Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

टाटा सुमोचोरट्यास अटक

$
0
0

इचलकरंजी

वंदूर (ता. कागल) येथील अट्टल वाहन चोरट्यास शहापूर पोलिसांनी अटक केली. लखन कृष्णा माने (वय २२) असे चोरट्याचे नाव असून त्याच्याकडून चोरीतील अडीच लाख रुपये किंमतीची टाटा सुमो जप्त करण्यात आली आहे.

शहापूर परिसरातील जे.के.नगर भागात गस्त घालत असताना शहापूर पोलिसांना लखन माने हा टाटा सुमोतून जात असताना निदर्शनास आला. संशयावरुन त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी करता त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. पण पोलिसी खाक्या दाखवताच माने याने ही गाडी चोरीची असल्याचे सांगितले. कोरोची (ता. हातकणंगले) येथील अमीर बादशहा मुजावर यांच्या मालकीची टाटा सुमो (क्र. एमएच ११ एएच ७७१०) ही २७ नोव्हेंबर रोजी चोरल्याचे त्याने कबूल केले. पोलिसांनी ही सुमो जप्त केली असून ही कारवाई पोलिस निरीक्षक सीताराम डुबल, सुरेश कोरवी, तानाजी गुरव, कमलसिंग रजपुत, सुभाष दाभाडे, शब्बीर बोजगर आदींच्या पथकाने केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वीरपत्नी तुपारे यांना शौर्यपदक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, चंदगड

नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राज्यातील वीरमरण आलेल्या जवानांच्या वीरपत्नींचा व नातेवाईकांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी मजरे कार्वे (ता. चंदगड) येथील शहीद राजेंद्र तुपारे यांच्या वीरपत्नी शर्मिला, आई शांता तुपारे, वडील नारायण वैजू तुपारे आणि भाऊ संदीप यांना शौर्यपदक देवून गौरविण्यात आले. यावेळी कोल्हापूर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘पाकिस्तानच्या भ्याड हल्याला घाबरुन सैनिकांत भरती होण्याचे प्रमाण कमी झालेले नाही. ते प्रमाण देशसेवेसाठी दुप्पटीने वाढले आहे. ही देशासाठी व राज्यासाठी भूषणावह बाब आहे. जवानांना आलेले वीरमरण हे एकट्या कुटुंबाचे नाही तर त्यांच्यापाठीमागे सारा देश उभा आहे.’ यावेळी राजेंद्र तुपारे यांच्या नातेवाईकांना आठ लाखांचा निधी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते देण्यात आला. याप्रसंगी शहीद व युध्दात अपंगत्व आलेल्या सैनिकांच्या वीरपत्नींचा आणि नातेवाईकांचा शौर्यपदक देवून सत्कार झाला. यावेळी सैनिक कल्याण विभागाचे पदाधिकारी, शहिद जवानांच्या वीरपत्नी तसेच जिल्हा सैनिक संघटक दिपक शेळके, राज्याचे सैनिक विभाग संचालक कर्नल सुहास जतकर, कार्वेचे उपसरपंच शिवाजी तुपारे यांच्यासह सैनिक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेकायदेशीर वसुलीविरोधातमनसेचा मोर्चा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

कर्जाच्या वसुलीसाठी खासगी फायनान्स कंपन्या, बँका व पतसंस्थांकडून दमदाटी व जबरदस्तीने केली जात असलेल्या बेकायदेशीर वसुलीला आळा घालून पिडीतांना संरक्षण द्यावे, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्यावतीने प्रांताधिकाऱ्यांना बुधवारी देण्यात आले. दरम्यान, नोटाबंदीमुळे निर्माण झालेली परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत एकही हप्ता भरला जाणार नाही, असा इशारा यावेळी सेनेच्या प्रदेशाध्यक्षा अॅड. स्वाती शिंदे व प्रदेश पदाधिकारी संदीप मोझर यांनी यावेळी दिला.

बचत गटांच्या कर्जदार महिलांना खासगी फायनान्स कंपन्या, बँका, पतसंस्थांकडून महिला वर्गाची होणारी पिळवणूक थांबवावी, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेचवतीने प्रांताधिकारी कार्यालयावर स्वाती शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली मोर्चा काढण्यात आला. महात्मा गांधी पुतळ्यापासून निघालेला मोर्चा प्रमुख मार्गावरुन प्रांत कार्यालय येथे आला असता त्याचे सभेत रुपांतर झाले. यावेळी विविध मान्यवरांनी मोर्चाला मार्गदर्शन केले. त्यानंतर शिष्टमंडळाच्यावतीने निवेदन देण्यात आले.

महिला बचत गटांना खासगी फायनान्स कंपन्या, विविध बँका व पतसंस्था यांच्या माध्यमातून कर्ज स्वरूपात रक्कम दिली जाते. परंतु सध्या ५०० व १००० रुपयाच्या नोटा बंदींमुळे व सध्या यंत्रमाग व्यवसायात निर्माण झालेली मंदी आणि चलन तुटवडा यामुळे बचत गटांना हप्ता भरणे अडचणीचे ठरत आहे. पण ही बाब लक्षात न घेता फायनान्स कंपन्या व बँकांचे अधिकारी दमदाटी करून व अपरात्री कर्ज वसुलीसाठी येतात. हप्त्यापोटी घरातील साहित्य उचलून नेतात. अशा प्रकारांमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तर काही महिलांनी घाबरून गाव सोडले आहे. भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये व बचत गटातील महिलांची पिळवणूक थांबवण्यासाठी यामध्ये प्रशासनाने लक्ष घालण्याची गरज असल्याचे नमूद केले आहे.

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

कर्जाच्या वसुलीसाठी खासगी फायनान्स कंपन्या, बँका व पतसंस्थांकडून दमदाटी व जबरदस्तीने केली जात असलेल्या बेकायदेशीर वसुलीला आळा घालून पिडीतांना संरक्षण द्यावे, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्यावतीने प्रांताधिकाऱ्यांना बुधवारी देण्यात आले. दरम्यान, नोटाबंदीमुळे निर्माण झालेली परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत एकही हप्ता भरला जाणार नाही, असा इशारा यावेळी सेनेच्या प्रदेशाध्यक्षा अॅड. स्वाती शिंदे व प्रदेश पदाधिकारी संदीप मोझर यांनी यावेळी दिला.

बचत गटांच्या कर्जदार महिलांना खासगी फायनान्स कंपन्या, बँका, पतसंस्थांकडून महिला वर्गाची होणारी पिळवणूक थांबवावी, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेचवतीने प्रांताधिकारी कार्यालयावर स्वाती शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली मोर्चा काढण्यात आला. महात्मा गांधी पुतळ्यापासून निघालेला मोर्चा प्रमुख मार्गावरुन प्रांत कार्यालय येथे आला असता त्याचे सभेत रुपांतर झाले. यावेळी विविध मान्यवरांनी मोर्चाला मार्गदर्शन केले. त्यानंतर शिष्टमंडळाच्यावतीने निवेदन देण्यात आले.

महिला बचत गटांना खासगी फायनान्स कंपन्या, विविध बँका व पतसंस्था यांच्या माध्यमातून कर्ज स्वरूपात रक्कम दिली जाते. परंतु सध्या ५०० व १००० रुपयाच्या नोटा बंदींमुळे व सध्या यंत्रमाग व्यवसायात निर्माण झालेली मंदी आणि चलन तुटवडा यामुळे बचत गटांना हप्ता भरणे अडचणीचे ठरत आहे. पण ही बाब लक्षात न घेता फायनान्स कंपन्या व बँकांचे अधिकारी दमदाटी करून व अपरात्री कर्ज वसुलीसाठी येतात. हप्त्यापोटी घरातील साहित्य उचलून नेतात. अशा प्रकारांमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तर काही महिलांनी घाबरून गाव सोडले आहे. भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये व बचत गटातील महिलांची पिळवणूक थांबवण्यासाठी यामध्ये प्रशासनाने लक्ष घालण्याची गरज असल्याचे नमूद केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संभाजीराजेची संसदेबाहेर निदर्शने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

संसदेत नोटाबंदीवरून गोंधळ सुरू असल्याने मराठा आरक्षणाचा प्रश्न मांडता न आल्याने आक्रमक झालेल्या खासदार संभाजीराजे यांनी गुरुवारी संसदेच्या आवारात आंदोलन केले. मराठा आरक्षणासाठी संसदेच्या आवारात फलक हातात घेऊन लक्ष वेधून घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देऊन मराठा समाजाच्या मागणीकडे तातडीने लक्ष देण्याचे आवाहन खासदार संभाजीराजे यांनी केले.

