Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

मराठा मोर्चाचा आज कोल्हापुरात एल्गार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
कोपर्डी घटनेबाबत खदखदत असलेला संताप आणि शिक्षण, रोजगारांच्या संधींसाठी सजग झालेला मराठा समाज मराठा क्रांती मूक मोर्चाच्या माध्यमातून विविध प्रलंबित मागण्या घेऊन शनिवारी (१५ ऑक्टोबर) कोल्हापूरच्या रस्त्यावर उतरणार आहे. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्याबरोबरच सांगली, सातारा तसेच सीमाभाग, कोकणातून प्रचंड संख्येने मराठा समाज शहरात दाखल होणार असल्याने हा मोर्चा ‘न भूतो...’ होईल. चार विविध ठिकाणाहून मोर्चा सुरू होऊन दसरा चौकात येणार असल्याने शनिवारी सकाळपासून शहरात येणाऱ्या नऊ मार्गावरील तसेच अंतर्गत वाहतूक मोर्चा संपेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. मोर्चामुळे शहरात अघोषित बंदचे वातावरण राहणार आहे.
कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ काढण्यात येणाऱ्या मराठा क्रांती मूक मोर्चाचे नेतृत्व रणरागिणी करणार आहेत. सकल मराठा समाजाच्यावतीने आयोजित मोर्चाची सुरुवात शिवाजी पेठेतील गांधी मैदानातून सकाळी अकरा वाजता होणार आहे. राष्ट्रमाता जिजाऊ व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जिजाऊ वंदनेनंतर मोर्चा सुरु होईल. गांधी मैदानबरोबरच सायबर चौक, रूईकर कॉलनीतील संभाजी महाराज पुतळा आणि कसबा बावड्यातील भगवा चौक या ठिकाणांवरून एकाचवेळी मोर्चा सुरू होईल. मोर्चाच्या अग्रभागी युवती, महिला असतील. मोर्चा मार्गावरील शिवाजी महाराज, बिंदू चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, राजाराम महाराज, महाराणी ताराराणी, दसरा चौकातील राजर्षि छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यांना मुलींच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात येणार आहे. दुपारी एक वाजता सहा मुलींचे शिष्टमंडळ विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांना देणार आहे. त्यानंतर दसरा चौकात या मुलींची भाषणे होतील. त्यानंतर राष्ट्रगीत होऊन मोर्चा विसर्जित होणार आहे.
प्रत्येक चौकाचौकात लावण्यात आलेले, वाहनांवर फडकणारे भगवे ध्वज, मोठमोठे फलक यामुळे शहरातील वातावरण भगवे बनले आहे. भगवे ध्वज घेऊन जाण्यासाठी सकल मराठा समाजाच्या कार्यालयांत दिवसभर लगबग होती. मोर्चामार्गावर वॉच टॉवर उभारले आहेत. तसेच सर्व सहभागींना सूचना करण्यासाठीची ध्वनी यंत्रणाही उभारण्यात आली आहे. विविध चौकांत मोर्चा पाहण्यासाठी १५ स्क्रिन बसवले आहेत. शुक्रवारी दुपारपासूनच मोर्चाच्या विविध ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. शनिवारी शहराच्या रस्त्यावर साडेचार हजार पोलिस राहणार आहेत. शिवाय मोर्चातील दहा हजार स्वयंसेवक नेमलेल्या ठिकाणी हजर राहतील. शहरात नऊ प्रवेशद्वारांकडून येणाऱ्या वाहनांची पार्किंगची ६५ ठिकाणी व्यवस्था केली आहे. शिवाजी विद्यापीठ, कृषी महाविद्यालय, राजाराम कॉलेज, शेंडा पार्क, तपोवन अशी पार्किंगची मोठी ठिकाणे असतील. जवळपास पाच लाखाहून अधिक वाहने कोल्हापुरात येतील असा पोलिसांचा अंदाज आहे. केएमटी तसेच रिक्षा वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पार्किंग स्पॉट सज्ज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मराठा क्रांती मोर्चासाठी संयोजकांनी शहरासह आसपास तयार केलेले ६५ पार्किंग स्पॉट सज्ज झाले आहेत. ९ प्रवेश ठिकाणांवरून शहरात प्रवेश करणाऱ्या पाच लाख वाहनांना पुरेशी जागा उपलब्ध केली असून, मोर्चेकरी परत जाताना वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी संयोजकांनी विशेष दक्षता घेतली आहे. मोर्चासाठी येणाऱ्या नागरिकांना पार्किंग स्थळांवरच पाणी आणि खाद्यपदार्थांचीही व्यवस्था केली आहे.

सकल मराठा क्रांती महामोर्चासाठी शनिवारी (ता.१५) शहरात किमान पाच लाख वाहने दाखल होती, असा संयोजकांचा अंदाज आहे. एवढ्या मोठ्या संख्येने येणाऱ्या वाहनांना पार्क करण्यासाठी पुरेशी आणि सोयीची जागा उपलब्ध करण्यासाठी संयोजकांसह पोलिस प्रशासनाने ६५ जागा निश्चित केल्या होत्या. या जागांवर पार्किंगचे निजोजन करण्याची जाबाबदारी मुस्लिम संघटनांनी स्वीकारली होती. त्यानुसार शेंडा पार्क, तपोवन मैदान, शिवाजी विद्यापीठ, राजाराम तलाव परिसर, शाहू मार्केट यार्ड, रुईकर कॉलनी मैदान, सोनतळी आदींसह ६५ ठिकाणी पार्किंगची तयारी पूर्ण झाली आहे. अंतिम टप्प्यात विविध संस्थांनी पार्किंग ठिकाणे सुसज्ज करण्यासाठी हातभार लावला.

पार्किंग स्थळांवर मार्गदर्शक फलक, स्टेजची उभारणी, वॉच टॉवर यासह चॉकपिटने मार्गांचीही आखणी केली आहे. शहरात प्रवेश करणाऱ्या नऊ मार्गांवर स्वयंसेवक तैनात असणार आहेत. वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी १००० स्वयंसेवक पोलिसांना मदत करणार आहेत. याशिवाय प्रत्येक पार्किंग स्पॉटवर मोर्चेकऱ्यांसाठी पाण्यासह खाद्यपदार्थांचीही व्यवस्था केली आहे. वाहनांच्या दुरुस्तीसाठी मेकॅनिकही उपलब्ध असतील. पार्किंग व्यवस्थेसाठी हामजेखान सिंधी, जहाँगीर अत्तार, इर्षाद टिनमेकर, सलीम कुरणे हे त्यांच्या सहकाऱ्यांसह पार्किंग स्थळांवर उपस्थित राहणार आहेत.

पार्किंग स्थळांवरील नियोजन

पार्किंग स्पॉट : ६५

वाहतूक पोलिस : ६५

पोलिस कॉन्स्टेबल : ६५

महापालिका अधिकारी : ६५

डॉक्टर्स आणि मदतनीस : ९०

व्हाइट आर्मीचे जवान : ६५

स्वयंसेवक : १०००

मुस्लिम स्वयंसेवक : १५०

एसटी महामंडळाचे कर्मचारी : ४५

केएमटीचे कर्मचारी : ४५

क्रेन : १५

प्रत्येक ठिकाणी १० ते १२ जणांचे पथक कार्यरत असेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मलमपट्टी नको, प्रश्नांचे मूळ शोधा

$
0
0

‘संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीनंतर आता मराठा समाजाने एकत्र येऊन आपल्या प्रश्नांवर आवाज उठवला. अतिशय शिस्तबद्धरीत्या व संयमाने काढल्या जात असलेल्या मोर्चांमधून मराठा समाजाने आतापर्यंत अंतःकरणात असलेली खदखद मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तात्कालीक तोडगा काढून मलमपट्टी करण्याचा प्रयत्न सरकारने करू नये. शिक्षण व आर्थिक परिस्थिती या दोन प्रमुख मुद्द्यांवर चिंतन, मनन करून प्रश्नांच्या मुळापर्यंत जाण्याची गरज आहे. सरकारला त्या अनुषंगाने धोरणांचा पुनर्विचारच करावा लागेल,’ असे मत ‘नाबार्ड’चे माजी अध्यक्ष डॉ. यशवंतराव थोरात यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ शी बोलताना व्यक्त केले.


प्रश्न ः शेती हा प्रमुख व्यवसाय असलेल्या बहुसंख्य मराठा समाजाला भेडसावणाऱ्या प्रश्नांच्या मुळाकडे आपण कशा पद्धतीने पाहता?

विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मराठे म्हणजे शेती व सेना असेच समजले जायचे. त्यानंतरची पिढी हळूहळू शिक्षणाकडे वळली. त्यातील काहींनी अपवादानेच शिक्षण घेतले व जीवनमान उंचावले; पण समाज म्हणून पाहिला तर शैक्षणिकदृष्ट्या मागासच राह‌िला. स्वातंत्र्यानंतर लोकशाहीतून राजकीय सत्ता मिळाली; पण प्रशासकीय सत्ता मिळाली नाही. त्यावेळी मराठा समाजाची अवस्था मंत्री किंवा संत्री अशीच होती. चांगल्या नोकऱ्यांसाठी आवश्यक असणारे शिक्षणच मिळाले नाही. दुसरीकडे शेती कमी होत चालली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सधनता सोडल्यास इतरत्र परिस्थिती वाईट आहे. केवळ सबळ अथवा काही मध्यम शेतकऱ्यांपर्यंतच सरकारच्या योजना पोहोचल्या. दुर्बल घटक अजूनही उपेक्षितच आहे. चांगले शिक्षण नाही म्हणून चांगली नोकरी नाही. शेती कमी होत चालली आहे, त्यातून उत्पादनही कमी होत आहे. त्यामुळेच समाजाला आता आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा वाटू लागला आहे.

प्रश्न ः प्रश्न सोडवण्यासाठी कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यायला हवे?

सरकारने चांगल्या शाळा, चांगले शिक्षक, चांगले शिक्षण दिले नसल्याने गुणवत्ता कशी मिळवायची? आरक्षण हा मुद्दा योग्य की अयोग्य यावर मी बोलणार नाही; पण ​आरक्षण का मागतात हे सरकारने पाहिले पाहिजे. शिक्षणाबाबतची जबाबदारी सरकारने पार पाडली का? ती व्यवस्थितपणे पार पाडली असती तर नक्कीच ही परिस्थिती ओढवली नसती. सक्षम शिक्षण व्यवस्था ही मोठी गरज आहे. सध्या दुसरा कोणता पर्याय समोर दिसतो का? आरक्षणाची​ चर्चा बाजूला ठेवून विचार केला तर आर्थिक निकषावर आधारित शिक्षण व्यवस्था तरी सरकारने दिली का? या सर्व प्रश्नांबाबत सरकारने नेहमीच विविध घटकांना आरक्षण देत तत्कालीन तोडगे काढून मलमपट्टी केली. जखम बरी करण्यासाठी मूळ शोधलेच नाही.

प्रश्न ः आरक्षण वा अॅट्रॉसिटी कायदा असो, मराठा मोर्चांसाठी नेमके कोणते निमित्त ठरले?

