Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

​मंत्री सदाभाऊ खोत यांच्याकुटुंबियांच्या मोटारीला अपघातदहा जण जखमी; दोन गंभीर जखमींवर कोल्हापुरात उपचार

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, इस्लामपूर

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे पुत्र सागर यांच्या प्रचाराला जाताना कुटुबियांच्या मोटारीला अपघात झाला. रविवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास इस्लामपूर-सांगली रस्त्यावरील आष्टा गावानजीक शिंदे मळ्याजवळ ही घटना घडली. अपघात दहा जण जखमी झाले. यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर कोल्हापूर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. अन्य जखमींवर इस्लामपूर येथील प्रकाश हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये मंत्री खोत यांच्या दोन सुना मोहिनी सागर खोत आणि गीता सुनील खोत यांचा समावेश आहे.

प्रचारासाठी निघालेल्या या मोटारीच्या (एमएच ४५. ए. ७५७२) उजव्या बाजूचे पाठीमागील टायर फुटल्याने हा अपघात झाला. भरधाव वेगात असताना टायर फुटल्याने चालकाचे मोटारीवरील नियंत्रण सुटले आणि मोटार दोनदा उलटली. गाडीत महिला असल्याने एकच गलका उडाला. रस्त्यावरील प्रवाशांनी उलटलेली मोटार सरळ करून जखमींना तातडीने उपचारासाठी इस्लामपूर येथील प्रकाश हॉस्पिटलमध्ये पाठविले. मोटारीतील बहूतेक सर्वांच्या हात, पाय, मानेला, डोक्याला मार लागला आहे.

अपघातातील जखमी तृप्ती तानाजी हारुगडे (वय २२ रा. येलूर, ता. वाळवा) आणि सुनील लक्ष्मण खोत (वय २७ रा. मरळनाथपूर, ता. वाळवा) यांच्या डोक्याला मार लागल्याने या दोघांना कोल्हापूर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये हालवण्यात आले.

मंत्री खोत यांच्या सून मोहिनी सागर खोत यांच्या पाठिला आणि पायाला तर गीता सुनील खोत यांच्या मानेला दुखापत झाली आहे. रुपाली सुनील खोत, अरुणा दीपक खोत, जयकर हिंदूराव खोत, निलेश किसन खोत व योगिता दीपक खोत (सर्व रा. मरळनाथपूर) आणि तेजश्री गणेश शेवाळे (रा. इस्लामपूर) यांच्यावर इस्लामपूर येथे उपचार सुरू आहेत.

खोत यांचे पुत्र सागर हे बागणी मतदारसंघातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या प्रचारासाठी कुटुंबीय सकाळी बागणी मतदारसंघात निघाले होते. अपघाताची नोंद आष्टा पोलिस ठाण्यात झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘सीमाप्रश्नी खासदारांनी पुढाकार घ्यावा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बेळगाव, निपाणी, कारवार, बिदर, भालकी या सीमा भागातील मराठी भाषिक महाराष्ट्रात येण्यासाठी पाच दशकांहून अधिक काळ धडपडत आहेत. कर्नाटक सरकारने त्यांच्यावर अन्याय करण्याची एकही संधी सोडलेली नाही. बेळगावात १६ फेब्रुवारी रोजी मराठा व मराठी क्रांती मूक मोर्चाचे आयोजन केले आहे. त्यामुळे कर्नाटक पोलिस मराठी भाषिक, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवत आहेत. सीमाप्रश्नी कोल्हापूरचे खासदार संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी आणि धनंजय महाडिक यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीचे समितीचे नेते नेताजी जाधव यांनी सोमवारी केली. अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे शाहू स्मारक भवनात आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.

दरम्यान, बेळगावातील मराठा मोर्चाच्या निमित्ताने टी शर्ट विक्री करणाऱ्या तीन तरुणांना कर्नाटक पोलिसांनी केलेल्या अटकेचे पडसादही यावेळी उमटले. दरम्यान, सीमाप्रश्नाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. प्रत्येक तारखेला कर्नाटकचे लोकप्रतिनिधी, मंत्री उपस्थित राहतात. उलट महाराष्ट्राचे लोकप्रतिनिधी उपस्थित राहत नाहीत. सीमाप्रश्नाचे समन्वयक, पालकमंत्री चंदकांत पाटील यांनी १० मार्चच्या सीमाप्रश्नाच्या तारखेला हजर रहावे, अशी अपेक्षा नेते जयराम मिरजकर यांनी व्यक्त केली.


आज बैठक

बेळगाव मराठा क्रांती मोर्चात सहभागाच्या नियोजनासाठी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पुढाकाराने आज, सोमवारी बैठकीचे आयोजन केले आहे. शाहू स्मारक भवनात सायंकाळी ५ वाजता बैठक होईल. बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दडपशाहीचे निषेध, मोर्चाचा निर्धार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बेळगाव येथे १६ फेब्रुवारी रोजी आयोजित मराठा व मराठी क्रांती मूक मोर्चाला कोल्हापुरकारांनी साथ देण्याचा ‌निर्णय रविवारी घेण्यात आला. येथील शाहू स्मारक भवनात अखिल भारतीय मराठा महासंघाच्या मेळाव्यात हा‌ निर्णय घेण्यात आला. यावेळी बेळगावहून आलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी मोर्चाला आडकाठी आणण्यासाठी कर्नाटक सरकारच्या दडपशाहीचा निषेध करत मराठी भाषिकांवर खोटे गुन्हे दाखल करून दबाव टाकत असल्याचा आरोप केला.

अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक म्हणाले, ‘मराठा समाजाच्या न्याय मागण्यांसाठी संपुर्ण देशात ६० ठिकाणी निघालेले मराठा क्रांती मोर्चे यशस्वी झाले. अतिशय शांततेत, उच्चांकी गर्दीने सर्व मोर्चे झाले. बेळगाव येथे १६ फेब्रुवारी रोजी काढण्यात येणाऱ्या मोर्चाला विरोध करून सीमा भागातील मराठी भाषिकांची गळचेपी करण्यासाठी कर्नाटक सरकारने मोर्चाला परवागी देण्यासाठी टाळाटाळ केली. मार्गाने मोर्चा निघू नये, यासाठी विविध मार्गांनी प्रयत्न केले जात आहेत. मोर्चाची तारीख निश्चित झाल्यानंतर कोल्हापूरचे तीन तरुण टी-शर्ट विक्री करीत होते. त्यांना कर्नाटक पोलिसांनी अटक केली. त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल केले. महाराष्ट्र एकीकण समितीच्या नेत्यांना अटक करण्याची भाषा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मोर्चा यशस्वी करण्यासाठी मोठ्या भावाच्या भूमिकेत कोल्हापूरकर बेळगावकरांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील. मोर्चात कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातून मोठ्या संख्येने उपस्थित राहू, अशी ग्वाही दिली.

महाराष्ट्र एकीकण समितीचे नेते नेताजी जाधव म्हणाले, ‘बेळगावमध्ये मराठा क्रांती मोर्चा निघू नये, यासाठी कर्नाटक पोलिसांची दडपशाही सुरू आहे. तेथील पोलिस अधिकारी आयोजकांना अटक करण्याचे नियोजन करत आहेत. नोटीस पाठवून पाच लाख लाखांचे हमीपत्र लिहून घेतले आहे. शनिवारी प्रमुख आयोजक प्रकाश मरगाळे यांना अटक करण्यासाठी पोलिस आले. त्यावेळी जोरदार विरोध केल्यानंतर हमीपत्र लिहून घेऊन सोडले.’

जयराम मिरजकर म्हणाले, ‘इच्छा नसताना सीमा भागातील मराठी भाषिकांना कर्नाटकात डांबले आहे. ते गेल्या पाच दशकाहून अधिक काळ महाराष्ट्रात येण्यासाठी लढत आहेत. सीमा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात आहे. अशा परिस्थितीमध्ये मराठा क्रांती मोर्चाला जाणीवपूर्वक पोलिस आडकाठी आणत आहेत. त्यामुळे कोल्हापूरकरांनी सीमाभागाच्या पाठीशी ठामपणे राहावे.’

अमर यळ्ळूरकर म्हणाले, ‘बेळगावात मराठा मोर्चाच निघू नये यासाठी पोलिस विविध माध्यमातून प्रयत्न करत आहेत. खोटे गुन्हे दाखल करून दहशत माजवली जात आहे. सीमा भागातील मराठी भाषिकांना घटनेनी दिलेले अधिकारही मिळत नाहीत. कर्नाटक सरकारकडे मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी मागणी यापुर्वीच केली आहे. पण त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर टी शर्ट विकणाऱ्या कोल्हापूरच्या युवकास अटक झाली. त्यास अजून जामीन झालेला नाही. येळ्ळूर येथील ‘मराराष्ट्र राज्य येळ्ळूर’ हा फलक हटवल्याच्या प्रकरणात पोलिसांनी मराठी भाषिकांना जनावरांप्रमाणे बदडून काढले होते. अशाप्रकारे संधी मिळेल, त्यावेळी कर्नाटक सरकार मराठी भाषिकांना त्रास देत आहे.’

