Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

दुसऱ्या गुन्ह्यात पोळला पोलिस कोठडी

$
0
0



सातारा :

वाई हत्याकांडाप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत २७०० जणांचे पंचनामे केल्याची माहिती पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी दिली आहे. आरोपी संतोष पोळने सात खून केल्याची कबुली दिली होती.

पोळने केलेल्या सात हत्यांचा पोलिस अतिशय बारकाईने आणि योग्य दिशेने तपास करीत आहेत. या सर्व हत्यांमागे पैसे किंवा सोन्याचा हव्यास ही कारणे असावीस असा अंदाजही नांगरे-पाटील यांनी व्यक्त केला आहे. १३ वर्षांत सात खून पडले, तरीही डॉ. संतोष पोळ मोकाट होता. मात्र डॉ. पोळचे दिवस भरले तेच अंगणवाडी सेविका संघटनेच्या राज्याध्यक्ष मंगल जेधे गायब झाल्या त्या दिवशी. १६ जून २०१६ला मंगल जेधे घरी परतल्या नाहीत, त्यामुळे कुटुंबाने पोलिसात तक्रार दिली आणि हाती लागला सर्वात मोठा पुरावा. अर्थात संतोष पोळची मैत्रीण आणि साथीदार ज्योती मांढरे.

संतोष पोळ याला सलमा शेख खून प्रकरणात शनिवारी पोलिसांनी ताब्यात घेऊन कोर्टात हजर केले असता कोर्टाने १ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. तर ज्योती मांढरे हिला शुक्रवारी पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गटबाजीचा तमाशा बंद करापतंगराव कदम यांनी सांगलीच्या कारभाऱ्यांना फटकारले

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सांगली

'निवडणुकीत निवडून द्या, म्हणून सांगायला आम्ही पुढे व्हायचे आणि निवडून आल्यावर तुमचे मागचे तेच पुढे चालणार असेल तर ते खपवून घेणार नाही. निधी वाटपात गोंधळ नको आहे. तुमचा गटबाजीचा तमाशा बंद करा,' अशा स्पष्ट शब्दात कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांनी महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांना फटकारले.

सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेच्या स्थायी समितीच्या आठ सदस्यांची निवड एक सप्टेंबरला होत आहे. यामध्ये सत्ताधारी काँग्रेसच्या तीन नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी डॉ. कदम यांच्या निवासस्थानी कॉँग्रेसच्या पदाधिकारी, नगरसेवकांची बैठक झाली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना कदम म्हणाले, 'पदाधिकाऱ्यांबरोबर आयुक्तांनाही बैठकीत बोलविले होते. त्यांच्याकडून विकासकामांचा आढावा घेतला. नगरसेवकांशी चर्चा केल्यानंतर निधीवाटपात दुजाभाव होत असल्याचे समोर आले. त्यामुळे गटबाजीचा तमाशा बंद करा, समान निधी वाटप झाला पाहिजे. पक्षाच्या सदस्यांनी पक्षाबरोबर चर्चा करून आपल्या अडचणी सांगितल्या पाहिजेत. बाहेर चर्चा करून काहीच उपयोग होणार नाही. अनेक जण मतांसाठी पालं उभी करतात, अशी पालं आपण आजवर खूप बघितली आहेत. भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यावर सत्ताधारी गप्प बसतात. त्याने वस्तूस्थिती मांडली पाहिजे. महापौर हारुण शिकलगार अनुभवी आहेत. आयुक्तांशी चर्चा केली असल्याने पायाभूत सुविधांचे प्रश्न मार्गी लागतील. स्थायीच्या तीन जागांवर कोणाला संधी द्यायची, असे अद्याप निश्चित झालेले नाही.'

--------- -

खासगी संस्थांचे शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग काम

खासगी शिक्षण संस्थांमधील प्रवेशाला 'नीट'चे बंधन लागू केल्याबाबत विचारले असता कदम म्हणाले, सरकारने यात लक्ष घालणे गरजेचे आहे का? असा प्रश्न पडला आहे. अगदी टिळक-आगरकरांपासून खासगी संस्थांनी शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग काम केले आहे. सरकार एक नया पैसा देत नसतानाही अनेक संस्था चांगल्या चालल्या आहेत. परंतु, हे सरकार ताम्रपट घेऊन आल्यासारखे स्वतःला मानून कायदे करण्याचा प्रयत्न करीत आहे. आज घडीला ६० हजार जागा विविध महाविद्यालयात रिक्त आहेत. त्या जागा भरायला विद्यार्थी मिळत नसताना कोण प्रवेशासाठी पैसे देईल. उगीच संशय घेऊन चांगल्या संस्थांमध्ये सरकारने ढवळाढवळ केली तर संस्थांना कोर्टात जाण्याचा पर्याय आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर

आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कोअर कमिटीची बैठक होत आहे. त्यामध्ये राज्यातील सर्वच जागांचा आढावा घेण्यात येईल. त्यानंतर कोणती जागा कोणी लढवायची, हे ठरेल. सांगली आणि साताऱ्याबाबतीतही चर्चा होणार आहे. ही जागा सांगलीला मिळाली पाहिजे, असा आग्रह आहे. आगामी नगर पालिका, महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका काँग्रेसने स्वबळावर, पक्षाच्या चिन्हावर लढण्याचा निर्णय घेतल्याचेही कदम यांनी यावेळी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूरच्या विकासाला नवी दृष्टी

$
0
0

gurubal.mali@timesgroup.com
कोल्हापूर: हद्दवाढ, विमानतळ, फाउंड्री क्लस्टर, आय. टी. पार्क, उदयोगांना सवलती, गूळ, चप्पल आणि गारमेंट क्लस्टर... किती वर्षे तरी कोल्हापूरची आंदोलने आणि चर्चा याच प्रश्नाभोवती फिरत आहे. पण तांबडा पांढरा रस्सा, दूध कट्टा, रंकाळा या पलिकडं जाणार कधी? असा सवालही यानिमित्तानं उपस्थित केला जातो. कोल्हापूरच्या विकासासाठी आता या पलिकडं जात संकुचित वृत्ती झटकून विकासाची नवी दृष्टी दिली ती 'मेक इन कोल्हापूर' अंतर्गत घेण्यात आलेल्या मटा कॉन्क्लेवमध्ये. विकासाची दृष्टी नेमकी कोणती, ती कशी असावी, त्यासाठी नेमके काय करायला हवे, त्यासाठी धोरण काय असावे, याबाबत या कॉन्क्लेवमध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली आणि मार्गही शोधण्यात आले.

मेडिकल हब, टुरिझम हब, फाउंड्री हब, शैक्षणिक हब, गारमेंट हब अशा अनेक मागण्या कोल्हापुरात वर्षानुवर्षे सुरू आहेत. हद्दवाढ, विमानतळ यासह अनेक प्रश्नासाठी वर्षानुवर्षे आंदोलने सुरू आहेत. आंदोलनाची झालेली सवय आणि कोल्हापूरची निर्माण झालेली आंदोलननगरी म्हणून इमेज, यामुळे होत असलेले नुकसान याची जाणीव कुठेतरी होण्याची गरज आहे. संकुचित वृत्तीने विकासाचे तीन-तेरा वाजत आहेत. अशावेळी कोल्हापूरचा विकास का थांबला आहे, विकासाचे अडथळे नेमके कोण आहेत, ​राजकीय ताकद कमी का पडत आहे, या पार्श्वभूमीवर विकासासाठी नेमक काय करायला हवे 'मेक इन कोल्हापूर ' हा उपक्रम 'मटा' ने राबवला. कोल्हापूरच्या विकासात आणि निर्णयप्रक्रियेत जे जे मान्यवर आहेत, त्यांना एका व्यासपीठावर आणत संवादाची आणि वाटचालीची नवी दृष्टी दिली.

केवळ उद्योगच नव्हे तर जिल्ह्याचे जे जे प्रलंबित प्रश्न आहेत ते सुटण्यासाठी नेमके काय करायले हवे याबाबत आंदोलनाच्या पलिकडे जात निर्णय घेणाऱ्या समवेत चर्चा होणे अपेक्षित होते. यामुळे उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील या दोन्ही मंत्र्यांना 'मटा' ने आमंत्रित केले. केवळ उद्योजकच नव्हे तर डॉक्टर, बिल्डर, अनेक क्षेत्रातील व्यावसायिक, प्रशासनातील अधिकारी, राजकीय पक्षाचे प्रमुख पदाधिकारी यांना एका व्यासपीठावर आणून त्यांच्याशी संवाद साधण्यात आला. कोल्हापूरचे नेमके प्रश्न आणि कोल्हापूरकरांची ताकद या दोन्हीची या व्यासपीठावर चर्चा झाली. उपस्थितांनी प्रश्न मांडतानाच अपेक्षाही व्यक्त केल्या. आता चर्चा फार झाली, कृती करण्याचीच ही वेळ आहे हे ठासून सांगण्यात आलं. नेमक विकासात अडथळा कुणाचा याची जाहीर चर्चा झाली, ज्यामुळे काहींचे डोळे उघडायला मदत झाली.

