Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

पानसरे हत्येत आणखी दोघे संशयित रडारवर

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणात आणखी दोघे संशियत पोलिसांच्या रडारवर आहेत. तपासात विनय पवार हा तिसरा, तर सारंग आकोळकर हा चौथा संशयित म्हणून नोंद करण्यात आली आहे. विनय पवार यानेच पानसरे यांच्या घराच्या परिसरात रेकी केली होती. साक्षीदारानेही त्याचा फोटो ओळखल्याचे पोलिसांनी कोर्टात सांगितले. दरम्यान, संशयित वीरेंद्र तावडेला आणखी नऊ दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली. गुरुवारी (ता. ८) प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी (कनिष्ठ स्तर) यू. बी. काळपगार यांच्यासमोर सुनावणी झाली.

एसआयटीने सीबीआयच्या ताब्यातून घेतलेला संशयित आरोपी डॉ. वीरेंद्र तावडे याच्या चौकशीतून धक्कादायक माहिती पुढे येत आहे. पहिला संशयित समीर विष्णू गायकवाड याच्यानंतर वीरेंद्र तावडेची दुसरा आरोपी म्हणून नोंद झाली आहे. तावडेच्या तपासात आणखी दोघांची नावे पुढे आली. विनय बाबूराव पवार (रा. उंब्रज, ता. कराड, जि. सातारा) आणि सारंग आकोळकर हे अन्य दोन आरोपी असल्याचे पोलिसांनी कोर्टात सांगितले. विनय पवारनेच १६ फेब्रुवारी २०१५ पूर्वी दोन दिवस कॉम्रेड पानसरे यांच्या घराच्या परिसरात रेकी केली होती. काही साक्षीदारांनीही त्याचा फोटो ओळखला आहे. शस्त्रे मिळवण्यासाठी पवार आणि आकोळकर यांचा सहभाग असल्याचे पोलिसांनी कोर्टात सांगितले. तावडेच्या चौकशीतील माहितीच्या आधारे पवार, आकोळकर यांना ताब्यात घेण्यास मदत होईल. त्यामुळे तावडेची पोलिस कोठडी वाढवून मिळावी, असा युक्तीवाद विशेष सरकारी वकील अॅड. शिवाजीराव राणे यांनी केला.

पोलिसांनी २ सप्टेंबरला तावडेचा ताबा घेतला होता. पाच दिवसांच्या कोठडीत तावडेचे पनवेलचे घर आणि सनातन संस्थेच्या आश्रमातील झडतीत एसआयटीला संशयास्पद औषधांचा साठा मिळाला आहे. एच आणि एच वन या औषधांमुळे माणसाच्या चेतासंस्थेवर परिणाम होऊन तो विशिष्ट अवस्थेत पोहोचतो. साठा करण्यास परवानगी नसलेली ही औषधे आहेत. या औषधांचा उल्लेख सनातनचे प्रमुख जयंत आठवले यांच्या 'क्लिनक हिप्नॉसिस' या पुस्तकातही आहे. या औषधांचा वापर नेमका कशासाठी, कोणी आणि कोणावर केला?, त्यातून काय साध्य झाले याचा शोध घेण्यासाठी तपास अधिकारी सुहेल शर्मा यांनी तावडेची पोलिस कोठडी वाढवून मागितली. तावडेची गायब मोटारसाकल, ट्रॅक्स, संशयित पवार आणि आकोळकर यांचा शोध घेण्यासाठी कोठडी आवश्यक असल्याचे विशेष सरकारी वकील अॅड. राणे यांनी कोर्टात सांगितले.

तावडेंचे वकील अॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी बाजू मांडताना, एसआयटीच्या छाप्यांवर आक्षेप घेतला. पनवेल कोर्टाची परवानगी न घेतचा छापे टाकले गेले. सीबीआयच्या छापेमारीनंतर एसआयटीने छापे टाकण्याची गरज नव्हती. समीर गायकवाडच्या बाबतीत झालेली पुनरावृत्ती तावडेच्या बाबतीत होत असल्याचा आरोप इचलकरंजीकर यांनी केली. तावडेच्या घरात सापडलेली औषधे घरगुती वापरासाठीची होती. त्यामुळे त्याचे रजिस्टर नव्हते. तावडेच्या मालकीच्या गाड्या विकल्या आहेत. त्यामुळे त्याचा गुन्ह्याशी संबंध नसल्याचे सांगत अॅड. इचलकरंजीकर यांनी त्याच्या जामिनाची मागणी केली. कोर्टाने दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर तावडेला १६ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

विशेष सरकारी वकीलपदी अॅड. राणे

कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येचा खटला चालवण्यासाठी पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी अॅड. शिवाजीराव राणे यांची विशेष सरकारी वकीलपदी नियुक्ती केली. गुरुवारी (ता. ८) सकाळी राणे यांना नियुक्तीपत्र देऊन अधीक्षक देशपांडे यांनी त्यांच्याशी तपासाबाबत चर्चा केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डॉ. घोटवडेकरांच्यामेडिकलचा परवाना रद्द

0
0



म. टा. वृत्तसेवा, सातारा

क्रूरकर्मा संतोष पोळ याच्या हत्याकांडाचा केंद्रबिंदू ठरलेल्या वाई तालुक्यातील डॉ. विद्याधर घोटावडेकर यांच्या मेडिकलची तपासणी अन्न व औषध प्रशासनाने केली. मेडिकलमध्ये सरकारी नियम पायदळी तुडवून कामकाज सुरू असल्याचे या तपासात समोर आल्याने तत्काळ मेडिकलचा परवाना रद्द करण्यात आला. दरम्यान, वाई कोर्टाने पोळ आणि मांढरे यांना नथमल भंडारी यांच्या खुनाप्रकरणी पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

वाई तालुक्यातील डॉ. घोटवडेकर यांचा दवाखाना संतोष पोळच्या अमानुष कृत्यांचा केंद्रबिंदू असून, विविध अमानुष औषधांचा अभ्यास याच ठिकाणी झाला आहे. पोळने केलेल्या हत्येसाठी याच मेडिकलमधील औषधांचा वापर केला गेला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोळ प्रकरणात डॉ. घोटवडेकरांची चौकशी सुरू असून, या पार्श्वभूमीवर त्यांच्या मेडिकलची तपासणी अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने करण्यात आली. सरकारी नियमांना तिलांजली दिल्याचे या तपासात समोर आले आहे. त्यामुळे डॉ. घोटवडेकरांच्या मेडिकलचा परवाना रद्द करण्यात आला आहे.

या पूर्वीच्या तपासात डॉ. घोटवडेकरांच्या मालकीची रुग्णवाहिका पोळने बेपत्ता महिलांना नेण्यासाठी वापरल्याचे समोर आले आहे. तसेच पोळ डॉ. घोटवडेकरांच्या दवाखान्यातून आपली सूत्रे चालवत असल्याचे स्पष्ट झाले आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर सविस्तर माहिती देणार असल्याचे औषध प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आमदार, खासदारांनीहीमोर्चात सहभागी व्हावे’

0
0



म. टा. प्रतिनिधी, सातारा

'महाराष्ट्रात मराठा समाज मोठ्या प्रमाणात जागृत झाला आहे. या मोर्चाबाबत गैरसमज नसतानाही आपल्याला पाहिजे तसे मुद्दे वळवून व आता आम्ही कुठेच राहणार नाही, या भीतीपोटी मोर्चाला वेगळे वळण लावण्याचा प्रयत्न होत आहे. गरीब मराठा मोकळेपणाने दु:ख व्यक्त करतो आहे. त्यामध्ये जातदांडग्यांनी बिब्बा घालू नये,' असा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी सातारा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिला. दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रात सत्तेत रमणाऱ्या आमदार, खासदारांनी आत्मपरीक्षण करून मोर्चात सहभागी व्हावे, असेही पाटणकर म्हणाले.

'दु:ख पाहण्याची सवय नाही त्यांना कोपर्डी येथील घटनेमुळे तीव्र वेदना होणे स्वाभाविक आहे. सर्वच बलात्काऱ्यांना फाशी होण्यासाठी कायदा कडक व्हावा. कष्टकरी कुणबी मराठा समाजाला आरक्षण मिळावे, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याबाबत मूकमोर्चात मोठ्या संख्येने लोक सहभागी होत आहेत. स्वयंस्फूर्तीने जनप्रक्रिया सुरू आहे. आज मराठा समाज उद्ध्वस्त होत आहे. आत्महत्या करू लागला आहे. अनेक प्रकल्पांमध्ये जमिनी गेल्या. सांस्कृतिक, आर्थिक व शैक्षणिक आणि नोकऱ्यांमध्ये मागे पडला. ही वस्तुस्थिती असून, काही महाभाग या मोर्चाच्या निमित्ताने वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतात, हे हास्यास्पद आहे. त्यांनी आत्मपरीक्षण करावे आणि बाजूला थांबावे, अशीच मराठा जनतेची भावना आहे.'

'अॅट्रॉसिटी कायदा रद्द करा, अशी सूचना आरएसएसशी संबंधित गिड्डे नावाच्या घुसखोराने केली. त्याला मार देऊन हाकलून लावले. कोणत्याही कायद्याचा गैरवापर होत असेल तर तो कायदाच रद्द करा म्हणणे सयुक्तिक नाही. कुणबी मराठा पिंजलेला आहे. त्याचा आवाज वाढू लागला आहे. अशा वेळी प्रस्थापित मराठा समाजाने मराठ्यांनाच पिळले आहे. आता त्यांना सुद्धा हिशोब मांडावा लागेल,' असेही पाटणकर म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्याच्या टाक्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरातील पाण्याच्या टाक्यांचे आर्युमान संपत आल्याने त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय स्थायी समिती सभेत शुक्रवारी घेण्यात आला. अध्यक्षस्थानी सभापती मुरलीधर जाधव होते. यावेळी नादुरुस्त आरसी वाहने आणि थंडावलेल्या कचरा उठावावरून स्थायी समिती सभेत सदस्यांनी प्रशासनावर हल्लाबोल केला. गेले सहा महिने नगरसेवक या प्रश्नाकडे लक्ष वेधत असताना प्रशासन काय करत होते? अशी विचारणा सदस्यांनी केली. वर्कशॉप विभागातील वाहनांच्या दुरुस्ती आणि कचरा उठावासाठी प्रशासन हलगर्जीपणा करत असल्याचा आरोप करत आयुक्त, अतिरिक्त आयुक्त व दोन्ही उपायुक्तांचाही निषेध केला.

