Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

व्हाइट कॉलरवर हवी जरब

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अलिकडे पारंपरिक गुन्ह्यांची पद्धत बदलली असून, आर्थिक फसवणूक, ऑनलाईन फसवणूक, बेकायदेशीर खासगी सावकारी आणि सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. यातच सोशल मीडियाच्या माध्यमातून निर्माण होणारी तेढ सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारी ठरत आहे. विशेष म्हणजे अशा गुन्ह्यांमध्ये व्हाइट कॉलर गुन्हेगारांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे नूतन पोलिस अधीक्षक एम. बी. तांबडे यांच्यासमोर व्हाइट कॉलर गन्हेगारी रोखण्याचे आव्हान आहे. याशिवाय अवैध धंदे रोखण्यासह जातीय सलोखा वाढवण्याचे कामही पोलिस अधीक्षकांना करावे लागणार आहे.

गेल्या वर्षभरात जिल्ह्यात ठकबाजीचे २१० गुन्हे नोंद झाले आहेत. यातील १८७ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. २३ गुन्हे अद्यापही उघडकीस आले नाहीत. नोकरीचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक, कमी व्याजदरात कर्ज देण्याचे आमिष दाखवून फसवणूक, मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून होणारी फसवणूक, अवैध खासगी सावकारांकडून अवाजवी व्याज दराने होणाऱ्या कर्जवसुलीने नागरिकांची आर्थिक पिळवणूक होत आहे. गेल्या वर्षभरात खासगी सावकारांच्या दांडगाव्याचे अनेक प्रकार उघडकीस आल्याने खासगी सावकारांवर गुन्हे नोंद झाले आहेत. विशेषतः या गुन्ह्यांमध्ये व्हाईट कॉलर गुंडांचे वर्चस्व असून, स्थानिक नेते आणि पुढाऱ्यांचेही त्यांना छुपे पाठबळ मिळत असल्याचे पोलिसांच्या तपासात उघडकीस आले आहे. खासगी सावकारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी गेल्या वर्षभरात ५० हून अधिक खासही सावकारांवर गुन्हे दाखल करून त्यांना कोर्टात खेचले आहे, पण अवैध सावकारी सुरूच आहे. तांत्रिकदृष्याही ठोस पुराव्यांसह कोर्टात लढण्याची तयारी पोलिसांना करावी लागणार आहे.

सायबर क्राइमचे १० गुन्हे नोंद असून, हे सर्व गुन्हे उघडकीस आले आहेत. केंद्र सरकारने घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर ऑनलाइन आर्थिक व्यवहारांना प्रोत्साहन दिले जात आहे. कॅशलेससाठी सरकारसह बँकांनी पुढाकार घेतला आहे, पण हीच स्थिती सायबर क्राइमसाठीही पोषक ठरू शकते. नागरिकांना ऑनलाइन व्यवहारांचे आणि ऑनलाईन बँकिंगचे पुरेसे ज्ञान नसल्याने एटीएम कार्डचा पासवर्ड विचारून गंडा घालणाऱ्या टोळ्या सक्रीय होण्याचा धोका आहे. विशेषतः उत्तर भारतातून येणारे बोगस फोन कॉल्स रोखण्यात आणि त्या टोळ्यांपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना विशेष यश येत नसल्याने अशा गुन्ह्यांचे गांभीर्य वाढत आहे. भविष्यातील सायबर क्राइमचा धोका ओळखून पोलिसांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवावा लागणार आहे, यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाचीही गरज भासणार आहे.

शहरात मटका, जुगार, मद्य तस्करी यासह किरकोळ कारणातून दोन गट आमने-सामने भिडण्याचे प्रकारही वाढले आहेत. तलवार हल्ले हऊनही पोलिसात नोंद होण्याआधीच परस्पर प्रकरणे मिटवण्याचे प्रकार सुरू आहेत.


शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासह अंबाबाई मंदिराच्या सुरक्षेचाही प्रश्न ऐरणीवर आहे. चार वर्षांपासून मंदिरातील स्वतंत्र पोलिस ठाण्याची मागणी प्रलंबित आहे. कन्यागत महापर्वाच्या पार्श्वभूमीवर अंबाबाई मंदिराच्या सुरक्षेसाठी १०० प्रशिक्षित पोलिसांचा बंदोबस्त देण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि तत्कालीन पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी जाहीर केले होते. याची अंमलबजावणी अद्यापही झाली नाही. कोल्हापुरात पोलिस आयुक्तालय सुरू व्हावे यासाठी जणीवपूर्वक प्रयत्न करावे लागणार आहेत.

सोशल मीडियाच्या माध्यमातून सामाजिक तेढ निर्माण करणारे मेसेज जाणीवपूर्वक पसरवले जातात. वाढदिवस आणि निवडींचे विनापरवानगी फलक वादाचे कारण ठरत आहेत. यावर पोलिसांना विशेष नजर ठेवावी लागणार आहे. गेल्या चार महिन्यांत जिल्ह्यात याच कारणांवरून दोन गटांत राडे झाले आहेत. असे गुन्हे वारंवार घडत राहिल्यास पोलिसांसमोर नवे आव्हान निर्माण होण्याची भीती आहे. विशेषत: वॉटस‍्अॅपच्या माध्यमातून जातीय तेढ निर्माण करणारे मेसेज व्हायरल केले जात आहेत. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सायबर क्राइम शाखेला स्वतंत्र काम करावे लागणार आहे. यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाचीही गरज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राज्यातील पतसंस्था नेटबँकिंगने जोडणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘नोटाबंदीनंतर बँकिंग क्षेत्रात आमुलाग्र बदल घडत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील १६ हजार ५३० पतसंस्था नेट बँकिंगद्वारे जोडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यातून पतसंस्थांच्या खातेधारकांना देशातील एटीएमवरुन पैसे काढता येतील’, अशी माहिती महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांनी दिली. कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन व महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कॅशलेस पतसंस्था’ विषयावर चर्चा आयोजित केले होते. नेटविन सिस्टिम्स अँड सॉफ्टवेअर, सर्वत्र टेक्नॉलॉजी व इन्फो डायनॅमिक सॉफ्टवेअरच्या सहयोगाने शाहूपुरीतील वसंतराव चौगुले नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात चर्चासत्र झाले.

कोयटे म्हणाले, ‘बँकिंगमध्ये आमूलाग्र बदल होत आहेत. त्यामुळे बँकिंग क्षेत्रात पतसंस्थांनी एकजूट होऊन काम केल्यास सर्वसामान्य लोकांना कॅशलेस व्यवहार करण्यासाठी पतसंस्थाच सरकारला जास्तीत जास्त मदत करतील. सर्व पतसंस्था नेटबँ​किंगद्वारे जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे देशभरातील अडीच लाख एटीएममधून पतसंस्थांच्या खातेधारकांना देशभरात कुठेही खात्यातून पैसे काढता येतील. बँकांप्रमाणे पतसंस्थाही सर्व सेवा देऊ शकतील. देशातील करप्रणाली पुर्ण बदलणार असून सरकार आता रोख रकमेच्या व्यवहारासाठी कर लावण्याच्या विचारात आहे. त्यामुळे पतसंस्थांना सक्षम बनावे लागणार आहे.’

कोल्हापूर पतसंस्था फेडरेशनचे कार्याध्यक्ष अनिल पाटील म्हणाले, ‘ग्रामीण भाग कॅशलेस करण्याची जबाबदारी पतसंस्थांची आहे. लहान पतसंस्थांना हे परवडणारे नसले तरी पतसंस्थांना फेडरेशनच्यामार्फत एकत्र करुन कोअर बँकिंग प्रणालीचा लाभ देऊ. सरकार ठेवीसाठी जसे नवीन कायदे करत आहे, तसेच वसुलीसाठीही कडक कायदे करण्याची गरज आहे.’

