Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

सोलापुरात ‘बळीराजा’चेभाजी फेको आंदोलन

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

खासदार राजू शेट्टी आणि सहकार आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर हमीभाव देण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाची त्यांनी पूर्तता केली नाही. उलट सत्तेची खुर्ची मिळाल्यानंतर त्यांच्याकडून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यात येत आहे, असा आरोप बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रवक्ते संजय पाटील- घाटणेकर यांनी केला.

शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा म्हणून सरकारने फळभाज्या नियमन मुक्तीचा निर्णय घेतला. परंतु, हा निर्णय पूर्णपणे फसल्यामुळे शेतकऱ्यांना कवडीमोल दराने आपला शेतीमाल विकावा लागत आहे. परिणामी शेतकरी हवालदिल झाला आहे. सरकारने शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ सोमवारी बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी रणजितकुमार यांच्या कार्यालयाबाहेर टोमॅटो, दोडका, मिरची तसेच कांदा फेकून गांधीगिरी मार्गाने निषेध करण्यात आला. तसेच या ठिकाणी आलेल्या नागरिकांना फळभाज्या कांदे मोफत देण्यात आले. घाटनेकर यांनी यावेळी

खासदार राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यावरही टीका केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


संतोष पोळला कळंबा कारागृहात हलविणार

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सातारा

सिरियल किलर संतोष पोळच्या सुरक्षिततेला जिल्हा कारागृहात धोका होण्याची शक्यता असल्याने त्याची रवानगी कोल्हापूर येथील कळंबा कारागृहात करण्यात येणार आहे. तेथे त्याला स्वतंत्र बराकीत ठेवण्यात येणार आहे. तो तीन गार्ड आणि चोवीस तास सीसीटीव्हीच्या नजरेखाली असणार आहे.

संतोष पोळने केलेल्या हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. संताप आणि रोष प्रचंड वाढलेला आहे. अनेकांनी त्याला फासावर लटकविण्याची मागणी केली आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न सध्या महत्त्वाचा आहे. जिल्हा मध्यवर्ती कारागृहातही बंदिवानांमध्ये संतोष पोळच्या कृत्याबाबत तीव्र संताप आहे. त्यामुळे संतोष पोळला जर जिल्हा कारागृहात ठेवले तर इतर बंदिवानांकडून त्याच्यावर हल्ला होऊ शकतो. त्यामुळे कारागृह अधीक्षक एन. एन. चोंधे यांनी खबरदारी म्हणून संतोष पोळला 'हाय सिक्युरिटी जेल'मध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा कारागृहात अशा प्रकारच्या सिरियल किलरला ठेवण्याची स्वतंत्र जागा नाही. त्यामुळे कोल्हापूर येथील कळंबा जेलमध्ये त्याच्यासाठी स्वतंत्र बराकीची सोय करण्यात आली आहे. तीन गार्ड आणि सीसीटीव्हीच्या देखरेखीत तो राहणार आहे. तेथील त्याची वर्तणूक कशी आहे, हे सर्व तेथील कारागृह प्रशासन अधिकारी आणि पोलिस अधीक्षक पाहणार आहेत. संतोषची साथीदार ज्योती मांढरेलाही कळंबा जेलमध्येच ठेवण्यात येणार आहे.

संतोषचा गाळा आठ वर्षांपासून बंद

संतोष पोळने खून केलेले मृतदेह त्याचे घर किंवा फार्म हाउसवर पुरले होते, ही धक्कादायक माहिती समोर येत असतानाच संतोष पोळच्या एका गाळ्यामुळे ग्रामस्थांची चिंता वाढली आहे. धोम ग्रामपंचायतीचा गाळा त्याने ताब्यात घेतल्यापासून गेली आठ वर्षे बंद आहे. त्यामुळे संतोषबरोबर त्याची स्थावर मालमत्ताही चर्चेत आली आहे. संतोषने तो गाळा २००८मध्ये ताब्यात घेतला आहे. मात्र, गाळ्याचा ताबा घेतल्यापासून तो बंद आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या मनात शंकेची पाल चुकचुकत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जीएसटी मंजुरीने ‘अच्छे दिन’ची प्रचिती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वस्तू आणि सेवा कर विधेयक (जीएसटी) मंजूर झाल्याने व्हॅटसह तर सर्व कर आकारणी रद्द झाल्याने व्यापारी, व्यावसायिकासाठी राज्य सरकारचा हा निर्णय 'अच्छे दिन'ची प्रचिती असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. कर आकारणीत सुसू्त्रता, समान पद्धती येणार असल्याने करबुडवेगिरीला चाप बसणार आहे. व्यापार, उद्योग व रोजगार वाढीला चालना मिळणार असल्याची शक्यता जाणकार व्यक्त करत आहेत. मात्र हॉटेलचे सेवा दर वाढल्याने ग्राहकांना त्याची किंमत चुकवावी लागेल. महापालिकेला मात्र जकात, एलबीटी बंद झाल्यामुळे सरकारी अनुदावर अवलंबून राहावे लागणार आहे. एलबीटी स्वरूपातील अनुदान नऊ कोटी अपेक्षित असताना सरकारकडून सध्या सात कोटी २२ लाखापर्यंत अर्थसहाय्य मिळते. सरकारने कर उत्पन्नाच्या प्रमाणात वाढीव निधी उपलब्ध केला नाही तर कमी अनुदानामुळे महापालिकेच्या कामकाजासह पायाभूत सुविधावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही काही जाणकारांचे म्हणणे आहे.

.............

वस्तू मूल्य प्रातिनिधिक होईल

जीएसटी लागू करण्याच्या निर्णयाचे ग्राहक प्रतिनिधी म्हणून स्वागत आहे. वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळे कर आणि छापील किंमतीमुळे ग्राहकांचा नाईलाज व्हायचा. छापील किंमत अधिक असली तरी त्या दराने ग्राहक वस्तू खरेदी करायचा. जीएसटीमुळे देशभर एकच करप्रणाली झाल्यामुळे वस्तू मूल्य हे जास्त प्रातिनिधीक व वस्तूनिष्ठ होईल. विक्रेते कराचा बागुलबुवा करत ग्राहकांना विना बिल वस्तूंची विक्री करायची. वस्तूची खरी किंमत ग्राहकांना समजत नव्हती. नोंदीविना होणारा व्यापार व्यवहार कमी होईल. वस्तूच्या मूळ उत्पादन मूल्यापेक्षा छापील किंमत कितीतरी पटीने अधिक असते. विक्रेता सवलतीचे आमिष दाखवून त्याचा गैरफायदा घ्यायचा. अशा प्रकारांना आता आळा बसेल.

संजय हुक्कीरे, अध्यक्ष, कोल्हापूर ग्राहक पंचायत

....................

व्यापाऱ्यांना एकदाच कर भरावा लागणार

प्रत्येक राज्यात व्हॅटचे दर वेगवेगळे असल्याने वस्तूंची आयात निर्यात करताना व्यापाऱ्यांना सेट ऑफ (कर आकारणीतील सवलत) मिळत नव्हता. व्यापाऱ्यांना करावर कर द्यावा लागत होता. तो आता करप्रणाली एक समान झाल्यामुळे एकदाच कर भरावा लागणार आहे. एकदाच कराचा भरणा होणार असल्याने करांचे दर कमी होणार असल्याने ग्राहकांना फायदा होणार आहे. मद्य व पेट्रोलियम पदार्थ जीएसटीतून वगळल्यामुळे त्यातून जो उत्पन्न मिळणार आहे त्याचा फायदा इतर उद्योग वर्गाला होणार नाही.

सदानंद कोरगावकर, अध्यक्ष, जिल्हा व्यापारी व उद्योजक महासंघ

.............................

व्यापार, रोजगारवाढीला चालना

देशभर एकसमान कर प्रणाली लागू केल्यामुळे राष्ट्रीय बाजारपेठ तयार होणार आहे. एकसमान कर प्रणालीमुळे कर बाबीतील अनेक अनिष्ट परिणाम दूर होण्याची शक्यता आहे. उद्योग, व्यापार व रोजगारवाढीला चालना मिळेल. जीएसटीचे दर वाजवी ठेवणे आवश्यक आहे. देशाच्या पातळीवर राष्ट्रीय उत्पन्नात दोन टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे राज्याचे केंद्रावरील अवलंबित्व वाढणार आहे. बहुचर्चित असा जीएसटी लागू केल्याने आंतरराष्ट्रीयस्तरावर भारताचे मानांकन वाढणार आहे. केंद्राकडे उत्पन्नाची साधने जाणार आहेत. राज्य सरकार व स्थानिक स्वराज्य संस्थेकडेच खर्चाची जबाबदारी राहणार आहे.

डॉ. विजय ककडे, अर्थतज्ज्ञ

................

राज्य, देशाच्या हिताचा निर्णय

जीएसटी लागू होण्याचा निर्णय राज्याच्या व देशाच्या हिताचा आहे. जीएसटीमुळे राज्यातील व्यापार, उद्योग व रोजगार वाढीस लागतील. परिणामी राज्यातील महत्वाच्या शेती आणि औद्योगिक वस्तू देशाच्या इतर राज्यात अ​धिक प्रमाणात विकल्या जातील. या दोन्ही गोष्टीचा ए​क​त्रित परिणम राज्याच्या आर्थिक विकास दराच्या वाढीसाठी पोषक ठरेल. जीएसटीमुळे महापालिकेची स्वायत्तता कमी होईल अशी जी ओरड केली जाते, ती चुकीची आहे. केंद्र सरकार जीएसटी कौन्सिल स्थापन करणार आहे. हे कौन्सिल, स्थानिक स्वराज्य संस्थांना नुकसान भरपाई भरून करण्याचे मार्ग सुचवणार आहे. त्याच पद्धतीने राज्याच्या पातळीवर राज्य वित्त आयोगच्या मार्गदर्शनाखाली नुकसान भरपाई देण्याची व्यवस्था होऊ शकेल.

