Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

जि. प. च्या शाळा हुश्शार...

$
0
0

Sachin.Yadav@timesgroup.com

tweet : @sachinyadavMT

पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी पालकांचा ओढा इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे असतो. किंबहुना अशा शाळांत घातले तरच मुले हुशार होतात, असा एक समज आहे. हा समज खोटा ठरवित कोल्हापूर जिल्ह्यात इंग्रजी माध्यमांच्या आणि खासगी प्राथमिक शाळांतून पहिली ते आठवी पर्यंतचे तब्बल ७६७ विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांत दाखल झाले आहेत. यामध्ये इंग्रजी माध्यमाचे ६३१ आणि खासगी प्राथमिक शाळांतून १३६ विद्यार्थी आहेत.

मुंबईसह राज्यातील मराठी माध्यमांच्या शाळांतील विद्यार्थी संख्या कमी झाल्याचे चित्र शिक्षण विभागाला जाणवले. या शैक्षणिक वर्षापासून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने प्रगत शिक्षण महाराष्ट्र, ज्ञान रचनावाद, शिक्षण समृद्धीसह, पहिल्याच दिवशी शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत आणि गुणवत्तापूर्ण अध्यपनाची जोड दिली. त्याचा परिणाम म्हणून जिल्ह्यातील २३५ इंग्रजी आणि मराठी माध्यमांच्या शाळांतून ७६७ विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत दाखल झाले. सर्वांधिक १५२ विद्यार्थी शिरोळ तालुक्यातून दाखल झाले. मुलांना इंग्रजी शाळाच हवी, असा अट्टाहास करणाऱ्या पालकांनी या वर्षी आपल्या पाल्यांना जिल्हा परिषदेच्या शाळांत प्रवेश घेतला. इंग्रजी आणि खासगी प्राथमिक शाळांतील शिक्षणाचा दर्जा सुमार असल्याने अनेक पालक पुन्हा मराठी माध्यमाच्या शाळांकडे वळले आहेत. १२ तालुक्यातील २३५ शाळांतील ४१६ शिक्षकांनी केलेल्या प्रयत्नामुळे अनेक पालकांनी इंग्रजी माध्यम सोडण्याचा निर्णय घेतला. इंग्रजी माध्यमातून ६३१ आणि खासगी माध्यमातून १३६ विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखल झाले. जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमांच्या शाळांकडून विविध प्रयोग आणि शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे यश आहे.

००

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने राबविलेल्या संयुक्त प्रयत्नामुळे विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत वाढ झाली आहे. या शैक्षणिक वर्षात मुले दाखल झाल्याने जिल्हा परिषदेच्या शाळांतील दर्जेदार शिक्षण आणि गुणवत्तेचे महत्त्व पटले आहे. भविष्यात पालकांचे मेळावे घेण्याचे नियोजन आहे.

डॉ. कुणाल खेमणार, सीईओ, जिल्हा परिषद

००

राज्यात १४ हजार ६४७ विद्यार्थ्यांनी मराठी शाळेत स्थलांतर केले आहे. यात सर्वाधिक विद्यार्थी पुणे विभागातील आहेत. त्याची संख्या ३५०० हजारांहून अधिक आहे. नावीन्यपूर्ण उपक्रमामुळेच शक्य झाले.

शरद गोसावी, राज्य प्राथमिक शिक्षण उपसंचालक

०००

इंग्रजी आणि खासगी प्राथमिक शाळांचा सुमार दर्जा असल्याचे स्पष्ट होत आहे. एका वर्गात पाचहून अधिक विद्यार्थी दाखल झालेल्या एकूण १५ प्राथमिक शिक्षकांचा सत्कार करण्यात येणार आहे.

सुभाष चौगुले, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद

०००

या धडपडी शिक्षकांच्यामुळेच..

पांडुरंग पाटील, संजय कांबळे, माधुरी यादव (विद्यामंदिर मुदाळ, ता. भुदरगड), राजेंद्र शेटे ( वि. मं. टिक्केवाडी, ता. भुदरगड) अशोक ढेकळे ( वि. मं निळपण, ता. भुदरगड), धनाजी पाटील ( वि. मं. मजरे कारवे, ता. चंदगड), मधुकर नागरगोजे ( वि. मं. चंदगड), नेताजी पोवार, बाळकृष्ण खोत ( वि. मं. नेर्ली , ता. करवीर), वैशाली पंधारे ( केंद्रशाळा कणेरी, ता. करवीर), अर्चना भटते, राजश्री पाटील (वि. मं. म्हाकवे, ता. कागल), प्रिया खोत (वि. मं. येळाणे, ता. शाहूवाडी), म. च. पाटील ( वि. मं. नं. ३, कुरुंदवाद, ता. शिरोळ), अरुण सुतार ( वि. मं. तमदलगे, ता. शिरोळ)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एसटीत नव्या वर्षांत ट्रॅकिंग सिस्टीम

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

एसटी बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांसाठी एक खूशखबर आहे. लांबपल्ल्याच्या एसटी बसचे निश्चित लोकेशन समजावे, यासाठी एसटीमध्ये ट्रॅकिंग सिस्टीम बसविण्यात येणार आहे. नागपूर आणि पुणे विभागातील काही एसटीत ही सुविधा सुरू झाली आहे. नव्या वर्षात कोल्हापूर विभागातील लांबपल्ल्याच्या एसटीत ही सुविधा दिली जाणार आहे.

कोल्हापूर विभागात लांब पल्ल्याच्या ३५० बसेस आहेत. या बसेसमध्ये ट्रॅकिंग सिस्टिम बसविण्यात येणार आहे. प्रवाशांना एसटीचे नि‌श्चित लोकेशन कळण्यासाठी एसटीत ट्रॅकिंग सिस्टिम बसविण्यात येत आहे. ही माहिती एसटीच्या अॅपवर उपलब्ध होणार आहे. बस सध्या कुठे आहे, नियोजित ठिकाणी बस येण्यासाठी किती वेळ लागेल? याची निश्चित माहिती प्रवाशांना मोबाइलवर मिळू शकेल. त्यासह विशेष अॅपही तयार केले जाणार आहे. या अॅपद्वारे तिकीट आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. मध्य रेल्वेने सध्या रेल्वे ट्रॅकिंग सिस्टिम बसविली आहे. त्यामुळे रेल्वेची माहिती प्रवाशांना थेट मोबाइलवर मिळू लागली आहे. ही सुविधा दिल्याने प्रवास अधिक सुखकर होण्याबरोबरच सुरक्षेची हमी मिळत आहे. एसटी महामंडळानेही प्रवाशांच्या सोयीसाठी स्वतःला अपडेट करायचे ठरवले आहे. दिवाळीच्या काळात एसटीच्या बहुतांश बसेस ऑनलाइन केल्या होत्या. त्याला वाढता प्रतिसाद पाहून सर्वच तिकिटे ऑनलाइन देण्याचा मानस आहे. त्यापुढे पाऊल टाकत एसटी महामंडळाने सर्व बसेसमध्ये ट्रॅकिंग सिस्टिम लावण्याचा निर्णय घेतला आहे.

००

राज्य मार्ग परिवहन महामंडळाने ही सुविधा बसविण्याचा ठेका एका कंपनीला दिला आहे. पुणे विभागातील विविध आगारात ही सुविधा दिल्यानंतर नव्या वर्षांत कोल्हापूर आगारातील बसेसना या सुविधा देण्यात येणार आहेत.

नवनीत भानप, विभाग नियंत्रक, कोल्हापूर

०००

एसटी किती वाजता येणार, कितीला सुटणार यासारखे प्रश्न कंट्रोलरला विचारावे लागतात. ट्रॅकिंग सिस्टिम सुरू होत असल्याने पुण्यातून निघालेल्या बसचा ट्रॅक मिळणार आहे. त्याचा फायदा प्रवाशांसह नातेवाईकांना होणार आहे.

संदीप जगदाळे, प्रवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा आज मोर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

​रिक्त पदावरील शिक्षकांच्या मान्यतेपासून ते वेतनापर्यंतच्या अनेक प्रश्नांबाबत गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या चर्चेच्या गुऱ्हाळापलीकडे कोणताही ठोस निर्णय न झाल्याने कोल्हापूर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक पुन्हा रस्त्यावर उतरणार आहेत. आज बुधवारी दुपारी १२ वाजता शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून प्रलंबित असलेल्या मागण्यांबाबत आवाज उठवण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघाचे अध्यक्ष ए. डी. चौगले यांनी दिली.

