Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

ट्रॅफिक अॅक्शन प्लॅन फेल

$
0
0
मलकापुरातील वाहतूक कोंडी फुटावी यासाठी केलेला अॅक्शन प्लॅन फेल गेला आहे. साडे तीन महिन्यापुर्वी केलेल्या अॅक्शन प्लॅनला नगरपालिकेकडून ग्रीन सिग्नल न मिळाल्याने येथील ट्रॅफिकमध्ये दिवसेंदिवस बेशिस्त निर्माण झाली आहे.

सेतू केंद्राखाली झाली कागदपत्रे गडप

$
0
0
सरकारी कार्यालयातून प्रमाणपत्र तसेच विविध दाखले मिळवण्याच्या मोठ्या दिव्यातून नागरिकांनी जमवलेल्या कागदपत्रांना सरकारी कार्यालयानेच कचऱ्याची कुंडी दाखवली आहे.

पक्ष एक आणि भूमिका दोन

$
0
0
परप्रांतीय मजुराने एका बालिकेवर बलात्कार केल्यानंतर शिवसेनेने रस्त्यावर उतरुन मारहाणीचा प्रकार केला होता. यावेळी बलात्कारासारखा प्रकार शिवसैनिक खपवून घेतला जाणार नसल्याचा सज्जड दम देण्यात आला होता.

ट्रक व्यवसाय अडचणीत

$
0
0
दोन ते अडीच हजार किलोमीटरचा प्रवास... ऊन असू दे अथवा पाऊस एका राज्यातून दुसऱ्या राज्यात वाहतूक करणे आणि त्यावर आपला चरितार्थ चालवणे असे सर्वसाधारणपणे ट्रकचालकांचे काम असते.

‘सहसंचालक’मधील भ्रष्टाचार थांबवा

$
0
0
शिक्षण सहसंचालक कार्यालयातील भ्रष्टाचार थांबला पाहिजे, एमफील, पीएचडीच्या वेतनवाढी मिळाल्याच पाहिजेत, प्राध्यापकांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करावी अशा विविध मागण्यांसाठी शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघातर्फे शिक्षण सहसंचालक कार्यालयाच्या विरोधात धरणे आंदोलन करण्यात आले.

उपमुख्यमंत्रिपदावर आमचाच हक्क

$
0
0
उपमुख्यमंत्री पदावर दावा करण्यात येणार असल्याचे सांगत आरपीआय पक्षाचा केवळ स्वार्थी वापर करुन घेणाऱ्या काँग्रेसला सत्तेवरुन खाली खेचण्याचे ‘मिशन २०१४’ आहे,’ अशी घोषणा माजी खासदार आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय नेते रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत केली.

शिवसेनेने लावले कंपनीला कुलूप

$
0
0
नगरोत्थान योजनेतील रस्त्यांच्या कामास विलंब होत असल्याबद्दल शिवसेनेने जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली शांतीनाथ रोड डेव्हलपर्स या रस्ते तयार करणाऱ्या कंपनीच्या कार्यालयाला कुलूप लावले.

काँग्रेसचे राजकारण स्वार्थी

$
0
0
‘येत्या १७ नोव्हेंबर रोजी येथील गांधी मैदानात होत असलेल्या परिवर्तन निर्धार महामेळावा एक लाखांच्या उपस्थितीत पार पाडा. राज्यात निळा आणि भगवाच फडविण्यासाठी नेटाने प्रयत्न करा.

आचारसंहितेआधी प्रशासन सावध

$
0
0
आगामी लोकसभा निवडणूक व त्यापाठोपाठ येणाऱ्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता गृहित धरून सावध झालेल्या जिल्हा नियोजन मंडळाने आत्ताच १८७ कोटींचा वार्षिक आराखडा तयार केला आहे.

खंडपीठाच्या लढ्याला बळ

$
0
0
‘कोल्हापुरात हायकोर्टाचे खंडपीठ व्हावे, या मागणीसाठी दीर्घकाळ सुरू असलेला लढा अधिक तीव्र करा. खंडपीठाची मागणी मंजूर होत नाही, तोपर्यंत त्वेषाने लढत रहा,’ असे आवाहन करून जेष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील, खासदार राजू शेट्टी व रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी वकील संघटनांना आश्वस्त केले.