शहरातील पाण्याच्या टाक्यांचे आयुर्मान संपत आले आहे. अमृत योजनेतून पाण्याच्या टाकीची बांधणी आणि डागडुजी करावी, अशा सूचना झाल्या. शहरातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीतील गाळ वर्षानुवर्षे काढला नाही. टाकीत दोन ते तीन फूट गाळ साचला आहे. निविदा प्रक्रिया राबवून गाळ काढण्यात येणार असल्याचे उत्तर अधिकाऱ्यांनी दिले. आरसी वाहने बंद पडल्यामुळे कचरा उठाव होत नाही. कचऱ्यांनी कंटेनर भरून रस्त्यावर पसरत आहे.

महापौर व पदाधिकाऱ्यांनी गुरूवारी वर्कशॉप विभागाची झाडाझडती घेत तत्काळ वाहने दुरुस्त करण्याचे आदेश दिले. स्थायी समिती सभेतही वर्कशॉपचा विषय गाजला. नगरसेविका दीपा मगदूम, जयश्री चव्हाण, रुपाराणी निकम, सत्यजित कदम, अजित ठाणेकर यांनी या चर्चेत भाग घेतला. यावेळी वर्कशॉप विभागप्रमुख रावसाहेब चव्हाण यांनी चार आरसी वाहने सुरू असल्याचे सांगितले. मात्र सदस्यांनी चव्हाण हे चुकीची माहिती देत असल्याचे सांगत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वर्कशॉप विभागाची जबाबदारी स्वीकारावी अशा सूचना केल्या.

पॅचवर्कसाठी दहा लाखांचे इस्ट‌िमेट

पावसामुळे खराब झालेल्या रस्त्यांचे अद्याप पॅचवर्क झाले नाही. नगरोत्थान योजनेतील एसएससी बोर्ड ते आरकेनगर रस्त्याचे काम बंद असल्याचे सदस्यांनी निदर्शनास आणले. यावर प्रशासनाकडून नगरोत्थान योजनेंतर्गत स्ट्रॉम वॉटरचे काम सुरू आहे. प्रत्येक वॉर्डनिहाय रस्ता डांबरीकरण अंतर्गत पॅचवर्क कामासाठी दहा लाख रुपयांचे इस्ट‌िमेट सादर केल्याचे उत्तर अधिकाऱ्यांनी दिले. गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले. चर्चेत सूरमंजिरी लाटकर, सुनील पाटील, रिना कांबळे यांनी सहभाग घेतला.

प्रशासनाच्या उत्तराने सदस्य आक्रमक

कचरा उठावप्रश्नी चर्चा सुरू असताना नगरसेवक पोटतिडकीने बोलत होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर यांनी पदाधिकाऱ्यांसोबत वर्कशॉपची पाहणी केली आहे. समस्या जाणून घेतल्या आहेत. वाहने दुरूस्तीसंदर्भात आयुक्तांशी चर्चा सुरू आहे. मात्र भेट दिल्यानंतर एक, दोन दिवसांत संपूर्ण कचरा उचलण्यासाठी जादूची कुठली कांडी नाही असे उत्तर देताच सदस्यांनी त्याला जोरदार आक्षेप घेतला. महिला सदस्य आक्रमक बनले. सहा महिने प्रशासन काय करत होते. प्रशासनातील सावळागोंधळमुळे समस्या निर्माण होत असल्याचा ठपका ठेवला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाडिकांना जशास तसे उत्तर देऊ

0
0

म. टा. वृत्तसेवा: कसबा बावडा

माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी कसबा बावडा गावाला एक रुपयाही निधी दिला नाही. त्यामुळे कसबा बावड्याचा विकास केल्याचे त्यांनी सांगू नये. यापुढे आमदार सतेज पाटील यांच्यावर वैयक्त‌िक आरोप केला तर गाव एकत्र करून जशाच तसे सडेतोड उत्तर देवू, असा इशारा नगरसेवक अशोक जाधव यांच्यासह नगरसेवकांनी पत्रकार परिषदेत दिला. माजी आमदार महाडिक यांनी शिवाजी चौकात केलेल्या आरोपांना आज आमदार सतेज पाटील यांच्या प्रमुख कार्यकर्त्यानी आज उत्तर दिले.

जाधव म्हणाले, 'बावड्यातील शेतकऱ्यांचा उस वाळेपर्यत कारखाना घेऊन जात नाही. शेतकऱ्यांना त्रास दिला जातो. बावड्यात अनेक प्रश्न आहेत परंतु आम्ही नगरसेवक लाचार होऊन खासदार धनंजय महाडिक यांच्याकडे फंडासाठी जाणार नाही. एकवेळ खासदार संभाजीराजेंचा फंड विकास कामासाठी आणू, पण महाडिकांकडे जाणार नाही. मुळात आमदार सतेज पाटील हेच कसबा बावड्याचा विकास करण्यास समर्थ व सक्षम आहेत. गृहराज्यमंत्री असताना आणि आता सुद्धा त्यांनी विमानतळासाठी दिल्लीला जाऊन प्रयत्न केले होते. त्यांचे श्रेय खासदार महाडिक लाटत आहेत. त्यांना खासदारकीसाठी आमदार सतेज पाटील यांनी केलेली मदत विसरू नये. ते कुणाच्या पाठ‌िंब्याने खासदार झाले हे संपूर्ण जिल्ह्याला माहिती आहे.

नगरसेवक मोहन सालपे म्हणाले, 'गणपतीच्या व्यासपीठावरून महाडिक यांनी कौटुंबिक आणि व्यक्त‌िगत आरोप करू नयेत. राजकीय आरोपांना उत्तर देण्यासाठी आमचे नेते समर्थ आहेत. यापुढे आमच्या नेत्यांच्या विरोधात घरगुती व कौटुंबिक विषयाबाबत बोलाल तर, तुमच्या भावांचे पंप तुम्ही कसे लाटले, त्याचबरोबर पढंरपूरच्या श्रीधर नावाच्या कारभाऱ्याला तुम्ही कामावरून का काढले? हेही आम्ही कोल्हापूरच्या जनतेला सांगू,' असा इशारा नगरसेवक सालपे यांनी दिला. नगरसेवक डॉ. संदीप नेजदार म्हणाले, 'पंचवीस फेब्रुवारीला राज्य शासनाकडून दोन कोटी विशेष निधी आला होता परंतु विधान परिषदेत पराभव झाल्यावर तो निधी भाजपने राज्य सरकारला परत पाठविला. महापालिकेच्या व जिल्हा नियोजन मंडळातून ते काम चालू आहे. यामुळे निधी दिल्याचे महाडिक खोटे सांगत आहेत.

पत्रकार परीषदेस सभापती प्रमोद पाटील, नगरसेवक सुभाष बुचडे, श्रावण फडतारे, माधुरी लाड, स्वाती यवलुजे, जे. एल. पाटील, माजी चेअरमन विश्वास नेजदार, विद्यानंद जामदार, अर्जन चौगले, संभाजी जाधव आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणेशोत्सव काळात महिलांसाठी स्वच्छतागृहे

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरातील महिलांच्या स्वच्छतागृहांचा विषय ‌दिवसेंदिवस बिकट होत असताना यंदाच्या गणेशोत्सव काळात सतेज पाटील फाउंडेशनच्यावतीने ४५ ठिकाणी महिला स्वच्छतागृहांची उभारणी करण्यात येणार आहे. १० ते १६ सप्टेंबरपर्यंत शहरातील गर्दीच्या ठिकाणी ही सोय करण्यात येणार आहे. महापालिकेने मात्र, नेहमीप्रमाणे चर्चा आणि बैठकांमध्ये हा प्रस्ताव गुंडळून ठेवला आहे.

मागील वर्षी फाऊंडेशनच्यावतीने गणेशोत्सव व नवरात्रोत्सव काळात अशा फिरत्या स्वच्छतागृहांची सुविधा करण्यात आली होती. यंदाही ती केली जाणार असून शहरातील ४५ ठिकाणी व्यवस्था करण्यात येणार आहे. गणेशोत्सव काळात विसर्जन, देखावे पाहण्यासाठी आणि अनंत चतुर्थशीनिमित्त बाहेर पडणाऱ्या महिलांची स्वच्छतागृहाअभावी कुचंबना होते. ही बाब लक्षात घेऊन सतेज पाटील फाउंडेशनच्यावतीने सच्छतागृहे उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

फाउंडेशनच्यावतीने उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या स्वच्छतागृहांत पाण्याची पुरेशी व्यवस्था करण्यात येणार आहे. स्वच्छतागृहांपासून काही अंतरावर पडदे बांधून हा परिसर गर्दीपासून स्वतंत्र केला जाणार आहे. या परिसरात विद्युत दिव्यांची व्यवस्था केली जाणार असून स्वच्छतागृहांच्या परिसरात खासगी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात येणार आहेत. स्वच्छतागृहाची व्यवस्था कुठे करण्यात आली याचे दिशादर्शक फलकही लावण्यात येणार आहे.

