Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

पैसे बुडण्याच्या भीतीने हवालदील

$
0
0

satish.ghatage@timesgroup.com

कोल्हापूर : जिल्ह्यांतील ५५ हजार गुंतवणूकदारांनी एकी करून अंदाजे ६०० कोटींची रक्कम परत मिळवण्यासाठी रस्त्यांवर उतरावे लागणार आहे. मुळात असे आंदोलन करणा ऱ्यांना पैसे बुडण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत त्यामुळे, अनेकजण हवालदील झाले आहेत. पैसे परत मिळवण्यासाठी लोकप्रतिनिधींवर दबाव आणून पर्ल्सने पैसे परत करावे यासाठी केंद्र व राज्य सरकारला भाग पाडण्यासाठी आंदोलन करावे लागणार आहे.

पर्ल्स अॅग्रोटेक कार्पोरेशन लिमिटेड (पीएससीएल) गुंतवणूकदारांनी दोन वर्षांपूर्वी कोल्हापुरात आंदोलनाचा प्रयत्न केला होता. त्यावेळी आंदोलन केल्यास सर्व पैसे बुडतील अशी धमकी एजंटाकडून मिळत होती. कोर्टाची अथवा आंदोलनाची धमकी देणाऱ्या गुंतवणूकदाराला थोडी रक्कम देऊन गप्प बसवण्यात आले. पण अनेक गुंतवणूकदार मात्र पैसे परत मिळवण्यासाठी कंपनीचे कार्यालय व एजंटाचे उंबरे झिजवत आहेत.

सेबीने (भांडवल बाजार नियंत्रण सेक्युरिटीज अॅड एक्स्चेंज बोर्ड) पर्ल्समधील फसवणूक लक्षात घेऊन पावनेदोन वर्षापूर्वी सर्व व्यवहार बंद केले आहे. दामदुप्पट रक्कम देण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या पर्ल्सवर सेबीने कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. पर्ल्समध्ये देशभरातील पाच ते सहा कोटी गुंतवणूकदार आहेत. सेबीकडून परवाना न घेता सामूहिक गुंतवणूक योजना राबवून तब्बल ४९ हजार कोटी रूपये गुंतवणूकदारांकडून जमा केले आहेत. कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी जिल्ह्यातील अंदाजे एक लाख गुंतवणूकदारांची अंदाजे दोन हजार कोटी रूपये रक्कम अडकली आहे. पर्ल्स कंपनीची मालमत्ता विकून गुंतवणूकदारांचे पैसे परत द्यावेत असे आदेश सुप्रीम कोर्टान निवृत्त न्यायाधीश आर.एस. लोढा यांना दिले आहेत. पण मालमत्ता विक्री करून समितीला गुंतवणूकदारांची रक्कम परत करण्यात गेल्या सहा महिन्यांत अपयश आले आहे. देशभरात पर्ल्सची एक लाख ८५ हजार कोटी रूपयांची मालमत्ता आहे.

पर्ल्सच्या फसवणुकीच्याविरोधात गतवर्षी शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार, शिवसेना ग्राहक संघटना जिल्हा प्रमुख कमलाकर जगदाळे, शहर प्रमुख संजय जाधव यांच्यासह शिवसैनिकांनी पर्ल्सच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला होता. ठेवी परत दिल्या नाही तर कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा दिला होता. सेनेच्या आंदोलनानंतर सांगली व मिरजेतील अधिकारी पाठवून ठेवी परत दिल्या जातील असे आश्वासन दिले होते. सेबीच्या कारवाईमुळे लोकांचे पैसे परत देत नाही असा खुलासाही केला होता. पण सेना व गुंतवणूकदारांनी आक्रमक धोरण स्वीकारल्यावर सेनेच्या जगदाळे व जाधव यांना पुण्यातील अधिकाऱ्यांनी धमकी दिली. दोघांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात धमकीबद्दल तक्रार दिली. तसेच पोलिस अधीक्षकांना निवेदनही दिले होते. पण त्याचा पुढील तपास झालेला नाही.

आंदोलन केल्यास तुमची सर्व रक्कम बुडेल अशी भीती एजंटांनी दाखवल्याने गेल्या दोन वर्षांत एकाही गुंतवणूकदारांने पैसे बुडाल्याची तक्रार केलेली नाही. शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी विधानसभेत पर्ल्सबद्दल आवाज उठवला होता. पण अन्य कोणत्याही राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी राज्यभरातील हजारो गुंतवणूकदारांची रक्कम अडकली असताना विधानसभेत आवाज उठवलेला नाही. गुंतवणूकदारांना एकत्र करण्यासाठी अखिल भारतीय पर्ल्स गुंतवणूकधारकांची संघटना स्थापन करण्यात आली आहे.

पर्ल्सच्या गुंतवणूकधारकांना एकत्र आणण्यासाठी आम्ही संघटना स्थापन करून सेबीला गुंतवणूकदारांचे फॉर्म भरून पाठवणार आहोत. आमचा हा लढा गुंतवणूकधारकांसाठी आहेत. त्यांचे कष्टाचे पैसे त्यांना परत मिळाले पाहिजेत. त्यासाठी मंगळवारी दुपारी बारा वाजता शाहू स्मारक भवन येथे पर्ल्स गुंतवणूकदारांचा मेळावा आयोजित केला आहे.

कॉ. विजय बचाटे, मेळाव्याचे संयोजक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उत्तर देण्याची हिम्मत नसेल तर खुर्ची सोडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विरोधकांच्या प्रश्नांची उत्तरे चेअरमन विश्वास पाटील यांना तोंडपाठ होती. उत्तरे देण्याची तयारी झाली होती. तरीही उत्तरे न देता सत्ताधाऱ्यांनी सभा उधळून लावली. सर्वसाधारण सभेत सभासदांना उत्तर देण्याची हिम्मत नसेल तर खुर्ची सोडा, असा हल्लाबोल सत्तारुढ गटातील ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांनी चेअरमन पाटील यांच्यावर केला. 'गोकुळ' च्या सर्वसाधारण सभेमध्ये उत्तरे न देता गुंडाळलेल्या सभेबाबत संचालक नरके यांनी प्रथमच चेअरमन पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. नरके यांच्या भूमिकेमुळे मात्र 'गोकुळ' सह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

सर्व नेत्यांच्या सहमतीने चेअरमनपदाची जबाबदारी दिली तर पेलण्यास समर्थ असल्याचे 'अमूल' चे वर्गीस कुरियन यांचे शिष्य समजले जाणारे नरके यांनी सांगितले होते. मात्र महादेवराव महाडिक व पी. एन. पाटील या दोन सत्तारुढच्या नेत्यांकडून पदाधिकारी बदलाबाबत काहीच चर्चा केली जात नव्हती. याबाबत नरके यांच्याशी पत्रकारांनी संपर्क साधला असता त्यांनी मनातील खदखद व्यक्त केली. ते म्हणाले, 'गोकुळच्या सभेमध्ये सभासदांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याचा पायंडा कै. आनंदराव पाटील-चुयेकर यांच्यापासून सुरू आहे. आमदार सतेज पाटील यांनी ऐनवेळी प्रश्न विचारले हे चुकीचे आहे. पण त्यांच्याकडून काय प्रश्न येणार हे अपेक्षित असल्याने चेअरमन पाटील यांच्याकडून उत्तरांची घोकंपट्टी करुन घेतली होती. त्यामुळे त्यांनाही उत्तरे तोंडपाठ होती. यामुळे सभेमध्ये विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्याऐवजी 'मंजूर, मंजूर' करत सत्ताधाऱ्यांकडूनच सभा उधळली गेली. हा चुकीचा पायंडा सभेमध्ये पाडला गेला आहे. जर उत्तर देण्याची हिम्मत नसेल तर चेअरमनपदाची खुर्ची सोडावी.'

गेल्या आठवड्यात झालेल्या गोकुळच्या सर्वसाधारण सभेमध्ये सत्तारुढ गटाबाबत विरोधी आमदार सतेज पाटील यांनी जोरदार आघाडी उघडली. त्यांनी सभेमध्ये सत्तारुढ गटाचे नेते महादेवराव महाडिक यांना अडचणीत टाकणारे प्रश्न विचारुन सत्तारुढची कोंडी केली होती. महाडिक यांच्यावर आक्षेप असणारे प्रश्न येणार असल्याने सत्तारुढ गटानेही सभेपूर्वी १० दिवस तयारी केली होती. मात्र सभेमध्ये नोंद घेतली, संचालक मंडळासमोर ठेवतो, असे सांगत चेअरमन पाटील यांनी सभा संपवली. यानंतर नव्या चेअरमनपदाबाबतची चर्चा सुरू झाली होती. 'अमूल' चे आव्हान व त्याला तोंड देणाऱ्या चेअरमनची गरज 'गोकुळ' च्या वर्तुळातून व्यक्त केली जात होती.

