Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

लुडबूड खपवून घेणार नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मोर्चावेळी कोणत्याही राजकीय नेत्याची लुडबूड खपवून घ्यायची नाही. कुणी गोंधळ, घोषणाबाजी करण्याचा प्रयत्न करत असेल तर स्पेशल टीमला तत्काळ सूचना द्या. मोर्चा संपून लोक घरी जाईपर्यंत नेमून दिलेली जागा सोडायची नाही. स्वतः बोलायचे नाही व कुणालाही बोलू द्यायचे नाही. घोषणाबाजी कुणी करत असल्यास त्यांना तत्काळ रोखा. कुणालाही स्वतःचे बॅनर घेऊन येऊ द्यायचे नाही. सेल्फी काढायचा नाही व काढू द्यायचा नाही, अशा मराठा क्रांती मोर्चातील कडक आचारसंहितेचे शब्द आणि शब्द जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून स्वयंसेवक बनण्यास आलेले युवक, युवती कानात साठवून घेत होते. निमित्त होते मराठा क्रांती मोर्चासाठी स्वयंसेवकांच्या बैठकीचे.

मराठा क्रांती मोर्चासाठी विविध पातळीवर तयारी सुरू आहे. त्याचपद्धतीने मोर्चातील शिस्त राखण्यासाठी महत्त्वाचा भाग असलेल्या स्वयंसेवकांसाठीच्या तयारीसाठी ​सोमवारी शिवाजी मंदिरमध्ये नियोजनाची पहिलीच बैठक घेण्यात आली. त्यासाठी जिल्ह्याच्या विविध तालुक्यातून युवक, युवती उपस्थित होते. त्यामुळे शिवाजी मंदिर खचाखच भरले होते. अक्षरश‍ः जिथे जागा मिळेल तिथे युवक बसले होते. दहा हजार स्वयंसेवक नेमण्यात येणार असून सोमवारअखेर सात हजार स्वयंसेवकांची नोंदणी झाली आहे. त्यांच्याकडून अर्ज भरुन घेण्यात येत असून अकरा तारखेनंतर ओळखपत्रे, टी शर्ट, जॅकेटस वितरित करण्यात येणार आहेत. त्यापुर्वी स्वयंसेवकांसाठी आयोजित केलेल्या बैठकीत कडक आचारसंहितेची ओळख करून देण्यात आली.

स्वयंसेवक संयोजन समितीच्यावतीने घेण्यात आलेल्या बैठकीत आचारसंहिता स्पष्ट करण्याबरोबरच अनेकांकडून सूचनाही घेण्यात आल्या. मोर्चाच्या एक​ किलोमीटर अंतरावर एक हजार अशा प्रमाणात स्वयंसेवक युवक, युवती नेमण्यात येणार आहेत. शंभर स्वयंसेवकांचा एक गट अशा पद्धतीने नियोजन केले जाणार असून प्रत्येक गटातील सदस्यांपर्यंत सूचना पोहचवण्यासाठी त्यातील दोन प्रमुख नेमले जाणार आहेत.

मोर्चामध्ये शिस्त राखण्याची मोठी जबाबदारी स्वयंसेवकांवर आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा म्हणूनच काम करायचे असल्याने जबाबदारीने वागण्याची सुरुवात आतापासूनच करा,’ असे मार्गदर्शन करणाऱ्या कार्यकर्त्यांनी सांगितले. त्याशिवाय हा मूक मोर्चा असल्याने कुणीही बोलणार नाही. कोणत्याही घोषणा त्यात नसतील. कुणी देण्याचा प्रयत्न केल्यास त्याला बाहेर काढण्याची जबाबदारी या स्वयंसेवकांवर देण्यात आली आहे. भगवे झेंडे सोडल्यास स्वतःच्या संघटनेचे, पक्षाचे, संस्थेचे बॅनर आणण्यास परवानगी नाही. महिला, लहान मुले, वृद्धांसाठी तातडीने सुविधा द्यायच्या. स्वयंसेवकांनी सेल्फी काढायची नाही, फोटो घ्यायचे नाहीत. त्याचपद्धतीने मोर्चात सहभागी होणाऱ्यांनाही सेल्फी अथवा फोटो काढू द्यायचे नाहीत. ११ तारखेच्या दरम्यान आणखी एक बैठक होणार असून त्यानंतर नेमणुकीच्या जागांविषयची माहिती तसेच टी शर्ट, जॅकेटस, ओळखपत्र देण्यात येणार आहे.

लाखो नागरिक रस्त्यावर असल्याने त्यांना शिस्त लावण्याची जबाबदारी असलेल्या स्वयंसेवकांनी सोबत मौल्यवान वस्तू आणू नये. संयोजन समितीच्या माध्यमातून मिळणाऱ्या सूचनांचाच अवलंब करायचा आहे.

लूडबूड खपवून घ्यायची नाही

कुणी राजकीय नेता ऐनवेळी काही सांगून लुडबुड करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याचे वर्तन खपवून घ्यायचे नाही. त्याच्या लुडबुडीचा परिणाम होऊ द्यायचा नाही. गोंधळ निर्माण होत असेल तर नेमण्यात येणाऱ्या स्पेशल टीमकडे तत्काळ सूचना करा. पोलिसांचे सहकार्य लागणार नाही. पण त्यांना त्रास होईल, असे काहीही होऊ द्यायचे नाही. मोर्चामध्ये स्वच्छता हे प्रमुख कर्तव्य आहे. त्यामुळे मोर्चात सहभागी होणाऱ्या नागरिकांनाच प्लास्टिकच्या पिशवीचा, पाण्याच्या बाटलीचा कचरा होऊ द्यायचा नाही याबाबतचे मार्गदर्शन करायचे आहे. सर्व लोक घरी गेल्याशिवाय जागा सोडयची नाही असे आवाहनही केले.

तरुणाईमध्ये प्रचंड उत्साह व भानही

आचारसंहितेची माहिती दिल्यानंतर ज्यांना सूचना करायची, त्यांनी करावी असे सां​गितले. त्यावेळी अनेक युवक, युवतींनी मराठा समाजाच्या दबलेल्या भावनांना वाट मोकळी करुन देत असताना सामाजिक जबाबदारीचे भानही राखले जात असल्याचे पहायला मिळाले. पानिपतच्या युद्धानंतर मराठा समाज एकत्रित आला आहे. त्या एकत्रितपणाला कोणतेही गालबोट लावता कामा नये, हे अनेकांनी सांगितले. इतक्या वर्षांनी एकत्रित झालेला हा समाज या मोर्चानंतरही एकत्रित राहिला पाहिजे. अनेकांनी व्हॉटस अॅप ग्रुप बनवले आहेत. त्यावर मराठा समाजाला शोभेल असेच संदेश टाकण्याची सूचनाही करण्यात आली. ‘महाराष्ट्राच्या मातीचा रंग लाल असून ते मराठ्यांच्या रक्ताने ती लाल झाली आहे,’ असेही भावनाप्रधान वक्तव्य करुन उपस्थित युवक, युवतींमध्ये चैतन्य निर्माण केले. ‘आता मराठ्यांकडून दिल्लीचे तख्त राखायचे नाही तर ते तख्तच ताब्यात घ्यायचे आहे. त्यासाठी राजकारण्यां​वर विश्वास ठेवू नका,’ असेही काहींनी निक्षून सांगितले. काहींनी जिल्ह्यातून पहाटेपासून येणाऱ्या महिलांसाठी स्वच्छतागृहाची सोय, पिण्याच्या पाण्याची सोय करण्याची सूचना केली.


१४ व १५ रोजी मंगल कार्यालये उघडी

मोर्चात सहभागी होण्यासाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून मोठया प्रमाणावर नागरिक येणार आहेत. त्यांच्या सोईसाठी १४ च्या मध्यरात्रीपासून १५ तारखेला दिवसभर शहरातील मंगल कार्यालये उघडी ठेवण्यात येतील, असे संयोजकांच्यावतीने सांगण्यात आले.

ड्रेसकोड

स्वयंसेक (तरुण)

काळा टि शर्ट, निळी जीन्स, पांढरा बूट, गळ्यात ओळखपत्र

स्वयंसेवक (तरुणी)

निळी जीन्स व कोणताही टॉप अथवा स्वयंसेवक म्हणून काम करण्यास योग्य असा वेश, त्यावर जॅकेट, पायात पांढरा बूट, गळ्यात ओळखपत्र

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वॉररूमधून मोर्चाची रणनीती सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सकल मराठा क्रांती मोर्चाची रणनीती व नियोजनास दसरा चौकातील वॉररूममधून सोमवारी प्रारंभ झाला. वॉररूमचे उद्‍घाटन राजकीय नेते व प्रमुख पदाधिकाऱ्यांना वगळून महिला व युवतींच्या हस्ते करण्यात आले. तसेच वॉररूममध्ये अधिकृत वेबसाइटचे उद्‍घाटन करण्यात आले.