यावेळी महानगरपालिका स्थायी समितीचे सभापती संदीप नेजदार, बेळगाव मराठा क्रांती मोर्चाचे जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी, अॅड. गुलाबराव घोरपडे, संभाजीराव जगदाळे, सुनील सरनाईक, शैलजा भोसले, सुजित चव्हाण, चंद्रकांत चव्हाण, रमेश कार्वेकर, उदय जगताप आदी उपस्थित होते.

कर्नाटकी पोटशूळ

‘मी बेळगावचा, बेळगाव महाराष्ट्राचा’ असा मजकूर असलेला टीशर्ट विकून तेढ निर्माण केल्याचा ठपका ठेवत कर्नाटक पोलिसांनी कोल्हापूरच्या युवकांना अटक केली. घटनेने आपले मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. कुठेही व्यवसाय करण्याची मुबा आहे. तरीही केवळ टी शर्टवर बेळगाव महाराष्ट्राचा असा आशय लिहिले असल्याचे पोटशूळ कर्नाटक पोलिसांनी उठले. त्यातून युवकांना अटक केली, असे अॅड. यळळूरकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चांगभलंच्या गजरात काळभैरीची यात्रा

$
0
0

म.टा.वृत्तसेवा , गडहिंग्लज

‘काळभैरी बाळभैरी, भैरीच्या नावाने चांगभल’ च्या जयघोषात व गुलालाच्या उधळणीत येथील ग्रामदैवत श्री काळभैरीची यात्रा उत्साहात पार पडली. सीमाभागासह पश्चिम महाराष्ट्रातील लाखो भाविकांनी काळभैरीचे दर्शन घेतले. पहाटे चार वाजल्यापासून भाविकांनी दर्शनासाठी मंदिर परिसरात रांगा लावल्या. बालगोपालांसह अबालवृद्ध व महिला मोठ्या संख्येने यात्रेत सहभागी झाल्या.

शहरापासून पाच किलोमीटर अंतरावरील डोंगर माथ्यावर काळभैरीचे मंदिर आहे. दरवर्षी एक दिवस येथे यात्रा भरते. गडहिंग्लज शहरासह हडलगे (कर्नाटक), बड्याचीवाडी (ता.गडहिंग्लज) आणि बहिरेवाडी (ता.आजरा) येथे ही रविवारी यात्रा साजरी केली जाते. यात्रेच्या आदल्या दिवशी पालखी मिरवणुकीने यात्राला सुरवात होते. शनिवारी दुपारी साडेचारच्या सुमारास शहरातील काळभैरी मंदिरापासून पालखी मिरवणूकीला सुरवात झाली. शनिवारी रात्री उशिरा पालखी मिरवणुकीची सांगता होऊन पालखी डोंगरावरील काळभैरव मंदिरात स्थानापन्न झाली. प्रांतधिकारी संगीता चौगुले यांच्या हस्ते तहसीलदार राजेश चव्हाण यांच्या उपस्थितीत विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर मुख्य यात्रेला प्रारंभ झाला. ‘श्री’च्या सुलभ दर्शनासाठी मंदिर परिसरात मंडप तसेच दर्शन रांगेचे आयोजन करण्यात आले. पहाटेपासून यात्रास्थळावर भाविकांनी अलोट गर्दी केली.

गडहिंग्लज आगारातर्फे यात्रास्थळापर्यंत भाविकांना नेण्या-आणण्याची सोय करण्यात आली. आगारातर्फे सुमारे चाळीस बस व पन्नास कर्मचारी तैनात करण्यात आले. या गाड्यांच्या माध्यमातून दिवसभर फेऱ्या सुरु होत्या. पहाटे व सकाळच्या सत्रात बसेसना गर्दी कमी होती. मात्र दुपारनंतर अचानक भाविकांची संख्या वाढली. भाविकांनी त्याचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. यात्रेनिमित्त डोंगराच्या पायथ्याशी खेळणी, खाद्यपदार्थ, शीतपेय, मेवा-मिठाई, नारळ, पूजासाहित्यांचे स्टॉल लावण्यात आले होते. गडहिंग्लज नगरपरिषद, गोकुळ, श्रीराम फायनान्स, दैवज्ञ ऐक्य वर्धक संघ व पाटील समाजातर्फे भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय पुरविण्यात आली. अनिरुद्धबापू फाऊंडेशनसह विविध संघटना, बड्याचीवाडी ग्रामस्थ तसेच तरुण मंडळांच्या कार्यकर्त्यांनी सेवाकार्यात विशेष भूमिका बजावली.

काळभैरी यात्रेसाठी एकेरी वाहतुकीचे नियोजन करण्यात आले. यात्रास्थळी जाण्यासाठी मुख्य मार्गाचा वापर करण्यात आला. तर येताना औद्योगिक वसाहत, साधना माळ ते मार्केट यार्ड या मार्गाचा अवलंब झाला. शहर वाहतूक शाखेसह पोलिसांनी वाहतूक नियोजनासंदर्भात विशेष परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उमेदवारांसाठी माघारीचे चारच तास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे सोमवारी (ता. १३) माघारीनंतर चित्र स्पष्ट होईल. माघारीसाठी उमेदवारांना केवळ चारच तासांचा वेळ देण्यात आला आहे. त्यामुळे माघारीसाठी राजकीय पक्षांच्या घडामोडींसाठी अतिशय कमी कालावधी मिळणार आहे. या कालावधीत राजकीय घडामोंडीना वेग येईल. माघारीसाठी दुपारी तीन वाजल्यानंतर निवडणूक कार्यालयात कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. अडथळा करणाऱ्या उमेदवारांवर कारवाईचा बडगा उगारू असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. दरम्यान, काहीजणांच्या माघारीसाठी विविध राजकीय पक्षांकडून दबावतंत्र रविवारी रात्रीही सुरूच राहिले. उद्या अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न सुरूच राहतील अशी स्थिती आहे.

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत अर्ज माघारीसाठी सोमवारी सकाळी ११ ते दुपारी ३ हा कालावधी देण्यात आला आहे. चार तासांच्या माघारीच्या प्रक्रियेनंतर उमेदवारांची अंतिम यादी आणि चिन्हाचे वाटप केले जाईल. करवीर तालुक्यासाठीची प्रक्रिया करवीर प्रांताधिकारी कार्यालयात होईल. दुपारी तीन वाजल्यानंतर अर्ज माघारीसाठी कोणतीही सबब विचारात घेतली जाणार नाही. अपुरी कागदपत्रांसह कोणतीही सबब ऐकून घेतली जाणार असे नोडल ऑफिसर विवेक आगवणे यांनी सांगितले. दुपारी तीन वाजेपर्यंत सभागृहात उपस्थित असलेल्या उमेदवारांना माघारीची संधी दिली जाईल. ही प्रक्रिया सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरू राहील.

मतदानासाठी ६ हजार इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन उपलब्ध आहेत. मतदानाच्या प्रक्रियेसाठी १६ हजार कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. १५ फेब्रुवारीला मतदान केंद्राची यादी जाहीर होईल. २१ फेब्रुवारीला मतदान आणि २३ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होईल.

निवडणूक आयोगाने ट्रू व्होटप अॅप विकसित केले आहे. यात मतदाराला आपले नाव, मतदान केंद्र क्रमांक, खोली क्रमाकांची माहिती मिळेल. अॅपवर मतदार यादी आहे. गुगल मॅपिंगचे कामही सुरू आहे. मतदान केंद्र कोणत्या ठिकाणी आहे, याची माहिती मतदाराला मिळेल. मतदान केंद्राचा नकाशा मॅपिंगवर येणार आहे. या यंत्रणेचे काम अंतिम टप्प्यात आहे.

प्रत्येक तालुक्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. माघारीसाठी दुपारी तीन वाजल्यानंतर आलेल्यांना संधी दिली जाणार नाही. उमेदवारांनी गडबड केल्यास कारवाई करू. यासंदर्भात पोलिसांना सूचना दिल्या आहेत. काटेकोर अंमलबजावणी करू.

- विवेक आगवणे, जिल्हा नोडल अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​फडणवीस पांढऱ्या पायाचेनारायण राणेंची टीका

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

‘मराठा आणि मुस्लिम समाजाला आरक्षण मिळत होते. परंतु पांढऱ्या पायाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आडकाठी घातल्याने आरक्षण कोर्टात लटकले,’ अशी टीका माजी मुख्यमंत्री आमदार नारायण राणे यांनी केली. सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचार सभेत बोलत होते.

