Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

नगरसेवकांची याचिका फेटाळली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मुदतीत जातवैधता प्रमाणपत्र सादर न केलेल्या नगरसेवकांच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात शुक्रवारी सुनावणी झाली. प्रमाणपत्र सादर न केलेल्या वीस नगरसेवकांवर पद रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या कारवाईला स्थगिती मिळावी ही सदस्यांची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली. मात्र, त्याचवेळी या नगरसेवकांच्या जात वैधता प्रमाणपत्रासंदर्भात दोन आठवड्यात म्हणणे मांडण्याचे आदेश राज्य सरकारला दिले. याप्रश्नी पंधरा दिवसांनी सुप्रीम कोर्टात सुनावणी होईल. दरम्यान, या निर्णयामुळे नगरसेवकांचे धाबे दणाणले आहे.

सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती चल्लरामेश्वर व न्यायमूर्ती सप्रे यांच्यासमोर सुनावणी झाली. आरक्षित प्रभागातून निवडून आल्यानंतर सहा महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास नगरसेवक पद रद्द होऊ शकते असा हायकोर्टाने आदेश दिला आहे. हायकोर्टाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने राज्य सरकारच्या नगर विकास विभागाला मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केलेल्या नगरसेवकांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. नगर विकास विभागाने महापालिकेकडून दोन वेळेला संबंधित नगरसेवकांचा अहवाल मागवून घेतला आहे. यामुळे वीस नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार कायम आहे.

हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती मिळावी आणि राज्य सरकारला कारवाईस मनाई करावी या संदर्भात वीस नगरसेवकांनी एकत्रितपणे महापौर हसीना फरास यांच्यावतीने सुप्रीम कोर्टात विशेष याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सुप्रीम कोर्टात गुरुवारी पहिल्यांदा सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांच्यावतीने सिनीअर वकील के. व्ही. विश्वनाथ यांनी युक्तीवाद केली. विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने मुदतीत प्रमाणपत्र न दिल्यामुळे नगरसेवकांना सादर करण्यास विलंब झाला. जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने तशी पत्रे दिली आहेत. एकीकडे सहा महिन्यांच्या आत प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असताना दुसरीकडे समितीकडून ती उपलब्ध होत नाहीत. यामुळे राज्य सरकारच्या कायद्यात विसंगती आढळते. कायद्यात सुधारणे करणे आवश्यक असल्याचा युक्तीवाद विश्वनाथ यांनी केला. त्यांना वकील मयांक पांडे यांनी सहाय केले. यानंतर सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला दोन आठवड्यात जात वैधता प्रमाणपत्राविषयी म्हणणे मांडण्याचे आदेश दिले. राज्य सरकारच्या म्हणण्यानंतर याप्रश्नी सुनावणी होणार आहे.

अडचणीत आलेले नगरसेवक

महापौर हसीना फरास, विरोधी पक्षनेते किरण शिराळे, अश्विनी रामाणे, शमा मुल्ला, वृषाली कदम, दीपा मगदूम, रिना कांबळे, स्वाती यवलुजे, सविता घोरपडे, मनीषा कुंभार, अश्विनी बारामते, संदीप नेजदार, सुभाष बुचडे, अफजल पिरजादे, निलेश देसाई, सचिन पाटील, संतोष गायकवाड, विजय खाडे, कमलाकर भोपळे, नियाज खान.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आक्षेपार्ह मजकूर छापला; सनातन प्रभातला नोटीस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ज्येष्ठ कामगार नेते कॉ गोविंदराव पानसरे हत्येचा खटला न्यायालयात सुरू असताना 'सनातन प्रभात'च्या अंकात आक्षेपार्ह मजकूर छापून आल्याबद्दल न्यायालयाने सनातन प्रभातला १७ जानेवारीला नोटीस पाठवली आहे. ही माहिती अतिरिक्त सत्र न्यायाधीश एल.डी. बिले यांनी सुनावणीच्यावेळी आज दिली. नोटीसीचा खुलास करण्यासाठी दहा दिवसांची मुदत दिली आहे. दरम्यान या खटल्यातील दुसरा आरोपी हिंदू जनजागृती समितीचा विरेंद्र तावडे याला पोलिसांनी सुनावणीच्यावेळी न्यायालयात हजर न केल्याबद्दल पोलिसांना जाब विचारला आणि पुढील सुनावणीच्यावेळी (६ फेब्रुवारीला) हजर करण्याचे आदेश दिले आहेत.

शनिवारी पानसरे हत्येची सुनावणी न्यायाधीश बिले यांच्यासमोर झाली. या खटल्यातील प्रमुख आरोपी सनातनचा प्रमुख साधक समीर गायकवाड याला कारागृहात सनातन प्रभातचे अंक, गोमुत्र, जपमाळ व उदबत्ती मिळावी अशी मागणी समीरचे वकील अॅड समीर पटवर्धन यांनी यापूर्वी केली होती. न्यायालयाने सनातनचे अंक व जपमाळ देण्यास परवानगी दिली होती. मात्र सनातनचे अंक परत कारागृहातून आल्याची तक्रार अॅड पटवर्धन यांनी आजच्या सुनावणीच्यावेळी करत कारागृहातून परत आलेले अंक न्यायालयात सादर केले. सनातन प्रभातच्या अंकात आक्षेपार्ह मजकूर आल्याचे न्यायाधीश बिले यांनी अॅड पटवर्धन यांना निदर्शनास आणून दिले. तसेच हा अंक विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे यांना वाचण्यास दिला. अॅड पटवर्धन यांनी प्रसिद्ध झालेल्या मजकुराबद्दल न्यायालयात दिलगिरी व्यक्त केली. न्यायाधीश बिले यांनी आक्षेपार्ह मजकूर छापून आलेल्या मजकुराबद्दल १७ जानेवारीला सनातन प्रभातला नोटीस पाठवली आहे, अशी माहिती दिली. नोटीशीचा खुलासा देण्यास दहा दिवसाची मुदत दिली असल्याचे अॅड पटवर्धन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

दरम्यान या खटल्यातील दुसरा आरोपी डॉ. विरेंद्र तावडे याच्याबाबत काही माहिती मिळत नसल्याने त्याला कोर्टात हजर केले जात नाही असे अॅड पटवर्धन यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. यासंदर्भात सरकारी वकील अॅड राणे यांनी खुलासा केला. तावडेचा ताबा सीबीआयकडे असून त्याला हजर करण्याबाबत येरवडा कारागृहाला कोर्टाने आदेश दिला आहे, असे कळवले आहे. पण तपास यंत्रणा तावडेला हजर करु शकत नाहीत असे सांगितले. पण न्यायालयाने डॉ. तावडे हा दुसरा आरोपी असून त्याच्यावर वॉरंट आहे. तो कोणत्याही कारागृहात हजर असला तरी कोर्टात सुनावणीच्यावेळी हजर करण्यात यावे असे आदेश दिले. तसेच कारागृहाच्या नियमांत बसत असल्यास समीर गायकवाडला गोमुत्र व उदबत्ती पुरवण्याबाबत निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट केले.

कोर्टाला वाटला हा आक्षेपार्ह मजकूर

निरपराध हिंदूत्ववाद्यांना न्यायालयामध्ये दोन वर्षे डांबून ठेवले आहे. त्यांचा छळ केला जातो. असा छळ करणाऱ्यांना हिंदू राष्ट्राची स्थापना झाल्यावर दुप्पट शिक्षा केली जाईल असा मजकूर सनातन प्रभातच्या अंकात प्रसिद्ध झाला आहे, अशी माहिती विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे यांनी पत्रकारांना दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संपत्ती, गुन्हेगारी पार्श्वभूमी झळकणार मतदान केंद्रावर

$
0
0

Gurubal.Mali

@timesgroup.com

Tweet: @gurubalmaliMT

कोल्हापूर ः जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीत प्रत्येक मतदान केंद्रावर यावेळी मतदारसंघातील सर्व उमेदवाराची संपत्ती आणि त्याच्या गुन्हेगारी तपशील झळकणार आहे. यामुळे मतदान करण्यापूर्वी मतदाराला ‘सावधान, पहा आणि मगच मतदान करा,’चा इशाराच मिळणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतलेल्या या निर्णयाने इच्छुक उमेदवारांना घाम फुटला आहे.

