Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

साताऱ्यात इतिहास घडविणारखासदार उदयनराजेंचा विश्वास

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सातारा

‘निवडणुका आल्या की, त्याच-त्या लोकांना संधी द्यायची. सर्वसामान्य लोकांनी मोठे व्हायचे नाही का? का मीच पाहिजे खासदार, आमदार, अध्यक्ष, असे कुठे होते का? लोकांनी आम्हाला निवडून दिले आहे. त्यांच्यासाठी काही मागितले, हे आमचे चुकल काय? एकच सांगतो कोणी काहीही म्हणो, या निवडणुकीत ४०-० शून्य असा निकाल लावून पुन्हा इतिहास घडविणार आहे. असे नाही झाले तर खासदारकीचा राजीनामा देईन,’ असा विश्वास खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

सातारा विकास आघाडीच्या ४० उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले मिरवणुकीने पालिकेत आले होते. अर्ज दाखल करून झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले, ‘मी आडमुठेपणा केला असता तर २२ महिने तुरुंगात बसावे लागले नसते. हे कोणामुळे घडते आहे, हे जनतेला सर्वश्रुत आहे. मी आमच्या काकांवर खूप प्रेम करतो. ते ही वेदांतिकाराजेंचा अध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आले होते. त्यांना डावलून मी निर्णय घेतला आहे. कोणाला उमेदवारी अर्ज भरायचे ते भरू द्या.’

दोघांमधील संघर्षाचे नेमके कारण काय, असे पत्रकरांनी विचारले असता खासदार उदयनराजे म्हणाले, ‘संघर्ष हा बरोबरींच्या लोकांमध्ये केला जातो. राजघराणे हे राजघराणे आहे.’ पाच वर्षांत केलेल्या कामांचे मूल्यमापन कसे करणार असास प्रश्न विचारला असता राजे म्हणाले, कामाचे मूल्यमापन करायचे झाले तर वेळ पुरणार नाही. आमचे लाडके बंधुराज आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी कोणती योजना आणली हे त्यांनी सांगावे. माझा दृष्टिकोन व्यापक असतो, मी संकुचित बुद्धीचा नाही. पालिकेत भ्र्रष्टाचार कोणी केला मला माहित नाही. याचे उत्तर जनता मतपेटीतून देईल. सातारकरांना एकच सांगतो, जे केले त्याची पोच पावती नाही मिळाली, तसेच नगराध्यक्षांना मतदान झाले नाही तर अनर्थ होईल.’



नगराध्यक्ष जनता ठरवेल : वेदांतिकाराजे

‘कोण जिंकणार आणि कोण हरणार, लोक ठरवतात. कोण एक जण ठरवत नाही. साताऱ्याची तमाम जनता ठरविणार आहे, त्यांना स्वत:चे निर्णय घेणारा नगराध्यक्ष पाहिजे कि, ‘कटपुतली’ भावली पाहिजे,’ असे मत नगराध्यक्षपदाच्या उमेदवार वेदांतिकाराजे भोसले यांनी व्यक्त केले. दरम्यान, मराठा समाज महाराष्ट्रात एकवटला पण, पालिका निवडणुकीत सातारचे राजघराणे दुभंगल ही दुर्देवाची बाब आहे. खासदारांनी आमच्या थोरल्या वहिनीसाहेबांना उमेदवारी दिली असती तर आम्ही उमेदवारच उभा केला नसता असा टोलाही आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी लगावला. शिंवेंद्रराजे म्हणाले, मनोमिलनाची पहिली बैठक झाली, त्या बैठकीत मागचे विषय काढालचे नाहीत. ते विषय विसरून मनोमिलन केले. भाऊसाहेब महाराज असताना लेवे खून घटना घडली. खासदार उदयनराजेंनी सांगावे हा विषय माझ्या डोक्यात आहे. आम्ही त्यांच्या खासदारकीला, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मदत केली ते चालते. मार्केट कमिटी, तालुका व जिल्हा खरेदी-विक्री संघात तुमच्या लोकांना सामावून घेतले, का तर मनोमिलन होते म्हणून. टाळी एका हाताने वाजत नाही. काही चुका कौटुंबीक अथवा अन्य असतील, ते सांगू शकत नाही. जिल्हा बँकेत त्यांनी माझ्या विरोधात उमेदवार उभे केले व मागे घेतले त्यापासून त्यांच्याविषयी माझ्या मनात कटुता निर्माण झाली, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मनोमिलनाचे तंतोतंत काटेकोरपणे पालन करता येईल तेवढे केले आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पेठवडगावात यादव, सालपे, कोरेंचे शक्त‌िप्रदर्शन

$
0
0

म. टा. वृतसेवा, हातकणंगले

पेठवडगाव नगरपालिका निवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी सात तर नगरसेवक पदासाठी तब्बल ७६ अर्ज दाखल झाले. शेवटचा दिवस असल्यामुळे आज तिन्ही प्रमुख गटांनी सामुहिकरित्या उमेदवारी अर्ज दाखल केले.

आज दाखल झालेल्या अर्जामध्ये नगराध्यक्ष पदासाठी सत्तारूढ यादव गटाचे राजन शेटे, युवक क्रांती आघाडीचे मोहनलाल माळी, भाजप-जनसुराज्य युतीचे डॉ. अशोक चौगुले यांचा यांचा समावेश असून नगराध्यक्षा विदयाताई पोळ, प्रविता सालपे, राजकुमार पोळ, संतोष गाताडे, कल्पना शिंदे, परवीन फकीर, सुनीता पोळ या विद्यमान नगरसेवकांबरोबर दिलीपसिंह यादव, सुनील हुक्केरी, धनाजी पाटील, प्रकाश भोसले, सुभाष माने, अजय थोरात या मातब्बर उमेदवारांनी अर्ज दाखल केले.

पेठवडगाव नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज सर्वच आघाड्या अर्ज भरणार असल्यांने मोठी उत्सुकता लागली होती. दुपारी १२ वाजेपर्यत अर्ज दाखल करण्यासाठी कोणीही फिरकले नव्हते. दुपारनंतर भाजप जनसुराज्य युतीचे डॉ. अशोक चौगूले नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला. त्यांच्यासोबत विनय कोरे, हुपरी जनता उद्योग समुहाचे नेते आण्णासाहेब शेंडुरे, पी. डी. पाटील, दत्ता घाटगे उपस्थित होते. तर नगरसेवक पदासाठी अनिल बुढढे, मीना अतिग्रे, माया पाटोळे, अभिजित झगडे, सारिका गोंदकर, तुकाराम ढोबळे, अलका बेलेकर, तय्यब कुरेशी, आनंदी जाधव, सुखदेव खाडे, अंकिता हावळ, मारूती सुतार, सुधाकर पिसे, जयश्री माने, नर्मदा कावडे आदीनी अर्ज दाखल केले. यामध्ये भाजप, जनसुराज्य प्रत्येकी आठ तर आरपीआयचा एक असे १७ अर्ज दाखल झाले.

युवक क्रांती आघाडीच्यावतीने मोहनलाल माळी यांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला त्यांच्याबरोबर प्रविता सालपे, विश्रांत माने हे उपस्थित होते. आज युवक क्रांती आघाडीच्यावतीने १७ अर्ज दाखल केले तर नगरसेवक पदासाठी शरद पाटील, अलका गुरव, मैमुन कवठेकर, संदीप पाटील, महेश सलगर, आक्काताई गोसावी, कालीदास धनवडे, सवित्री घोटणे, शबनम मोमीन, उषा बुचडे आदींनी अर्ज दाखल केले.

यादव आघाडीच्यावतीने सुनील पोवार, स्नेहा सनदी, राजश्री धनवडे, संगीता मिरजकर, धनाजी केर्लेकर, सुजाता गुरव, अनिता चव्हाण, स्नेहल भोसले, जवाहर सलगर आदीनी अर्ज दाखल केले.


कुरूंदवाडमध्ये नगराध्यक्षपदासाठी १२ अर्ज

कुरूंदवाड नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवारी अखेरच्या दिवशी नगराध्यक्षपदासाठी पाच अर्ज दाखल झाले. नगराध्यक्षपदासाठी एकूण १२ तर नगरसेवक पदासाठी एकूण ८१ अर्ज दाखल झाले आहेत.

नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष रावसाहेब पाटील, भाजपाचे रामचंद्र डांगे, मनीषा डांगे, काँग्रेसचे जयराम पाटील या दिग्गजासह अभिजित पाटील, आप्पासाहेब बंडगर, सुनील कुरूंदवाडे, नजीर मोमीन, विजय पाटील, हुमायून महात यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर नगरसेवक पदासाठी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जिन्नाप्पा पोवार, माजी नगराध्यक्ष त्रिशला पाटील, बाबासाहेब पाटील, लियाकत बागवान, रजियाबेगम पठाण, सुरेश कडाळे, शरद आलासे, या दिग्गजासह अन्य इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत. शनिवारी अखेरच्या दिवशी पालिकेच्या निवडणूक विभागात अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांनी गर्दी केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कागलला आघाड्या आणि फाटाफूट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कागल आणि मुरगूड नगरपालिकेत भाजप आणि शिवसेनेची युती झाल्याची घोषणा सेनेचे सहसंपर्कप्रमुख प्रा. संजय मंडलिक आणि समरजित घाटगे यांनी केली. याबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील रविवारी अधिकृत घोषणा करतील. ही युती झाल्याचे जाहीर करून कागलमध्ये दोन्ही गटाची मिरवणूकही काढण्यात आली. दरम्यान, मंडलिक गटाच्या दोन प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करून शिवसेनेशी युती झाल्याचे पत्रक राष्ट्रवादीने प्रसिद्धीस दिले. तर अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन प्रा. मंडलिक यांनी रात्री उशीरा पत्रकार परिषदेत केले.

राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची युती झाल्याची चर्चा सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर मंडलिक व घाटगे यांनी रात्री कागल येथे पत्रकार परिषद घेतली. मंडलिक म्हणाले, ‘राजे आणि मंडलिक यांच्या वारसांनी एकत्र यावे ही जनतेच्या मनातील भावना होती. ज्यांनी तालुका घडवला, त्यांच्या वारसांनी मजबूत आघाडी करता विकासाचा रथ पुढे घेऊन जाण्याचा आग्रह कार्यकर्त्यांकडून होता. त्यामुळे कागल व मुरगूड पालिकेत मंडलिक -राजे गटाची युती झाली. यात संजय घाटगे गटही आहे. निवडून येण्याची ज्याची क्षमता आहे, त्यांची उमेदवारी कायम ठेवून इतरांचे अर्ज माघार घेऊ. अर्ज भरलेले कार्यकर्ते निष्ठावंत असल्याने बंडखोरीची भीती नाही.’

दरम्यान, संजय घाटगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, ‘मंडलिक - राजे गटाबरोबर आमचा गट कायम राहील. रविवारी याबाबत पालकमंत्री घोषणा करतील. तेथे मी उपस्थित राहणार आहे’ असे सांगितले.

राष्ट्रवादीची पत्रकबाजी

दरम्यान, राष्ट्रवादीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ‘कागलच्या विकासासाठी राष्ट्रवादी व शिवसेना युती झाली आहे. राष्ट्रवादीला १५ तर सेनेला ५ जागा देण्यात आल्या आहेत. नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार असेल. पत्रकावर प्रताप माने, बाबगोंड पाटील, चंद्रकांत गवळी, नविद मुश्रीफ, प्रकाश गाडेकर व अशोक जकाते यांच्या सह्या आहेत. यापैकी पाटील व गवळी मंडलिक गटाचे आहेत. ‘आम्ही मंडलिक गटाच्या कार्यकर्त्याशी चर्चा करून युती केली आहे. ते त्यांच्या नेत्यांशी चर्चा करतील. आमची संजय मंडलिक अथवा संजय घाटगे यांच्याशी चर्चा झालेली नाही’ असे आमदार मुश्रीफ म्हणाले. दरम्यान, सेनेशी आघाडी झाली नसली तरी मंडलिक गटात फूट पाडून गोंधळाचे वातावरण तयार करण्यात मुश्रीफांना यश आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जयसिंगपुरात नगराध्यक्षपदासाठी १२ अर्ज

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

जयसिंगपूर नगरपालिका निवडणुकीक‌रिता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अखेरच्या दिवशी शनिवारी झुंबड उडाली. सकाळपासूनच नगरपालिकेतील निवडणूक विभागाच्या कार्यालयात इच्छुकांनी रांगा लावल्या होत्या. दिवसभरात १३१ अर्ज दाखल झाले. नगरसेवक पदासाठी एकूण २३१ तर नगराध्यक्ष पदासाठी १२ अर्ज दाखल झाले आहेत.

अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचा दिवस असल्याने नगरपालिका परिसरात इच्छुकांची मोठी गर्दी होती. अर्ज दाखल करण्याची मुदत निवडणूक आयोगाने एक तासाने वाढविल्याने निवडणूक विभागात उशिरा आलेल्या इच्छुकांना संधी मिळाली. दुपारी चारनंतर निवडणूक विभागाचे दरवाजे बंद करण्यात आले. यानंतर विभागात असणाऱ्या उमेदवारांचे अर्ज दाखल करून घेण्यात आले. अनामत रक्कम भरण्याबरोबरच अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दिवसभर इच्छुकांची धावपळ सुरू होती. पालिकेत मोठा पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. माजी नगराध्यक्ष डॉ. जे. जे. मगदूम यांच्या स्नुषा अॅड.सोनाली मगदूम यांनी शक्त‌िप्रदर्शन करीत अर्ज दाखल केला.

आज नगराध्यक्षपदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी १२५ अर्ज दाखल झाले. यामुळे नगराध्यक्षपदासाठी दाखल झालेल्या एकूण अर्जांची संख्या १२ तर नगरसेवक पदासाठी दाखल झालेल्या एकूण अर्जांची संख्या २३१ झाली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विजयसिंह देशमुख, तसेच सहायक निवडणूक निर्णय अधिकारी हेमंत निकम यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेसाठी एकूण २३३ अर्ज दाखल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गडहिंग्लज

नगरपालिका निवडणुकीसाठी आजच्या शेवटच्या दिवशी पालिका प्रांगणात इच्छुक उमेदवारांसह समर्थकांची तुफान गर्दी पाहायला मिळाली. आजअखेर पालिकेसाठी नगराध्यक्षपदासाठी १७ तर नगरसेवकपदासाठी २१६ असे एकूण २३३ अर्ज दाखल झाले आहेत. आज दिवसभरत नगराध्यक्षपदासाठी नऊ तर नगरसेवकपदासाठी ८५ अर्ज दाखल झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांतधिकारी संगीता चौगुले यांनी दिली.

आजअखेर नगराध्यक्षपदासाठी भाजपाकडून वसंतराव यमगेकर, जनता दलाच्या स्वाती कोरी, महादेव पाटील, राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक किरण कदम व रमेश रिंगणे, राष्ट्रीय काँग्रेसचे सुधीर पाटील व सागर हिरेमठ तर शिवसेनेकडून प्रा.सुनील शिंत्रे व दिलीप माने तसेच तुषार यमगेकर यांनी अर्ज दाखल केले आहेत.

आजच्या शेवटच्या दिवशी पालिका परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते. सकाळपासूनच इच्छुक उमेदवार आपल्या समर्थकांसह अर्ज भरण्यासाठी पालिकेत दाखल झाले होते. काही महिन्यांपूर्वी भाजपाशी जवळीक साधलेल्या रमेश रिंगणे यांनी काल अचानकपणे राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. परिणामी आज दिवसभरात अनेक नवीन घडामोडींना ऊत आला.

विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पक्ष व पक्षाचे अधिकृत उमेदवार पुढीलप्रमाणे- नगराध्यक्ष: वसंतराव यमगेकर (भाजपा), स्वाती कोरी (जनतादल), सागर हिरेमठ (राष्ट्रीय काँग्रेस), सुनील शिंत्रे (शिवसेना), रमेश रिंगणे (राष्ट्रवादी).

जनता दल:

विनोद बिलावर, सुलोचना मोरे, कल्पना कांबळे, उदय पाटील, गंगाधर हिरेमठ, सरिता भैसकर, तरन्नुम खलीफ, नरेंद्र भद्रापूर, क्रांतीदेवी शिवणे, बसवराज खणगावे, नाज खलीफ, प्रकाश मोरे, विद्या कापसे, नितीन देसाई, राजेश बोरगावे, सुनिता पाटील, शकुंतला हातरोटे.

राष्ट्रवादी काँग्रेस:

रामदास कुराडे, अरुणा कोलते, रेश्मा कांबळे, बाळासाहेब घुगरी, हारूण सय्यद, सावित्री पाटील, रुपाली परीट, सुनील गुरव, श्वेता कदम, अमर मांगले, माधुरी शिंदे, सूर्यकांत नाईक, अरुणा शिंदे, किरण खोराटे, दुंडाप्पा नेवडे, शुभदा पाटील, शैलजा पाटील

भारतीय जनता पार्टी:

दीपक कुराडे, शशिकला पाटील, प्रेमा विटेकरी, शिवानंद पाटील, संदीप नाथबुवा, निलांबरी भुईबर, शगुफ्ता खलीफ, राजेंद्र हत्ती, संदीप कुरळे, अनिल गायकवाड, अनिता पेडणेकर, अरविंद पाटील, सदाशिव कोरवी.