शिक्षणाच्या पातळीवर मराठा समाजातील नवीन पिढीला सतत नवनवीन अनुभव येत आहेत. कोपर्डीसारखी घटना घडली. या पार्श्वभूमीवर मराठा समाजाने या दोन प्रमुख मागण्या मांडल्या. पण यापेक्षाही आतापर्यंत सरकारला सक्षम शिक्षण व्यवस्था उभी करण्यात आलेले अपयश व कायद्याची योग्य अंमलबजावणी हे साऱ्यांचे प्रमुख कारण ठरले आहे. शिक्षण व्यवस्था नीट नसल्याने आरक्षणाची मागणी करावी लागली आहे, तर अॅट्रॉसिटी कायद्याची अंमलबजावणीही नीट केली नाही. त्यातूनच हे प्रश्न निर्माण झाले आहेत. याबाबत सरकारी यंत्रणेला आतापर्यंत अपयशच आले आहे. त्यामुळे नवीन पिढी दाद मागणार नाही तर आणखी काय करणार? मराठा समाजाला समाजातील आपली जबाबदारी माहिती आहे. त्यामुळेच इतके मोठे मोर्चे निघूनही त्यात शांतता आहे. त्याची जाण ठेवण्याची जबाबदारी आता सरकारवर आली आहे.

प्रश्न ः समाज प्रगत झाला तर देश प्रगत होतो. त्यामुळे सर्वंकष प्रगतीचा विचार करण्यासाठी कोणती पावले उचलली गेली पाहिजेत?

आरक्षणाचा विषय संवेदनशील आहे. देशातील मागास समाजांचा स्तर उंचावण्यासाठी आरक्षण देण्यात आले; पण आता देशपातळीवरच आरक्षण धोरणाचा विचार करण्याची वेळ आली आहे. देशाच्या प्रगतीसाठी गुणवत्ता आवश्यक आहे. गुणवत्ता कशी निर्माण करायची हे पाहण्याची गरज आहे. ज्या गोष्टीतून गुणवत्तेला छेद बसणार आहे, अशा बाबींचा विचार आधी झाला पाहिजे. त्यावर प्राधान्याने उपाय शोधले पाहिजेत. मराठा समाजाच्यादृष्टीने विचार करायचा झाल्यास हा समाज स्वाभिमानी आहे. स्वतःच्या हिमतीवर पुढे गेला आहे. त्याच्या प्रगतीसाठी चांगले शिक्षण, चांगले शिक्षक, स्पर्धात्मक परीक्षांचा पाया मजबूत करणारे शिक्षण दिल्यास या समाजाला आरक्षणाची गरजच भासणार नाही. शिक्षण व गुणवत्तेवर हा समाज आपोआपच प्रगती करेल.

Udaysing.patil@timesgroup.com

@udaysingpatilMT

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठा महामोर्चाची प्रचंड उत्सुकता

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

‘देख लेना आँखो से, हम आयेंगे लाखोंसे...,’ ‘एक मराठा लाख मराठा,’ ‘आता नाही तर कधीच नाही,’ अशा आशयाच्या फलकांसह आज (शनिवारी) होत असलेल्या सकल मराठा क्रांती मूक मोर्चासाठी शुक्रवारीही जनजागृती फेरी काढण्यात आली. दिवसभर शहरात मोर्चाची तयारी सुरू राहिली. प्रहार अपंग क्रांती आंदोलन, वकील संघटनांनी जनजागृती फेरी काढली. ठिकठिकाणी कोपरा सभा घेण्यात आल्या. युवकांनी प्रत्येक वाहनांवर स्टिकर, झेंडे लावल्याचे दिसत होते. भेटेल त्याला उद्या यायला लागतंय... असा संदेश देत जनजागृती सुरु ठेवली होती. सर्व पेठांत केवळ मोर्चाचाच जागर सुरू राहिला.

शनिवारी होत असलेल्या मराठा क्रांती मोर्चा ऐतिहासिक ठरणार असल्याने नागरिकांत उत्कंठा वाढली आहे. मोर्चा जनजागृतीसाठी दुचाकी, ऑटो रिक्षा आणि चारकाची वाहनांवर भगवे ध्वज फडकले आहेत. टी शर्ट, बिल्ले, बॅनर, झेंडे, स्टिकर खरेदीसाठी चौकाचौकांत गर्दी दिसत होती. चौकाचौकात भव्य फलक उभारणीचे काम तरूण मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून सुरु होते. शिवाजी पेठ, मंगळवार, बुधवार पेठांसह उपनगरातील घराघरावरही भगवे ध्वज फडकले. मोर्चा नियोजन समितीची शहरातील वॉर रूम, प्रधान कार्यालये फुलून गेली होती. मराठा समाजासह अन्य समाजाचे कार्यकर्तेही वॉर रूम थांबले. पेठांतील युवक आणि युवतींच्या गर्दीने वॉर रूमही फुलले. प्रमुख पेठा, उपनगरातील तरूण मंडळे, कार्यालयात बैठका, मेळावे आणि जनजागृती फेरी काढण्यात आली.

प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्यावतीने सकल मराठा क्रांती मूक मोर्चाच्या जनजागृतीसाठी शहरात अपंगाची मोटार सायकल रॅली काढण्यात आली. माऊली बळवंत आडकूर यांनी झेंडा फडकावल्यानंतर फेरीची सुरूवात झाली. सकल मराठा क्रांती मोर्चाचे वसंतराव मुळीक, हर्षल सुर्वे यांच्या उपस्थितीत फेरीची सुरूवात झाली. दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यापासून फेरीची सुरूवात झाली. शहराच्या प्रमुख मार्गावरून फेरी काढल्यानंतर शिवाजी चौकात सांगता झाली. मराठा समाजाला आरक्षण आणि कोपर्डी घटनेचा निषेध करणारे फलक फेरीत होते. सुमारे दोनशेहून अधिक अपंग फेरीत सहभागी झाले. क्रांती आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष देवदत्त माने, जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम पाटील, संदीप दळवी, विकास चौगुले, संजयसिंह जाधव, शहराध्यक्ष प्रशांत म्हेतर, शैलेश सातपुते, महिला शहराध्यक्ष शर्मिला इनामदार, श्रद्धा माने, रंजना गुलाईकर, जानवी मोकाशी आदी सहभागी झाले.

जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने मोटारसायकल फेरी काढण्यात आली. कसबा बावडा रोडवरील न्यायसंकुलापासून फेरीची सुरुवात झाली. असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश मोरे यांच्या हस्ते फेरीची सुरूवात झाली. फेरीमध्ये सर्व वकील आपल्या ड्रेसकोडसह सहभागी झाले. फेरीच्या सुरुवातीला जीप आणि त्यानंतर मोटारसायकल, कोपर्डी घटनेच्या निषेधाचे फलक आणि भगवे ध्वज होते. जिल्हा पोलिस प्रमुख कार्यालय रोड, ताराराणी चौक, व्हीनस कॉर्नर, लक्ष्मीपुरी, टेंबे रोड, मिरजकर तिकटी, शिवाजी पेठ, साकोली कॉर्नर, महाद्वार रोड, मनपा मार्गे फेरी दसरा चौकातील राजर्षी शाहू पुतळ्याजवळ आली. मान्यवरांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. फेरीत उपाध्यक्ष अरूण पाटील, सचिव सर्जेराव खोत, माजी अध्यक्ष विवेक घाटगे, अॅड. मेघा पाटील, सुचित्रा घोरपडे, अनुजा घोरपडे आदी सहभागी झाले. कोपर्डीत चिमुकलीवर अत्याचार झाला. त्याचा आक्रोश रॅलीतून नजरेस पडला. ‘जिजाऊंच्या लेकी आम्ही, वाकडी नजर टाकलीस तर याद राख’, ‘ज्या जिजाऊने छत्रपती शिवाजी महाराज यांना घडविले त्यांच्याच आम्ही वारस आहोत’, ‘छत्रपती ताराराणीचा करारी बाणा आमच्या अंगी आहे’, अशा आशयाचे फलक फेरीत दिसत होते.

०००

तयारी मोर्चाची

दरम्यान, मोर्चा प्रारंभाचे एक ठिकाण असलेल्या गांधी मैदान येथे महापालिकेतर्फे पुन्हा स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. व्हाइट आर्मीच्या जवानांनी रंगीत तालीम केली. मोर्चाच्या ठिकाणी सुमारे दहा हजार स्वयंसेवक काम करणार आहेत. त्यांच्या प्रशिक्षणाची रंगीत तालीम मावळे आणि रणरागिणींनी केली. पोलिसांकडून या स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्यात आले असून ताराराणी चौक ते दसरा चौक या मार्गांवर कार्यरत राहणार आहेत. शहरातील रस्ते पॅचवर्क करण्यासाठी गुरुवारी महापालिकेची यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत राहिली. दुपारी दोन वाजेपर्यंत मोर्चाच्या मार्गावरील कचरा उठाव करण्यात आला. शहर वाहतूक शाखेच्या वतीने मार्गावरील वाहने उचलण्याचे काम सुरू राहिले. राष्ट्रीय महामार्गावरील सांगली फाटा, गोकुळ शिरगावजवळ वाहनांसाठी दिशादर्शक नकाशे आणि फलक उभारण्यात आले. मोर्चाच्या मार्गावर १४ भव्य एलइडी स्क्रिन उभारण्यात आले आहेत. मोर्चा मार्गावर सूचना देण्यासाठी एफ. एम. यंत्रणा कार्यरत राहिली. राजर्षी शाहू पुतळ्यापासून दोन किलोमीटर अंतरावर सुमारे दोनशे ध्वनीक्षेपक लावण्याचे काम सुरु होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आचारसंहितेमुळे पोलिसाचा ताण कमी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मराठा क्रांती महामोर्चातील शिस्त आणि स्वतंत्र आचारसंहितेमुळे पोलिसांवरील ताण कमी झाला आहे. शनिवारी (ता. १५) होणाऱ्या मोर्चासाठी चोख पोलिस बंदोबस्त तैनात केला असला तरीही, शस्त्राविना पोलिस बंदोबस्तावर असणार आहेत. मोर्चाची पार्श्वभूमी संवेदनशील असल्याने पोलिसांनी मोर्चेकऱ्यांशी सौजन्याने आणि नम्रतेने वागावे, अशा सूचना विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी बंदोबस्तावरील पोलिसांना केल्या आहेत. शुक्रवारी(ता. १४) मुख्यालयात बंदोबस्ताच्या नियोजनानंतर ते पोलिसांशी बोलत होते.