येथे असेल स्वच्छतागृहाची सुविधा

घरगुती गणपती विसर्जन:

इराणी खण, पंपिंग हाऊस, पतौडी घाट, पंचगंगा घाट, पंचगंगा ब्राह्मण घाट, तोरस्कर चौक, शाहू विद्यालय समोर, कसबा बावडा दत्त मंदिर, कसबा बावडा राजाराम बंधारा घाट, बापट कॅम्प विसर्जन स्थळ, कोटीतीर्थ तलाव, राजाराम तलाव, कळंबा तलाव, मंगळवार पेठ खण

देखावे पाहताना: राजारामपुरी नवशा मारुती जवळ, राजारामपुरी जनता बझार बागेजवळ, राजारामपुरी महाराष्ट्र बँक, टाकाळा पूल राजारामपुरी, ९ नंबर शाळा राजारामपुरी, राजारामपुरी ५ वी गल्ली, शाहूपुरी व्यापार पेठ, शिवाजी पुतळा बँकेजवळ, शाहू उद्यान म्हैस कट्टा, बिंदू चौक पार्कींग, केशवराव भोसले नाट्यगृहाजवळ, शाहू उद्यान म्हैस कट्टा, कसबा बावडा भगवा चौक, सेवा रुग्णालय लाइन बझार, कसबा बावडा पाटील गल्ली, मिरजकर तिकटी, संध्यामठ खराडे कॉलेज समोर

अनंत चतुर्दशी मिरवणुक दरम्यान :

मिरजकर तिकटी, वांगी बोळ, पापाची तिकटी, गंगावेश, बिंदू चौक पार्कींग, कसबा बावडा भगवा चौक, पिंजार गल्ली-कसबा बावडा, पंचगंगा नदी परीट घाट, इराणी खण, पंतौडी घाट, संध्यामठ-खराडे कॉलेज समोर, पंपिंग हाऊस, पंचगंगा ब्राह्मण घाट, राजाराम तलाव, कोटीतीर्थ तलाव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वागत कमानींना परवानगीन दिल्यास विसर्जन नाही

0
0

म. टा. वृत्तसेवा,इचलकरंजी -

विसर्जन मिरवणुकीदिवशी स्वागत कमानी उभारण्यास नगरपालिकेने परवानगी नाकारल्याने शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव आणि मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली. कमानी लावण्यास मनाई करुन नगरपालिका नवा पायंडा पाडत सणांवर गंडांतर आणण्याचा काम करत असल्याचा आरोप जाधव यांनी केला. परवानगी न दिल्यास एकही सार्वजनिक मंडळ श्रीं चे विसर्जन करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

शहरातील मुख्य मार्गावर अनंत चतुर्दशीदिनी उभारण्यात येणाऱ्या विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांना यंदा स्वागत कमानी लावण्यास नगरपालिकेने मनाई केली आहे. या संदर्भात शुक्रवारी इचलकरंजी शहर शिवसेनेच्यावतीने जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, उपजिल्हाप्रमुख महादैव गौड, शहरप्रमुख धनाजी मोरे यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेवर मोर्चा काढून मुख्याधिकारी डॉ. रसाळ यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. स्वागत कमानीचा कोणताही अडथळा अथवा अडचण होत नसताना नगरपालिकेने घेतलेल्या या निर्णयाबद्दल शिवसैनिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

चर्चेवेळी मुख्याधिकारी रसाळ यांनी, इचलकरंजी हे संवेदनशील शहर असल्यामुळे स्वागत कमानी उभारण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनीही निर्बंध घातले असल्यामुळे नगरपालिका त्याबाबत निर्णय घेऊ शकत नाही असे सांगितले. त्यावर जाधव यांनी, विसर्जन मिरवणुकीवेळी स्वागत व्यासपीठ आणि कमान उभारताना विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना योग्य ती खबरदारी घेत असतात. आजपर्यंत स्वागत कमानींचा कधीच अडथळा झालेला नाही. उलट व्यासपीठामुळे प्रशासनाला सहकार्यच मिळते. जिल्ह्यात स्वागत कमानी उभारण्यास एकाही नगरपालिकेने मनाई केलेली नाही. तर इचलकरंजी नगरपालिकाच अपवाद का ठरावी असा सवाल केला. यावेळी जाधव आणि रसाळ यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाल्याने काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. अखेर जाधव यांनी स्वागत कमानीस परवानगी न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याबरोबरच एकही सार्वजनिक मंडळ आपल्या श्रीं चे विसर्जन करणार नाही, असा इशारा दिला.

आंदोलनात मलकारी लवटे, सयाजी चव्हाण, राजू आलासे, महेश बोहरा, संजय पाटील, रामभाऊ पाटील, तौफिक हारुगिरी, सचिन खोंद्रे, किशोर घडलिंग आदींसह शिवसैनिक सहभागी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अडकूर, दानोळी मतदारसंघांवर कुऱ्हाड ?

0
0

म. टा.प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अडकूर (ता. चंदगड) व दानोळी (ता. शिरोळ) हे दोन मतदारसंघ वगळले जाण्याची दाट शक्यता आहे. अडकूर मतदारसंघाचा समावेश चंदगड या मतदारसंघात झाला आहे. तर दानोळी मतदारसंघाचा समावेश अब्दुललाट या मतदारसंघात झाल्याची चर्चा आहे. तुर्केवाडी जिल्हा परिषद मतदारसंघाचे नाव नवीन प्रभाग रचनेत तुडये करण्यात आले आहे. दरम्यान, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे प्रस्ताव शुक्रवारी विभागीय आयुक्तांकडे पाठवण्यात आले आहेत.

फेब्रुवारी २०१७ मध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीसाठी मतदारसंघाच्या पुर्नरचनेच्या प्रस्तावाचे काम महसूल विभागाकडून युद्धपातळीवर सुरू आहे. २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या गृहीत धरून जिल्हा परिषदेच्या एका मतदारसंघांसाठी चाळीस हजार तर पंचायत समितीच्या एका मतदारसंघासाठी २० हजार लोकसंख्या गृहीत धरण्यात आली आहेत. सध्या कोल्हापूर परिषदेचे ६९ मतदार संघ आहेत. नवीन लोकसंख्येच्या नियमानुसार दोन मतदारसंघ कमी झाले असून यापुढे दहा वर्षे ६७ मतदार संघ असणार आहेत. शिरोळ व चंदगड तालु्क्यातील प्रत्येकी एक मतदारसंघ कमी झाले आहेत.

मतदारसंघ पुनर्रचनेचे काम गेले महिनाभर जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू आहे. शुक्रवारी मतदारसंघाचे प्रस्ताव देण्याची अंतिम मुदत होती. त्यानुसार मतदारसंघाच्या सीमा निश्चित केल्या आहेत. या सीमा निश्चित करताना नदी, ओढे, नाले, गावाची हद्द, रस्ते यांचा विचार करून प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. चंदगड तालुक्यातील अडकूर मतदारसंघ कमी झाला असून या मतदार संघातील गावांचा समावेश चंदगड मतदारसंघात झाल्याचे समजते. तर शिरोळ तालुक्यातील दानोळी जिल्हा परिषद मतदारसंघ कमी झाला असून या मतदार संघातील गावे अब्दुललाट या मतदारसंघात समाविष्ट केली जाण्याची शक्यता आहे. या दोन मतदारसंघांबरोबर ६७ मतदार संघातही लोकसंख्येनुसार काही बदल झाले आहेत. दोन मतदारसंघ कमी झाल्याने चंदगड व शिरोळ तालुक्यातील प्रत्येकी दोन पंचायत समिती मतदारसंघही कमी होणार आहेत.

विभागीय आयुक्त प्रस्ताव पडताळून पाहणार असून त्यानंतर २३ सप्टेंबरला मतदारसंघाच्या प्रस्तावाला मान्यता देतील. पाच ऑक्टोबर रोजी आरक्षण व मतदारसंघ रचना जाहीर होणार आहे. त्यानंतर मतदारसंघाबाबत हरकती मागवल्या जाणार आहेत.

चौकट

अब्दुललाट व चंदगडमध्ये चुरस वाढणार

दोन मतदारसंघ कमी झाल्याने चंदगड व अब्दुललाट या मतदारसंघातील राजकीय गणित बदलले जाणार आहे. अडकूर मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व तात्यासो देसाई, चंदगडचे राजाराम परीट, दानोळीचे सुरेश कांबळे तर अब्दुललाटचे प्रतिनिधीत्व दादासो सांगावे करत आहेत. साहजिकच मतदारसंघ कमी झाल्याने चंदगड व अब्दुललाट या मतदारसंघात कमालीची चुरस होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गुटखा कारखान्यावर अब्दुललाटमध्ये छापा

0
0

म. टा.वृत्तसेवा,जयसिंगपूर

अब्दुललाट (ता.शिरोळ) येथे पोलिसांच्या पथकाने गुटखा कारखान्यावर छापा टाकला. या कारवाईत तयार गुटखा, कच्चा माल, पॅकिंग मशिन असा २० लाख ५१ हजार १२० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी तिघाजणांना अटक करण्यात आली आहे.

मिलिंद बाबासाहेब चौगुले (वय ३५), शितल धनपाल चौगुले (वय ३५, दोघेही रा. अब्दुललाट), प्रविण विलास पाटील (वय ३०, रा.शिरदवाड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर यामधील विलास नागेश जमदाडे (रा.हरिपूर, जि.सांगली) हा फरारी झाला आहे.

याबाबत कुरूंदवाड पोलिसांतून मिळालेली अधिक माहिती अशी, अब्दुललाट येथे मिलिंद चौगुले यांच्या शेतातील गोठ्यात गुटख्याचे पॅकिंग करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर गुरूवारी रात्री उशिरा पोलिसांच्या पथकाने याठिकाणी छापा टाकला. यावेळी दोन गुटखा पॅकिंग मशिन, लॅमिनेशन मशिन, तीन म्निसंग टब, स्टीचिंग मशिन, १५ सुगंधीत तंबाखूचे रिकामे पेपर बॉक्स, गुटख्याचे पॅकिंग रोल, पॉलिथिन पॅकेट, २१० किलो सुगंधीत तंबाखू, २२५० किलो सुगंधीत सुपारी, १०० बॅग सागर गुटखा असा एकूण २० लाख ५१ हजार १२० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिस उपनिरीक्षक पी.बी.केदार, पोलिस पी.के.कानुगडे, ए.पी.मिठारी, टी.जी. मुल्ला, आर.ए.देसाई, पी.ए.पारधी यांच्या पथकाने ही कारवाई केली. अन्न व औषध प्रशासनचे अधिकारी बी.डी.मुळे यांनी कुरूंदवाड पोलिसात फिर्याद दिली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक डी.ए.फुके करीत आहेत

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवाजी तरुण मंडळासह ‘स्वस्तिक’ प्रथम

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

हसन मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणाऱ्या गणराया अवॉर्ड २०१५ स्पर्धेत उत्कृष्ट सजीव देखावा स्पर्धेत कसबा बावडा येथील स्वस्तिक मित्र मंडळ व शिवाजी तरुण मंडळाने संयुक्त विजेतेपद पटकाविले. तांत्रिक देखावा स्पर्धेत रमणमळा येथील विजेता तरुण मंडळाने विजेतेपद पटकाविले. येथील शाहू स्मारक भवनात झालेल्या भव्य सोहळ्यात जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. प्रदीप देशपांडे आणि फाउंडेशनचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते मंडळांना पारितोषिक प्रदान करण्यात आले.

फाउंडेशनच्या वतीने गेल्या पाच वर्षांपासून या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. स्पर्धेत गेल्या वर्षी जवळपास २५०हून अधिक गणेशोत्सव मंडळे सहभागी झाली होती. त्यातील मंडळांना उत्कृष्ट सजीव देखावा, उत्कृष्ट तांत्रिक देखावा, बाह्य सजावट स्पर्धा, उत्कृष्ट मूर्ती स्पर्धा अशा गटांत बक्षिसांचे वितरण करण्यात आले.