डॉ. जे. एफ. पाटील, अर्थतज्ज्ञ

.......................

हॉटेल सेवा महागणार

जीएसटी विधेयकाला मंजुरी मिळाली असली तर प्रत्यक्ष कर आकारणी कशी असणार यासंदर्भात संदिग्धता आहे. मात्र हॉटेलचे सेवा दर वाढणार आहेत.सेवा करातील वाढ ग्राहकांना सहन करावी लागणार आहे. सरकारच्या कर आकारणीचे नवीन बदल स्वीकारणे गरजेचे आहे. हॉटेल व्यावसायिक कर आकारणीतील बदल सकारात्मक पद्धतीने घेत आहेत.

उज्ज्वल नागेशकर, अध्यक्ष, कोल्हापूर हॉटेल मालक संघ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जांबोटी अपघातातील मृतांवर अंत्यसंस्कार

$
0
0

म.टा.वृत्तसेवा,जयसिंगपूर

जांबोटीजवळ झालेल्या अपघातातील मृतांवर सोमवारी सकाळी जयसिंगपूर व नांदणी येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. बेळगाव-चोर्ला मार्गावर रविवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली होती. यामध्ये डॉ.नितीन ज्ञानदेव बुबणे (वय ३२, रा.नांदणी) व सुनील बंडोपंत पाटील (वय ४६, रा.संभाजीपूर) हे दोघे जागीच ठार झाले होते. या अपघातात डॉ.सचिन श्रीधर पाटील अंकलीकर, भरत शांतीलाल मडके व सचिन अशोक भोकरे (सर्व रा.जयसिंगपूर) हे जखमी झाले आहेत.

रविवारी सुटी असल्याने सकाळी सर्वजण सचिन पाटील यांच्या स्विफ्ट डिझायर कारमधून कर्नाटक राज्यात पर्यटनासाठी गेले होते. कर्नाटक व गोवा राज्याच्या सीमेवरील कणकुंबीजवळचा सुरल धबधबा त्यांनी पाहिला. दुपारी काही काळ येथे थांबल्यानंतर ते जांबोटी, बेळगावमार्गे कोल्हापूरकडे येत होते. एका वळणावर समोरून येणाऱ्या वाहनाला रस्ता देताना त्यांची कार घसरली. यावेळी चालकाचा ताबा सुटल्याने कार रस्त्याकडेला उलटली. या अपघातात गंभीर दुखापत झाल्याने डॉ.नितीन बुबणे व सुनील पाटील हे जागीच ठार झाले. तर भरत मडके, डॉ.सचिन पाटील, भरत मडके जखमी झाले. त्यांना तातडीने खानापूनर येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताचे वृत्त रात्री नांदणी व संभाजीपूर येथे पसरले. यानंतर बुबणे व पाटील यांच्या निवासस्थानासमोर नातेवाईक व ग्रामस्थांनी गर्दी केली.

दरम्यान, रात्री उशिरा शवविमछेदन झाल्यानंतर डॉ.नितीन बुबणे व सुनील पाटील यांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. सकाळी साडेपाच वाजता मृतदेह जयसिंगपूर येथे आणण्यात आले. नांदणी येथे डॉ.बुबणे यांच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. तर उदगाव येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत पाटील यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

बी.ए.एम.एस.चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर नितीन बुबणे यांनी नांदणी येथे वैद्यकीय व्यवसाय सुरू केला होता. रविवारी पर्यटनासाठी गेल्यानंतर काळाने त्यांच्यावर घाला घातला. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. सुनील पाटील हे शिरोळ येथील कुलकर्णी पॉवर टूल्समध्ये मेंटेनन्स विभागात काम करीत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, भाऊ असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एक लाखाची लाच घेणाऱ्या पोलिसास अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

तक्रारदाराच्या नातेवाईकावर दाखल झालेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी एक लाख रुपयांची लाच स्वीकारणारा पोलिस कर्मचारी सुरेश महादेव कबीर (वय ५२, रा. लाईन बाजार, कसबा बावडा, कोल्हापूर) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली. ही कारवाई सोमवारी (ता. २९) शिरोली, ता. हातकणंगले) येथे करण्यात आली. कबीर हा शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात कार्यरत आहे.

शिरोली पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या एका गुन्ह्यात मदत करण्यासाठी सुरेश कबीर याने तक्रारदाराकडे दोन लाखांचा मागणी केली होती. यातील एक लाखांच्या रकमेवर तडजोड झाली. तक्रारदाराने याबाबत सातारा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पोलिसांनी सोमवारी सापळा रचून शिरोलीतील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शखेसमोर एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना कबीर यास रंगेहात पकडले. कबीर याच्यावर शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कबीर याने ही लाचेची रक्कम स्वतःसाठी स्वीकारली की पोलिस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी स्वीकारली याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी तपास करीत आहे. या कारावाईनंतर शिरोली आणि टोप परिसरात काही नागरिकांनी फटाके वाजवून या कारवाईचा आनंद व्यक्त केला. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सातारा पोलिसांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फसवणूक प्रकरणी आणखी दोघे ताब्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठात नोकरी लावण्याच्या आमिषाने केलेल्या फसवणुकीची व्याप्ती वाढत असून, राजारामपुरी पोलिसांनी सोमवारी (ता. २९) यातील आणखी दोन संशयितांना ताब्यात घेतले. फसवणूक करणाऱ्या टोळीचा मुख्य सूत्रधार नितीन वसंत कदम (रा. पोर्ले तर्फ ठाणे. ता पन्हाळा) हा मात्र अद्यापही फरार आहे. कदम याला पकडण्यासाठी पोलिसांनी सोमवारी पथक रवाना केले. दरम्यान, फसवणूक झालेल्या तरुणांचे जबाब पोलिसांनी नोंदवून घेतले असून, फसवणुकीचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

शिवाजी विद्यापीठात वरिष्ठ लिपिक पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तीन लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार आत्माराम दादू मोटे(वय ४७, रा. कुशिरे पोहाळे, ता. पन्हाळा) यांनी राजारामपुरी पोलिसात दाखल केली होती. याबाबत पोलिसांनी गेल्या तीन दिवसांत दोघांना अटक केली असून, सोमवारी आणखी दोन संशयितांना ताब्यात घेतले. यात राधानगरी तालुक्यातील एका माजी सरपंचाचाही समावेश आहे. टोळीचा सूत्रधार नितीन कदम याने पन्हाळा, राधानगरी आणि हातकणंगले तालुक्यातील गरजू सुशिक्षितांन हेरून नोकरीचे आमिष दाखवले. फसवणुकीसाठी सावज शोधताना कदम याने सरपंच, उपसरपंच, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते यांचा वापर केला. स्वतःची राजकीय नेत्यांसोबतची उठबस आणि पै-पाहुण्यांचे विद्यापीठात लिंकिंग असल्याचे सांगत त्याने लाखो रुपये उकळले. पोलिसात गुन्हा दाखल होताच त्याने स्वतःचा मोबाइल बंद ठेवला असून, तो पोर्ले तर्फ ठाणे येथील घराकडेही फिरकलेला नाही. पोलिसांनी त्याच्या शोधासाठी एक पथक रवाना केले आहे. त्याला ताब्यात घेतल्यानंतर फसवणुकीचा नेमका आकडा समजेल, अशी माहिती पोलिस निरीक्षक अमृत देशमुख यांनी दिली. दरम्यान,फसवणूक झालेल्या सहा तरुणांचे जबाब पोलिसांनी सोमवारी नोंदवले.


पट्टणकोडोलीतील तरुणाला

इतिहास विभागात नियुक्ती

पट्टणकोडोली येथील एका तरुणाला विद्यापीठातील इतिहास विभागात शिपाई म्हणून रुजू होण्यासाठी पत्र दिले होते. या तरुणाची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. यातील फसवणूक करणारा एका तरुणाचा नातेवाईक असल्याने आणि पाच सप्टेंबरपर्यत घेतलेले पैसे परत देण्याची गॅरंटी दिल्याने पोलिसांत तक्रार दिली नसल्याचे समजते. विद्यापीठाच्या कुलसचिवांची सही, ऑर्डर नंबर, शिक्का संबधित बोगस नियुक्ती पत्रावर आढळून येत आहे. नोकरी मिळणार या आशेने गावातील सहा ते सात तरुणांनी नोकरीसाठी प्रत्येकी साडेतीन लाख रुपये दिल्याचे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिक्त जागांनी ‘आरोग्य ’धोक्यात

$
0
0

प्रकाश कारंडे, कागल

कागल तालुक्यात पाच आरोग्य केंद्रे आणि जिल्हा परिषदेचे दोन तसेच आयुर्वेदिक दोन दवाखाने आहेत. यापैकी पाच आरोग्य केंद्रांना १० वैद्यकीय अधिकारी मंजूर असताना केवळ तीनच जागा भरल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या दोन दवाखान्यात मिळून वैद्यकीय अधिकाऱ्यांची सर्वच पदे रिक्त आहेत. तर आयुर्वेदिक रुग्णालयात दोन पैकी एक जागा रिक्त आहे. गेली दीड ते दोन वर्ष हा प्रकार सुरु असून अद्यापही ही पदे भरली नसल्याने एकीकडे रुग्णांची हेळसांड होत आहेच, शिवाय कुटुंब कल्याणसारख्या योजना राबवण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. एकूणच आरोग्यसेवा १० सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांअभावी कोलमडल्याचेच चित्र कागल तालुक्यात दिसून येत आहे.