मराठा क्रांती महामोर्चासाठी पोलिसांनी कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर आणि पुणे ग्रामीणमधील पोलिसांना बंदोबस्तासाठी पाचारण केले आहे. सकल मराठा संघटनांच्या स्वयंसेवकांसह पोलिस बंदोबस्तावर लक्ष ठेवणार आहेत. मोर्चासाठी स्वतंत्र आचारसंहिता असल्याने आजवर झालेले सर्वच मोर्चे शांततेत आणि शिस्तीत पार पडले आहेत. कोल्हापुरातही मोर्चाला गालबोट लागू नये, यासाठी पोलिस प्रशासनाने विशेष दक्षता घेतली आहे. बाहेरील जिल्ह्यातून आलेल्या पोलिसांना बंदोबस्ताविषयी मार्गदर्शन करण्यासाठी पोलिस प्रशासनाने शुक्रवारी सकाळी मुख्यालयात विशेष मार्गदर्शन आयोजित केले होते. यावेळी आयजी विश्वास नांगरे-पाटील आणि पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी पोलिस कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. नांगरे-पाटील म्हणाले, ‘राज्यात आजपर्यंत झालेल्या मराठा क्रांती मोर्चांमध्ये शिस्तीचे काटेकोर पालन झाले आहे. मोर्चेकऱ्यांना आ‍वरण्यासाठी पोलिस बंदोबस्ताची गरज पडणार नाही, त्यामुळे पिस्तूल, बंदूक, अश्रुधुराच्या नळकांड्या असे कोणतेही शस्त्र मोर्चादरम्यान पोलिसांकडे नसेल. पार्किंग सुरळीत होणे आणि मोर्चानंतर नागरिकांना शहराबाहेर निघण्यासाठी पोलिसांनी महत्त्वाची भूमिका पार पाडायची आहे. पोलिसांनी मोर्चेकऱ्यांशी सौजन्याने आणि नम्रतेने वागावे’, अशा सूचना आयजी नांगरे-पाटील यांनी दिल्या.

‘मोर्चादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी संशयास्पद व्यक्ती, वस्तूंवर विशेष लक्ष ठेवावे. सोबत असलेल्या स्वयंसेवकांसह योग्य समन्वय ठेवून काही शंका उपस्थित झाल्यास तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधा’, अशा सूचना पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी दिल्या. यावेळी सकल मराठा संघटनांच्या कोअर कमिटीचे काही सदस्य उपस्थित होते, त्याचबरोबर शहर पोलिस उपाधीक्षक भारतकुमार राणे, सतीश माने यांच्यासह सर्व पोलिस निरीक्षकही उपस्थित होते.

पोलिसांची रंगीत तलीम

बंदोबस्तावरील पोलिसांना नेमून दिलेले ठिकाण लक्षात यावे यासाठी शुक्रवारी संध्याकाळीच बंदोबस्ताची रंगीत तालीम घेण्यात आली. पोलिस कर्मचारी आणि सकल मराठा संघटनांच्या स्वयंसेवकांनी एकत्रित रंगीत तालीम केली. पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसह मोर्चा मार्गासह शहरातील महत्त्वाच्या ठिकाणांची पाहणी केली. पार्किंग स्पॉटनाही भेट देऊन त्या ठिकाणी बंदोबस्तासाठी नेमलेलेल्या पोलिसांना विशेष सूचना देण्यात आल्या.

पोलिस अधीक्षक १

पोलिस उपअधीक्षक ५

पोलिस निरीक्षक ४०

सहायक पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक १३५

पोलिस कॉन्स्टेबल महिला ३००

पोलिस कॉन्स्टेबल पुरुष १०००

वाहतूक पोलिस ३००

स्ट्रायकिंग फोर्स ४ पथके

शीघ्र कृती दल २ पथके

स्वयंसेवक १०,०००

संपर्कासाठी पोलिसांची स्वतंत्र यंत्रणा

मोर्चात लाखो लोक सहभागी होणार असल्याने मोबाइल यंत्रणा कोलमडण्याची शक्यता आहे. असे झाल्यास संपर्क साधण्यात अडचणी निर्माण होऊ नयेत, यासाठी पोलिसांकडे १७० वॉकीटॉकी आणि ३० मेगाफोन असणार आहेत. पोलिसांची दळणवळण यंत्रणा सक्षम ठेवण्यासाठी दसरा चौक परिसरात पोलिसांनी नियंत्रण कक्षही निर्माण केले आहे. पोलिस अधीक्षक कार्यालयातील सीसीटीव्ही कंट्रोल रुममधून पोलिसांनी मोर्चावर नजर राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तुळजाभवानीच्या दर्शनासाठीभक्तीचा महासागर लोटला

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

चलो बुलावा आया है, माता ने बुलाया है, आई राजा उदे उदे सदानंदीचा उदे उदे, बोल भवानी माता की जय, असा जयघोष करीत कोजागरी पौर्णिमेनिमित्त महाराष्ट्राची कुलस्वामीनी तुळजाभवानीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह आंध्र आणि कर्नाटकातील भाविकांचे जत्थे शनिवारी तुळजापूरच्या दिशेने रवाना झाले. महिलांसह युवक आणि युवतींचा मोठा सहभाग दिसून आला. सोलापूर-तुळजापूर मार्ग भक्तांच्या गर्दीने फुलून गेला होता.

शनिवारी आणि रविवार, अशी दोन दिवस पौर्णिमा आली आहे. मात्र, रविवारच्या कोजागरी पौर्णिमेला अनन्य साधारण महत्व असल्यामुळे लाखो भाविक तुळजापूरच्या दिशेने गेल्या दोन दिवसांपासून रवाना होत आहेत. शनिवारी तर हजारो भक्तांच्या गर्दीने सोलापूर फुलून गेले होते. सायंकाळी सहा नंतर मात्र तुळजापूरला जाणारा मार्ग भक्तांच्या अलोट गर्दीने जाम झाला होता. आई राजा उदो उदोचा जयघोष करीत आनंद आणि उत्साहामध्ये भाविकांची पाऊले तुळजापूरच्या दिशेने झपझप पडत होती. पाठीवर कपड्याचे ओझे, हातात पाण्याची बाटली आणि मुखी आई जगदंबेचा जयघोष करीत निघालेल्या भक्तांच्या उत्साहाला उधाण आले होते. युवक आणि युवतींचा उत्साह गगनात मावेनासा झाला होता. सोलापूर-तुळजापूर रस्त्याला जत्रेचे स्वरुप आले होते. मोबाइलवरून सेल्फी घेत तरुणाई आपल्या मित्र व आप्तेष्ठांना तुळजापूर मार्गावरील भक्तीची जाणीव करून देत होती.

दरम्यान कोजागरी पौर्णिमेनिमित्त तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी पायी निघालेल्या भवानी भक्तांसाठी विविध सामाजिक संघटनांकडून मार्गावर महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. ठिकठिकाणी दालने उभारण्यात आली होती. शांत आणि शिस्तबद्ध पद्धतीने रांगेतूनच महाप्रसाद घेण्यात येत होता. काही किलोमीटर चालून थकलेले भक्त रस्त्याच्याकडेला आराम करताना दिसून येत होते. सोलापूर-तुळजापूर महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असल्यामुळे आणि भाविक मोठ्या संख्येने असल्यामुळे या मार्गावरची वाहतूक नळदुर्ग मार्गावरून वळविण्यात आली होती. शनिवारी सकाळपासूनच भाविक तुळजापूरच्या दिशेने पायी चालत निघाले होते. या भक्तांना कोणत्याही प्रकारचा शारीरीक त्रास जाणवू नये, म्हणून ठिकठिकाणी मोफत औषधांचे स्टॉलही उभारण्यात आले होते. या शिवाय पहाटे तुळजापूरपासून कांही अंतरावर पायी चालून आलेल्या भक्तांचा थकवा घालविण्यासाठी गरम पाण्याची व्यवस्थाही करण्यात आली होती. तुळजापुरात कोजागरी पौर्णिमेनिमित्त भक्तीचा मळा फुलला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्व धर्म‌ियांचा सेवाभाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मूक मोर्चात सहभागी झालेल्या लाखो लोकांना पिण्यासाठी पाणी, नाष्टा, सरबत मिळावा यासाठी मुस्लमि, जैन, गुजराती, सिंधी समाजातील लोकांसह शहरातील अनेक संस्था व मंडळांनी मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकांची सेवा करत बंधुभाव जपला.

मोर्चात सहभागी होण्यासाठी ग्रामीण भागातील लोकांची खाण्याची पिण्याची गैरसोय होऊ नये, यासाठी अनेक समाज व संस्थानी खारीचा वाटा उचलून योगदान ​दिले. मोर्चाची घोषणा झाल्यापासून संयोजक म्हणून मुस्ल‌िम समाजाच्या मुस्ल‌िम बोर्डिंगने योगदान देण्यास सुरुवात केली. शेंडा पार्क येथील सर्व पार्किंग व्यवस्थेची जबाबदारी मुस्लीम समाजातील कार्यकर्त्यांनी उचलली होती. गेली चार दिवस शेंडा पार्कच्या सपाटीकरणाच्या कामात ४५० कार्यकर्ते परिश्रम घेत होते. शुक्रवारी रात्री कार्यकर्त्यांनी पार्किंगच्या ठिकाणी मुक्काम केला होता. पार्किगची नियोजनाची चोख जबाबदारी त्यांनी पार पाडली. मोर्चाच्या बंदोबस्तास असलेल्या अंदाजे पाच हजार पोलिस व स्वयंसेवकांसाठी खिचडीच्या पाकिटांची व्यवस्था मुस्ल‌िम बोर्डिंगने केली. वारणा उद्योग समुहाने दिलेल्या दोन लाख पाण्याच्या पाऊचे वाटप मोर्चात सहभागी झालेल्या व्यक्तींना पुरवण्यासाठी मुस्ल‌िम बोर्डिंगने नियोजन केले होते. बिंदू चौकातील बडी मशीद येथे पोहे व केळी वाटप करण्यात आली. शिरोळ तालुका मुस्ल‌िम समाजाने राजेश मोटर परिसरात भडंग व पाण्याचे वाटप केले. सानेगुरूजी परिसरात बिडी कॉलनी मुस्ल‌िम समाजाने व नागदेवाडी मुस्ल‌िम समाजाने पोहे, उपीट व पाण्याचे वाटप केले.

दिगंबर जैन बोर्डिंग व जैन समाजाच्यावतीने शहाजी महाविद्यालयासमोर नळाद्वारे कोकम सरबताचे वाटप केले. १५ लाख लिटर नवीन पाण्याच्या टाकीत सरबत तयार केले होते. ते नळावाटे फुटपाथवर आणले होते. आडव्या नळाला २० हून अधिक तोट्या ठेवल्या होत्या. तसेच ग्लासेस ठेवले होते. कसबा बावडा व शिये मार्गाकडून येणाऱ्या मोर्चातील लोकांनी सरबत वाटपाचा लाभ घेतला. रमणमळा चौकात सिंधी समाजाच्यावतीने भडंग व पाणी वाटण्यात आले.

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्यावतीने वीस हजार पिशव्या ताकाचे वाटप केले. ताराराणी चौकातील वीरशैव बँकेच्या दारात ताक वाटपाचे काम सुरू होते. यावेळी गोकुळचे अध्यक्ष विश्वास नारायण पाटील, संचालक राजेश पाटील, धैर्यशील देसाई, सूर्यकांत पाटील-बुदिहाळकर, अनिल सोलापुरे उपस्थित होते. कपिलतीर्थ मार्केट येथील हॉलमध्ये महालक्ष्मी भक्त मंडळाच्या अन्नछत्रात अंदाजे दहा हजार आंदोलकांनी लाभ घेतला.