यावेळी नेटविन सॉफ्टवेअरचे संचालक उत्तम गाडे यांनी कॅशलेसचे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले. वसंतराव चौगुले पतसंस्थेचे जनरल मॅनेजर एम. एस. पाटील यांनी स्वागत केले. व्यवस्थापक ​दीपक पाटील यांनी आभार मानले. फेडरेशनचे उपाध्यक्ष सुनील पाटील, राजेश केसरकर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्त्री जन्माचे स्वागत करूया’

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘आज मुलगी जन्मली नाही, तर उद्याची आई होणार नाही. आणि जर आई झाली नाही तर मनुष्यनिर्मिती होणार नाही. त्यामुळे आई नाही तर माणुसकीच उरणार नाही. यासाठी स्त्री-जन्माचे स्वागत करूया’ असे आवाहन डॉ. सुधा कांकरिया यांनी केले. युनिसेफ अंतर्गत शिवाजी विद्यापीठातील वृत्तपत्रविद्या आणि मास कम्युनिकेशन विभागातर्फे ‘सामाजिक हिंसा आणि शोषण’ या विषयावर पत्रकारांसाठी कार्यशाळा पार पडली. यावेळी ‘मुलगा वंशाचा दिवा आहे तर मुलगी ही वंशाची पणती’ असल्याचेही त्यांनी मत मांडले.

‘स्त्री जन्माचे स्वागत करुया’ विषयावर बोलताना डॉ. कांकरिया म्हणाल्या, ‘गेल्या ३० वर्षात दीड कोटी चिमुकल्यांची गर्भातच हत्या झाली. महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या काही वर्षापूर्वी स्त्री बीज नको हे समाजमनात रुजले आहे. या बीजाचे स्वागत करण्यासाठी समाजात पोषक वातावरण निर्माण करण्याची आवश्यकता आहे.’

कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात ‘शाश्वत विकास’ विषयावर बोलताना प्रा. डॉ. जय सामंत म्हणाले, ‘शाश्वत विकासासाठी नैसर्गिक साधन संपत्तीचा ऱ्हास रोखणे, पर्यावरणरक्षण व निसर्ग संवर्धन, मानवी आत्मकेंद्रित प्रवृत्तीमध्ये बदल आवश्यक आहे. पर्यावरण शिक्षण व जागृतीसाठी योग्य नियोजन आवश्यक आहे.’

‘गरोदर मातांची उपासमार, संतुलित आहाराचा अभाव, योग्य वैद्यकीय सेवा व उपचारांमुळे अर्भकांच्या मृत्युचे प्रमाण वाढत आहे. यासाठी गरोदर मातांनी योग्य तपासणी व उपचार करणे आवश्यक आहे. प्रसूती पूर्व व प्रसुती पश्चात वैद्यकीय उपचारांची आवश्यकता असल्याचे मत पत्की रिसर्च फाउंडेशनच्या डॉ. श्वेता पत्की यांनी व्यक्त केले. दुसऱ्या सत्रात प्राचार्या मंगला पाटील-बडदारे, प्रा. साधना झाडबुके यांनी मनोगत व्यक्त केले.

वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र विभागप्रमुख डॉ. निशा पवार यांनी स्वागत केले. चंद्रशेखर वानखेडे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी डॉ. सुमेधा साळुंखे, सुनील जाधव यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी व पत्रकार उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेंडापार्क वीज केंद्र राज्यात प्रथम

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वीज महावितरण कंपनीच्या कोल्हापुरातील शेंडापार्क येथील उपकेंद्राला राज्यात उत्कृष्ट उपकेंद्राचा पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. यात सांगलीतील कानडवाडी उपकेंद्र दुसऱ्या क्रमांकावर राहिले. मुख्य अभियंता जितेंद्र सोनवणे यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी उपकेंद्राला पुरस्कार प्रदान करण्यात येईल.

गेल्यावर्षी महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार यांनी अचानक एका वीज उपकेंद्राला भेट दिली. तेथील असुविधा व वातावरण पाहून प्रचंड नाराजी व्यक्त केली. या भेटीमुळे ‘उत्कृष्ट उपकेंद्र’ स्पर्धा सुरू झाली. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात किमान एक उपकेंद्र उत्कृष्ट बनविण्याचे काम सुरू झाले. त्याचे निकष ठरविण्यात आले. उपकेंद्रातील पावर ट्रान्सफॉर्मची नियमित व नियमानुसार देखभाल; ब्रेकर, सीटीपीटी, मीटर व पॅनलची देखभाल; हँडग्लोव्हज, डिस्चार्ज रॉड आदी सुरक्षा साधनांची उपलब्धता व वापर, स्पष्टपणे दिसतील असे नामफलक असे निकष होते.

कोल्हापूर जिल्ह्यातून शेंडापार्क तर सांगलीतून कानडवाडी उपकेंद्र स्पर्धेत उतरले. कोणत्याही विशेष तरतुदीशिवाय देखभाल दुरुस्तीच्या खर्चातून उपकेंद्रांचे रूप बदण्याचे काम स्थापत्य विभाग व वीज अभियंते, जनमित्र व यंत्रचालकांनी केले आहे. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये कामाचा उत्साह वाढला आहे.

तत्कालीन मुख्य अभियंता शंकर शिंदे यांनी वेळोवेळी भेटी देऊन चांगले बदल घडवून आणले. अर्थातच त्यांच्या या प्रयत्नांना कोल्हापूरचे अधीक्षक अभियंता जितेंद्र सोनवणे, स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता आनंद सावळे, कोल्हापूर शहर विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील माने, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय गवळी, सहाय्यक अभियंता विवेक पाटील यांचेसह जनमित्र, यंत्रचालक आदींनी मोलाची साथ दिली. कानडवाडीसाठी सांगलीचे अधीक्षक अभियंता आर.डी. चव्हाण, सांगली ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता नारायण व्हनमाने, त्यांचे सर्व अभियंते, जनमित्र, यंत्रचालकांनीही अथक परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पासपोर्ट कार्यालयाला मुहूर्त कधी?

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापुरात पासपोर्ट पडताळणी कार्यालय व्हावे यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना अजूनही मूर्त रूप मिळालेले नाही. पासपोर्ट कार्यालयाच्या पुणे येथील पथकाने कोल्हापुरातील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत जागेची पाहणी केली असली तरी, अजूनही दिल्ली कार्यालयाकडून कोल्हापूरच्या कार्यालयासाठी अधिकृत परवानगीच मिळालेली नाही. नागरिकांची गरज आणि जागेची उपलब्धता असूनही कोल्हापुरातील पासपोर्ट कार्यालयाला मुहूर्त मिळत नसल्याने नागरिकांच्या पुणे वारी तुर्तास तरी सुरूच राहणार आहेत.

कोल्हापुरात पासपोर्ट पडताळणी कार्यालय सुरू होणार अशी चर्चा गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. या चर्चेला मूर्त स्वरुप देण्यासाठी लोकप्रतिनिधींनीही पाठपुरावा केला, मात्र अजूनही पासपोर्ट पडताळणी कार्यालयाची प्रतीक्षा संपलेली नाही. ऑनलइन अर्ज भरल्यानंतर नागरिकांनी पुण्याची वारी करावीच लागते. पोलिस ठाण्यांकडून होणाऱ्या तपासणीत काही त्रुटी राहिल्यास पुन्हा पुण्याला जाऊनच दुरुस्ती केल्याशिवाय पासपोर्ट मिळत नाही. पुण्याला होणारे हेलपाटे वाचवण्यासाठी कोल्हापुरातच पासपोर्ट पडताळणी कार्यालय सुरू व्हावे, या मागणीने जोर धरला आहे.

याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाने पासपोर्ट विभागाशी पत्रव्यवहार करून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यासाठी पासपोर्ट पडताळणी कार्यालयाची मागणी केली होती. यासाठी लोकप्रतिनिधींनीही दिल्लीत राजकीय वजन खर्ची घातले. यानंतर पासपोर्ट कार्यालयाकडून जागेची मागणी करण्यात आली होती. जिल्हाधिकारी कार्यालयाने कसबा बावडा येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील सेतू केंद्राची जागा पासपोर्ट कार्यालयासाठी निश्चित केली आहे. या जागेची पाहणी करण्याचे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयाने पाठवल्यानंतर मागील आठवड्यातच पुणे येथील पथकाने जागेची पाहणी केली आहे. पाहणी होऊनदेखील परवानगीचे घोडे मात्र अजूनही अडले आहे.

पासपोर्टसाठी कोल्हापुरातून दरवर्षी सुमारे १८०० अर्ज केले जातात. सांगली जिल्ह्यातूनही सुमारे १२०० अर्जदार पासपोर्टसाठी प्रतीक्षेत असतात. ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर अर्जदारांना पडताळणीसाठी पुण्यातील पासपोर्ट कार्यालयात जावेच लागते. दोन्ही जिल्ह्यातील किमान दोनशे ते अडीचशे अर्जदारांना दररोज पुण्याला जावे लागते. यासाठी वेळ, पैसा आणि श्रमाचाही अपव्यय होत आहे.