यावेळी पोलिसप्रमुख डॉ. देशपांडे म्हणाले, 'यंदा आम्ही मंडळांना ध्वनीप्रदूषणमुक्त उत्सवासाठी आवाहन केले. त्याला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. कोल्हापूर शहर नेहमीच राज्याला दिशा देणारे शहर ठरले आहे. यंदाच्या उत्सवाची सुरुवात चांगली आहे. यापुढेही असाच शिस्तबद्ध उत्सव करून आपण राज्याला एक आदर्श घालून देणार आहोत.' सभागृहात आलेले मंडळांचे कार्यकर्ते म्हणजे पहिल्या बाकावरील विद्यार्थी आहेत. आता शेवटच्या बाकांवरच्या विद्यार्थ्यांना म्हणजेच शिस्त न पाळणाऱ्या मंडळांना शहाणे करण्याची जबाबदारी आपली आहे, असे सांगून देशपांडे यांनी शिस्तबद्ध मंडळांची संख्या वाढावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

अध्यक्षीय भाषणात आमदार मुश्रीफ यांनी गणेशोत्सवाच्या निमित्ताने मंडळांनी प्रबोधन करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. ते म्हणाले, 'स्वातंत्र्यापूर्वी सुरू झालेला सार्वजनिक गणेशोत्सव आणि आताचा उत्सव यात खूप फरक आहे. आता आपल्यापुढे, गरिबी, कुटुंब कल्याण, ग्लोबल वॉर्मिंग, पर्यावरण संरक्षण असे प्रश्न आहेत. त्यामुळे याचा विचार करूनच उत्सव साजरे व्हावेत.' 'गणेशोत्सवातील पुढील दिवसांत कायदा सुव्यवस्था पाळण्यासाठी पोलिसांना मंडळांनी सहकार्य करावे,' असे आवाहन महापौर अश्विनी रामाणे यांनी केले. प्रास्ताविक माजी महापौर आर. के. पोवार यांनी केले.

कार्यक्रमास सीपीआरचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, नगरसेवक जयंत पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय पाटील, उपमहापौर शमा मुल्ला, नगरसेवक प्रवीण केसरकर, अनिल कदम, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जहिदा मुजावर, माजी नगरसेवक अमोल माने, अजित राउत, सुनिल देसाई आदी उपस्थित होते.

चौकट

'गणपतीनेच सुबुद्धी दिली'

पोलिसप्रमुख डॉ. देशपांडे यांनी त्यांच्या खुमासदार शैलीत भाषण केले. ध्वनीप्रदूषणाबाबत ते म्हणाले, 'ज्याचे कान खूप मोठे असूनही, त्याला ध्वनी प्रदूषणाचा त्रास होत होता. म्हणूनच त्या बुद्धीच्या देवाने आपल्याला सुबुद्धी दिली आणि यंदाच्या उत्सवाची सुरुवात डॉल्बीमुक्तीने झाली.'

चौकट

अकराजणांचा देहदानाचा संकल्प

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राजेश लाटकर कार्यक्रमास उपस्थित होते. स्वागतपर भाषणात त्यांनी देहदानाच्या गंभीर विषयाचा उल्लेख केला. ते म्हणाले, 'राजीव गांधी जीवनदायी योनजेचे काम अतिशय चांगले सुरू आहे. आता देहदान ही काळाची गरज आहे. त्यामुळे आम्ही पक्षातील अकरा जणांनी देहदानाचा संकल्प केला आहे.' अकराजणांचे देहदानाचे अर्ज दोन दिवसांत जमा करण्याची घोषणा लाटकर यांनी केली.

000000000000000000

स्पर्धेचा सविस्तर निकाल असा ः

उत्कृष्ट सजीव देखावा : प्रथम - स्वस्तिक मित्र मंडळ व शिवाजी तरुण मंडळ (कसबा बावडा). द्वितीय - कै. उमेश कांदेकर युवा मंच (रंकाळा) व विश्वशांती तरुण मंडळ (बावडा). तृतीय - मनोरंजन तरुण मंडळ व भारतवीर मित्र मंडळ (बावडा).

उत्कृष्ट तांत्रिक देखावा : प्रथम - विजेता तरुण मंडळ (रमणमळा). द्वितीय - क्रांतीवीर तरुण मंडळ, बुधवार पेठ. तृतीय - नंदी तरुण मंडळ (रंकाळा) व शाहूपुरी युवक मंडळ (व्यापार पेठ).

बाह्य सजावट स्पर्धा : प्रथम - न्यू शिवतेज मित्र मंडळ (शाहूपुरी). द्वितीय - डांगे गल्ली तरुण मंडळ (बुधवार पेठ). तृतीय - राधाकृष्ण तरुण मंडळ (शाहूपुरी) व राजारामपुरी शिवाजी तरुण मंडळ.

उत्कृष्ट मूर्ती : जय पद्मापती मंडळ (बेलबाग), कलकल ग्रुप (मंगळवार पेठ), हाय कमांडो फ्रेंड्स सर्कल (बुधवार पेठ), मृत्यूंजय मित्र मंडळ (शनिवार पेठ), न्यू अमर मित्र मंडळ (शनिवार पेठ). स्वयंभू गणेश मित्र मंडळ (लक्ष्मीपुरी), संघर्ष मित्र मंडळ (बावडा), मनिषानगर मित्र मंडळ (सुभाषनगर), महाराजा ग्रुप (लक्ष्मीपुरी), म्हसोबा तरुण मंडळ (गजानन महाराज नगर).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१८ किलोमीटरमध्ये १८०० खड्डे

0
0

म. टा. वृत्तसेवा, शाहूवाडी

कोल्हापूर-रत्नागिरी या राष्ट्रीय महामार्गादरम्यानच्या मलकापूरपासून आंबा या कोल्हापूर हद्दीतील १८ किलोमीटर रस्त्यावर 'आठराशे' खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. रत्नागिरी व कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांचा परस्पर राबता तसेच औद्योगिकरणाशी संबंधित वाहनांची या मार्गावरून सुरु असलेली दैनंदिन वर्दळ यामुळे अगोदरच अपघातप्रवण बनलेला मार्ग उखडलेल्या रस्त्यामुळे अधिकच धोकादायक बनला आहे. अलीकडेच या मार्गाचे उत्तरदायीत्व हायवे अॅथॉरीटीकडे गेले आहे. तर या पूर्वीच्या जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभागाने चालू वर्षी अधिकच्या पर्जन्यवृष्टीने कमी अधिक प्रमाणात सर्वच रस्ते खराब झाल्याचे कारण देत 'वरूणराजा'वर खापर फोडून स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न चालू ठेवला आहे.

कोल्हापूर-रत्नागिरी या राष्ट्रीय महामार्गावरील मलकापूर ते आंबा हा १८ किलोमीटरचा रस्ता पावसाळ्याच्या सुरुवातीलाच उखडण्यास प्रारंभ झाला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाने याची दाखल घेत मुरूम टाकून खड्डे बुजविण्याचा प्रयत्नही केला आहे. परंतु दिवसागणिक वाढणाऱ्या खड्ड्यांची संख्या आणि पावसाच्या माऱ्यामुळे मुरुमीकरणाचा प्रयत्न असफल झाल्याचे दिसत आहे.

कोकण व घाटमाथा यांच्यात दुवा ठरणारा आणि औद्योगिकरणाशी संबंधित वाहनांची वाढती रहदारी विचारात घेता हा मार्ग सुरक्षित असायला हवा होता. तसा तो पावसाळ्यापूर्वी भासतही होता. परंतु पावसाला सुरु झाल्यानंतर या रस्त्याचा दर्जा समोर यायला वेळ लागला नाही. मलकापूर, निळे स्वागत कमान, म्हावळेवाडी, चांदोली, लव्हाळा, केर्ले, वारूळ, आंबा असा १८ किलोमीटरचा प्रचंड उखडलेला रस्ता पाहिल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाकडे स्वतंत्र अस्तित्व ठेवून असलेला 'दर्जा नियंत्रण विभाग' नेमके करतो तरी काय, असा सर्वसामान्यांतून विचारला जात आहे. जिल्हा मार्ग अथवा एखाद्या अंतर्गत रस्त्यालाही लाजवेल अशी या राष्ट्रीय मार्गाचा दर्जाप्राप्त केलेल्या रस्त्याची अवस्था झाली आहे. हा रस्ता प्रवासायोग्य राहिला नसल्याने संबंधित विभागाने त्वरित योग्य ती पाऊले उचलून दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पनवेल आश्रमातून दोघे संश‌यित ताब्यात

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी एसआयटीने शुक्रवारी (ता. ९) सनातन संस्थेच्या पनवेल येथील आश्रमातील दोन साधकांकडे चौकशी केली. या दोन्ही साधकांना पोलिसांनी चौकशीसाठी कोल्हापूर येथे आणले होते. यातील एक डॉक्टर असून दुसरा साधक ड्रायव्हर आहे. या दोघांकडून आश्रमातील संशयास्पद औषधे आणि वाहनांची माहिती घेतली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

कॉम्रेड पानसरे हत्येचा तपास करताना एसआयटीने अटक केलेला दुसरा संशयित डॉ. वीरेंद्र तावडे याच्याशी संबंधित इतर साधकांची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे. पोलिसांनी पाच आणि सहा सप्टेंबरला पनवेल येथील सनातन संस्थेच्या आश्रमात झडती घेतली होती. झडतीदरम्यान पोलिसांना एच आणि एच वन ही संशयास्पद औषधे मिळाली. त्यांचा वापर प्रसाद म्हणून केला जात असल्याची धक्कादायक माहितीही एसआयटीला मिळाली. माणसाच्या चेतासंस्थेवर परिणाम करणारी ही औषधे आहेत. त्यामुळे औषधांचा वापर करणाऱ्या सनातनमधील संबंधित डॉक्टरांकडे पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. सनातन आश्रमातील एका डॉक्टरला पोलिसांनी चौकशीसाठी कोल्हापुरातील मुख्यालयात आणले आहे. हा डॉक्टर मूळचा रत्नागिरी येथील आहे. सनातनच्या आश्रमात दीर्घकाळ राहणारा आणि वीरेंद्र तावडे याच्या संपर्कातील आहे. आश्रमातील झडतीमध्ये याच डॉक्टरकडून पोलिसांनी माहिती घेतली होती. संबंधित औषधे कोणी आणली, कोणाच्या सांगण्यावरून आणली, यांचा वापर कधीपासून सुरू आहे, कोणासाठी सुरू आहे. याचे रजिस्टर ठेवले आहे काय? याची माहिती घेतली जात आहे. हीच माहिती आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांकडूनही तपासली जात आहे. औषधांबद्दल सनातनच्या आश्रमातील साधकांकडून विसंगत माहिती मिळत असल्याने संभ्रम वाढला आहे, अशी माहितीही विश्वसनीय सूत्रांनी दिली.