चौगले म्हणाले, ‘महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यावयीन शिक्षक महासंघातर्फे गेल्यावर्षीही विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले होते. मात्र दरवेळी केवळ चर्चा आणि बैठका होत असून कोणताही ठोस निर्णय सरकारकडून घेतला जात नसल्याचा आरोप संघटनेच्या कोल्हापूर संघाने केला आहे. चर्चेपुरतेच विचारात घेणाऱ्या शिक्षकांच्या प्रश्नांबाबत निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारच्या शिक्षण मंत्रालयाकडून होणाऱ्या दिरंगाईचा फटका ​शिक्षकांना बसत आहे. परिणामी शिक्षकांचे प्रश्न जटील होत आहेत. शिक्षकांच्या प्रमुख मागण्यांमध्ये वेतन, रिक्तपदावरीव भरती, माहिती तंत्रज्ञान ​​विषयाच्या शिक्षकांच्या भरतीमध्ये होणारा विलंब, अंशकालीन ​शिक्षकांच्या भविष्य निर्वाह निधीचा प्रश्न यांचा समावेश आहे. मे २०१२ नंतर पायाभूत रिक्त पदावरील भरती झालेल्या शिक्षकांच्या मान्यतेचा प्रश्न अद्याप निकालात निघालेला नाही. तर २००८ पासून २०११ या कालावधीतील सरकारमान्य वाढीव पदावरील शिक्षकांना मान्यता मिळालेल्या दुसऱ्या टप्प्यातील शिक्षकांचे वेतन अद्याप शिक्षकांच्या खात्यात जमा होत नाही. अशा शिक्षकांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे. याबाबत शिक्षक संघाने यापूर्वी आंदोलनाच्या माध्यमातून मागण्या मांडल्या आहेत. मात्र त्याबाबत दखल न घेतल्याने शिक्षकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया आहेत. गेल्या चार वर्षापासूनच्या नवीन वाढीव पदांनाही अद्याप मंजुरी मिळालेली नसल्याने अनेक शिक्षकांची नोकरी अधांतरी आहे. कायम विनाअनुदानित महाविद्यालयातील शिक्षक व आय. टी. विषयाचे ​शिक्षक व वेतनापासून वंचित आहेत. २००५ पूर्वी व त्यानंतरच्या अंशकालीन शिक्षकांना जुन्या नियमाप्रमाणे पेन्शन लागू झाली पाहिजे, त्याचप्रमाणे अर्धवेळ शिक्षकांची सेवा वरिष्ठ व निवडश्रेणी व पेन्शनसाठी ग्राह्य धरली पाहिजे, अशीही मागणी करण्यात येणार आहे,’ असेही ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समानता हाच समृद्धीचा पाया

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘स्त्री-पुरुष समानता हा माणसाच्या समृद्धी पाया आहे. समाजामध्ये वावरताना पुरुषांनी घरातील स्त्रीयांच्या मनाचा, मतांचा आदर केल्यास माणूस म्हणून जगणे सहज शक्य आहे,’ असे प्रतिपादन पुणे येथील ज्येष्ठ लेखिका विद्या बाळ यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाच्या विदेशी भाषा विभाग व मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘स्त्री-पुरुष समानता म्हणजे काय?’ या विषयावर आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या. वि. स. खांडेकर भाषा भवन येथे झालेल्या व्याख्यानास डॉ. गीताली मंदाकिनी यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्या बाळ म्हणाल्या, ‘ समाजामध्ये स्त्री-पुरुष समानतेचा विचार लिहिला-वाचला, रुजवला गेला पाहिजे तसेच तो जगला पाहिजे. आजच्या काळामध्ये आपल्याला स्त्री-पुरुष समानतेबाबत विचारावे लागते, हे अत्यंत खेदजनक आहे. हजारो वर्षांपासून चालत आलेल्या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये बदल घडवणे आवश्यक आहे. आज विविध क्षेत्रांमध्ये स्त्रीया पुरुषांच्या बरोबरीने कामे करीत आहेत. परंतु, या गोष्टी अपवादात्मक आहेत. बहुसंख्य स्त्रीयांना पुरुषांच्या बरोबरीचा दर्जा, प्रतिष्ठा मिळालेला नाही. यासाठी आजची तरुणपिढी जागृत होणे गरजेचे आहे. देशामध्ये खऱ्या अर्थाने लोकशाही समर्थपणे चालण्यासाठी त्याची सुरुवात कुटुंबापासून झाली पाहिजे.’

बाळ म्हणाल्या, ‘काचेच्या भांडयात स्त्रीयांनी स्वत:ला कोंडून घेऊ नये तसेच पुरुषांनीही स्वत:ला काचेच्या भांडयात कोंडून ठेवू नये. समता आणि समानता हे एकाच अर्थाने वापरले जातात. समताही मूल्याधारित कल्पना आहे आणि समानतेमध्ये बरोबरीची भावना आहे. पुरुषांप्रमाणे स्त्रीयांनाही स्वातंत्र्य, संधी, जबाबदारी मिळायला पाहिजे. विषमता विविध प्रकारांमुळे निर्माण होते या विषमतेला कवेत घेणारी क्षमता म्हणजे स्त्री-पुरुष समानता होय’

डॉ. मंदाकिनी म्हणाल्या, ‘महिलांना घराबाहेरील कामाला पैसा आणि प्रतिष्ठा आहे परंतु स्त्रीया करीत असलेल्या घरातील कामाला मूल्य आणि प्रतिष्ठाही नाही. कुटुंब हा एकक मानून स्त्री-पुरुष समता ठेवल्यास समाज जास्त प्रगल्भ व निकोप होणार आहे.’

यावेळी डॉ. भारती पाटील, डॉ. प्रकाश पवार, डॉ. भगवान माने, डॉ. नंदकुमार मोरे यांच्यासह विद्यार्थी, विद्यार्थींनी उपस्थित होते. मराठी भाषा विभागप्रमुख डॉ. राजन गवस यांनी प्रास्ताविक केले. विदेशी भाषा विभागाच्या प्र. विभागप्रमुख डॉ. मेघा पानसरे यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. डॉ. रणधीर शिंदे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तात्यासाहेब कोरेंवरीलटपाल पाकिटाचे अनावरण

$
0
0

म.टा. वृत्तसेवा, पन्हाळा

‘ ज्या वारणा खोऱ्याचे जीवनमान उंचवण्याचे कार्य सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांनी कार्य केले, त्यांच्या कार्याचे कौतुक टपाल खात्याने त्यांच्या जीवन कार्यावर पोस्ट पाकीट करून केले, हा वारणा सहकारी समूहाचा व तात्यासाहेबांच्या कार्याचा सन्मान असल्याचे प्रतिपादन बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी.वाय.पाटील यांनी केले. भारतीय टपाल खात्याच्या वतीने सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांच्यावरील टपाल पाकीट अनावरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.

सहकारी तत्वावरील विविध संस्थाचे तसेच विद्याथ्यांसाठी शैक्षणिक दालन उभा करून सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांनी सर्वसामान्यांचा सर्वांगीण विकास केला. महिला सबलीकरणाचे उत्कृष्ट कार्य त्यांनी केल्याचे सांगून डॉ. पाटील यांनी त्यांच्या कार्याचा यशस्वी वारसा चालवणारे त्यांचे नातू विनय कोरे यांच्या कारकीर्दस शुभेच्छा दिल्या. टपाल खात्याच्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तात्यासाहेब कोरेंचे ज्येष्ठ सहकारी वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष डॉ. भाऊसाहेब गुळवणी, साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील,संचालक रावसाहेब पाटील,विलासदादा पाटील तसेच तात्यासाहेबचे निष्ठावंत सेवक हंबीरराव यादव (कोडोली) यांच्या हस्ते हा टपाल पाकीट अनावरण सोहळा कुस्ती मैदानात लाखोंच्या उपस्थित पार पडला. या पाकिटावर विश्वव्यापी कर्तृत्वाचा मराठी, हिंदी व इंग्रजी असे तीन भाषेतील संक्षिप्त आलेख नमूद केला असून तात्यासाहेब कोरेंनी उभारलेल्या संस्थेच्या पार्श्वभूमीवर तात्यासाहेबची छबी उभी केली आहे. या टपाल पाकिट अनावरण सोहळ्याचे निवेदन प्रा.जीवनकुमार शिंदे यांनी केले. या सोहळ्यास टपाल खात्याचे मुंबई विभागाचे रुपेश सोनावणे, कोल्हापूर विभागाचे रमेश पाटील आदी प्रमुख उपस्थित होते. रमेश पाटील यांनी तात्यासाहेब कोरेंच्या कार्याची सविस्तर माहिती सांगून वारणा समूहाचे अध्यक्ष विनय कोरे यांनी केलेल्या पाठपुराव्याचा विशेष उल्लेख केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हितेंदर ‘जनसुराज्यशक्ती श्री’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पन्हाळा

भारत केसरी रुबलसिंह व राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता हितेंदर यांच्यातील पस्तीस मिनिटांच्या अटीतटीच्या लढतीत शेवटच्या पाच मिनिटात आघाडी घेत हितेंदरने मानाचा ‘जनसुराज्यशक्ती श्री’ हा किताब पटकावला. सुरुवातीच्या दहा मिनिटांत आक्रमक खेळ करणाऱ्या रुबलसिंहने हितेंदरला घुटना डाव घालून चितपट करण्याचा प्रयत्न केला. मात्र हितेंदरच्या मानेवर गुडघा असूनही शरीरयष्टीने बलदंड असणाऱ्या हितेंदरला तो उचलू शकला नाही. अर्धा तासाच्या लढतीत रुबलने घुटना डावावर तीनवेळा पट काढण्याचा प्रयत्न केला, मात्र शेवटच्या पाच मिनिटांनी पंचानी गुणांवर हितेंदरला विजयी घोषित केले.

सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांचा बाविसाव्या स्मृतिदिनानिमित्त वारणा उद्योग व शिक्षण समूहाच्या वतीने ‘विश्वनाथ वारणा शक्ती कुस्ती महासंग्राम २०१६’ आयोजित करण्यात आला होता. युवा नेते विश्वेश कोरे यांच्या हस्ते मैदानाचे पूजन करून कुस्त्यांना प्रारंभ झाला. यावेळी वारणा कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील, डॉ. भाऊसाहेब गुळवणी, वस्ताद प्रकाश पाटील, दिलीप महापुरे आदी उपस्थित होते.

प्रमुख १५ लढतींपैकी वारणा साखर कारखाना शक्ती किताबासाठी झालेल्या हिंदकेसरी कृष्णकुमार विरुद्ध हिंदकेसरी जोगिंदर सिंह यांच्यात झालेल्या अत्यंत चुरशीच्या लढतीत जोगिंदर आखाड्याच्या लाकडी खांबाला धडकून जखमी झाल्याने कृष्णकुमारला विजयी घोषित करण्यात आले. तात्यासाहेब कोरे दूध साखर शक्ती किताबासाठी हिंदकेसरी जस्सा पट्टी विरुद्ध राष्ट्रीय विजेता किरण भगत यांच्यातील लढतीमध्ये किरण सुरुवातीला अत्यंत जोमाने लढला. बाहेरून आखडी डाव लावत त्याने जस्साला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला, पण जस्साने घुटना डावाची जबरदस्त पकड घेत किरणवर विजय मिळविला. वारणा दूध संघ शक्ती किताबाच्या लढतीमध्ये हरियाना केसरी भोलू याने हिंदकेसरी सुनील साळुंखे याच्यावर एकलांगी डावावर विजय मिळवला. ‘वारणा ट्रॅक्टर ऊस वाहातूक शक्ती’ किताबाच्या लढतीत पंजाब केसरी लवप्रित सिंह याने महाराष्ट्र केसरी समाधान घोडकेवर घिस्सा डावावर मात केली. ‘वारणा सहकारी बँक शक्ती’ किताबासाठी महाराष्ट्र कामगार केसरी संग्राम पोळने राष्ट्रीय विजेता नवदीप सिंगला चितपट केले.

इंडिया शक्ती किताबासाठी उपमहाराष्ट्र केसरी नांदू आबदार याने भगवंत केसरी माऊली जमदाडे याच्यावर झोळी डावावर विजय मिळविला. वारणा शेतीपूरक व प्रशिक्षण संस्था शक्ती किताबासाठीच्या लढतीत महाराष्ट्र चॅम्पियन योगेश बोंबाळेने एकलांगी डावावर विकास कुमारवर विजय मिळविला. वारणा बिलट्यूब इंडस्ट्रीज शक्ती किताबासाठी झालेल्या लढतीमध्ये राष्ट्रीय विजेता कौतुक डाफळे विरुद्ध महाराष्ट्र चॅम्पियन विजय धुमाळ यांच्यात झालेल्या रोमहर्षक लढतीमध्ये कौतुकने विजय मिळविला.

वारणा दूध कामगार शक्ती किताबासाठी यमाई केसरी मारुती जाधव विरुद्ध राष्ट्रीय विजेता विकी यांच्यात झालेल्या लढतीमध्ये बराच काळ खडाखडी झाली. यामध्ये मारुती जाधवने विजय मिळविला. कोल्हापूर जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती शक्ती किताबासाठी झालेल्या लढतीमध्ये विक्रम वडतिलेला सचिन जामदारने आखडी डावावर चितपट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मद्य तस्करी रोखण्यासाठी नाकाबंदी

$
0
0

Uddhav.Godase@timesgroup.com

कोल्हापूर : डिसेंबर महिन्यात मद्याच्या विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. याच काळात परराज्यातून मद्याची अवैध वाहतूक केली जाते, त्याचबरोबर बनावट मद्य विक्रीचेही प्रकार घडतात. याला आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमांवरील तपासणी नाके सज्ज केले आहेत, तर नाक्यांसह महामार्गावरही हत्यारी बंदोबस्त तैनात केला आहे. मद्य तस्करी आणि भेसळ करणाऱ्यांवर विशेष पथकांची नजर राहणार आहे.

सरत्या वर्षाला निरोप देणे आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्याच्या निमित्ताने अनेक ठिकाणी रंगीत-संगीत कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यामुळे डिसेंबर महिन्यात मद्याच्या विक्रीत मोठी वाढ होते. हीच संधी साधून भेसळखोर बनावट मद्याची विक्री करतात, तर गोवा राज्यात कमी किमतीत मिळणारे मद्य छुप्या पद्धतीने कोल्हापुरात आणून विकले जाते. यातून उत्पादन शुल्क विभागाचा लाखोंचा तोटा होतो, त्याचबरोबर भेसळीने आरोग्याचेही गंभीर प्रश्न उद्भवण्याची भीती असते. हे प्रकार टाळण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच प्रयत्न सुरू केले आहेत. विशेषतः गोव्यातून होणारी मद्य तस्करी रोखण्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा भर आहे. यासाठी स्वतंत्र नियोजन करण्यात आले आहे. अधीक्षक संतोष झगडे यांनी आंबा, आंबोली-आजरा, गगनबावडा आणि दाजीपूर या ठिकाणी स्वतंत्र तपासणी नाके उभारले आहेत. या नाक्यांवर निरीक्षकांसह जवानांची नेमणूक केली आहे. या पथकाला सर्व्हिस रिव्हॉल्व्हर आणि बंदुकीसह २४ तास वाहनांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.

गोवा बनावटीच्या मद्यासह कर्नाटकातून होणाऱ्या बनावट मद्याची तस्करी रोखण्याचेही आव्हान राज्य उत्पादन शुल्क विभागासमोर आहे. यासाठी अधिकाऱ्यांनी आजरा, चंदगड, गडहिंग्लज, कागल आणि शिरोळ तालुक्यातील निरीक्षकांना विशेष सूचना दिल्या आहेत. दररोज रात्रीच्या ठराविक वेळांमध्ये सीमाभागातील नाक्यांवर वाहनांची तपासणी करणे, संशयास्पद वाहतुकीवर लक्ष ठेवणे आणि मद्याच्या नियमित विक्रीवरही नजर ठेवली जात आहे. या कारवाईचा अहवाल दररोज अधीक्षक कार्यालयाला पाठवणे बंधनकारक केले आहे, यामुळे सीमाभागातून होणारी मद्य तस्करी आणि बनावट मद्याच्या विक्रीलाही आळा बसेल, अशी माहिती अधीक्षक संतोष झगडे यांनी दिली.

भेसळीवर विशेष नजर

मद्यविक्री वाढताच भेसळीचे प्रमाणही वाढते. भेसळीसाठी साखर कारखान्यांमध्ये तयार होणारे कच्चे द्रव्य वापरण्याची शक्यता असते, त्यामुळे मद्यनिर्मिती करणाऱ्या जिल्ह्यातील १२ साखर कारखान्यांची आवक-जावक तपासण्यासाठी स्वतंत्र निरीक्षकांची नेमणूक केली आहे. याशिवाय मद्यनिर्मिती करणाऱ्या चार कंपन्यांसाठीही स्वतंत्र निरीक्षकांची नेमणूक केली आहे.

महामार्गावर स्वतंत्र पथके

डिसेंबर महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात पुणे-बेंगळुरू महामार्गावरील ढाबे, हॉटेल्स, पेट्रोल पंप या ठिकाणी छुप्या पद्धतीने मद्याची विक्री होते, असा राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अनुभव आहे. यंदा चोरटी विक्री रोखण्यासाठी महामार्गावरही स्वतंत्रे पथके नेमली आहेत. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासूनच या पथकांचे काम सुरू झाले आहे. यातून मद्याची चोरटी वाहतूक आणि विक्रीला आळा बसल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.

मद्यतस्करीमुळे राज्य सरकारचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडतो, त्याचबरोबर नागरिकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण होतो. वर्षाअखेरीस या प्रकारांमध्ये वाढ होते, त्यामुळे मद्य तस्करी आणि बनावट मद्य रोखण्यासाठी आम्ही महिनाभर आधीच काम सुरू केले आहे. गोव्यातून होणाऱ्या चोरट्या वाहतुकीवर आमचे विशेष लक्ष आहे.