सत्तारुढ गटातीलच नरके यांनी थेट चेअरमन पाटील यांच्यावर निशाणा साधला असला तरी नेत्यांबाबत अथवा सत्तारुढ पॅनेलच्या सोबतच असल्याचेही सांगितले आहे. ते म्हणाले, अमूलसारख्या यंत्रणेला तोंड द्यायचे असल्यास नेत्यांनी विश्वास ठेवून संधी दिल्यास निश्चितपणे चांगले काम करू. पण हे केवळ गोकुळमधील दोन नेत्यांचा नव्हे तर जिल्ह्यातील इतर नेत्यांनीही साथ दिली पाहिजे. इतर नेते काहीच बोलत नाहीत. तसेच संचालक मंडळातही अर्ध्या संचालकांचा विरोध घेऊन काम करता येणार नाही. त्यासाठी साऱ्यांनी एकसंघपणे साथ दिली तर निश्चितच चेअरमनपद स्वीकारेन. त्यानंतर गुजरात, दिल्ली येथे जाऊन 'गोकुळ' च्या यंत्रणेला अमूलचा धक्का कसा बसणार नाही याची निश्चितच दक्षता घेतली जाईल. हे आव्हान जर परतायचे असेल तर ताकदीने उतरावे लागणार आहे. त्यासाठी माझे धोरणही तयार आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून

$
0
0

म.टा.वृत्तसेवा,जयसिंगपूर

शिवनाकवाडी (ता. शिरोळ) येथे चारित्र्याच्या संशयावरून पतीने धारदार हत्याराने वार करून पत्नीचा खून केला. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. रुपाली राजेंद्र माळी (वय ४०) असे मृत महिलेचे नाव आहे. संशयित पती राजेंद्र यशवंत माळी याला पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत पोलिसांतून तसेच घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, शिवनाकवाडी येथील नवीन वसाहतीत रूपाली माळी या आपल्या तीन मुलांसमवेत रहात होत्या. त्यांना कोमल (वय १६), मधुरा (वय १४) व शुभम (वय १२) अशी तीन मुले आहेत. कौटुंबिक वादामुळे गेल्या सहा वर्षांपासून रूपाली या आपल्या पतीपासून विभक्त रहात होत्या.

सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे कोमल इचलकरंजी येथे महाविद्यालयात गेली होती. तर साडेदहा वाजण्याच्या सुमारास मधुरा व शुभम हे शाळेत गेले होते. या दरम्यान घरी आलेल्या राजेंद्रचा पत्नीशी वाद झाला. यावेळी त्याने पत्नी रूपालीवर धारदार शस्त्राने वार केले. डोक्यावर तसेच चेहऱ्यावर घाव वर्मी बसल्याने रूपाली यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर राजेंद्र याने रूपालीच्या अंगावर बेडशीट पांघरून तसेच घराच्या दरवाजास कडी लावून पलायन केले.

दरम्यान, महाविद्यालयातून परत आल्यानंतर कोमलला आईचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. यावेळी तिने हंबरडा फोडल्याने शेजाऱ्यांनी माळी यांच्या घराकडे धाव घेतली. यानंतर मधुरा व शुभम या मुलांनाही शाळेतून आणण्यात आले. यावेळी तीनही मुलांनी आक्रोश केला. खुनाच्या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. विभागीय पोलिस अधिकारी विनायक नरळे, गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष डोके, कुरुंदवाडचे सहाय्यक पोलिस निरीक्षक कुमार कदम यांनी घटनास्थळी पाहणी केली.

माळी कुटुंबिय मूळचे हातकणंगले तालुक्यातील अंबप येथील आहे. उदरनिर्वाहासाठी ते शिवनाकवाडी येथे रहात होते. गेल्या सहा वर्षांपासून माळी दाम्पत्यात कौटुंबिक वाद होता. राजेंद्र यास रुपालीच्या अनैतिक संबंधाचा संशय होता. त्यामुळे तो घराकडे येण्याचे टाळत होता. शिवनाकवाडी येथे धाब्यावर तो काम करीत होता. त्याला दारुचे व्यसन होते.

दरम्यान, पोलिसांनी रुपाली यांचा मृतदेह दत्तवाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविला. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पोलिसांनी राजेंद्रच्या शोधासाठी पथके रवाना केली. सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास अब्दुललाट येथे त्याला ताब्यात घेण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कराडमध्ये डॉल्बीमुक्तीला प्रतिसाद

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, कराड

कोर्टाच्या आदेशांची अंमलबजावणी करीत पोलिसांनी यंदा सर्वच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना ध्वनीमर्यादेचे कारण सांगत डॉल्बी न वापरण्याचा आग्रह धरला आहे. परिणामी गणेश आगमणांच्या मिरवणुकांही डॉल्बीशिवाय निघाल्या होत्या. अनंत चतुर्दशी दिवशी निघणाऱ्या अनेक विसर्जन मिरवणुकांही डॉल्बीशिवाय निघण्याची शक्यता आहे.

यंदा मंडळांच्या ठिकाणची डॉल्बीची जागा शाहिरी पोवाडे, ऐतिहासिक व देशभक्तीपर तसेच धार्मिक गौरी-गणपतींच्या गाण्यांनी घेतली असल्याने आता कराड परिसरातून डॉल्बी हद्दपार होत असल्याचे चित्र दिसत आहे. सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये होत चाललेला हा विधायक बदल नक्कीच स्वागतार्ह असल्याच्या प्रतिक्रिया सर्वसामान्यांच्यातून व्यक्त होत आहेत.

दर वर्षी या मंडळांमध्ये डॉल्बीच्या आवाजासाठी स्पर्धाच लागल्याचे चित्र पाहावयास मिळत होते. डॉल्बीच्या तालावर गणपती असो, अथवा दुर्गादेवीसमोर लावली जाणारी बीभत्स, कर्णकर्कश गाणी. डॉल्बीच्या आवाजाबरोबर कार्यकर्त्यांचा धांबडधिंगा, बीभत्स डान्स, हावभाव, शिट्ट्या वाजवित चित्र विचित्र आवाज वाढायचे. त्यातून सार्वजनिक शांततेचा भंग व्हायचा. अनेकदा मद्यपी कार्यकर्त्यांनी भांडणे केल्याने मारामारीच्या घटनाही घडल्या आहेत.

यंदा मात्र, या प्रकाराला बऱ्याच प्रमाणात लगाम बसला आहे.

..
उत्सवांमध्ये वाजविल्या जाणाऱ्या वाद्यांच्या ध्वनीमर्यादेवर हायकोर्टाकडून निर्बंध घातले आहेत. त्याची कडक अंमलबजावणी करण्याचे काम पोलिस प्रशासनावर आहे. या बाबतच्या सूचना मंडळांच्या व शांतता समित्यांच्या बैठकांत दिल्या होत्या. त्याला मंडळांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. पोलिस प्रशासनाला त्यांनी चांगले सहकार्य केले आहे. गणेश विसर्जन मिरवणुकांतही मंडळांनी पारंपरिक वाद्यांचा वापर करून पोलिसांना सहकार्य करावे.

संदिप पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वतंत्र रेल्वेलाइन, विकास संकुले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्ह्याच्या प्रादेशिक आराखड्यात रिंग रोड, रस्ते, सर्व्हिस रोड यांना प्राधान्य दिले आहे. त्यामध्ये कोल्हापूर शहरासाठी चार रिंगरोड, राष्ट्रीय महामार्गावर सर्व्हिस रोड तर इचलकरंजी शहरासाठी बायपासचा प्रस्ताव केला आहे. पुणे विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी प्रादेशिक आराखडा २१ सप्टेंबर रोजी जाहीर होणार असल्याचे सांगितले आहे.

कोल्हापूर शहराचा २०३६ सालापर्यंत होणार विस्तार लक्षात घेऊन चार रिंगरोडचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. महानगरपालिकेने ४० ते ५० टक्के रिंगरोड तयार केला आहे. कळंबा साई मंदिर, सानेगुरूजी चिव्याचा बाजार, फुलेवाडी रिंग रोड हा सध्या रिंगरोड वापरात आहे. या रिंगरोडला सायबर चौक, एससएसी ऑफिस, हॉकी स्टेडियम, संभाजीनगर बस स्थानक, कळंबा मध्यवर्ती कार्यालय हा रस्ता जोडण्यात आला आहे. फुलेवाडी ते कसबा बावडा हा रिंग रोड अद्याप पूर्ण झालेला नाही. कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीत १८ गावांचा समावेश करावा असा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने दिला होता. सध्या १८ गावांमध्ये प्राधिकरण स्थापन करावे, असा प्रस्ताव राज्य सरकारने दिला आहे. या १८ गावांमधून चार रिंगरोड जाण्याची शक्यता आहे.

पुणे-बेंगळुरू महामार्गावरील जिल्ह्यातील ४७ किलोमीटर रस्त्यांच्या दोन्ही बाजूस १० मीटर रूंदीचे सर्व्हिस रोड करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. लवकरच सातारा ते कागल या सहा पदरी रस्त्याचे काम सुरू होणार आहे. सहा पदरी रस्ता झाल्यानंतर दोन्ही बाजूला अंदाजे ३२ ते ३३ फुटाचे सर्व्हिस रोड होतील. खास बाब म्हणून इचलकरंजी शहरासाठी बायपास रोडचा प्रस्तावही ठेवण्यात आला आहे.

उद्योग विस्ताराला संधी

प्रादेशिक विकास आराखड्यात पाच नव्या औद्योगिक वसाहतींचा प्रस्ताव असल्याने जिल्ह्यात उद्योग विस्ताराला चालना मिळणार आहे. जिल्ह्यात उद्योगांना जागा नसल्याने मुंबई-बेंगळुरू इंटस्ट्रियल कॅरिडॉरमधून कोल्हापूरला वगळण्यात आले आहे. मात्र, प्रादेशिक विकास आराखड्यातील पाच नव्या प्रस्तावांमुळे उद्योग क्षेत्राच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सध्या करवीर तालुक्यतील विकासवाडी आणि कागल तालुक्यातील सीमा भागाला लागून असलेल्या अर्जुनी येथील प्रस्तावित एमआयडीसी प्रकल्प रखडले आहेत. या दोन्ही ठिकाणी स्थानिक शेतकऱ्यांनी उद्योगांना आपली जमीन देण्यास नकार दिला आहे. येथे जागा मिळत नसल्याने, तसेच कर्नाटकमध्ये आपल्या तुलनेत वीज थोडी स्वस्त असल्याने काही वर्षांपूर्वी उद्योजकांनी कर्नाटकात स्थलांतर तसेच विस्तार करण्याची चर्चा सुरू केली होती. मात्र, विकास आराखड्यातील प्रस्तावानुसार पाच नव्या एमआयडीसी जिल्ह्यात झाल्यास, येथील उद्योजकांना विस्तारासाठी संधी मिळणार आहे.

