Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

चित्रपट महामंडळात खर्चाचे कवित्व

0
0

Appasaheb.mali@timesgroup.com

Tewwt : @Appasaheb_MT

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची निवडणूक होऊन सात महिने लोटले तरी महामंडळातील राजकारणाचे कवित्व अजूनही संपायला तयार नाही. महामंडळाच्या निवडणुकीसाठी अंदाजपत्रकात सात लाखांची तरतूद केलेली असताना सुमारे १५ लाख खर्ची पडले आहेत. हा खर्च कुणाच्या संमतीने केला? अन्य संचालकांना त्याची माहिती होती का?अशी विचारणा करणारी नोटीस महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले यांनी गेल्या कार्यकारिणीतील १४ संचालकांना पाठविली आहे. निवडणूक खर्च ही प्रशासकीय बाब असताना संचालकांकडे विचारणा कशासाठी? अशी भूमिका माजी संचालकांनी घेतल्याने महामंडळातील राजकारण पुन्हा एकदा रंगण्याची चिन्हे आहेत.

महामंडळाच्या १४ संचालकांच्या कार्यकारिणीसाठी एप्रिल २०१६ मध्ये निवडणूक झाली होती. या निवडणुकीत नऊ पॅनेल आणि ११५ उमेदवार​ रिंगणात होते. मागील निवडणुकीतील मर्यादित उमेदवार व पॅनेलची संख्या विचारात घेत माजी अध्यक्ष विजय पाटकर यांच्या नेतृत्वाखालील कार्यकारिणीने २०१६ मधील निवडणुकीसाठी सात लाखांची तरतूद केली होती. जानेवारी २०१६ मध्ये झालेल्या महामंडळाच्या सभेने त्या अंदाजपत्रकाला मंजुरी दिली. प्रत्यक्ष निवडणुकीत मतदानप​त्रिका, कर्मचारी, मतदान आणि मतमोजणी अशा विविध कामासाठी​ जादा यंत्रणा कार्यान्वित करावी लागल्याने निवडणुकीचा खर्च १५ लाखापर्यंत पोहचला. निवडणुकीत महामंडळात सत्तांतर झाले. अध्यक्ष मेघराज भोसले यांनी अंदाजपत्रकात सात लाखांची तरतूद असताना पंधरा लाख रुपये कुणाच्या संमतीने खर्ची पडले या संदर्भात जुन्या कार्यकारिणीला नोटीस काढली.

१४ जणांना नोटिसा

महामंडळाचे माजी अध्यक्ष विजय पाटकर, माजी उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर, तत्कालिन खजीनदार सतीश बीडकर, कार्यवाह सुभाष भुरके, संजीव नाईक, अनिल निकम, अलका आठल्ये, प्रसाद सुर्वे, विजय कोंडके, सतीश रणदिवे, प्रिया बेर्डे, इम्तियाज बारगीर, सदानंद सूर्यवंशी, बाळकृष्ण बारामती यांना नोटीसा काढल्या आहेत. बहुतांश माजी संचालकांनी नोटिसीला उत्तर पाठविले नाही. निवडणूक खर्च ही प्रशासकीय बाब असून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या अखत्यारित ही प्रक्रिया होते, असे माजी उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर यांनी म्हटले आहे. महामंडळाच्या आगामी सर्वसाधारण सभेत त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

निलंबित कर्मचारी पुन्हा कामावर

महामंडळाच्या पुणे कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला जुन्या कार्यकारिणीने पैशाच्या गैरवापरावरून निलंबित केले होते. सुमारे साडेचार लाखाचा गैरव्यवहार केल्याचे या कर्मचाऱ्याने कबूल केले होते. त्याची चौकशी सुरू आहे. ​दरम्यान विद्यमान अध्यक्ष व संचालकांनी त्या कर्मचाऱ्याला पुन्हा कामावर घेतले आहे. कोल्हापूर येथील मुख्य कार्यालयात त्याची बदली केली आहे.

सत्ताधाऱ्यांतही धुसफूस

सध्या चित्रपट महामंडळात अध्यक्ष मेघराज भोसले यांचे वर्चस्व आहे. निवडणुकीत भोसले व सतीश रणदिवे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलला १४ पैकी बारा जागा मिळाल्या. मात्र सात महिन्याच्या कालावधीतच सत्ताधाऱ्यांत धुसफूस सुरू आहे. संचालक सतीश रणदिवे, पितांबर काळे, विजय खोचीकर हे अध्यक्ष भोसले यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याचे वृत्त आहे.


सध्याचे अध्यक्ष हे महामंडळाच्या हितापेक्षा राजकारणच जास्त करत आहेत. निवडणूक खर्चाबाबत जुन्या संचालकांना नोटीस पाठविण्याचे कारणच काय? सर्वसाधारण सभेपुढे विषय मांडून वाढीव खर्चाला रितसर मान्यता घेण्याऐवजी अध्यक्ष नको ते उद्योग करत आहेत.

माजी अध्यक्ष विजय पाटकर


निवडणुकीसाठी वाढीव खर्च कुणाच्या संमतीने केला हे जुन्या कार्यकारिणीतील अनेक संचालकांना माहीत नाही. महामंडळाच्या खर्चाची माहिती संचालकांना व्हावी यासाठी वाढीव खर्चाची माहिती मागवली आहे. लवकरच जुन्या संचालकांसोबत बैठक घेऊ.

मेघराज भोसले, अध्यक्ष, चित्रपट महामंडळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


म्यूरल्समधून पानसरेंच्या कार्याचे दर्शन

0
0

म.टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कष्टकरी, श्रमिकांच्या न्याय हक्कासाठी आयुष्य खर्ची घालणाऱ्या आणि प्रबोधनाची चळवळ राबविणाऱ्या कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या स्मारकातूनही त्यांच्या संघर्षमय आणि समाजप्रबोधनाच्या कार्याची शिकवण मिळणार आहे. पानसरे यांच्या जीवन कार्यावर आधारित स्मारक म्यूरल्स स्वरुपात (​शिल्पकृती) साकारण्यात येणार आहे. स्मारकासाठी बांधकाम क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात येणार आहे.

जीआरसी पद्धत (ग्लास रेनफोर्समेंट काँक्रीट), स्मारकावर ऊन, वाऱ्याचा परिणाम होणार नाही यासाठी जर्मन तंत्रज्ञानावर आधारित आर्किटेक्चरल काँक्रीट, लाइट इफेक्टस हे वैशिष्ट्य असणार आहे. आर्किटेक्ट अँड इंजिनीअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र सावंत यांनी मंगळवारी महापालिकेत स्मारकाच्या आराखड्याचे सादरीकरण केले. मूर्तीकार अशोक सुतार यांच्या संकल्पनाही समाविष्ट केल्या आहेत. स्मारकाचे एकूण इस्ट‌िमेट २१ लाख रुपयांचे आहे.

असे असेल स्मारक

‘संपूर्ण स्मारकाची जागा ही ३० बाय ३५ फूट इतकी आहे. पानसरे यांच्या व्यक्त‌िमत्त्वाचे दर्शन घडविणारे एकूण तीन म्यूरल्स असतील. मुख्य शिल्पकृती २१ बाय १५ फुटाची तर अन्य दोन म्यूरल्स सहा बाय पाच फुटाच्या असतील. चहूबाजूनी स्मारकाचे पूर्ण दर्शन घडेल या पद्धतीने रचना आहे. शिल्पकृती जमिनीपासून सहा फुट उंचीवर असणार आहे. शिल्पाची उंची १७ फूट व रुंदी पाच फूट इतकी असेल. पीलरची रचना पेनच्या स्वरूपात, पुस्तक स्वरूपात संरक्षक भिंतीची रचना असणार आहे. छोटा लॉन, स्पेशल लाइट इफेक्टस आकर्षण ठरेल. स्मारकालगतच्या मोकळ्या जागेत फ्लॉवर बेडस असतील’ अशी माहिती आर्किटेक्ट सावंत यांनी दिली. संरक्षक भिंतीसाठी आर्किटेक्चरल काँक्र‌िट वापरल्याने नव्याने रंगकाम करण्याची आवश्यकता नाही.

संपूर्ण पानसरे कुटुंबीय उपस्थित

स्मारकाच्या डिझाइन सादरीकरणप्रसंगी काम्रेड पानसरे यांच्या पत्नी उमा पानसरे, मुलगी स्मिता, मेघा, सून मेघा जावई बन्सी सातपुते उपस्थित होते. कन्या मेघा यांनी पुरोगामी विचार, वैचारिक चळवळीला पूरक उपक्रम, चर्चा, परिसंवादाकरिता अभ्यासिका असावी अशी सूचना केली. स्मिता पानसरे यांनी कॉम्रेड पानसरे यांचा आदर्शवाद, वैचारिक लढाई, संघर्षमय कहाणी नव्या पिढीला प्रेरणादायी ठरावी या पद्धतीने स्मारकाची उभारणी करावी अशी मागणी केली. सतीश कांबळे यांनी स्मारकाजवळील एमएसईबीचा ट्रान्सफार्मर अन्यत्र हलविण्यात यावा, अशी सूचना केली. माजी महापौर आर. के. पोवार, कॉम्रेड दिलीप पोवार, चंद्रकांत यादव, नगरसेवक भूपाल शेटे यांनी स्मारकासंदर्भात सूचना मांडल्या. कॉम्रेड व्ही.एल. बर्गे, नामदेवराव गावडे, अनिल चव्हाण, मीनल चव्हाण, मुकुंद कदम, सुशीला यादव, सुनील जाधव, अमर जाधव उपस्थित होते.

स्मारकासाठी आणखी २१ लाख देऊ

कॉम्रेड पानसरे यांच्या स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही. आवश्यकता भासली तर स्मारकासाठी आणखी २१ लाख रुपयांची तरतूद करू, अशी ग्वाही महापौर अश्विनी रामाणे यांनी केले. उपमहापौर शमा मुल्ला, सभापती मुरलीधर जाधव, वृषाली कदम आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

किरणांचा अंबाबाईला चरणस्पर्श

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मावळतीच्या सूर्यकिरणांनी अंबाबाईच्या चरणांना स्पर्श केला आणि किरणोत्सवाचा सोहळा शेकडो भाविकांनी डोळ्यात साठवला. या पर्वातील दुसऱ्या किरणोत्सव सोहळ्याला बुधवारी प्रारंभ झाला. गुरूवारी अंबाबाईच्या पोटापर्यंत किरणे जातील अशी उत्सुकता भाविकांमध्ये असून शुक्रवारी देवीच्या मुखावर किरणांचा स्पर्श झाला तर अखंड किरणोत्सव होईल. पहिल्या दिवशी चरणस्पर्शाने किरणोत्सव झाल्यानंतर भाविकांच्या साक्षीने देवीची आरती करण्यात आली.

