Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

शैक्षणिक कर्जामुळे भार हलका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सध्याच्या शिक्षणाचा खर्च परवडत नाही हा प्रश्न समोर असलेल्या गुणवंत मुलांच्या पालकांसाठी ​शैक्षणिक कर्ज सुविधा आर्थिक भार हलका करत आहे. केवळ आर्थिक बाजू भक्कम नाही म्हणून एखाद्या हुशार विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये, यासाठी राष्ट्रीयीकृत बँकांच्यावतीने शैक्षणिक कर्ज योजना आधार देत आहे. काही वर्षांपूर्वी शैक्षणिक कर्जासंदर्भात पालक व विद्यार्थ्यांमध्ये असलेली संभ्रमावस्था दूर करण्यासाठीही बँक व्यवस्थापनाची विशेष टीम काम करत आहे. यावर्षी एकट्या बँक ऑफ इंडियातून कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तीन जिल्ह्यांत एप्रिल ते जून या तीन महिन्यात साडेपाच कोटी कर्ज वाटप केले आहे.

गेल्या वीस वर्षांत शिक्षण आणि करियर निवडीचा परीघ व्यापक झाल्यामुळे ​मुलांच्या शिक्षणासाठी पालकांना आर्थिक तरतूद करणे ही कसरत ठरत आहे. महत्त्वाचे म्हणजे याची सर्वाधिक झळ मध्यमवर्गीय पालकांच्या आर्थिक नियोजनाला बसत आहे. अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रीयीकृत बँकांच्या माध्यमातून कर्ज घेण्याचा पर्याय आज पालक आणि विद्यार्थी यांच्यासाठी अतिशय उपयुक्त ठरत आहे. शैक्षणिक कर्ज घेण्यासाठी एप्रिल ते जून या महिन्यात बँकांमध्ये विशेष माहिती दालनही खुले केले जाते जेणेकरून पालक व विद्यार्थी यांच्यामध्ये शैक्षणिक कर्जाबाबतची भीती, शंका दूर होऊन योग्य माहिती मिळावी.

शैक्षणिक कर्जामध्ये समाविष्ट खर्च

कॉलेज हॉस्टेल फी

ग्रंथालय, प्रयोगशाळा, परीक्षा फी

पुस्तके व शैक्षणिक साधने व उपकरणे फी

परदेशातील शिक्षणाचा प्रवासखर्च

अभ्यासक्रमासाठी आवश्यक असल्यास संगणक खरेदी

​अभ्यासक्रम पूर्ण करण्याकरता आवश्यक त्या संगणकाची खरेदी

शैक्षणिक कर्ज मिळण्याची प्रक्रिया

उच्च शिक्षणासह, ज्या अभ्यासक्रमाची फी खूप महाग आहे अशा अभ्यासक्रमाची निवड करणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज मिळते. एज्युकेशन लोन घेऊन ​शिक्षण पूर्ण करणे आणि नोकरी लागल्यानंतर सहा महिन्यांनी ते फेडण्याचा पर्याय स्वीकारणे ही सध्या एक सोयीची सुविधा बनली आहे. ही सुविधा विद्यार्थी केंद्री असल्यामुळे हे कर्ज मंजूर होण्याची प्रक्रियाही सोपी आहे. विद्यार्थ्यांच्या नावावर कर्ज मंजूर होत असले तरी हमीदार किंवा सहकर्जदार म्हणून पालकांचे नाव लागते. त्यासाठी पालकांना त्यांच्या उत्पन्नाची माहिती द्यावी लागते. तर विवाहित विद्यार्थिनींसाठी पतीचे नाव हमीदार म्हणून लावले जाते. बारावीनंतर इंजिनीअरिंग, मेडिकलसह अन्य व्यावसायिक ​शिक्षण, उच्च शिक्षण तसेच संशोधनासाठी कर्ज मिळते. राष्ट्रीयीकृत, निम-सार्वजनिक, काही खाजगी तसेच नागरी बँक शैक्ष​णिक कर्ज सुविधा देतात. मात्र विद्यार्थी व पालक राष्ट्रीयीकृत बँकांमधून कर्ज घेण्याला प्राध्यान्य देत आहेत. विशेष म्हणजे चार लाखापर्यंतंच्या कर्जासाठी काहीही तारण ठेवण्याचे बंधन नसल्यामुळे या सुविधेचा उपयोग दरवर्षी हजारो विद्यार्थी घेतात.

शैक्षणिक कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

विद्यार्थ्याचे शैक्षणिक प्रमाणपत्र

प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे पत्र

अभ्यासक्रम मान्यतेचा पुरावा

प्रवेश घेतल्याचे पत्र

अ​धिकृत ओळखपत्र

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एकेरी वाहतूक, तरीही राजारामपुरीत कोंडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राजारामपुरीमध्ये पार्किंगचे नियोजन नसल्यामुळे एकेरी वाहतूक असूनही अनेकदा कोंडीला सामोरे जावे लागते. नेहमीच वर्दळीचा असलेल्या राजारामपुरीच्या मुख्य रस्त्यांसह व्यापारी संकुलांसमोरच मध्येच असलेले रिक्षा स्टॉप, चारचाकी वाहनांचे कोठेही आणि कसेही केले जाणारे पार्किंग यामुळे या परिसरात नेहमीच वाहतूक कोंडी दिसून येते.

राजारामपुरीतील पेट्रोल पंपापासून बस रूटवरील दोन्ही मुख्य मार्गांवर नेहमी वर्दळ असते. गेल्या काही वर्षात या परिसरात होणारे अपघात आणि वाहतूकीची कोंडी लक्षात घेत वाहतूक शाखेने गेल्या वर्षीपासून येथे एकेरी वाहतूक सुरू केली. मात्र, वाहतूक पोलिसांचे नेहमीच लक्ष असते अशी स्थिती नाही. त्यामुळे अनेकदा एकेरी वाहतूक असूनही नो एन्ट्रीमधून अनेक वाहनचालक बिनधास्त वाहने चालवित जातात. त्यामुळे या परिसरात वाहतूक कोंडी प्रश्न उदभवत आहे.

बसरुट मार्गावर सध्या हातगाड्या वाढत असल्यामुळे आणि अस्ताव्यस्त पार्किंगमुळे कोंडीचे चित्र दिसते. अनेकदा छोटे-मोठे अपघात घडतात. कमला कॉलेज ते आईचा पुतळा या मार्गावर नेहमीच वर्दळ असते. या मार्गावर तीन बसस्टॉप असल्यामुळे बस थांब्यांमुळे दुसरे मोठे वाहन ओव्हरटेक करू शकत नाही अशी परिस्थिती आहे. हा मार्ग कमला कॉलेजकडून पुढे जाणारा असा असला तरी अनेक वाहनचालक सर्रास नो एन्ट्रीमध्ये वाहन चालविताना दिसतात. मात्र तरीही या परिसरात वाहतूक पोलिस कोणतीच कारवाई करताना दिसत नाहीत. बस स्टॉपजवळच अनेक दुचाकी वाहने पार्क केलेली असतात. तसेच नवव्या गल्लीमध्ये शाळा असल्यामुळे सकाळी आणि सायंकाळी या परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होते. हा मार्ग एकेरी असल्यामुळे वाहतूक पोलिसांनी नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्याची आवश्यकता आहे.

गणेशोत्सवात मार्ग बंद

दरवर्षी गणशोत्सवाच्या काळात प्रत्येक गल्लीमध्ये मंडळ शेड उभारत बस रुट ते मेन रोड यामधील रस्ता पूर्णपणे बंद केला जातो. प्रशासनाने वाहन जाण्या इतपत जागा सोडणे आवश्यक असतानाही, दरवर्षी हा रस्ता मंडळांनी उभारलेल्या शेडमुळे बंद होतो. त्यामुळे या दोन्ही मार्गावर वाहतूकीची प्रचंड कोंडी होते.

आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून राजारामपुरीत रोहतो. मात्र वाहतुकीचे नियोजन नसल्यामुळे नेहमीच या परिसरात कोंडीचा प्रश्न निर्माण होतो. एकेरी वाहतूक असूनही या नियमाचे पालन होत नसल्यामुळे अनेकवेळा छोटे-मोठे अपघात घडतात.

- सुनील रोकडे, नागरिक, कोल्हापूर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कन्यागत महापर्व सोहळा सुरू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

'श्री गुरुदेव दत्त'च्या जयघोषात गुरुवारी दुपारी तीर्थक्षेत्र नृसिंहवाडी येथे पालखी मिरवणुकीने कन्यागत महापर्वकाळ सोहळ्यास सुरुवात झाली. टाळ-मृदंगासह पारंपरिक वाद्यांच्या गजरात श्रींच्या पालखीचे शुक्लतीर्थाकडे प्रस्थान झाले आणि कृष्णाकाठ दुमदुमला. यावेळी भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. दत्त मंदिराच्या आवारात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी श्रींच्या पालखीला पुष्पार्पण केले.

नैवेद्य, धूप दीप आरती होऊन दुपारी श्रींच्या पालखी सोहळ्यास ब्रम्हवृंद, ग्रामस्थ, दत्तभक्त व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. श्रींची पालखी आकर्षक फुलांनी सजविली होती. गुरुवारी पहाटे पाच वाजता मंदिरात काकडआरती व षोडशोपचार पूजा झाली. सकाळी आठ वाजता अभिषेक व पूजा झाली. सकाळी अकरा वाजता महापूजा करण्यात आली.

आज मुख्य सोहळा

शुक्रवारी सकाळी सूर्योदयावेळी, सहा वाजून २० मिनिटांनी कृष्णा नदीकाठी शुक्लतीर्थावर श्रींच्या मूर्तीस कन्यागत पर्वकाल स्नान होईल. त्यानंतर परंपरेनुसार पुण्याहवाचन, गंगापूजनासह धार्मिक कार्यक्रम होतील. त्यानंतर श्रींची पालखी मिरवणूक मंदिराकडे प्रस्थान करेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कन्यागत महापर्वकाळास उत्साहात प्रारंभ

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

'दिगंबरा... दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा', 'श्री गुरुदेव दत्त'च्या जयघोषात गुरुवारी दुपारी कृष्णाकाठ दुमदुमला. तीर्थक्षेत्र नृसिंहवाडी येथे पालखी मिरवणुकीने कन्यागत महापर्वकाळ सोहळ्यास सुरुवात झाली. टाळ-मृदंगासह पारंपरिक वाद्यांच्या गजरात श्रींच्या पालखीचे शुक्लतीर्थाकडे प्रस्थान झाले. यावेळी भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. दत्त मंदिराच्या आवारात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी श्रींच्या पालखीला पुष्पार्पण केले.

श्रींची पालखी आकर्षक फुलांनी सजविली होती. नैवेद्य, धूप दीप आरती होऊन दुपारी श्रींच्या पालखी सोहळ्यास ब्रम्हवृंद, ग्रामस्थ, दत्तभक्त व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. यावेळी माजी मंत्री आमदार डॉ. पतंगराव कदम, आमदार उल्हास पाटील, आमदार सुरेश हाळवणकर, आमदार सुजित मिणचेकर, वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष हिंदुराव शेळके, करवीर पीठाचे जगद्गुरू शंकराचार्य, गाणगापूर येथील वल्लभानंद महाराज, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, श्री नृसिंहसरस्वती दत्तगुरू देवस्थानचे अध्यक्ष राहुल पुजारी, सचिव संजय पुजारी तसेच मान्यवर ट्रस्टी, नृसिंहवाडी सरंपच अरुंधती जगदाळे, उपसरपंच धनाजीराव जगदाळे तसेच श्रींचे मान्यवर पुजारी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गुरुवारी पहाटे पाच वाजता मंदिरात काकडआरती व षोडशोपचार पूजा करण्यात आली. यानंतर सकाळी आठ वाजता अभिषेक व पूजा झाली. सकाळी अकरा वाजता श्रींची महापूजा करण्यात आली. नैवेद्य, धूप, दीप, आरती झाल्यानंतर नारायण स्वामी मंदिरातून श्रींच्या पालखी मिरवणुकीस सुरुवात झाली. रामचंद्र योगी, स्वामी महाराज यांच्या मंदिराला प्रदक्षिणा घालून पालखीचे ओतवाडी भागातील कृष्णा नदीकाठच्या शुक्लतीर्थ घाटाकडे प्रस्थान झाले. पालखी मार्गावर ग्रामस्थांनी ठिकठिकाणी रांगोळ्या रेखाटल्या होत्या. पालखी मार्गावर मंडप घालण्यात आला असून, विद्युत रोषणाईने पालखी मार्ग सजविण्यात आला आहे. पालखी मिरवणुकीवेळी घरोघरी सुहासिनीनी श्रींचे औक्षण केले, तसेच भाविकांनी पालखीवर पुष्पवृष्टी केली.

पालखी सोहळ्यास प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सदाशिव साळुंखे, कार्यकारी अभियंता आर. एस. पाटील, तहसीलदार सचिन गिरी, गटविकास अधिकारी राहुल देसाई, श्री नृसिंहसरस्वती दत्त देवस्थानचे पदाधिकारी, ट्रस्टी, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ आणि राज्यभरातून आलेले भाविक उपस्थित होते.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कृष्णा नदीच्या पूरपरिस्थितीची पाहणी केली तसेच त्याबाबत केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. जिल्हा नियोजन कक्षामधील सीसीटीव्ही, नियंत्रण कक्ष आदींची माहिती घेऊन कन्यागत सोहळ्यासाठीच्या आपत्कालीन यंत्रणेचा तसेच सुरक्षा यंत्रणेचाही आढावा घेतला. कन्यागत महापर्वकाल सोहळ्यानिमित्त केलेल्या विकासकामांची त्यांनी माहिती घेतली. पार्किंग, पालखी मार्ग, शुक्लतीर्थ घाट या ठिकाणी त्यांनी भेट दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांबळे कुटुंबियांना आठ लाखांची मदत

$
0
0

हातकणंगले

महाड येथील दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या सावर्डे (ता.हातकणंगले) येथील श्रीकांत कांबळे व त्यांचा मुलगा महेंद्र कांबळे यांच्या वारसांना सरकारच्या राष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती विशेष निधीतून आठ लाखांची आर्थिक मदत देण्यात आली. त्याचबरोबर येत्या दहा दिवसात एसटी महामंडळाकडून प्रत्येकी दहा लाखाची मदत देण्यात येईल, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील असे सांगितले.

या मदतीचा धनादेश पालकमंत्री पाटील यांनी श्रीकांत कांबळे यांच्या घरी जाऊन वारस पत्नी कमल कांबळे ,मुलगा मिलन,आई हिराबाई यांच्याकडे दिला. यावेळी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, सुरेश हाळवणकर ,जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके,तहसीलदार दिपक शिंदे उपस्थित होते.