पाच ठिकाणी होणार विकास संकुल

कोल्हापूर जिल्ह्याच्या सूक्ष्म आराखड्यात जिल्हयातील काही गावांचा नियोजनबध्द विकास करण्यासाठी पाच ठिकाणी नागरी संकुल करण्याचा प्रस्ताव आहे. सर्व सुविधा एका ठिकाणी देत हे संकुल वसविण्यात येणार आहे. ज्या शहरांची वाढ झपाट्याने होत आहे, अशा शहरांचा यामध्ये समावेश आहे.शहरातील नागरी वस्तीत होत असलेली वाढ लक्षात घेऊन शहराबाहेर हे नागरी संकुल वसविण्यात येणार आहे. यामध्ये कोल्हापूर, इचलकरंजी, जयसिंगपूर, कागल आणि गडहिंग्लज या ठिकाणी नागरी संकुल प्रस्तावित करण्यात आले आहे. या पाच शहराबरोबरच काही गावे देखील विस्तारत आहेत. त्यामुळे तेथेही नागरी संकुलाची गरज भासत आहे. त्यामध्ये हुपरी, कोडोली, हातकणंगले यांचा समावेश आहे. या तीन गावात ग्रामीण विकास संकुले प्रस्तावित करण्यात आली आहे. शाहूवाडी, गगनबावडा , गारगोटी,आजरा,राधानगरी, चंदगड याठिकाणी नगरी विकास केंद्रे, बांबवडे, कुंबोज, भादोले, आब्दुललाट, दानोळी, उत्तुर या ठिकाणी नागरी विकास केंद्रांचा प्रस्ताव आहे.

विमानतळाचा दुसरा टप्पा

जिल्हा नियोजन आराखड्यात विमानतळाचा दुसरा टप्पा पूर्ण होण्यासाठी बफर आणि टनेल झोन करण्यात येणार आहे. त्यामुळे विमानतळाचे टेक ऑफचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. वाहतूक, परिवहन व दळणवळणातंर्गंत विमानतळ, विमानतळाला जोडणारे रस्ते आणि राष्ट्रीय महामार्गांचे रूंदीकरण करण्यात येणार असल्याने दळणवळण भक्कम होणार आहे. विमानतळ परिसरातील बफर झोन आणि टनेल मार्गी लागणार आहे. राष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणातील तरतूदीनुसार विमानतळाच्या परिसरातील मंदिर, नागरी बांधकामे, विमानतळाची सुरक्षितता आणि पर्यावरणाचे नुकसान होणार नाही, याची दक्षता घेण्यात येणार आहे. त्यानुसार येत्या काही दिवसांत विमानतळ परिसराची पाहणीचे काम सुरू होणार आहे. टनेलमध्ये परिसरात उपलब्ध असलेले जंगल,वन्य प्राणी, विमानाच्या आवाजामुळे कोणत्याही वन्यप्राणीला धोका पोहोचणार नाही. याची दक्षता घेतली जाणार आहे. विमानतळाच्या परिसरात असलेली नागरी वस्तीची संख्या, त्यांचे बांधकाम, वीजवाहिनी आदीची माहिती घेतली जाणार आहे. बफर आणि टनेलमध्ये पर्यावरणाला कोणतेही नुकसान पोहोचणार नसल्याच्या सूचना प्राधिकरणाने दिल्या आहेत. त्यानुसार कार्यवाही केली जाणार आहे. विमानतळाकडे जाणारे सर्व जोडरस्तेही दर्जेदार करण्यात येणार आहेत. विमानतळाकडे पोहोचण्यासाठी जाणारा आणि येणारा मार्ग, सूचनाही दर्शविल्या जाणार आहेत.

दोन रेल्वेलाइन

जिल्ह्यात दोन रेल्वेलाइन प्रस्तावित आहे. या दोन रेल्वेलाइनमुळे रेल्वेचे जाळे अधिक विणले जाणार आहे. कराड-बेळगाव आणि कोल्हापूर-वैभववाडी हा ११० किलोमीटरचा मार्ग आहे. दोन्ही मार्ग सुरू झाल्यास पश्चिम महाराष्ट्राची कनेक्टिव्हीटी अधिक वाढणार आहे. आयात आणि निर्यातीला मोठी चालना मिळणार आहे. राष्ट्रीय महामार्गांचे रूंदीकरण प्रस्तावित केले जाणार असून दहा मीरच्या दोन्ही बाजूला सर्व्हिस रोड केला जाणार आहे. सर्व्हिस रोड ४७ किलोमीटरचे केले जाणार आहे. राष्ट्रीय महामार्गावरुन इचलकरंजीला बायपास रस्त्याचा प्रस्ताव असल्याने वाहतुकीचा ताणही कमी होणार आहे. शहराला ८६ किलोमीटरचे रिंगरोड झाल्यास अवजड वाहतूकही रिंगरोड मार्गे गोवा, रत्नागिरीसह कोकणाकडे रवाना होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सुटीच्या दिवशी दुचाकी सर्व्हिसिंगसाठी उचगावच्या पसरिचानगरमधून कोल्हापुरात येताना कंटेनरने धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाले. शिवाजी दगडू बेंद्रे (वय ४५, मूळ रा. बुधगाव, ता. मिरज, जि. सांगली, सध्या रा. पसरिचानगर, उचगाव) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. मंगळवारी (ता. १३) सरनोबतवाडी येथे महामार्गाच्या उड्डाणपुलाखाली सर्व्हिस रोडवर हा अपघात घडला.

शिवाजी बेंद्रे हे बुधगाव येथील इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये शिपाई पदावर कार्यरत होते. त्यांची पत्नी शीला या पोलिस दलात कवायत निर्देशक पदावर कार्यरत आहेत, त्यामुळे बेंद्रे कुटुंब पसरिचानगर येथे राहते. मंगळवारी ईदची सुटी असल्याने शिवाजी बेंद्रे यांनी दुचाकी सर्व्हिसिंग करण्यासाठी कोल्हापुरात जाण्याचे नियोजन केले होते. दुपारनंतर चारच्या सुमारास त्यांची पत्नी पोलिस मुख्यालयात ड्युटीवर जाणार होत्या. त्यामुळे दोघेही एकाचवेळी मात्र स्वतंत्र दुचाकीवरून घराबाहेर पडले. पुणे-बेंगळुरू महामार्गाच्या सरनोबतवाडी उड्डाणपुलाखाली सर्व्हिस रोडवर येताच उचगावच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कंटेनरने शिवाजी बेंद्रे यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत बेंद्रे यांची दुचाकी रस्त्याकडेला फेकली गेली. बेंद्रे यांच्या पत्नीही काही अंतरावरच पुढे होत्या. अपघात झाल्याचे समजताच त्या दुचाकी थांबवून मागे आल्या. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पतीला पाहून त्यांना मोठा धक्का बसला. गंभीर जखमी शिवाजी बेंद्रे पत्नीच्या समोरच गतप्राण झाले. परिसरातील नागरिकांनी आणि काही प्रवाशांनी बेंद्रे यांना सीपीआरमध्ये दाखल केले. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.

या दुर्घटनेची माहिती मिळताच जिल्हा मुख्यालयातील पोलिसांनी सीपीआरमध्ये धाव घेतली. बेंद्रे यांचे बुधगावमधील नातेवाईकही सीपीआरमध्ये दाखल झाले. शिवाजी बेंद्रे यांच्या पश्चात पत्नी शीला, मुलगा रोहन, आई चंद्रभागा असा परिवार आहे. रात्री उशिरा शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवईकांकडे सोपवण्यात आला. या अपघाताची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली. दरम्यान, बेंद्रे यांच्या दुचाकीला धडक देणारा कंटेनर घटनास्थळावरून उचगावच्या दिशेने निघून गेला. काही नागरिकांनी चालकाला थांबवण्याचे प्रयत्न केले, पण कंटेनर थांबवला नाही. महामार्गावरील उड्डाणपुलाखालून वाढलेली वर्दळ धोकादायक बनली आहे. गेल्या दोन महिन्यात या परिसरात दोन अपघात झाले आहेत.

मुलाच्या शिक्षणासाठी

शिवाजी बेंद्रे हे मुळचे बुधगावचे. गावातील कॉलेजवरच त्यांची नोकरी असल्याने ते गावातील घरात कुटुंबासह राहत होते. मुलाच्या बारावीच्या शिक्षणाची सोय व्हावी यासाठी त्यांनी पसरिचानगर येथे दीड वर्षांपूर्वी घर घेतले होते. वर्षभरापूर्वीच ते पसरिचानगर येथील घरात राहायला आले होते. दररोज ते रेल्वेने बुधगाव येथे ये-जा करीत होते. त्यांची पत्नी पोलिस मुख्यालयात कवायत निर्देशक पदावर कार्यरत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वाभिमानी’च्या प्रदेशाध्यक्षपदी प्रा. कोपळे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी नांदेडचे प्रा. प्रकाश कोपळे (नांदेड) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य आणि जिल्हा कार्यकारिणीची तातडीने नियुक्त्या करण्यात येणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यात दुसऱ्या जिल्हयातील व्यक्तीची संपर्कप्रमुख म्हणून नियुक्त करण्यात येणार असल्याचे खासदार राजू शेट्टी यांनी सां​गितले.

