Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

पंढरपूर अर्बन बँकेचीप्राप्तिकर विभागाकडून तपासणी

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर

प्राप्तिकर विभागाने मागील दोन दिवसांपासून पंढरपूर अर्बन बँकेची कसून तपासणी केली. नोटाबंदीच्या निर्णयानंतर नागरी बँकांतील पैसे राष्ट्रीयकृत बँक स्वीकारण्यास तयार नसल्याने कोट्यवधींच्या १००० आणि ५००च्या नोटांनी या बँकांच्या तिजोऱ्या भरल्या होत्या. या नागरी बँकात नेमका कोणी आणि किती पैसे जमा केला याची तपासणी करण्यासाठी गुरुवार व शुक्रवारी प्रप्तिकर खात्याच्या पथकाने पंढरपूर अर्बन बँकेत अचानक तपासणी सुरू केली. बँकांच्या बाहेर पोलिस बंदोबस्त लावून तपासणी केली जात होती. कोणत्या खातेदारांनी नोटाबंदीनंतर बँकात पैसे भरले याची कसून तपासणी केली. प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी दहा तारखेपासून खात्यांमध्ये जमा झालेल्या रक्कमांची माहिती घेतली. या आ तपासणीत बँकात जमा झालेल्या प्रत्येक रुपयाचा हिशोब बँकेकडून घेण्यात आला. या तपासणी बाबत प्राप्तिकर विभागाकडून कोणतीच अधिकृत माहिती देण्यात आली नाही. पंढरपूर अर्बन बँकेची स्थापना १९१२मध्ये झाली असून, बँकेच्या राज्यात अनेक ठिकाणी शाखा आहेत. जवळपास २ हजार कोटींची उलाढाल करणाऱ्या या बँकेचे अध्यक्ष सोलापूर विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक आहेत. पंढरपूर अर्बन बँकेचे व्यवस्थापक उमेश विरधे म्हणाले, प्राप्तिकर विभागाकडून होणारी ही रुटीन तपासणी होती. प्राप्तिकर विभागाने मागितलेली सर्व माहिती बँकेकडून देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


साताऱ्यात आठ नगरपालिकासहा नगरपंचायतीसाठी चुरस

$
0
0



सातारा :

सातारा जिल्ह्यातील आठ नगरपालिका व सहा नगरपंचायतीचा जाहीर प्रचार शनिवारी रात्री संपला. आज, रविवारी मतदान होणार आहे. सातारा, कऱ्हाड, फलटण, वाई, महाबळेश्वर, पाचगणी, रहिमतपूर, म्हसवड व खंडाळा, मेढा, कोरेगाव, पाटण, वडूज, दहिवडी येथे जोरदार प्रचार सुरू होता. प्रचारात राज्य पातळीवरील नेते मंडळींनीही लक्ष घातल्याने त्यांच्या जाहीर सभा व प्रचार फेऱ्यांना जागोजागी गर्दी पाहायला मिळाली. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. अनेक आघाड्यांच्या सांगता सभा शुक्रवारी रात्री झाल्या. काही आघाड्यांच्या सभा शनिवारी झाल्या.

सातारा ४०, कराड २९, फलटण २५, वाई २०, रहिमतपूर, महाबळेश्वर, पाचगणी, म्हसवड या पालिकांच्या प्रत्येकी १७ जागांसाठी तर कोरेगाव, खंडाळा, वडूज, दहिवडी, मेढा, पाटण नगरपंचायतींच्या प्रत्येकी १७ जागांसाठी रविवारी मतदान होणार आहे.

शनिवारी सायंकाळी सर्व मतदान केंद्रांवर मतदान यंत्रे, साहित्य, आणि कर्मचारी रवाना झाले. मतमोजणी २८ रोजी कृष्णानगर येथील सरकारी विश्रमागृहात होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जयकुमार गोरेंविरुद्धविनयभंगाचा गुन्हा

$
0
0



सातारा

एका ओळख झालेल्या महिलेला व्हॉट्स अॅपवरून शरीर सुखाची मागणी करण्यात आली, अशी तक्रार आमदार जयकुमार गोरे यांच्याविरुद्ध सातारा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. या तक्रारीवरून गोरेंविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार गोरे यांना पकडण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाली आहेत.

संबंधित पीडित ३६ वर्षीय महिला ग्रामीण भागातील मुलांना व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रशिक्षण देणाऱ्या एका संस्थेत काम करते. या संस्थेची सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये कामे सुरू आहेत. आमदार गोरे यांच्या मतदारसंघातही युवकांना प्रशिक्षण देण्याचे काम त्या करीत होत्या. त्या माध्यमातून आमदार गोरे यांच्याशी त्यांची ओळख झाली. या ओळखीतून गोरे यांनी संबंधित महिलेचा मोबाइल क्रमांक मागून घेतला. २ ऑगस्ट २०१५ ते १ ऑक्टोबर २०१६ या कालावधीत जयकुमार गोरे यांनी व्हॉट्स अॅपवरून अश्लील, घाणेरडे मॅसेज, छायाचित्र व व्हिडिओ क्लिप पाठविल्या. त्यानंतर त्यांनी फोनवरून शरीरसंबंध ठेवण्याची मागणी केली. या प्रकाराबाबत कायदेशीर कारवाई करीन, असे संबंधित महिलेने त्यांना सांगितले. त्यावरून जयकुमार गोरे यांनी व त्यांच्या लोकांनी धमकावले, असे पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार सातारा शहर पोलिस ठाण्यात विनयभंग आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६७ नुसार गुन्हा दाखल झाला आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील तपास करीत आहेत. आमदार गोरेंच्या शोधासाठी एक पथकही रवाना झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

जयकुमार गोरे म्हणाले, राजकीय मैदानात मी कुठेच कमी पडत नाही, म्हटल्यावर विरोधकांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर खूप मोठे षडयंत्र रचले आहे. मात्र, येत्या दोन दिवसांत या प्रकरणातील सत्य मी सर्व पुराव्यानिशी जनतेसमोर आणणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरपरिषदा-नगरपंचायतींसाठी आज मतदान

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सांगली

सांगली जिल्ह्यातील पाच नगरपरिषदा आणि तीन नगरपंचायत निवडणुकीसाठी आज, रविवारी मतदान होत आहे. यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. एकूण १ लाख ८७ हजार १०६ मतदार असून, ते २६४ मतदान केंद्रांवर मतदान करतील. या केंद्रांवर चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी, जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी शनिवारी दिली.

सांगली जिल्ह्यात इस्लामपूर, विटा, आष्टा, तासगाव व पलूस नगरपरिषद तसेच कवठेमहांकाळ, कडेगाव आणि खानापूर नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदान होत आहे. त्यासाठी प्रत्येक नगरपरिषद व नगरपंचायतनिहाय अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये इस्लामपूरसाठी ८४ अधिकारी, ३६९ कर्मचारी, विट्यासाठी १५ अधिकारी, ३७३ कर्मचारी, आष्ट्यासाठी ७ अधिकारी, ४३५ कर्मचारी, तासगावसाठी ७ अधिकारी, ३४५ कर्मचारी, पलूससाठी १५ अधिकारी व ३२५ कर्मचारी. कवठेमहांकाळसाठी १५ अधिकारी, २६१ कर्मचारी, खानापूरसाठी ३ अधिकारी, १०० कर्मचारी व कडेगावसाठी २२ अधिकारी व १३२ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी एकूण ६ पोलिस उपाअधीक्षक १७ पोलिस निरीक्षक, ७१ सहायक पोलिस निरीक्षक, १ हजार १९६ पोलिस कर्मचारी, ८०० होमगार्ड, एसआरपीएफची १ कंपनी याबरोबरच १०६ वायरलेस तसेच ९९ वाहने, असा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रत्येक नगरपालिकेसाठी प्रभारी अधिकारी म्हणून पोलिस निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. २८ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.