सध्या राज्यात महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीची धामधूम सुरू आहे. पुढील महिन्यात दोन टप्प्यात या निवडणुका होणार आहेत. यासाठी आचारसंहिता जाहीर करण्यात आली आहे. यंदा प्रथमच उमेदवाराचे शिक्षण, स्थावर व जंगम मालमत्ता आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी याबाबतची माहिती प्रत्येक मतदान केंद्रावर लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही सर्व माहिती उमेदवारी अर्ज भरताना शपथपत्राव्दारे देणे बंधनकारक आहे. त्यामुळे उमेदवाराची ही माहिती आता प्रत्येक मतदाराला कळणार आहे. यामुळे संपत्ती, शिक्षण किंवा गुन्हा दडवून ठेवण्याचा प्रयत्न यापुढे अंगलट येण्याची शक्यता आहे. कारण चुकीची माहिती दिल्यास आणि याबाबत आक्षेप घेतल्यास पद धोक्यात येणार आहे.

अनेक उमेदवाराची संपत्ती निवडून आल्यानंतर अचानक वाढते. ती नेमकी किती वाढली हे प्रत्येक मतदाराला कळणार आहे. यामुळे उमेदवाराची मोठी पंचाइत होणार आहे. संपत्तीचा वापर मतदारांना आ​कर्षित करण्यासाठी होतो. यामुळे प्रतिस्पर्धी उमेदवारालाही बरीच गुपिते कळणार आहेत. गुन्हा दडवण्याचा प्रयत्न बहुतांशी उमेदवारांकडून होत असतो. त्यालाही आता आळा बसणार आहे. यापूर्वी ही सर्व माहिती ऑनलाइन भरलेली असायची. पण, ती लोकांना सहजासहजी मिळत नव्हती. आता ती प्रत्येक मतदान केंद्रावर झळकणार असल्याने उमेदवाराचे ‘गुन्हेगारी कर्तृत्व’ दिसणार आहे. मतदानादिवशी उमेदवारांची ही माहिती कळणार असल्याने मतदान करताना मानसिकता तयार होण्यास बरी​च मदत होणार आहे.


मुख्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी या नव्या निर्णयाची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे ज्या मतदारसंघातील उमेदवार असेल तेथील सर्व केंद्रावर त्याची माहिती पाहता येणार आहे.

वि​वेक आगवणे, मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेश्मा, नंदिनीला सुवर्णपदक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बिहारमधील पाटणा येथे झालेल्या महिलांच्या राष्ट्रीय ज्युनिअर कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरच्या रेश्मा माने व नंदिनी साळोखे यांनी सुवर्णपदके पटकावली. शनिवारी स्पर्धेचे अंतिम सामने झाले. रेश्माने ६३ किलो गटात हरियाणाच्या टिनाला दोन्ही बगलेतून हात घालून हप्ते डावावर चितपट केले. तर, ५१ किलो गटात नंदिनीने उत्तर प्रदेशच्या आरझू तोमरला १४ सेकंदांत कलाजंग डावावर आस्मान दाखवत सुवर्णपदकाला गवसणी घातली. रेश्मा राष्ट्रकुल संकुलाचे प्रशिक्षक राम सारंग यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे, तर नंदिनी मुरगूडच्या कै. सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय कुस्ती संकुलात (भारतीय खेल प्राधिकरण) दादासाहेब लवटे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चंदगड, हातकणंगलेत भाजपबरोबर राष्ट्रवादी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यात स्थानिक आघाड्यांच्या राजकारणाचे पेव फुटले असून, तालुक्यातील विकासासाठी राजकारण बाजूला ठेवत असल्याचे सांगत राष्ट्रवादीतील कुपेकर आणि माने गटाने रविवारी भाजपशी हातमिळवणी केली. ‘चंदगड तालुक्यात भाजप, राष्ट्रवादीची चंदगड विकास आघाडी तर हातकणंगले तालुक्यात भाजप, ताराराणी आघाडी, जनसुराज्य पक्ष व राष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता माने यांच्या गटाची युवक क्रांती आघाडी झाली आहे. जिल्ह्यात जनसुराज्य पक्ष, ताराराणी आघाडी तसेच अशा स्थानिक आघाड्यांच्या सहकार्याने भाजप निवडणूक लढवेल,’ असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी सांगितले. स्थानिक आघाड्या केवळ जिल्हा परिषदेच्या राजकारणापुरत्या मर्यादित असल्याचे सांगितले असले तरी काहींनी आघाडी करुन येतो, नंतर पाहू असे सांगितल्याने भविष्यात आणखी काहींचा भाजप प्रवेश होईल, असे सूचक वक्तव्यही केले.

आघाडीचे जागा वाटपही झाले असून भाजप ४४ जागा तर जनसुराज्य पक्ष १२, ताराराणी आघाडी ५, कुपेकर, माने, गोपाळ पाटील गट प्रत्येकी दोन जागा लढवणार आहे. २८ तारखेला ही आघाडी आणि पक्षाच्यावतीने उमेदवारांच्या घोषणा करण्यात येणार आहे. ‘अजूनही शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रासप, रिपाइं अशा मित्रपक्षांशी बोलणी सुरू असून भाजपच्या कोट्यातील जागा त्यांना देण्यात येणार आहेत. भाजपची आघाडी ६७ पैकी ५० जागा जिंकेल,’ असा विश्वास मंत्री पाटील यांनी व्यक्त केला.

दरम्यान, कागलमधील गोकुळचे संचालक रणजितसिंह पाटील यांच्यासह जिल्हा परिषद माजी अध्यक्ष डी. सी. पाटील, महावीर गाट यांचा पालकमंत्री पाटील, आमदार सुरेश हाळवणकर, समरजितसिंह घाटगे यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश झाला. रणजितसिंह पाटील यांचा गट यापुढे तालुक्यात विधानसभा व लोकसभा निवडणूक समरजितसिंह घाटगे यांच्यासोबत राहील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता लक्ष्य भुदरगड, राधानगरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भाजपने जनसुराज्य पक्षानंतर राष्ट्रवादीच्या गटांना सोबत घेत जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतील बेरजेच्या राजकारणात जोरदार आघाडी घेतली आहे. चंदगड, हातकणंगलेमध्ये स्थानिक आघाडी झाल्यानंतर गोकुळचे संचालक रणजित पाटील यांनी भाजप प्रवेश केला. ‘आणखी चार दिवसांत भुदरगड, राधानगरीमध्ये मोठे खिंडार पडेल, अशी व्यवस्था केली आहे. तसेच २८ तारखेला जिल्हा हादरुन जाईल, असा मोठा धक्का देण्यात येईल. तो जिल्ह्यातील जनतेला फारच अनपेक्षित असेल. त्यामुळे तो पेलवणारही नाही,’ असे वक्तव्य पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

ताराराणी आघाडी व जनसुराज्य पक्ष दोन्ही भाजपसोबत असल्याचे स्पष्ट झाले होते. पण गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीतील काही गट ठिकठिकाणी भाजपशी आघाडी करण्याची चर्चा होती. खुद्द खासदार धनंजय महाडिक यांनी दक्षिणमध्ये भाजपसोबत इतर पक्षांना एकत्रित करण्याचा मनसुबा बोलून दाखवला होता. त्यानंतर चंदगडमधील कुपेकर गट व हातकणंगलेमधील माजी खासदार माने गट यांचीही चर्चा सुरू होती. त्यानुसार रविवारी कुपेकर गटाच्या संध्यादेवी बाभूळकर, माने गटाचे धैर्यशील माने यांच्या उपस्थितीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपबरोबर या गटाची स्थानिक पातळीवर आघाडी झाल्याची घोषणा केली. तसेच जिल्हा परिषदेच्या राजकारणासाठी या आघाड्या आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काहींनी प्रवेश केला आहे. निवडणुकीनंतरही पक्ष प्रवेश होत राहतील, असेही पाटील यांनी सूचकपणे सांगितले. यावेळी आमदार अमल महाडिक, ताराराणी आघाडीचे स्वरुप महाडिक, जनसुराज्यचे विजयसिंह जाधव, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अरुण इंगवले, गोकुळ संचालक रामराजे कुपेकर, गोपाळ पाटील,​अनिल यादव उपस्थित होते.