सदाभाऊ खोत राज्यमंत्री झाल्याने त्यांच्याऐवजी प्रदेशाध्यक्षपद दुसऱ्याला देण्यात येणार होते. त्यासाठी गेले काही दिवस संघटनेत जोरदार हालचाली सुरू होत्या. शेट्टी आणि खोत यांच्यानंतर संघटनेत तिसरा मोठा नेता नाही. यामुळे हे पद कुणाच्या गळ्यात पडणार, याची सध्या उत्सुकता होती. स्थापनेपासून काम करणारे अनेकजण या पदासाठी इच्छूक होते. त्यामध्ये प्रा. जालिंदर पाटील, प्रकाश कोपळे (नांदेड) सतीश काकडे (बारामती​) दशरथ सावंत, राजेंद्र गड्ड्यान्नवर यांचा समावेश होता. यामध्ये पोकळे यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. खासदार व मंत्रीपद पश्चिम महाराष्ट्रात असल्याने राज्याच्या इतर भागात पक्ष वाढवण्यासाठी पोकळे यांना संधी देण्यात आली आहे.

आगामी जिल्हा परिषद निवडणूक स्वाभिमानी पक्ष स्वबळावर लढणार की आघाडी करणार याचा निर्णय अजून झाला नाही. या पार्श्वभूमीवर आता प्रत्येक जिल्हयात नवीन संपर्क प्रमुख नेमण्यात येणार आहे. त्याच्या अहवालानुसार जिल्हा कार्यकारिणी नियुक्त करण्यात येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्ल्स गुंतवणूकदार काढणार सेबीच्या कार्यालयावर मोर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'महाराष्ट्रातील एक कोटी गुंतवणूकधारकांची रक्कम पर्ल्स कंपनीत अडकली आहे. ही रक्कम परत मिळविण्यासाठी मुंबईतील सेबीच्या कार्यालयावर दसऱ्यांनतर मोर्चा काढू. या मोर्चात ५० हजार गुंतवणूकधारक सहभागी होतील' अशी घोषणा अखिल भारतीय पर्ल्स गंतवणूकदार संघटनेचे निमंत्रक विश्वास उटगी यांनी केली. मंगळवारी राजर्षी शाहू स्मारक भवनात पर्ल्स गुंतवणूकदारांच्या मेळाव्यात ते बोलत होते. कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील फसवणूक झालेले गुंतवणूकदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विश्वास उटगी यांनी मेळाव्यात पर्ल्सचे पैसे परत मिळवण्यासाठी रस्त्यांवरच्या लढाईत सहभागी होण्याचे आवाहन केले. उटगी म्हणाले, 'देशभरात पर्ल्सचे ११ कोटी गुंतवणूकदार आहेत. यात महाराष्ट्रात एक कोटी गुंतवणूकदार आहेत. गुंतवणूकदारांचे ४९ हजार १०० कोटी रुपये अडकले आहेत. त्यात महाराष्ट्रातील अंदाजे १२ ते १५ हजार कोटी रुपये पर्ल्स कंपनीकडे थकित आहे. देशात पर्ल्सची एक लाख ८६ हजार कोटी रुपयांची मालमत्ता आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही पर्ल्सने गुंतवणूकदारांची रक्कम देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे गेल्या आठ महिन्यांपासून कंपनीचे निर्मलसिंग भांगू, अवतारसिंग, सुब्रतो भट्टाचार्य यांच्यासह नऊ संचालक सीबीआयच्या जेलमध्ये आहेत.'

उटगी म्हणाले, 'संघटनेने आंदोलनाचा पवित्रा घेतल्यावर पर्ल्ससह फसवणूक करणाऱ्या १९७ कंपन्यांच्या व्यवहारावर सरकारने बंदी आणली आहे. पर्ल्स कंपनीची सर्व मालमत्ता, जमिनी, कार्यालये आदींमध्ये त्यांनी गुंतवलेल्या ठेवी परत मिळवून देण्यासाठी सेबीवर दबाव आणण्यासाठी गुंतवणूकदारांनी एकत्र यावे. चोरी झाल्यावर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली जाते, तशी गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याने त्यांनी सेबीकडे तक्रार केली पाहिजे. सेबीचे कार्यालय मुंबई आणि दिल्लीत आहे. त्यामुळे संघटनेने तक्रार अर्जाचे फॉर्म काढले आहेत. हे फॉर्म भरून सेबीकडे तक्रार करायची आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यात तक्रार अर्जाचे फॉर्म वाटप सुरू आहे. गुंतवणूकदारांनी योग्य माहिती फॉर्म भरून द्यावेत. हे अर्ज दसऱ्यानंतर मोर्चाने सेबीच्या कार्यालयात जमा केले जातील. सेबीने पर्ल्सच्या मालमत्तेचा लिलाव करून जी रक्कम मिळेत त्या रक्कमेतून गुंतवणूकदारांच्या बँक खात्यावर पैसे जमा करावेत अशी मागणी सुप्रिम कोर्टात केली जाणार आहे.'

कार्यक्रमाला कॉ. राजन क्षीरसागर, शंकर पुजारी, नामदेवराव गावडे, शिवाजीराव परुळेकर, सतीशचंद्र कांबळे, अनिल चव्हाण, सुमन पुजारी यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

राज्य सरकारने पर्ल्सची मालमत्ता ताब्यात घ्यावी

'पर्ल्सने मुंबई, ठाणे, पुणे, सोलापूर, औरंगाबाद येथे मोठी गुंतवणूक केली आहे. गुंतवणूकधारकांची रक्कम परत देण्यासाठी भाजप महायुती सरकारने पर्ल्सची मालमत्ता वटहुकुम काढून ताब्यात घ्यावी', अशी मागणी परभणीचे राजन क्षीरसागर यांनी केली.

माझा पानसरे होऊ शकतो

'बँका बुडवणाऱ्या​ विजय मल्याच्या प्रकरणाचा पाठपुरावा केला' असे विश्वास उटगी यांनी सांगितले. 'पर्ल्सच्या गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळावे म्हणून कायद्याच्या चौकटीत प्रयत्न केले जात आहेत. गुंतवणूकदारांची फसवणूक हा अर्थव्यवस्थेला लागलेला रोग आहे. फसवणूक करणाऱ्यांच्या मुसक्या कोर्टाच्याव्दारे आवळल्या जात आहेत. या लढ्यातून माझाही पानसरे होऊ शकतो. पण मी पानसरे, दाभोलकर व कुलबुर्गी होऊ देणार नाही असा विश्वासही उटगी यांनी व्यक्त केला. '

फॉर्म मिळण्याचे ठिकाणे

सेबीकडे गुंतवणुकदारांनी अर्ज करण्यासाठी केंद्रे उघडण्यात आली आहेत. कोल्हापुरात कॉ. अनिल चव्हाण, इचलकरंजीत महेश लोहार, सांगलीमध्ये कॉ शंकर पुजारी व सातारा येथे शाम चिंचणेकर यांच्याकडे अर्ज उपलब्ध आहेत असे मेळाव्यात जाहीर करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दोन महिला साधकांची चौकशी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी एसआयटीने ताब्यात घेतलेला दुसरा संशयित आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे याची माहिती घेण्यासाठी पोलिसांनी सनातनच्या आश्रमातील अन्य साधकांकडे चौकशी सुरू केली आहे.

मंगळवारी (ता. १३) सनातनच्या आश्रमातील दोन महिलांना पोलिस मुख्यालयात बोलावून एसआयटीने चौकशी केली. या चौकशीतून तावडेविषयी अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याचबरोबर, तावडेच्या संपर्कातील कोल्हापुरातील काही लोकांकडेही चौकशी सुरू असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

एसआटीच्या चौकशीमध्ये वीरेंद्र तावडेकडून वारंवार दिशाभूल करणारी माहिती येत असल्याने, पोलिसांनी त्याच्याशी संबंधित इतरांकडून माहिती मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. पनवेलच्या आश्रमातील डॉक्टर आणि ड्रायव्हरकडे चौकशी केल्यानंतर पोलिसांनी दोन महिला साधकांकडे मंगळवारी चौकशी केली. चौकशीत तावडेने दिलेल्या माहितीची पडताळणी सुरू आहे, त्याचबरोबर आश्रमात दिल्या जाणाऱ्या संशयास्पद औषधांचीही माहिती घेण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. औषधांबाबतचे गुढ उकलण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

तावडेने विकलेली टेम्पो ट्रॅक्स गाडी वाशिममधून ताब्यात घेतल्यानंतर या ट्रॅक्सचा वापर कुठे आणि कशासाठी झाला होता याची माहिती मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ही ट्रॅक्स कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येच्या कटासाठी वापरल्याचा संशय एसआयटीने कोर्टात व्यक्त केला होता. या अनुषंगाने तपास सुरू आहे. तावडेची दुचाकी मात्र अजूनही मिळालेली नाही असे पोलिसांनी सांगितले. या दुचाकीचा शोध सुरू आहे.

वीरेंद्र तावडे सहा वर्षांहून अधिक काळ कोल्हापुरात वास्तव्यास होता. त्याचबरोबर जत, मिरज, संकेश्वर, बेळगाव आणि गोवा परिसरात तावडेचा वावर होता. तेथेही चौकशी केली जात आहे. गरज पडल्यास तावडेलाही संबंधित ठिकाणी नेऊन तपास केला जाणार आहे. तावडेच्या संपर्कातील व्यक्तींवर लक्ष केले आहे. त्याच्याशी संबंधित कोल्हापुरातीलही काही व्यक्तींकडूनही माहिती मिळवण्याचा प्रयत्न असल्याचे एसआयटीतील सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाराजांना भाजपची ‘गळ’

$
0
0

Bhimgonda.Desai@timesgroup.com

Tweet:@bhimgondaMT

कोल्हापूर : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ग्रामीण भागात पक्ष विस्तारासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, जनुसराज्य पक्षातील नाराजांना भाजप गळ घालत आहे. राज्यात सत्ता असल्याने गळ टाकलेले नेते भाजपच्या कळपात सामील होत आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वतः यामध्ये लक्ष घातले आहे. परिणामी जिल्ह्यात राजकीय उलथापालथींना वेग आला आहे.