सर्वसाधारण आराखड्यानुसार ३० हजार लोकसंख्येला एक प्राथमिक आरोग्य केंद्र असावे असा नियम आहे.परंतु कागल तालुक्यातील एकाही आरोग्य केंद्राला हा नियम लागू होत नाही. यातील पिंपळगाव बुद्रुक आरोग्य केंद्राकडे तर ६८ हजार लोकसंख्या आहे. यावरुनच तालुक्याची आरोग्य स्थिती लक्षात येते. नानीबाई चिखली ४६ हजार लोकसंख्या, सेनापती कापशी ४२ हजार आणि सिध्दनेर्ली व कसबा सांगाव ३४ हजार अशी दोन लाख २७ हजार २९१ लोकसंख्येची मनाला येईल तशी विभागणी करण्यात आली आहे. त्यातच तालुक्याला अजून चार प्राथमिक आरोग्य केंद्रे मंजूर झाली आहेत. परंतु बाचणी,हमिदवाडा,हळदी व बिद्री येथील ग्रामपंचायतींनी एक एकर जागा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावावर करण्यास तब्बल चषार वर्षापासून अद्यापही विलंबच झाला आहे. त्यामुळे एकीकडे अधिकाऱ्यांची वानवा आणि दुसरीकडे पर्यायी व्यवस्थाही उभारत नसल्याने उपलब्ध प्राथमिक आरोग्य केंद्रावर प्रचंड ताण पडत आहे.

तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांना ड्रायव्हर केवळ एकच कायस्वरुपी असल्याचे स्पष्ट झाले आहे. पिंपळगाव बुद्रुक वगळता बाकीच्या ठिकाणी तात्पुरते ड्रायव्हर असल्याने आणि अधिकारीच नसल्याने वेळेत औषधे आणि इतर कामाच्या बाबी यावर मोठा परिणाम होत असल्याचेच चित्र आहे. असे असतानाही इतर ठिकाणी गयावया करुन येथील अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय कुटुंब कल्याण योजनेअंतर्गत स्त्री-पुरुष शस्त्रक्रिया उद्दिष्ठापेक्षाही जास्त करीत जिल्ह्यात सलग दोन वर्ष प्रथम क्रमांक पटकावला आहे.कागलचा जिल्हा परिषदेचा दवाखाना आता गैरसोयीमुळे अखेरची घटका मोजत आहे. या दवाखान्यात औषधे आहेत मात्र डॉक्टर नाहीत. दुर्धर आजार झाल्यासारखी या दवाखान्याची अवस्था केवळ अतिक्रमण आणि इमारतीच्या दुरवस्थेने झाली आहे. या दवाखान्याची स्थापना २३ एप्रिल १८९१ साली झाली.सर्वसोयीनीयुक्त सव्वाशे वर्षाचा दवाखाना असा या दवाखान्याचा लौकीक आहे. अशा या दवाखान्यात गैरसोय, तळीरामांचा अड्डा व पडलेल्या बाटल्या, दवाखान्याच्या आवारात भरणारा बाजार आणि त्यामुळे झालेली घाण,कचरा,दुर्गंधी ,डासांचा उपद्रव आहे. तर म्हाकवेचा दवाखाना देवळात असून येथेही अशीच अवस्था अशीच आहे.

.......

कोट

'जोपर्यंत वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे भरली जात नाहीत तोपर्यंत आम्ही काहीच करु शकत नाही. यासाठी विवीध माध्यमातून आम्ही वरिष्ठांकडे पदे भरण्यासाठी वारंवार पाठपुरावा करीत आहोत.

डॉ.अजयकुमार गवळी ,तालुका आरोग्य अधिकारी


चौकट

कंत्राटी कर्मचारी

तालुक्यात एकूण ३४ आरोग्य उपकेंद्रे आहेत. आरोग्य विभागाच्या नाकर्तेपणामुळे ३४ कंत्राटी कर्मचाऱ्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. त्यांचे कंत्राट संपत आले असून त्याला निधीअभावी मुदत वाढ न देण्याचे सरकारचे धोरण आहे. एकीकडे अशी परिस्थिती असताना जिल्हा परिषद आणि ग्रामीण रुग्णालय एकाच ठिकाणी असणारे कागल हे राज्यतले एकमेव उदाहरण आहे. तालुक्यातील नानीबाई चिखली आरोग्य केंद्राने राष्ट्रीए मानांकनापर्यंत झेप घेतली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हद्दवाढीतील गावांसाठी विशेष प्राधिकरण ?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर महापालिकेच्या हद्दवाढीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मंगळवारी (ता. ३० ऑगस्ट) मुंबईत समर्थक व विरोधकांची महत्वपूर्ण संयुक्त बैठक होत आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हद्दवाढीबाबत मुख्यमंत्री स्वतःच घोषणा करणार आहेत असे २६ जून रोजी 'मटा कॉन्क्लेव'मध्ये स्पष्ट केल्याने दोन्ही गटांसाठी योग्य असा पर्याय काढला जाण्याची शक्यता आहे. यात वसई-विरारच्या धर्तीवर कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दवाढीत येत असलेल्या गावांसाठी विशेष प्राधिकरण जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. याशिवाय सर्व गावांचा समावेश करून विशेष पॅकेज देणे, काही गावांचा समावेश करणे, अधिसूचना काढून हरकतीनुसार अंतिम निर्णय घेण्याच्या अन्य पर्यायांचाही समावेश असू शकेल.

समर्थक आणि विरोधकांनी टोकाची भूमिका घेतल्याने मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांचा निर्णय घेण्यास कस लागणार आहे. दुपारी तीन वाजता होणाऱ्या बैठकीसाठी समर्थकांकडून महापौर अश्विनी रामाणे, निमंत्रक आर. के. पोवार, बाबा पार्टे, राजू लाटकर, शारंगधर देशमुख, स्थायी सभापती मुरलीधर जाधव, उपमहापौर शमा मुल्ला, प्रल्हाद चव्हाण, किशोर घाटगे, संभाजी जाधव, विजय सूर्यवंशी, लाला गायकवाड, संदीप देसाई, सतिशचंद्र कांबळे, चंद्रकांत बराले हे उपस्थित राहतील. विरोधकाकडून आमदार चंद्रदीप नरके, आमदार अमल महाडिक, आमदार डॉ. सुजीत मिणचेकर, संपतराव पवार पाटील, भगवान काटे, नाथाजी पवार, राजू माने, बी. ए. पाटील, रावसाहेब दिगंबरे उपस्थित राहणार आहेत.

हद्दवाढ समर्थक व विरोधक दोन्हीबाजूकडून गेल्या आठवड्यापासून आंदोलनाची जोरदार आघाडी उघडली होती. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे बैठकीऐवजी हद्दवाढीची अधिसूचना काढण्यासाठी समर्थकांनी बेमुदत उपोषणाचा इशारा दिला होता. त्यानंतर हद्दवाढ विरोधकांनी एक इंचही जागा देणार नाही असा इशारा देऊन बेमुदत उपोषणाचा इशारा दिला. २४ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आंदोलनामुळे शहरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याच्या शक्यतेने थेट मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांनी दोन्ही बाजूंना बैठकीचे निमंत्रण देऊन आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली होती. त्यामुळे आजची बैठकच महत्वाची ठरणार आहे. शहरवासियांबरोबर ​प्रस्तावित गावातील ग्रामस्थांचे डोळे निर्णयाकडे लागले आहेत.

विशेष पॅकेजसह प्राधिकरण

महापालिकेने सादर केलेल्या प्रस्तावातील १८ गावांसाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करणे. वसई-विरार महानगरपालिकेच्या धर्तीवर या गावांचा स्वतंत्र विकास करण्याचे प्रयत्न करणे. हा विकास करत असताना त्या गावांनी बनवलेल्या विकास आराखड्याला धक्का न लावणे.

हरकतीनुसार अंतिम निर्णय

सर्व गावांची हद्दवाढीची अधिसूचना प्रसिद्ध करणे. जिल्हाधिकाऱ्यांना प्राधिकृत अधिकारी नेमून हरकती, सुचनांचा विचार करुन त्यानुसार गावांच्या अंतिम समावेशाचा निर्णय घेणे.

काही गावांचा समावेश

महापालिकेच्या प्रस्तावानुसार १८ गावांऐवजी भौगोलिक सलगता असलेल्या काही गावांचा समावेश हद्दवाढीत करायचा. दक्षिणेकडील शहरालगतच्या कळंबा, पाचगाव, उचगाव, मोरेवाडी, कंदलगाव, उजळाईवाडी यांसह आणखी काही गावांचा समावेश केला जाऊ शकतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महाआघाडीची विजयाकडे वाटचाल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, राधानगरी

भोगावती शिक्षण मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, शेकाप, शिवसेना, शेतकरी संघटना,जनता दल पुरस्कृत महाघाडीने सोमवारी रात्रीपर्यंतच्या मतमोजणीत एकतर्फी विजयाकडे वाटचाल सुरू ठेवली. तेरापैकी तेरा जागांवर पाच हजार मतांच्या फरकाने आघाडी मिळवून महाआघाडीची सत्ता हस्तगत करण्याकडे वाटचाल सुरू आहे. अधिकृत निकालाची घोषणा तीन सप्टेंबर रोजी करण्यात येणार आहे .