तपोवन येथे न्यू कॉलेजच्यावतीने दोन हजार लोकांना पुलाव्याचे वाटप करण्यात आले. शिवाजी तरुण मंडळाच्यावतीने गांधी मैदान येथे एक हजार किलो पोहे व एक लाख पाण्याच्या बाटल्यांचे वितरण करण्यात आले. निवृत्ती चौक तरुण मंडळाच्यावतीने पोहे वाटण्यात आले. महाराष्ट्र सेवा मंडळाने वडा पावचे वाटप केले. मंगळवार पेठेतील नंगीवली तालमीने भडंग व पाण्याचे वाटप केले. जैन श्वेताबंर समाजाच्यावतीने भडंग वाटण्यात आले. याशिवाय शहरातील सर्व पेठा, तालीम परिसरात पाणी व सरबत वाटण्यात आले.

सरकारप्रेमी सेवाभावी संस्था

मराठा मोर्चाच्यातील सहभागी बांधवांना देवकर पाणंद येथील सेवाभावी संस्था व अॅटो वर्ल्ड यांच्यावतीने दहा हजार केळी व राजिगरा लाडूचे वाटप करण्यात आले. दीडशे स्वयंसेवकांच्या मदतीने कळंबा फिल्टर हाऊस व देवकर पाणंद येथे वाटप करण्यात आले. मोर्चानंतर या सर्व स्वंयसेवकांनी स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपनगरांत शुकशुकाट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरातील चार ठिकाणांहून दसरा चौकाकडे जाणारा मोर्चा मार्ग आणि या मार्गाला जाडणारे उपमार्ग भगव्या गर्दीने गजबजले होते. अवघे शहर मोर्चामय झाले असताना उपनगरांनी मात्र शुकशुकाट आणि बंदसदृश स्थिती अनुभवली. वाहतुकीसह दुकानेही बंद राहिल्याने उपनगरांमधील सर्व व्यवहार ठप्प होते, तर अनेकांनी सहकुटुंब मोर्चात सहभाग घेतल्याने दुपारी दोनपर्यंत शुकशुकाट अनुभवला.

मोर्चासाठी नऊ प्रवेशद्वारे निश्चित केली होती, त्यानुसार पार्किंग स्थळांवर वाहने पार्क केल्यानंतर मोर्चेकरी थेट मोर्चास्थळांवर जात होते. तावडे हॉटेल परिसरातून शहरात येणारे मोर्चेकरी मुख्य मार्गावरून ताराराणी चौकात पोहोचले. कसबा बावड्याकडून येणाऱ्या मोर्चेकऱ्यांनाही मुख्य मार्ग मिळाला होता. शेंडा पार्क, तपोवन मैदान, शिवाजी पूल आणि शहरातून दसरा चौकाकडे पोहोचणाऱ्या मोर्चेकऱ्यांना मात्र अनेक मार्ग उपलब्ध असल्याने शहरात मोर्चेकऱ्यांची वर्दळ सुरूच होती. सकाळी दहाच्या आतच उपनगरांतील बहुतांश लोक सहकुटुंब मोर्चात सहभागी होण्यासाठी घराबाहेर पडले होते. शाळांना सुट्या जाहीर केल्याने सर्व शाळा आणि खासगी क्लासेसही बंद होते. रिक्षा आणि केएमटी बसेसच्या बंदमुळे एकही वाहन रस्त्यावर फिरत नव्हते. सर्व दुकानेही बंद राहिली, त्यामुळे मोर्चा मार्गाशिवाय इतरत्र लोक क्वचितच दिसत नव्हते. पार्किंग स्थळांपासून मुख्य मोर्चामार्ग आणि दसरा चौकाकडे जाणाऱ्या काही मार्गांवर उपनगरांतील मंडळांनी पाणी, सरबत आणि अल्पोपहाराची सोय केली होती. मोर्चाला जाताना लोकांनी सोबत आणलेले पाणी आणि खाद्यपदार्थ वापरले. परत जाताना मात्र पाण्याच्या स्टॉलवर मोर्चेकऱ्यांची गर्दी दिसत होती. परतीचे मुख्य मार्ग वगळता उपनगरांमध्ये सर्वत्र शुकशुकाट होता. उपनगरांनी एवढी शांतता पहिल्यांदाच अनुभवली असावी, अशी चर्चा चौकाचौकांमध्ये सुरू होती.


मदतीसाठी सरसावले हात

जिल्ह्यातून आलेल्या लाखो मोर्चेकऱ्यांची शहरात आल्यानंतर खाण्यापिण्याची आबाळ होऊ नये, यासाठी विविध संघटनांसह तरुण मंडळांनीही दक्षता घेतली होती. पिण्याचे पाणी, केळी, पोहे, पुलाव भात यांचे स्टॉल लावले होते. वाढते ऊन आणि पार्किंग ठिकाणांपासून मोर्चा स्थळापर्यंत तीन ते चार किलोमीटर अंतर असल्याने मार्गावरील स्थानिक नागरिकांनीही मोर्चेकऱ्यांना पाणी पुरवले. मोर्चेकऱ्यांच्या मदतीसाठी अनेक शहरवासीयांनी धावपळ केली.


स्वच्छतागृहांची सोय

शहरातील सर्व हॉटेल, लॉजिंग, बोर्डिंग, मंगल कार्यालये यांची स्वच्छतागृहे खुली ठेवण्यात आली होती. तसेच आविष्कार फाउंडेशनच्या वतीने शहरातील विविध ठिकाणी स्वच्छतागृहांची सुविधा केली होती.

सरकारी, निमसरकारी कार्यालय बंद

मराठा क्रांती मोर्चामुळे शनिवारी कोल्हापूर अघोषित बंद होते. शहरातील सर्व सरकारी, निमसरकारी कार्यालय, बँका बंद ठेवण्यात आल्यामुळे या परिसरात शुकशुकाट होता. तर काही बँकाच्या बाहेर मराठा क्रांती मोर्चानिमित्त बँक बंद राहील असले फलक लावण्यात आले होते.

ऑक्टोंबर महिन्यातील हा तिसरा शनिवार असल्यामुळे आज सरकारी कार्यालय, बँका सुरु असतात, मात्र मराठा क्रांती मोर्चा‌मुळे आज बऱ्याच कार्यालयांमध्ये बंदसदृश्य स्थिती होती. शहरात आज नो व्हेईकल झोन असल्यामुळे अनेक जणांना कार्यालयात वेळेवर पोहचणे शक्य नव्हते. तसेच अनेक थेट मोर्चातच सहभागी झाल्यामुळे शहरातील अनेक कार्यालयामध्ये कोणी फिरकलेच नाही. महापालिका, जिल्हा परिषद, पोस्ट ऑफिस, जिल्हाधिकारी कार्यालय या सरकारी कार्यालयांसह राष्ट्रीयकृत आणि सरकारी बँकांमध्ये अघो‌षित बंद होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाच तास जनसागर रस्त्यावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

येथील सायबर चौक ते राजारामपुरी, दसरा चौकापर्यंत सलग पाच तास मोर्चात जनसागर उसळला. त्यामुळे राजारामपुरी परिसर पूर्ण ब्लॉक झाला होता. शेवटच्या टप्प्यात आलेल्यांना गर्दीमुळे दसरा चौकापर्यंत पोहोचणे शक्य झाले नाही. या मार्गावर सीमाभाग, कागल, आजरा, चंदगड, गडहिंग्लज तालुक्यांतील मराठा बांधव सहभागी झाले होते. दुपारी एकपर्यंत लोक येतच होते.

शाहू टोल नाक्यातून प्रवेश केल्यानंतर मोर्चेकऱ्यांच्या वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था राजाराम महाविद्यालयाच्या मैदानावर केली होती. तेथे वाहने पार्किंग केल्यानंतर जथ्थेच्या जथ्थे सकाळी आठपासून येण्यास सुरुवात झाली. सायबर चौकात मोर्चात सहभागी होणाऱ्यांचे स्वागत केले जात होते. तेथे मोफत भगवे झेंडे, टोप्या, नाष्टा, पाणी वाटप करण्यात आले. सुरुवातीला लोकांना गटागटाने मोर्चात सहभागी होण्यासाठी सोडले जात होते. मात्र, दहानंतर गर्दीने उचांक गाठला. राजाराम महाविद्यालयापासून रस्त्याच्या दोन्ही बाजू मोर्चेकऱ्यांची व्यापल्या. तेथून आईचा पुतळा, राजारामपुरी - जनता बझार, बागल चौकमार्गे फिरून मोर्चा दसरा चौकात पोहोचला.

सर्व बाजूंनी आल्याने दसरा चौकातील गर्दीचा फुगवटा वाढत राहिल्याने बारानंतर मोर्चाची गती मंदावत रा‌हिली. रणरणते ऊन आणि मंदावलेल्या मोर्चाच्या गतीमुळे वृद्धांना त्रास झाला. मोर्चाची सांगता होईपर्यंत गर्दी कायम राहिली. सांगता झाल्यानंतर पुन्हा उलट्या दिशेने परतीसाठी मोर्चेकरी मार्गस्थ झाले. त्यामुळे पूर्ण रस्ता भगवामय दिसत होता. मोर्चा संपल्यानंतर तब्बल एक तास विनावाहन लोक चालताना दिसत होते. दुचाकी जाण्याला संधी नव्हती इतकी गर्दी राहिली.
तीनशे वैद्यकीय पथके कार्यरत
मराठा क्रांती मोर्चामध्ये सहभागी होणाऱ्या आंदोलकांना तत्काळ उपचार मिळावेत म्हणून मोर्चाच्या मार्गात ३०० वैद्यकीय पथके, ५० अॅम्ब्युलन्स, १०० स्वयंसेवक सहभागी झाले होते. उन्हात अधिक काळ थांबावे लागल्याने अनेक महिलांना चक्कर आल्याने त्यांच्यावर तत्काळ वैद्यकीय पथकाच्या माध्यमातून उपचार करण्यात आले.

तत्काळ वैद्यकीय सुविधा देण्यासाठी जिल्ह्यातील ७१० डॉक्टर स्वयंसेवक, ५० सरकारी व खासगी रुग्णवाहिका शहरातून प्रवेश असणारे नऊ मार्ग, मोर्चाचा मुख्य मार्ग, पार्किंग ठिकाणांचा अभ्यास करून मोर्चा मार्गात वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्यात आल्या होत्या. संपूर्ण शहरात ५७ स्ट्रॅटेजिक पॉइंट उभारण्यात आले होते. या पॉइंटवर रुग्णवाहिका व वैद्यकीय पथक उपस्थित होते. प्रत्येक चौकात खासगी तसेच सरकारी १०८ अॅम्ब्युलन्स उभी करण्यात आली होती. याचबरोबर चौकामध्ये तीन डॉक्टर एक मदतनीस असे वैद्यकीय पथक मार्गाच्या ठिकठिकाणी तैनात केले होते. सकाळी सात ते दुपारी दोनपर्यंत वैद्यकीय पथके मोर्चामध्ये सहभागी होती.