नागपूर विधीमंडळावर काढलेल्या मराठा क्रांती मोर्चात सहभागी झाल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी हातात फलक आणि डोक्यावर मराठा आरक्षणाचा उल्लेख असणारी टोपी घालून गुरुवारी सकाळी संसदेसमोर उभे राहून लक्ष वेधून घेतले. 'मराठा समाज की यही पुकार, जल्दसे जल्द आरक्षण दे सरकार', ‘कोपर्डी बलात्कार के अपराधियों को जल्दसे जल्द मृत्यूदंड मिले' असेही फलक संभाजीराजेंच्या हातात होते. हा प्रश्न संसदेत मांडण्याची इच्छा होती. पण सलग महिनाभर गोंधळ आणि गदारोळामुळे संसद ठप्प असल्याने अखेर सभागृहाबाहेर पण संसद परिसरात अशा पद्धतीने आंदोलन करावे लागले. मराठा आरक्षणाचे जनहिताचे प्रश्न संसदेत मांडता येत नसतील तर संसदेचा उपयोग काय? दिल्लीत फक्त गोंधळ पाहायला यायचे का? अशी प्रतिक्रियाही संभाजीराजे यांनी व्यक्त केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांना संभाजीराजे यांनी निवेदन दिले. केंद्रसरकार, राज्य सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांकडे लक्ष दिलेले नाही. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देण्यासाठी महाराष्ट्रात मराठा समाज लाखोंच्या संख्यने रस्त्यांवर उतरला आहे. या असंतोषाला उग्र वळण लागण्यापुर्वीच मागणीची गंभीर दखल घेतली पाहिजे असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलाखतपत्रात विद्यापीठाचा घोळ

$
0
0

Maruti.Patil@timesgroup.com

Tweet : @MarutipatilMT

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या विविध अधिविभागाच्या प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर व असिस्टंट प्रोफेसर पदाच्या १९ डिसेंबर रोजी होणाऱ्या मुलाखंतीसाठी केवळ आठवडाभर आधी पत्र पाठवण्यात आले आहे. नियमानुसार ही पत्रे संबंधित उमेदवाराला एक महिना आधी मिळणे अपेक्ष‌ित असताना, केवळ आठवडाभर आधी ई-मेलवर पत्र पाठवण्यात आल्याने उमेदवारांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. पाठवलेल्या पत्रावर १९ नोव्हेंबर रोजी पत्र पाठवल्याचा उल्लेख असल्याने आणि अद्याप रजिस्टर पत्र न मिळाल्याने उमेदवार नाराजी व्यक्त होत आहे.

शिवाजी विद्यापीठाच्या विविध अधिविभागाच्या प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर व असोसिएट प्रोफेसर पदाची मे २०१६ मध्ये जाहिरात प्रसिद्ध झाली. २४ जूनपर्यंत अर्ज सादर करण्याची अखेरीची मुदत होती. अर्जांची छाननी करून पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्याची तयारी सुरू झाली. त्यानुसार १९ डिसेंबर रोजी विद्यापीठातील एका अधिविभागातील या पदांच्या मुलाखती होणार आहेत. यासाठी पात्र उमेदवारांना दहा डिसेंबर रोजी मुलाखत पत्र ई-मेलद्वारे पाठवले. प्रत्यक्षात मुलाखतीच्या तारखेपुर्वी उमेदवारांना एक महिना आधी पत्र मिळणे, अपेक्ष‌ित आहे. पण त्यांना मुलाखतीपुर्वी केवळ आठवडाभर आधी इ-मेलद्वारे पत्रे पाठवली आहेत. पाठवलेल्या ई-मेल पत्रावर १९ नोव्हेंबर आशी तारीख असताना एवढ्या विलंबाने पत्र उमेदवारांना का मिळाले, असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे.

प्रशासनाकडून तयार झालेल्या पत्रावर जर १९ नोव्हेंबर तारीख आहे, तर त्यानंतरच्या दोन दिवसांनंतर पत्र का मिळाले नाही असाही प्रश्न उमेदवार उपस्थित करत आहेत. पात्र उमेदवारांना मुलाखतीचे पत्र केवळ ई-मेलद्वारेच मिळाले आहे, पण अद्याप त्यांना रजिस्टर पत्र मिळालेले नाही. त्यामुळे मुलाखत प्रक्रिया थांबविण्याचा उद्देश आहे का असाही प्रश्न उमेदवार उपस्थित करत आहेत.

अधिकारी आउट ऑफ रेंज

कोणत्याही उमेदवाराला मुलाखतीपुर्वी एक महिना अगोदर रजिस्टर पत्र मिळणे अपेक्ष‌ित असते, तसा नियमही आहे. पण प्रोफेसर पदासाठी १९ डिसेंबर रोजी होणाऱ्या मुलाखत प्रक्रियेसाठी दहा डिसेंबर रोजी मुलाखतीचे पत्र पाठवल्यामुळे मुलाखतीच्या तयारीसाठी अत्यंत कमी कालावधी मिळणार असल्याचे पात्र उमेदवारांनी सांगितले. याबाबत कुलसचिव डॉ. व्ही. डी. नांदवडेकर व बीसीयूडी डॉ. डी. आर. मोरे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालसंशोधनाचा अविष्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ग्लोबल वॉर्मिंगमुळे पर्यावरणात होत असलेला बदल आणि या मानवी आक्रमणामुळे वीज आणि पाणी या नैसर्गिक स्रोतांची बचत तसेच व्यवस्थापन करण्याच्यादृष्टीने विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पना विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून मांडल्या. ग्रामीण भागात जमा होणाऱ्या राखेपासून केली जाणारी वीजनिर्मिती, इको फ्रेंडली सीटी, मातीविना शेती, वॉटर लेवल इंडिकेटर, कचरा व्यवस्थापन, बहुउद्देशीय शेगडी, अपारंपारिक सौर ऊर्जेचा रेल्वेत उपयोग, घाटातील अपघात टाळण्यासाठी उपया-योजना अशा एकाहून अधिक वैज्ञानिक उपकरणांच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांनी नैस‌र्गिक ऊर्जा स्रोताच्या माध्यमातून उपया-योजना मांडण्याचा प्रयत्न केला.

महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीच्या वतीने ४२ वे शहरस्तरीय विज्ञान प्रदर्शन रंकाळा स्टँडजवळी ना. पा. हायस्कूलमध्ये बुधवारी भरविण्यात आले. या विज्ञान प्रदर्शनाचे उद्‍घाटन महापौर हसीना फरास यांच्या हस्ते करण्यात आले. दोन दिवस हे प्रदर्शन खुले राहणार असून यामध्ये ६ व ७ वीच्या विद्यार्थ्यांनी केलेले वैज्ञानिक उपकरणे पाहता येणार आहे. या प्रदर्शनात महापालिकेच्या ५४ शाळा, इंग्रजी व खासगी माध्यमाच्या २७ शाळांचा सहभाग असून एकूण ८७ उपकरणे मांडण्यात आली आहेत.

प्रदर्शनात विद्यार्थ्यांसाठी आरोग्य, उद्योग, वाहतूक व दळवळण, शाश्वत पर्यावरणासाठी पुनर्वापर, अन्न उत्पादन व अन्न सुरक्षा नवकल्पना, दैनंदिन जीवनात गणितीय उपाय हे विषय तर शिक्षकांसाठी गणित विज्ञान, लोकसंख्या शिक्षण हे विषय होते.

पाणीबचत करणारा इंडिकेटर, चुंबकाच्या प्रतिकर्षण शक्तीपासून विद्युतनिर्मिती, कचरा व्यवस्थापन, जल व्यवस्थापन, पावसाचे पाणी घराच्या छतावर साठवून त्याचा वापर पिण्यासह दैनंदिन वापरासाठी करणे, लिंबूपासून वीजनिर्मिती, नारळातील पाणी काढण्याचे यंत्र, सुरक्षित वाहतूक व्यवस्थापन, बहुउद्देशीय मॅग्नेट बोर्ड अशा विषयांची विद्यार्थ्यांनी अ‌‌‌तिशय कल्पकतेने आणि अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे.


कचरा व्यवस्थापन उपकरण लक्षवेधी

कचरा व्यवस्थापन-सध्या शहरातील कचरा व्यवस्थापन हे मोठे आव्हान ठरत आहे. महापालिकेला ज्या ठिकाणी कचरा कोंडाळा आहे. तिथे वैज्ञानिक उपकराचा वापर केल्यास ज्या ठिकाणी कचरा कोंडाळा भरला आहे, त्याची सूचना महापालिकेच्या संबंधित विभागा पोहचण्याबाबतचे उपकरण या प्रदर्शनात मांडण्यात आले आहे.