बुधवारी सायंकाळी पावणे सहा वाजता सूर्यास्ताची वेळ होती. त्यापूर्वी किरणे देवीच्या चरणांवर पडून सूर्य अस्ताला जाणार असल्याने हा किरणोत्सव सोहळा अनुभवण्यासाठी सायंकाळी साडेचार वाजल्यापासूनच भाविकांनी गणपतीचौकापासून पितळी उंबरा चौकापर्यंत गर्दी केली. चार वाजून ५६ मिनिटांनी प्रखर किरणांनी महाद्वारातून गरूडमंडपाच्या दिशेने येण्यास सुरूवात केली. तर पाच वाजून दोन मिनिटांच्या ठोक्याला किरणे गरूडमंडपात पोहोचली. गणपती चौकातून घंटा चौकात किरणांचा प्रवेश झाला तेव्हा सव्वापाच वाजले होते. तर साडेपाचच्या सुमारास किरणांनी पितळी उंबरा ओलांडून पेटी चौकात प्रवेश केला. पाच वाजून ३६ मिनिटांनी तेजाने प्रखर किरणे गाभाऱ्याच्या पहिल्या संगमरवरी पायरीपर्यंत पोहोचली. यावेळी पेटी चौकासह गर्भकुडीतील दिवे मालवण्यात आले. तर पाच वाजून ४० मिनिटांनी दुसऱ्या संगमरवरी पायरीला स्पर्श करून पावणेसहा वाजता किरणांचा देवीच्या चरणांना स्पर्श झाला. पुढच्या दोन मिनिटात किरणे मूर्तीच्या वरच्यादिशेने सरकत खाली झुकली. यानंतर देवीची आरती करण्यात आली.

किरणोत्सव मार्गातील पाच अडथळे दूर

किरणोत्सव मार्गातील पाच अडथळे महापालिकेच्यावतीने बुधवारी दूर करण्यात आल्याची माहिती महापालिकेचे उपशहर अभियंता एस. के. माने यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संचालकाला सहा दिवस कोठडी

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शित्तूर तर्फ मलकापूर येथील आधार आश्रमशाळेतील तीन मतिमंद मुलांच्या मृत्यूप्रकरणी आणि इतर मुलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल पोलिसांच्या अटकेतील संस्थापक अध्यक्ष पंचरत्न पांडुरंग राजपाल याला सहा दिवसाची पोलिस कोठडी मिळाली. शाहूवाडी पोलिसांनी राजपाल याला बुधवारी (ता. ९) शाहूवाडी प्रथमवर्ग दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले होते. दरम्यान, जिल्हा शल्य चिकित्सकांनी तपासणी अहवाल पूर्ण केला असून, लवकरच तो जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्याकडे सुपूर्द केला जाणार आहे.

आधार आश्रमशाळेतील मतिमंद, मूकबधिर आणि दिव्यांग मुलांच्या आरोग्याशी हेळसांड झाल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी प्रेरणा मागासवर्गीय, शैक्षणिक, सामाजिक संस्थेचे अध्यक्ष पंचरत्न राजपाल याला पोलिसांनी मंगळवारी कोल्हापुरात अटक केली. कारवाईचा ससेमिरा चुकवण्यासाठी राजपाल हा मुंबईला पळून जाण्याच्या तयारीत होता. शाहूवाडी पोलिसांनी राजपाल याला बुधवारी शाहूवाडी प्रथमवर्ग दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले असता, त्याला १४ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली. राजपालकडे कसून चौकशी सुरू असून, संस्थेचे इतर पदाधिकारी आणि शाळेच्या मुख्याध्यापकांचीही माहिती घेतली जात आहे. शाळेच्या गलथान कारभारात संस्था सदस्य आणि मुख्याध्यापकांचा सहभाग असल्याचे स्पष्ट होताच त्यांच्यावरही अटकेची कारवाई होणार आहे, अशी माहिती शाहूवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिल गाडे यांनी दिली.

जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या आदेशाने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वसंत पाटील यांनी आधार आश्रमशाळा आणि संस्थेची तपासणी केली आहे. या तपासणीत अनेक त्रुटींसह संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा गलथान कारभारही उघडकीस आला आहे. परवानगीची मुदत संपल्यानंतरही ही शाळा सुरू होती, त्याचबरोबर मुंबई, ठाणे जिल्ह्यातून मतिमंद मुले आधार आश्रमशाळेत स्थलांतरीत करताना कोल्हापूर जिल्हा बालकल्याण समितीला कोणतीच कल्पना दिली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. शाळेच्या त्रैमासिक तपासणीतही गंभीर बाबी उघडकीस न आल्याने समाज कल्याण विभागाच्या कारभारावरही शंका उपस्थित झाली आहे. या सर्व बाबींचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर झाल्यानंतर हा अहवाल पुढे राज्य सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. त्यानंतरच संस्थेची मान्यता रद्द करण्याची कारवाई होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी दिली.

मुलांच्या प्रकृतीत सुधारणा

सीपीआर रुग्णालयात दाखल केलेल्या मतिमंद मुलांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून, औषधोपचारासह मुलांना पोषक आहारही दिला जात आहे. शनिवारी दाखल केलेल्या मुलांपैकी खुशी या मुलीच्या प्रकृतीत मात्र अजूनही अपेक्षित सुधारणा झालेली नाही. तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. जिल्ह्यासह राज्यातील इतर आश्रमशाळांशी चर्चा झाल्यानंतर आठवड्याभरात या मुलांना इतरत्र हलवण्यात येणार आहे.

‘दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करा’

आश्रमशाळेतील मुलांच्या मृत्यूला जसे कुपोषण कारणीभूत आहे, तसेच जिल्हा परिषदेकडील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्षही कारणीभूत आहे. मुलांची वेळोवेळी आरोग्य तपासणी करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी याचे गांभीर्य ओळखून पुढील उपचारासाठी त्यांना जिल्हा रुग्णालयात का दाखल केले नाही? असा सवाल आमदार राजेश क्षीरसागर यांनी उपस्थित केला आहे. संबंधित दोषी वैद्यकीय अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी आमदार क्षीरसागर यांनी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्याकडे केली आहे. मुंबई येथे आरोग्यमंत्र्यांची भेट घेऊन कुपोषित मुलांच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी आमदार क्षीरसागर यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाइपलाइनचे काम रखडलेलेच

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरवासियांच्या जिव्हाळ्याची आणि तब्बल ४८८ कोटी रुपयांची थेट पाइपलाइन योजनेचे काम सध्या रडतखडत सुरु आहे. अजूनही पाइपलाइन मार्गाच्या परवान्याचा न सुटलेला तिढा, ठेकेदार कंपनीकडून संथगतीने सुरू असलेले काम, सल्लागार कंपनीची चालढकलची प्रवृत्ती आणि कामाच्या पाठपुराव्यासाठी पूर्णवेळ अधिकाऱ्याची वानवा यामुळे गेल्या २७ महिन्यात केवळ ३५ ते ४० टक्केच काम पूर्ण झाले आहे. पाटबंधारे विभागाकडून अजूनही ११ किलो मीटर लांबीच्या पाइपलाइन मार्गाला मान्यता मिळायची आहे. एकूण ५२ किलो मीटर लांबीचा पाइपलाइन मार्ग आहे.

महापालिका, ठेकेदार जीकेसी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी आणि सल्लागार युनिटी कन्सल्टंटी यांच्यातील करारानुसार प्रकल्पाची कामे पूर्ण करण्याचा कालावधी या महिन्यात संपत आहे. करारानुसार कंपनीने तीन महिने चाचणी घेऊन फेब्रुवारी २०१७ मध्ये योजना पूर्ण करायवचे ठरले होते. पाइपलाइन योजनेच्या कामाची सध्यस्थिती पाहिली की योजनेचा कालावधी वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. परवाने व इतर तांत्रिक कारणामुळे पाइपलाइन कामात अडथळे निर्माण झाल्याचा प्रशासनाचा दावा आहे. मुदतीत काम करण्यास कंपनी अपयशी ठरली असताना अद्याप दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय झाला नसल्याचे उपायुक्त विजयकुमार खोराटे यांनी सांगितले.

केंद्र सरकारच्या युआयडीएसएसएमटी योजनेंतर्गत थेट पाइलाइन योजना मंजूर करण्यात आली. केंद्र सरकारने ८० टक्के तर राज्य सरकार व महापालिकेचा प्रत्येकी दहा टक्के निधी उपलब्ध करावयाचा आहे. केंद्राकडून पहिल्या टप्प्यात १९१ कोटी रुपये उपलब्ध झाले आहेत. २६ ऑगस्ट, २०१४ रोजी पाइपलाइन योजनेच्या कामाचे उद्‍घाटन झाले. २७ महिन्यात योजनेचे काम पूर्ण करून तीन महिने चाचणी कालावधी ठरला होता.

मात्र महापालिकेची पहिली दोन वर्षे बांधकाम विभाग, वन विभाग, जिल्हा परिषदेची मान्यता मिळवण्यात खर्ची पडले. धरणाच्या उजव्या बाजूच्या तिरावर इनटेक वेल, जॅकवेल व पंप हाऊसची कामे प्रस्तावित आहे. धरणातील पाणी पातळी आणि बांधकाम करावयची जागा दलदल असलेल्या येत्या मार्च महिन्यापर्यंत कुठल्याच स्वरूपातील कामे करता येणार नाहीत.