भाजपचा सर्व तालुक्यात, गावात स्वतःचा गट नाही. याउलट शिवसेनेचे जिल्ह्यात सहा आमदार आहेत. ग्रामीण भागात सेनेला मानणारे कार्यकर्ते आहेत. भाजपने आता सत्तेच्या जोरावर आपली वेगळी राजकीय ताकद निर्माण करण्याचा सपाटा ‌लावला आहे. जिल्ह्याचे आर्थिक, राजकीय सत्ता केंद्र असलेल्या गोकुळमध्ये जेष्ठ कार्यकर्ते बाबा देसाई यांच्या रुपाने भाजपने चंचूप्रवेश केला. त्यानंतर देसाई यांनी पक्षाच्या संटनात्मक बांधणीला गती घेतली. सर्वच तालुक्यातील महत्वाच्या सहकारी संस्थेत एकतरी स्थानिक भाजपचा कार्यकर्ता असावा, यासाठी ‌‌फिल्डिंग लावली.

‌दरम्यान, ग्रामीण राजकाणाचे केंद्रबिंदू असलेल्या जिल्हा परिषदेत सत्ता मिळवण्यासाठी ६७ पै‌की ३५ जागा जिंकाव्या जागणार आहेत. आघाडी झाल्यास शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटनेसोबत नाही तर एकाकी लढण्याची तयारी भाजप करत आहे. जिल्हा प‌रिषद, पंचायत समिती मतदारसंघ फेररचनेची प्रक्रिया सुरू आहे. त्यामध्ये फेररचेत भौगोलिकदृष्ट्या काही मदारसंघ जिंकण्यासाठी भाजपच्या सोयीचा केला जात असल्याची चर्चा आहे. विद्यमान काही सदस्यांच्या संपर्कात भाजपचे नेते आहेत. त्यांना, 'तुम्हाला हवा तसा मतदारसंघ करू. तुम्ही पक्षात प्रवेश करा', असे सांगितले जात आहे. त्यामध्ये कितपत तथ्य आहे. हे अद्याप गुलदस्त्यात आहे. पण फोडाफोड करून पक्षात प्रवेशासाठी सत्तेचा वापर होत असल्याचे लपून राहिलेले नाही.

भाजपसोबत सत्तेत असलेले शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील हालचाली थंड आहेत. काँग्रेसमध्ये जिल्ह्यांच्या नेत्यांची तोंडे परस्पर विरोधी दिशेला आहेत. राष्ट्रवादीतही असेच चित्र आहे. या दोन्ही पक्षातील अंतर्गंत धुसफूस, विस्कळीतपणा भाजपच्या पथ्यावर पडत आहे. सत्ता नसल्याने कासावीस झालेले पुढील काळात आपली, कार्यकर्त्यांची कामे तरी होतील, अशा मानसिकतेतून भाजपध्ये दाखल होत आहेत. असंतुष्ट, नाराज नेत्यांना, कार्यकर्त्यांना नवी राजकीय इनिंग सुरू करण्यासाठी भाजप पर्याय मिळला आहे.

चौकशीच्या फेऱ्यातील नेतेच वळचणीला

गैरव्यवहार, अनियमितता, संचालकांची मनमानी, नातेवाइक, हितसंबंधितांना बेसुमार कर्ज वितरण अशा तक्रारी असलेल्या मोठ्या सहकारी संस्थांची सरकारपातळीवर चौकशी सुरू आहे. गडहिंग्लजमधील शिवाजी बँक हे त्यातील एक उदाहरण. अशाप्रकारे चौकशीच्या फेऱ्यात असलेल्या संस्थांशी प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे संबंधीत नेत्यांना कारवाई टाळण्यासाठी सत्तेच्या वळचणीची तीव्र गरज आहे. असे नेते भाजपच्या गळाला सहज लागत आहेत.

इतिहास उड्यांचाच

भाजपचे मध्ये आता प्रवेश केलेले आणि संपर्कात असलेल्याचा यापुर्वीचा राजकीय इतिहास तपासला असता ते संधी मिळेल त्यावेळी या पक्षातून, त्या पक्षात उड्या मारल्याचे दिसते. म्हणून त्या नेत्यांचे दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते कितपत पाठिशी राहतात, हा खरा प्रश्न निर्माण झाला आहे.

संस्था, संघटनांशीही संपर्क

निवडणुकीसाठी उपयोगी ठरावीत, यासाठी प्रबळ स्थानिक संघटना, संस्था, महिला बचतगट यांच्याशाही भाजप संपर्कात आहे. मदतीच्या अपेक्षेनेच विविध सरकारी योजनांतून निधी दिला जात आहे. जिल्हा प‌रिषद व पंचायत समितीत सत्तेत असलेले कारभारी ‌अधिकाधिक निधी खेचून विकास कामे मार्गी लावण्यासाठी धडपडत आहेत. आता आपली मुदत संपणार आहे, पुन्हा संधी मिळले याची शाश्वती नाही, असे म्हणत 'ढपला' पाडण्यात काही सदस्य गुंतले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तर साऱ्यांचाच काटा निघेल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'तो त्याच्या गटाचा, हा माझ्या गटाचा... म्हणत एकमेकांचा काटा काढण्याचा प्रयत्न केलात तर साऱ्यांचाच काटा निघेल. एकमेकांच्या पायात पाय घालून काँग्रेसचे उमेदवार पाडणे बरोबर नाही. स्वतःची गरज असेल त्यावेळी काँग्रेस आणि काँग्रेसच्या गरजेवेळी इतरांबरोबर असे करून कार्यकर्तेच . काँग्रेसला पाडतात. पाडापाडीच्या राजकारणामुळे पक्ष राहणार नाही', अशी परस्परांवर बोचरी टिका करून काँग्रेसच्या नेत्यांनी पक्ष निरीक्षकांसमोर मनातील खदखद व्यक्त केली. जिल्हा परिषद, नगरपालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात नेत्यांनीच दिलेल्या सलामीमुळे निवडणुकीतील चुरशीची चुणूकच दिसून आली. 'पायात पाय घालण्यापेक्षा हातात हात घातले तरच जिल्ह्यातील काँग्रेसचे बळ वाढेल' असा आत्मचिंतनाचा सूरही नेत्यांनी आळवला.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष सदाशिवराव पाटील यांची आगामी निवडणुकांसाठी जिल्ह्याचे निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांच्या उपस्थितीत मंगळवारी काँग्रेस कमिटीमध्ये मेळावा झाला. यावेळी जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, आमदार सतेज पाटील यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते.

जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील म्हणाले, 'यापूर्वी विरोधक असला तरी त्यांची कामे केली जात होती. मात्र सध्या कार्यकर्त्यांना प्रचंड त्रास दिला जात आहे. भाजपमध्ये आल्याशिवाय काम केले जात नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांना ताकद देण्याची आवश्यकता आहे. त्यांना ताकद मिळाली तर काँग्रेसलाही बळ मिळेल.'

आमदार सतेज पाटील यांनी जिल्ह्यातील कुरबुरीच्या कारणांचे आत्मपरीक्षण करण्याची गरज व्यक्त केली. ते म्हणाले, 'जिल्हा परिषद, पंचायत समिती आली की काँग्रेस व काँग्रेसची गरज असेल त्यावेळी इतरांबरोबर ही प्रवृत्ती बरोबर नाही. केवळ या निवडणुकांपुरते नव्हे तर आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुकीपर्यंत काँग्रेससोबत कोण राहील याचा आत्ताच निर्णय घ्यावा. भाजपकडून फसवल्या गेलेल्या नागरिकांच्या मागण्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर उतरली नाही तर ते अयोग्य ठरेल. काँग्रेसला बळ देण्यासाठी तालुक्यातील नेत्यांनी वाद मिटवून ताकदीने काम करण्याची गरज आहे. माझे-तुझे वर्चस्व न म्हणता जो निवडून येऊ शकतो, त्यालाच तिकीट द्या. महापालिकेच्या निवडणुकीत जसा प्रभाग पुनर्रचनेचा फटका बसला तसाच फटका जिल्हा परिषदेमध्येही बसण्याची शक्यता आहे. त्यासाठी आघाडी करण्याबाबत तसेच अन्य काही मतभेद असतील तर सर्व नेत्यांना एकत्र बोलवा, चर्चा करुन जिल्हा पातळीवर निर्णय घ्या.'

माजी आमदार बजरंग देसाई यांनी तालुक्यातील पक्षांतर्गत राजकारणावर जोरदार टिका केली. ते म्हणाले, 'काँग्रेसचे कार्यक्रम शिवसेनेच्या आमदारांच्या हस्ते होत आहेत. काँग्रेसचे एकनिष्ठ म्हणायचे व एकमेकांच्या पायात पाय घालून काँग्रेसचाच उमेदवार पाडायचा हे बरोबर नाही. सगळे पक्षाशी प्रामाणिक राहिले तर काँग्रेसची सत्ता येण्यास काहीच हरकत नाही. माजी मंत्री भरमू पाटील म्हणाले, पक्षाचे तिकीट मिळाल्यावर काँग्रेसची मंडळी गायबच झाली. मला फसवले गेले असल्याने इतरांनाही फसवण्याचीच शक्यता आहे. या निवडणुकीत हा आपला, तो त्यांचा असे समजून काटा काढण्याचा प्रयत्न केला तर साऱ्यांचाच काटा निघेल. आगामी निवडणुकीत पक्षाने स्वतंत्र लढावे. आघाडीमुळेच देशात, राज्यातही घात झाला. आम्ही प्रामाणिकपणे मदत केली. पण इतर पक्षांनी मदत केलेली नाही.'