इस्लामपूर, विटा, कडेगावात सर्वाधिक चुरस

नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये सर्वाधिक चुरस इस्लामपूर, विटा या ठिकाणी आणि कडेगाव नगरपंचायतीमध्ये आहे. इस्लामपूरची निवडणूक माजी मंत्री, राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांच्यासाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे. त्यांना सर्वपक्षीय आघाडीशी सामना करावा लागत आहे. विटा येथे शिवसेनेचे विद्यमान आमदार अनिल बाबर आणि काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्यात थेट सामना होत आहे. दोन्ही नेत्यांच्या सुनबाई थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आमने-सामने आल्या आहेत. कडेगाव नगरपंचायतीची पहिली निवडणूक आहे. या ठिकाणी पारंपरिक विरोधक माजी मंत्री, ज्येष्ठ नेते पतंगराव कदम आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्यात आहे. तासगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत खासदार संजय पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बँकांना सुटी, एटीएमवर रांगा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पाचशे आणि हजारच्या नोटा चलनातून रद्द झाल्याच्या निर्णयाला जवळपास तीन आठवडे होत असले, तरी त्याचे पडसाद बाजारपेठेत अजूनही उमटत आहेत. सर्वाधिक फटका बसलेली किरकोळ बाजारपेठ शनिवारी आठवड्याची सुटी असल्याने शांत होती. दुकाने बंद असल्याने बाजारपेठेत शुकशुकाट होता. पण, चौथा शनिवार असल्याने बँकांही बंद होत्या. त्यामुळे शहरातील निवडक एटीएम सेंटरवर दिवसभर गर्दी दिसत होती.

चलनातून पाचशे आणि हजारच्या नोटा रद्द करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे पडसाद गेल्या आठवड्याच्या तुलनेत सर्वाधिक जाणवले. बाजारपेठेला साप्ताहिक सुटी असल्याने त्याची तीव्रता कमी होती. बँका बंद असल्याने स्टेट बँक आणि इतर निवडक बँकांच्या एटीएमवर रांगा दिसत होत्या. लोकांच्या हातात पैसे नसल्याने शहरातील किरकोळ व्यापार धीम्यागतीनेच सुरू होता.

बँकांमध्ये नोटा बदलून देण्याची प्रक्रिया बंद झाली असली तरी खात्यावरून चेकने रक्कम काढता येत असल्याने ते सोयीचे होते. पण, बँकांना शनिवार व रविवार सलग दोन दिवस सुटी असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. एटीएममधून काही ठिकाणीच शंभरच्या नोटा मिळतात, इतर ठिकाणी दोन हजारची नोट मिळत असल्याने दिवसभरात काहींचा गोंधळ झाला. नाईलाजाने दोन हजारची नोट घेऊन त्याचे सुटे करण्यात अनेकांना वेळ खर्ची करावा लागला.

ज्या ठिकाणी एटीएममधून शंभरच्या नोटा मिळत होत्या तेथे मशीनमधून दोन हजारची रक्कम मागितल्यास दोन हजारची एकच नोट मिळत होती. तेथे नागरिकांनी १९००, १७०० अशा रक्कम देऊन पैसे काढून घेण्याचा प्रकार आजही सुरू होता. मात्र, मशीनधील शंभरच्या नोटा संपल्यानंतर पुन्हा नागरिकांना दोन हजारच्याच नोटेचा पर्याय राहिला. शंभरच्या नोटा न मिळालेल्यांची पंचाईत झाली. यात सामान्यांपेक्षा रोजचे किरकोळ व्यवहार करणाऱ्या व्यापारी, दुकानदारांची संख्या अधिक होती.

सोमवारीच पुन्हा व्यवहार

आजच्या शनिवारच्या सुटीनंतर उद्या (२७ नोव्हेंबर) रविवार असल्याने पुन्हा व्यवहार बंद असणार आहेत. त्यामुळे उद्याही नागरिकांना या समस्येला सामोरे जावे लागणार आहे. आजच्या एटीएममध्ये कॅश होती. ती संपल्यानंतर उद्या व्यवहारांना पुन्हा मर्यादा येणार आहे. या दोन दिवसांचे खोळंबलेले व्यवहार सोमवारी सकाळी बँका सुरू झाल्यानंतर पुन्हा रुळावर होण्याची चिन्हे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आवक घटली, दर वाढले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नोटाबंदीनंतर ​चलन तुटवड्यामुळे उलाढाल ठप्प असल्याने व आवक मोठी असल्याने या आठवड्यापर्यंत पालेभाज्यांचे दर घसरले होते. आता ते पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली आहे. आता आवक कमी असल्याने दर वाढत असून, आणखी काही दिवसांत गेल्या महिन्यातील दरांचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे. त्याचवेळी तूरडाळीची टंचाई जाणवू लागल्याने दर पुन्हा १४० रुपयांवर गेला आहे. याबरोबर ज्वारी व गव्हाचे दरही वाढले आहेत.

दिवाळीपासून बाजारात शांतता जाणवत होती. आवक चांगली असल्याने टोमॅटोचे दर तर पाच रुपये किलोपर्यंत आले होते. नोटा रद्दच्या निर्णयादरम्यान पालेभाजी, सिमला मिरची, वांगी, गाजर यांची आवक वाढली होती. शेतीमाल विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना पैसे मिळत नसल्याने शेवटी अनेकांनी बाजारात भाज्या आणणे बंद केले. यामुळे होलसेलपासून किरकोळ विक्रीच्या ठिकाणी आवक कमी झाली. त्यामुळे बाजारात टंचाईसदृश वातावरण असल्याने भाज्यांचे दर हळूहळू वाढण्यास सुरुवात झाली आहे. मेथीच्या तीन पेंड्या दहा रुपयांना दिल्या जात होत्या. आता दहा रुपयांना दोन पेंड्या मिळत आहेत. सिमला मिरचीची आवकही कमी झाल्याने दर तीस रुपयांवर पोहोचला आहे. वांगी, दोडका, कारली, भेंडी यांचे दर २० रुपयांच्या आसपास होते. या आठवड्याच्या अखेरीस मात्र त्यांचे दर तीस ते चाळीस रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. गाजराची आवक वाढली असली तरी दर ३० रुपये किलो कायम आहे. पुढील आठवड्यात आणखी दर वाढण्याचा अंदाज आहे.