पाइपलाइन योजनेचे आतापर्यंत ३५ ते ४० टक्क्यापर्यंत काम झाले आहे. १८ किलो मीटर लांबीची पाइपलाइन टाकली आहे. पुईखडी येथे जलशुद्धीकरण केंद्र उभारणी सुरू आहे. ५२ किलो मीटर लांबीच्या मार्गासाठी आवश्यक पाइप उपलब्ध आहेत. पाटबंधारे विभागाकडून अद्याप मान्यता मिळायची आहे. मुदतीत काम पूर्ण होणार नाही हे स्पष्ट झाले आहे, मात्र या प्रकरणी कंपनीवर दंडात्मक कारवाईचा अद्याप कसलाही निर्णय झाला नाही.

विजयकुमार खोराटे, उपायुक्त, महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘महादेवराव महाडिकबच्चन नव्हे गब्बर’

0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

‘मुळात महादेवराव महाडिक हे अमिताभ बच्चन आहेत हे त्यांना कुणी सांगितले ?,ते तर कोल्हापूरलाच खायला उठलेले ‘गब्बर’ आहेत. जय आणि वीरुला (हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांना ) त्यांची सुपारी दिली आहे. त्यामुळेच महाडिकांचे फार काळ अस्तित्व आहे असे वाटत नाही,’ असा प्रतिटोला आमदार सतेज पाटील यांनी लगावला.

आजरा कारखान्याच्या गळीत हंगामप्रारंभी महादेवराव महाडिक यांनी ‘शोले’ चित्रपटातील बच्चनचा टॉस माझ्याकडेच असून त्यावर दोन्ही बाजूने छापाच पडतो, त्यामुळे अनेकांचा पैरा फेडला जातो. आता संजय घाटगेंना साथ देवून तिथलाही हिशोब चुकता करणार असल्याचे वक्तव्य केले होते. त्या पार्श्वभूमीवर कागल तालुक्यातील बेलेवाडी काळम्मा येथील सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याच्या पोती पूजनप्रसंगी आल्यावर ते पत्रकारांनी बोलत होते. यावेळी आमदार हसन मुश्रीफ, नाविद मुश्रीफ, युवराज पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.

आमदार पाटील म्हणाले,‘ अजून जिल्हा परिषद आणि लोकसभेच्या निवडणुका व्हायच्या आहेत. तत्पूर्वीच महाडिक यांना विधानसभेची चिंता लागून राहीली आहे. याचा अर्थ लोकसभेची त्यांची दिशा त्यांना स्पष्ट दिसत नाही. जिल्ह्यात सर्वच निवडणुकांत सर्वांना वापरून घेण्याचे काम ते सध्या करीत आहेत. पेठवडगाव, जयसिंगपूर, पन्हाळा, मलकापूर, इचलकरंजी अशा प्रत्येक ठिकाणी तालुकानिहाय ते पक्ष बदलायला लागले आहेत. त्यामुळे त्यांना फार महत्व देण्याचा प्रश्नच येत नाही.कारण त्यांच्या पाठीशी आता जनता राहीलेली नाही.’

ते पुढे म्हणाले, ‘एकीकडे अमूल दुधचे संकट जिल्ह्यावर घोंगावत असताना गोकुळ दुध संघाला वाचवण्याच्या दृष्टीने सर्वसाधारण सभेत विचारलेल्या प्रश्नांची अद्यापही उत्तरेही अद्याप महाडिक यांना देता आलेली नाहीत. आम्ही दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांना ‘गोकुळ वाचवा’ अशी विनंती करणार आहे. कारण गोकुळमधल्या संचालकांची अवस्था ‘शोले ’ मधील दोन्ही हात नसलेल्या संजीव कुमारसारखी झाली आहे.’ माजी आमदार संजय घाटगे यांचे सुपुत्र अंबरिष घाटगे हे आमच्या पॅनेलमधून आमच्याच मतांवर निवडून आल्यानंतर लगेचच सत्ताधाऱ्यांत सामील झाले. त्यामुळे त्यांच्या विश्वासार्हतेवर काय बोलायचे?, असेही ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झेडपी अध्यक्षांच्यापतीसह मुलाला मारहाण

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिक्षक पत्नीला नोकरीतून निलंबित केल्याच्या रागातून जिल्हा परीषद अध्यक्ष विमल पाटील यांचे पती पुंडलिक पाटील आणि मुलगा प्रकाश या दोघांना शिक्षकासह दोघांनी मारहाण केली. बुधवारी (ता. ९) दुपारी चारच्या सुमारास जिल्हा परीषदेच्या इमारतीमध्येच हा प्रकार घडला. पुंडलिक रावजी पाटिल (रा. आमशी, ता. करवीर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शिक्षक संघटनेचा पदाधिकारी आनंदा केशव पाटील, तसेच अवधूत आनंदा पाटील (दोघेही रा. आमशी, ता. करवीर) यांच्याविरुद्ध शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

आनंदा पाटील हे पासार्डे (ता. करवीर) येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत मुख्याध्यापक आहेत, तर त्यांच्या पत्नी शोभा पाटील या वाकरे (ता. करवीर) येथे शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. जिल्हा परिषद प्रशासनाने शोभा पाटील यांना काही तक्रारींमुळे आठ दिवसांपूर्वीच नोकरीतून निलंबित केले आहे. या घटनेचा राग शिक्षक दाम्पत्यास होता. बुधवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास पुंडलिक पाटील आणि त्यांचा मुलगा प्रकाश हे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांना भेटून त्यांच्या दालनातून बाहेर पडले. यावेळी त्यांच्यासोबत काही सदस्यही उपस्थित होते. जिन्यावरुन तळमजल्यावर येत असताना आनंदा पाटील आणि त्यांचा मुलगा अवधूत पाटील या दोघांनी जिल्हा परिषदेच्या इमारतीतच पुंडलिक पाटील यांची गळपट्टी धरली. पाटील यांना शिवीगाळ करत आनंदा व अवधूत यांनी मारहाण केली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे जिल्हा परीषदेमध्ये गोंधळ उडाला. आनंदा पाटील व पुंडलिक पाटील यांच्यात झटापट सुरू असताना अन्य सदस्यांनी वाद थांबवण्याचाही प्रयत्न केला. गर्दी वाढताच अवधूत पाटील आणि आनंदा पाटील हे पसार झाले.

दरम्यान, जिल्हा परीषद अध्यक्ष विमल पाटील यांचे पती व माजी जिल्हा परीषद सदस्य पुंडलिक पाटील यांना मारहाण झाल्याची बातमी पसरताच जिल्हा परिषदेच्या इमारतीमध्ये सदस्यांनी मोठी गर्दी केली होती. यानंतर सर्व सदस्यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन आनंदा पाटील आणि अवधूत पाटील यांच्याविरुद्ध शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. शाहूपुरी पोलिस ठाण्यात जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शशिकांत खोत, शिक्षण सभापती अभिजित तायशेटे, सदस्य अर्जुन आबिटकर, अरुण इंगवले, प्रकाश पाटील, राहुल देसाई, तानाजी पाटील, तानाजी वळकुंजे, भगवानराव जाधव, सुभाष पाटील यांच्यासह सदस्यांनी गर्दी केली होती. पुंडलिक पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी आनंदा पाटील आणि अवधूत पाटील या दोघांवर गुन्हा नोंद केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनधिकृत धार्मिक स्थळांनी अडला रस्ता

0
0

म. टा.प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापुरात जागा मिळेल त्या ठिकाणी चहाच्या टपऱ्या, केबिन थाटण्याचा उद्योग हा पहिल्यापासूनच आहे. प्रमुख रस्ते आणि चौक ही बेकायदेशीर केबिनमधून सुटले नाहीत. नागरिकांच्या श्रद्धेचे स्थान असणाऱ्या धार्मिक स्थळांची गेल्या काही वर्षात अनध‌िकृतपणे उभारणी झाली आहे. रस्ता, चौक, डीपी रस्ता, केएमटी बस स्थानकसाठी आरक्षित जागेवर बिनदिक्कतणे धार्मिक स्थळांची बांधणी झाली. कुठे मंदिर तर कुठे तुरबत आकाराला आल्या. मूर्ती स्वरुपात प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या जागी आता संगमरवरी दगडात धार्मिक स्थळे साकारली. स्थानिक लोकप्रतिनिधींचा छुपा पाठिंबा, अधिकाऱ्यांचे कातडी बचाओ धोरणामुळे धर्मिक स्थळे उद्याला आली आहेत. चौक, रस्ताची जागा व्यापल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. लोकभावनेला हात घालून आपले राजकारण चालव‌िण्यासाठी लोकप्रतिनिधी अशा प्रकारांना प्रोत्साहन देत आहेत तर अधिकारी याकडे लक्ष देत नसल्याने हा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.

कोल्हापूर शहरात कुणी राजकीय सोयीसाठी तर कुणी मतांवर डोळा ठेवून धार्मिक स्थळांना हातभार लावला. नगरसेवक, आमदार, शेठजी​, दोन नंबरमधील व्यावसायिकांच्या देणगीतून अनिधकृत धार्मिक स्थळांचा थाटमाट दिवसेंदिवस वाढत आहे. गणेश उत्सव, नवरात्र उत्सवाच्या हजारोच्या महाप्रसादाच्या पंगती उठत आहेत. दसरा चौक, लक्ष्मीपुरी, शिवाजी मार्केट परिसर, मंगळवार पेठ, महाद्वार रोड, उत्तरेश्वर पेठ, सोमवार पेठ, रंकाळा टॉवर, लक्षतीर्थ वसाहत येथे अनिधकृत मंदिर, तुरबतांची संख्या ३९ पर्यंत पोहचली आहे.

हॉस्पिटलच्या इमारतीत उभारले मारुती मंदिर

रस्त्याच्या कडेला, चौकाला लागून विविध देवदेवतांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होते. कालांतराने त्या जागा विकसित होतात. मूळ मूर्तीभोवती संगमरवरी, ग्रॅनाइटमधील बांधकाम होते. वर्धापनदिनानिमित्त महाप्रसादाचे आयोजन होते. ही धार्मिक स्थळे अनधिकृतपणे उभारली जात असताना महापालिका प्रशासनाकडून त्याला अटकाव होत नाही. कुणी अनधिकृत धार्मिकस्थळाविरोधात तक्रार केल्यानंतर प्रशासनाने कारवाई करायचे ठरविले की लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेप ठरलेला आहे. पंचगंगा हॉस्पिटलच्या इमारतीमध्ये मारुती मंदिर उभारले आहे. मंदिरासमोर मंडप उभारला आहे. रस्ता बाधित झाला आहे. दोन मंडळातील वाद, वर्चस्ववादातूनही मंदिर उभारल्याची उदाहरणे आहेत.

