Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

साताऱ्यात उदयनराजेंचा आव्वाज

$
0
0



सातारा

सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडीने पालिकेची निर्विवाद सत्ता काबीज केली. राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या पत्नी वेदांतिकाराजे भोसले यांना पराभवाला सामोरे जावे लागले. सातारा विकास आघाडीच्या माधवी कदम यांनी वेदांतिकाराजे भोसले यांचा ३ हजार ३०५ मतदांनी पराभव केला. माधवी कदम यांना २४५३९ तर वेदांतिकाराजे भोसलेंना २१२३६ मते मिळाली. भाजपच्या सुवर्णा पाटील यांना १३६५१ मते मिळाली. साताऱ्यात सातारा विकास आघाडी २२, नगरविकास आघाडी १२ तर अनपेक्षितरित्या भाजपाने ६ जागांवर मुंसंडी मारली.

कराड नगरपालिका निवडणुकीमध्ये थेट नगराध्यक्षापदाच्या निवडीमध्ये भाजपाने बाजी मारली. माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या जनशक्तीला आघाडीला बहुमत मिळाले. २९ पैकी १६ जागांवर विजय मिळविला. पाटण नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर व युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी विरोधी उमेदवारांना धूळ चारत १७ पैकी १४ जागांवर विजय मिळवला.

फलटणमध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष झाला. २४ जागांपैकी १६ जागा राष्ट्रवादीला, राष्ट्रीय कॉँग्रेसला ८ जागा मिळाल्या. नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी कॉँग्रेसचा उमेदवार विजयी झाला. दहिवडी नगरपंचायतीच्या सत्ता आमदार जयकुमार गोरे यांच्याकडे आली. कॉँग्रेसला १७ पैकी ११ जागा मिळाल्या. राष्ट्रवादी कॉँग्रेसला ५ जागा मिळाल्या, एका ठिकाणी अपक्ष विजयी झाला. म्हसवड पालिकेत कॉँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांना धक्का बसला. राष्ट्रवादीच्या शेखर गोरे यांच्या परिवर्तन पॅनेलने बाजी मारली. १७ जागांपैकी परिवर्तन पॅनेलला १०, राष्ट्रीय कॉँग्रेसला ७ जागा मिळाल्या. वाई नगरपालिकेची सत्ता राष्ट्रवादी कॉँग्रेसकडे राहिली, महाआघाडीचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार विजयी झाला आहे. वाई पालिकेच्या २० जागांपैकी १४ जागा तीर्थक्षेत्र विकास आघाडीला मिळाल्या. वाई विकास महाआघाडीला ६ जागा मिळाल्या. महाबळेश्वर नगरपालिकेत नगराध्यक्षपदी अपक्ष उमेदवार निवडून आला. रहिमतूपर नगरपालिकेत नगराध्यक्ष आणि सत्ता राष्ट्रवादी कॉँग्रेसकडे राहिली. मेढा नगरपंचायत राष्ट्रवादीकडे राहिली. १ खंडाळा नगरपंचायतीवर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे वर्चस्व कायम राहिले. वडूज नगरपंचायत त्रिशंकू झाली आहे. पाचगणीत नगराध्यक्ष अप

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शेखर चरेगावकरांवरकोणतीही कारवाई नाही

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, कराड

भाजपचे नेते व राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर व त्याचे भाऊ मुकुंद यांनी रविवारी कराड येथील नगरपालिका निवडणूक मतदानादिवशी मतदान केंद्रावर जाऊन महिला पोलिस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, दमबाजी व धमकी दिल्याप्रकरणी चरेगावकर यांच्यावर पोलिसांनी व निवडणूक अधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई केली नाही, त्यामुळे हे प्रकरण गुंडाळल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

चरेगावकर यांनी रविवारी मतदान केंद्रावर महिला पोलिस अधिकाऱ्याला दमबाजी करीत धमकी दिली होती. या बाबत कोणतीही तक्रार दाखल न झाल्याने आणि दरम्यान, स्वत: डोईफोडे यांनीही तक्रार दिली नसल्याची माहिती डीवायएसपी राजलक्ष्मी शिवणकर व सहायक निवडणूक अधिकारी विनायक औंधकर यांनी दिली आहे.

दरम्यान, या घटनेचा सर्व स्तरांतून निषेध होत असून, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, शिवसेनेनीही घटनेचा धिक्कार केला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र याचा निषेध होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चाकू हल्ल्यात दोघे जखमी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लक्ष्मीपुरीतील भोई गल्लीत रविवारी (ता. २७) रात्री पूर्ववैमनस्यातून झालेल्या मारहाणीत दोन गटांनी चाकू, हॉकीस्टिक, काठी आणि बिअरच्या बाटल्यांचा वापर झाला. मारहाणीत दोन्ही गटातील दोघे जखमी झाले. शस्त्रांच्या खुलेआम वापराने परिसरात दहशतीचे वातावरण होते. दोन्ही बाजुंनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलिसांनी एका गटातील सहा संशयितांना तर दुसऱ्या गटातील संशयितांचा शोध सुरू आहे.

रविवारी दुपारी भोई गल्लीत लहान मुलांचा किरकोळ कारणावरून वाद झाला होता. इम्राम मणेर आणि पप्पू हुलस्वार या दोन कुटुंबात वाद वाढला. रविवारी वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. इम्रान युनूस मणेर (वय २४, रा. रविवार पेठ बँकेसमोर, लक्ष्मीपुरी) याला चाकू, काठीने माराहण झाली. पप्पू हूलस्वार, बबलू लोंढे, सागर लोंढे, विनायक कोकणे, विश्वास आणि रोहीत या सहा जणांनी मारहाण केल्याची फिर्याद लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाली. याच वादातून मारहाणीची तक्रार विनायक संजय कोकणे (वय २३, रा. रविवार पेठ) याने केली आहे. कोकणेने दिलेल्या फिर्यादीनुसार शाहरुख आलम शिकलगार, शुभम राजेंद्र गायकवाड, सुयम अमर डांगे, अभिजित मोरे, अल्ताफ अलम शिकलगार आणि इम्रान मणेर (सर्व रा, रविवार पेठ) यांना अटक करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यटन महोत्सव लांबणीवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पर्यटन टूरअंतर्गत यापूर्वी जाहीर केलेला २५ डिसेंबर रोजी होणारा पर्यटन महोत्सव लांबणीवर पडला आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पर्यटन महोत्सव १५जानेवारीला घेणार असल्याचे वारणानगर येथे झालेल्या कार्यक्रमात जाहीर केले. त्यामुळे नियोजनापेक्षा वीस दिवस उशीरा पर्यटन महोत्सव होईल अशी स्थिती आहे.

राज्यातील प्रमुख टूर ऑर्गनायझरांना एकत्र करून कोल्हापूर स्थळ दर्शन टूरचे नियोजन १६ ऑक्टोबरला करण्यात आले. या वेळी २६ डिसेंबरपासून जिल्ह्याचा पर्यटन महोत्सव घेण्याची घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली होती. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने महोत्सवाची तयारी सुरू केली होती. पालकमंत्री पाटील यांनी वारणानगर येथे झालेल्या कार्यक्रमात पर्यटन महोत्सव १५ जानेवारीपासून होणार असल्याचे सांगितले. त्यामुळे कोल्हापूर हॉटेल मालक संघाकडूनही महोत्सवाच्या तयारीत बदल केले आहे. चलन बदलाचा कोणताही परिणाम पर्यटन महोत्सवावर होणार नाही. धनादेश, डेबिट आणि क्रेडिट कार्डवर व्यवहार करण्यासाठी हॉटेल मालक संघाने तयारी दर्शविली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉँग्रेसने गड राखले;राष्ट्रवादीला जबर धक्का

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सांगली

बदलत्या राजकीय वातावरणात झालेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत सांगली जिल्ह्यात काँग्रेसने आपापले गड शाबूत ठेऊन आघाडी घेतली. राष्ट्रवादीला मात्र इस्लामपूर आणि तासगावच्या बालेकिल्ल्यात जबरदस्त धक्का बसला. तासगावात भाजपने बाजी मारली तर इस्लामपूर पालिकेत राष्ट्रवादीचे तगडे नेते जयंत पाटील यांच्या घौडदौडीला ब्रेक लावत विकास आघाडीने नगराध्यक्षपद खेचून नेले. आष्टा पालिकेतील सत्तेवरची मांड कायम ठेवण्यात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यशस्वी झाले आहेत. पलूस, विटा पालिकेवर आणि कडेगाव नगरपंचायतीवर काँग्रेसने स्पष्ट बहुमताचा झेंडा फडकाविला. कवठेमहांकाळ नगरपंचायतीत आघाडीत सहभागी होऊन राष्ट्रवादी पुढे सरकली. खानापूर नगरपंचायतींमध्ये त्रिशंकू स्थिती निर्माण झाली असून, या ठिकाणी एकमेकांच्या विरोधात लढलेल्या काँग्रेसच्या दोन्ही गटांना एकत्र येण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.

