Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

काळाम्मावाडी डाव्या कालव्यास भगदाड

$
0
0

म.टा वृत्तसेवा, राधानगरी

काळम्मावाडी (ता राधानगरी) येथील दूधगंगा जलाशयाच्या उजव्या आणि डाव्या कालव्यांना भगदाडे पडण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. लिंगाचीवाडी येथील डाव्या कालव्यास भगदाड पडून कालव्याच्या भरावा नदीपात्रात वाहून गेला आहे. पाटबंधारे विभागाने अक्षम्य दुर्लक्ष केल्याने अशा घटना सतत घडत असून विषयी शेतकऱ्यांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे .

काळम्मावाडी येथील दूधगंगा जलाशय (राजर्षी शाहू सागर) या आंतरराज्य जल प्रकल्पाला उजवा आणि डावा असे दोन कालवे आहेत. या कालव्यातून शेती सिंचनासाठी पाणी सोडले जाते. परंतु या कालव्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने कालवा फुटून शेतातील पिके वाहून जाण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. सोमवारी (ता.३१) सायंकाळी लिंगाचीवाडी येथील डाव्या कालव्यास मोठे भगदाड पडले. कालव्यातून सुरु असलेला पाण्याचा मोठा प्रवाह दुधगंगा नदीपात्रात वाहून गेला. या घटनेची माहिती पाटबंधारे विभागास समजताच ताबोडतोब पाणी कालव्यातून बंद करण्यात आले.कालवा फुटीच्या प्रकारामुळे कालव्याशेजारील पिके केंव्हा वाहून जातील याची खात्री नाही. शेती सिंचनाबरोबरच पिण्याच्या पाण्यासाठी या कालव्यांच्या उपयोग होतो. सध्या या कालव्यातून पाणी पुरवठा खंडित केल्यामुळे या कालव्यावरील शेती पिके धोक्यात आली आहेत .ऊस,नाचणी,आदी पिका बरोबर रब्बीची लागण खोळंबणार आहे. या कालव्याचे नव्याने अस्तरीकरण करावे अशी मागणी या भागातील नागरिकांच्यामधून जोर धरू लागली आहे. कालव्याला भगदाड पडल्याची घटना घडल्यानंतर या विभागाचे शाखा अभियंता, कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देवून पाहणी केली.

दरम्यान, काळम्मावाडी प्रकल्पाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यांचे काम निकृष्ट दर्जाचे काम झाले आहे. कालवे फुटून पिके वाहून जाण्याचे प्रकार घडत आहेत. या कालव्यामध्ये झाडे झुडपे वाढली आहेत. कोणत्याही प्रकारची देखभाल केली जात नाही .या कालव्यांचे अस्तरीकरण करण्यात यावे अन्यथा कालवा पाणी बंद आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार सूर्यवंशी यांनी दिला आहे . आणि शहर वाहतूक शाखाने फॅन्सी नंबरप्लेट, विना परवाना वाहन चालवण्यासंदर्भात कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शहरात पर्यटकांची गर्दी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दिवाळीच्या सुटीमुळे आज, मंगळवारी शहरात पर्यटकांची गर्दी अनुभवायला मिळाली. कोल्हापुरातील निवासी हॉटेल्समध्येही सध्या पर्यटकांची बऱ्यापैकी संख्या असून, यातील बरीचशी हॉटेल्स हाउसफुल्ल झाली आहेत. त्यामुळे अचानक आलेल्या काही पर्यटकांची थोडी तारांबळ उडाली. शाळा महाविद्यालयांना आणखी आठवडाभर सुटी असल्याने या आठवड्यात पर्यटकांची ओघ आणखी वाढण्याची शक्यता आहे.

कोल्हापूरचे वातावरण आल्हाददायक आहे. सध्या उन्हाचे चटके जाणवत असले, तरी इतर शहरांच्या तुलनेत कोल्हापुरात वातावरण चांगले असते पर्यटकांचे मत आहे. त्यामुळे उन्हाळ्याची असो किंवा दिवाळीची पर्यटक कोल्हापूरला पहिली पसंती देतात. त्याबरोबरच अंबाबाईच्या दर्शनासाठीही येणाऱ्या भाविकांची संख्याही वाढली आहे. रात्री आपल्या गावी परतण्यापेक्षा कोल्हापुरात हॉटेल्सवर राहणे पर्यटक पसंत करत आहेत. तसेच महालक्ष्मीचे दर्शन घेऊन दुसऱ्या दिवशी सकाळी गोव्याला किंवा कोकणात जाणे किंवा गोव्याहून परतताना कोल्हापुरात एक रात्र हॉल्ट घेऊन सकाळी अंबाबाईचे दर्शन घेऊन आपल्या गावी परतण्याचा पर्यटकांचा बेत असतो.

गेल्या दोन दिवसांत पर्यटकांचा कोल्हापुरातील ओघ वाढू लागला आहे. हॉटेल्समध्ये बुकिंग झाले असून, या विकेंडला कोल्हापूर हाउसफुल्ल होण्याची शक्यता आहे. दर वर्षी डिसेंबरचा आणि मे महिन्याचा शेवटचा आठवडा आणि दिवाळीनंतरचा आठवडा कोल्हापुरात पर्यंटकांची गर्दी असते, अशी माहिती हॉटेल व्यवसायिकांनी दिली.

शहरात उच्च दर्जाची २५ तर मध्यम दर्जाची ४३ हॉटेल्स आहेत. त्याबरोबरच छोटी २५ हॉटेल्स आहेत. याठिकाणी राहण्याची सोय होते. उच्च दर्जाच्या हॉटेल्समध्ये १ हजारांपासून ५ हजारांपर्यंत, मध्यम दर्जाच्या हॉटेलमध्ये ५०० रुपयांपासून २ हजारांपर्यंत तर सर्वसाधारण हॉटेलमध्ये ३०० ते १००० रुपयांपर्यंत रुम्स उपलब्ध आहेत. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी महालक्ष्मी धर्मशाळेमध्येही थांबण्याची व्यवस्था करण्यात येते. याठिकाणी अत्यंत कमी खर्चात राहण्याची व्यवस्था होते. गेल्या दोन दिवसांत त्या ठिकाणीही पर्यटकांची गर्दी अनुभवायला मिळाली. पुढील पाच दिवसांत ही गर्दी आणखी वाढण्याची अपेक्षा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरपालिका अर्जांची आज छाननी

$
0
0

इचलकरंजी -

नगरपालिका निवडणुकीसाठी दाखल अर्जांची छाननी प्रक्रिया बुधवारी (ता.२) होत आहे. त्यामध्ये कोण राहणार आणि कोणाचा पत्ता कट होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. येथील अर्जांची संख्या पाहता छाननीची प्रक्रिया प्रदीर्घकाळ सुरु राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यादृष्टीने प्रशासनानेही जय्यत तयारी केलेली आहे., दरम्यान, निवडणूक विभागाने दाखल माहितीसाठी अर्जांची यादी लावताना अनेक उमेदवारांची कागदपत्रेच भित्तीफलकावर न लावल्याने संबंधित उमेदवाराच्या विरोधात कोणत्या आधारे आक्षेप घ्यावयाचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. बुधवारी सकाळी ११ वाजल्यापासून नगरपालिका सभागृहात छाननी सुरु करण्यात येणार आहे. अर्जांची संख्या लक्षात घेता नगरपालिका प्रशासनाने जय्यत तयारी केली असून रात्री उशीरापर्यंत तयारीचे काम सुरु होते. एकावेळेला एकाच प्रभागातील छाननी होणार असून उमेदवारासोबत एक सूचक व लेखी प्राधिकृत प्रतिनिधी अशा तिघांना प्रवेश दिला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कागलमध्ये भाजप सेना युती होणारच’

$
0
0

कागल

‘कागल नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप- शिवसेनेची आघाडी होणारच आहे. या आघाडीमध्ये माजी आमदार संजय घाटगे यांचा समावेश आहेच. महाआघाडी येत्या दोन तीन दिवसात पूर्णत्वास येणार आहे. याबाबत चर्चा सुरू आहे. मंडलिक गटाचा कागलमधील निवडणुकीबाबतचा प्रश्न लवकरच सुटेल आणि ही आघाडी समर्थपणे निवडणुकीत उतरेल,’ असा विश्वास भाजपचे नेते समरजितसिंह घाटगे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

कागलमधील गोसावी समाजातील कार्यकर्त्यांनी समरजितसिंह घाटगे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश झाला. प्रवेशानंतर झालेल्या पत्रकार बैठकीत घाटगे बोलत होते. बैठकीस विरेंद्रसिंह घाटगे, भाजप शहराध्यक्ष अरूण सोनुले व अन्य उपस्थित होते.

घाटगे म्हणाले, ‘सोशल मिडीयाच्या माध्यमातून निवडणुकीबाबत अनेक बातम्या व्हायरल होत होत्या. त्यामुळेच मी व संजय मंडलिक दोघेही कागलमध्ये लोकांसमोर आलो. त्यामुळे लोकांमध्ये झालेली संभ्रमावस्था दूर झाली. भाजप सेनेसह इतर मित्र पक्ष यांची युतीही होणारच आहे. हे येत्या दोन दिवसात स्पष्ट होईल. महाआघाडी आकारास येण्यासाठी माजी आमदार संजय घाटगे यांचा वाटा मोठा आहे. कागलमधील मंडलिक गटातील अंतर्गत गुंता सुटल्यानंतर ही महाआघाडी स्पष्ट होईल.’