वाढता वाढता वाढे रस्त्यावरील मंदिरे

रस्त्यालगत आणि कॉर्नरला ठिकठिकाणी धार्मिक स्थळांची उभारणी झपाट्याने झाली आहे. शारदा कॅफेसमोरील स्वयंभू गणेश मंदिर, रंकाळा टॉवर येथील जाऊळाचा गणेश मंदिर, रवि बँकेसमोरील गणेश मंदिराचा विस्तार वाढला आहे. मंदिरासमोर पत्र्याचा शेड उभारला आहे. सात मीटर, नऊ मीटर व पंधरा मीटर रस्ता बाधित होत आहेत. उत्तरेश्वर पेठ, मंगळवार पेठ येथील लहान मंदिरेही सध्या वापरात असलेल्या रस्त्यावर आहेत. जोशी गल्लीतही कॉर्नरला गणेश मंदिर आहे. लक्षतीर्थ वसाहतीत प्राथमिक शाळेसाठी आरक्षित जागेवर दोन मंदिरे अनधिकृतपणे उभारली आहेत. मंगळवार पेठेतही एकाच रस्त्यावर चार मंदिरे बांधली आहेत.


ही आहेत अनधिकृत धार्मिक स्थळे

म्हसोबा मंदिर, विठ्ठल मंदिर (आझाद गल्ली), नरसोबा मंदिर (डांगे गल्ली), स्वंयभू गणेश मंदिर (लक्ष्मीपुरी), बीबी माँ साहेब दर्गा (दसरा चौक परिसर), मारूती मंदिर (दसरा चौक), दत्त मंदिर, विठ्ठल मंदिर, रेणुका मंदिर, किडीकाडी मंदिर (लक्षतीर्थ वसाहत), मारूती मंदिर (कुंभार गल्ली), महादेव मंदिर (सोमेश्वर गल्ली), दुर्गामाता मंदिर (गोंधळी गल्ली, उत्तरेश्वर पेठ), नागराज मंदिर (पिवळावाडा), तुरबत (विकास हायस्कूल जवळ), बहिरेश्वर म्हसोबा मंदिर (रंकाळा टॉवर), महादेव मंदिर (रंकाळा रोड), जाऊळाचा गणपती (रंकाळा टॉवर), नवनाथ मंदिर (भाविका विठोबा मंडळासमोर), मारूती मंदीर (पंचगंगा हॉस्पिटल जवळ), गणेश मंदिर झाडाचा गणपती (जामदार क्लबसमोर), गणपती मंदिर (रवि बँकेसमोर), तुरबत (सिद्धार्थनगर), तुरबत (सुभाष रोड, लक्ष्मीपुरी), महादेव मंदिर (बिंदू चौक बुरुजालगत), मारूती मंदिर (नागेशकर व्यायामशाळेसमोर), शनि मारुती मंदिर (कॉमर्स कॉलेजसमोर), साई मंदिर (प्रायव्हेट हायस्कूल कंपाऊड लगत)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उमेदवारांचे धाबे दणाणले

0
0

राजेंद्र पाटील, इचलकरंजी

काळ्या पैशावर रोख लावण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० व १००० रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्या आहेत. याचा फटका जिल्ह्यातील नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारांना भोवणार असल्याची चर्चा आहे. माघारीला अद्याप काही तास उरले असताना निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या इच्छुकांच्या महत्वाकांक्षेवरही पाणी पडले आहे. निवडणुकीत आता नोटांऐवजी भेटवस्तूंवरच भर राहणार आहे. काळा पैसा व्यवहारात आणण्यासाठी महत्वाचे माध्यम असणाऱ्या नगरपालिका निवडणुकीमया धामधूमीतच सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. आर्थिक नियोजनासाठी उमेदवारांना आता ‘नामी युक्ती’ शोधावी लागणार आहे. साहजिकच लाखो रुपयांची तजवीज केलेल्या उमेदवारांचे आर्थिक गणित बिघडून गेले आहे.

नगरपालिका निवडणुकीत राजकीय पक्षांसह अपक्ष व आघाडीतील उमेदवारांकडून मतदारांना आमिषे दिली जात आहेत. यापूर्वी लोकसभा, विधानसभा निवडणुकीसह नगरपालिका निवडणुकीत पैसे वाटताना अनेकजण रंगेहाथ सापडले होते. जिल्ह्यातील नऊ नगरपालिकांची निवडणूक रणधुमाळी मोक्याच्या टप्प्यावर आली आहे. शुक्रवारी (ता.११) माघारीचा अखेरचा दिवस असून त्यानंतर खरी रंगत येणार आहे. इचलकरंजीत नगरसेवक पदाच्या दोन जागा बिनविरोध झाल्या असून आणखी काहीजण आपली जागा बिनविरोध करण्यासाठी धडपडत आहेत. त्यासाठी मोठे आर्थिक प्रलोभन दिले जात आहे. सोशल मिडीयावरुन असे संदेश पसरल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे या संदर्भातील तक्रारीही प्राप्त झाल्या आहेत. एक जागा बिनविरोध करण्यासाठी सौदा झाल्याची चर्चा आजही रंगत आहेत.

या सर्व पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून हद्दपार केल्या आहेत. अनेक उमेदवारांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोठमोठ्या रकमा आणून ठेवल्याची चर्चा दबक्यात आवाजात ऐकू येत आहे. मंगळवारी पंतप्रधान मोदी यांनी रात्री अचानकपणे घेतलेल्या निर्णयामुळे ऐन थंडीच्या मौसमातही उमेदवारांना घाम फुटला आहे. यातून पळवाटा शोधण्यासाठी कायदे सल्लागारांसह अर्थतज्ज्ञांची मते आजमावून घेण्यात येत आहेत. नगरपालिका निवडणुकीत पैशाचा अक्षरश: चुराडा होतो हे आजपर्यंतचे अनुभव राजकीय पक्षांना असताना मोदी सरकारने घेतलेला धक्कादायक निर्णय भाजपलाही कितपत फायदेशीर ठरणार यावरही राजकीय पक्षातून तर्कवितर्क लढविले जात आहेत.

मोदी यांच्या या निर्णयानंतर निवडणूकीसाठी आणलेल्या मोठ्या रकमा आता कशा बदलून घ्यायच्या या चिंतेने अनेक उमेदवारांनी रात्र जागून काढली. शिवाय मोठमोठे व्यापारी, बिल्डर्स, खासगी सावकर, अवैध व्यावसायिक यांचेही धाबे दणाणले आहेत.

...

चौकटी -

राजकीय ‘गणिते’

पैशाच्या जोरावर राजकीय ताकद आजमावत राजाश्रय शोधणाऱ्या गुन्हेगारी व अवैध व्यावसायिकांवर जणू या निर्णयाने आभाळच कोसळले आहे. निवडणूक म्हटली की पैशाचा चुराडा हा ठरलेलाच. यातून प्रामाणिकपणे काम करणाऱ्या आणि स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवारालाही निवडणूक जड जाते असा आजवरचा इतिहास आहे. आता पाचशे व एक हजारच नोटा रद्द झाल्याने होणारी निवडणूक ही उमेदवारांची राजकीय गणिते मांडणारी ठरणार आहे.

...

कामगारांच्या पगाराचा प्रश्न

इचलकरंजी हे वस्त्रोद्योग क्षेत्रातील महत्वाचे केंद्र आहे. या ठिकाणी यंत्रमाग उद्योगासह संबंधित सर्वच घटकांना प्रत्येक शुक्रवारी पगार द्यावा लागतो. मोदी सरकारने ५०० आणि १००० चया नोटा रद्द केल्याने नव्या नोटा हाती येण्यास थोडा अवधी लागणार आहे. बुधवारी बँकेचे व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. एटीएम केंद्रही बंदच होते. गुरुवारी नियमित बँका सुरु झाल्यानंतर मोठ्या व्यवहारांवर मर्यादा येणार आहेत. कामगारांचे पगार भागविण्यासाठी दर आठवड्याला लाखो रुपये बँकेतून काढावे लागतात. मात्र एकाचवेळी मोठी रक्कम मिळणार नसल्याने कारखानदारांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे शुक्रवारी होणारा पगार पुढे जाण्याची शक्यता आहे.

...

सर्वच स्तरांवर गोंधळ

सरकारच्या निर्णयाचा अद्याप नेमका अर्थबोध होत नसल्याने कर सल्लागार, सर्वच बँकेचे व्यवस्थापन, मोठ मोठे व्यापारी, उद्योजक सर्वजण संभ्रमात आहेत. जोपर्यंत रिझर्व बँक, आयकर विभाग, अर्थ व नियोजन विभागाकडून सविस्तर माहिती उपलब्ध होत नाही तोवर गोंधळाची स्थिती राहणार आहे. या संदर्भात प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता सरकारकडून मार्गदर्शक तत्वे जाहीर होईपर्यंत बोलणे उचित ठरणार नसल्याचे सांगण्यात आले.

.....

कोट -

५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून हद्दपार करण्यात आल्या आहेत. तर बँक व्यवहार ठप्प राहणार आहेत. एकावेळी मोठी रक्कम हाती मिळणार नसल्याने कारखानदारांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. पगारासाठी दर आठवड्याला लाखो रुपये लागतात. पण आता मर्यादा आल्याने व व्यवहार पूर्वपदावर येण्यास काही अवधी लागणार असल्याने कामगारांचे पगार आता थेट बँक खात्यावर ऑनलाईन पध्दतीने करावे लागणार आहेत.

