Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

पोलिस ठाण्यांना अधिकाऱ्यांची वानवा

$
0
0

Uddhav.Godase
@timesgroup.com
Tweet : @Uddhavg_MT

कोल्हापूर शहरातील चारही पोलिस ठाण्यांमध्ये मंजूर पदांपेक्षा पोलिस उपनिरीक्षक आणि सहायक पोलिस निरीक्षकांची पदे रिक्त आहेत. गेल्या महिन्यात तत्कालीन पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी काही अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यानंतर रिक्त जागांवर अद्यापही अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या झालेल्या नाहीत. सध्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने नव्याने पदे भरण्याची शक्यताही कमी आहे, त्यामुळे तपासकामे रखडण्याची शक्यता आहे. याशिवाय वाढत्या कामांमुळे पोलिसांवर अतिरिक्त ताणही वाढत आहे.

कोल्हापूर शहरातील शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, राजारामपुरी, जुना राजवाडा आणि शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडे एकूण ४३८ पोलिस कार्यरत आहेत. यात सहायक पोलिस निरीक्षक आणि पोलिस उपनिरीक्षकांची संख्या केवळ ३० आहे. गेल्या महिन्यात तत्कालीन पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी काही पोलिस अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या केल्या. मुळातच मंजूर पदांपेक्षा अपुरे मनुष्यबळ असल्याने या बदल्यांनी पोलिस ठाण्यांतील खुर्च्या रिकाम्या पडल्या आहेत. वाढत्या चोऱ्या, आंदोलने, मोर्चे, दोन गटांतील राडे यांचे प्रमाण वाढत असतानाच पोलिसांची संख्या कमी होत असल्याने कामांचा ताण वाढला आहे. गंभीर गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी प्रशिक्षित आणि अनुभवी अधिकाऱ्यांची गरज असते. सध्या मात्र शहरातील सर्वच पोलिस ठाण्यांमध्ये तपासासाठी तज्ज्ञ अधिकाऱ्यांची वानवा आहे. यामुळे पोलिस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांपुढे पेच निर्माण झाला आहे.

शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत जिल्हाधिकारी कार्यालय आणि शासकीय विश्रामगृह असल्याने सतत मोर्चे, आंदोलने यासाठी अधिकचा बंदोबस्त गरजेचा असतो. सध्या शाहूपुरी ठाण्यात ३ सहायक पोलिस निरीक्षक आणि ३ पोलिस उपनिरीक्षक आहेत. मात्र, बंदोबस्ताच्या कामांमुळे बऱ्याचदा अधिकाऱ्यांना सलग ड्युटी करावी लागत आहे. शहरात सर्वाधिक १०२ कर्मचारी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यासाठी मंजूर आहेत. मात्र ३ अधिकाऱ्यांसह एकूण १४ कर्मचाऱ्यांची पदे गेल्या सहा महिन्यांपासून रिक्त आहेत. सहायक पोलिस निरीक्षकांचे पद सध्या रिक्त असल्याने तपास कामे खोळंबली आहेत. जुना राजवाडा पोलिस ठाण्यात ५ पोलिस अधिकारी आहेत, मात्र, २ अधिकाऱ्यांची बदली झाल्यानंतर ही पदे रिक्त आहेत. राजारामपुरी पोलिस ठाण्यातही फार वेगळी स्थिती नाही. शहर वाहतूक नियंत्रण शाखा तर मंजूर पदांच्या केवळ ६० टक्के पदांवरच शहराच्या वाहतुकीला शिस्त लावण्याचा प्रयत्न करते. ही स्थिती कायम राहिल्यास गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यात पोलिसांना अडचणी येणार आहेत, त्याचबरोबर गुन्ह्यांचा तपासही रखडणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​मतदान केंद्राबाहेरप्रसिद्ध होणार उमेदवारांची माहिती

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर

‘राज्यातील महापालिका निवडणुकीत यंदा प्रथमच निवडणूक आयोगाकडून सर्व उमेदवारांची माहिती प्रसिद्धी केली जाणार आहे. महापालिका निवडणुकीत उभ्या असलेल्या सर्व उमेदवारांची माहिती वर्तमान पत्रात जाहिरातीच्या स्वरूपात दिली जाणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार उमेदवारांची सर्व माहिती मतदारांना मिळणे आवश्यक असल्याने हे पाऊल यंदा प्रथमच उचलण्यात आले आहे,’ अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी दिली. विठ्ठलाच्या दर्शनासाठी ते पंढरपूरमध्ये आले होते. या वेळी अप्पर पोलिस महासंचालक बिष्णोई, निवडणूक आयोगाचे सचिव शेखर, सोलापूरचे जिल्हाधिकारी रणजित कुमार यावेळी उपस्थित होते.

सहारिया म्हणाले, ‘उमेदवारांनी निवडणूक अर्जात जी माहिती दिली आहे, त्याचा गोषवारा वर्तमान पत्रातून प्रसिद्धीस दिला जाणार आहे. याचबरोबर सर्व मतदान केंद्राबाहेर दर्शनी भागावर त्या-त्या प्रभागातील सर्व उमेदवारांची माहिती मोठ्या फ्लेक्सवर लावण्यात येणार असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त सहारिया यांनी सांगितले. या निवडणुकीत पहिल्यांदाच सर्व महापालिका क्षेत्र आणि जिल्हा परिषद गट आणि गणामध्ये २४ तास नियंत्रण कक्ष सुरुवात करण्यात आला आहे. आचारसंहिता भंग अथवा कोणतेही निर्णय या कक्षातून तत्काळ देत कारवाई केली जाणार असल्याचेही सहारिया यांनी सांगितले.’

सहारिया उवाच

पिंपरी-चिंचवडमध्ये संमोहनाच्या मदतीने मतदारांना प्रभावित करण्यात आल्याची बातमी प्रसिद्ध झाली आहे. आयोग या प्रकरणाची तत्काळ चौकशी करणार आहे.

नाशिकमध्ये तिकीट वाटपात पैसे घेतल्याच्या आरोपांबाबत संबंधित उमेदवाराने तक्रार दिल्यास त्या प्रकरणाची चौकशी करू.

राज्यातील २२० पक्षांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रंकाळा रस्त्यावरील पार्किंग हटेना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिका प्रशासन आणि स्थानिक नगरसेवकांनी मोठा गाजावाजा करत, रंकाळा टॉवर ते क्रशर चौकापर्यंतच्या रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात केली. महापालिकेच्या निधीतून तब्बल २ कोटी ९० लाख रुपये दुरुस्तीवर खर्च झाले. मात्र, प्रशासनाच्या सावळ्या गोंधळामुळे रंकाळा टॉवर ते पद्माराजे उद्यानपर्यंतचा तयार रस्ता वापराविना पडून आहे. परिसरातील नागरिकांनी या रस्त्याला पार्किंगचा अड्डा बनविला आहे. या मार्गावरील दुभाजकही वादग्रस्त ठरला आहे. नागरिकांनी रस्ता अडवूनही महापालिकेचे अधिकारी सुस्तच आहेत.

क्रशर चौक ते टॉवर या मार्गावरून एकेरी वाहतूक सुरू असल्याने नागरिकांना वाहने चालविताना कसरत करावी लागत आहे. रंकाळा टॉवर, खराडे कॉलेज ते पद्माराजे गार्डनपर्यंतच्य रस्त्यावर नागरिकांनी अतिक्रमण केल्यासारखी स्थिती आहे. चारचाकी वाहने, रिक्षा, खासगी बस तेथेच लावली जातात. काही नागरिकांनी रस्त्यावरच जनावरे बांधली आहेत. त्यामुळे रस्ता तयार असूनही त्याचा वाहतुकीसाठी उपयोग होत नाही. रंकाळा टॉवर ते क्रशर चौक रस्त्याच्या दुरुस्तीसाठी नागरिकांनी अनेक आंदोलने केली. त्यानंतर महापालिकेने स्वनिधीतून हा रस्ता तयार केला. यात रस्त्यात बाधित होणाऱ्या घरांवरून वाद निर्माण झाला. सुमारे ३५ घरे रस्त्याला लागून आहेत.


दुभाजक हटविण्यावरुन वाद

खराडे कॉलेज आणि पद्माराजे गार्डनसमोरील रस्त्यावरील दुभाजकावरून मतप्रवाह आहेत. दुभाजक हटवून रस्त्याचे रुंदीकरण करावे अशी काहीजणांची मागणी आहे. तर काहीजण दुभाजक न हटविता मूळ आराखड्यानुसार रस्ता तयार व्हावा यासाठी आग्रही आहेत. दोन्ही गटांतील वादामुळे रस्त्याचे काम रखडले आहे. पद्माराजे गार्डनसमोरील रस्त्यावर डांबराचा आणखी एक लेअर टाकण्यात आला. रस्त्यावरून दोन गटांत वाद निर्माण झाल्याने ठेकेदाराने काम बंद ठेवले आहे. काम बंद असल्याने महापालिकेने ठेकेदाराचे बिल अडविले आहे.

