Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

उपनिबंधकांना काळे फासण्याचा ‘स्वाभिमानी’चा इशारा

$
0
0
कृषी उत्पन्न बाजार समितीतील बेकायदा गाळे काढण्याचे आश्वासन देऊनही बाजार समितीने ती काढली नाहीत. त्यामुळे आठ दिवसांत ही अतिक्रमणे काढली नाहीत, तर बाजार समितीचे चेअरमन आणि जिल्हा उपनिबंधकांना काळे फासण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वताने शंकर शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

युवतीला मारहाण करून तरुणाची आत्महत्या

$
0
0
महाविद्यालयीन युवतीवर प्रेम करणाऱ्या एका तरुणाने आंतरजातीय विवाह करण्यास प्रेयसी तयार होत नसल्याच्या रागातून तिला बेशुद्ध पडेपर्यंत मारहाण केली.

‘सातारा पॅटर्न’ आदर्श ठरेल

$
0
0
आजच्या स्पर्धेच्या युगात खासगी शाळेचे आव्हान पेलत आजही जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक स्कॉलरशिपसाठी अव्वल विद्यार्थी घडवतोय. हा ‘सातारा पॅटर्न’ राज्यात आदर्श ठरेल, असे प्रतिपादन पालकमंत्री शशिकांत शिंदे यांनी आज केले.

खंडपीठासाठी वकिलांचा घंटानाद

$
0
0
कोल्हापूर येथे मुंबई हायकोर्टाचे खंडपीठ सुरू व्हावे, या मागणीसाठी आज सुमारे ५०० वकिलांनी शहरातील प्रमुख रस्त्यावरून घंटानाद फेरी काढली. घंटा, झांजा जोरजोरात वाजवत, घोषणा देत राजवाडा चौकातून या फेरीला सुरुवात झाली.

तासगावातील कुमठे पाण्यासाठी रस्त्यावर

$
0
0
तासगाव तालुक्यातील कुमठे भागाला आरपळ कालव्याचे पाणी मिळावे, या मागणीसाठी गुरुवारी सांगली-तासगांव रस्त्यावर कुमठे पाट्यानजीक ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आल्याने काही काळ या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती.

पानपट्टीचालकांना सरकारी अनुदान द्या

$
0
0
सुगंधी सुपारी, मावा, जर्दावरील बंदी कायदा मागे घ्यावा अथवा पानपट्टी व्यावसायिक कुटुंबाना अंत्योदय योजनेखाली रेशन, श्रावणबाळ योजनेअंतर्गत मासिक अनुदान व मुलांसाठी शिष्यवृत्ती देण्यात यावी अशी मागणी पानपट्टी असोसिएशनच्यावतीने निवेदनाद्वारे प्रांताधिकारी विवेक आगवणे यांच्याकडे करण्यात आली.

शिक्षण क्षेत्रात पुन्हा प्रस्थापितांचे राज्य

$
0
0
परंपरेच्या विरोधात बंड पुकारून महात्मा फुले यांनी सर्वसामन्यांसाठी शिक्षणाची दारे खुली केली. प्रस्थापितांच्या विरोधात लढा दिला. सध्या इंग्रजी शाळांना अवास्तव महत्त्व दिल्याने मराठी शाळा अडगडीत गेल्या आहेत.

सत्यजित पाटील यांच्यामुळे पक्षवाढीला खीळ

$
0
0
माजी आमदार सत्यजित पाटील यांनी तालुक्यात गटातटाच्या राजकारणाला खतपाणी घातले. त्यांनी पक्षाच्या ध्येयधोरणांना हरताळ फासला,अशी टीका शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांनी केला.

इचलकरंजी पालिकेत सीसीटीव्ही कॅमेरे

$
0
0
नगरपालिकेच्यावतीने जनतेला स्वच्छ व पुरेसा पाणीपुरवठा आणि चांगली आरोग्य सेवा सातत्याने देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. तसेच पालिकेच्या पारदर्शी व जलद कारभारासाठी सर्व खात्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येतील.

कागलमध्ये ऑनलाइन पेन्शन

$
0
0
कागल पंचायत समितीमार्फत तालुक्यातील सेवानिवृत्तांचे वेतन आता ऑनलाइन मिळणार आहे. सर्व बँकांशी ही प्रणाली जोडून ऑनलाइन पेमेंट देणारी कागल पंचायत समिती ही जिल्ह्यातील एकमेव पंचायत समिती ठरली आहे.