मोर्चाच्या नियोजनासाठी शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिर, ताराबाई पार्क, राजारामपुरीसह शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या दसरा चौकातील डॉ. रविकांत जाधव यांच्या व्हाईट हाऊस या होमिओपॅथी हॉस्पिटलमध्ये करण्यात आले आहे. वॉररूममध्ये www.marathakrantikop.com ही वेबसाइट सुरू करण्यात आली आहे. मोर्चात सहभागी होणाऱ्यांना वेबसाइटवर नोंदणी करता येणार आहे. वेबसाइटमुळे ​जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून ई मेल, एसएमएस व सोशल मीडियावरून संपर्क साधता येणार आहे. मोर्चाचा मार्ग, पार्किंग व्यवस्था यांची माहिती देण्यात येणार आहे. मराठा क्रांती मोर्चाचे अधीकृत पत्रक, लोगो, फ्लेक्स बोर्डचे डिझाईन वेबसाइटवर प्रकाशित केले जाणार आहे. यासुविधा ग्रामीण भागातील लोकांना डाऊनलोड करून वापरता येणार आहेत. जा​तीय सलोखा टिकवण्यासाठी सोशल मीडियावर आलेले संदेश फिल्टर करून अधिकृतरित्या तालुक्यातील कार्यकर्त्यांकडे पाठवण्यात येणार आहेत. मोर्चाच्या सूचनाही वॉररूममधून जिल्ह्यात पाठवण्यात येणार आहेत. मराठा क्रांती मोर्चा कोल्हापूर १५ ऑक्टोबर, २०१६ हे फेसबुक पेजही तयार करण्यात आले आहे. संगणक तज्ज्ञ शिरीष जाधव, अक्षय शिंदे, प्रशांत बरगे, प्रतिक जगताप, मनोज नरके, सिद्धी घाटगे हे वॉररूममध्ये सकाळी ११ ते पाच यावेळेत कार्यरत राहणार आहेत.

वॉररूमच्या उद्‍घाटन नेहा मुळीक, दीपा पाटील, लतादेवी जाधव, माजी नगरसेविका पद्मावती पाटील, वैशाली महाडिक, मेघा मुळीक यांच्यासह महिलांनी केले. यावेळी आमदार राजेश क्षीरसागर, आनंद माने, डॉ. रवी जाधव, वसंतराव मुळीक, इंद्रजित सावंत, शशिकांत पाटील, जयेश कदम, गणी आजरेकर, अॅड गुलाबराव घोरपडे, नगरसेवक तौफिक मुल्लानी, दिलीप देसाई, किशोर घाटगे, उदय भोसले यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुण्याची टीमही मार्गदर्शन करणार

पुण्यातील मोर्चाचे नियोजन वॉररूममधून करण्यात आले होते. मोर्चाच्या दिवशी वॉररूम वॉकीटॉकवरून मोर्चाचा मार्ग, पार्किंग व्यवस्था यांच्या सूचना देण्यात आल्या होत्या. हाच प्रयोग कोल्हापुरात करण्यात येणार आहे. मोर्चाच्या मार्गावर सीसीटीव्ही बसवण्यात येणार असून वॉररूममध्ये कंट्रोल रूम करण्यात येणार आहे. गर्दीच्या ठिकाणी स्वयंसेवक काय करावे, याच्या सूचना वॉररूममधून देण्यात येणार आहे. पुण्यातील वॉररूमचे नियोजन करणारे तरुण याबाबत लवकरच कोल्हापुरात येऊन मार्गदर्शन करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुणी प्राचार्य देतं का?

$
0
0

Maruti.Patil@timesgroup.com

कोल्हापूर :प्राचार्य पदासाठी २०११ मध्ये अकॅडमिक परफॉर्मन्स इंडिकेटर (एपीआय) पात्रता निश्चित करण्यात आली. विद्यापीठाकडे सध्या ८१ पात्रताधारक व्यक्तींची संख्या असून केवळ प्राचार्य व प्रोफेसरमधील बेसिक वेतनातील तफावतीमुळे शिवाजी विद्यापीठ अतंर्गत कॉलेजमधील ९८ प्राचार्य पदाच्या जागा रिक्त आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) बेसिक वेतनाताली फरक संपुष्टात आणत प्राचार्य पदाचा टेन्युअर दहा वर्षे केला आहे. मात्र याची अमंलबजावणी अद्याप राज्य सरकारने केलेली नसल्याने बहुतांशी महाविद्यालयांचा कारभार प्रभारी प्राचार्यांच्या हातामध्ये विसावला आहे. त्यामुळे यूजीसीच्या निर्णयाची अमंलबजावणी राज्य सरकार का करत नाही, असा प्रश्न पात्रताधारकांकडून उपस्थित केला जात आहे.

प्राचार्यपदासाठी एपीआय लागू करण्याचा युजीसीने निर्णय घेताना, हे पद पाच वर्षासाठी टेन्युअर असल्याचे जाहीर केले. त्याचबरोबर प्राचार्य व प्रोफेसर यांच्या बेसिक वेतनामध्ये कोणताही बदल केला नाही. त्यामुळे अनेक जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या प्राचार्य पदासाचे बेसिक प्रोफेसर पदापेक्षा कमी राहिले. याबाबत यूजीसीकडे तक्रार दाखल केल्यानंतर बेसिक वेतनामध्ये वाढ करत टेन्युअरचा कालावधीही दहा वर्षे करण्यात आला. यूजीसीने घेतला निर्णयाची अमंलबजावणीचे अधिकार राज्य सरकारला असताना त्याकडे पूर्वीच्या व सध्याच्या शिक्षण मंत्र्यांनी पूर्णत: दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे राज्यातील अनेक महाविद्यालयांची जबाबदारी प्रभारी प्राचार्यांच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे. प्राचार्य पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर विद्यापीठाच्या कमिट्या, राज्य सरकार, स्टाफ, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना सामोरे जावून जबाबदारी एवढे वेतन आणि प्रतिष्ठा मिळणार नसल्यास कशासाठी प्राचार्य पदाचा काटेरी मुकूट परिधान करायचा अशा प्रश्न पात्रताधारकांकडून उपस्थित होत आहे. २०१४ मध्ये केवळ एपीआय पात्रताधारकांची संख्या ११ होती. त्यामध्ये चांगलीच वाढ झालेली असली, हे पदच स्वीकारायला तयार नसल्याने कॉलेज प्रशासनाचीही चांगलीच अडचण झाली आहे.

संस्थाही तितक्याच जबाबदार

रिक्त जागेवर मुलाखतीसाठी अर्ज प्राप्त झाल्यानंतर संस्थांचालक हेराफेरी करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुलाखतीसाठी दहा अर्ज आल्यास त्यातील पाच व्यक्तींना बोलवून त्यामधील एका व्यक्तीबरोबर मुलाखतीपूर्वीच सेटलमेंट केली जाते. त्यामुळे पात्रता असूनही त्यांच्यावर अन्याय होत असल्याचे स्पष्ट होते. अशा अन्याय झालेल्या व्यक्तीला आपल्याला कोणत्या पातळीवर डावलले गेले याची माहिती, माहिती अधिकारासारखे शस्त्र वापरून विद्यापीठाकडून माहिती घेता येऊ शकते. पण याकडे असे पात्र प्राध्यापकच दुर्लक्ष करत असल्याने संस्थाचालकांची खेळी यशस्वी होत असल्याचे दिसून येत आहे.

प्राचार्यपदाची मोठी जबाबदारी असल्याने प्रोफेसर व प्राचार्य यांच्यातील वेतनामधील तफावत कमी होण्याची आवश्यकता आहे. युजीसीने या निर्णयाची अमंलबजावणी केली आहे, मात्र राज्य सरकारने याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. तत्कालीन शिक्षण मंत्री राजेश टोपे व सध्याच्या शिक्षणमंत्री विनोद तावडे याबाबत सकारात्मक नाहीत, त्यामुळे प्राचार्यपदे रिक्त असल्याचे दिसून येत आहे.

प्राचार्य डॉ. क्रांतीकुमार पाटील, अध्यक्ष, प्राचार्य असोसिएशन

प्राचार्य नियुक्तीसाठी कमिटी

संस्था अध्यक्ष - कमिटी चेअरमन

कुलगुरू नॉमिनी (स्पेशल तीन व्यक्ती)

सहा तज्ज्ञ - त्यामध्ये प्राचार्य किंवा प्राध्यापक

शिक्षण सहसंचालक किंवा प्रतिनिधी

तीन व्यक्ती नियुक्तीचा अधिकार संस्थेला

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चांदणेने घातला होता दुकानदाराशी वाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

देवकर पाणंद येथील शाळकरी मुलगा दर्शन शहा (वय १०, रा. देवकर पाणंद, कोल्हापूर) याच्या खून खटल्यात सोमवारी (ता. ३) जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांच्यासमोर दोघांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. संशयित आरोपी योगेश उर्फ चारू चांदणे याने ज्या दुकानातून कोरे कागद आणि लखोटा खरेदी केला होता, त्या दुकानाचे मालक श्रीकांत मधुकर पुणदीकर आणि दर्शनच्या शेजारी राहणाऱ्या संगीता पद्माकर कुलकर्णी यांच्या साक्षी झाल्या. चारू चांदणे याने कोरे कागद खरेदी करताना सुट्या पैशांवरून वाद घातल्याचे दुकानदार पुणदीकर यांनी साक्षीमध्ये सांगितले, तसेच चारू चांदेणे याला कोर्टात ओळखले.