पोलिसांनी डॉक्टरसोबत आश्रमातील एका ड्रायव्हरकडेही चौकशी सुरू केली आहे. हा ड्रायव्हर सातारा जिल्ह्यात राहणारा असून, सनातन संस्थेचा पूर्णवेळ साधक आहे. आश्रमातील वाहन विभागाची जबाबदारी त्याच्याकडे आहे. तावडेच्या टेम्पो ट्रॅक्सवर तो ड्रायव्हर करीत होता. या ट्रॅक्सचाच जत येथील शस्त्र प्रशिक्षणासाठी वापर केल्याचा संशय पोलिसांना आहे.

तावडेच्या कारनाम्यांबाबत पत्नी अनभिज्ञ

एसआयटीच्या तपासात तावडेच्या नावावरील दोन्ही वाहने गायब असल्याचे निदर्शनास आल्याने पोलिसांनी तावडेच्या पत्नीकडे चौकशी केली. तावडेकडे केवळ एक दुचाकी असल्याची माहिती पत्नीला होती. तावडेच्या नावावर असलेल्या ट्रॅक्सबाबत मात्र त्याची पत्नीही अनभिज्ञ होती. पोलिसांनी दिलेली माहिती ऐकून तावडेच्या पत्नीलाही धक्का बसला होता. शिवाय तो स्वतःच्या मुलीच्या संगोपनासाठीही वेळ काढू शकत नव्हता, इतका संस्थेच्या कामात व्यस्त होता, अशी माहिती तावडेच्या पत्नीनेच पोलिसांना दिली.

तावडे आणि दोन साधकांची समोरासमोर चौकशी

पोलिसांनी चौकशीसाठी बोलवलेल्या दोन्ही साधकांकडे स्वतंत्र चौकशी केली. आश्रमाबाबत विचारलेल्या प्रश्नांमध्ये दोघांच्या उत्तरात विसंगती आली. यानंतर या दोघांनाही तावडेसमोर बसवून तिघांची एकत्रित चौकशी केली. या दोन्ही साधकांकडून तावडेसह बेपत्ता विनय पवार याचीही महत्वपूर्ण माहिती पोलिसांना मिळाली आहे.

यवतमाळ आणि वाशिममध्ये वाहनांचा शोध

तावडेची बाइक आणि ट्रॅक्स ही दोन्ही वाहने गायब आहेत. ही वाहने विकली आहेत की चोरी झाली आहेत, याबाबत तावडेकडून कोणतीच माहिती मिळालेली नाही. प्रत्येकवेळी चुकीची माहिती देऊन दिशाभूल करण्याच प्रयत्न तावडेकडून सुरू आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार ही दोन्ही वाहने यवतमाळ आणि वाशिम परिसरात आहेत. या वाहनांच्या शोधासाठी पोलिसांची पथके यवतमाळ, वाशिम येथे लवकरच जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ललिता बाबरलासातारा भूषण पुरस्कार

0
0



सातारा

रा. ना. गोडबोले सार्वजनिक ट्रस्ट आणि सातारकर नागरिकांतर्फे प्रतिवर्षी दिला जाणारा सातारा भूषण पुरस्कार यंदा रिओ ऑलिपिंकमध्ये अंतिम फेरीत धडक मारणाऱ्या ऑलिंपिक धावपटू ललिता बाबर यांना जाहीर करण्यात आला आहे.

रिओ ऑलिंपिकच्या ३००० मीटरच्या स्टेपल चेस स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी तिची निवड झाली होती. पै. खाशाबा जाधव व पै. श्रीरंग जाधव यांच्यानंतर ऑलिंपिक स्पर्धेसाठी निवड झालेली गेल्या सातारा जिल्ह्यातील ही पहिलीच खेळाडू ठरली. रिओ ऑलिंपिकमध्ये अंतिम फेरीपर्यंतचे यश तिने संपादन केले. दुर्देवाने पदकाने तिला हुलकावणी दिली असली तरी तिचा हा दैदिप्यमान प्रवास सातारकरांची मान उंचावणारा ठरला आहे. परिश्रम, जिद्द व अथक मेहनतीतून झालेल्या तिच्या दैदीप्यमान प्रवासाची दखल घेऊन तिची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

पुरस्काराचे यंदा २६वे वर्ष आहे. २५००० हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, असे पुरस्काराचे स्वरूप आहे. लवकरच समारंभपूवर्क पुरस्कार प्रदान करण्यात येईल, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अरूण गोडबोले यांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणराय चालले झेब्रा क्रॉसिंगवरून

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ट्रॅफिक सिग्नलवर वाहनांची गर्दी आहे. या गर्दीतून दोन लहान मुलांना हाताला धरून गणराय झेब्रा क्रॉसिंगवरून रस्ता ओलांडत आहेत. असे वाहतूक नियोजनाचे आदर्श रूप डांगे गल्ली तरुण मंडळाच्या 'वाहतूक सुरक्षा' या देखाव्यातून मांडले. शहरात वाहतुकीचा उडालेला बोजवारा व आदर्श वाहतूक नियोजन देखाव्याव्दारे मांडले आहे.

'वर्गणी नको, भंगार द्या' असे नागरिकांना आवाहन केल्यानंतर नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. मिळालेले भंगार विक्री करून जी रक्कम मिळाली आहे त्यातील रक्कम गरजू संस्थांना देण्यात येणार आहे. मंडळाने यावर्षी कमी जागेत वाहतूक सुरक्षा हा देखावा उभारला आहे. दाभोळकर कॉर्नर सिग्नलवरील बेशिस्त एका सेटमध्ये दाखवली आहे. त्यामध्ये जनावरे रस्त्यांच्या मधोमध बसली आहेत. टू व्हीलर पार्किंग फूटपाथवर केले आहे. दुसऱ्या सेटमध्ये आदर्श वाहतूक व्यवस्था दाखवली आहे. तिसऱ्या सेटमध्ये हॉस्पिटल व मंगल कार्यालयाच्या बाहेर बेशिस्त पार्किंग दाखवण्यात आले आहे. चौथ्या सेटमध्ये लक्ष्मीपुरी धान्य बाजाराचा सेट उभारला असून जीवघेणी अवजड वाहनांची वाहतूक व पार्किंगचा विषय हाताळला आहे. विद्यार्थी वाहतुकीमुळे २००३ मध्ये ऋचा सागर देसाई या चिमुकल्या विद्यार्थींनीचा मृत्यू झाला होता. तिला श्रद्धांजली वाहून धोकादायक विद्यार्थी वाहतुकीचा सेट उभारला आहे. आदर्श वन वे, बस हब, यांचे सेट उभारण्यात आले आहेत. झेब्रा कॉसिंगवर उभारणारी बेशिस्त वाहने व आदर्श झेब्रा क्रॉसिंगवर वाहन झेब्रा क्रॉसिंगच्या बाहेर व गणराय झेब्रा क्रॉसिंगवरून चालतात ही मांडणी दाद मिळवणारी ठरली आहे.

'हेल्मेट का हवे?' याची माहिती देणारा फलक उभारला आहे. तसेच पोलिसांच्यावर होणारे भ्रष्टाचाराचे आरोप मांडण्यात आले आहेत. शहरातील वाहतूक कोंडीची ठिकाणे फलकावर मांडण्यात आली आहेत. मिरजकर तिकटी येथे वाहतुकीच्या कोंडीमुळे राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्कॉय वॉक हा सेट उभारण्यात आला आहे. सार्वजनिक वाहतुकीचा वापर, फॅन्सी नंबर प्लेट, जीवघेणी अवजड वाहतूक मंडळाने चांगल्या पद्धतीने हाताळले आहेत.

वाहतुक सुरक्षिततेचे भान राखताना मंडळाने देखाव्याचे उद्घाटन शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे ​निरीक्षक अशोक धुमाळ यांच्या हस्ते व लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक तानाजी सावंत यांच्या उपस्थित केले. यावेळी नगरसेवक अफलज पिरजादे, नगरसेविका सरिता मोरे, भाजपा महानगर अध्यक्ष संदीप देसाई, माजी नगरसेवक दिगंबर फराकटे, संजय घाटगे उपस्थित होते. मंडळाच्या गणपतीच्या स्वागत कमानीवर नमस्कार करणाऱ्या दोन ट्रॅफिक पोलिसांचे फोटो लावले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्रिमूर्ती’ने टाकणार पोलिसांच्या कष्टावर प्रकाश

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

घरच्या गणपतीच्या आरतीला हजर राहू न शकणारे, सणासुदीच्या काळात अखंड बंदोबस्तासाठी उभे असणारे पोलिस...पण काही अनुचित प्रकार घडला की पोलिस काय करत होते, असा सवाल करत त्यांच्यावर दोष देणाऱ्यांच्या गर्दीतही कर्तव्य बजावणारी वर्दी...शाहूपुरीतील व्हीनस कॉर्नरच्या पिछाडीस असलेल्या त्रिमूर्ती गणेश मंडळाने यंदा पोलिसांच्या व्यथांना सजीव देखाव्याच्या मंचावर आवाज दिला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पोलिसांवर झालेले हल्ले, त्यांच्यावरचा ताण, कुटुंबापासून लांब राहताना त्यांच्या मनाची घालमेल, कुणा एका पोलिसाच्या चुकीमुळे सर्वांकडे पाहण्याचा दूषित दृष्टिकोन हे सहन करताना त्यांच्या मनातील हुंकार यानिमित्ताने समाजासमोर मांडण्यात येणार आहे. रविवारी (ता. ११) हा देखावा खुला होणार आहे.