त्याचवेळी बऱ्याच दिवसांपासून चर्चा असलेले गोकुळचे संचालक रणजित पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डी. सी. पाटील, उद्योगपती महावीर गाट, राष्ट्रवादीचे भुदरगड तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष देवराज बारदेस्कर यांचा भाजप प्रवेश झाला. कागलमधील राजकारणात गटांना महत्त्व असून तेथील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तोंडावर गोकुळचे संचालक रणजित पाटील यांच्या गटाने भाजप प्रवेश केल्याने तेथील राजकारणावर परिणाम होण्याची चिन्हे आहेत. या गटाच्या प्रवेशामुळे तेथील आमदार हसन मुश्रीफ व शिवसेनेचे प्रा. संजय मंडलिक यांच्या मैत्रीपुर्ण राजकारणाला फटका बसण्याची शक्यता आहे. पाटील यांच्या प्रवेशामुळे समरजितसिंह घाटगे तसेच एकूणच भाजपला बळ मिळणार आहे. यामध्ये संजय घाटगे यांची आता भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

या प्रवेशानंतर पालकमंत्री पाटील यांनी अजून काहींचे प्रवेश होणार असल्याचे सांगितले आहे. त्यांच्या वक्तव्यातून भुदरगड, राधानगरी तालुक्यातील नेत्यांवर लक्ष केंद्रीत केल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे तेथील राष्ट्रवादीच्या ताकदीला खिळखिळी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. या तालुक्यातून मोठे नेते भाजपमध्ये जाण्याच्या मार्गावर आहेत. येत्या आठवडाभरात त्यांचा निर्णय होणार आहे. रविवारी संभाजी मोरे, अनिल शिरोळकर, विक्रांतसिंह कदम, रायगोंड पाटील, प्रभाकर पाटील, उत्तम मिठारी यांनी प्रवेश केला

चर्चा संपलेली नाही

शिवसेना, स्वाभिमानी संघटना, रासप, रिपाइं यांच्याशी चर्चा सुरू आहे. शिवसेनेशी चर्चा संपलेली नसून मुंबईकडे लक्ष लागले आहे. सर्व घटक पक्षांना सामावून घेण्यात येणार असून चार दिवसात चर्चा पुर्ण होईल.

शेट्टी-खोत एकत्रच रहावेत

राजू शेट्टी व सदाभाऊ खोत यांच्यात अंतर निर्माण होऊ नये असेच प्रामाणिकपणे वाटते. सरकार ठिकाणावर राहण्यासाठी संघटनेच्यावतीने चालवण्यात येणाऱ्या चळवळीची आवश्यकता आहे. त्यामुळे या दोघांमधील एकजण बाजूला गेला तर चळवळ कमकुवत होईल. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे, असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.


संदिग्धता विरोधकांमध्ये

‘दक्षिण’ मधील आघाडीच्या संदिग्धतेबाबत पाटील म्हणाले, सारे काही व्यवस्थित होत आहे. आमच्यामध्ये कोणतीही संदिग्धता नाही. ​विरोधकांमध्येच संदिग्धता असल्याने काही प्रकार सुरू आहेत. तसेच राष्ट्रवादीतील जे जेलमध्ये जाणार आहेत ते गेले आहेत. जे आले आहेत, त्यातील कुणी जाणारे नाहीत.

राजकारण बाजूला ठेवले

राज्यात व केंद्रात भाजपचे सरकार असल्याने आम्ही विरोधी बाकावर आहोत. तरीही राज्यातून विकास कामांसाठी निधीची मागणी केली व मिळाला नाही असे झालेले नाही. विकासाचा मुद्दा विचारात घेऊन राजकारण बाजूला ठेवून आघाडी केली आहे. या आघाडीच्या माध्यमातून विकास कामे करु शकू.

नंदिनी बाभूळकर, राष्ट्रवादीच्या नेत्या

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हिंजवडी बस गडहिंग्लजमपर्यंत

$
0
0

Sachin.Yadav@timesgroup.com

tweet : @sachinyadavMT

कोल्हापूर : कागल, निपाणी, संकेश्वर, गडहिंग्लज परिसरात आयटीयन्संसाठी सुरू करण्यात आलेली हिंजवडी-कोल्हापूर ही एसटी बस आता गडहिंग्लजपर्यंत धावणार आहे. येत्या २५ जानेवापासून दर शुक्रवारी ही सेवा प्रवाशांच्या सेवेत रूजू होत आहे. हिंजवडी-कोल्हापूर बस कोल्हापुरात आल्यानंतर येथून काही बसेस सुटतील, तर काही बसेस थेट हिंजवडीतून सुटणार आहेत. एसटीच्या गडहिंग्लज आगारातर्फे ही सुविधा दिली जाणार आहे. आतापर्यंत ३०० नोकरदारांनी हिंजवडी ग्रुपच्या व्हॉटस्अॅपवर नोंदणी केली आहे. याच दिवशी हिंजवडी-बेळगांव एसटीही सुरू केली जाणार आहे.

कोल्हापुरातून हिंजवडी आयटी पार्क येथे नोकरीनिमित्त जाणारे कोल्हापूर आणि परिसरातील चारशेहून अधिक नोकरदार आहेत. त्यांच्यासाठी हिंजवडी-कोल्हापूर एसटीची व्यवस्था आहे. आयटीयन्स कर्मचारी कागल, संकेश्वर, निपाणी, गडहिंग्जल परिसरात आहे. या ठिकाणच्या उमेदवारांची व्यवस्था करण्यासाठी २५ जानेवारीला बससेवा सुरू करण्यात येत आहे. हिंजवडी येथून ही बससेवा दर शुक्रवारी सायंकाळी ४ वाजून ४० मिनिटांनी धावणार आहे. आयटीयन्सचा पाच दिवसांचा आठवडा असल्याने दर शुक्रवारी आयटीयन्स गावांकडे परततात. पुन्हा परतीचा प्रवास रविवारी रात्री केला जातो. दर रविवारी रात्री कोल्हापूर बसस्थानकातून हिंजवडीसाठी बससेवा आहे. या हिंजवडी- गडहिंग्लज या बससेवेला चांगला प्रतिसाद मिळाल्यास हिंजवडी ते कोल्हापूर जाण्यासाठी आणि येण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. या बससेवेच ऑनलाइन बुकिंग केले जात आहे.

हिंजवडी-गडहिंग्लज आयटीयन्स बससेवेसह हिंजवडी-बेळगांव पर्यंतचे प्रवासाचे कनेक्शन जोडले जाणार आहे. कर्नाटकातील मोठ्या प्रमाणात उमेदवार पुणे येथे नोकरीसाठी आहेत. त्यांच्यासाठी हिंजवडी-बेळगाव आयटीयन्स बससेवाही याच दिवशी सुरू केली जाणार आहे. सध्या या बससेवेसाठी दहा नोकरदारांचा प्रतिसाद मिळाला आहे. दोन्ही मार्गावरील एसटी सेवा यशस्वी झाल्यास हिंजवडी, कोल्हापूर, गडहिंग्लज ते बेळगाव या ठिकाणापर्यंत आयटीयन्सला सुविधा उपलब्ध होणार आहे. एसटीत ४४ आसनक्षमता आहे. प्रवाशांची संख्या वाढल्यास या मार्गावर फेऱ्या वाढविण्याचा विचार एसटीचे विभागीय कार्यालय करणार आहे. या बससेवेसाठी विभागीय कार्यालयातील अतुल मोरे, स्थानकप्रमुख अभय कदम, हिंजवडी व्हॉटस्अॅप ग्रुपचे कपील गुरव, अक्षय मोर्चे यांनी पुढाकार घेतला आहे. तर बेळगाव आयटीयन्ससाठी समर स्वामी यांनी पुढाकार घेतला आहे.


तिकीट दर

हिंजवडी- कागल: २९६

हिंजवडी-गडहिंग्जल: ३६१

हिंजवडी- निपाणी: ३२३

हिंजवडी- संकेश्वर: ३४३

हिंजवडी- हत्तरगी: ३५७

हिंजवडी-बेळगाव: ३८६

००

या मार्गांवर थांबणार एसटी

हिंजवडी फेज: ३

हिंजवडी फेज: २

हिंजवडी फेज: १

हिंजवडी चौक

वाकड पूल

बाणेर, बालेवाडी

पाषाण रोड

चांदणी चौक

नावले पूल


हिंजवडी ते कोल्हापूर मार्गावर आयटीयन्ससाठी एसटीसेवा सुरू आहे. कोल्हापूर ते गडहिंग्लज मार्गावरील अनेकजण हिंजवडी आयटी पार्क येथे नोकरी करतात. त्यांना ही बससेवा उपयोगी पडणार आहे.

पी. डी. कदम, आगार व्यवस्थापक गडहिंग्लज

या एसटीचे सर्व बुकिंग ऑनलाइन केले जात आहे. अनेक आयटीयन्स कागल, निपाणी, संकेश्वर, गडहिंग्लज भागातून येतात. त्यांच्यासाठी एसटीची व्यवस्था नव्हती. त्यासाठी एसटी प्रशासनला विनंती करण्यात आली. ही विनंती मान्य करून बससेवा दाखल होत आहे.