गोसावी समाजाचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रकाश मकवाने व त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचा उल्लेख करीत घाटगे म्हणाले, ‘सामाजिक मानसन्मान राखला पाहिजे, असे गोसावी समाजास मनोमनी वाटत असते. आपलीही मुले इतरांप्रमाणेच शिकून मोठी झाली पाहिजेत. आम्हालाही मुख्य प्रवाहात सामील करून घेतले पाहिजे, व्यसनाधिनता, धाबा संस्कृती, वाईट वळणापासून मुले दूर राहिली पाहिजेत, या अपेक्षेने गोसावी समाज भाजपमध्ये आला आहे. विकासापासून आजपर्यंत दूर ठेवले आहे, अशी या समाजाची भावना आहे. यासाठी या समाजाला कायद्यानुसार मिळणाऱ्या सर्व सुविधा त्यांना देऊन विकास करू व मानसन्मान देवू.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सामाजिक उपक्रमांनी बहारदार दिवाळी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

फटाके, फराळ, नवे कपडे, भेटवस्तू आणि शुभेच्छांचा वर्षाव अशा अमाप उत्साहात दिवाळी साजरी होत आहे. मात्र या पारपंरिक पद्धतीने साजऱ्या केल्या जात असलेल्या उत्सवाला सामाजिक बांधिलकीची जोड देत अनेक संस्था, तालीम मंडळांनी विविध उपक्रम राबवले. सामाजिक उपक्रमांतून दीपावलीचे सण साजरा करताना विधायक पाऊल टाकणाऱ्या मंडळांनी उत्सवाला एक वेगळीच झळाळी दिली.

आर्ट ऑफ लिव्हिंग

आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेच्या कोल्हापूर शाखेतर्फे दरवर्षी दीपावलीत सामाजिक संस्थांना मदत केली जाते. यावर्षी संस्थेने ‘अवनि’ संस्थेला मदत करण्याचा निर्णय घेतला. ‘अवनि’ संस्थेला वंचितांच्या मुलांना शिक्षण दिले जाते. या संस्थेत पुस्तके ठेवण्यासाठी जागा नसल्याने त्यांना कपाटाची गरज होती. डिंपल गजवाणी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. राहुल नागवेकर व अजय किल्लेदार, प्रलव लोळे यांनी स्वयंसेवकांकडून वर्गणी गोळा करून साडेआठ हजार रुपये जमा केले. या रक्कमेतून दीपावली पाडव्याच्या दिवशी कपाट देण्यात आले. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या स्वयंसेवकांनी मुलांना फराळाबरोबर चॉकलेट वाटले. यावेळी ‘अवनि’च्या अनुराधा भोसले उपस्थित होत्या.

उत्तरेश्वर पेठ तालमीत एकोपा

मराठा मोर्चावेळी मुस्लिम समाज मोठ्या संख्येने रस्त्यांवर उतरला होता. हा एकोपा सर्व जाती धर्मात टिकला पाहिजे या उदात्त भावनेतून उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळाच्यावतीने सामूहिक फराळाचे आयोजन करण्यात आले. उत्तरेवर पेठ तालमीच्या परिसरातील मुस्लिम बांधवांची मोठी वस्ती आहे. सर्व जाती धर्मात सलोखा रहावा यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, असे तालमीचे अध्यक्ष विनायक साळोखे यांनी सांगितले. भाऊ घोडके यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम यशस्वी करण्यात आला. यासाठी राजू मेवेकरी यांची साथ मिळाली. रघुनाथ साळोखे, किरण पोवार, युवराज जाधव, सुनिल जाधव, गौतम जाधव यांनी उपक्रमासाठी परिश्रम घेतले.

खोलखंडोबा तालमीजववळ

‘एक पणती जवानासाठी’

सर्वजण दिवाळी साजरी करत असताना सीमेवर जवान डोळ्यात तेल घालून सीमेचे रक्षण करत आहेत. पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करून गोळीबार सुरू केला आहे. या गोळीबाराला भारतीय सैनिक प्रत्युत्तर देत आहेत. या सैनिकांविषयी आदरभाव व्यक्त करण्यासाठी खोलखंडोबा तालीम परिसरातील नागरिकांनी ‘एक पणती जवानासाठी’ या उपक्रमाचे आयोजन केले होते. कलाकार महेश पोतदार यांनी अमर जवान रांगोळी रेखाटली होती. परिसरातील नागरिक घरातून पणती घेऊन आले होते. पणती पेटवून जवानांविषयी आदर व्यक्त करण्यात आला. शहीद जवानांसाठी एक मिनीट मौन पाळून आदराजंली वाहण्यात आली. परिसरातील मुलांनी पथनाट्यही सादर केले. प्रा. अरुण चव्हाण, माधुरी करंबे, मोहन सरवळकर यांनी सैनिकांविषयीची मनोगते व्यक्त केली. या उपक्रमाचे आयोजन सुनील करंबे, विजय पेंटर, नितीन मुधाळे, प्रियांक ससे, शामली कालेकर, आरती पेडणेकर यांनी केले होते.

‘बचपन’कडून ‘अवनि’ला मदत

सानेगुरुजी वसाहत येथील बचपन प्ले स्कूलमधील विद्यार्थ्यांनी फटाके व इतर गोष्टींना फाटा देऊन निसर्गपूरक दीपावली साजरा करण्याचा निर्णय घेतला. शाळेने बचतीच्या माध्यमातून जमा झालेल्या रक्कमेतून अवनि संस्थेला वॉटरफिल्टर, फराळ, वह्या, शालोपयोगी वस्तू, कपडे या वस्तूंची मदत केली. संचालक रवींद्र कुंभार यांच्या मार्गदर्शनातून मुख्याध्यापक सीमा पाटील, विशाखा सुर्वे, गायत्री निकम, यांच्यासह पालकांनी उपक्रमाचे नियोजन केले.

कोंडाओळ शिवसेनेची एकटी संस्थेला मदत

शिवसेनेच्या कोंडाओळ शाखेने दीपावली सण साजरा करताना एकटी संस्थेतील लहान मुले व मुलांना मदत करण्याचा निर्णय घेतला. शाखेच्यावतीने १५० जोड नवे कपडे, काही जुने कपडे संस्थेला देण्यात आले. यावेळी शाखाप्रमुख मुकुंद मोकाशी, उप शहरप्रमुख अमोल बुढ्ढे, भगवान कोंडेकर, विवेक बुढ्ढे, मुन्ना गुरव उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एक दिवाळी सर्वांसाठी उपक्रमाला प्रतिसाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

एक दिवाळी सर्वांसाठी उपक्रमातून समाजातील सर्वांची दिवाळी आपल्यासारखीच साजरी करण्याच्या हेतूने कसबा तरुण मंडळ आणि महाद्वार रोडवरील कॉर्नर मित्र मंडळाच्यावतीने अनोखा उपक्रम राबविण्यात आला आहे. आपले जुने कपडे, साडी, शूज, लहान मुलांची जुनी खेळणी व कपडे कसबा गेट चौक येथे देऊन जावेत आणि ज्यांना परिस्थितीमुळे दिवाळी साजरी करणेही अवघड आहे, अशा गरजू लोकांनी ती तेथुन घेऊन जावेत असे आवाहन माणुसकीची भिंत उपक्रमातून करण्यात आले. त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

कृपया आपले वापरात नसलेले, पण चांगले कपडे, शूज, चप्पल, चादर, स्वेटर, खेळणी आपण जमा करून त्यांची दिवाळी साजरी करूया असे आवाहन करण्यात आले होते. गंगावेशीत कसबा गेट चौक येथे प्रशांत पाटील, शिवानंद तोडकर, महेश कोठावळे आदी हा उपक्रम राबवत आहेत. आपणही या सामाजिक उपक्रमाचा हिस्सा बना असे आवाहन संयोजकांच्यावतीने करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आग विझवण्यासाठी धावणार मोटारबाइक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरातील वाहनांची वाढती गर्दी, रस्त्यांवरील पार्किंग आणि मोठ्या प्रमाणात वाढलेली अतिक्रमणे यामुळे एखाद्या दुर्घटनेवेळी अॅम्ब्युलन्स किंवा फायर फायटरची गाडी तत्काळ नेता येणे अवघड झाले आहे. महापालिका अग्नीशमन विभागाकडे वाहने असले तरी ती अरूंद रस्त्यामुळे आवश्यक तेथे पोहोचतीलच, अशी खात्री देता येत नाही, हे आजचे वास्तव आहे. त्यामुळे एखादी मोठी दुर्घटना होऊन प्रचंड नुकसान होऊ शकते. याचा विचार करून महापालिकेच्यावतीने जिल्हा नियोजन मंडळाला बॅकपॅक वॉटर मिस्ट फायर सिस्टम आणि माउंटिंग कीटसाठीचा प्रस्ताव सादर केला होता. त्याला नियोजन मंडळाने मान्यता दिली आहे. त्यामुळे अरुंद रस्ते किंवा गल्लीबोळांत घडणाऱ्या आगीच्या घटनांवर तत्काळ नियंत्रण आणता येणार आहे.

गल्लीबोळात व गर्दीच्या ठिकाणी आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या बंबांना संकटांचा सामना करावा लागतो. नव्या प्रस्तावानुसार बॅकपॅक वॉटर मिस्ट फायर सिस्टीम व माउंटिंग कीटला मान्यता मिळाली आहे. त्यासाठी सुसज्ज मोटारबाइक असणार आहे. त्यासाठी अग्निशमन दलाचे दोन जवान कार्यरत असतील. आगप्रतिबंधक कीटनी सुसज्ज असलेली ही मोटारबाइक गल्लीबोळांत सहज नेता येणार आहे. त्यामुळे आगीच्या ठिकाणी लवकर पोहोचता येणार आहे. हे कीट लवकरच अग्निशमन दलात दाखल होणार आहे.

कोल्हापूर महापालिकेच्या अग्निशमन विभागात सेवेसाठी बुलेट वाहनांकरिता बॅकपॅक वॉटर मिस्ट फायर फायटर सिस्टीम व माऊटिंग कीटचा प्रस्ताव सादर केला होता. अग्निशमन सेवा व आणीबाणीच्या सेवा बळकटीकरण योजनेखाली या कीटला परवानगी मिळावी, अशी मागणी करण्यात आली होती. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे हा प्रस्ताव पाठवला होता. प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता देण्याची मागणी आमदार सतेज पाटील यांनी केली होती.