यात्री निवासचे पार्किंग रस्त्यावर

ताराबाई रोडवर मोठ्या संख्येने यात्री​ निवास सुरू झाली आहेत. यात्री निवास सुरू करताना अनेकांनी पार्किंगचा विचार केलेला नाही. बहुतांश यात्री निवासांच्या ठिकाणी पार्किंगची सोय नाही. खासगी बस, वाहने रंकाळा टॉवर ते खराडे कॉलेज रस्त्यावर लावली जातात. त्यामुळे हा रस्ता म्हणजे पार्किंग अड्डाच बनतो.


हा रस्ता वाहतुकीला खुला करण्यासाठी प्रयत्नशील आहे. शहर वाहतूक शाखेला रस्त्यावरील वाहने हटवण्यासंदर्भात पत्र दिले आहे. रोडवरील विद्युत पोल, डीपी अन्यत्र बसवावेत यासाठी वीज वितरण कंपनीबरोबर पत्रव्यवहार केला आहे. दुभाजकावरुन वाद निर्माण झाल्याने संबंधितांची महापलिकेत बैठक घेऊन त्यावर तोडगा काढू.

रमेश मस्कर, उपशहर अभियंता, गांधी मैदान विभागीय कार्यालय

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहतूक कोंडीसाठी स्थानिक वाहने कारणीभूत

$
0
0

Uddhav.Godase@timesgroup.com

Tweet @Uddhavg_MT

कोल्हापूर ः शहरातील वाहतूक कोंडीसाठी स्थानिक नागरिकांचीच वाहने कारणीभूत असल्याचे वास्तव पाहणीतून पुढे आले आहे. पार्किंगच्या जागेत ऑफिस, दुकाने आणि गोडाऊन्स थाटल्याने शहरातील ८० टक्के वाहने रस्त्यातच उभी असतात. शिवाय रस्त्यांच्या तुलनेत वाहनांची संख्या प्रमाणापेक्षा वाढल्याचे सर्व्हेतून स्पष्ट झाले आहे. वाहतूक सर्व्हेतून जमा झालेल्या माहितीचा अहवाल दोन महिन्यांनी पोलिस प्रशासनाला मिळणार आहे. यानंतर उपाययोजनांची अंमलबजावणी होणार आहे. पुण्यातील कॉलेज ऑफ इंजीनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी कोल्हापुरातील वाहतूक कोंडीबाबत सर्व्हे नुकताच पूर्ण केला.

कोल्हापूर शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीचा शास्त्रशुद्ध अभ्यास करण्यासाठी विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी पुण्यातील कॉलेज ऑफ इंजीनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना बोलवले होते. टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटच्या विद्यार्थ्यांनी शहरातील अंबाबाई मंदिराच्या आसपास दीड किलोमीटर अंतरातील रस्ते, वाहनांची संख्या, प्रकार, दुकाने, फेरीवाले, पार्किंग, रिक्षा आणि केएमटीचे थांबे, भाविकांची संख्या यांची पाहणी केली. आठ दिवसांच्या पाहणीत महत्त्वाची आकडेवारी उपलब्ध झाली आहे. या आकडेवारीचा शास्त्रशुद्ध अभ्यास करून वाहतूक कोंडीची कारणे आणि यावरील उपाय सुचवले जाणार आहेत.

शहरात रस्ते विकास प्रकल्पांतर्गत काही रस्ते प्रशस्त झाले, मात्र अंबाबाई मंदिर परिसरातील एकाही रस्त्याचे रुंदीकरण झाले नाही. याउलट रस्त्यांवरील दुकाने आणि फेरीवालेही वाढले. मंदिराच्या आसपास राहणाऱ्या नागरिकांनी वाहन पार्किंगसाठी स्वतंत्र सोय केलेली नाही. अपार्टमेंटमध्ये पार्किंगसाठी राखून ठेवलेल्या जागेत ऑफिस, दुकाने आणि गोडाउन्स थाटली आहे. बहुतांश घरांचीही अशीच स्थिती आहे. घरांपुढे पार्किंगसाठी जागा नसल्याने थेट रस्त्यातच वाहने पार्क केली जातात. पाहणीनुसार या परिसरातील प्रत्येक घरात एक ते दोन चारचाकी आणि दोन ते तीन दुचाकी वाहने आहेत. फार कमी वेळा ही वाहने जागेवरून हलवली जातात. सतत रस्त्यांवर उभ्या असलेल्या वाहनांमुळे रस्त्यावरील वाहतुकीत मोठा अडथळा होत आहे. विशेष म्हणजे परिसरात नव्याने बांधकाम सुरू असलेली अपार्टमेंट्स आणि घरांमध्येही पार्किंगसाठी जागा सोडलेली नाही.

शहरात नागरिकांच्या संख्येपेक्षा अधिक वाहनांची संख्या आहे. त्याचबरोबर नागरिकांकडून खासगी वाहनांचा अधिक वापर होत असल्याचे पाहणीत जाणवले. मंदिराच्या आसपासच्या मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असली तरी, रस्ते मात्र अरुंद आणि अतिक्रमणांनी व्यापले आहेत. दुकानांचे फुटपाथवर, फेरीवाल्यांचे रस्त्यांवर आणि त्याहीपुढे पादचाऱ्यांचे अतिक्रमण आहे. काही दुकानधारकांनीच फेरीवाल्यांना दुकानासमोरील सरकारी जागा भाड्याने दिली आहे. फेरीवाल्यांचे योग्य नियोजन नसल्याने जागा मिळेत तिथे आणि त्यांच्या मर्जीने ते व्यवसाय सुरू ठेवतात. रस्त्यांवर प्रमाणापेक्षा जास्त गर्दी असल्याने वाहनधारकांना अक्षरशः कसरत करीतच वाहने चालवावी लागतात. भवानी मंडपातील दुचाकी पार्किंगमध्ये परिसरात खरेदी करण्यासाठी आलेल्या नागरिकांची वाहने असतात. बिंदू चौकातील चारकाची पार्किंगमध्ये भाविकांची वाहने असतात. मात्र पार्किंगस्थळी जाण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी एकाच मार्गाचा वापर होत असल्याने बिंदू चौकात कोंडी होते.


स्वयंशिस्तीचा अभाव

शहरातील वाहनधारकांत स्वयंशिस्तीचा अभाव असल्याचे वाहतूक पाहणीत निदर्शनास आले. झेब्रा क्रॉसिंगवर वाहने थांबवणे, वन वेचे उल्लंघन करणे, ट्रॅफिक सिग्नलला रस्त्याच्या डाव्या बाजूलाही थांबणे, पार्किंगचे नियम मोडणे अशा चुका वाहनधारकांकडून होत आहेत. याबाबत वाहनधारकांत गांभीर्याचा अभाव असल्याचे विद्यार्थ्यांचे निरीक्षण आहे.


अरूंद रस्ते आणि पार्किंगच्या अभावाने वाहतूक कोंडी होत असली तरीही, योग्य उपाययोजनांनी ही कोंडी फोडता येते. सर्व्हे पूर्ण झाला असून, महिन्याभरात नागरिकांचीही मते आजमावली जातील. यानंतर उपाययोजनांचा अहवाल सादर केला जाईल.

प्रा. राहुल शुक्ला, पुणे इंजीनिअरिंग कॉलेज


पुण्यातील विद्यार्थ्यांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने वाहतूक कोंडीचा अभ्यास केला आहे. दीड महिन्यात अहवाल येणे अपेक्षित आहे. यानंतर सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांनी शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला जाईल.

अशोक धुमाळ, वाहतूक पोलिस निरीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तावडे, समीर जेलमध्येच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येतील संशयित आरोपी समीर विष्णू गायकवाड आणि डॉ. वीरेंद्र तावडे या दोघांनाही सुनावणीसाठी हजर करण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमुळे पुरेसा पोलिस बंदोबस्त उपलब्ध नसल्याचे कारण देत पोलिसांनी पुन्हा एकदा संशयितांना कोर्टात हजर करणे टाळले. पुढील सुनावणीसाठी संशयितांना हजर करा अन्यथा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घेण्यात येईल, असा आदेश न्यायाधीश एल. डी. बिले यांनी सोमवारी झालेल्या सुनावणीत दिला. पुढील सुनावणी २८ फेब्रुवारीला होणार आहे.

मागील सुनावणीदरम्यान न्यायाधीश एल. डी. बिले यांनी दोन्ही संशयितांना कोर्टात हजर करण्याच आदेश दिले होते, मात्र सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान पोलिस संशयितांना कोर्टात हजर करू शकले नाहीत. ‘जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमुळे पुरेसा पोलिस बंदोबस्त उपलब्ध नसल्याचे कारण देत संशयित आरोपी डॉ. तावडे आणि गायकवाड या दोघांनाही कोर्टात हजर करता आले नाही. तावडे सीबीआयच्या कोठडीत पुण्यातील येरवडा जेलमध्ये आहेत, तर समीर कळंबा जेलमध्ये आहे. या दोघांनाही एकाच वेळी कोर्टात हजर करण्यासाठी मोठ्या पोलिस बंदोबस्ताची गरज आहे. सुरक्षेच्या कारणास्तव दोघांनाही हजर करता आले नाही’, अशी माहिती सरकारी वकील शिवाजीराव राणे यांनी कोर्टात दिली. यावर ‘पुढील तारखेला दोन्ही संशयितांना कोर्टात हजर करा. संशयितांना कोर्टात हजर करता येत नसेल तर, आठ दिवस आधी कोर्टाला कळवा. संशयित हजर नसल्यास खटल्याचे कमकाज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे चालवले जाईल.’ असे आदेश न्यायाधीश बिले यांनी कारागृह अधीक्षक शरद शेळके आणि पोलिसांना दिले.