कोल्हापुरात प्रलंबित असलेल्या साधारणता ऐंशीपेक्षा अधिक छोट्यामोठ्या प्रश्नांचा उहापोह मंत्र्यांसमोर झाला. विमानसेवा, फाउंड्री हब, फाउंड्री क्लस्टरसाठी जादा निधी, गूळ, चप्पल गारमेंट, ज्वलेरी क्लस्टर, मुंबई बेंगळुरू कॉरिडॉरमध्ये कोल्हापूरचा समावेश, आय टी पार्कसाठी नवीन योजना, कर्नाटकात सुरू असलेले उद्योजकांचे स्थलांतर, समान वीज दर, लघू व मध्यम उद्योग विस्तारात काही सवलती, कृषी पुरक उद्योगांना चालना, गुळ, साखर व कृषी उत्पादनासाठी कोल्ड स्टोअरेज, पर्यटन विकास, स्कील इंडिया योजनेत कोल्हापूरचा समावेश असे अनेक प्रश्न मंत्र‌िमहोदयासमोर मांडण्यात आले यामध्ये उद्योग संदर्भातील अतिशय महत्त्वाचे १५ पेक्षा अधिक प्रश्न होते. विशेष म्हणजे यातील सर्व प्रश्नांना उद्योगमंत्री देसाई यांनी आपल्या भाषणात स्पर्श केला. केवळ स्पर्श नव्हे तर काही प्रश्नांची तड लावण्यासाठी आवश्यक त्या घोषणा केल्या. जे जे तातडीने करता येणे शक्य आहे, ते सर्व करण्याची ग्वाही त्यांनी दिली. कोल्हापूरचे प्रश्न मार्गी लावण्यात आपण निश्च‌ित प्रयत्न करू, असे आश्वासन देताना यासाठी १५ दिवसांत मंत्रालयात खास संयुक्त बैठक घेण्याची घोषणा केली. सार काही सरकार देणार नाही, ती अपेक्षाही करू नका पण जे जे देता येणे शक्य आहे, त्यामध्ये सरकार कुठेच कमी पडणार नाही, असे म्हणत उद्योगांना बळ देण्याची ग्वाही तर दिलीच शिवाय नवी दृष्टी​देखील.

कोल्हापूरच्या संकुचित विचारांना महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी चांगलाच चिमटा घेतला. किती दिवस तांबडा आ​णि पांढरा रस्सा, दूध कट्टा याबाबत सांगत बसणार? यातून बाहेर कधी पडणार, प्रत्येक सकारात्मक बाबीला विरोध किती दिवस करणार, आंदोलकांचे शहर ही कोल्हापूरची इमेज कधी ​बदलणार? असा थेट सवाल या कार्यक्रमात करण्यात आला. शहराचा विकास व्हायचा असेल तर संकुचित वृत्ती सोडून दयायलाच हवी, असे खडेबोल सुनावले. विकासाची नवी दृष्टी आता शोधायला हवी ही अपेक्षा व्यक्त करण्यात आली. 'मेक इन कोल्हापूर' म्हणत असताना विकासाची हीच नवी दृष्टी अपेक्षित होती. जी या कार्यक्रमाने मिळाली. त्याच त्या प्रश्नावर आंदोलन आणि चर्चा करत बसण्यापेक्षा मार्ग काढत विकासाचा नवा पूल बांधण्याचा मंत्र या कार्यक्रमाने दिला.

राजकीय इच्छाशक्ती आणि जनतेची सामूहिक ताकद एकवटली, संकुचित वृत्ती सोडली तर प्रश्न सुटण्यास फार काळ लागणार नाही हे 'मेक इन कोल्हापूर 'ने दाखवून दिले. 'मेड इन कोल्हापूर'ला योग्य मार्केटिंग केल्यास हे सहज शक्य आहे याबाबत उहापोह झाला. प्रश्नावर केवळ चर्चा न करता ते सोडवण्यासाठी एक नवे व्यासपीठ मटाने कोल्हापूरकरांना दिले. मंत्र्यांच्या आणि उपस्थितांच्या सकारात्मक दृष्टीने विकासाची नवी दिशा देण्याचे काम केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सफरचंदांची आवक वाढली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गेल्या दोन आठवड्यांपासून भाज्यांची आवक वाढत असल्याने दरांची घसरण सुरूच आहे. सफरचंदाची आवकही मोठ्या प्रमाणावर झाल्याने दर उतरले आहेत. सत्तर रुपये किलोपासून सफरचंद उपलब्ध असून सणांच्या पार्श्वभूमीवर मागणीही वाढलेली आहे. चांगल्या प्रतीचा कांद्याचा दरही कमी झाला आहे. यामुळे सामान्य नागरिकांच्यादृष्टीने या आठवड्यातील बाजारभाव दिलासा देणारेच ठरले आहेत.

श्रावण महिन्यामध्ये भाज्यांना मागणी वाढणार असल्याने दर वाढण्याची शक्यता असते. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पालेभाजींचे दर वाढलेही होते. पण त्यानंतर मोठ्या प्रमाणावर आवक झाल्याने पालेभाज्यांचे दर कमी होऊ लागले. गेल्या आठवड्यात पालकचे प्रमाण बाजारात फारसे नव्हते. पण या आठवड्यात मोठी आवक झाल्याने त्यांचे दर गडगडले आहेत. पाच रुपयांना एक पेंडी मिळत आहे. याबरोबर वांग्याचे दरही निम्म्यावर आले ओहत. गेल्या आठवड्यात साठ रुपयांवर असलेली वांगी आता ३० रुपये किलो झाली आहेत. दोडक्याचेही दर निम्म्यावर आले आहेत. हिरवा वाटाण्याचा दर १०० रुपयांवर होता. तोही या आठवड्यात ८० रुपयापर्यंत खाली आला आहे. भाज्यांच्या दरामध्ये घसरण असल्याने सामान्य नागरिकांना ऐन श्रावणामध्ये भाज्यांचा आस्वाद घेण्याचा आनंद मिळत आहे.

भाज्यांबरोबर फळ मार्केटमध्येही वातावरण आनंदाचे आहे. सफरचंदाची आवक मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आहे. शहरातील बाजारामध्ये ठिकठिकाणी सफरचंदाचे वाढलेले प्रमाण जाणवत आहे. १२० रुपयांना मिळणारे सफरचंद आता ७० रुपयापर्यंत उपलब्ध झाले आहे. सध्या श्रावणातील उपवासांच्या व पुजेच्या पार्श्वभूमीवर त्यांचा उठावही होत आहे. त्याबरोबर केळींचे दरही ​आवाक्यात आले आहेत. ३५ रुपये डझन इतका दर आहे.

वांगी : ३० रु.

टोमॅटो : १० रु.

भेंडी : २० रु.

दोडका : १५ रु.

ढबू मिरची : ४० रु.

कोबी : ४० रु. किलो

श्रावण घेवडा : १५ रु. किलो

वाटाणा : ८० रु. किलो

लसून : २०० रु. किलो

कांदा : २० किलो

बटाटा : ३० रु. किलो

फ्लॉवर : १० रु. नग

गवार : २५ रु.

मेथी : २० रु. पेंडी

कोथिंबीर : ५ रु. पेंडी

आले ४० रु. कि.

मुळा १० रु. किलो

शेवगा ४० रुपये किलो

काकडी ३० रु. किलो

मिरची ३५ रुपये किलो

बासमती तांदूळ : २८ ते ४० रु. किलो

गहू : २६ ते २८ रु. किलो

साखर : ३९ रु. किलो

पोहे : ३८ रु. किलो

रवा : २८ रु. किलो

शेंगदाणा : ११० रु. किलो

शाबू : ५५० रु. किलो

आटा : २७ रु. किलो


डाळी

तूरडाळ : १२० रु.

मूगडाळ : ९० रु.

उडीद डाळ : १६० रु.

हरभरा डाळ : ११० रु.

मूग : ८० रु.

मसूर डाळ ८५ रु. किलो

सरकी तेल: ७८ रु. किलो

खोबरे :११० रु. किलो

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोकरीच्या अमिषाने ११ जणांची ५५ लाखांची फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठात नोकरी लावण्याच्या आमिषाने ११ जणांची ५५ लाखांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून, पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी बजरंग हिंदूराव घाटगे आणि नितिन वसंत कदम (दोघेही रा. आसुर्ले पोर्ले, ता. पन्हाळा) या दोघांना ताब्यात घेतले आहे. रोहित यादव (गुजरी कॉर्नर) आणि जयदीप आनंदराव निकम (रा. निकमवाडी, ता. पन्हाळा) अशी अन्य दोघांची नावे आहेत.

राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक ​अमृत देशमुख यांनी या गुन्ह्याची माहिती दिली. आत्माराम दादू मोटे (वय ४७, रा. कुशिरे पोहाळे, ता. पन्हाळा) यांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संशयित नितिन कदम याने फिर्यादी आत्माराम मोटे यांना दिगंबर वसंत साळुंखे (रा. पुलाची शिरोली) असे स्वतःचे खोटे नाव सांगितले. नितिनने आपला मेहुणा मंत्रालयात सचिव असल्याचे सांगितले. सचिवांच्या मदतीने शिवाजी विद्यापीठातील वरिष्ठांना पैसे देऊन लिपिकपदावर नोकरीची ऑर्डर देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर नितिनचे सहकारी रोहित यादव, बजरंग घाटगे आणि जयदीप निकम यांनी फिर्यादी मोटे यांचा मुलगा सूरज याला भूलथापा लावून त्याला विद्यापीठातील वरिष्ठ लिपिकपदावर नोकरी मिळाल्याचे सांगितले. त्याला शिवाजी विद्यापीठाच्या मुलीच्या वसतिगृहाजवळील कँटिनच्या आवारात बोलून घेतले. त्याच्याकडून नोकरी लावण्यासाठी तीन लाख रूपये घेतले. त्यानंतर त्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागात वरिष्ठ लिपिकपदावर नियुक्ती झाल्याचे पत्र दिले. आदेशाच्या पत्रावर कार्यालयीन आदेश क्रमांक ४१६, वर्ष २०१६, आदेश क्रमांक ११४, जावक क्रमांक, सहा जून २०१६ तारीख, शिवाजी विद्यापीठाचा शिक्का, सह​सचिवांची बनावट सही आणि शिक्काही आहे. मोटे यांच्यासह किरण रामचंद्र कुरणे व ११ जणांकडून लाखो रूपयांची फसवणूक झाली आहे. फसवणुकीचा आकडा अंदाजे ५५ लाख रूपये आहे, असे पोलिस निरीक्षक अमृत देशमुख यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीजदर, व्याजात सवलत

$
0
0

इचलकरंजी: 'राज्यातील यंत्रमाग सध्या संक्रमणावस्थेतून जात आहे. हा उद्योग तरला पाहिजे. यंत्रमागधारकांबरोबच कामगारही जगला पाहिजे, असे सरकारचे धोरण आहे. त्यामुळे उद्योगाला सावरण्यासाठी सध्याच्या वीज दरात एक रुपयाची व व्याजामध्ये पाच टक्के सवलत देण्यात येईल,' अशी घोषणा सहकार पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी केली.

येथील लायन्स क्लबमध्ये इचलकरंजी यंत्रमागधारक कृती समितीच्यावतीने सर्वपक्षीय वस्त्रोद्योग परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार राजू शेट्टी होते.

देशमुख म्हणाले, 'राज्यातील वस्त्रोद्योग अडचणीत आहे. रोजगार मिळवून देणार्‍या या उद्योगाला उघड्यावर सोडणार नाही. सध्या यंत्रमागाला जो प्रचलित वीजदर आहे. त्यामध्ये एक रुपया सवलत देण्यात येईल. अनेकांनी कर्ज काढून उद्योगाची उभारणी केली आहे. ज्यांनी पतसंस्था, सहकारी, राष्ट्रीय बँकांतून कर्ज घेतले आहे. त्यांना व्याजदरात पाच टक्के सवलत देण्यात येईल. त्याची अंमलबजावणी एक जुलै, २०१५ पासून करण्यात येईल. सध्या सहकारामध्ये जे चुकीच्या पद्धतीने काम करतात त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे. जे चांगले काम करतात त्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे राहील.

खासदार शेट्टी म्हणाले, 'रोजगार निर्माण करणाऱ्या या उद्योगाला मदतीची गरज आहे. सट्टेबाजारातून सूतालाही बाहेर काढण्याची गरज आहे. तसेच साखरेप्रमाणे या व्यवसायाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे,' असेही ते म्हणाले.

आमदार सुरेश हाळवणकर म्हणाले, 'मुख्यमंत्र्यांच्या आकस्मिक निधीतून या उद्योगाला मदत करावी. वीजेचे दर पाच वर्षे स्थिर ठेवावेत. सूत गिरणीतून यंत्रमागधारकांना कमी दरात सूत उपलब्ध व्हावे, यासाठी पॉवरलूम असोशिएनची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती करावी. खासदार शेट्टी यांनी पंतप्रधानांसोबत यंत्रमागधारकांची बैठक लावावी, अशी मागणी केली.'

माजी मंत्री प्रकाश आवाडे म्हणाले, 'यापूर्वी उद्योगाला सवलती दिल्या आहेत. त्याप्रमाणे २७ अश्‍वशक्तीच्या खालील छोट्या उद्योगाला वीज दरात सवलती द्यावी. त्यासाठी केवळ २०० कोटी रुपये लागतील. आणि व्याजात सवलत दिल्यास ६० कोटी रुपये लागतील,' असे सांगितले.

माजी खासदार श्रीमती निवेदिता माने यांनी, या परिसंवादातून चांगले फलित जाहीर करावे, अशी मागणी केली.

यावेळी अशोक स्वामी, विनय महाजन, सतीश कोष्टी, दीपक राशिनकर आदींची भाषणे झाली. यावेळी प्रताप होगाडे, हिंदुराव शेळके, विश्‍वनाथ अग्रवाल आदींसह वस्त्रोद्योगातील मान्यवर, यंत्रमागधारक उपस्थित होते. स्वागत पुंडलिक जाधव यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाप्पांच्या आभूषणांनी सजली गुजरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बाप्पांचे आगमन अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपल्याने सर्वत्र बाप्पांच्या आगमनाची जोरदार तयारी सुरू आहे. अनेकजण बाप्पांसाठी आवर्जून चांदी आणि सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करतात. त्यामुळे सोन्या-चांदीच्या आकर्षक आभूषणांनी गुजरीतील दुकाने सजली आहेत. मोदकापासून ते डोक्यावरील छत्रीपर्यंत आणि गणपतीचे वाहन उंदीरमामापासून ते कानातील बालीपर्यंत अनेक दागिने भाविकांना भुरळ घालत आहेत.

गणेशोत्सवाआधी आठवडाभर त्याच्या आगमनाचे वेध लागतात. स्वागताचीही जोरदार तयारी सुरू असते. घरी आलेल्या बाप्पाच्या अंगावर किमान एकतरी नवीन दागिना घालावा यासाठी दागिन्यांच्या खरेदीचीही झुंबड उडते. बाप्पांसाठी चांदीचे दागिने खरेदी करण्याकडे भाविकांचा कल असतो. त्यामुळे गुजरीतील दुकानेही चांदीच्या आभूषणांनी सजली आहेत. गणपतीच्या डोक्यावरील मुकुट, किरीट, गळ्यातील मणीहार, दुर्वाहार, कानातील फुले, कुड्या, बाली यासह बाजूबंद, अंगठ्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. पायातील तोडे, वाळे, हातातील त्रिशूल, कुऱ्हाड, पाश शिवाय पूजनासाठी चांदीचे पान-सुपारी, केळी, ड्रायफूट सेट आणि गणपतीचा आवडता मोदकही आहे. बाप्पांना आ‍डणारे जास्वंदीचे फूल खरदी करण्याकडेही भाविकांचा कल आहे. याशिवाय बाप्पांचे वाहन उंदीरमामाही विविध आकारात उपलब्ध आहेत. काही भाविक बाप्पाकडे नवस बोलतात. नवसपूर्ती झालेले भाविक पाळणा, अंगठी, चांदीचे हात, पाय, डोळे, करदोडेही बाप्पांसाठी अर्पण करतात. हे सर्वच दागिने विविध आकारात आणि कलाकुसरींनी युक्त असे आहेत. पाहताक्षणी मनाला भूरळ घालणारे दागिने आवडत्या बाप्पांचे रुप खुलवण्यास मदत करणार आहेत.

घरातील गणपतींसह काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळेही चांदीची प्रभावळ, सिंहासन, चौरंग खरेदी करतात. मोठ्या मूर्तींसाठी चांदीचे कान, हात, शस्त्रे, मुकुट आदी दागिनेही बनवून घेतले जातात. हे सर्व दागिने पाच ग्रॅमपासून ते हव्या तितक्या वजनापर्यंत उपलब्ध आहेत. आर्डरनुसारही दागिने बनवून दिले जात आहेत. त्यामुळे सध्या गुजरीतील दुकानांमध्ये बाप्पांच्या स्वागतासाठी दागिन्यांच्या खरेदीची लगबग सुरू आहे. चांदीप्रमाणेच सोन्याचेही दागिने उपलब्ध आहेत.

==

चांदीचे दर उतरले

गेल्या महिन्याच्या तुलनेत चांदीचे दर उतरले आहेत. काही दिवसांपूर्वी चांदीचे दर ४६ हजार रुपये प्रतिकिलो असे होते. सध्या ४४ हजार ५०० रुपये प्रतिकिलो चांदीची विक्री सुरू आहे. आकर्षक कलाकुसर आणि हव्या त्या वजनात दागिने उपलब्ध असल्याने खरेदी करणेही सोयीचे झाले आहे.

===

दरवर्षी गणपतीच्या स्वागतासाठी दागिने खरेदी करण्याची परंपरा असल्याने या दागिन्यांच्या खरेदीसाठी गर्दी वाढली आहे. सर्व प्रकारचे आणि पाहिजे त्या वजनाचे फॅन्सी दागिने उपलब्ध आहेत. याशिवाय चांदीचे दरही उतरले आहेत, त्यामुळे भाविकांचा उत्साह वाढला आहे.