संतोष झगडे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, कोल्हापूर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यारीचा दोर तुटून एकाचा मृत्यू

$
0
0

पन्हाळा

कोडोली (ता.पन्हाळा ) येथे शेतातील नवीन विहीर खोदाई करत असताना काम संपवून विहीरीतून बाहेर येत असताना यारीचा दोर तुटल्याने बकेट विहिरीत कोसळून धोंडीबा दगडू उचगावकर (वय ३०, रा.दुर्गेवाडी, कोडोली) हे जागीच ठार झाले. तर तीनजण गंभीर जखमी झाले. याबाबत माहिती अशी, कोडोली-काखे रोडवरील काईंगडे मळा परिसरात असलेल्या उल्हास कुलकर्णी यांच्या शेतामध्ये नवीन विहीर खोदाई काम सुरु आाहे. हे काम कोडोलीतील वामन सांगलीकर यांनी घेतले आहे. या कामावर ९ ते १० मजूर काम करीत आहेत. मागील एक महिन्यापासून हे काम चालू आहे. विहीरीची अंदाजे ३० ते ३५ फुटापर्यंत खोदाई झाली आहे. मंगळवारी (ता.१३) सायंकाळी काम संपल्यानंतर पहिल्यांदा पाच मजूर यारीच्या बकेटमध्ये बसून बाहेर आले. नंतर अन्य चारजण विहिरीच्या बाहेर यारीच्या बकेटमधून येत असता यारी तुटल्याने चारही जण २५ फुट खाली कोसळले. त्यामध्ये धोंडीबा याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने उपचारपूर्वीच त्यांचे निधन झाले.तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले.या घटनेची नोंद कोडोली पोलिसात झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जिल्हा बँकेची ८२५ खाती चौकशीच्या फेऱ्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नोटाबंदीनंतर जिल्हा बँकांमध्ये जमा झालेल्या पैशांबाबत शंका घेऊन देशभरातील जिल्हा बँकांवर घातलेल्या निर्बंधानंतर कोल्हापूर जिल्हा बँकेतील १५ शाखांमधील ८२५ खाती नाबार्डच्या चौकशीच्या फेऱ्यात सापडली आहेत. १० ते १३ नोव्हेंबरपर्यंतच्या कालावधीत दोन लाखांपेक्षा जास्त व एक कोटीहून अधिक रक्कम जमा केलेली ही खाती आहेत. त्यातील पाच शाखांमधील सुमारे २७५ खात्यांची नाबार्डच्या पथकाने बँकेत येऊन प्रत्यक्ष चौकशी केली. याबाबत नाबार्डच्या दोन पथकांनी गोपनीय अहवाल वरिष्ठांकडे सादर केला आहे. दरम्यान, निर्बंधांबाबत जिल्हा बँकांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर ही चौकशी करण्यात आली.

जिल्हा बँकेत या कालावधीत ३०४ कोटींची रक्कम जमा झाली. त्यानंतर देशभरातील जिल्हा बँकांना नोटा स्वीकारण्याबरोबर नोटा बदली करण्यास निर्बंध घातले. यामुळे जिल्हा बँकांच्या १९१ शाखांत जमा झालेली ही रक्कम नंतर करन्सी चेस्टने स्वीकारली नसल्याने बँकेच्या मुख्य शाखेतच ठेवली आहे. या रकमेसाठी जिल्हा बँकेला व्याज द्यावे लागत आहे.

जिल्हा बँकेवर निर्बंध घातल्यानंतर १० ते १३ या चार दिवसांच्या कालावधीत २५५ कोटी जमा झाले आहेत. त्यात स्वीकारण्याबरोबरच बदलून ​दिलेल्या नोटांचा समावेश आहे. दोन लाखांहून अधिक रक्कम जमा होणाऱ्या खात्यांवर आयकर विभागाची नजर होती. त्यानुसार जिल्हा बँकेतील अशा खात्यातील उलाढालीवर नोटीस दिल्या होत्या. त्यानुसार चौकशीसाठी शनिवारी नाबार्डच्या अधिकाऱ्यांची दोन पथके दाखल झाली. दोन लाखावर रक्कम जमा केलेल्या खात्यांची माहिती पथकाकडे तयार होती. त्यानुसार जिल्ह्यातील १९१ शाखांपैकी १५ शाखांमधील ८२५खात्यांमध्ये अशा प्रकारे रक्कम जमा झाली होती. यातील जवळपास ४२५ खाती ही सेवा सोसायटी, दूध संस्था, साखर व्यापारी, पतसंस्था अशा संस्थांची आहेत. उर्वरित वैयक्तिक खाती आहेत. त्यातील मुख्य शाखेबरोबर इचलकरंजी, कुरुंदवाड, पेठवडगाव, आजरा अशा पाच शाखांतील २७५ च्या आसपास खात्यांच्या चौकशीसाठी नाबार्डचे पथक शनिवारी दाखल झाले होते. सुटी असूनही चौकशीसाठी बँकेतील अधिकाऱ्यांकडून सलग तीन दिवस पथकांनी माहिती घेतली.

या चौकशीत अशा प्रकारे रक्कम एकदाच भरली की त्यानंतर वारंवार कितीवेळा भरण्यात आली, ती​ किती पटीत होती, त्यांची केवायसी आहे का यांची माहिती घेण्यात आली. चौकशीनंतर सोमवारी सायंकाळीच या पथकांनी वरिष्ठांकडे अहवाल सादर केला. नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी एन. जे. नाईक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने माहिती देण्यास नकार दिला, पण चौकशीनंतरचा अहवाल वरिष्ठांकडे सादर केल्याचे सांगितले. जिल्हा बँकेतील अधिकाऱ्यांनीही खात्यांतील उलाढालीबाबत माहिती देण्यास असमर्थता दर्शवली. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीची तारीख बुधवारी होती, पण ती गुरुवारी होणार असल्याचे समजते.

....

निर्बंध आणले त्यावेळीच प्राप्तीकर, सीबीआय, इडीच्यावतीने चौकशी करा असे आम्ही सांगितले होते. जिल्हा बँकेचा कारभार स्वच्छ असल्याची खात्री असल्यानेच आम्ही भूमिका मांडली होती. चौकशीनंतर ते स्पष्टच होईल.

आमदार हसन मुश्रीफ, चेअरमन, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक

....

बँकेत स्विकारलेली रक्कम

१० नोव्हेंबर

७९ कोटी ५ लाख

११ नोव्हेंबर

७९ कोटी ८६ लाख

१२ नोव्हेंबर

५५ कोटी ११ लाख

१३ नोव्हेंबर

४० कोटी ९६लाख

....

बदलून दिलेल्या नोटा

११ नोव्हेंबर

१ लाख ५० हजार

....

या कालावधीतील एकूण रक्कम

२५५ कोटी

....

८ नोव्हेंबरची शिल्लक

४९ कोटी ३६ लाख

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टोमॅटोचा दर गडगडला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

टोमॅटोचा भाव एकदम गडगडला. घाऊक बाजारात एक रूपये दराने खरेदी होत आहे. बाजारातील किरकोळ विक्री चार ते पाच रूपये किलोने होत आहे. तरीही खरेदीसाठी प्रतिसाद मिळत नसल्याने काही विक्रेत्यांना संध्याकाळी टोमॅटोचे ढीग गटारात ओतून घरी जावे लागत आहे.

महिनाभरापासून पुरेशा प्रमाणात चलन मिळत नाही. मिळाले तरी दोन हजारांचे सुटे मिळत नाहीत. त्याचा परिणाम भाजीपाला खरेदी विक्रीवर जाणवत आहे.

चलन टंचाई आहे. त्यात आवकही वाढली आहे. दोन आठवड्यापासून टोमॅटोचा दर कमी झाले आहेत. त्यामुळे उत्पादन खर्चही निघत नसल्याचे उत्पादक महावीर खोत यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

६२ हजार संच सेटटॉप बॉक्सविना

$
0
0

satish.ghatage@timesgroup.com

twitter@satishgMT

कोल्हापूर ः जिल्ह्यातील केबल नेटवर्कच्या डिजिटायझेशनची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत आहे. अद्यापही ६२ हजार ४३९ ग्राहकांनी सेटटॉप बॉक्स जोडलेले नाहीत. जे ग्राहक सेटटॉप बॉक्स जोडणार नाहीत त्यांची केबल सेवा खंडीत करण्यात येणार आहे. केबल सेवा खंडीत होऊ नये म्हणून ग्रामीण भागातील केबल ऑपरेटर्सची धावपळ सुरू झाली आहे. त्यांच्याकडे आता अवघे ००००० दिवस बाकी आहेत.

शहरासह परिसरातील एकूण २३ गावांमध्ये सेटटॉप बॉक्सची जोडणी पूर्ण झाली आहे. सद्यस्थितीत येथील डिजिटायझेशनचे काम पूर्ण झाले आहे. कोल्हापूर शहरात ३४ हजार सेटटॉप बॉक्स बसवण्यात आले आहेत. कोल्हापूर शहरासह आसपासच्या २३ गावांमध्ये ८४ हजार ३०० सेटटॉप बॉक्स बसवण्यात आले आहेत. ग्रामीण भागात ४५ हजार ७०७ ग्राहकांच्या घरी सेटटॉप बॉक्सची जोडणी झाली आहे. ज्यांच्याकडे स्थानिक केबल सर्व्हिस नाही, अशा ग्राहकांकडे डीटूएच सुविधा आहे. जिल्ह्यात ६२ हजार ८६५ डीटूएचचे ग्राहक असून त्यांची नोंद मुंबईत करमणूक कर विभागाकडे होते. डिजिटायझेशनमुळे सेटटॉप बॉक्सची सक्ती केल्याने अनधिकृत केबलधारकांची संख्या उघड झाली. त्यामुळे करमणूक कर थेट सरकारला मिळू लागला आहे. कोल्हापूर शहरासह आसपासच्या २३ गावांत ७८ हजार ८५४ ग्राहकांची नोंद होती, पण सेटटॉप बॉक्सची जोडणी केल्यावर हा आकाडा ८४ हजार ३०० ग्राहकांवर पोचला आहे.