शिवसेना:

बाबुराव कासारीकर, सुवर्णा तांबेकर, शालन कासारीकर, सागर कुऱ्हाडे, प्रकाश रावळ, मंगल जाधव, हल्लाप्पा भमानगोळ, सुरेखा मोहिते, अशोक शिंदे, गीता सुतार, श्रद्धा शिंत्रे, दिलीप माने, संतोष पाथरवट, सपना संकपाळ.

काँग्रेस:

वीरसिंग बिलावर, भीमराव सलवादे, सुधीर पाटील, करिष्मा मुल्ला, उत्तम देसाई, बिना कुराडे, संतोष चौगुले. स्वाभिमानी शेतकरी संघटना- राजेंद्र चव्हाण, सरिता चव्हाण, संपदा पोवार.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मलकापुरात १७ जागांसाठी ३५ अर्ज

$
0
0

म. टा. वृत्तसेवा शाहूवाडी

मलकापूर पालिका निवडणुकीसाठी अखेरच्या दिवशी (ता. २९) नगराध्यक्षपदासाठी एक तर नगरसेवकपदासाठी ३४ असे एकूण ३५ उमेदवारी अर्ज दाखल झाले. आजअखेर मलकापूर पालिका नगराध्यक्षपदासाठी चार जणांनी एकूण पाच तर नगरसेवकांच्या १७ जागांसाठी एकूण ६५ (एकूण ७०) उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती मुख्य निवडणूक सहाय्यक अधिकारी चंद्रशेखर सानप यांनी दिली.

शनिवारी नामनिर्देशनपत्र दाखल करावयाच्या अखेरच्या दिवशी नगराध्यक्षपदासाठी विध्यमान नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी पर्यायी उमेदवारी अर्ज दाखल केला. तर माजी नगराध्यक्षा शुभांगी कोकरे-देसाई, माजी नगराध्यक्ष रवींद्र पाथरे, खासदार राजू शेट्टी यांचे स्वीय सहाय्यक विश्वजित महाजन, माजी नगराध्यक्ष राजू भोपळे यांच्या पत्नी प्रियांका भोपळे, रश्मी शंकर कोठावळे,मीनाक्षी गवळी, सोनिया शेंडे, लक्ष्मी घेवदे, सदानंद नागवेकर या प्रमुखांसह ३४ जणांनी नगरसेवक पदासाठी अखेरच्या दिवशी प्रशासनाकडे नामनिर्देशनपत्र दाखल केले.

विध्यमान नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी यापूर्वी नगरसेवकपदासाठी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. आज त्यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल केली. तर त्यांचे बंधू प्रकाश तातोबा पाटील यांच्यासह दिलीप पाटील यांनी यापूर्वी नगराध्यक्षपदासाठी प्रत्येकी एक व आज अखेरच्या दिवशी नगरसेवकपदासाठीही प्रत्येकी एक अर्ज दाखल केला. भाजपचे राज्यपरिषद सदस्य प्रवीण प्रभावळकर, नगराध्यक्षपदाचे भाजपचे उमेदवार अमोल केसरकर, विध्यमान विरोधी पक्षनेते सुधाकर पाटील, राष्ट्रवादीचे सुहास पाटील आदी प्रमुख नेतेमंडळी आपआपल्या उमेदवारांकडून वेळेत नामनिर्देशनपत्र दाखल होण्यासाठी नगरपालिका आवारात शेवटपर्यंत टाळ ठोकून होते. स्वाभिमानी शेतकरी संघटना येथे तीन उमेदवारांच्या माध्यमातून अस्तित्वाच्या मुद्द्यावर स्वतंत्र लढणार असल्याचे पक्षाचे संघटक अमोल महाजन यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले.

दरम्यान शिवसेनेचे कट्टर समर्थक व माजी नगराध्यक्ष शामराव कारंडे यांनी अखेरपर्यंत अर्जच दाखल न केल्याने ते नाराजीतून नगराध्यक्षपदासाठी स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची दिवसभर रंगलेली चर्चा ही अखेर चर्चाच राहिली. ‘राष्ट्रवादी’ला सोबत घेण्यावरून कारंडे यांचा शिवसेना नेतृत्वाशी प्रारंभापासून संघर्ष सुरु आहे. शिवाय आपल्या भूमिकेकडे दुर्लक्ष करून शिवसेना-राष्ट्रवादी आकाराला येत असल्याचे शल्य कारंडे यांना आहे. त्यातच या आघाडीचे नगराध्यक्ष पदासाठीचे उमेदवार प्रकाश पाटील आणि कारंडे यांचे राजकीय वैर सर्वश्रुत असल्याने कारंडे यांच्या सुरु झालेल्या कथित भाजप प्रवेशाची आणि नाराजीतून नगराध्यक्षपदासाठी ते अर्ज दाखल करणार असल्याच्या गेले दोन दिवस उलट-सुलट रंगलेल्या चर्चेला आज पूर्णविराम मिळाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कागलमध्ये अफवांमुळे गोंधळ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

कागल नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शनिवारी नगरसेवक पदासाठी १३६ अर्ज दाखल झाले. आजअखेर २० जागांसाठी एकूण ३०४ अर्ज नगरसेवक पदासाठी दाखल झाले आहेत. नगराध्यक्ष पदासाठी शेवटच्यादिवशी १६ अर्ज दाखल झाले. आजअखेर एकूण ४० अर्ज दाखल झाले आहेत. शेवटच्या दिवशी ऑनलाइनमधील त्रुटी लक्षात घेऊन ऑफलाइनमुळे एक तास उश‌िरा अर्ज दाखल करण्यासाठी मुभा देण्यात आली होती. राजकीय संवेदनशीलता लक्षात घेऊन पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.

गर्दी लक्षात घेऊन पोलिसांनी पालिकेसमोरील सर्व रस्ते आडविण्यात आले होते. पालिकेच्या प्रमुख गेटमध्ये उमेदवार व सूचक या दोघांनाच प्रवेश दिला जात होता. दुपारी तीन ते चारच्या दरम्यान मोठी गर्दी झाली. आजच्या अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी काही दिग्गज मंडळींनीही अर्ज दाखल केले. नगराध्यक्ष पदासाठी सुमारे १६ अर्ज दाखल झाले. नगरसेवक पदासाठी १३६ अर्ज दाखल झाले. उमेदवारांची संख्या अधिक असल्याचे नेते मंडळींना माघारीवेळी कसरत करावी लागणार आहे. राज्यात अधिकृत असलेले पक्ष भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी आदींनी पक्षाचे ए.बी. फॉर्म निवडणूक अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले.

अफवांमुळे गोंधळ

ऐन दिवाळीच्या सणात पालिका निवडणुकीची घाई-गडबड सुरू आहे. दिवसभर अर्ज दाखल केल्यानंतर पालिकेच्या आवारात मोठी गर्दी झाली होती. कोणता गट कोणाशी युती करणार याचा कानोसा सर्वच कार्यकर्ते घेत होते. कार्यकर्त्यांबरोबर फोन खणखणत होते. मंडलिक-मुश्रीफ ही युती झाली हे खरे आहे का? अशी विचारणा सातत्याने होत होती. त्याचबरोबर सोशल मीडियावरून मुश्रीफ, मंडलिक व संजय घाटगे गट एकत्र आले आहेत. मुश्रीफ गटास गटास १५ अधिक नगराध्यक्षपद, मंडलिक गटास चार व संजय घाटगे गटास एक असे जागा वाटप झाल्याचे तसेच भाजपाच्या समरजित घाटगे यांना एकाकी पाडले आहे, असे वृत्त फिरत होते. या वृत्ताने सर्वच कार्यकर्ते संभ्रमावस्थेत होते. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास आपणास उमेदवारी मिळाल्याच्या अविर्भावात त्यांनी जोरदार फटाक्यांची आतषबाजी केली. हे फटाके दिवाळीचेच होते की राजकीय होते याचा कानोसा कागलकर घेत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इचलकरंजीत ६२ जागांसाठी विक्रमी ४३२ अर्ज

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

इचलकरंजी नगरपालिकेच्या ६२ जागांसाठी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी ४३२ विक्रमी अर्ज दाखल झाले. नगराध्यक्षपदासाठी रवी रजपुते (काँग्रेस), अलका स्वामी (भाजपा), दशरथ माने (शिवसेना), विजय कांबळे (एमआयएम) यांच्यासह १७ अर्ज दाखल झाले आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी बहुतांशी विद्यमान सदस्यांना वगळले असून नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने चांगलीच झुंबड उडाली होती.

नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस होता. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपासह ताराराणी व शाहू आघाडी या सर्वांच्यात जागा वाटपाबाबत विलंब होत असल्याने इच्छुकांची घालमेल वाढली होती. अर्ज दाखल झाल्यानंतर भाजपा व ताराराणी आघाडीने तर सायंकाळी काँग्रेस-राष्ट्रवादी-शाहू आघाडीने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली. बहुतांशी विद्यमान नगरसेवकांना यंदा डच्चू देण्यात आला आहे. भाजपाने केवळ तीन तर ताराराणी आघाडीने विद्यमान चार सदस्यांना संधी दिली आहे. काँग्रेसने १० विद्यमान सदस्यांसह आघाडीतून आलेल्या दोन सदस्यांना पुन:श्च उमेदवारी दिली आहे. तर कारंडे गटाच्या शाहू आघाडीने केवळ दोन विद्यमान सदस्यांना मैदानात उतरवले आहे. राष्ट्रवादीच्या माजी आमदार अशोकराव जांभळे गटाने विद्यमान पाच सदस्यांना उमेदवारी दिली आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाल्यानंतर काहींनी अपक्ष म्हणून व आघाड्यांच्यावतीने अर्ज दाखल केले होते. पण उमेदवारांचा घोळ सुरुच राहिल्याने शेवटच्या दिवशी अनेकांना पक्षातून उमेदवारी अर्ज भरावा लागला. शेवटच्या क्षणापर्यंत जागा वाटपाचा तिढा कायम होता. प्रभाग २० अ मधून काँग्रेसने विद्यमान सदस्य अब्राहम आवळे यांना तर शाहू आघाडीने याच प्रभागातून श्रीकांत कांबळे यांना उमेदवारी दिली आहे. पण यापैकी रिंगणात कोण राहणार याबाबतचा निर्णय दोन दिवसांत होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रीय काँग्रेस ४०, शाहू आघाडी १५ तर जांभळे गट आठ जागांवर एकत्रित निवडणूक लढवत आहे. तर भाजपा ३९ आणि ताराराणी आघाडी २३ जागांवर एकत्र लढत आहेत. भाजपाच्यावतीनेही अनेक विद्यमान सदस्यांना नाकारले आहे. काँग्रेसच्या विद्यमान नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे या ताराराणी आघाडीच्या संपर्कात होत्या. अखेरच्या क्षणी मात्र त्यांचा पत्ता कट झाल्याने त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. भाजपा-शिवसेना यांची राफयस्तरीय युती असतानाही स्थानिक पातळीवर जागा वाटपाची चर्चा फिस्कटल्याने शिवसेनेने स्वबळाचा नारा देत ३५ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. शिवाय नगराध्यक्षपदासाठीही शड्डू ठोकला आहे. एआयएमआयएम पक्षातर्फे नगरसेवकपदासाठी एकही उमेदवार नसला तरी नगराध्यक्षपदासाठी विजय कांबळे यांनी अर्ज दाखल केला आहे.

अर्ज भरण्यासाठी दुपारी चार वाजेपर्यंत वेळ असला तरी ११ वाजल्यापासून इच्छुकांसह अपक्ष उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी करू लागले होते. वाद्यांचा गजर, पक्षाचा जयजयकार आणि फटाक्यांची आतषबाजी करीत उमेदवार समर्थकांसह नगरपालिकेत येत होते. बुधवार दोन नोव्हेंबर रोजी उमेदवारांची अर्जांची छाननी करण्यात येणार असून ११ नोव्हेंबर रोजी माघारीचा अखेरचा दिवस आहे. त्यानंतरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे.

गुन्हेगारी पार्श्वभूमीचेही उमेदवार

भारतीय जनता पार्टी व ताराराणी आघाडीने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना उमदेवारी बहाल केली आहे. याबाबत आमदार सुरेश हाळवणकर यांना छेडले असता ‘सर्वसामान्य उमेदवारांना संधी दिल्याचे सांगत एखादं दुसरा असा असू शकतो’ अशी पुष्टी जोडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दुधगाववर शोककळा

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सांगली

पाकिस्तान सैन्याचा दहशतवाद्यांना भारताच्या हद्दीत घुसवण्याचा प्रयत्न हाणून पाडताना मिरज तालुक्यातील दुधगाव येथील नितीन सुभाष कोळी (वय ३०) या जवानाला वीरमरण आले. मिरज तालुक्यातील दुधगाव येथे जन्मलेल्या नितीन कोळी याने बारावीपर्यंतच शिक्षण झाल्यानंतर सीमा सुरक्षा दलाची वाट धरली. २००८मध्ये लातूर येथे झालेल्या सैन्य भरतीत त्याची निवड झाली. घरची अर्थिक परिस्थिती बेताची. आई-वडील मोलमजुरी करून संसारगाडा ओढत होते. परिस्थिती नसतानाही त्यांनी नितिन यांना बारावीपर्यंतचे शिक्षण दिले. धाकटा मुलगा अद्याप शिक्षण घेतो आहे. नितीनच्या नोकरीमुळे कुटुंब स्थिरस्थावर होऊ लागल्यानंतर २०१२मध्ये नितीन यांचा संपदा यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यांना चार वर्षे वयाचा देवराज आणि अवघ्या दोन वर्षे वयाचा युवराज अशी दोन मुले आहे. आई-वडील आणि एक लहान भाऊ असा परिवार असलेल्या नितिनने चार दिवसांपूर्वीच घरच्यांशी संपर्क साधून दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गप्पागोष्टी केल्या होत्या. पाच नोव्हेंबर रोजी त्यांना सुट्टी मिळणार होती. दिवाळीत नितीन यांची भेट नाही होऊ शकली तर नोव्हेंबरमध्ये ते येणार असल्याने संपूर्ण कुटुंबाने स्वतःला दिवाळीच्या सणात गुंतवून घेतले होते. परंतु, शनिवारी सकाळी दुःखद बातमी सुभाष कोळी यांच्या कानावर आदळली. नितीनने सीमेवर प्राणांची आहुती दिली असल्याचे त्यांना समजताच त्यांच्या दुःखाचा डोंगर कोसळला. तान्हुल्याच्या आनंदात स्वतःला गुंतवून पतीच्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या सुनेला, नितीनला जन्म देणाऱ्या मातेला हे कसे सांगायचे? अशा विवंचनेत सुभाष कोळी आणि संपूर्ण गाव असतानाच टीव्हीवरच्या बातम्यानी कोळी कुटुंबीयांना जबरदस्त धक्का दिला.

मध्यरात्रीच्या सुमारास मिरज तहसीलदार, गावचे पोलिस पाटील यांच्या माध्यमातून नितीन कोळी यांना वीरमरण आल्याची वार्ता दुधगावात पोहचली होती. त्यामुळे शोकसागरात बुडत चालेला गावातील प्रत्येक जण आपल्या घरावर लावलेला आकाशकंदील, विद्युत रोषणाईच्या माळा, घराला बांधलेली तोरणे काढून घेऊ लागला. गावात शोकसभा बोलावून तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला. गावात कोणीही फटाका वाजवायचा नाही किंवा शहीद जवानाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होईपर्यंत गावात कोणतेही डीजिटल लावायचे नाही, असा गावाने निर्णय घेतला.