महाड येथील सावित्री नदीवरील पूल कोसळून यामध्ये एसटी चालक श्रीकांत कांबळे व त्यांचा मुलगा महेंद्र कांबळे या दोघांचा मुत्यू झाला होता. याच काळात मुसळधार पावसामुळे कांबळे कुटूंबियांच्या राहत्या घराची पडझड झाली होती. पालकमंत्री पाटील यांनी कांबळे कुटूंबियांचे सांत्वन करून घरबांधणीसाठी तत्काळ ९५ हजारांचा निधी मंजूर केला. यावेळी उपस्थितांनी पालकमंत्री पाटील यांच्याकडे श्रीकांत कांबळेच्या मुलगा मिलन याला सरकारी नोकरीत घ्यावे, अशी मागणी केली. यावेळी पाटील यांनी या मागणीचा पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कन्यागत महापर्वकाळ सोहळा वेळापत्रक

$
0
0


शुक्रवारी (दि.१२) सकाळी सूर्योदयावेळी सहा वाजून २० मिनिटांनी कृष्णा नदीकाठी शुक्लतीर्थावर श्रींच्या मूर्तीस कन्यागत पर्वकाल स्नान होईल. यानंतर परंपरेनुसार पुण्याहवाचन, गंगापूजन यांसह धार्मिक कार्यक्रम झाल्यानंतर श्रींची पालखी मिरवणूक मंदिराकडे प्रस्थान करेल. मंदिरात धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.

वर्षभरातील प्रमुख पर्वणी

२० सप्टेंबर २०१६ भरणी श्राद्ध महापर्वकाल

२५ मार्च २०१७ महावारूणी योग द्वादशी महापर्व

९ जुलै २०१७ गुरुपौर्णिमा

७ ऑगस्ट २०१७ श्रावण पौर्णिमा

२१ ऑगस्ट २०१७ दर्श-पिठोरी-सोम अमावस्या

१२ सप्टेंबर २०१७ कन्यागत समाप्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपचे टार्गेट 40 जागा

$
0
0

कोल्हापूर

ताराराणी आघाडीच्या हातात हात घालून कोल्हापूर महापालिकेत दणदणीत प्रवेश केलेल्या भारतीय जनता पक्षाने आता जिल्हा परिषदेसाठी व्यूहरचना आखली आहे. 40 मतदारसंघ निवडून तेथे कोणत्याही परिस्थितीत पक्षाचा झेंडा फडकवण्याचा भाजपचा अजेंडा आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना, रिपाईं आठवले गट आणि प्रसंगी शिवसेनेशी महायुती करण्याचा प्रस्ताव खुला ठेवतानाच पक्षाच्या चिन्हावर अधिकाधिक सदस्य निवडून आणण्यासाठी पक्षाने आतापासूनच फिल्डींग लावण्यास सुरूवात केली आहे.

कोल्हापूर महापालिकेत गेल्या अनेक वर्षात भाजपची फारशी ताकद नव्हती. केवळ दोन तीन जागा या पक्षाला मिळत होत्या. राज्यात सत्तेत आल्यानंतर मात्र महापालिकेची निवडणूक ताकदीने लढवत पक्षाने मोठी झेप मारली. पक्षाने ताराराणी आघाडीच्या मदतीने १३ जागा मिळवल्या. एका अपक्षाच्या पाठिंब्यामुळे हा आकडा १४ झाला. प्रबळ विरोधक म्हणून महापालिकेत प्रवेश केल्यानंतर आता पक्षाने जिल्हा परिषदेवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी जिल्ह्यातील प्र्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या तीन चार बैठका घेतल्या. या बैठकीत मतदारसंघनिहाय चर्चा करण्यात आली. या मतदारसंघातील सध्याची पक्षाची स्थिती आणि काही नेत्यांच्या संभाव्य प्रवेशानंतर मिळणारी ताकद याचा आढावा घेण्यात आला. हातकणंगले, करवीरसह अनेक तालुक्यात पक्षाची ताकद चांगली आहे. तशीच ताकद इतर तालुक्यात निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरले. शिरोळ, गडहिंग्लज तालुक्यात स्वाभिमानीची ताकद आहे, समरजित घाटगे यांचा पक्षात प्रवेश झाल्यास कागल तालुक्यात पक्षाला बळकटी येणार आहे. रिपाईंची प्रत्येक मतदारसंघात मते आहेत, त्याचा फायदा पक्षाला होण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर पक्षाने प्राथमिक टप्यात ६९ पैकी 40 मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. निवडणुकीला अजून सहा महिन्याचा कालावधी आहे. तोपर्यंत या मतदारसंघात वाढ होण्याची शक्यता आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतरही काही राजकीय संदर्भ बदलणार आहेत. त्यामुळे सध्या पक्षाच्या पातळीवर त्याची तयारी सुरू आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतर आणखी काही मतदारसंघ वाढवून तेथे जोरदार तयारी करण्याचे पक्षाचे नियोजन आहे. त्यादृष्टीने काही पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सध्या जिल्हा परिषदेत पक्षाची ताकद कमी आहे, पण काही मित्र पक्षाशी महायुती झाल्यास महापालिकेप्रमाणे तेथेही भाजपला फायदा होण्याची शक्यता आहे. महायुतीबाबत निर्णय होण्यास अजून वेळ आहे. पण राज्यात महायुतीचे राज्य असल्याने मित्र पक्ष स्वतंत्र लढण्याची शक्यता कमी आहे. शिवसेना मात्र याला अपवाद ठरणार की नाही हे शेवटच्या टप्प्यात ठरणार आहे.

चौकट

अनुकूल मतदारसंघांवर नजर

भाजपला अनुकूल असलेले काही विशिष्ट मतदारसंघ पक्षाने हेरले आहेत. सध्या तेथे असलेली पक्षाची ताकद आणि एखाद्या व्यक्तीच्या संभाव्य पक्ष प्रवेशाने काही मतदारसंघात मिळणारी ताकद या पार्श्वभूमीवर हे मतदारसंघ निश्चित करण्यात आले आहेत. या मतदारसंघात विशेष निधी देवून तेथे जादा कामे करत वातावरणनिर्मिती करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. महापालिका निवडणुकीपूर्वी पक्षाने कोल्हापूर शहराला वीस कोटींचा विशेष निधी दिला होता. त्या पध्दतीने जिल्ह्यात देखील विशेष निधीतून विकासकामे करत पक्षाची ताकद वाढवण्याचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यटन विकासाला चालना

$
0
0

नाशिक येथील कुंभमेळ्याप्रमाणे श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे दर बारा वर्षांनी कन्यागत महापर्वकाळ सोहळा सुरू झाला आहे. या काळात गुरू कन्या राशीत प्रवेश करीत असताना गंगा नदी कृष्णा नदीस येऊन भेटते, अशी आख्यायिका आहे. या काळात कृष्णा नदीतील स्नानास महत्त्व असते. सोहळ्याचा आज (१२ ऑगस्ट) मुख्य दिवस आहे. कन्यागत पर्वानिमित्त पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी साधलेला संवाद.

कन्यागत महापर्वकाळ सोहळ्यात किती लोक सहभागी होतील?

कन्यागत सोहळ्याला धार्मिक महत्त्व आहे. बारावा गुरू कन्या राशीत प्रवेश करणार असून, त्याचा कालावधी १३ महिन्यांचा आहे. यावेळी गंगा नदी कृष्णेला मिळणार आहे. नृसिंहवाडीला कृष्णा व पंचगंगेचा संगम होतो. तसेच कृष्णेला गंगा मिळणार असल्याने हिंदू धर्मातील पवित्र स्नानाची पर्वणी १३ महिने लाभणार आहे. २०१६ मध्ये १२ ऑगस्ट, २० सप्टेंबर या दिवशी, तर २०१७ मध्ये १४ जानेवारी, १५ मार्च, नऊ जुलै, सात ऑगस्ट, २१ ऑगस्ट, २२ सप्टेंबर हे पर्वणीचे योग आहेत. तसेच दर पौर्णिमेलाही नृसिंहवाडी येथे भाविक दर्शनाला येतात. १३ महिन्यांच्या महापर्वकाळात दर्शनासाठी ५० लाख भाविक येतील अशी अपेक्षा आहे.

कन्यागत पर्वासाठी कोणत्या पायाभूत सुविधा निर्माण करणार आहात?