कोल्हापूर शहर, नऊ नगरपालिकांसह २३ गावांत सेटटॉप बॉक्सची जोडणी पूर्ण झाली असली तर ग्रामीण भागात सेटटॉप बॉक्स जोडणीचे मोठे आव्हान केबल ऑपरेटरांपुढे आहे. ग्रामीण भागातील केबल ऑपरेटरांकडे १०० ते ४५० ग्राहक असतात, पण सेटटॉप बॉक्स जोडणीसाठी ग्राहकांना माहिती देणे व त्यांना मान्यता घेण्यात वेळ लागत आहे. ग्राहकांनी सेटटॉप बसवावेत, असे आवाहन केबल टीव्हीवरून नियमित सुरू आहे. जिल्हा प्रशासन व करमणूक विभागाकडून पाठपुरावा सुरू आहे. तरीही ३१ डिसेंबरपर्यंत ६२ हजार केबलग्राहकांच्या घरी सेटटॉप बॉक्स जोडण्याचे शिवधनुष्य स्थानिक केबल ऑपरेटर्सना पेलावे लागणार आहे. मोठे तालुके असलेल्या करवीर तालुक्यात ३५ हजार, हातकणंगले तालुक्यात ११ हजार तर शिरोळ तालुक्यात चार हजारहून अधिक घरात सेटटॉप बॉक्स बसवण्यात आलेले नाहीत.

असा आहे दरमहा करमणूक कराचे दर

ग्रामीण भाग १५ रुपये,

नगरपालिका ३० रुपये

महापालिका ४५ रुपये

डीटूएच कंपन्याकडील कनेक्शनची संख्या

डीश टीव्ही ५५५०

रिलायन्स २८५०

व्हिडिओकॉन २१,४००

एअरटेल ६२००

सन डायरेक्ट ७५०

टाटा स्काय २६, ११५

कोट००००

जिल्ह्यात ३१ डिसेंबरपर्यंत केबल ग्राहकांकडे सेटटॉप बॉक्स जोडावयाचे आहेत. जिल्हा प्रशासनाच्या करमणूक विभागाने जिल्ह्यातील प्रमुख दोन केबल ऑपरेटर व सब ऑपरेटर्सची बैठक घेऊन सेटटॉप बॉक्स जोडण्यासाठी सूचना केल्या आहेत. सर्व त​हसीलदारही सेटटॉप बॉक्सचा आढावा घेत आहेत.

गणेश शिंदे, करमणूक अधिकारी

जीएसटीनंतर करमणूक कर थेट सरकारकडे

सध्या केबल टीव्ही ग्राहकांकडून करमणूक कर जिल्हा करमणूक विभागाकडून गोळा केला जातो. २०१६-२०१७ मध्ये करमणूक विभागाला ११ कोटी ७५ लाख रुपयांचे टार्गेट आहे. नोव्हेंबरअखेर सात कोटी रुपये करमणूक कर गोळा झाला आहे. जीएसटी कराची अंमलबजावणी झाल्यावर हा कर जिल्हाधिकारी कार्यालयाऐवजी थेट सरकारच्या करमणूक कर आयुक्तालयाकडे जमा होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉक्टरची ऑनलाइन फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रुईकर कॉलनीतील एका डॉक्टरांच्या क्रेडिट कार्ड पासवर्डचा गैरवापर करून अज्ञाताने ऑनलाईन गंडा घातला. याबाबत डॉ. अरुण कुमारपाल शहा (वय ५८, रा. रुईकर कॉलनी) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दखल केली असून, त्यांच्या क्रेडिट कार्डवरील १५ हजार रुपयांची रक्कम लंपास झाली आहे. सरकारकडून कॅशलेस व्यवहारांचा आग्रह सुरू असतानाच फसवणुकीचे प्रकारही उघडकीस येत असल्याने ऑनलाइन व्यवहारांबाबत नागिरकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.

सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर कॅशलेस व्यवहारांची संकल्पना मांडली आहे. यासाठी नागरिकांना ऑनलाईन व्यवहारांना पसंती देण्याचे आवाहनही केले जात आहे. दुसरीकडे ऑनलाइन व्यवहारांमध्ये फसवणुकीचे प्रकारही घडत असल्याने नागरिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. बँक खात्यांची माहिती घेणारे बोगस फोन कॉल थांबवण्यात पोलिसांसह बँकांनाही यश आलेले नाही, त्यामुळे ग्राहकांकडून एटीएम, क्रेडिट कार्डचे पासवर्ड नंबर घेऊन खात्यांवरील रकमा लंपास केल्या जातात. कोल्हापूरच्या रुईकर कॉलनीत राहणारे डॉ. अरुण शहा यांचीही अशीच ऑनलाइन फसवणूक झाली आहे. शहा यांनी त्यांच्या क्रेडिट कार्डवरून २६ ऑगस्ट २०१६ रोजी ४ हजार रुपयांची खरेदी केली होती. यानंतर कोणताही ऑनलाइन व्यवहार त्यांनी केला नाही, मात्र शनिवारी (ता. १०) रात्री बाराच्या सुमारास त्यांच्या मोबाइलवर ऑनलाइन खरेदीचे मेसेज येऊ लागले. पाच वेळा केलेल्या खरेदीसाठी त्यांच्या क्रेडिट कार्डवरून १५ हजार रुपयांची रक्कम गायब झाली.

डॉ. शहा यांना संशय आल्याने त्यांनी तातडीने क्रेडिट कार्ड तपासले. कार्ड त्यांच्याजवळच होते, तरीही खात्यावरील रक्कम गायब झाली होती. त्यांनी नेट बँकिंगद्वारे कार्ड लॉक केले, त्यामुळे प्रकरण १५ हजारांवरच थांबले. कार्ड लॉक केले नसते तर अज्ञाताने मोठी रक्कम गायब केली असती. डॉ. शहा यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दखल केल्यानंतर पोलिसांनी व्यवहारांचे लोकेशन तपासले असता, बेंगलोर येथील एका पेट्रोलपंपावर १५ हजार रुपयांची खरेदी झाल्याचे लक्षात आले. याबाबत शाहूपुरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

बँकिंग साक्षरतेचा अभाव

कॅशलेस व्यवहारांसाठी ऑनलाइनवर भर देण्याचा आग्रह सरकारने धरला आहे, मात्र अजूनही आपल्याकडे पुरेशा प्रमाणात बँकिंग साक्षरता नसल्याची वस्तुस्थिती आहे. अनोळखी व्यक्तींना आपल्या बँक खात्याबाबत कोणतीच मोहिती देऊ नका, असे एसएमएस बँकांकडून ग्राहकांना पाठवले जातात, तरीही फसवणूक करणारे अत्याधुनिक साधनांचा वापर करून ग्राहकांना गंडा घालतात. याबाबत ग्राहकांना पुरेशी माहिती मिळावी, त्याचबरोबर फसवणूक करणाऱ्या टोळ्यांनाही जेरबंद करणे गरजेचे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘दिगंबरा..दिगंबरा..श्रीपाद वल्लभ दिगंबरा’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा,जयसिंगपूर

‘दिगंबरा..दिगंबरा..श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ व ‘श्री गुरूदेव दत्त’च्या अखंड गजराने अवघी नृसिंहवाडी दुमदुमली. मंगळवारी सायंकाळी पाच वाजता भक्तिमय वातावरणात श्री दत्त जन्मकाळ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कन्यागत महापर्वकाल तसेच मार्गशीर्ष महिन्यात आलेल्या या दत्तजयंतीनिमित्त लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.

दत्तजयंतीनिमित्त मंदिरात पहाटे चार वाजता ब्रम्हवृंदामार्फत भूपाळी, गणपतीपूजन, काकड आरती झाली. यानंतर शोडषोपचार पूजा करून श्रीं च्या चरणकमलावर कृष्णा नदीचा जलाभिषेक, पंचामृत अभिषेक करण्यात आला. गंध, पुष्प वाहून धूपदीप नैवेद्य आरती करण्यात आली. यावेळी पादुकांस केशरयुक्त गंधाचा लेप चढविण्यात आला. उत्सवमुर्तीची पूजा करून भाविकांना तीर्थ देण्यात आले. प्रात:कालच्या पूजाविधीनंतर सकाळी साडेसात ते बारा या वेळेत भाविकांसाठी अभिषेक करून पंचामृत पूजा, लघुरूद्र विधी झाला. दुपारी साडेबारा वाजता महापूजा करण्यात आली. यानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. दुपारी ब्रह्मवृंदामार्फत पवमान पंचसुक्तांचे पठण करण्यात आले.