कपील गुरव, आयटीयन्स

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यसेवा, पोस्टाची एकाच दिवशी परीक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्य लोकसेवा आयोगाच्यावतीने होणारी विक्रीकर निरीक्षक आणि महाराष्ट्र पोस्ट विभागाच्यावतीने होणारी टंकलेखन परीक्षा रविवारी (ता. २९) एकाच दिवशी होणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. लोकसेवा आयोग आणि पोस्ट विभागामध्ये समन्वय नसल्याने राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना एका परीक्षेला मुकावे लागणार आहे.

राज्य लोकसेवा आयोगाने तीन महिन्यापूर्वी वेळापत्रक जाहीर केले होते. वेळापत्रकानुसार विक्रीकर निरीक्षक पदासाठी रविवारी (ता. २९) पूर्व परीक्षा होणार आहे. या परीक्षेची तयारी सुरू असतानाच वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडलेल्या पोस्ट विभागाच्या टंकलेखन परीक्षा रविवारी होणारी असल्याची माहिती संकेतस्थळावरुन पात्र उमेदवारांना दिली आहे. पोस्टाची परीक्षा मुंबई येथे तर विक्रीकर निरीक्षक परीक्षा प्रत्येक जिल्ह्यात होणार असल्याने विद्यार्थ्यांची मोठी अडचण झाली आहे.

याबाबत बोलताना परीक्षार्थी तौसिफ शेख म्हणाले, ‘महाराष्ट्र पोस्ट विभागाच्यावतीने प्रथमच राज्यनिहाय लेखी परीक्षा २०१४ मध्ये घेतली होती. परीक्षेचा निकाल लागल्यानंतर उत्तीर्ण उमेदवारांची टंकलेखन परीक्षा झाली. टंकलेखन परीक्षेचा निकाल घाईगडबडीत लावल्यानंतर याविरोधात काही उमेदवारांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने पुन्हा टंकलेखन परीक्षा घेण्याचे आदेश दिले. ७०० जागांसाठी सात हजार विद्यार्थ्यांना पात्रही ठरवण्यात आले. मात्र याबाबत इतर परीक्षांची माहिती न घेताच पोस्टाने संकेतस्थळावरून टंकलेखन परीक्षा रविवारी होणार असल्याचे गुरुवारी प्रसिद्ध केले. पोस्टाच्या या गोंधळामुळे नेमक्या कोणत्या परीक्षांना सामोरे जायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत मुंबई येथील पोस्ट कार्यालयात काही पात्र उमेदवारांनी संपर्क साधला, पण त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यामुळे ऐन परीक्षेचा काळात स्पर्धा परीक्षार्थींमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तुमच्या पालख्या खांद्यावर का घ्यायच्या ?

$
0
0

म.टा.वृत्तसेवा,जयसिंगपूर

‘राज्याच्या राजकारणात काय चाललेय याच्याशी आम्हाला आता देणेघेणे नाही. कोणाशीही युती किंवा आघाडी करण्याचे बंधन आमच्यावर नाही. राज्यभरात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपने कोणत्याही जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आघाडीबाबत विचारणा केलेली नाही. त्यामुळे सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात आम्ही त्यांच्या पालख्या खांद्यावर का घ्यायच्या,’ असा खडा सवाल खासदार राजू शेट्टी यांनी केला.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी आणि निवडणुकीची व्यूहरचना आखण्यासाठी उदगाव (ता.शिरोळ) येथे कल्पवृक्ष गार्डनमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. याप्रसंगी कृषि व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत प्रमुख उपस्थित होते.

खासदार शेट्टी म्हणाले, ‘राज्यकर्ते कोणत्याही पक्षाचे असोत त्यांना चळवळीतील कार्यकर्त्यांची नेहमी भीती वाटते. त्यामुळे याही निवडणुकीत संघर्ष अटळ आहे. आम्ही वाघ आहोत आणि वाघ हा एकटाच राहतो. आमची फक्त मदत घ्यायची आणि नंतर आमच्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून द्यायचे, हे आता चालणार नाही. भाजपने तर कोल्हापूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षांशी, गटांशी आघाड्या केल्या आहेत. हे कसले राजकारण चालविले आहे?’

ते पुढे म्हणाले, ‘या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रत्येक उमेदवाराच्या प्रचारासाठी मी जातीने प्रचारसभा घेणार आहे. कोणत्याही परिस्थितीत स्वाभिमानीचे उमेदवार मोठ्या संख्येने पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांमध्ये जावेत, यासाठी चळवळीची ताकद त्यांच्यामागे उभी करणार आहे. लोकसभेसाठी मदत करणारे विविध विभागांतील लोक त्यांच्याशी आघाडी न केल्यास नाराज होतील व लोकसभेत पराभव होईल, ही भीती कार्यकर्त्यांनी बाळगू नये. लोकसभेत माझा पराभव झाला, तरी चालेल. मात्र, चळवळीतील कार्यकर्त्यांच्या विजयासाठी मी स्वत: जिवाचे रान करणार आहे.’

मंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, ‘ मी सरकारमध्ये असताना सरकारचा प्रतिनिधी आहे. बाहेर मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे संघटनेच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी राज्यभर सभा घेणार आहे. चळवळीतील लढाऊ कार्यकर्त्यांना जिल्हा परिषद व पंचायत समित्यांत पाठविण्याची संधी निवडणुकीच्या निमित्ताने चालून आली आहे. निवडणूक ही लोकशाहीतील लढाई आहे. त्यामुळे ही लढाई जिंकण्यासाठी जे काही करावे लागेल, ते करण्याची तयारी आम्ही केली आहे. मंत्री झालो, म्हणून मी नरमलो नाही. मी योग्य वेळी योग्य ते आणि परखड बोलणारच. शत्रू कितीही मोठा असला, तरी तो अंगावर आल्यावर त्याला शिंगावर घेणारच.’

यावेळी स्वाभिमानी पक्षाचे राज्यसचिव राजेंद्र गड्ड्यान्नावर, जिल्हाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष भगवान काटे, सांगली जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, जिल्हा परिषद सदस्य सावकर मादनाईक, अजित पवार, पंचायत समिती सभापती सुवर्णा अपराज यांच्यासह पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली. स्वागत आदिनाथ हेमगिरे यांनी केले. तर प्रास्ताविक आण्णासाहेब चौगुले यांनी केले. मेळाव्यात उमेदवार निवडीचे अधिकारी खासदार राजू शेट्टी यांना देण्यात आले.

...

चौकट

स्वाभिमानीची भूमिका निर्णायक

या मेळाव्यात मते मांडताना सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी स्थानिक परिस्थिती पाहून आघाड्या कराव्यात, अशी सूचना केली. काही कार्यकर्त्यांनी निवडणूक स्वबळावरच लढविण्याची मागणी केली. त्यावर, ‘जिल्हा परिषदेत कोणत्याही एका पक्षाचे किंवा आघाडीचे बहुमत असणार नाही. यामुळे निवडणुकीनंतरच खऱ्या अर्थाने आघाड्या होणार आहेत. येथे बहुमत होणार नसल्याने स्वाभिमानीची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे खासदार शेट्टी म्हणाले.

...

चौकट-

अधिकाधिक जागा हेच टार्गेट

निवडणुकीत अधिकाधिक जागा मिळविणे हेच स्वाभिमानीचे टार्गेट आहे. चळवळीत रक्त सांडणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना बळ देऊन त्यांना निवडून द्यायचे आहे. संघटनेची ताकद कुणाचे हात बळकट करण्यासाठी नाही, असेही खासदार शेट्टी म्हणाले. निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर संघटनेने वेगवेगळ्या समित्या केल्या आहेत. कार्यकर्त्यांनी गावनिहाय बैठका घेऊन सूचना घ्याव्यात. यानंतर लोकसहभागातून निवडणुकीस सामोरे जावू ,असेही त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युवतीची आत्महत्या

$
0
0

इचलकरंजी

गणेशनगर परिसरातील अल्पवयीन मुलीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मुस्कान दगडू फरीदे (वय १७) असे तिचे नाव आहे. ही घटना रविवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. याबाबतची नोंद शहापूर पोलिस ठाण्यात झाली आहे. गणेशनगर परिसरात येथील दगडू फरीदे यांची मुलगी मुस्कान हिने घरी कोणी नसल्याचे पाहून आढ्यास गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. दुपारी पावणेबारा वाजण्याच्या सुमारास भाऊ घरी आल्यानंतर ही घटना निदर्शनास आली. उपचारासाठी मुस्कान हिला तातडीने पालिकेच्या आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकिय अधिकाऱ्यांनी सांगितले. याबाबची वर्दी त्यांनी शहापूर पोलिस ठाण्यात दिली आहे. ती महाविद्यालयात शिक्षण घेत होती. आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा परिषदेवरशिवसेनेचा भगवा फडकेल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘जिल्हा परिषद मतदारसंघांमध्ये शिवसेनेचे पाच आमदार आहेत. करवीर, गडहिंग्लज, राधानगरीर-भुदरड, चंदगड आदी तालुक्यांत शिवसेनेची मोठी ताकद असल्याने जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकवेल,’ असा विश्वास आमदार राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला. ज्या-ज्या वेळी युतीवरुन सेनेला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी सेनेने भरघोस यश मिळवले असल्याचेही ते म्हणाले.

