांगण्याची गरजही पडत नाही. कागदात गुंडाळलेल्या पुड्या हातात ठेवल्या जातात.

दोन रुपयांच्या पुडीची किंमत पाच ते पन्नास रुपयांपर्यंत मोजावी लागते. पुडीची किंमत वाढली तरीही शोधून विकत घेणारेही कमी नाहीत. त्यामुळेच विक्रेतेही दररोज त्याच्या मनात येईल त्या दराने गुटखा विक्री करतात. कायद्यातून पळवाट म्हणून तंबाखूची वेगळी पुडी आणि सुपारीची वेगळी पुडी विकीली जाते. दोन्ही पुड्या मिक्स केल्यानंतर गुटखा तयार होतो. ही पळवाट बहुतांश विक्रेत्यांकडून अवलंबली जाते.

पर्याय माव्याचाही

गुटख्याला पर्याय म्हणून माव्याची मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते. शहरात खरी कॉर्नर, पद्मा चौक, मिरजकर तिकटी, लक्ष्मीपुरीतील फोर्ड कॉर्नर, कोळेकर तिकटी, मध्यवर्ती बसस्थानक परिसर, ताराबाई पार्क आदी परिसरात केवळ मावा खाण्यासाठी तरुणाईची गर्दी असते. गुटखा नसेल तर माव्याची पुडी घेतली जाते. मावा विक्रीवर बंदी नसल्याने शहरात माव्याची उलाढाल लाखो रुपयांची आहे.

कारवायांनी वाढतात हफ्ते

अन्न व औषध प्रशासनासह पोलिसांनाही विक्रेते माहितीचे आहेत. किंबहुना काही पोलिस कर्मचारीही गुटख्याचे नियमित ग्राहक आहेत. प्रत्येक पोलिस ठाण्याच्या परिसरातही गुटख्याच्या पुड्या आणि रंगलेल्या भिंती दिसतात. विक्रेते आणि वितरकांवर कारवाई केल्यानंतर गुटख्याची उपलब्धता थांबत नाही, उलट हफ्त्यात वाढ होते, अशी चर्चा आहे. हप्तेखोरीमुळेच गुटखा विक्री सुरू राहते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चाळीस व्यापाऱ्यांकडे साठ लाखाची थकबाकी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरातील ४० व्यापाऱ्यांकडे साठ लाख रुपयांची एलबीटी थकीत आहे. महापालिकेने असेसमेंट करुन संबंधितावर रक्कम निश्चित केली आहे. मात्र व्यापाऱ्यांकडून प्रतिसाद नसल्याने वसुलीसाठी मालमत्ता जप्तीची कारवाई करण्याची नोटीस प्रशासनाने काढली आहे. याशिवाय तीन हजार व्यापारी असेसमेंटला सहकार्य करत नसल्यामुळे त्यांच्यावर स्थानिक संस्था कर नियमानुसार एकतर्फी एलबीटी निश्चित करुन दंडासह वसूली केली जाणार आहे.

महापालिकेने एलबीटी वसुलीसाठी कडक भूमिका घेत मालमत्ता जप्तीसाठी ४० (क)ची नोटीस काढली आहे. संबंधित व्यापाऱ्यांनी करपात्र रकमेचा भरणा करुन महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन स्थानिक संस्थाकर विभागाचे अधिकारी सुधाकर चल्लावाड यांनी केली आहे. आयुक्त पी. शिवशंकर यांच्याशी चर्चेने अधिकाऱ्यांनी कारवाईचा निर्णय घेतला आहे. आठवडाभरात व्यापाऱ्यांनी कर न भरल्यास कारवाई होईल असे सांगण्यात आले.

व्यापाऱ्यांवर एकतर्फी दंड लावणार

महापालिकेने २०११ पासून एलबीटी आकारली. मात्र अनेक व्यापाऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे सादर केलेली नाहीत. एलबीटीच्या असेसमेंटसाठी महापालिकेने ३५०० जणांना नोटिसा काढल्या. कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन केले. मात्र ३००० व्यावसायिकांनी आवाहनाला केराची टोपली दाखवली. त्यांच्यावर कारवाईचा निर्णय झाला आहे. व्यापाऱ्यांनी महापालिकेकडे वार्षिक विवरणपत्रे सादर केली आहेत. त्या आधारावर एलबीटी, दंड निश्चित केली जाईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिंदेबाबतचा चौकशी अहवाल दोन दिवसांत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘माध्यमिक शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांच्याविरोधात आलेल्या तक्रारींचा अहवाल शनिवारपर्यंत दिला जाणार आहे. त्यांच्याकडून तक्रारीचा लेखी खुलासा मागविला आहे. मात्र त्यांची इन कॅमेरा चौकशी करण्याची गरज नाही’, असे अतिरिक्त सीईओ आणि चौकशी समितीचे प्रमुख इंद्रजित देशमुख यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी शिंदे यांच्या विरोधात दीडशेहून अधिक तक्रारी आल्या आहेत. या तक्रारींबाबतची चौकशी अंतिम टप्यात आहे. त्यांच्याविरोधात आलेल्या तक्रारींचा खुलासा मागविला आहे. लेखी खुलासा मागविल्याने इन कॅमेरा चौकशी करण्याची गरज नसल्याचे समितीकडून सांगण्यात आले. चौकशी समितीचा अहवाल सीइओ डॉ. कुणाल खेमनार हे शालेय शिक्षण विभागाकडे, पुणे विभागीय आयुक्तांकडे पाठविणार आहेत. त्यानंतर शिंदे यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जाण्याची शक्यता आहे.

शिक्षणाधिकारी शिंदे यांच्यावर वीसहून अधिक तक्रारी आहेत. नियमित वेतनश्रेणी मान्यता, निवडश्रेणी, वरिष्ठ वेतनश्रेणी, मुख्याध्यापक पदोन्नती, पेन्शन प्रकरणे, वैद्यकीय बिले, फरकाची बिले मंजूर करण्यासाठी आणि वैयक्तिक मान्यता देण्यासाठी आर्थिक व्यवहार केल्याच्या तक्रारी आहेत. त्यासह पैसे देऊनही कामे केलेली नाहीत, अशा तक्रारीही काही शिक्षकांनी केल्या आहेत. त्याचे सबळ पुरावेही चौकशी समितीकडे देण्यात येणार आहेत. झालेल्या तक्रारींबाबत कायदेशीर लेखी खुलासा करण्यासाठी एका वकिलाची नेमणूक केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images