भोगावती शिक्षण मंडळाची पंचवार्षिक निवडणूक सुरवातीपासून न्यायालयीन प्रक्रियेत होती. शेतकरी संघटनेने शिक्षण संस्थेत राजकारण नको म्हणून निवडणूक बिनविरोध होण्यासाठी विशेष प्रयत्न केले, परंतु भाजप रिपाईं आघाडीने पॅनेल उभा करून निवडणुकीचा बिगुल वाजवला. भाजप आघाडी मार्फत विशेष सभाही घेण्यात आल्या. सभांना गर्दीही खेचली.

एकूण ३२,८०७ मतदारांपैकी १९, ५०२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. चाळीस टक्के मतदार मतदान केंद्रावर फिरकले नाहीत. दहा केंद्रांवर झालेल्या मतदानात कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. सुरवातीपासूनच महाआघाडीने मतदानात आघाडी घेऊन विजयाकडे वाटचाल सुरू केली. पहिल्या टप्प्यात दहा हजार मतदानापैकी महाआघाडीला ४१६२ मते मिळाली तर भाजप आघाडीला १२५७ मते मिळाली. तीन हजार मतांची आघाडी घेऊन महाआघाडीच्या सर्व उमेदवारांनी विजयाकडे वाटचाल सुरू केली .

काँग्रेस ,राष्ट्रवादी ,शेकाप ,शिवसेना ,जनता दल, शेतकरी संघटना यांच्या महा आघाडीला सुरवातीला सभासदांनी विरोध केला. परंतु माजी आमदार पी एन पाटील, संपतबापू पाटील, ए. वाय. पाटील यांनी खंबीर भूमिका घेत विजय खेचून आणण्यात यश मिळवले. भोगावती शिक्षण मंडळ निवडणूक ही भोगावती साखर कारखाना निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून ओळखली जात आहे. विजयाचा कल दिसताच महाआघाडीच्या उमेदवारांच्या समर्थकांनी जल्लोष फटाके वाजवून व्यक्त केला .



विजयाकडे वाटचाल करणारे उमेदवारः बबन शंकर पाटील, बंडोपंत बाळासो वाडकर ,गोविंदा दादू चौगले, जयसिंग गोपाळराव हुजरे, मच्छिंद्र भिकाजी पाटील, मारुती रामजी पाटील, पांडुरंग बाळू कवडे, संभाजी गणपत पाटील , सरदार चिल्लपा पाटील, सर्जेराव आनंदा पाटील, उदय हिंदुराव चव्हाण, विलास शामराव पाटील, पुष्पा पांडुरंग पाटील .

..........

कोट

'सभासदानी आमच्या महाआघाडीवर प्रचंड मते देऊन विश्वास दाखवला आहे, त्याबद्दल सर्व सभासदाना आम्ही धन्यवाद देतो. लवकरच शिक्षण मंडळाची घटना दुरुस्त करून शिक्षण मंडळ भोगावती साखर कारखान्याच्या संचालक मंडळाकडे सर्व अधिकार सोपविणार आहे.

धैर्यशील पाटील, महाआघाडी

.......

कोट

'भोगावती शिक्षण मंडळाच्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजप घराघरात पोहचला. सभासदांना दडपशाही नको होती. सभासदांच्या हक्कासाठी ही निवडणूक आम्ही लढवली होती.सभासदांनी दिलेला कौल मान्य आहे . आमच्या आघाडीला मिळालेले तीस टक्के मतदान आमच्यादृष्टीने समाधानकारक आहे .

व्ही टी जाधव , भाजप आघाडी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मद्यधुंद पोलिसाची महिलेशी हुज्जत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अंबाबाई मंदिरात ड्युटीवर असलेले पोलिस कर्मचारी अजित गणपती होडगे (वय ४०) याने दर्शनासाठी आलेल्या महिलेशी पर्स आत घेऊन जाण्याच्या कारणावरून वाद घातला. होडगे हा मद्यधुंद अवस्थेत होता, त्याचबरोबर त्याने पर्समधील हजार रुपये काढून घेतल्यचा आरोपही फिर्यादी महिलेने केला आहे. जुना राजवाडा पोलिसांनी होडगे याला ताब्यात घेतले. हा प्रकार सोमवारी(ता. २९) दुपारी तीनच्या सुमारास घडला.

सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास प्रिया चैतन्य माने (वय ३२, रा. मरगाई गल्ली, शिवाजी पेठ, कोल्हापूर) या दर्शनासाठी महाद्वारातून आत जाताना होडगे याने गेटवर रोखले. हातातील पर्स घेऊन आत जाण्यास मनाई करीत त्याने पर्स तपासली. जबरदस्तीने पर्स स्वतःकडे ठेवून घेत त्याने माने यांना दर्शनासाठी आत पाठवले. दर्शनानंतर माघारी आलेल्या माने यांनी पर्स घेतली, मात्र यातील २२०० रुपयांपैकी एक हजार रुपये नसल्याचे त्यांना लक्षात आले. याबाबत जाब विचारताना पोलिस कर्मचारी होडगे याने महिलेशी हुज्जत घातली. माने यांनी याबाबत देवस्थान समितीच्या कार्यालयात जाऊन तक्रार केली आणि सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. होडगे हा मद्यधुंद अवस्थेत असल्याचे लक्षात येताच माने या तक्रार देण्यासाठी जुना राडवाडा पोलिस ठाण्यात गेल्या, मात्र त्यांना तासभर ताटकळत ठेवून टाळणे सुरू होते. बजरंग दलाचे महेश उरसाल यांनी हस्तक्षेप करताच पोलिसांनी तक्रार नोंदवून घेत होडगे याला ताब्यात घेतले. त्याची सीपीआरमध्ये तपासणी केली.

अजित होडगे याची कारकीर्द वादग्रस्त असून, चार वर्षांपूर्वीच कर्तव्यात कसूर केल्याबद्दल त्याला काही काळासाठी निलंबित करण्यात आले होते. मद्यप्राशन करून मंदिरात ड्युटीवर आल्याने पोलिस निरीक्षक अनिल देशमुख यांनी याची गांभीर्याने दखल घेत अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. दिनेश बारी आणि विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांना घटनेची माहिती दिली.

मंदिरातील सुरक्षा रामभरोसे

अंबाबाई मंदिरात गेल्या पंधरा दिवसात पाच वेळा चोरीचे प्रकार घडले आहेत. चार दिवसांपूर्वीच अज्ञात चोरट्यांनी महिलेच्या पर्समधील वीस तोळे दागिने लंपास केले. किरकोळ चोरीचे प्रकार तर वारंवार घडत आहेत. या पार्श्वभूमीवर मंदिरात नेमणूक केलेले पोलिस अधिक दक्ष असणे गरजेचे आहे, प्रत्यक्षात मात्र मद्यधुंद अवस्थेतील पोलिसांच्या कारनाम्यांमुळे भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शिवाजी द ग्रेट’ वेबसाइटवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची थोरवी जगभर पोहचावी म्हणून सह्याद्री इतिहास संशोधन केंद्राने पुढाकार घेतला आहे. राजाराम कॉलेजचे प्राचार्य डॉ. बाळकृष्ण यांच्या गाजलेल्या 'शिवाजी द ग्रेट' या चारही खंडाच्या संपादनाचे काम पूर्ण केले आहे. तसेच शिवाजी महाराजांच्या जीवन कार्याचे दर्शन घडविणाऱ्या 'www.shivajithegreat.com' वेबसाइट तयार केली आहे. वेबसाटवर डॉ. बाळकृष्ण यांच्या चारही खंडातील माहिती, फोटोग्राफ्स आहेत. कोल्हापूरचे इतिहास संशोधक इंद्रजित सावंत व सहकाऱ्यांच्या तीन वर्षाच्या परीश्रमानंतर शिवकालीन इतिहासाचा दस्ताऐवज वेबसाइटवर उपलब्ध झाला आहे.

राजाराम कॉलेजचे प्राचार्य डॉ. बाळकृष्ण यांनी १९३२ ते १९४० या कालावधीत 'शिवाजी दे ग्रेट' या नावांनी चार खंडात शिवचरित्र प्रसिद्ध केले होते. ऐतिहासिक कागदपत्राच्या आधारे लिहिलले खंडात्मक असे हे पहिलेच शिवचरित्र मानले जाते. डॉ. बाळकृष्ण यांनी डचसह परदेशी भाषांतील कागदपत्रांचा अभ्यास करून १६८० पानांतून ​शिवचरित्र साकारले. मात्र कालाच्या ओघात चारही खंड एकत्रित स्वरूपात मिळणे अशक्य झाले. राजाराम कॉलेजमध्ये शिवचरित्राचा तिसरा खंड आहे, पुराभिलेखागार कार्यालयात दोन खंड आढळतात. पन्हाळा येथील संग्रहालयात एक खंड मिळतो.