सायंकाळी साडेचार वाजता श्रींची उत्सवमूर्ती श्री नारायणस्वामी मंदिरातून वाजत गाजत मुख्य मंदिरात आणण्यात आली. पाच वाजता धार्मिक वातावरणात असंख्य भाविक व ब्रह्मवृंद यांच्या उपस्थितीत विधीवत दत्त जन्मकाळ सोहळा पार पडला. जन्मकाळासाठी चांदीचा पाळणा विविध रंगांच्या फुलांनी आकर्षक सजविण्यात आला होता. उपस्थित असंख्य भक्तांनी सजविलेल्या पाळण्यावर अबिर, गुलाल व फुलांची मुक्त हस्तांनी उधळण केली. जन्मकाळानंतर येथील दत्त मंदिरात पारंपारिक पाळणागीते व आरत्या म्हणण्यात आल्या व प्रार्थना करण्यात आली. जन्मकाळानंतर भाविकांना सुंठवडयाचे वाटप करण्यात आले.

रात्री दत्त मंदिरात धूप,दीप,आरती,व पालखी सोहळा पार पडला. यानंतर भाविकांना दर्शनासाठी जन्मकाळाचा पाळणा ठेवण्यात आला. सोहळा यशस्वी करण्यासाठी तहसीलदार किरणकुमार काकडे, देवसंस्थानचे अध्यक्ष राहुल पुजारी, सचिव संजय पुजारी, सरपंच अरूंधती जगदाळे, उपसरपंच धनाजीराव जगदाळे तसेच देव संस्थानचे विश्वस्त, ग्रामपंचायत सदस्य आदींनी परिश्रम घेतले.

...

भाविकांसाठी सोयीसुविधा

भाविकांच्या सोयीसाठी येथील दत्त देव संस्थानमार्फत अनेक सोयी व सुविधा पुरविण्यात आल्या होत्या. मंदिर परिसरात ठिकठिकाणी क्लोज सर्किट टी.व्ही. तसेच दर्शन रांग व मुखदर्शन व्यवस्था करण्यात आली होती. दुपारी व रात्री भाविकांना मोफत महाप्रसाद वाटप करण्यात आला. ग्रामपंचायतीमार्फत पार्किंगची उत्तम व्यवस्था, दिवाबत्ती, आरोग्य व्यवस्था, पिण्याचे शुद्ध व मुबलक पाण्याची सोय करण्यात आली होती. रस्त्यांची साफसफाई तसेच जंतुनाशक फवारणी आदी सोयी सुविधा ग्रामपंचायती मार्फत करण्यात आल्या होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भेसळखोरांना अडीच लाखांचा दंड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

खाद्य पदार्थांच्या भेसळीसह चुकीचे लेबल, अस्वच्छता आणि अप्रमाणित पदार्थांची विक्री केल्याबद्दल १३ विक्रेते आणि व्यावसायिकांना दोन लाख ४६ हजार रुपयांचा दंड सुनावण्यात आला. अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या पाहणीनंतर पुणे येथील विशेष कोर्टात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवर निर्णय झाल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनचे सहायक आयुक्त मोहन केंबळकर यांनी दिली.

भेसळीच्या संशयावरून अन्नव औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील खाद्य पदार्थांचे विक्रेते आणि निर्मिती करणाऱ्या व्यावसायिकांच्या फर्मवर छापे टाकून कारवाई केली होती. या कारवाईत अस्वच्छता, अप्रमाणित पदार्थ, चुकीचे लेबल, दिशाभूल करणाऱ्या जाहिराती, वापरास बंदी असलेल्या रासायनिक रंगाचा वापर केल्याचे आढळल्याने अधिकाऱ्यांनी कारवाई केली होती. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवलेले नमुने सदोष असल्याचे स्पष्ट होताच संबधित विक्रेते आणि व्यावसायिकांच्या विरोधात पुणे येथील विशेष कोर्टात तक्रार दाखल केली होती. या तक्रारींची सुनावणी होऊन नुकताच निकाल देण्यात आला. यात १३ विक्रेते आणि व्यावसायिकांना २ लाख ४६ हजार रुपयांचा दंड सुनावण्यात आल्याची माहिती सहायक आयुक्त मोहन केंबळकर यांनी दिली.

यांना सुनावला दंड

चंदरलाल किकोमल अमलानी, मालक मे. के. बी. कन्फेक्शनरी, गांधीनगर यांनी फरसाणमध्ये खाद्यरंगाचा वापर केल्याने ४२ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

सुनील जगन्नाथ मरे, मालक-मे.मरे फुड प्रॉडक्टस, गोकुळ शिरगांव एमआयडीसी यांना मिक्स व आंबा लोणचे पाकिटांवर चुकीचे लेबल लावल्याचे सिध्द झाल्याने ३० हजार रुपये दंड.

अक्षय शांताराम वारंगे, मालक-मे. हॉटेल कोकण किनारा यांना त्यांच्या हॉटेलमध्ये अस्वच्छता आढळल्याने १५ हजार रुपये दंड.

सुरज पांडुरंग पाटील, मालक-मे. माऊली किराणा स्टोअर्स, शिरोळ (विक्रेता पेढी) व दिलीप भोलानाथ सिंग (पुरवठादार) मे. जय अंबे फुड प्रॉडक्सट, पेठवडगाव (पुरवठादार पेढी) यांना फरसाण पाकिटांवर चुकीचे लेबल लावल्याचे सिद्ध झाल्याने त्यांना २० हजार रुपये दंड ठोठावण्यात आला.

सुरज पांडुरंग पाटील, मालक-मे. माऊली किराणा स्टोअर्स, शिरोळ यांना सुट्टे खाद्यतेलाची विक्री करण्यास प्रतिबंध असतानाही त्यांनी विक्री केल्याचे सिध्द झाल्याने १० हजार रुपये दंड.

मुकुंद गणपतराव खोचरे, विक्रेता व इतर ५ भागीदार, मे.गुरुदत्त हॉटेल, नरसोबावाडी यांना अप्रमाणित दर्जाचे दही विक्री केल्याबद्दल १२ हजार रुपये दंड.

स्वरुपसिंग उमेशसिंग राजपुरोहित, मालक-मे. न्यु राजपुरोहित स्वीट मार्ट, जयसिंगपूर यांना फरसाण पाकिटांवर चुकीचे लेबल लावल्याचे सिध्द झाल्याने त्यांना २० हजार रुपये दंड ठोठावण्यात आला.

विजय संजय पाटील (विक्रेता) व सुदर्शन जिनगोंडा पाटील (मालक) मे. अहिंसा बेकरी प्रॉडक्स, चिपरी यांना ऑरेंज कुकीज, मिल्क टोस्ट व मिल्क ब्रेड या अन्नपदार्थावर चुकीचे लेबल लावल्याचे सिध्द झाल्याने त्यांना ४५ हजार रुपये दंड.

संतोष वसंत शिंदे, मालक, मे. अर्जुन रिफायनरीज, हासुरपंच, ता. गडहिंग्लज यांना खाद्यतेलाचे जुने डबे वापरल्याबद्दल ४० हजार रुपये दंड करण्यात आला.

रोहित हरिदास उकरंडे, संचालक, मे. चौंडेश्वरी फुडस आणि बेव्हरेजेस, पाणी बोटलवर चुकीचे लेबल लावल्याबद्दल १२ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अश्लील चित्रफितीवरुन दगडफेक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

विवाहितेची अश्लील चित्रफित तयार केल्याच्या कारणावरुन खासगी भिशीचालक मुबारक बशीर पकाली याच्या घर, दुकान व यंत्रमाग कारखान्यावर संतप्त जमावाने हल्ला चढवत दगडफेक केली. या हल्ल्यामध्ये साहित्याचे प्रचंड नुकसान झाले. घटनेनंतर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला असून घटनास्थळी मोठा पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तर संशयितावर कारवाईमया मागणीसाठी कारंडे मळ्यातील नागरिकांनी शहापूर पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला. दरम्यान, पिडीत महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी मुबारक पकाली व फिरोज दस्तगीर नदाफ (दोघे रा. कारंडे मळा) यांच्यावर बलात्कार व अश्लील चित्रफित प्रसारीत केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

शहापूर परिसरातील कारंडे मळा परिसरात राहणारा मुबारक पकाली हा खासगी कार्डभिशी चालवितो. त्याचबरोबर त्याचा बांगड्या विक्रीचाही व्यवसाय आहे. भिशीच्या माध्यमातून चार महिन्यांपूर्वी भागातीलच एका विवाहितेशी त्याचा संपर्क झाला. त्या महिलेला ऑक्टोबर महिन्यात मुबारक याने ५० हजार रुपये देतो असे सांगून जयसिंगपूर येथील हॉटेलमध्ये तिच्यावर बलात्कार करुन नवऱ्याला व मुलाला ठार मारण्याची धमकी देत तिची अश्लील चित्रफितही बनविली. त्यानंतर मुबारक याचा मित्र फिरोज याने या चित्रफिती माझ्याकडे सुरक्षित ठेवतो असे सांगून घेतल्या होत्या. दोन दिवसांपासून कारंडे मळा परिसरात ही चित्रफित व्हायरल झाल्याने खळबळ उडाली. या प्रकरणानंतर मुबारक हा फरार झाला. त्याच्या कृष्णकृत्याचे पडसाद मंगळवारी सकाळी परिसरात उमटले. मुबारक हा घराकडे येणार असल्याची माहिती समजल्याने मोठ्या संख्येने नागरिक कारंडे मळा परिसरात जमा झाले. मुबारक याला पकडून त्याच्यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी करीत महिला तसेच जमलेल्या संतप्त नागरिकांनी शहापूर पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला. पोलिस निरीक्षक सीताराम डुबल यांच्याकडे शिष्टमंडळाने कारवाईची मागणी केली. पोलिसांनी कारवाईचे आश्वासन देत जमावाला पांगविले.

