गेला महिनाभर सुट्टी घेतलेल्या पावसाने पहाटे हजेरी लावल्याने दरवर्षी सकाळी चारपासून गर्दीने फुलणारा कुंभारवाडा यावेळी पाहावयास मिळाला नाही. आठच्या सुमारास पावसाने सुट्टी घेतल्यानंतर गणेशभक्तांची धांदल सुरू झाली आणि पाहता पाहता कुंभारवाडा गर्दीने फुलून गेला.
महिलांची उपस्थिती लक्षणीय
↧
↧
सांगलीत पर्यावरणपूरक मूर्तींना मागणी
संततधार पावसात सांगली नगरीत सोमवारी गणेशाचे जल्लोषात आगमन झाले. सुमारे अडीचशे ते तीनशे स्टॉलवर गणेश मूर्ती खरेदीसाठी भाविकांची झुंबड उडाली होती. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे सांगलीकरांनी अधिक लक्ष दिल्याने यावेळी शाडूच्या मूर्तींना अधिक मागणी होती.
↧
साताऱ्यात मोरयाचा गजर
सातारा शहर व परिसरात सोमवारी सकाळी गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात घरगुती आणि सार्वजनिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. सायंकाळी पावसाने हजेरी लावली. गणेशमूर्ती खरेदीसाठी शहरातील मोती चौक, राजवाडा, पोवई नाका, सातारा-कोरेगाव रस्त्यावरील नटराज मंदीर परिसरात नागरिकांची गर्दी होती.
↧
बेळगावात उत्साहाला उधाण
गणेशचतुर्थी दिवशी सकाळपासून पावसाने हजेरी लावली. गणेशभक्तांचा उत्साह मात्र, पावसामुळे कमी झाला नाही. सकाळी शहरातील विविध भागातील मूर्तिकारांच्या चित्रशाळेत घरगुती गणेशमूर्ती नेण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती.
↧
गंभीर परिणाम भोगावे लागतील
‘मुंबई हायकोर्टाने आदेश देऊनही राज्य सहकारी बँक तासगाव-पलूस सहकारी साखर कारखाना गणपती जिल्हा संघाकडून ताब्यात घ्यायला टाळाटाळ करीत आहे, याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील,’ असा इशारा ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी पाटील यांनी दिला आहे.
↧
↧
सांगलीत दुष्काळी भागात पाऊस
परतीच्या मान्सूनने सांगली जिल्ह्यात दखलपात्र हजेरी लावली. रविवारी रात्री दहा वाजता सुरू झालेली संततधार सकाळपर्यंत कायम होती. विशेषतः जिल्ह्यातील आटपाडी, जत, कवठेमहांकाळ, तासगाव आणि खानापूर या कायम दुष्काळी आणि ऐन पावसाळा कोरडाच गेलेल्या भागांत परतीच्या मान्सूनची बरसात झाल्याने समाधानाचे वातावरण आहे.
↧
यापुढे काँग्रेस स्वबळावर लढणार
आगामी काळातील सर्व निवडणुका आघाडी वगैरे न करता काँग्रेस स्वबळावर लढवेल, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रवक्ते आणि भारतीय कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस आमदार भाई जगताप यांनी केले.
↧
आनंदोत्सव सुरू
ढोल ताशांचा गजर, मोरया, मोरयाचा जयघोष आणि भक्तीचा ओसंडून वाहणारा दरवळ अशा माहोलात सोमवारी गणरायाचे थाटामाटात स्वागत करण्यात आले. सकाळपासून सर्वत्र गणरायाच्या स्वागताची धूम होती. सुखकर्ता बाप्पाच्या आगमनाने वातावरण चैतन्याने भारले होते. संपूर्ण शहर गणरायाच्या जयजयकाराने दुमदुमले.
↧
कराडमध्ये संततधार पावसाने गणेशभक्त चिंब
‘आले रे आले गणपती आले’, ‘गणपती बाप्पा मोरया’, ‘मंगलमूर्ती मोरया’, अशा घोषणा देत, गणेशाचे सोमवारी संततधार पावसात आणि भक्तिमय वातावरणात आगमन झाले. सोमवारी दिवसभर गणेश भक्तांची लगबग दिसून येत होती. खरेदीसाठी झालेल्या गर्दीने शहरासह ग्रामीण भागांतील बाजारपेठा फुलून गेल्या होत्या.
↧
↧
बाप्पांसाठी मलई मोदक
लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी अन्य मोदकांबरोबरच मलई मोदकाला मोठी मागणी आहे. बच्चे कंपनीमध्ये चॉकलेट मोदकाला अधिक पसंती दिली जात आहे. मलई मोदक आणि विविध प्रकारच्या लाडूचा नैवेद्य बाप्पाला दाखविण्यासाठी मिठाई दुकानात गर्दी दिसत आहे.