प्रीतम ओसवाल, विक्रेते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळकरी मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

शिवनाकवाडी (ता.शिरोळ) येथे शाळेतून घरी परतणाऱ्या बारा वर्षीय मुलीचे अपहरण करणाऱ्या तरुणास पोलिसांनी शनिवारी गजाआड केले. दरम्यान संशयित तरुणास ताब्यात द्यावे, या मागणीसाठी संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको केला. तसेच पोलिस गाडीवर दगडफेकही करण्यात आली. या घटनेची नोंद करण्याचे काम कुरुंदवाड पोलिसांत रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, सहावीच्या वर्गात शिकणारी ही मुलगी दुपारी शाळेतून घरी जात होती. यावेळी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तरुणाने तिचे अपहरण केले. या घटनेची माहिती ग्रामस्थांनी कुरुंदवाड पोलिसांना दिली. यानंतर कुरुंदवाडचे पोलिस निरीक्षक कुमार कदम व त्यांच्या पथकाने शोध मोहीम राबविली. आवाडे पेपर मिलजवळ संशयितास पोलिसांनी जेरबंद केले.

दरम्यान पोलिस जीपमधून संशयितास नेताना संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको केला. मात्र पोलिसांनी शांततेचे आवाहन केले. मात्र यावेळी जीपवर दगडफेक करण्यात आली. ग्रामस्थांच्या संतापाचा उद्रेक झाल्याने शिरोळ, कुरुंदवाड, इचलकरंजी येथून पोलिस बंदोबस्त मागविण्यात आला. यामुळे शिवनाकवाडीला छावणीचे स्वरूप आले. ग्रामस्थांचे रौद्ररूप पाहून संशयितास शिरोळ येथे हलविण्यात आले. रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


काश्मीरमधील हिंसाचारालामोदी सरकार जबाबदारसीताराम येचुरींची टीका

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बलुचिस्तानमध्ये मानवाधिकाराचे हनन होत असल्याबाबतचे वक्तव्य करून पाकिस्तानच्या हातात आयते कोलीत दिले आहे. खोऱ्यातील हिंसाचाराला मोदी सरकारच जबाबदार आहे,' असा आरोप मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाचे केंद्रीय महासचिव खासदार सिताराम येचुरी यांनी केला.

महासचिवपदाचा पदभार घेतल्यानंतर खासदार येचुरी यांचे प्रथमच सोलापुरात आगमन झाले. सरकारी विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मोदी सरकारच्या अच्छे दिनवर सडकून टीका केली. येचुरी म्हणाले, 'मनमोहनसिंग सरकार असताना काश्मीरचा प्रश्न अत्यंत सुलभतेने हाताळण्यात आला. परंतु, मोदी सरकारने हा प्रश्न हाताळणे तर सोडाच उलट दोन महिने चिघळत ठेवून जनतेला वेठीस धरले. परिणामी नागरिकांसह जवानांचेही बळी गेले. या हिंसाचाराला मोदी सरकारच जबाबदार आहे. संयुक्त राष्ट्रात आता पाकिस्तानला भारताविरोधात बोलण्याची संधी मिळाली आहे. नरेंद्र मोदी आमच्या पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये हस्तक्षेप करीत असतील तर आम्ही सुद्धा काश्मीरमध्ये हस्तक्षेप करणार, असे पाकिस्तान सांगेल. बलुचिस्तान आमचा आहे, असे मोदी म्हणाले नाहीत तर बलुचिस्तानात मानवाधिकाराचे हनन होत असल्याचे वक्तव्य करून पाकिस्तानला मोदींनी आयती संधी उपलब्ध करून दिली आहे.'

सर्वच आघाड्यांवर मोदी अपयशी

रामजादा या हरामजादा, ही मोदींची भाषणे देशाची संस्कृती बिघडवणारी आहेत. अडीच वर्षांपूर्वी संसदेत पाय ठेवताना जनतेच्या मंदिरात आल्याचे सांगत मोदींनी पदभार स्वीकारला. मोदी पूर्वी जे बोलले ते आता करतात काय? याचा विचार करावा लागेल असेही येचुरी म्हणाले. उत्तराखंड आणि अरुणाचलमध्ये सरकार नसल्यामुळे मोदी अस्वस्थ आहेत. शिवाय राज्यसभेतही बहुमत नाही. एकूणच संविधानाचा दुरुपयोग करून जनतंत्राची मोडतोड करणारा हा तिसरा चेहरा आहे. सर्वच आघांड्यांवर मोदी सरकार अपयशी ठरत आहे, असा आरोपही येचुरी यांनी केला.

आस्पा तत्काळ हटवा

जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराला असलेला विशेष अधिकार (आस्पा) सरकारने तत्काळ हटविला पाहिजे. आस्पाची खरी गरज सरहद्दीवर आहे. काश्मीरच्या जनतेसोबत आम्ही आहोत आणि चर्चा करू, असा विश्वास सरकारने काश्मीरी जनतेला दिला पाहिजे. जनतेत जाऊन चर्चा करणे आवश्यक आहे. जम्मूमध्ये सर्वपक्षीय मंडळ जाणार असले तरी त्या अगोदर होमवर्क करूनच सरकारने जम्मूत गेले पाहिजे. पाकिस्तानच्या हरकती देशासमोर आल्या पाहिजेत त्या दृष्टीने केंद्र सरकारने पाऊल उचचले पाहिजे, असे झाल्यास पाकिस्तानला शर्मेने मान खाली घालावी लागेल. मोदींनी स्वतः पुढे आले पाहिजे. जर मोदी सरकार हे करणार नसेल तर माकप यासाठी सघर्षाची तयारी ठेवेल, असेही येचुरी म्हणाले.

...........

शेतकरी कोमात, उद्योगपती जोमात

मोदी सरकार बडे उद्योगपती आणि आरएसएसचे आहे. सरकारमध्ये शेतकरी कोमात गेला असून, उद्योगपती मात्र जोमात आहेत. किंगफिशरने नऊ हजार कोटींचे कर्ज बुडविले. तसेच अन्य बड्या उद्योगपतींनी व्यवसायाच्या नावाखाली सुमारे साडेआठ लाख करोड रुपयांची कर्जे बँकेतून घेतली. व्यवसाय बंद पडला म्हणून ती परत दिली नाहीत. या सर्वांवर मोदी सरकार मेहरबान आहे. शेतकऱ्याने घेतलेली छोटी कर्ज परत न केल्यास वसुलीचा तगादा लावला जातो. वसुलीच्या तगाद्यानेच तो आत्महत्या करतो. हेच मोदी सरकारचा अच्छे दिन आहेत, असेही येचुरी म्हणाले.

देश १५३ करोडपतींच्या हातात

भारतात १५३ करोडपती असून, देशाच्या एकूण उत्पादन मूल्यांच्या अर्धा वाटा याच १५३ लोकांच्या हातात आहे. मोदी सरकार उद्योगपतींचे सरकार आहे, सर्वसामान्य जनता आणि गरिबांनामात्र सरकारने वाऱ्यावर सोडले आहे, अशी टीकाही खासदार सिताराम येचुरी यांनी केली आहे. मोदी सरकारने परदेशातून १५२रुपये किलोने डाळ खरेदी केली आणि ती २०० रुपयाला विकली. मोदी सरकार विदेशातील शेतकऱ्याला १५२ रुपये देत असेल तर भारतातील शेतकऱ्याला याच डाळीसाठी ५० रुपये ५० पैशांचा मोबदला का देत आहे, असा सवाल खासदार येचुरी यांनी उपस्थित केला. देशातील शेतकऱ्यांच्या डाळीसाठी १०० रुपये दिले तर डाळींच्या किंमतीही कमी होतील आणि शेतकऱ्यांचेही जीवनमान उंचावण्यास मदत होईल, असा सल्लाही येचुरींनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कराडजवळ स्कॉर्पिओ खाक;पाचही प्रवाशी सुखरूप

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, कराड

कोल्हापूरहून पुण्याच्या दिशेने निघालेल्या स्कार्पिओ गाडीने पुणे-बेंगळुरू महामार्गावरील खोडशी गावाच्या हद्दीत अचानक पेट घेतला. या घटनेत स्कॉर्पिओ गाडी जळून खाक झाली. मात्र, गाडीच्या बॉनेटमधून धूर निघू लागल्याचे चालकाच्या लक्षात आल्याने त्याने तत्काळ गाडी थांबवून प्रवाशांना बाहेर काढल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

ही घटना रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. गाडीत दोन महिलांसह पाच प्रवाशी होते. सर्व प्रवाशी सुखरूप आहेत. दिनेश बारी परशुराम (रा. डहाणू, जि. पालघर) हे आपल्या कुटुंबीयांसमवेत कोल्हापूर येथील महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी आपल्या स्कार्पिओ (एम. एच. ०४ सीजे ८०४०) गाडीतून कोल्हापूरला गेले होते. रविवारी दुपारी ते कोल्हापूरहून डहाणूकडे निघाले होते. राजू लक्ष्मण विरठा (रा. डहाणू, जि. पालघर) हे गाडी चालवित होते. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास त्यांची गाडी खोडशी (ता. कराड) गावाच्या हद्दीत आली असता गाडीच्या बॉनेटमधून धूर येत असल्याचे चालक राजू विरठा यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ गाडी महामार्गाकडेला घेत आतील प्रवाशांना तत्काळ गाडीतून बाहेर येण्यास सांगितले. गाडीत दोन महिलांसह पाच प्रवाशी होते. गाडीतून प्रवाशी बाहेर आल्यानंतर राजू विरठा यांनी धूर का येत आहे, हे पाहण्यासाठी गाडीचे बॉनेट उघडले असता गाडीच्या इंजिनने अचानक पेट घेतला. गाडीतील प्रवाशांनी जवळील पाण्याने व परिसरातील माती टाकून आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही वेळातच संपूर्ण गाडीने पेट घेतल्याने गाडी जळून खाक झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. सुनंदा यांचाही खून झाल्याची शक्यता

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा

वाई शहराचे दिवंगत माजी नगराध्यक्ष के. बी. जमदाडे यांची मुलगी आणि धुळ्याचे आमदार ग. द. सोनावणे यांची सून डॉ. सुनंदा विकास सोनावणे या संतोष पोळ याच्या संपर्कात आल्या होत्या. त्या २३ जानेवारी २०१२पासून अचानक बेपत्ता झाल्या आहेत. त्या आजपर्यंत सापडल्या नाहीत. पोलिस ठाण्यात त्यांच्या मिसिंगची तक्रार दाखल आहे.