सांगली जिल्ह्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या आठ ठिकाणच्या निवडणुकांमध्ये तीन ठिकाणी भाजप तर एका ठिकाणी भाजप-सेना युतीने स्वबळावर निवडणूक लढविली. यापैकी खासदार संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली केवळ तासगाव पालिकेची सत्ता भाजप मिळवू शकले. विट्यात युतीतल्या सेनेला दोन जागा मिळाल्यातर भाजप शून्यावर राहिली. कडेगाव नगरपंचायतीत पतंगराव कदम काँग्रेस आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख अशी लढत झाली. काँग्रेसने १० तर भाजपला ७ जागा मिळाल्या. पलूस पालिकेत भाजप शून्य. इस्लापूरमध्ये मात्र राष्ट्रवादीच्या विरोधातील सर्वपक्षीय आघाडीत सहभागी होत भाजप-सेनेने आपले अस्तित्व जोपासले. कवठेमहांकाळ नगरपंचायतीत खासदार पाटील यांनी परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून भाजप निवडणुकीत उतरविली होती. पण, त्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या आमदार सुमन पाटील, विजय सगरे गट, गजानन कोठावळे आदींनी माजी मंत्री अजितराव घोरपडे गटाबरोबरच्या स्वाभिमानी विकास आघाडीच्या माध्यमातून खासदार गटाला धक्का देत नगरपंचायतीची पहिली वहिली सत्ता काबीज केली. आघाडीने सहयोगीसह १३ जागा मिळविल्या तर खासदार गटाला केवळ ४ जागांवर समाधान मानावे लागले. खानापूर नगरपंचायतींमध्ये काँग्रेसच्या दोन गटात आणि सेनेचे आमदार अनिल बाबर यांच्या गटात चुरशीचा सामना झाला. यामध्ये कदम गटाचे जिल्हा परिषद सदस्य सुहास शिंदे यांच्या खानापूर विकास आघाडीने ६, राजेंद्र माने गटाच्या संपतराव नाना आघाडीने ५ तर बाबर गटाच्या जनता विकास आघाडीने ५ जागा जिंकल्या. एका जागेवर अपक्षाने बाजी मारली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एटीएम, बँकांच्या रांगांमध्ये आज ‘मटा हेल्पिंग हँड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नोटा रद्दच्या निर्णयानंतर बँक, एटीएमसमोर भल्या मोठ्या रांगा कायम दिसत आहेत. कुणाला दररोजच्या खर्चासाठी, कुणाला अचानक ओढवलेल्या आपत्तीसाठी, कुणाला मुलांच्या शिक्षणासाठी तर कुणाला व्यवसायासाठी लागणाऱ्या पैशांसाठी नोकरदार, व्यावसायिक, गृहिणी, पेन्शनर्स तहान भूक विसरुन रांगेत उभे असलेले पहायला मिळत आहेत. गरजेपोटी हा त्रास सहन करणाऱ्या नागरिकांच्या सहकार्यासाठी आता ‘महाराष्ट्र टाइम्स’ पुढे सरसावला आहे. सामाजिक बांधिलकी जपत ‘महाराष्ट्र टाइम्स’ मंगळवारी (ता. २९ नोव्हेंबर) बँकांसमोर रांगेत तास न् तास तिष्ठत उभ्या राहणाऱ्या नागरिकांसाठी पिण्याचे पाणी, बिस्किट देण्याचा ‘हेल्पींग हँड’ हा उपक्रम राबवणार आहे. या उपक्रमासाठी श्री ट्रॅव्हल्स, व्यंकटेश ज्वेलरी इन्स्टिट्यूट, आदित्य पेरीफेरलर्स क्लिक आयटी यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

सरकारने नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सामान्य नागरिकांची धावपळ सुरू झाली आहे. जुन्या नोटा जमा करण्यासाठी ३० डिसेंबरपर्यंतची मुदत आहे. पण त्या कालावधीपर्यंत अनेकांना दररोजच्या खर्चासाठी पैसे काढणे व भरण्याचे व्यवहार करावेच लागणार आहेत. दोन आठवड्यापासून नियमित व्यवहारांबरोबर नोटा बदलणे, जुन्या नोटा जमा करण्यासाठी, पैसे काढण्यासाठी बँकेतील वर्दळ वाढली होती. त्यामुळे बँकांमधील रांगांचे चित्र या सोमवारपर्यंत कायम होते. अनेक नागरिक उन्हामध्ये रांगेत उभे रहात आहेत. या रांगेमध्ये गृहिणी, वयोवृद्ध झालेले पेन्शनर्स आहेत. त्यांना होत असलेला त्रास कमी करण्याचा प्रयत्न ‘महाराष्ट्र टाइम्स’ करणार आहे.

मंगळवारी सकाळी साडेदहा नंतर बँक ऑफ इंडियाच्या लक्ष्मीपुरीतील शाखेसमोर, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या दसरा चौकातील शाखेसमोर, एचडीएफसीच्या लक्ष्मीपुरी शाखेसमोर ‘महाराष्ट्र टाइम्स’ च्या ‘हेल्पींग हँड’ उपक्रमातून रांगेत उभ्या असलेल्या नागरिकांना पाण्याची बाटली व बिस्किट देण्यात येणार आहे. अनेकांना आरोग्याचे प्रश्न असतात. त्यांना दिले जाणारे पाणी व बिस्किट यामुळे आधार मिळणार आहे. बँक, एटीएमसमोर उभे राहून त्रास सहन करणाऱ्या नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महात्मा फुलेंचे विचार आजही तर्कसंगत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महात्मा फुले यांनी धर्मापेक्षा माणूस मोठा असल्याचे ठणकावून सांगितले. मानवतावादावर आधारित धर्मचिकित्सा केली. समाजातील विषमता दूर करण्यासाठी महात्मा फुलेंच्या परखड आणि विद्रोही विचारांची आजच्या काळातही नितांत गरज आहे. विधायक समाजनिर्मितीसाठी त्यांच्या विचारांची हत्यारे ताकदीने वापरावीत, असे प्रतिपादन डॉ. गोविंद काजरेकर यांनी केले.

राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्या वतीने महात्मा जोतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त राजर्षी शाहू स्मारक भवनाच्या मिनी सभागृहात त्यांचे व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र टाइम्सच्या कोल्हापूर आवृत्तीचे निवासी संपादक विजय जाधव होते.

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. आनंद यादव आणि ज्येष्ठ क्रीडा प्रशिक्षक पांडुरंग मस्कर यांना आदरांजली वाहून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. ‘महात्मा फुले, जागतिकीकरण आणि वंचितांच्या चळवळी’ या विषयावर डॉ. काजरेकर म्हणाले, तत्कालीन काळात मुलींच्यासाठी पहिल्या शाळेची सुरूवात, अस्पृश्य समाजासाठी पाण्याचा हौद खुला करण्याचा धाडसी, रूढी परंपरेच्या विरोधात विधायक निर्णय महात्मा फुले यांनी घेतला. सत्यशोधक समाजाची नवी आचारसंहिता मांडली. प्रस्थापितांच्या विरोधात बंड केल्याने सामाजिक गुलामगिरीच्या जोखडातून समाज काही प्रमाणात मुक्त झाला. त्या काळात बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना त्यांनी केली. सामाजिक विषमतेवर प्रहार केले. ‘तृतीयरत्न’ नाटकातून धर्मपुनर्रचना मांडली. विष्णू दशावतार, दैवतांच्या कथा खोट्या असल्याचे मांडले.

डॉ. गोविंद काजरेकर म्हणाले, जागतिकीकरणात भांडवलदारांचा सत्ता आणि संपत्तीकडे ओढा वाढला. जल, जमीन आणि जंगल त्यांनी ताब्यात घेतली. वंचितांच्या चळवळीची संपविण्याचे कारस्थान करण्यात आले. यामुळे अर्थसत्ता प्रधान ठरून मूल्यव्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडली.

महाराष्ट्र टाइम्सचे कोल्हापूर आवृत्तीचे निवासी संपादक विजय जाधव म्हणाले, शिक्षण तळापासून देण्याची गरज असल्याचे महात्मा फुले यांनी ठामपणे सांगितले होते. आज जो शिक्षणहक्क मिळाला आहे, सवसामान्यांना शिक्षणाची दारे खुली झाली आहेत, त्याचे मूळ फुलेंच्या भूमिकेत आहे. आजच्या संदर्भात महात्मा फुले यांचे विचार प्रत्येक ठिकाणी मार्ग दाखवतात, हा द्रष्टेपणा त्यामागे होता. त्यांनी समताधिष्ठीत जीवनप्रणालीचा आकृतीबंध मांडला. जातीअंतासाठी अखेरपर्यंत लढा दिला. जागतिकीकरणानंतर वंचितांचे प्रश्न अधिकच गंभीर होत चालले आहेत. वं‌चितांचे शिक्षण आणि सक्षमीकरण याला प्राधान्य दिले पाहिजे. त्यांना वगळून महासत्तेचे स्वप्न साकारता येणार नाही. महात्मा फुले, राजर्षी शाहू, फुले आणि आंबेडकरांचे विचार या सामाजिक समतेच्या तत्वासाठी दिशादर्शक आहेत.

ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ डॉ. जयसिंगराव पवार यांनी स्वागत केले. डॉ. अशोक चौसाळकर यांनी प्रास्ताविक केले. अरूण नाईक यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

न्यायालयांचा वापर हत्यारासारखा नको

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘शहाण्यांनी न्यायालयाची पायरी चढू नये, असा समज आपल्या संस्कृतीत आहे. पण हे चित्र बदलण्यासाठी न्यायालयांचा वापर हत्यार म्हणून करू नये. खोटे टाळून फक्त खरे खटले दाखल झाल्यास न्यायालयातील प्रलंबित खटल्यांचे प्रमाण कमी होईल’, असे मत निवृत्त जिल्हा न्यायाधीश व मुंबई विक्रीकर प्राधिकरणाचे अध्यक्ष‌‌‌ अश्विनीकुमार देवरे यांनी सोमवारी व्यक्त केले. ब्राम्हण सभा करवीर, महालक्ष्मी को-ऑपरेटिव्ह बॅक यांच्यातर्फे आयोजित तात्यासाहेब तेंडुलकर स्मृती व्याख्यानमालेत ते बोलत होते. ‘मूलभूत हक्क आणि पेटंट’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. प्रायव्हेट हायस्कूलच्या सभागृहात व्याख्यान झाले.

निवृत्त जिल्हा न्यायाधिश अश्विनीकुमार देवरे म्हणाले, ‘सर्वोच्च न्यायालयात हुशार आणि बुद्धीवंतांनाच न्यायाधीश म्हणून संधी मिळते. खालच्या पातळीवरील न्याययंत्रणेत काही त्रुटी असतीलही. तरीही सरसकट न्यायालयातील न्यायदानावर नकारात्मक भाष्य करणे चुकीचे आहे. संविधानात प्रत्येक नागरिकास जगण्याच्या स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार दिला आहे. ‘मनेका गांधी’, ‘गोदावरी’, ‘विशाखा’ अशा विविध खटल्यांमध्ये मूलभूत अधिकार उल्लघंन झालेल्या प्रकरमणांत सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निकाल महत्वपूर्ण आहेत. या निकालानंतर मुलभूत अधिकारांत नैस‌र्गिक न्यायदानांची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी दोन्ही बाजू ऐकून घेण्याचा समावेश करण्यात आला.’

निवृत्त जिल्हा न्यायाधिश अश्विनीकुमार देवरे म्हणाले, ‘भारतीय न्यायव्यस्थेने औषध कंपन्याच्या पेटंटचा मूलभूत अधिकारांवर कसे अतिक्रमण होत आहे दाखवून दिले.’

कार्यक्रमात प्रारंभी महालक्ष्मी बँकेचे अध्यक्ष केदार हसबनीस, उपाध्यक्ष श्रीकांत हेर्लेकर, ब्राह्मण करवीर सभेचे अध्यक्ष उदय कुलकर्णी, अॅड. विवेक शुक्ल आदींच्या हस्ते दिपप्रज्वलनाने व्याख्यानमालेचे उदघाटन झाले. अध्यक्ष हसबनीस, कुलकर्णी यांची भाषणे झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विकास प्राधिकरणात इचलकरंजी, कागल हवे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर विकास प्राधिकरणात इचलकरंजी, कागल, वडगावसह आसपासची गावे समाविष्ट करावीत. प्राधिकरणाच्या माध्यमातून कोल्हापूर शहरातंर्गत सुविधासाठी प्रचंड निधी उपलब्ध करावा, अशी सूचना महापालिकेतर्फे करण्यात येणार आहे. स्थायी समिती सभापती मुरलीधर जाधव यांच्या सहीनिशी प्राधिकरण संदर्भातील सूचना आणि हरकती जिल्हाधिकारी कार्यालयाला मंगळवारी (ता.२९) सादर केली जाईल.

हद्दवाढीऐवजी प्राधिकरण स्थापण्याचा पर्याय पुढे आल्यानंतर त्या अनुषंगाने सादर करावयाच्या सूचना, महापालिकेचे विविध प्रकल्प, शहर विकासाच्या योजना संदर्भात महापालिकेत सोमवारी बैठक झाली. या बैठकीत प्राधिकरणाचे स्वरूप, फायद्याविषयी चर्चा झाली. स्थायी समिती सभापती मुरलीधर जाधव बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. मावळत्या महापौर अश्विनी रामाणे, उपमहापौर शमा मुल्ला, सभागृह नेता प्रविण केसरकर, शिक्षण समिती उपसभापती सुरेखा शहा, भाजप गटनेते विजय सुर्यवंशी, ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यजित कदम यांच्यासह नगरसेवक व अधिकाऱ्यांच्या उपस्थित बैठक झाली.

प्राधिकरण संदर्भातील सूचना आणि हरकती सादर करण्याची मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत आहे. यापूर्वी हद्दवाढ विरोधी कृती समितीने प्राधिकरणविषयक सूचना केल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे ३० नोव्हेंबरपर्यंत प्राप्त सूचना व हरकतीवर आधारित जिल्हाधिकारी अहवाल तयार करणार आहेत. जिल्हाधिकारी दोन आठवड्यात अहवाल राज्य सरकारकडे सादर करतील.

प्राधिकरणचा अभ्यास करून सूचना करण्यासाठी महापालिकेने एक महिन्याची मुदतवाढ घेतली होती. प्रत्यक्ष सादरीकरणावेळी आयुक्त, उपायुक्त, प्रकल्प कार्यालयापासून नगररचना विभागातील अधिकाऱ्यांनी प्राधिकरणची कार्यकक्षा सांगण्यापलीकडे काही केले नाही. प्रशासनाचा अभ्यास कच्चा असल्याचे समोर आले.

प्राधिकरणच्या माध्यमातून शहराचा विकास अपेक्षित आहे. शहर विकासासाठी आवश्यक प्रकल्प आणि निधीची सांगड घालून प्रस्ताव करण्याच्या सूचना आहेत. महापालिकेतर्फे मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव दिला जाईल.

- मुरलीधर जाधव, सभापती, स्थायी समिती

प्राधिकरणाच्या माध्यमातून शहरातील विकासप्रकल्पांना गती मिळू शकते. शहरात पाच उड्डाणपूल प्रस्तावित आहेत. प्राधिकरण स्थापताना त्यामध्ये इचलकरंजी, वडगाव, कागलसह आसपासच्या गावांचा समावेश करावा अशी सूचना स्थायी सभापतींच्या सहीने जिल्हा प्रशासनाकडे करण्यात येणार आहे.

- पी. शिवशंकर, आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२१ हजार नागरिकांच्या दारी पोहोचला ‘न्याय’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विधी सेवा प्राधिकरणने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार २४ व २५ नोव्हेंबर या दोन दिवसांमध्ये ‘न्याय आपल्या दारी’ ही योजना राबवली. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील २१ हजार १२२ नागरिकांना स्वयंसेवकांमार्फत न्यायविषयक मार्गदर्शन करण्यात आले.

समाजाच्या तळागाळातील घटकांपर्यंत न्याय पोहोचण्यासाठी न्याय यंत्रणाच गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने प्रयत्न सुरू केले आहेत. न्याय आपल्या दारी या योजनेअंतर्गत विधी सेवा प्राधिकरणने शहरासह जिल्ह्यात घरोघरी जाऊन समाजातील दुर्बल घटकांना न्यायविषयक मार्गदर्शन केले.

यासाठी अर्चना पांढरे, दीपाली काटकर, अनिता काळे, शामराव पाटील, सुषमा बटकडली, प्रसाद जाधव आदींसह स्वयंसेवी संस्थांनी परिश्रम घेतले. जिल्हा न्यायाधीश एस. पी. कुलकर्णी यांच्या हस्ते स्वयंसेवकांचा सत्कार करण्यात आला, त्याचबरोबर स्वयंसेवकांनी ओळखपत्र आणि धनादेशांचे वाटपही करण्यात आले. न्याय आपल्या दारी ही योजना यशस्वीपणे राबवण्यासाठी विधी सेवा प्राधिकरणचे सचिव न्यायाधीश उमेशचंद्र मोरे यांनी विशेष नियोजन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप आघाडीचा दमदार प्रवेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आव्हाने-प्रतिआव्हानांमुळे प्रचंड राजकीय इर्षेने लढल्या गेलेल्या जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकांमधील अटीतटीच्या लढतींमध्ये मुरगूडमध्ये शिवसेनेने, मलकापूरमध्ये भाजप आघाडीने तर पेठ वडगावमध्ये युवक क्रांती आघाडीने सत्तांतर घडवले. भाजपचे नेते, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सहभागामुळे चुरशीच्या बनलेल्या व राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कागल नगरपालिकेतील लढतीत राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी वर्चस्व कायम ठेवत सत्ता मिळवली. मात्र प्रथमच उतरलेल्या भाजपने राष्ट्रवादीला चांगलेच झगडायला लावले. गडहिंग्लजमध्ये जनता दल, कुरुंदवाडमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीने तर पन्हाळ्यात जनसुराज्यने सत्ता कायम ठेवली. इचलकरंजी, जयसिंगपूरमध्ये स्थानिक आघाडीची सत्ता आली असली तरी नगराध्यक्षपद मात्र भाजप आघाडीला मिळाले. त्यामुळे पुढील पाच वर्षे येथील राजकारण अखंड धगधगत राहण्याची चिन्हे आहेत.​ नगरपालिकांच्या माध्यमातून भाजप आघाडीने जिल्ह्याच्या राजकारणात दमदार प्रवेश केला आहे.


