Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

सुविधा केंद्र हाऊसफुल्ल, इ सेवा केंद्रे ओस

$
0
0
ऐनवेळी दाखल्यांसाठी विद्यार्थी व पालकांची होणारी धावपळ थांबवण्यासाठी सरकारने महा ई सेवा केंद्र सुरु केली असली तरी शाहू सुविधा केंद्रातूनच दाखले मिळवण्याच्या प्रयत्नामुळे एजंटांचे फावत आहे. येथे दररोज विविध दाखल्यांसाठी जवळपास ४५० अर्ज येत आहेत.

आपत्ती केंद्रात पडला उजेड

$
0
0
जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापनाचे नियंत्रण करणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षात अखेर मंगळवारी वीजपुरवठा सुरु झाला. बिल भरलेले नसल्याने वीजपुरवठा बंद असल्याने गेले अनेक महिने कम्प्युटर यंत्रणा बंद होती. वीजपुरवठा सुरु झाल्याने कक्षातून पावसाचा अहवाल पाठवणे शक्य होणार आहे.

पाचपुतेंना हटविण्यात नगरकरांचाच हात?

$
0
0
बबनराव पाचपुते यांना मंत्रिपदावरून हटविल्याची बातमी नगर जिल्ह्यात येऊन धडकताच जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची चांगलीच कळी खुलली. जिल्ह्यातील साखरसम्राट व राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी गेल्या वर्ष-दीड वर्षापासून पाचपुते यांच्याविरोधात मोहीम उघडली होती.

लाच घेताना हुपरीचे मंड‌ल अधिकारी ताब्यात

$
0
0
हुपरीचे मंडल अधिकारी बी. डी. पटकारे ( ४०, रा. राजारामपुरी दुसरी गल्ली) यांना मंगळावारी लाचलुचपत विभागाच्या पथकाने पंचवीस हजारांची लाच घेताना रंगेहाथ ताब्यात घेतले.

NCPच्या वादात सोपल यांना लॉटरी

$
0
0
सोलापूर राष्ट्रवादीमध्ये विधानसभा निवडणुकीपासून सुरू असलेली बंडाळी शमविण्यात खुद्द पक्षाध्यक्ष शरद पवार यांनाही अपयश आल्याने पक्षातील फूट टाळण्यासाठी जिल्ह्यातील पवारसमर्थक अपक्ष आमदार दिलीप सोपल यांना मंत्रिपद देण्याची नामुष्की राष्ट्रवादीवर आली.

फोटो कॉपीसाठी साडेपाचशे अर्ज

$
0
0
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागाने बारावी सायन्सच्या विद्यार्थ्यांना फोटोकॉपी फास्ट देण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा सज्ज केली आहे. आतापर्यंत कोल्हापूर, सांगली आणि सातारा विभागांतून मंडळाकडे फोटो कॉपीसाठी ५५९ अर्ज आले आहेत. मंडळ विद्यार्थ्यांना ११५० उत्तरपत्रिका देणार आहे.

पाचपुतेंच्या गच्छंतीमागे नगरकर?

$
0
0
बबनराव पाचपुते यांना मंत्रीपदावरून हटविल्याची बातमी अहमदनगर जिल्ह्यात येऊन धडकताच जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची चांगलीच कळी खुलली. जिल्ह्यातील साखरसम्राट व राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी वर्ष-दीड वर्षापासून पाचपुतेंविरोधात मोहीम उघडली होती, त्याला यश मिळाल्याची चर्चा जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या गोटात सुरू होती.

भैरीबांबरप्रकरणी गुन्हे दाखल करा

$
0
0
राधानगरी तालुक्यातील भैरीबांबर येथे बालकामगार सापडल्याने संबधितांवर गुन्हे दाखल करा या मागणीसाठी बाल हक्क अभियानच्यावतीने शाहूपुरी येथील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने केली. या मागणीचे निवेदन दुकानी निरीक्षक के.बी.कदम यांना देण्यात आले.

टीम स्पिरीट ला सलाम

$
0
0
आपलं टीम स्पिरीट आवडलं. बांबवडे येथे झालेल्या अपघातातील जखमींना आपण तात्काळ सेवा देऊन तत्परतेचे दर्शन घडवलं. सीपीआर हे सर्वसामान्य रुग्णांसाठी आधारवड आहे. आपण असेच सेवाभाव वृत्तीने कार्यरत रहा. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत...