नितीन कोळी यांच्या पार्थिवाला शनिवारी देशाचे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी श्रीनगरमध्ये जाऊन श्रद्धांजली वाहून मानवंदना दिली. रविवारी दुपारपर्यंत खास विमाने नितीनचे पार्थिव दुपारपर्यंत दिल्लीत येणार आहे. दिल्लीतून दुसऱ्या विमानाने ते सायंकाळपर्यंत मुंबईत येईल. त्यानंतर रुग्णवाहिकेमधून ते दुधगावच्या दिशेने रवाना होऊन सोमवारी सकाळी जन्मभूमीवर येईल. त्यानंतर वारणा नदीच्या काठी नितीनच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्या ठिकाणच्या तयारीची पाहणी कृषी व पणन खात्याचे राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शनिवारी सायंकाळी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विधान परिषदेसाठीकॉँग्रेसमध्ये बंडखोरी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली

सांगली-सातारा विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी विशाल पाटील गटाने शनिवारी जोरदार शक्तीप्रदर्शन करून नगरसेवक शेखर माने यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. माने यांनी एक पक्षाचा तर दुसरा अपक्ष असे दोन अर्ज दाखल केल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. यावेळी सांगली महापालिकेचे २६ व जत नगरपालिकेचे १० नगरसेवक व १ जिल्हा परिषद सदस्यांसह ३७ जणांचे शक्तीप्रदर्शन दिसले. यामुळे काँग्रेसमध्ये बंडखोरी अटळ असल्याचे समोर येत असल्याने पक्षात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

काँग्रेसचे उमेदवार म्हणून मोहनराव कदम यांचे नाव जाहीर झाल्यापासून विशाल पाटील गटाच्या समर्थकांच्या बैठकांना गती आली होती. सांगली, कराड व सातारा येथे बैठका झाल्या. शुक्रवारी रात्री वसंतदादा साखर कारखान्याच्या परिसरात झालेल्या बैठकीत या गटाने माने यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. त्यानंतर शनिवारी सकाळी पुन्हा समर्थकांची बैठक झाली. दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात शेखर माने समर्थक जमले, जत नगरपालिकेचे नेते सुरेश शिंदे , स्वाभिमानी विकास आघाडीचे नगरसेवक गौतम पवार व उपमहापौर विजय घाडगे यांच्या नेतृत्वाखाली ३७ मतदारांच्या उपस्थित अर्ज दाखल करण्यात आला.

काँग्रेस कुणाची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही

वसंतदादा पाटील यांनी जिल्ह्यात काँग्रेस वाढविली. मात्र, आताचे काही नेते काँग्रेस आपल्या मालकीची असल्याचे दाखवून प्रत्येक निवडणुकीत हक्क सांगत आहेत. यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर अन्याय होत आहे. यापुढे असे चालणार नाही. काँग्रेस कोणाची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही, असा हल्लाबोल विशाल पाटील यांचे समर्थक शेखर माने व काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश शिंदे यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना केला.
शेखर गोरेंची अधिकृत

घोषणा मी केली नाही

आमदार जयंत पाटील यांचे स्पष्टीकरण


‘विधान परिषदेसाठी मी दिलीप पाटील यांच्याशी स्वतः चर्चा केली होती. शिवाय शेखर गोरे यांच्या नावाची अधिकृत घोषणा मी केलेली नाही. ते मला भेटायला आले होते, माझ्या बैठका सुरू असलेल्या ठिकाणी ते सोबत आले, म्हणून मी त्यांची संबधितांना ओळख करून दिली, याचा गैर अर्थ घेतला जात आहे,’ असा खुलासा आमदार जयंत पाटील यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना केला.

पालिका निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदासाठी विजय पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जयंत पाटील पाटील म्हणाले, ‘शेखर गोरे यांनी मला फोन केला आणि भेटायला येतो, असे सांगितले. मी त्या दरम्यान पालिका निवडणुकीशी संबंधित बैठकांत व्यस्त होतो. त्या ठिकाणी ते आले. इस्लामपूर, आष्टा आणि सांगली या ठिकाणच्या माझ्या बैठकांच्या वेळी ते आले. त्यांना मी नको म्हणालो नाही याचा गैर अर्थ घेतला गेला.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आल्हाददायक थंडीची चाहूल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सकाळच्या गुलाबी थंडीने आणि दुपारच्या अंगाला चटके न देणाऱ्या उन्हामुळे कोल्हापूरकर सुखावले आहेत. शहरासह राज्यात थंडीने बस्तान बांधायला सुरुवात केली असून आतापर्यंतची तापमानाची नोंद पाहता थंडीचा कडाका येत्या काळात वाढण्याची चिन्हे आहेत. गेल्या साठ वर्षांतील अनुभव लक्षात घेता, यंदा पाऊस चांगला झाल्याने थंडीचा कडाकाही वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

गेल्या चार दिवसांपासून कोल्हापुरात थंडी वाढायला सुरुवात झाली. सकाळी तापमापकातील पारा १७ अंश सेल्सिअसपर्यंत खाली येत आहे. त्यातच दुपारच्या तापमानातही घट होण्यास सुरुवात झाली आहे. कोरडी हवा व कमाल तापमानात झालेली चार ते पाच अंशांची घसरण यामुळे गुलाबी थंडीचा अनुभव कोल्हापूरकरांना येत आहे. रविवारी सकाळी किमान तापमान १७.२ अंश सेल्सिअस तर कमाल तापमान ३१.५ अंश सेल्सिअस होते. या गुलाबी थंडीचे येत्या काही दिवसांत बोचऱ्या थंडीत रुपांतर होण्याचा अंदाज आहे.

राज्यात गोवा आणि कोकणाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते. विदर्भ मराठवाड्यात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट दिसत आहे. कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रातही काही भागांत किमान तापमान सरासरीपेक्षा घसरले आहे.

कोल्हापुरात राज्याच्या इतर शहरांच्या तुलनेत थोडी संमिश्र स्थिती आहे. कमाल तापमान सरासरीच्या जवळ असले, तरी किमान तापमानात बऱ्यापैकी घट दिसत आहे. सकाळी १७.२ पर्यंत आलेल्या पाऱ्यामुळे या थंडीत अभ्यंग स्नान करण्याची नामी संधी कोल्हापूरकरांनी दवडली नाही. सकाळी आणि सायंकाळी थंडी जाणवत असली, तरी दुपारी उन्हाच्या कडाका सोसावा लागत आहे.

किमान तापमान घसरले

नाशिक : ११.४

पुणे :१२.३

उस्मानाबाद : १२.५

जळगाव : १३.८

महाबळेश्वर: १४.१

कोल्हापूर : १७.२

मुंबई :२०.२

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुटीला जाताय...? सावधान !

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दिवाळीच्या सुटीत गावी जाणाऱ्या किंवा पर्यटनासाठी घराबाहेर पडणाऱ्यांनी दिवाळीच्या आनंदावर विरजण पडू नये, यासाठी घराबाहेर पडण्याआधीच दक्षता घेतलेली बरी. सुटीच्या काळात बंद घरांवर चोरट्यांची नजर पडण्याची भीती असल्याने घरातील किमती ऐवज सांभाळावेत, त्याचबरोबर घराच्या सुरक्षेचीही व्यवस्था करावी. दुर्घटना घडण्यापूर्वीच दक्षता घेतल्यास दिवाळीचा गोडवा वाढू शकतो.

मुलांना दिवाळीची सुटी सुरू होताच अनेकांना गावाकडे जाऊन सर्व कुटुंबीयांसह दिवाळी साजरी करण्याचे वेध लागतात. काहीजण पर्यटनासाठी बाहेर पडण्याचा बेत आखतात. सलग चार-पाच दिवस घराबाहेर असल्याने बंद घरे चोरट्यांच्या नजरेस पडतात आणि यातूनच सुटीच्या काळात चोऱ्यांचे प्रमाण वाढते. चोरट्यांना ही संधी साधता येऊ नये, यासाठी घराबाहेर पडण्यापूर्वीच नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून केले आहे. दिवाळीच्या सुटीत आठवडाभर बाहेरगावी जाणाऱ्यांची मोठी संख्या असते. या काळात घरे बंद करून लोक बाहेर पडतात. चोरट्यांसाठी मात्र हाच काळ पर्वणीचा ठरतो, त्यामुळेच घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होते. यंदा अशा घटना घडू नयेत यासाठी नागरिकांनीच स्वतःहून दक्षता घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

चौकट...

मौल्यवान वस्तू बँकेत ठेवा

घरातील सोन्या-चांदीचे दागिने, मौल्यवान वस्तू आणि रोख रक्कम घरात ठेवण्याऐवजी बँकेत ठेवावी. अनेकजण दिवाळीत लक्ष्मीपूजनासाठी मौल्यवान वस्तू आणि रक्कम घरी ठेवतात. बँकांना सुट्या असल्याने अशा वस्तू व पैसे घरीच ठेवून लोक बाहेरगावी जातात. त्यामुळे असे न करता गरजेपुरतीच रक्कम आणि मोजकेच दागिने सोबत ठेवावेत. उर्वरित सर्व रक्कम, दागिने बँकेत ठेवावेत. चोरट्यांनी घरफोडी केल्यास त्यांच्या हाती या मौल्यवान वस्तू लागणार नाहीत

चौकट...