किराणा बाजारात फार मोठी उलाढाल झाली नव्हती. मात्र वाहतूकधारांना भेडसावणाऱ्या पैशांच्या समस्यांमुळे धान्याची व डाळींची आवक रोडावली आहे. त्यामुळे टंचाईचे वातावरण तयार झाले आहे. ज्वारीची आवक कमी असल्याने किलोला पाच ते सहा रुपयांपर्यंत दर वाढला आहे, तर तूरडाळीची टंचाई जाणवत आहे. या टंचाईमुळे तूरडाळीचे दर पुन्हा १४० रुपयांवर पोहोचले आहेत. पॅकिंगमधील आट्याच्या दरात २० ​रुपयांनी वाढ झाली आहे. मात्र, किरकोळ विक्रीच्या आट्याच्या दरात फरक पडलेला नाही. पुढील आठवड्यात आट्याचे दर वाढण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोलापुरात सरासरी ७३.७९ टक्के मतदान

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर

सोलापूर जिल्ह्यातील नऊ नगरपालिकेतील २०२ जागांसाठी ७३१ उमेदवारांचे भवितव्य रविवारी मशीनमध्ये बंद झाले. चुरशीच्या निवडणुकीत नोटाबंदीमुळे अनेक धक्कादायक निकाल लागण्याची अपेक्षा जाणकारांकडून व्यक्त केले जात आहे. पंतप्रधान मोदींच्या नोटबंदीचे मोठे परिणाम निकालावर होणार असल्याचे परस्पर विरोधी दावे सत्ताधारी भाजप व विरोधकांकडून केले जात आहेत. निकाल भाजप आघाडीच्या अस्तित्वाची आणि राष्ट्रवादी-काँग्रेसच्या वर्चस्वाची परीक्षा ठरणारी असणार आहे. जिल्ह्यातील नऊ नगरपालिकांत सर्वात जास्त मतदान सांगोल्यात ८४. ४१ टक्के, तर सर्वात कमी मतदान पंढरपूरमध्ये ७०.०३ टक्के झाले आहे.

मतदानाला सकाळी साडेसातपासून सुरुवात झाली, मात्र, बऱ्याच ठिकाणी मतदान संपेपर्यंत गर्दी नव्हती. पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा, कुर्डुवाडी, करमाळा या सर्वच ठिकाणी मतदारांअभावी मतदान केंद्रे ओस पडल्याचे चित्र दिसत होते. मात्र, मतदानाची वेळ संपताना अचानक चमत्कार झाल्यासारखे पंढरपूर, सांगोला व इतर काही शहरातील काही प्रभागात अचानक मतदारांनी गर्दी केली. वेळ संपल्यावर देखील काही प्रभागात नियमानुसार मतदान सुरू होते. नोटाबंदीचा फटका अप्रत्यक्षपणे निवडणुकांना बसला असून, उमेदवारांना पैसे वाटायला नवीन नोटाच नसल्याने काही ठिकाणी पैशांचे वाटप जुन्याच नोटांनी केल्याची चर्चा सुरू होती. मात्र, राजकारण्यांनी मतदारांना लावलेल्या सवयीचा फटका यावेळी नेत्यांनाच बसला आहे. मतदारांनी मतदानाकडे मोठ्या प्रमाणात पाठ फिरविल्याचे धक्कादायक चित्र दिसू लागले आहे. सोलापूर जिल्ह्यात सर्वात चुरशीने मतदान सांगोला नगरपालिकेत झाले असून, येथे शेकाप आघाडी आणि शिवसेना आघाडी यांच्यात लढत होत आहे . शेकाप आघाडीकडून छाया पाटील तर सेना आघाडीकडून राणी माने यांच्यात थेट लढत होत आहे.

पंढरपूरमध्ये देखील काँग्रेसकडून संतोष नेहतराव आणि भाजपा आघाडीकडून साधना भोसले यांच्यात थेट लढत होत असताना शिवसेनेचे उमेदवार डॉ बब्रुवान रोंगे आणि राष्ट्रवादीचे युवराज पाटील यांना देखील चांगले मतदान झाल्याने येथील निकाल धक्कादायक लागण्याची चिन्हे आहेत. मंगळवेढा येथे काँग्रेस-राष्ट्रवादीकडून अरुण माळी व भाजप आघाडीकडून शीतल बुरकूल यांच्यात थेट लढत होत आहे. येथे काँग्रेस-राष्ट्रवादी बाजी मारण्याची शक्यता आहे. करमाळ्यात सर्वात रंगतदार लढत होत असून, काँग्रेसचे तरुण उमेदवार वैभव जगताप यांची लढत शहर विकास आघाडीचे ज्येष्ठ नेते कन्हैयालाल देवी यांच्याशी होत आहे. येथूनच शिवसेनेकडून महेश चिवटे आणि भाजपकडून गणेश चिवटे यांच्यामुळे होणाऱ्या बहुरंगी लढतीत काँग्रेसचे पारडे जाड आहे.

..........

नगरपरिषद मतदानाची टक्केवारी

करमाळा ७८.२५

कुर्डुवाडी ७२.३०

मंगळवेढा ७६.५७

अक्कलकोट ७१.६७

बार्शी ७३

पंढरपूर ७०.०३

सांगोला ८४. ४१

मैंदर्गी ७४.८९

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मागेल त्या बँकेतमिळणार ऊसबीलविठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचा निर्णय

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर

नोटाबंदीमुळे सहकारी आणि नागरी बँक व पतसंस्था अडचणीत आल्याने शेतकरी मागतील त्या बँकेत उसबिलाची रक्कम जमा करण्याची घोषणा विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार बबनराव शिंदे यांनी केली आहे.

बहुतांश शेतकऱ्यांची खाती जिल्हा बँकेत आणि नागरी बँकात असून, आता उसबिलाचे मिळणारे पैसे या बँकात जमा केल्यास शेतकऱ्यांना रक्कम मिळण्यास अडचणी येणार असल्याचे लक्षात घेऊन या कारखान्याने ही घोषणा केली आहे. विठ्ठलराव शिंदे राज्यातील सर्वांत जास्त गाळप क्षमता असणारा साखर कारखाना असून, रोज ११ ते १२ हजार टन उसाचे गाळप करतो. या कारखान्याने पहिल्या हप्त्यापोटी २५०० रुपयांची उचल जाहीर केली असून, आता ही रक्कम शेतकरी सांगतील त्या बँकात जमा केली जाणार आहे. असाच निर्णय इतर कारखान्यांनी घेतल्यास नोटबंदी नंतर अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला त्यांच्या घामाचा दाम योग्य वेळी मिळण्यास मदत होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शेखर चरेगावकरांचीमहिला पोलिस कर्मचाऱ्याला धमकी

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, कराड

भाजप नेते राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर व त्यांच्या भावाने मतदान केंद्राबाहेर बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या महिला पोलिस कर्मचाऱ्यास दमदाटी करून सस्पेंड करण्याची धमकी दिली. त्यामुळे काहीकाळ तणाव निर्माण झाला होता.

कराड पालिका वॉर्ड क्रमांक एकमध्ये भाजपचे नेते व राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर व त्याचे भाऊ मुकुंद यांनी बूथवर जाऊन महिला पोलिस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्याने दिवसभर तेथील वातावरण तणावाचे होते.

चरेगावकर वॉर्ड क्रमांक एकमधील एका मतदान केंद्रावर गाडीतून आले असता केद्रापासून शंभर मिटरच्या आत गाडी नेण्यास बंदोबस्तावर असलेल्या महिला पोलिस कर्मचारी दया डोईफोडे यांनी मज्जाव केला. मात्र चरेगावकरांनी आपले वाहन तसेच मतदान केंद्रमध्ये दामटण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे डोई़फोडे यांनी त्यांना अडवून विरोध केला. ‘माझा मंत्रालयात जाण्याचा पास असल्याने तेथेही मला कोण आडवू शकत नाही. येथे मला तू अडवणार कोण, मी तुला सस्पेंड करेन,’ अशी दमबाजीची व धमकीची भाषा चरेगावकर यांनी वापरल्याने काही काळ चांगलाच तणाव निर्माण झाला होता.