दर्शन शहा याचे अपहरण आणि खून होण्यापूर्वी महिनाभर धनत्रयोदशीच्या दुसऱ्या दिवशी दर्शनच्या घरात काळा बुरखा परिधान करून एक चोरटा घुसला होता. दर्शनच्या आजीशी झटापट केल्यानंतर पळून जाताना त्याने एक लखोटा आणि चाकू दर्शनच्या दारातच टाकून पळ काढला होता. तो व्यक्ती म्हणजे चारू चांदणेच होता, असा दावा पोलिस तपासात करण्यात आला आहे. या अनुषंगाने झालेल्या सुनावणीत देवकर पाणंद येथील दुकानदार पुणदीकर यांनी सांगितले, ‘चारू चांदणे याने आपल्या अथर्व स्टेशनर्स या दुकानातून कोरे कागद आणि लखोटा खरेदी केला. चारूने खरेदीवेळी सुट्या पैशांवरून वादही घातला होता, त्यामुळे तो माझ्या लक्षात राहिला’, अशी साक्ष पुणदीकर यांनी दिली. साक्षीदरम्यान त्यांनी कोर्टात उपस्थित असलेल्या चारू चांदणेला ओळखत असल्याचेही सांगितले.

दुसरी साक्ष दर्शनच्या शेजारी राहणाऱ्या संगीता कुलकर्णी यांची घेण्यात आली. ‘दर्शनच्या घरातून ‘चोर... चोर...’ असा आवाज आल्याने त्याच्या घरात पळत जाताना काळ्या रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाचा रुमाल तोंडावर बांधलेला तरूण पळत जात होता. त्याच्या हातातील सुरा आणि लखोटा टाकून तो पळाला. आरडाओरडा ऐकून गल्लीतील इतरही लोक जमा झाले. यातील काही लोकांनी त्या तरुणाचा पाठलाग केला,’ अशी साक्ष कुलकर्णी यांनी दिली. कुलकर्णी यांनी साक्षीदरम्यान सुरा ओळखला. उलट तपासणी करताना आरोपीचे वकील अॅड. पीटर बारदेस्कर यांनी पोलिसांनी घेतलेले साक्षीदारांचे जबाब आणि कोर्टात सादर होणाऱ्या साक्षींमध्ये विसंगती असल्याचे कोर्टाच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी काम पाहिले. सुनावणीदरम्यान पोलिसांनी मोठ्या बंदोबस्तात संशयित आरोपी चारू चांदणे याला कोर्टात आणले होते. मंगळवारी(ता. ३) आणखी दोन साक्षीदारांच्या साक्षी होणार आहेत.

‘दुकान कशाला चालविता?’

संशयित आरोपी चारू चांदणे याने श्रीकांत पुणदीकर यांच्या दुकानातून कोरे कागद आणि लखोटा खरेदी केल्यानंतर पुणदीकर यांच्याकडे ५० रुपयांची नोट दिली. २० रुपयांचे बिल झाल्याने ‘सुटे २० रुपये दे,’ असे म्हंटल्यावर चारूने दुकानदार पुणदीकर यांच्याशी वाद घातला. ‘सुटे पैशे ठेवता येत नाही, तर दुकान कशाला चालवता?’ असे म्हणत उरलेले पैशे राहू देत तुमच्याकडेच, नंतर घेतो.’ असे सांगून तो निघून गेला होता. अशी माहिती साक्षीदार श्रीकांत पुणदीकर यांनी साक्षीदरम्यान दिली

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वडगावच्या बाजारात सहा कोटींची उलाढाल

$
0
0

म. टा. वृतसेवा, हातकणंगले

महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील सर्वाधिक मोठा बाजार अशी ओळख असलेल्या पेठ वडगांवच्या महालक्ष्मी बाजारात सोमवारी जनावरांची सुमारे पाच ते सहा कोटी रूपयांची उलाढाल झाली. विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर पहिल्या सोमवारी भरणाऱ्या या प्रसिध्द बाजारात आकर्षक बैलजोडया, म्हशी, शेळ्या-मेंढया,गायी आदी जनावरांची विक्रमी प्रमाणात विक्री झाली. लाटवडे येथील सोमाजी धनगर यांची बैलजोडी बाजाराचे खास आकर्षण होते. तसेच मिणचे येथील अनिल जाधव यांच्या म्हैसाणा म्हशीची एक लाख एकवीस हजारांस विक्री झाली.

पेठ वडगावच्या या बाजाराला सुमारे १०० वर्षांची परंपरा आहे. या बाजारापासून राज्यामध्ये सर्वत्र जनावरे खरेदी विक्रीच्या व्यवसायास प्रारंभ होत असल्यामुळे या बाजारास मोठे महत्व आहे. हा बाजार मार्केट यार्ड, महालक्ष्मी मंदिर परिसरात,पाण्याची टाकी ते देवगिरी पेट्रोल पंपापर्यंत भरला होता.

बैल बाजारामध्ये एक हजार २०० बैलजोडींची आवक झाली होती. यामध्ये खिलार, माणदेशी, म्हैसूरी, जवारी आदी जातींचा समावेश होता. सदाशिव ज्ञानदेव गोगावे यांच्या खिलार चैसा बैलजोडीची किंमत एक लाख ८० हजार तर दत्तात्रय रामचंद्र माळी कसबा सांगाव यांच्या बैलजोडीची किंमत दोन लाख, राजाराम शामराव झलग (लक्ष्मीवाडी) यांचा बिनदाती बैल ५१ हजारांस सिध्दू रामा झलग यांनी खरेदी केला. तसेच सांगरूळच्या निवृत्ती खाडे यांचा खरसुंडी बैल ९० हजारांस विक्रीस होता.

जुन्या पाण्याच्या टाकीजवळ म्हशींचा बाजार भरला होता. या बाजारात मुरा, म्हैसाणा, पंढरपुरी, दुग्गल, गावठी,जाफराबादी अशा विविध जातींच्या म्हशी विक्रीसाठी आल्या होत्या. त्यांची आवक सातशे ते आठशे इतकी होती. म्हशींच्या किंमती ४० हजार ते एक लाख ६० हजारांपर्यंत होत्या. मिणचे येथील सुनिल आनंदराव जाधव यांनी म्हैसाणा, पंढरपुरी, मुरा जातीच्या २१ म्हशींची विक्रमी विक्री केली. तर वडगावच्या अनिल बापू माने यांची १४ लिटर दूध देणारी म्हैस सावर्डेच्या दगडू कांबळे यांनी ८० हजारांस खरेदी केली.

गाईच्या जातीमध्ये एच. एफ, होस्टन, जर्सी, रेडडेनिथ, गीर विक्रीस आल्या होत्या. त्यांच्या किंमती ४० हजारांपासून एक लाख ४० हजारांपर्यत होत्या. गायीची आवक जवळपास ९०० ते १००० पर्यंत होती. आष्टा येथील रोहित आडुके यांची पैलारू गाय ८५ हजारांस विक्री झाली. अनिल भाळवणे यांची एम एफ गाय शेखर कवाळे यांनी ८५ हजारांस खरेदी केली.

शेळी, मेंढी,बकरी आदींची दोन हजारांहून अधिक आवक झाली. मार्केट यार्ड येथे पहाटे बकऱ्यांचा बाजार भरलेला होता. पेठ वडगांव बाजार समितीच्या वतीने जनावरांसाठी पाणी,चा-याची व्यवस्था केली होती. सभापती विलास खानविलककर, नितीन चव्हाण,आनंदा भोसले,रमेश पाटोळे,सचिव आनंदराव पाटील यांनी बाजारांवर देखरेख ठेवली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इचलकरंजी नगरपालिकेवरीलजप्तीची नामुष्की टळली

$
0
0

म. टा . वृत्तसेवा, इचलकरंजी

रस्त्यासाठी शहापूर येथील संपादीत केलेल्या जमिनीचा मोबदला देण्यास टाळाटाळ करणाऱ्या इचलकरंजी नगरपालिका नगराध्यक्षा, मुख्याधिकारी व उपमुख्याधिकारी यांच्या खुर्चीसह पालिकेची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालयाने दिले होते. दरम्यान, नगरपालिकेने तातडीने हालचाली करत पाच लाखांचा धनादेश भरल्याने पालिकेवरील जप्तीची नामुष्की तुर्तास टळली आहे.