रविवारी झालेल्या ७९.३९ टक्के मतदानानंतर सोमवारी सकाळपासून त्या त्या नगरपालिकांच्या मतमोजणीला प्रारंभ झाला. प्रचंड उत्सुकता, क्षणाक्षणाला चित्र बदलणारे निकाल, नगराध्यक्षपद व सत्ता यांचे सतत वरखाली होत असलेल्या पारड्यांमुळे कार्यकर्त्यांबरोबर नेत्यांनाही सहन करावा लागलेला आशा-निराशेचा खेळ अशा वातावरणात मतमोजणी पूर्ण झाली. सर्वां​त पहिला निकाल पन्हाळा नगरपालिकेचा जाहीर झाला. त्यानंतर ठिकठिकाणच्या पालिकांमधील नगरसेवक व नगराध्यक्षपदाचे निकाल जाहीर झाले. निकाल समजताच त्या त्या प्रभागांमधील उमेदवार व समर्थक गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा करत होते. सत्तांतर झालेल्या नगरपालिकांमध्ये सत्ता मिळवलेल्या पक्ष, आघाड्यांकडून मोठ्या प्रमाणात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. कुरुंदवाडमध्ये नगराध्यक्षपदी काँग्रेसचे जयराम पाटील विजयी झाल्यानंतर फेरमतमोजणी करण्यात आली. त्यानंतरही पाटील यांचाच विजय घोषित करण्यात आला. इचलकरंजीची मतमोजणी रात्री सर्वांत उशिरापर्यंत चालली.

सकाळी केंद्र व राज्यात सत्ता मिळवल्यानंतर भाजप व शिवसेना प्रथमच ग्रामीण पातळीवरील सार्वत्रिक निवडणुकांना सामोरे जात होते. जिल्ह्यात राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, जनता दल स्थानिक आघाड्यांच्या माध्यमातून सत्तेत होते. भाजपने ठिकठिकाणी वेगवेगळ्या आघाड्या करुन या निवडणुकांत पर्याय उभा केला होता. कागलमध्ये आमदार हसन मुश्रीफ यांच्याविरोधात चांगलेच दंड थोपटले होते. त्यासाठी समरजीतसिंह घाटगे यांचा भाजपप्रवेशही झाला होता. मुश्रीफ यांच्याविरोधात भाजपने लावलेल्या ताकदीमुळे येथे राज्याचे लक्ष लागले होते. भाजपने स्थानिक घाटगे गटाला सोबत घेत लावलेल्या ताकदीमुळे ९ जागा मिळवल्या. राष्ट्रवादीलाही ९ जागा मिळाल्या. शिवसेनेला दोन जागा मिळाल्या. राष्ट्रवादी व शिवसेना एकत्र असल्याने ११ विरुद्ध भाजप ९ असे बलाबल झाले. नगराध्यक्षपदाच्या निवडीतही राष्ट्रवादीच्या माणिक माळी विजयी झाल्या. या बलाबलामुळे मुश्रीफ यांनी सत्ता कायम राखली असली तरी भाजपने कडवी झुंज दिली.

कागलबरोबरच मुरगूडकडेही अनेकांचे लक्ष लागले होते. पाटील गटाच्या ताब्यात असलेल्या मुरगूड पालिकेवर शिवसेनेने भगवा फडकवला. नगराध्यक्षपदावरही शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले. प्रा. संजय मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या सेनेला १२, पाटील गटाला २, अपक्षांना २ तर शिवाजी आघाडीला १ जागा मिळाल्या. मलकापूरमध्ये भाजप-जनसुराज्यने सत्तांतर घडवले. शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीचा निसटता पराभव करत सत्ता मिळवली. तसेच नगराध्यक्षपदावरही विजय मिळवला. भाजप आघाडीला ९ तर सेना, राष्ट्रवादी आघाडीला ८ जागा मिळाल्या. पेठ वडगाव पालिकेत मात्र अनपेक्षितरित्या युवक क्रांती आघाडीने बाजी मारली. सत्ताधारी यादव आघाडीचा पराभव करत युवक क्रांती आघाडीने १३ जागा मिळवल्या. विविध पक्षांनी पाठींबा दिलेल्या या आघाडीचे मोहनलाल माळी नगराध्यक्षपदी विराजमान झाले. यादव आघाडीला केवळ ४ जागांवर समाधान मानावे लागले. कुरुंदवाडमध्ये राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीची सत्ता कायम राखली असली तरी तिथे काँग्रेसचे जयराम पाटील नगराध्यक्षपदी विजयी झाले. काँग्रेस व राष्ट्रवादीला ११ तर भाजप आघाडीला ६ जागा मिळाल्या.

गडहिंग्लजमध्ये जनता दलाने सत्ता कायम राखण्यात यश मिळवले. जनता दलाच्या स्वाती कोरी नगराध्यक्षपदी विजयी झाल्या. जनता दलाला १० जागा, राष्ट्रवादीला ४, भाजपला २ तर शिवसेनेला १ जागा मि​ळाल्या. पन्हाळ्याचा गड माजी आमदार विनय कोरे यांनी राखला. भाजपच्या सोबतीने उतरलेल्या जनसुराज्य आघाडीचे १२, भोसले गटाचे २ तर शाहू आघाडीचे ३ उमेदवार विजयी झाले. जनसुराज्य आघाडीच्या रुपाली धडेल या नगराध्यक्षपदी विजयी झाल्या.

नगराध्यक्ष एकाचे सत्ता दुसऱ्यांची

जयसिंगपूर व इचलकरंजी नगरपालिकेत कुरघोड्याच्या राजकारणाला ऊत येणार आहे. जयसिंगपूरमध्ये सत्ताधारी शाहू आघाडीने सत्ता कायम राखत १३ जागा मिळवल्या. पण त्यांचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार ​पराभूत झाला. तिथे ताराराणी आघाडीच्या डॉ. निता माने नगराध्यक्षपदी विजयी झाल्या. इचलकरंजीत नगराध्यक्षपदी भाजपच्या अलका स्वामी विजयी झाल्या. तर काँग्रेस व मित्र पक्षांची सत्ता आली आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणी सत्ता एकाची व नगराध्यक्ष दुसऱ्या पक्षाचे असे चित्र तयार झाले आहे. यामुळे दोन्ही गट एकमेकांना शह काटशहाचे राजकारण खेळणार हे स्पष्ट आहे.

०००००००००००००००००००

स्वतंत्र चौकट

कोण कुठे सत्तेवर?

कागल - राष्ट्रवादी

गडहिंग्लज-जनता दल

पन्हाळा- जनसुराज्य पक्ष

कुरुंदवाड - काँग्रेस आघाडी

मुरगूड- शिवसेना

मलकापूर- भाजप- जनसुराज्य आघाडी

पेठवडगाव- युवक क्रांती आघाडी

इचलकरंजी- काँग्रेस मित्रपक्ष (नगराध्यक्ष भाजप आघाडी)

जयसिंगपूर- शाहू आघाडी (नगराध्यक्ष ताराराणी आघाडी)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपाची दमदार एंट्री