निवडणूक अधिकाऱ्यांची भूमिका वादात

वॉर्ड क्रमांक एकमध्ये चरेगावकर यांचे मतदान होते. त्यासाठी ते आपल्या खासगी वाहनातून येथे आले होते. त्यावेळी कराड नगरपालिकेचे मुख्याधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विनायक औंधकर यांनीही कोणतीही ठोस भूमिका न घेता महिला पोलिस कर्मचारी डोई़फोडे यांनाच शांत बसण्याचा उपदेश केला.

कोट

वॉर्ड क्रमांक एकमध्ये माझे मतदान असल्याने मी मतदानास गेलो होतो. मतदानास जात असताना मी माझ्या स्वत:च्या गाडीचा वापर केला होता. त्यावेळी मतदान केंद्रामध्ये एक वाहन उभे होते, त्यामुळे स्वाभाविकपणे माझेही वाहन मतदान केंद्रमध्ये नेण्यास अडचण नसावी, असे वाटल्याने मी माझे वाहन तिथेपर्यंत घेऊन जात होतो. मी कोणतेही अवमानकारक शब्द वापरले नाहीत. उपलटपक्षी मॅडम या आदरार्थी शब्दाने संबोधले. सदर प्रकरणास राजकीय वळण देऊन माझी बदनामी करण्याचा प्रयत्न आहे.

शेखर चरेगावकर, अध्यक्ष, राज्य सहकार परिषद

............

आमच्या महिला पोलीस कर्मचारी दया डोई़फोडे यांनी सदर घटना घडल्यानंतर त्या बाबत तत्काळ पोलिस ठाण्यात फोनवरून माहिती दिली आहे. या घटनेची दखल पोलिसांनी घेतली आहे. या बाबत सविस्तर चौकशी करून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.

प्रमोद जाधव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साताऱ्यात सरासरी ७४.८१ टक्के मतदान

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सातारा

सातारा जिल्ह्यातील आठ नगरपालिका आणि सहा नगरपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी किरकोळ प्रकार वगळता शांततेत मतदान झाले. जिल्ह्यात २८४ जागांसाठी ४७६ मतदान केंद्रावर सरासरी ७४.८१ टक्के मतदान झाले. सर्वात जास्त मतदान खंडाळा नगरपंचायतीसाठी ९१. १९ टक्के तर सर्वात कमी मतदान सातारा पालिकेसाठी ६७.८२ टक्के झाले. आज, सोमवारी सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार असून, ठिकठिकाणी विजयी कोण होणार याची उत्सुकता वाढली आहे.

सातारा जिल्ह्यातील सातारा, कराड, फलटण, वाई, म्हसवड, रहिमतपूर, महाबळेश्वर आणि पाचगणी या आठ नगरपालिका आणि कोरेगाव, मेढा, पाटण, वडूज, खंडाळा आणि दहिवडी या सहा नगरपंचायतींसाठी रविवारी मतदान झाले. सातारा नगरपालिकेतील ४० जागांसाठी १२१ मतदान केंद्रावर ६७.८२ टक्के मतदान झाले त्यात ३ ३२ हजार ८१९ पुरुषांनी तर ३० हजार ५४६ महिलांनी हक्क बजावला.

कराड नगरपालिकेच्या २९ जागांसाठी ८० केंद्रावर ६७.५२ टक्के मतदान झाले. त्यात २२ हजार ८६७ पुरुषांनी तर २० हजार ९१४ महिलांनी हक्क बजावला.

फलटण नगरपालिकेच्या २४ जागांसाठी ५२ मतदान केंद्रावर ६८.२२ टक्के मतदान झाले. त्यात १४ हजार ९२१ पुरुषांनी तर १३८४८ महिलांनी हक्क बजावला. वाई नगरपालिकेच्या २० जागांसाठी ३९ मतदान केंद्रावर ७५. ६९ टक्के मतदान झाले. त्यात ११ हजार १६४ पुरुषांनी तर १०८८९ महिलांनी हक्क बजावला. रहिमतपूर नगरपालिकेच्या १७ जागांसाठी २२ मतदान केंद्रावर ८५.७१ टक्के मतदान झाले. त्यात ६ हजार २३० पुरुषांनी तर ५ हजार ७८५ महिलांनी हक्क बजावला. पाचगणी नगरपालिकेच्या १७ जागांसाठी १४ मतदान केंद्रावर ७८.६२ टक्के मतदान झाले. त्यात ३ हजार ४४३ पुरुषांनी तर ३ हजार ४७१ महिलांनी. हक्क बजावला. महाबळेश्वर नगरपालिकेच्या १७ जागांसाठी १७ मतदान केंद्रावर ८३.७३ टक्के मतदान झाले. त्यात ४ हजार ७३५ पुरुषांनी तर ४६०१ महिलांनी हक्क बजावला. म्हसवड नगरपालिकेच्या १७ जागांसाठी ३० मतदान केंद्रावर ८३.७३ .टक्के मतदान झाले. त्यात ८ हजार ४८२ पुरुषांनी तर ७ हजार ५०८ महिलांनी हक्क बजावला. कोरेगाव नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी १९ मतदान केंद्रावर ८१.७३ टक्के मतदान झाले. त्यात ७ हजार ३१४ पुरुषांनी तर ६ हजार ७७६ महिलांनी हक्क बजावला. मेढा नगरपंचायतीच्या १६ जागांसाठी १६ मतदान केंद्रावर ८८.०७ टक्के मतदान झाले. त्यात १ हजार २९८ पुरुषांनी तर १ हजार ३४५ महिलांनी हक्क बजावला. पाटण नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी १६ मतदानकेंद्रावर ७४. ३६ टक्के मतदान झाले. त्यात ३ हजार ४०५ पुरुषांनी तर ३ हजार ३१९ महिलांनी हक्क बजावला. वडूज नगरपंचायतीच्या १६ जागांसाठी १६ मतदानकेंद्रावर ७६.६६ टक्के मतदान झाले त्यात ५ हजार ३७० पुरुषांनी तर ५ हजार १५४ महिलांनी हक्क बजावला. खंडाळा नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी १७ मतदानकेंद्रावर ९१.१९ टक्के मतदान झाले. त्यात २ हजार १५४ पुरुषांनी तर २ हजार ८० महिलांनी हक्क बजावला. दहिवडी नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी १७ मतदान केंद्रावर ८३.०४ टक्के मतदान झाले. त्यात ५ हजार ४८ पुरुषांनी तर ४ हजार ७६३ महिलांनी हक्क बजावला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आवक खटली, तूरडाळ भडकली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

चलनटंचाई आणि घटलेल्या आवकेमुळे तूरडाळ दहा रुपयांनी महाग होऊन किलोचा भाव १४० रुपयांवर पोहोचला आहे. गव्हाच्या किमतीतही किलोमागे चार रुपयांनी वाढ झाली आहे. धान्यांची आवकही पूर्णक्षमतेने होत नसल्याने धान्य बाजारपेठ अजूनही पूर्वपदावर आलेली नाही.