जुन्या पेठांमध्ये अरूंद रस्ते आहेत. आगीसारखी दुर्घटना घडली तर ट्रॅफिक जॅमच्या कचाट्यातून सुटका करीत अग्निशमन दलाचे बंब नेताना मोठी कसरत करावी लागते. गल्लीबोळांत पाइप टाकून पाण्याचा फवारा मारावा लागतो. अनेकदा गर्दीच्या ठिकाणी मोटारी किंवा मोटरसायकल पेट घेतात. अशावेळी वेगाने आपत्कालीन यंत्रणा राबवण्यासाठी अशा सिस्टीमची गरज होती. आता या प्रस्तावाला परवानगी मिळाल्याने ‌अग्निशमन दलाचे काम सोपे होणार आहे.

मुख्य अग्निशमन अधिकारी रणजित चिले म्हणाले की, मुंबई, पुणे, नाशिक या शहरात या कीटचा वापर केला जातो. बुलेट किंवा मोटारसायकलवर हे कीट असते. जवानांच्या पाठीवरील वॉटर मिस्ड गनव्दारे आग विझवता येते. पाण्याला हवेचे प्रेशर देऊन कमी पाण्यात आग विझवता येते. शहरातील अरुंद गल्ल्या आणि बोळांत या कीटचा वापर चांगला वापर करता येईल.

===

मोटारसायकलसह या आगप्रतिबंधक ‌कीटची किंमत सहा लाखाच्या आसपास आहे. महापालिकेने जिल्हा नियोजन मंडळाकडे तीन कीटची मागणी केली आहे. शहरातील तीन फायर स्टेशनवर हे कीट ठेवण्यात येतील.

रणजित चिले, मुख्य अग्निशमन अधिकारी, महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाडवा, भाऊबिजेला कोट्यवधींची उलाढाल

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर आणि भाऊबिजेनिमित्त सोने-चांदी, मोबाइलसह इलेक्ट्रॉनिक बाजारपेठेत करोडोंची उलाढाल झाली. ग्राहकांना आकर्षक योजना, नव्या तंत्रज्ञानने भरपूर नवनवीन उत्पादने आणि बँका व फायनान्स कंपन्यांकडून मिळणाऱ्या कर्जसुविधांचा फायदा घेत ग्राहकांनी खरेदीचा मनमुराद आनंद लुटला. दोन दिवसांत जिल्ह्यात एकूण दोनशे ते अडीचशे कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे.

यंदा दिवाळी पाडव्याच्या खरेदीत मोबाइल आणि सोन्याबरोबरच ऑटोमोबाइल बाजारपेठेत मोठी उलाढाल झाल्याचे दिसत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा एकूण बाजारपेठेत काही टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसत होते. सोने खरेदीसाठी गुजरीत दिवसा थोडी तुरळक गर्दी दिस होती. मात्र, सायंकाळी गुजरीतील सर्व दुकाने गर्दीने ओसंडून वाहत होती. परिसरात पार्किंगची मोठी समस्या असल्याने ग्राहकांना त्याचा थोडा त्रास झाला. तसेच या परिसरातील वाहतूक सायंकाळनंतर थोडी मंदावल्याचे दिसत होते.

इलेक्ट्रॉनिक उत्पादनांच्या खरेदीसाठी टेंबे रोड, राजारामपुरी, शाहूपुरी, महाद्वार रोड येथील शोरूम्स गर्दीने फुलली होती. व्यापाऱ्यांनी खरेदीवर विशेष सवलती आणि ऑफर्सही दिल्यामुळे खरेदीला सवलतींची झालर होती. यामध्ये मोबाइल फोन, टॅब, लॅपटॉप यासह गृहोपयोगी वस्तूंमध्ये फ्रीज, वॉशिंग मशीन, घरगुती आटा चक्की, व्हॅक्युम क्लिनरच्या नवीन मॉडेल्सना मागणी होती. याच्या जोडीला बँका आणि फायनान्स कंपन्यांनी अगदी शून्य टक्के दराने अर्थपुरवठा करण्याची तयारी दर्शवून ग्राहकांना संधी उपलब्ध करून दिली त्याचा ग्राहकांना फायदा झाला. शहरातील काही शोरूममध्ये अगदी ९९९ रुपये भरून वस्तू घरी घेऊन जाण्याची संधी देण्यात आली. उर्वरित किंमत हप्त्यांमध्ये भरून घेण्यासाठी फायनान्स कंपन्या पुढे आल्या. त्यामुळे वस्तूची पूर्ण रक्कम हातात नसूनही ग्राहकांना ती घरी घेऊन जाता आली. काही लकी ड्रॉदेखील जाहीर करण्यात आले होते. त्यातून पुन्हा एखादी वस्तू किंवा पुढील खरेदीसाठी कुपन्स देण्यात आली. याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद होता. मुहूर्ताने खरेदी केलेले हे साहित्य ग्राहकाच्या घरापर्यंत पोहचविण्यासाठी शोरूम मालकांना आणि कर्मचाऱ्यांना कसरत करावी लागत होती. या घरपोच सेवेमुळे माल वाहतूक करणाऱ्या छोट्या व्यवसायिकांची अक्षरशः चांदी झाली.

दुचाकी, चारचाकी गाड्यांच्या खरेदीचा वेगही मोठा होता. ग्राहकांनी हजारोंच्या संख्येने दुचाकी खरेदी केल्या. तर, चारचाकी गाड्यांमध्ये ग्राहकांची पहिली पसंती राहिली. कोल्हापुरातील चारचाकी गाड्यांच्या विक्रीतही यंदा वाढ दिसून आली. ऑटोमोबाईल क्षेत्रात जिल्ह्यात ४०-४५ कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज या व्यवसायिकांनी व्यक्त केला आहे.

मोबाइल खरेदीसाठी गर्दी

पाडवा खरेदीच्या बाजारपेठेत स्मार्टफोन खरेदीकडेच ग्राहकांचा ओढा असल्याचे दिसून आला. आय फोन्ससह स्मार्ट फोनची नवी रेंजही बाजारपेठेत आली असून ऑनलाइन मार्केटच्या स्पर्धेला शहरातील इलेक्ट्रॉनिक डीलर्सनी जोरदार टक्कर दिली. अगदी २२५० पासून ७४ हजारांपर्यंतचे हँडसेट बाजारात मोठ्या प्रमाणात विकले गेले. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत मोबाइल फोन शोरूम्समध्ये स्मार्टफोन खरेदीसाठी गर्दी होती. मोबाइल्स खरेदीसाठीही बँका आणि फायनान्स कंपन्यांकडून अर्थ पुरवठा होत असल्याने महागातील महाग मोबाइलही खरेदी करण्याची संधी सामान्य ग्राहकांना मिळाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ऊसदरप्रश्नी समिती, आज पुन्हा बैठक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

एकरकमी एफआरपीबरोबर जादा रकमेच्या पहिल्या उचलीच्या ऊस दराबाबत मंगळवारी बोलवण्यात आलेली दुसरी बैठक अनिर्णित राहिली. कारखानदार व संघटना यांच्यात एकमत होत नसल्याने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विविध संघटना, साखर कारखानदारांचे प्रतिनिधी व कार्यकारी संचालक अशी बारा प्रतिनिधींची समिती नेमण्यात आली. या समितीची जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बुधवारी (२ नोव्हेंबर) दुपारी दोन वाजता बैठक होत आहे. दरम्यान, कळे परिसरात तसेच हातकणंगले परिसरात काही ठिकाणी ऊस तोडी रोखण्याबरोबरच वाहनांच्या टायरची हवा सोडण्याचे प्रकार झाल्याने आंदोलनाचे वातावरण तयार होत आहे. बैठक सुरू असल्याने शिवसेनेने मात्र बुधवारचा ‘महामार्ग रोको’ स्थगित केला आहे.

दराबाबत पालकमंत्री पाटील यांनी पुढाकार घेऊन रविवारी कारखानदार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बैठक घेतली. त्यावेळी संघटनेने ३२०० रुपयांचा आग्रह धरला. एफआरपीपेक्षा जादा दर देण्यास कारखानदार तयार नसल्याने तोडगा निघाला नाही. त्यासाठी अन्य संघटनांनाही बोलवून मंगळवारी पुन्हा बैठक बोलवण्याचे ठरले होते. त्यानुसार दुपारी सर्किट हाऊसच्या सभागृहात पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी शेतकऱ्यांच्यावतीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी, शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील, शिवसेनेचे संजय पवार, विजय देवणे, सकल शेतकरीचे दत्तात्रय काळे, भारतीय किसान संघाचे मदन देशपांडे यांच्यासह अन्य प्रतिनिधी उपस्थित होते. तर कारखानदारांच्यावतीने आमदार हसन मुश्रीफ, सतेज पाटील, चंद्रदीप नरके, समरजीतसिंह घाटगे, माधवराव घाटगे, अशोक चराटी, प्रकाश आवाडे, जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे आदी उपस्थित होते.

हंगाम संपल्यानंतर ताळेबंद काढून एफआरपीपेक्षा जास्त असल्यास दिली जाईल, अशी भूमिका कारखानदारांनी घेतली. मात्र संघटनांच्यावतीने जे मिळतील, त्याचा अंदाज करुन आता अॅडव्हान्स द्या असे मत मांडले. आमदार नरके यांनी आमचा ऊस अडवला जातो व दुसरीकडे लाखाचे गाळप झाले आहे असे सांगत शेट्टी व रघुनाथदादा पाटील यांना हे बरोबर नसल्याचे मत मांडले. बंद करायचा निर्णय घ्यायचा तर सर्वांसाठीच घ्या अन्यथा साऱ्यांना सुरु करु द्या, असेही सांगितले. मुश्रीफ यांनी यंदा ११० दिवसच हंगाम चालणार असल्याने दोन ते तीन महिने कर्मचारी बसून राहतील. त्याचा खर्च कसा परवडणार याचा विचार करा. कारखान्यांसाठी सीए नेमा व त्यांच्याकडून ताळेबंद तपासून घ्या. दरवर्षी दराची घासघीस करण्यापेक्षा एकदाच सर्व वस्तूस्थिती समोर आणा, असे उद्वेगाने सांगितले.