आसार मैदान येथे सोमवारी घेण्यात आलेल्या जाहीर सभेत राणे यांनी केंद्र आणि राज्यातील भाजप सरकार आणि शिवसेनेवर टीकेची झोड उठविली. राणे म्हणाले, ‘यशवंतराव चव्हाण ते सुधीलकुमार शिंदे आणि त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री जबाबदारीने बोलत होते. शिवाय कोणालाही कमी लेखत नव्हते मात्र, देवेंद्र फडणवीस मात्र शिवसेनेची औकात काढत आहेत, हे दुर्दैव आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना देशात विशेष मान आहे. आतापर्यंतच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची संस्कृती आणि संस्कार सांभाळले आहेत. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस यांनी संस्कृतीला काळीमा फासला आहे. मुख्यमंत्र्यांनी खरे बोलले पाहिजे परंतु फडणवीस चक्क खोटे बोलत आहेत, हे महाराष्ट्रासाठी लाजिरवाणे आहे. फडणवीस जे बोलतात ते करीत नाहीत. एकूणच फडणवीस सरकार थापाडे आहेत. भाजप सरकारने शेतकऱ्यांची पुरती वाट लावली आहे. धान्य आणि भाजीपाल्याचे दर पडले आहेत. शेतकरी हवालदिल झाला आहे. भाजीपाला रस्त्यावर टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. गेल्या अडीच ते तीन वर्षांत सरकारने केवळ बनवाबनवी केली आहे.’

दरम्यान, मुंबईत युती तुटली म्हणून भाजप शिवसेनेवर जहरी टीका करीत आहे, मित्र पक्षावर अशी टीका करणे योग्य नाही, भाजपकडून शिवसेनेची फरफट सुरू आहे. राजिनामा खिशात घेऊन फिरायचा नसतो, तो देऊन टाकायचा असतो परंतु, तेवढी धमक सेनेच्या मंत्र्यांमध्ये नाही. एकूणच सेनेच्या मंत्र्यांची चेष्ठा सुरू आहे. सत्ता आणि सत्तेतून पैसे मिळविण्याचा धंदा भाजप आणि शिवसेना सरकारने मांडला असून, थापाडे, गरिबांची चेष्ठा करणारे व बेईमान फडणवीस सरकार फार काळ टीकणार नाही, असेही राणे म्हणाले.

दोन देशमुखांच्या भांडणात विकास खुंटला

सोलापूर शहराचा विकास करण्याचे बाजूला ठेऊन पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख आपापसात भांडत आहेत. विकासकामांसाठी हे दोघे का भांडत नाहीत. सोलापूर शहराला त्यांनी काय दिले याचा जाब सोलापूरकर जनतेने त्यांना विचारावा असेही आमदार राणे यांनी सांगितले. सुभाष देशमुख यांच्या लोकमंगलच्या वाहनात सुमारे ९१ लाख रुपये सापडले त्याचे पुढे काहीही झाले नाही, उलट त्यांना क्लीनचिट दिली, असा आरोपही राणे यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सातारा झेडपीसाठी २८७ रिंगणात

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सातारा

सातारा जिल्हा परिषदेच्या ६४ जागेसाठी २८७ उमेदवार रिंगणात असून, जिल्ह्यातील अकरा पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी २८७ उमेदवार निवडणुकीसाठी रिंगणात उभे आहेत. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी निवडणुकीचे चित्र स्पष्ट झालेले आहे. या निवडणुकीत ज्यांना पक्षाची उमेदवारी नाकारली आहे, अशा उमेदवारांनी पक्षाच्या विरोधात अपक्ष उमेदवारी ठेवून थेट पक्षालाच आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला आहे.

अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी जि. प. साठी वाईतून १३, फलटणमधून ३३, कोरेगावमधून २२, खटावमधून २७, साताऱ्यातून ४०, महाबळेश्‍वरमधून ५, माणमधून २४, खंडाळ्यातून २०, जावलीतून १२ असे एकूण २८७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. जिल्ह्यातील अकरा पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी वाईत ३४, फलटणमध्ये ५४, कोरेगावमध्ये ३६, खटावमध्ये ५३, साताऱ्यात ६८, महाबळेश्‍वरमध्ये १०, माणमध्ये ४१, खंडाळ्यात ३१, जावलीत २६ असे एकूण ५३० उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत. सर्व उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​प्रतापगड होणार जागतिक वारसा?युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीच्या पथकाची भेट

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सातारा

किल्ले प्रतापगडला युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीचे सदस्य आणि तज्ज्ञांनी भेट दिली. पथकाने रविवारी सात तास प्रतापगडावर भ्रमंती केली. छत्रपतींची युद्धनीती व दुर्गस्थापत्य कौशल्याने पथक अचंबित झाले. युनेस्कोच्या समितीने भेट दिल्याने गडाचा वारसा जागतिक नकाशावर पोहोचण्याची शक्यता आहे.

देदीप्यमान इतिहास असणाऱ्या महाराष्ट्रातील गडांचे युरोप तसेच राजस्थान येथील गडांप्रमाणेच संवर्धन व्हावे, गडपर्यटन (फोर्ट टुरिझम) ही संकल्पना रुजावी, यासाठी युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीचे सदस्य आणि युरोपीय तज्ज्ञांनी १७ फेब्रुवारीपर्यंत महाराष्ट्रातील गडकोटांच्या दौऱ्याचे आयोजन केले आहे. स्वित्झर्लंड, ब्रिटन, जर्मनी व फ्रान्स येथील तज्ज्ञांचा या पथकात समावेश आहे. केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या सल्लागार तसेच इकोफोर्टच्या सदस्या डॉ. शिखा जैन यांच्यासह, एमटीडीसीच्या वल्सा नायर, भारतीय पुरातत्त्व खात्याचे पश्चिम विभागाचे संचालक नांबीराजन, इंटरनॅशनल सायंटिफीक कमिटीचे सदस्य जर्मनीचे डॉ. हन्स रुडोल्फ, डॉ. एडमंड स्फोर, ब्रिटिश फोर्ट्रेस स्टडी ग्रुपचे माजी अध्यक्ष आणि इंटरनॅशनल फोर्ट्रेस कौन्सिल ग्रेट ब्रिटनचे अध्यक्ष डेव्हिड बसेत, डॉ. शाड, चाल्स ब्लॅकवूड यांच्यासह २२ सदस्यांच्या समितीने किल्ले प्रतापगडाला भेट दिली.

युनेस्कोच्या सदस्यांनी रविवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास किल्ले प्रतापगड चढण्यास सुरुवात केली. किल्ल्यांची भिंत कशा पद्धतीने बांधण्यात आली आहे. दिंडी दरवाजा, महादरवाजा, भवानी मातेच्या मंदिराची पाहणी करून दर्शन घेतले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसराची पाहणी केली. किल्ल्याच्या तटबंदीवरून फिरून किल्ल्यांची महिती इतिहासप्रेमींकडून घेतली. या वेळी दुर्गअभ्यासक प्रमोद मांडे यांनी प्रतापगडावर झालेल्या

युद्धाची महती सदस्यांना सांगितली. युनेस्कोच्या सदस्यांनी सुमारे ६ ते ७ तास प्रतापगडावर भ्रमंती केली. छत्रपती शिवरायांचा इतिहास जाणून घेतल्यानंतर सदस्य भारावून गेले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत किल्ले प्रतापगडावर युनेस्कोचे सदस्य होते.

बारा मोटेच्या विहिरीची भूरळ

युनेस्कोचे सदस्यांनी सोमवारी किल्ले अजिंक्यतारा, संगम माहुली, लिंब शेरी येथील बारा मोटेच्या विहिरींची पाहणी केली, अशी माहिती मालोजी जगदाळे व अजय जाधवराव यांनी दिली आहे. पुढे कोल्हापूर, सिंधुदुर्ग येथेही युनेस्कोचे पथक भेट देणार असल्याचे समजते. कास पठाराचे जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समावेश झाल्यानंतर सातारा जिल्ह्यातील प्रतापगड, अजिंक्यतारा, धोमचे मंदिर, वाई मेणवली वाडा, संगम माहुली, लिंबशेरीची बारामोटेची विहीर हेही आता जगाच्या नकाशावर दिमाखात झळकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सांगली झेडपीसाठी २२५ रिंगणातभाजप, कॉँग्रेसने खाते उघडले; एक-एक जागा बिनविरोध

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सांगली

सांगली जिल्हा परिषदेच्या ६० जागांसाठी २२५ तर पंचायत समितीच्या १२० जागांसाठी ३६७ उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याचे सोमवारी उमेदवारी अर्ज माघारीनंतर स्पष्ट झाले. मिरज तालुक्यातील पंचायत समितीच्या बेडग गणातून भाजपच्या गीतांजली कणसे तर कवठेपिरान गणातून काँग्रेसचे अनिल आमटवणे यांच्या विरोधात उमेदवारच उरला नसल्याने त्यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. भाजप आणि काँग्रेसने उमेदवारीतच बाजी मारली. भाजपने पंचायत समितीमध्ये प्रथमच खाते उघडले आहे. जिल्ह्यात दुरंगी, तिरंगी आणि चौरंगी लढती होणार आहेत.

सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप या तीनही प्रबळ पक्षांनी सुरुवातीला स्वबळाची भाषा केली. परंतु, एकाही पक्षाला जिल्हा परिषदेच्या सर्व जागांवर चिन्हावर उमेदवार देण्यात यश आलेले नाही. कोणी कोणाबरोबर कशी आघाडी केली आहे, हे समजून घेणेही कठीण आहे.

शिराळ्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आघाडीचा सामना भाजप, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उमेदवारांबरोबर रंगणार आहे. वाळवा तालुक्यात राष्ट्रवादीच्या विरोधात सर्वपक्षीय आघाडीचा प्रयत्न फसल्यानंत्तर शिवसेना, भाजप, कॉँग्रेस स्वबळावर मैदानात उरले आहेत. या तालुक्यातील ४८ गावांमध्ये मात्र, काँग्रेसचा एक गट भाजपबरोबर गेला आहे.

कडेगाव आणि पलूस तालुक्यात काँग्रेस स्वबळावर असून, या ठिकाणी काँग्रेसला भाजप आणि राष्ट्रवादीच्या आघाडीशी सामना करावा लागणार आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांना पलूस तालुक्यातील बंड थंड करण्यात सोमवारी अखेरच्या दिवशी यश आल्याने काँग्रेस एकसंघ आणि निकराचा लढा देणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अंकलखोप सारख्या एका जिल्हा परिषद मतदारसंघात एकाच गावातील अकरा जण इच्छुक होते. प्रत्येकांनी शक्तीप्रदर्शन सुरू ठेवल्याने या ठिकाणी बंडखोरी अटळ असल्याची चर्चा होती. परंतु, पतंगराव कदम, जिल्हाध्यक्ष आमदार मोहनराव कदम आणि युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांनी बंडखोरांची समजूत काढण्यात यश मिळविले आहे. कुंडल जिल्हा परिषद मतदार संघात पतंगराव कदम यांचे जावई महेंद्र लाड आणि क्रांतिअग्रणी जी. डी. लाड यांचे नातू आणि युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शरद लाड यांच्यातली लढत लक्षवेधी ठरत आहे.

कडेगाव तालुक्यात भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख आणि राष्ट्रवादीचे नेते अरुणअण्णा लाड यांनी पूर्वीचे सख्य कायम ठेवून काँग्रेससमोर आव्हान उभे केले आहे. यंदा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी असल्याने दिवंगत आमदार संपतराव देशमुख यांचे चिरंजीव संग्रामसिंह देशमुख यांच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ते सर्वाधिक मताधिक्यांनी विजयी होतील, असा दावा पृथ्वीराज देशमुख यांनी केला आहे.

तासगाव तालुक्यात खासदार संजय पाटील यांची भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यातच खरा सामना रंगणार असल्याचे समोर आले आहे. या तालुक्यात काँग्रेसने काही ठिकाणी उमेदवार दिले असले तरी स्थानिक पातळीवर खासदार पाटील यांना मदत होईल, अशी रणनिती अवलंबल्याची चर्चा आहे. बहुतेक मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादी असा दुरंगी सामना आहे तर काही ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार रिंगणात चुरस निर्माण करणार आहेत. दोन्ही बाजू बंड थंड करण्यात यशस्वी झाल्या असल्यातरी सावळजमध्ये भाजपच्या तर मांजर्डेत राष्ट्रवादीतून बंडखोरी झाली आहे. या तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वबळावर अवघ्या चार ठिकाणीच मैदानात उतरली आहे.

खानापूर तालुक्यात आमदार अनिल बाबर यांच्या शिवसेनेच्या विरोधात काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी केली आहे. या तालुक्यात बाबर यांच्या चिरंजीवाच्या विरोधात माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्या चिरंजीवाने दाखल केलेली उमेदवारी मागे घेतली आहे. बाबर यांच्या सुनबाईही मैदानात आहेत. भाजप आणि अपक्षही मैदानात आहेत. आटपाडी तालुक्यात राष्ट्रवादीचे माजी आमदार राजेंद्र देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने त्या ठिकाणी राष्ट्रवादीच अवस्था बिकट झाली आहे. अवघ्या दोन ठिकाणी राष्ट्रवादी चिन्हावर लढत आहे. या ठिकाणी शिवसेनेचे तानाजी पाटील आणि स्वाभिमानी विकास आघाडीचे भरत पाटील यांनी युती करून भाजपसमोर आव्हान उभे केले आहे.

जत तालुक्यात भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका गटाबरोबर तिसरी आघाडी करुन मैदानात उतरली आहे. भाजपला दोन तर काँग्रेसला एका ठिकाणी बंडखोरीचा सामना करावा लागणार आहे. काही ठिकाणी तिरंगी तर काही ठिकाणी चौरंगी लढती आहेत. राष्ट्रीय समाज पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना, बहुजन समाज पक्षही काही जागांवर लढत आहे.

कवठेमहांकाळ तालुक्यात राष्ट्रवादी आणि माजी मंत्री अजितराव घोरपडे यांची स्वाभिमानी विकास आघाडीची युती झाली आहे. भाजपसह अन्य पक्षांनी अपक्ष उमेदवारांच्या माध्यमातून मैदानात आहेत. मिरज तालुक्याच्या पूर्व भागात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि घोरपडे एकत्र आहेत. पश्चिम भागात स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि काँग्रेस एकत्र आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा परिषदेसाठी जिल्ह्यात चौरंगी लढत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषदेसाठी जिल्ह्यात चौरंगी लढत होणार असल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. जिल्हा परिषदेच्या ६७ जागांसाठी ३२२ तर पंचायत समितीच्या १३४ जागांसाठी ५८३ उमेदवार नशीब आजमावणार आहे. माघारीच्या दिवशी १००३ उमेदवारांनी माघार घेतली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपप्रणित आघाडी आणि शिवसेना या चार प्रमुख पक्षांतच लढती होणार आहे. पंचायत समिती गणांत काही ठिकाणी तिरंगी लढत असेल. काही तालुक्यात बंडोबांमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढली आहे. मंगळवारपासून प्रचाराचा धुमधुडाका वाढणार असून केवळ सहा दिवसांत मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान उमेदवारांसमोर असणार आहे.

जिल्हा परिषदेत सर्वाधिक ६६ उमेदवार करवीर तालुक्यात आहेत. तर सर्वाधिक कमी, ८ उमेदवार आजरा तालुक्यात आहेत. पंचायत समिती गणात सर्वाधिक १०६ उमेदवार हातकणंगले तर सर्वांत कमी उमेदवार गगनबावडा तालुक्यात आहेत. माघार घेणाऱ्यात अपक्षांची संख्या मोठी आहे. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपप्रणित आघाडीत (भाजप, ताराराणी, जनसुराज्य पक्ष, युवक क्रांती आघाडी) चुरस असेल. दक्षिण मतदारसंघात स्वाभिमानी पक्ष भाजपसोबत असणार आहे. त्यासह शिवसेना आणि स्थानिक आघाडी आहे. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत चौरंगी लढत होणार आहे. सर्वच राजकीय पक्षांनी स्थानिक आघाडी केली आहे. या आघाडीच पक्षाचे बलाबल वाढविणार आहेत.

०००

राष्ट्रवादीच्या बंडोबांना रोखले

बोरवडेतून शिवसेनेचे भूषण पाटील, खुपिरेतून तानाजी आंग्रे, केर्ली येथून सचिन चौगले, राशिवडेतून शिवाजी माने, राधानगरीतून काँग्रेसचे मारूतराव जाधव बंडखोर आहेत. या बंडोबांना थांबविण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र अखेरच्या क्षणापर्यंत माघार घेतली नाही. कागल, भुदरगड, गडहिंग्लज या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात बंडोबांना शांत करण्यात यश मिळाले.