राजगोंडा पाटील, कारखानदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रतिजैविकांना मिळाला पर्याय

0
0

Maruti.Patil @timesgroup.com

Tweet :@ MarutipatilMT

कोल्हापूर : ऑर्थोपेडिक, डेंटल व बॉयोसिरॉमिक इंडस्ट्रीमध्ये उपयोगात येणारे ‘मेथड फॉर प्रेप्रिंग ऑफ नॅनो स्ट्रक्चर कॅल्शियम सिलिकेट अॅज ड्रग डिलिव्हरी एजंट’ नावाचे पेटंट राजा श्रीपतराव भगवंतराव कॉलेजचे प्राचार्य डॉ. संभाजीराव बामणे व डॉ. प्रमोद जगदाळे यांनी सादर कलेल्या पेटंटला भारत सरकारने मान्यता दिली आहे. या संशोधनाचा उपयोग ऑर्थोपेडिक, डेंटल क्षेत्राबरोबरच सिरॉमिक्स इंडस्ट्रीमध्ये होणार आहे. कॅल्शियम सिलिकेट नॅनोपार्टिकलमुळे हाडांच्या शस्त्रक्रियेपुर्वी प्रतिजैविकांचा वापर करावा लागणार नाही. त्यामुळे रुग्णांच्या औषधोपचार व परकीय चलनामध्ये बचत होणार असल्याचा त्यांनी दावा केला आहे. तसेच बोन बायडिंग मटेरियल तयार करणे सुलभ होणार आहे.

मानवी हाडांवर शस्त्रक्रिया करताना शस्त्रक्रियेच्या ठिकाणी विषाणूचा संसर्ग होवू नये, यासाठी प्रथम प्रतिजैविकांचा (अॅन्टिबॉयोटिक्स) वापर केला जातो. त्यानंतर बायोमटेरियल औषध सोडले जाते, या पद्धतीमुळे रुग्णांना औषधांवर मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागत आहे. या अवघड आणि खर्चिक पद्धतीला डॉ. बामणे व डॉ. जगदाळे यांनी पर्याय शोधला आहे. या पद्धतीमध्ये प्रथम प्रतिजैविके न सोडता बाहेरच सुयोग्य व सुनियंत्रित वातावरणात कॅल्शियम सिलिकेटचे नॅनोसाइज पार्टिकलवर प्रतिजैविकांची वाढ करून शस्त्रक्रियेच्या ठिकाणी सोडले जाते. यामुळे मोडलेले हाड लवकर व उत्तम प्रकारे जुळून येऊन त्याठिकाणी विषाणूचा प्रार्दुभाव होत नसल्याचा दावाही केला आहे.

डॉ. बामणे व डॉ. जगदाळे यांनी प्रथम हा प्रयोग बोकडाच्या हाडाच्या पेशीवर केला. प्रत्येकी सात दिवसानंतर प्रयोग केल्यानंतर प्रयोगाची सतत्या निष्पन्न झाली. त्यानंतर पेटंटसाठी २०१२ मध्ये अर्ज सादर करण्यात आला. २७ ऑक्टोबर, २०१६ मध्ये पॅनेलसमोर निष्कर्ष मांडल्यानंतर त्यांच्या संशोधनाला पेटंट म्हणून मान्यता मिळाली. पेटंटसाठी औंध शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अजित पवार, चेअमरन श्रीमंत गायत्रीदेवी भगवंतराव पंतप्रतिनिधी यांचे मौलिक मार्गदर्शन लाभले. तर डॉ. बामणे यांच्या पत्नी अॅड. संगीता बामणे यांचे कायदेविषयक मार्गदर्शन लाभले.

संशोधनासाठी मिळाली नाही लॅब

या विषयावर संशोधन करण्यासाठी डॉ. बामणे यांनी लॅबॉरिटीसाठी विद्यापीठाकडे अर्ज दाखल केला होता. मात्र दोन वर्षानंतर त्यांना मान्यता मिळाली. पेटंट मिळवण्याच्या उद्देशाने त्यांनी सांगली येथील डॉ. पंतगराव कदम कॉलेजमध्ये मेटल ऑक्साइड रिसर्ज लॅबॉरिटी निर्माण केली. एक वर्षाच्या काळानंतर त्यांनी डॉ. जगदाळेंच्या सहाय्याने पेटंट मिळवण्यात यश मिळवले. मात्र समाजपयोगी संशोधन असून लॅबॉरिटी स्थापन करण्यासाठी दिरंगाई केल्याबद्दल त्यांच्या मनात अद्यापही असंतोषाची भावना आहे.

असे झाले संशोधन

कॅल्शियम नायट्रेट व सोडियम नायट्रेट एका ठराविक प्रमाणात घेऊन नॅनोस्ट्रक्चरल कॅल्शियम सिलिकेट तयार केले आहे. याची पार्टिकल साइज ३४ ते ४० नॅनोमिटर होते. हे यापुर्वी शक्य झाले नव्हते. या पार्टिकल साइजबरोबर अॅन्टिबॉयोटिक्स किंवा पाहिजे असलेले केमोथेरपिक एजंट मिक्स होतात व ब्लड प्लाझमाबरोबर ज्या ठिकाणी औषध पाठविणे आवश्यक आहे, तेथे पोहोच होतात. त्याचा उपयोग मोडलेल्या हाडाना जुळवून घेण्यासाठी मदत होते.

हाडांची शस्त्रक्रिया करण्यापुर्वी प्रतिजैविकांचा वापर करावा लागतो. यामुळे प्रतिजैविकांवर रुग्णांना प्रचंड खर्च करावा लागतो. यावर उपया म्हणून पेटंट सादर केले होते. त्याला सरकारची मान्यता मिळाली असून त्यामुळे औषधांच्या खर्च कमी होणार आहे. भविष्यात स्त्रियांच्या स्तनाच्या कर्करोग यावर संशोधन सुरू असून यासाठीही लवकर पेटंट सादर केले जाणार आहे.

प्राचार्य डॉ. संभाजीराव बामणे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नेत्यांपेक्षा कार्यकत्यांनांच महत्व

0
0

प्रकाश कारंडे, कागल

कागलच्या राजकीय विद्यापीठात सध्या नगरपालिकेच्या रणधुमाळीत नेत्यांपेक्षा कार्यकर्त्यांनाच महत्व प्राप्त झाले. कधी नव्हे इतकी कागलच्या बाबगोंडा पाटील आणि चंद्रकांत गवळी या मंडलिक गटाच्य दोन कार्यकर्त्यांची तालुक्यात चांगलीच चर्चा रंगली आहे. यामधील पाटील यांनी आपली भूमिका जाहीर सभेमधून स्पष्ट केली असून गवळी मात्र अद्यापही ‘नॉट रिचेबल’ आहेत. त्यांनी कुठेच आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळेच महाआघाडीची घोषणा झालेली असली तरी नेत्यांना मात्र नाराजांची समजूत काढण्यासाठी ११ नोव्हेंबरपर्यंत ‘वेट अँड वॉच’ अशीच भूमिका घ्यावी लागणार आहे.

२९ ऑक्टोबर रोजी सोशल मिडीयावरुन मंडलिक कारखान्याचे कागलमधील संचालक बाबगोंडा पाटील आणि चंद्रकांत गवळी यांनी राष्ट्रवादीबरोबर जुळवून घेतल्याच्या बातम्या प्रसिध्द झाल्या. यामध्ये पाच जागा घेवून मंडलिक गटाने मुश्रीफ गटाबरोबर जुळवून घेतल्याचे सह्यांचे निवेदनही प्रसिध्द झाले. त्यामुळे तालुक्यात चर्चेला उधाण आले. या कारणाने संजय मंडलिक आणि समरजितसिंह घाटगे या दोन नेत्यांनाही आपल्या युतीच्या लांबलेल्या चर्चा व इतर कामे सोडून कागलमध्ये बाबगोंडा पाटील यांच्याच घरी येवून पत्रकार परिषद घ्यावी लागली. यामध्ये त्यांनी आपली म्हणजेच भाजप आणि शिवसेना यांच्यासह वरच्या पातळीवरील महाआघाडी होणार असल्याचे जाहीर केले, परंतु जागा वाटपाचा तिढा मात्र कायम राखत दुसऱ्या दिवशी पालकमंत्री युती जाहीर करतील असे स्पष्ट केले. परंतु या पत्रकार परिषदेस बाबगोंडा पाटील व गवळी अनुपस्थित राहील्यामुळे चर्चेला अधिकच उधाण आले.

याच दिवशी बाबगोंडा पाटील यांनी राजे गट आम्हाला योग्य न्याय देत नाही. आम्हाला सन्मानाची वागणूक देत नाही, असे सांगत आपण मुश्रीफ गटाबरोबरच रहाणार असल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या या विधानावर विश्वास ठेवून राजकारणातील मुरब्बी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुश्रीफांसारख्या नेत्याने राष्ट्रवादी पक्षाचे पाच ए.बी. फॉर्म भरले नाहीत. पाच नोव्हेंबरला देखील पत्रकार परिषदेत मुश्रीफांना पॅनेलची घोषणा करताना पाटील आणि गवळी आपल्याबरोबरच रहातील, असा विश्वास व्यक्त केला. याला दुजोरा देताना त्यांनी संजय मंडलिकांच्या सांगण्यावरुनच हे सर्व घडल्याचे स्पष्ट केले.परंतु या दिवशी सायंकाळी पाटील व गवळी मुश्रीफांपर्यंत पोहचलेच नाहीत.

सहा नोव्हेंबरला संजय मंडलिक यांनी आपण युतीसाठी कोणालाही चर्चेला पाठवले नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे एकूण या सर्व घडामोडींबाबत कार्यकर्त्यांसह तालुक्यातही संभ्रमावस्था कायम राहीली. परंतु याचदिवशी कारखान्याच्या गळीत हंगाम कार्यक्रमात आभार मानताना पाटील यांनी संजय मंडलिकांचा शब्द अंतिम असेल असे सांगत या एकूणच प्रकरणावर पडदा टाकला.

चौकट

‘नॉट रिचेबल’ ची चर्चा

ग्रामपंचायत निवडणुकीत स्थानिक कार्यकर्त्यांना जसे अधिकार दिले होते, त्याच पध्दतीने २० वर्षे अन्याय सोसणाऱ्या आपल्या गटाच्या कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी आपण अशी भूमिका घेतल्याचे बाबगोंड पाटील म्हणाले. परंतु चंद्रकांत गवळी मात्र अद्यापही ‘नॉट रिचेबल’ आहेत. त्यांना ‘नॉट रिचेबल’ राहण्यास सांगणारे नेते कोण ? याचीही सध्या दिवाळीच्या खमंग फराळाइतकीच चर्चा जोरात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

किरणांची आभा चेहऱ्यावर

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मावळतीच्या सूर्याने केशरी किरणांचा अभिषेक करत करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या किरणोत्सव सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी हजारो भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. गुरुवारी सूर्यकिरणे देवीच्या गळ्यापर्यंत पोहचली असली तरी किरणांची प्रखरता असल्याने देवीचा चेहरा उजळून निघाला. किरणोत्सव झाल्यानंतर ‘उदे गं अंबे उदे,’ असा जयघोष करून आरती केली.