कोल्हापुरात पडताळणी कार्यालय सुरू झाल्यास हे टाळता येणार आहे, मात्र जागेची उपलब्धता असली तरीही पासपोर्ट विभागाच्या दिल्ली कार्यालयाकडून अजूनही कोल्हापुरातील कार्यालयासाठी अधिकृत परवानगीच मिळाली नसल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले आहे. पत्र व्यवहार सुरू आहेत, पण परवानगीच नसल्याने कार्यालय नेमके कधी सुरू होणार याची खात्री देता येत नाही, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी दिली. परराष्ट्र मंत्रालयाच्या सचिवपदी कोल्हापूरचे ज्ञानेश्वर मुळे हे आहेत. मुळे यांच्या प्रयत्नातून तरी कोल्हापुरातील कार्यालयाला मूर्त स्वरुप मिळावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

मनुष्यबळाची कमतरता

नोकरी, शिक्षण आणि पर्यटनाच्या निमित्तान पदेशात जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पोलिस अधीक्षक कार्यालयातील पासपोर्ट विभागात दररोज किमान १५० अर्ज दाखल होतात. अर्जांच्या तुलनेत या विभागात केवळ सहा कर्मचारी कार्यरत आहेत. १ अधिकारी आणि ५ कर्मचाऱ्यांवरच कार्यालयाचा गाडा हाकला जात असल्याने वेळेत कामे पूर्ण होण्यात अडचणी येतात. घाईगडबडीत कामे केल्यास त्रुटी राहून पुन्हा अर्जदारांचा वेळ वाया जाऊ शकतो. आणखी २० कर्मचाऱ्यांची नियुक्ती या कार्यालयात आवश्यक आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अॅट्रॉसिटी’आडून शांतता भंग नको

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अॅट्रॉसिटीचा वापर करून खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांना जिल्हा परिषद निवडणुकीत उमेदवारी देऊ नये, अशी मागणी काही संघटनांनी नुकतीच केली आहे. वेगळ्या पद्धतीने बहिष्कार टाकण्याच्या हेतूने सामाजिक दहशतवाद पसरवणाऱ्यांनीच अशी मागणी केली आहे. ही मागणी सामाजिक शांतता भंग करणारी आहे. त्यामुळे ही मागणी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आंबेडकरवादी संघटनांनी केली आहे. याबाबतचे निवेदन पोलिस अधीक्षक एम. बी. तांबडे यांच्याकडे देण्यात आले आहे.

अॅट्रॉसिटीचा गैरवापर करणाऱ्यांना उमेदवारी देऊ नका, अशी मागणी काही संघटनांनी केली आहे. याला आंबेडकरी संघटनांनी विरोध दर्शवला असून, याबाबत सोमवारी पोलिस अधीक्षक तांबडे यांच्याकडे निवेदन देण्यात आले. संबंधितांवर कारवाईची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनातून म्हटले आहे की, ‘काही संघटनांकडून वेगळ्या पद्धतीने बहिष्कार टाकला जात आहे. अॅट्रॉसिटीचा वापर करणाऱ्यांना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी करून मागासवर्गीय नागरिकांना निवडणुकीपासून वंचित ठेवण्याचा हा प्रयत्न आहे. सामाजिक शांतता बिघडवणारी मागणी असून, संबंधितांवर कारवाई करावी,’ अशी मागणी आंबेडकरी संघटनांनी केली आहे.

डी. जी. भास्कर, आरपीआयचे अॅड. पंडितराव सडोलीकर, बी. के. कांबळे, बाबासाहेब वडगावकर, शहाजी कांबळे, सखाराम कामत, बहुजन परिवर्तनचे बाजीराव नाईक, ब्लॅक पँथरचे सुभाष देसाई, आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अन्यथा व्यापार बंद करू

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिका प्रशासनाकडून व्यापाऱ्यांना एलबीटीसंदर्भात लागू केलेल्या नोट‌िशींच्या विरोधात व्यापारी आक्रमक झाले. २०११ ते २०१४ या कालावधीतील एलबीटी संदर्भातील कागदपत्रे पुन्हा महापालिककडे देण्यास विरोध केला. तसेच ज्या व्यापाऱ्यांना एलबीटी लागू होत नाही, त्यांना नोट‌िसा कशा काढल्या? अशी विचारणा केली. यावरुन अधिकारी व व्यापारी, व्यावसायिकांच्या प्रतिनिधीमध्ये शाब्दिक चकमक उडाली. चर्चेदरम्यान असेसमेंट पथकातील एका कर्मचाऱ्यांने व्यापाऱ्यांच्या दिशेने फाइल भिरकावल्याने वादावादी झाली. तीन तासाच्या बैठकीत समाधानकारक तोडगा न निघाल्याने बुधवारी आयुक्तांसोबत पुन्हा बैठक होणार आहे.

प्रशासनाने चुकीच्या पद्धतीने लागू केलेल्या नोट‌िसा मागे घेतल्या नाहीत आणि सामोपचाराने विषय न सोडविल्यास शहरातील व्यापार व्यवसाय बंद करू, असा इशारा चेंबर ऑफ कॉमर्सचे संचालक प्रदीप कापडिया यांनी दिला. २०११ मध्ये एलबीटी लागू केल्यानंतर ज्या व्यापाऱ्यांनी कराची पूर्ण रक्कम भरली नाही, आवश्यक कागदपत्रे सादर केली नाहीत, अशा प्रकरणाचे असेसमेंट सुरू केले आहे. शहरातील सुमारे तीन हजार व्यापाऱ्यांना नोट‌िसा बजावल्या आहेत. या नोट‌िसा बेकायदा आहेत. शिवाय जे लहान व्यावसायिक शहरातंर्गत खरेदी विक्री व्यवसाय करतात त्यांनाही नोटिस लागू करणे गैर असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष संजय शेटे, सराफ संघाचे अध्यक्ष भरत ओसवाल, संचालक कापडिया, हरीभाई पटेल, राहुल नष्टे, अजित कोठारी, अजित मेहता, धनंजय दुग्गे, वैभव सावर्डेकर, नयन प्रसादे, मिलिंद शहा, मोहन पटेल, विवेक शेटे, संदीप वीर आदींच्या शिष्टमंडळाने एलबीटी अधिकारी सुधारक चल्लवाड, राम काटकर यांच्याशी चर्चा केली. आस्थापना खर्चावर एलबीटी आकारणी चुकीची असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. २०११ ते २०१४ कालावधीतील कागदपत्रे पुन्हा सादर करण्याची अट काढून टाकावी, असे सुचविले. त्यावेळी अधिकाऱ्यांनी कागदपत्रे सादर केली असतील तर त्याची पोहोच द्यावी, असे म्हणताच उपाध्यक्ष शेटे व इतरांनी त्याला आक्षेप घेतला. त्या कालावधीत पोच देण्याची व्यवस्था नव्हती, असे निदर्शनास आणले. नगरसेवक तौफिक मुल्लाणी यांनी एलबीटी अधिकारी व आयुक्तांची ​शिष्टमंडळासोबत भेट घेऊन व्यापारी, व्यावसायिकांच्या अडचणी मांडल्या. याप्रश्नी सकारात्मक निर्णय घ्यावा, असे सुचविले. दरम्यान कागदपत्र सादर केल्यानंतर त्याची पोहोच देण्याची कार्यवाही प्रशासनाने सुरू केली आहे.

व्यापारी आज आयुक्तांना भेटणार

शिवाजी मार्केट विभागीय कार्यालय येथील बैठकीत निर्णय न झाल्यामुळे व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळांनी आयुक्त पी. शिवशंकर यांची भेट घेण्याचे ठरविले. सगळेजण आयुक्त कार्यालयात दाखल झाले. आयुक्तांनी याप्रश्नी बुधवारी दुपारी चार वाजता शिष्टमंडळाला चर्चेची वेळ दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोटीचा रस्ता हडपला

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

रस्ता दुरुस्तीसाठी नागरिकांनी आंदोलने केली. महापालिकेवर मोर्चा काढला. सात वर्षाच्या कालखंडानंतर रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतले. रस्ता तयार झाला. पण, हा कोटीचा रस्ताच एका बाजूने हडप करून स्थानिक नागरिकांनी त्याचा वापर स्वतःची वाहने पार्क करण्यासाठी आणि जनावरे बांधण्यासाठी सुरू केला आहे. त्यामुळे वाहतुकीवर ताण पडत आहे. अरुंद रस्त्यामुळे वारंवार अपघात होतात. शहरात याबाबत ओरड सुरू असताना अख्खा रस्ताच हडप करण्याच्या या प्रकारामुळे वाहनधारकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.