याबाबत तोडगा निघू न शकल्याने जादाची रक्कम किती व केव्हा द्यायची हे निश्चित करण्यासाठी समिती नेमण्याचे ठरवण्यात आले. समितीची तातडीने बुधवारी दुपारी दोन वाजता बैठक घेऊन निर्णय देण्यास सांगितले. दरम्यान, निर्णय न झाल्यास ४ नोव्हेंबरला तावडे हॉटेल येथे आंदोलन केले जाईल, असा इशारा जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी दिला आहे.

अशी आहे समिती

कारखानदार ः सतेज पाटील, समरजीतसिंह घाटगे, चंद्रदीप नरके, प्रकाश आवाडे.

जिल्हा बँक प्रतिनिधीः हसन मुश्रीफ

संघटना प्रतिनिधी ः राजू शेट्टी, रघुनाथदादा पाटील, विजय देवणे, दत्तात्रय काळे, मदन देशपांडे.

कार्यकारी संचालक ः विजय औताडे, पी. जी. मेढे

हे संघटनेचे आंदोलन नव्हे

जिल्ह्यात काही ठिकाणी तोडी रोखण्याबरोबरच वाहने रोखण्याचे प्रकार होत असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन सुरू केले का? अशी विचारणा खासदार शेट्टी यांच्याकडे केल्यानंतर संघटनेने आंदोलन पुकारले नसल्याचे स्पष्ट केले. संघटना असे लपूनछपून आंदोलन करत नाही. उघडपणे आंदोलन सुरू केल्यानंतर वणवा पेटतो, हा आतापर्यंतचा अनुभव आहे, असे शेट्टी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंबाबाई मंदिर विकासाचा खडतर मार्ग

$
0
0

Janhavi.Sarate@timesgroup.com

Tweet : @ MTjanhavisarate

कोल्हापूर : आपल्या अधिपत्याखाली असलेल्या जमिनी रेकॉर्डवर आणणे, गेल्या सहा वर्षांपासून रिक्त अध्यक्षपद, अंबाबाई मंदिरात सुविधांचा अभाव, मंदिर राज्य संरक्षित होण्यासाठी दुकानदारांच्या हरकतींचा अडथळा आणि मंदिराच्या गाभाऱ्यातील हुंडीचा न्यायालयात प्रलंबित असलेला वाद अशी अनेक आव्हाने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीसमोर आहेत. या अडचणी सोडविण्याबाबत दुर्लक्ष होत असल्याने करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या विकासाचा मार्ग अधिकच खडतर बनला आहे.

जमिनींच्या रेकॉर्डची ४७ वर्षांची प्रतीक्षा

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या अखत्यारित ३०६५ मंदिरे आणि त्यांच्याकडील जमिनी व अन्य संपत्तीच्या देखभालीची जबाबदारी आहे. समितीकडे २५ हजार एकरहून अधिक शेतजमीन आहे. यापूर्वी समितीकडे १७ हजार एकर जमिनीची नोंद होती. संस्थानकाळात शेतकऱ्यांना ९९ वर्षाच्या करारानुसार शेतजमीनी कसण्यासाठी देण्यात आल्या होत्या. या जमिनींचे १९६९ पर्यंतचे रेकॉर्ड नव्हते. त्यानंतर देवस्थान समितीने या जमिनी रेकॉर्डवर आणण्यासाठी प्रयत्न केला. पण गेल्या ४७ वर्षांपासून देवस्थान समितीच्या एकूण किती जमिनी आहेत, याचे रेकॉर्ड अद्यापही अपडेट झालेले नाही. त्यामुळे ठिकठिकाणी शेतजमिनी बळविल्या गेल्याचे प्रकार गेल्या काही वर्षांपासून उघडकीस येत आहेत.

हुंडीचा वाद न्यायालयाच्या दरबारी

करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिराससह कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील मंदिरे समितीच्या नियंत्रणाखाली आहेत. मंदिरातील दानपेटीत तसेच दानपेटी वगळता गाभाऱ्यात दररोज मोठ्या प्रमाणावर देणगी जमा होते. भाविकांकडून कोट्यावधींची देणगी मंदिरांमध्ये देवाच्या चरणी अर्पण केली होते. धन देवस्थानच्या पेटीत जमा व्हावे यासाठी समितीचे प्रयत्न सुरू आहेत. अंबाबाई मंदिरात काही वर्षांपूर्वी देवस्थान समितीने गाभाऱ्यात दोन हुंड्या ठेवल्या. यावरुन श्रीपूजक व देवस्थानचा मोठा वाद झाला आहे. सद्यस्थितीत हा वाद सध्या न्यायालयाच्या दरबारी प्रलंबित आहे.

अध्यक्षपद सहा वर्षे रिक्त

राजकीय श्रेयवाद आणि पक्षीय राजकारणामुळे अध्यक्षपद रखडण्याची स्थिती महायुतीच्या सरकारच्या काळातही कायम आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अध्यक्षपदाबाबत सध्या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यात अध्यक्षपद चर्चेतच अडकले आहेत. एकीकडे देवस्थान समितीचे प्रमुख केंद्र असलेले कोल्हापूर धार्मिक पर्यटनाच्या नकाशावर ठळक होत असताना देवस्थान समितीच्या अध्यक्षपदाची ​खुर्ची सन २०१०पासून, म्हणजेच गेल्या सहा वर्षांपासून रिक्त आहे. सध्या यापदाचा प्रभारी कार्यभार जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी पाहत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांवर देवस्थान समितीच्या अध्यक्षपदाची ही अतिरिक्त जबाबदारी आहे. अंबाबाईच्या मंदिर विकासाच्या दृष्टीने देवस्थान समितीला पूर्णवेळ अध्यक्ष नियुक्त करण्याची गरज आहे.

मंदिर राज्य संर‌क्षित होण्यातील अडथळे

महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुराण वास्तूशास्त्र विषयक स्थळे, अवशेष अधिनियमाच्या कलम ४ च्या पोटकलम १ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांनुसार २० जुलै २०१६ रोजी अंबाबाई मंदिर प्राचीन व ऐतिहासिक स्मारक निर्देशित करण्यात आले. यामध्ये देवस्थान समितीची मंदिरे तसेच मंदिराच्या परिसरात असलेली महंत रामगिरीजीसह इतर सात मंदिरे संरक्षित करण्याची सूचना करण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयावर दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये मंदिर परिसरातील दुकानदारांसह इतरांकडून एकूण २४ हरकती दाखल झाल्या आहेत. अंबाबाई मंदिर राज्य संरक्षित स्मारक होण्याच्या मार्गात मंदिराच्या आवारातील दुकानांचा अडथळा निर्माण झाला आहे. त्यावर तोडगा निघणे आवश्यक आहे.

मंदिर विकासाची प्रतीक्षा

अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक दर्शनासाठी येतात. मात्र शहर परिसरात सुविधांची वानवा आहे. वाहने पार्किंगची व्यवस्था, दर्शन रांगेत बसण्याची व्यवस्था, दर्शन रांगेबाबतचे फलक, मोफत प्रसाद व्यवस्था, भाविकांसाठी यात्रीनिवास सुविधा, भाविकांसाठी ध्यान साधनेसाठी विश्रांतीगृह, देवीचे दर्शन घेतल्यानंतर माफक दरात राहण्याची, भोजनाची सोय अशा अनेक सुविधा भाविकांना देणे आवश्यक आहे. मात्र याकडे दुर्लक्ष झाले आहे.

पोलिस ठाण्याचा प्रश्न प्रलंबित

साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या अंबाबाई मंदिराच्या सुरक्षेसाठी तीन अधिकारी आणि १०२ पोलिसांची नियुक्ती करावी, असा प्रस्ताव सव्वादोन वर्षापूर्वी राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. तर तब्बल आठ वर्षांपासून मंदिरात स्वतंत्र पोलिस चौकीचा प्रस्ताव प्रलंबित आहे. प्रस्तावावर अद्याप निर्णय झालेला नाही. सुरक्षेच्यादृष्टीने संवेदनशील असलेल्या मंदिरात पोलिस चौकी असावी, अशी वारंवार मागणी केली गेली आहे. मात्र याकडे दुर्लक्ष केले गेले आहे. देशात एखादी दहशतवादी हल्ल्याची घटना घडली की मंदिर परिसरात सुरक्षेत वाढ केली जाते. मात्र, येथे कायमस्वरुपी उपाययोजनेकडे गृहखात्याचे दुर्लक्ष आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस निवासस्थाने दुरुस्तीसाठी पाच कोटी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी (ता. २) पोलिस मुख्यालयातील वसाहतीत जाऊन घरांची पाहणी केली. पोलिसांच्या व्यथा जाणून घेत त्यांना दिवाळी भेट दिली. या घरांची तातडीने डागडुजी करण्यासाठी महाराष्ट्र पोलिस हाउसिंग योजनेतून पाच कोटींचा निधीही देत असल्याचे त्यांनी जाहीर केले.

कोल्हापूरसह इचलकरंजीच्या पोलिस वसाहतींमधील १४०० नवीन घरांना राज्य सरकारने परवानगी दिल्यानंतर ही घरे वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी सरकारचे प्रयत्न सरू आहेत.