येथील मंगळवार पेठेत राहणाऱ्या जिनेंद्र देवाप्पा रुग्गे यांच्या मालकीची शहापूर येथे गट नं. १७६ मध्ये ५७ गुंठे जागा होती. या जागेवर नगरपालिकेने सन २००३ मध्ये रस्त्याचे आरक्षण टाकले होते. संपादीत केलेल्या जमिनीचा ठरल्यानुसार मोबदला पालिकेने न दिल्याने रुग्गे यांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती. त्यावेळी नगरपालिकेने काही रक्कम रुग्गे यांना दिली. मात्र उर्वरीत आठ लाख ५० हजार रुपयांसाठी रुग्गे यांनी न्यायालयात दरखास्त दाखल केली होती. त्यावर नगरपालिकेने उच्च न्यायालयात धाव घेतली असता पालिकेच्या बाजूने निकाल लागला होता. रुग्गे यांनी या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने नोव्हेंबर २०१५ मध्ये साडेआठ लाख रुपये व त्यावर द.सा.द.शे. १५ टक्के व्याज मिळून रक्कम देण्याचे नगरपालिकेला आदेश दिले होते. रुग्गे यांनी या २४ लाख ५४ हजार ७५६ रुपयांच्या वसुलीसाठी वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालयात दरखास्त दाखल केली होती. वारंवार सांगूनही नगरपालिकेकडून ही रक्कम न भरण्यात आल्याने न्यायालयाने नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, उपमुख्याधिकारी यांच्या खुर्चीसह पालिकेची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश जारी केले होते.

न्यायालयाच्या आदेशानुसार सोमवारी न्यायालयातील बेलिफ ए. ए. पानारी व ए. डी. पठाण हे जप्तीच्या कारवाईसाठी पालिकेत आले होते. त्यांनी मुख्याधिकारी डॉ. रसाळ यांना वसुलीची नोटीस बजावली. तसेच जप्तीची कारवाई सुरु केली. जप्तीच्या कारवाईमुळे पालिकेत खळबळ माजली. नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे, मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ आदींनी तातडीने निर्णय घेत पाच लाख रुपयांची तरतूद करुन त्याचा धनादेश न्यायालयात जमा केला. तसेच उर्वरीत रक्कमेसाठी मुदत मागितली. त्यावर न्यायालयाने २५ ऑक्टोबरपर्यंत मुदत देत जप्तीच्या कारवाईस स्थगिती दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृषी अधिकाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलन सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडील कृषी अधिकारी व विस्तार अधिकाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सोमवारपासून लेखणी बंद आंदोलनाची सुरूवात झाली. जिल्हा परिषदेसमोर कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली.

राज्य जिल्हा परिषद कृषी तांत्रिक कर्मचारी संघटनेच्या जिल्हा शाखेच्या वतीने प्रमुख तीन मागण्यांसाठी आंदोलन झाले. यापूर्वी काळ्या फिती लावून काम केले आहे. दुसऱ्या टप्प्यात पुणे कृषी आयुक्तालय येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलनचा तिसरा टप्पा म्हणून सर्व पंचायत समितीचे कृषी अधिकारी, विस्ताराधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर निदर्शने केली. सुमारे ५५ कृषी अधिकारी निदर्शनात सहभागी झाले. गेली दहा वर्षे प्रयत्न करूनही दाद मिळत नसल्याने बेमुदत लेखणी बंद आंदोलन झाले. जिल्हा परिषदेतील कृषी विस्तार अधिकाऱ्यांना इतर अधिकाऱ्यांप्रमाणे वर्ग दोनची पदोन्नती मिळावी, कृषी अधिकारी या पदास वर्ग दोनचा दर्जा मिळावा, कृषी व विकास सेवामधील रखडलेल्या पदोन्नती मिळाव्यात, कृषी विभागाकडे वर्ग केलेल्या योजना पुन्हा जिल्हा परिषदेकडे वर्ग कराव्यात, या मागण्यांसाठी लेखणीबंद आंदोलनाची सुरूवात झाली. मंगळवारी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी लेखणी बंद आंदोलन केले जाणार आहे. आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष ए. बी. मगदूम व सचिव एस. पी. देसाई यांनी केले. निदर्शनात उपाध्यक्ष एस. बी. देशमुख, सहसचिव डी. ए. शेटे, जी. एस. नारकर, जिल्हा संघटक एल. के. शेख, एस. एस. शिंदे, ए. पी. कारंडे, ए. के. महाले, एस. डी. माळगी आदी सहभागी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिबट्याच्या हल्ल्यात तीन शेतकरी जखमी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, शाहूवाडी

आंबा (ता. शाहूवाडी) परिसरातील लोळाणे-करुंगळे रस्त्यावर मादी बिबट्याने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात तीन शेतकरी जखमी झाले. यामध्ये लोळाणे येथील यशवंत भाऊ कंक (वय ५२) यांची प्रकृती गंभीर असून लक्ष्मण पांडुरंग पाटील (वय ५५) व मारुती गणपती जाधव (वय ५०) हे अन्य दोघे शेतकरी किरकोळ जखमी झाले आहेत. तर जीवरक्षणाच्या हेतूने केलेल्या प्रतिकारात बिबट्याचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली. हल्ल्याच्या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

घटनास्थळावरून समजलेली अधिक माहिती अशी, यशवंत कंक हे आपल्या मुलीला नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी शाळेला सोडून लोळाणे-करुंगळे रस्त्यावरून घरी परतत असताना वाटेत अचानक बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. गांभीर्य ओळखून त्यांनी जीवाच्या आकांताने आरडाओरडा केल्यांनतर जवळच शेतात जनावरांसाठी वैरण काढत असणारे लक्ष्मण पाटील व मारुती जाधव यांनी प्रसंगावधान राखत तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. अगोदरच बिथरलेल्या बिबट्याने कंक यांना सोडून या दोघांवर हल्ला चढविला. जीव वाचविण्याच्या प्रयत्नात बिबट्या बरोबर झालेल्या त्यांच्या प्रतिकारात हा बिबट्या गतप्राण झाला. जखमींना उपचारासाठी मलकापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, कंक यांची गंभीर स्थिती पाहून त्यांना पुढील उपचारांसाठी सीपीआर येथे हलविण्यात आले. दरम्यान, बघता-बघता घटनेची वार्ता परिसरात वाऱ्यासारखी पसरल्याने घटनास्थळी बघ्यांची तोबा गर्दी झाली. तज्ज्ञांच्या मते ही अडीच वर्षीय मादी बिबट्या आहे. किशोर वयात सैरभैर होऊन या मादी बिबट्याने हा हल्ला केला असावा असा कयासही या तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. पोलिस व्हॅनमधून आणलेल्या मृत बिबट्याची मलकापूर पशुवैद्यकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली.

वन विभागाचे उप वनसंरक्षक सगुनाथ शुक्ला, सहाय्यक वनसंरक्षक भरत पाटील, एम. एस. सोळंकी, एम. व्ही. स्वामी तसेच शाहूवाडीचे पोलीस निरीक्षक अनिल गाडे यांनी सहकारी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळाला भेट देवून पाहणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जयसिंगपुरात भीषण आग

$
0
0

म. टा. वृत्तसेवा,जयसिंगपूर

शहरातील चौदाव्या गल्लीतील दुकाने व घरास मध्यरात्री आग लागली. शॉर्टसर्किटने लागलेल्या या आगीत साडेचार लाख रुपयांच्या रोख रकमेसह दुकानातील तसेच घरातील साहित्य जळून खाक झाले. दरम्यान, जयसिंगपूर नगरपालिकेची अग्निशमन गाडी न आल्याने संतप्त नागरिकांनी रास्ता रोको केला. तसेच पालिकेत अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

शहरातील चौदाव्या गल्लीत शिरोळ रस्त्यालगत मुसा काझी यांचे निवासस्थान व दुकानगाळे आहेत. मध्यरात्री तीनच्या सुमारास शॉर्टसर्किटने या गाळ्यांपैकी गुरव फ्रेममेकर्स या दुकानास आग लागली. काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केले. या आगीत दुकानातील फ्रेमचे साहित्य, मशिनरी जळून खाक झाले.

याच दरम्यान, दुकानाच्या मागील बाजूस असणाऱ्या ताजुद्दीन काझी यांच्या घरालाही आग लागली. घरातील कपडे, फर्निचर, तिजोरी, प्रापंचिक साहित्याने पेट घेतला. यावेळी तिजोरीतील साडेचार लाख रुपये व महत्त्वाची कागदपत्रे भस्मसात झाली. यावेळी घराबाहेरील ओट्यावर झोपल्याने ताजुद्दीन काझी सुदैवाने बचावले.