००

या प्रमुखांची माघार

परिते मतदारसंघातून बाबूराव हजारे ( राष्ट्रवादी), भाजपचे उमेदवार परशराम तावरे (गिजवणे), राष्ट्रवादीचे कुंभोज मतदारसंघातील संजय देसाई, गगनबावडा तालुक्यातून भाजपचे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष नंदकुमार पोवार, काँग्रसचे मानसिंग पाटील, सुजाता कांबळे, एकनाथ शिंदे, उदय देसाई, तानाजी काटे, एम. जे. पाटील (माणगांव), तात्या देसाई (चंदगड), प्रा. नालंदा पाटील (राशिवडे), शाहूवाडी तालुक्यात बांबवडेच सरपंच विष्णू यादव, स्वाभिमानीचे राजाराम वडाम, राजीव पाटील या प्रमुखांनी माघार घेतली.

०००

राजकीय पक्ष उमेदवार

शिवसेना ६६

काँग्रेस ५२

भाजप ३९

राष्ट्रवादी ३६

०००

०००

जिल्हा परिषद जागा ६७

वैध अर्ज ६७७

माघार ३५५

उमेदवार संख्या ३२२

०००

पंचायत समिती

जागा १३४

वैध अर्ज १२३१

माघार ६४८

उमेदवार संख्या ५८३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसावर चाकू हल्ल्याचा प्रयत्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ट्रिपल सिट जाणाऱ्या दुचाकीस्वारांना अडवल्याच्या रागातून पाच ते सहा तरुणांनी वाहतूक पोलिस गंगाराम भिवा पोवार (वय ५७, रा. लाईन बाजार, कसबा बावडा) यांना धक्काबुक्की करत चाकू हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सोमवारी (ता. १३) संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास उमा टॉकीज परिसरात हा प्रकार घडला. पोलिसांनी जावेद सिकंदर जमादार (वय २६), सुमित सुरेश पोवार (२६, दोघेही रा. रविवार पेठ) आणि धैर्यशील अशोक माने (२२, रा. केर्ले, ता. करवीर) या तीन संशयितांना अटक केली असून, त्यांच्यावर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

सोमवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे सहायक फौजदार गंगाराम पोवार हे सहकारी आर. जी. माने यांच्यासह उमा टॉकिज चौकात ड्युटीवर होते. गोखले कॉलेजच्या दिशेने जाणाऱ्या एका दुचाकीवरील तिघांना त्यांनी अडवले. ट्रिपल सिटबाबत जाब विचारला असता हे तिघे शिविगाळ करून निघून गेले. काही वेळाने हे तिघे दोन मित्रांना घेऊन पुन्हा उमा टॉकीज चौकात आले. त्यांनी पोवार यांना धक्काबुक्की करीत चाकू हल्ल्याचाही प्रयत्न केला. दरम्यान, प्रशिक्षणार्थी उपअधीक्षक बसवराज शिवपुजे हे घटनास्थळी आल्यानंतर हल्लेखोरांनी पळ काढला. शहर पोलिस उपअधीक्षक भारतकुमार राणे यांनीही घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली. या घटनेची माहिती लक्ष्मीपुरी पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने हल्लेखोरांचा शोध घेऊन जावेद जमादार, सुमित पोवार आणि धैर्यशील माने या तिघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी या तिघांकडून एक दुचाकीही जप्त केली आहे. यातील दोघांनी मद्यप्राशन केले होते. पळालेल्या दोघांचा शोध सुरू आहे.

घटनेची चौकशी केल्यानंतर लक्ष्मीपुरी पोलिसांनी तिन्ही संशयितांना जुना राजवाडा पोलिसांच्या ताब्यात दिले. सरकारी कामात अडथळा आणणे, जीवघेणा हल्ला करणे, दहशत माजवण्याचे गुन्हे यांच्यावर दाखल केले आहेत. रविवारी उमा टॉकिज परिसरात झालेल्या चाकू हल्ल्यातील संशयिताला धमकावण्यासाठी हे तिघे आल्याचा लक्ष्मीपुरी पोलिसांना संशय आहे. यादृष्टीने लक्ष्मीपुरी पोलिस तपास करीत आहेत.

सलग तिसऱ्या दिवशी दहशत

उमा टॉ‌किज परिसरात सलग तिसऱ्या दिवशी दहशत माजवण्याचा प्रकार घडला आहे. गेली दोन दिवस परिसरातील तरुणांनी चाकू हल्ला करून दोघांना गंभीर जखमी केले आहे, तर सोमवारी थेट पोलिसांवरच हल्ला केला. या प्रकाराने उमा टॉकीज परिसरातील वाढती दहशत पोलिसांसा आव्हान ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चुरशीच्या लढतीनेनिवडणुकीत रंगत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अर्ज माघारीनंतर जिल्ह्यातील चुरशीच्या लढतीही स्पष्ट झाल्या. हातकणंगले, करवीर, शिरोळ आणि पन्हाळा तालुक्यात चुरशीच्या लढती होणार आहेत. कागल येथे राष्ट्रवादीला भाजप आणि शिवसेनेचे आव्हान राहणार आहे. राधानगरी, भुदरगडमध्ये भाजप आणि शिवसेनेचे आव्हान आहे. आमदार प्रकाश आबिटकर यांनी शिवसेनेपेक्षा स्थानिक आघाडीला महत्व दिले आहे. त्यामुळे शिवसेनेला आपल्याच आमदारांच्या विरोधात ताकद लावावी लागणार आहे.

चंदगडमध्ये पंचरंगी लढत होणार असून गगनबावडा तालुक्यात काँग्रेसचे भगवान पाटील, शिवसेनेचे बंकट थोडगे आणि भाजपचे पी. जी. शिंदे यांच्यात लढत होईल. राधानगरी तालुक्यात काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आणि बंडखोर उमेदवारांच्या थेट लढत होईल. आजरा तालुक्यात तिरंगी लढत होईल. गारगोटीत राष्ट्रवादी काँग्रेस, शाहू विकास आघाडी, काँग्रेस, भाजप यांच्यात लढत होईल. आजरा तालुक्यात ताराराणी आघाडीचे अशोक चराटी विरूद्ध राष्ट्रवादीचे जयवंत शिंपी यांच्यात चुरशीची लढत होईल. शाहूवाडीत शिवसेना-राष्ट्रवादी, काँग्रेस-जनसुराज्य, स्वाभिमानी, मनसे, शेकाप यांच्यात लढत होईल. गडहिंग्लज मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश पाटील, काँग्रेसचे दिग्विजय कुराडे आणि संजय बटकडली यांच्यात चुरशीची लढत होईल. कागल मध्ये सिद्धनेर्ली मतदारसंघात शिवसेनेचे अंबरिशसिंह घाटगे, राष्ट्रवादीच्या वृषाली पाटील आणि भाजपचे सुनील मगदूम यांच्यात लढत होईल. बोरवडे मतदारसंघात राष्ट्रवादीचे मनोज फराकटे, भाजपचे प्रताप पाटील, शिवसेनेचे वीरेंद्र संजय मंडलिक, अपक्ष भूषण पाटील यांच्यात लढत होईल. दक्षिण मतदारसंघात उजळाईवाडी जि. प. मतदारसंघात काँग्रेसच्या सरिता खोत आणि भाजपच्या आरती यादव यांच्यात प्रमुख लढत होईल.

तालुकानिहाय रिंगणातील उमेदवार

जिल्हा परिषद पंचायत समिती

शाहूवाडी १५ २४

पन्हाळा २९ ५०

हातकणंगले ५५ १०६

शिरोळ ३३ ५७

कागल २३ ३९

करवीर ६६ ९९

गगनबावडा ९ १५

राधानगरी २० ४६

भुदरगड २१ ४२

आजरा ८ २४

गडहिंग्लज २० ४६

चंदगड २३ ३५

एकूण ३२२ ५८३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूरकर गुरुवारी बेळगावमध्ये

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सीमावासीयांच्या सदैव पाठीशी राहणाऱ्या कोल्हापुरातील सकल मराठा समाजाने बेळगाव येथे गुरुवारी (१६) होणाऱ्या मराठा क्रांती मूक मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होऊन कोल्हापूरचा ठसा उमटवण्याचा निर्धर केला. राजर्षी शाहू स्मारक भवन येथे झालेल्या सकल मराठा समाजाचा बैठकीत निर्णय घेण्यात आला.

