Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

इस्लामपुरात बिनविरोध

$
0
0
येथील कासेगांव शिक्षण संस्थेच्या कुसुमताई राजारामबापू पाटील महाविद्यालयात बी.एस्सी. भाग. तीनची विद्यार्थिनी पूजा प्रकाश बनसोडे हिची विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून बिनविरोध निवड झाली.

आव्वाज कुणाचा

$
0
0
सांगली आणि परिसरातील महाविद्यालयांतील विद्यापीठ प्रतिनिधींच्या निवडणुका शुक्रवारी शांततेत पार पडल्या. नऊपैकी पाच महाविद्यालयातील निवडणूक बिनविरोध झाली.

‘ही दिरंगाई बघवत नाही’

$
0
0
‘आम्हास ही दिरंगाई बघवत नाही,’ असा फलक दाखवत डोळ्यावर काळ्या पट्ट्या बांधून अंधश्रद्धा निर्मूलन समितीने शुक्रवारी सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

पिस्तूल, काडतुसासह तिघांना अटक

$
0
0
येथील गावभाग पोलिसांनी आज अवधूत आखाडा परिसरातील एका तरुणास बनावट पिस्तूल व जिवंत काडतुसासह अटक केली. सागर आण्णासो कचरे (वय 33) असे त्याचे नांव आहे.

नगरसेवक संजय तेलनाडेला अटक

$
0
0
कुख्यात गुंड भरत त्यागी खूनप्रकरणातील मुख्य संशय‌ित इचलकरंजीचा नगरसेवक संजय तेलनाडे याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली.

मुरगूडच्या जवानाचे हृदयविकाराने निधन

$
0
0
मुरगूड येथील जवान तुकाराम शंकर आडोळे (वय ४५) यांचे हरियाणातील हिस्सार येथे सेवा बजावत असताना हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. आडोळे यांचे मूळ गाव बोळावीवाडी (ता. कागल) असून सध्या त्यांचे कुटुंबिय मुरगूड येथे वास्तव्यास होते.

‘गुणवत्ता विकास’द्वारे माणसे उभी करा

$
0
0
शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून गुणवत्ता वाढली पाहिजे. पण, त्याबरोबरच विद्यार्थ्यांचा सर्वसमावेशक विकास झाला पाहिजे, अशी अपेक्षा विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी व्यक्त केली.

प्रत्येक प्रस्तावांमध्ये त्रुटी काढण्याची खोड

$
0
0
गतीमान कामकाज आणि जलद निर्णय या सूत्रानुसार काम करण्याच्या सूचना असताना शिक्षण सहसंचालक कार्यालयाकडून मात्र ‘सब कुछ ठंडा करके खाओ’ अशा पध्दतीने कामकाज सुरू आहे.

५ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर ‘ऑनलाइन पगार’

$
0
0
एकीकडे धडधाकट विद्यार्थ्यांच्या शाळेतील आदर्श शिक्षक पुरस्कारांच्या मानकरी शिक्षकांना टॅबलेट, एक पगारवाढ अशी हायटेक भेट देणाऱ्या राज्य सरकारने ऑनलाइन यंत्रणेतील गोंधळाचे कारण पुढे करत अपंग, मूकबधीर शाळेतील शिक्षकांचा गेल्या पाच महिन्यांपासून पगार तटवला होता.

अध्यादेश निघेपर्यंत माघार नाही

$
0
0
मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठ व सर्किट बेंचसाठी पुकारलेल्या आंदोलनाच्या नवव्या दिवशी वकीलांनी लाक्षणिक उपोषण आणि जोरदार निदर्शने करत ठोस कार्यवाहीशिवाय आता माघार नाही हेच दाखवून दिले.

रुग्णालये परवानगीच्या प्रतीक्षेत

$
0
0
अग्निशामक व इमारत बांधकामविषयक नियमांची लहान-मोठ्या, जुन्या-नव्या सरसकट रुग्णालयांना सक्ती केल्याने गेल्या पाच महिन्यांपासून शहरातील ३५० रुग्णालये व नर्सिंग होम परवानगीच्या प्रतीक्षेत आहेत.