राखेपासून वीजनिर्मिती

ग्रामीण भागात पाणी तापविण्यासाठी चूल अथवा बंबाचा अधिक वापर केला जातो. यामाध्यमातून राख मोठ्या प्रमाणात टाकली जाते. ह्यचा राखेचा वापर करून समप्रमाणात राख आणि पाण्याच्या सहाय्याने वीजनिर्मिचा प्रयोग विद्यार्थ्यांनी मांडला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंबईत ५० लाखांचा मोर्चा काढणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘अॅट्रॉसिटी कायद्याला धक्का लावू दिला जाणार नाही. मराठा आरक्षणाला पूर्ण पाठिंबा राहील, मात्र ओबीसी आरक्षण आणि अॅट्रॉसिटी कायद्यात बदलाची भाषा करू नये. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तालावर चालणाऱ्या सरकारला २१ जानेवारीला मुंबईत २५ लाखांचा मोर्चा काढून ताकद दाखविण्यात येईल,’ असा इशारा बहुजन क्रांती मोर्चाचे प्रवर्तक आणि भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी येथे बुधवारी दिला. दसरा चौकात झालेल्या बहुजन क्रांती मोर्चावेळी ते बोलत होते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राज्यात दंगली घडविण्याचे काम करीत असल्याचा आरोप करून मेश्राम म्हणाले की, संघाकडून मराठा विरूद्ध दलित अशी दंगल घडविण्याचे षड‍्यंत्र रचले जात आहे. बहुजनांनी मराठ्यांविरोधात ताकदीने मोर्चे काढावेत, असेही प्रयत्न सुरू होते. मात्र बहुजनांचा लढा हा राजर्षी शाहू, फुले आणि आंबेडकरी विचारधारा पुढे नेण्यासाठी आहे. मराठा समाजाला प्रतिमोर्चा म्हणून नाही. आरएसएसने यापूर्वीही मंडल आयोगाची राजकीय खेळी केली आहे. संघाचा बहुजनांत विभाजनाचा डाव आहे. सहा हजार जाती एक झाल्यास सत्ता सहज मिळेल, त्यासाठी बहुजन समाजाने आत्मपरीक्षण करावे.’

मेश्राम म्हणाले की, बहुजन समाजाच्या हक्कावंर गदा आणण्याचा प्रयत्न केल्यास सत्ताधाऱ्यांना वेळीच धडा शिकविला जाईल. मराठा समाज बहुजनांचा मोठा भाऊ आहे. मात्र अॅट्रॉसिटी कायद्यातील बदलाची मागणी धक्कादायक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही अलिखित अॅट्रॉसिटी कायद्याची अंमलबजावणी केली जात होती. अॅट्रॉसिटीत बदल करण्याचा प्रयत्न झाल्यास विरोध केला जाईल. हा कायदा भटक्या जाती-जमातींसाठीही लागू करावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्पन्नाचे स्रोत तपासणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नोटाबंदीनंतर जिल्हा बँकांमधील ८२५ खात्यांमध्ये जमा केलेल्या रकमांबाबत नाबार्डने केलेल्या चौकशीनंतर आता ही खाती सरकारच्या अन्य यंत्रणांकडून तपासली जाण्याची शक्यता आहे. या खात्यांमध्ये दहा ते १३ नोव्हेंबर दरम्यान दोन लाखांपेक्षा जास्त रक्कम जमा झाल्यामुळे ही सर्व खाती चौकशीच्या फेऱ्यात आली आहेत. नाबार्डने जरी याबाबत कसाही अहवाल दिला असला तरी त्या खात्यांमध्ये भरलेल्या रकमेचा उत्पन्न स्त्रोत तपासला जाणार असल्याचे समजते.

कोल्हापूर जिल्हा बँकेच्या १५ शाखांमधील ८२५ खात्यांवर मोठी रक्कम जमा झाल्याचे दिसून आले होते. त्याबाबतची कागदपत्रे एकत्रित करुन रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार नाबार्डने चौकशी करण्याचे ठरवले होते. सर्व जिल्हा बँकांमध्ये अशा प्रकारच्या खात्यांची चौकशी केली गेली आहे. यामध्ये अनेक ठिकाणी संशयाचे वातावरण असले तरी जिल्ह्यातील शाखांमध्ये जमा झालेल्या रकमांबाबत तशी परिस्थिती नसल्याचे बँकेच्या सूत्रांकडून सांगण्यात आले होते. याबाबतचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करण्यात आला होता. मात्र त्यातील विस्तृत माहिती दिली नव्हती. मुख्य शाखेबरोबर इचलकरंजी, कुरुंदवाड, पेठवडगाव, आजरा अशा पाच शाखांतील २७५ च्या आसपास खात्यांची चौकशी करण्यात आली.

१५ पैकी पाच शाखांमधील सुमारे २७५ खात्यांची नाबार्डच्या पथकाने शाखांमध्ये जाऊन चौकशी केली. यामध्ये जमा केलेले पैसे कशा पद्धतीने भरले. जमा दिसत असलेली रक्कम एकाचवेळी की काही दिवसांनी टप्प्याटप्प्याने भरली, केवायसी आहे की नाही अशा प्रकारे चौकशीचा समावेश होता. त्याबाबतची कागदपत्रे तयार असल्याने त्याची खात्री करण्यात आली होती. नोटा बदलण्यात काही गोलमाल झाला आहे का याचीही तपासणी करण्यात आली. मात्र जिल्हा बँकेतून केवळ एक लाखावरील नोटा बदलून दिल्या आहेत. जिल्हा बँक नव्हे तर सर्वच बँकांमधील खात्यांवर दोन लाखांहून अधिक रक्कम जमा होते. त्या खात्यांवर रिझर्व्ह बँक तसेच आयकर विभाग नजर ठेवून होते. त्यामुळे ज्या खात्यांमध्ये अशा प्रकारे रक्कम जमा झाली. त्यांच्या चौकशीची सुरुवात केली जाण्याची शक्यता आहे. त्यामध्ये जिल्हा बँकेतील या खातेधारकांना भविष्यात विविध तपासणी यंत्रणांमार्फत चौकशीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. या यंत्रणा खात्यावर जमा झालेल्या रकमेचा स्त्रोत तसेच त्याची योग्य कारणे विचारली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्यांची रक्कम मोठी व बेकायदेशीर आहे, त्यांना मात्र यातून मोठा फटका बसू शकतो. तसेच ज्या नागरिकांनी अनेक ठिकाणी जाऊन नोटा बदलून घेतल्या आहेत. अशा नागरिकांपर्यंतही भविष्यात या यंत्रणा पोहचण्याची शक्यता आहे.

आजच्या सुनावणीकडे लक्ष

देशभरातील जिल्हा बँकांवरील निर्बंधांबाबत सर्वोच्च न्यायालयात सर्व जिल्हा बँकांनी दाखल केलेल्या याचिकेवर गुरुवारी सुनावणी होत आहे. नाबार्डच्यावतीने करण्यात आलेली चौकशी या न्यायालयीन प्रक्रियेसाठी राबवण्यात आली, असे समजते. गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात होत असलेल्या सुनावणीकडे ​जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. जिल्हा बँकेत नोटा बंदीनंतर ३०४ कोटी रुपयांच्या जुन्या नोटा आहेत. त्या स्वीकारलेल्या नाहीत. त्याच्या व्याजाचा भार बँकेवर पडत आहे. त्यामुळे बँक प्रशासनही या सुनावणीतून दिलासा मिळेल अशी आशा बाळगून आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एसबीआयमध्ये नोटाबदलीत घोळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