काही स्वयंसेवक माइकद्वारे मोर्चामध्ये सहभागी झालेल्या लोकांना पाणी पिण्याबाबत व आरोग्याबाबत काळजी घेण्याचे आवाहन करत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामगारांच्या घरांचानिधी पडूनः पानसरे

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सांगली

सरकारच्या कामगार कल्याण मंडळाकडे कामगारांसाठीचा हजार कोटी रुपयांचा निधी पडून आहे. विकासाचे नाव घेऊन सत्तेवर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने कामगारांसाठी भरीव कार्य करणे अपेक्षित आहे. केवळ घोषणा करून, भुलथापा देण्यापेक्षा राज्यकर्त्यांनी सर्वप्रथम कामगारांच्या हक्काचा निधी त्यांना द्यावा, असे आवाहन भारतीय महिला फेडरेशनच्या अध्यक्षा कॉम्रेड मेघा पानसरे यांनी शनिवारी सांगलीत केले.

सांगलीत राज्य बांधकाम कामगार संघटना फेडरेशनच्या (आयटक) पहिल्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे उद्घाटन कॉ. पानसरे यांच्या हस्ते शनिवारी झाले. यावेळी संघटनेचे सरचिटणीस श्यामजी काळे, दिलीप पवार, राजन क्षीरसागर, स्वागताध्यक्ष शंकर पुजारी, सुमन पुजारी आदी उपस्थित होते.

मेघा पानसरे म्हणाल्या, सबका साथ सबका विकास, हा नारा देऊन मोदी सरकार सत्तेवर विराजमान झाले आहे. परंतु त्यांनी दिलेल्या आश्वासनांकडे त्यांचे पूर्णपणे दुर्लक्ष होताना दिसत आहे. विकासाच्या नावाखाली कामगारांची लूट करण्याचे धोरण अवलंबिले जात आहे. यामुळेच कामगारांना संघटितपणे लढा देण्याची आवश्यकता आहे.

भितीचे वातावरण

मेघा पानसरे म्हणाल्या, ‘देशात सध्या भितीचे वातावरण आहे. अद्यापही डॉ. दाभोळकर, डॉ. कलबुर्गी आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे मारेकरी मोकाट आहेत. तीन वर्षे होऊनही त्यांना अटक होऊ शकत नसेल तर यासारखे दुर्देव दुसरे नाही. लोकांमध्ये मोठा असंतोष असून, तो निरनिराळ्या मार्गाने व्यक्त होत आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘टूर द सांगली’चा प्रारंभ

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सांगली

सांगली जिल्हा पोलिस दलातर्फे महिलांचा सन्मान, राष्ट्रीय एकात्मता, पर्यावरण संतुलन आणि शारीरिक व्यायाम असा चतु:सूत्री हेतू ठेवून शनिवारी निघालेल्या निर्भया सायकल रॅलीला कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी हिरवा झेंडा दाखविला. निर्भया रॅलीच्या माध्यमातून सामान्य माणसाला निर्भयपणे जगता येणार असल्याचा संदेश देणारा हा एक स्तुत्य उपक्रम असल्याचे खोत म्हणाले.

निर्भया सायकल रॅलीचा प्रारंभ कॉलेज कॉर्नरवरील कस्तूरबाई वालचंद कॉलेजच्या आवारातून झाला. आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, महापौर हारूण शिकलगार, जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे आदी उपस्थित होते.

प्रास्ताविकात पोलिस अधीक्षक शिंदे म्हणाले, महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस दलाने नेहमीच प्राधान्य दिले आहे. महिला सुरक्षेसाठी महाराष्ट्र सरकार व महाराष्ट्र पोलिस दलाने वेळोवेळी आवश्यक त्या उपाय योजना केल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्या कल्पनेतून व निर्देशान्वये सांगली जिल्ह्यात महिला सुरक्षेसाठी निर्भया पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत. महिलांना सुरक्षिततेचे वातावरण निर्माण करण्याबरोबरच त्यांना तसे वातावरण आहे याची खात्री देणे महत्त्वाचे आहे. ‘टूर द फ्रान्स’च्या धर्तीवर ‘टूर द सांगली’ या संकल्पनेतून सायकल रॅलीद्वारे २१ ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण सांगली जिल्ह्यात फिरणार आहे. यामध्ये जिल्ह्यातून ६९१ जणांनी सहभाग नोंदवला आहे.


बलात्कार पीडितेला

न्याय देण्याची मागणी


सांगलीत निर्भया सायकल रॅली सुरू झाल्यानंतर काही वेळातच खानापूर तालुक्यातील करंजे येथील अत्याचारीत शाळकरी मुलीला न्याय द्या, अशी मागणी करीत सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची फेरी तेथे दाखल झाली. करंजे येथील निर्भयाला न्याय मिळालाच पाहिजे, असे फलक घेऊन फेरी आल्यानंतर त्यांना जिल्हा पोलिस अधीक्षक त्या ठिकाणी नसल्याचे समजले. त्यामुळे संतापलेल्या आंदोलकांनी ‘आमची दिशाभूल केली जात आहे, ’ असा आरोप उपस्थित पोलिसांशी बोलताना केला.

करंजे येथील बारा वर्षीय शाळकरी मुलीवर २२ सप्टेंबर रोजी शिक्षक गणेश गायकवाड आणि विद्यार्थी राहुल पाटील या दोघांनी बलात्कार केला. त्यानंतर २९ सप्टेंबर रोजी पुन्हा राहुल याने शाळेतच त्या मुलीवर बलात्कार केला. तेंव्हापासून तिची प्रकृती ढासळली असून, ती मुलगी सध्या रुग्णालयात आहे. ही घटना उघडकीस आल्यापासून बलात्कार करणारा शिक्षक बेपत्ता आहे. त्याला पाठिशी घालण्याचा प्रयत्न होत आहे.

पीडितेला न्याय मिळावा म्हणून करंजे अत्याचार निर्मूलन समितीच्या बॅनरखाली विविध पक्षाचे कार्यकर्ते एकत्र आले आहेत.

यावेळी बोलताना अपर्णा वाघमारे म्हणाल्या, ‘सुरुवातीला डॉक्टर आणि पोलिसांना मॅनेज करण्याचा प्रयत्न झाला. हे निंदनीय आहे. खोटा वैद्यकीय अहवाल देणाऱ्या आणि संबधितांवर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करणाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे. बलात्कार करणाऱ्या शिक्षकावर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करुन त्याला त्वरीत अटक करा. दोन वेळा बलात्कार करणाऱ्या विद्यार्थ्याला अटक केली आहे. पण, शिक्षक मोकाट आहे. असे स्पष्ट करीत आंदोलकांनी रस्त्यावरच ठिय्या मारला. त्यानंतर पोलिसांनी धावपळ करून निर्भया सायकल रॅलीत गेलेल्या पोलिस उपाधीक्षक वैशाली शिंदे यांना परत बोलावून घेतले. त्यांनी निवेदन स्वीकारल्यानंतर आंदोलक शांत झाले. या आंदोलनात अपर्णा वाघमारे, डॉ. मानसी सोनलकर, डॉ. सायली पाटील, सुप्रिया चोपडे, अमर पडळकर, नगरसेवक विष्णु माने, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महेश खराडे, कल्पना कोळेकर, पांडुरंग कोळेकर, डॉ. संजय लवटे, अजित दुधाळ, निवांत कोळेकर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शांत...संयमी रणरागिणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
मूक मोर्चात महिलांच्या लक्षणीय सहभागाने लक्ष वेधून घेतले. असुरक्षा आणि अत्याचाराविरोधात सरकारला मूकपणे जाब विचारताना महिलांनी शांतता आणि संयमाची मर्यादा न ओलांडता मोर्चातील अस्तित्वाची दखल घ्यायला भाग पाडले. पाच वर्षांच्या मुलीपासून ते नव्वदी गाठलेल्या आजीपर्यंत आणि धुणीभांडी करणाऱ्या महिलेपासून उच्चभ्रू महिलांपर्यंत प्रत्येकीने मोर्चात सहभाग घेतला.

मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे आणि अॅट्रॉसिटी कायद्यातील दुरूस्ती या मागण्यांसह या मराठा क्रांती मोर्चाचा महत्त्वाचा गाभा होता तो कोपर्डीतील युवतीवर झालेला अत्याचार आणि त्यात तिचा गेलेला बळी. स्त्री शौर्याच्या गाथांशिवाय मराठ्यांचा इतिहास पूर्ण होत नाही तिथे मराठा समाजातील महिलेकडे विकृत नजरेने पाहण्याची हिंमत करणाऱ्यांविरोधातील प्रचंड चीड धुमसत आहे. त्याचा परिपाक मोर्चात सहभागी झालेल्या महिलांच्या प्रचंड संख्येत दिसला. मोर्चासाठी सकाळी आठपासून ​जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून महिलांचे जथ्थेच्या जथ्थे येऊ लागले. हा मोर्चा आपल्या लेकीसुनांच्या सुरक्षेसाठी आहे या भावनेनेच महिलांना एकत्र आणले. गांधीमैदान, ताराराणी चौक, भगवा चौक, तपोवन मैदान, बिंदू चौक अशा ठिकाणी महिला एकत्र येत होत्या. हातात भगवे झेंडे, डोक्यावर टोप्या, कपाळावर रिबीन्स बांधून मोर्चाच्या गर्दीत पाऊल टाकत होत्या.

मोर्चा ज्या मैदानावरून काढण्यात येणार होता त्या सर्व ठिकाणी महिलांना खास राखीव पथ देण्यात आले होते. मोर्चाच्या अग्रभागी महिलांना स्थान असल्यामुळे महिलांच्या सहभागालाही धार आली. कोपर्डी घटनेचा निषेध म्हणून काळ्या रंगाचे पेहराव करून तर मराठ्यांचा अभिमान असलेल्या भगव्या रंगाचे पेहराव करून महिलांनी मूकपणे जाब विचारला.

आई, बहीण, लेक आणि आजीही

तान्ह्या बाळाला कडेवर घेतलेल्या आईपासून ते कुणाची बहीण, कुणाची लेक तर कुणाची आजी अशी महिलांची सगळी रूपं मोर्चात दिसली. घराबाहेर पडणारी मुलगी सुरक्षित परत येईल की नाही याची शाश्वती नसलेल्या समाजाला कायद्याची जरब बसावी या मागणीसाठी महिलांनी कोणतीही घोषणा न देता मनातील सगळ्या प्रश्नांची सरबत्ती या मोर्चातून केली.

युवतींही आघाडीवर

मराठा समाजाला आरक्षण मिळाले तर शिक्षण आणि नोकरीच्या संधी खुल्या होणार आहेत. त्याचा फायदा सध्याच्या महाविद्यालयीन तरूणाईला होणार आहे. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चात युवतींचा सहभाग लक्षणीय होता. फलक हाती घेऊन तरूणींनी मोर्चाचे नेतृत्व केले. तसेच महिलांच्या असुर​क्षितेबाबतही युवतींनी मूकपणे आवाज उठवला.