रंकाळा टॉवर ते तांबट कमानीपर्यंतचा रस्ता प्रदीर्घ काळ रखडला होता. त्यामुळे तो तातडीने दुरुस्त करण्याची मागणी होत होती. सात वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडानंतर हा रस्ता प्रशस्त आणि चांगल्या पद्धतीने तयार करण्यात आला. मात्र हा रस्ता असूनही त्याचा वापर करता येईनासा झाला आहे. अख्‍ख्या रस्त्याची एक बाजूच अतिक्रमण करून बंद करण्यात आली आहे. परिसरातील नागरिकांनी, खासगी बस व्यावसायिकांनी रस्त्याला पार्किंगचा अड्डा बनविला आहे. सार्वज​निक वाहतुकीसाठी तयार केलेल्या रस्त्याचा मालकी हक्काप्रमाणे काहीजण वापर करत चक्क रस्त्यावरच बंद वाहने लावली आहेत. जनावरे बांधली आहेत. बेकायदेशीररित्या रस्ता अडविणाऱ्यांविरोधात कारवाई करुन या मार्गावर वाहतूक सुरु करण्याऐवजी महापालिका अधिकारी मात्र कारवाई करण्यापासून पळ काढत आहेत. रस्ता तयार करण्यासाठी आंदोलन करणारे भागातील नागरिक, परिसरातील नगरसेवकही याप्रश्नी मूग गिळून आहेत.

रस्ते विकास प्रकल्पांतर्गत रंकाळा टॉवर ते क्रशर चौकपर्यंतच्या रस्ता करण्यात येणार होता. मात्र आयआरबी कंपनीने हा रस्ता तयार करायला नकार दिला. नंतर महापालिकेने स्वनिधीतून रस्ता तयार करण्याचा निर्णय घेतला. महापालिकेने सुमारे तीन कोटी रुपयांची तरतूद त्यासाठी केली. रंकाळा टॉवर ते वाशी नाका खर्डेकर दवाखानापर्यंतचा रस्ता साठ फुटाचा की त्यापेक्षा कमी रुंदीचा यावरुन वाद निर्माण झाला. हा रस्ता रहदारीचा असल्याने तो यापूर्वी ठरलेल्या आराखड्याप्रमाणे करावा, अशी मागणी नागरिकांनी केली. १९७६ च्या आसपास रस्ता रुंदीकरणाचे नियोजन झाले आहे. त्यावेळी नागरिकांना नुकसान भरपाईही दिली आहे. पण काहीजणांनी कालांतराने रस्त्यावर अतिक्रमणे केली आहेत.

बसेस, कारसह जनावरेही रस्त्यावर

आंदोलन, प्रति-आंदोलनानंतर रस्त्याची कामे झाली. सध्या रंकाळा टॉवर ते तांबट कमानीकडे जाणारा एकेरी मार्गच या भागातील नागरिकांनी अडविला आहे. खराडे कॉलेजसमोर खासगी बसेस लावल्या जातात. त्यापुढील मार्गावर नागरिकांनी चारचाकी वाहने, दुचाकी वाहने रस्त्यावर आडव्या-तिडव्या पद्धतीने लावत वाहतूक अडवली आहे. काहीजणांनी रस्त्याला चक्क गोठा बनवला आहे. जवळपास एक किलोमीटर लांबीचा रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे. रस्त्यावर दोन ठिकाणी दूरध्वनी पोल आहेत. त्याचाही वाहतुकीत अडथळा येत आहे. तीन ठिकाणी ड्रेनेजची झाकणे रस्त्यावर आली आहेत. तांबट कमानीकडून रंकाळा टॉवरकडे येणाऱ्या मार्गावर तलावाच्या संरक्षक भिंतीलगत विजेच्या खांबाला जनावरे बांधली जातात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा ठरतो. या मार्गावर वाहतूक मोठी आहे. वारंवार होणाऱ्या कोंडीतून मार्ग काढताना एखाद्यावेळी वाहनांचा संरक्षक भिंतीला धक्का लागण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


काँग्रेसच्या उमेदवारीसाठी गर्दी

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

​बऱ्याच वर्षांपासून एकनिष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांपासून मोठा गट असलेल्या नेत्यांपर्यंत आणि शेतकऱ्यांपासून वकील, डॉक्टर, आर्किटेक्ट अशा उच्चशिक्षित युवक-युवतींनी जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक काँग्रेसकडून लढवण्यासाठी गर्दी केली. दिवसभरात बाराही तालुक्यातील विविध मतदारसंघांसाठी ६२३ इच्छुकांनी मुलाखती दिल्या. जिल्हा परिषदेसाठी २३१ तर पंचायत ​​समितीसाठी ३९२ इच्छुकांनी मुलाखती दिल्या. यामुळे मंगळवारी काँग्रेस कमिटीचा आवार दिवसभर कार्यकर्त्यांनी फुलून गेला होता.

अर्ज भरण्याची प्रक्रिया आठवड्यावर आली आहे. त्यासाठी काँग्रेसने इच्छुकांकडून उमेदवारी मागणी अर्ज घेतले होते. मंगळवारी पक्ष निरीक्षक सदाशिव पाटील, जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, आमदार सतेज पाटील, माजी खासदार जयवंतराव आवळे, माजी आमदार प्रकाश आवाडे, तौफिक मुल्लाणी, शहर अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांच्या उपस्थितीत मुलाखतींना सुरुवात झाली. प्रत्येक तालुक्याला वेळ दिला होता, त्याप्रमाणे मुलाखती घेण्यात आल्या. संबंधित तालुक्यातील नेते उपस्थित होते. प्रत्येक तालुक्यातील इच्छुक समर्थकांसह दाखल झाल्याने त्यांच्या वाहनांमुळे स्टेशन रोडवर वाहतुकीला अनेकवेळा अडथळा होत होता.

करवीर तालुक्यातील इच्छुकांपासून सुरुवात करण्यात आली. इच्छुकांच्या वाटचालीचा आढावा घेण्यात आला. करवीरमधील बहुतांश इच्छुक पी. एन. पाटील व सतेज पाटील यांच्या गटाशी संबंधित असल्याने अनेक इच्छुकांची इत्यंभूत माहिती होती. जागांची संख्या जास्त असल्याने इच्छुकांची संख्याही मोठी होती. त्यामुळे काँग्रेस कमिटीमध्ये उभारण्यासही जागा नव्हती. त्यामुळे निरीक्षकांसमोर नाव व थोडक्यात माहिती सांगण्यात आली. एकापाठोपाठ एक अशा सर्व तालुक्यांतील मुलाखती दिवसभर अखंड सुरू राहिल्या. माहिती सांगत असताना अनेकांनी आवर्जून जातपडताळणी प्रमाणपत्र घेतले असल्याचे नमूद करत होते. निवड समितीकडूनही जातपडताळणी समितीची योग्य माहिती देण्यास सांगितले जात होते. त्यामुळे ज्यांचे प्रमाणपत्र असेल, त्यांचा प्राधान्याने विचार केला जाण्याची दाट शक्यता आहे.

काही मतदार संघात इच्छुक मोठ्या संख्येने होते. त्यांनी मुलाखती दिल्या, पण सर्वजण एकत्र बसून एक उमेदवार निश्चित करून देतो, असे सांगत होते. राशिवडे मतदार संघातील इच्छुकांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे नंतर नेत्यांनी इच्छुकांच्या पातळीवर एकमत करता येते का, हे पाहण्याचे व बैठक घेण्यास सांगितले होते. काही मतदार संघात त्याला चांगला प्रतिसाद मिळाला तर काही इच्छुकांनी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. मुलाखतीनंतर ३१ तारखेला उमेदवार यादी प्रदेश पातळीवरून जाहीर केली जाणार आहे. ज्या मतदार संघात सक्षम एक उमेदवार आहे, अशा ठिकाणची उमेदवारांची नावे त्याआधीही जाहीर होण्याची शक्यता आहे.