इमारतीतून धुराचे लोट व आगीचे लोळ शेजाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी आरडाओरडा करून काझी कुटुंबियांना जागे केले व आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आग मोठी असल्याने जयसिंगपूर पालिकेमया अग्निशमन दलास घटनेची माहिती देण्यात आली. मात्र, दोन्ही गाड्या नादुरुस्त असल्याचे सांगून अग्निशमन दलाने घटनास्थळी येण्यास असमर्थता दर्शविली. यानंतर नागरिकांनी शिरोळ येथील दत्त साखर कारखाना व कुरुंदवाड पालिकेच्या अग्निशमन पथकाला पाचारण केले. या पथकांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली.

चौकट

संतप्त नागरिकांचा रास्ता रोको

जयसिंगपूर नगरपालिकेची अग्निशमन गाडी न आल्याने दुकान व घरातील साहित्य जळून खाक झाले. यामुळे संतप्त झालेल्या काझी कुटुंबियांसह नागरिकांनी सोमवारी सकाळी शिरोळ वाडी रस्त्यावर अचानक रास्ता रोको केला. यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. त्यानंतर आंदोलकांनी आपला मोर्चा नगरपालिकेकडे वळविला. जयसिंगपूर पालिकेच्या दोन अग्निशमन गाड्या असताना एकही उपलब्ध होऊ शकत नसल्याबद्दल त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. हे सर्व सुरू असतानाच आगीच्या घटनेची माहिती मिळालेले आमदार उल्हास पाटील तेथे आले. त्यांनी पुन्हा अधिकाऱ्याची खरडपट्टी काढत अग्निशमन गाड्यांच्या लॉग बुकची मागणी केली. त्यावेळी तब्बल अर्ध्या तासाने त्यांना लॉगबुक देण्यात आले. त्यामुळे नागरिकांच्या जिवाशी खेळणाऱ्या जयसिंगपूर पालिकेच्या ढिसाळ कारभाराबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

चौकट

काझी यांचा आक्रोश

ताजुद्दीन काझी यांनी आयुष्यभराची जमा केलेली साडेचार लाख रुपयांची रक्कम आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. यामुळे त्यांनी आक्रोश केला. जयसिंगपूर नगरपालिकेची अग्निशमन गाडी तत्काळ आली असती, तर आग आटोक्यात येऊन हे नुकसान टळले असते, असे काझी कुटुंबियांनी साश्रू नयनांनी सांगितले.

चौकट

तातडीने मदत मिळावी

बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना तातडीने मदत मिळावी. परिसरात वन्य प्राण्यांकडून होणारा वाढता उपद्रव विचारात घेवून वनविभागाने तातडीने सौरकुंपणासारखे उपाय अमलात आणावेत, अशी आग्रही मागणी लोळाणे गावचे सरपंच आकाराम पाटील व ग्रामस्थांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आघाडीचा निर्णय स्थानिक पातळीवरकॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची माहिती

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

‘आगामी सोलापूर महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या निवडणुकीत कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीबाबतचा निर्णय शहर आणि जिल्हा कॉँग्रेसकडून स्थानिक पातळीवर होणार आहे. शहर आणि जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती पाहून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हेच निर्णय घेतील,’ असे कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चव्हाण राज्यभरात दौरा करीत आहेत. मंगळवारी सोलापूर दौऱ्यावर आल्यानंतर त्यांनी कॉँग्रेस भवनात आमदार, नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. त्यानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत चव्हाण बोलत होते.

येत्या सात तारखेला प्रभागाचे आरक्षण पडणार आहे. त्यानंतर जिल्हा निवडणूक मंडळाची बैठक होईल आणि त्यानंतर राज्यस्तरावर अंतिम बैठक होऊन गुणवत्तेच्या आधारावर उमेदवार निवडला जाईल. निवडणुकांबाबत सरकार पूर्णपणे गोंधळले आहे. त्यांना राजकीय फायदा घेता येत नाही. महापालिका प्रभाग रचनेत अनेक वार्डांची मोडतोड करून भाजप सरकारने राजकीय हस्तक्षेप केला आहे, असा आरोपही चव्हाण यांनी केला.

राज्यात जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीमध्ये कॉँग्रेससाठी राजकीय वातावरण अनुकूल आहे. दसऱ्यानंतर राज्यातील नेते सर्वच जिल्ह्यामध्ये जातील, कॉँग्रेस पक्षाने केलेले काम जनतेसमोर मांडतील. सर्वच जिल्ह्यांत पक्षाच्या सभा घेऊन भाजप सरकारचे अपयश जनतेसमोर मांडणार असल्याचेही चव्हाण म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लक्ष्मी-विष्णू मिलच्याकामगारांना घरे देणार

$
0
0



सोलापूर

सोलापूर येथील लक्ष्मी-विष्णू मिलच्या सर्व कामगारांना मुंबईच्या धर्तीवर घरे देणार आहे. घरांपासून एकही कामगार वंचित राहणार नाही, अशी हमी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी शिष्टमंडळास दिली. सोमवारी शिष्टमंडळाने सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या निवासस्थानी भेट घेऊन लक्ष्मी-विष्णू मिलच्या गैरव्यवहाराची चौकशी तातडीने करावी, अशी मागणी केली. यावेळी देशमुख यांनी चर्चा करून हक्काच्या घरापासून एकही कामगार वंचित राहणार नाही तसेच त्यांना मुंबईच्या धर्तीवर घरे देण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले आहे, असे संगितले.

सुभाष देशमुख यांनी बैठकीचे आयोजन करून लवकरात लवकर कामगारांना न्याय मिळवून देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांगली नऊ ठिकाणी‘नो-पार्किंग झोन’

$
0
0



सांगली

सांगली शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी नऊ ठिकाणी सर्व प्रकारच्या वाहनांना ‘नो-पार्किंग झोन’ म्हणून घोषित केले आहेत.

राजवाडा चौक-उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयापर्यंतचा दोन्ही बाजूचा समातंर रस्ता, जुना रेल्वे स्टेशन चौक-आझाद चौकापर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर एसएफसी मॉलच्या समोर पूर्व-पश्चिम बाजू, राजवाडा चौक, आझाद चौक, सिव्हिल हॉस्पिटल चौक, कॉलेज कॉर्नर चौक, राममंदिर चौक, पुष्पराज चौक आणि क्रांतिसिंह नाना पाटील (विश्रामबाग) चौक-कुपवाडकडे जाणाऱ्या दक्षिण उत्तर रस्त्याच्या पूर्व बाजूस सिग्नलपासून २० फूट अंतरापर्यंत कोणतेही वाहन न थांबविता पुढे उत्तर बाजूस एकेरी पार्किंग करेल. तसेच सदर नाना पाटील चौकात येऊन मिळणाऱ्या उर्वरित रस्त्यास चौकापासून ५० मीटर नो-पार्किंग राहील. विश्रामबाग चौकापासून कुपवाड रस्त्यावर रस्त्याच्या पूर्व बाजूस महापालिकेचे गाळे आहेत, त्यांच्यासमोर पार्किंगला सूट दिली आहे. तसेच रुग्णवाहिका, अग्निशामक दल वाहने, पोलिस दल वाहने यांना वेळप्रसंगी यामधून सूट राहील.

नागरिक, रहिवासी, व मोटार वाहनधारकांनी या वाहतूक नियोजनास सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीपीआरमधील सीटी स्कॅन, ट्रॉमा केअर सेंटरचे काम पूर्णत्वाकडे

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

सीपीआर रुग्णालयातील काम पूर्ण क्षमतेने सुरु करण्यासाठी आवश्यक विभाग तातडीने सुरु करण्यासाठी आवश्यक निधीबाबत पालकमंत्र्यांकडे पाठपुरावा करु, तसेच सी. टी. स्कॅन, ट्रॉमा केअर सेंटरचे काम पूर्णत्वाकडे आले असल्याची माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी अभ्यागत समितीच्या आढावा बैठकीत दिली.

सातत्याने पाठपुराव्याने सीपीआर रुग्णालयाला मंजूर झालेल्या सीटी स्कॅन आणि ट्रॉमा केअर सेंटरच्या कामाची पाहणी समितीच्यावतीने करण्यात आली. सेंटरचे काम पूर्णत्वाला आले असून लवकरच या सेंटरचे उद्‍घाटन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर राजीव गांधी जीवनदायी योजनेतील काही खासगी रुग्णालयांकडून होत असणाऱ्या मनमानी कारभाराबाबात लवकरच पालकमंत्री, लोकप्रतिनिधी, अभ्यागत समिती, प्रशासन आणि रुग्णालय प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे आमदार क्षीरसागर व आमदार अमल महाडिक यांनी सांगितले.

या बैठकीत रुग्णालयातर्फे राबविली जाणारी महात्मा जोतिबा फुले जीवनदायी आरोग्य योजना, वर्ग ४ ची १०४ रिक्त पदे भरण्याबाबत, लोकसहभागातून यंत्रसामग्री मिळावी, शेंडापार्क येथील बांधकामाची सद्यस्थिती, स्तन कर्करोग मोफत तपासणी अभियान आणि सीपीआर परिसरातील अतिक्रमण या विषयावर चर्चा करण्यात आली.