मुस्लिम महिलाही ‘मी मराठा’

मोर्चात सहभागी झालेल्या प्रत्येकाच्या डोक्यावर ‘मी मराठा,’ असे लिहिलेली टोपी होती. यामध्ये महिलाही मागे नव्हत्या. मात्र या महिलांच्या गर्दीत काळ्या रंगाचा बुरखा घालूनही डोक्यावर ‘मी मराठा,’ असे शब्द असलेली भग्वी टोपी घालून मुस्लिम समाजातील महिलांनीही सहभाग घेतला. मराठा समाजाला आरक्षण द्या, मराठा समाजातील महिला सुरक्षित असल्या पाहिजेत, अशा मागण्यांचे फलकही अनेक मुस्लिम महिलांच्या हातात दिसत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीमा प्रश्नाचाही एल्गार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सीमाभागातील निपाणी, संकेश्वर, चिक्कोडी, बेळगाव, खानापूर, कारवार आदी ठिकाणांहून प्रचंड संख्येने मराठी भाषिक मराठा क्रांती मूक मोर्चात सहभागी झाले होते. सीमाप्रश्न त्वरीत सोडवा, सीमाभागातील मराठी भाषिकांना महाराष्ट्रात सामावून घ्या अशा मागण्यांचे फलक हातात घेऊन त्यांनी मोर्चात लक्ष वेधून घेतले. सीमा भागातून मोर्चात सुमारे ५० हजारांहून अधिक मराठी भाषिक सहभागी झाल्याचा दावा महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी केला.

गेल्या दोन आठवड्यांपासून सीमाभागात मोर्चाबाबत व्यापक जागृती करण्यात आली. त्याला बेळगावसह सीमाभागातील सर्वच गावांतून चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे मोर्चात सीमावासियांची संख्या अधिक असेल असे अपेक्षित होते. तसेच चित्र शनिवारी दिसून आले. बेळगावच्या महापौर सरीता पाटील शुक्रवारी रात्रीच येथे दाखल झाल्या होत्या. सकाळी आमदार संभाजी पाटील, अरविंद पाटील, माजी आमदार मनोहर किणेकर, उपमहापौर संजय शिंदे, महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते दीपक दळवी, मालोजी अष्टेकर, प्रकाश मरगाळे, टी. के. पाटील आदी नेते व्हिनस कॉर्नर येथे मोर्चात सहभागी झाले. त्यानंतर सीमावासिय सकाळी आठ वाजल्यापासून राजाराम कॉलेजच्या मैदानात वाहने पार्क करून सायबर चौकातील मूक मोर्चात सामिल होत राहिले.

प्रत्येकाच्या डोक्यावर ‘एक मराठा लाख मराठा’ असे लिहिलेली टोपी आणि हातात भगवा ध्वज, ‘सीमाभाग महाराष्ट्रात सामाविष्ट करा’ अशा घोषणांचे फलक घेऊन सीमावासिय मोर्चात मार्गस्थ होत राहिले. दुपारी एक वाजेपर्यंत ते गटागटाने येताना दिसत होते. मोर्चात सहभागी काही वयोवृद्ध महिलांना चालणे असह्य झाल्याने राजारामपुरीत रस्त्याकडेला झाडांच्या सावलीत बसणे पसंत केले. सीमाभागातून आलेल्या प्रत्येक‌ांच्या चेहऱ्यावर महाराष्ट्रात येण्यासाठीची आतुरता ‌स्पष्टपणे दिसत होती. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर कर्नाटक सरकारीची हुकमशाही, दडपशाही आणि महाराष्ट्राबद्दलचे असलेले प्रचंड प्रेम, आपल्या मराठी भाषिक राज्यात येण्याची तीव्र इच्छा प्रकर्षाने जाणवली.

०००

भाषेची प्रखर अस्मिता

सीमाभागात मराठा जातीऐवजी भाषेचा मुद्दा प्रखर अस्मितेचा आहे. त्यामुळे सर्वच जाती, धर्मातील मराठी भाषिक संघटीतपणे मोर्चात सामील झाल्याचे दिसले. युवक, महिलांचा सहभाग लक्षणीय होता. स्वतःच्या वाहनाने, सोबत भाकरी घेऊन आलो आहोत, असेही सीमाबांधव मोठ्या अभिमानाने सांगत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाखोंच्या जनसागरासमोरही पोलिस निश्चिंत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मराठा क्रांती महामोर्चामध्ये कोल्हापूर जिल्ह्यासह आसपासच्या जिल्ह्यातून लाखोंचा जनसागर उसळूनही एक आगळी शिस्त साऱ्या शहराने अनुभवली. मोर्चाच्या बंदोबस्तालवरील पोलिसांवरही विशेष ताण नव्हता. मोजक्या शब्दात सूचना देणारे पोलिस आणि निमूटपणे पुढे जाणारी माणसं असेच चित्र सर्वत्र होते. त्यामुळे पोलिसांनाही एक मोर्चाची शिस्त अनुभवता आली. मोर्चा संपल्यानंतरही नागरीक शांतपणे निघून जाताना पोलिस रस्त्याकडेला निश्चिंतपणे थांबून होते. ना हेल्मेट, ना जाळी, ना कोणतेही शस्त्र... उलट बंदोबस्तामुळेच अनोखा मोर्चा अनुभवल्याचे समाधान पोलिसांच्या चेहऱ्यावर दिसत होते.

सकल मराठा क्रांती महामोर्चासाठी संयोजकांनी तयार केलेली आचारसंहिता आणि गेल्या पंधरा दिवसांपासून पोलिसांनी केलेले नियोजन यामुळे मोर्चात बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी तणाविरहीत मोर्चाचा अनुभव घेता आला. शुक्रवारी दुपारीच साडेचार हजार पोलिसांना बंदोबस्ताच्या जागा निश्चित करून देण्यात आल्या होत्या. संध्याकाळी पाच वाजल्यापासून पोलिस प्रत्यक्ष बंदोबस्तासाठी हजर होते. हा बंदोबस्त शनिवारी चार वाजेपर्यंत कायम होता. शुक्रवारी रात्री एक वाजेपर्यंत पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी मोर्चाच्या मार्गासह शहरातील प्रवेश मार्गांची पाहणी केली. सकाळी सात वाजता विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनीही दसरा चौक आणि गांधी मैदान परिसरात सायकलवरून फेरी मारली.

सकाळी सातपासूनच ग्रामीण भागातून मोर्चेकरी शहरात दाखल होण्यास सुरुवात झाली होती. पोलिसांनी शहराच्या नऊ प्रवेशद्वारांवर आणि पार्किंग स्पॉटवर यंत्रणा सज्ज ठेवली होती. स्वयंसेवकांच्या मदतीने वाहनांचे पार्किंग सुरळीत सुरू झाले. त्यानंतर मोर्चेकऱ्यांचे जत्थे ताराराणी चौक, दसरा चौक, गांधी मैदानाकडे जाण्यास सुरूवात झाली होती. एकाच वेळी हजारोंच्या संख्येने येणाऱ्या मोर्चेकऱ्यांना केवळ दोन ते तीन पोलिस सूचना देऊन पुढे मार्गस्थ करीत होते. पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करणारे किंवा हुज्जत घालणारे दिसत नव्हते. पोलिसांशी नम्रतेने वागत पुढे सरकणारे मोर्चेकरी पोलिसांची मने जिंकून जात होते.

पुणे-बेंगळुरू महामार्गावरून येणाऱ्या वाहनांची काहीकाळ कोंडी झाली होती, त्यामुळे दुपारी एकपर्यंत येणाऱ्या वाहनांची गती धिमी होती. मोर्चा संपल्यानंतर पार्किंग स्पॉटकडे परतणारे नागरिकही तितक्याच शिस्तीत जात होते, त्यामुळे पोलिस आणि स्वयंसेवकही निश्चिंत होते. मोर्चाचा समारोप होईपर्यंत विशेष पोलिस महानिरीक्षक नांगरे-पाटील आणि पोलिस अधीक्षक देशपांडे, अतिरिक्त अधीक्षक डॉ. दिनेश बारी, अप्पर अधीक्षक सुहेल शर्मा, उपाधीक्षक भारतकुमार राणे, पोलिस अधीक्षक तानाजी सावंत आदींसह अन्य अधिकारी दसरा चौक ते ताराराणी चौक आणि गांधी मैदान ते दसरा चौक या मार्गांवर पथकांसह फिरत होते.

विशेष पथके गाडीतच

मोर्चात अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शीघ्र कृती दलाच्या २ तुकड्या, राज्य राखीव दलाच्या २ तुकड्या, स्ट्रायकिंग फोर्सची ४ पथके तैनात होती. दसरा चौक, ताराराणी चौक, बिंदू चौक परिसरात या तुकड्या सज्ज होत्या. मात्र शिस्तबद्ध मोर्चामुळे बहुतांश कर्मचारी वाहनांमध्येच बसून होते. श्वानपथकाने सकाळी सात वाजता दसरा चौक आणि ताराराणी चौकात पाहणी केली. त्यानंतर पथकाची गरज भासली नाही. स्वयंसेवक आणि मोर्चेकऱ्यांच्या शिस्तीमुळे पोलिसांवर ताण आला नाही.

पोलिसांमध्ये योग्य समन्वय

मोर्चावर नजर ठेवण्यासाठी शहरात तीस ठिकाणी वॉच टॉवर तयार केले होते. शहरातील ६५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून पोलिसांचे एक पथक सकाळी सात वाजल्यापासून मोर्चावर लक्ष ठेवून होते. पोलिस अधीक्षक कार्यालयातील नियंत्रण कक्षातून बंदोबस्तावरील अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या जात होत्या. गर्दीवर नियंत्रण केले जात होते. दसरा चौकातील ध्वनीक्षेपकावरून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी मोर्चेकऱ्यांना वेळोवेळी सूचना दिल्याने अडचणी निर्माण झाल्या नाहीत. मोर्चा शिस्तबद्ध रीतीने पार पाडण्यासाठी स्वयंसेवक आणि पोलिसांमधील समन्वयही महत्त्वाचा ठरला.

योग्य नियोजन आणि नियोजनाची काटेकोर अंमलबजावणी याचे उत्तम उदाहरण मोर्चात पाहायला मिळाले. एका ऐतिहासिक मोर्चाचे आपण साक्षीदार आहोत. मोर्चाची आचारसंहिता आणि स्वयंसेवकांनी दिलेल्या योगदानामुळे मोर्चामध्ये पोलिसांवर ताण आला नाही. सुरळीत मोर्चा पार पाडण्याचे सर्व श्रेय मोर्चेकरी आणि संयोजकांनाच आहे.

प्रदीप देशपांडे, पोलिस अधीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापुरात भगवी लाट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोणतीही घोषणा नाही की कोणाचा जयजयकार नाही, अंग भाजून काढणाऱ्या रणरणत्या उन्हात, घामाच्या धारा वाहत असतानाही अगदी कडक शिस्तीत सहभागी झालेल्या मराठा समाजातील आबालवृद्ध, महिला, तरुणाईच्या ​विराट जनसागराच्या मनातील दबलेला मूक हुंकार शनिवारी मराठा क्रांती मूक मोर्चाच्या​निमित्ताने कोल्हापुरात उमटला.