आमदार क्षीरसागर म्हणाले, ‘जिल्ह्यातील राजकारणाची स्थिती नाजूक वळणावर पोहोचली आहे. कोण कोणत्या पक्षाकडून लढणार आहे, याचा पत्ताच लागत नाही. अनेकजण विविध पक्षांत प्रवेश करत आहेत. त्यामुळे राजकीय समीकरणे बदलणार आहेत. तरीही निष्ठावंत शिवसैनिकांचा पक्षावर विश्वास कायम आहे. शहर वगळता जिल्ह्यातील पाच आमदारांचे मतदारसंघ जिल्हा परिषद मतदारसंघात आहेत. त्यामुळे प्रत्येक आमदार आपल्या मतदारसंघात ताकदीने निवडणुकीला सामोरे जाणार आहे. पक्षातील इच्छुकांची संख्या पाहता निवडणूक अवघड नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेवर भगवाच पडकणार आहे.’

‘मुंबई महापालिका निवडणुकीच्या युतीबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असली, तरी काही झाले तरी मुंबई महापालिकेचा महापौर शिवसेनेचाच होणार असल्याचा आशावाद आमदार क्षीरसागर यांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्येष्ठ रंगकर्मी विजय शंकर पोवार यांचे निधन

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त। कोल्हापूर

'खजिन्याची विहीर' या प्रसिद्ध नाटकाचे सादरकर्ते, ज्येष्ठ रंगकर्मी आणि कवी विजय शंकर पोवार यांचे रविवारी सायंकाळी गडहिंग्लज येथे निधन झाले. ते ५५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

पोवार गेल्या दोन महिन्यांपासून मूतखड्याच्या त्रासाने त्रस्त होते. ते गडहिंग्लजमधील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर शस्त्रक्रिया देखील करावी लागली होती. दरम्यानच्या काळात जंतूसंसर्ग झाल्याने त्यांच्यावर दुसरी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला होता. मात्र या शस्त्रक्रियेपूर्वीच त्यांचे निधन झाले.

पोवार यांनी अनेक नाटकांचं यशस्वीपणे दिग्दर्शन केलं. त्यानी सादर केलेले 'खजिन्याची विहीर' हे नाटक विशेष गाजले. याबरोबर, पोवार यांनी भूमिका केलेला 'चौकट' हा लघुपट गेल्यावर्षी गोव्यात पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ( इफ्फी) चांगलाच गाजला. त्यांनी प्रायोगिक रंगभूमीवर सातत्याने नवनवे प्रयोग केले. पारंपारिक रंगभूमीला छेद देत पोवार यांनी नव्या रंगभूमीवर आपली कारकीर्द घडवण्यासाठी नवी पिढी तयार केली. त्यांनी सादर केलेल्या कलाकृतींना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

याबरोबर विजय शंकर पोवार हे प्रसिद्ध कवी देखील होते. त्यांनी अनेक दर्जेदार कविता लिहिल्या.

पोवार यांनी कोल्हापुरात तंबाखू संघामध्ये काही काळ नोकरी केली. नोकरीत त्यांचे मन फार काळ रमले नाहीत. अखेर त्यांनी नोकरी साडून कलेसाठी स्वत:ला वाहून घेतलं.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरकुलासाठी आयटकचाइचलकरंजीत मोर्चा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

यंत्रमाग उद्योगातील कामगारांसाठीच्या घरकुल योजनेसंदर्भात इचलकरंजी नगरपरिषदेने तातडीने कार्यवाही करावी, या मागणीसाठी करवीर कामगार संघ (आयटक) च्यावतीने नगपरिषदेवर मोर्चा काढण्यात आला. आंदोलकांनी नगरपरिषदेच्या प्रवेशद्वारात ठिय्या मारत जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, नगराध्यक्षा अलका स्वामी यांनी या प्रश्नी सभागृहात चर्चा करुन मार्ग काढण्याबरोबरच प्रधानमंत्री आवास योजनेत अर्ज दाखल केल्यास प्रत्येकाला घर मिळवून देण्यासाठी प्रयत्न करु, अशी ग्वाही दिली.

राज्य सरकारच्या पणन व वस्त्रोद्योग विभागाने जाहीर केल्याप्रमाणे यंत्रमाग उद्योगातील कामगारांना घरकुल योजनेची अंमलबजावणी संदर्भात वारंवार आंदोलने करण्यात आली. परंतु नगरपरिषदेकडून काहीच कार्यवाही झालेले नाही. याचा जाब विचारण्यासाठी सोमवारी करवीर कामगार संघाच्यावतीने हा मोर्चा काढण्यात आला. गोकुळ येथील कार्यालयापासून कॉ. मारुती आजगेकर, कॉ. हणमंत लोहार यांमया नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. प्रमुख मार्गावरुन मोर्चा नगपरिषदेत आल्यानंतर प्रवेशद्वारात ठिय्या मारत घोषणाबाजी सुरु करण्यात आली. अर्धा तासानंतर नगराध्यक्षा अलका स्वामी, उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे, नगरसेवक सागर चाळके यांनी आंदोलकांची भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळाच्यावतीने त्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी आजगेकर व लोहार यांनी, राज्य सरकारच्या वस्त्रोद्योग विभागाने जाहीर केल्याप्रमाणे मालेगाव महानगरपालिकेने यंत्रमाग धंद्यातील कामगारांना घरकुल देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच धर्तीवर इचलकरंजी नगरपरिषदेनेही घरकुल योजनेची अंमलबजावणी करावी. या मागणीसाठी संघटनेच्यावतीने विविध मार्गांनी आंदोलने केली आहेत. मात्र नगरपरिषदेकडून पाठपुरावा होत नसल्याचे सांगितले. त्यामुळे यंत्रमाग कामगारांसह वस्त्रोद्योगातील सर्वच कामागरांना सरकार निर्णयाप्रमाणे घरकुले मिळावीत अशी मागणी केली.

या आंदोलनात शंकर आडावकर, महेश लोहार, रामचंद्र सौंदत्ते, अशोक गोपलकर, लक्ष्मण चव्हाण, ज्ञानदेव महादर, दादासो जगदाळे, पांडुरंग जाधव, नजमा दुरुगवाले, समिना गरगरे यांच्यासह कामगार सहभागी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चूक आमची नव्हे, समितीची

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जात वैधता प्रमाणपत्र मुदतीत सादर न केलेल्या नगरसेवकांमध्ये कारवाईवरुन अस्वस्थता निर्माण झाली आहे. राज्य सरकारच्या नगरविकास विभागाकडून अपात्रतेची कारवाई होवू शकते, या धास्तीने नगरसेवकांत चलबिचलता वाढली आहे. महापालिकेतील २० नगरसेवकांनी एकत्रितपणे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदनाद्वारे प्रमाणपत्र उशिरा सादर करण्यात आपली चूक नसल्याचे म्हटले आहे. विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने उशिरा प्रमाणपत्र दिल्याचे त्यांनी पालकमंत्र्याच्या निदर्शनास आणले आहे.

महापालिकेत निवडून आल्यानंतर सहा महिन्याच्या आत प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. मात्र महापौर हसीना फरास, माजी महापौर अश्विनी रामाणे, विरोधी पक्षनेते किरण शिराळे, शमा मुल्ला, वृषाली कदम, संदीप नेजदार, सुभाष बुचडे, निलेश देसाई, सचिन पाटील, संतोष गायकवाड, विजय खाडे, दीपा मगदूम, स्वाती यवलुजे, रिना कांबळे, मनीषा कुंभार, अश्विनी बारामते, नियाज खान, सविता घोरपडे, कमलाकर भोपळे, अफजल पिरजादे यांनी मुदतीत प्रमाणपत्रे सादर केली नाहीत.

हायकोर्टाच्या निर्णयानुसार राज्य सरकारने कारवाई करावी, अशा सूचना राज्य निवडणूक आयोगाने केली आहे. त्यानुसार नगर विकास विभागाने महापालिकेकडून अहवाल मागवून घेतला आहे. यामुळे नगरसेवकावर कारवाईची टांगती तलवार आहे. दरम्यान विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने ३० एप्रिलनंतर प्रमाणपत्र उपलब्ध करुन दिली आहेत. प्रमाणपत्र उशिरा सादर करण्यात नगरसेवकांची चूक नाही, असे नगरसेवकांचे म्हणणे असून त्यांनी सोमवारी पालकमंत्र्यांना निवेदन सादर केले आहे.