गुजरात, राजस्थान, हरियाणा, कर्नाटक, विदर्भ, मराठवाडा येथून रोज येथील बाजारात सरासरी ७० ट्रक म्हणजे ७०० टन धान्य येत असते. मात्र, चलनातून पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा रद्द झाल्यानंतर दोन आठवड्यांपासून आवक घटली. रोज ४० ट्रक आवकेला ब्रेक लागला. खात्यावर पैसे आहेत, पण हातात नाही, असे चित्र असल्याने धान्य खरेदीकडे ग्राहकांनीही पाठ फिरवली आहे. नव्या दोन हजार रुपयांच्या नोट घेऊन खरेदीसाठी गेल्यानंतर सुट्या पैशांची समस्या येत आहे.

अनेक व्यापाऱ्यांनी स्वॅप मशिन बसवले आहे. स्वॅप वापराबद्दल व्यापक प्रमाणात जागृती नाही. किरकोळ खरेदीत अपेक्षित वाढ झालेली नाही. विदर्भ, मराठवाडा, कर्नाटक येथून गहू, ज्वारीची आवक काही प्रमाणात सुरू झाली आहे. उर्वरित ठिकाणाहून बंद आहे. अजूनही सरासरी ४०० टन धान्यांचा पुरवठा कमीच होत आहे. नवे चलन पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत. मागणीही पूर्वीइतकी नाही. यामुळे अद्याप बाजारात धान्यांची तीव्र टंचाई भासलेली नाही.

विदर्भ, मराठवाडा या भागात ज्वारी काढणी अंतिम टप्प्यात असताना जोरदार पाऊस पडला. ज्वारीचे उत्पादन घटले. त्याचाही परिणाम आवकेवर झाला आहे. दर्जानुसार २१ ते २५ रुपयांपर्यंत मिळणाऱ्या ज्वारीचा भाव ३२ रुपयांपर्यंत गेला आहे. पंजाब, हरियाणा, गुजरात येथून गव्हाची आवक सुरू नाही. सरकारी कोट्यातील गहू खु्ल्या बाजारात आलेला नाही. या सर्वाचा परिणाम म्हणून किलोमागे गहू ३ रुपयांनी वाढून २८ रुपये झाला आहे.

बाजारादिवशी मंदी

येथील लक्ष्मीपुरी, रविवार पेठ येथील धान्य बाजारात रविवारी बाजारादिवशी तेजी असते. खरेदीसाठी गर्दी असल्याने उलाढालही वाढते, पण चलन टंचाइमुळे बाजारादिवशीही मंदी जाणवली. मोठे व्यापारी ग्राहकांच्या प्रतीक्षेत दिसत होते.

सामान्यांची कोंडी

रोजच्या जेवणासाठी अत्यावश्यक असलेल्या गहू, ज्वारी, तूरडाळीचे दर वाढल्याने गरीब, सर्वसामान्यांचे आर्थिक बजेड कोलमडत आहे. दर वाढल्याने एक किंवा दोन किलो धान्याची खरेदी केल्यानंतर नवी दोन हजारांची नोट संबंधित व्यापारी स्वीकारत नाहीत. परत देण्यासाठी सुटे पैसे नाहीत, असे कारण ते सांगत आहेत. परिणामी किरकोळ प्रमाणात धान्य खरेदी करणाऱ्या ग्राहकांची कोंडी होत आहे.

परराज्य आणि परजिल्ह्यातून येणाऱ्या धान्यांच्या आवकेत वाढ झालेली नाही. अजूनही रोज ४० ट्रक धान्याची आवक कमी होत आहे. पुरेशा प्रमाणात चलन नसल्याने ग्राहकांकडे पैसे नाहीत. धान्यांची टंचाई तीव्रपणे जाणवलेली नाही. मात्र, मंदीमुळे धान्य बाजारातील उलाढालही थंडावली आहे.

वैभव सावर्डेकर, धान्य व्यापारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हवा प्रदूषणाचा असह्य मारा

$
0
0

Anuradha.kadam
@timesgroup.com

Tweet : @anuradhakadamMT

कोल्हापूर : वाहनांची वाढती संख्या, त्यातून येणारे धुराचे लोट, धुलिकणांनी भरलेला आसमंत, साठलेल्या कचऱ्यामुळे हवेत पसरणारा दुर्गंध, हॉटेल्सच्या किचनमधून हवेत पसरणारा धूर अशा अनेक घटकांकडून हवेवर होणाऱ्या अतिक्रमणामुळे कोल्हापुरात हवा प्रदूषणाचा मारा असह्य होत आहे. घराबाहेर पडायचे असेल तर नाक बांधूनच बाहेर पडण्याची वेळ आली आहे. कायम वाहनाच्या विळख्यात असलेल्या दाभोळकर कॉर्नर, शिवाजी चौक, बिंदू चौक, व्हिनस चौक, स्टेशन रोड हा भाग प्रदूषणाबाबत डेंजर झोनमध्ये आहे. शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाने कोल्हापुरातील हवा प्रदूषणाबाबत केलेल्या सर्वेक्षणातून हे चित्र समोर आले आहे. याबाबत काय उपाय करता येतील, याचेही संशोधन सुरू आहे.

कोल्हापुरात गेल्या दहा वर्षात वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. हवा प्रदूषणासाठी रस्त्यावरची धूळ, वाहनांचा धूर, उद्योग क्षेत्रातील रासायनिक धूर, हॉटेल्सच्या चिमण्यांमधून बाहेर पडणारा अन्न शिजवण्याच्या प्रक्रियेनंतरचा धूर, वाढत्या बांधकामांमुळे सिमेंटचे हवेतील थर, कचरा जाळल्यामुळे, स्मशानभूमीतून बाहेर पडणारा धूर या गोष्टी कारणीभूत ठरत आहेत. वाहतूक कोंडीमुळे पसरणारे धुराचे लोट आणि ग्रीन हाउस गॅसेसचा सर्वाधिक परिणाम हवा प्रदूषणावर होत असल्याचाही निष्कर्ष अभ्यासातून काढण्यात आला आहे. निसर्गाच्या स्रोतांच्या गैरवापराबाबतही वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननेही नुकत्याच एका अहवालात ताशेरे ओढले आहेत.

शहरातील महत्वाच्या चौकांपैकी दाभोळकर कॉर्नरसह स्टेशन रोड, अंबाबाई मंदिर परिसर आणि बिंदू चौक येथे हवा प्रदूषण धोक्याच्या पातळीवर आहे. सतत वर्दळीचा, वाहतूक कोंडी होणाऱ्या शाहू बँक ते संभाजीनगर पेट्रोलपंप चौक मार्गावर प्रदूषणाची पातळी सकाळी दहा ते दुपारी दोन आणि सायंकाळी सहा ते रात्री आठ यावेळेत वाढत असल्याचे दिसून आले आहे. कोल्हापुरात गेल्या सात वर्षांपासून प्रदूषित वारे वाहात असल्याच्या नोंदी आहेत.

हवा प्रदू्षित का होते?