२४ तास ऑनड्युटी पोलिसांची घरे मोडकळीस आली आहेत. कोल्हापूरसह इचलकरंजीत ब्रिटीशकालीन अपुऱ्या आणि कोंदट घरांमध्ये राहणाऱ्या पोलिसांसाठीच्या १४०० नवीन घरांना राज्य सरकारने परवानगी दिली आहे. वसाहतीतील घरांच्या दुरुस्तीसाठीही निधी देण्याचे नियोजन केले आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री पाटील यांनी बुधवारी पोलिस मुख्यालयातील वसाहतीतीतील घरांची पाहणी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन केली.

यावेळी छोटेखानी कार्यक्रमात बोलताना पालकमंत्र्यांनी घरांच्या दुरुस्तीसाठी पाच कोटी देण्याचे जाहीर केले. ते म्हणाले, ‘पोलिसांना पुरेशी आणि आवश्यक सुविधांयुक्त घरे असतील तर ते कामात पूर्णपणे योगदान देतील. कोल्हापुरातील पोलिसांना घरे मिळण्यासाठी खूपच उशीर झाला आहे. १४०० घरांच्या बांधकामासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यासाठी संबंधित विभागांना सूचना दिल्या आहेत. महिन्याभरात कामाला सुरूवात होईल आणि सहा महिन्यांत वसाहतीचे चित्र पालटेल. ज्या घरांची तातडीने दुरस्ती करणे गरजेचे आहे त्या घरांसाठी महाराष्ट्र पोलिस हाउसिंग योजनेतून पाच कोटी दिले जातील. याचे नियोजन सार्वजनिक बंधाकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी करतील.’

पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी पोलिसांच्या वसाहतींची स्थिती मांडली. ते म्हणाले, ‘कोल्हापुरात गेल्या तीस वर्षात पहिल्यांदाच पोलिसांसाठी नवीन घरे तयार होणार आहेत. दिवाळीनिमित्त थेट पालकमंत्र्यांनी आमच्या वसाहतीत येऊन व्यथा जाणून घेतल्या. त्यामुळे ही दिवाळी आमच्यासाठी अविस्मरणीय ठरली.’

पोलिस उपाधीक्षक सतीश माने यांनी सूत्रसंचलन केले. पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते काही कर्मचाऱ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात दिवाळी भेटवस्तू देण्यात आल्या. पोलिस उपअधीक्षक भारतकुमार राणे, सर्व निरीक्षक, नगरसेविका स्वाती येवलुजे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता एस. एस. साळुंखे आणि कार्कारी अभियंता आर. एस. पाटील उपस्थित होते.

पोलिसाच्या घरी चहापान, जुनी आठवण

पोलिस मुख्यालयातील घरांची पाहणी करताना पालकमंत्री पाटील यांनी पोलिस कॉन्स्टेबल राजेंद्र घाटगे यांच्या घरी चहा घेतला. काही वेळ गप्पाही मारल्या. पोलिसांच्या घरांची अवस्था पाहिल्यानंतर त्यांनी आपले मुंबईतील जुने दिवस आठवल्याचे आवर्जून सांगितले. ‘आठ बाय दहाच्या खोलीत आई-वडिलांसह सात बहिणींचे कुटुंब कसे राहते, याचा अनुभव मी घेतला आहे. पोलिसांचे स्थिती त्यापेक्षा वेगळी नाही’ असे सांगत पालकमंत्र्यांनी आठवणींना उजाळा दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऊसदरावर तोडगा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

उसाला एकरकमी एफआरपीबरोबर टनाला १७५ रुपयाप्रमाणे जादा रकमेची पहिली उचल घेण्याचे शेतकरी संघटनांनी मान्य केल्याने ऊसदरप्रश्नी बुधवारी तोडगा निघाला. जिल्ह्यात एफआरपीची सरासरी २५५० रुपये असून तोडग्याप्रमाणे टनाला सरासरी २७५० रुपयापर्यंत पहिली उचल मिळणार आहे. ज्या कारखान्याचा उतारा जास्त असेल तिथे जादा दर मिळणार आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मध्यस्थीने चार दिवसांपासून साखर कारखानदार, संघटनांमध्ये सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला. भविष्यात दर मिळण्याची शक्यता व पहिली उचल गेल्यावर्षीपेक्षा जास्त मिळाली असली तरी संघटनांनी केलेल्या मागणीपेक्षा ती फारच कमी असल्याने शेतकऱ्यांचा मात्र अपेक्षाभंग झाला आहे.

दरम्यान, गेल्या हंगामातील उर्वरित दराबाबत चर्चा अपेक्षित असताना बैठकीत ती टाळून सध्याच्या दराबाबत चर्चा करत असल्याचे सांगून हे मान्य नसल्याने सकल ऊस उत्पादक ऊस परिषदेचे प्रतिनिधी बाहेर पडले. पाच नोव्हेंबरला शिरोळमध्ये होणाऱ्या ऊस परिषदेत पुढील दिशा स्पष्ट केली जाईल, असे परिषदेच्यावतीने सांगण्यात आले.

कारखानदार पहिल्या बैठकीत एफआरपी एकरकमी देण्यावर सहमत झाले होते. शेतकरी संघटनांकडून मात्र त्यावर जादा उचल मिळाली पाहिजे, असे सांगितले होते. या मुद्द्यावरुन दोन बैठक झाल्या. त्यात तोडगा निघाला नसल्याने समिती नेमण्यात आली. समितीची बुधवारी दुपारी दोन वाजता बैठक झाली. सुमारे तीन तासांच्या चर्चेनंतर या प्रश्नावर तोडगा निघाला. त्यानंतर पालकमंत्री पाटील यांनी खासदार राजू शेट्टी, रघुनाथदादा पाटील, आमदार हसन मुश्रीफ, सतेज पाटील,चंद्रदीप नरके, प्रकाश आवाडे, समरजीतसिंह घाटगे, माधवराव घाटगे यांच्या उपस्थितीत पत्रकारांना निर्णयाची माहिती दिली.

बैठकीत एफआरपीपेक्षा जादा किती रक्कम द्यायची यावरच सुरुवातीपासून चर्चा झाली. कारखानदारांकडून शंभर रुपयेच दिले जातील, असे मांडले जात होते. मात्र संघटनांचा तीनशे ते पाचशे रुपयापर्यंत जादा दराचा आग्रह होता. याबाबत मोलॅसिस, को-जनरेशन, डिस्टलिरी, बगॅस या साऱ्यांचाच दर वाढणार असल्याने तीनशे रुपयांवर जादा दर देण्यास काहीच अडचण नसल्याचे कारखानदारांना पटवून सांगण्यात येत होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कारखान्यांना मिळणाऱ्या फायद्याचा विचार करुन एफआरपीबरोबर देता येणारी रक्कम सांगावी, असे सांगितले. त्यावर चर्चा होऊन १७५ रुपयांचा तोडगा समोर आला. संघटनांकडून याबाबत सहमती नसल्याचे समजते. पण, यंदा कमी असलेला ऊस, तो कर्नाटकात गेल्यास कारखान्यांना बसणारा फटका, त्यातून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान यावर पालकमंत्र्यांनी ​विचार करायला सांगितल्यानंतर अखेर यावर सहमती दर्शवण्यात आली. ही रक्कम व एफआरपी अशी पहिली उचल द्यावी. तीन महिन्यानंतर पुन्हा साखर दराचा आढावा घेण्यात येऊन अंतिम दराबाबतचा निर्णय घेण्यात येईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

...

सरकारकडून होणार मदत

एफआरपीपेक्षा जादा रक्कम देण्याबाबत ऊस दर नियंत्रण समितीची परवानगी मिळवून देणार

राज्य बँकेकडून मूल्यांकनापैकी ८५ ऐवजी ९० टक्के उचल देण्याची व्यवस्था करणार

एफआरपीच्या कर्जावरील सवलतीच्या योजनेची जबाबदारी खासदार शेट्टी यांनी स्वीकारली

...

कारखान्यांच्या पळवाटांसाठी उपसमिती

एफआरपीप्रमाणे व ७०/३० प्रमाणे ऊस दर देण्याचे कायदे असले तरी कारखानदारांकडून पळवाटा शोधल्या जातात. त्या रोखण्यासाठी उपाययोजनेची मागणी यावेळी करण्यात आली. त्यानुसार पालकमंत्री म्हणाले, ‘काटामारी, उतारा कमी दाखवणे, वाहतूक तोडणी खर्च जादा दाखवणे यावर नियंत्रण आणण्यासाटी ऊस दर नियंत्रण समितीत उपसमिती नेमण्यात येईल. त्यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव ठेवला जाईल. शेतकऱ्यांच्या खिशातील रक्कम कापली जाणार नाही.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तडजोडीने शेतकऱ्यांच्या अपेक्षा फोल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

एफआरपीसह एकरकमी पहिली उचल तसेच अंतिम दर तीन हजार रुपयांपेक्षा जास्त अशी मागणी असताना त्याच्यापेक्षा कमी रकमेवर झालेल्या तडजोडीमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अपेक्षांना सुरुंग लागला. बुधवारच्या बैठकीत शेतकरी संघटना व स्वाभिमानी शेतकरी संघटना या दोन मोठ्या संघटनांनी सहमती दाखवल्याने ही तडजोड झाली. साखरेचे दर चढे राहणार असल्याने हंगाम संपल्यानंतर जादा रक्कम मिळेल, असा विश्वास संघटनेच्या नेत्यांना आहे. पण ही रक्कम पदरात पाडून घेण्यासाठी बैठकीत सरकार अथवा कारखानदारांकडून काही हमी घेतलेली नाही. त्यामुळे पूर्वीप्रमाणे पुढील उचल मिळणार का? की पुन्हा शेतकऱ्यांच्या पदरी उपेक्षाच हाही प्रश्नच आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी ऊस परिषदेत ३२०० रुपयांचा दर मागितला होता. तर शेतकरी संघटनेच्या रघुनाथदादा पाटील यांनी सध्याचे साखरेचे दर पाहता ३५०० रुपये दर मिळालाच पाहिजे, असा मुद्दा मांडला होता. शेकाप, बळीराजा संघटना किसान सभा यांनीही ३ हजारांवर मागणी केली होती. यामुळे स्वाभिमानीने यापूर्वी ऊस दरासाठी केलेल्या आंदोलनामुळे यंदा ३२०० रुपयांची मागणी केली असली तरी तीन हजार रुपयांवर तरी दर मिळवण्यासाठी आंदोलनाचा धडाका लावला जाणार असे शेतकऱ्यांना वाटत होते. पण शेट्टी यांनी सावध भूमिका घेत इतर संघटना जे निर्णय घेतील त्याला सहमती असेल, आपल्याला चर्चेत घेतले नाही तरी चालेल अशी मांडणी केली होती. यातूनच कारखानदारांनी कायद्याचा आधार घेत एफआरपीपेक्षा जादा देऊ पण हिशोब झाल्यानंतर यावरच ठाम राहण्यास सुरुवात केली. ऊस कमी असल्याने हंगाम लांबल्यास शेतकऱ्याला फटका बसू नये म्हणून संघटनांनी दराची तडजोड केल्याचे बोलले जाते. मात्र या तडजोडीने शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले आहे.