पोलिसांची ड्युटी २४ तास असते. सर्वजण सण साजरे करत असताना पोलिस मात्र आपल्या माणसांपासून दूर कर्तव्य बजावत असतात. झोपता येत नाही, विश्रांती घेता येत नाही. तब्येतीवर परिणाम होतो. महिला पोलिसांचे प्रश्न तर अधिक गंभीर असतात. पोलिसांनी कारवाई केली तर राजकीय दबाव येतो. नाही केली तर समाज नावं ठेवतो. अशा कात्रीत अडकलेल्या पोलिसांना समजून घेतले जात नाही. हा विषय या देखाव्यातून मांडला आहे.

त्रिमूर्ती गणेश मंडळ दरवर्षी विधायक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करते. साडेचार फूट उंचीची मूर्ती दरवर्षी विसर्जित न करता ती मूर्तिकारांकडे दिली जाते. पुढच्यावर्षी तीच मूर्ती रंगाचा टचअप देऊन आणली जाते. गेल्या सहा वर्षापासून प्रबोधनात्मक देखावे सादर केले जातात. आजवर विविध पुरस्कार मंडळाला मिळाले आहेत अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष प्रसाद जानवेकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एलईडी लायटिंग, तांत्रिक देखावे आणि शिवछत्रपतींचा गजर

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सजीव देखाव्यांचा प्रसिद्ध असलेल्या शिवाजी पेठेत सजीव आणि तांत्रिक देखाव्याचा मिलाफ आहे. बालचमूंचे आकर्षक लक्षात घेऊन आकर्षक गणेशमूर्ती, सजावटीसह पिक्सल एलईडी लायटिंगवर भर आहे. गणेश महल, आशीर्वाद देणारा गणपतीची तांत्रिक देखावा, शिवराज्याभिषेक सोहळ्याची ६० फूटी कमान, सैराटचा देखावा, लेक वाचवा, शिरस्ता शिवशाहीचा सजीव देखावा यंदा शिवाजी पेठेचे आकर्षण आहे. ऐतिहासिक देखावे, लेक वाचवाची हाक शिवाजी पेठेतून दिली जाणार आहे.

कप‌ीलतीर्थ मंडईजवळील मित्र प्रेम तरुण मंडळाने सजीव देखाव्याची परंपरा सातत्याने जपली आहे. या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारित 'शिरस्ता शिवशाही'चा हा सुमारे २५ मिनिटांचा सजीव देखावा आकर्षक आहे. या देखाव्यांचे सेटचे कामही पूर्ण झाले आहे. रविवारी हा देखावा खुला होणार आहे. दरवर्षी साकोली कॉर्नर येथील हिंदी स्पोटर्सचा आकर्षक देखावा सादरीकरणाकडे कल आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्याची सुमारे ६० फूट उंच कमान उभी केली आहे. ही कमान उभी करताना वाहतुकीला कोणताही अडथळा होणार नाही, याची दक्षता मंडळाच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे. ताराबाई रोडवरील वखार ग्रुपने 'सैराट' हा देखावा केला आहे. लाड चौकातील नाथागोळे तालीम मंडळ दरवर्षी आकर्षक मंदिराची प्रतिकृती साकारते. या वर्षी गणेश महल (दरबार) ही आकर्षक मंदिर साकारले आहे. या मंदिराची उंची सुमारे पंचवीस फूट उंच आहे. हा देखावाही शनिवारी (ता. १०) खुला होणार आहे. या चौकाजवळीलच रामकृष्ण हरी गल्लीतील रामकृष्ण तरुण मंडळाने 'लेक वाचवा' हा सामाजिक प्रबोधनाचा देखावा सादर करणार आहे. सुमारे दहा मिनिटांचा हा देखावा आहे. गोल्डस्टार मंडळाने ऐतिहासिक सजीव देखाव्याची तयारी सुरू केली आहे. रंकाळा तलावाजवळील संध्यामठ तरुण मंडळाने रंकाळ्यात तराफ्यातील आकर्षक गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. रंकाळा टॉवर येथील कै. उमेश कांदेकर युवा मंचने 'बेटी बचाओ बेटी पढाओ' या सजीव देखावा सादर करणार आहे. विद्यार्थी कामगार मंडळाने आशीर्वाद देणारा 'विधायक पेटी' हा तांत्रिक दे‍खावा तयार केला आहे. शनिवारी हा देखावा खुला झाला आहे.


आशीर्वाद देणारा गणपती

शिवाजी पेठेतील विद्यार्थी कामगार मंडळ डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करत आहे. मूर्तीदान आणि पर्यावरणाची जागृती केली जात आहे. मंडळाची सव्वाचार फूट उंच कायमस्वरुपी फायबरच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. मूर्तीला पोवते, हार नारळाच्या तोरणाऐवजी वही, पाटी आणि पुस्तके देण्याचे आवाहन केले आहे. या वर्षी मंडळाने 'विधायक पेटी' नावाचा आशीर्वाद देणारा गणपती हा तांत्रिक देखावा तयार केला आहे. विधायक पेटीवर हात ठेवल्यानंतर गणरायाच्या हातातातून आशीर्वाद देणारी किरणे बाहेर पडतात. या पेटीतील सर्व रक्कम गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी खर्च केली जाणार आहेत. विद्यार्थ्यांना दत्तकही घेतले जाणार आहे. पैशाची उधळपट्टी न करता गणेशोत्सवातून सामाजिक बांधिलकी मंडळाने जपली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जत तालुक्यात भीषण हत्याकांड

0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली

जमिनीच्या वादातून पत्नी, दोन मुली आणि आईची एकाच वेळी हत्त्या केल्याची खळबळजनक घटना शनिवारी पहाटे जत तालुक्यातील कुडनूरमध्ये घडली. आरोपी भारत कुंडलिक इरकर (५०) हा स्वतःहून जत पोलिसात हजर झाला आहे. संपूर्ण जिल्ह्याला हादरा देणारी ही घटना समोर येताच जिल्हा पोलिस प्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक तपासानुसार जमिनीबाबतचा निकाल सावत्र आईच्या बाजूने लागल्याने आपल्याला जमीन मिळणार नसल्याने नैराश्येतून भारतने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. त्याची दोन मुले आत्याकडे अभ्यासाला गेल्याने बचावली. घटनास्थळी नातेवाइकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कुडनर गावापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर भारत इरकर पत्नी, दोन मुली, दोन मुले आणि आईसह राहत होता. घरात लाइट नसल्याने आठवीत शिकणारा म्हाळाप्पा आणि सहावीत शिकणारा आकाश ही दोन्ही मुले त्याच परिसरातील आत्याच्या घरी अभ्यासाला गेली होती. त्यामुळे घरी भारत, त्याची पत्नी सिंधूताई (४०) मुलगी रूपाली (१९), दुसरी मुलगी राणी (१७) आणि आई सुशीला (६०) झोपल्या होत्या.

पहाटे पाचच्या सुमारास भारतने घरातील सर्वांना उठवले. बाजरी काढायला चला म्हणून सर्वांना पुढे घातले. काही अंतर गेल्यानंतर त्याने या सर्वांवर एकापाठोपाठ कोयत्याने हल्ला चढवला. दोन्ही मुली आणि आई वर्मी घाव बसल्याने जागीच कोसळल्या. त्याने पुन्हा त्यांच्या चेहऱ्यावर घाव घातले. तोपर्यंत पत्नी सिंधूताई पळाली होती. तिला पाठलाग करून तिच्यावरही वार केला. वार झेलूनही ती पळतच राहिली. परंतु बाजरीच्या शेतात गाठून तिच्यावर सपासप वार करून तिचाही खून केला.

चौघांची हत्या करून भारत शांतपणे घरी परतला. रक्ताने माखलेला कोयता स्वच्छ धुतला. नंतर स्वतः आंघोळ करुन रक्ताने माखलेले कपडे इतर कपड्यात लपवून ठेवले. स्वच्छ कपडे घालून त्याने आपल्या कुडनूर गावचा रस्ता धरला. भारत घरातून बाहेर पडल्यानंतर शनिवारची सकाळची शाळा असल्याने त्याची दोन्ही मुले म्हाळाप्पा आणि आकाश हे आत्याच्या घरातून धावत घरी आली. आपापले दप्तर पाठीला लावून शिंगणापूरच्या शाळेत जाण्यासाठी ती निघाली. शाळेच्या रस्त्याने दोघे भाऊ जात असताना घरापासून काही अंतरावरील शेतात बांधाच्या खाली आजी आणि दोघी बहिणीचे मृतदेह अस्ताव्यस्त पडलेले त्यांना दिसले. काही अंतरावर आईचीही तीच अवस्था झालेली होती. हे दृश्य समोर पाहताच दोघांनीही दप्तर टाकून हंबरडा फोडला. मुलांच्या आवाजाच्या दिशेने त्या ठिकाणच्या वस्तीवरचे लोक धावले. त्यांना जे समोर दिसले ते चित्र एकदम विदारक होते. त्यापैकी एकाने गावचे सरपंच अज्ञान पांढरे यांना घटनेची माहिती दिली. तेही धावत आले. त्यांनी जत पोलिसांना कळविले. जत पोलिसांची गाडी डफळापूर मार्गे कुडनूरकडे येत असतानाच हत्यारा भारत इरकर हा रस्त्याच्या रस्त्याच्या कडेने पायी जतकडे निघाला होता. अगदी शांतपणे त्याने पोलिसगाडीकडे नजर टाकली आणि तो पुढे चालत राहिला. थेट तो जत पोलिस ठाण्यात जाऊन हजर झाला.



निकालाच्या नैराश्येतून भीषण कृत्य

कुडनूर गावच्या दक्षिणेला सुमारे दोन किलोमीटर अंतरावर भारत इरकर याचे घर तसे एकलकोंडेच आहे. त्याच्या वडिलांना सहा पत्नी होत्या. त्यापैकी चौघींचा मृत्यू झाला आहे. तर एक सावत्र आई सांगलीतील संजयनगरमध्ये राहते. भारत इरकर हाही अधूनमधून सांगलीत येऊन मिळेल ती मजुरी करत असे. बराच काळ तो सांगलीतच असायचा. वडिलांच्या निधनानंतर कुडनूरमधील सुमारे शंभर एकर जमीन भारतच्या नावावर आली होती. त्यापैकी ६८ एकर जमिनीचे सातबारे अद्यापही त्याच्याच नावावर आहेत. दरम्यानच्या काळात त्याची सावत्रआई जनाबाई हिने जमिनीपैकी निम्म्या हिश्शावर हक्क सांगितला. कोर्टात दावा दाखल झाला. जिल्ह्याच्या कोर्टातील निकाल जनाबाईच्या बाजूने लागल्यानंतर भारतने पुढे उच्च न्यायालयात धाव घेतली. सुमारे सहा महिन्यांपूर्वी जनाबार्इंच्या बाजूनेच निकाल दिला. असे निकाल समोर येईपर्यंत्त कोर्टकचेऱ्यांच्या खर्चासाठी बरीच जमीन विकली होती, तर ३६ एकर जमिनीचे विक्रीचे करार करुन पैसे उचलले होते. त्यामुळे अवघी ३२ एकर जमीन शिल्लक राहत होती.