तीन वर्षाचे परिश्रम, २४ सप्टेंबरला प्रकाशन

डॉ. बाळकृष्ण यांनी शिवछत्रपतींचे खरे ​चरित्र रेखाटल्याने ते जगासमोर उपलब्ध असावे, यासाठी चारही खंडाचे संपादन करण्याचा निर्णय इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी घेतला. 'शिवाजी द ग्रेट'च्या संपादनाविषयी सावंत म्हणाले, 'डॉ. बाळकृष्ण यांचे चारही खंड आता दुर्मिळ आहेत. उपलब्ध खंडातील पाने जीर्ण झाली आहेत. छायाचित्रे अस्पष्ट आहेत. इतिहास अभ्यासकांना व संशोधकांना शिवचरित्राचा अभ्यास करताना वस्तुनिष्ठ माहिती उपलब्ध होण्यात अडचणी निर्माण होत होत्या. गेली तीन वर्षे संपादनाचे काम सुरू होते. या चार खंडाच्या संपादनासह, स्वतंत्ररित्या १०० पानांच्या संपादकीय मजकुरावर आधारित एक पुस्तक तयार झाले आहे. २४ सप्टेंबर रोजी चार खंड आणि संपादकीय पुस्तकाचा प्रकाशन समारंभ होणार आहे. जगभरातील इतिहास अभ्यास, संशोधकांना हा ऐतिहासिक दस्ताऐवज उपयुक्त ठरणार असल्याचा दावा सावंत यांनी केला. संपादनासाठी अमित आडसुळे, राम यादव यांचे सहकार्य लाभल्याचे त्यांनी सांगितले.

वेबसाइटचे अनावरण

छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यावर 'शिवाजी द ग्रेट' या नावांनी वेबसाइट तयार केली आहे. वेबसाइटवर डॉ. बाळकृष्ण यांच्या शिवचरित्र खंडातील महत्वाचे लेखन, संदर्भ, फोटाग्राफ्स, सावंत यांच्या पुस्तकांची माहिती असणार आहे. ए लॅबच्या अक्षय शिंदे, शिरीष जाधव, भास्कर सबनीस, सिद्धी घाडगे यांनी वेबसाइट तयार केली अहे. येत्या वर्षभरात डॉ. बाळकृष्ण यांचे संपूर्ण शिवचरित्र वेबसाइटवर उपलब्ध असेल. जोतिरादित्य इस्टेट डेव्हलपर्सचे संजय शिंदे, आर्किटेक्ट अभिजित जाधव कसबेकर, मराठा महासंघाचे वसंत मुळीक, हर्षल सुर्वे, दिलीप पाटील, विजय पाटील, सचिन तोडकर यांच्या उपस्थितीत वेबसाइटचे अनावरण झाले.


डॉ. बाळकृष्ण यांच्या 'शिवाजी द ग्रेट' खंडाविषयी...

पहिला खंड छत्रपती शहाजी महाराज यांच्या कार्यावर

दुसऱ्या व तिसऱ्या खंडात शिवाजी महाराज व कार्य

चौथ्या खंडात छत्रपती शिवाजी महाराज आणि जगभरातील योद्धे यांची तुलनात्मक मांडणी

शिवाजी महाराज यांचे श्रेष्ठत्व रेखाटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हिंस्त्र स्वापदांच्या हल्ल्यात घोडा ठार

$
0
0




म. टा. वृत्तसेवा, कराड

कराड तालुक्यातील जखिणवाडी गावाजवळच्या आगाशिव डोंगराच्या पायथ्याला मेढपाळाने उभारलेल्या शेळ्या-मेंढ्याच्या वाड्यावर मंगळवारी पहाटेच्या सुमारास हिंस्त्र स्वापदांनी हल्ला करून वाड्यावर बांधलेल्या घोड्याला ठार करून त्याचा फडशा पाडला. दरम्यान, घटनास्थळावरील श्वापदांच्या पाऊलांच्या ठशांवरून शेळ्या-मेंढ्यांच्या वाड्यावर हल्ला करून घोड्याचा फडशा पाडलेली श्वापदे म्हणजे दोन बिबटे असल्याचा दावा मेंढपाळ व तेथील ग्रामस्थांनी केला आहे. वन विभागानेही हे बिबट्याचे ठसे असल्याचे म्हटले आहे.

आगाशिव डोंगराच्या पायथ्याला मोठ्या प्रमाणात शेती आहे. त्यामुळे या परिसरात शेळ्या-मेंढ्यांचे अनेक कळप आहेत. यातील एक कळप आबा दशरथ येडगे (जखिणवाडी, ता. कराड) या मेंढपाळाचा असून, तो तेथील एका शेतात वाडा टाकून उतरला होता. या वाड्यावर सुमारे चारशे मेंढरे, काही शेळ्या आणि ओझी वाहण्यासाठी एक घोडाही होता. सोमवारी रात्री मेंढपाळ आबा दशरथ येडगे आपल्या सहकाऱ्यांसह वाड्यावर मुक्कामी राखणीला थांबले होते. मंगळवारी पहाटेच्या सुमारास दोन हिंस्त्र स्वापदांनी अचानक शेळ्या-मेंड्यांच्या कळपावर हल्ला केला. या हल्ल्यात वाड्याकडेला बांधलेल्या घोड्यावर नेम साधत त्याच्या नरडीचा घोट घेत त्याला जागीच ठार करून फडशा पाडला.

दरम्यान, वाड्यावर राखणीला असलेल्या दोघा मेंढपाळांच्या लक्षात हा प्रकार येताच झोपेतून जागे होताच बिबट्यासारखे दोन श्वापदांनी धूम ठोकली. श्वापदांच्या हालचालीमुळे जमिनीवर उमटलेले पायाचे ठसे हे बिबट्याचेच असल्याचा दावा मेंढपाळांसह ग्रामस्थांनी केला आहे. तसेच वन विभागानेही सदर ठसे बिबट्याचे असल्याचा संशय व्यक्त केला आहे. सदर ठसे तज्ज्ञांकडे पाठविल्यानंतरच या बाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे.

मेंढपाळाच्या कळपावर झालेला हल्ला बिबट्यांचाच झाला असावा, असे पाऊलांच्या ठशांवरून वाटते. ठशांचे फोटो तज्ज्ञांकडे पाठविण्यात येतील त्यानंतर या बाबतचे चित्र स्पष्ट होईल. घोड्याचा पंचनामा केला आहे, अशी माहिती मलकापूर परीमंडळाचे वनाधिकारी संतोष जाधवराव यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तत्कालीन जिल्हाधिकारी, आरोग्याधिकाऱ्यांवरगुन्हा दाखल करण्याची मागणीवाई हत्याकांड

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सातारा

'संतोष पोळ याला २५ जुलै २००२रोजी तत्कालीन जिल्हाधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी पंधराशे रुपये अनुमती शुल्क भरून घेऊन वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी परवानगी दिली आहे. त्याचा गैरफायदा घेऊनच त्याने पुढील कारनामे केले. त्यामुळे त्याच्या एकंदर कृत्याला दोन्ही अधिकाऱ्यांना जबाबदार धरून गुन्हा दाखल करावा,' अशी मागणी माहिती अधिकार चळवळीतील कार्यकर्ते शिवाजी राऊत यांनी केली आहे.

राऊत म्हणाले, सरकारच्या २०००च्या आदेशानुसार राज्यातील बोगस डॉक्टरांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी जिल्हास्तरावर एक समिती कार्यरत करण्यात आली होती. या समितीचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी तर सचिव म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी काम पाहतात. या समितीने जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांवर केलेल्या कारवाईची माहिती मिळावी म्हणून माहितीच्या अधिकाराखाली एक ऑगस्ट २००३ रोजी अर्ज केला होता. त्या वेळी या समितीने महाराष्ट्र वैद्यकीय अधिनियम १९६१ च्या कलम ३५चा आधार घेऊन बोगस डॉक्टरांची परीक्षा घेऊन त्यांना व्यवसायासाठी प्रमाणपत्र दिले. त्या वेळी प्रत्येकाकडून अनुमती शुल्क म्हणून १५०० भरून घेतले. जिल्ह्यातील १५३ व्यक्तींना अशा प्रकारे अनुमती शुल्क भरून वैद्यकीय व्यवसाय करण्यास परवानगी दिल्याचे त्यांनी त्यावेळी कळविले होते. प्रशासनाने बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना अभयच दिल्याचे घटनांक्रमांवरून स्पष्ट झाले आहे. २००२ साली ओमप्रकाश गुप्ता जिल्हाधिकारी होते तर डॉ. विजयसिंह मोहिते जिल्हा आरोग्य अधिकारी होते.

पोळविरोधात २००५मध्येच तक्रार

२३ जून २००५ रोजी डॉ. पोळसह अन्य पाच जणांविरुद्ध वाई पोलिसात बोरगाव (ता. वाई) आरोग्य केंद्रामया डॉक्टरांनी बोगस डॉक्टर म्हणून तक्रार केली होती. मात्र, त्याकडेही दुर्लक्ष केले गेले. राऊत यांनी मिळवलेली माहिती व २००५ साली झालेली तक्रार प्रशासनाने गांभीर्याने घेतली असती तर पोळची त्याचवेळी पोलखोल झाली असती. प्रशासनाने कारवाया न केल्यामुळे पोळ पोसला गेला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फसवणूकप्रकरणी फिर्यादीवरच गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठात नोकरी लावण्याच्या अभिषाने फसवणूक प्रकरणाची व्याप्ती वाढली असून या प्रकरणातील फिर्यादीनेच अन्य काही लोकांकडून पैसे घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे फसवणूक झालेल्या दोघांनी फिर्यादी आत्माराम बाबू मोटे (रा. कुशिरे पोहाळे, ता. पन्हाळा) याच्याविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. सहा संशयितांना मदत करत मोटे याने शिरोळच्या दोन युवकांकडून १६ लाख ५० हजार रुपयांचा गंडा घातल्याचे उघड झाले. याबाबत प्रवीण केरू कांबळे (वय ३३, रा. नवीन कॉलनी, दत्तनगर, दत्त कारखाना, शिरोळ) यांनी फिर्याद दिली आहे.