नरकेंच्या कार्यकर्त्यांमुळे गोंधळ

करवीर तालुक्यातील मुलाखती सुरू असताना चंद्रदीप नरके यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने मुलाखतीच्या ठिकाणी आले. या कार्यकर्त्यांकडून नरके यांना काँग्रेसकडून कळे मतदार संघातून उमेदवारी देण्याची मागणी करण्यात आली. ही मागणी ऐकल्यानंतर जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी कार्यकर्त्यांना प्रथम ‘त्या तालुक्यातील मुलाखती नाहीत. तसेच ज्या इच्छुकांसाठी मागणी करत आहात, ते कुठे आहेत? ते कोणत्या पक्षात आहेत? त्यांनी पक्षामध्ये प्रवेश करावा, त्यानंतर मुलाखतीचे पाहू. अशा पद्धतीने मुलाखतीमध्ये येऊन दबावतंत्रासारखी मागणी करणे बरोबर नाही,’ अशा शब्दात सुनावले. त्याचवेळी त्या मतदार संघातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही तिथे येऊन समितीसमोर मत मांडले. ‘अचानक येऊन उमेदवारी मागणाऱ्यांना उमेदवारी न देता पक्षातील कार्यकर्त्यांना संधी द्यावी,’ असे सांगितले. या साऱ्या प्रकारामुळे मुलाखतीवेळी काही काळ गोंधळ उडाला. त्यानंतर संदीप नरके काँग्रेस ​कमिटीमध्ये आले होते. पण त्यांनी मुलाखत दिली नसल्याचे सांगण्यात आले.

तालुका जि.प. पंचायत ​समिती

करवीर ८५ १५८

पन्हाळा १८ २०

गगनबावडा १७ २०

राधानगरी ३० ४२

भुदरगड १६ ३५

हातकणंगले२८ ४६

शिरोळ २६ ४५

गडहिंग्लज ८ १४

आजरा ३ १२

चंदगड ८ १३

शाहूवाडी ४ ८

कागल १ २

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तांबडे, मोर्ती यांना राष्ट्रपती पदक

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा पोलिस अधीक्षक महादेव तांबडे यांच्यासह हातकणंगले ठाण्यातील सहायक फौजदार शिवाप्पा मोर्ती यांना सेवेतील उत्कृष्ठ कार्याबद्दल दिले जाणारे राष्ट्रपती पदक जाहीर झाले. मुंबईत होणाऱ्या समारंभात राष्ट्रपती पदकांचे वितरण होणार आहे. एकाचवेळी कोल्हापूर जिल्हा पोलिस दलातील दोघांना हा सन्मान जाहीर झाला आहे.

बीड जिल्ह्यातील तळेगाव (ता. परळी वैजनाथ) येथील महादेव तांबडे १९८९ मध्ये सरळसेवेने उपअधीक्षक पदावर दाखल झाले होते. दोन वर्षे प्रशिक्षणानंतर त्यांनी नक्षलग्रस्त भागात चंद्रपूर येथे काम पाहिले. यानंतर अमरावती, नगर जिल्ह्यातही त्यांनी उपअधीक्षक पदावर काम केले. दनगर येथील महाराष्ट्र पोलिस अकादमीत पोलिस उपअधीक्षकांना प्रशिक्षण देण्याची जबाबदरी त्यांना मिळाली. २००१ मध्ये पोलिस अधीक्षक पदी बढती मिली. औरंगाबाद येथे पोलिस उपायुक्तपदावर त्यांनी काम केले. यापूर्वी त्यांनी नक्षलग्रस्त भागात केलेल्या उत्तम कामगिरीचीही दखल सरकारने घेतली असून, त्यांना खडतर सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.

हातकणंगले पोलिस ठाण्यात सहायक पोलिस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेले शिवाप्पा इराप्पा मोर्ती (मूळ गाव भडगांव, ता. गडहिंग्लज) यांनाही राष्ट्रपती पदक जाहीर झाले. त्यांनी ३९ वर्षाच्या कार्यकालात अनेक गुन्हे उघडकीस आणले आहेत. या दोघांना यांना २६ जानेवारीला मुंबईत होणाऱ्या समारंभात राष्ट्रपती पदकाने गौरवण्यात येणार आहे.

''राष्ट्रपती पदकाने पोलिस दलातील माझ्या २७ वर्षांच्या सेवेचा सन्मान झाला. सर्वोच्च पदकाने माझी जबाबदारी आणखी वाढली आहे. यापुढेही अधिक जोमाने आणि जबाबदारीने काम करू" - महादेव तांबडे, पोलिस अधीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप महाडिक चालवतात का?

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘भारतीय जनता पक्ष हा माजी आमदार महादेवराव महाडिक की राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे नेते चंद्रकांत पाटील चालवितात, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. माजी आमदार महाडिक यांच्या दारात भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील जातात, याचे गौडबंगाल कायम आहे. भाजप महाडिक चालवित असल्याचे दिसते. कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासापेक्षा राजकीय समीकरणे जुळविण्यातच पालकमंत्री आघाडीवर आहेत’ असे टिकास्त्र शिवसेनेचे संपर्कप्रमुख, अरूण दुधवडकर यांनी बुधवारी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत सोडले.

संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर म्हणाले, ‘पालकमंत्री पाटील यांनी कोल्हापूर खड्डेमुक्त करण्याची घोषणा केली होती. मात्र, कोल्हापुरात प्रवेश करताना ढीगभर खड्डेच आहेत. कोल्हापूरचा कायापालट आणि विकासाची घोषणा केलेले पालकमंत्री खोटारडे आहेत. मंत्री पाटील केवळ राजकीय समीकरणे जुळविण्यात आघाडीवर आहेत. कोल्हापूरचा विकास दूरच राहिला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जनतेला खरे कोण आणि खोटे कोण याची ओळख आता पटली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेनेने किती जागा मागाव्यात, हे पालकमंत्री पाटील यांनी आम्हाला सांगू नये. सेना जागांचा प्रस्ताव भाजपला देईल. आमच्या विचारसरणीला पटतील अशा ठिकाणीच युती केली जाईल. अन्यथा, शिवसेना निवडणूक स्वबळावर लढवेल. शिवसेनेत कोणाच्याही इन्कमिंगची गरज नाही. सध्या भाजपमध्ये जात असलेले डोमकावळे अनेकदा सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मातोश्रीवर माथा टेकून गेले आहेत. आमचा पक्ष सक्षम आहे. ज्यांना पक्षातून बाहेर पडायचे आहे, त्यांना चालते व्हा असा आदेश पक्षप्रमुखांनी दिला आहे. ’

यावेळी आमदार चंद्रदीप नरके, आमदार सुजित मिणचेकर, जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे उपस्थित होते.


काँग्रेस, राष्ट्रवादीशी युती नाही

‘जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत घटक पक्षांसोबत युती केली जाईल. मात्र काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेससोबत हातमिळविणी केली जाणार नाही. निवडणूक धनुष्यबाणावरच लढविली जाईल. दोन दिवसांपूर्वी स्वाभिमानी पक्षाचे नेते, खासदार राजू शेट्टी यांचा दूरध्वनी आला होता. मात्र स्वाभिमानीसोबत युती करण्याचा निर्णय अद्यापही घेतलेला नाही,’ असे अरुण दुधवडकर म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बनावट प्रमाणपत्रांचे सात लाभार्थी

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

क्षयरोगाची बनावट कागदपत्रे तयार करून त्याच्या आधारावर रजेची सवलत मिळवण्याचा प्रकार मार्च २०१६ मध्ये उघडकीस आला होता. सात संशयितांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे सरकारी नोकरीत रजेची सवलत घेतल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. यातील मुख्य सूत्रधार बाळासाहेब बाबूराव कांबळे - बेलेकर याच्या अटकेनंतर सरकारी कर्मचाऱ्यांची बोगसगिरी पुन्हा चर्चेत आली आहे. या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, सूत्रधार कांबळे याच्या असहकार्यामुळे पोलिस तपास धिम्या गतीने सुरू आहे.