शेजाऱ्यांना कल्पना द्या

आठवडाभर बाहेरगावी जाणार असाल तर शेजाऱ्यांना बंद घराकडे लक्ष ठेवण्याची विनंती करा. अपार्टमेंटमधील सीसीटीव्ही कॅमेरे सुस्थितीत असल्याचे चेक करा. बंद घराकडे लक्ष ठेवण्यासाठी सुरक्षारक्षकाला सूचना द्या. एकाच सोसायटीतील अनेक घरे बंद राहणार असतील तर परिसरातील पोलिस ठाण्यांना पूर्वकल्पना द्या.

चौकट...

प्रवासात घ्या काळजी

सुटीत बाहेर जाताना अनेक महिला अंगावर किमती दागिने परिधान करून जातात. अशावेळी चेन स्नेचिंगसारख्या घटना घडू शकतात. बॅग किंवा पर्समध्ये पैसे, किमती वस्तू ठेवून या बॅग, पर्स कारमध्ये ठेवल्या जातात. कारमधून उतरताना कारच्या काचा आणि दरवाजे लॉक न केल्यास पार्किंगमध्ये चोरट्यांकडून बॅग लांबवण्याच्या घटना घडू शकतात. असे प्रकार टाळण्यासाठी प्रवासात किमती वस्तू सोबत बाळगू नका.

चौकट

पोलिसांची गस्त वाढणार

सुटीदरम्यान पोलिसांची रात्र गस्त वाढणार आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सर्व पोलिस ठाण्यांना गस्त वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत. दिवसाही साध्या वेशातील काही पोलिस कर्मचारी परिसरातील बंद घरांवर नजर ठेवणार आहेत. याशिवाय सेफ सिटीअंतर्गत कार्यरत असलेल्या ६५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही मदत घेतली जाणार आहे. चोऱ्या रोखण्यासाठी रेकॉर्डवरील गुन्हेगारांवरही नजर ठेवली जात आहे.

कोट...

‘सुटीत बंद घरे आणि दुकाने सुरक्षित राहावीत यासाठी पोलिस प्रशासनाने विशेष दक्षता घेतली आहे. बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांनी संबंधित पोलिस ठाण्यात कल्पना द्यावी, त्याचबरोबर शेजाऱ्यांनाही घराकडे लक्ष ठेवण्यासाठी विनंती करावी अशा सूचना देत आहोत. या काळात गस्त वाढवून चोरट्यांना रोखू.’

प्रदीप देशपांडे, पोलिस अधीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निराधारांच्या चेहऱ्यावर फुलविले हास्याचे तेज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘आनंद वाटल्याने तो वाढतो’ या उक्तीला न्याय देत अनेकांनी दिवाळीचा आनंद साजरा कराताना निराधारांच्या चेहऱ्यावरही हास्याचे तेज दिले. समाजातील अनेक निराधार, अपंग, बेघर लोकांसोबत दिवाळी साजरी करत या आनंदाला माणुसकीची झालर दिली. दिवाळी हा तेजाचा सण. मात्र अनेकांच्या आयुष्यात गरिबीचा अंधार असतो. अशा अंधारामुळे ते सण साजरा करू शकत नाहीत. मात्र, कोल्हापुरातील काही संस्था, तरुणांचे ग्रुप, सामाजिक कार्यकर्ते यांनी मात्र दिवाळी आणि माणुसकी यांचे बंध गुंफले.

मंगळवार पेठ येथील संकल्प फाउंडेशनच्यावतीने दिवाळीचे औ​चित्य साधून समाजातील निराधार व बेघर लोकांना फराळ वाटप करण्यात आले. सुशांत चव्हाण, अक्षय शेळके, आशुतोष मगर, अभिषेक कारेकर, संकेत जोशी, प्रतीक बदामे, युवराज साळोखे, पार्थ मुंडे, रोहित पोतनीस यांनी संयोजन केले.

साठमारी येथील स्वामी विवेकानंद आश्रम आध्यात्मिक केंद्रातर्फे समाजातील अपंग, निराधार लोकांना फळे, फराळ, कपडे देऊन दिवाळी साजरी करण्यात आली. भाजपचे गटनेते प्रताप जाधव यांच्या हस्ते या उपक्रमाला प्रारंभ झाला.यावेळी किरण अतिग्रे, चंद्रकांत देसाई उपस्थित होते.

आर. के. नगर येथील महिला मंडळाने निराधार व एकट्या राहणाऱ्या महिलांसोबत दिवाळी साजरी केली, तर ऑयस्टर जैन ग्रुपच्यावतीने महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या मुलांच्या कुटुंबीयांना मदत करून दिवाळीचा आनंद साजरा केला. वनिता ग्रुपतर्फे वृद्धाश्रमातील ज्येष्ठांसोबत दिवाळीचे लक्ष्मीपूजन करण्यात आले. तर कोल्हापुरातील काही तरुणांनी बालसंकुल, वारांगना यांच्यासोबत भाऊबीज साजरी करण्याचे नियोजन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एक पाऊल कृतज्ञतेचे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्ह्यातील मराठा मोर्चाला ​विविध समाजातील बांधवांनी दिलेल्या सक्रिय पाठिंब्याबाबतची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विविध समाजांना सोबत घेऊन सकल मराठा समाजाच्यावतीने दिवाळीनिमित्त एक​त्र फराळ केला. दैवज्ञ समाज बोर्डिंगमध्ये विविध ८५ संघटनांच्या प्रतिनिधी उपस्थित होते. मोर्चाला केवळ पाठिंबा न देता त्यात सक्रिय सहभाग घेऊन विविध समाजांनी जपलेल्या सामाजिक बांधिलकीबाबत या उपक्रमातून कृतज्ञताच व्यक्त केली.

महापौर अश्विनी रामाणे, माजी आमदार सुरेश साळोखे, जिल्हा पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे, पोलिस उपअधीक्षक सतीश माने (गृह),शहर पोलिस उपअधीक्षक भारतकुमार राणे, निरीक्षक अनिल देशमुख, मुस्लिम बोर्डिंगचे अध्यक्ष गणी आजरेकर, प्रशासक कादर मलबारी, जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. प्रकाश मोरे यांच्या हस्ते उपक्रमाला सुरुवात झाली. यावेळी फराळाचा आस्वाद घेतल्यानंतर भविष्यात कोल्हापूरच्या विकासासाठी एकजुटीने सक्रिया राहण्याचा निर्धार सर्वांनी केला.

यावेळी संयोजक वसंतराव मुळीक म्हणाले, ‘मराठा समाजाचा मोर्चा हा बहुजन समाजाचा मोर्चा ठरला. मराठा समाजाला न्याय मिळावा म्हणून सर्वांनी सक्रिय सहभाग घेतला. त्यामुळे कोल्हापूरचा मोर्चा सर्वांमध्ये स्मरणात राहणारा ठरला. त्यातून देशाला एक नवी दिशा मिळाली. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी स्वागत केले.

माजी अध्यक्ष अॅड. विवेक घाटगे, विजया पाटील, बांधकाम व्यावसायिक व्ही. बी. पाटील, मल्हार सेनेचे बबन रानगे, माजी नगरसेवक आदिल फरास, नंदकुमार मोरे, दिलीप भुर्के, अजित राऊत, अजित खराडे, केमिस्टस असोसिएशनचे मदन पाटील, प्रकाश मेडशिंगे, स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष भगवान काटे, के. एम. बागवान, सुधाकर पेडणेकर, डॉ. संदीप पाटील, बाबा महाडिक, छावा संघटनेचे अध्यक्ष राजू सावंत, डॉ. गिरीश कोरे, राजू वाली, हर्षल सुर्वे, खाटीक समाजाचे अध्यक्ष उत्तम कांबळे, बंटी सावंत, अवधूत पाटील, महादेव पाटील, पद्माकर कापसे, किशोर घाटगे, संजय क्षीरसागर, अशोक माळी, पापाभाई बागवान, बाबासाहेब तिबिले, प्रदीप व्हरांबळे, शंकरराव शेळके आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नेत्यांची डोकेदुखी वाढणार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

उमेदवार जाहीर करण्यात झालेला विलंब अन् विद्यमानांना दिलेला डच्चू यामुळे सर्वच पक्षात गोंधळ उडाला असून साहजिकच यंदाची निवडणूक ही एक आगळीवेगळी निवडणूक समजली जात आहे. अनेकांनी पक्षाची साथ सोडून दुसऱ्या गटात उड्या मारल्या तर काहींची ना इकडे ना तिकडे अशी अवस्था झाली. मात्र विक्रमी अर्ज दाखल झाल्याने अपक्षांसह बंडखोरी करणाऱ्यांची मनधरणी करण्याचा मन:स्ताप नेत्यांना सहन करावा लागणार असून बहुतांशी ठिकाणी अपक्ष उमेदवारी डोकेदुखी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रभाग १८ मध्ये सासू-विरुध्द सून अशी लक्षवेधी लढत होत असून गतवेळी निवडणूकीपासून दूर राहिलेले पुन्हा रिंगणात उतरले आहेत. काही मोजकेच विद्यमान सदस्य रिंगणात असून सर्वच पक्ष व आघाड्यांनी विद्यमानांना बगल दिली आहे.