पहिल्या दिवशी किरणांनी देवीचा चरणस्पर्श केल्यामुळे दुसऱ्या दिवशी किरणोत्सव सोहळा होईल अशी आशा निर्माण झाली. सायंकाळी ५ वाजल्यापासूनच भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती. शिवाय मंदिराबाहेर लावण्यात आलेल्या स्क्रीनवर हा सोहळा पाहण्यासाठी भाविक उभे होते. जसजसे किरण गरूड मंडपातून गणपती चौकात यायला सुरुवात झाली तेव्हापासून भाविकांची उत्सुकता वाढली. कासव चौक, पितळी उंबरा पार करत किरणांनी चांदीचा उंबरा ओलांडून गाभाऱ्याच्या दिशेने किरणे गेली. किरणांनी प्रथम देवीच्या चरणस्पर्श केल्यानंतर किरण देवीच्या कमरेपर्यंत आली त्यानंतर सूर्यास्तच्या एक मिनिट आधी किरण देवीच्या गळयापर्यंत पोहचली. किरणांची प्रखरता असल्याने देवीचा चेहरा उजळून निघाला.

शुक्रवारी किरणोत्सव सोहळ्याचा मुख्य दिवस आहे. आजची ‌परिस्थिती पाहता पूर्ण किरणोत्सव सोहळा होण्याची शक्यता आहे.


किरणाच्या तीव्रतेमुळे होणार किरणोत्सव

यंदा सूर्य किरणांची तीव्रता असल्यामुळे पहिल्या दिवशी चरणस्पर्श आणि दुसऱ्या दिवशी देवीच्या गळ्यापर्यंत किरणे गेली. तसेच महाद्वार रोड येथील गणपती उत्सव काळात बिल्ड‌िंग पडल्यामुळेही अडथळा नाहीसा झाला.

अजून ७ ते ८ भौतिक अडथळे

किरणोत्सव सोहळ्यात येणारे अडथळे गेल्या दोन दिवसांपासून काढले जात होते. गेल्या काही दिवसांत तीन अडथळे दूर केले असून अजूनही सात ते आठ बिल्ड‌िंगचे अडथळे आहे. हे अडथळे दूर केले तर किरणोत्सव होऊ होऊ शकेल, असे अभ्यासक प्रा. के. जी. हिरासकर यांनी सांगितले.



किरणांचा असा झाला प्रवास

महाद्वार: ४ वाजून ४८ मि.

गरुडमंडप : ५ वाजून ०८ मि.

पितळ उंबरा : ५ वाजून ३३ मि.

पहिल पायरी : ५ वाजून ३९ मि.

दुसरी पायरी : ५ वाजून ४० मि.

तिसरी पायरी : ५ वाजून ४२ मि.

गर्भकुटी पहिली पायरी: ५ वाजून ४३ मि.

चरण स्पर्श : ५ वाजून ४५ मि.

देवीच्या कमरेपर्यंत: ५ वाजून ४६

देवीच्या गळ्यापर्यंत - ५ वाजून ४९ मि.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूर होणार पर्यटन जिल्हा

0
0

Gurubal.mali@timesgroup.com

twieet@gurubalmaliMT

कोल्हापूर : कोल्हापूरला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्याच्या प्रस्तावाला राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. पर्यटन सचिवांनीही त्याला मान्यता दिल्याने याबाबत सविस्तर प्रस्ताव तयार करण्याच्या कामाला गती आली आहे. नगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता संपताच राज्य सरकारकडे हा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. याची अधिकृत घोषणा झाल्यास शंभर कोटीपेक्षा जास्त निधी पहिल्याच टप्प्यात मिळणार असून यामुळे कोल्हापूरचा चेहरामोहरा बदलणार आहे.

कोल्हापूरला समृद्ध सांस्कृतिक, धार्मिक व ऐतिहासिक वारसा आहे. अंबाबाई, जोतिबा, नृसिंहवाडीला दरवर्षी लाखो भाविक दर्शनाला येतात. पन्हाळा, विशाळगड, पारगड यासह अनेक किल्ले पाहायला गर्दी असते. आंबा, दाजीपूर, गगनबाडा या निसर्गरम्य ठिकाणांचा आनंद घेण्यास देशाच्या कानाकोपऱ्यांतून पर्यटक येतात. अलिकडे कोल्हापूरला येणाऱ्या या पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. पण, त्यांना मिळणाऱ्या सुविधा कमी असल्याने पर्यटन व्यवसायवाढीवर मर्यादा येत आहेत. या पार्श्वभूमीवर हा उद्योग वाढावा, यासाठी पर्यटन महोत्सव आयोजन करण्यापासून ते काही उपक्रम राबवण्यात येणार आहेत. यापुढील टप्पा म्हणून जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पर्यटनमंत्री रावल व पर्यटन सचिव नायर यांच्याशी चर्चा करून कोल्हापूर पर्यटन जिल्हा जाहीर करण्याची विनंती केली. रावल व नायर यांनी त्याला हिरवा कंदील दाखवला. याबाबत तातडीने प्रस्ताव देण्याची सूचना केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना तसे आदेश दिले आहेत. तीन वर्षांपूर्वी पाचशे कोटीचा एक आराखडा तयार केला होता. त्यात काही बदल करून नवा आराखडा तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. हा आराखडा व पर्यटन जिल्हा जाहीर करण्याचा प्रस्ताव पुढील महिन्यात राज्य सरकारडे पाठवण्यात येणार आहे.


‘स्वदेश’मधून शंभर कोटी

केंद्र सरकारच्या ‘स्वदेश’ या योजनेतून जिल्ह्याच्या विकासासाठी निधी मिळावा यासाठी चर्चा झाली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील तीन पर्यटनस्थळांचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. आचारसंहिता संपताच हा प्रस्तावही पाठवण्यात येणार असून केंद्राने त्याला तत्त्वतः मान्यता दिल्याने नवीन वर्षात शंभर कोटी निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


कोल्हापूर पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यासाठी पर्यटनमंत्री जयप्रकाश रावल यांच्याशी चर्चा झाली आहे. त्यांनी तत्त्वतः मान्यता दिली आहे. रितसर प्रस्ताव तयार करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. हा प्रस्ताव राज्य सरकारला मिळताच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून तो तातडीने मंजूर करून घेण्यात येईल.

चंद्रकांत पाटील, पालकमंत्री



काय होणार फायदा

पर्यटन जिल्हा झाल्यास राज्य व केंद्र सरकारकडूनही एक हजार कोटीपेक्षा अधिक निधी जिल्ह्याला मिळू शकतो. यामुळे अनेक सुविधा उपलब्ध करून देणे शक्य होते. रस्ते, पाणी, निवासस्थान याबरोबरच पर्यटकांना हव्या असलेल्या सर्व सुविधा तातडीने उपलब्ध झाल्याने पर्यटनवाढीला चालना मिळेल. सिंधुदूर्गला याचा मोठा फायदा झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळा, पार्किंगमध्येही धार्मिक स्थळे

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कुठे सार्वजनिक तरुण मंडळातील तरुण कार्यकर्ते एकवटतात, तर कुठे रिक्षा व्यावसायिक जमतात. चौक, रस्त्याच्या कडेला छोटेखानी मंदिर उभारणीचा निर्णय होतो आणि रातोरात मंदिर आकाराला येते. भावनेच्या भरात आणि नियमांची पायमल्ली करत शाळेच्या आवारात, पार्किंगसाठी आरक्षित जागेवर मंदिर थाटली आहेत. सागरमाळ येथे तर महापालिकेच्या शाळेच्या आवारात, मध्यवर्ती बसस्थानक समोरील पार्किंगसाठी आरक्षित जागेवर मंदिराची उभारणी झाली आहे. लोणार वसाहतीत रेल्वेव्या हद्दीतही अनधिकृत बांधकाम झाले आहे. शहरातील प्रमुख मार्ग आणि उपनगरात तर शेंदूर फासला देव घडविला अशी स्थिती तयार झाली आहे.

सरकारी, आरक्षित आणि महापालिकेच्या मालकीच्या जागेतील अनधिकृत धार्मिक स्थळ हटविण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे. मध्यवर्ती बसस्थानक समोरील मोकळ्या जागेत बहुमजली कार पार्किंग उभारणीचा प्रस्ताव आहे. महापालिका प्रशासनाने, कार पार्किंगसाठी निविदा प्रसिद्ध केली, पण त्याला अल्प प्रतिसाद मिळाला यामुळे बीओटी तत्त्वावरील हा प्रकल्प अद्याप कागदापुरताच सिमीत राहिला आहे. पार्किंगसाठी आरक्षित असलेल्या जागेच्या मध्यवर्ती ठिकाणी दत्त मंदिर उभारले आहे. रोज त्या ठिकाणी पूजा अर्चा होते. मंदिराच्या भोवती पत्र्याचा शेड उभारला आहे. सागरमाळ परिसरात महापालिकेच्या मालकीचे वि. स. खांडेकर विद्यामंदिर आहे. शाळेच्या आवारात सागरदेव मंदिर आहे. मंदिर छोटे आहे, पण त्याची उभारणी अनधिकृतपणे केली आहे. या ठिकाणी आता दरवर्षी यात्रा भरते. या जागेचा मूळ वापर शाळेसाठी आहे. भविष्यकाळात मंदिराचा विस्तार वाढत गेला तर पटांगणास अडथळा निर्माण होणार आहे. महापालिकेच्या मालकीच्या जागेतही अनधिकृतपणे बांधकाम होऊनही प्रशासनाला त्याची वार्ता लागत नाही. आरक्षित व खुल्या जागा, पार्किंग ठिकाणी अ​नधिकृत बांधकाम होऊनही ते हटविण्याची तसदी प्रशासन घेत नाही.