केंद्र सरकारने व्यवहारातील १००० आणि ५०० रुपयांच्या नोटा रद्द केल्यानंतर जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी बँकांमध्ये झुंबड उडाली होती. सरकारने नोटा बदलण्यासाठी मर्यादा घातली होती, त्याचबरोबर ग्राहकांकडून अर्ज भरून घेण्याची सक्तीही बँकाना केली होती, मात्र शाहू मार्केट यार्ड परिसरातील स्टेट बँकेचे कर्मचारी चंद्रकांत मल्लू चव्हाण (वय ३७, रा. शांतीनगर, उचगाव) याने नियम डावलून सुमारे ७ लाखांची रक्कम बदलून दिल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत बँकेचे मॅनेजर धनंजय महादेव अभ्यंकर (वय ५६, रा. खानविलकर पंपामागे, नागाळा पार्क) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चलनातील १००० आणि ५०० रुपयांच्या नोटा रद्द केल्याचा निर्णय ८ नोव्हेंबरला जाहीर केला. यानंतर जुन्या नोटा बँकेत आपल्या खात्यावर जमा करून नवीन नोटा देण्याची व्यवस्थाही कार्यान्वित केली, मात्र ग्राहकांना नवीन दोन हजार रुपयांच्या नोटा देताना रकमेवर मर्यादा घातली होती. एकाच वेळी मोठ्या रकमा जमा करून त्या बदल्यात नवीन नोटा घेण्याचे प्रकार घडू नयेत, यासाठी संबंधित ग्राहकांच्या ओळखपत्रासह अर्ज भरून घेण्याचे निर्देशही रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना दिले होते. शाहू मार्केट यार्ड परिसरातील स्टेट बँकेच्या शाखेत हे नियम डावलून ग्राहकांना मोठ्या रकमा दिल्याचे उघडकीस आले आहे. बँकेतील कर्मचारी चंद्रकांत मल्लू चव्हाण याने ११ नोव्हेंरपासून ६ लाख ९२ हजार रुपयांच्या नव्या नोटा ग्राहकांना दिल्या आहेत. एका ग्राहकाला केवळ ४ हजार रुपये देण्याचा नियम असतानाही चव्हाण याने मोठी रक्कम दिली आहे. याशिवाय कोणत्याही ग्राहकाकडून ओळखपत्र आणि अर्जही भरून घेतला नाही. हा प्रकार बँकेचे मॅनेजर धनंजय अभ्यंकर यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी बुधवारी (ता. १४) शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

पोलिसांनी बँकेतील कागदपत्रे ताब्यात घेतली असून, संशयित चव्हाण याने केलेल्या व्यवहारांची तपासणी सुरू आहे. चव्हाण यालाही अटक करण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. त्याने एकाच ग्राहकाची रक्कम बदलून दिल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे, त्यामुळे नियम डावलून पैसे बदलून घेणारा तो ग्राहक कोण ? याचीही माहिती घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. याशिवाय इतर बँकांमध्येही असे प्रकार घडल्याची शक्यता असल्याने याबाबत बँकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तक्रारी करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

तो ग्राहक कोण ?

बँकेतील कर्मचारी चंद्रकांत चव्हाण याच्याकडून ६ लाख ९२ हजार रुपयांची रक्कम बदलून घेणारा तो ग्राहक कोण आहे, याची चर्चा शहरात सुरू झाली आहे. याबाबत बँक कर्मचाऱ्यास मोठे कमिशन दिल्याचाही संशय आहे. कोट्यवधींच्या नव्या नोटा धनदांडग्यांकडे सापडत असल्याने बँका संशयाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. कोल्हापुरातही असाच प्रकार उघडकीस आल्याने बँकांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मार्केट यार्डातील स्टेट बँकेच्या मॅनेजरनी बँकेतील कर्मचाऱ्याविरोधात फिर्याद दाखल केली आहे. बँकेची कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत, त्याचबरोबर संशयित चंद्रकांत चव्हाण यालाही लवकरच अटक करू. याप्रकरणी संबंधित ग्राहकाचीही चौकशी होणार आहे.

स. ई. मुंडे, पोलिस उपनिरीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंब्याच्या जंगलात ‘श्रीलंकन फ्रॉग माऊथ’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सहसा दिवसा नजरेस न पडणारा दुर्मिळ श्रीलंकन फ्रॉग माउथ हा पक्षी आंबा येथील घनदाट जंगलात पक्षी निरीक्षकांना आढळून आला. महत्त्वाचे म्हणजे नर व मादी एकाच ठिकाणी पहायला मिळणे हा पक्षी निरीक्षकांसाठी दुर्मिळ योग होता. महाराष्ट्र पक्षी मित्र व विवेकानंद फाउंडेशनचे युवराज पाटील, संदीप पाटील व सुजित चव्हाण यांना पक्षी निरीक्षणावेळी ही जोडी पहायला मिळाली.

दिवसा सहसा नजरेस न पडणारा श्रीलंकन फ्रॉग माउथ मादी व त्याच्या शेजारी नर बसला होता. एका फुलपाखराचा पाठलाग करत असताना या तरुणांना हे पक्षी दिसले. या पक्षांचा रंग आणि आकार निसर्गाशी इतका मिळता जुळता आहे की, ते सहजपणे ओळखून येत नाहीत. एकाचवेळी एकत्र येणाऱ्या फ्लाईकेचर्समधील चार प्रकार पाहण्यासाठी व त्यांची छायाचित्रे घेण्यासाठी हे तरुण गेले होते. यावेळी व्हरडिटेर फ्लाईकेचर, प्यॅराडाइज फ्लाईकेचर, यलो ब्राउडेड फ्लाईकेचर असे तीन प्रकार दिसले. त्यावेळी दुर्मिळ श्रीलंकन फ्रॉग माउथ पक्षी दिसला.

हा निशाचर असून खाद्य शोधासाठी रात्रीच बाहेर पडतात. दिवसा घनदाट जंगलात विश्रांती घेत असतो. साधारणपणे २२ ते २३ सेंटीमीटर लांब शरीर असते. कीटक हे त्याचे आवडते खाद्य आहे. नर पक्ष्याचा संपूर्ण शरीरचा रंग हा वाळलेल्या लाकडाच्या सालीसारखा राखाडी असतो. मादी ही बदामी रंगाची असते पंखाच्या बाजूने व पाठीमागे बदामी रंगावर पांढरे ठिपके असतात. बेडकाच्या तोंडासारखे तोंड असलेने त्याला मराठीत मण्डूक मुखी असेही म्हणतात.

०००

एक ते अर्धा फुटावरुन हे पक्षी पाहिले. नर व मादी हे दोघे एकत्र बसलेले पहायला मिळणे म्हणजे पक्षी अभ्यासकांसाठी दुर्मिळ योग आहे. याशिवाय फ्लाईकेचरसह ऑरेंज हेडेड थ्रश ,सर्पेंट ईगल खाटीक कोतवाल, रेड व्हिस्करड बुलबुल पाँन्ड हेरॉन, रॉबिन असे पक्षी पहायला मिळाले. जगातील काही मोजक्याच जैवविविधतेच्यादृष्टीने अतिसंवेदनशील प्रदेश म्हणून गणलेल्या पश्चिम घाटातील आंबा येथील जंगल पक्ष्यांसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे, हे यावरुन स्पष्ट होते.

युवराज पाटील, पक्षी निरीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पॅरोलवरील ५२ कैदी फरार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कळंबा येथील मध्यवर्ती कारागृहातून पॅरोल घेऊन गेलेले ५२ कैदी फरार आहेत. त्यांना अटक करून आणण्याचे प्रयत्न कारागृह प्रशासनाकडून सुरू आहेत. या फरार कैद्यांची माहिती संबंधित पोलिस ठाण्यांना कळवली आहे. नागरिकांनाही या कैद्यांची माहिती मिळावी यासाठी कैद्यांची नावे प्रसिद्धीस देण्यात आली आहेत.

कळंबा कारागृहात सुमारे १७०० कैदी शिक्षा भोगत आहेत. यातील कैद्यांना नियमांनुसार संचित किंवा पॅरोलवरील रजा दिली जाते. ती संपल्यानंतर त्यांनी स्वत:हून कारागृहात दाखल होणे गरजेचे असते. गेल्या काही वर्षांत कळंबा कारागृहातून असे ५२ कैदी फरार झाले आहेत. या कैद्यांना पुन्हा कारागृहात आणण्यासाठी राज्यासह परराज्यातील संबंधित पोलिस ठाण्यांशी पत्रव्यवहार केला आहे. फरार कैदी नागरिकांमध्येच राहतात. त्यामुळे नागरिकांच्या माहितीसाठीही या कैद्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. ५२ कैद्यांपैकी कुणी आढळल्यास जवळच्या पोलिस ठाण्यात माहिती द्यावी, असे आवाहन अधीक्षक शरद शेळके यांनी केले आहे.