यंदा प्रथमच उमेदवार निवडीचा घोळ अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत सुरु होता. त्यातच काँग्रेसने स्वबळाचा नारा देत ऐन मोक्याच्या क्षणी राष्ट्रवादीतील जांभळे गट आणि मदन कारंडे यांच्या राजर्षि शाहू आघाडीशी हातमिळवणी केल्याने अनेक इच्छुकांच्या आकांक्षेवर पाणी फेरले गेले. तर शहर विकास आघाडी व मँचेस्टर आघाडीला नोंदणीच न मिळाल्याने ताराराणी आघाडी स्थापन होऊन भारतीय जनता पार्टीला साथ दिली गेली. या घडामोडीत अनेकांनी या पक्षातून त्या पक्षात उड्या मारल्या. तर अनेकांना रिंगणापासून दूर थांबत आपल्या पत्नीला मैदानात उतरवावे लागले आहे.

कॉँग्रेस पक्षाच्या चिन्हावर विजयी झालेल्या अन् नगराध्यक्ष पदाची संधी मिळालेल्या शुभांगी बिरंजे यांनी आपला कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर राजीनामा देण्यास नकार देऊन बंडाचे निशाण उभारले. त्यांच्या या भूमिकेला शहर विकास आघाडीसह राष्ट्रवादीतील मदन कारंडे गटाने पाठबळ दिले. या पाठबळावर बिरंजे यांनी अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला. परंतु, यंदाच्या निवडणुकीत कॉँग्रेस पक्षासह शहर विकास आघाडीनेही त्यांना उमेदवारी नाकारली आहे. त्यामुळे बिरंजे यांच्यावर चक्क अपक्ष म्हणून अर्ज दाखल करण्याची वेळ आली.

शहर विकास आघाडीकडून विजयी झालेले मोहन कुंभार व ध्रुवती दळवाई यांना यंदा काँग्रेसने आपल्या गोटात सामील करुन घेत उमेदवारी दिली आहे. नगरपालिका शिक्षण ङ्कंडळाचे विद्यमान उपसभापती राष्ट्रवादीचे नितीन कोकणे यांनी मंडळाच्या निवडणुकीत कॉँग्रेसची साथ सोडत शहर विकास आघाडी व भाजपशी हातमिळवणी केल्याने मंडळात सत्तांतर घडले. परंतु, या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी आपल्या पत्नीला कॉँग्रेसमधून रिंगणात उतरविले आहे.

काँग्रेसचे विद्यमान सदस्य संजय तेलनाडे हे आपले बंधू सुनील तेलनाडे यांच्यासह ताराराणी आघाडीतून लढत आहेत. तर मागील निवडणुकीत मैदानापासून दूर राहिलेले सागर चाळके व माजी नगराध्यक्षा मेघा चाळके हे दाम्पत्य पुन्हा रिंगणात उतरले असून ते वेगवेगळ्या प्रभागांतून उभे आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादी कॉँग्रेसमधून माजी आमदार अशोकराव जांभळे, त्यांच्या पत्नी कलावती जांभळे व पुत्र विद्यमान नगरसेवक नितीन जांभळे हे तिघेजण वेगवेगळ्या प्रभागांतून लढत आहेत.



सासू सून लढत लक्षवेधी

गावभागातील प्रभाग क्रमांक १८ मध्ये सासू विरुध्द सून अशी लढत होत असून याकडे सर्वांचेच लक्ष वेधले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षप्रतोद रविंद्र माने यांच्या आई इंदूमती माने या राष्ट्रवादीकडून तर बंधू मोहन माने यांच्या पत्नी वंदना मानेने या ताराराणी आघाडीकडून निवडणूक रिंगणात आहेत. सासू-सूनेची लढत चांगलीच रंगणार असल्यामुळे ती लक्षवेधी बनली आहे. एकंदरीत ही निवडणूक अनेक कारणांनी लक्षवेधी ठरणार असून माघारीच्या अखेरच्या दिवसापर्यंत नानाविध घडामोडी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र अपक्षांसह बंडखोरी केलेल्यांची मनधरणी करुन आपल्या उमेदवाराला कसे झुकते माप मिळेल याची कसरत सर्वच राजकीय पक्षांच्या नेतेमंडळींना करावी लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गॅस स्फोटातील मुलाचाही दुर्देवी मृत्यू

$
0
0

म .टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

मागील आठवड्यात येथील सुतारमळा परिसरात झालेल्या गॅस स्फोटातील जखमी गौतम पांडुरंग आवळकर याचाही शनिवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. अवघ्या आठवडाभरात वडील, मुलगी, आई आणि मुलाचा एक-दोन दिवसांच्या अंतराने मृत्यू झाल्याने आवळकर कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तर त्यांचा लहान मुलगा वैभव हा माता-पित्याचे छत्र हरपल्याने निराधार झाला आहे.

१८ ऑक्टोबर रोजी सुतारमळा गल्ली नंबर तीनमध्ये गॅस गळती होऊन त्याचा स्फोट उडाला होता. या दुर्घटनेत पांडुरग आवळकर यांच्यासह पत्नी गीता, मुलगी पूजा व मुलगा गौतम हे चौघेजण गंभीर जखमी झाले होते. तर वैभव आवळकर हा टेरेसवर झोपला असल्याने त्याला फारशी इजा झाली नव्हती. सर्व जखमींवर येथे प्राथमिक उपचारानंतर सांगलीतील रुग्णालयात पाठविण्यात आले होते. तेथे उपचार सुरु असताना सोमवारी पांडुरंग आवळकर, मंगळवारी मुलगी पूजा आणि दोन दिवसानंतर म्हणजे गुरुवारी पत्नी गीता यांचा मृत्यू झाला. या दु:खातून आवळकर कुटुंब सावरण्यापूर्वीच गौतम याचाही मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऊसदराची कोंडी कायम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

एकरकमी एफआरपी देण्यावर साखर कारखानदार तयार आहेत. मात्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एफआरपीबरोबरच जादा रकमेच्या घसघशीत पहिल्या उचलीसाठी आग्रह कायम ठेवल्याने ऊस दराबाबत रविवारी सर्किट हाऊसवर दिड तास झालेल्या पहिल्या बैठकीनंतरही कोंडी कायम राहिली. ‘एफआरपीबरोबर जादा रक्कम देण्याबाबत कारखानदार तयार नाहीत. तर ही रक्कम उशीरा घेण्यास संघटना तयार नाही. त्यामुळे पाच नोव्हेंबरपूर्वी आणखी दोन बैठक होण्याची शक्यता आहे. दोन्ही बाजूंकडून काही तडजोडी होईल. त्यातून तोडगा नक्की काढू,’ असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. त्यानुसार १ नोव्हेंबरला पुन्हा बैठक होण्याची शक्यता आहे.

ऊसदराच्या कोंडीबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सर्किट हाऊसमध्ये बैठक झाली. यावेळी खासदार राजू शेट्टी, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, आमदार चंद्रदिप नरके, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी आमदार प्रकाश आवाडे, समरजीतसिंह घाटगे, गणपतराव पाटील, प्रा. जालंदर पाटील, भगवान काटे, राहुल आवाडे यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, साखर सहसंचालक सचिन रावळ, जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे उपस्थित होते.

कारखानदार व संघटनेची बैठक झाल्यानंतर पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘कारखानदारांनी एफआरपी एकरकमी देण्याचे मान्य केले. पण संघटनेचे खासदार राजू शेट्टी मात्र त्यावर दर घोषित करा असा आग्रह धरला. त्याला कारखानदारांनी या वर्षीचा हिशोब झाल्यानंतर ​७०/३० प्रमाणे देण्याची तयारी दर्शवली. मात्र दराचे चढउतार होत असल्याने त्याबाबत आता काही हमी देणे व्यवहार्य होणार नाही. खासदार शेट्टी यांनी मात्र, त्या देय रकमेवर आता अॅडव्हान्स द्या असा पर्याय सुचवला. त्यावरही कारखानदारांनी आता दिलेल्या अॅडव्हान्सच्या खाली दर आल्यास जादा गेलेली रक्कम कशी वसूल करायची? हा तांत्रिक मुद्दा उपस्थित केला. या जादा रक्कमेच्या मुद्दयावर चर्चा थांबली असून ५ नोव्हेंबरपर्यंत त्यावर तोडगा काढून कारखाने व्यवस्थित सुरु होतील.’