बैठकीत वसंतराव मुळीक यांनी बेळगावात निघणाऱ्या मोर्चाची माहिती दिली. ते म्हणाले, ‘मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी महाराष्ट्र व अन्य राज्यात ६१ मोर्चे निघाले आहेत. सीमाभागातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे, शेतीमाला हमीभाव मिळावा, शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यासक्रमात समाविष्ट करावा, शहाजीराजे यांच्या समाधीचा जिर्णोद्धार करावा, मराठा समाजाला शैक्षणिक व नोकरीत आरक्षण मिळावे, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सरकारी पातळीवर साजरी करावी, या प्रमुख मागण्या मोर्चात करण्यात येणार आहेत. मोर्चा शांततेत निघणार असला तरी कर्नाटक सरकारकडून दडपशाही सुरू आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

उद्योगपती दिलीप पाटील व किशोर घाटगे यांनी सीमाप्रश्नी केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली. प्रसाद जाधव यांनी कन्नड गुंड मोर्चाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता असल्याने कोल्हापुरातील मराठा समाजाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले. सरकार कोणत्याही पक्षाचे असले तरी मराठा माणसाविरुद्ध होणाऱ्या अन्यायाच्याविरोधात महाराष्ट्रातील जनता कायम सीमावासियांच्या पाठीशी राहतील, असे मत महेश जाधव यांनी व्यक्त केले. शिवाजी पेठेतील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होतील, अशी घोषणा माजी नगरसेवक अजित राऊत यांनी केली. कोल्हापुरातील मराठा समाजाने भगवे झेंडे घेऊन सहभागी व्हावे, अशी सूचना बाबा महाडिक यांनी केली. स्वातंत्रसैनिक संघटना मराठा मोर्चात सहभागी होईल, असे सुंदरराव देसाई यांनी सांगितले. दिलीप देसाई यांनी सीमावासीयांवर होणारा अन्याय व मराठा समाज, मराठा भाविकांना पाठिंबा देण्यासाठी कोल्हापूरकर सहभागी होतील, अशी ग्वाही दिली. राजू जाधव यांनी कर्नाटक पोलिसांच्या अत्याचाराविरोधात लढताना कोल्हापुरवासियांचा पाठिंबा महत्त्वाचा आहे. मोर्चात कोल्हापुरची एकजूट दाखविण्याची वेळ आली आहे, असे मत व्यक्त केले. मोर्चात मोठ्या संख्येने महिला सहभागी होतील, असे वैशाली महाडिक यांनी सांगितले. बैठकीला नगरसेवक प्रताप जाधव, जयेश कदम, उद्योगपती चंद्रकांत जाधव, संजय पवार-वाईकर, गीता गुरव, उदय लाड, गायत्री राऊत, सर्जेराव पोवार यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते.

आज पुन्हा बैठक

मोर्चाच्या नियोजनासाठी मंगळवारी (ता. १४) सकाळी अकरा वाजता महापौर हसीना फरास यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिकेत बैठक होणार आहे. मोर्चात सहभागी होणाऱ्या वाहने शिवाजी गुरुवारी सकाळी सात वाजता विद्यापीठाजवळ एकत्र येणार असून त्यानंतर ते बेळगावला रवाना होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेवकांना तात्पुरता दिलासा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मुदतीत जातवैधता प्रमाणपत्र सादर न केलेल्या नगरसेवकांवर पुढील सुनावणी होईपर्यंत कारवाई करण्यास सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. त्याचवेळी नगरसेवकांच्या जातवैधता प्रमाणपत्रप्रश्नी राज्य सरकारला वस्तुनिष्ठ म्हणणे सादर करण्याबाबत नोटीस काढली. सुप्रीम कोर्टाने, हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती दिल्यामुळे महापालिकेतील १९ नगरसेवकांना दिलासा मिळाल्याचे माजी नगरसेवक आदिल फरास यांनी सांगितले. पुढील सुनावणी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहे.

महापौर हसीना फरास, स्थायी सभापती संदीप नेजदार, परिवहन सभापती नियाज खान, विरोधी पक्षनेते किरण शिराळेंसह १९ नगरसेवकांना जात प्रमाणपत्रप्रकरणी कारवाईची टांगती तलवार आहे. हायकोर्टाने, ​निवडून आल्यानंतर सहा महिन्याच्या मुदतीत प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या नगरसेवकांचे पद रद्द होते असा निर्णय डिसेंबर २०१६ मध्ये दिला होता. हायकोर्टाच्या निर्णयानुसार राज्य निवडणूक आयोगाने राज्य सरकारला संबंधित नगरसेवकावर कारवाईची सूचना केली आहे. नगर विकास विभागाने, महापालिकेकडून नगरसेवकांची दोनदा माहिती घेत कार्यवाही सुरु केली. २० नगरसेवकांनी त्याविरोधात एकत्रितपणे सुप्रीम कोर्टात दाद मागितली. महापौर फरास यांच्यावतीने याचिका दाखल आहे. दरम्यान विभागीय पडताळणी समितीने माजी महापौर अश्विनी रामाणे यांचा जात दाखला अवैध ठरविल्याने त्यांचे नगरसेवक पद रद्द झाले आहे.

सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती रंजन गोगाई यांच्यासमोर सोमवारी सुनावणी झाली. नगरसेवकांच्यावतीने मयांक पांडे यांनी युक्तिवाद केला. विभागीय पडताळणी समिती राज्य सरकारशी निगडीत आहे. पडताळणी समितीकडूनच नगरसेवकांना दाखले देण्यास विलंब झाला. नगरसेवकांची चूक नसतानाही कारवाई झाल्यास त्यांचे नुकसान होणार आहे. पद रद्दची कारवाई झाल्यास त्यांना निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. नगरसेवकांवर अन्याय होऊ नये अशी त्यांनी बाजू मांडल्याचे माजी नगरसेवक फरास यांनी सांगितले.

………..

राज्यातील ४५० नगरसेवकांना दिलासा

राज्यातील ४५० नगरसेवकांनी मुदतीत प्रमाणपत्रे दिली नाहीत. त्या संदर्भात सुनावणी सुरु आहे. कोर्टाने सोमवारी राज्य सरकारला जातवैधता प्रमाणपत्रप्रश्नी म्हणणे मांडण्याची नोटीस काढली. समितीकडून दिलेले दाखले, कालावधी संदर्भात सरकारला सुप्रीममध्ये बाजू मांडावी लागणार आहे. सरकारच्या भूमिकेवर नगरसेवकांचे भवितव्य अवलंबून असणार आहे. सरकार म्हणणे मांडेपर्यंत ४५० नगरसेवकांना दिलासा मिळाला आहे.

………….

संबंधित नगरसेवक

महापौर हसीना फरास, सभापती संदीप नेजदार, नियाज खान, ​विरोधी पक्षनेते किरण शिराळे, नगरसेवक सुभाष बुचडे, शमा मुल्ला, वृषाली कदम, निलेश देसाई, कमलाकर भोपळे, सचिन पाटील, संतोष गायकवाड, विजय खाडे, अफजल पिरजादे, दीपा मगदूम, स्वाती यवलुजे, अश्विनी बारामते, सविता घोरपडे, रीना कांबळे, मनीषा कुंभार.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिरोळ तालुक्यात बहुरंगी लढत

$
0
0

म.टा.वृत्तसेवा,जयसिंगपूर

शिरोळ तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ४६ तर पंचायत समितीच्या तब्बल ७० उमेदवारांनी माघार घेतली. यामुळे आता जिल्हा परिषदेच्या सात जागांसाठी ३३ तर पंचायत समितीच्या १४ जागांसाठी ५७ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. जिल्हा परिषदेसाठी दोन ठिकाणी तिरंगी तर अन्य ठिकाणी बहुरंगी लढतीचे चित्र आहे. तर पंचायत समितीसाठी सात ठिकाणी तिरंगी लढत होत आहे.

शिरोळ तालुक्यात छाननीमध्ये जिल्हा परिषदेचे ७९ तर पंचायत समितीचे १२७ अर्ज वैध ठरले होते. सोमवारी माघारीच्या दिवशी उमेदवारांनी ११६ अर्ज मागे घेतले. यामध्ये जिल्हा परिषदेच्या रिंगणातून माजी समाजकल्याण समिती सभापती विलास कांबळे, पंचायत समितीचे माजी उपसभापती सत्येंद्रराजे नाईक निंबाळकर, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश परीट तर पंचायत समितीच्या दत्तवाड मतदार संघातून पंचायत समिती सदस्य हरिश्चंद्र पाटील, शानूर मुजावर, पंचायत समिती सदस्य विजीतसिंह शिंदे यांनी अर्ज मागे घेतले. तर कोथळी पंचायत समिती मतदार संघातून चिपरीचे उपसरपंच शिवाजी बेडगे, उदगावमधून ग्रामपंचायत सदस्य हिदायतुल्ला नदाफ तसेच बाळासो कांबळे यांनी माघार घेतली.

जिल्हा परिषदेमया सात जागांपैकी दोन ठिकाणी तिरंगी, दोन ठिकाणी चौरंगी तर तीन ठिकाणी बहुरंगी लढत होत आहे. पंचायत समितीमया १४ जागांपैकी सात ठिकाणी तिरंगी, चार ठिकाणी चौरंगी तर तीन ठिकाणी बहुरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले. जिल्हा परिषदेचा दत्तवाड मतदारसंघ खुला असून याठिकाणी सर्वाधिक आठ उमेदवार रिंगणात आहेत. तर उदगाव, आलास मतदार संघात तिरंगी लढत होत आहे.