कन्यागत पर्वासाठी राज्य सरकारने पायाभूत सुविधा उभारण्यासाठी १२१ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. ६५ कोटी रुपयांचा पहिला हप्ता विकासकामांसाठी उपलब्ध झाला असून, त्यातून विकासकामे सुरू आहेत. नृसिंहवाडी येथील आठ प्रशस्त घाट, घाटांचे सुशोभिकरण, पालखी मार्ग, भक्तनिवास, पार्किंग, विद्युतीकरण, सांस्कृतिक सभागह, सुरक्षाव्यवस्था, आरोग्य सुविधा, रस्ते या पायाभूत सुविधा केल्या जात आहेत.

कन्यागतमधून कोणत्या गोष्टी साध्य होणार आहेत?

भारतात पर्यटन रुजेलेले नाही; पण लोक धार्मिक पर्यटन करतात. धार्मिक पर्यटनातून पर्यटन विकासाला चालना देण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे. धार्मिक पर्यटनाची वृद्धी होण्यासाठी त्या ठिकाणी पायाभूत सुविधांचे जाळे उभारणे आवश्यक आहे. कन्यागत महापर्वकाळात ५० लाख भाविक येणार असल्याने पर्यटनावर आधारित रोजगारनिर्मिती होऊन आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणावर होईल. तसेच नृसिंहवाडीकडे येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येतही वाढ होईल.

कन्यागतबरोबर कोल्हापूरच्या पर्यटन वृद्धीसाठी कोणत्या योजना आहेत?

कोल्हापूरचे पर्यटन वाढावे यासाठी येत्या नोव्हेंबर ते डिसेंबर या कालावधीत कोल्हापूर महोत्सवाचे आयोजन केले आहे. तसेच पर्यटनवाढीसाठी रस्ते, विमानतळ, रेल्वेच्या सुविधा वाढवाव्या लागतील. तीन ते चार महिन्यांत विमानतळ सुरू होण्याची शक्यता असून, कोल्हापूर-मुंबई, मुंबई-कोल्हापूर या रेल्वेच्या जादा गाड्या सोडण्यासाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेणार आहे. अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचे काम सुरू झाले आहे. कोल्हापुरात पर्यटक वाढावे यासाठी टूर ऑपरेटर्सना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. टूर ऑपरेटर्सच्या माध्यमातून पर्यटकांना कोल्हापूरकडे वळविण्यात येईल.

 संकलन ः सतीश घाटगे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


निम्मी आरोग्य केंद्रे मृत्यूशय्येवर

$
0
0

Bhimgonda.Desai@timesgroup.com

डॉक्टराविना जिल्ह्यातील ५१ प्राथमिक आरोग्य केंद्रे मृत्यूशय्येवर आहेत. संबंधित आरोग्य केंद्रात वैद्यकीय उपचार मिळत नसल्याने रूग्णांना खासगी दवाखान्यात जावे लागत आहे. त्याचा सर्वाधिक आर्थिक फटका गरीब रूग्णांना बसत आहे. याउलट संबधित ठिकाणच्या खासगी रूग्णालयांना अच्छे दिन आले आहे.

जिल्ह्यात एकूण ९४ तालुका आणि प्राथमिक आरोंग्य केंद्रे आहेत. प्राथमिक व उपकेंद्रात किरकोळ स्वरूपाच्या सर्व आजारांवर उपचार करून औषधे नाममात्र किंमतीत दिली जातात. प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसुतीची सुविधा आहे. तालुका पातळीवरील दवाखान्यात गंभीर आजारांवर उपचार केले जातात. यामुळे सामान्य, गरीब रूग्णांसाठी आरोग्य केंद्रे वरदान ठरली आहेत. अलिकडे खासगी दवाखान्यातील मनमानी बिलांमुळे रूग्ण हतबल झाले आहेत. परिणामी सरकारी आरोग्य केंद्रात उपचार घेण्याकडे कल वाढतो आहे. अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रात दर्जेदार उपचार दिले आहेत. ज्या सरकारी दवाखान्यांत दर्जेदार आणि चांगली सेवा मिळते आहे, त्या ठिकाणच्या खासगी डॉक्टरांना रूग्णांची प्रतिक्षा करत दिवस घालवावा लागतो.

वर्षभरापूर्वी सर्वच केंद्रांत मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी जिल्ह्यात लोकसहभागातून कायापालट उपक्रम प्रभावीपणे राबविला. सर्वच आरोग्य केंद्रांचा लूक बदलला आहे. परंतु, वर्षानुवर्षे आरोग्य केंद्रांना डॉक्टर मिळत नसल्याने पंचक्रोशीतील रूग्णांची प्रचंड गैरसोय होते आहे. रिक्त असलेली जागा भरण्यासाठी यापूर्वी अनेकवेळा जिल्हा परिषद प्रशासनाने भरतीची प्रक्रिया राबवली. परंतु एमबीबीएस झालेल्या उमेदवारांकडून प्रतिसाद मिळालेला नाही.

डॉक्टर नसलेल्या आरोग्य केंद्राना टाळे ठोको आंदोलन करून विविध पक्ष, संघटनानी लक्ष वेधले आहे. डॉक्टरांच्या रिक्त जागा असल्याने स्थानिक आरोग्य प्रशासन या प्रश्नावर हतबल झाले आहे. पगार वाढवणे सरकारी धोरणात्मक बाब आहे. जिल्हा आरोग्य प्रशासनास रिक्त जागेचा प्रश्न सोडवणे अशक्य बनले आहे. संघटना, लोकप्रतिनिधींच्या दबावामुळे जिल्हा परिषद स्वनिधीतून तरतूद करून सहा महिन्यांपूर्वी प्रतीमहिना २० हजार पगारावर बीएएमएस शिकलेल्या १२ जणांना आरोग्य अधिकारी म्हणून नियुक्ती दिली आहे. पण तेथे एमबीबीएस डॉक्टरसारखी सेवा मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. कायमस्वरूपी नियुक्ती एमबीबीएस ऐवजी बीएएमएस शिक्षण घेतलेल्यांना सरकारी नियमनुसार मिळत नाही. नोकरीत सुरक्षितता वाटत नसल्याने दुसरीकडे संधी मिळल्यानंतर बीएएमएस डॉक्टर जात आहेत. यामुळे ग्रामीण आरोग्याचा बोजवारा उडाला आहे.


सर्वाधिक रिक्त जागा शाहूवाडीत

तालुकानिहाय वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त जागा अशाः आजरा-३, करवीर-३, कागल-५, गगनबावडा-२, गडहिंग्लज-७, चंदगड- ५, पन्हाळा-१, राधानगरी-६, शाहूवाडी-८, शिरोळ-५, हातकणंगले-१, भुदरगड-६


प्रमुख ठिकाणीच

कानडेवाडी, हलकर्णी (गडहिंग्लज), हेरे (चंदगड), तारळे, धामोड (राधानगरी), मांजरे, करंजफेन, शित्तूर (शाहूवाडी), घालवाड (शिरोळ), पाटगाव (भुदरगड) या केंद्रात मंजूर दोन्ही वैद्यकीय ‌अधिकाऱ्यांच्या जागा रिक्त असल्याने नियमित सेवाच मिळत्त नाही. ही सर्व केंद्रे परिसरातील प्रमुख आहेत.


दर मंगळवारी मुलाखत

आरोग्य केंद्रातील रिक्त जागा भरण्यासाठी दर मंगळवारी थेट मुलाखत ‌आणि निवड अशी प्रक्रिया जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सहा ते सात महिन्यापासून राबवली जात आहेत. सुरूवातीला पगार ३५ हजार आहे. मात्र ग्रामीण भागात रूग्णसेवा करण्याची मानसिकता नसणे, खासगी सेवेतून चांगली कमाई, अधिक काम करावे लागते , आदी कारणांमुळे आरोग्य केंद्रांना डॉक्टर मिळत नसल्याचे वास्तव आहे.