$
0
0



सूर्यकांत आसबे, सोलापूर

मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने एकूण चार नगरपालिकांमध्ये दमदार एंट्री केली भाजपने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला धूळ चारुन यश मिळविले. शिवसेनेने आपला गड शाबूत राखताना बार्शीचा राष्ट्रवादीच्या दहा वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावत भगवा फडकविला आहे. पालकमंत्री विजयकुमार देशमुख एकूण चार नगरपालिकांच्या विजयाचे शिल्पकार ठरले. तर सहकारमंत्री सुभाष देशमुख या निवडणुकीत पुरते नापास झाले आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट आणि दुधनी नगरपालिकांमध्ये काँग्रेसची अनेक वर्षे सत्ता होती. मात्र, विकास कामांबाबत स्वामी समर्थांची अक्कलकोट नगरी कायमच उपेक्षित राहिली होती. मागील निवडणुकीत २१ पैकी प्रत्येकी १० उमेदवार भाजप आणि काँग्रेसचे असताना सत्तेची चावी मात्र, एकमेव नगरसेवक असलेल्या राष्ट्रवादीच्या ताब्यात असायची ते ज्यांच्या पारड्यात आपले मत टाकायचे तो पक्ष सत्ता उपभोगायचा. काँग्रेसने येथे सर्वाधिक काळ सत्ता उपभोगली होती. भाजपचे माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांनी येथे नेहमी राष्ट्रवादीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. या राजकीय साठमारीत समर्थ नगरीचा विकास मात्र खुंटला. काँग्रेसचे आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनीही आपल्या सोयीच्या राजकारणाला महत्व दिले होते. मात्र, यंदाच्या निवडणुकीत भाजपने नगरपालिका ताब्यात घेण्याच्या इर्षेने जोमाने प्रचार केला. नव्या दमाचा तालुकाध्यक्ष म्हणून सचिन कल्ल्याणशेट्टी यांची निवड केली. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी गल्लोगल्ली फिरुन भाजपचा प्रचार केला. मात्र, ऐनवेळी सिद्रामप्पा पाटील यांनी भाजपची साथ सोडली तरीही जनता मागे हटली नाही, भाजपच्या पारड्यात घसघशीत १५ जागा टाकत स्पष्ट बहुमत मिळवून दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची येथे जाहीर सभा झाली होती. भाजपच्या शोभा खेडगी नगराध्यक्ष झाल्या.

आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्या दुधनीतही पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी चमत्कार घडविला. तब्बल ५० वर्षांच्या काँग्रेसच्या सत्तेला सुरुंग लावला इतकेच नव्हे तर नगराध्यक्षपदही खेचून आणले. तीन अपत्ये असल्याचे बनावट प्रमाणपत्र सादर करून निवडणूक जिंकण्याचा म्हेत्रे यांचा डाव मतदारांनी हाणून पाडला. भाजपचे भीमाशंकर इंगळे यांना नगराध्यक्ष केले. बहुमत काँग्रेसचे आणि नगराध्यक्ष भाजपचा अशी दुधणीची अवस्था आहे. म्हेत्रे यांना येथे जबरदस्त धक्का बसला आहे. मैंदर्गी नगरपालिकेवर नेहमी स्थानिक गटांचाच झेंडा राहिला आहे. मात्र, येथेही भाजपचे ४ नगरसेवक निवडून आणण्याची किमया देशमुख यांनी केली आहे.

पंढरपूरमध्ये आमदार प्रशांत परिचारक यांनी भाजपच्या मदतीने एकहाती सत्ता राखली आहे, त्यांनी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचा पराभव केला. पंढरीचा रखडलेला विकास आणि परिचारक यांनी भाजप सरकारकडून मंजूर करून आणलेला कोट्यवधींचा निधी हे परिचारक यांच्या विजयाचे महत्वाचे कारण ठरले. येथे अपक्ष नगरसेवकांनी बाजी मारली हे विशेष म्हणावे लागेल. येथे परिचारक गटाच्या साधना भोसले नगराध्यक्षाच्या खुर्चीत विराजमान झाल्या.

सांगोला नगरपालिकेत शेकाप आमदार गणपतराव देशमुख आणि माजी आमदार दीपक साळुंखे यांना जास्तीच्या जागा मिळाल्या, परंतु शिवसेना भाजप आणि रिपाई महायुतीने नगराध्यक्षपद खेचून आणले. राणी माने यांच्या गळ्यात नगराध्यक्षपदाची माळ पडली. आतापर्यंतच्या इतिहासात आमदार देशमुख यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

मंगळवेढा नगरपालिकेत आमदार भारत भालके यांची काँग्रेस, शहा गट आणि राष्ट्रवादीने सत्ता राखली आहे. राष्ट्रवादीच्या अरुणा माळी नगराध्यक्ष झाल्या. बार्शीत माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार दिलीप सोपल यांच्या १० वर्षांच्या सत्तेला शिवसेनेने सुरुंग लावला. ४० पैकी तब्बल २९ जागा जिंकून शिवसेनेने येथे भगवा फडकविला. सोपल यांचे सांगली येथील सभेत झालेले वाचाळ भाषण त्यांची सत्ता जाण्याचे प्रमुख कारण ठरले. तर आर्यन कारखान्याने त्यांना पुरते अडचणीत आणले. शिवसेनेचे माजी आमदार राजेंद्र राऊत येथे विजयाचे शिल्पकार ठरले. त्यांचा सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग यशस्वी झाला. भाजपचा मात्र येथे पराभव झाला. शिवसेनेचे असिफ तांबोळी नगराध्यक्ष झाले. करमाळा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने ऐनवेळी आघाडी केली आणि नगरपालिकेची सत्ता राखली. माजी आमदार जयवंतराव जगताप आणि माजी आमदार श्यामल बागल यांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन केली. वैभवराजे जगताप नगराध्यक्ष झाले. भाजप शिवसेना आणि माजी नगराध्यक्ष कन्हैयालाल देवी यांना पराभवाला सामोरे जावे लागले. येथे करमाळ्याचे शिवसेना आमदार नारायण पाटील यांना पराभव पत्करावा लागला. कुर्डूवाडीत मात्र स्वाभिमानीची सत्ता आणि शिवसेनेचा नगराध्यक्ष, अशी स्थिती आहे. समीर मुलाणी नगराध्यक्षपदी निवडून आले. येथे आमदार बबन शिंदे यांचे बंधू संजय शिंदे यांच्या स्वाभिमानी आणि रिपाई आघाडीने नऊ जागा जिंकल्या. शिवसेना आणि स्वाभिमानाला गड आला पण सिंह गेला, असे म्हणण्याची वेळ आली. जिल्ह्यात सर्वाधिक आमदार असलेल्या राष्ट्रवादीचा या निवडणुकीत पराभव झाला. अजित पवार यांच्याकडे या निवडणुकीची सूत्रे होती. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्याकडे नऊ पैकी अक्कलकोट, मैंदर्गी, दूधनी आणि पंढरपूर या चार नगरपालिकांची जबाबदारी होती. त्यापैकी मैंदर्गी वगळता तीन नगरपालिका त्यांनी ताब्यात घेतल्या. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे कुर्डुवाडी, बार्शी, सांगोला, करमाळा आणि मंगळवेढा या पाच नगरपालिकांची जबाबदारी होती. मात्र, त्यापैकी एकही नगरपालिका त्यांना ताब्यात घेता आली नाही. बार्शीत मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा झाली आणि त्यांनी बार्शी दत्तक घेण्याचे आवाहन केले होते. मात्र, तेथे भाजपाची पुरती धूळधान उडाली. नगरपालिका निवडणुकीत पालकमंत्री पास तर सहकारमंत्री नापास झाले आहेत. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीतही भाजपचा कस लागणार आहे. त्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला भाजप आणि शिवसेनेला रोखताना नाकी नऊ येणार हे मात्र, या नगरपरिषदा निवडणुकीवरून स्पष्ट झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाराष्ट्राच्या दोन सुपुत्रांना वीरमरण

$
0
0

लेह, लडाखमधील कामगिरीनंतर कुणालगीर यांचे जम्मूमध्ये शौर्य

सुनील दिवाण, पंढरपूर

जम्मू-काश्मीर येथे दहशतवाद्यांशी दोन हात करताना पंढरपूरचे सुपुत्र मेजर कुणालगीर मुन्नागीर गोसावी मंगळवारी शहीद झाले. मंगळवारी सकाळी सैन्यदलाकडून कुणालच्या भावाला फोनवरून ही दुःखद बातमी कळताच, कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.

पंढरपूरमधील अत्यंत सधन कुटुंबातील धाकटा मुलगा असलेल्या कुणाल यांना सुरुवातीपासून सैन्यदलाची आवड. पंढरपूर येथील कवठेकर प्रशालेत शालेय शिक्षण आणि नंतर एमकॉम पदवी घेऊन सैन्यदलाचे प्रशिक्षण घेत ते नऊ वर्षांपूर्वी अधिकारीपदावर सैन्यात दाखल झाले. प्रारंभी लेह, लडाख, सागर, मणिपूर अशा विविध पोस्टिंगनंतर सध्या ते जम्मूमध्ये रुजू झाले होते. त्यानंतर २६ नोव्हेंबरलाच ते पत्नी उमा आणि ५ वर्षांची मुलगी उमंग हिला घेऊन पुन्हा जम्मूकडे रवाना झाले होते. मंगळवारी सकाळपासून टीव्हीवर चकमकीच्या बातम्या सुरू असल्याने गोसावी कुटुंब धास्तावले होते. यातच सकाळी कमांडंट अधिकाऱ्यांकडून मेजर कुणाल शहीद झाल्याचा फोन त्यांच्या भावाला आला.