संशयित बाळासाहेब हा एका मागासवर्गीय संघटनेचा पदाधिकारी असून, सीपीआरमधील काही अधिकाऱ्यांशी त्याचे जवळचे संबंध आहेत. त्यातूनच त्याला सीपीआरमध्ये आरोग्य प्रमाणपत्रांच्या मागणीसाठी मोठी मागणी होत असल्याचे लक्षात आले. काही कर्मचारी रजा मिळवण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत प्रमाणपत्र मिळवण्यासाठी धडपडतात हे लक्षात आल्यानंतर कांबळे याने बोगस प्रमाणपत्र देण्याची शक्कल लढवली. सीपीआरमध्ये थांबून रजेसाठी अर्ज करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हेरून काही हजार रुपयांच्या बदल्यात प्रमाणपत्र देण्याचा व्यवहार तो करीत होतो. सीपीआरमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी उठबस असल्याचे पाहून कर्मचाऱ्यांनीही कांबळेला मोठ्या रकमा दिल्याचे तपासात पुढे आले आहे.

यात माधुरी सुनील कोठावळे (वय ४६, रा. मलकापूर, ता. शाहूवाडी), शहानुल इसबू मुल्ला (वय ४१, रा. शिरोली पुलाची, ता, हातकणंगले), सुनील सदाशिव धनवडे (वय ५७, रा. किणी, ता. हातकणंगले), आशा शंकर आसुळकर (वय ३४, रा. विरळे, ता. शाहुवाडी), धनाजी दत्तात्रय गुरव (वय ४०, रा. खोची. ता. हातकणंगले), श्रीराम सर्जेराव पाटील (वय ३८, रा. लाटवडे, ता. हातकणंगले) आणि जयवंत रघुनाथ पाटील (वय ५०, रा. तळाशी, ता. राधानगरी) या सातजणांनी बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे रजांचा लाभ घेतला. या सर्वांची लक्ष्मीपुरी पोलिसांनी चौकशी केली असून, त्यांच्याकडील बनावट प्रमाणपत्रेही जप्त केली आहेत.

मार्च २०१६ मध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन विभातील एका कर्मचाऱ्याने टीबीचा त्रास होत असल्याने रजेची मागणी केली होती. यासाठी त्याने कांबळे याच्याकडून घेतलेले आरोग्य प्रमाणपत्र जोडले होते. परिवहन विभागातील अधिकाऱ्यांना प्रमाणपत्राबाबत शंका आल्याने त्यांनी जिल्हा क्षयरोग केंद्रातील तत्कालीन अधिकारी डॉ. हर्षला वेदक यांच्याशी संपर्क साधला. परिवहन अधिकाऱ्यांनी शंकास्पद प्रमाणपत्र डॉ. वेदक यांच्याकडे पडताळणीसाठी पाठवले. प्रमाणपत्रासाठी वापरलेला कागद, सही आणि शिक्के बनावट असल्याचे स्पष्ट होताच डॉ. वेदक आणि परिवहन विभागाने गुन्हा दाखल केला होता.

पोलिसांनाच दमदाटी

लक्ष्मीपुरी पोलिसांनी यापूर्वी चारवेळा कांबळेला नोटीस पाठवून चौकशीसाठी हजर राहण्याची सूचना केली होती. मात्र त्याने पोलिसांना दाद दिली नाही. उलट संघटनेचा पदाधिकारी असल्याचे सांगत पोलिसांनाच दमदाटी करण्याचा प्रयत्न केला. अटकेनंतरही त्याने हृदयविकाराचा त्रास असल्याचे कारण पुढे करून चौकशीत टाळाटाळ केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेच्या मुलाखतीस गर्दी

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

डॉक्टर, इंजिनीअर, वकील, शेतकरी, सामाजिक कार्यकर्त्यांसह उच्च शिक्षित युवक, युवतींनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची उमेदवारी शिवसेनेकडे मागितली. सभागृहातील बंद खोलीत ८२७ उमेदवारांच्या मुलाखतीची प्रक्रिया पार पडली. मुलाखतीचा अहवाल पक्षप्रमुखांच्याकडे पाठविण्यात येणार असून उमेदवाराची पहिली यादी येत्या ३० जानेवारीला जाहीर करण्याची शक्यता आहे. सकाळी दहा वाजल्या पासूनच कळंबा येथील अमृतसिद्धी सभागृहात इच्छुक उमेदवारांची गर्दी झाली. शिवसेनेने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीची प्रक्रिया बुधवारी पार पडली.

अमृतसिद्धी सभागृहात बंद खोलीत शिवसेनेच्या मुलाखतीची प्रक्रिया सुरू झाली. दक्षिण मतदारसंघ, करवीर नंतर चंदगड, राधानगरी, भुदरगड, कागल मतदारसंघातील मुलाखती घेण्यात आल्या. बुधवारी संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार सुजित मिणचेकर, जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, प्रा. संजय मंडलिक यांच्या उपस्थितीत मुलाखतींना सुरूवात झाली. आमदार चंद्रदीप नरके गटाशी संबधित होते. जिल्हाप्रमुख संजय पवार आणि विजय देवणे यांच्या संपर्कातील काही इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या. करवीर विधानसभा मतदारसंघात २२६ आणि कागल विधानसभा मतदारसंघात १३१ इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या. आरक्षित मतदारसंघात उमेदवारांच्या जात प्रमाणपत्राची पडताळणी आवर्जून करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा बॅंकेची तिघांनाकारणे दाखवा नोटीस

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा बँकेच्या जिल्हा परिषदेच्या आवारातील शाखेमधून कंत्राटदाराला चार लाख रुपयांऐवजी ४० लाख रुपये अदा करणाऱ्या शाखाधिकाऱ्यांसह ब्रँच अकाऊटंट व क्लार्क अशा तिघांना बँक प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच जादा गेलेले पैसे संबंधित कंत्राटदाराकडून दोन टप्प्यात भरुन घेण्यात आले आहेत.

जिल्हा परिषदेकडून कंत्राटदाराला चार लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला होता. तो धनादेश कंत्राटदाराने दुसऱ्या बँकेत भरला होता. त्या बँकेतून तो धनादेश क्लिअरिंगसाठी आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या आवारातील शाखेतून त्या कंत्राटदाराच्या खात्यावर चार लाखाऐवजी ४० लाख रुपये ट्रान्स्फर करण्यात आले होते. हा प्रकार समजल्यानंतर जिल्हा परिषदेने जिल्हा बँक प्रशासनाला कळवले होते. त्यानुसार त्या कंत्राटदाराचा शोध घेऊन त्याला दोन टप्प्यात पैसे भरण्यास सांगण्यात आले.बुधवारी उर्वरित रक्कम पूर्ववत भरण्यात आली. मात्र या कारभारासाठी कारणीभूत असल्याचे समजून शाखाधिकारी विद्या कुलकर्णी, ब्रँच अकाऊंटंट शब्बीर उस्ताद, क्लार्क विजय अस्वले यांना बँकेने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप चव्हाण यांनी या नोटीस बजावल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जवाहर’च्या एमडींसह दोघांवर गुन्हा

0
0

हरीश यमगर, सांगली

स्वतःकडील जुन्या हजार-पाचशेच्या नोटांमधील रक्कम कारखान्याच्या माध्यमातून बदलून देण्यासाठी दबाव आणून प्रकल्प व्यवस्थापकाला आत्महत्येसप्र प्रवृत्त केल्याप्रकरणी जवाहर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक मनोहर गोपाळ जोशी यांच्यासह दोघांविरोधात शहर पोलिसांनी बुधवारी गुन्हा दाखल केला.

श्रीराम साखर कारखान्याचे प्रकल्प व्यवस्थापक सुनील गजानन पुजारी (वय ४९) यांनी १४ जानेवारी रोजी सांगलीतील एका लॉजमध्ये आत्महत्या केली होती. त्यांनी लिहून ठेवलेल्या सहापानी चिठ्ठीत दोघांची नावे लिहून दोघांमुळेच आत्महत्या करत असल्याचे म्हटले होते.