सध्या पोळचे एक एक कारनामे उघड होऊ लागल्याने डॉ. सुनंदा सोनावणे यांचाही पोळनेच काटा काढला असावा, असा संशय नागरिकातून व्यक्त होत आहे. त्यामुळे वाई पोलिसांनी त्यादृष्टीने तपास करावा, अशी मागणी वाईकरातून होत आहे.

सुनंदा सोनावणे (रा. रामडोह आळी वाई) यांचे लग्न झाल्यावर त्या धुळे येथे राहत होत्या. त्यांचे वडील के. बी. जमदाडे यांचे २००६ मध्ये निधन झाले. त्यामुळे त्या नेहमीच वाई येथील शेतीचे कामकाज पाहण्यासाठी येत असत. दोन मुले लहान असतानाच त्यांच्या पतीचे निधन झाले होते. त्यामुळे त्यांच्यावर मुलांचे शिक्षण आणि वाईमध्ये असणाऱ्या जमिनीची देखरेख अशी दुहेरी कसरत करण्याची वेळ आली होती. त्यांचा धुळे येथे दवाखाना होता. डॉ. सुनंदा सोनावणे बेपत्ता झाल्यानंतर त्या बेपत्ता झाल्याची तक्रार वाई पोलिस ठाण्यात नातेवाईकांनी दिली होती. पण, पोलिसांकडून अपेक्षित तपास न झाल्याने त्यांचा अद्याप ठावठिकाणा लागला नाही. डॉ. पोळचे कारनामे बघता यामध्ये त्याचा हात आहे किंवा कसे? याची तपासणी करण्याची आवश्यकता असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.

ज्योती मांढरेच्या मागे सलमा शेख प्रकरण

मंगल जेधे खून प्रकरणात अटकेत असलेल्या ज्योती मांढरेच्या मागे आता सलमा शेख खून प्रकरण लागले आहे. ज्योती मांढरेचा मोबाइल सापडत नाही तसेच तिला सलमा शेख खुनाचा तपास करण्यासाठी सात दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. याची मुदत एक सप्टेंबरला संपत आहे,

भारती कोरवारांनी संतोषचे वकीलपत्र

संतोष पोळ आणि ज्योती मांढरे यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी मिळायला हवी, त्यामुळे कोणीतरी त्यांचे वकीलपत्र घ्यावे, असे आदेश कोर्टाने दिले होते. मात्र, वकील संघटनेने संतोष पोळ व ज्योती मांढरे यांचे वकीलपत्र न घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे त्याला त्याची बाजू मांडण्याची संधी मिळाली नाही, असा युक्तिवाद तो कोर्टात करू शकतो म्हणून त्याला त्याची बाजू मांडण्याची संधी मिळावी म्हणून अॅड. भारती कोरवार यांनी शुक्रवारी कोर्टात वकीलपत्र दाखल केले. अॅड. भारती कोरवार या संतोष पोळची बाजू मांडणार आहेत. त्या विधी सेवा समितीच्या सदस्या आहेत. कोर्टाच्या आदेशावरून भारती कोरवार संतोषची बाजू मांडणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सायबर क्राइमबाबत सतर्कता हवी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'पोर्नोग्राफी, सट्टेबाजी, ऑनलाइन लॉटरी, इमेल बॉम्बिंग आदी स्वरुपाच्या आर्थिक, सामाजिक गुन्ह्यांना व फसवणुकीला भोळ्या, अविचारी आणि लोभी व्यक्ती त्याचबरोबर मोठ्याप्रमाणात विद्यार्थी बळी पडत आहेत. अशा गुन्ह्यांपासून अलिप्तता राखण्यासाठी सजग आणि सर्तकतेची आवश्यकता आहे' असे मत सायबर क्राइमचे पोलिस निरीक्षक संजय भांबुरे यांनी केले.

भारती विद्यापीठाच्या कॉलेज ऑफ फामर्सीच्यावतीने सायबर क्राइम विषयावर आयोजित चर्चासत्रात बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एच. एन. मोरे होते.

पोलिस निरीक्षक भांबुरे म्हणाले, 'महाविद्यालयीन विद्यार्थ्यांबरोबरच हायस्कूलच्या विद्यार्थ्यांमध्ये मोबाइल वापरण्याची क्रेज वाढत आहे. सोशल मीडियाचा अतिवापराने सायबर गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशा गुन्ह्यांमध्ये फसवणुकीच्या गुन्ह्यांचा अधिक समावेश असल्याने अनेक आर्थिक समस्या निर्माण होत आहेत. तर पोर्नोग्राफी सारख्या घटनामुळे युवतींना मोठ्याप्रमाणात त्रासाला सामोरे जाव लागत आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी पालक व विद्यार्थ्यांनी सतर्कता बाळगण्याची आवश्यकता आहे.'

यावेळी त्यांनी सायबर गुन्हेगारी, त्यातून होणारे तोटे, कायदा व शिक्षा, डिजीटल पायरसी, सायबर आतंकवाद, सोशल नेटवर्किंग, बँकिंग व फायनान्शिअल क्राइमबाबत सखोल मार्गदर्शन केले.

प्राचार्य डॉ. मोरे यांनी विद्यार्थ्यांनी डिजीटल तंत्रज्ञानाचा उपयोग उच्च शिक्षणासाठी करुन त्यातील वाइट व अनावश्यक बाबी कटाक्षाने टाळण्याचे आवाहन केले. यावेळी पोसिल उपनिरीक्षक शीतल जाधव, एम. आर. गुरव, उपप्राचार्य डॉ. एम. एस. भाटिया यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन सिमरन नगारजी यांनी केले. समन्वयक प्रा. फिरोज तांबोळी यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भोगावती’ साठी ६१ टक्के मतदान

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, राधानगरी

'भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाच्या निवडणुकीसाठी शांततेत मतदान झाले. दहा केंद्रांवर सरासरी मतदान ६१ टक्के झाले. सर्वाधिक मतदान कांडगाव केंद्रावर ७१ टक्के तर सर्वात कमी मतदान सडोली केंद्रावर ५३ टक्के झाले. चाळीश टक्के मतदारांनी मतदान केंद्राकडे पाठ फिरवली

भोगावती शिक्षण मंडळाच्या पंचवार्षिक निवडनुकीत रविवार सकाळपासून कौलव, गुडाळ, तारळे, शिरगाव व राशिवडे अशा पाच केंद्रावर राधानगरी तालुक्यातील मातदान झाले तर करवीर तालुक्यात सडोली, कुरुकली, हासूर कांडगाव,शाहूनगर परिते येथील प्राथमिक शाळेच्या इमारतीत मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. भोगावती साखर कारखान्याचे सभासद भोगावती शिक्षण प्रसारक मंडळासाठी सभासद आहेत. एकूण मतदार संख्या ३२,८०७ आहे. सुरवातीपासून न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेल्या निवडणुकीसाठी रविवारी करवीर व राधानगरी तालुक्यातील दहा केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली .

सकाळी आठ ते दहा वाजेपर्यत मतदानाचा वेग कमी होता. दहा वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत ५५ टक्के मतदान झाले .उमेदवारांच्या समर्थकांनी प्रत्येक केंद्रावर मतदारांना प्रवासाची सुविधा पुरवल्याने मतदान केंद्रावर दुपारपासून गर्दी होती .भोगावती शिक्षण मंडळासाठी सत्ताधारी काँग्रेससह राष्ट्रवादी ,शेकाप, शिवसेना ,शेतकरी संघटना या पक्षांनी मिळून महाआघाडीचे एक पॅनेल व विरोधात भाजप, रिपाईं, रासप यांनी मिळून विकास आघाडीचे शिक्षण विकास पॅनेल यांच्यासह सात अपक्ष उमेदवार असे तेरा जागांसाठी ३३ उमेदवार रिंगणात होते. सर्व उमेदरांचे भवितव्य मतदान पेटीत बंद झाले असून मतमोजणी सोमवारी (ता.२९) भोगावती महाविद्यालयाच्या इमारीतीमध्ये होणार आहे. मात्र निवडणुकीचा निकाल निवडणूक निर्णय अधिकारी शिवराज नाईकवडी हे शिक्षण मंडळाच्या सर्वसाधारण सभेत तीन सप्टेंबर रोजी अधिकृत घोषणा करणार आहेत. दरम्यान, मतदान काळात कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. परंतु अपात्र साडेसहा हजार सभासद सत्ताधारी मंडळींना लाखोली वाहत होते .भोगावती परिसरासह संपूर्ण जिल्ह्याचे निवडणुकीच्या निकालाकडे लक्ष लागून राहिले आहे. मतदानासाठी वृद्ध ,अपंग आणि महिलांना मतदान केंद्रापर्यंत आणण्याची दोन्ही बाजूंकडून विशेष प्रवास सुविधा पुरविण्यात आली. भोगावती महाविद्याल्याचे कर्मचारी आणि धर्मादाय आयुक्त कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी निवडणूक प्रक्रिया पार पाडली. करवीर व राधानगरी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता .



....

कोट

'भोगावती शिक्षण मंडळाच्या ३२ हजार सभासदांना संविधान पद्धतीने मतदानाचा हक्क भाजप रिपाईं आघाडीने मिळवून दिला आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून भोगावती परीसरात नवे राजकीय संदर्भ पाहण्यास मिळत असून आमचा विजय निश्चित आहे

प्रा शहाजी कांबळे, भाजप रिपाईं आघाडी

...

कोट

'भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाची घटना दुरुस्त करून शिक्षण मंडळ हे कारखान्याकडे सुपूर्द करणार आहे . सभासदांनी आमच्या महाआघाडीवर विश्वास दाखवला आहे. शिक्षण संस्थेत राजकारण आणणार नाही. सभासदांचा कौल आमच्या बरोबर आहे.

धैर्यशील पाटील कौलवकर ,महाआघाडी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्योगमंत्र्यांसमोर मांडले प्रलंबित प्रश्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

उद्योगांसाठीचे वीजदर कमी करावेत यांसह विविध मागण्यांचे निवेदन उद्योजकांच्या विविध संघटनांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना दिले. शिटमंडळाने भेट घेऊन निवेदन देण्यात आले.

आमदार सतेज पाटील यांन‌ी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, जिल्ह्यात गोकुळ शिरगाव, शिरोली, उद्यमनगर आदी ठिकाणी लहान, मोठे उद्योग आहेत. जिल्हात १३०० पेक्षा अधिक कारखाने आणि ४८५ फौंड्री युनिट आहेत. शेजारच्या राज्यापेक्षा आपल्या राज्यात विजेचे दर अधिक आहे. विदर्भ, मराठवाड्यास ज्याप्रमाणे विजेचे दर कमी केले आहेत, त्याप्रमाणे जिल्हयातील उद्योगांसाठीही सवलतीच्या दरात वीज द्यावी.

शिरोली, गोकुळ‌शिरगाव औद्योगिक वसाहतींच्या टाऊनशीपबाबत निर्णय घ्यावे, बंद पडलेल्या उद्योग भूखंड खरेदी, विक्री करताना कामगार घातलेली आयुक्त कार्यालयाकडील नाहरकत दाखल्याची अट शिथील करावी, इंडस्ट्रियल वेष्ट टाकण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावे, करखाना परिसरात वे-ब्रिज बसवण्यास मंजुरी मिळावी, अग्निशमन विभागाकडील एनओसी अट रद्द करावी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा दाखला त्वरीत मिळावा. मुंबई बेंगलोर कॅरिडोर कोल्हापूरहूनच जावे, कोल्हापूरला मोठे उद्योग सुरू करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, बी टेन्युअर रद्द करावे.

पासपोर्ट कार्यालय सुरू करावे, ईएसआय हॉस्पिटल सुरू करावे, शहरातील शिवाजी उद्यमनगर, वाय.पी. पोवारनगर, पांजरपोळ, टोप, संभापूर येथील औद्योगिक वसाहतीमध्ये सुविधा पुरवाव्यात. किमान वेतन कमिटीवर औद्योगिक असोसिएशनच्या प्रतिनिधींची निवड करावी आदी मागण्यांचे निवेदन औद्योगिक संघटनेचे बाबासाहेब कोंडेकर, सुरेंद्र जैन यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केले.

हातकणंगले येथील श्री लक्ष्मी औद्योगिक वसाहतीमध्ये पायाभूत सुविधा द्याव्यात, येथे कार्यारत असलेल्या २०० उद्योजकांना सुविधा अभावी विविध अडचणींना सामारे जावे लागत आहे. कामगारांची टंचाई दूर करावी, मुलभूत सुविधांसाठी निधी द्यावा. निवेदनावर अध्यक्ष शीतल केटकाळे, विनय मगदूम यांच्या सह्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जलयुक्त’मध्ये जनतेला विश्वासात घ्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'जनतेला विश्वासात घेऊन जलयुक्त शिवार अभियान राबवा,' असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. जिल्हा नियोजन समितीची बैठक नुकतीच झाली. यावेळी जलयुक्त शिवार अभियानाची आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, 'गतवर्षी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत ६९ गावांमध्ये ११९९ कामे पूर्ण केली असून त्यासाठी २८ कोटी २७ लाख रुपयांचा निधी खर्च झाला आहे. जलयुक्त शिवार योजनांच्या कामांचे त्रयस्थ यंत्रणेमार्फत मूल्यमापनही करण्यात आले आहे. ६३५ कामांमध्ये चांगला पाणीसाठा निर्माण झाला असून, त्यातून ४५०० हेक्टर क्षेत्र संरक्षित सिंचनाखाली आले आहे. १८ हजार हेक्टर क्षेत्रामध्ये ठिबक सिंचनाद्वारे पाणी देण्याची क्षमता निर्माण झाली आहे. यावर्षी जिल्ह्यात २० गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियान हाती घेण्यात आले असले तरी या व्यतिरिक्त ज्या गावांमध्ये हे अभियान राबविण्याची आवश्यकता आहे आणि लोकांची इच्छा आहे त्या गावांमध्ये जलयुक्त शिवारअंतर्गत कामे करण्यासाठी मदत केली जाई. त्यासाठी विविध कंपन्यांची सीएसआरमधून मदत घेतली जाईल.'

महाअवयवदान अभियानात सहभागी व्हा

डोळे, त्वचा, यकृत, ह्रदय, मूत्रपिंड यांसारख्या अवयवांची निसर्गाने आपल्याला अमूल्य भेट दिली आहे. मृत्यूनंतर हे अवयव इतर रुग्णांना जीवनदान देऊ शकतात. यासाठी महाराष्ट्र सरकारनेही ३० ऑगस्ट ते एक सप्टेंबर या कालावधीत महाअवयवदान अभियान राबविण्याचे ठरविले आहे. यामध्ये जनतेने मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री पाटील यांनी केले आहे.

जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. जलयुक्त शिवार अभियानाची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक बसवराज मास्तोळी यांनी दिली. हागणदारीमुक्तीची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुषमा देसाई यांनी दिली. तर महाअवयवदान अभियनाची माहिती अधीष्ठता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी दिली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर. एस. पाटील, एन. एम. वेधपाटक, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख, उपवन संरक्षक रंगनाथ नाईकडे, निवासी उपजिल्हाधिकारी शंकर बर्गे, करवीरचे प्रांताधिकारी प्रशांत पाटील यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


टक्केवारीचा ढपला जोरात

$
0
0

जिल्हा परिषदेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर कारभारी सदस्यांनी वैय‌क्तिक साहित्य खरेदीत ढपला मारण्याचा सपाटाच लावला आहे. यामुळे संबंधित सदस्यांचे पक्ष आणि नेत्यांचे 'चेहरे'ही बदनाम होत आहेत. पुन्हा निवडून येण्याची खात्री नसल्यामुळे जाताजाता टक्केवारी गोळा करण्याकडे कल वाढला आहे. परिणामी पारदर्शक कारभार करणारे अधिकारी हैराण झाले आहेत.

जिल्हा परिषदेत कॉंग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शाहूवाडी विकास आघाडीची सत्ता आहे. अध्यक्षा विमल पाटील काँग्रसेचे नेते पी‍. एन‍‍‍‍. पाटील यांच्या समर्थक आहेत. याउलट उपाध्यक्ष श‌शिकांत खोत विधान परिषदेचे आमदार सतेज पाटील यांचे समर्थक आहेत. याशिवाय समाजकल्याण, महिला व बालकल्याण, बांधकाम, शिक्षण या समितीचे सभापती व सदस्य त्या त्या तालुक्यातील नेत्यांचे जवळचे कार्यकर्ते आहेत.

प्रत्येकवर्षी सुमारे ७ ते ८ कोटींच्या स्व-निधीतून वैयक्तिक लाभासाठीचे साहित्य समाजकल्याण, महिला बालकल्याण, कृषी या विभागाकडून खरेदी केली जाते. साहित्य खरेदीत निविदा मॅनेज करून ढपला मारण्याचे प्रकार वाढत आहेत. दोन दिवसांपर्वी समाजकल्याण विभागाच्या झेरॉक्स मशीन खरेदीतील निविदा मॅनेजचे प्रकरण उघड झाले. साहित्य उत्पादक कंपनीच्या प्रतिनिधींशी आर्थिक वाटाघटी करून कमीत कमी दहा ‌आणि अधिकाधिक २५ टक्के वाटा घेतला जात आहे. टक्केवारी ठरवण्यापासून ढपला मारण्यापर्यंत मजल गेलेले कारभारी सदस्य हे कोणत्या त्या कोणत्या ‌नेत्याच्या जवळचे कार्यकर्ते आहेत. वाढलेल्या ढपला संस्कृतीसंबंधी अनेकवेळा वर्तमानपत्रामध्ये ठळकपणे प्रसिध्द झाल्या आहेत.