सपाटीपासून कोल्हापूर हे ५८६ फूट उंचावर आहे. या भौगोलिक रचनेनुसार जेव्हा वारे वाहतात तेव्हा हवेमुळे एक विशिष्ट प्रकारचा खोलगट भाग तयार होतो. तसेच आर्द्रता, पाऊस, उष्णतेमुळे दमटपणा याचाही परिणाम होतो. याचे थर साचून हवा प्रदूषित करणारे घटक साठून राहतात आणि हवा अशुद्ध होते. वाढते प्रदूषण अनेकांच्या शरिरावर घातक परिणाम करीत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे चांगल्या हवामानासाठी प्रसिद्ध असलेले कोल्हापूर प्रदूषित झाले आहे.

हवा प्रदूषणास कारणीभूत ठरणारे घटक

- रस्त्यावरील धूलीकण
- वाहतूक कोंडीवेळी उठणारे धुराचे लोट
- हॉटेलमधील किचनमधून बाहेर पडणारा धूर
- कचरा जाळल्यानंतरचा धूर
- वैद्यकीय कचऱ्याच्या ज्वलनामुळे मिसळणारा धूर
- स्मशानभूमीतील ज्वलनातून बाहेर पडणारा धूर
- साठलेल्या कचऱ्याच्या संपर्कातील हवा


कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठ परिसर, दाभोळकर कॉर्नर आणि अंबाबाई मंदिर परिसरात हवा प्रदूषण मोजण्याची यंत्रणा आहे. दर सोमवारी हवेतील प्रदूषण मोजले जाते. सन २०१२ पासून हवा प्रदूषण वाढत असल्याचे दिसते. दाभोळकर कॉर्नरला धोकादायक धूलीकण हवेत मिसळत असल्याने सर्वधिक गंभीर स्थिती आहे.

- डॉ. पी. डी. राऊत, पर्यावरणशास्त्र विभागप्रमुख

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाचशेची नोट आज येणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सलग दोन दिवस बँक बंद असल्याने दोन हजार रुपयांच्याही नोटा एटीएममधून काढण्यात आल्याने आठवडाभरापासून अगदी मोजकीच सुरू असलेली बहुतांश एटीएमही रविवारी बंद पडली. स्टेट बँक ऑफ इंडियाची एटीएम सुरू असल्याचे चित्र होते. मात्र पैशांची प्रचंड टंचाई जाणवली. त्यामुळे अगदी तुरळक व्यवहार सुरु होते. सोमवारी बँक सुरू झाल्यानंतर दुपारनंतर एटीएम कार्यरत होण्याची चिन्हे असल्याने बँकांत गर्दी उसळण्याची शक्यता आहे. बऱ्याच दिवसांपासून प्रतिक्षा असलेली पाचशेची नोट सोमवारी बाजारात येण्याची शक्यता आहे. त्यानंतर सुट्या पैशांचा तुटवडा कमी होईल.

गेल्या आठवड्यात बहुतांश एटीएम नोटांअभावी बंद पडली होती. जी सुरु होती त्यातून दोन हजारचीच नोट मिळत होती. त्यामुळे एटीएमवरही फार मोठा गरजवंत जात होता. यामुळे मात्र बाजारातील उलाढाल कमी होत चालली होती. नोटांच्या चणचणीमुळे यापूर्वीच्या आठवड्यात ४० टक्क्यांवर आलेला व्यवहार गेल्या आठवड्यात वीस ते दहा टक्क्यांवर पोहचला होता. उलाढाल थंडावल्याचे चित्र होते. दैनंदिन गरजेच्या वस्तूंचीच खरेदी होत होती. या आठवड्याच्या शेवटी शंभरच्या सुट्या पैशांची चणचण भासू लागली. पाचशेची नोट सोमवारनंतर बाजारात येण्याची शक्यता असल्याने परिस्थिती सुधारेल अशी आशा होती. दरम्यान, शनिवार व रविवार दोन दिवस बँक बंद राहिल्याने एटीएमवर ताण पडला. शनिवारी एसबीआयबरोबर काही बँकांची एटीएम सुरु होती, पण रविवारी दुपारनंतर बहुतांश एटीएममध्ये पैसे संपले. एसबीआयची मोजकी एटीएम सुरु राहिली.

जी एटीएम सुरू होती, त्यावरुन दोन हजार रुपयांची नोट मिळत होती. त्यामुळे तिथेही गर्दी कमी होती. काही ठिकाणी शंभर रुपयांच्या नोटा काही काळच उपलब्ध होत्या. मात्र नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अंबाबाई दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन आठवड्यानंतर बाजारात उलाढाल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नोटाबंदीच्या निर्णयानंतर बाजारात जाणवणाऱ्या सुट्या पैशाच्या टंचाईमुळे दोन आठवडे रविवारच्या बाजारात शांतता होती. या रविवारी मात्र परिस्थिती काहीसी सुधारली. भाज्यांबरोबर आठवड्याला लागणाऱ्या विविध गरजेच्या वस्तू खरेदीसाठी गर्दी झाली होती. ग्राहकांकडे शंभर रुपयांच्या नोटांची उपलब्धता असल्याचे दिसून आले.

आठ नोव्हेंबरच्या निर्णयानंतर सर्वत्रच सुट्या पैशांची चणचण जाणवू लागली. जुन्या नोटा चालत नसल्याने अनेक रोजंदारीवर राबणाऱ्या नागरिकांकडे सुट्या पैशांची वानवा ​होती. अनेकांना सुटे पैसे घेण्यासाठी खटाटोप करावा लागला. दोन आठवड्यांमध्ये रविवारच्या बाजारात उलाढालीवर ४० टक्के परिणाम झाला होता. सुट्या पैशांचीच वानवा असल्याने बाजारात उलाढाल कमी होत होती. या रविवारी मात्र बाजारातील ​चित्र थोडेसे बदलले होते.

आठवड्याच्या पगारानंतर दैनंदिन खरेदीसाठी बाजारात येणाऱ्यांची संख्या जास्त असते. या सर्वांकडे आता शंभर रुपयांच्या नोटांची उपलब्धता दिसत होती. त्यामुळे गेल्या दोन आठवड्यात बाहेर पडलेल्या शंभर रुपयांच्या नोटा अशाप्रकारे हळूहळू चलनात येत असल्याचे दिसत होते. पण अनेकांचा बाजार तीनशे ते सहाशेच्या दरम्यान होत असल्याने पाचशे रुपयांच्या नोटा बाजारात आल्यानंतर शंभर रुपयांच्या नोटांवरील ताण कमी होणार आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांकडूनही आता पाचशे रुपयांची नोट बाजारात आली पाहिजे, असे मत व्यक्त केले जात होते. किरकोळ खरेदीचा बाजार असल्याने या बाजारात आता सुट्या पैशांची चणचण जाणवत नसल्याचे दिसते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगराध्यक्षपदाचा आज फैसला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

प्रचारात राज्यस्तरावरील नेत्यांच्या धडाडलेल्या तोफा, जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांची पणाला लागलेली प्रतिष्ठा या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नऊ नगरपालिकांच्या नगराध्यक्ष व नगरसेवकपदासाठी रविवारी प्रचंड चुरशीने ७९.३९ टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदान पन्हाळ्यात ९२.८४ टक्के इतके झाले. तर इचलकरंजीतील प्रचंड इर्षेमुळे सहा मतदान केंद्रांवर वादावादी झाली. त्यामुळे सौम्य लाठीमार झाल्याने वातावरण तणावाचे बनले होते. कुरुंदवाडमध्येही वादावादी झाली. अन्य ठिकाणी मात्र शांततेत मतदान झाले. आज, सोमवारी मतमोजणी होत असून पहिला निकाल पन्हाळ्याचा जाहीर होणार आहे. जिल्ह्यातील नगराध्यक्षपदाच्या ३९ व नगरसेवकपदाच्या ६८९ उमेदवारांचा आज फैसला होणार आहे.