फोन येताच त्यांचे दोन्ही भाऊ तातडीने जम्मूकडे रवाना झाले. ही बातमी पंढरपूर परिसरात समजताच पंढरपूरकरांनी गोसावी यांच्या घरापाशी गर्दी करण्यास सुरुवात केली. यातच जिल्हा प्रशासनाकडून मात्र या बातमीला पुष्टी मिळत नसल्याने कुटुंबीय कसातरी धीर ठेवून होते. दुर्दैवाने ही बातमी खरी असल्याचे समजताच परिसरावर शोककळा पसरली.
....................

लष्करी सेवा हेच होते संभाजी कदम यांचे ध्येय

म. टा. प्रतिनिधी, नांदेड

नांदेड जिल्ह्यातील जानापुरी (ता. लोहा) येथील जवान संभाजी यशवंतराव कदम (३३) यांना जम्मू-काश्मिरमधील नगरोटा येथे दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगी, आईवडील, दोन बहिणी असा परिवार आहे. रत्नेश्वरी मातेच्या पायथ्याशी वाढलेला जिगरबाज कणखर कदम यांच्या वीरमरणाचे वृत्त समजताच जानापुरीवर शोककळा पसरली असून गावात चूलही पेटलेली नाही.

कदम हे डिसेंबर २००२मध्ये ५ मराठा लाइट इन्फ्रंट्रीमध्ये दाखल झाले. १४ वर्षे सेवा बजावल्यानंतर पुढील वर्षी ते निवृत्त होणार होते. कदम आईवडिलांना एकुलते एक पुत्र होते. त्यांचे वडील पुण्यात खासगी कंपनीत वॉचमन तर आई पुण्यात मजुरी करते. कदम यांची पत्नी व तीन वर्षांची मुलगीही पुण्यात वास्तव्यास आहेत.

कदम गौरीपूजनावेळी जानापुरीत आले होते. त्यावेळी ‘नोकरी करावी, तर सैन्यातच करावी, त्यासारखी देशसेवा दुसऱ्या कोणत्याही नोकरीत नाही. आपल्या नोकरीचा अभिमान वाटतो,’ असे त्यांनी गावातील तरुणांना आवर्जून सांगितल्याची आठवण शहाजी कदम तसेच पांडुरंग कदम या त्यांच्या मित्रांनी जागवली. कदम यांच्या रूपाने अतिशय धाडसी शूरवीर पुत्र नांदेड जिल्ह्याने गमावल्याची व्यक्त होत आहे. पालकमंत्री दिवाकर रावते, आमदार हेमंत पाटील यांनी कदम यांना श्रद्धांजली वाहिली.
......................

मुलाचा अभिमान

कुणाल यांना लहानपणी बबलू या टोपणनावाने हात मारली जात असे. आपला लाडका बबलू सैन्यदलात उच्चपदावर जावा ही कुटुंबाची इच्छा होती. या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असला, तरी आपला मुलगा दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाल्याचा अभिमान असल्याचे त्यांचे वडील मुन्नागीर गोसावी यांनी सांगितले. मेजर कुणाल यांच्यावर त्यांच्या वाखरी येथील शेतात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

आज अंत्यसंस्कार

त्यांचे पार्थिव आज, बुधवारी जम्मू-काश्मीरहून विमानाने नांदेडला व त्यानंतर जानापुरी येथे आणले जाणार आहे. तेथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले जातील. लष्कर तसेच जिल्हा पोलिस दलातर्फे त्यांना मानवंदना दिली जाणार आहे. जिल्हा पोलिस दल, सार्वजनिक बांधकाम विभाग आदींसह विविध यंत्रणा जानापुरी येथे पोहोचल्या आहेत. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर मिलिंद तुंगार समन्वय साधत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कमळाची कमाल; पृथ्वीराज चव्हाणांच्या विकासाला सलाम

$
0
0



राम जगताप, कराड

कराडकरांना विकास काय असतो, हे दाखवून देणाऱ्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील यशवंत जनशक्ती लोकसेवा आघाडीस २९ पैकी तब्बल १६ जागांवर विजयी करून कराडकरांनी त्यांच्या कामाचे योग्य मोजमाप केले. भाजपने अनपेक्षितपणे चार जागांसह नगराध्यक्ष पदावर विजय मिळवित कराडात कोमजलेले कमळ पुन्हा टवटवीत करण्यात यश मिळविले. शिवाय कराडकरांनी यंदा नगरपरिषदेत अनेक वर्षांपासून सत्तेत असणाऱ्या आमदार बाळासाहेब पाटील यांना पराभूत केले. माजी आमदार विलासराव पाटील उंडाळकरांनाही धूळ चारली.

कराड नगरपालिकेची यंदाची निवडणूक काहीशी वेगळ्या वळणांवर होती. येथील नेत्यांच्या पारंपरिक गटांमध्ये सत्तेचे अंतर्गत वाटप ठरवून या निवडणुका होत होत्या. त्यामुळे काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण व येथील राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील यांची असणारी युती यावेळी कायम राहून काँग्रेसचे माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर व डॉ. अतुल भोसले या दोन कट्टर विरोधकांना शहराच्या राजकारणात येऊ द्यायचे नाही, यासाठी हे दोन्ही आमदार दोन्ही आमदारकीच्या सत्तेसाठी राजकीय खेळी करतील, असा अंदाज होता. मात्र तो खोटा ठरवत प्रत्यक्षात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या या दोन्ही आमदारांनी स्वतंत्र आघाड्या स्थापन करीत निवडणुकीला सामोरे गेले. याचा जास्तीचा फायदा आमदार चव्हाण गटाला झाला तर आमदार पाटील गटाचे पुरते पानिपत झाले. मात्र, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या या राजकीय भांडणात अपेक्षितपणे चित्र बदलत जाऊन याचा फायदा तिसऱ्याला मिळाला. भाजपाचे चार नगरसवेक आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार विजयी होऊन कोमजलेले कमळ पुन्हा उमलले.

नगरपरिषदेच्या निवडणुकीत काँगेसचे नेते आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या जनशक्ती आघाडीनेच शहरातील सर्व प्रभागांत आपले उमेदवार उभे केले. तसेच शारदा जाधव या उमेदवार बिनविरोध निवडून आणण्यात त्यांना यश आले होते. त्यामुळे बहुमताचा पहिला नारळ त्यांच्याच आघाडीने फोडला होता. याचबरोबर नगराध्यक्षपदाचा उमेदवारही त्यांच्याच आघाडीचा निवडून येईल, अशी शक्यता वाटत होती. त्यामुळे भाजपचा कोणी फारसा विचार करीत नसल्याचेच प्रारंभीचे चित्र होते. या उलट सत्ताधारी राष्ट्रवादी पुरस्कृत लोकशाही आघाडीची सत्ता पालिकेत वर्षानुवर्षे असतानाही त्यांना सर्वच्या सर्व जागांवर उमेदवारही मिळाले नसल्याने त्यांच्या पराभवाची चाहुल मतदारांना अगोदरचा लागली होती. या संधीचा फायदा उठविण्यासाठी व पक्षाने दोन महत्वाची पदे कराडात दिल्याने सामाजिक जाणीवेचे भान ठेवत देशात व राज्यात सत्ता असलेल्या भाजपने अनिवार्य परिस्थितीत ही निवडणूक पक्षीय चिन्हावरच निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार थेट नगराध्यक्षपदाचा उमेदवार चिन्हावर उभा करण्याबरोबरच चिन्हावर काही उमेदवारही उभे केले. तरीही त्यांना सर्वच्या सर्व जागांवर उमेदवार का मिळाले नाहीत. त्यातच भाजपने गटबाजीचे दर्शन घडवत पक्षाऐवजी माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांच्याशी राजकीय सोयरिक करीत नागरी विकास आघाडीबरोबर युती केली. मात्र, त्याचा फारसा उपयोग झाला नाही, विलासकाका पाटील-उंडाळकरांचा कराडातील राजकीय करिष्मा संपत चालला असल्याचेही या निकालाने अधोरेखित केले.

काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप ही लेबल असली तरी नेते मंडळी पारंपरिकच होती. मात्र, या निवडणुकीने एका वेगळ्या राजकीय अस्तित्वाची जाणीव कराडकरांना झाली आहे. एमआयएमने नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरत मुस्लिम-मागासवर्गीय ऐक्याचा प्रयोग करीत राजकीय वगनाट्याचा पहिला अंक सादर केला आहे. हा प्रयोग यशस्वी झाला नसला तरी दलित समाजातील भीमशक्तीच्या रुपाली लादे यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी देत दलित-मुस्लिम ऐक्याचा कायमस्वरूपी राजकीय रंगमंच उभारण्यात ते काही अंशी का होईना यशस्वी झाले आहेत. या यशाकडे पाहूनच एमआयएमचे अध्यक्ष खासदार आसुद्दीन ओवेसी यांची येथे जाहीर सभा घेऊन येथील राजकारणाला वेगळी कलाटणी दिली आहे. या सभेत ओवीसींनी काँग्रेस-भाजपची भीती दाखवून दोघांनीही मुस्लिम मते मागणे बंद करा, असे ठणकावल्यामुळे मुस्लिमाची एकगठ्ठा मते एमआयएमकडे गेली. शिवाय भाजपाची पारंपरिक फिक्स मते मिळाल्याने व काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मतांची विभागणी झाल्याने भाजपचा नगराध्यक्ष निवडून आल्याची जोरदार चर्चाही सुरू आहे. त्यातच भाजपनेही ओवेसींना लगाम घालण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जोरदार सभा घेऊन दाखविली. यावेळी देवेंद्र फडणवीसांनीही राजकीय ढंगांत भाषण ठोकत मत द्या, विकास निधी देतो, असे सांगत मतदारांना निधीचे गाजर दाखविले. नगराध्यक्षपदाचे मत भाजपलाच द्या, असा प्रचार केला. त्यामुळेच जातींच्या मतांचे राजकारण होऊन प्रथमच कमळ फुलले. कराडमध्ये भाजप जिल्हाध्यक्षासह सहकार परिषदेचे अध्यक्ष, अशी पदे देऊन त्यांच्यावर नैतिक जबाबदारी टाकली. खाल्ल्या मिठाला जागण्यासाठी त्यांनीही इमाने-इतबारे काम करीत आपल्या अस्तित्वाची झलक पक्षश्रेष्ठींना दाखवून दिली. भाजपाचे प्रदेश चिटणीस डॉ. अतुल भोसले यांची कृष्णा उद्योग समूहाची राखीव फौज प्रचारात सहभागी झाल्याने त्यांच्या श्रेयाची पक्षाने दाद घेणे आवश्यक झाले आहे. त्यामुळे भोसले हेही या विजयाचे शिल्पकार असल्याचे कराडकरांना वाटते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राप्त‌िकरविषयक राष्ट्रीय परिषद उद्यापासून

$
0
0

कोल्हापूर : प्राप्त‌िकरविषयक नियमांत बदल आणि नोटांबदीच्या परिणाम याबाबत विवेचन करण्यासाठी चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाच्यावतीने एक व दोन डिसेंबर रोजी परिषद होणार आहे. हॉटेल सयाजी येथे सकाळी साडेदहा वाजता परिषदेचे उदघाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होईल. श्रीमंत शाहू महाराज प्रमुख उपस्थित राहतील. कोल्हापूर चार्टर्ड अकाउंटंट असोसिएशनचे अध्यक्ष सीए नीलेश भालकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

अध्यक्ष भालकर म्हणाले, ‘परिषदेत दिल्लीतील सीए गिरीश आहुजा ‘भांडवली नफा व त्यावरील करप्रणाली’ विषयावर मार्गदर्शन करतील. प्राप्त‌िकर विवरणपत्रामध्ये आवश्यक मानांकने या विषयावर राष्ट्रीय सदस्य निहार जंबुसारीया मार्गदर्शन करतील. नोटाबंदी निर्णयानंतर झालेले परिणाम, नागरीकांना भेडसावणारे प्रश्न याचा उहापोह सीए किशोर फडके करतील. नोटाबंदी कार्यन्वित विचारधारेशी समंत असणारे यमाजी मालकर अर्थक्रांतीविषयी माहिती देतील. सीए अनिल साठे, सीए राजेश आठवलेही मार्गदर्शन करतील.’

उपाध्यक्ष अवधुत चिकोडी म्हणाले, ‘परिषदेस पश्चिम विभागीय प्रमुख सीए श्रृती शहा, राष्ट्रीय सदस्य नवीन गुप्ता व मंगेश किणरे उपस्थित राहणार आहेत.’

सेक्रेटरी नवीन महाजन, शंकर पाटील, नितीन हरुगडे, अमित शिंदे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कोल्हापूरच्या विकासाचा रोडमॅप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वाहतुकीची कोंडी संपुष्टात आणण्यासाठी १२०० कोटी रुपये खर्चून शहरात सहा ठिकाणी उड्डाणपूल, मल्टिलेव्हल कार पार्किंग, रस्ते, बागा, क्रीडागंण, दवाखान्यांत अत्याधुनिक सुविधा, रंकाळा संवर्धन, महापालिकेची भव्य प्रशासकीय इमारत उभारणीपासून शहरातंर्गत ते शहराबाहेरील रिंग रोड बांधणीच्या विकासाचा रोडमॅप महापालिकेने तयार केला आहे. शहरातील सुविधासाठी ३५०० कोटी रुपये, रिंगरोड व आवश्यक आरक्षणे संपादनासाठी २००० कोटी रुपये अशी त्याची विभागणी आहे. राज्य सरकारने कोल्हापूर क्षेत्र विकास प्राधिकरणास मंजुरी देताना शहर विकासासाठी ५५०० कोटी रुपयांचे अनुदान महापालिकेला द्यावे अशी मागणी केली आहे. महापालिकेने प्रस्तावित कामांचा जम्बो प्रस्ताव मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला.

सहा ठिकाणी फ्लायओव्हर

कोल्हापूरच्या वाढीचा वाढता वेग व स्थलांतरितांच्या संख्येचा ताण महापालिकेवर पडत आहे. सार्वजनिक सुविधांसाठी​ आरक्षित जागा संपादन करून विकास योजनेच्या अंमलबजावणीसाठी २००० कोटी रुपयांची तरतूद आवश्यक असल्याचे प्रस्तावात म्हटले आहे. वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी कावळा नाका ते दसरा चौक, गंगावेश ते रंकाळा टॉवर, गंगावेश ते शिवाजी पूल, मिरजकर तिकटी ते संभाजीनगर, खासबाग मैदान पद्माराजे गर्ल्स हायस्कूल येथे उड्डाणपूल आवश्यक असल्याचा प्रस्ताव दिला आहे. मध्यवर्ती बसस्थानक परिसर, राजारामपुरी, शाहूपुरी येथे वाहतूक नियोजनासाठी आरओबी बांधणी गरजेची आहे.

तीनशे बससाठी डेपो

केएमटीची सेवा आसपासच्या गावांनाही पुरविली जाते. पुढील ५० वर्षातील प्रवासी संख्या विचारात घेऊन ३०० बससाठी व्यापारी संकुलवजा बसडेपो, यंत्रशाळा आवश्यक आहे. यासाठी नवीन बस खरेदीसह अन्य कामांसाठी निधीची तरतूद करावी. केएमटीसाठी तत्काळ १५ कोटी विशेष अनुदान मिळावे अशी मागणी आहे.

नवी प्रशासकीय इमारत

महापालिकेला प्रशासकीय कामकाजासाठी सध्याची इमारत अपुरी पडत आहे. नवीन प्रशासकीय इमारतीचा आराखडा तयार केला असून याकरिता ५० कोटी रुपयांची मागणी केली आहे. हुतात्मा पार्क, महावीर गार्डन, हनुमान तलाव येथील आंबेडकर गार्डन विकसित करण्यासाठी सहा कोटी रुपयांचा प्रस्ताव आहे. हॉकी स्टेडियम, गांधी मैदान, मेरी वेदर मैदान, सासने मैदान, लालबहाद्दूर शास्त्री मैदान, राजोपाध्येनगर मैदान व दुधाळी मैदान विकसित करण्यासाठी १५ कोटी रुपयांची मागणी आहे.

सेफ सिटी दुसरा टप्पा
- ६५ ठिकाणी इमर्जन्सी कॉल पाईंटव्दारे नागरिकांना कंट्रोल रुमशी थेट संपर्क
- पार्किग मॅनेजमेंट सिस्टीम, पोलिस एम बिट प्रणालीची अंमलबजावणी)

या आहेत मागण्या
- थेट पाइपलाइन योजनेसाठी वाढीव दहा टक्के निधीची जबाबदारी स्वीकारावी
- अमृत योजनेतील महापालिका वाट्याची २५ टक्के रक्कम प्राधिकरणातून मिळावी
- प्राधिकरणाच्या माध्यमातून कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्पालाअनुदान मिळावे
- इचलकरंजी, वडगाव, कागलसह आसपासच्या गावांचा प्राधिकरणात समावेश

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बी. कॉम.ची परीक्षा पूर्वनियोजित वेळेलाच

$
0
0

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या बी. कॉम. (पाचवे सत्र) या अभ्यासक्रमाचा बिझनेस एन्व्हायर्नमेंट या अनिवार्य विषयाची परीक्षा बुधवारी (ता. ३०) दुपारी तीन ते पाच या वेळेत होणार आहे. मात्र एसआरपीडीची प्रायोगिक चाचणी घेण्यासाठी पाठविण्यात आलेल्या पेपरवर दुपारी एक ते तीन अशी वेळ छापली गेली आहे. मात्र, ही परीक्षा नियोजित वेळेनुसार दुपारी तीन ते पाच वाजता होईल. त्याची सूचना सर्व महाविद्यालयांना दिल्या आहेत.
परीक्षार्थींनी वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन परीक्षा नियंत्रक महेश काकडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