यावेळी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, अभ्यागत समिती सदस्य अजित गायकवाड, सुनील करंबे, सुभाष रामुगडे, डॉ. संजय देसाई आदी डॉक्टर्स, पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमानतळाबाबतची बैठक लांबणीवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर विमानतळासाठी २७० कोटी रूपये मंजूर करून घेण्याबाबतची बैठक लांबणीवर पडली आहे. ही बैठक आता १८ ऑक्टोबरला होणार आहे. विकासाचा पहिला टप्पा विमानतळाच्या कपाउंडच्या भिंतीसाठी १६ कोटी रूपये मंजूर झाले आहेत. निविदाही काढली आहे. २७० कोटींचा निधी मिळाल्यास आगामी तीन वर्षांत विमानतळावर अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत.

कोल्हापूर विमानतळावर दिवसा विमानसेवा सुरू करण्यासाठी नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाकडे (डीजीसीए) प्रयत्न सुरू आहेत. डीजीसीएच्या वीस अटींची पूर्तता करण्यासाठी राज्य सरकारकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. डीजीसीए अधिकाऱ्यांसोबत मार्च महिन्यात बैठक झाली. त्यावेळी २७० कोटी रूपये मंजूर करण्याच्या प्रस्तावावर चर्चा झाली होती. मात्र त्यासाठी निकषांची पूर्तता केल्याशिवाय हा निधी मंजूर केला जाण्याची शक्यता कमी आहे. विमानपतन प्राधिकरणाकडून त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नागरी उड्डान सेवा तातडीने सुरू करण्यासाठी खासदारांकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. खासदार धनंजय महाडिक, खासदार संभाजीराजे छत्रपती आणि खासदार राजू शेट्टी यांच्याकडून विमानतळ विकासासाठी बैठक आणि निधी आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कोल्हापूर विमानतळाचा समावेश लो कॉस्ट एअरपोर्टमध्ये केला आहे. त्यासाठी सिव्हील एव्हीएशन डायरेक्टर बोर्डासमोर २७० कोटींचा आराखडा आला होता. हा निधी मंजूर करून घेण्यासाठी कोल्हापूर विमानतळावर काही प्राथमिक निकष पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. सर्व प्रकारच्या हवामानात टेक ऑफ करता येईल, असा प्रस्ताव देण्यात आला आहे.

विमानतळावरील रनवेची सुरक्षा, वन जमिनीतील वृक्षांची उंची, सुरक्षेसाठी नवे गेट, फायर फायटर, इमर्जन्सी एक्झिटची पूर्तता करावी लागणार आहे. रनवेवरील प्रकाश योजनेसाठी प्रपोशन अॅप्रोच पाथ इंडिकेटर (पापी) आणि रनवे एंड सेफ्टी एरियासाठी तातडीने तरतूद केली जाणार आहे. २७० कोटी रूपयांचा निधी मंजूर करून घेण्यासाठी नागरी उड्डयन सेवा संचालनालयाने ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात बैठक घेण्याचे ठरले होते. मात्र ही बैठक आता लांबणीवर पडली आहे. हा निधी मंजूर झाल्यानंतर येत्या तीन वर्षांत विमानतळावर सर्व पायाभूत आणि अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार होत्या. त्यानंतर नाइट लॅँण्डींग पूर्ण क्षमतेने झाल्यानंतर विमानसेवेची सुरूवात होणार आहे. सप्टेंबरमध्ये कोल्हापूर विमानतळावर भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या (एएआय) प्रादेशिक सरव्यवस्थापकांसोबतही विमानतळ विकासासाठी चर्चा झाली होती. दिवसा विमानसेवा सुरू करण्यासाठी डीजीसीएच्या व्यवस्थापक सत्यव्रती यांच्याकडे प्रयत्न करण्यात येत आहेत.

०००

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यातील नियोजित बैठक काही तांत्रिक कारणांमुळे पुढे ढकलली आहे. विमानतळाच्या विकासासाठी २७० कोटींचा निधी मंजूर करून घेतला जाईल. दिवसा विमानसेवा सुरू करण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत.

धनंजय महाडिक, खासदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टी शर्टमधून भगवा एल्गार

$
0
0

Sachin.yadav@timesgroup.com

tweet : @sachinyadavMT

‘एक मराठा लाख मराठा’, ‘होय, मी मराठा’, ‘मी जाणार, तुम्हीही या’, ‘मराठा क्रांती मोर्चा’ अशा शब्दज्वाळांनी सजलेले टी-शर्ट बाजारपेठेत उपलब्ध झाले आहे. कोल्हापुरात १५ ऑक्टोबरला निघणाऱ्या सकल मराठा क्रांती मूक मोर्चासाठी खास युवकांसाठी टी शर्टचा लूक बदलला आहे. भगवे आणि कोपर्डी घटनेचा निषेध करण्यासाठी काळ्या रंगाचे टी शर्ट उपलब्ध आहेत. टी शर्टमधून लाखो रुपयांची उलाढाल शक्य आहे. मराठा क्रांती मोर्चात काळ्या रंगावर भगवा एल्गार पाहायला मिळणार आहे. या मूकमोर्चात टी-शर्टवरील धगधगत्या भावनांचा एल्गार होणार आहे.

सांगलीत निघालेल्या मोर्चापेक्षा कोल्हापुरातील मोर्चा रेकॉर्ड ब्रेक करण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर शहर आणि जिल्ह्यातील युवक वर्गासाठी सुमारे पाच लाखांपर्यंत टी शर्ट विक्रीसाठी सज्ज ठेवण्याची तयारी सुरू झाली आहे. अगदी ६० रुपयांपासून १२० रुपयांपर्यंत टी शर्ट विक्रीची किंमत आहे. कॉलर आणि कॉलरविरहित टी शर्ट आहेत. मोर्चात सहभागी होण्यासाठी टी शर्ट परिधान करून जाण्याची क्रेझ युवकांत अधिक आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरातील शाहूपुरी कुंभार गल्ली, राजारामपुरी परिसर, स्पोर्टसच्या दुकानांत टी शर्ट उपलब्ध करून दिले आहेत. टी शर्टवर छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र आहे. काही टी शर्टवर शिवमुद्राही आहे. बंद मुठीचा बुलंद आवाज बोलतो आहे, असाही आशय आहे. काही टी शर्ट भगव्या रंगातील आहेत. त्यावर डिजिटल छपाई केली आहे. ते खास आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहेत. काही नेत्यांकडून युवकांसाठी टी शर्ट खरेदी करण्याची तयारी सुरू झाली आहे. विक्रेत्यांकडून शंभर, दोनशे, हजार टी-शर्ट खरेदीसाठी मागणी सुरू आहे.


वैयक्तिक नावे नकोच

मराठा मोर्चासाठी काही नेत्यांनी टी शर्टवर आपले फोटो छापण्याचा प्रकार सुरू केला आहे. या नेत्यांना ‘सकल मराठा क्रांती मूक मोर्चा’ असे छापण्याचे आवाहन केले आहे. हा मोर्चा मराठा समाजासाठी आहे. त्यामुळे वैयक्तिक आणि कोणत्याही नेत्यांची छबी टी शर्टवर नको, अशा सूचना सकल मराठा समाजाच्या युवकांना दिल्या आहेत. वारणा परिसरात नेत्यांनी टी शर्टवर वैयक्तिक छपाई केल्याचा प्रकार घडला.

व्यापारी गुजरातकडे

मोर्चासाठी मोठ्या प्रमाणात लागणाऱ्या टी शर्टची शक्यता लक्षात घेऊन व्यापारी वर्गाने जय्यत तयारी केली आहे. सांगली आणि पुणे येथे निघालेल्या मोर्चावेळी शिल्लक राहिलेल्या टी शर्टची मागणी केली आहे. त्यासह काही व्यापाऱ्यांनी कापडासाठी गुजरातकडे धाव घेतली आहे. मोर्चासाठी अकरा दिवस शिल्लक राहिल्याने मोठ्या व्यापाऱ्यांनी नियोजन केले आहे. काउंटरसह ग्रुप बुकिंगसाठी नोंदणी सुरू केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हम साथ साथ है...

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

उत्सव असो की समारंभ, जाती-धर्माच्या ​भिंती ओलांडून कोल्हापूरकर एकत्र येतात. गणेशोत्सवपासून उरुसापर्यंतच्या सणात सामील होतात. मराठा क्रांती मोर्चाच्या निमित्ताने एकोप्याच्या नात्याची प्रचिती घडत आहे.​ लिंगायत, वीरशैव माळी समाज, दिगंबर जैन समाज, मुस्लिम समाज, मारवाडी समाज, ब्राह्मण, डवरी, गोसावी समाज अशा विविध घटकांनी मराठा क्रांती मोर्चाला पाठिंबा दर्शविला आहे. मराठा समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी सर्वांनीच रस्त्यावर उतरण्याचा निर्धार करत ‘हम साथ साथ है’ असल्याचे दाखवून दिले आहे.