पंचायत समितीच्या दानोळी, अब्दुललाट मतदारसंघात सर्वाधिक प्रत्येकी सात उमेदवार रिंगणात आहेत. तर गणेशवाडी, शिरोळ, अकिवाट, यड्राव, शिरढोण, टाकळी, दत्तवाड मतदार संघात तिरंगी लढतीचे चित्र आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पस्तीशीतच ब्रेस्ट कॅन्सर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बदलती जीवनशैली, उशिरा होणारे लग्न, स्तनपानाबाबत असलेले गैरसमज यामुळे दिवसेंदिवस महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढत आहे. गेल्या काही वर्षांत ब्रेस्ट कॅन्सरचे वाढते प्रमाण पस्तीशीतच जास्त दिसू लागले आहे.

कॅन्सर हे नाव जरी ऐकले तर अनेकांना धडकी भरते. त्यातही महिलांमधील ब्रेस्ट कॅन्सरची समस्या (स्तनांचा कॅन्सर) गंभीर रुप धारण करीत आहे. महिलांमध्ये याबाबत पुरेशी जनजागृती नसल्यामुळे हा आजार दुसऱ्या टप्प्यात गेल्यानंतरच त्याची जाणीव आणि गांभीर्य लक्षात घेतले जाते.

ह्या आजाराचे लवकर निदान होण्यासाठी वेळेवर तपासणी करणे खूप महत्त्वाचे आहे. मात्र नेमके तीच वेळेत केली जात नाही. ग्रामीण आणि शहरातील महिलांमध्ये तीच परिस्थिती असल्यामुळे कॅन्सरने धोक्याची पातळी गाठल्यानंतर महिलांच्या लक्षात येते.

येथील कोल्हापूर कॅन्सर सेंटरमध्ये दररोज किमान तीन ते चार महिलांना नव्याने ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचे निष्पन्न होते. ३० ते ४० या वयोगटातील महिलांमध्ये हा आजार अधिक असल्याचे कॅन्सर तज्ज्ञ डॉ. रेश्मा पवार यांनी सांगितले.

ही तपासणी आयब्रेस्ट एक्झामिनेशनद्वारे अल्ट्रा पोर्टेबल स्कॅनर मशिनद्वारे केली जाते.

या कॅन्सरचे दरवर्षी ९ टक्के नवीन रुग्ण आढळून येत असून वेळीच उपचार न केल्यामुळे अनेकांना जीवही गमवावा लागला आहे. महिलांनी वयाच्या चाळिशीनंतर मॅमोग्राफी करणे आवश्यक असून संतुलित आहार घेऊन आरोग्यदायी जीवन जगणे आवश्यक आहे.

...........

कोट -

ग्रामीण आणि शहरातील महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण सारखेच आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे आणि उशिरा लग्न, मूल होऊ न देणे, मूल झाल्यास स्तनपान न देणे, अशा काही कारणांमुळे ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढत आहे. हा कॅन्सर झाल्याचे पहिल्या टप्प्यात लक्षात येत नाही. त्यामुळे महिलांनी मेमोग्राफी तपासणी करणे आवश्यक आहे.

डॉ. रेशमा पवार, कॅन्सर तज्ज्ञ

.........................

काय काळजी घ्यावी?

आरोग्यदायी जीवन

जंकफूड टाळावे

लग्न लांबवू नये

मूल झाल्यानंतर स्तनपानाला प्राधान्य द्यावे

ब्रेस्ट हेल्प एक्झामिनेशनद्वारे तपासणी करावी

वयाच्या चाळिशीनंतर मेमोग्राफी तपासणी करणे आवश्यक

.........

कसा ओळखावा?

स्तनातील गाठ असल्यास

स्तनाग्र आत ओढले जाणे

स्तनाग्रातून द्रव बाहेर पडणे

..................

ब्रेस्ट कॅन्सर बरा होऊ शकतो

महिलांनी तपासणी केल्यानंतर वेळीच निदान झाल्यास त्याला उपचारांची साथ दिली तर हा आजार बरा होऊ शकतो. डिजिटल मेमोग्राफी या चाचणीव्दारे सुरुवातीच्या टप्प्यावरच या आजाराचे निदान होऊ शकते. वयाची चाळीशी पार केलेल्या प्रत्येक महिलेने ही तपासणी वर्षातून एकदा तरी निश्चितपणे करून घ्यावी, असे डॉ. पवार सांगतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेनेच्या पारड्यात दान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर महापालिकेच्या परिवहन समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या पाठिंब्यावर शिवसेनेचा झेंडा फडक​ला. सभापतिपदासाठी सोमवारी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे गटनेते व नगरसेवक नियाज खान यांनी भारतीय जनता पक्ष, ताराराणी आघाडीचे नगरसेवक शेखर कुसाळे यांचा आठ विरुद्ध पाच मतांनी पराभव केला. १६ सदस्यीय परिवहन समितीत काँग्रेस, राष्ट्रवादीचे सात, शिवसेनेचा एक तर भाजप, ताराराणी आघाडीचे पाच सदस्य आहेत.

महापालिकेत काँग्रेस, राष्ट्रवादीला काठावरचे बहुमत आहे. महापालिकेच्या एकूण ८१ सदस्य संख्येपैकी शिवसेनेचे चार नगरसेवक आहेत. गेल्या सव्वा वर्षाच्या कालावधीत महापौर निवडणूक, स्थायी समिती सभापती आणि प्रभाग समिती निवडणूक व सभागृहात शिवसेनेने सातत्याने सत्तारुढ काँग्रेस आघाडीला पूरक अशी भूमिका निभावली. स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत काँग्रेस आघाडीचे नगरसेवक संदीप नेजदार यांना शिवसेनेने पाठिंबा दिला होता. स्थायीतील पाठिंब्याची परतफेड म्हणून शिवसेनेला ‘परिवहन’ देण्याचा निर्णय दोन्ही काँग्रेस व शिवसेनेत झाला.

यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पाठिंब्यामुळे शिवसेनेचा सभापतिपद होणार हे निश्चित होते. सोमवारी सकाळी ११ वाजता सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा पीठासन अधिकारी राजेंद्र देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली. काँग्रेस आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या चंद्रकांत सूर्यवंशी यांनी उमेदवारी मागे घेतली. पहिल्यांदा ताराराणी आघाडीचे नगरसेवक शेखर कुसाळे यांना पाच सदस्यांनी हात उंचावून पाठिंबा दिला. यानंतर नियाज खान यांच्यासाठी मतदान झाले. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सात सदस्यांनी त्यांना पाठिंबा दिल्याने आठ विरुद्ध पाच मतांनी ते विजयी झाले.


कार्यकर्त्यांची गर्दी, मिरवणूक

परिवहन समिती सभापतिपदासाठी नियाज खान यांची निवड होणार हे निश्चित होते. निवडणूक सुरु झाल्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेत गर्दी केली. शहरप्रमुख शिवाजी जाधव, दुर्गेश लिंग्रस, सुजित चव्हाण, कमलाकर जगदाळे, शशिकांत बीडकर, हर्षल सुर्वे, अवधूत साळोखे आदीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी जल्लोषी मिरवणूक काढली.

आधी ताराराणी आघाडी, आता काँग्रेस

परिवहन समिती सभापतिपदी शिवसेनेला दुसऱ्यांदा संधी मिळाली. २००१ ते २००५ मधील सभागृहातील शिवसेनेचे नगरसेवक बाबा पार्टे यांची परिवहन सभापतिपदी निवड झाली होती. त्यावेळी ताराराणी आघाडीच्या पाठिंब्यावर सेनेला पद मिळाले होता. आता शहरातील राजकारण आणि महापालिकेतील आघाड्यांच्या वर्चस्ववादाच्या खेळीत सेना आणि काँग्रेस एकत्र आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रेमासाठी ती खऱ्या अर्थाने झाली अर्धांगिनी

$
0
0

Anuradha.kadam@timesgroup.com

Tweet:@anuradhakadamMT

‘तुझ्यावर येणाऱ्या संकटाला सामोरे जाण्यासाठी आधी मी पुढे होईन...,’ सप्तपदीमधील हे एक वचन. विवाहवेदीवर एकमेकांना साथ देण्याचे वचन​ दिले जाते आणि सुरू होतो सहजीवनाचा प्रवास. पत्नी पतीची अर्धां​गिनी म्हणून ओळखली जाते. मात्र तुझ्यावरच्या कोणत्याही संकटात मी तुझ्यासोबत राहीन आणि प्रेमाचा धागा उसवणार नाही यासाठी तुझ्यात समर्पित होईन, ही प्रेमाची परिभाषा वास्तवात आणली आहे शुक्रवार पेठेतील पद्मश्री शिराळे यांनी. दोन्ही किडनी निकामी झालेल्या पतीला आपली किडनी दान करून तिने विवाहसंस्कारातील अर्धांगिनी या शब्दाला खऱ्या अर्थाने मोल दिले आहे. प्रेमाचा दिवस साजरा होत असताना एकमेकांच्या नात्याचा बंध नितळ भावनेने गुंफणाऱ्या शिराळे दांपत्याने प्रेमाचे अनोखे दर्शन घडवले आहे.