दरम्यान, संशयित आरोपी समीर विष्णू गायकवाड याने कळंबा कारागृहात सनातन संस्थेची अगरबत्ती, गोमूत्र आणि जपमाळ मिळावी, अशी मागणी अर्जाद्वारे कोर्टाकडे केली होती. यावर सरकारी वकील अॅड. शिवाजीराव राणे यांनी आक्षेप घेतला. ‘सनातनच्या तीर्थातून गुंगी आणणारे पदार्थ दिले जातात, अशी माहिती पनवेल येथील आश्रमातून जप्त केलेल्या वस्तूंमधून मिळाली आहे, त्यामुळे समीरला दिले जाणारे गोमूत्र आणि अगरबत्तीचे रासायनिक पृथक्करण केल्याशिवाय दिले जाऊ नये’, अशी विनंती अॅड. राणे यांनी केली. याशिवाय कळंबा कारागृहाचे अधीक्षक शरद शेळके यांनीदेखील कारागृहातील संशयितास बाहेरील वस्तू देता येत नसल्याची माहिती कोर्टास दिली. ते म्हणाले, ‘कारागृहाच्या नियमावलीनुसार कारागृहाच्या कँटीनमधील वस्तूच खरेदी करण्याचे बंधन कैद्यांवर असते. काचेच्या बाटलीचा वापर कैद्यांकडून एकमेकांना जखमी करण्यासाठी होऊ शकतो, त्यामुळे अशी बाटली किंवा वस्तू देता येत नाही. सनातन प्रभातचा अंकही देता येत नाही’, असे अधीक्षक शेळके यांनी स्पष्ट केले. यावर न्यायधीश बिले यांनी स्वतः वस्तूंची खात्री करून समीरला कारागृहात केवळ जपमाळ पुरवण्यास परवानगी दिली. गोमूत्र आणि अगरबत्ती देण्यास मात्र त्यांनी स्पष्ट नकार दिला. आरोपीच्या वतीने अॅड. समीर पटवर्धन यांनी काम पाहिले. त्यांनी पुढील कामकाजासाठी कॉम्रेड पानसरे यांची बँक खात्यांची डिटेल्स आणि पत्रव्यवहारासंबंधी माहिती मिळण्यासाठी कोर्टात अर्ज करणार असल्याचे सांगितले.

हायकोर्टात आज सुनावणी

संशयित समीर गायकवाड आणि डॉ. वीरेंद्र तावडे या दोघांवर आरोपपत्र दाखल करण्याची घाई होऊ नये, यासाठी पानसरे कुटुंबीयांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर मंगळवारी (ता. ७) सुनावणी होणार आहे. हायकोर्टातील सुनावणीवरच जिल्हा सत्र न्यायालयातील पुढील कामकाज अवलंबून असल्याने याकडे पोलिसांसह पानसरे कुटुंबीयांच्याही नजरा लागल्या आहेत.

तपास अहवाल सादर

हायकोर्टाच्या आदेशानुसार तपास अधिकारी सुहेल शर्मा यांनी कॉम्रेड पानसरे हत्येप्रकरणी आजवर झालेल्या तपासाची माहिती बंद लखोट्यातून कोर्टाकडे सादर केली. यापुढील तपासाबाबतही पोलिसांनी सविस्तर अहवाल दिला असून, ही माहिती गोपनीय ठेवण्यात आली आहे.

पतंजली चालते, सनातन नाही

कारागृह अधीक्षक शरद शेळके यांनी कैद्यांना कारागृहात पुरवल्या जणाऱ्या वस्तूंची यादी कोर्टात सादर केली. यात भारतवासी, संस्कृती, सोनाचांदी, सायकल आणि पतंजली या अगरबत्ती कैद्यास देण्यास परवानगी आहे, मात्र सनातनच्या अगरबत्तीचा कुठेच उल्लेख नाही. याशिवाय गोमूत्रही देण्याबाबतही काही उल्लेख नसल्याने कारागृहाच्या नियमानुसार सनातनच्या वस्तू देता येणार नाहीत, असे सरकारी वकिलांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमआयएमचा शहरअध्यक्ष ताब्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

एमआयएम पक्षाच्यावतीने शहरात विनापरवाना मोटारसायकल रॅली काढण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एमआयएम पक्षाचा शहराध्यक्ष शाहीद शहानवाज शेख (वय ३०, रा. रविवार पेठ, कोल्हापूर) याला जुना राजवाडा पोलिसांनी सोमवारी ताब्यात घेतले. त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करणात आली असून, या घटनेमुळे सोमवारी (ता. ६) सकाळी बिंदू चौकात तणाव निर्माण झाला होता.

याबाबत जुना राजवाडा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शिरोळ तालुक्यातील गौरवाड पंचायत समिती गणासाठी एमआयएम पक्षाच्यावतीने अस्लम मुल्ला यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सोमवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास कोल्हापूरमधून मोटारसायकल रॅलीने काही तरुण गौरवाडला जाणार होते. गौरवाडला जाण्यासाठी शाहीद शेख व त्याचे कार्यकर्ते बिंदू चौक येथे जमले होते. मात्र, बिंदू चौकामधून रॅली काढण्यासाठी जुना राजवाडा पोलिस ठाण्यातून परवानगी घेतली नव्हती. एमआयएमने मोटारसायकल रॅलीचे आयोजन केल्याची माहिती जुना राजवाडा पोलिसांना मिळताच पोलिस निरीक्षक अनिल देशमुख पोलिस फौजफाट्यासह बिंदू चौकात दाखल झाले. यानंतर लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक तानाजी सावंत हेदेखील बिंदू चौकात पोहोचले. पोलिसांनी चौकशी करून एमआयएमचा शहराध्यक्ष शाहीद शेख याला ताब्यात घेतले. प्रतिबंधात्मक कारवाई करून त्याला सोडून देण्यात आले. विनापरवाना रॅली रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस फौजफाटा बिंदू चौकात दाखल झाला होता. याचवेळी परिसरातील तरुणही मोठ्या संखेने जमा झाल्याने परिसरात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती.

कडक कारवाईची मागणी

एमआयएम पक्षाची मोटारसायकल रॅली निघणार असल्याची माहिती मिळताच शहरातील काही मुस्लिम संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी बिंदू चौकात गर्दी केली. जातीयवाद पसरवणाऱ्या पक्षांच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी कडक कारवाई करावी, असा आग्रह त्यांनी पोलिसांकडे धरला. शाहू महराजांच्या नगरीत अशा प्रकारची रॅली सामाजिक स्वस्थ्य बिघडवणारी असल्याने यावर त्यांनी आक्षेप घेतला. यावेळी मुस्लिम बोर्डिंगचे गणी आजरेकर, राष्ट्रवादीचे आदिल फरास, शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे फिरोज खान, नगरसेवक नियाज खान आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दक्षिणमध्ये काँग्रेस-भाजपातच लढत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दक्षिण विधानसभा मतदार संघातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये राष्ट्रीय काँग्रेस व भाजपकडून सर्वाधिक उमेदावारांनी अर्ज दाखल झाल्याने या मतदारसंघात काँग्रेसविरुद्ध भाजप अशीच लढत होणार आहे. दोन्ही पक्षांनी तूल्यबळ उमेदवारांना उमेदवारी दिली आहे. उजळाईवाडी जिल्हा परिषद मतदारसंघाचा अपवाद वगळता इतर मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना वालीच राहिलेला नाही. त्यामुळे गेल्या दोन-तीन वर्षांपासून निवडणुकीच्या तयारीत असलेले कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत. भाजपमध्ये अर्ज दाखल केल्यानंतरही उमेदवारीबाबतच घोळ मिटत नसल्याने अनेक कार्यकर्त्यांची रात्री उशीरापर्यंत उत्सुकता ताणली होती.

दक्षिण विधानसभेची लिटमस टेस्ट म्हणून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीकडे पाहिले जात आहे. त्यामुळे विद्यमान आमदार अमल महाडिक आणि आमदार सतेज पाटील यांनी सक्षम उमेदवारांच्या माध्यमातून एकमेंकासमोर आव्हान उभे केले आहे. त्यामुळे सर्वच मतदारसंघात चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. काँग्रेस, भाजप बरोबरच आरपीआय, ब्लॅक पँथरने अनेक मतदारसंघात उमेदवारी दाखल केली आहे. मात्र या मतदारसंघात राष्ट्रवादी आणि शिवसेनेची दयनीय अवस्था झाली आहे. शिवसेनेने येथे दोन जिल्हा परिषद तर राष्ट्रवादीने केवळ एकाच ठिकाणी उमेदवारी दिली आहे. सेनेने मात्र पंचायत समतितीच्या ११ पैकी आठ ठिकाणी उमेदवारी जाहीर केली आहे.