जादा दरामुळे जिल्ह्यात एफआरपीची सरासरी २७५० रुपयापर्यंत जाऊ शकते. मात्र विविध कारखान्यांमध्ये उतारा कमी जास्त असल्याने ही रक्कमही तशीच कमी जास्त होणार आहे. त्यामुळे उचलीची रक्कम सर्वात जास्त २९०० रुपयांच्या आतच असणार आहे. हा दर पाहता यंदा तीन हजारावर पहिली उचल मिळण्याच्या अपेक्षांवर पाणीच फेरले आहे. हंगाम संपल्यानंतरचा हिशोब झाल्यानंतर पुढील हप्ता मिळेल असे सांगण्यात आले. पण तो मिळेल की नाही हे सर्वस्वी साखरेच्या दरांवर अवलंबून असणार आहे. त्याबाबत कारखानदारांकडून हमी घेतलेली नाही हा मोठा धोका समजण्यात येत आहे. गेल्याच हंगामातील रक्कम अजून काही कारखान्यांनी दिलेली नाही. त्यामुळे पुढील हंगामात जादाची रक्कम मिळेल यावरही विश्वास राहिलेला नाही.

खासदार शेट्टी म्हणतात विनाकारण आंदोलन कशाला?

‘सारासार विचार करुन ३२०० रुपयांची मागणी केली होती. नफ्यातील रक्कम मिळणार आहे. पालकमंत्र्यांनी मध्यस्थी करुन अॅडव्हान्स १७५ रुपये घेण्याचा प्रस्ताव ठेवला’ असे सांगून खासदार राजू शेट्टी म्हणाले, ‘पालकमंत्र्यांनी तीन महिन्यांनी आढावा घेत राहू असेही सांगितले. भविष्यात जादा दर मिळणारच आहेच. त्यामुळे त्या दरातील अॅडव्हान्स म्हणून आता ही रक्कम स्वीकारण्याचा प्रस्ताव मान्य केला. संघटनेच्यावतीने लढण्याची तयारी केली होती. पण शेतकऱ्यांना न लढता जर सहज दर मिळत असेल तर विनाकारण आंदोलन करण्यात काय हशील आहे. शेतकऱ्यांना न भांडता न्याय मिळत असेल तर प्रसिद्धीसाठी विनाकारण आंदोलन करण्याचा व शेतकऱ्यांचा नेता, तारणहार म्हणून मिरवणार नाही.’

गेल्यावर्षी एफआरपी वसूल करुच असे सांगणाऱ्या संघटनांनी आता गेल्यावर्षी नफा झाला, त्यातील रक्कम अॅडव्हान्स म्हणून द्या असे सांगत आहेत. याबाबत दोन कायदे स्पष्ट असताना परत आंदोलन कशासाठी? पालकमंत्र्यांनी पुढाकार घेऊन तोडगा काढल्याबद्दल आभारी आहोत. त्यामुळे ५ नोव्हेंबरपासून कारखाने सुरू होतील. सरकार एकीकडे स्टॉक लिमिट घालते व दुसरीकडे ऊसदर एफआरपीप्रमाणे द्या असे सांगते, हे कसे शक्य होईल. भविष्यात साखरेचे दर उतरले तर १७५ रुपये अॅडव्हान्स देणेही अशक्य असल्याची परिस्थिती पालकमंत्र्यांसमोर मांडली आहे. तसेच सरकारकडूनही या तोडग्याबाबत काही निर्णय घेण्यास सांगितले आहे.

हसन मुश्रीफ, आमदार


सदाभाऊ खोत यांच्या घरासमोर आंदोलन

‘गेल्या हंगामात कारखानदारांनी ७५ लाख टन साखर चढ्या दराने विकली. त्यातील जादा फरकाची रक्कम घेण्यासाठी आम्ही आग्रही आहोत’ असे सांगून सकल ऊस उत्पादक परिषदेचे प्रमुख दादासाहेब काळे म्हणाले, ‘याबाबत आम्ही चर्चा करण्यास आलो असताना कारखानदार व पालकमंत्री यांनी त्यावर चर्चा करण्यास नकार दिला. त्यामुळे बैठकीवर बहिष्कार घालून तिथून निघून आलो. आता ५ तारखेला ऊस परिषद घेतली जाणार असून त्यामध्ये पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे. सकल ऊस परिषद ही बिगर राजकीय चळवळ असून ऊस चळवळीसाठीच आंदोलन करणार आहे. ७ तारखेला परिषदेच्यावतीने सदाभाऊ खोत यांच्या घरासमोर आंदोलन केले जाणार आहे.’

पालकमंत्री म्हणाले, कोल्हापूरचा विषय संपला

‘ही बैठक केवळ कोल्हापूर परिसरातील कारखान्यांच्या दराबाबत घेण्यात आली होती. त्यामुळे हा निर्णय येथील कारखान्यांसाठी लागू होणार आहे’ असे सांगून पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘अन्य ठिकाणच्या कारखान्यांनी एकत्र बसून निर्णय घ्यावेत. सर्व संघटनांचे सर्व समाधान करता येणार नाही. सकलचा मुद्दा कायदेशीरदृष्ट्या बरोबर नाही. गेल्या हंगामातील हिशोब पुर्ण झाला आहे. त्याबाबत पुढे विचार करू.’


सर्वसहमतीने निघालेला तोडगा शिवसेनेला मान्य आहे. त्यामुळे आंदोलन करण्याचा प्रश्नच नाही. मात्र साखरेचे भविष्यातील दर चढे राहणार असल्याने कारखानदारांनी त्यानुसार नफा शेतकऱ्यांना द्यावा, ही भूमिका कायम असेल.

विजय देवणे, जिल्हाप्रमुख, शिवसेना


कुंभीची एफआरपी सर्वात जास्त

नव्या तोडग्याप्रमाणे जिल्ह्यातील कारखान्यांच्या एफआरपीसह पहिली उचल किती असेल याची चर्चा रंगली आहे. त्यानुसार कुंभी कारखान्याकडून २८६१ रुपयांची सर्वाधिक पहिली उचल दिली जाणार आहे. तर सर्वात कमी इको केन कारखान्याची २४७५ रुपये आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जवान संग्राम चौगुलेवर आज अंत्यसंस्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

खेबवडे (ता. करवीर) येथील जवान संग्राम दिनकर चौगुले (वय २३) यांचा मंगळवारी (ता. १) सकाळी अरुणाचल प्रदेश येथे अपघाती मृत्यू झाला. चौगुले हे सुटी संपवून २९ ऑक्टोबर रोजी पुन्हा अरुणाचल प्रदेश येथे ड्युटीवर रुजू झाले होते.

अवघ्या चार दिवसांपूर्वीच घरातून गेलेल्या संग्राम चौगुले यांच्यावर काळाने घाला घातल्याने खेबवडेत चौगुले कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गुरूवारी (ता. ३) संध्याकाळपर्यंत मृतदेह गावात पोहोचणार आहे. त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

संग्राम चौगुले हे पाच वर्षांपूर्वी हैदराबाद येथे सैन्यदलात भरती झाले होते. ३११ फिल्ड रेजिमेंटमध्ये कार्यरत असलेले संग्राम हे १४ दिवसांच्या सुटीसाठी गावी आले होते. सुटी संपल्यानंतर ते २८ ऑक्टोबर रोजी पुन्हा अरुणाचल प्रदेशला गेले. ३१ ऑक्टोबर रोजी तेथे पोहोचल्यानंतर सोमवारी (ता. १) सकाळी झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. संग्राम यांचा सहा महिन्यांपर्वीच विवाह झाला होता.

दरम्यान, गुरुवारी सायंकाळपर्यंत त्यांचा मृतदेह खेबवडे येथे पोहोचणार आहे. यानंतर गावातील मुख्य मार्गांवरून अंत्ययात्रा काढण्यात येईल. त्यानंतर अंत्यसंस्कार होणार आहेत. संग्राम यांचा मोठा भाऊदेखील सैन्यात आहे. या घटनेने खेबवडे परिसरात शोककळा पसरली आहे. संग्राम यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन हजारांसाठी डॉक्टरचा खून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गोव्याला जातो असे सांगून घराबाहेर पडलेले, बेपत्ता डॉ. सतीश शांताराम देवूलकर (वय ५५, रा. स्वयंभू गणेश मंदिराजवळ, कोल्हापूर) यांच्या खुनाचा उगडा करण्यात पोलिसांना यश आले. याप्रकरणी उत्तम आण्णा देसाई (३९) आणि तानाजी आनंदा थोरात (२६, दोघेही रा. घरपण, ता. पन्हाळा) या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. डॉ. देवूलकर यांनी नोकरीचे आमिष दाखवून घेतलेले दोन हजार रुपये परत न केल्याच्या रागातून त्यांचा खून केल्याची कबुली संशयितांनी दिली.