गंगावेश परिसरात किराणा मालाचे दुकान चालवणाऱ्या भरत रसाळे आणि बेळगावच्या पद्मश्री यांचा विवाह सतरा वर्षापूर्वी झाला. शुक्रवार पेठेतील कद्रे गल्लीत शिराळे दांपत्य दोन लहान मुलांसह आनंदाने जगत असताना पाच वर्षापूर्वी भरत यांना अचानक रक्तदाबवाढीचा त्रास सुरू झाला. वजनही घटायला लागलं. पूर्णवेळ गृहिणी असलेल्या पद्मश्री यांनी भरत यांच्या उपचारासाठी अनेक डॉक्टरांचे उंबरे ​​झिजवले. किराणा दुकानावरच त्यांचा उदरनिर्वाह असल्यामुळे घराची घडी विस्कटली. उपचार सुरू असतानाच भरत यांच्या दोन्ही किडनी निकामी असल्याचे निदान झाले तेव्हा शिराळे दांपत्य खचून गेले. जेमतेम चाळीशीच्या उंबरठ्यावर असलेल्या भरत यांना हा धक्का सहन झाला नाही. डायलेसीस करण्याची प्रक्रिया सुरू झाली. मात्र भरत यांना हे उपचार सहन झाले नाहीत. दरम्यान, कुटुंबातील सदस्य किंवा जवळचे नातेवाईक यांच्या किडनीचे प्रत्यारोपण होऊ शकते, असे डॉक्टरांनी शिराळे कुटुंबीयांना सांगितले. त्यानंतर किडनीदात्याचा शोध सुरू झाला. भरत यांच्या वडीलांचे निधन झाले आहे, तर आई आजारी असतात. जेव्हा कुटुंबातील सदस्यांच्या रक्ताचे नमुने घेतले जात होते तेव्हा फक्त पत्नीचा रक्तगट भरत यांच्या रक्ताशी जुळला. अडीच वर्षांपूर्वी पुण्यातील रूबी हॉस्पिटलमध्ये पद्मश्री यांची एक किडनी भरत यांना प्रत्यारोपित करण्यात आली. शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि गेल्या अडीच वर्षांपासून हे दाम्पत्य सर्वसामान्य आणि निरोगी आयुष्य जगत आहे. अडीच अक्षरे प्रेमाची असे म्हणतात. पण, भरत आणि पद्मश्री यांच्या प्रेमाची अडीच वर्षे किडनीदानामुळे झालेल्या एकरूपतेची आहेत.

तिनेच दिला धीर

जेव्हा पत्नी पद्मश्रीच्याच किडनीचे प्रत्यारोपण करायचे हे निश्चित झाल्यानंतर भरत यांनी विरोध केला. माझ्यामुळे पत्नी अधू व्हायला नको, असे त्यांचे म्हणणे होते. मात्र पद्मश्री त्यांच्या मागे खंबीरपणे उभ्या राहिल्या. मी तुम्हाला नव्हे तर आपल्या प्रेमाला जीवदान देत आहे, असे तिने सांगितले. इतकेच नव्हे तर पूर्णपणे खचलेल्या भरत यांना आयुष्य जगण्याची उमेद दिली. आज मी जे बोनस आयुष्य जगत आहे ते पत्नी पद्मश्रीने मला दिलेली प्रेमाची सर्वोत्तम भेट आहे असे ते सांगतात.

योगायोगाने डोळे पाणावले

सध्या विवाह ठरवताना रक्तगट पाहिले जातात. मात्र १६ वर्षांपूर्वी भरत आणि पद्मश्री यांचे लग्न ठरले तेव्हा त्यांचा रक्तगट पाहिला नव्हता. इतकेच नव्हे तर गेल्या १५ वर्षांत दोघांनाही दोघांचा रक्तगट एकच आहे, याची माहिती नव्हती. भरत यांना किडनी कुणी द्यायची हा प्रश्न आला आणि पद्मश्री यासाठी तयार झाल्या तेव्हा त्यांचा रक्तगट तपासला असता तो भरत यांच्याशी जुळणारा होता. समोर जीवनमरणाचा प्रश्न उभा असताना दोघांचा रक्तगट जुळल्याच्या योगायोगाची आठवण आली की आजही शिराळे दाम्पत्याचे डोळे पाणावतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोलापुरात मुख्यमंत्र्यांविरुद्ध गाजर दाखवा आंदोलन

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । सोलापूर

सोलापूरमध्ये मराठा समाजाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात गाजर दाखवा आंदोलन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाबाबतीत केवळ आश्वासनांचे गाजर दाखवल्याने त्यांच्याविरोधात गाजर दाखवा आंदोलन करत असल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली.

सोलापूर महापालिकेच्या प्रचारासाठी सोलापुरात आलेल्या मुख्यमंत्र्यांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागलं. सोलापूर महापालिकेच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेपूर्वी मुख्यमंत्र्यांचा निषेध करण्यासाठी चार हुतात्मा चौकात मराठा समाजातील काही तरुणांनी हे आंदोलन केले. यावेळी तरुणांनी हातात गाजर दाखवून मुख्यमंत्र्याविरुद्ध संताप व्यक्त केला.

फोटो काढा आणि बाजूला बसा, या मुख्यमंत्र्यांच्या नांदेडच्या सभेतील वक्तव्याचा निषेधही आंदोलकांनी केला. नांदेडमधील मुख्यमंत्र्यांच्या सभेत घोषणाबाजी करण्यात आली होती. त्यावेळी फोटो काढा आणि बाजूला बसा, असे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केले होते. दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी राज्यातील अनेक जिल्ह्यात लाखोंचे मोर्चे मराठा समाजाने काढले आहे. परंतु मराठा समाजाला आरक्षण देण्यावरून राज्य सरकार चालढकल करीत असल्याचा आरोप मराठा संघटनांकडून केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैशाली पाटील यांचे रविवारपासून चित्रप्रदर्शन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दृश्यकला क्षेत्रात राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर गेली दोन दशकं आपल्या कलाकृतीतून स्वत:ची मोहोर उमटविण्याऱ्या येथील चित्रकार वैशाली पाटील यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन शाहू स्मारक भवनात १९ ते २५ फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. भारतीय परंपरेतील तत्वचिंतन, शैवतत्वद्नान आणि स्त्री तत्व यांची गुंफण असलेली ‘उपाख्यान’ ही चित्रमालिका या प्रदर्शनात मांडली आहे. उपाख्यान या चित्रप्रदर्शनाचे उदघाटन रविवारी (ता. १९) सकाळी ११ वाजता मधुरीमाराजे छत्रपती, प्रतिमा पाटील, नंदितादेवी घाटगे, ज्येष्ठ चित्रकार जी. एस. माजगावकर आणि चित्रकार, कलाभ्यासक श्यामकांत जाधव यांच्या उपस्थितीत होणार आहे.

प्रस्तूत प्रदर्शनात सुमारे सत्तरहून अधिक कलाकृती मांडण्यात येणार असून यामध्ये कागद आणि कॅनव्हॉसवर ड्रायपेस्टल, अॅक्रॅलिक कलर, इंक आणि चारकोलचा वापर केला आहे. पाटील यांचे कला शिक्षण बेळगाव, सांगली आणि मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून झाल्या आहेत. जी. डी. आर्ट पेंटिंग प्रथम क्षेणीत तर डिप्लोमा इन आर्ट एज्युकेशन राज्यात प्रथम श्रेणीत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यांच्या कलाकृती राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील अनेक कला महाविद्यालये, कला संग्रहालये आणि कलासंग्रहाकांकडे संग्रहीत आहेत. जर्मन, कोरिया, लंडन, फिलिपाईन्स, जपान यासारख्या देशात त्यांच्या कलाकृती पोहचल्या आहेत. पाटील सध्या यथील रा. शि. गोसावी कलानिकेतन महाविद्यालयात कलाध्यापन करीत आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कला शिक्षण अभ्यासक्रमाच्या त्या सदस्या आहेत. शिवाजी विद्यापीठाच्या बॅचलर इन व्हेकेश्नल कोर्स अंतर्गत असलेल्या ग्राफीक डिझाईन या विषयाच्या अभ्यासक्रम समन्वय समितीच्या त्या अध्यक्षा आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images