सुमित ब्रिजबिहारी गिरी, बाबू हनुमंत उर्फ नरसय्या मद्रासी, विश्वनाथ जगन्नाथ यादव उर्फ मोठा काका, जितेंद्र तानाजी माने, मुजिब खलिल इनामदार, नासिर खलिल इनामदार, बाबू वीर महाराणा, अनिल शशिकांत आळवे, दादासाहेब बाळाराम जाधव, विनोद रामचंद्र धाकड, गौतमलाल भवनजी मिणा, गणेश सखाराम कांबळे, नितीन अनिल स्वर्गे, कडया उर्फ लक्ष्मण महादेव वैरागणे, आसईतंबी उर्फ लंगडा उर्फ सत्या नटराजन नाडर, बलबीरसिंग इंद्रसिंग महाल, अंबादास तुकाराम पवार, मंगलसिंग उर्फ मंगेश चतुरसिंग ओनावले, अमरसिंग कालुसिंग विश्वकर्मा, पाकीयाराज नटराज नाडर, मनजितसिंग जोगिंदरसिंग सैनी, यशवंत पांडुरंग कीर, चैनसिंग पेपसिंग राठोड, रमेश चिमाजी शिंदे, पिंटू उर्फ मारुती दत्तात्रय हरीहर, सुजित उर्फ पप्पू भीमा कुऱ्हाडे, सुनीत भीमा कुऱ्हाडे, बबलू मुरलीधर साळवे, दिलीप श्रावण कमाने, सर्जेराव सीताराम पोळ, अनिल मारुती काळै, श्रीकांत बापूराव गायकवाड, भरतकुमार भवरलाल पंड्या, अब्दुलगफूर अब्दुलरहिमबिया फक्की, यल्लाप्पा दशरथ गायकवाड, मोहम्मदहुसेन मोहम्मदसिध्दीक हमीदाणी, संतोष सदशिव वसेकर, प्रमोद भीमराव भोसले, जाफर पैगंबर पाटील, राहुल बाबुराव पवार, ईस्माईल महमद शेख, राजू गुरखान मुजावर, प्रमोद मधुकर नाक्ती, विकास हरी जाधव, प्रल्हाद आक्रूर चव्हाण, वसंत दिलीप लोंढे, सुरेश तिमप्पा शेट्टी, दिगंबर ईरण्णा मजकुरे, अतिकअहमद अब्दुलहाफीज खान, सुधाकर राजाराम माने, अन्सार नजीर खाटीक आणि रवींद्र मेस्त्री चव्हाण अशी या कैद्यांची नावे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोर्टाच्या बनावट आदेशाने फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

हायकोर्टाचा बनावट आदेश तयार करून धर्मादाय आयुक्त कार्यालयाची फसवणूक करणाऱ्या आरोपीस प्रथमवर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांनी दोन वर्षे सक्तमजुरी आणि १४ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. मोहन शिवराम वाघमारे (वय ६०, रा. पुणदी, ता. पलूस, जि. सांगली) असे आरोपीचे नाव असून, त्यांनी हायकोर्टाकडून शिक्षण संस्थेवर प्रशासकपदी नेमणूक झाल्याचा खोटा आदेश तयार केला होता. बुधवारी (ता. १४) व्ही. सी. जोशी यांच्या कोर्टाने ही शिक्षा सुनावली.

पुणदी तर्फ वाळवा येथील यशवंत काशिद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र नारायण रणखांबे आणि मोहन वाघमारे यांच्यात संस्थेतील कामांवरून वाद होता. हा वाद न्यायप्रविष्ठ असतानाच मोहन वाघमारे यांनी हायकोर्टाच्या सही-शिक्क्याचा एक आदेश धर्मादाय आयुक्त कार्यालयात दाखल करून संस्थेच्या प्रशासकपदी नेमणूक झाल्याचा दावा केला. धर्मादाय आयुक्त कार्यालयाने नियुक्तीचे पत्रही दिले, मात्र या आदेशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र रणखांबे यांना संशय आल्याने त्यांनी उच्च न्यायालयात खात्री केली असता, असा कोणताही आदेश दिला नसल्याचे स्पष्ट झाले. याबाबत धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार दिल्यानंतर आयुक्तांनी मोहन वाघमारे यांच्यासह त्यांचे वकील श्रीरंग भिसे यांच्याविरोधात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती.

या खटल्यात सरकारी वकील अशोक रणदिवे यांनी साक्षीदार भैरी आप्पा पोवार यांची साक्ष घेतली, त्याचबरोबर कागदपत्रांची मांडणी करून वाघमारे यांनी खोटा आदेश सादर केल्याचे निदर्शनास आणून दिले. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. सी. जोशी यांनी पुरावे आणि साक्ष ग्राह्य धरून मोहन वाघमारे यांना दोन वर्षांची सक्तमजुरी आणि १४ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या खटल्यातील दुसरे संशयित आरोपी वकील श्रीरंग भिसे यांचा यापूर्वीच मृत्यू झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गळती काढण्यासाठी ज्यादा ८० लाख द्या’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थित करण्यासाठी विविध ठिकाणच्या पाण्याच्या पाइपची गळती दुरुस्त करण्याबरोबरच अनेक ठिकाणी नवीन पाइपची आवश्यकता आहे. यासाठी पाणीपुरवठा विभागाने दरवर्षीच्या बजेट तरतुदीपेक्षा ८० लाख रुपयांची जादाची तरतूद करण्याची मागणी केली आहे. गेल्या दोन महिन्यात सातत्याने काही जुन्या जलवाहिन्या फुटल्या आहेत. त्यातून पाणीपुरवठ्यावर परिणाम होऊन सभागृहामध्ये पडसाद उमटत असल्याच्या पार्श्वभूमीवर दुरुस्तीसाठी जादा निधीची मागणी केली आहे.

​शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी राबवण्यात आलेल्या योजनांमधील शिंगणापूर योजना प्रचंड वादग्रस्त झाली. अनेक ठिकाणी गळती व पाइप फुटण्याच्या प्रकाराने गळकी योजना म्हणूनच प्रसिद्ध झाली होती. त्याची दुरुस्ती अजूनही सुरू असून काही ठिकाणची गळती दूर झालेली नाही. मुख्य योजनेतील ही गळती असताना शहराच्या अनेक भागातील अंतर्गत पाइपलाइन जुन्या झाल्या आहेत. त्यांच्यातून गळती सुरू असून पाणी वाया जाण्याबरोबरच पाणीपुरवठा योग्य दाबाने होत नसल्याच्या तक्रारी होत्या. या साऱ्या तक्रारींवर मात करण्यासाठी पाणीपुरवठा विभागाने दुरुस्तीसाठी जादा निधीची मागणी केली आहे.

नवीन अंदाजपत्रक सादर करण्यापर्यंत दुरुस्तीची कामे पुर्ण करण्यासाठी विभागाने आणखी ८० लाख रुपयांची मागणी केली आहे. या अंदाजपत्रकात ७५ लाख रुपयांची तरतूद केली होती. त्याव्यतिरिक्त उर्वरित कामांसाठी ८० लाख रुपयांची आवश्यकता असल्याने ​पाणीपुरवठा विभागाने निधीचे पुर्ननियोजन करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. मंगळवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेमध्ये हा विषय ठेवण्यात आला असून पाणीपुरवठ्याच्या नियोजनासाठी या निधीची अत्यावश्यकता असल्याचे सांगण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यापारी संशयाच्या भोवऱ्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रत्नागिरी-गोवा राष्ट्रीय महामार्गावर हातखंबा येथे रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी बुधवारी (ता. १४) एका कारमधून ५१ लाखांची रक्कम जप्त केली होती. ही रक्कम घेऊन जाणाऱ्या गांधीनगर येथील सहा व्यापाऱ्यांची पोलिसांनी सुटका केली असली तरी त्यांच्यावरील संशय कायम आहे. जप्त केलेली रक्कम प्राप्त‌िकर विभागाकडे सोपवली असून, रकमेबाबत कागदपत्रे सादर करण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. या घटनेने गांधीनगरातही खळबळ निर्माण झाली आहे.