हायकोर्टात सुनावणी नाही, पुढील आठवड्यात शक्य

भ्रष्टाचार निर्मूलन समिती शहर अध्यक्ष सुरेश पोवार यांनी जात वैधता प्रमाणपत्रप्रश्नी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. मुदतीत ज्या नगरसेवकांनी प्रमाणपत्र दिले नाहीत त्यांच्यावर हायकोर्टाच्या निर्णयानुसार कारवाई करावी, अशी याचिका दाखल केली आहे. आयुक्तांनी सरकारला अहवाल देऊनही त्यावर कार्यवाही होत नाही, असे पोवार यांचे म्हणणे आहे. सोमवारी सुनावणी होणार होती, परंतु हायकोर्टातील खंडपीठासमोर सुनावणीची प्रक्रिया होऊ शकली नाही. पुढील आठवड्यात सुनावणी होऊ शकेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेट्टींसाठी महाडिकांची मध्यस्थी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये भाजप, ताराराणी व जनसुराज्य युतीमध्ये स्वाभिमानी संघटनेला घेण्यासाठी खासदार राजू शेट्टी यांची मनधरणी करू. यासाठी खासदार शेट्टी यांची लवकरच भेट घेणार आहे. ताराराणी आघाडी ही भाजपप्रणित असल्याने दक्षिण मतदारसंघात आमदार अमल महाडिक यांनी मजबूत तटबंदी तयार केली आहे. त्यामुळे दक्षिणचा बुरुज भेदणे कोणालाही शक्य होणार नसल्याचे सांगत विधानपरिषदेच्या आमदार असताना जेवढे राजकीय वजन होते, त्यापेक्षा सध्या जास्त राजकीय वजन वाढले असल्याची माहिती माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी पत्रकार बैठकीत दिली.

महाडिक म्हणाले, ‘विधानपरिषदेची निवडणूक मी, जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील किंवा माजी आमदार प्रकाश आवाडे यापैकी एकजण लढवण्याचे निश्चित झाले होते. पाटील व आवाडे यांनी मला निवडणूक लढवण्यास सांगितले. या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला तरी, मी‌ कधीही सूडबुद्धीचे राजकारण करत नाही. त्यांनी काय केले, तर मला सोसते पण मी काहीही केले तर, त्यांना सोसत नसल्याचा टोला त्यांनी आमदार सतेज पाटील यांचे नाव न घेता त्यांनी लगावला. विधानपरिषदेचे आमदार असताना जेवढे राजकीय वजन होते, त्यापेक्षा जास्त वजन आता वाढले आहे, असेही ते म्हणाले.

‘शिरोली येथील काँग्रेसच्या व्यासपीठावर जनसुराज्यचे नेते जातात, याचा संदर्भ घेत महाडिक म्हणाले, ‘कोणत्याही निवडणुकीत महाडिक पूर्ण ताकदीने उतरतात. महाडिक यांनी कधीही दगाफटका केला नाही. पण जे महाडिक यांच्याबरोबर दगाफटका करतील, त्यांना भविष्यात प्रायश्चित्त मिळेल. दक्षिण विधानसभा मतदारसंघात आमदार अमल महाडिक यांनी तटबंदी बजबूत केली आहे. ‘दक्षिण’चा बुरुज भेदणे कोणालाही शक्य नसल्याने त्यामुळे या मतदारसंघात वेगळे काही करण्याची गरज नाही. तथ्य असल्याशिवाय पालकमंत्री पाटील कोणतेही विधान करत नाहीत, त्यामुळे शनिवारी (ता. २८) जिल्ह्यात राजकीय भुकंप होणार आहे, असेही महाडिक यांनी सांगितले.

पालकमंत्री राजाराम कारखान्यावर

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सकाळी साडेदहा वाजता राजाराम कारखान्यावर माजी आमदार महादेवराव महाडिक यांची भेट घेतली. भेटचे स्वरुप सदिच्छा असले, तरी यामागे जिल्हा परिषद निवडणुकीचे निमित्त होते. काही दिवसांपासून भाजप व खासदार शेट्टी यांच्यामध्ये दुरावा वाढत आहे. हा दुरावा कमी करण्यासाठी पालकमंत्री पाटील यांनी महाडिक यांची भेट घेतल्याची शक्यता होती. स्वाभिमानी पक्षाबरोबर युती करण्यासाठी भाजपने जिल्हा परिषदेच्या अधिक जागा आपल्याकडे घेतल्या आहेत. त्यामुळे आता महाडिक यांच्या शिष्टाईनंतरच खासदार भाजपबरोबर युती करणार किंवा नाही हे स्पष्ट होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


इचलकरंजी-बेळगाव रेल्वेमार्गाला रेडसिग्नल

$
0
0

राजेंद्र पाटील, इचलकरंजी

कराड-इचलकरंजी-बेळगांव या १९१ किलोमीटरचा रेल्वे मार्ग निधीअभावी रखडला आहे. कराड, बेळगांव, पुणे, कोल्हापूर हे अंतर कमी होऊन इंधन बचत होण्याबरोबरच या मार्गावर नवीन १७ गावे जोडली जाणार आहेत. सुमारे साडेतीन हजार कोटी रुपये खर्चापैकी निम्मा वाटा राज्य सरकारला उचलावा लागणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात सत्ताधारी लोकप्रतिनिधींचे वर्चस्व असतानाही त्यांची उदासीनता आणि इच्छाशक्तीचा अभाव या मार्गाला अडथळा ठरत आहे.

देश व राज्याच्या विकासात रेल्वेचे महत्व मोठे आहे. दळणवळण यंत्रणेवरच उद्योगाची गती अवलंबून असते. पश्चिम महाराष्ट्रात शेतीखालोखाल रोजगार उपलब्ध करुन देणारा वस्त्रोद्योग मोठ्या प्रमाणात आहे. येथे उत्पादीत होणारे कापड परराज्यांसह सातासमुद्रापार पाठविले जाते. असे असले तरी या शहराला रेल्वेची कित्येक वर्षांपासून उणीव जाणवत आहे. कोल्हापूर जिल्ह्यालगतच कर्नाटक राज्याची सीमा आहे. त्यामुळे कराड-इचलकरंजी-बेळगांव हा रेल्वे मार्ग पूर्णत्वास आल्यास दळणवळणाबरोबरच सुखकारक प्रवास व औद्योगिक विकासाला चालना मिळू शकते. हा मार्ग व्हावा यासाठी इचलकरंजीने पुढाकार घेतला. रेल्वे कृती समितीची स्थापना झाली. समितीने मागील पाच वर्षांपासून केंद्र व राज्य पातळीवर सातत्याने रेल्वेसाठी पाठपुरावा सुरु ठेवला आहे. या मार्गावर समाविष्ट होणाऱ्या १७ गावांसह परिसरातील नगरपालिका, ग्रामपंचायत यांचा ठराव करुन सरकारकडे सादर केला आहे. कृती समितीचे पदाधिकारी श्रीनिवास शर्मा यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेऊन हा मार्ग का आवश्यक आहे याचा सविस्तर अहवालच दिला आहे. केंद्र व राज्य सरकारकडून केवळ तोंडाला पाने पुसण्याव्यतिरिक्त काहीच हालचाली झालेल्या नाहीत.

तीन वर्षांपूर्वी पुणे रेल्वे बोर्डाने कराड-इचलकरंजी-बेळगांव या मार्गाचा सर्व्हे केला. त्यावेळी कबनूर (ता. हातकणंगले) येथील शेतकऱ्यांनी त्याला विरोध दर्शवत साहित्य काढून घेत अधिकाऱ्यांना डांबून ठेवले. ही एकमात्र घटना वगळता अन्यत्र या मार्गाला कसलाही अडथळा आलेला नाही. यातूनही या मार्गाचा सर्व्हे पूर्ण होऊन तसा प्रस्तावही रेल्वे बोर्डाकडे सादर करण्यात आला आहे. याबरोबरच वारणानगर, शाहूवाडी ते रत्नागिरी असा नवीन रेल्वेमार्ग अस्तित्वात येणार आहे. त्याचाही सर्व्हे पूर्ण झालेला आहे. मात्र यासाठी आवश्यक खर्चातील निम्मा वाटा संदर्भात राज्य सरकारकडून आर्थिक तरतूद न झाल्याने हा प्रस्तावही अधांतरीतच राहिला आहे.