डॉ. सतीश देवूलकर हे शुक्रवारी (ता. २८) सायंकाळी सातच्या सुमारास गोव्याला जाण्यासाठी घराबाहेर पडले. त्यानंतर कळे पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पाटपन्हाळा येथील कासारी नदीच्या कोरड्या पात्रात डॉ. देवूलकर यांचा मृतदेह आढळला होता. पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपवला. पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते यांनी तपासासाठी विशेष पथक तयार केले होते. तपासादरम्यान हा खून आर्थिक देवघेवीच्या वादातून झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी संशयित उत्तम देसाई आणि तानाजी थोरात यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीदरम्यान त्यांनी डॉक्टरांच्या खुनाची कबुली दिली. संशयित आणि डॉ. देवूलकर यांची महिन्यापूर्वी ओळख झाली होती. मर्चंट नेवीमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून डॉ. देवूलकर यांनी देसाई याच्याकडून दोन हजार रुपये घेतले. मात्र नोकरीही लावली नाही आणि पैसेही परत केले नाहीत.

या फसवणुकीचा राग मनात धरून देसाई याने शुक्रवारी रात्री डॉ. देवूलकर यांना गोव्यास जाण्यासाठी सीपीआरसमोर बोलवले. तानाजी थोरात याला सोबत घेऊन हे तिघेही (एमएच ०१ एई ३६५२) कारमधून केर्लीजवळ गेले. दोघांनीही डॉ. देवूलकर यांना दारू पाजून मारहाण करीत गळ्यातील सोन्याची चेन आणि मोबाइल हँडसेट काढून घेतला. देवूलकर या घटनेची माहिती पोलिसांना देतील या भीतीने दोघांनीही मलकापूर, अणूस्कुरामार्गे पाटपन्हाळा गावाजवळ त्यांना नेले. कासारी नदीच्या पुलाखाली देवुलकर यांना नेऊन डोक्यात दगड घालून त्यांचा खून केला.

पोलिसांनी गुन्ह्यातील कार जप्त केली असून, यात आणखी कोणी साथीदार होते का याचा शोध सुरू केला आहे. पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते, इलियास सय्यद, उपनिरीक्षक युवराज आठरे, हवालदार सुनील कवळेकर यांनी तपास केला.

दोन हजारांसाठी घेतला जीव?

डॉ. सतीश देवूलकर ओएनजीसीमध्ये मेडिकल ऑफिसर होते. निवृत्तीनंतर ते सोमवार पेठेत भावाच्या घरी राहत होते. गेल्या महिन्यात लक्ष्मीपुरीतील एका चहाच्या टपरीवर उत्तम देसाई आणि त्यांची भेट झाली होती. यावेळी नेव्हीमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून देवूलकर यांनी देसाई याच्याकडून दोन हजार रुपये घेतले. यानंतर चहापाण्यासाठी देसाई याने देवूलकर यांच्यावर खर्च केला. अवघे दोन हजार परत मिळत नसल्याचा राग मनात धरून देसाई याने साथीदाराच्या मदतीने हा खून केल्याचे पोलिसांनी सांगितले. एक महिन्याची ओळख आणि किरकोळ रकमेसाठी झालेला खून यातील विसंगतीमुळे खुनामागे आणखी काही कारणे असू शकतात का, अशी शंका डॉक्टरांच्या नातेवाईकांनी व्यक्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विवाहितेला तरुणांनी वाचवले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रंकाळा तलाव चौपाटीवर फिरण्यासाठी आलेल्या विवाहितेने आपल्या दोन मुलांना काठावर बसवून तलावात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. सुदैवाने मुलांनी आरडाओरड केल्यानंतर परिसरातील तरुणांनी पाण्यात उडी मारून बुडणाऱ्या महिलेस वाचवले. तिला उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. बुधवारी (ता. २) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. रोहिणी पाटील (वय २८ रा. मोरे-माने नगर) असे या महिलेचे नाव आहे.

रोहिणी या बुधवारी साडेअकराच्या सुमारास मोपेडवरून आठ वर्षांची मुलगी आणि सहा वर्षाच्या मुलाला घेऊन रंकाळा चौपाटीवर आल्या. यावेळी त्यांनी वडिलांना फोन करून, मी आत्महत्या करणार आहे असे सांगितले. अर्ध्या तासानंतर, दोन्ही मुलांना भेळ देऊन रोहिणी यांनी पाण्यात उडी मारली. आई पाण्यात बुडत असल्याचे पाहून मुलांनी ओरडण्यास सुरूवात केली. त्यावेळी चौपाटी परिसरात फिरणाऱ्या काही तरुणांनी पाण्यात उड्या मारून रोहिणी यांना बाहेर काढले. त्यांना रिक्षातून सीपीआर रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तातडीने उपचार केल्याने त्यांची प्रकृती सुधारली आहे. डॉक्टरांनी रोहिणी यांच्या वडिलांना फोन करून बोलवून घेतले. कौटुंबिक वादातून तिने हे कृत्य केल्याचा संशय पोलिसांनी वर्तवला आहे. सीपीआर पोलिस चौकीत या घटनेची नोंद झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रोपे सुकली; वृक्षारोपण मोहीम धोक्यात

$
0
0

Maruti.Patil@timesgroup.com

कोल्हापूर : वनमहोत्सवांतर्गत लावण्यात आलेल्या रोपांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार योजनेशी (मनरेगा) सांगड घातली होती. याअंतर्गत जिल्हा परिषदेच्या सव्वालाख व सामजिक वनीकरण विभागाच्यावतीने लावण्यात आलेल्या ७५ हजार अशा दोन लाख रोपांचे जतन होणार होते. तसेच यामुळे स्थानिकांना रोजगारही मिळणार होता. मात्र चार महिन्यानंतरही वृक्षांच्या संवर्धनासाठी ‘मनरेगा’तंर्गत कोणत्याही व्यक्तीची निवड न केल्याने वनमहोत्सवातील रोपे सुकून जाऊ लागली आहेत. त्यामुळे भाजप सरकारच्या ड्रीम प्रोजेक्टची वाटचाल आघाडी सरकारच्या ‘शतकोटी’ योजनेच्या दिशेने सुरू असल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात दिसू लागले आहे.

एक जुलैला भाजप सरकारने राज्यात राबवलेल्या महत्त्वाकांक्षी वनमहोत्सव योजनेंतर्गत जिल्ह्यात सहालाख रोपांची लागवड करण्याचे उद्दिष्ट दिले होते. प्रत्यक्षात जिल्हा प्रशासनाने आठ लाख रोपांची लागवड केल्याचा दावा करत १३३ टक्के उद्दिष्ट पूर्ण केल्याचा अहवाल सरकारला सादर केला होता. जिल्ह्यात झालेल्या वृक्ष लागवडीतील रोपांचे जतन करण्यासाठी योजनेला ‘मनरेगा’शी सांगड घातली होती. याअंतर्गत जिल्हा परिषदेच्यावतीने लावलेली एक लाख २५ हजार आणि सामाजिक वनीकरण विभागाच्यावतीने लावलेल्या ७५ हजार रोपांच्या संवर्धनासाठी प्रत्येकी २०० रोपांसाठी चार व्यक्तींची नेमणूक करण्यात येणार होती. यासाठी त्यांना १८ महिन्यांसाठी १९० रुपयांप्रमाणे चार हजार व्यक्तींची नियुक्ती करण्यात येणार होती. योजनेमुळे रोजगाराच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रत्येक व्यक्तीला पाच हजार ७०० रुपयांप्रमाणे महिन्याला वेतन मिळणार होते.

वनमहोत्सवाची सांगड ‘मनरेगा’ बरोबर घातल्याने सुमारे चारहजार व्यक्तींना रोजगारांसह वृक्षांचे जतनही होणार होते. जुलैमध्ये वृक्षलागवड झाल्यानंतर किमान एक महिन्यानंतर तरी ‘मनरेगा’अंतर्गत व्यक्तींची नेमणूक होण्याची अपेक्षा होती. मात्र चार महिन्यानंतर अद्याप एकाही व्यक्तीची नेमणूक झालेली नाही. सामाजिक वनीकरण विभागाने लावलेल्या ७५ हजार रोपांचे संवर्धन करण्यास विभाग सक्षम असल्याने, या रोपांच्या संवर्धनांसाठी ‘मनरेगा’तून कर्मचाऱ्यांनी नियुक्ती करणार नसल्याचे सांगितले जात आहे. तर जिल्हा परिषदेमार्फत केवळ कागल तालुक्यात अशा व्यक्तींची नियुक्ती केली असल्याचे सांगितले जात आहे. मात्र याबाबतची आकडेवारी कोणत्याही विभागाकडे उपलब्ध नाही.

दोन्ही विभागाच्या दिरंगाईमुळे रोजगाराबरोबरच वनमहोत्सवांतर्गत लावलेल्या वृक्षांच्या अस्तित्वाचाही प्रश्न निर्माण झाला आहे. ऑक्टोबरचा पहिल्या आठवड्यात पडलेल्या परतीच्या पावसानंतर वनमहोत्सवात लावलेल्या रोपांना पाण्याची आवश्यकता भासत आहे. रोपांना पाणीच मिळत नसल्याने रोपे सुकून जावू लागली आहेत. यापूर्वी आघाडी सरकारच्या काळात ‘शतकोटी’ वृक्ष लागवडीतील रोपांची अशीच स्थिती झाल्याने आघाडी सरकारने वनमहोत्सवाची सांगड ‘मनरेगा’ योजनेशी घातली होती. मात्र या योजनेंतर्गत व्यक्तींची नेमणूक केली नसल्याने जिल्ह्यात वनमहोत्सवाचा पुरता बोजवारा उडत असून भविष्यात शतकोटी योजनेप्रमाणेच वनमहोत्सवातील रोपेही शोधण्याची वेळ येणार आहे.