माजी खासदार जयवंतराव आवळे यांनीही, 'प्रत्येक तालुक्यात पाडापाडीचे राजकारण झाले तर काँग्रेस टिकणार नाही. एकमेकांचे पाय ओढून स्वतःचेच नुकसान होते. त्यामुळे कार्यकर्तेच काँग्रेसचा पराभव करत असतात. काँग्रेस वाढवण्यासाठी हातात हात द्या' असे आवाहन केले. अनिल यादव यांचेही भाषण झाले. प्रकाश सातपुते यांनी स्वागत केले. शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांनी आभार मानले. जिल्हा परिषद अध्यक्ष विमल पाटील, माजी आमदार संजीवनीदेवी गायकवाड, अॅड. सुरेश कुराडे, राजू आवळे यांच्यासह जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, सदस्य तसेच तालुका पदाधिकारी उपस्थित होते.

सर्वांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर निरीक्षक सदाशिवराव पाटील म्हणाले, 'पक्षातील काही गोष्टी उघडपणे बोलण्यापेक्षा बंद खोलीत चर्चा केली तर अनेक गोष्टींना न्याय देता येईल. नेत्यांनी व्यक्त केलेल्या भावनांशी सहमत आहे. पण तेच करत रहायचे का? जुन्या गोष्टी उगाळत बसण्यापेक्षा आता मार्ग काढून पक्षाला उर्जितावस्था आणण्याची अत्यंत गरज आहे. आत्मचिंतन करुन पक्षवाढीसाठी अभिप्रेत बदल आवश्यक आहेत. सकारात्मक बदल दिसावेत ही अपेक्षा आहे. पक्ष निरीक्षक म्हणून योग्य, अयोग्य साऱ्या बाबी समजून घेऊ. पण शिक्षा देण्यासाठी नाही. साऱ्यांवर कारवाई करावी लागली तर कार्यकर्ते आणायचे कुठून? अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जाईल. पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची भूमिका आहे. जिथे अतिशय दयनीय, अपवादात्मक अवस्था असेल तिथे जिल्हा समितीने शिफारस केल्यावर विचार केला जाईल. निवडणुकांमध्ये तिकीट दिले म्हणून निवडून येतो असे होत नाही. निवडून येण्याची क्षमता असलीच पाहिजे.'

जिरवण्यापेक्षा सकारात्मक वागा

जिल्ह्यातील नेत्यांनी मेळाव्यात एकमेकांची ऊणीदुणी काढण्याचा प्रयत्न केला. त्याचा धागा पकडत निरीक्षक पाटील म्हणाले, 'एकमेकांना जिरवण्याच्या नकारात्मक उर्जेपेक्षा सकारात्मक उर्जा वापरल्यास काँग्रेसला जिल्ह्यात उर्जितावस्था येईल. ​जिल्ह्यात ​लोकांमधून निवडून आलेला काँग्रेसचा एकही आमदार नसावा ही चांगली गोष्ट नाही. त्यामुळे आत्मचिंतन करा.'

पन्नास वर्षात अनेकांच्या वल्गना

नुकतेच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्यातील काँग्रेस संपवण्याची वल्गना केल्याचे सांगून आमदार सतेज पाटील म्हणाले, 'अनेकांना भाजपमध्ये ओढले जात आहे. ही तात्पुरती सूज आहे. गेल्या ५० वर्षात अनेकांनी काँग्रेस संपवण्याची भाषा केली. पालकमंत्री काँग्रेस संपवण्याची भाषा करत असले तरी महापालिकेत काँग्रेसच आहे. जिल्हा परिषदेमध्येही काँग्रेसच असून जिल्ह्यात विविध विकास कामे केली आहेत. हे काँग्रेसचेच श्रेय आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘देवस्थान’च्या हिशेबात अनागोंदी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पश्चिम महाराष्ट्रातील तीन हजारावर असलेल्या मंदिरांचे व्यवस्थापन करणाऱ्या समितीच्या बँक व्यवहारांबरोबर इतर कामकाजामध्येही दोष आहेत. अपर्ण केलेल्या दागिन्यांच्या नोंदीमध्ये तफावत, समितीकडे खरेदी केलेल्या साहित्याचीही नोंद होत नसल्याची गंभीर बाब, मंदिरनिहाय लेखापरीक्षण नाही, समितीकडे जमा होणाऱ्या भाड्याची माहिती नसल्याचे लेखापरीक्षणातून समोर आले आहे.

देवस्थान समितीच्या अखत्यारित ३०६७ मंदिरे आहेत. त्यातील अंबाबाई, केदारलिंग तसेच कोल्हापूर शहर व ग्रामीण भागातील जवळपास ४७१ मंदिरांमध्ये दागिने असल्याचे सांगण्यात येते. अंबाबाई मंदिरामध्ये तर भाविक मोठ्या प्रमाणात दागिने अर्पण करत असतात. अंबाबाई व केदारलिंग ही दोन देवस्थान वगळता इतर देवस्थानांचे दागिने किती व त्यांची रक्कम किती याबाबतचे रजिस्टर नाही. अंबाबाई मंदिरामध्ये दिल्या जाणाऱ्या दागिन्यांच्या नोंदी रजिस्टरमध्ये केल्या जातात. पण पावतीबुक प्रमाणे रजिस्टरची नोंद तपासल्यानंतर दोन्हीमध्ये तफावत आढळल्या आहेत. लेखापरीक्षणामध्ये काही नोंदी तपासल्यानंतर पावतीनुसार आलेल्या काही ​दागिन्यांची नोंद रजिस्टरला झाली नसल्याचे आढळून आले. तर काही दागिन्यांचे वजन रजिस्टरवर कमी नोंदवले गेले असल्याचेही आढळून आले. इतर देवस्थानमध्ये आलेल्या वस्तूंची मालमत्ता खात्यास नोंदवली जात नाही. त्यामुळे गेल्या काही वर्षात कोणत्या देवस्थानात किती वाढ झाली, तपासणी अहवाल, गोल्ड व्हॅल्यूअर दाखला असे काहीही नसल्याचे लेखापरीक्षण अहवालात म्हटले आहे.

भक्तांकडून मंदिरामध्ये साड्या अर्पण केल्या जातात. त्याचे रजिस्टर मात्र अद्ययावत केलेले नाही. साडी स्टॉक बुक नाही. त्यामुळे साड्यांची मोजणी करुन रजिस्टरप्रमाणे साठा जुळतो की नाही याची तपासणी करण्याची गरज व्यक्त केली आहे. बऱ्याच साडी अर्पण पावतीची रजिस्टरला नोंद नाही. रजिस्टर हेच साडी शिल्लक साठा नियंत्रणाचे मुख्य कागदपत्र आहे. पावतीप्रमाणे प्राप्त झालेल्या पण रजिस्टरला नोंद न झाल्याचे लेखापरीक्षणात आढळून आले आहे. याशिवाय दुकान, इमारत, ब्लॉक, भुईभाडे, जिल्हा परिषद शाळा यांचे भाडे जमा झालेले दिसते. पण किती येण्यापैकी जमा झाले याची काही माहिती समितीच्या कार्यालयात नसल्याचे आढळून आले. नृसिंहवाडी देवस्थान धर्मशाळेमध्ये डेडस्टॉक रजिस्टर ठेवलेले नाही. तसेच पावती पुस्तके, शिल्लक पुस्तके यांचा साठा तपासला जात नसून त्यामुळे पुस्तके क्रमाने वापरली जात आहेत का याची काहीच माहिती मिळत नसल्याचे समोर आले आहे.

देवस्थान समितीचे दहा वर्षानंतर लेखापरीक्षण झाले आहे. ज्या त्रुटी दाखवल्या आहेत, त्यांचा निपटारा करण्यास सुरुवात केली आहे. बँक खात्यांमधील तफावत कागदपत्रांच्या आधारे दूर केली जात आहे. साड्यांच्या नोंदीमध्ये असलेल्या तफावतीबाबत चौकशी केली जात आहे. सावंतवाडीतील प्रणिता जाधव प्रकरणाबाबतही नेमके काय झाले आहे याची चौकशी करू. योग्य बाबींची कार्यवाही करू. समितीच्या कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी, शिस्तीसाठी प्रयत्न केले जात आहेत.

विजय पवार, सचिव, देवस्थान समिती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सनातनच्या दोन महिला साधकांची चौकशी

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । कोल्हापूर

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणात पनवेल येथील सनातन आश्रमातील दोन महिला साधकांची कोल्हापुरात कसून चौकशी केली जात असल्याचे वृत्त 'एबीपी माझा' वृत्तवाहिनीने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.

ज्या दोन महिला साधकांची चौकशी केली जात आहे त्यांची नावे अद्याप कळू शकलेली नाहीत. वीरेंद्र तावडेच्या चौकशीतून पुढे आलेल्या माहितीच्या आधारे एसआयटी अधिकारी त्यांची चौकशी करत आहेत.

पानसरे हत्येचा तपास करत असलेल्या एसआयटी अधिकाऱ्यांकडून वीरेंद्र तावडेचं वास्तव्य राहिलेल्या कोल्हापुरातील ठिकाणाचीही झडती घेतली जात असल्याचे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोलापुरात संततधार

$
0
0



सोलापूर

दडी मारलेल्या पावसाने तब्बल सव्वा महिन्यानंतर सोलापुरात दमदार हजेरी लावली. शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातही पावसाने संततधार हजेरी लावल्यामुळे खरिपाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. रब्बीच्या पिकांनाही काहीअंशी जीवदान मिळण्यास मदत झाली आहे.

तब्बल सव्वा महिन्यानंतर मंगळवार सकाळपासून पावसाला सुरुवात झाली. गेल्या दोन दिवसांपासून दिवसरात्र शहर आणि जिल्ह्यात पाऊस कोसळत आहे. त्यामुळे समाधानकारक वातावरण निर्माण झाले आहे. खरिपाच्या पिकांना आता खऱ्या अर्थाने दिलासा मिळाला आहे. शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. मंगळवारी रात्री तर शहरासह अन्य भागात दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे गणेश भक्तांच्या आनंदाला उधाण आले आहे.