'वॉटर पायलट प्रोजेक्टमुळे' भागतेय तहान

$
0
0
सोलापुरात सर्वत्र भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. दोन दिवसांआड सोडलेले पाणीसुद्धा नागरिकांना मिळत नाही. पाण्याची ही अशी गंभीर परिस्थिती असताना मनपा राष्ट्रवादीचे गटनेते नगरसेवक दिलीप कोल्हे यांनी आपल्या प्रभागात राबिवलेल्या पायलट प्रोजेक्टमुळे दररोज सुमारे ४० हजार नागरिकांची तहान भागत आहे.

राष्ट्रवादीच्या इच्छुकांची मुलाखतीसाठी गर्दी

$
0
0
सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीची उमेदवारी पदरात पाडून घेण्यासाठी बुधवारी राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयात अनेकांनी मोठी गर्दी केली होती. फटाक्यांची आतिषबाजी, वाहनांचे विचित्र आवाज करत इच्छुक समर्थकांचा लोंढा घेऊन वाजत-गाजत येऊन शक्ती प्रर्दशन करत होते.

शिराळ्यात डेंगीचा पेशंट

$
0
0
मांगले (ता. शिराळा) येथील तरुणाला डेंगीची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. प्रकाश गोविंद पाटील (वय ३२) असे तरुणाचे नाव आहे. कोल्हापुरातील खासगी हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

मिरजेतून २४४ उमेदवारी अर्जांची विक्री

$
0
0
महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मंगळवारी ११ रोजी सुरुवात झाली. बुधवारपर्यंत मिरजेतून २४४ उमेदवारी अर्जांची विक्री झाली आहे. मात्र, अजून एकही अर्ज दाखल झाला नाही.

निपाणी बसस्थानकात प्रवाशांच्या बेडूक उड्या

$
0
0
पावसाळा नुकताच सुरू झाला आहे. मात्र, निपाणी बसस्थानकात आताच पाण्याची डबकी साचली आहेत. बसस्थानकात पडलेले खड्डे त्यात साचलेले पाणी आणि बेडूक उड्या मारीत एसटी पकडण्यासाठी चालणारे महाराष्ट्रासह कर्नाटकातील प्रवासी असे सध्याचे चित्र आहे.

गगनबावडा, राधानगरीतही जोर ओसरला

$
0
0
दमदार सलामी दिलेल्या पावसाचा गेल्या दोन दिवसांपासून जोर ओसरला आहे. मंगळवारी रात्री व बुधवारी दिवसभर पावसाची उघडझाप सुरू होती. करवीर, गडहिंग्लज व शिरोळ तालुक्यांतून बुधवारी पाऊस गायब झाल्याची स्थिती होती.

डॉक्टरांच्या परवाना नुतनीकरणाला 'ऑब्जेक्शन'

$
0
0
दरवर्षी व्यावसायिक परवान्यासाठी डॉक्टरांनी अर्ज केला तर तो तत्काळ मंजूर होत असे. यंदा मात्र व्यावसायिक परवान्यासाठी अग्निशमन, बांधकाम, प्रदूषण नियंत्रण मंडळ, आदी अनेक विभागांच्या 'नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट'ची आवश्यकता आहे.

'शहरातील लिफ्ट सुरक्षेची तपासणी करा'

$
0
0
शहरातील विविध खासगी आणि सरकारी इमारतीमधील लिफ्टच्या सुरक्षेची पाहणी प्रशासने करावी अशी, मागणी हिंदू युवा प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आली आहे.

बांबवडे अपघातातील जखमीचा मृत्यू

$
0
0
बांबवडेनजीक पाच जून रोजी वऱ्हाडाचा टेम्पो उलटून झालेल्या अपघातातील जखमी बापू श्रीपती पाटील (वय ५५, रा. शिंपे, ता. शाहूवाडी) यांचा बुधवारी दुपारी मृत्यू झाला. त्यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू होते.

जयंत पाटलांच्या चेहऱ्यावर जाऊ नका!

$
0
0
'मोनोरेलचे स्वप्न दाखविणारे ग्रामविकासमंत्री जयंत पाटील तुम्हाला चंद्रही तुमच्या नावावर असल्याचा सातबारा दाखवतील. त्यांच्या चेहऱ्यावर जाऊ नका. त्यांच्या पॅकेजला भुलू नका, ' असे आवाहन खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी सांगलीत केले.

शरद पवारांचा जलसंपदामंत्री शिंदेना कानमंत्र

$
0
0
'पक्षवाढीबरोबरच कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अंतर्गत रखडलेले प्रकल्प तातडीने मार्गी लावण्यासाठी काय करावे लागेल याचा अभ्यास करा. कालव्याच्या कामांना गती द्या, प्रत्येक जिल्ह्यातील छोट्या, मध्यम प्रकल्पाची माहिती घेण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठका बोलावून आढावा घ्या.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images