पत्रकात म्हटले आहे, बुधवारी बी. कॉम. (पाचवे सत्र) या अभ्यासक्रमाच्या बिझनेस एन्व्हायर्नमेंट या अनिवार्य विषयाची परीक्षा दुपारी तीन ते पाच या वेळेत होणार आहे. एसआरपीडी (सिक्युअर्ड रिमोट पेपर डिस्ट्रीब्युशन) या आधुनिक तंत्राद्वारे महाविद्यालयांना पाठविण्यात येणार आहे. त्याची यापूर्वी प्रायोगिक चाचणी (मॉक टेस्ट) घेण्यासाठी पाठविण्यात आलेल्या पेपरवर दुपारी एक ते तीन अशी डमी वेळ छापण्यात आली होती. त्यामुळे काही विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या प्रवेशपत्रांवर ती वेळ छापल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र ही परीक्षा दुपारी तीन ते पाच या वेळेतच होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालिंगेजवळ भीषण अपघातात दोघे ठार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर - गगनबावडा मार्गावर बालिंगा येथील तीव्र वळणावर टेम्पो आणि दुचाकीच्या धडकेत दुचाकीवरील दोन तरुण ठार झाले. सनी सरदार कांबळे (वय १९, रा. कळंबे तर्फ कळे, ता. करवीर) हा जागीच ठार झाला, तर यासिन गुलाब मुकादम (२०, रा. कोपार्डे, ता. करवीर) याचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. या अपघातात टेम्पोचालक सुरेश सोनू कोरापळे (२८, रा. सैतवडे, ता. गगनबावडा) गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोमवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या घटनेची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली.

सनी हा प्लंबिंगचे काम करतो, तर यासिन मुकादम हा खाजगी नोकरीस आहे. रविवारी रात्री दहाच्या सुमारास दोघेही कोल्हापुरातील काम आटोपून सनीच्या पल्सर (एमएच ०९ डी. डब्ल्यू १४२७) या दुचाकीवरुन गावी निघाले होते. यावेळी गगनबावड्याकडून सुरेश कोळापरे हे लसूण भरलेला टेम्पो (एमएच ०९ सीव्ही ७३६९) घेऊन कोल्हापूरच्या दिशेने येत होते. बालिंगेनजीक महादेव मंदिराजवळ तीव्र वळणाचा अंदाज न आल्याने दुचाकी समोरुन येणार्‍या टेम्पोवर आदळली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीचा चक्काचूर झाला. सनीच्या डोक्यास गंभीर मार लागल्याने तो जागीच ठार झाला. टेम्पोचालक सुरेश कोळापरे गंभीर जखमी झाले. नागरिकांनी तिघांना सीपीआर रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान यासिन याचा मृत्यू झाला. कोळापरे यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अपघाताची माहिती मिळताच करवीर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. उत्तरीय तपासणी केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांकडे सोपवण्यात आले. या अपघाताची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली आहे. या अपघातात घरातील कर्त्या मुलांचा मृत्यू झाल्याने कांबळे आणि मुकादम कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘झेब्रा क्रॉसिंग’चा नियमच क्रॉस

$
0
0

Sachin.Yadav@timesgroup.com

tweet : @sachinyadavMT

शहरात सुरू असलेल्या बारा सिग्नलवर तीन वर्षांपूर्वी मारलेले झेब्रा क्राँसिंगचे पट्टे गायब झाले आहेत. रस्ता ओलांडण्यासाठी पादचाऱ्यांना झेब्रा क्राँसिंगची मोठी मदत होते. मात्र शहरातील एकूण २५ सिग्नलपैकी एकाही सिग्नलवर झेब्रा क्राँसिंगची अंमलबजावणी होत नाही. झेब्रा क्राँसिंगचे पट्टे मारण्यासाठी महापालिकाही काही पावले उचलत नाही. अर्धवट दिसत असलेल्या झेब्रा क्राँसिंगवर उभ्या राहिलेल्या वाहनधारकांवर शहर वाहतूक शाखेकडून कारवाई केली जात नाही.

शहर वाहतूक नियंत्रण शाखा आणि महापालिकेच्या वाहतूक शाखेत योग्य समन्वय नसल्याने शहरातील झेब्रा क्राँसिंगच्या अंमलबजावणीचे तीन तेरा वाजले आहेत. मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वेस्थानक, सासने मैदान आणि शहरात प्रवेश करणारी वाहने दाभोळकर कॉर्नर चौकात थांबतात. दाभोळकर कॉर्नरच्या सिग्नलला झेब्रा क्राँसिंगचे पट्टे अधर्वट आहेत. त्यामुळे वाहनचालक क्राँसिंगच्या पुढे येऊन थांबतात. क्राँसिंगच्या हॉल्ट लाइनजवळ उभे न राहता मनमानी पद्धतीने कुठेही वाहन उभे केले जाते. शहरातील मुख्य चौकात सीसी टिव्ही कॅमेरे आहेत. मात्र झेब्रा क्राँसिंगचे पट्टे दिसत नसल्याने पोलिसांसमोर कारवाई करण्याचा प्रश्न आहे.

सीपीआर चौक, लक्ष्मीपुरी फोर्ड कॉर्नर, उमा टॉकीज, व्हीनस कॉर्नर, कळंबा फिल्टर हाऊस चौक सिग्नल, ताराराणी पुतळा सिग्नल, माळकर तिकटी चौकात झेब्रा क्राँसिंगचे पट्टे नाहीत. काही ठिकाणी आहेत ते अर्धवट आहेत. त्यामुळे झेब्रा क्राँसिंगच्या पट्ट्यावरच वाहने उभी केली जातात. रस्ता ओलांडण्यासाठी क्राँसिंगची मोलाची मदत होते. मात्र पट्टे मारण्यासाठी महापालिकेच्या वाहतूक शाखेलाही सवड मिळत नसल्याचे चित्र आहे.

महापालिकेच्या वाहतूक शाखेने तीन वर्षांपूर्वी झेब्रा क्राँसिंगचे पट्टे मारले आहेत. त्यानंतर काहीच कार्यवाही झालेली नाही. जिल्हा पोलिसप्रमुख कार्यालयात शहर वाहतुकीच्या कोंडीवर उपाय काढण्यासाठी बैठक झाली. या बैठकीत महापालिकेला आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आदेशही देण्यात आले. मात्र त्यांची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. त्यामुळे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणे मुश्किल झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आठ डिसेंबरला महापौर निवड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी आठ डिसेंबर रोजी निवडणूक होत आहे. सत्तारुढ काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांच्या विरोधात भारतीय जनता पक्ष, ताराराणी आघाडीने निवडणूक लढविणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत नवा रंग भरणार आहे. सत्तारुढ काँग्रेस आघाडीतील सत्ता वाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला महापौरपद तर काँग्रेसकडे उपमहापौरपद जाणार आहे.

वर्षभराचा कालावधी पूर्ण झाल्याने अश्विनी रामाणे यांनी २५ नोव्हेंबर रोजी पदाचा राजीनामा दिला. प्रशासनाने, त्याच दिवशी विभागीय आयुक्तांकडे दोन्ही पदांच्या राजीनाम्याची माहिती दिली. नवीन महापौर निवडीचा कार्यक्रम मागविलाही होता. विभागीय आयुक्तांकडून महापौर व उपमहापौरपदासाठी आठ डिसेंबर रोजी निवडणुकीची तारीख निश्चित केली आहे. या दोन्ही पदासाठी तीन डिसेंबरला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे.

सहा महिन्यांचेच पद

महापौरपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगरसेविका हसीना फरास, अनुराधा खेडकर आणि माधवी गवंडी शर्यतीत आहेत. यात फरास यांचे नाव आघाडीवर आहे. महापालिका निवडणुकीवेळीच नेत्यांनी फरास यांना पद देण्याचा शब्द दिल्याचे सांगितले जाते. दुसरीकडे गेल्या सभागृहात तत्कालीन नगरसेवक प्रकाश गवंडी यांना पद मिळाले नव्हते. नव्या सभागृहात त्यांच्या पत्नी माधवी प्रतिनिधीत्व करत आहेत. त्यांच्याकडूनही पदासाठी दावा केला जात आहे. लक्षतीर्थ वसाहत प्रभागाच्या नगरसेविका अनुराधा खेडकर यांनी तयारी सुरु केली आहे. राष्ट्रवादीकडे इच्छुकांची संख्या जास्त असल्याने वर्षभरात दोघांना संधी दिली जाईल अशी नगरसेवकांत चर्चा आहे. तसे झाल्यास सहा महिन्यांचे दोन महापौर होतील. या आठवड्यात राष्ट्रवादीची बैठक होईल. त्यात आमदार हसन मुश्रीफ हे अंतिम निर्णय घेतील.

भारतीय जनता पक्ष, ताराराणी आघाडीमार्फत महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक लढविली जाईल. नेत्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे उमेदवार ठरतील. मात्र आम्ही ही निवडणूक लढविणार हे नक्की आहे.

- सुनील कदम, ताराराणी आघाडीचे नेते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images