कोल्हापुरात विविध जाती, धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. एकमेकांच्या सण समारंभात सहभागी होतात. त्यांच्यातील सलोख्याची संबंधांची वीण आणखी घट्ट करण्याचा प्रयत्न मराठा क्रांती मोर्चाच्या नि​मित्ताने होत आहे. प्रत्येक जाती धर्मीयांतील धुरिणांनी बैठका घेऊन मोर्चाला पाठिंबा दिला आहे. मुस्लिम समाजाचे एक हजाराहून अधिक स्वयंसेवक मोर्चात असणार आहेत. पार्किंग नियोजन, कचरा वाटप, मोर्चाच्या आदल्या दिवशी कोल्हापुरात येणाऱ्या नागरिकांची सोय असा बारा प्रकारच्या जबाबदाऱ्या मुस्लिम समाज पार पाडणार आहे. मोर्चाच्या मार्गावर पाणी आ​णि नाष्ट्याचे स्टॉल असणार आहेत, अशी माहिती गणी आजरेकर यांनी दिली.

कोल्हापूर शहरात जैन धर्मीयांची संख्या लक्षणीय आहे. शहरातील विविध पेठा, उपनगरांत हा समाज वास्तव्य करून आहे. कोल्हापूर दिगंबर जैन समाज व जैन मारवाडी समाजाने मोर्चाला पाठिंबा दिला आहे. जैन पंचम या जातीस ओबीसी प्रवर्गाचा दर्जा देण्यासाठी मराठा समाजाने प्रयत्न केला होता. मराठा आणि जैन समाजाचे सलोख्याचे संबंध आहेत. मराठा समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी निघणाऱ्या मोर्चाला संपूर्ण सहकार्य करण्याचा निर्णय कोल्हापूर दिगंबर जैन समाज व मारवाडी जैन समाजाने घेतला आहे.


लिंगायत, ब्राह्मण, ख्रिस्तीही सरसावले

वीरशैव माळी, लिंगायत, जैन, मारवाडी, ख्रिस्ती, मुस्लिम समाजाची लोकसंख्या लक्षणीय आहे. या समाजाच्या संघटनांनी पाठिंबा देताना मोर्चा यशस्वी करण्यासाठी वेगवेगळ्या जबाबदऱ्या स्वीकारल्या आहेत. अखिल भारतीय नाथपंथी डवरी व गोसावी समाजाने क्रांती मोर्चाला पाठिंबा दर्शविला आहे. पाठिंबा दर्शवितानाच मोर्चातही हा घटक सामील होणार आहे. ख्रिस्ती समाज मोर्चाच्या दिवशी पाणी वाटप करणार आहे. शहरात विविध समाजातर्फे पाठिंबा दर्शविणारे फलक उभारले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ललितापंचमीसाठी जय्यत तयारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नवरात्रोत्सवातील महत्त्वाचा सोहळा असलेल्या ललितापंचमीचा उत्सव येत्या गुरुवारी साजरा होणार आहे. अंबाबाई आणि त्र्यंबोली देवी भेटीसह कोहळा फोडण्याचा विधी त्र्यंबोली मंदिरात होणार असून, ललितापंचमीसाठी टेंबलाई मंदिरात जय्यत तयारी सुरू झाली आहे.

सोहळ्यासाठी सकाळी साडेदहा वाजता अंबाबाईची उत्सवमूर्ती पालखीतून पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि शाही लवाजम्यासह त्र्यंबोली देवीच्या भेटीसाठी निघणार आहे. कोहळ्याचा तुकडा मिळवण्यासाठी होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्र्यंबोली मंदिरात पोलिस बंदोबस्त ठेवला आहे.

गुरुवारी सकाळी दहापर्यंत अंबाबाई मंदिरातील धार्मिक विधी पार पडल्यानंतर दहा वाजता तोफेची सलामी दिल्यानंतर अंबाबाईची उत्सवमूर्ती पालखीतून पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि शाही लवाजम्यासह त्र्यंबोली देवीच्या भेटीसाठी निघणार आहे. त्र्यंबोली मंदिरात दुपारी बारा वाजता गुरव घराण्यातील कुमारिकेच्या हस्ते कोल्हासुराचे प्रतीक असलेला कोहळा फोडण्यात येणार असून, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या उपस्थितीत पंचमी सोहळा होणार आहे.

त्र्यंबोली यात्रेच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी त्र्यंबोली मंदिराकडे जाणारा टेलिफोन टॉवर ते त्र्यंबोली मंदिर गेट व पुढे आर्मी ऑफिसर्स -विक्रमनगर पाण्याची टाकीपर्यंत तिन्ही बाजूंनी सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठीचे मार्ग बंद केले आहे, तसेच अवजड मोटार वाहतुकीसाठीही प्रवेश बंद केला आहे. उचगाव फाट्याकडून शहरात येणारी अवजड वाहने उचगाव फाट्यातून सरनोबवाडीमार्गे वळविली आहेत. त्र्यंबोली यात्रेच्या केएमटी बसेस टाकाळा सिग्नल चौक, टेंबलाई रेल्व फाटक, टेलिफोन टॉवर पुढे शिवाजी विद्यापीठ हायवे कँटीनमार्गे शहरात येतील.

यात्रेची तयारी

ललितापंचमीनिमित्त हजारो भाविक कोहळा फोडण्याचा विधी पाहण्यासाठी येतात. यासाठी परिसरात पूजेच्या साहित्याचे, खेळण्यांचे, खाद्यपदार्थांचे स्टॉल लागले आहेत. लहान मुलांसाठी या परिसरात पाळणे, झुला बसविण्याची तयारी पूर्ण होत आली आहे.

‘ल‌लितापंचमी यात्रेनिमित्त तयारी सुरू झाली आहे. त्र्यंबोली देवी परिसरातील राजारामपुरी पोलिस ठाण्याच्यावतीने बंदोबस्त ठेवण्यात येणार असून, सकाळी दहा वाजता तोफेची सलामी दिल्यानंतर अंबाबाईची उत्सवमूर्ती पालखीतून त्र्यंबोलीदेवीच्या भेटीसाठी निघणार आहे.’

विजय पोवार, सचिव, देवस्थान व्यवस्थापन समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉलेज कट्ट्यावर चर्चा मोर्चाची

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सकल मराठा क्रांती मोर्चाची चर्चा महाविद्यालयीन कट्ट्यावर जोरदार होऊ लागली आहे. ‘एक मराठा, लाख मराठा’ अशा घोषणा देत एकजुटीचे दर्शन घडविण्यासाठी महाविद्यालयीन युवक सरसावले आहेत. प्रत्येक मोर्चामध्ये युवकांचा सहभाग उल्लेखनीय असल्याने अनेक युवकांनी मोर्चा यशस्वी करण्याचा निर्धार करत स्टिकर्स, प्रसिद्धीपत्रके, बॅनर तयार करण्यासाठी एकच धावपळ उडाली आहे. सोशल मीडियाचा खुबीने वापर करत अधिकाधिक लोकांना सहभागी करून घेतले जात आहे. मोर्चाची आचारसंहिता पोहोचविण्यात युवक आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये युवतीही उत्स्फूर्त सहभाग घेत आहेत.

मराठा आरक्षण, कोपर्डी घटनेचा निषेध आणि शेतमालाला हमीभाव देण्याच्या मागणीवर राज्यभर लाखोंच्या संख्येने मोर्चे निघत आहे. पुणे, सांगलीनंतर १५ ऑक्टोबरला निघणाऱ्या कोल्हापूर येथील मोर्चाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. मोर्चाच्या यशस्वी नियोजनासाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी कोपरा सभा, बैठका, मेळावे घेऊन जागृती निर्माण केली जात आहे. शहरासह जिल्ह्यातील प्रत्येक कॉलेजमधील विद्यार्थी शिवाजी पेठ येथील शिवाजी मंदिर येथील संपर्क कार्यालयात जाऊन आपण मोर्चामध्ये सहभागी होणार असल्याची नोंद करत आहेत.