पैसे २ खड्ड्यांचे, खड्डे मात्र २५

$
0
0
‘आमचा गणपती नवसाचा आहे’, ‘सर्वात मोठी विद्युत रोषणाई आमची आहे’, ‘मंदिराची भव्य प्रतिकृती आमचीच’, ‘छत्रपती शिवरायांच्या चरित्रावर आधारित देखावा सादर करून राष्ट्रभक्ती दाखवणारे आम्हीच’ असा दावा करणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी रस्त्यांवर मोठे मंडप उभारुन अडवणूक सुरू केली आहे.

प्रादेशिक सेनेसाठी १५ सप्टेंबरपासून भरती

$
0
0
प्रादेशिक सेनेत शिपाई (जनरल), लिपिक, धोबी, स्वयंपाकी, सफाईवाला आदी पदांसाठी भरतीचा चाचणी मेळावा १५ व १६ सप्टेंबर रोजी मिलटरी प्रशिक्षण मैदानावर होणार आहे. दोन्ही दिवस सकाळी सात वाजता ही भरती प्रक्रिया सुरू होईल.

‘मन, शरीर सक्षम बनवा’

$
0
0
‘सुदृढ आरोग्यामुळे मन आणि शरीर सक्षम बनते, मुलींनी शिक्षणावरोबरच आरोग्याकडे लक्ष द्यावे,’ असे प्रतिपादन अरूंधती महाडिक यांनी केले. माळ्याची शिरोली (ता.करवीर) येथील बाबूराव पाटील उच्च माध्यमिक विद्यालयात ‘कळी उमलताना’ या प्रबोधनात्मक कार्याक्रमात बोलत होत्या. कार्यक्रमाचे आयोजन भागीरथी महिला संस्थेच्यावतीने केले होते.

शेतकऱ्यांना १३२ एकर जमिनीचे वाटप

$
0
0
जिल्ह्यातील खंडकरी शेतकऱ्यांना जमिनीचे वाटप प्राधान्य क्रमाने करण्यास प्रशासनाने प्राध्यान्य दिले असून सोमवारी करवीर तालुक्यातील २० खंडकरी शेतकऱ्यांना १३२ एकर जमिनीचे वाटप जिल्हाधिकारी राजाराम माने यांच्या हस्ते करण्यात आले.

घडतेय कुशल मनुष्यबळ

$
0
0
शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (स्मॅक) ही शिरोली परिसरातील उद्योजकांची शिखर संस्था. कोल्हापूर जिल्ह्यातील ५ औद्योगिक वसाहतींपैकी सर्वात श्रीमंत संस्था म्हणून या संस्थेची ओळख आहे. ‘स्मॅक’ची पंचवार्षिक निवडणूक सध्या सुरू आहे.

विद्यापीठ परिसरातील झाडांची नासधूस थांबवा

$
0
0
शिवाजी विद्यापीठ परिसरात राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विविध जातीच्या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. आंबा, साग, चिंच, बांबू, पाम, लिंबसह औषधी वनस्पती, पश्चिम घाटातील दुर्मिळ वनस्पतीची रोपे लावली आहेत. विद्यापीठाचा परिसर प्रशस्त आहे.

प्रकाशमान बदलासाठी...

$
0
0
...हॅलो, तुमच्या लक्षात येतंय का? हा कॉलम सुरू होऊन आणि आपली अटॅचमेंट होऊन चक्क दहा महिने होत आलेत ! आजचा हा पंचेचाळीसावा लेख... मी मागं वळून सर्व लेखांकडं बघतेय, तर विश्वासच बसत नाहीये, की इतकं सारं लिहून झालंय!

मंडपांनी केले रस्ते गायब

$
0
0
बाप्पांना ‌विघ्नहर्ता म्हटले जात असले तरी सध्या बाप्पांचा उत्सव सार्व‌जनिक पातळीवर साजरा करणाऱ्या उत्साही कार्यकर्त्यांमुळे शहरातील नागरिकांसमोर रिकामा रस्ता शोधण्याचे ‌संकट उभे राहिले आहे. राजारामपुरी, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, पेठातील रस्ते मंडप घालून ‘नो एंट्री’ केल्यामुळे लोकांचा मात्र गाड्यांसोबत भुलभुलैय्या होत आहे.

पॉश इमारतीवर २ दिवसांत पडणार हातोडा

$
0
0
सोलापूर शहरात महापालिकेचे आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी बेकायदा अतिक्रण भुईसपाट करण्याची मोहीम हाती घेतल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

नातेवाइकांच्या परवानगीने सल्यावर ऑपरेशन

$
0
0
कुख्यात गुंड सल्या चेप्यावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर अधिक उपचारासाठी सल्याला मुंबईतील जसलोक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून, तेथे सल्याच्या हातावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images