दरम्यान, संतप्त जमाव पकाली याच्या घराच्या दिशेने गेला. जमावाने पकालीच्या घरावर जोरदार दगडफेक करीत खिडक्यांच्या काचांसह घरातील साहित्याची नासधूस केली. यावेळी पकाली याच्या कुटुंबियांकडून विरोध झाल्याने हाणामारीचा प्रकारही घडला. मुबारक याचे वडील बशीर, नातेवाईक अकबर मोमीन यांच्यासह महिलांनाही जमावाकडून मारहाण करण्यात आली. त्यानंतर जमावाने आपला मोर्चा कृष्णानगर येथील पकाली याचे दुकान व कारखान्याकडे वळविला. इचलकरंजी-शहापूर रस्त्यालगत असलेल्या मासूम बँगल स्टोअर्स या दुकानासह पानपट्टीवर दगडफेक करीत मोडतोड केली. त्याचबरोबर लगतच्या दोन यंत्रमाग कारखान्यावरही दगडफेक करीत नुकसान केले. दगडफेकीच्या या प्रकाराने कारंडे मळ्यासह कृष्णानगर परिसरातील वातावरण तणावपूर्व बनले होते. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत जमावाला सौम्य लाठीमार करीत पांगविले. घटनास्थळी पोलिस उपअधिक्षक विनायक नरळे यांनी भेट देऊन पाहणी केली. बलात्कार करुन तसेच अश्लील चित्रफित बनवून बदनामी केल्याप्रकरणी पिडीत महिलेकडून तक्रार देण्यात आली असून संशयित पकाली व नदाफ यांचा शोध घेण्याचे काम सुरु आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मृत मुलांचा अहवाल नाहीच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शाहूवाडी तालुक्यातील शित्तूर तर्फ मलकापूर येथील आधार वसतिगृहातील मुलांच्या छळछावण्याचे प्रकरण उघडकीस येऊन एक महिना उलटला. तेथील दोन अनाथ मुलींचा मृत्यू होऊन चार महिने पुर्ण झाले. पण त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदनाचा अहवाल, मृत्यूचे नेमके कारण याबद्दल प्रशासन अजूनही अनभिज्ञ आहे. याबाबत कोण‌तीही अधीकृत माहिती दिलेली नाही.

आधार वसतिगृहातील ‘गांधी’ नावाची अनाथ मुलगी आजारी पडल्याने उपचारासाठी येथील सीपीआरमध्ये चार नोव्हेंबर रोजी दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच पाच नोव्हेंबर रोजी तिचा मृत्यू झाला. त्यानंतर कुपोषणग्रस्त अशा २० ते २५ विद्यार्थ्यांना सीपीआरमध्ये उपचार दाखल केले. उपचारानंतर ते बरे झाले. त्यानंतर वसतीगृहातील कारभाराची चौकशी झाली. प्राथमिक टप्यात अनेक धक्कादायक गोष्टी बाहेर आल्या. गांधीचा मृत्यू होण्यापुर्वीच दोन अनाथ मुलींचा मृत्यू झाला आहे, हे लपवून ठेवलेले बाहेर आले. त्यानंतर प्रकरणाने गंभीर वळण घेतले. संस्थापकास पोलिसांनी अटक केली.

वसतिगृहातील झेबी नावाच्या गतिमंद मुलीचा तीन ऑगस्ट तर प्रेरणा भीमराव बनसोडे या अस्थ‌िव्यंग मुलींचा १९ ऑगस्ट २०१६ रोजी मृत्यू झाला. दोन मुलींचा मृत्यू झाल्यानंतर पोलिस प्रशासनाकडे नोंद करून सीपीआरमध्ये शवविच्छेदन करणे बंधनकारक होते. नियमाप्रमाणे शवविच्छेदन झाले असते तर मृत्यूचे नेमके कारणही स्पष्ट झाले असते. पण आतापर्यंतच्या समाजकल्याण प्रशासनाच्या चौकशीत यासंबंधीची कोणतीही माहिती मिळालेली नाही. वसतिगृहाची नियमानुसार मान्यता २०१४ साली संपली होती. त्यानंतरही वसतिगृह सुरूच ठेवले.

प्रशासनाने वसतिगृह चालवण्याचा आर्थिक स्रोत कोणता होता त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी संस्था चालकाने देणगीतून असे उत्तर दिले. देणगी दिलेल्याची पावत्या, धर्मादायकडे काही नोंदी आहेत का? अशी माहिती प्रशासनाने घेतली. त्यावेळी देणगीतून वसतीगृह चालत होते, त्याचा कोणताही पुरावा मिळाला नाही. मुंबईच्या बाल कल्याण समितीकडून संस्थेने बेकायदेशीरपणे ३८ मुले वसतिगृहात आणली हे उघड झाले. मुंबईच्या समितीने येथील समितीला त्याची माहिती दिल्याचेही सांगितले. पण येथील समितीने हे उडवून लावले आहे. परिणामी वसतिगृहातील अनाथ अपंग, गतिमंद, अस्थ‌िव्यंग मुलांच्या जीवनाशी खेळ सुरू राहिला.

……………..

‘अनाथपणा’मुळे बेदखल

वसतिगृहात १८ गतिमंद, १५ मूकबधीर, ५ अस्थ‌िव्यंग मुले होती. त्यातील तीन वगळात सर्व अनाथ होती. अनाथ असल्याने त्यांची होणाऱ्या हेळसांडपणाकडे दुर्लक्ष झाले. त्यांना सांगण्यासाठी ‘आवाज’ नव्हता. तिघांचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासनापर्यंत त्यांचा ‘आवाज’ पोहचला. दोन मुलींचा मृत्यू ज्याप्रमाणे दडपण्यात संस्थाचालक यशस्वी झाले त्याप्रमाणे ‘गांधी’चे झाले असते अजून वसतिगृहातील आणखी किती जणांच्या वाट्याला आले असते याचाही विचार होणे गरजेचे आहे.

तर खरे बाहेर येणार

दोन मुलींचा मृत्यू कशाने झाला, त्यांचे शवविच्छेन केले होते की नाही, मृतदेहाची कशी विल्हेवाट लावली या सर्व महत्त्वाच्या प्रश्नांची उकल झालेली नाहीत. प्रशासनाने या प्रश्नांची उत्तरे शोधल्यानंतर सरकारी अनुदान नसतानाही वसतिगृह कोणत्या उद्देशासाठी चालवले गेले हे समजणार आहे. पण प्रकरण उघड होऊन एक महिना झाला तरी प्रशासन अजून या प्रश्नाची उत्तरे शोधण्याच्या दिशेने वाटचाल केलेली नाही.

कोट

‘आधार’मधील तीन मुलींचा मृत्यू झाला. तिसऱ्या मुलींच्या मृत्यूनंतर आधीच्या दोन मुलींच्या मृत्यू झाल्याचे समोर आले. दरम्यान, दोन मुलींचा मृत्यू कशाने झाला, शवविच्छेदन झाले किंवा नाही याची माहिती घेण्यात येणार आहे.

प्रदीप भोगले, समाजकल्याण अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माजी नगरसेवकाचा बँकेच्या रांगेत मृत्यू

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । सांगली

सांगली जिल्ह्यातील विटा नगरपरिषदेचे माजी नगरसेवक शेकू पांडुरंग कांबळे यांचा आज बँकेबाहेरच्या रांगेत उभे असताना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

नोटाबंदीच्या निर्णयानंतर निर्माण झालेल्या अभूतपूर्व अशा चलन टंचाईमुळे लोकांचे प्रचंड हाल होत आहेत. पैसे काढण्यासाठी दररोज लोक बँका तसेच एटीएमबाहेर रांगा लावत आहेत. नोटाबंदीच्या निर्णयाला एक महिना उलटून गेला तरी या रांगा कमी झालेल्या नाहीत. या रागांमध्ये घडलेल्या वेगवेगळ्या दुर्घटनांत आतापर्यंत अनेकांना आपले प्राण गमवावे लागले असताना आज शेकू कांबळे या माजी नगरसेवकालाही या रांगेत प्राणास मुकावे लागले.