या पार्श्वभूमीवर जनाबाईने वकिलामार्फत कोर्टाच्या निकालाप्रमाणे जमिनीची वाटणी मागितली. जेवढी जमीन शिल्लक आहे ती आणि उर्वरित जमिनीचे पैसे देण्याचा तिचा प्रस्ताव समोर आल्यानंतर भारतला गुंठाभरही जमीन उरत नव्हती. उलट आणखी पैसे द्यावे लागणार होते. त्यामुळे तो नैराश्येत वावरु लागला. अलिकडे मानसिक स्थिती बिघडल्यासारखेच तो वावरत असल्याचीही चर्चा समोर येत आहे. जमीनच नसेल तर संसारगाडा कसा चालवायचा. या विवंचनेतूनच त्याने पत्नी, दोन मुली आणि आईची हत्या करुन आत्महत्या करण्याचा त्याचा इरादा असावा, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे.



सखोल तपासाचे आदेश

एकाच घरातील चौघींचा खून झाल्याची घटना अत्यंत भीषण आहे. आरोपी भारत इरकर याला अटक करण्यात आली आहे. आरोपीला कठोर शिक्षा होण्याच्यादृष्टीने सखोल तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सर्व मृतदेहांचे शवविच्छेदन केल्यानंतर ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येतील, असे जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी घटनास्थळी पत्रकारांना सांगितले.


दोन्ही मुली हुशार

जन्मदात्या भारत इरकरने दोन्ही पोटच्या मुलींचा बळी घेतला असून त्या दोघींही शिक्षणात हुशार होत्या. बारावीला चांगले गुण मिळाल्याने रुपाली हिचा गावच्या वतीने सत्कारही करण्यात आला होता. जमिनीच्या वादासाठी पैसे खर्च होत राहिल्याने भारतची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची होती. जुने पडलेले घरही दुरुस्त करता आले नव्हते. त्यामुळे पडक्या घरातच त्यांचा संसार सुरु होता. परिस्थिती हलाखीची असतानाही मुली घरकाम करुन कॉलेजला धावत होत्या. एक डफळापूरच्या तर दुसरी कवठेमहांकाळच्या कॉलेजला शिकत होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंगलदान मूर्तिदान

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

डॉल्बीमुक्तीपाठोपाठ कोल्हापूरकरांनी मूर्तिदान आणि निर्माल्यदान चळवळीलाही भरभरून प्रतिसाद देत शनिवारी प्रदूषणमुक्तीसाठी प्रचंड संख्येने गणेश मूर्ती दान केल्या. पाणी प्रदूषणापासून मुक्तीसाठी मूर्ती वाहत्या पाण्यात विसर्जित न करता त्या काहिली आणि विसर्जन कुंडात विसर्जित करण्यात आल्या. पर्यावरणपूरक उत्सवाला प्रतिसाद देत शनिवारी घरगुती गणेश मूर्ती आणि गौरी विसर्जन करण्यात आले. आपल्या लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप देताना अबालवृद्धांनी मूर्तिदानाची संकल्पपूर्ती करीत प्रदूषणमुक्तीच्या दृष्टीने भक्कम पाऊल टाकले. पंचगंगा घाट, रंकाळा, राजाराम तलाव, राजाराम बंधारा, कोटीतीर्थ, कळंबा तलाव आणि जिल्ह्यात सुमारे सव्वा लाखांवर मूर्ती दान करण्यात आल्या. विशेष म्हणजे शहरात हा आकडा ६० हजारावर आहे.

दोन वर्षे डॉल्बीचा दणदणाट झाल्यानंतर यंदा मात्र कोल्हापूरकरांनी डॉल्बीच्या आवाजाला फाटा दिला. पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत तरूण मंडळांनी गणेश आगमन मिरवणुकीत डॉल्बीऐवजी पारंपरिक वाद्यांच्या सार्थीने गणेशाचे स्वागत केले. यामुळे डॉल्बीमुक्त वातावरणात गणेश आगमन झाल्यानंतर घरगुती गणेश विसर्जनही पर्यावरणपूरकच होईल, अशी अपेक्षा होती. ती पूर्ण करताना शनिवारी मूर्ती तलाव, नदीत विसर्जन न करता अनेकांनी मूर्ती दान केल्या.

महापालिका, पर्यावरणवादी संस्था आणि संघटना आणि तरुण मंडळांनी मूर्ती स्वीकारण्याची व्यवस्था केली होती. उद्यानाच्या ठिकाणीही स्वयंसेवी कार्यकर्ते कार्यरत होते. सकाळी दहापासून मूर्तिदानाच्या आकड्यात वाढ होत राहिली. गेल्यावर्षी शहरात ६० हजारांवर मूर्ती दान केल्या होत्या. यंदा त्यात वाढ झाल्याचे स्पष्ट झाले.

मूर्ती विसर्जनासाठी आलेल्या भाविकांनी पंचगंगा, रंकाळा खण, कोटीतीर्थ, राजाराम तलाव, राजाराम बंधारा तसेच कळंबा परिसर फुलला होता. चिरमुऱ्याची उधळण, फटाक्यांची आतषबाजी, हलगी, ढोलताशांच्या निनादात आणि 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या'च्या अखंड गजरात लाडक्या बाप्पाला निरोप दिला.

यावर्षीही महापालिका, पंचगंगा घाट संवर्धन समिती, शिवाजी विद्यापीठाचा पर्यावरणशास्त्र विभाग, सेव्ह कोल्हापूर सिटीझन्स कमिटी, न्यू पॉलिटेक्नीक, दीपक पोलादे, अवनि संस्थांच्या पुढाकाराने पर्यावरणपूरक विसर्जन चळवळीला चांगला प्रतिसाद मिळाला.

१३ ठिकाणी विसर्जन कुंड

२० ठिकाणी काहिली

३००

महापालिका कर्मचारी

२००

अवनि व एकटी संस्थेच्या कार्यकर्त्या

(निर्माल्य संकलन व वर्गीकरणात सहभाग)

कळंब्यात शंभर टक्के मूर्तिदान

कळंबा तलावाचे प्रदूषण रोखण्यासाठी २००१ पासून मूर्ती व निर्माल्यदानचे आवाहन करण्यात आले होते. युवक मंडळांनी घेतलेल्या चळवळीला चांगलेच बळ प्राप्त झाले आहे. भाविकांमध्ये जागृती करण्यात नागरिकांना यश आले आहे. त्यामुळे सलग तिसऱ्या वर्षी येथील शंभर टक्के भाविकांनी मूर्ती दान केल्या. यावर्षी ६ हजार पाचशे मूर्ती दान झाल्या.

०००००००००००००००

मूर्तिदान (सकाळी ९ ते रात्री दहा पर्यंत अंदाजे)

पंचगंगा घाट १३,०७६

कोटीतीर्थ व राजाराम तलाव १४,१९०

रंकाळा तलाव १८,१५०

राजाराम बंधारा, बावडा ७, ५०० वर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यकर्त्यांमुळेच शहर मागे

0
0

म. टा. पतिनिधी, कोल्हापूर

'नाशिक, औरंगाबाद शहरांपेक्षा कोल्हापूर शहर सर्वच क्षेत्रांत ३० वर्षांनी अग्रेसर होते. काळाच्या ओघात अन्य शहरे कोल्हापूरच्या पुढे गेली. विकासाच्या बाबतीत कोल्हापूर ३० वर्षे मागे पडले. कोल्हापूरच्या पिछाडीस राजकारणीसुद्धा जबाबदार असून, त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची वेळ येऊन ठेपली आहे,' अशा शब्दांत खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी जिल्ह्यातील राजकारणावर कोरडे ओढले. शहराची राजर्षी शाहू महाराजांची नगरी अशी ओळख कमी होत चालल्याचे निदर्शनास आणून देत त्यांनी जिल्ह्यासाठी सर्वच नेत्यांनी राजकारण बाजूला सोडून विकासाचा अॅक्शन प्लॅन राबविण्याची आवश्यकता असल्याचे नमूद केले.

नाथा गोळे तालीम मंडळाच्या गणेश महाल देखाव्याच्या उद्घाटन सोहळ्यात युवराज संभाजीराजे यांचा सत्कार करण्यात आला. माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी आमदार सतेज पाटील यांच्यावर केलेली टीका, 'गोकुळ'ची सभा या पार्श्वभूमीवर नाथा गोळे तालमीच्या व्यासपीठावर सतेज पाटील, संभाजीराजे आणि सर्वपक्षीय नगरसेवक एकवटल्याने उत्सुकता वाढली. माजी नगरसेवक रविकिरण इंगवले यांचा आमदार पाटील यांच्या हस्ते सत्कार ही गोष्ट चर्चेची ठरली.

यावेळी संभाजीराजे यांनी उत्सवातील चुकीच्या गोष्टीवरून मंडळांना फटकारले. संगीताला माझा विरोध नाही, पण डॉल्बी हा समाजाला लागलेला रोग आहे. या रोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी मंडळांनीच प्रबोधनाची भूमिका बजावावी, असे आवाहनही केले. माजी नगरसेवक सचिन चव्हाण यांनी भाषणात नाथा गोळे तालीम इमारत बांधकामासाठी निधीची मागणी केली होती. तसेच त्यांचा उल्लेख 'खासदार साहेब' असा केला होता. त्याचा धागा पकडून बोलताना संभाजीराजे म्हणाले, 'माझा सत्कार हा छत्रपती घराण्याचा आहे. मात्र, मला खासदार साहेब ऐकण्याची सवय नाही. ज्या घराण्यात जन्म घेतला, ते घराणे मोठे आहे. त्यामुळे खासदार साहेब म्हणू नका. तालमीच्या इमारतीसाठी निधी हक्काने मागा, राजेंचे मन मोठे आहे. मालोजीराजे यांनीदेखील तालीम संस्थांच्या बांधणीसाठी निधी उपलब्ध करून दिला होता. मालोजीराजे आणि मी दोघे भाऊ एकच आहोत. त्यांच्याकडेच इमारतीच्या निधीचा प्रस्ताव द्या. चांगल्या कामासाठी निधी कमी पडू देणार नाही.' असे म्हणताच सर्वांनीच त्याला दाद दिली.