वाहतूक, रहदारीचा परिसर विचारात घेतला नाही

जिल्हाधिकारी कार्यालयालगतच्या उद्योग भवनसमोरील रस्त्यावर गणेश मंदिराची निर्मिती केली आहे. फूटपाथला लागून मंदिराच बांधणी झाली. याआधी येथे गणेश प्रतिमा होती. आता त्या ठिकाणी छोट्या स्वरुपात संगमरवरी मंदिर बांधले आहे. त्याच्या अवतीभोवती दुचाकी वाहने पार्क केलेली असतात. परीख पुल ते आप्पाज कॉम्प्लेक्सकडे जाणाऱ्या मार्गावर मोठी झाडे आहेत. हा मार्ग रहदारीचा आहे. दिवसभर वाहतूक सुरू असते. रस्ता रुंदीकरणात झाडांचा अडथळा निर्माण झाला. झाडे हटविली तर वाहतूक आणखी सुलभ होणार आहे. मात्र येथील एका झाडाच्या बुंध्याला अचानक कुणीतरी शेंदूर फासला. शहरातील विविध भागात अनधिकृतपणे धार्मिकस्थळे थाटून अनेकांनी त्या ठिकाणी दुकानदारी सुरू केली आहे.

मध्यवर्ती बसस्थानक परिसरात असलेलेल्या उड्डाण पुलाखाली हनुमानाचे मंदिर उभारले आहे. जिन्याखाली अनेकजण लघुशंका करतात तरीही येथे फोटो पूजन करून फरशी घालून चौक बांधला आहे. लाल रंग देऊन येथे दानपेटीही ठेवली आहे.

पोलिस ठाण्याच्या परिसरातही बिनधिक्कत उभारणी

राजारामपुरी पोलिस स्टेशन आणि कावळा नाका येथील ताराराणी पोलिस चौक परिसरातही विविध देवदेवतांच्या नावाची मंदिरे उभारली आहेत. ताराराणी चौक शेजारील हनुमान मंदिर १८ मीटर रस्त्याला बाधित होते. माऊली पुतळा ते राजारामपुरी पोलिस स्टेशन रस्त्याच्या डावीकडील बाजूस रस्त्याच्या जागेत मंदिर आहे. विकास योजनेनुसार मंदिर व्याप्त जागा रस्त्याची असल्याने हे बांधकाम नियमित होणार नाही. राजारामपुरी पोलिस स्टेशन ते तीन बत्ती चौक परिसरातही रस्त्याला बाधित होईल, या पद्धतीने मंदिरे उभारली आहेत. (क्रमश:)


राजारामपुरी, दौलनतगर परिसरातील अनधिकृत स्थळे

स्वामी समर्थ मंदिर, गणेश मंदिर, वटवृक्ष माऊली स्वामी समर्थ मंदिर (दौलतनगर झोपडपट्टी), दत्त मंदिर (माऊली पुतळा ते राजारामपुरी पोलिस स्टेशन), रेणुका मंदिर (शाहूनगर झोपडपट्टी), सागरदेव मंदिर (सागरमाळ), म्हसोबा मंदिर (नार्वेकर मार्केट समोर), नवश्या मारुती मंदिर (शाहूनगर), म्हसोबा देवालय (टाकाळा), काळभैरव मंदिर (यादवनगर झोपडपट्टी), साई मंदिर (शाहू सेना चौक), शनि मंदिर (राजारामपुरी), स्वामी समर्थ सेवा सदन (जवाहरनगर), म्हसोबा मंदिर (यादवनगर) पिंपळेश्वर गणेश मंदिर, साई मंदिर (सुभाषनगर शाळेलगत), मारूती मंदिर (वर्षानगर), मारूती मंदिर, दर्गा, हनुमान मंदिर (लोणार वसाहत), दुर्गामाता मंदिर, रेणुका मंदिर (माकडवाला वसाहत), हनुमान मंदिर (मार्केट यार्ड मागील बाजूस मेन रोड), स्वामी समर्थ मंदिर (एसटी स्टँन्ड समोरील पार्किगमधील जागेत), गणेश मंदिर, महादेव मंदिर (हॉटेल एलिंगट परिसर)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहाय्यक निरीक्षकासहहवालदार जाळ्यात

0
0

म. टा. वृत्तसेवा, हुपरी

हुपरी (ता.हातकणंगले) येथे एका आत्महत्या प्रकरणामध्ये न्यायालयीन प्रक्रियेत मदत करण्याकामी दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना हुपरी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शशिकांत यशवंत सावंत (रा.शांतिधाम, कोल्हापूर. मूळगाव वर्णे, जि.सातारा) व हवालदार आप्पालाल अब्बास मिस्त्री (रा.सिद्धनेर्ली, ता.कागल) हे दोघे लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात सापडले. ही कारवाई गावभागातील हिरा चित्रमंदिर समोरील विश्वनाथ बिअरबारमध्ये करण्यात आली. मागील दहा महिन्यांत लाच घेताना हुपरी पोलिस ठाण्याच्या पाच पोलिसांवर कारवाई झाली आहे.

हुपरी (ता.हातकणंगले) येथील गावभागातील विनायक सुभाष मेथे या तरुणावर चार महिन्यांपूर्वी विनयभंगासह अनेक गुन्हे दाखल झाले होते. विनायकचा भाऊ अमोल याने काहीजणांनी आपल्या भावाला यामध्ये नाहक गोवल्याचा आरोप करत आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी अमोलने चिठ्ठीत शेजारी राहणाऱ्या मटका किंग प्रकाश काटकर व अन्य तिघांची नावे लिहीली होती. याबाबत हुपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. यासंदर्भात प्रकाश काटकर याच्यावर मुंबई उच्च न्यायालयाने काही अटी घालून अटकपूर्व जामीन दिला होता. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक शशिकांत सावंत यांच्याकडे होता. शशिकांत सावंत यांच्या सांगण्यावरुन हवालदार आप्पालाल मिस्त्री याने या न्यायालयीन प्रक्रियेत मदत करण्यासाठी काटकर याच्याकडे पंचवीस हजार रुपयांची मागणी केली होती. यामध्ये तडजोड करुन दहा हजार रुपये देण्याचे निश्चित झाले होते. प्रकाश काटकर याने मंगळवारी (ता.७) याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. गुरूवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हिरा चित्रमंदिर समोरील विश्वनाथ बिअरबारमध्ये ‘लाचलुचपत’ने सापळा लावून दहा हजारांची लाच घेताना हवालदार आप्पालाल मिस्त्री याला रंगेहाथ पकडले. मिस्त्री याच्या जबाबानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक सावंत यांच्या सांगण्यावरुन ही लाच घेतल्याचे सांगितल्यामुळे पोलिस ठाण्यात जावून सावंत यांना अटक करण्यात आली. या कारवाईमध्ये पोलिस उपअधिक्षक उदय आफळे, पदमा कदम, फौजदार शाम बुचडे, हवालदार श्रीधर सावंत, अमर भोसले, मनोज खोत, मोहन सौंदत्ते, संदीप पावलेकर, दयानंद कडूकर, सर्जेराव पाटील आदींनी सहभाग घेतला

चौकट

हुपरी पोलिस ठाणे बदनाम

गेल्या दहा महिन्यांत आजपर्यंत लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाच्या जाळ्यात हुपरीतील पाचजण सापडले आहेत. त्यामध्ये जालिंधर भाट, दिपक सावंत, धनाजी पाटील या पोलिस कर्मचाऱ्यांनंतर गुरूवारी सहाय्यक पोलिस निरीक्षक शशिकांत सावंत, हवालदार आप्पालाल मिस्त्री हे जाळ्यात सापडले. तर मागील चार महिन्यांपूर्वी खंडणी प्रकरणामध्ये सहाय्यक फौजदार संजय लोंढे, काँस्टेबल अब्दुल काझी हे अडकले आहेत. या सर्व प्रकरणांमुळे जिल्ह्यात हुपरी पोलिस ठाणे बदनाम झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अतिक्रमण हटविले, परवान्याची तपासणी

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहराच्या रहदारीच्या मार्गावरील अतिक्रमणे आ​णि दुकानांच्या वाढीव छपऱ्यामुळे वाहतुकीस अडथळा होत होता. महापालिकेच्या मालकीच्या मार्केटमध्येही किराणा माल दुकानदारांनी अतिक्रमण केले होते. पापाची तिकटी, माळकर तिकटी परिसरातील रस्त्यावरील अतिक्रमणाच्या विरोधात महापालिकेने गुरूवारी मोहीम राबवली. सायंकाळी सहा वाजता आयुक्त पी. शिवशंकर हे स्वत: रस्त्यावर उतरत महापालिकेच्या इमारतीमधील दुकानगाळेधारकांची झाडाझडती घेतली. व्यवसाय परवाना, गाळेधारक स्वत दुकान चालवित आहे की अन्य भाडेकरून नेमलेत या संदर्भात तपासणी सुरू केल्यानंतर दुकानमालकांची तारांबळ उडाली.

महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये ४० हून अधिक दुकानगाळे आहेत. अनेक दुकानदारांचा करार संपुष्टात आला आहे. काही जणांनी नूतनीकरण केले नाही. दुसरीकडे काही ठिकाणी गाळेधारकांनी भाडेकरू नेमल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी गुरुवारी सायंकाळी दुकानगाळयांची तपासणी सुरू केली. कुणाला कसलीही पूर्व कल्पना न देता थेट चौकशीला सुरुवात केल्याने दुकानदारांची धांदल उडाली. प्रत्येक दुकानात जाऊन व्यवसाय कोणता आहे, व्यवसाय परवाना, दुकानदार कोण आहेत अशा बारीकसारीक गोष्टीची खातरजमा केली. उपायुक्त विजयकुमार खोराटे, इस्टेट अधिकारी प्रमोद बराले, परवाना विभाग अधिकारी सचिन जाधव यावेळी उपस्थित होते.