पुजारी यांनी तृप्ती लॉजमध्ये केलेल्या आत्महत्येवेळी त्यांच्या मृतदेहाजवळ चिठ्ठी सापडली. तपासात धक्कादायक माहिती मिळाल्याचे सांगून पोलिस उपाधिक्षक डॉ. दिपाली काळे यांनी म्हणाल्या, ‘चिठ्ठीतील मजकुरानुसार ८ नोव्हेंबर रोजी नोटबंदीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर मनोहर गोपाळ जोशी यांनी त्यांच्याकडील तीन कोटी रुपयांच्या नोटा बदलून देण्यासाठी कारखान्याच्या यंत्रणेचा वापर करण्याचा माझ्यावर दबाव आणला. १ कोटी २५ लाख रुपयांच्या नोटा मी कारखान्याच्या खात्यावर भरुन बदलून देऊ शकलो. नोटा फलटण येथील बँक ऑफ इंडिया, अॅक्सीस आणि श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँकेत भरल्या. नंतर आणखी रक्कम बदलण्याचा दबाव आला. जोशी दोन्हीकडे ते वरिष्ठ होते. त्यांचे काम नाकारणे शक्य नव्हते. त्यातच फलटण कारखान्याचा कर्मचारी हणमंत गंगाराम मुळीक ( सासकल, फलटण) याने माझ्याविरुध्द दोन तक्रारी केल्या. दोन्ही घटनांमुळे माझा निद्रानाश झाला. नीट झोप येत नसल्याने मी आत्महत्या करीत आहे.

प्राथमिक तपास केल्यानंतर पोलिस निरिक्षक अनिल गुजर यांनी फिर्याद दाखल केली. जोशी आणि मुळीक यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला. पोलिस निरिक्षक प्रकाश गायकवाड यांच्याकडे तपास सोपविल्याचे डॉ. दिपाली काळे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


माले येथील जवानाचा हृदयविकाराने मूत्यू

0
0

म. टा. वृत्तसेवा, पन्हाळा

माले (ता.पन्हाळा) येथील सैन्यदलातील जवान मनोज मारुती सोळसे (वय २६ ) या युवकाचे बुधवारी ह्दयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मनोज २०१२ मध्ये सोलापूर येथून सैन्यदलात भरती झाला होता. १६ आर.आर.बटालियन मध्ये जम्मू काश्मीर मधील पूंछयेथे तो शिपाई पदावर काम करीत होता. गेल्या तीन दिवसापासून तो २० दिवसाच्या सुटीवर गावी (माले ) येथे आला होता. बुधवारी (ता.२५) सकाळी नेहमीप्रमाणे तो न्यू इंग्लिश स्कूलच्या पटांगणावर व्यायाम करीत असताना त्याला सौम्य झटका आल्याने सोबतच्या मित्रांनी कोडोली येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र उपचार सुरु असताना त्याला दुसरा झटका आला व उपचारा दरम्यान दुपारी दोन वाजता त्याची प्राणज्योत मालवली. कोडोली उपजिल्हा रुग्णालय येथे उत्तरीय तपासणीनंतर पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. मनोज हा आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. मनोजच्या मुत्यूची बातमी समजताच गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले. गावातून अंत्ययात्रा काढून रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. १०९ टी.ए.बटालियन च्या जवानांनी सलामी दिली. मनोज अविवाहित होता, त्याच्या पश्चात आजी, आई,वडील व विवाहित बहिण आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कबनूरजवळ स्क्रॅप गोदामाला आग

0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

येथील कबनूर-चंदूर रस्त्यावरील स्क्रॅप गोदामाला लागलेल्या भीषण आगीत गोदामासह संपूर्ण माल जळून खाक झाला. आगीमध्ये सुमारे २० लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. या घटनेची नोंद रात्री उशीरापर्यंत पोलिस ठाण्यात झाली नव्हती. आठ तासांच्या परिश्रमानंतर आग आटोक्यात आली.

इचलकरंजीपासून जवळच असलेल्या कबनूर-चंदूर रस्त्यालगतच ओढ्याजवळ इज्जातुल्ला खान यांचे स्क्रॅप मालाचे मोठे गोदाम आहे. पाच महिन्यापूर्वी त्यांनी गोदम सुरु केले आहे. या गोदामाला मंगळवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास आग लागली. परिसरात आणि गोदामाच्या ठिकाणी वीजेची सोय नसल्याने संपूर्ण अंधारच आहे. रस्त्यावरुन जाणाऱ्या काही नागरिकांनी आग संदर्भातील माहिती खान यांना दिली. खान यांनी घटनास्थळी धाव घेत याबाबतची माहिती अग्निशमन दलाला दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करत आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु गोदामात सूत, कोन, कापडाच्या गाठी, बाचकी, सायझिंगसाठी लागणारे वेस्ट मटेरियल मोठ्या प्रमाणात असल्याने आगीने बघता बघता रौद्ररुप धारण केले. अखेर आठ तासाच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणण्यात जवानांना यश आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एलबीटी नोटिशींप्रश्नी सकारात्मक चर्चा

0
0

कोल्हापूर : व्यापाऱ्यांनी जकातीच्या दराप्रमाणे एलबीटी भरल्यानंतर प्रशासनाने पुन्हा एलबीटीच्या दरात वाढ करून नोटिसा काढल्या आहेत. दर कमी करावा आणि याप्रश्नी लागू केलेल्या नोटिसा मागे घ्याव्यात यासाठी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या नेतृत्वाखाली व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आयुक्त पी. शिवशंकर यांच्यासोबत चर्चा केली. आयुक्तांनी नियमांची माहिती, मार्गदर्शन मागवत असून दोन दिवसांत निर्णय घेऊ असे सांगितले.

महापालिकेने एलबीटी आकारणी, असेसमेंटसह शहरातंर्गत खरेदी-विक्री करणाऱ्या ३००० व्यापाऱ्यांना नोटिसा लागू केल्या आहेत. या नोटिसा अन्यायकारक असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. एलबीटीची दरवाढ रद्द करण्याचा महासभेने ठराव केला होता हे बुधवारी आयुक्तांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. चेंबर ऑफ कॉमर्सचे आनंद माने, उपाध्यक्ष संजय शेटे, कोल्हापूर सराफ संघाचे अध्यक्ष भरत ओसवाल, प्रदीप कापडिया, संजय पाटील, धनंजय दुग्गे, हरिभाई पटेल, शिवाजीराव पोवार, जयेश ओसवाल, अजित मेहता, अजित कोठारी, कुलदीप गायकवाड, राहुल नष्टे आदींचा शिष्टमंडळात समावेश होता. याप्रश्नी पुन्हा बैठक घेण्याचे ठरले. यावेळी नगरसेवक तौफिक मुल्लाणी, एलबीटी अधिकारी सुधाकर चेलवाड, राम काटकर उपस्थित होते. दरम्यान, एलबीटीप्रश्नी नगरविकास खात्याचे प्रधान सचिव नितीन करीर यांची मुंबईत कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे संतोष मंडलेचा, व्यापारी असोसिएशनचे अ​श्विन शहा यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी फेब्रुवारीत बैठकीचे आश्वासन दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खंडपीठासाठी बुधवारी सहा जिल्ह्यात रॅली

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ (सर्किट बेंच) सुरू व्हावे, या मागणीकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी खंडपीठ कृती समितीच्या वतीने एक फेब्रुवारीला कोल्हापूरसह सहा जिल्ह्यात मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीत विविध पक्ष, संघटना, संस्था यासह महाविद्यालयीन विद्यार्थीही सहभागी होणार आहेत. सहा जिल्ह्यातील ६३ तालुक्यांमध्ये एकाच वेळी रॅली काढण्याचे खंडपीठ कृती समितीच्या बैठकीत ठरवण्यात आले. शुक्रवारी (ता. २७) न्यायसंकुलातील सभागृहात बैठक झाली.

कोल्हापुरातील खंडपीठाच्या प्रलंबित प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी १ नोव्हेंबर २०१६ पासून खंडपीठ कृती समितीने साखळी उपोषण सुरू आहे. विविध पक्ष, संघटनांनी या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला, मात्र सरकार दरबारी अजूनही आंदोलनाची दखल घेतली नाही. या आंदोलनाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय खंडपीठ कृती समितीने घेतला असून, याबाबत वकिलांची शुक्रवारी न्यायसंकुलातील सभागृहात बैठक झाली. या बैठकीत १ फेब्रुवारीला होणाऱ्या मोटारसायकल रॅलीचे नियोजन करण्यात आले. त्याचबरोबर आंदोलनाची व्यापकता वाढवण्यासाठी शहरातील सर्वपक्षीय संघटना, संस्था, तालीम मंडळे आणि शैक्षणिक संस्थांनाही रॅलीसाठी निमंत्रित करण्याचे ठरले आहे. यासाठी १८६ संस्थांना पत्र लिहिले असून, लवकरच हे पत्र संबंधित संस्थांना पोहोचवले जाईल. शहरातील सर्व पक्षीय नेत्यांची बैठक घेण्याची जबाबदारी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आर. के. पोवार यांनी स्वीकारली असून, ते ३० जानेवारीला सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेणार आहेत.