संपर्क कार्यालयाच्या संपर्कात आलेले युवक ‘एक मराठा, लाख मराठा’ हा संदेश शहरातील नव्हे, तर जिल्ह्यातील महाविद्यालयांतही घुमत आहे. प्रत्येक महाविद्यालयातील विद्यार्थी हा संदेश अभिमानाने पुढे देण्याचे काम करत आहेत. ‘मोर्चात मी सहभागी होणार आहे, तुम्हीही व्हा’ असे आवाहन करत स्टिकर्स, बॅनर तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. विद्यार्थी बाइकवर ‘मराठा क्रांती मोर्चा’चे स्टिकर्स लावून फेरफटका मारत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंडलिक स्मृती पुरस्कार जाहीर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

माजी खासदार दिवंगत सदाशिवराव मंडलिक यांच्या ८२ व्या जयंतीदिनी देण्यात येणारा लोकनेते सदाशिवराव मंडलिक स्मृती पुरस्कार यंदा हिवरे बाजारचे पोपटराव पवार यांच्यासह आमदार गणपतराव देशमुख, डॉ. बुधाजीराव मुळीक, उद्योजक बापू जाधव, डॉ. जी. डी. यादव, बिभीषण पाटील, दिनकर कांबळे यांना प्रदान करण्यात येणार आहे. शुक्रवारी (ता.७) दुपारी एक वाजता हमिदवाडा येथील सदाशिवराव मंडलिक सहकारी साखर कारखान्यावर होणाऱ्या सोहळ्यामध्ये लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे.

पोपटराव पवार यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला असून एक लाख रुपये व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. इतर सहा राज्यस्तरीय पुरस्कार असून पंचवीस हजार रुपये व सन्मानचिन्ह असे स्वरुप आहे. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार संभाजीराजे छत्रपती प्रमुख उपस्थित राहणार आहेत. तर अध्यक्षस्थान पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील भुषवणार आहेत, अशी माहिती सदाशिवराव मंडलिक इरिगेशन, अॅग्रीकल्चरल, एज्युकेशनल अँड कल्चरल डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशनचे अध्यक्ष संजय मंडलिक यांनी दिली.

संजय मंडलिक म्हणाले, ‘येथून पुढे दरवर्षी हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. त्यासाठी कारखान्याच्या सभासदांनी गेल्या हंगामात व यंदाच्या हंगामात टनाला २५ रुपये द्यायचे ठरवले आहे. तसेच गेल्या हंगामात कर्मचाऱ्यांनी एक महिन्याचा पगार दिला आहे. जवळपास चार कोटी रुपयांच्या निधीच्या व्याजातून पुरस्काराची रक्कम देण्यात येणार आहे. पोपटराव पवार यांनी हिरवे बाजारात १९९० पासून लोकांच्या हितासाठी व कल्याणासाठी केलेल्या कामाबाबत राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर आमदार देशमुख यांना सहकार क्षेत्रातील, मुळीक यांना कृषी क्षेत्रातील, बापू जाधव यांना उद्योग क्षेत्रातील, डॉ. जी. डी. यादव यांना शिक्षण क्षेत्रातील, बिभिषण पाटील यांना क्रीडा क्षेत्रातील, दिनकर कांबळे यांना सामाजिक क्षेत्रातील कार्यासाठी पुरस्कार देण्यात येणार आहे. यासाठी नेमण्यात आलेल्या निवड समितीने पुरस्कारांसाठी निवड केली आहे. निवड समितीचे अध्यक्ष प्रा. जे. एफ. पाटील यांच्या नेतृत्वाखाली डॉ. राजन गवस, प्रा. भालबा विभुते, व्ही. बी. पाटील, सूर्यकांत पाटील बुदिहाळकर, डॉ. जयंत कळके, डॉ. अच्युत माने, यशवंत भालकर, एम. एस. खापरे, प्रा. जीवन साळोखे, डॉ. अर्जुन कुंभार, राजू दलवाई, वाघमारे या सदस्यांनी काम केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेसची गटबाजी भाजपच्या पथ्यावर

$
0
0

कोल्हापूर

नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजपने मित्रपक्षांच्या संख्येत वाढ करण्याची मोहिमच उघडली आहे. याउलट दोन्ही काँग्रेसमधील गटबाजी वाढत असून या गटबाजीतून अनेकांनी पक्षाला रामराम करण्याची भूमिका घेण्यास सुरूवात केली आहे. ताकद असतानाही केवळ गटबाजीला सतत मिळणाऱ्या प्रोत्साहनामुळे दोन्ही काँग्रेसमोर महायुतीचे मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. बुधवारी (ता.५) जिल्हा परिषद मतदारसंघाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर या निवडणुकीचे वातावरण तापणार असून फोडाफोडीच्या राजकारणाला वेग येण्याचे संकेत मिळत आहेत.

नोव्हेंबर महिन्यात नगरपालिका तर येत्या फेब्रुवारीमध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक होत आहे. सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेवर दोन्ही काँग्रेसचेच वर्चस्व आहे. सत्तेवर येण्यासाठी काही ठिकाणी दोन्ही काँग्रेसनी इतरांची मदत घेतली आहे. एकतर्फी सत्ता नसली तरी सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थेत दोन्ही काँग्रेसची ताकद मात्र चांगली आहे. पण यावेळी दोन्ही पक्षात अंतर्गत गटबाजी मोठ्या प्रमाणात आहे. याचा फटका या त्यांना बसण्याची शक्यता आहे. काँग्रेसमध्ये जिल्हाध्यक्ष पी.एन. पाटील, आमदार सतेज पाटील, माजी आमदार प्रकाश आवाडे व जयवंतराव आवळे असे चार प्रमुख गट आहेत. गतवेळी या गटबाजीत काही जागा पक्षाच्या हातातून गेल्या. आजही या नेत्यातील गटबाजी संपलेली नाही. ती संपवण्यासाठी अनेक प्रयत्न झाले तरीही त्याला यश आले नाही. या पार्श्वभूमी​वर गटबाजी कायम ठेवूनच निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे.

काँग्रेसप्रमाणे राष्ट्रवादीमध्ये देखील फारसे काही अलबेल नाही. खासदार धनंजय महाडिक व आमदार हसन मुश्रीफ यांच्यातील दरी आता वाढत आहे. महापालिकेतील भाजप ताराराणी आघाडीच्या बैठकीस उपस्थिती लावत महाडिक यांनी वेगळा संदेश दिला. लोकसभेत टॉप थ्री मध्ये आलेल्या महाडिक यांच्या सत्कारात रस न दाखवत मुश्रीफांनी महाडिक गटाला जो संदेश द्यायचा तो दिला. दोघे कितीही इन्कार करत असले तरी पक्षात दोन गट असल्याचे स्पष्ट होत आहे. अनेकजण या पक्षात असले तरी नसल्यासारखेच वागत आहेत. पक्षकार्यात सक्रीय न होता ते आपला असंतोष व्यक्त करत आहेत. पी.जी. शिंदे यांच्यासह काहीजण भाजपच्या वाटेवर आहेत.

दोन्ही काँग्रेसमध्ये असलेल्या गटबाजीचा फायदा घेण्याची व्यूहरचना भाजप आखत आहे. त्यासाठी दोन्ही पक्षातील नाराज नेत्यांना पक्षात घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याशिवाय महायुतीतीच्या वतीने नगरपालिका आणि जिल्हा परिषद एकत्र लढण्यासाठी नियोजन सुरू आहे. शिवसेना ,स्वाभिमानी शेतकरी संघटना,राष्ट्रीय समाज पक्ष, आरपीआय आठवले गटाने स्वबळावर निवडणुका लढवण्याची घोषणा केली आहे. पण या सर्वांची ताकद बघता ते भाजप सोबत महाआघाडी करतील असेच चित्र आहे. भाजपने ३८ जागा लढवण्याचे निश्चित केले आहे. उर्वरित जागा मित्रपक्षाला देण्याचे नियोजन आहे. स्वाभिमानीची हातकणंगले व शिरोळ मध्ये ताकद आहे. सेनेचे करवीर तालुक्यात ताकद असल्याने जिथे ज्यांची ताकद तेथील जागा त्यांना या सुत्रानुसार जागा वाटप करण्यात येणार असल्याचे समजते. त्या दृष्टीने सध्या हालचाली सुरू आहेत. सध्या भाजपच्या हातात एकही नगरपालिका नाही, जिल्हा परिषद नाही, त्यामुळे काहीही करून काही ठिकाणी तरी पक्षाचा झेंडा फडकवण्याचा पक्षाचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी दोन्ही काँग्रेसमध्ये फोडाफोडीचे राजकारण करण्याची फिल्डींगच भाजपने लावली आहे.

चौकट

प्रवेशाऐवजी जनसुराज्य करणार आघाडी

वारणा परिसरात राजकीय भूकंप होणार असल्याची जोरदार चर्चा काही दिवसापूर्वी सुरू होती. पण माजी मंत्री विनय कोरे भाजप प्रवेश करण्याऐवजी या दोन्ही निवडणुकीत महायुतीबरोबर आघाडी करणार असल्याचे समजते. तशा हालचाली सुरू आहेत. अशी आघाडी झाल्यास मलकापूर, पन्हाळा व पेठवडगाव या तीन नगरपालिकेबरोबरच पन्हाळा, शाहूवाडी व हातकणंगले तालुक्यातील जिल्हा परिषद मतदार संघात भाजपला प्रवेश मिळणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोरे यांचा भाजप प्रवेशाबाबत हालचाली होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images