हातखंबा येथून मोठ्या प्रमाणात रोख रकमेची ने-आण होणार असल्याची माहिती रत्नागिरी जिल्हा पोलिसांना मिळाली होती. या माहितीनुसार पोलिसांनी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी सुरू केली होती. तपासणीदरम्यान पोलिसांना इनोव्हा कारमधून (एम. एच. ७ ए. डी. ४७८६) व्यक्तींकडून ५१ लाख रुपयांची रोकड मिळाली. पोलिसांनी रफिक उस्मान नाईक (वय ३८, रा. कणकवली, जि. सिंधुदुर्ग), विनोद सुरेश हिंदुजा (३५), मुकेश सुरेशलाल राजानी (२८), भरत हेमंत भानुशाली (२५), मनीष सुनीलकुमार रिजवाने (३५) आणि संतोष बाळकृष्ण शिंदे (३५, सर्व रा, गांधीनगर) यांना ताब्यात घेतले होते. चौकशी केली असता, या सर्वांनी व्यापाराची रक्कम असल्याचे पोलिसांना सांगितले, मात्र मोठी रक्कम आणि सर्व नोटा दोन हजारांच्या असल्याने संशय वाढला आहे. रकमेसह संशयितांना हातखंबा पोलिस ठाण्यात घेऊन गेल्यानंतर अधिक चौकशी करण्यात आली. संबंधित रक्कम व्यापारातील असून, कोकणातील व्यापाऱ्यांकडून घेतली असल्याचे संशियितांनी सांगितले. यातील पाच जणांची गांधीनगरात दुकाने आहेत. याबाबत खरेदी-विक्रीची कागदपत्रे मागितली असता ती न मिळाल्याने पोलिसांनी याची माहिती आयकर विभागाला कळवली आहे, तर संशयितांची सुटका केली. रात्री उशिरापर्यंत व्यापारी गांधीनगरात पोहोचले नव्हते.

या घटनेनंतर गुरुवारी गांधीनगरातील व्यापाऱ्यांमध्ये अस्वस्थता होती. दिवसभरात प्राप्त‌िकर विभागाने संबंधित व्यापाऱ्यांच्या घरात कोणतीच चौकशी केली नाही. व्यापाऱ्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क केला असता, त्यांनीही ही रक्कम व्यापारातील खरेदी-विक्रीची असल्याचे सांगितले. अधूनमधून पैसे आणण्यासाठी व्यापारी कोकणात जातात, अशी माहिती त्यांनी दिली, मात्र बँकांमध्ये पैसे भरण्याऐवजी रोकड घेऊन जाण्याचा धोका का पत्करला? एवढ्या मोठ्या प्रमाणात नवीन नोटा कशा आल्या? खरेदी-विक्रीची कागदपत्रे सोबत का नव्हती? या प्रश्नांची उत्तरे उद्याप मिळालेली नाहीत.

रकमेबाबत उलटसुलट चर्चा

अनेकदा व्यापाराच्या नावाखाली हवालाच्या पैशाची ने-आण केली जाते. रत्नागिरी पोलिसांनी पकडलेल्या व्यापाऱ्यांमधील एक होलसेल कपड्यांचा व्यापारी, तर दुसरा किराणा दुकानदार आहे, त्यामुळे यांच्याकडे लाखोंची रक्कम कशी आली याबाबत उलटसुलट चर्चा केली जात आहे. जप्त केलेल्या नोटांमध्ये दोन हजारांच्या नोटांची नवी कोरी बंडले असल्याने या नोटा कोणत्या बँकेतून आल्या याबाबतही स्पष्टता नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बनावट नोटा खपवणारा ताब्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

केंद्र सरकारने जुन्या १००० आणि ५०० रुपयांच्या नोटा चलनातून बंद केल्याचा निर्णय घेतल्यानंतर बनावट नोटांना आळा बसेल असे सांगण्यात आले. प्रत्यक्षात मात्र नवीन नोटांसोबतच बनावट नोटाही बाजारात आल्याची वस्तुस्थिती आहे. कोल्हापुरातही बनावट नोटा खपवण्याची यंत्रणाही सक्रीय असल्याचे उघडकीस आले आहे. बनावट नोट खपवण्याच्या प्रयत्नातील एका संशयितास शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडे बनावट नोट कुठून आली याचा शोध सुरू आहे.

जुन्या १००० आणि ५०० रुपायांच्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर सरकारने आठवड्याभरातच २००० रुपयांची नवीन नोट चलनात आणली. बनावट नोटा चलनात येऊ नयेत, यासाठीच नोटाबंदीचा निर्णय घेतल्याचा युक्तिवाद करण्यात आला. मात्र पहिल्या दिवसापासूनच बनावट नोटांनी हा युक्तिवाद खोटा ठरवला. कोल्हापुरातही बनावट नोटा आल्या असून, त्या खपवण्याची स्वतंत्र यंत्रणाही सक्रीय आहे. संध्याकाळी आणि रात्रीच्या वेळी बनावट नोटा देऊन खरेदी केली जात आहे. आठवड्यापूर्वी खानविलकर पेट्रोल पंपापासून जवळच एका विक्रेत्याला २ हजाराची बनावट नोट देऊन गंडा घातला होता. याची चर्चा पोलिसांपर्यंत पोहोचल्यानंतर पोलिसांनी संशयास्पद व्यक्तींवर नजर ठेवण्यास सुरूवात केली होती. गुरूवारी (ता. १५) दुपारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी एक संशयित बनावट नोट खपवत असल्याचे व्यावसायिकाच्या लक्षात आले. व्यावसायिकाने याची माहिती पोलिसांना देताच पोलिसांनी बनावट नोटेसह संशयिताला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती.

संशियित पेशाने डॉक्टर आहे. त्याने ही नोट कुठून आणली याची सखोल चौकशी सुरू असून, आठवड्यापूर्वी खानविलकर पेट्रोलपंप परिसरात बनावट नोट खपवणारा हाच असावा, असा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी या प्रकाराचे गांभीर्य ओळखून सखोल चौकशी सुरू केली आहे. यातून मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


घोटाळ्यातील बँक कर्मचारी फरार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बेकायदेशीरपणे लाखोंच्या नोटा बदलून देणारा स्टेट बँकेचा कर्मचारी चंद्रकांत मल्लू चव्हाण (वय ३७, रा. शांतीनगर, उचगाव) हा फरार झाला आहे. शाहूपुरी पोलिसांनी गुरुवारी (ता. १५) चव्हाण याच्या घराची झडती घेतली, मात्र तो पत्नीसह तिरुपती येथे गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. चव्हाण याने कोणत्या खात्यांवरून संशयास्पद रक्कम दिली आहे याची माहिती घेण्यासाठी पोलिसांनी बँकेच्या कागदपत्रांची तपासणी सुरू केली आहे.

केंद्र सरकारने एक हजार आणि ५०० रुपयांच्या नोटा चलनातून बंद केल्यानंतर नवीन दोन हजार रुपयांच्या नोटा देण्यासाठी बँकांना नियमावली बंधनकारक केली होती. प्रत्येक खातेदाराला केवळ चार हजार रुपयांचीच रक्कम देण्याचे आदेश दिले होते. रक्कम देताना संबंधित ग्राहकांचे ओळखपत्र घेणे सक्तीचे केले आहे. शहरातील मार्केट यार्ड परिसरातील स्टेट बँकेत मात्र केवायसीचा नियम डावलून मोठ्या प्रमाणात रक्कम वितरित झाली. बँक मॅनेजर धनंजय महादेव अभ्यंकर यांना हा प्रकार निदर्शनास येताच त्यांनी संपूर्ण व्यवहारांची पडताळणी केली. कर्मचारी चंद्रकांत चव्हाण याने नियम डावलून ६ लाख ९२ हजार रुपयांची रक्कम ग्राहकांना दिली असल्याचे स्पष्ट झाले. अभ्यंकर यांनी याबाबत शाहूपुरी पोलिस ठाण्यात चव्हाण याच्याविरोधात फिर्याद दाखल केल्यानंतर शहरात खळबळ निर्माण झाली होती.

पोलिसांनी गुरुवारी चव्हाण याच्या उचगावमधील घराची झडती घेतली. यावेळी त्याची आई घरात होती. आईकडे केलेल्या चौकशीत चंद्रकांत चव्हाण त्याच्या पत्नीसह तिरुपतीला गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. दरम्यान, चव्हाण याच्या मोबाइलवरून लोकेशनचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. त्याला चौकशीसाठी पोलिस ठाण्यात हजर राहण्याचा निरोप दिला आहे, मात्र यानंतरही त्याने हजर होण्यास टाळाटाळ केल्यास त्याच्या अटकेसाठी पथके रवाना होणार आहेत. चव्हाण याने नवीन नोटा नेमक्या कोणाला दिल्या याचा शोध घेण्यासाठी बँकेतील कागदपत्रांची तपासणी सुरू असून, चव्हाण याला ताब्यात घेतल्यानंतरच ही रक्कम कोणाला दिली याचे रहस्य समोर येईल, अशी माहिती पोलिस निरीक्षक प्रवीण चौगुले यांनी दिली.