'प्रत्येक आठवड्याला एक दिवस रिक्त जागा भरण्यासाठी थेट निवड प्रक्रिया राबवली जात आहे. परंतु, पात्र उमेदवार मिळत नसल्याने अनेक दिवसांपासून जागा रिक्तच राहत आहेत. पर्याय म्हणून बीएएमएस उमेदवारांची काही केंद्रांत नियुक्ती केली आहे.- प्रकाश पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कराड-चिपळूण रेल्वे मार्गाचाठेकेदारी करार रविवारी मुंबईत

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, कराड

कराड-चिपळूण रेल्वे मार्गाच्या कामाचा ठेकेदारी करार रविवारी, १४ रोजी मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात होत आहे. रेल्वे मार्गाच्या नियोजनाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. मुंबई येथे होत असलेल्या या करारचे थेट प्रक्षेपण होणार असून, हा कार्यक्रम कराड रेल्वे स्थानकासह चिपळूण येथील बांदल हायस्कूलमध्ये पाहता येणार आहे, अशी माहिती कराड रेल्वे स्थानकाचे मुख्य प्रबंधक एम. ए. स्वामी यांनी शुक्रवारी दिली.

स्वामी म्हणाले, रेल्वे मंत्री सुरेश प्रभू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण, केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गिते, खासदार विनायक राऊत, खासदार उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहात कार्यक्रम होणार आहे. सुमारे १०४ कि. मी. अंतराचा हा मार्ग कोकणातील व दक्षिण, पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांच्या दृष्टीने व माल वाहतुकीसाठी हा प्रकल्प अत्यंत महत्वपूर्ण आहे. या कामाचा करार ज्या कंपनीशी होत आहे, तो जनतेला थेट पाहता यावा या हेतूने येथे या कराराच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण होत आहे. येथील लोकप्रतिनीधींना तेथील मान्यवरांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधता यावा यासाठी येथे विशेष कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोयनेच्या पायथा वीजगृहातून विसर्ग

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, कराड

पाटण तालुक्यासह कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला आहे. शिवसागर जलाशयातील पाण्याची आवकही कमी झालेली आहे. सध्या शिवसागर जलाशयात २५ हजार ६६८ क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे. कोयना धरणात ९४.०९ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातून २ हजार १०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, कोयना धरण व्यवस्थापनाला ९५ टीएमसी पाणीसाठ्याचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण होण्यास केवळ एक टीएमसी पाण्याची गरज आहे. शुक्रवारी दिवसभरामध्ये कोयनानगर येथे १५, नवजा २८, महाबळेश्वर ७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

३३ हजार क्युसेक विसर्ग

सातारा जिल्ह्यातील कोयनासह धोम, कण्हेर, भाटघर, वीर, उरमोडी, धोम-बलकवडी, महू, हातगेघर, मोरणा-गुरेघर, उत्तर मांड, नीरा-देवघर, वांग या बारा धरणांमधून सुमारे ३३ हजार १९० क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाईमध्ये खूनप्रकरणीडॉक्टरला अटक

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सातारा

मुंबई येथील हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये किडनी रॅकेट उघडकीस येऊन पाच डॉक्टरांना अटक झाल्याची घटना ताजी असतानाच दोन महिन्यांपासून गायब असलेल्या वाई येथील अंगणवाडी सेविका मंगला जेधे (वय ४५, रा. वेलंग ता. वाई) यांचाही खून किडनीसाठीच झाला असल्याचा संशय व्यक्त होत आहे. गुरुवारी सायंकाळी मंगला यांचा मृतदेह पोलिसांनी धोम परिसरातून जमिनीतून उकरुन काढलाय या प्रकरणी वाई येथील डॉक्टर संतोष पोळ याला अटक केली आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून अंगणवाडी सेविका संघटनेच्या राज्याच्या अध्यक्षा मंगलाबाई जेधे बेपत्ता होत्या. त्यांचे अपहरण झाल्याचा संशय व्यक्त होत होता. दोन दिवसांपूर्वी अंगणवाडी सेविकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जेधे यांच्या अपहरणाचा तपास 'सीआयडी'कडे द्यावा, अशी मागणी केली होती. पोलिसांनी डॉक्टर संतोष पोळ याला मुंबई येथून अटक केल्यानंतर जेधे यांचा खून झाल्याचे स्पष्ट झाले. त्याने ज्या ठिकाणी जेधे यांचा मृतदेह पुरला होता. ती जागाही त्याने दाखविली. सात फूट खड्ड्यात एका पोत्यामध्ये जेधे यांचा मृतदेह त्याने गुंडाळून ठेवला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचगंगा मंदिरातून ‘भागिरथी’ प्रकटली

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सातारा

क्षेत्र महाबळेश्वर येथील गंगाभागिरथी कुंडातून बारा वर्षांनंतर गुरुवारी रात्री ९ वाजून २९ मिनिटांनी भागिरथी प्रकट झाली. या पार्श्वभूमीवर महाबळेश्वरमधील पंचगंगा मंदिर विद्युत रोषणाई, फुलांच्या माळा व दिव्यांनी सजवले आहे. दरम्यान, रात्री आठच्या सुमारास आमदार मकरंद पाटील यांच्या हस्ते सपत्नीक गंगापूजन करण्यात आले.

यंदाच्या वर्षी ११ ऑगस्ट २०१६ रोजी रात्री ९ वाजून २९ मिनिटांनी बारा वर्षांतून गुरू कन्या राशीमध्ये प्रवेश करीत होता. या वेळी भागिरथी नदी जलप्रवाह सुरू आला. हा दिव्य सोहळा पाहण्यासाठी क्षेत्र महाबळेश्वर येथे राज्यभरातील हजारो भाविक दाखल झाले आहेत.

भागिरथी नदी बारा वर्षांनंतर प्रकट होणार असल्याने भाविकांमध्ये उत्साह दिसून येत होता. पंचगंगा देवस्थान व श्री क्षेत्र महाबळेश्वर ग्रामपंचायतीने अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यामध्ये रात्रीच्या सुमारास आमदार मकरंद पाटील यांच्या हस्ते झेंडा पूजनाने कार्यक्रमांना सुरुवात झाली. त्यानंतर दीपप्रज्वलन करून गंगापूजन झाले.

क्षेत्र महाबळेश्वर येथील पंचगंगा मंदिरातून कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री, गायत्री, गंगाभागिरथी आणि सरस्वती या नद्या उगम पावतात. यातील कृष्णा, वेण्णा, कोयना आणि सावित्रीचा चार कुंडातून नित्य निरंतर जलप्रवाह सुरू असतो. सरस्वती नदी ही सदैव गुप्त रूपाने वास करून असते. त्यामुळे तिचा प्रवाह दिसत नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवयवदानाची व्याप्ती वाढावी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
कोल्हापुरातील २८ वर्षीय गिरीश कुलकर्णी या सी. ए. युवकाला किडनी फेल्युअरचे निदान झाले. त्यावेळी त्याचे ५७ वर्षीय वडील कमलाकांत कुलकर्णी यांनी आपली किडनी दिली. नॅशनल ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्स्प्लांट ऑर्गनायझेशन (नोटो) च्या प्रतीक्षा यादीनुसार दीड ते दोन लाख किडनींची गरज असताना केवळ पाच हजार किडनी मिळून प्रत्यारोपण पार पडते. आपल्यामध्ये असलेले अवयवदानाविषयीचे गैरसमज दूर होणे गरजेचे असल्यामुळे किडनीदाते कमलाकांत कुलकर्णी यांच्याशी अनुराधा तेंडुलकर यांनी साधलेला संवाद.

गिरीशच्या आजाराचे निदान कसे झाले?