४७२ मतदान केंद्रावर सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान झाले. ३ लाख ६२ हजार ३७६ पैकी २ लाख ८७ हजार ७०९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. भाजपचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सुरेश हाळवणकर, राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ, काँग्रेसचे प्रकाश आवाडे, माजी आमदार विनय कोरे, माजी आमदार श्रीपतराव शिंदे, डॉ. प्रकाश शहापूरकर, आमदार सत्यजीत पाटील, राजेंद्र पाटील यड्रावकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

रविवारी सकाळी साडेसातपासून विविध पालिकांच्या ठिकाणी मतदानास उत्साहात प्रारंभ झाला. नगराध्यक्षपदासाठी प्रथमच थेट मतदान होत असल्याने अनेकांची मतदान करण्यासाठी उत्सुकता होती. राजकीय पातळीवर भाजपने विविध आघाड्यांच्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी नगराध्यक्षपदाबरोबर नगरसेवकपदांची निवडणूक लढवली असल्याने मोठी चुरस निर्माण झाली होती. कागल, मुरगूड, इचलकरंजी, जयसिंगपूर, गडहिंग्लज या पालिकांबरोबर सर्वच ठिकाणी ७५ टक्क्यांवर मतदान झाले. या मतदानातूनच सर्वत्र प्रचंड चुरस पहायला मिळाली. सर्व ठिकाणी कडेकोट बंदोबस्त होता.

सर्व पालिकांमध्ये असलेल्या मतदान केंद्रांपैकी निम्म्याहून अधिक मतदान केंद्र इचलकरंजीत होती. भाजपबरोबर काँग्रेसची लढत होत असल्याने संवेदनशील असलेल्या लढतींमध्ये मोठी चुरस पहायला मिळत होती. त्यातूनच गावभागातील अनुबाई कन्या विद्या मंदिर, कन्नड शाळा, सरस्वती हायस्कूल, गोविंदराव हायस्कूल, नॅशनल हायस्कूल, नाईट कॉलेज आदी ठिकाणी वादाचे प्रसंग झाले. यामुळे निर्माण झालेला तणाव निवळण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. पन्हाळ्यात आठ प्रभागांत सतरा उमेदवारांसाठी २६९७ मतदार आहेत. मतमोजणी आठ टेबलांवर होणार असून सोमवारी अवघ्या दहा मिनिटांत निकाल लागेल. यामुळे जिल्ह्यात पहिला निकाल पन्हाळ्याचा लागेल. कागल, मुरगूड नगरपालिका संवदेनशील असल्याने प्रचंड पोलिस बंदोबस्त होता. या ठिकाणी शांततेत मतदान झाले. सोमवारी दुपारी चारपर्यंत सर्वच पालिकांमधील नगराध्यक्षांसह नगरसेवकांचे निकाल जाहीर होतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ज्येष्ठ क्रीडा प्रशिक्षक पांडुरंग मस्कर यांचे निधन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठाच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रात अनेक अॅथलेटिक्स खेळाडू घडविणारे पांडुरंग ईश्वर मस्कर (वय ७६) यांचे मुंबईत अल्पशा आजाराने निधन झाले. गेले काही दिवस आजारी असलेल्या मस्करसर यांच्यावर कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर मुंबईत तपसाणी आणि उपचारांसाठी गेलेल्या मस्कर यांंना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

मुळचे सांगली जिल्ह्यातील शिराळ्याचे असलेल्या मस्कर सरांनी १९७३ मध्ये राष्ट्रीय पातळीवर १०० मीटर धावण्यात रौप्यपदक पटकाविले होते. त्यानंतर क्रीडा प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम पूर्ण करून ते शिवाजी विद्यापीठात क्रीडा प्रशिक्षक म्हणून रुजू झाले. त्यानंतर शिवाजी विद्यापीठाला राष्ट्रीय पातळीवर पदके मिळण्यास सुरुवात झाली. नंदा जाधव, वंदना शानबाग, जयश्री बोरगी, भाग्यश्री बिले, मंगल फोडे, उमा मोरे, बाळासाहेब निकम यांसारख्या अॅथलेटिक्समध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्यांना घडविण्यात मस्कर सरांचा मोठा वाटा होता. सरकारने त्यांना दादोजी कोंडदेव पुरस्काराने गौरविले होते.

राज्यातील नव्या विद्यापीठांमध्ये अॅथलेटिक्स मैदान तयार करण्यात आले, तेथे मस्कर यांच्या मार्गदर्शनाखालीच काम झाले. परभणी, नांदेड, दापोली येथील मैदानांचे श्रेय मस्कर सरांना दिले जाते. शिवाजी विद्यापीठाच्या सिंथेटिक ट्रॅकसाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. वैभव हाउसिंग सोसाटीत राहणाऱ्या मस्कर यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (३० नोव्हेंबर) सकाळी साडेनऊ वाजता पंचगंगा स्माशनभूमीवर आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षकांची बाजू मांडण्यात यश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘कोणत्या लेखकाचे किंवा कोणत्या पुस्तकाचे वाचन केले, यावरून व्यक्तीची वैचारिक बैठक तयार होते. संघाच्या नियतकालिकेच्या माध्यमातून कोणताही अभिनिवेश न ठेवता सरकारच्या धोरणांवर आसूड ओढता येतो. शिक्षकांना सेल्फीमध्ये अडकून ठेवण्याचा सरकारने घाट घातला तेव्हा, नियतकालिकेत वस्तुनिष्ठ लिखाण करून शिक्षकांची बाजू मांडण्यात यश आले,’ असे मत प्राथमिक शिक्षक महासंघाचे अध्यक्ष प्रभाकर आरडे यांनी व्यक्त केले. अध्यक्षस्थानी व्ही. जी. पाटील होते.

कोल्हापूर जिल्हा माध्यमिक कर्मचारी व शिक्षक संघाच्यावतीने जीवनगौरव व गुणवंत कार्यकर्ता पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. जुना वाशीनाका येथील देशमुख सांस्कृतिक भवन येथे झालेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉ. अशोक चौसाळकर, टी. डी. लाड यांना जीवनगौरव, तर एम. जे. पाटील व व्ही. एम. पाटील यांना गुणवंत कार्यकर्ता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

आरडे म्हणाले, ‘स्वातंत्र्यानंतर शिक्षणक्षेत्रात झालेल्या बदलांमुळे अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत. त्यांचा सामना करण्यासाठी सक्षम बनण्याची गरज आहे. आज नफा मिळवण्याच्या उद्देशाने स्वत:च्या नातेवाइकांना फायदा होण्याच्या दृष्टीने एखादी संस्था चालवली जात आहे. मात्र, गळदगे यांनी आपल्या माणसांविरोधात निर्भीडपणे काही गोष्टी नियतकालिकामध्ये मांडल्याने त्यांचे स्वागत करायला हवे.’