दक्षिणेतील सर्वात संवदेशील म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषदेच्या पाचगाव मतदारसंघात काँग्रेसच्या स्वाती व्हटकर व भाजपच्या सुरेखा सातपुते यांच्यामध्ये लढत होणार आहे. या ठिकाणी अपक्षांनीही आपली उमेदवारी दाखल केली असली, तरी दोन्ही महिलामध्ये आरपारची लढाई होणार आहे. उचगाव मतदारसंघात काँग्रेसचे सतीश भोसले भाजपचे महेश चौगले, शिवसेनेचे अमोल पोवार यांच्याबरोबर आरपीआयचे सतीश कांबळे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे येथे चौरंगी लढत होणार आहे. दक्षिण मतदारसंघात सर्वात लक्षवेधी निवडणूक उजळाईवाडी मतदारसंघात होणार आहे. सर्वसाधारण महिला गटासाठी आरक्षीत असलेल्या मतदारसंघात काँग्रेसकडून जिल्हा परिषदेचे विद्यमान उपाध्यक्ष शशिकांत खोत यांच्या पत्नी सरिता खोत आणि करवीर तालुकाध्यक्ष वसंत पाटील यांच्या कन्या आरती यादव आणि पंचायत समितीच्या विद्यमान सदस्या अरुणिमा माने निवडणूक लढवत आहेत. माने यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी दाखल केली आहे.

निगवे खालसा मतदारसंघातून भाजपच्या संध्याराणी बेडगे व काँग्रेसच्या मनीषा बोटे यांच्यात टक्कर होणार आहे. या मतदारसंघात शेतकरी संघटनेची असलेली मते निर्णायक ठरणार आहे. तर मुंडशिंगी मतदारसंघात चौरंगी लढत होणार आहे. काँग्रेसच्या वंदना विजय पाटील, ‘स्वाभामिनी’च्या वैशाली सचिन चौगले, भाजपच्या रुपाली तानाजी पाटील व शिवसेनेच्या अश्विनी वळीवडे यांच्यामध्ये होणार आहे. या मतदारसंघात स्वाभिमानी संघटना आणि जैन समाजाच्या मतांना विचार करुनच पंचयात समितीचे उमेदवार निश्चित केल्याने या मतदारसंघात अत्यंत चुरशीची लढत होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

एबी फॉर्मचा घोळ मिटेना

दक्षिण मतदारसंघातील अपवाद वगळता राष्ट्रीय काँग्रेसने सर्वच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या उमेदवारांची नावे जाहीर करून एबी फॉर्मही दिले होते. त्यामुळे बहुतांशी उमेदवारांनी शक्तीप्रदर्शनाने अर्ज दाखल केले. पण भाजपमधील तिकीट वाटपाचा घोळ दुपारपर्यंत न मिटल्याने अनेक मतदारसंघातील सर्वच इच्छुक उमेदवारांनी भाजपचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केले. नेत्यांचा आदेश असल्याचे सर्वच इच्छुक सांगत असल्याने नेमका एबी फॉर्म कोणाला दिला आहे, याची माहिती कोणाला समजत नव्हती. त्यामुळे रात्री उशारापर्यंत उमेदवारीबाबतचा घोळ सुरू होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूर शहराभोवतीचा रिंगरोड निश्चित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर शहराभोवतीचा रिंगरोड (बाह्यवळण) तयार करण्यावर मार्ग सोमवारी मोकळा झाला. रिंगरोडमधील ६९ किलोमीटरचे अंतर जिल्ह्यातून राज्यमार्गाकडे वर्ग करण्यात आले आहे. रस्ते विकास योजना २००१-२१ मध्ये हा मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाने ‌अधिकृतरित्या वर्ग केला. हा मार्ग निश्चित करण्याबाबतचा आदेश सरकारचे अवर सचिव प्रशांत पाटील यांनी काढला आहे. त्यामध्ये रिंगरोड कुठून जाणार हेही स्पष्ट केले आहे.

गगनबावडा, गारगोटी, राधानगरी, रत्नागिरीकडे पुणे, मुंबई, बेळगाव, सांगलीहून जाणारी वाहने कोल्हापूर शहरातून जातात. कोकणातून पुणे, मुंबई, बेळगावकडे जाणारी वाहनेही शहरातून जातात. परिणामी शहरात रोज वाहतूक कोंडी होते. अपघाताच्या घटना घडतात. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरून कोल्हापूरला रिंगरोड तयार करावा, अशी अनेक वर्षापासूनची मागणी होती. पण, रिंगरोड कुठून न्यायचा, याबाबत मतभिन्नता होती. त्यामुळे रिंगरोडचा प्रस्ताव रेंगाळत राहिला होता. आता हा प्रश्न मार्गी लागणार आहे.


असा जाणार रिंगरोड

राष्ट्रीय महामार्ग पेट्रोल पंप, कणेरी, ‌गिरगाव, नंदवाळ, वाशी, महे, कोगे, कुडीत्रे कारखाना, वाकरे फाटा, खुपीरे, यवलूज, वरणगे, केर्ली, निगवे, टोप, नागाव, मौजे वडगाव, हेर्ले, रूकडी फाटा, बंधारा, चिंचवाड, वसगडे, सांगवडे, हलसवडे, विकासवाडी ते राष्ट्रीय महामार्ग पेट्रोलपंप.


राज्यमार्गकडे कोल्हापूर रिंगरोड वर्ग करण्यात आला आहे. मार्गही निश्चित झाला आहे. त्यामुळे रिंगरोडच्या कामाला सुरूवात होईल.

चंद्रकांत पाटील, पालकमंत्री


२८ रस्त्यांचा सामावेश

चोवीस गावांतून जाणाऱ्या रिंगरोडमध्ये २८ लहान रस्ते आहेत. त्यांचाही समावेश राज्यमार्गांत करण्यात आला आहे. परिणामी एकूण जिल्हा मार्गाच्या लांबीतही घट झाली आहे. मार्ग निश्चित झाल्यामुळे रिंगडरोडमधील प्रा‌थमिक अडचण दूर झाली आहे. निधीची तरतूद झाल्यानंतर भूसंपादन आणि प्रत्यक्ष कामास प्रारंभ होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


घराणेशाहीत कार्यकर्त्यांचा बळी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘मी नाही तर माझ्या घरातील कुणीही’ या नेत्यांच्या वृत्तीमुळे जिल्हा परिषद निवडणुकीत नेत्यांचे वारसदार रिंगणात उतरले आहेत. यातील बहूतेक सर्वच वारसदार अध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याने यामुळे निवडणुकीत रंग येणार आहे. सर्वच पक्षानी घराणेशाहीचा कित्ता गिरवल्याने सामान्य कार्यकर्त्यामध्ये ‘आम्हाला संधी कधी?’ या प्रश्नाने नाराजी निर्माण झाली आहे. अध्यक्षपद खुले झाल्याने सुरक्षित मतदारसंघात नेत्यांनी आपल्या वारसदारांना घुसवून कार्यकर्त्यांचा बळी दिला आहे.

जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद यावेळी खुले आहे. यामुळे या पदासाठी इच्छुकांची संख्या वाढली आहे. महत्त्वाचे पद आपल्याच घरात रहावे यासाठी यंदा नेत्यांनी देखील फिल्ड‌िंग लावली आहे. त्याचाच एक भाग म्हणून अनेकांची उमेदवारी देताना आपल्याच घरातील व्यक्तीची निवड केली आहे. यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर आहे. शिवसेना आणि भाजपने देखील या दोन्ही पक्षाच्या पावलावर पाऊल ठेवत घरातील वारसदारांना उमेदवारी दिली आहे. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पी. एन. पाटील, माजी मंत्री जयवंतराव आवळे, प्रकाश आवाडे, प्रा. संजय मंडलिक, मानसिंग गायकवाड, संजय घाटगे यांच्यासह अनेक नेत्यांचा यामध्ये समावेश आहे. या सर्वांनी आपल्या मुलांची नावे पुढे कली आहेत. जिथे मतदारासंघ महिलांसाठी राखीव आहे, तेथे अनेकांनी सुनेचा अर्ज दाखल केला आहे. यामध्ये माजी खासदार निवेदिता माने, माजी आमदार महादेवराव महाडिक, भरमू सुबराव पाटील यांचा समावेश आहे.