पावसाळा सुरू झाल्यानंतर तब्बल एक महिन्यांनंतर सोलापुरात पावसाने हजेरी लावली. खरीप पेरण्या वाया जातात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पेरण्या झाल्यानंतर अपेक्षेप्रमाणे पावसाची गरज होती. परंतु पावसाने पाठ फिरविली होती, बळीराजा पुरता हतबल होऊन गेला होता. जिल्ह्यातील सर्वच अकरा तालुक्यात खरिपाच्या पेरण्या होऊनही पाऊस न आल्यामुळे पेरण्यांवर संकट आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साताऱ्यात श्रींचे विसर्जनबुधवारी उशिरापर्यंत ९९६ मंडळांच्या श्रींचे विसर्जन

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सातारा

सातारा शहरात बुधवारी दुपारी एक वाजता गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. शेटे चौकातील मानाच्या प्रकाश मंडळाची शिस्तबद्ध मिरवणुकीचा प्रारंभ आरतीने झाला. सातारा शहरासह जिल्ह्यातील एकूण ९९६ सार्वजानिक मंडळांनी बुधवारी, अनंत चतुर्दशीच्या अगोदरच एक दिवस आपल्या लाडक्या गणरायाला निरोप दिला.

प्रकाश मंडळाच्या मिरवणुकीत फुलांच्या आकर्षक सजावटीने सुशोभीत केलेल्या ट्रॉलीवर शंकर-पार्वती-गणेशाची इको फ्रेंडली मूर्ती. पुण्याचे दरबार ब्रास बँडचे १४० वादकांचे भव्य पथक, एकदंत ढोल ताशांचे पथक, समर्थ रंगावली पथकाने काढलेल्या नयनरम्य महारांगोळ्या, पारंपरिक वेषातील युवती आणि महिलांच्या फेर, फुगड्या, भारदस्त फेटे धारी, झब्बा लेंगा पोशाखातील युवक, चौकाचौकांत फटाक्यांची आतषबाजी, असे हे चित्र सर्वाचे आकर्षण ठरत होते. प्रमुख चौकात या रंगावली ग्रुपने शहीद कर्नल महाडिक, हुतात्मा पोलिस विलास शिंदे यांच्या चित्रा भोवती सुरख रांगोळी काढून मानवंदना दिली. ऑलिंपिक मधील विजेत्या महिला खेळाडूंच्या चित्रा भोवती रांगोळी रेखाटली. महिलांनी शंकर पार्वतीचे औक्षण करुन दृष्टही काढली जात होती. मानाचा अखिल भाजी मंडईचा राजाची मिरवणूक दुपारी तीन वाजता सुरू झाली. कार्यकर्त्यांनी गणेशाची ट्रॅक्टर ट्रॉली ओढत गणपती बाप्पाचा जयजयकार केला. अधून-मधून येणाऱ्या पावसाच्या हलक्या सरींनी गणेश भक्तांच्या उत्साहात अधिकच भर पडत होती.
अष्टविनायक मंडळाचा ढोंलांचा थरथराट उत्साह वाढवणारा होता. गोल्डन मंडळ, ओमकार मंडळ, क्रांतिवीर आदी मंडळांची ही मिरवणूक लक्षवेधक ठरत होती. पोलिस मुख्यालयातील बाल हनुमान मंडळात विविध पोलिस अधिकारी व कर्मचारी धोतर, कुर्ता या महाराष्ट्रीयन पोशाखात सहभागी झाले होते. दुष्काळी भागातील मायणी येथील कलाकारांनी सादर केलेला पारंपरिक हलगी व पिपाणी वादनाचा नजारा आकर्षण ठरत होता.
शहरातील मंगळवारतळे, मोती तळे व फुटका तलाव येथे सार्वजानिक मंडळांच्या विसर्जनासाठी प्रशासनाने हायकोर्टाने बंदी घातल्याने राधिका रोडवर तयार केलेल्या कृत्रिम तळ्यात हे गणपती विसर्जित होत होते. येथे विशेष मचाण व्यवस्था केली होती. तसेच शहरात हुतात्मा स्मारक, सदर बझार येथील दगडी शाळा, गोडोली बाग येथे ही अशी कृत्रिम तळी बनवण्यात आली आहेत. यंदा कृत्रिम तलावात राधीका रोडवर विसर्जन करण्याची सुविधा केल्याने दर वर्षीचा मिरवणूक मार्ग बदलून यासाठी मंडळांना मार्गदर्शन केले जात होते. शहरातील राजपथ, सदाशिव पेठ, समर्थ मंदिर-राजवाडा या रस्त्यांवर वाहतुकीला बंदी घालण्यात आली होती. राजपथाचे दोन्ही मार्ग खास मिरवणुकीसाठी खुले ठेवण्यात आले होते. दरम्यान, आज, अनंत चतुर्दशी दिवशी वाहतुकीचा अडथळा टाळण्यासाठी अनेक मंडळांनी आपल्या विसर्जन मिरवणुका गुरुवारी सकाळी लवकरच काढण्याचा निर्णय घेतला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विचित्र अपघातात पोलीस ठार

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । सातारा

पुणे-बेंगळुरू महामार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास जावळीतील रायगांव येथे झालेल्या विचित्र अपघातात भुईंज पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे एक पोलीस कर्मचारी ठार झाले असून एक होमगार्ड व पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झालेले आहेत.

पुणे बाजूकडून सातार्‍याकडे विरूध्द दिशेने येत असलेल्या दुचाकीची व मालवाहतूक करणार्‍या कंटेनरची समोरासमोर धडक झाली होती. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी झाली होती. त्यामुळे वाहतूक पूर्ववत करण्यासाठी भुईंज पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे पोलीस नाईक नितीन पांडुरंग जमदाडे (वय ३५, रा. ओझर्डे, ता. वाई) तसेच सातारा तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे पोलीस कर्मचारी अमोल अंकुश कांबळे व होमगार्ड राजेंद्र बबन बोराडे हे वाहतूक पूर्ववत करण्यासाठी त्याठिकाणी गेले असता वाहतूक सुरळीत करत असतानाच सातारा बाजूकडून पुण्याकडे जात असणारी ट्रॅव्हल्स क्रमांक एम.एच ०९ सी.ए. २९९७ ही गाडी तीव्र उतारामुळे चालकाचा ताबा सुटून या कर्मचार्‍यांच्या अंगावरून गेली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या तिघाही कर्मचार्‍यांना येथील सातारा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. दरम्यान उपचार सुरू असताना पोलीस नाईक नितीन पांडुरंग जमदाडे यांचा मृत्यू झाला तर अमोल कांबळे व राजेंद्र बोराडे यांच्यावर उपचार सुरू आहेत.

पोलीस नाईक नितीन जमदाडे यांनी जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांत अतिशय उत्कृष्ट काम केल्यामुळे त्यांचा जिल्ह्यात मोठा मित्रपरिवार आहे. नितीन जमदाडे यांच्या मृत्युमुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पोलीस कर्मचार्‍यांवर होत असलेले हल्ले व अपघातांची मालिका यामुळे संपूर्ण पोलीस दलच धास्तावले असून याबाबत उपाययोजना कराव्यात अशी मागणी होवू लागली आहे.

दरम्यान याबाबत संबंधित ट्रॅव्हलचालकावर गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक भरणे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गोकुळ’ अध्यक्षबदलाची डोकेदुखी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'गोकुळ' च्या सर्वसाधारण सभेनंतर चेअरमन बदलाच्यादृष्टीने चर्चा सुरू झाली असली तरी अजून नेते निर्णयाप्रत आलेले नाहीत. ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांनी थेट चेअरमन पाटील यांना खुर्ची सोडण्याचे सांगितल्यामुळे संचालकांमधील गटतट समोर आले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर नवीन चेअरमन कोणाला करायचे याची नेत्यांना डोकेदुखी होणार आहे.

सर्वसाधारण सभेमध्ये चेअरमन विश्वास पाटील यांना उत्तर देण्यास आलेले अपयश व परराज्यातील दूध संघाचे असलेले आव्हान या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांनी थेट पाटील यांनी खुर्ची सोडावी असे सांगितल्याने 'गोकुळ' मधील सारे आलबेल नाही हे स्पष्ट झाले. तसेच नेत्यांनी संधी दिल्यास चेअरमनपद स्वीकारण्यास तयार असल्याचे नरके यांनी सांगितले आहे. महादेवराव महाडिक यांच्याकडून नरकेंना हिरवा कंदिल मिळेल. पण पी. एन. पाटील यांच्याकडून ते शक्य नाही. त्यामुळे नरके यांची चेअरनपदी वर्णी लागेल की नाही याबाबत शंकाच आहे. नरकेंना संधी न मिळाल्यास ते काय करणार? चेअरमन बदलण्याचे ठरवल्यास नरके सोडून अन्य कोण? याचा विचार नेत्यांना करावा लागणार आहे. यामुळे आगामी काही दिवसात या सर्व बाबींबाबत नेत्यांची डोकेदुखी वाढणार आहे असे चित्र आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाप्पा निघाले गावाला...

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

सार्वजनिक गणेशमूर्तींच्या विसर्जन सोहळ्यातील विसर्जन मिरवणुकीलाही यावर्षी पर्यावरणपूरक उत्सवाची जोड देण्याचा प्रयत्न महापालिकेच्यावतीने करण्यात येणार आहे. गुरूवारी सकाळी सुरू होणाऱ्या विसर्जन मिरवणुकीची तयारी महापालिका व पोलिस प्रशासनाने केली आहे. तसेच विविध संस्था, संघटना, पोलिस मित्र, स्वयंसेवक यांनीही मिरवणुकीला शिस्त लावण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मिरवणूक शांततेत, शिस्तबद्ध आणि सुरक्षित वातावरणात पार पडावी, यासाठी सर्व यंत्रणा कार्यरत राहणार आहेत. पावसाची शक्यता गृहीत धरून धोकादायक इमारतींवर सुरक्षाफलक लावण्यात आले असून अशा इमारतींच्या आसपास नागरिकांनी उभे राहू नये, यासाठी विशेष दक्षताही घेतली जाणार आहे.