जिल्ह्याच्या वाड्यावस्तींवरुन तसेच शेजारील जिल्ह्यांमधून अक्षरशः घराला कुलूप लावून एकजुटीची ताकद दाखवण्यासाठी बाहेर पडलेल्या मराठा समाजाचे मूक वादळ शहरात तब्बल आठ तासाहून अधिक काळ घोंगावले. खांद्यावर भगवा झेंडा, डोक्यावर भगवी टोपी, गळ्यात भगव्या स्कार्फसह लोटलेल्या अफाट जनसमुदायामुळे सर्वत्र भगवी त्सुनामी जाणवत होती. यामुळे कोल्हापूर शहराबरोबरच महामार्गावरील वाहतूकही ठप्प झाली. मराठा समाजाबरोबरच इतर समाजांच्या सहभागामुळे राज्यातील सर्व मोर्चाच्या गर्दीचे उच्चांक मोडत कोल्हापुरातील ‘न भूतो न भविष्यती’ मोर्चाने रेकॉर्डब्रेक इतिहास रचला. दरम्यान, सकल मराठा समाजाच्यावतीने सहा तरुणींच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांना मागण्यांचे निवेदन दिले.

कोपर्डी घटनेचा निषेध करण्याबरोबरच मराठा समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्रभर काढण्यात आलेल्या मूक मोर्चांनंतर शनिवारी कोल्हापुरात मूक मोर्चाचे आयोजन केले होते. राज्यात झालेल्या मोर्चांच्या तुलनेत येथील मोर्चा अतिविराट होणार असल्याने राज्याच्या नजरा या मोर्चाकडे लागल्या होत्या. महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार घालून गांधी मैदान, ताराराणी पुतळा, सायबर चौक, कसबा बावडा येथून सकाळी साडेदहा वाजता एकाचवेळी मोर्चाला प्रारंभ झाला. सर्व मार्गावर महिला, मुली, लहान मुलांना प्राधान्य देण्यात आले होते. त्यानंतर ज्येष्ठ नागरिक व तरुण कार्यकर्ते होते. या सर्वांना मोर्चामध्ये अडचण येऊ नये यासाठी मोर्चा मार्गावर रणरागिणी, मावळे दुतर्फा होते. ताराराणी चौक ते दसरा चौक हा मार्ग महिलांसाठी राखीव ठेवण्यात आला होता. या प्रमुख मार्गांबरोबरच शहराच्या अन्य रस्त्यांवरुनही मोठा जनसमुदाय दसरा चौकाच्या दिशेने मार्गक्रमण करत असल्याने त्यांच्याकडे असलेले झेंडे, टोप्यांमुळे संपूर्ण शहरात भगवे वातावरण निर्माण झाले होते. मोर्चाचे मार्ग लाखोंच्या संख्येने ओसंडून वाहत होते. साडेअकरापर्यंतच सर्व रस्ते या जनसागराने भरुन गेले. त्यामुळे अगदी मुंगीच्या चालीने मोर्चा पुढे सरकत होता. सर्व सहभागी दसरा चौकाच्या दिशेने येत असल्याने दुपारी बाराच्या सुमारास दसरा चौक व आजूबाजूच्या परिसरात मराठा समाजाचा विराट जनसागर उसळला.

राष्ट्रगीत होऊन दुपारी पावणेएक वाजता मोर्चा विसर्जित झाला तरी शहरातील प्रवेशाच्या नऊही मार्गावरुन अलोट जनसागर दसरा चौकाच्या दिशेने वाहतच होता. शहराकडे येत असलेल्या लाखो वाहनांमुळे पुणे-बेंगळुरु महामार्ग ठप्प झाला. सकाळी सातपूर्वीच शहरातील मार्ग वाहतुकीसाठी बंद केले होते. मोर्चा संपल्यानंतर या सर्व मार्गावरील वाहतूक दुपारी तीननंतर हळूहळू सुरू झाली. तर विविध ठिकाणी पार्किंग केलेली वाहने मार्गस्थ व्हायला सायंकाळ झाली. अनेक समाजांनी तसेच सामाजिक संस्था, संघटना व खासगी संस्थांनी मोर्चाच्या मार्गावर पिण्याच्या पाण्याबरोबर नाष्ट्याची सोय केली होती.

मोर्चामध्ये श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार राजू शेट्टी, खासदार धनंजय महाडिक, खासदार संभाजीराजे, खासदार उदयनराजे, महापौर अश्विनी रामाणे यांच्यासह आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार अमल महाडिक, सुजित मिणचेकर, प्रकाश आबीटकर, उल्हास पाटील, सुरेश हाळवणकर, आमदार संध्यादेवी कुपेकर, आमदार सत्यजीत पाटील-सरुडकर सहभागी झाले होते. महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते आमदार संभाजी पाटील, अरविंद पाटील, माजी खासदार निवेदिता माने, माजी आमदार महादेवराव महाडिक, पी. एन. पाटील यांच्यासह बेळगावच्या महापौर सरीता पाटील, उपमहापौर संजय शिंदे आदी सहभागी झाले होते.


अत्याधुनिक, सुसज्ज ध्वनी यंत्रणा

मोर्चा मार्गावर ३०० स्पीकरच्या माध्यमातून लाखो आंदोलकांना दसरा चौक येथील कंट्रोल रुमवरुन सर्व आंदोलन मार्गावर वेगवेगळ्या सूचना दिल्या जात होत्या. मार्गावर ३२ टॉवर्स आणि ३०० स्पीकर्स, १० माईकची व्यवस्था करण्यात आली होती. दसरा चौकातून ५ किमी परिसरात असा २० किमीचा परिघ अत्याधुनिक पॉवर अॅम्प्लीफायरच्या माध्यमातून कव्हर केला होता.


१६५ सीसीटीव्हीची नजर

मराठा मोर्चा नियोजनसाठी १६५ सीसीटीव्ही असलेल्या पोलिस कंट्रोल रूममधून संयोजक आणि पोलिस समन्वयाने नियोजन करण्यात आले होते. एकाच वेळी शहरातील सर्व ठिकाणांवर लक्ष ठेवण्यासाठी कंट्रोल रुममधून सूचना देण्यात येत होत्या. मोर्चा मार्गावर सूचना देण्यासाठी ८० स्वयंसेवक कार्यरत होते. या संपूर्ण मोर्चात १० हजार मावळे आणि साडेतीन हजार रणरागिणी गर्दीवर नियंत्रण ठेवत शिस्तीचे पालन करण्याचे आवाहन करत होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आघाडी सरकारनेच वेळकाढूपणा केलामहसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचा विरोधकांना टोला

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सांगली

‘सत्ता असताना पन्नास वर्षे घालवली. विविध आयोग नेमले. त्या आयोगाचे अहवाल नकारात्मक कसे येतील हे पहात बसलात. त्यावेळी वेळकाढूपणा होत नव्हता काय,’ असा सवाल महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांना केला आहे. मंत्री पाटील रविवारी सांगलीच्या दौऱ्यावर होते.

मराठा क्रांती मोर्चाच्या सर्व मागण्यांबाबत सरकार विचार करीत आहेच मात्र, ई. बी. सी. ची मर्यादा वाढवली आहे. जे दिले त्याबद्दल मराठा समाजाने सरकारचे आभार मानायला हवेत, अशी अपेक्षा मंत्री पाटील यांनी रविवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

मराठा आरक्षणाच्या याचिकेवरील सुनावणीच्या बाबतीत पाटील म्हणाले, ‘नव्याने याचिका दाखल करणाऱ्यांसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. सरकारने वेळ मागितलेली नव्हती. सरकारने भक्कम तयारी केली आहे. मराठा आरक्षणसाठी सर्व पुरावे सादर करणार आहोत.’

‘मराठा आर्थिक मागास’चे भक्कम पुरावे

राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी सरकार वेळ काढूपणा करीत असल्याचा आरोप केल्याबद्दल विचारताच मंत्री म्हणाले, ‘वेळकाढूपणाची अजिबात गरज नाही. सरकारने जे आश्वासन दिले ते पूर्ण करण्यास सरकार कटिबद्ध आहे. मराठा समाज आर्थिक बाजूने कसा मागास आहे, याचे सर्व भक्कम पुरावे आहेत. केंद्राने जात निहाय केलेले सर्वेक्षण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. केद्राकडे मागणी केली आहे. त्यामुळे अतिशय भक्कमपणे सरकार मराठा आरक्षणबाबत बाजू मांडेल. सरकार नक्कीच सर्व मागण्या मार्गी लावेल. अ‍ॅट्रॉसिटीच्या मागणीबाबतही प्रयत्न सुरू आहेत. अ‍ॅट्रॉसिटीचा चुकीचा वापर होत असेल तर तो होऊ नये, अशी अपेक्षा दलित समाजातील नेत्यांनी व्यक्त केली आहे. हा प्रश्न दोन्ही समाजाच्या नेत्यांना सोबत घेऊन चर्चेतून सोडवता येणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री प्रयत्नही करीत आहेत. म्हणून मराठा समाजाने त्वरीत मोर्चे थांबवावेत, अशी अपेक्षाही सरकारने केलेली नाही.’

मुख्यमंत्र्‍यांविषयी नो-कमेंट

मुख्यमंत्र्यांनी नाणीज येथील कार्यक्रमाला लावलेल्या उपस्थितीबाबत राज्यभर उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. विरोधकांकडून टीका होत आहे. या बाबत विचारले असता पाटील यांनी ‘आपणास त्याबाबत काहीही बोलायचे नाही, असे सांगून तोंडावर बोट ठेवले. सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या वक्तव्याबद्दल विचारले असता त्यांनी स्वतः त्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. त्याबाबत आता मी काही बोलण्याची आवश्यकता नाही, असे सांगत त्यावरही नो-कमेंट म्हणत मंत्र्यांनी काढता पाय घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन टोळ्यांवर मोक्काचा प्रस्ताव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, यासाठी पोलिसांकडून तीन टोळ्यांवर मोक्काचा प्रस्ताव दाखल केला जाणार आहे. प्रस्तावाचे काम अंतिम टपप्यात असून, लवकरच हे प्रस्ताव विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडे पाठवले जाणार आहेत.

जिल्ह्यात लवकरच पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांमध्ये पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडून गैरकृत्ये होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे संबंधित गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाईसाठी पोलिस प्रयत्न करत आहेत. गुन्हे रोखता यावेत आणि कायदा सुव्यवस्था बिघडण्याची परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. इचलकरंजी येथील दोन आणि गांधीनगरातील एका टोळीवर मोकाचा प्रस्ताव दाखल करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. या तीन टोळ्यात २२ ते २५ गुन्हेगारांचे समावेश आहे. खुनाचा प्रयत्न, मारामारी, दमदाटी, अपहरण, खंडणी वसुली करणे असे गंभीर यांच्यावर दाखल आहेत. काही गुन्हेगारांवर इचलकरंजीसह शहरातील इतर पोलिस ठाण्यांमध्येही गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी या तिन्ही टोळ्यांवर मोका अंतर्गत कारवाई करण्यासाठी प्रस्ताव तयार केले आहेत. लवकरच हे प्रस्ताव कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडे पाठवले जातील. आयजींच्या परवानगीनंतर संबंधित गुन्हेगारांवर पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी दिली.