आमदार चंद्रदीप नरके यांनी प्रथमच त्यांचे बंधू अजित नरके प्रथमच जिल्हा परिषदेच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांचे चुलत बंधू आणि अरुण नरके यांचे चिरंजीव संदीप नरकेदेखील यावेळी नशीब आ​​जमवत आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीत दोन वेळा निवडून आलेल्या धैर्यशील माने यांना आरक्षणामुळे लढायला मतदारसंघच राहिला नाही. त्यामुळे रूकडी मतदारसंघातून त्यांच्या पत्नी वेदांतिका माने यांनी अर्ज दाखल केला आहे. जयवंतराव आवळे यांचे चिरंजीव राजूबाबा आवळे देखील जिल्हा परिषदेवर जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत. कागल तालुक्यातील दोन नेत्यांचे वारसदार जिल्हा परिषदेत येण्याची शक्यता आहे. त्यासाठी अंबरिष घाटगे व वीरेंद्र मंडलिक यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे.

यावेळी प्रथमच युवक मोठ्या प्रमाणात जिल्हा परिषदेच्या रिंगणात उतरले आहेत. सत्ता कुणाचीही आली तरी अध्यक्षपद आपल्याच घरात रहावे, यासाठी नेत्यांनी फिल्ड‌िंग लावली आहे. यावेळी सत्ता कोणत्याही एका पक्षाची येण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे निकालानंतर आघड्यांचे पेव फुटणार आहे. यामध्ये देखील अध्यक्षपद आपल्याकडेच रहावे यासाठी प्रयत्न होण्याची शक्यता आहे. ज्योती पाटील व महेश पाटील यांना पाच वर्षांचा अनुभव आहे. इतर सारे प्रथमच निवडणुकीला सामोरे जात आहेत. पण यातील अनेकांना अध्यक्षपदाची स्वप्ने पडत असल्याने उमेदवारी मिळण्यापूर्वीच यातील अनेकांनी प्रचाराला सुरुवात केली आहे.

विविध मतदारसंघात नेत्यांचे वारसदार

रेंदाळ: राहुल आवाडे: प्रकाश आवाडे यांचा मुलगा

परिते: राजेश पाटील : पी.एन. पाटील यांचा मुलगा

बोरवडे: विरेंद्र मंडलिक : प्रा. संजय मंडलिक यांचा मुलगा

सिद्धनेर्ली: अंबरिष घाटगे : संजय घाटगे यांचा मुलगा

शिरोली: शौमिका महाडिक : .महादेवराव महाडिक यांची सून

तुर्केवाडी : महेश पाटील: नरसिंग गुरुनाथ यांचा मुलगा

तुडये: : ज्योती पाटील : भरमू पाटील यांची सून

रुकडी: वेदांतिका माने: निवेदिता माने यांची सून

कोतोली: अजित नरके: चद्रदीप नरके यांचे बंधू

कळे: संदीप नरके: अरुण नरके यांचा मुलगा

​पोर्ले: प्रियांका पाटील: बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांची पुतणी

आकुर्डे: देसाई : बजरंग देसाई यांची सून

नेसरी: संग्राम कुपेकर: बाबासाहेब कुपेकर यांचा पुतण्या

पणुत्रे: रणवीर गायकवाड: मानसिंग गायकवाड यांचा मुलगा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलीचे लग्न मोडण्याची धमकी; आईची आत्महत्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली

मुलीचे तिसऱ्यांदा लग्न मोडण्याची धमकी दिल्याने शोभा सुरेश पाटील-नागावे (वय ४५) या महिलेने विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. हा प्रकार पलूस तालुक्यातील खटाव येथे घडला. धमकी देणारा तरुण ऐतवडे गावचा रहिवाशी असल्याचे समोर आल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.

पलूस तालुक्यातील खटाव येथे पती निधनानंतर एक मुलगा आणि एक मुलगी, सासूबाई यांच्या सोबतीने शोभा पाटील या संसाराचा गाडा हाकत होत्या. त्यांना ऐतवडे येथील राहुल पाटील नावाचा तरुण सतत फोनवरुन धमकी देत होता. या संदर्भात त्यांनी या पूर्वी पोलिसांत तक्रारही केली होती. त्यावेळी त्याने पुन्हा असा प्रकार करणार नाही, असे लिहून दिले होते. अगोदर दोन वेळा त्याने मुलीच्या लग्नात खोडा घातला होता. नातेवाईकांनी पुन्हा प्रयत्न करून त्या मुलीचे लग्न करण्याचे निश्चित केले. या बाबत माहिती मिळताच रविवारी पुन्हा त्या तरुणाने फोनवरुन शोभा पाटील यांना धमकी दिली. तो वारंवार धमक्या देत असल्याने तणावाखाली असलेल्या शोभा यांच्याबरोबर त्यांचा मुलगा असायचा. सोमवारी पहाटे त्या बाथरुमच्या निमित्ताने गेल्या आणि त्यांनी विष प्राशन केले. काहीवेळाने त्यांना उलट्या होऊ लागल्यानंतर मुलाच्या लक्षात हा प्रकार आला. त्यानंतर शोभा यांना त्वरीत सांगलीच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच संपूर्ण खटाव गाव आणि ऐतवडे येथील त्यांच्या नातेवाईकांनी सरकारी हॉस्पिटलमध्ये गर्दी केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समीरला कारागृहात गोमूत्र देण्यास नकार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येतील संशयित आरोपी समीर गायकवाड याने कारागृहात मानसिक शांतता मिळावी, यासाठी सनातन संस्थेकडून गोमूत्र आणि अगरबत्ती मागितली होती. जिल्हा सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांनी ही मागणी फेटाळत समीरला फक्त जपमाळ देण्यास परवानगी दिली. दरम्यान, पुरेशा पोलिस बंदोबस्ताअभावी समीर गायकवाड आणि डॉ. वीरेंद्र तावडे या दोघांनाही पोलिसांनी सोमवारी (ता. ६) झालेल्या सुनावणीसाठी जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले नाही.

कॉम्रेड पानसरे हत्येतील संशयित आरोपी समीर गायकवाड याने कळंबा कारागृहात सनातन संस्थेकडून देण्यात येणारे गोमूत्र, अगरबत्ती आणि जपमाळ मिळावी, अशी मागणी वकिलांमार्फत कोर्टाकडे केली होती. सोमवारी झालेल्या सुनावणीत या मागणीला सरकारी वकील शिवाजीराव राणे यांनी आक्षेप घेतला. सनातनचे तीर्थ किंवा अन्य वस्तूंमध्ये गुंगी आणणारे घटक असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे कोणताही पदार्थ किंवा वस्तूचे रासायनिक पृथ्‍थकरण केल्याशिवाय समीरला त्या देऊ नयेत, अशी मागणी अॅड. राणे यांनी केली. समीरला देण्यासाठी आणलेले गोमूत्र, अगरबत्ती आणि जपमाळेची कोर्टानेही पाहणी केली. यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव समीरला कारागृहात केवळ जपमाळ देण्यात यावी, असा आदेश त्यांनी दिला. दरम्यान, पुरेशा पोलिस बंदोबस्ताअभावी सोमवारी संशयित आरोपी गायकवाड आणि तावडे यांना पोलिसांनी कोर्टात हजर केले नाही. आरोपीच्या वतीने अॅड. समीर पटवर्धन यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​सोलापुरात होणार पंचरंगी लढत

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठीच्या अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी तब्बल २५९ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता १०२ जागांसाठी तब्बल ७४३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत. भाजप-शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये प्रमुख लढत होणार. एमआयएमचे उमेदवार असणाऱ्या प्रभागात चुरस वाढणार आहे.

महानगरपालिका निवडणुकीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून घमासान सुरू आहे. उमेदवारी कोणाला मिळणार यातच दिवस वाया गेले. प्रमुख पक्षांनी आपले उमेदवार जाहीर न करता त्यांचे एबी फॉर्म थेट उमेदवारी भरताना दिल्याने बंडखोरी काही अंशी टळली. परंतु, अर्जाची संख्या हजारांवर गेल्याने किती जण माघार घेणार याचे टेन्शन सर्वच पक्षांना होते. सोमवारी जवळपास ६५ जणांनी अर्ज मागे घेतले. तर आज २५९ जणांनी अर्ज मागे घेतल्याने उमेदवारांची संख्या सातशेवर आली. भाजपने यंदा विद्यमान नगरसेवक असलेले नरेंद्र काळे, पांडुरंग दिड्डी, चंद्रकांत रमनशेट्टी, रोहिणी तडवळकर, कृष्णाहरी दुस्सा यांना उमेदवारी दिली नाही त्याऐवजी नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. त्यामुळे या नगरसेवकांनी आपले अर्ज मंगळवारी बिनशर्त मागे घेतले. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी आपले पुत्र डॉ. किरण देशमुख यांनी प्रभाग क्रमांक नऊमधून मैदानात उतरविले आहे. शिवसेनेमध्येही बंडखोरी होती मात्र, पक्षाने ती थोपविण्यात यश मिळविले. भाजपचे माजी ज्येष्ठ नगरसेवक विश्वनाथ बेंद्रे यांनीही अर्ज मागे घेतला. प्रभाग क्रमांक सहामधून निष्ठावंत शिवसैनिक लहू गायकवाड आणि त्यांच्या पत्नी रेखा गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज मागे घेत शिवसैनिक म्हणून काम करणार असल्याचे सांगितले. प्रभाग क्रमांक ५, ६ आणि सातच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले असून, काट्याची टक्कर सोलापूरकारांना पाहावयास मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दरवाजाविनाच बांधल्या खोल्या

$
0
0

म. टा. प्र​तिनिधी, कोल्हापूर

नगरोत्थान योजनेतून जगरनगर येथील शाळेच्या पाच वर्गखोल्यांचे बांधकाम करण्याचा निर्णय झाला. २१ लाख ५० हजार रुपयांचे इस्ट‌िमेट ठरले. योजनेतून वर्ग खोल्यांचे बांधकाम झाले. पण वर्षभरानंतही वर्गात फरशीकाम नाही, दरवाजे बसविले नाहीत. व्हराड्यांस पॅराफिट (संरक्षक कठडा) उभारलेला नाही, असे चित्र जरगनगर विद्यामंदिरातील नवीन इमारतीत आहे. शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी प्रशासनाडे केल्या. महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी, विभागीय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊनही कार्यवाही मात्र शून्य आहे. या साऱ्या प्रकरणात ठेकेदार मात्र नामानिराळाच आहे.