बँकिंग क्षेत्रात खळबळ

बँकेच्या कर्मचाऱ्याकडूनच नियम डावलून नव्या नोटांचे वितरण झाल्याचा प्रकार उघडकीस आल्याने गुरुवारी शहरातील सर्वच बँकांमध्ये या घटनेची चर्चा सुरू होती. इतर बँकांच्या अधिकाऱ्यांनी व्यवहारांची तपासणी सुरू केली असून, संशयास्पद व्यवहार आणि कर्मचाऱ्यांवर नजर ठेवली जात आहे. यातच गांधीनगरमधील पाच व्यक्तींना नव्या नोटांसह रत्नागिरी जिल्ह्यात अटक झाल्याने त्यांच्याकडील नोटा कोल्हापुरातूनच वितरित झाल्या आहेत का? याचीही चर्चा सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॅशलेससाठी तरुणाईचा पुढाकार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
कॅशलेस व्यवहारासाठी ‘एसबीआय बडी मोबाइलअॅप’च्या वापरासंबंधी ‘केआयटी’ (आयएमईआर)च्या १०० विद्यार्थ्यांना तज्ज्ञांकडून प्रशिक्षण देण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांनी प्रमुख बाजारपेठेतील छोट्या व्यवसायिकांना अॅप वापरण्याबाबत प्रशिक्षण देण्याच्या मोहिमेला सुरूवात केली. तसेच महाविद्यालयांमध्ये ‌जागृती केली. अधिकाधिक लोकांपर्यत अॅपची माहिती पोहचवण्याचा हा प्रयत्न आहे. कॅशलेस व्यवहार कसे करायचे, वॉलेटमध्ये रक्कम कशी जमा करायची, त्याचा वापर व्यक्ती-व्यक्तींमध्ये, मोबाइल रिचार्ज, दैनंदिन बिले (लाइट, पाणी, फोन, गॅस सिलिंडर) ऑनलाइन शॉपिंगसाठी कसा करायचा, याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी युवा टीम काम करणार आहे. विद्यार्थ्यांचा ग्रुप करुन प्रत्येक ग्रुपसाठी एक स्वतंत्र बँक अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून हे सर्व विद्यार्थी विद्यापीठ, विविध कॉलेज, नागरिकांना कॅशलेस व्यवहारांबाबत मार्गदर्शन करणार आहेत.


मार्गदर्शनाबरोबरच शंकांचेही समाधान

‘मिशन कॅशलेस कोल्हापूर’ मोहिमेअंतर्गत देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्समध्येही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ‘बडी’ मोबाइल अॅपबाबत बँकेच्या तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना धडे दिले. कॉलेजमधील बारा क्लासरूममध्ये विद्यार्थ्यांना कॅशलेस मोहीम आणि बडी अॅप संदर्भात माहिती देण्यात आली. दुपारी साडे अकरा ते अडीच या वेळेत हे मार्गदर्शन सत्र झाले. त्यात विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणादरम्यान शंकाही विचारल्या. यात अॅपसाठी स्टेट बँकेमध्ये अकाउंट असणे गरजेचे आहे का? अॅप वापरणाऱ्यांसाठी काही कॅशबॅक ऑफर्स आहेत का? असतील, तर त्या ऑफर्स कोणत्या आहेत? अशा शंका विद्यार्थ्यांनी उपस्थित केल्या. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मुलांनी बँक खात्याच्या किंवा पैशांच्या सुरक्षेविषयी सर्वाधिक शंका विचारल्या. या सर्व शंकांचे निरसन यावेळी करण्यात आले. जवळपास तीन तासांत कॉलेजमधील सुमारे सहाशे विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शनाचा लाभ घेतला. विद्यार्थ्यांबरोबरच कॉलेजचे प्राध्यापक आणि इतर स्टाफलाही बडी अॅप विषयी मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षणादरम्यान सुमारे चारशे जणांनी अॅप डाउनलोड करून त्याचा वापर सुरू केला. या उपक्रमास प्राचार्य व्ही. ए. पाटील व त्यांच्या स्टाफचे विशेष सहकार्य लाभले.

विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी डाउनलोड केले एसबीआय बडी

शिवाजी विद्यापीठाच्या दहाहून अधिक अधिविभागात एसबीआयच्या विविध अॅपचे कॅपेनिंग करण्यात आले. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्सुकतेने अॅपची माहिती घेतली. काही विद्यार्थ्यांनी अॅप डाऊनलोड करून ट्रांझेक्शनही सुरू केले. शिवाजी विद्यापीठातील सुमारे एक हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी एसबीआय बडी अॅप्लिकेशन सुविधेचा फायदा घेतला. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, समन्वयक डॉ. ए. एम. गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली ही माहिती देण्यात आली.

शिवाजी विद्यापीठात वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित, संख्याशास्त्र, संगणकशास्त्र, पर्यावरणशास्त्र, इलेक्टॉनिक्स आणि भाषा भवनमधील इंग्रजी, हिंदी, विदेशी भाषा विभागात या बडी सुविधेची माहिती देण्यात आली. विद्यापीठातील बहुतांशी सर्व विद्यार्थ्यांच्याकडे स्मार्ट फोन आणि व्हॉट्सअॅपची सुविधा होती. एसबीआयच्या टीमकडून या अॅपची माहिती देण्यात आली. स्टेट बँक ऑफ इंडियाने काही दिवसांपूर्वी ग्राहकांसाठी ‘एसबीआय बडी अॅप’ आणले आहे. हे अॅप्लिकेशन १३ भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे. या अॅप्लिकेशनचे वैशिष्टय़ म्हणजे कॅशलेस व्यवहार यामुळे शक्य होणार आहेत. एसबीआयसह इतर बँकांमध्ये खाते असलेल्या ग्राहकांनाही या अॅप्लिकेशनचा फायदा घेता येणार आहे. गुगल प्ले स्टोअरवर हे ऍप्लिकेशन मोफत आहे. या ऍप्लिकेशनचा वापर मोबाइल बिल, वीज बिल, किराणा सामान बिल भरण्यासाठी उपयोग करता येईल. यावेळी विद्यार्थ्यांसाठी एसबीआय बडी सुविधा उपलब्ध करावी, अशी सूचना काहींनी केली अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना शु्ल्क, परीक्षा शुल्क भरण्यात अडचण येते. त्यामुळे शाळा आणि महाविद्यालयांनी या अॅपच्या माध्यमातून फी स्वीकारावी, अशी सूचना मागणीही काही विद्यार्थ्यांनी केली.

सायबर कॉलेजमध्ये उत्सुकता

सायबर कॉलेजमध्ये दुपारी बारा वाजल्यापासून कॅम्पेनिंग करण्यात आले. अनेक विद्यार्थ्यांनी बडी अॅपची माहिती विचारली. अन्य अॅपपेक्षा अत्यंत सुरक्षित आणि सुटसुटीत व्यवहारासाठी ‘बडी’ हा एकमेव पर्याय असल्याचे एसबीआयच्या टीमने सांगितले. ‘नो कॅश, नो वरी’, असे सांगून अनेक विद्यार्थ्यांनी बडीचे अॅप्लिकेशन डाऊनलोड केले. गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड केले. ओटीपी क्रमांक मिळाल्यानंतर अनेकांच्या मोबाइलमध्ये बडी अॅप्लिकेशन डाउनलोड झाले. काही विद्यार्थ्यांनी फस्ट ट्रान्झेशन करून कॅशबँक ऑफरचा लाभही घेतला. रक्कम मागा, पाठवा, रिचार्ज, बिल भरणा, खरेदी आणि गिफ्ट योजनांची माहिती देण्यात आली. अॅप्लिकेशनवरील आस्क मनी, सेंड मनी, अॅड मनी, रिचार्ज अॅण्ड पे बिल ऑप्शनची माहिती देण्यात आली. अनेक प्रकारचे शॉपिंग, मुव्ही, विमानाची तिकीटे आदी सुविधांचा लाभ घेणार असल्याचे एसबीआय टीमने सांगितले. बाजारात अनेक वॉलेट उपलब्ध असले तरी विश्वसनीय बँकेचे मोबाइल वॉलेट विद्यार्थी निश्चितच स्वीकारणार आहेत, असे काहींनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चिंचणेर-वंदन प्रकरण३२ जणांचीजामिनावर मुक्तता

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सातारा

चिंचणेर-वंदन येथील जाळपोळ आणि दगडफेक प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या ३२ जणांची गुरुवारी सातारा येथील विशेष न्यायालयाने अटी-शर्तींवर जामिनावर मुक्तता केली.