ध्वनीमर्यादा मोजणारी मशीन्स पोलिसांच्या हातात

पंचगंगा नदीचे प्रदूषण टाळण्यासाठी सार्वजनिक मंडळांनी मूर्तींचे विसर्जन इराणी खणीतच करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे. त्यासाठी मूर्ती विसर्जनासाठी इराणी खण येथे दोन धक्के तयार केले आहेत. इराणी खणलगतच्या खणीचाही विसर्जनासाठी पर्याय उपलब्ध झाला आहे. महापालिकेकडून विसर्जन मिरवणूक मार्गावरील रस्त्यांची डागडुजी सुरू आहे. मिरवणूक मार्गावरील धोकादायक इमारतीभोवती बॅरिेकेट्‍स लावली आहेत. ध्वनीप्रदूषण मोजण्यासाठी महापालिकेच्यावतीने तीन मशिन्स पोलिस खात्यास दिली आहेत.

महापालिका सज्ज

महापालिका प्रशासनाने विसर्जन मिरवणूक शिस्तबद्ध निघावी तसेच विसर्जनात कुठल्याही प्रकारचे अडथळे उद्भभवू नयेत यासाठी यंत्रणा सज्ज ठेवली आहे. 'पवडी' आणि आरोग्य विभागाचे प्रत्येकी २०० कर्मचारी तैनात असणार आहेत. साठ ट्रॅक्टर, दहा डंपर व चार जेसीबी अशी यंत्रणा असणार आहे. रस्त्यांची डागडुजी करण्यात आली आहे. ​मिरवणूक मार्गावरील अडथळे, ​अतिक्रमणे हटवली आहेत. मिरवणूक मार्ग तसेच विसर्जन ठिकाणी लाइट व्यवस्था केली आहे. इराणी खणीवर सार्वजनिक मूर्ती विसर्जनासाठी क्रेन व दोन जेसीबीची व्यवस्था आहे. इराणी व बाजूच्या खणीभोवती संरक्षणासाठी बॅरिकेटिंग करण्यात आले आहे. जाऊळाचा गणपती ते इराणी खण हा रस्ता विसर्जनासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. वैद्यकीय पथकेही नेमली आहेत. दान केलेल्या मूर्तींचे इराणी खणीत विसर्जन करण्यात येणार आहे. यासाठी वाहतूक व्यवस्था केली आहे. निर्माल्य उठावासाठी कर्मचारी नेमले आहेत. विसर्जन मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी लाकडी व लोखंडी बॅरिकेट्स उभारली आहेत.

सुरक्षापथक

अग्निशमन विभागामार्फत पंचगंगा घाट, इराणी खण, कोटीतीर्थ तलाव व राजाराम बंधारा येथे अग्निशमन दलाचे पथक, सुरक्षा गार्ड, लाइफ जॅकेटची सुविधा, बोटी उपलब्ध असणार आहेत. मंडळाच्या कार्यकर्त्यांसह मिरवणूक पहायला येणाऱ्या नागरिकांनाही धोक्याच्या ठिकाणी न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या असून सुरक्षारक्षक तैनात करण्यात येणार आहेत.

यंदा मानाच्या नारळासह रोप

महापालिकेतर्फे विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या सार्वजनिक संस्था, तरूण मंडळे व तालीम संस्थांच्या अध्यक्षांना पापाची तिकटी येथील मंडपात महापालिका पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या हस्ते श्रीफळ, पान, सुपारीसोबत रोप देण्यात येणार आहे. सार्वजनिक मंडळांना वृक्षारोपणाचे महत्व समजावे म्हणून रोपे भेट देण्यात येणार आहेत. पर्यावरणपूरक उत्सवाला जोड देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपमध्ये नेत्यांचा प्रवेश ही सत्तेची सूज

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

'भाजपमध्ये बड्या नेत्यांचा प्रवेश होणार असल्याची घोषणा आणि इच्छुकांची रीघ लागल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे. मात्र हा पक्षप्रवेश म्हणजे सत्तेची आलेली सूज आहे. सत्ता गेल्यावर त्यांना हे निश्चितच समजेल,' असे टीकास्त्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार हसन मुश्रीफ यांनी सोडले. 'सत्तेत असताना शिवसेनेने आणि त्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीने ही सूज अनुभवली आहे. आता जाणारे लोकच त्यावेळी पक्षप्रवेशाला पुढे होते. बाटली बदलली, लेबल बदलले, आतील माल तोच आहे,' असा टोलाही त्यांनी हाणला.

कागलमध्ये बुधवारी संताजी घोरपडे कारखान्याच्या विकास योजनेच्या कार्यक्रमानंतर मुश्रीफ पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, 'भाजपला कोल्हापूर जिल्ह्यात जागाच नव्हती. पण महाराष्ट्रात अचानक सर्वांत जास्त विधानसभा सदस्य भाजपचे निवडून आले. सत्तेमुळे जिल्ह्यात चंद्रकांत पाटील यांचे पक्षातील स्थान आणि जबाबदारी वाढली. म्हणूनच ते पक्षविस्ताराचे काम करीत आहेत. जी मंडळी पक्षप्रवेश करीत आहेत, त्यातील ८० टक्के युती सरकारच्या काळात शिवसेनेत जाण्यात अग्रेसर होते. पुढे राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीची सत्ता आल्यावर हेच लोक काँग्रेसमध्ये आले. आता सत्ता गेल्यानंतर ह्या मंडळींचे झालेले प्रवेश ही सत्तेची सूज होती हे लक्षात आले आहे. जो अनुभव आम्ही घेत आहोत, तोच अनुभव सत्ता गेल्यावर चंद्रकांत पाटील यांनाही येईल.'

समरजितसिंह घाटगे यांच्या भाजप प्रवेशाबद्दल विचारले असता मुश्रीफ यांनी या प्रश्नाला मात्र बगल दिली.

...तरच आश्चर्य वाटेल

'भाजपमध्ये प्रवेश करणारा बडा नेता कोण?' या प्रश्नाला उत्तर देताना मुश्रीफ म्हणाले, 'आठवडाभरात पालकमंत्री भाजप प्रवेश करणाऱ्यांची नावे जाहीर करतीलच. मला त्याचे फारसे आश्चर्य राहिलेले नाही. कारण जिल्ह्यामधील मी स्वत:, पी. एन. पाटील, सतेज पाटील, विनय कोरे, कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्यापैकी कुणी प्रवेश केला तरच आश्चर्य वाटेल. कागल तालुक्यातील नेतेमंडळींचा विचार करता एका नेत्याला पक्षप्रवेशाचा प्रचंड अनुभव आहे. त्याबद्दल त्यावर काहीही बोलू शकत नाही.'

जि.प.बाबत तूर्त चर्चा नाही

'काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आपापल्या चिन्हावरच लढले आहेत. त्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये आघाडी झाली असे सांगून आमदार मुश्रीफ म्हणाले, 'सद्यस्थितीत या विषयावर काही बोलू शकत नाही.'

आमचे आणि दादांचे सूर जुळलेलेच

आमदार मुश्रीफ म्हणाले, 'कोणतीही राजकीय व्यक्ती परस्परांवर मात करण्याचा प्रयत्न करणारच. त्यांच्याही व्यूहरचनेचा हा एक भाग आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील आणि आमचे तसे वाद नाहीत. आमचे सूर जुळलेलेच आहेत,' याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लॉ अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

तब्बल दोन महिन्यांच्या विलंबानंतर लॉ (विधी) अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेस मंगळवारपासून (ता. १३ सप्टेंबर) सुरुवात झाली. लॉ अभ्यासक्रमासाठी प्रथमच घेण्यात आलेल्या सीईटी परीक्षेच्या निकालानंतर प्रवेश प्रक्रियेस विलंब झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सुरू होता. प्रवेश प्रक्रिया त्वरीत पूर्ण करण्यासाठी सुटीदिवशीही अर्ज दाखल करण्याची मुभा विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे. प्रवेशाच्या एकून चार फेऱ्या होतील. पहिली फेरी १७ सप्टेंबरपर्यंत सुरू राहिल.

बी.एड्, बी. पीएड् अभ्यासक्रमांप्रमाणे यावर्षी प्रथमच लॉ अभ्यासक्रमासाठी राज्य सामायिक पात्रता परीक्षा (सीईटी) घेण्यात आली होती. मे महिन्यात झालेल्या परीक्षचा निकाल ३० जून रोजी जाहीर झाला. निकालानंतर प्रवेश प्रक्रिया त्वरीत सुरुवात होईल अशी अपेक्षा होती. मात्र, ती फोल ठरली. शिवाजी विद्यापीठ सलंग्नीत सात विधी महाविद्यालयांमध्ये बारावीनंतर पाच वर्षे व पदवीनंतर तीन वर्षे अभ्यासक्रमाच शिक्षण दिले जात आहे. लॉ अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांचा कलही चांगला आहे. मात्र, यावर्षी प्रवेश प्रक्रियेलाच विलंब झाल्याने अनेक विद्यार्थ्यांनी इतर अभ्यासक्रमांना पसंती दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या रोडावण्याची शक्यता व्यक्त झाल्यानंतर प्रवेश प्रक्रिया गती आली आहे.

आता प्रवेशाच्या एकूण चार फेऱ्या होणार असून पहिली १७ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. प्रवेशादरम्यान विद्यार्थ्यांना सुटीमुळे त्रास होऊ नये, यासाठी सुटीदिवशीही प्रवेश प्रक्रिया सुरू राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images