​रोडवर अतिक्रमण करणाऱ्या दुकानदारांना झटका

शिवाजी मार्केट विभागीय कार्यालय व ​अतिक्रमण निर्मूलन पथक यांच्या संयुक्त विद्यमाने अतिक्रमण विरोधी मोहीम राबविण्यात आली. शिवाजी मार्केटमधील दुकानाच्या वाढीव छपऱ्या, पत्र्याचे शेड काढण्यात आले. मार्केटमधील भाजी मंडईतील अतिक्रमणही हटविले. शिवाजी रोड, पापाची तिकटी, माळकर तिकटी या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. मात्र अनेक ठिकाणी दुकानदारांनी अनधिकृतपणे वाढीव बांधकाम, पत्र्याचे शेड बांधले होते. वाहतुकीला अडथळा ठरणारे अतिक्रमण, छपऱ्या काढण्यात आल्या. उपशहर अभियंता एस. के. माने, अतिक्रमण निर्मूलन विभागाचे पंडित पोवार यांच्या नेतृत्वाखाली मोहीम राबवली. शिवाजी मार्केट इमारतीमधील बी. जी. महाजन, सादुले सोळंकी, जांगनुरी, नगारे, रामचंद्र तवनाप्पा मूग, विनायक स्टोअर्स, विभूते, श्रीकृष्ण स्टोअर्स, शिवकृपा स्टोअर्स, दिलीप जनरल स्टोअर्स, चैतन्य ब्रदर्स, श्रेया भडंग, बालाजी क्लॉथ, सविता कटलरी, जितेंद्र मेटल्स येथे कारवाई झाली.


पत्र्याचा शेड, छपऱ्या हटविल्या

पापाची तिकटी परिसरातील अतिक्रमणे हटविण्यात आली. पापाची तिकटी ते महापालिका रोडवर दुकानदारांन केलेले वाढीव बांधकाम, पत्र्याचा शेड काढण्यात आले. विशाल होजिअरी, भोरे नॉव्हेल्टी, मुश्ताक अगरबत्ती, जयभारत टी डेपो, ईस्माइल तांबोळी सप्लायर्स, बर्थ डे टी डेपो, मुल्ला पतंग डेपो, राजू पतंग डेपो, कृष्णा मोबाइल, आनंद फ्रेम, जी. जी. भोसले, लक्ष्मी क्लॉथ, शिव मेन्स वेअलर, राम गारमेंट, उरुणकर फरसाणा या दुकानावरही कारवाई झाली. कारवाईत ३० हून अधिक कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वादग्रस्त मुख्याध्यापकए.के.पाटील निलंबित

0
0

कोल्हापूर

जिल्हा प‌रिषदेत अध्यक्षा विमल पाटील यांचे पती पुंडलिक, मुलगा प्रकाश यांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मुख्याध्यापक ए. के. पाटील यांना गुरूवारी निलंबित केले. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी ही कारवाई केली.

पासार्डे (ता. करवीर) येथील विद्यामंदिर शाळेत ए. के. मुख्याध्यापक होते. बुधवारी दुपारी तीन वाजता त्यांना व मुलगा अवधूत या दोघांना अध्यक्षा विमल यांचे पती पुंडलिक व मुलगा प्रकाश यांना अचानक मारहाण केली. जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे या प्रकरणाची प्रशासनाने चौकशी केली. चौकशीत ‘ए. के’ यांची रजा मंजूर नसल्याचे समोर आले. शिक्षकी पेशातील आचारसंहितेचा भंग केला. यापूर्वी निलंबित करूनही त्यांच्यात सुधारणा झालेली नाही. त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाहू आघाडीच्या स्वरूपा यड्रावकर बिनविरोध

0
0

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

जयसिंगपूर नगरपालिका निवडणुकीच्या रिंगणातून प्रभाग क्रमांक तीन (ब) मधील ताराराणी आघाडीच्या उमेदवारासह अपक्षांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे राजर्षि शाहू विकास आघाडीच्या उमेदवार व माजी नगराध्यक्षा स्वरूपा पाटील-यड्रावकर बिनविरोध निवडून आल्या. असंख्य नेत्यांनी मोट बांधलेल्या ताराराणी आघाडीला शाहू विकास आघाडीने विजयी सलामी दिली आहे. ताराराणी आघाडीत पडलेली उभी फूट यानिमित्ताने स्पष्ट झाली आहे.

या प्रभागातील उमेदवार फुलाबाई बेडगे, शहापरी मुजावर, राजश्री जाधव यांनी यापूर्वीच माघार घेतली होती. गुरूवारी ताराराणी आघाडीच्या संगीता खामकर, अपक्ष कल्पना मोरे आणि शाहू विकास आघाडीच्याच पर्यायी उमेदवार सुनीता खामकर यांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे स्वरूपा पाटील-यड्रावकर या बिनविरोध निवडून आल्या. या निवडीची अधिकृत घोषणा २८ ऑक्टोबर रोजी मतमोजणीदिवशी करण्यात येणार आहे.

दरम्यान, गुरूवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत नगरसेवकपदासाठी अर्ज भरलेल्या नऊजणांनी माघार घेतली. त्यात उज्ज्वला पाटील, संतोष खामकर, संजय पाटील-यड्रावकर, अर्चना शिंगाडे, अलका खाडे यांचा समावेश आहे. शुक्रवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस असून आणखी कोणत्या प्रभागांतील उमेदवार बिनविरोध होणार, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.


दुसऱ्यांदा बिनविरोध

पाच वर्षांपूर्वी झालेल्या जयसिंगपूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राजर्षी शाहू विकास आघाडीच्या स्वरूपा पाटील यड्रावकर यांची प्रभाग एकमधून बिनविरोध निवड झाली होती. आता दुसऱ्यांदा त्यांची बिनविरोध निवड झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वस्त्रनगरीतील व्यवहारावर परिणाम

0
0

म.टा.वृत्तसेवा,इचलकरंजी -

पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्यात आलेले वस्त्रोद्योगाचे प्रमुख केंद्र असलेल्या वस्त्रनगरी इचलकरंजीलाही त्याचा मोठा फटका बसला. अनेकांनी या नोटा स्वीकारण्यास नकार दर्शविल्याने सर्वच ठिकाणचे व्यवहार थंडावले होते. सूत व कापड खरेदी-विक्री बाजारातही शुकशुकाट जाणवत होता. दिवाळीनंतर काही प्रमाणात सुरु असलेले यंत्रमागही बंद होण्यामया मार्गावर आहेत.

जुन्या नोटांच्या बदल्यात नव्या नोटा घेण्यासाठी तसेच जवळील रक्कम बँक खात्यावर जमा करण्यासाठी शहरातील सर्वच राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांमध्ये नागरिकांनी एकच गर्दी केली होती. त्यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. काही ठिकाणी गर्दीमुळे किरकोळ वादाचे प्रसंग घडले.

काळा पैसा बाहेर काढण्याच्या हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चलनात असलेल्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा रद्द केल्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयाचे स्वागत झाले असले तरी सर्वसामान्य वर्गाला मात्र अडचणीला तोंड द्यावे लागले. रद्दबातल ठरलेल्या नोटा बदलून घेण्यास गुरुवारपासून सुरुवात झाल्याने नागरिकांनी बँक उघडण्यापूर्वीच रांगा लावल्या होत्या. नोटा बदलण्यापूर्वी आवश्यक माहितीचा अर्ज व पुरावा आवश्यक असल्याने थोडा विलंब लागत होता. तर गर्दीमुळे अनेक ठिकाणी नागरिकांतच वादाचे प्रसंग उद्भवत होते. वादाचे प्रसंग घडण्याची शक्यता असल्याने पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जुन्या नोटांच्या बदल्यात मिळालेल्या नवीन नोटा तसेच शंभराच्या नोटा पाहून अनेकांचा आनंद ओसंडून वाहत होता.

दरम्यान, नगरपालिकेतील घरफाळा विभाग, लाईट बिलसह सरकारी कार्यालयात पाचशे व हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास मनाई केली जात होती. आम्हाला वरुन आदेश नसल्याने नोटा स्वीकारता येत नसल्याचे सांगितले जात असल्याने शाब्दिक चकमकी झडताना दिसत होत्या.

दरम्यान, इचलकरंजीत यंत्रमाग उद्योगासह संबंधित सर्वच घटकांचा पगार प्रत्येक शुक्रवारी होतो. कामगारांचे पगार भागविण्यासाठी दर आठवड्याला लाखो रुपये बँकेतून काढावे लागतात. गुरूवारी बॅंका सुरू झाल्या असल्या तरी एकाचवेळी मोठी रक्कम मिळणार नसल्याने कारखानदारांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे कारखानदारांसह कामगार वर्गातही चिंतेचे वातावरण आहे. शुक्रवारी पगार होईल की नाही याची अद्याप खात्री देता येत नसल्याचे कारखानदारांनी सांगितले.

रक्कम काढण्यावर मर्यादा आल्याने व व्यवहार पूर्वपदावर येण्यास काही अवधी लागणार असल्याने कामगारांचे पगार आता थेट बँक खात्यावर ऑनलाईन पध्दतीने करण्याची तयारी काही कारखानदार करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बॅंकांसमोर लांबच लांब रांगा

0
0

गडहिंग्लज

पाचशे व हजारच्या नोटा व्यवहारातून बंद करण्याच्या घोषणेचे पडसाद सर्वच स्तरावर उमटत असून तालुक्यातील सर्वच व्यवहारांवर याचा परिणाम जाणविला. मात्र देशहितासाठी अडचणीचा सामना करीतही सामान्यांनी या निर्णयाचे स्वागत केले. दरम्यान, बुधवारी बँकांसह एटीएम बंद राहिल्यामुळे गुरूवारी दिवसभर बँकांमध्ये हाउसफुल्ल गर्दी पाहायला मिळाली.

गुरूवारी सकाळपासून बहुतांश लोकांनी बँकेतून जुन्या नोटा जमा करण्यासाठी रांगा लावल्या. त्यामुळे बँकांसह सहकारी पतसंस्थांमध्ये सुद्धा तुडुंब गर्दी पाहायला मिळत आहे. तर काहींच्याकडे हातात खर्चालाच पैसे नसल्याने उपलब्ध होतील तेथून पैसे काढण्याचा प्रयत्न ते करीत आहेत. अद्याप गडहिंग्लज शहरात नवीन नोट दाखल झालेली नसली तरी दोन दिवसात नोटा उपलब्ध होतील, अशी माहिती बँक अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images