चिंचणेर-वंदन (ता. सातारा) येथील माहेरवासिण नवविवाहितेच्या खूनप्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी त्याच गावात राहणाऱ्या सिद्धार्थ उर्फ बारक्या दयानंद दणाणे (वय २४) या युवकाला अटक केली होती. दणाणे याने गावातील नवविवाहितेचा खून केल्याची माहिती मिळाल्यानंतर सहा डिंसेबरच्या रात्री जमावाने सिद्धार्थ दणाणे व त्याच्या नातेवाईकांच्या घरावर दगडफेक करीत परिसरातील वाहने जाळली होती. या बाबतची तक्रार अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार दाखल झाल्यानंतर सातारा तालुका पोलिसांनी चिंचणेर-वंदन येथील ३४ जणांना ताब्यात घेतले होते. ताब्यात घेतलेल्यांपैकी २ अल्पवयीन असल्याने त्यांची रवानगी बालसुधार गृहात करण्यात आली तर उर्वरित ३२ जणांना न्यायालयात हजर करण्यात आले. सुरुवातीला सर्वांना पोलिस कोठडी सुनावली होती. पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर ३२ जणांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या त्या ३२ जणांनी जामीन मिळण्यासाठी सातारा येथील विशेष न्यायालयात अर्ज केला होता. या अर्जावर सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील अॅड. महेश कुलकर्णी यांनी म्हणणे सादर केले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विजय दिवस समारोहाचीदिमाखदार सांगता

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, कराड

भारताने बांगलादेश मुक्तीच्या युद्धात पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाप्रित्यर्थ कराडमध्ये विजय दिवस समारोह थरारक कसरतींसह लष्करातील जवानांच्या मर्दानी खेळांनी दिमाखात साजरा करण्यात आला.देशभक्तीने भारावलेल्या वातावरणात साजऱ्या झालेल्या या समारोहास कराडकरांनी चांगलीच दाद दिली.

निवृत्त कर्नल संभाजीराव पाटील यांच्या संकल्पनेतून कराडला विजय दिवस समारोह दर वर्षी दिमाखात साजरा केला जातो. शिवाजी स्डेडीयमवर झालेल्या यंदाच्या १९व्या विजय दिवस समारोहास मेजर जनरल राजविजेंद्र सिंग, ज्येष्ठ विचारवंत भाई वैद्य प्रमुख पाहुणे होते. या सांगता सोहळ्याला हजारोंची उपस्थिती होती. दुपारी समारोहाच्या मुख्य कार्यक्रमास प्रारंभ झाला. विजय ज्योत स्टेडियममध्ये आल्यानंतर लष्करी जवान आणि पोलिसांच्या संचलनाने प्रारंभ झाला.

बेळगावच्या मराठा लाईट इन्फंट्रीच्या जवानांनी लेझीमची प्रात्यक्षिके सादर केली. ती सुरू असतानाच सुमारे दोन हजार फूट उंचीवरुन पॅरामोटर ड्रायव्हिंग करणारे जवान स्टेडियमच्या दिशेने झेपावले आणि उपस्थित आबालवृद्धांनी दिलेल्या वंदे मातरम, भारत माता की जय, जय शिवाजी-जय भवानींच्या घोषणांनी सारा परिसर दणाणून गेला.

.........

रयत मिल्ट्री सायन्स

अभ्यासक्रम सुरू करणार

रयत शिक्षण संस्थेमार्फत कर्जत येथे पुढील वर्षापासून मिल्ट्री सायन्स अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. त्यामाध्यमातून विद्यार्थ्यांना मिल्ट्रीच्या कक्षा खुल्या होतील, अशी घोषणा रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील यांनी विजय दिवस कार्यक्रमात केली.

समितीच्या वतीने रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, कराड अर्बन कुटुंब प्रमुख सुभाषराव जोशी यांना जीवन गौरव यशवंत पुरस्कार तर पालिकेच्या वतीने मेजर जनरल राजविजेंद्र सिंग यांना मानपत्र देण्यात आले. परमवीरचक्र विजेते कर्नल बाणासिंग, योगेंद्र सिंग, आदर्श विद्यार्थी प्रणव गुरव, सुनिता पाटील, काजल पाटील, मुग्धा पाटील, प्रणय सपकाळ, वीरमाता निर्मला बाबर, वीरपत्नी श्रीमती गलांडे यांना सन्मानीत करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बचत गटांच्या महिलांनीघेतले पाच कोटींचे कर्जमहिला फायनान्स कंपनी, सावकारांकडून वेठीस

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, शिराळा

मांगले (ता. शिराळा) गावातील महिला बचत गटांच्या महिलांनी मायक्रो फायनान्स कंपनीकडून पाच कोटी रुपयांहून अधिक कर्ज उचलले असल्याची धक्कादायक माहिती शुक्रवारी सकाळी आयोजित केलेल्या या महिलांच्या बैठकीत मिळाली. हे कर्ज फेडण्यासाठी महिलांनी खासगी सावकरांकडून मोठ्या व्याजाने कर्ज घेतल्याचे आणि या कर्जांच्या वसुलीसाठी शिवीगाळ आणि धमकी दिली जात असल्याची माहितीही महिलांनी दिली. या प्रकारात ८० बचत गटांतील सुमारे एक हजार महिला अडचणीत आल्याची माहिती समोर आली आहे. फायन्सास कंपनीकडून कर्जाला २६ टक्के व्याजाने कर्ज दिले जात आहे.

सांगली जिल्हा परिषदेचे सदस्य रणधीर नाईक यांच्यासह गावातील सर्वच राजकीय गटाचे कार्यकर्त्यांच्या उपस्थित बैठक झाली. काढलेल्या कर्जांची आणि घडल्या प्रकाराची माहिती देताना महिला गहिवरल्या, या कर्जाची परतफेड करण्यासाठी खासगी सावकाराकडूनही कर्ज घेतल्याचे त्यांनी सांगितले. वर्षभरात फायनान्स कंपन्यांनी कोणत्याही प्रकारची चिट्टी न देता दीड कोटी रुपयांचे व्याज वसूल केल्याचेही यावेळी उघडकीस आले. महिलांनी सावकारांची नावेही सांगितली. खासगी सावकार दारात येऊन जबरदस्तीने वसुलीचा तगादा लावतात. शिवीगाळ करू नका, आम्ही पोलिसात जाऊ, असे सांगितल्यानंतर स्थानिक पोलिस ठाण्यापासून जिल्हा पोलिस अधीक्षकांना आमचा महिन्याला पंचवीस-पन्नास हजार हप्ता असतो. ते काहीही करू शकणार नाहीत, अशी धमकी दिली जाते, असे काही महिलांनी सांगताच उपस्थित ग्रामस्थही आवक झाले.

आंदोलन उभारण्याचा

सर्वपक्षीय नेत्यांचा निर्धार

मायक्रो फायनान्स कंपनीने अन्यायकारक व्याज आकारणी करून ग्रामीण भागातील महिलांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली असून, या विरोधात आणि खासगी सावकारांकडून होणाऱ्या अन्याया विरोधात शिराळा तालुक्यातील मांगले गावातून आंदोलन उभे करण्याचा निर्धार जिल्हा परिषदेचे सदस्य रणधीर नाईक यांनी व्यक्त केला. कंपनीला कर्ज पुरवठ्याचा अधिकृत परवाना असला तरी त्यांच्या व्याज आकारणीच्या आणि कर्ज वसुलीच्या अटी नियमबाह्य आहेत. कर्जाच्या हप्त्याच्या तगाद्याने आनंदराव वायदंडे, या ग्रामस्थाने आपले जीवन संपवल्याची घटना दोनच दिवसांपूर्वी घडली आहे. ही लाजिरवाणी गोष्ट आहे. आता या कंपनीच्या लोकांना वसुलीसाठी गावात येऊ देऊ नका. या बाबत जिल्हाधिकारी यांना फायनान्स कंपनीच्या जाचक अटी आणि अरेरावीने करणाऱ्या वसुली विरोधात निवेदन देऊन कर्जांचे पुनर्गठन करण्याची मागणी करू या. खाजगी सावकारांच्या विरोधात तक्रारी दाखल कराव्यात, असे आवाहनही नाईक यांनी केले.

भाजपाचे तालुका अध्यक्ष सुखदेव पाटील यांनीही खासगी सावकारांना एक रुपयाही परत करू नका, तुम्ही धाडसाने पुढे या आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असे सांगितले. शिराळा पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रल्हाद पाटील यांनीही मांगले गावातील महिलांनी फायनान्स कंपनीकडून आणि खासगी सावकारांच्या कडून घेतलेल्या कर्जाचे आकडे सुन्न करणारे आहेत. या पुढे काटकसर करा, रोजंदारी करा, परंतु अशा प्रकारची फसवणूक करणारे कर्ज घेऊ नका, असे आवाहन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images