कराड-बेळगांव या मार्गावर १२ पेक्षा अधिक साखर कारखाने, सूत गिरण्या, गारमेंट उद्योग, खांडसरी, दूध संघ, औद्योगिक वसाहती यासह छोटे-मोठे उद्योग, पर्यटनस्थळे आहेत. इचलकरंजी-अतिग्रे-इस्लामपूर याठिकाणी आंतरराष्ट्रीय शैक्षणिक दालन आहेत. त्यामुळे या गावांना रेल्वेमार्ग जोडला जावा ही वर्षानुवर्षांची मागणी भाजप सरकारने पूर्णत्वास न्यावी अशी मागणी होत आहे.

...

दुसरा पर्याय

कराड-इचलकरंजी-निपाणी-बेळगाव या मार्गाला मंजूरी देऊन सर्व्हेही पूर्ण झाला आहे. असे असताना केंद्र सरकारने पुणे-मिरज-लोंढा या डबल ट्रॅकचा प्रस्ताव आणला आहे. ४६७ किलोमीटर अंतराच्या या मार्गासाठी चार हजार ६७० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. नवीन मार्गावरील पुणे-मिरज-बेळगांव-लोंढा हा मार्ग डबल ट्रॅक करताना पुणे-कराड २४० किलोमीटर अंतरापर्यंत करुन पुढे थोडा बदल करुन तो कराड-इस्लामपूर-वाळवा-आष्टा-इचलकरंजी-हुपरी-कागल-निपाणी-संकेश्वर-बेळगाव असा १९१ किलोमीटर व पुणे लोंढापर्यंतचे ५१ किलोमीटर अंतर फायद्याचे ठरणार आहे. हा दुसरा पर्याय स्विकारल्यास पुणे-मिरज-लोंढा हे अंतर २२ किलोमीटरने कमी होणार आहे. परिणामी इंधन व वेळेची बचत होणार आहे.

...

कोट

‘कराड-इचलकरंजी-बेळगांव या मार्गाचा सर्व्हे पूर्ण झाला आहे. या मार्गासाठी निम्मा खर्च राज्य सरकारने उचलणे गरजेचे आहे. जोपर्यंत सरकारकडून निधी तरतूद होत नाही तोपर्यंत केंद्र सरकार काहीच हालचाल करु शकत नाही. लोकप्रतिनिधी म्हणून सातत्याने याचा पाठपुरावा केला जात आहे. या मार्गासोबतच वारणानगर-शाहूवाडी-रत्नागिरी हा मार्गही निधीअभावी रखडला आहे.

राजू शेट्टी, खासदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शरद पवार शुक्रवारपासून कोल्हापूर दौऱ्यावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार येत्या शुक्रवारपासून (ता. २७) दोन दिवस कोल्हापूरच्या दौऱ्यावर येत आहेत. शनिवारी (ता. २८) ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्यास ते उपस्थित राहणार आहेत. दोन दिवसातील हा मुख्य कार्यक्रम असला तरी त्याबरोबर अन्य कार्यक्रम व कार्यकर्त्यांचा मेळावा होण्याची शक्यता आहे.

डॉ. जयसिंगराव पवार यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त २८ जानेवारीला सकाळी ११ वाजता अमृतमहोत्सवी गौरव समारंभ आयोजित केला आहे. केशवराव भोसले नाट्यगृहात होणाऱ्या समारंभामध्ये शरद पवार यांच्या हस्ते व श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत हा गौरव होणार आहे. ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या समारंभास महापौर हसीना फरास उपस्थित राहणार आहेत. या गौरव समारंभामध्ये ‘डॉ. जयसिंगराव पवार गौरव ग्रंथ’, ‘डॉ. पवार यांच्या निवडक प्रस्तावनांचा ग्रंथ’ तसेच ‘इतिहासकार डॉ. पवार यांचे विचार व कार्य’ या ग्रंथांचे प्रकाशन होणार आहे. यानिमित्त शस्त्रसंग्राहक गिरीश जाधव यांच्या ऐतिहासिक शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन २८ व २९ रोजी बाबूराव पेंढारकर कलादालनात आयोजित केले आहे.

पवार यांच्या हस्ते शुक्रवारी सायंकाळी महाराणा प्रताप चौकातील केपीसी मल्ट‌िस्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्‍घाटन होणार आहे. त्यानंतर ज्येष्ठ पत्रकार बाळ पोतदार यांच्या ग्रंथाच्या प्रकाशनाचा सोहळाही आयोजित केला आहे. केशवराव भोसले नाट्यगृहात सायंकाळी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. याव्यतिरिक्त जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्याचे नियोजन केले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुपेकर गटाची कोंडी फोडण्याचा प्रयत्न

$
0
0

म.टा.वृत्तसेवा, गडहिंग्लज

गडहिंग्लज उपविभागातील सर्वात सक्षम व मोठा गट म्हणून सर्वश्रुत असलेल्या कुपेकर गटाने चंदगडमध्ये भारतीय जनता पक्षाशी अपेक्षेप्रमाणे आघाडी केली. चंदगड विधानसभा मतदारसंघात आमदार हसन मुश्रीफ यांनी कुपेकर गटाची केलेली राजकीय कोंडी हीच या आघाडीच्या मुळाशी असल्याचे कार्यकर्त्यांचे मत आहे. चंदगड विकास आघाडीच्या निमित्ताने भाजपला या विभागात दमदार ‘सवंगडी’ मिळविला आहे.

माजी विधानसभा अध्यक्ष दिवंगत बाबासाहेब कुपेकर यांच्या निधनानंतर स्थानिक राजकारणाला कलाटणी मिळाली. कुपेकर यांच्या पश्चात संग्राम कुपेकर यांनी राजकीय हक्क सांगितला. मात्र नाट्यमय घडामोडीनंतर चंदगड मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत पक्षातर्फे संध्यादेवी कुपेकर यांना संधी मिळाली. सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होत आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी कन्या डॉ.नंदिनी बाभूळकर यांच्या सोबतीने ‘गृहिणी ते आमदार’ अशी यशस्वी वाटचाल केली. या दरम्यान डॉ. बाभूळकर सक्षमपणे आमदार कुपेकर यांच्यामागे ठामपणे उभ्या राहिल्या. संग्राम कुपेकर यांनीही विधानसभा लढवण्याची तयारी केली. मात्र विधानसभा निवडणुकीत संग्राम यांना पक्षानेच नाकारले आणि पुन्हा संध्यादेवीना संधी मिळाली. यावेळी संग्राम यांनी बंडखोरी करीत जनसुराज्यच्या तिकिटावर निवडणूक लढवली. यानिमित्ताने कुपेकर घराण्यातील ‘गृहकलह’ लोकांसमोर आला.

दरम्यान, आमदार कुपेकर यांनी गटातटाचे राजकारण बाजूला ठेवत विकासकामांना प्राधान्य दिले. यावेळी त्यांच्यासोबत कार्यकर्त्याप्रमाणे वावरणाऱ्या डॉ. बाभूळकर यांचे परिपूर्ण अस्तित्व कुणालाही नाकारता आले नाही. वैद्यकीय व्यवसाय सांभाळून आमदार कुपेकर यांच्यासोबत वावरणाऱ्या डॉ.बाभूळकर या एक विचारी व्यक्तिमत्व म्हणून लोकांच्या नजरेत भरल्या. नेहमी हसतमुख आणि थेट जनतेत मिसळणाऱ्या डॉ. बाभूळकर अल्पावधीत सर्वांना आपल्याशा वाटल्या. गेली तीन वर्ष बाभूळकर यांनी आमदार संध्यादेवी यांच्यासोबत कार्यकर्त्या म्हणून प्रामाणिकपणे विकासाभिमुख कामे केली. चंदगडकराच्या जीवावर बेतलेला एव्हीएच प्रकल्पासाठी बाभूळकर यांनी कृती समितीच्या माध्यमातून लढा दिला. प्रसंगी कार्यकर्त्यांसोबत त्यांनी तुरुंगही पाहिला. त्यांच्या कामाची पोहचपावती म्हणून मुश्रीफ यांनीच त्यांची ‘भावी आमदार’ म्हणून घोषणा केली होती.