सत्काराला उत्तर देताना डॉ. चौसाळकर म्हणाले, ‘गेल्या ३० वर्षांपासून विद्यापीठात कार्यरत असताना शैक्षणिक क्षेत्रात अनेक बदल झाले. त्यामुळे सर्वच संघटनांची जबाबदारी वाढली आहे. संघटनांना अनेक गोष्टीमध्ये संघर्ष करावा लागत आहे, या संघर्षावर मात करण्यासाठी मते मांडण्याचा आवश्यकता आहे. अशावेळी संघटनांचे मुखपत्र उपयोगी पडते.’

एम. जे. पाटील व व्ही. एम. पाटील यांनी पुरस्कारांची रक्कम संघटनेला परत केली. यावेळी जी. ए. पाटील, ए. एस. शिरगुप्पे, आर. एस. बरगे आदींसह जिल्हा माध्यममिक कर्मचारी व शिक्षक संघाचे पदाधिकारी व शिक्षक उपस्थित होते. एस. जी. तोडकर यांनी प्रास्ताविक केले. बी. आर. कदम यांनी सूत्रसंचालन केले. सर्जेराव पाटील यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोटाबंदीचा आज ‘आक्रोश’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

केंद्र सरकारने अचानकपणे चलनातून ५०० आणि १००० रूपयांच्या नोटा रद्द केल्याने सामान्यांना होणाऱ्या त्रासाकडे लक्ष वेधण्यासाठी डाव्या लोकशाही आघाडीतर्फे आज, सोमवारी आक्रोश निदर्शने करण्यात येणार आहेत. डाव्या लोकशाही आघाडीतर्फे सायंकाळी साडेचार वाजता शिवाजी पुतळा, शिवाजी चौक येथे निदर्शने होतील.

निदर्शनात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी व्हावेत, असे आवाहन चंद्रकांत यादव, नामदेव गावडे, सतिशचंद्र कांबळे, शंकर काटाळे, लक्ष्मण वायदंडे, दिलीप पोवार, अनिल चव्हाण आदींनी प्रसिध्दी पत्रकातून केले आहे. दरम्यान, सोशल मिडियांमधून देशव्यापी बंद पुकारला आहे. कोल्हापूर बंद असल्याचे मॅसेज ‌मोठ्या प्रमाणात फिरत होते.

बाजारपेठेतील व्यापा‌ऱ्यांत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. आक्रोश निदर्शनात विविध संस्था, संघटनांनी सहभागी होण्यासंबंधी प्रसिध्दी पत्रकातून माहिती दिली.

मात्र कोल्हापूर बंदचे आवाहन कोणत्याही संघटनेने अधिकृतपणे केलेल नाही. त्यामुळे नेहमीप्रमाणे बाजारपेठ सुरळीतपणे सुरू राहणार आहे. सोशल मीडियावरून फिरत असलेल्या मेसेजांमुळे नागरिकांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे. अनेकांनी या आक्रोश आंदोलनाला आपला विरोध असल्याचे प्रतिमेसेज पाठवले आहेत. त्यामुळे नेमकी उद्या काय स्थिती असणार याविषयी उत्सुकता आहे.

‘राष्ट्रवादी’चा पा‌ठिंबा

कोल्हापूर : काँग्रेससह डाव्या लोकशाही आघाडीतर्फे सोमवारी करण्यात येणाऱ्या देशव्यापी आक्रोश निदर्शनास येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पा‌ठिंबा दिला. नोटबंदीमुळे शेतकरी कष्टकरी व सर्वसामान्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. मध्यवर्ती सहकारी बँकांना कमी अर्थपुरवठा करून ग्रामीण जनतेची आर्थिक कोंडी केली आहे. त्यामुळे नोट बंदी विरोधात आक्रोश निदर्शनास कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे पाठिंबा दिला आहे. निदर्शनात ‘राष्ट्रवादी’चे कार्यकर्ते, पदाधिकारी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकात‌ून केले आहे.

शेकापही करणार आंदोलन

दरम्यान, नोटाबंदीमुळे शेतकऱ्यांची उलाढाल थंडावली आहे. याविरोधात शेकापतर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबत झालेल्या बैठकीस बाबूराव कदम, एकनाथ पाटील, संतराम पाटील, मारूती सिताफळे, समरसिंह पवार, अमित कांबळे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चाकूहल्ल्यातील तीन गुंडांची धिंड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लक्ष्मीपुरीतील पद्मा चौकात रिक्षाची तोडफोड करून पार्वती टॉकीजजवळ एकावर चाकू हल्ला करणाऱ्या तीन गुंडांची पोलिसांनी रविवारी (ता. २७) यादवनगरातून धिंड काढली. फिरोज यासिन मुल्ला (वय २७), मुजबिन खुदबुद्दीन कुरणे (२८, दोघेही रा. यादवनगर) आणि स्वप्निल सातपुते (रा. यादवनगर) अशी त्यांची नावे आहेत. यातील मुल्ला आणि कुरणे या दोघांना कोर्टात हजर केले असता, त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

शनिवारी (ता. २६) संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास लक्ष्मीपुरीतील पद्मा चौकात रिक्षाचे भाडे देण्याच्या वादातून निवृत्ती शंकर कांबळे (वय ५६, रा. पाचगाव) या रिक्षाचालकाला मद्यधुंद तरुणांनी मारहाण केली होती. त्यानंतर तासाभरातच या गुंडांनी प्रमोद हंबीरराव देवकर (वय ४०, रा. सम्राटनगर) यांच्यावर चाकू हल्ला केला होता. गुंडांनी दहशत माजवून दोन ठिकाणी मारहाण केल्याने पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली. राजारामपुरी पोलिसांनी मुल्ला आणि कुरणे या दोघांना शनिवारी रात्रीच अटक केली. पसार झालेला गुंड स्वप्निल सातपुते याला रविवारी सकाळी ताब्यात घेतले.

मुल्ला आणि कुरणे या दोघांना कोर्टात हजर केले असता, त्यांना कोर्टाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. तिघांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी रविवारी संध्याकाळी या तिघांचीही यादवनगर परिसरातून धिंड काढली. गुंड स्वप्निल सातपुते याला सोमवारी कोर्टात हजर केले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोलापुरात भाजप–सेनेचा झेंडा

$
0
0

सोलापूर
सोलापुरातील ९ नगरपालिकांच्या निवडणुकीत भाजप – शिवसेनेने बाजी मारली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने दोन नगरपालिकांवर वर्चस्व सिद्ध केले असले, तरी काँग्रेसचे पुरते पानिपत झाले आहे. माजी मंत्री आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांना अक्कलकोट व दुधनी या दोन्ही नगरपालिकांत भाजपने जबर धक्का दिला आहे. मैंदर्गीमध्ये केसूर – पाटील गटाने बाजी मारली आहे. करमाळा आणि मंगळवेढ्यात राष्ट्रवादीने सत्ता कायम राखली. पंढरपुरात भाजप पुरस्कृत आमदार प्रशांत परिचारक यांनी काँग्रेसचा दारुण पराभव करीत परिचारक गटाचे वर्चस्व सिद्ध केले आहे. बार्शीत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या सत्तेला माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी सुरुंग लावला. तर, कुर्डूवाडीत शिवसेनेने सत्ता कायम राखली आहे. सांगोल्यात आमदार गणपतराव देशमुख व माजी आमदार दीपक साळुंखे यांच्या महाआघाडीने बहुमत मिळवले असले, तरी नगराध्यक्षपद महायुतीकडे गेले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images