ठेकेदारांनी गेल्या वर्षी या शाळेतील पाच वर्ग खोल्यांचे बांधकाम केले. विद्यार्थ्यांची वाढती संख्या असल्यामुळे बांधकाम अपुरे असताना या ठिकाणी वर्ग सुरु केले. पाच खोल्यात इयत्ता तिसरीचे पाच वर्ग भरतात. जून २०१६ पासून शाळा व्यवस्थापन समिती आणि पालकांनी अपुरे बांधकाम पूर्ण करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. नगरसेवक सुनील पाटील, गीता गुरव यांनी या प्रश्नाकडे लक्ष वेधले. शैक्षणिक वर्ष संपत आले तरी अजूनही बांधकाम पूर्ण करण्याच्या हालचाली दिसत नाहीत. पाचही वर्गामध्ये फरशीकाम, दरवाजे, व्हराड्यांत पॅराफिटचे काम झाले नाही. वर्गात फरशा नसल्यामुळे मुलांना धुळीचा त्रास होत आहे. शिवाय इमारतीला रंगकामही केलेले नाही.

आयुक्तांनी सूचना देऊनही दुर्लक्ष

ठेकेदाराला सांगूनही त्यांच्याकडून अद्याप कामाची पूर्तता झाली नाही. ठेकेदारांकडून अपुरी कामे पूर्ण झाली नसल्याने मुलांना होणारा त्रास लक्षात घेऊन पालकांनी वर्गणी काढून दरवाजे बसविले. ते दरवाजेही आता मोडकळीस आले आहेत. आयुक्त पी. शिवशंकर यांनी गांधी मैदान विभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना शाळेत सुविधा, इमारतीची डागडुजी करण्यासंदर्भात सूचना केल्या होत्या. नगरोत्थान योजनेंतर्गत नवीन इमारतीतील अपुरी कामे पूर्ण करुन घेण्याच्या सूचना देऊनही गांधी मैदान विभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी काहीच कार्यवाही केली नाही. विभागीय कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी, कनिष्ठ अभियंत्यावर जबाबदारी ढकलून नामानिराळे राहत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.

मैदानाचे सपाटीकरण गरजेचे

महापालिकेच्या मालकीच्या शहरात ५९ शाळा आहेत. श्रीमती लक्ष्मीबाई जरगनगर विद्यामंदिर ही सर्वाधिक १४२७ पटसंख्या असणारी शाळा आहे. पहिली ते सातवीपर्यंतच्या एकूण ३४ तुकड्या आहेत. सेमी इंग्लिश शिक्षणाची सुविधा आहे. शिक्षकांनी स्वखर्च, लोकवर्गणीतून शाळेत भौतिक सुविधा उपलब्ध केल्या आहेत. शैक्षणिक गुणवत्ता, शिष्यवृत्ती परीक्षा, शाळाबाह्य परीक्षा अशा विविध ठिकाणी मुलांनी गुणवत्ता सिद्ध केली आहे. वाढत्या पटसंख्येमुळे सुविधावर ताण पडत आहे. मैदानात चढ, उतार असल्यामुळे प्रार्थनेवेळी, खेळताना मुलांना खबरदारी घ्यावी लागते. मैदानाचे सपाटीकरण केले नसल्याने खेळताना विद्यार्थ्याना किरकोळ दुखापती होत आहेत. महापालिका शिक्षण समिती व अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. जुन्या इमारतीच्या वर्ग खोल्याच्या खिडक्या खराब झाले आहेत. काही ठिकाणी मोडतोड झाली आहे. मैदानाचे सपाटीकरण, इमारतीची डागडुजीकरिता निधी उपलब्ध झाल्यास मुलांची सोय होणार आहे. जरगनगर विद्यामंदिराच्या विकासात ज्येष्ठ कार्यकर्ते नाना जरग व कुटुंबीयांचे योगदान मोठे आहे. त्यांनी शाळेसाठी जागा आणि इमारतीचे बांधकाम करुन दिले आहे. महापालिकेने निधी उपलब्ध करुन दिला तर भौतिक सुविधांत वाढ होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​नेत्यांच्या पुत्रप्रेमाला आले भरतेसंगे-सोयऱ्यांसह नेत्यांचे वारसदार झेडपीच्या रिंगणात

$
0
0



हरीश यमगर, सांगली

सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी असल्याने आजी माजी मंत्री, आमदार पुत्रांनी निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली आहे. काही नेत्यांनी आपल्या वारसांना, नातेवाईकांना उमेदवारी मिळवून दिली आहे तर दोन ठिकाणी जिल्हा परिषदेच्या सभागृहात जोडीने येण्याच्या हेतूने पती-पत्नी दोघेही मैदानात उतरले आहेत.

खानापूरचे शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांनी आपले पुत्र सुहास बाबर यांना तर माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी आपले पुत्र विशाल पाटील यांना जिल्हा परिषदेच्या मैदानात उतरवले आहे. पाटील यांचा पंचायत समितीसाठी उमेदवारी अर्ज आहे. दलित महासंघाचे संस्थापक नेते प्रा. मच्छिंद्र सकटे यांनी पत्नी पुष्पलता सकटे यांना काँग्रसने भाळवणी गटातून उमेदवारी दिली आहे. दिवंगत आमदार संपतराव देशमुख यांचे चिरंजीव आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख हे कडेपूरमधून रिंगणात आहेत. आमदार आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांच्या सुनबाई वैशाली शांताराम कदम, ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांचे जावई महेंद्र लाड आणि जतमधील नातेवाईक विक्रम सावंत हे संख मतदारसंघातून निवडणुक लढवित आहेत. ते जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालकही आहेत. शिराळा तालुक्यातून विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांचे चिरंजीव सत्यजित देशमुख, आमदार शिवाजीराव नाईक यांचे पुत्र सत्यजित नाईक, आटपाडी तालुक्यातून नुकतेच भाजपवाशी झालेले माजी आमदार राजेंद्र देशमुख यांचे पुत्र हर्षवर्धन देशमुख, भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रम्हानंद पडळकर, कवठेमहांकाळ तालुक्यातून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत शेजाळ यांच्या पत्नी सारीका शेजाळ या रांजणी जिल्हा परिषद मतदारसंघातून काँग्रेसतर्फे तर जिल्हा बँकेचे संचालक चंद्रकांत हाक्के यांचे पुत्र विकास हाक्के भाजप आघाडीच्या वतीने ढालगाव पंचायत समितीची निवडणुक लढवित आहेत. वाळवा तालुक्यातील बागणी पंचायत समिती मतदारसंघात कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे पुत्र सागर खोत आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार विलासराव शिंदे यांचे पुत्र वैभव शिंदे यांच्यात सामना होण्याची चिन्हे आहेत. काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेले आणि नंतर भाजपवाशी झालेले विद्यमान सदस्य शिवाजी डोंगरे आणि त्यांची पत्नी विद्या डोंगरे दोघे दोन जिल्हा परिषद मतदारसंघातून भाजपच्या चिन्हावर निवडणुकीत उतरले आहेत. आटपाडी तालुक्यात विद्यमान सदस्या मनीषा पाटील आणि त्यांचे पती तानाजी पाटील शिवसेनेच्या चिन्हावर निवडणुकीच्या मैदानात आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंटिग्रेटेड लेगसीचे आंतरराष्ट्रीय गीत लाँचिंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘इंटिग्रेटेड लेगसी’ या कोल्हापूरच्या तरुणाईच्या सुप्रसिद्ध रॉक बँडने आणखी एका अांतरराष्ट्रीय स्तरावरील स्त्रीशक्तीच्या गीताची निर्मिती केली आहे. या गीतातून स्त्रीशक्तीचा जागर दाखवण्यात आला आहे. हे गीत आता यूट्यूब, आयट्यून्स, स्पोटीफाय, सावन, शाहजाम, अॅपल म्युझिक, साऊंड क्लाऊड यासारख्या आंतरराष्ट्रीय म्युझिक साइटवर उपलब्ध झाले आहे.