गिरीश पुण्यात काम करत होता. शनिवारी-रविवारी कोल्हापुरात आला की आम्ही जोतिबा डोंगर चढायला जायचो. डोंगर चढताना त्याला धाप लागत होती. त्यामुळे माझ्या मनात शंका आली. या मंडळींची बैठी कार्यपद्धती, वेळी-अवेळी कामे, वर्षअखेरी कामाचा ताण हे सारे लक्षात घेता मला हृदयविकाराची शंका आली. मी प्रथम दाभोलकर चॅरिटेबल ट्रस्टच्या डॉ. अरविंद मांजरेकर यांचा सल्ला घेतला. त्यांनी रक्त व लघवी तपासायला सांगितले. रक्त व लघवीचे रिपोर्टस डॉ. मल्लवी पाटील यांना दाखवल्यावर त्यांनी किएटिन व प्रोटिनचं प्रमाण पाहून क्षणार्धात निदान केले. माझी पत्नी तर अगदी प्रत्यारोपणापर्यंत त्याची गरज नाही, तो बरा होईल अशी आशावादी होती. रिपोर्ट घेऊन डॉ. अजित जोशींना भेटलो. त्यांनी आणखी दोन टेस्ट करुन निदानावर शिक्कमोर्तब केले. वैद्यकीय क्षेत्रातली आप्तमंडळी असल्याने मुंबईला जायचे ठरवले. तिथे पुन्हा वेगवेगळ्या चाचण्या झाल्या. तज्ज्ञांची मते घेतली आणि निदानावर शिक्कामोर्तब झाले.

किडनी ट्रान्सप्लानंटचा निर्णय लगेच घेतला का?

नाही, आशावादी मनाने निरनिराळे उपचार करून पाहायला प्रवृत्त केले. होमिओपॅथी, आयुर्वेदिक, वनौषधी, जडीबुटी सर्व प्रकार केले. त्यात पाच महिने गेले. त्यानंतरचे तीन महिने ट्रान्सप्लांटच्या तयारीत गेले.

किडनी दानाचा निर्णय कसा घेतला?

ट्रान्सप्लांटला पर्याय नाही हे समजल्यावर निर्णय सोपा होता, पण त्यातही चढाओढ होती. पत्नीचं म्हणणं घरातले, दोन्ही कमावते पुरुष किडनीदाता व घेता होणे योग्य नव्हते. त्यामुळे आईनेच किडनी देणे योग्य आहे, तर सूनबाईचे म्हणणे की, जोडीदारासाठी मीच हे काम करायला हवं, पण रक्तगट जुळत असल्याने मीच दाता म्हणून योग्य ठरलो.

फक्त रक्तगट जुळले की झाले का?

मी प्रकृतीने अगदी धडधाकट होतो. वीस वर्षे योगाभ्यास नियमित करत होतो. कोणतेही व्यसन नव्हते, त्यामुळे माझ्या किडनी सुस्थितीत व निरोगी होत्या. म्हणूनच मी योग्य किडनीदाता ठरलो.

किडनी दानासाठी १९९४ च्या अवयव प्रत्यारोपण कायद्यान्वये कोणत्या अटी असतात?

१) पहिली अट म्हणजे किडनीदाता नात्यातील हवा

२) त्याच्यावर किडनीदानासाठी कोणत्याही प्रकारचा दबाव असता कामा नये

३) किडनीदानामागे आर्थिक व्यवहार नाहीत याचीही इन कॅमेरा चाचणी केली जाते.

४) मुख्य म्हणजे दानानंतरच्या शक्यता काय काय आहेत याची दात्याला कल्पना आहे किंवा नाही याची शहानिशा केली जाते आणि तसे दस्तावेज तयार केले जातात.

या सर्व उपचार-प्रत्यारोपणाला किती खर्च येतो?

किडनी ट्रान्सप्लांटमध्ये किडनी काढणे व प्रत्यारोपण अशा दोन शस्त्रक्रिया व दोन पेशंटवर उपचार यांचा अंतर्भाव असतो. त्यामुळे खर्चाचा आकडा मोठा दिसतो. त्यासाठी आम्हाला पाच लाख रुपये खर्च आला.

‌किडनीदात्याला काय उपचार घ्यावे लागतात? औषधे किती दिवस घ्यावी लागतात?

किडनी काढण्याच्या शस्त्रक्रियेनंतर चार दिवसात डिस्चार्ज मिळतो. साधारणत: १५ दिवसांत टाके काढले जातात आणि महिनाभर औषधे घ्यावी लागतात. तीन महिने जड वस्तू उचलू नये अशी बंधने असतात. त्यानंतर तुम्ही पूर्ववत दिनचर्या ठेवू शकता. व्यायामही करू शकता.

किडनी मिळालेल्या पेंशटला कोणती काळजी घ्यावी लागते?

किडनी मिळालेल्या पेंशटला काही पथ्ये काटेकोरपणे पाळावी लागतात. शस्त्रक्रियेनंतर पहिले पंधरा दिवस संसर्ग टाळण्यासाठी भेटीची परवानगी नसते. त्यानंतर मास्क लावून फिरता येते. वर्षभर मास्क वापरावा लागतो. पाणी उकळून निर्जंतूक करून प्यावे लागते. जेवण ताजे व घरचे घ्यावे लागते. प्रथम दर १५ दिवसांनी, नंतर दर महिन्याने, दर तीन महिन्यांनी तपासण्या करून घ्याव्या लागतात.

पालकांची किडनी मिळण्याचे फायदेही असतील ना?

निश्चितच. आई किंवा वडिलांची किडनी मिळणे उत्तमच. कारण त्यामुळे किडनीचा स्वीकार रुग्णाचे शरीर झपाट्याने करून कार्यरत होऊ शकते. पण परस्परांशी देवाण घेवाण करण्याची पद्धतीने (स्वॅप) किडनी ट्रान्सप्लांट करणाऱ्या रुग्णांचेही रिझल्टस् उत्तमच येतात.

अशा प्रसंगातून जाणाऱ्या रुग्ण आणि त्यांच्या आप्तांना काय सांगाल?

एवढंच सांगावसं वाटते की, वेळेवर योग्य डॉक्टरांचे मार्गदर्शन घ्या आणि निदान झाल्यावर लवकरात लवकर प्रत्यारोपण करून घ्या. इतर कोणी किडनीदाता भेटेल याची वाट पाहू नका.

आता तीन वर्षांनी गिरीशचं आयुष्य कसं चाललंय?

त्यांने कोल्हापुरात ऑफिस सुरू केले. पूर्वीसारखंच कार्यमग्न जीवन तो जगतोय. पूर्वीसारखी पुण्या-मुंबईची कामही करतोय. त्याचा आहार-विहार साधा सकस नियमित आहे. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे लवकरच आम्ही आजी आजोबा बनणार आहाेत.

तुमच्यावर आलेल्या प्रसंगानंतर अशाच रुग्णांसाठी आपण दोघे काही काम करता असे कळतेय?

या आजारपणातून बाहेर पडल्यावर लक्षात आले की, सध्या अशा केसेसच प्रमाण फार वाढले आहे. आधुनिक जीवनशैली, धकाधकीची दिनचर्या, व्यवसायातले ताण-तणाव आणि कॉर्पोरेट जीवनपद्धतीतील जीवघेणी स्पर्धा यामुळे निर्व्यसनी युवकसुद्धा हृद‌विकार, किडनी फेल्युअर अशा आजारांना जवळ करतात. अशा आजारात आर्थिक पाठबळ तर गरजेच असतेच, पण मानसिक आधारही खूप महत्त्वाचा ठरतो. निर्णय घेण्यासाठी योग्य मार्गदर्शन हवं असते. अशा रुग्णांना आणि त्यांच्या परिवारांना आम्ही गिरीश कमलाकांत कुलकर्णी किडनी फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून शक्य ती मदत करतो. किडनी डोनेशनसाठी नातेवाइकांचे समुपदेशन करतो. या आजार प्रत्यारोपण उपचार यातून बाहेर पडणाऱ्यांना याच कार्याचा प्रसार करण्यासाठी प्रोत्साहन देतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भुर्दंडासह प्रवासाचा फेरा

$
0
0

Udaysing.Patil @timesgroup.com

कोल्हापूर : ब्रिट‌िशकालीन शिवाजी पुलावरील वाहतूक यापुढे केंव्हाही बंद केली जाण्याची शक्यता असल्याने भुये, भुयेवाडी, निगवे, वडणगे या परिसरातील हजारो नागरिकांना चौपट खर्चाबरोबरच अर्ध्या तासाच्या अंतरासाठी दोन तास खर्च करण्याची वेळ येणार आहे. यासाठी शिवाजी पुलाच्या पर्यायी असलेल्या पुलाचे बांधकाम तातडीने पुर्ण करावे लागणार आहे. कोल्हापूरला दररोज येणाऱ्यांसाठी हा मोठा फटका असून भाजीपाला, दूध वाहतूकही महाग होऊ शकते.