याआधी पोलिसांनी नितीन वसंत कदम (रा. आसुर्ले पोर्ले, ता. पन्हाळा), आत्माराम दादू मोटे, वसगडेचे माजी सरपंच प्रकाश कांबळे, बजरंग हिंदुराव पाटील, (रा. आसुर्ले पोर्ले, ता. पन्हाळा), युवराज सातपुते (रा. म्हाळुंगे, ता. करवीर), संतोष पटवर्धन कांबळे (रा. पट्टणकोडोली ता. हातकणंगले) रोहित यादव (रा. गुजरी कॉर्नर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मोटे, कांबळे, घाटगे, सातपुते, पटवर्धन यांना पोलिसांनी अटक केली असून कदम व यादव फरारी आहेत.

शिवाजी विद्यापीठात नोकरी लावण्यासाठी ११ जणांना गंडा घातल्याचे वृत्तपत्रातील बातमी वाचून फिर्यादी प्रवीण कांबळे यांनी मंगळवारी राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अमृत देशमुख यांच्याशी संपर्क साधला. प्रवीण हे एमबीए पदवीधर असून बेकार आहेत. तर त्यांचे मेहुणे पंकज कांबळे हे अपंग असून सुशिक्षित बेकार आहेत. आत्माराम मोटे व अन्य पाच संशयितांनी नोकरी लावतो म्हणून प्रविण व पंकज यांची फसवणूक केल्याचे सांगितले. या गुन्ह्यातील प्रमुख संशयित नितिन कदम याने आपले बनावट नाव दिगंबर साळुंखे असल्याचे सांगितले. कदमने आपले मेहुणे मंत्रालयात सचिव असल्याचे सांगितले. दाजीच्या माध्यमातून शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूंकडून शिवाजी विद्यापीठात नोकरी लावतो, अशी बतावणी केली. तसेच फोनवरून शिवाजी विद्यापीठाचा वरिष्ठ अधिकारी देसाई बोलतो असे खोटे सांगून शिवाजी विद्यापीठात वरिष्ठ लिपिक पदावर प्रत्येकी आठ लाख २५ हजार असे १६ लाख ५० हजार रुपये घेतले. त्यांना मानस शास्त्र विभागात शिवाजी विद्यापीठाचा बनावट सही शिक्याचा आदेश असलेली ऑर्डर दिली. पोलिसांनी सात जणांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयुष्य जगण्याची आणखी एक संधी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अवयव दान म्हणजे आयुष्य जगण्यासाठी आणखी एक संधी असून अवयवदान हे श्रेष्ठ दान आहे. याबाबत समाजाला जाणीव जागृती करण्यासाठी राज्यात महाअवयवदान अभियान सुरू करण्यात आले. या अभियानाची सुरुवात कोल्हापुरात कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे यांनी हिरवा झेंडा दाखवून केली.

दसरा चौकातून सुरु झालेल्या महाअवयवदान अभियान महारॅलीच्या प्रारंभप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, राजर्षि शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, विद्यापीठाचे कुलसचिव व्ही. एन. शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एल. एस. पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी प्रकाश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

'अवयव दान श्रेष्ठ दान,' 'गणपती बाप्पा मोरया-आवयव दान करुया,' 'सबसे महान अवयवदान,' अशा घोषणा देत या महारॅलीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. अवयवदानाने मृत्यूच्या उंबरठ्यावर असणाऱ्यांना जीवन जगण्याची संधी मिळू शकते. मृत्युनंतरही आपण अवयवदानाच्या स्वरुपात दुसऱ्याच्या शरीरात जिवंत राहू शकतो. अवयवदानाच्या या उदात्त कार्याला जात, धर्म, लिंग यांचे बंधन नाही. यामुळे अवयवदानासाठी मोठ्या प्रमाणात पुढे यावे, असे आवाहन या महारॅलीद्वारे करण्यात आले.

छत्रपती राजर्षि शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय, जगद्‍गुरु पंचाचार्य होमिओपॅथिक महाविद्यालय, वेणूताई चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, डी. वाय. पाटील मेडीकल कॉलेज, सावित्रबाई फुले नर्सिंग कॉलेज, शिवाजी विद्यापीठातील एनएसएस विभाग, देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, महावीर महाविद्यालय, शहाजी छत्रपती महाविद्यालय, कोल्हापूर मेडीकल असोसिएशन यांचा रॅलीत सहभाग होता.

रॅली दसरा चौकातून पुढे आईसाहेब महाराज पुतळा, बिंदू चौक, शिवाजी पुतळा, महापालिका, सीपीआरमार्गे दसरा चौकात आली. यावेळी शासकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. रॅलीनंतर सावित्रीबाई फुले महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्येही रॅलीचे आयोजन करण्यात आले. या अभियानांतर्गत विविध महाविद्यालयांत निबंध, वक्तृत्व आणि रांगोळी स्पर्धा होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कोल्हापुरी ब्रॅड ग्लोबल करू

$
0
0

बेटर व्हॅल्यू ब्रँडस् यांच्या सहयोगाने एसकेआर मल्ट‌िफॉरमॅट ग्लोबल रेस्टॉरंट चेन सुरू करून भारतातील सर्वात मोठी कंपनी होण्याचा बहुमान मिळवला आहे. भारतीय आणि पाश्चित अशा दोन्ही खाद्य संस्कृतीचा मिलाफ साधत 'द यलो चिली' व 'हाँगकाँग' रेस्टॉरंटच्या माध्यमातून कोल्हापुरातील खवय्यांची भूक भागवणार आहेत. अमेरिका सारख्या प्रगत देशात हळदी दुधाने नवी क्रेज निर्माण केली आहे. देशाची चौफेर प्रगतीमुळे 'जमाना हमारा है' असा खास विश्वास व्यक्त करत खाद्यपदार्थ्यांच्या माध्यमातून जगावर राज्य करण्यासाठी सज्ज असून चेन रेस्टॉरंटच्या माध्यमातून कोल्हापुरातील खाद्य संस्कृती जगात पोहोच‍वणार असल्याचे मास्टर शेफ संजीव कपूर यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' ला सांगितले.

'द यलो चिली'चे वैशिष्ट्य काय?

'द यलो चिली'च्या माध्यमातून भारतासह इतर देशात रेस्टॉरंट चेन निर्माण केली आहे. रेस्टॉरंटच्या माध्यमातून वैशिष्ट्यपूर्ण चवीसाठी ओळखणारी भारतीय खाद्यसंस्कृती पोहोचवली जात आहे. केवळ खाद्यसंस्कृतीचा प्रसार न करता जागतिक दर्जाच्या सेवाही दिल्या जात आहेत. उत्तर व पश्चिम भारताच्या खास मुघल व पंजाबच्या वैशिष्ट्यपूर्ण प्रांतांच्या चवीचा मिलाफ यामध्ये दिसून येणार आहे. यामध्ये विशेषता: शाम-सवेरा, लल्ला मुस्सा दाल, तंदुरी बेझील प्रॉन्स, लाँटेन्स रोड तंदुरी मुर्ग, चांदी कलीया, रान बुझकाझी आदी पदार्थांचा समावेश आहे.

हाँगकाँग हे नामकरण कसे केले?

आशियाई खंडातील स्वादिष्ट चवीचं माहेरघर म्हणून हाँगकाँगची ओळख आहे. हाँगकाँग स्ट्रीट फूडमध्ये सुप्रसिद्ध आहे. देशाची हे स्पेशालिटी असल्याने रेस्टॉरंटला हाँगकाँग असे नाव दिले आहे. हाँगकाँग रेस्टॉरंटमध्ये आपल्या काही खास डिशेस कोल्हापुरातील खवय्यांना उपलब्ध होणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने ब्रोकोली वीथ, टोफू डिमसम्, हर गुआ डिम्-सम्, ग्रील स्टाइल गई-यांग, क्रंची नटस्, क्रिस्पी लॅम्ब अशा किती तरी डिशेस कोल्हापूर वासियांच्या सेवेत हजर होणार आहेत.

कोल्हापूरच्या खाद्य परंपरेशी कसे एकरुप होणार?

कोल्हापूर हे खाद्य परंपरेचे शहर आहे. येथे कोपऱ्या-कोपऱ्यावर वेगवेगळ्या चवींच्या डिशेस उपलब्ध होतात. यातील काही डिशेसची राष्ट्रीय पातळीवर ओळख निर्माण झाली आहे. रेस्टॉरंटच्या माध्यमातून उत्तर भारतीय व आशियाच्या सर्वच क्षेत्रातील स्वाद सजावटीसह उपलब्ध करून दिला आहे. जो कोल्हापुरात दिसत नाही. त्यामुळे येथील खाद्य पदार्थांना स्वत:चा टच देत नव्या व्हरायटीचा भर टाकली जाणार आहे. कोल्हापुरातील खाद्य संस्कृतीला विचारात घेऊनच येथे फ्रँचाइजी देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्याप्रमाणे इतर देशातील खाद्यपदार्थ कोल्हापूर वासियांची भूक शमवणार आहेत, त्याचप्रमाणे चेन रेस्टॉरंटच्या माध्यमातून कोल्हापुरातील खाद्यपदार्थ जगभर पोहोचवणार आहे.

चेन रेस्टॉरंट संकल्पना काय आहे ?