शेकू कांबळे हे आज दुपारी बँकेबाहेर लागलेल्या रांगेत उभे असतानाच त्यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यातच खाली कोसळून त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. कांबळे हे विटा नगरपरिषदेत नगरसेवक म्हणून निवडून आलेले होते. शहरात त्यांचा दांडगा जनसंपर्क होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हृदयविकाराच्या धक्क्याने बँकेत वृद्धाचा मृत्यू

$
0
0



सांगली :

विटा येथील युनियन बँकेच्या शाखेत पैसे काढण्यासाठी गेलेले माजी नगरसेवक शेकू पांडुरंग कांबळे (वय ८२) यांचे बुधवारी दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. बँकेत पैसे काढणारांची रांग मोठी असल्याने ते तेथील बाकड्यावर बसले होते. त्याच ठिकाणी छातीत दुखत असल्याचे सांगत कोसळले. बँक आणि रांगेत उभा असलेल्यांची धावपळ उडाली. नातेवाईकांनी कांबळे यांना त्वरीत रुग्णालयात दाखल केले. परंतु तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.

विटा येथील डॉ. आंबेडकरनगरमध्ये राहणारे शेकू कांबळे बुधवारी युनियन बँकेच्या शाखेत गेले होते. नगरपालिकेच्या शिक्षण मंडळात दीर्घकाळ शिक्षक, मुख्याध्यापक म्हणून काम केले होते. २००१-२००६या कालावधित नगरसेवक म्हणून कार्यरत होते. बुधवारी बँकेसमोर रांग असल्याने ते बाकड्यावर विसावले होते. त्याच ठिकाणी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या डॉक्टारांनी कांबळे यांना त्वरीत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा सल्ला दिला. त्यांचे जावई अविनाश भंडारे यांनी धावत येऊन त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतु, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिरजेचा पाणीप्रश्न मार्गी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली

केंद्र सरकारच्या अमृत अभियानातंर्गत मिरज शहराच्या १०३ कोटी ६५ लाखांच्या सुधारित पाणीपुरवठा योजनेला अखेर मंत्रिमंडळाने अखेर अध्यादेशाद्वारे मंगळवारी मान्यता दिली. आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी सरकारकडे पाठपुरावा करून तातडीने प्रस्ताव पाठवण्यासाठी महासभा घ्यायला लावली होती. महासभेचा प्रस्ताव सरकार दरबारी पोहचताच ठरावाची दखल घेऊन सरकारच्या नगरविकास खात्याने प्रकल्प मंजुरीचा आदेश काढला आहे. वर्कऑर्डर ठेकेदाराच्या हातात पडल्यानंतर चोवीस महिन्यांत हा प्रकल्प पूर्ण करायचा आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रकल्प व्यवस्थापक, या नात्याने सल्लागाराच्या भूमिकेत असणार आहे.

केंद्र सरकार पुरस्कृत अमृत अभियानाची आंमलबजावणी महाराष्ट्रात करण्यात येत आहे. या अभियानांतर्गत पाणीपुरवठा, मलनिस्सारण, जलवाहिनी, नागरी परिवहन, हरीत क्षेत्र विकास आदी पायभूत सुविधांची निर्मिती शहरांमध्ये करण्यात येणार आहे. या करिता २०१६-१७ या आर्थिक वर्षामध्ये राज्याच्या २४८९.९१ कोटी किमतीच्या आराखड्यास केंद्र सरकारने मान्यता दिलेली आहे. यामध्ये सांगली-मिरज-कुपवाड महापालिका हद्दीतील मिरज पाणी पुरवठा प्रकल्पाचा समावेश आहे. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार सदर प्रकल्प अहवालास अमृत अभियानांतर्गत गठीत करण्यात आलेल्या राज्यस्तरीय तांत्रिक समितीने व त्यानंतर राज्यस्तरीय उच्चाधिकार समितीने मान्यता दिलेली आहे. मंत्रिमंडळाने मिरजेतील पाणीपुरवठा योजनेला सरकारने अंतिम मान्यता दिल्याने या सुधारित पाणी योजनेमुळे सव्वा दोन लाख मिरजकरांना पाण्याची उपलब्धता होणार आहे.

केंद्र सरकार ५० टक्के निधी, राज्य सरकार २५ आणि महापालिका २५ टक्के हिस्सा देणार आहे. या योजनेचा खर्च वाढला तर याची सर्व जबाबदारी महापालिकेवर टाकली आहे. योजना सुरु झाल्यानंतर पहिले दोन टप्पे २०, २० चे आणि ४० टक्के, असा निधी महापालिकेला दिला जाणार आहे. प्रकल्प व्यवस्थापक या नात्याने सल्लागाराच्या भूमिकेत असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणा ३ टक्के शुल्क द्यावे लागणार आहे.

मिरज शहराचा विस्तार झपाट्याने वाढत आहे. त्यात शहरातील जलवाहिन्याही जुनाट झाल्या आहेत. मध्यतंरी अपुरा पाणीपुरवठा लक्षात घेऊन कृष्णा नदीतून रायझिंग मेन टाकण्यात आली आहे. तसेच जलशुद्धीकरण केंद्राचे विस्तारीकरणही झाले आहे. सध्याची मिरज पाणी पुरवठा योजनेची १ लाख ७६ हजार लोकसंख्येला पाणीपुरवठा करण्याची क्षमता आहे. त्यात झपाट्याने वाढलेल्या उपनगरांना मुबलक पाणीपुरवठा करण्याचे आव्हान महापालिकेसमोर आहे. त्यासाठी महापालिकेला राज्य सरकारच्या अमृत योजनेचा मोठा आधार मिळाला आहे.

महापालिकेने अमृत योजनेतून मिरज पाणीपुरवठा सुधारण्याचा प्रस्ताव दिला होता. सरकारने पाणीपुरवठ्यासाठी ७५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. तसेच महापालिकेने आराखडा सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मिरजेतील २८५ किलोमीटर लांबीची जलवाहिनी, कृष्णा नदीत नवीन जॅकवेल व पाच नवीन पाण्याची टाकी उभारण्याचा १०३ कोटीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. २०३३ पर्यंतची २ लाख १८ हजार लोकसंख्या गृहीत धरून आराखडा तयार करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘विजय दिवस’ला दिमाखदार प्रारंभ

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, कराड

भारताच्या १९७१च्या पाकिस्तानवरील विजयाच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या १९व्या विजय दिवस समारोहाला बुधवारी शोभा यात्रेने मोठ्या दिमाखात प्रारंभ झाला. या शोभा यात्रेमध्ये विविध शाळांच्या चित्ररथांनी आबालवृद्धांचे लक्ष वेधले.

१९७१ला भारताने पाकिस्तानवर मिळविलेल्या विजयाप्रित्यर्थ निवृत्त कर्नल संभाजीराव पाटील यांच्या संकल्पनेतून येथे गेल्या १९ वर्षांपासून विजय दिवस समारोह साजरा केला जातो. समारोहास बुधवारी सकाळी येथे काढण्यात आलेल्या शोभायात्रेने प्रारंभ झाला. भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या हस्ते त्यास प्रारंभ झाला. यावेळी वरिष्ठ शहर पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव, डॉ. अशोकराव गुजर, उद्योजक रवळनाथ शेंडे, शंकराप्पा संसुद्दी, अॅड. संभाजीराव मोहिते, अरुण जाधव, विनायक विभुते आदी मान्यवर उपस्थित होते.

शोभायात्रेत येथील पालिका शाळा क्रमांक नऊने शहीद जवान, पालिका शाळा क्रमांक सात आणि शिवाजी विद्यालयाने पर्यावरण विषय जनजागृतीपर, विठामाता विद्यालयाने वीर जवान, अॅग्लो उर्दु स्कुलने स्त्री सक्षमीकरण, शाहीन विद्यालयाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महाराष्ट्र हायस्कूलने पर्यावरण काळाची गरज, संत तुकाराम हायस्कूलने संतदर्शन आदी चिरत्रथ सहभागी झाले होते. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, संत गाडगेबाबा आदी व्यक्तीरेखाही कलाकारांनी साकारल्या.

शोभायात्रेचे नेटके नियोजन अॅड. परवेज सुतार, रत्नाकर शानभाग, चंद्रकांत जाधव, सागर जाधव, शंकरराव डांगे, गणपतराव कणसे, अॅड. संभाजीराव मोहिते, विलासराव जाधव,संभाजी कणसे आदींनी केले.

शस्त्रास्त्र प्रदर्शनाचे आकर्षण

विजय दिवस समारोहानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शस्त्रास्त्र प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रदर्शनात भारतीय व परदेशी बनावटीची शस्त्रे ठेवण्यात आली असून, यामध्ये रडार, हवेत मारा करणारी बंदुकीसह विविध प्रकारच्या बंदुकांचा समावेश आहे. हे प्रदर्शन पाहण्यासाठी विद्यार्थी, नागरिकांची गर्दी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images