माजी नगरसेवक सचिन चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, नगरसेविका जयश्री चव्हाण यांनी स्वागत केले. कार्यक्रमाला उपमहापौर शमा मुल्ला, वृषाली कदम, जिल्हा परिषद उपाध्यक्ष शशिकांत खोत, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजू लाटकर आदी उपस्थित होते.

पालकमंत्र्याचे कौतुक

माजी आमदार महादेवराव महाडिक व पालकमंत्री चंदकांत पाटील यांची राजकीय मैत्री सर्वश्रुत आहे. आमदार पाटील यांनी भाषणात महाडिक यांच्यावर टीकेची झोड उठविताना पालकमंत्री पाटील यांच्याविषयी कौतुकोद्गार काढले. पालकमंत्र्यांच्या पुढाकारामुळेच यंदाचा गणेशोउत्सव डॉल्बीमुक्त झाला आहे. डॉल्बीमुक्त उत्सवाचे खरे मानकरी तेच आहेत. चांगल्या गोष्टी पुढे नेण्याची भूमिका स्वीकारावी लागेल. व्यासपीठावरील मान्यवरांकडे नजर टाकत सगळ्यांचे पक्ष वेगवेगळे असले तरी विकासाचा विचार हा कॉमन असल्याचे पाटील यांनी नमूद केले.


नरकेंकडून जनतेची दिशाभूल

आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, 'हद्दवाढीसाठी शिवाजी पेठ एकवटली तर १८ गावे वाहून जातील या वक्तव्यावरून आमदार चंददीप नरके यांनी खेडेगावातील लोकांची​ दिशाभूल केली. हद्दवाढीशिवाय शहराचा विकास नाही. मात्र, गामीण भागातील नेते अडाण्यासारखे वागत आहेत. हद्दवाढीला विरोध करत आहेत. शहरवासीयांनी हद्दवाढीसाठी एकवटले पाहिजे. गामीण भागातील आंदोलनापेक्षा शहरातील आंदोलन मोठे करून दाखवू हेच मला त्या वक्तव्यावरून सूचित करायचे होते, असे क्षीरसागर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जत तालुक्यात भीषण हत्याकांड

0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली

जमिनीच्या वादातून पत्नी, दोन मुली आणि आईची एकाचवेळी हत्त्या केल्याची खळबळजनक घटना शनिवारी पहाटे जत तालुक्यातील कुडनूरमध्ये घडली. आरोपी भारत कुंडलिक इरकर (वय ५०) हा स्वतःहून जत पोलिसात हजर झाला आहे. संपूर्ण जिल्ह्याला हादरा देणारी ही घटना समोर येताच जिल्हा पोलिस प्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक तपासानुसार जमिनीबाबतचा निकाल सावत्र आईच्या बाजूने लागल्याने आपल्याला जमीन मिळणार नसल्याने नैराश्येतून भारतने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. त्याची दोन मुले आत्याकडे अभ्यासाला गेल्याने बचावली. घटनास्थळी नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कुडनर गावापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर भारत इरकर पत्नी, दोन मुली, दोन मुले आणि आईसह राहत होता. घरात लाइट नसल्याने आठवीत शिकणारा म्हाळाप्पा आणि सहावीत शिकणारा आकाश ही दोन्ही मुले त्याच परिसरातील आत्याच्या घरी अभ्यासाला गेली होती. त्यामुळे घरी भारत, त्याची पत्नी सिंधुताई (वय ४०) मुलगी रुपाली (वय १९), दुसरी मुलगी राणी (वय १७) आणि आई सुशीला (वय ६०) झोपल्या होत्या.

पहाटे पाचच्या सुमारास भारतने घरातील सर्वांना उठवले. बाजरी काढायला चला म्हणून सर्वांना पुढे घातले. काही अंतर गेल्यानंतर त्याने या सर्वांवर एकापाठोपाठ कोयत्याने हल्ला चढवला. दोन्ही मुली आणि आई वर्मी घाव बसल्याने जागीच कोसळल्या. त्याने पुन्हा त्यांच्या चेहऱ्यावर घाव घातले. तो पर्यंत पत्नी सिंधुताई पळाली होती. तिला पाठलाग करुन तिच्यावरही वार केला. वार झेलूनही ती पळतच राहिली. परंतु बाजरीच्या शेतात गाठून तिच्यावर सपासप वार करुन तिचाही खून केला.

चौघांची हत्या करून भारत शांतपणे घरी परतला. रक्ताने माखलेला कोयता स्वच्छ धुतला. नंतर स्वतः आंघोळ करुन रक्ताने माखलेले कपडे इतर कपड्यात लपवून ठेवले. स्वच्छ कपडे घालून त्याने आपल्या कुडनूर गावचा रस्ता धरला. भारत घरातून बाहेर पडल्यानंतर शनिवारची सकाळची शाळा असल्याने त्याची दोन्ही मुले म्हाळाप्पा आणि आकाश हे आत्याच्या घरातून धावत घरी आली. आपापले दप्तर पाठीला लावून शिंगणापूरच्या शाळेत जाण्यासाठी ती निघाली. शाळेच्या रस्त्याने दोघे भाऊ जात असताना घरापासून काही अंतरावरील शेतात बांधाच्या खाली आजी आणि दोघी बहिणीचे मृतदेह अस्ताव्यस्त पडलेले त्यांना दिसले. काही अंतरावर आईचीही तीच अवस्था झालेली होती. हे दृश्य समोर पाहताच दोघांनीही दप्तर टाकून हंबरडा फोडला. मुलांच्या आवाजाच्या दिशेने त्या ठिकाणच्या वस्तीवरचे लोक धावले. त्यांना जे समोर दिसले ते चित्र एकदम विदारक असेच होते. त्यापैकी एकाने गावचे सरपंच अज्ञान पांढरे यांना घटनेची माहिती दिली. तेही धावत आले. त्यांनी जत पोलिसांना कळविले. जत पोलिसांची गाडी डफळापूर मार्गे कुडनूरकडे येत असतानाच हत्यारा भारत इरकर हा रस्त्याच्या रस्त्याच्या कडेने पायी जतकडे निघाला होता. अगदी शांतपणे त्याने पोलिसगाडीकडे नजर टाकली आणि तो पुढे चालत राहिला. थेट तो जत पोलिस ठाण्यात जावून हजर झाला.

निकालाच्या नैराश्येतून भीषण कृत्य

कुडनूर गावच्या दक्षिणेला सुमारे दोन किलोमीटर अंतरावर भारत इरकर याचे घर तसे एकलकोंडेच आहे. त्याच्या वडिलांना सहा पत्नी होत्या. त्यापैकी चौघींचा मृत्यू झाला आहे. तर एक सावत्र आई सांगलीतील संजयनगरमध्ये राहते. भारत इरकर हाही अधूनमधून सांगलीत येऊन मिळेल ती मजुरी करत असे. बराच काळ तो सांगलीतच असायचा. वडिलांच्या निधनानंतर कुडनूरमधील सुमारे शंभर एकर जमीन भारतच्या नावावर आली होती. त्यापैकी ६८ एकर जमिनीचे सातबारे अद्यापही त्याच्याच नावावर आहेत. दरम्यानच्या काळात त्याची सावत्रआई जनाबाई हिने जमिनीपैकी निम्म्या हिश्शावर हक्क सांगितला. कोर्टात दावा दाखल झाला. जिल्ह्याच्या कोर्टातील निकाल जनाबाईच्या बाजूने लागल्यानंतर भारतने पुढे उच्च न्यायालयात धाव घेतली. सुमारे सहा महिन्यांपूर्वी जनाबार्इंच्या बाजूनेच निकाल दिला. असे निकाल समोर येईपर्यंत्त कोर्टकचेऱ्यांच्या खर्चासाठी बरीच जमीन विकली होती, तर ३६ एकर जमिनीचे विक्रीचे करार करुन पैसे उचलले होते. त्यामुळे अवघी ३२ एकर जमीन शिल्लक राहत होती.

या पार्श्वभूमीवर जनाबाईने वकिलामार्फत कोर्टाच्या निकालाप्रमाणे जमिनीची वाटणी मागितली. जेवढी जमीन शिल्लक आहे ती आणि उर्वरित जमिनीचे पैसे देण्याचा तिचा प्रस्ताव समोर आल्यानंतर भारतला गुंठाभरही जमीन उरत नव्हती. उलट आणखी पैसे द्यावे लागणार होते. त्यामुळे तो नैराश्येत वावरु लागला. अलिकडे मानसिक स्थिती बिघडल्यासारखेच तो वावरत असल्याचीही चर्चा समोर येत आहे. जमीनच नसेल तर संसारगाडा कसा चालवायचा. या विवंचनेतूनच त्याने पत्नी, दोन मुली आणि आईची हत्या करुन आत्महत्या करण्याचा त्याचा इरादा असावा, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे.


सखोल तपासाचे आदेश

एकाच घरातील चौघींचा खून झाल्याची घटना अत्यंत भीषण आहे. आरोपी भारत इरकर याला अटक करण्यात आली आहे. आरोपीला कठोर शिक्षा होण्याच्यादृष्टीने सखोल तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सर्व मृतदेहांचे शवविच्छेदन केल्यानंतर ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येतील, असे जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी घटनास्थळी पत्रकारांना सांगितले.

दोन्ही मुली हुशार

जन्मदात्या भारत इरकरने दोन्ही पोटच्या मुलींचा बळी घेतला असून त्या दोघींही शिक्षणात हुशार होत्या. बारावीला चांगले गुण मिळाल्याने रुपाली हिचा गावच्या वतीने सत्कारही करण्यात आला होता. जमिनीच्या वादासाठी पैसे खर्च होत राहिल्याने भारतची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची होती. जुने पडलेले घरही दुरुस्त करता आले नव्हते. त्यामुळे पडक्या घरातच त्यांचा संसार सुरु होता. परिस्थिती हलाखीची असतानाही मुली घरकाम करुन कॉलेजला धावत होत्या. एक डफळापूरच्या तर दुसरी कवठेमहांकाळच्या कॉलेजला शिकत होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images