महिलांवर होणारे अत्याचार हे असहनीय असून खऱ्या अर्थाने एक स्त्रीचं हे जग चालवण्याचे काम करत आहे. स्त्री आता आई, मुलगी, पत्नी, सून, आजी, बहीण या नात्यापुरती मर्यादित न राहता मार्गदर्शक, लेखिका, वैज्ञानिक आणि रक्षणकर्ता म्हणूनसुद्धा ती खंबीरपणे उभी राहिली आहे. याचे सादरीकरण या गीतामधून करण्यात आले आहे. याचे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाला ‘मिस इंडिया एक्सक्युझीट २०१६ हेमल इंगळे’ यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या गीताची दखल आंतरराष्ट्रीय संगीत क्षेत्रात घेण्यात आली. विशेष म्हणजे या गीताच्या सादरीकरणामध्ये सहभागी झालेल्या सर्व महिला कोल्हापूरच्या आहेत. तसेच त्या आपआपल्या क्षेत्रात तज्ज्ञ म्हणून काम करत आहेत. या गाण्याचे संगीत संयोजन आणि दृश्य चित्रिकरण कोल्हापुरातच झाले आहे.

या बँडमध्ये कोल्हापूरचे प्रथमेश देसाई, सोहम येवले, अक्षय पाटील, अनुराग राठोड, शिवराज गुरबक्षाणी सहभागी आहेत. सध्या हा बँड गोवा, मुंबई, पुणे, हैद्राबाद, बेंगलोर या ठिकाणी सादरीकरण करत असून त्यांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

आजच्या या सोहळ्याला या गीतामधील कलाकार आर्किटेक्ट निहारीका शिंदे, मैत्री पाटील, प्राजक्ता पाटील, मधुरा हावळ, श्रृती पाटील, मृणाल नाईक, इंजिनीअर रुची पाटील, मॅनजमेंटची साक्षी पाटील, पर्यावरण तज्ज्ञ गौरीका दिगे, इंटिरिअर डिझायनर सिमरन लालवाणी, बिझनेस वुमेन पूजा क्रिपलानी, मधुरा हावळ, इंजिनीअर पूजा कुकरेजा यांच्यासह एडिटर सिनेमॅटोग्राफर त्रिशूल पाटील, सरफराज मकानदार, राहुल बेळगावकर हे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रंगरेषांना कल्पनांचे आकाश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोणत्याही क्षेत्रातील शास्त्रशुद्ध शिक्षणाचे धडे ‌‌गिरवत असताना केलेल्या कामाला रसिकांची दाद मिळणं आवश्यक असतं. भविष्यात त्या त्या क्षेत्रातील शिखर गाठण्यासाठी पायथ्यापाशी मिळालेले अनुभव नक्कीच मोलाचे असतात. अशाच अनुभवाची शिदोरी कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मिळावी यासाठी कलामहाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांच्या चित्र शिल्पाकृतींना मंच दिला जातो. सध्या कलामंदिरच्या विद्यार्थ्यानी वार्षिक काम म्हणून केलेल्या कलाकृती आणि दळवीज आर्ट इ‌न्स्टिट्यूटमधून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या कलाकृतींमधून विद्यार्थ्यांच्या रंगरेषांना कल्पनांचे आकाश मिळाले आहे. शाहू स्मारक भवन येथे हे प्रदर्शनीय दालन खुले झाले आहे.

कलामंदिरच्या शंभर विद्यार्थ्यांचा कलाविष्कार

पापाची तिकटी येथील कलामंदिर महाविद्यालयातील शंभर मुलांनी केलेल्या चित्र व शिल्पाकृतींची पर्वणी हे या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य आहे. मुलांना केवळ विषय द्यायचा आणि त्यानंतर पुढची कलाकृती विद्यार्थ्यांनी रेखाटायची या माध्यमातून हे काम प्रदर्शनीय झाले आहे. चित्रकलेत रचनाचित्रे व्यक्तीचित्र आणि मुद्राचित्रे अप्रतिम बनली आहेत. जलरंग, मिश्ररंग आणि पे‌न्सील स्केच यातून आकारला आलेल्या प्रत्येक चित्रातून एक भाव प्रतीत होत आहे.

शिल्पाकृतींमधील भाव पाहता विदयार्थ्यांची शिल्पकलेती पकड दिसून येत आहे. फायबर, प्लास्टर, मेटल, वूड, स्क्रॅप यामाध्यमांचा खुबीने केलेला वापर कौतुस्कापद झाला आहे.

दळवीज् माजी विद्यार्थी जोडले रंगरेषांनी

कॉलेज संपल्यानंतर अनुभवाच्या राज्यात रमलेले दळवीज आर्ट इ‌न्स्टिट्यूटचे विद्यार्थी रंगरेषांनी प्रदर्शनाच्या रूपाने जोडले गेले आहेत. दळवीजच्या प्रदर्शनात या विद्यार्थ्यांनी आपल्या निसर्ग हा मध्यवर्ती विषय निवडला आहे. निसर्ग दिसतो कसा आणि निसर्ग भावतो कसा या विषयावर विद्यार्थ्यांनी रंगरेषांमधून वि‌‌विधांगी दर्शन घडवले आहे. या‌निमित्ताने साहित्यिक कृष्णात खोत यांच्या शब्द आणि ‌चित्र या विषयावर बेतलेल्या व्याख्यानातून साहित्यातील चित्रांचे महत्त्व विद्यार्थ्याना

नव्याने समजले. प्रदर्शनाच्या दालनात तज्ज्ञ चित्रकारांनी प्रात्यक्षिके दाखवली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रपती पदक विजेते पाटणे यांचा सत्कार

$
0
0

सांगली : केंद्रीय उत्पादन शुल्क व सेवा कर पुणे विभागाचे सहायक आयुक्त अविनाश पाटणे यांना उत्कृष्ट सेवेबद्दल राष्ट्रपती पदक प्राप्त झाल्याबद्दल अप्पर आयुक्त सुरेंद्रकुमार मानकोसकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सोल्युशन्स फॉर न्यू ‌इंडिया कंपनी व स्नेहजित प्रतिष्ठानच्यावतीने आयो‌जित केंद्रीय अर्थसंकल्प व जीएसटी याविषयीच्या कार्यशाळेत सत्कार करण्या आला. प्रमुख पाहुणे म्हणून राजारामबापू साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक आर. डी. माहुली, विक्रीकर उपायुक्त सुनील कानगुडे, स्नेहजित प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्मती गौंडाजे उपस्थित होते.

यावेळी पाटणे म्हणाले, ‘केंद्रीय उत्पादन शुल्क विभागातर्फे राबविलेली करचुकवेगिरी विरोधातील मोहीम व त्यामुळे सरकारला मिळालेला महसूल यामुळे हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्राप्त झाला. विभागातील सर्वांचे सहकार्य व पाठबळ मोलाचे आहे.’

चार्टर्ड अकाउंटंट शिरीष किर्लोस्कर यांनी अर्थसंकल्पातील आयकरविषयक तरतूदींचे सखोल विवेचन केले. करसल्लागार दीपक नाईक यांनी केंद्रीय उत्पादन शुल्क व सेवा करातील बदलांचा आढावा घेतला. माहुली यांनी कर प्रणालीत सुधारणा होत असताना करदाते व शासकीय यंत्रणा यात समन्वय हवा असे स्पष्ट केले.

कार्यक्रमाला केंद्रीय उत्पादन शुल्क निरीक्षक राजेंद्र मेढेकर, अधीक्षक भरत घारगे, सी. ए. विवेक कुंभोजकर, आशिष गोसावी, मेधा जाधव, उद्योजक प्रकाश कुलकर्णी, सतीश इंगवले, करसल्लागार प्रसाद जोशी, महेश जाधव, अॅड. सुभाष संकपाळ आदी उपस्थित होते. कार्यक्रमात सी. ए. परीक्षा उत्तीर्ण झालेले

मनाली कुलकर्णी व सुशील मालू यांचा सत्कार करण्यात आला. विनायक काळे यांनी स्वागत, प्रसाद जगताप यांनी प्रास्ताविक व स्नेहल गौंडाजे यांनी सूत्रसंचालन केले. सुधीर डिग्रजकर यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डीबी पथके बरखास्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरासह जिल्ह्यात अवैध धंदे फोफावल्याने सर्व पोलिस ठाण्यांमधील डीबी (गुन्हे शोध पथक) पथके बरखास्त करण्यात आली आहेत. पोलिस उपअधीक्षकांच्या देखरेखीखाली पथकांची फेररचना होईल. प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रेकॉर्डवरील २५ सराईत गुन्हेगारांचे नव्याने रेकॉर्ड तयार करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (ता. ७) पोलिस अधीक्षक कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर अधीक्षक तांबडे यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी शहरात मटका बुकींच्या अड्ड्यावर छापा टाकून केलेल्या कारवाईनंतर अवैध धंदे जोरात सुरू असल्याचे स्पष्ट झाले होते. पोलिस अधीक्षक तांबडे यांनी याचे गंभीर्य लक्षात घेऊन मंगळवारी पोलिस अधीक्षक कार्यालयात जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी यांनी अवैध धंद्यांवरून अधिकाऱ्यांची कानउघडणी केली. ‘मटका, जुगार, मद्य तस्करी, देशी दारू निर्मिती आणि विक्री हे प्रकार सुरू असणे हे संबंधित पोलिस ठाण्यातील डीबी पथकाचे अपयश आहे. कारवाईला सामोरे जाण्याआधीच सर्व अवैध प्रकार बंद करा. ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध प्रकार उघडकीस येतील, तेथील अधिकाऱ्यांवर कारवाई होईल. सर्वच पोलिस ठाण्यातील सध्याची डीबी पथके बरखास्त करण्यात आली असून, नव्याने पथके निर्माण करा’ असा आदेश तांबडे यांनी दिला आहे. तोडपाणी करणाऱ्या पोलिसांना या पथकांत स्थान मिळू नये, यासाठी विशेष दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.