वेध बाप्पांच्या आगमनाचे

$
0
0
पिठोरी अमावास्येसोबत श्रावणाची सांगता झाल्यानंतर आता खऱ्या अर्थाने घराघरांत आणि सार्वजनिक मंडळांमध्ये गणेशोत्सवाचे वातावरण रंगू लागले आहे. मंडळांचे कार्यकर्ते मंडप उभारणीपासून ते सजावटीसाठी रात्री जागवू लागले आहेत, तर गृहिणींनी स्वच्छता मोहीम सुरू केली आहे.

...तर दाभोलकर हत्येचा CBIकडे

$
0
0
ज्येष्ठ विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांना पकडण्यासाठी सर्व पर्याय खुले ठेवल्याचे सांगताना वेळ आल्यास यासंबंधीचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा विचार करू,’ असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

सरकार टोलमाफियांच्या पाठीशी

$
0
0
सरकारकडे विकासकामे करण्यासाठी पैसे नसल्यास बीओटी तत्त्वावर प्रकल्प राबविण्यास हरकत नाही. पण प्रकल्पावर खर्च झालेल्या रकमेची वसुली कायदेशीर मार्गाने होण्याची आवश्यकता आहे.

पगार वाढला, आदर का नाही?

$
0
0
गुणवत्ताच देशाला तारणार असून शिक्षकांनी संख्यात्मक वाढीपेक्षा गुणवत्ता वाढीकडे लक्ष द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

सर्व जिल्ह्यांत विमानतळ

$
0
0
गुंतवणूकदारांना राज्याकडे आकृष्ट करण्यासाठी विमान वाहतूक आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात विमानतळ व प्रत्येक विभागात नाईट लँडिंगची सुविधा असणारी दोन विमानतळे असावीत, यादृष्टीने सरकार लवकरच पावले उचलणार असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

सर्किट बेंच घ्या; २४ तासांत देतो

$
0
0
‘कोल्हापूर खंडपीठासाठी सगळे मंत्रिमंडळ कोल्हापूरच्या पाठीशी आहे. मी यापूर्वीच हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांना पत्र दिले आहे. आता सर्किट बेंच तत्काळ हवे असेल तर लेखी द्या, मी चोवीस तासांत सर्किट बेंचचा प्रस्ताव पाठवतो,’ अशी ग्वाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सहा जिल्ह्यांतील वकिलांच्या शिष्टमंडळाशी बोलताना दिली. सर्किट हाउसवर ही बैठक झाली.

मूकबधिरांच्या हातून साकारते ‘बोलकी’ गणेशमूर्ती

$
0
0
गणरायाच्या विविध आकर्षक मूर्ती बनवणारे शिल्पकारही मूर्तीवरून शेवटचा हात फिरवत आहेत. त्यापैकीच एक आहेत, मिरजेतील किशोर धुळुबुळू आणि अर्चना धुळुबुळू हे मुकबधीर दाम्पत्य. हे दाम्पत्य गेल्या दहा वर्षांपासून गणेशमूर्ती बनवत असून, त्यांना भाविक ग्राहकांकडून चांगला प्रतिसादही मिळत आहे.

‘नियमबाह्य’ परवाने ‘RTO कडून’ निलंबित

$
0
0
प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) नियमबाह्य प्रवासी वाहतूक करणे, दारू पिऊन वाहन चालविल्यामुळे ५६१ वाहनांचे (वडाप) परवाने तीन महिन्यांसाठी निलंबित केले आहेत.

आगामी निवडणुकांवर बहिष्कार टाकू

$
0
0
औंधसह सोळा गावांना शेतीसाठी पाणी देण्याचे मुख्यमंत्यांनी दिलेले आश्वासन पाळावे, अन्यथा आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकींवर बहिष्कार टाकू, असा इशारा या गावांनी दिला आहे.

तात्यासाहेब डिंगरे यांचे निधन

$
0
0
दलितांना मंदिर प्रवेश या साने गुरुजींच्या आंदोलनातील अग्रणी शिलेदार ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आणि काँग्रेसचे माजी आमदार तात्यासाहेब उर्फ पांडुरंगराव डिंगरे यांचे शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता पंढरपूर येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९८ वर्षांचे होते.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images