===

सामाजिक वनीकरण विभागाच्यावतीने लावलेल्या रोपांचे संवर्धन करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ आहे. तसेच विभागाच्यावतीने लावलेल्या रोपांचे चांगले संवर्धन झाले आहे. त्यामुळे ‘मनरेगा’तून व्यक्तींची नेमणूक केलेली नाही.

तुकाराम पाटील, उपसंचालक, सामाजिक वनीकरण

००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

किरणोत्सवातील अडथळे कायम

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

शहरातील वाढते प्रदूषण, हवेतील धुलीकण, हिवाळ्यात किरणांची कमी असलेली तीव्रता आणि किरणोत्सव मार्गातील बिल्डींग आणि फलक यामुळे गेल्या काही वर्षांपासून श्री अंबाबाई मंदिरातील किरणोत्सवात प्रदूषण व मानवनिर्मित अडथळे अद्यापही कायम आहेत.

करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातील अनेक वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे मंदिरातील किरणोत्सव. सूर्याच्या दक्षिणायनातील किरणोत्सव बुधवारपासून सुरु होत आहे. नोव्हेंबर व जानेवारी असा दोनवेळा अंबाबाईचा किरणोत्सव सोहळा होतो. नोव्हेंबर महिन्यातील ९, १० व ११ अशा तारखा ठरलेल्या आहेत. यंदाही त्याच तारखेला किरणोत्सव सोहळा होणार आहे. किरणोत्सवाच्या कालाप्रमाणे सूर्यास्ताची किरणे पहिल्या दिवशी मूर्तीच्या चरणांवर, दुसऱ्या दिवशी पोटावर आणि तिसऱ्या दिवशी मुखावर पडतात. मात्र गेल्या काही वर्षांत ही कालप्रक्रिया बदलत असल्याचे लक्षात येत आहे. शहरातील वाढते प्रदूषण रंकाळा परिसरातील दव, हिवाळ्यामुळे किरणाची तीव्रता कमी असल्यामुळे किरणोत्सव सोहळा होण्यास अडथळा येत आहे.

ताराबाई रोड व महाव्दार रोडवरुन मोठ्या संख्येने वाहनांची वर्दळ सुरू असते. त्यांच्या धुरामुळे किरणोत्सवाच्या मार्गात धुलीकणांचे प्रमाण वाढते. यामुळे किरणांची तीव्रता कमी होत असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.

.............

चौकट

नोव्हेंबरमध्ये किरणांची तीव्रता कमी

जानेवारी, फेब्रुवारी आणि नोव्हेंबर या कालावधीत किरणोत्सव दोन पर्वांमध्ये होतो. यापैकी नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या किरणोत्सव काळात सूर्यकिरणांची प्रखरता तुलनेने कमी असते. दिवस लहान होत असल्यामुळे ढगाळ हवामानाचा अडथळाही होऊ शकतो.

..........

किरणांच्या मार्गाची पाहणी ५ नोव्हेंबरपासून

गेल्या काही वर्षांपासून किरणोत्सवात बदल होत असल्याचे दिसून आहे. गेल्यावर्षी एक दिवस आधीच किरणोत्सव सुरु झाला असल्याचे अभ्यासकांनी सांगितले. तसेच या किरणोत्सवात काय अडथळे आहेत याची पाहणी करण्यासाठी विवेकानंद कॉलेजचे विद्यार्थी, अभ्यासक व देवस्थान समितीच्यावतीने रंकाळ्यापासून श्री अंबाबाई मंदिरापर्यंतची पाहणी केली जाणार आहे. ही पाहणी ५ नोव्हेंबरपासून सुरु होणार असून किरणोत्सव ११ नोव्हेंबरला संपल्यानंतरही दोन दिवस पाहणी सुरु राहणार आहे.

............

भिंत पडल्यामुळे काय परिणाम होणार?

महाद्वार रोड परिसरात काही बिल्डींग व फलक किरणोत्सवात अडथळा ठरत होते. काहींनी या काळात ते फलक काढले. मात्र, बिल्डींगचा अडथळा कायम होता. पावसाळ्यात याच परिसरातील कॉर्नरची भिंत पडल्यामुळे यंदा किरणोत्सवात काय बदल होतील, याचाही अभ्यास केला जाणार आहे.

......

अडथळ्यांबाबत ठोस कार्यवाही हवी

किरणोत्सवाबाबत केलेल्या सर्वेक्षणातील काही अडथळे अद्याप हटवण्यात आलेले नाहीत. अडथळे हटवले तर किरणोत्सव पूर्ण क्षमतेने होऊन देवीच्या मुखापर्यंत किरणे पोहचू शकतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

...........
गेल्या पंधरा वर्षांपासून श्री अंबाबाई मंदिरातील किरणोत्सवाचा अभ्यास केला जात आहे. या काळात मार्गावरील फलक काढले जातात. पण हवेतील धुलीकण, वाढते प्रदूषण आणि रंकाळा परिसरात पडणारे दव यामुळे नोव्हेंबरमध्ये प्रखरतेने किरणोत्सव होण्यास अडथळा येत आहे. यासाठी यंदा रंकाळ्यापासून मंदिरापर्यंत अभ्यास केला जाणार आहे.

प्रा. मिलिंद कारंजकर, अभ्यासक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोलापूर जिल्ह्यात दीड लाख ग्राहकांना थकबाकीमुक्तीची संधी

$
0
0


सोलापूर : थकित देयकांमुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या उच्च व लघुदाब वीजग्राहकांच्या थकबाकीमुक्तीसाठी १ नोव्हेंबरपासून महावितरणची योजना सुरू झाली आहे. या योजनेत कृषिपंपधारक व सार्वजनिक नळ योजना वगळता उर्वरित सर्व वर्गवारीतील वीजग्राहकांचा समावेश करण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यात १ लाख ४७ हजार ५२८ वीजग्राहक या योजनेसाठी पात्र असून, थकबाकीमुक्तीबरोबरच त्यांना पुन्हा वीज जोडणी घेण्याची संधी महावितरणने उपलब्ध करून दिली आहे.
ही योजना ३० एप्रिल २०१७ पर्यंत लागू राहणार आहे. या योजनेत थकबाकीदारांना ७५ ते १०० टक्के व्याजाची रक्कम तसेच १०० टक्के विलंब आकार माफ होणार आहे. योजनेच्या पहिल्या तीन महिन्यात थकबाकीदार ग्राहकांनी मूळ थकबाकीच्या रकमेचा भरणा केल्यास व्याज व विलंब आकाराची १०० टक्के रक्कम माफ होणार आहे. तर योजनेच्या पुढील तीन महिन्यात व सहा महिन्यापर्यंत मूळ थकबाकी आणि २५ टक्के व्याजाची रक्कम भरणा केल्यास ७५ टक्के व्याज व विलंब आकाराची १०० टक्के रक्कम माफ होणार आहे.
योजनेच्या पहिल्याच महिन्यात थकबाकीदार ग्राहकांनी मूळ थकबाकीचा भरणा केल्यास त्यांना मूळ थकबाकीमधील ५ टक्के रक्कम परत करण्यात येणार आहे. या योजनेतून थकबाकीमुक्त झालेल्या वीजग्राहकांना त्यांच्या मागणीनुसार त्वरित नवीन वीजजोडणी देण्यात येणार आहे. त्यासाठी सुरक्षा ठेव, सर्व्हिस कनेक्शन चार्जेस, रिकनेक्शन चार्जेसमधून सूट देण्यात येणार आहे. तथापि, सुरक्षा ठेवीची रक्कम वर्षभराच्या वीजवापरानुसार आर्थिक वर्षानंतर आकारण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाबळेश्वर गजबजले

$
0
0

सातारा : महाबळेश्वरचा दिवाळी पर्यटक हंगाम सुरू झाला असून, सर्वत्र पर्यटकांची गर्दी दिसत आहे. सुट्या, लवकर आलेली थंडी यामुळे सहलींची मजा दुणावल्याचे जाणवत आहे.
दिवाळी पाडव्यापासूनच दिवसापासून या पर्यटक महाबळेश्वरला गर्दी करतात. यंदाही महाराष्ट्रासह गुजरातमधून पर्यटक गटागटाने आले आहेत. नौकाविहारासाठी प्रसिद्ध असलेला वेण्णा तलाव असो की, येथील विविध पॉइंट सर्वत्रच या गर्दीने हे नंदनवन फुलून गेले आहे. महाबळेश्वर प्रसिद्ध विविध फळांचे जेम, जेली, सिरप, चिक्की, फज तसेच, कातडी चप्पल, बूट व कातडी चीज वस्तू तसेच विविध प्रकारमया चीज वास्तू आपल्या लाडक्यांसाठी खरेदी करण्यासाठी दिवसभर व रात्री येथील बाजारपेठही या येथे आलेल्या दिवाळी पाहुण्यांनी बहरलेली असते तर फिरण्याचा शीण घालवण्यासाठी पर्यटकांनी येथील विविध ठिकाणच्या आइस गोळा गाड्या, पॅटिस, वडा, कचोरीच्या गाड्यांभोवतीही गर्दी दिसते. ही गर्दी पुढील आठ-दहा दिवस कायम राहील, असे स्थानिकांनी सांगितले.
या दिवाळी हंगामात पर्यटकांसाठी पालिकेने त्याचे रे गार्डन येथील वाहनतळ विनामोबदला पर्यटकांसाठी खुले केल्याने पर्यटकांत समाधानाचे वातावरण आहे. पाचगणीहून महाबळेश्वरकडे येणारा रस्ता तसेच महाबळेश्वर मधील सर्वच रस्त्यांची अवस्था गंभीर असल्याने वाहनधारक स्थानिकांसह पर्यटकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images