शिवाजी पुलाच्या जुन्या बांधकामामुळे दक्षता म्हणून जिल्हा प्रशासनाने सावधगिरी म्हणून वाहतूक बंद केली. अगदी दुचाकी वाहतूकही बंद केल्याने दररोज कोल्हापूरला येणाऱ्यांसाठी एक तर घरात थांबावे लागले किंवा पर्यायी मार्गाने जावे लागले. आंबेवाडी, चिखली या गावातील ग्रामस्थांना तर बाहेर पडण्याचा मार्गच नव्हता. पण वडणगे, निगवे दुमाला, कुशिरे, भुये, शिये, भुयेवाडी, जठारवाडी या परिसरातील ग्रामस्थांनाही फेरा मारल्याशिवाय कोल्हापूरला जाणे शक्य झाले नव्हते. शिये ते भुये दरम्यानचा ओढाही पुराच्या पाण्याने तुंबल्याने त्याचे पाणी रस्त्यावर येते. या पुराच्यावेळी तिथे अर्धा फूट पाणी होते. या प्रकाराने निगवे, भुये, भुयेवाडी परिसरातील ग्रामस्थांची इकडे आड तिकडे विहिर अशीच अवस्था झाली होती.

शिवाजी पुलाकडून जठारवाडीपर्यंत तर शिरोलीकडून शियेपर्यंत केएमटी बससेवा आहे. शिवाजी पुलाकडील वाहतूक बंद झाल्यानंतर शिरोली हायवेकडून येणारा रस्ता हा पर्याय होता. त्यासाठी वडाप व्यावसायिकांनी भुयेवाडीकडून शिये फाट्यापर्यंत जाण्यासाठी सात किलोमीटरच्या अंतरासाठी बारा रुपयाहून अधिक दर लावला होता. भुयेजवळ रस्त्यावर पाणी आल्याने ही वाहतूकही बंद झाली. त्यामुळे ग्रामस्थांना निगवे, कुशिरे, गिरोलीमार्गे सादळे, मादळे करत हायवेकडे जावे लागत होते. भुयेपासून गंगावेश हे अंतर आठ किलोमीटरपर्यंत भरत असताना गिरोलीमार्गे हे अंतर ४० किलोमीटरपर्यंत भरत होते. त्यासाठी ५० रुपये मोजावे लागले होते. अंतर वाढल्याने खर्चाबरोबर प्रवासाचा वेळही वाढला. भुये, निगवे, गिरोली, सादळे मादळेमार्गे शिरोलीकडून कोल्हापुरात येण्यासाठी दोन तास लागत होते. त्यातच शिरोलीकडील रस्त्यावर वाहतूक वाढल्याने शहरात मुख्य भागात पोहचण्यासाठी आणखी वेळ लागत होता. त्यामुळे ग्रामस्थांचे वेळापत्रक बिघडून गेले होते. या प्रकारामुळे पुराच्या तडाख्यापेक्षाही ग्रामस्थांना हा मोठा त्रास वाटत होता. भुयेजवळ रस्त्यावर पाणी येत असल्याने मोठा पूर आल्यास हा रस्ताही बंद होण्याची शक्यता असते.

याबाबत संजय चौगुले म्हणाले, शिवाजी पूल बंद झाल्याने वाहतूक खर्च वाढला. एरवी १२ रुपयात गंगावेशपर्यंत जाणाऱ्या नागरिकांना ५० रुपये खर्च करावे लागले. भाजीपाल्यासाठीही प्रचंड पैसे मोजावे लागले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सीएमनी टाळली बार असोसिएशनची भेट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कन्यागत महापर्वकाळ सोहळा आणि कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या मुलांच्या लग्नासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह जवळपास अर्धा डझन मंत्र्यांचे कोल्हापुरातील विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आले. मात्र, खंडपीठाच्या मागणीसाठी बार असोसिएशनच्या सदस्यांची मुख्यमंत्र्यांशी प्रस्तावित भेट झालीच नाही. खंडपीठासाठी पुढील आठवड्यात बैठक घेण्याचा निरोप देण्यात आला.

पणनमंत्री सदाभाऊ खोत यांच्या मुलांच्या लग्न समारंभासह कडेगाव तालुक्यातील येतगावमधील शेतकरी मेळाव्यासाठी मुख्यमंत्री शुक्रवारी (ता. १२) सकाळी दहा वाजता विशेष विमानाने कोल्हापूर विमानतळावर दाखल झाले. त्यांच्यासोबत विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे आणि कृषी व फलोत्पादन मंत्री पांडुरंग फुंडकर हेदेखील होते. यांचे स्वागत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. यानंतर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि कामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांचे दुसऱ्या विमानातून आगमन झाले. पालकमंत्र्यांसह भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी या मंत्र्यांचे स्वागत केले. मुख्यमंत्री तातडीने इस्लामपूरकडे रवाना झाले.

दरम्यान बार असो‌सिएशनच्या सदस्यांनी त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुख्यमंत्र्यांनी भेट टाळली. गेल्या महिन्याभरात मुख्यमंत्र्यांनी दोनवेळा भेटीची वेळ देऊन ऐनवेळी बैठक पुढे ढकलल्याने शुक्रवारी मुख्यमंत्र्यांना भेटून बैठकीसाठी वेळ मागण्याचे खंडपीठ कृती समितीने ठरवले होते. संध्याकाळीही भेटीचे नियोजन केले होते, मात्र लवकरच सचिवांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावू, असा निरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून खंडपीठ कृती समितीला दिला. हा निरोप आल्यानंतर कृती समितीने मुख्यमंत्र्यांची भेट घेणे रद्द केले.

संध्याकाळी पाच वाजता पुन्हा विमानतळावर पोहोचलेल्या मुख्यमंत्र्यांना महापालिकेच्या माहापौर अश्विनी रामाणे यांच्यासह नगरसेवकांनी हद्दवाढीबाबत निवेदन दिले. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भाजप जिल्हा अध्यक्ष संदीप देसाई, आमदार सुरेश हाळवणकर, आदी उपस्थित होते. भाजपचे सांगली जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी योजनेचे होणार ऑडिट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर शहरातील पाणीपुरवठा योजनेचे ऑडिट करण्याचा निर्णय स्थायी समितीच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी स्थायी सभापती मुरलीधर जाधव होते. पाणी योजनेच्या ऑडिटनंतर गळतीच्या समस्येचे नेमके वास्तव समोर येईल. त्यासाठी हायड्रोलिक मॉडेलिंग आणि जीआयएम मॅपिंग करण्यात येणार आहे.