↧
ई-लर्निंग व्हाया गणेशोत्सव
उत्सवाच्या नावाखाली एकीकडे लाखो रूपयांची उधळपट्टी होत असली तरी अनेक मंडळांनी जमा झालेली वर्गणी सामाजिक उपक्रमासाठी वापरत नवा आदर्श निर्माण केला आहे.
↧
बाप्पाचं बुवा असं आहे!
माझं आणि गणपती बाप्पाचं नातं मैत्रीचं आहे. अगदी लहानपणापासून ते तसंच आहे. माझ्या आग्रहामुळेच आमच्या घरी गणपती बसवायला सुरुवात झाली.
↧
उत्सव आणि समाजसेवा
गणेशोत्सव हा सार्वत्रिक चैतन्याचा आविष्कार प्रकटणारा उत्सव. लहानांपासून थोरांपर्यंत सर्व घटकांचा हिरीरीने सहभाग हे या उत्सवाचे वैशिष्ट्य. सार्वजनिक मंडळांकडून मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा होत असल्याने ही सामूहिक ऊर्जा समाजसेवेसाठी किंवा विधायक उपक्रमासाठी वापरली तर अनेक समस्या चुटकीसरशी सुटू शकतात.
↧
↧
समतावादी महिला मंचच्या अध्यक्षपदी पुष्पलता सकटे
महिलांना हक्काबाबत जाणीव जागृती करून देण्यासाठी दलित महासंघ प्रणित समतावादी महिला मंचची स्थापना करण्यात आली. मंचच्या अध्यक्षपदी पुष्पलता सकटे यांची सर्वांनुमते निवड केल्याची माहिती दलित महासंघाचे संस्थापक प्रा. मच्छिंद्र सकटे यांनी केली.
↧
लर्निंग लायसनच्या इमारतीचे पासिंग कधी?
आरटीओ कार्यालयातील लर्निंग लायसन्सच्या इमारतीचे पासिंग अद्याप परिवहन कार्यालयाच्या प्रतीक्षेत आहे. लर्निंगची इमारत बांधून तयार आहे. मात्र, अद्याप आयुक्तालय कार्यालयाकडून काहीच प्रतिसाद नाही.
↧
विद्यार्थ्यांची विवेक वाहिनी
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी विवेकशील महाराष्ट्राच्या आशा पल्लवीत व्हाव्यात याकरिता जे जे म्हणून कृतिशील उपक्रम महाराष्ट्राकरिता दिले त्या उपक्रमांपैकी त्यांनी प्रत्येक महाविद्यालयात विद्यार्थ्यांकरिता ‘विवेक वाहिनी’ सुरू करण्याचा जो उपक्रम केला तो केवळ अनन्यसाधारण वाटावा असाच उपक्रम आहे.
↧
प्रादेशिक सेनेत भरती चाचणी
प्रादेशिक सेनेत शिपाई जनरल ड्युटी, लिपिक, स्वयंपाकी आणि सफाईवाला या पदांसाठी १५ व १६ सप्टेंबरला चाचणी मेळावा होणार आहे. मेळावा येथील मिलिटरी प्रशिक्षण मैदानावर सकाळी सात वाजता होणार आहे.
↧
↧
संतकृपा भजनी मंडळ चेन्नईत
मंगळवार पेठेतील श्री संतकृपा भजनी मंडळ भजन सेवेच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचा वसा जोपासत आहे. भजनी मंडळाचे सर्व सदस्य सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून एकत्र आले आहेत. मंडळाने आतापर्यंत महाराष्ट्रातील विविध भागांबरोबरच कर्नाटक, गुजरातमध्ये भजनाचे कार्यक्रम केले आहेत.
↧
जरा समाजकार्याकडेही पाहा
गणेशोत्सव काळात लोकवर्गणीतून मिळणारा निधी हा लोकांसाठीच खर्च करण्याचा विधायक पायंडा काही सार्वजनिक मंडळांनी पाडला आहे. पारंपरिक पद्धतीने उत्सव साजरा करतानाच अनेक मंडळे वर्गणीची सक्ती करत नाहीत. या निधीचा विनियोगही चांगल्या पद्धतीने केला जातो.
↧
ये गं गौराबाई
गौरीसाठी लागणारी वनस्पती, तिच्या नैवेद्याला लागणारी आल्यापाल्याची भाजी, सुगडी, कुकडीसह काकडी, खारीक, बदाम, वेलदोडा, विविध वनस्पतींच्या पत्री यांच्या खरेदीसाठी मंगळवारी बाजारपेठ फुलून गेली.
↧
More Pages to Explore .....