कुपेकर घराण्याचे पूर्वीपासून शरद पवार यांचेशी घरोब्याचे संबध आहेत. मात्र कुपेकर यांच्या निधनानंतर जिल्हापातळीवरील राष्ट्रवादीच्याच नेत्यांनी आमदार कुपेकर यांची मतदारसंघातच कोंडी करण्याचा प्रयत्न केला. जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अप्पी उर्फ विनायक पाटील हे कधीकाळी दिवंगत कुपेकर यांचे खास सहकारी म्हणून ओळखले जात. मात्र कालांतराने त्यांनी कुपेकरांशी फारकत घेऊन वेगळे अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

चौकट

मुश्रीफ अप्पी पाटील ‘याराना’

विधानसभा निवडणुकीपासून अप्पी पाटील यांना आमदार हसन मुश्रीफ हे अप्रत्यक्षरीत्या सहकार्य करीत राष्ट्रवादीची कोंडी करीत आहेत, अशी तक्रार दस्तुरखुद्द शरद पवार यांच्यापर्यंत करण्यात आली. जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षपदी अप्पी पाटील यांची कॉंग्रेसच्या जागी लागलेली वर्णी हा त्याचाच भाग आहे अशीही चर्चा झाली. चंदगडचा बहुचर्चित दौलत कारखाना सुरु करण्यासंदर्भातही आमदार मुश्रीफांवर स्थानिक कार्यकर्ते नारज झाले. परिणामी मुश्रीफ आणि अप्पी पाटील यांच्यातील वाढता ‘याराना’ कुपेकर गटासाठी मारक ठरणार हे निश्चित होते.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीनिमित्ताने पक्षांतर्गत कार्यकर्त्यांचा आघाडीसाठी डॉ.नंदिनी बाभूळकर यांच्यावर दबाव वाढत गेला. शेवटी राज्यात आणि केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपशी त्यांनी आघाडी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निगाहे मिलाने को...

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

प्रेक्षकांनी खचाखच भरलेले खासबाग मैदान आणि आकर्षक विद्युत रोषणाईत न्हालेल्या व्यासपीठावर आकर्षक नृत्याविष्कार, एकापेक्षा एक कव्वाली, गजल आणि मुजऱ्याला मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद आणि बहारदार सूत्रसंचालनात भीमा फेस्टिव्हल रंगला. ‘शिर्डीवाले साईबाबा...’, ‘निगाहे मिलाने को जी चाहता है...’ या कव्वालीने सुरू झालेली मैफल रात्री उत्तरोत्तर रंगत गेली. संदीप पंचवाटकर यांनी निर्मिती केलेल्या ‘जुनून’ कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी खासबाग मैदान गर्दीने फुलून गेले होते. बी चॅनेलच्या १५ वर्धापन दिनानिमित्त आयोजित भीमा फेस्टिव्हलचे उद्‍घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सोमवारी झाले. यावेळी माजी आमदार महादेवराव महाडिक आणि खासदार धनंजय महाडिक प्रमुख उपस्थित होते.

उद्‍घाटनानंतर विवेकपांडे बनारसी यांनी ‘शिर्डीवाले साईबाबा...’ या कव्वालींने मैफलीला सुरुवात झाली. अखिलेशकुमार प्रजापती यांनी सादर केलेल्या ‘ताकते रहते तुझको सांझ सवेरे...’ या दंबग चित्रपटातील गीताने प्रेक्षकांची वाहवा मिळविली. या कव्वालीना वन्स मोअर मिळाला. कव्वाली, मुजरा आणि गझल पेश करत उत्तोत्तर मैफल अधिक रंगत गेली. आशा भोसले यांच्या आवाजातील आणि आयाम यांनी संगीतबद्ध केलेली ‘उमराव जान’ चित्रपटातील मुजऱ्याने प्रेक्षक भावविश्वात हरवून गेले. ‘दिल चीज क्या है, आप मेरी जान लीजिए... बस एक बार मेरा कहा मान लीजिए...’ या गीतावर नीता पाटील यांनी दिलखेचक नृत्य करत ‘जुनून’ कार्यक्रमांमध्ये रंगत आणली. संगीता कलकर्णी, राजू जाधव, राधिका अत्रे यांनी कव्वाली, मुजर व गझल सादर करत शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवले.

यावेळी दिवंगत भीमराव महाडिक व नटराज मूर्तीचे पूजन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झाले. या मैफलीस आमदार अमल महाडिक, ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील, संचालक रवींद्र आपटे, रामराजे कुपेकर, नगरसेवक सत्यज‌ित कदम, सुनील कदम, स्वरुप महाडिक, अरुंधती महाडिक, पृथ्वीराज महाडिक, कृष्णराज महाडिक, अॅड. सुरेश कुराडे यांच्यासह महापालिकेचे पदाधिकारी उपस्थित होते.

बनरासींनी जिंकली मने

विवेकपांडे बनारसी यांनी १७ जानेवारी रोजी दुपारी १२ ते रात्री १२ पर्यंत सलग महमद रफी यांच्या कव्वाली सादर केल्या आहेत. त्यांच्या या उपक्रमांची लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. बनारसी यांनी गायिलेल्या ‘परदा है परदा’ आणि ‘शिर्डी वाले साईबाबा’ कव्वालींना प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साठ अधिकाऱ्यांना नोट‌िसा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेतील कामकाजाला शिस्त लागावी, कामचुकार कर्मचाऱ्यांना लगाम बसावा याकरिता प्रशासनाने हजेरी नोंदविण्यासाठी बायोमेट्रिक मशीन उपलब्ध केले आहेत. बायोमेट्रिक मशीनद्वारे दोन्ही वेळेला हजेरी नोंदविणे बंधनकारक असताना फक्त एकवेळची हजेरी नोंदविणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार काढावा, अशी शिफारस करणाऱ्या साठ अधिकाऱ्यांना आयुक्त पी. शिवशंकर यांनी नोटीस काढली आहे. विविध विभागातील अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश असून तीन दिवसात खुलासा मागविले आहे.

अधीक्षक, सहाय्यक अभियंता, आरोग्य निरीक्षक, उद्यान अधीक्षकांना नोटीस काढण्यात आली आहे. महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या हजेरीवरून सर्वसाधारण सभेतही विषय गाजला होता. बायोमेट्रिक हजेरी नोंदविली नसल्याने महिन्यातील १५ ते २० दिवसांचा पगार कपात करण्यात आल्याच्या तक्रारी आहेत. बायोमेट्रिक मशीनमध्ये बिघाड असल्याने कर्मचाऱ्यांची हजेरी नोंद होत नसल्याची तक्रार नगरसेवकांनी सभेत केली होती. त्यावेळी आयुक्तांनी मशीनध्ये तांत्रिक बिघाड असेल तर दूर केली जाईल, मात्र बोगस हजेरी नोंदविण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असे स्पष्ट केले होते. दरम्यान महापालिकेतील अनेक कर्मचाऱ्यांच्या कामकाजाविषयी तक्रारी आहेत. महापालिकेत नोकरी म्हणजे ‘आओ जाओ घर तुम्हारा’ या मानसिकतेत अनेकजण वावरत आहेत. काही जण नगरसेवक, पदाधिकाऱ्यांची वशिलेबाजी लावत तर काही जण अधिकाऱ्यांच्या मर्जीतील कर्मचारी असल्याचे सांगत ऑफिस वेळेत कार्यालय बाहेर असतात. त्यांची ऑफिस कामापेक्षा व्यक्त‌िगत कामे सुरू असतात.

सकाळी ऑफिसमध्ये येऊन हजेरी नोंद करून बाहेर पडतात. अशा कामचुकार कर्मचारी, अधिकाऱ्याना चाप बसावा याकरिता बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक केली आहे. त्याचवेळी मॅन्युअल पद्धतीने हजेरी नोंदविण्याची पद्धत आहे. नेमक्या याच सवलतीचा फायदा घेत अनेकजण बायोमेट्रिक हजेरी नोंदविणे टाळत आहेत. प्रशासनाने, सर्वच विभागाने बायामेट्रिक हजेरी नोंदविणे बंधनकारक असल्याचे म्हटले आहे. मात्र प्रशासनाच्या या आदेशालाच हरताळ फासत केवळ एक वेळच्या बायामेट्रिक हजेरी विचारात घेत पगार काढण्यात यावा, अशी शिफारस करण्यात आली आहे. आयुक्तांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी साठ अधिकाऱ्यांना नोटीस काढत जाब विचारला आहे. या संदर्भात तीन दिवसात खुलासा मागविला आहे. बायोमेट्रिक हजेरीवरून पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

प्रामाणिक कर्मचाऱ्यांना नको त्रास

महापालिकेतील सगळेच कर्मचारी काही कामचुकार नाहीत. काहीजण प्रामाणिकपणाने व कार्यालयीन नियमानुसार कामकाज करत असतात. कार्यालयीन कामानिमित्त अनेकांना दोन्ही वेळेला बायोमेट्रिक हजेरी नोंदविणे शक्य होत नाही. यामुळे अनेकांच्या पगाराला कात्री लागली आहे. विभागातील अधिकाऱ्यांना अगोदर कळवूनही केवळ बायोमेट्रिक हजेरी नसल्याने त्यांच्या पगारातही कपात होत असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images