खासगीत बोलताना अधिकारी, कर्मचारी कोणता पदाधिकारी, सदस्य किती टक्केवारी मागत आहे, याची चर्चा करत असतात. स्पर्धेमुळे निविदा भरलेल्या कंपन्याचे प्रतिनिधीही टक्केवारीचे पैसे कोणाला कोठे पोहच केले, हे देखील सांगत असतात. टक्केवारी गोळा करण्याचे काम कारभारी सदस्य करतात आणि त्यांचे नेते मौन पाळून आहेत, हे कोडे या सभागृहाची मुदत संपत आली तरी उलगडलेले नाही.

टक्केवारी गोळा करणाऱ्या सदस्यांइतकेच त्यांच्या नेत्यांचीही वाईट चर्चा होत आहे. तरीही मलिदावाल्या सदस्यास आवर घालण्यासंबंधी नेत्यांनी उघडपणे पुढाकार घेतलेला नाही. नेत्यांचा वचक, धाकच राहिलेला नाही की छुपा पाठिंबा आहे, असा यातील एक सोयीचा अर्थ काढला जात आहे. साहित्य खरेदी आणि कारभारी सदस्य यांचे टक्केवारीचे गणित जमले आहे. हे गणित चुकते आणि आपली कमाई बुडते हे एकमेव कारण साहित्य खरेदी न करता लाभार्थींच्या खात्यावर थेट पैसे जमा करण्याला विरोधामागचे आहे.

......................................

चौकट

कोल्हापूर नको

टक्केवारी मागणे, हितसंबंधतांची नियमबाह्य कामे करण्याचा आग्रह करणे यासाठी छळ केल्याने समाज कल्याण विभागातील अधिकाऱ्याने सरकारकडे पाठपुरावा करून पुणे बदली करून घेतली आहे. आता बदली झाल्याने सुटलो एकदाचे, अशी त्यांची प्रतिक्रिया आहे. पारदर्शक कारभारावर आग्रही असणाऱ्या जिल्हा परिषदेतील अन्य अधिकाऱ्यांचीही अशीच मानसिकता तयार होत आहे.

................

चौकट

सुपारी घ्यायची, दबाव टाकायचा

काही सदस्य हजार, दोन हजारांसाठीही फाईल हातात घेवून कर्मचारी, अधिकाऱ्यांकडे घिरट्या घालताना दिसतात. कोणाची तरी सुपारी घ्यायची आणि अधिकाऱ्यांवर दबाव टाकून काम करून घ्यायचे ही त्यांच्या कामाची पध्दतच बनली आहे. असे सदस्य नेहमी प्राथमिक, माध्यमिक, बांधकाम या विभागात अधिक दिसतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१२०० खेळाडूंना ‘शाहू’ चा राजाश्रय

$
0
0

प्रकाश कारंडे, कागल

कागलच्या श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याने गेल्या ३२ वर्षांत १२०० हून अधिक खेळाडूंना दरवर्षी २५ लाख रुपये मानधनाच्या रुपाने देताना आजवर आठ कोटी रुपयांच्यावर मदत करताना खऱ्या अर्थाने 'राजाश्रय' दिला आहे. सहकारी तत्वावरील इतर कुठल्याही साखर कारखान्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात मानधनधारक खेळाडू नाहीत. त्याचाच परिपाक म्हणजे आज राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर चमकणाऱ्या शाहू कारखान्याच्या खेळाडूंची संख्या लक्षणीय आहे.

कोणत्याही खेळात ज्यांना करिअर करायचे आहे, ज्यांच्या मनात जिद्द आहे आणि ध्येयापर्यंत पोहचण्यासाठीची तळमळ आहे, अशा नवोदित कुस्तीगिरांसह उभरत्या कोणत्याही क्रिडा प्रकारातील खेळाडूंना कागलचा छत्रपती शाहू कारखाना वरदान आणि मोठा आधार ठरला आहे. गेली ३२ वर्षे सातत्याने केवळ खेळाच्या वाढीसाठीच प्रयत्न करताना 'शाहू' ने यासाठी खेळाडूचा गट-तट ,जिल्हा,सभासदत्व,कार्यक्षेत्र,अथवा राज्य पाहीले नाही. केवळ खेळाडूची गुणवत्ता हाच स्वत:चा निकष बनवून कारखान्याने राज्य आणि आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत कुस्तीतील खेळाडूंना पोहचण्यासाठी आर्थिक मदतीचे मोठे बळ देण्याचे काम केले आहे. ऊस दराच्या बाबतीत कितीही अडचणी आल्या तरी कुस्ती स्पर्धा आणि इतर खेळाडूना दिले जाणारे मानधन यामध्ये तीस वर्षात एकदाही खंड पडलेला नाही. त्यामुळे ग्रामीण अथवा राज्य व राष्ट्रीय पातळीवरील खेळांमध्ये चुणूक दाखवणे आणि शाहूचे मानधन घेवून खेळात करिअर करणे एवढाच मार्ग अवलंबून आजतागायत सुमारे १५०० खेळाडूनी आपले भवितव्य घडविले आहे.

कुस्ती आणि अन्य खेळांच्या विकासासाठी कारखान्यात अद्ययावत स्वतंत्र संगणकीकृत विभाग आहे. यामध्ये काम करणारे कर्मचारी राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर चमकलेले खेळाडू आहेत. स्पर्धा संयोजनासह निप:क्षपातीपणे खेळाडू निवडणे आणि गरजू , गुणी व होतकरु खेळाडू शोधून त्यांना प्रोत्साहन देणे असे काम ते करतात. यासाठी कारखाना दरवर्षी सुमारे २५ लाख रुपये खर्च करतो. ज्यामध्ये कारखान्यामार्फत आयोजित केलेल्या कुस्त्यांना साडेतीन लाख रुपये, कागलच्या उरसात ६.५ लाख रुपये,कारखाना कार्यक्षेत्रात कुठेही कुस्त्यांची मैदाने असल्यास दरवर्षी एक लाख रुपये, खेळाडू मानधन सुमारे १५ लाख रुपये, कारखान्यामार्फत नेमलेल्या प्रशिक्षकांना एक लाख आणि गरज पडेल तिथे व्यायामाचे साहीत्य एक लाख रुपये असा समावेश आहे. सरासरी ५० खेळाडू दरवर्षी कारखान्याकडून मानधन घेतात. कधी ही संख्या ९७ पर्यंतही जाते. यातील खेळाडूंना नोकऱ्या मिळाल्यास त्यांचे मानधन बंद करुन पुन्हा गरजूंना शोधून प्रवाहात आणले जाते.

आतापर्यंत या कारखान्याचे कुस्तीमध्ये राष्ट्रकुल सुवर्ण विजेते राम सारंग, रणजित नलवडे,अस्लम काझी,डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, तानाजी नरके (रशिया कांस्य),नंदू आबदार, विक्रम कुऱ्हाडे, सुनिल पाटील (थायलंड कांस्य) असे खेळाडू चमकले आहेत. तर शरिरसौष्ठवमधील 'भारत श्री' सुहास खामकर,अॅथलेटिक्समधील मॅरेथॉन गाजवलेली जयश्री बोरगी,अपंगमधील ज्योती जाधव,पॉवर लिफ्टरमधील अमित निंबाळकर, स्केटिंगमधील बांगलादेशचे सुवर्ण मिळवणारा सुजय पवार यांच्यासह आंतरराष्ट्रीय नेमबाज तेजस्विनी सावंत यांनाही शाहू कारखान्याने खेळासाठी मदत केली आहे. असे २५ हून अधिक खेळाडू राज्य आणि राष्ट्रीय पातळीपर्यंत चमकले आहेत.

'१९७५-७६ सालात सामाजिक क्षेत्रात उतरल्यावर दिवंगत राजे विक्रमसिंह घाटगे यांना जाणीव झाली की, गावागावात तालमी होत्या. परंतु प्रोत्साहन द्यायला कुणी नव्हते. ते हा खेळ कधी खेळले नाहीत. परंतु या खेळालाच प्राधान्य द्यायचे ठरवले आणि यासह इतर खेळांची यासंबंधीची नियमावली बनवली. त्याचा ग्रामीण, होतकरू मुलांना होणाऱ्या फायद्याची तुलना कशाशीच होवू शकत नाही. मी फक्त हा वारसा पुढे अंखंड चालवला आहे.

समरजितसिंह घाटगे,चेअरमन, शाहू कारखाना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संविधानाच्या मूळ ढाच्याला धोका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

देशभरात अराजकता माजवून संविधान अस्थिर करण्याचा प्रय‌त्न भाजप सत्तेत आल्यापासून करत आहे. देशात स्वयंघोषित गोरक्षक दलित आणि मुस्लिमांवर हल्ले चढवत आहेत. न्यायव्यवस्था खिळखिळी केली जात आहे. तर ज्या राज्यात सत्ता नाही त्या राज्यांमध्ये अस्थिरता निर्माण करून सत्ता बळकावण्याचा प्रयत्न जात आहे, भाजपचा हा चौमुखी चेहरा संविधानाच्या मूळ ढाच्याला धोके पोहोचवत आहे, अशी टीका मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार सीताराम येचुरी यांनी रविवारी केली.