डॉक्टर दाम्पत्याचा खून परिचिताकडून?

रुकडी येथील वयोवृद्ध डॉक्टर दाम्पत्याच्या खुनाला अडीच महिने उलटले, मात्र अजूनही आरोपींपर्यंत पोहोचण्यास पोलिसांना यश आले नाही. या गुन्ह्यातील आरोपी डॉक्टर दाम्पत्याशी परिचयाचा असावा. त्याने स्वतः किंवा एखाद्या सराईत गुन्हेगाराकडून दाम्पत्याचा खून केल्याचा पोलिस अधिकाऱ्यांना संशय आहे. संबंधित परिचिताकडे कसून चौकशी सरू असल्याचे पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यटन महोत्सव २५ डिसेंबरपासून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर पर्यटन महोत्सव २५ डिसेंबर ते १५ जानेवारी या कालावधीत आयोजित केला आहे. जिल्ह्यात पर्यटनवाढीसाठी आणि जिल्ह्याच्या आर्थिक उन्नतीसाठी पर्यटकांना विशेष पॅकेज आणि नाव‌िन्यपूर्ण योजना उपलब्ध करून दिल्याची घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. जिल्हा पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि कोल्हापूर हॉटेल मालक संघातर्फे फॅम टूरच्यावतीने आयोजित परिसंवादाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘कोल्हापूरच्या आर्थिक उन्नतीसाठी करण्यासाठी पर्यटन क्षेत्राला चालना देणे आवश्यक आहे. महाराष्ट्र पर्यटन महामंडळाच्या नकाशामध्ये कोल्हापूरचा समावेश नसणे ही बाब गंभीर आहे. त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी तत्काळ चर्चा केली जाईल. श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी येणारा पर्यटक शहरात चार दिवस मुक्कामासाठी थांबला पाहिजे. त्यासाठी जिल्ह्यात चार ते पाच पर्यटन स्थळे नव्याने विकसित करण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी महापौरांनी पुढाकार घेऊन त्यासाठी लागणारी ना हरकत प्रमाणपत्रे त्वरित उपलब्ध करून द्यावीत. गाईडसाठी प्रशिक्षण आणि जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची माहिती देणाऱ्या अभ्यासक्रमाची रचना केली जाईल. टूर ऑपरेटर्सना प्रत्येक पर्यटकामागे चांगला भत्ता देण्यात येणार आहे.सरकार या क्षेत्रात तीन वर्षे गुंतवणूक करेल. पर्यटनासाठी जिल्हा स्तरावर एक समिती स्थापन करण्यात येणार आहे. ही समिती पॅकेज, स्थळे, आवश्यक सुविधा यांचा आराखडा तयार करेल. सरकार पर्यटकांना दर्जेदार लक्झरी बसेस उपलब्ध करून देण्यात येणार असून त्याचा खर्च सरकार देणार आहे.

जिल्हाधिकारी डॉ अमित सैनी म्हणाले, ‘महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे माहिती व आरक्षण केंद्र सुरू केले आहे. शाहू स्मारक भवन पर्यटन व सांस्कृतिक हब म्हणून विकसित केले जाईल. जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी जिल्हा परिषदेची मदत घेण्यात येईल.’

महाराष्ट्र टूर ऑर्गनायझरर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुधीर पाटील म्हणाले, ‘कोल्हापूरच्या पर्यटनवाढीसाठी टूरिझम पॉलिसी २०१६ तयार केली आहे. जिल्ह्यात दरवर्षी ६० लाख पर्यटक येतात. सुमारे सात हजार खोल्या निवासासाठी उपलब्ध आहे. साठ टक्के पर्यटकांनी निवास केला तरी सुमारे ४०० कोटींचा महसूल जमा होईल. त्यासाठी नियोजन आवश्यक आहे.’

‍डॉ जयसिंगराव पवार यांनी जिल्ह्याचे मार्केंटिग करणे आवश्यक आहे, अशी भावना व्यक्त केली. यावेळी महापौर अश्विनी रामाणे, मुख्य वनसंरक्षक एम. के. राव, महाराष्ट्र टूर ऑर्गनायझरर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रभूलाल जोशी, सहसचिव चिमण मोटा, कोल्हापूर हॉटेल मालक अशोसिएशनचे उज्वल नागेशकर, शाहू स्मारक ट्रस्टचे सचिव विवेक आगवणे आदी उपस्थित होते. असोसिएशनचे अध्यक्ष उज्वल नागेशकर यांनी प्रास्ताविक केले. चारुदत्त जोशी यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता तयारी दिवाळीची

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अवघ्या दहा दिवसांवर दिवाळी आल्यामुळे सध्या बाजारपेठेमध्ये दिवाळीचा माहोल तयार झाला आहे. दिवाळीसाठी बाजारपेठा सज्ज झाल्या असून अनेकांनी दिवाळी खरेदीसाठी रविवारची सुटी उपयोगात आणली. पुढचा एकच रविवार खरेदीसाठी असल्यामुळे नोकरदार वर्गाने आज बाजारपेठेत गर्दी केली होती. तर घरातील स्वच्छता, खाद्यपदार्थांची तयारीसाठी गृहिणींची लगबग वाढली आहे.

रविवारी खरेदीसाठी शहरातील महाद्वार रोड, लक्ष्मी रोड, पापाची तिकटी, राजारामपुरी या प्रमुख बाजार पेठांमध्ये गर्दीचा ओघ सुरू होता. दुपारी चारनंतर गर्दी वाढू लागली होती. दिवाळीसाठी लागणाऱ्या सर्व वस्तूंच्या एकाच परिसरात मिळणारी बाजारपेठ म्हणजे महाद्वार रोड. परिसरातील भोजनालय आणि विविध वस्तूंची खरेदी महाद्वार रोडवर होत असल्याने संपूर्ण कुटुंबच खरेदीसाठी रस्त्यावर उतरल्याचे चित्र होते. हातगाडी विक्रेते, अलिशान दुकाने, कपड्याची दुकाने, सराफ बाजार, इलेक्ट्रॉनिक आदी वस्तू एकाच ठिकाणी मिळत असल्याने याठिकाणी नेहमीच गर्दी होते.

यावर्षी बाजारपेठेत आकर्षक आकाश कंदील लक्ष वेधून घेत आहेत. पर्यावरणपूरक आकाश कंदीलमध्ये कागदी, कापडी आणि हँडमेड पेपरच्या आकाश कंदिलांचे वैविध्य आहे. तर गेल्या काही वर्षांपासून रंगवलेल्या पणत्या, फ्लोटिंगच्या पणत्या तसेच विविध आकारातील डेकोरेटिव्ह पणत्यांची खरेदी करण्याकडे ओढा वाढला आहे. याची प्रचिती यंदाही येत आहे. पणत्यांमध्ये एकेरी पणतीसह पंचरंगी ताट, नंदादीप आकारातील पणत्यांची विशेष क्रेझ आहे. यंदाही बाजारपेठामध्ये चायना मेडच्या वस्तू मोठ्या प्रमाणात दाखल झाल्या आहेत.

दिवाळीच्या अभ्यंगस्नानाच्या खरेदीसाठी सुगंधी उटणे, साबण आणि तेल यांचे स्टॉल्स बाजारपेठेत लागले आहेत. काही दुकानदारांनी उटणे, साबण आणि तेलाचे पॅकेज केले आहे. तसेच परफ्युम, बॉडी स्प्रे यांची बाजारपेठही गर्दीने फुलून गेली आहे. अनेक नामवंत ब्रॅण्डची कपडे, सोन्या-चांदीची आलिशान दुकाने, तरुणाईला आकर्षित करणारे नाविन्यपूर्ण फॅशनचे कपडे, युवतींसाठीची सौंदर्यप्रसाधनांसह कलाकुसरीच्या आकाशदिव्यांनी राजारामपुरी सजली आहे. ब्रॅण्डेड शोरुमला केलेली आकर्षक रोषणाई आणि प्रत्येक दुकानांत कुटुंबासह ओसंडून वाहणारी गर्दी, असे चित्र राजारामपुरीत आहे.

फराळाच्या साहित्य खरेदीसाठी गर्दी

फराळचे सर्व पदार्थ करण्यासाठी महिलांची कसरत सुरू झाली आहे. आज बाजारपेठेमध्ये फराळ बनविण्यासाठी लागणाऱ्या वस्तूची खरेदी मोठ्या प्रमाणात महिला करत असल्याचे दिसून येत होते. फराळासाठी लागणारे मसाले, तयार पीठ ही बाजारापेठेमध्ये उपलब्ध झाले आहेत. तर काहींनी फराळ स्टॉल लावण्यासाठी तयारी करत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कलेक्टर, एसपींवर हायकोर्टाचे ताशेरे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील गाभारा दर्शनप्रश्नी दाखल केलेल्या दाव्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी व जिल्हा पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी वेळेत म्हणणे न मांडता सुणावनीदिवशीच अर्ज माघार घेतल्याने मुंबई हायकोर्टाने ताशेरे ओढत दंड सुनावला आहे. न्यायमूर्ती एन. एम. जामदार यांनी महाराष्ट्र सरकार, जिल्हा पोलिस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांच्यावतीने अर्ज दाखल करणारे प्रांताधिकारी प्रशांत पाटील यांच्याकडून सर्व खर्च वसूल करण्याचा आदेश दिल्याची माहिती अॅड. ओकार गांधी व श्रीपूजक गजानन मुनीश्वर यांनी ही माहिती दिली.

करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या गाभाऱ्यात पुजारी आणि त्यांचे सहाय्यक यांच्या व्यक्तिरिक्त इतर कोणालाही प्रवेश देऊ नये, अशी मागणी करणारा दावा १२ एप्रिल, २०१६ ला गजानन मुनीश्वर व शिवकुमार शिंदे यांनी दिवाणी न्यायालयात दाखल केला. यासंदर्भात महाराष्ट्र सरकार, जिल्हा पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे आणि जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी मनाई अर्जास म्हणणे देण्यास अधिक वेळ लावला. याबाबत दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांनी प्रत्येकी दोनशे रुपयांचा दंड केला आहे.

७ ऑक्टोबर रोजी या अर्जाच्या सुनावणीदिवशी सरकारी वकिलांनी अर्ज मागे करण्याची विनंती करताच कोर्टाने हा अर्ज दाखल करणाऱ्यांवर ताशेरे ओढले. अशा प्रकारे अर्ज करणे ही जनतेच्या पैशाची उधळपट्टी असून न्यायालयाच्या वेळेचा अपव्यय केला असल्याचे मत न्यायमूर्ती एन. एम. जामदार यांनी व्यक्त केले असल्याची माहिती अॅड. गांधी व श्रीपूजक गजानन मुनीश्वर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>