बेटर व्हेल्यू ब्रँडस् यांच्या सहयोगाने संजीव कपूर रेस्टॉरंट (एसकेआर) ही मल्ट‌िफॉरमॅट ग्लोबल रेस्टॉरंट चेन सुरू केली आहे. भारतातील ही आघाडीची कंपनी आहे. कंपनीच्या आठ ब्रँडस् ११ विविध देशात आणि ४७ शहरामध्ये ७३ रेस्टॉरंटच्या रुपात कार्यरत आहेत. प्रत्येक शहरात रेस्टॉरंटने व्यावसायाची वेगळी ओळख निर्माण केली आहे. याच चेनमधील 'द यलो चिली' व 'हाँगकाँग' या दोन ब्रँडची रेस्टॉरंट कोल्हापुरात सुरू केली आहेत. ही दोन्ही रेस्टॉरंट कोल्हापूरात आपले वेगळे अस्तित्व निर्माण करुन चेन रेस्टॉरंटमधील एक आदर्श ठरेल.

स्पॅनिश फूड क्लचरला आव्हान देणार ?

जगात सर्वात मॉडर्न रेस्टॉरंट स्पेन देशात आहेत. त्यामुळे स्पॅनिश फूड क्लचर निर्माण झाले आहे. स्पेन देशाने संस्कृतीमधील खाद्यपदार्थांना मॉडर्न टच दिला आहे, त्यामुळे स्पॅनिश फूड क्लचरचा गवगवा होत आहे. याउलट स्थिती भारतीयांची असून आपण संस्कृतीच्या मागे जातो. आपल्याही खाद्य संस्कृतीला मॉडर्न टच द्यावा लागेल. यासाठीच आपण चेन रेस्टॉरंटची स्थापना केली असून यामाध्यमातून स्पॅनिश फूड क्लचरला आव्हान देणार आहे.

मारुती पाटील

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मूर्तींनी सजले स्टॉल

$
0
0

satish.ghatage@timesgroup.com

कोल्हापूर ः एकीकडे गणेशमूर्तींवर शेवटचा हात फिरणारा कलाकारांचा ब्रश, घरकाम आवरून डायमंड आणि लेस लावण्यासाठी महिलांची लागलेली धांदल, तयार मूर्ती शिस्तबद्ध रांगेप्रमाणे स्टॉलवर मांडून भाविकांना दाखवण्याबरोबरच मूर्तीचे बुकिंग करून घेण्याची लगबग असे चित्र पापाची तिकटी कुंभार गल्ली परिसरात पाहायला मिळत आहे. भाविकांना ठरलेल्या वेळेत मूर्ती मिळावी, यासाठी दिवसाचे १८ तास कुंभारगल्लीत काम सुरू असल्याचे चित्र आहे.

शनिवार पेठ आणि पापाची तिकटीच्या मधोमध असलेली जुन्या शहरातील मूळची कुंभार गल्ली. ही गल्ली पापाची तिकटी, दत्त गल्ली, ऋणमुक्तेश्वर, गंगावेश, धोत्री गल्लीपर्यंत विस्तारली आहे. कुंभारांच्या घराघरांत मूर्ती तयार करण्याचे काम सुरू आहे. परिसरातील कुंभाराचे कारखाने बापट कॅम्प येथे असल्याने मूळ घर आणि कारखाना अशा दोन्ही गोष्टी त्यांना सांभाळाव्या लागत आहेत. कुंभार गल्लीतील बहुतांशी माहिलांना दोन्हीकडे काम करावे लागत आहे.

प्रसिद्ध मूर्तिकार हरी माजगांवकर यांच्या नातसून रूपाली माजगांवकर सांगतात, 'तयार झालेल्या मूर्ती स्टॉलवर मांडल्या आहेत. या मूर्तींना लेस लावणे, डायमंड लावण्याचे काम करावे लागते. रोज पहाटे पाच वाजता उठावे लागते. घरातील धुणीभांडी, मुलांना शाळेत सोडणे, जेवण करून बापट कॅम्प येथे जावे लागते. तिथे काम करून रात्री नऊला परत येऊन जेवण करावे लागते. त्यानंतर पुन्हा घरातील मूर्ती रंगवायला लागतात. आठवडाभरात केवळ चार ते पाच तासच झोप मिळते.'

घरातील पुरूषांनाही कुंभार गल्ली आणि बापट कॅम्प या दोन्ही गोष्टीकडे लक्ष द्यावे लागते. परगावच्या ऑर्डर पूर्ण करण्यासाठी रात्रीचा दिवस सुरू आहे. सार्वजनिक मंडळांच्या मोठ्या मूर्तींची देण्यासाठी कामगारांनी नियोजन केले आहे. गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी हरितालिकेला जी मंडळे मूर्ती नेणार आहेत त्या मूर्ती तयार करण्याला प्राधान्य दिले जात आहे. प्रसिद्ध मूर्तिकार टी.के. वडणगेकर यांचे नातू महेश वडणगेकर यांनी महालक्ष्मी भक्त मंडळाची तर रणधीर वडणगेकर यांनी तटाकडील तालीम मंडळाची पाच फूट उंचीची शाडूची मूर्ती तयार केली आहे. या मूर्तीचे रंगकाम शुक्रवारी सुरू केले जाणार आहे. महेश व रणधीर यांच्या आई सुभद्रा वडणगेकर यांनी गणोबाच्या मूर्ती तयार करून त्या विक्रीला ठेवल्या आहेत.

प्रत्येक कुंभार समाजाच्या पहिल्या खोलीत म्हणजे पहिल्या सोप्यात मूर्ती विक्रीसाठी स्टॉल मांडले आहेत. तीन ते चार पायऱ्यांच्या स्टॉलवर आकर्षक पद्धतीने मूर्ती मांडल्या आहेत. भाविक मूर्ती पाहून जात आहेत तर काहीजण ठरवतही आहेत. मूर्तीचे बुकिंग झाले की तिची जागा दुसरी मूर्ती घेतले. माजी महापौर मारूतराव कातवरे यांचे पुतणे सुरेश कातवरे यांनी रस्त्यांवर लोखंडी सांगाडा तयार करून मूर्ती विक्रीसाठी स्टॉल मांडला आहे. त्यांच्याकडे शाडू आणि चिखलाच्या १५० मूर्ती आहेत. राजारामपुरीतील स्टॉलला प्रतिसाद मिळाला नसल्याने त्यांनी कुंभार गल्लीतील मूर्ती विकण्याचा निर्णय घेतला आहे.

एकीकडे मूर्ती विक्रीचे काम सुरू असताना दुसरीकडे शाडूच्या मूर्ती रंगवायला सुरूवात झाली आहे. वॉटर कलरने शाडूची मूर्ती उत्सवापूर्वी चार ते पाच दिवस आधी रंगवावी लागते, अशी माहिती नारायण पाडळकर यांनी दिली. वॉटर कलर मिळत नसल्याने बळू कलर म्हणजे दगडावर खडू उगळून त्यात रंग मिसळून शाडूची मूर्ती रंगवतो, असे त्यांनी सांगितले. पण पुढील वर्षी बळू कलर मिळत नसल्याने रासायनिक रंग वापरावे लागणार आहेत. शाडूची मूर्ती जड असल्याने उचलताना त्रास होतो. कमरेचा त्रास असल्याने डॉक्टरांनी जड वस्तू उचलू नये, असा सल्ला दिला आहे. त्यामुळे भविष्यात शाडूच्या मूर्ती तयार करायच्या की नाही हे ठरवण्याची वेळ आली आहे.

नारायणरावांचे थोरले बंधू विष्णू पाडळकर म्हणाले, 'शाडूची मूर्ती बनवण्याची आमची इच्छा आहे. पण जोतिबावर उत्खनन करू देत नसल्याने दर्जेदार शाडू मिळत नाही. सरकारही शाडू उपलब्ध करून देत नाही. दुसरीकडे जिल्हाधिकारी शाडूच्या मूर्तीची पूजा करा, असे सांगतात. एकीकडे उत्खननाला बंदी तर दुसरीकडे शाडूची मूर्ती पूजा करा, असे दुहेरी धोरण सरकार राबवत आहे. शाडूची मूर्ती हा कुटिरोद्योग मानून सरकारने मदत करावी अशी मागणीही त्यांनी केली.

दोघी बहिणी करतात मूर्ती

भावाचे निधन झाल्याने आणि भाचा लहान असल्याने सुवर्णा बळीराम पुरेकर व संगिता कृष्णात वडगांवकर या दोघी बहिणी भावाच्या घरातील मूर्ती तयार करतात. संगिता वडगांवकर या दत्त गल्लीत राहतात. घरातील काम आवरून त्या गेल्या तीन महिन्यांपासून भावाच्या घरातील मूर्ती तयार करत आहेत. दोघी बहिणींनी शाडूच्या मूर्ती तयार केल्या आहेत.

०००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षक बँकेत महापालिकेचा फॉर्म्युला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

प्राथमिक शिक्षक बँकेच्या सत्ताधारी गटातील उर्वरित अकरा संचालकांना चेअरमनपदाच्या मांडवाखालून घालवण्यासाठी विद्यमान पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेतल्याचे समजते. त्यामुळे महापालिकेचा एक वर्षाचा की त्यापेक्षा कमी कालावधीचे चेअरमन, व्हाइस चेअरमन होणार हे लवकरच समजणार आहे. यासाठी सुकाणू समिती व संचालकांची लवकरच बैठक होणार आहे. त्यानंतर फॉर्म्युला निश्चित केला जाणार आहे.