राज्य बँकेने केलेल्या ३२०० रुपयांच्या मूल्यांकनाप्रमाणे ​क्विंटलला देण्यात येणाऱ्या कर्जानंतरही एफआरपी देण्यासाठी ४०० ते ५०० रुपयांचा फरक राहणार आहे. तो गोळा करुन एफआरपी देण्यावर कारखानदार तयार असल्याचे सांगत पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘संघटनेच्या मागणीप्रमाणे जादा रक्कम देण्यासाठी कारखानदारांनी कारखान्याचे गणित उद्ध्वस्त होणार नाही अशा पद्धतीने ​आकडा द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. जादा दर देण्याबाबत कारखानदार राजी आहेत. पण ते एफआरपीबरोबर देण्याऐवजी थोडा कालावधी द्या, असे त्यांचे मत आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंचे एकमत करण्यासाठी आणखी दोन बैठक होतील. अन्यही काही शेतकरी संघटना आहेत. त्यांना सोबत घेऊन बैठक बोलवण्यात येणार आहे. दोन्ही बाजूंनी दोन पाऊले मागे गेल्याशिवाय तोडगा निघणार नाही. त्यानंतर ५ नोव्हेंबरपासून कारखाने सुरू होतील.’ राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, ‘सरकार बदलल्याचा परिणाम आता दिसत आहेत. कारखानदारांचेच सरकार असल्याने ते बैठकीला येतच नव्हते. आता सरकार शेतकऱ्यांबरोबर असल्याने कारखानदारांना चर्चेला बोलवले. चर्चेतून प्रश्न सुटू शकतो.’

३१ मार्च २०१६ नंतर कारखान्यांनी चढ्या दराने विकलेल्या साखरेच्या रकमेतील भर घालून शेतकऱ्यांना पहिली उचल घसघशीत द्यावी यासाठी आग्रही आहोत. आम्ही चर्चेला तयार आहोत, याचा अर्थ एकदमच खाली येण्यास तयार आहोत, असा अजिबात अर्थ होत नाही. सामोपचाराने पहिली उचल द्यावी.

राज शेट्टी, खासदार


एकरकमी एफआरपीसाठीच ३०० तूट

राज्य बँकेने केलेल्या मूल्यांकनाप्रमाणे​ मिळणारी पहिली उचल व त्यातून मिळणाऱ्या ऊस दराची रक्कम पाहता एफआरपी देण्यासच ३०० ते ३५० रुपयांची तूट येत आहे. त्यामुळे आत्ताच एफआरपीपेक्षा जादा रक्कम देणे शक्य होणार नाही. त्याला काही कालावधी जावा लागेल.

हसन मुश्रीफ, आमदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहीद नितीन कोळी यांच्यावर आज अंत्यसंस्कार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली

नितीन कोळी यांचे पार्थिव सोमवारी सकाळी त्यांच्या मूळ गावी दुधगाव येथे येणार आहे. गावापासून दीड किलोमीटर अंतरावर असणाऱ्या वारणा नदीच्या काठावर सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पार्थिवावर सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तत्पूर्वी त्यांच्या पार्थिवाची गावातील प्रमुख चौकातून अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी केली आहे.

दुःखात बुडालेल्या दुधगावच्या नागरिकांनी दिवाळीचा सण बाजूला ठेवला आहे. पंचक्रोशीतील सावळवाडी, माळवाडी, कवठेपिराण व आष्टा शहरात व्यवहार बंद ठेवून कोळी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सर्वत्र दिवाळीची धामधूम सुरू असताना दुधगाव मात्र वीर जवानाच्या पार्थिवाच्या वाटेकडे डोळे लावून बसले आहे. शहीद नितीन कोळी यांचे पार्थिव मध्यरात्रीनंतर इस्लामपूर येथील सरकारी विश्रामगृहावर येणार आहे. तेथून सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पार्थिवाचा प्रवास दुधगावकडे सुरू होणार आहे. सकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास दुधगाव येथे त्यांचे पार्थिव आणण्यात येईल. वारणा नदीकाठी अंत्यसंस्काराच्या ठिकाणी पार्थिव येईपर्यंत गावातील सर्व युवक मंडळांच्या वतीने युवक, युवतींची मानवी साखळी उभी राहणार आहे.

दरम्यान, गेल्या दोन ते तीन दिवसांत लष्कराचे चार, तर सीमा सुरक्षा दलाचे तीन जवान शहीद झाले आहेत. शुक्रवारी रात्री पाकिस्तानच्या गोळीबारात दोन नागरिकही ठार झाले आहेत. लष्कराने जोरदार प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला आहे.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहीद नितीन कोळी यांना अखेरचा निरोप

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । सांगली

जम्मू-काश्मीरमध्ये प्रत्यक्ष ताबारेषेवर पाकिस्तानच्या गोळीबारात शहीद झालेले सांगलीचे सुपुत्र नितीन सुभाष कोळी यांना आज साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. नितीन यांच्या मूळ गावी दुधगाव इथं, वारणा नदीच्या काठावर त्यांच्यावर सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले, तेव्हा या वीराला सगळ्यांनीच मनोमन सलाम केला.

शहीद नितीन कोळी यांचं पार्थिव रविवारी श्रीनगरहून पुणे विमानतळावर आणण्यात आलं होतं. तिथून ते आज पहाटे दुधगावात पोहोचलं. त्यावेळी संपूर्ण गाव शोकसागरात बुडाला होता. भारतमातेच्या रक्षणासाठी बलिदान देणाऱ्या आपल्या 'गाववाल्या'ला पाहण्यासाठी पंचक्रोशीतून नागरिक लोटले होते. नितीन यांचं पार्थिव गावात पोहोचलं, तेव्हा सगळ्यांनाच अश्रू अनावर झाले. त्यांच्या एका डोळ्यात अभिमान होता, तर दुसऱ्या डोळ्यात दुःख.

सुरुवातीला नितीन यांचं पार्थिव त्यांच्या घरी नेण्यात आलं आणि नंतर कर्मवीर चौकात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं. तिथून त्यांची अंत्ययात्रा निघाली, तेव्हा 'नितीन कोळी अमर रहे'च्या घोषणा गावात घुमल्या. नितीन कोळींचे भाऊ उल्हास कोळी आणि मोठा मुलगा देवराज यांनी त्यांना मुखाग्नी दिला. या अंत्यसंस्कारांवेळी राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सदाभाऊ खोत, राजू शेट्टी उपस्थित होते.

दरम्यान, ‍कोळी यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारतर्फे १५ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूरच्या मेस्त्रीने केले हेलिकॉप्टर दुरुस्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बंद पडलेले हेलिकॉप्टर चारचाकी वाहनांचे मेस्त्री महाराष्ट्र गॅरेजचे मालक इम्तियाज मोमीन यांनी दुरुस्त करून आश्चर्याचा धक्का दिला. काही वेळातच हेलिकॉप्टरने हवेत भरारी घेतली. कोल्हापूरच्या कुशल कारागीरीचा अनुभव पाहुण्यांनी घेतला.

डॉ. डी. वाय. पाटील शिक्षण समूहाचे अध्यक्ष संजय पाटील यांच्याकडे चेन्नईचे मान्यवर भेटीसाठी आले. त्याचे हेलिकॉप्टर अचानक नादुरुस्त झाले. कोल्हापुरात हेलिकॉप्टर दुरुस्त करणारा कोणीच नसल्याने मोठी पंचाईत झाली. त्या वेळी अध्यक्ष पाटील यांनी कसबा बावडा येथील इम्तियाज मोमीन यांना हेलिकॉप्टर दुरुस्तीसाठी बोलाविले. त्यांच्यासोबत इम्तियाज यांचा धाकटा भाऊ युसूफसह आला. त्यांनी काही मिनिटांतच हेलिकॉप्टर दुरुस्त केले. त्याची ट्रायलही घेण्यात आली आणि काही क्षणातच आलेले मान्यवर चेन्नईकडे रवाना झाले. काही वर्षांपूर्वी मोमीन यांनी पाण्यावर चालणारी चारचाकी मोटार बनविली होती. हेलिकॉप्टर दुरुस्तीमुळे मोमीन यांच्या कौशल्याची चुणूक पुन्हा सर्वांना पाहायला मिळाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images