एक फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता महापौर हसीना फरास यांच्या उपस्थितीत न्यायसंकुलापासून रॅलीची सुरुवात होणार आहे. एस.पी. ऑफिस, धैर्यप्रसाद हॉल, कावळा नाका, स्टेशन रोड, व्हिनस कॉर्नर, फोर्ड कॉर्नर, उमा टॉकी, टेंबे रोड, मिरजकर तिकटी, महाद्वार रोड, सीपीआर चौक, दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा रॅलीचा मार्ग निश्चित केला आहे. जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांना निवेदन देऊन रॅलीची सांगता होणार आहे, अशी माहिती खंडपीठ कृती समितीने निमंत्रक अॅड. प्रकाश मोरे यांनी दिली.

बैठकीस उपाध्यक्ष अरुण पाटील, माजी अध्यक्ष अॅड. महादेवराव आडगुळे, विवेक घाटगे, पीटर बारदेस्कर, शिवाजीराव राणे आदी उपस्थित होते.

...

चौकट

६ जिल्हे ६३ तालुके

एक फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यातील ६३ तालुक्यांमध्ये एकाच वेळी मोटारसायकल रॅलीला सुरूवात होणार आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले जाईल, तर तालुका स्तरावर तहसीलदार किंवा प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिले जाणार आहे. सर्व पक्षीय संघटना आणि संस्थांच्या सहभागामुळे विराट रॅली निघेल, असा विश्वास निमंत्रक अॅड. मोरे यांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतीच देशाला सावरेल

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘देश सावरायचा असले, तर प्रथम शेतकरी सावरायला हवा, देशाला संपन्नता मिळवून देण्यासाठी ज्याच्या मनगटात ताकद आहे, त्यांनी शेतीबरोबरच कृषिपूरक व्यवसायातून आर्थिक संपन्नता साधावी. कोल्हापूरचा शेतकरी यासाठी सक्षम असून तुम्ही केलेल्या प्रयोगाची निश्चित कॉपी केली जाईल, त्याद्वारे देशाच्या शेती उत्पन्नात भर पडेल आणि हेच तुमचे प्रयोग सेंद्रीय शेतीला पूरक ठरतील,’ असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री पद्मविभूषण शरद पवार यांनी व्यक्त केले. भीमा उद्योग समूहाच्यावतीने आयोजित दहाव्या भीमा कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मेरीवेदर मैदानावर शुक्रवारी भीमा कृषी प्रदर्शनाचे थाटात उद्घाटन झाले.

पवार म्हणाले, ‘शेतकऱ्यांनी देशातील भुकेचा प्रश्न सोडवला. १९८० मध्ये वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात गृहराज्य मंत्री असताना दुष्काळाला सामोरे जावे लागले. त्यावेळी नाईक यांनी माझ्यावर अन्न खात्याची जबाबदारी दिली. तेव्हा अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा येथून आयात केलेला गहू थेट गोदीवरुन रेशनवर पोहोचवला जात होता. त्यावेळी मंत्रालयातून नव्हे, तर प्रत्यक्षात जाऊन काम करावे लागत होते. त्यानंतर प्राध्यापक, संशोधक आणि प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी केलेल्या कामामुळे सध्या देश अनेक कृषी उत्पादन निर्यातीमध्ये क्रमांक एक व दोनचा बनला आहे. मात्र आता शेतीपुढील आव्हाने वाढत आहेत. विकासामुळे पिकाखालील क्षेत्र कमी होत असतानाच, वाढत्या लोकसंख्येच्या भुकेचा प्रश्न मिटवणे महत्त्वाचे आहे. हा प्रश्न मिटवण्यासाठी शेतकऱ्यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे, त्यासाठी त्यांना तसे तंत्रज्ञान उपलब्ध करून द्यावे लागेल. तसेच शेतीवरील बोजाही कमी करण्याची आवश्यकता असून, त्याशिवाय शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार नाही.’

आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, ‘संसदेत ५० वर्षे सतत केलेली कामगिरी, कृषिमंत्री असताना घेतलेले क्रांतिकारी निर्णय आणि आपत्ती व्यवस्थापनामध्ये केलेल्या कामगिरीची दखल घेऊन केंद्र सरकारने शरद पवार यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले. त्यांच्या याच कामगिरीमुळे भारतरत्न पुरस्काराने गौरव होईल.’

माजी आमदार महादेवराव महाडिक म्हणाले, ‘जेव्हा शेतकरी आणि शेतीपूरक व्यवसाय अडचणीत सापडतो, त्यावेळी पवार धावून येतात. पवार यांच्या या दूरदृष्टीमुळेच देशातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळाली.’

खासदार धनंजय महाडिक म्हणाले, ‘पवार यांनी राष्ट्रीय फलोत्पादन योजना राबविण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे राज्यात अनेक ठिकाणी फळबागा फुलल्या. सध्या ही योजना बंद असली, तरी त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे शेतकऱ्यांची आर्थिक व्यवस्था सुधारली आहे. कृषी क्षेत्रात घेतलेल्या क्रांतिकारी निर्णयांची प्रेरणा घेऊन कृषी प्रदर्शन भरवण्याची संकल्पना सुचली.’

यावेळी महापौर हसीना फरास यांनी मनोगत व्यक्त केले. उद्घाटन समारंभास आमदार संध्यादेवी कुपेकर, अमल महाडिक, भारत भालके, ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, निवेदिता माने, माजी आमदार के. पी. पाटील, ‘गोकुळ’चे संचालक रवींद्र आपटे, अरुण डोंगळे, ‘भोगावती’चे माजी चेअरमन धैर्यशील पाटील-कौलवकर, राष्ट्रवादीच्या जिल्हा महिला अध्यक्षा संगीता खाडे, अॅड. सुरेश कुराडे, नगरसेवक सत्यजित कदम, विजय सूर्यवंशी, किरण शिराळे, डॉ. नंदाताई बाभूळकर, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी, बी. एम. पाटील-मुगळीकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबूराव हजारे, आदी उपस्थित होते.

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी स्वागत केले. शुभदा हिरेमठ यांनी सूत्रसंचालन केले. ‘गोकुळ’चे संचालक रामराजे कुपेकर यांनी आभार मानले


कष्टाचा उचित सन्मान

उद्घाटन समारंभावे‍ळी डॉ. जे. पी. पाटील यांना ‘भीमा कृषी जीवन गौरव’, निवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अजित पाटील, तर वैशाली सर्जेराव पाटील, काशीबाई गोविंद मोरे, रूपाली पांडुरंग सावंत व लक्ष्मी सूर्यकांत पाटील यांचा शेती क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल जिजामाता शेतीभूषण पुरस्कार देऊन गौरव केला.


आम्हाला मात्र उठाबशा काढाव्या लागतात

नुकत्याच झालेल्या नगरपालिका व आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये आमदार मुश्रीफ यांची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. विशेषत: कागल विधानसभा मतदारसंघात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांची चांगलीच कोंडी केली आहे. या चक्रव्यूहातून बाहेर पडणार असल्याचे मुश्रीफ सातत्याने सांगत असले तरी पवार यांच्या ५० वर्षांच्या विनापराजय राजकीय वाटचालीचा आढावा घेताना आम्हाला मात्र एक दोन टर्म झाली की, चांगल्याच उठाबशा काढव्या लागतात, याची स्वत: कबुली दिल्यानंतर सभागृहात प्रचंड हशा उमटली.


कोल्हापूरचं पाणीच वेगळं

शेती क्षेत्रातील कामगिरीबद्दल ज्येष्ठ बंधू आप्पासाहेब पवार यांना पद्मश्री, वृत्तपत्र क्षेत्रातील कामगिरीबद्दल प्रतापराव पवार यांना पद्मश्री, तर आपल्याला पद्मविभूषण पुरस्कार मिळाला आहे. सार्वजनिक जीवनात कौतुकास्पद काम केल्याबद्दल पवार कुटुंबातील तिघांना सर्वोच्च पुरस्कार मिळाले आहेत, त्याचे कारण कोल्हापूर आहे. माझ्या आईचा जन्म आणि शिक्षण कोल्हापुरात झाल्याचे सांगत पवार यांनी कोल्हापूरचं पाणीच वेगळं असल्याचे सांगताच उपस्थितांनी चांगलीच दाद दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images