दरम्यान, बैठकीत अवैध धंद्यांवरून पोलिस अधीक्षक तांबडे आक्रमक बनले होते. कुणाचाही दबाव न घेता, कायद्यानुसार कामाला प्राधान्य द्या. अवैध धंदेवाल्यांशी कोणत्याही कर्मचाऱ्याचा संबंध येऊ नये, अन्यथा त्यांच्यावर कारवाई करावी, अशा सूचना तांबडे यांनी दिल्या. बैठकीसाठी अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. दिनेश बारी, गृह उपअधीक्षक सतीश माने, उपअधीक्षक रमेश सरवदे, डॉ. सागर पाटील, सूरज गुरव, विनायक नरळे, डॉ. बसवराज शिवमूर्ती, निरीक्षक रमेश मोहिते आदी उपस्थित होते.

पथकासाठी विशेष निकष

पोलिस ठाण्याचे निरीक्षकच डीबी पथकांची निर्मिती करतात. बऱ्याचदा या पथकात मर्जीतले आणि तोडपाणी करण्यात माहीर कर्मचारी घेतले जातात. आता हे निकष बदलण्यात आले आहेत. कायद्यांची माहिती, खबऱ्यांचे जाळे आणि चांगला जनसंपर्क असलेल्यांनीच पथकात स्थान मिळणार आहे. पोलिस उपअधीक्षकांकडून आधी केलेल्या कामांचे मूल्यांकन करून पथकात निवड होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बहुरंगी लढतीची चिन्हे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी उमेदवारांच्या अर्ज छाननीची प्रक्रिया मंगळवारी (ता. ७) शह-काटशहाच्या राजकारणात रंगली. छाननीत जिल्हा परिषदेचे ८ तर पंचायत समितीच्या १४ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले. जिल्हा परिषदेच्या ६७ जागांसाठी ८८५ तर पंचायत समितीच्या १३४ जागांसाठी १५२३ अर्ज वैध ठरले. राजकीय पक्षांचे उमेदवार निश्चित झाल्याने माघारीआधीच प्रचाराचा धडाका सुरू होणार आहे. माघारीसाठी १३ फेब्रुवारी रोजी दुपारी अडीच वाजेपर्यंत मुदत आहे.

जिल्ह्यात ठिकठिकाणी प्रांताधिकारी आणि तहसीलदार कार्यालयात मंगळवारी सकाळी अकरा वाजता छाननची प्रक्रिया झाली. जिल्हा परिषदेसाठी ६९७ उमेदवारांनी ८९८ अर्ज तर पंचायत समितीसाठी १२६४ उमेदवारांनी १५४८ अर्ज भरले होते. छाननीत २१ जणांची दांडी उडाली. सांगरूळ जिल्हा परिषदेत कृष्णात भोसले यांच्यासह करवीर पंचायत समितीत ७ अर्ज अवैध ठरले. यात सतीश कोळी, योगिता बागडी, मंगल कारंडे, मीना हुदले, बाळासाहेब रानगे, संभाजी पाटील, सारिका शेळके यांचे अर्ज अवैध ठरले.

दरम्यान, इच्छुक उमेदवारांनी अर्ज छाननीतून बाद होऊ नये, यासाठी काही वकिलांना सोबत घेऊन आले. अर्ज छाननीत बाद होणार असल्याची कारणे दिली गेल्यानंतर अनेकांनी वकिलाचा सल्ला घेतला. छाननीच्या वेळी उमेदवारांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली. ऑनलाइन अर्ज भरताना काही उमेदवारांनी चुका केल्या. त्याचा फटका उमेदवारांना बसला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॅश व्यवहारावर बडगा उगारणार?

$
0
0


satish.ghatage@timesgroup.com
Tweet : @satishgMT

सध्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा माहोल सुरू आहे. नोटाबंदीनंतर निवडणुकीचा कौल कुणाला मिळणार याची उत्सुकता राजकीय पक्षांबरोबर कार्यकर्ते व नागरिकांनाही लागून राहिली आहे. निवडणुकीत पाण्यासारखा पैसा खर्च होणार असल्याचा अंदाज राजकीय पक्ष व कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत. याच पार्श्वभूमीवर तीन लाख रुपये रोखीचा व्यवहार करणाऱ्यांना शंभर टक्के दंड आकारण्याची घोषणा केंद्रीय महसूल सचिवांनी केली आहे. पण निवडणुकीतील कॅश व्यवहारावर बडगा कसा उगारणार, हा महत्त्वाचा प्रश्न मतदारांकडून विचारला जात आहे.

निवडणुकीसाठी आचारसंहितेचे पालन करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी विविध पथके स्थापन केली आहेत, पण ही पथके सध्या काय करतात हा संशोधनाचा विषय आहे. निवडणूक खर्चासाठी जिल्हा परिषद उमेदवाराला पाच लाख रुपये, तर पंचायत समिती उमेदवाराला तीन लाख रुपयांची मर्यादा आहे; पण त्यांची ही खर्चाची मर्यादा फॉर्म भरेपर्यंतच संपली आहे. पुढील १५ दिवस पाण्यासारखा पैसा खर्च होणार आहे. हा पैसा ब्लॅकमनी स्वरूपातील असणार आहे.

काही इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी शक्तिप्रदर्शन केले आहे. काहींनी बुलेटवरून अर्ज भरले, तर काहींनी गावातून मोटारसायकल रॅली काढून तहसील कार्यालयापर्यंत नेली. रॅलीसाठी हजारो रुपयांचा खर्च झाला असताना निवडणूक खर्चात तो दाखवला जात नाही. इच्छुक उमेदवारांकडून जेवणावळी सुरू झाल्या आहेत. रात्रीच्यावेळी गावाबाहेर, राष्ट्रीय महामार्गावरील बिअर बार, परमिट रूम, हॉटेल, धाबे हाउसफुल आहेत. हे सर्व व्यवहार रोखीने सुरू आहेत. बिअर बार, परमिट रूम, हॉटेलना परवानगी रात्री अकरापर्यंत असतानासुद्धा ती मध्यरात्रीनंतर सुरू आहेत. तरुण पिढी निवडणुकांमुळे व्यसनांच्या आधीन जाऊ लागली असताना आचारसंहिता पथक कुठे आहे? असा प्रश्न विचारला जात आहे.

२०१२ च्या निवडणुकीत राधानगरी तालुक्यात तत्कालीन निवडणूक अधिकारी प्रशांत नारनवरे यांनी आचारसंहितेची कडक अंमलबजावणी केली होती. हॉटेल, धाब्यांवरील जेवणावळी बंद केल्या होत्या. नियमानुसार सर्व हॉटेल नियोजित वेळेच्या आधीच बंद होत होती. मटणाच्या दुकानांतूनही मटण किती विकले, याचा आढावा घेतला जायचा. चांदेकरवाडी गावात वाढदिवसाच्या नावाखाली घातलेल्या जेवणावळीवर त्यांनी छापा टाकल्यावर काँग्रेसच्या उमेदवाराची व कार्यकर्त्यांची पळताभुई झाली होती. स्वतः नारनवरे यांनी कारवाई केली होती, पण त्यावेळी पोलिसपाटील गैरहजर राहिल्याबद्दल त्याला निलंबितही केले होते. नारनवरे यांच्यासारखी कडक कारवाईची गरज असताना आचारंहिता अंमलबजावणी करणारी पथकेच कुठे दिसत नाही. फॉर्म भरताना येणाऱ्या वाहनांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करणारे कॅमेरे हळूहळू लुप्त होऊ लागले आहेत.

निवडणुकीला अजून पंधरा दिवसांचा कालावधी असल्याने पैशाचा मोठा वापर होणार आहे. बँकेत आठवड्याला २४ हजार रुपये काढण्याची मर्यादा असताना नेते, उमेदवार, कार्यकर्त्यांकडे दोन हजार, पाचशे रुपयांच्या नोटांची बंडले दिसू लागली आहेत. काही राजकीय पक्षांनी २० ते २५ लाख रुपये खर्चासाठी देण्याची तयारी दर्शवली असताना कॅश व्यवहाराचा दंडाचा बडगा कसा उगारणार, असा प्रश्न विचारला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images