येथील शाहू स्मारक भवनात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे आयोजित 'चक्रव्यूहात भारतीय लोकशाही' या विषयावर ते बोलत होते.

खासदार येचुरी म्हणाले, 'गेल्या तीन महिन्यातील औद्यागिक विकास दर केवळ ०.६ वर तर उत्पादनाचा दर उणे ०.७ वर आला आहे. परिणामी रोजगार घटले आहे. उद्योगांत मंदी आहे. शेतीची ‌बिकट अवस्था आहे. उत्पादनआधारित भाव मिळत नसल्याने कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्तेचे प्रमाण वाढले आहे. भाजप सत्तेवर आल्यापासून संविधांनाच्या ढाच्याला जाणीवपूर्वक धोके पोहचवत आहेत. संविधानाचा बचाव करत असल्याने मार्क्सवादाला टार्गेट केले जात आहे. देशातर्गंत अशांतता निर्माण होत आहे. सीमेवरील हल्ले वाढले आहेत.

यावेळी पक्षाचे महाराष्ट्र राज्य सचिव नरसय्या आडम यांच्या हस्ते कोल्हापूरातून संकलित झालेले एक लाख ७१ हजार आणि राज्यातून गोळा झालेले एकूण दहा लाख रुपयांचा धनादेश पश्चिम बंगाल भ्रातृभावनिधीसाठी येचुरी यांच्याकडे दिले. डॉ. अशोक ढवळे, डॉ. उदय नारकर, चंद्रकांत यादव आदी उपस्थित होते. सुभाष जाधव यांनी प्रास्ताविक केले.

'मल्या सहीसलामत...'

खासदार येचुरी यांनी विजय मल्यावर भाष्य करताना म्हणाले, माझे एके काळचे राज्यसभेतील खासदार सहकारी राष्ट्रीयकृत बँकांना ९००० हजार कोटींना बुडवून सरकारच्या सल्याने विदेशात पलायन केले आहेत. त्यांना पकडण्याची हिंमत सरकारमध्ये नाही. याउलट नऊ हजार रूपये कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यास वुसलीसाठी तगादा लावला जात आहे. मालमत्ता जप्त केली जाते. त्याला कंटाळूनच शेतकरी आत्महत्या करत आहे.

म्हणून पानसरेंचा खून...

सध्या दडपशाही आणि संविधानाच्या बचावासाठी जे बोलतात त्यांची मुस्कटदाबी केली जात आहे. त्यातूनही जे ऐकणार नाहीत त्यांची हत्या घडवून आणली जात आहे. कॉ. गोविंद पानसरे आणि डॉ. कलबुर्गी यांनी प्रबोधनाची मोहीम सुरू ठेवल्याने त्याचे खून झाले, असेही येचुरी म्हणाले. तसेच कामगारांच्या हक्कावर गदा येत असल्याने २ सप्टेंबर रोजी देशव्यापी संप आहे. यापुढील काळात दडपशाही झुगारून सरकारला उलथून टाकण्यासाठी भीमशक्ती, लाल सलाम, कामगार, शेतकरी संघटीतपणे लढायला हवे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विवाहितेला जीवे मारण्याचा प्रयत्न

$
0
0

सासरच्या लोकांकडून मारहाण;

पीडितेची पोलिस अधीक्षकांकडे धाव

म. टा. वृत्तसेवा, मिरज

विवाहिता अनिसा वाहिद बेंदरे (वय २७, गुरुवार पेठ, मिरज) यांना खोलीत कोंडून बेदम मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. या बाबत विवाहितेने पोलिस अधीक्षकांकडे धाव घेऊन सासरच्या सहा जणांविरोधात तक्रार दिली आहे.

पीडित विवाहिता अनिसा हिचा विवाह तासगाव येथील वाहिद बेंदरे याच्याशी २००७मध्ये झाला. तिला सहा वर्षांची मुलगी आणि चार वर्षांचा मुलगा आहे. माहेरच्या लोकांकडून व्यवसायास पाच लाख रुपये घेऊन येण्यासाठी सासरच्या लोकांकडून तिच्यावर वारंवार दबाव आणला जात होता. मात्र, अनिसाने पैसे आणण्यास नकार दिल्याने काही महिन्यांपासून तिला उपाशी ठेवणे, वारंवार मारहाण करणे असे प्रकार केले जात होते. या बाबत अनिसाने माहेरच्या लोकांना काहीच सांगितले नव्हते. पुन्हा २३ ऑगस्ट रोजी तासगाव येथील सय्यद प्लॉट येथे बेंदरे कुटुंबातील सदस्यांनी पीडित अनिसाला एका खोलीत डांबून तिला काठ्याने आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तिला विषारी इंजेक्शन करण्याचीही धमकी दिली. पीडितेने सासरच्या तावडीतून सुटका करून घेऊन थेट माहेर मिरज गाठले. पीडितेने बेंदरे कुटुंबातील पती वाहिद बताश बेंदरे, दीर वसिम बताश बेंदरे, नईम बताश बेंदरे, वाजीद बताश बेंदरे, जाऊ रईसा वसिम बेंदरे, फौजिया नईम बेंदरे यांच्या विरोधात तासगाव पोलिसांत तक्रार दिली होती.

तासगाव पोलिसांची हलगर्जी

तासगाव पोलिसांनी केवळ विवाहिता हिंसाचार प्रतिबंधक कलमाखाली गुन्हा दाखल केला. जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा पोलिसांनी जाणीवपूर्वक दाखल केला नसल्याचा आरोप पीडितेने केला आहे. म्हणून सासरच्या लोकांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यासाठी पीडित विवाहिता अनिसा बेंदरे हिने पोलिस अधीक्षकांकडे धाव घेऊन तक्रार केली आहे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गूळ निर्यातीला मिळणार ‘बुस्टर’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यातील पारंपरिक गूळ निर्मितीला आता बुस्टर मिळणार आहे. जिल्ह्यात कोल्ड स्टोअरेज नसल्यामुळे गुळाच्या निर्यातीत अडथळे येत होते. मात्र, येथील सहकारी संस्था किंवा उद्योजकांनी कोल्ड स्टोअरेजसाठी प्रस्ताव दिल्यास त्याला पूर्णपणे सहकार्य करण्याचे आश्वासन राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी 'महाराष्ट्र टाइम्स'ने आयोजित केलेल्या 'मेक इन कोल्हापूर मटा कॉन्क्लेव'मध्ये दिली आहे. या घोषणेचे गूळ उत्पादकांनी स्वागत केले आहे. दरम्यान, क्लस्टर योजनेचे कामही अंतिम टप्प्यात असल्याने भविष्यात गुळाच्या निर्यातीला चालना मिळणार आहे.

फाउंड्री उद्योग हा येथील उद्योगाचा पाया आहे. तसेच गूळ ही कोल्हापूरची खासियत असल्याने गुळालाही निर्यातीसाठी पाठबळ देण्याची गरज असल्याचे मत मंत्री देसाई यांनी 'कॉन्क्लेव'मध्ये व्यक्त केले. क्लस्टरअंतर्गत कोल्ड स्टोअरेज उभारण्याची आवश्यकता आहे. हे स्टोअरेज उभारण्यासाठी सरकार पूर्णपणे सहकार्य करेल. त्यासाठी असोसिएशन, सहकारी संस्था किंवा उद्योजकांकडून प्रस्ताव आल्यास निश्चितच पूर्ण सहकार्य केले जाईल, असे आश्वासन देसाई यांनी दिले.

गूळ क्लस्टरसंदर्भात कोल्हापुरात एक समिती कार्यरत असून, त्याचे सात सदस्य आहेत. योजनेसाठी शंभरहून अधिक शेतकऱ्यांची सभासद नोंदणी झालेली आहे. या क्लस्टरसाठी कागल तालुक्यातील बेलवळे खुर्द येथे चार एक जागा मंजूर असून, तेथे माती परीक्षणापासून गूळ प्रयोगशाळादेखील असेल. यासाठी १५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, त्यासाठीची ९० टक्के रक्कम केंद्र सरकार देणार आहे. उर्वरीत रक्कम योजनेतील गूळ उत्पादक शेतकऱ्यांना द्यायची आहे. या दहा टक्के रकमेतील प्राथमिक टप्प्यातील रक्कम तयार असल्याची माहिती समितीचे संचालक मारुती जाधव यांनी दिली. नियोजनानुसार सर्व गोष्टी होत गेल्या, तर येत्या काही महिन्यांत क्लस्टरचे काम सुरू होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

गूळ क्लस्टरसंदर्भात मंगळवारी (ता. ३० ऑगस्ट) कोल्हापुरात एक बैठक होत आहे. त्यानंतर क्लस्टरच्या हालचालींना गती येईल. क्लस्टर प्रस्तावातील मशिन्सच्या एका कोटेशनसाठी सध्या प्रक्रिया थांबली आहे. दिल्लीतील कार्यालयाच्या मागणीनुसार कोटेशन दिल्यानंतर क्लस्टर योजनेला अंतिम स्वरूप येईल.

- मारुती जाधव, संचालक, गूळ क्लस्टर समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images