तुरटीपासून साकारली गणेशमूर्ती

$
0
0
पर्यावरणपूरक गणेश उत्सवाचा एक भाग म्हणून कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या अभियांत्रिकी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी तुरटीपासून गणेश मूर्ती साकारली आहे. कॉलेजमधील प्रॉडक्शन विभागातील विद्यार्थी प्रतीक पुरेकर यांनी तुरटीपासून मूर्ती तयार केली आहे.

‘लेटेस्ट’ची कायमस्वरूपी फायबर मूर्ती

$
0
0
पंचगंगा नदी कायमस्वरूपी स्वच्छ राहावी व प्रदूषणमुक्ती व्हावी यासाठी मंगळवार पेठेतील लेटेस्ट तरूण मंडळाने कायमस्वरूपी साडेपाच फूट उंचीची फायबर गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय घेतला आहे.

स्मशानभूमीसाठी शिवसेनेचा ‘रास्ता रोको’

$
0
0
कसबा बावडा येथील स्मशानभूमीचे त्वरित नूतनीकरण करावे, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने चौगले गल्ली येथे शुक्रवारी रास्ता रोको आंदोलन केले.

बाप्पांचे आगमन दोन दिवसांवर

$
0
0
आपल्या लाडक्या बाप्पांचे आगमन अवघ्या दोन दिवसांत होणार असल्याने गणेशभक्तांमध्ये उत्साहाला उधाण आले आहे. कुंभारवाड्यांत तर चांगलीच लगबग सुरू आहे.

बेंगळुरू, गोवा नि दिल्लीला...

$
0
0
गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर आला असताना कोल्हापुरातील भटजीबुवा बॅग पॅक करण्याच्या तयारीत आहेत. गोवा, बेंगळुरू आणि दिल्लीतील मराठी कुटुंबीयांकडून निमंत्रण आल्यामुळे त्यांच्या घरात बाप्पांच्या प्रतिष्ठापनेसाठी दहा दिवस कोल्हापूरचे अडीचशे भटजीबुवा मुक्काम ठोकणार आहेत.

कळंबा तलावाचा ‘रंकाळा’ नको

$
0
0
प्रदूषणामुळे कळंबा तलावाचा रंकाळा तलाव होऊ नये म्हणून शुध्द पाण्याचे स्त्रोत असलेल्या कळंबा तलावाचे संरक्षण होण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलून कळंबा तलाव वाचवावा, अशी मागणी स्थायी समितीच्या सभेत करण्यात आली.

बाजार समितीची बरखास्ती स्थगित

$
0
0
भूखंड घोटाळा व बेकायदा नोकरभरतीच्या मुद्द्यावरून कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्तीच्या उंबरठ्यावर असताना पणनमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शुक्रवारी कारवाईला स्थगिती दिली.

परीख पुलाचे दुखणे कायम

$
0
0
मध्य रेल्वे प्रशासनाने परीख पुलाची डागडुजी करण्याचा निर्णय घेतला असल्याने पुलाखालील वाहतूक बंद करण्यात यावी अशा सूचना महापालिकेला देण्यात आल्या आहेत. तीन महिन्यांपूर्वी महापालिकेने पुलाखालील भुयारी मार्गाच्या केलेल्या डागडुजीचा फज्जा उडाल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे.

महिला कार्यकर्त्यांनी भरली ओटी

$
0
0
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी महालक्ष्मी मंदिरात देवीची ओटी भरल्यामुळे गोंधळ निर्माण झाला. मनसेच्या कार्यकर्त्या स्वाती शिंदे यांच्यासोबत आलेल्या दहा ते बारा महिलांनी आम्ही गाभाऱ्यात जाणार असा आग्रह धरत धक्काबुक्की केल्याचा आक्षेप श्रीपूजकांतर्फे घेण्यात आला.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images