शिक्षक बँकेत गेल्या वर्षभरापासून सत्ताधारी व विरोधकांमध्ये शीतयुद्ध सुरू आहे. गेल्या पंचवार्षिकमध्ये झालेल्या कारभाराचे मुद्दे उपस्थित करत सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. शिक्षक संघाचे बारा तर पुरोगामी पॅनेलचे तीन व शिक्षक समितीचे दोन अशी संचालक मंडळाची संख्या आहे. सत्तारुढ शिक्षक संघाची सुकाणू समिती आहे. संचालक मंडळातून पदाधिकारी होण्याची संधी देण्यासाठी या समितीसमोर यापूर्वी चर्चा होऊन नावे निश्चित केली आहेत. गेल्या वर्षभरात झालेल्या कारभाराच्या आरोपांवरुन सर्वसाधारण सभेमध्ये मोठा गोंधळ होण्याची शक्यता होती. मात्र ही सभा शांततेत झाली.

सुकाणू समितीमध्ये ठरल्याप्रमाणे सध्याचे चेअरमन राजमोहन पाटील, व्हाईस चेअरमन बाजीराव कांबळे तसेच तज्ज्ञ संचालक राजाराम वरुटे यांनी रविवारी संचालक मंडळासमोर राजीनामे सादर केले. यापाठीमागे नवीन संचालकांना पदाधिकारी होण्याची संधी देण्याचा विचार असला तरी सत्तारुढमध्ये काही धुसफूस असल्याची चर्चा आहे. मात्र काही संचालक चेअरमन होण्यासाठी प्रचंड इच्छुक आहेत. त्यांच्यासाठी बँकेमध्ये नवीन पद्धती अवलंबली जाण्याची शक्यता आहे. ११ संचालक असून त्या सर्वांना चेअरमनपदाची संधी द्यायची झाल्यास चार महिन्याचाही कालावधी येणार नाही. त्यामुळे बँकेचा कारभार कसा चालवणार हा प्रश्न आहे. सध्या विद्यमान पदाधिकाऱ्यांचे राजीनामे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे पाठवून त्यांच्याकडून नवीन निवडीच्या तारखेची प्रतीक्षा केली जात आहे. तारीख आल्यानंतर सुकाणू ​समिती व संचालक मंडळ एकत्रित बसून नवीन पदाधिकाऱ्यांबाबत व कालावधीबाबत निर्णय घेणार आहेत. यामुळे शिक्षक बँकेची वाटचाल महापालिकेतील राजकारणाच्या दिशेने सुरू असल्याचे दिसते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘उत्पन्न प्रकटीकरण योजनेचा लाभ घ्या’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'आयकर विभागाच्या वतीने उत्पन्न प्रकटीकरण योजना २०१६ लागू करण्यात आली आहे. त्यात स्थावर मालमत्तेच्या मूळ व्यवहाराच्या रकमेवरील कॉस्ट इंन्फ्लेशन इंडेक्सप्रमाणे त्याची किंमत ठरवून त्यावरील कर तीन टप्प्यांत भरण्याची मुभा देण्यात आली आहे. सर्व सामान्यांना या योजनेचा लाभ घ्यावा', असे आवाहन आयकर विभागाचे प्रिन्सिपल कमिशनर के. आर. मेघवाल यांनी आज येथे केले.

आयकर विभागाच्या योजनांची माहिती देण्यासंदर्भात तसेच त्यासंदर्भातील शंकांचे निरसन करण्यासाठी उद्यमनगरमध्ये इंजिनीअरिंग असोसिएशनच्या रामभाई सामाणी सभागृहात विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मेघवाल बोलत होते. चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रिज, कोल्हापूर इंजिनीअरिंग असोसिएशन, शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ कागल-हातकणंगले, फाउंड्री मेन इन्स्टिट्यूट ऑफ कोल्हापूर यांच्या वतीने या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

मेघवाल म्हणाले, 'एखाद्या मालमत्तेचे उत्पन्न प्रकटीकरण करताना पूर्वी त्या मालमत्तेच्या सध्याच्या किंमतीचा विचार केला जात होता. मात्र, सरकारने १८ ऑगस्ट रोजी जाहीर केलेल्या योजनेत संबंधित मिळकत अथवा स्थावर मालमत्ता २०१६पूर्वी खरेदी केली असेल, तर त्याचे उत्पन्न प्रकटीकरण करताना त्या मालमत्तेच्या खरेदी रकमेवर ४५ टक्के कर भरता येणार आहे. विशेष म्हणजे सरकारने या योजनेत कराची रक्कम तीन टप्प्यांत भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार कराच्या रकमेची पहिली २५ टक्के रक्कम ३० नोव्हेंबरपूर्वी, त्यानंतर दुसरी २५ टक्के रक्कम ३१ मार्च २०१७ पूर्वी आणि उर्वरित ५० टक्के रक्कम ३० सप्टेंबर २०१७पूर्वी भरता येणार आहे.'

दरम्यान, ही योजना असूनही मालमत्ता दडविल्यास आयकर विभागाकडे माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे देशातील सर्व व्यवहारांची माहिती असल्याने संबंधितांवर तातडीने कारवाईची पावलेही उचलली जाऊ शकतात, असा इशाराही मेघवाल यांनी दिला. कार्यक्रमात आयकर विभागाचे जॉइंट कमिश्नर (रेंज वन) एम. के. बिजू, जॉइंट कमिश्नर (रेंज टू) एस. पी. वाळिंबे, असिस्टंट कमिशनर (सर्कल वन) महेश शिंगटे यांनीही मार्गदर्शन केले.

कार्यक्रमास उद्योजक, व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रिजचे उपाध्यक्ष संजय शेटे, मॅकचे अध्यक्ष संजय जोशी, इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन फाउंड्रीमेनचे संजय पाटील आदी प्रमुख उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक शेटे यांनी केले. महेश धर्माधिकारी यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाडूच्या मूर्तींना मागणी दुप्पट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पाण्याचे प्रदूषण कमी करण्यासाठी गणेशमूर्ती प्लास्टरऐवजी शाडूमध्ये बनवण्याच्या चळवळीला यंदा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. शाडूच्या मूर्ती बनवणाऱ्या कुंभारांची संख्या गेल्यावर्षीच्या तुलनेत दुप्पट झाली आहे. त्यामुळे गेल्या वर्षी मूर्ती बनवण्यासाठी ६० टन शाडूचा वापर झाला होता. यंदा तब्बल ९० टनावर पोहचला आहे. यामुळे मूर्तींच्या संख्येमध्येही प्रचंड वाढ झाली आहे. कुंभारांनाही हा अनपेक्षित धक्का असून पुढील वर्षी हे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवण्यात येणाऱ्या गणेशमूर्ती व त्यांना दिले जाणारे रासायनिक रंग यामुळे वाढणारे पाणीप्रदूषण कमी करण्यासाठी निसर्गमित्र संस्थेच्यावतीने पुढाकार घेतला. २००१ पासून ही चळवळ सुरू केली जात असताना कुंभार गल्लीतील कमलाकर आरेकर यांना सोबत घेऊन शाडूच्या गणेशमूर्ती करण्यास सुरुवात केली. त्यावेळी १०० नागरिकांनी या मूर्तीची नोंदणी केली होती. निसर्गमित्र संस्थेच्या पुढाकाराने सुरू असलेल्या या चळवळीला हळूहळू प्रतिसाद वाढत गेला. कमलाकर व त्यांच्या बंधूंनी शाडूच्या मूर्ती बनवण्यास सुरुवात केली. शाडू उपलब्ध होत नसल्यामुळे अनेक कुंभारांनी शाडूच्या मूर्ती बनवणे टाळले होते. पण गेल्या दहा वर्षांच्या कालावधीत पाणी प्रदूषणामुळे होणारे परिणाम नागरिकांना दिसू लागल्यानंतर शाडूच्या मूर्तींकडे वळण्याचे प्रमाण वाढत होते.

जिल्ह्यातील कुंभारांनी गेल्या वर्षी ६० टन शाडूची मागणी नोंदवली होती. या शाडूमधून तयार होणाऱ्या मूर्ती परजिल्ह्यातही पाठवण्यात येत होत्या. यंदा मात्र ही मागणी ९० टनावर पोहचली आहे. २५ किलोच्या एका पोत्यामध्ये एक फुटाच्या चार मूर्ती बनवल्या जातात. शंभर किलोतून १६ मूर्ती बनतात. ९० टन शाडूतून जवळपास १५ हजारपर्यंत गणेशमूर्ती होऊ शकतात. हे प्रमाण कुंभारांच्यादृष्टीने अनपेक्षितच आहे.

सध्या शाडूच्या नऊ इंच गणेशमूर्तीची किंमत २५० रुपयापासून पुढे आहे तर दीड फुटापर्यंतची मूर्ती १७०० रुपयांना ​आहे. गेल्या पंधरा वर्षातील पर्यावरणपूरक गणेशमूर्तींची मागणी वाढली आहे हे शाडू तसेच मूर्तींच्या मागणीवरुन दिसत आहे.

इतक्या मोठ्या प्रमाणावर शाडूची झालेली मागणी पाहता नागरिकांकडून शाडूच्या मूर्ती घेतल्या जात असल्याचे दिसते. माझ्याकडे कायम शाडूच्या मूर्ती घेणारे ७०० शहरवासिय आहेत. यंदा २५०० नागरिकांनी मागणी केली आहे. हे प्रमाण पाहून आम्हालाही आश्चर्य झाले आहे. पुढील वर्षीही हे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता आहे.

कमलाकर आरेकर, मूर्तिकार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images