पाणी योजनेच्या ऑडिटसाठी पुण्यातील स्टुडिओ गिली इंजिग्नेरिया इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एसजीआयए) कंपनीची सर्वात कमी दराची निविदा मंजूर केली. ऑडिटसाठी दोन कोटी ३६ लाख रुपये खर्च येईल. सध्या पाणीपुरवठा वितरण योजनेतील नकाशे, आराखडे, जुन्या लाइनसंदर्भातील माहिती विभागाकडे उपलब्ध नाही. शहरांतर्गत पाइपलाइन गळतीची समस्या आहे. त्यावर मात करण्याचा प्रयत्न यातून होऊ शकेल. रोजंदारी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ

महापालिकेच्या विविध ​विभागातील रोजंदारी कर्मचाऱ्यांना सध्या त्यांना २३६ रुपये इतके रोजचे वेतन मिळते. स्थायी समिती व आयुक्तांच्या मान्यतेने त्यामध्ये वाढ होऊन रोजंदारी कर्मचाऱ्यांना रोजचे वेतन ४१४ रुपये करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ताराबाई पार्कात अस्ताव्यस्त पार्किंगचा त्रास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरातील उच्चभ्रू वसाहत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ताराबाई पार्क परिसरातील महत्त्वाचा रस्ता असलेल्या धैर्यप्रसाद चौक ते कावळा नाका या मार्गावर दुचाकीसह चारचाकी वाहनांचे अस्ताव्यस्त पार्किंग हा नेहमीचा प्रश्न झाला आहे. हॉटेल्स, रेस्टराँ, जीम, शोरूम्स यांच्या इमारतींसाठी पार्किंग रस्त्यावरच होत असल्यामुळे रस्ता चांगला असूनही वाहनांच्या बेशिस्त पार्किंगमुळे या रस्त्याला गचाळ स्वरूप आले आहे.

धैर्यप्रसाद हॉलच्या आवारात फारशी पार्किंगसाठी जागा नसल्यामुळे अनेकदा या हॉलमध्ये कोणताही समारंभ असला की पार्किंग थेट रस्त्यावरच होते. टिक टॅक हॉटेलपर्यंत अनेकदा या हॉलमध्ये येणाऱ्या नागरिकांची दुचाकी व चारचाकी वाहने लावलेली असतात. रस्तादुभाजक असूनही वाहतुकीला शिस्त येण्याऐवजी अस्ताव्यस्त पार्किंगमुळे सायंकाळी सहानंतर या मार्गावर सतत वाहतुकीचा बोऱ्या वाजल्याचे दिसून येते. या रस्त्यावर तीन ते चार जिम आहेत. सकाळचे दोन तास आणि सायंकाळचे चार तास जिममध्ये येणारे अनेकजण चारचाकी वाहने घेऊन येतात. जिम असलेल्या बहुतांशी इमारतींना स्वत:ची पार्किंगस्पेस नाही. त्यामुळे चारचाकी वाहने थेट रस्त्यावरच पा​र्किंग केली जातात. ही वाहने जवळपास निम्मा रस्ता व्यापत असल्यामुळे ये जा करणाऱ्या वाहनांनाही अडथळा होतो.

या रस्त्यावर जे स्वतंत्र बंगले आहेत त्यांचे पार्किंग व्यवस्था आहे, मात्र व्यावसायिक संकुल, हॉटेल्स यांची पुरेशी पार्किंग व्यवस्था नसल्याचा ताण मुख्य रस्त्यावर येत असल्यामुळे या मार्गावर केवळ अस्ताव्यस्त पार्किंगमुळे किरकोळ अपघात झाले आहेत. धैर्यप्रसाद चौकात सायंकाळी फुटपाथवर भरणाऱ्या भाजीमार्केटमध्ये येणाऱ्या नागरिकांकडूनही वाहनांचे पार्किंग रस्त्यावर केले जाते.

या परिसरात असलेल्या काही मोठ्या हॉटेलमध्ये नेहमी पार्टी, कॉन्फरन्स, ग्रुपच्या सभा असे कार्यक्रम होत असतात. बहुतांशी हे कार्यक्रम सायंकाळी सहानंतरच असल्यामुळे पार्किंगची गर्दी वाढते. अनेकदा रस्त्याच्या दुतर्फा पार्क केलेल्या चारचाकी गाड्यांमुळे वाहतुकीसाठी केवळ सहा ते सात फुटांचाच रस्ता उरतो.


ट्रॅफ‌िक पोलिसांचे अस्तित्व नाही

अस्ताव्यस्त पार्किंगला शिस्त लावण्यासाठी किंवा कारवाई करण्यासाठी या रस्त्यावर ट्रॅफिक पोलिस कधीच फिरकत नसल्याचे या परिसरातील रहिवाशी नागरिकांनी सांगितले. मुख्य शहरातून कावळानाका मार्गे शहाराच्या बाहेर जाण्याचा शॉर्टकट असल्यामुळे कसबा बावडा, ताराबाई पार्क, नागाळा पार्क, शाहूपुरी येथील वाहनचालक या रस्त्याचा वापर करतात. मात्र पार्किंगच्या बट्ट्याबोळामुळे हा चकचकीत रस्ताही अजागळ दिसतो.

विशेषत: तरूणांकडून पार्किंगशी शिस्त पाळली जात नाही. हॉटेलिंगला येणाऱ्या तरूणांकडून वाहने अस्ताव्यस्त पार्किंग केली जातात. अनेकदा कुठे जागा मिळाली नाही तर रहिवाशी नागरिकांच्या घराच्या दारात वाहने लावली जातात. शोरूम्स, जिम आणि हॉटेल्स यांच्या पार्किंगचा त्रास येथील स्थानिक नागरिकांना होतो.

- अतुल साधवानी, नागरीक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठाचीच होणार ‘परीक्षा’

$
0
0

Maruti.Patil @timesgroup.com

कोल्हापूर : महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (एमकेसीएल) संगणक प्रणालीचा वापर करून शिवाजी विद्यापीठ सलंग्नीत कॉलेजांकडून पदवी परीक्षा घेतल्या जात होत्या. एमकेसीएलच्या प्रणालीत प्रचंड त्रुटी असल्याबाबत असंख्य तक्रारी झाल्या. या तक्रारींची दखल घेऊन स्थापन केलेल्या समितीचा अहवाल विद्यापीठाकडे आला आहे. त्यानुसार आता विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडूनच सर्व परीक्षा घेतल्या जाणार आहेत. त्यासाठी एमकेसीएलकडे असलेला विद्यार्थ्यांचा डाटा संकलीत करण्याचे काम विद्यापीठाच्या आयटी विभागाने सुरू केले आहे. ऑक्टोबर २०१६ मध्ये होत असलेल्या सेमिस्टरपासून सर्व परीक्षा विद्यापीठ घेईल. त्यामुळे विद्यापीठाला आता 'परीक्षे'ला सामोरे जावे लागेल.

दरवर्षी विद्यापीठांकडून विविध १२२ अभ्यासक्रमांच्या सुमारे साडेतीन लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या जातात. अभियांत्रिकी, विधी, विज्ञान आदी कमी कालावधीच्या अभ्यासक्रमांच्या परीक्षा विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून घेतल्या जातात. त्यासाठी विद्यापीठाच्या संगणक प्रणालीचा वापर केला जातो. उर्वरीत २२ अभ्यासक्रमांच्या परीक्षा एमकेसीएलच्या संगणक प्रणालीच्या माध्यमातून घेतल्या जात होत्या. या प्रणालीतून सुमारे दोन लाख विद्यार्थी परीक्षेला सामोरे जात होते. मात्र परीक्षेबाबत असंख्य तक्रारी होत्या. हॉल तिकीटावर वेगळ्याच विद्यार्थ्याचे नाव, उत्तीर्ण-अनुत्तीर्णच्या निकालात बदल, परीक्षार्थींना उपस्थितऐवजी अनुपस्थित दाखवणे, विषयांमध्ये बदल होणे अशा अनेक तक्रारींना सामोरे जावे लागत होते.

विद्यार्थ्यांच्या अशा तक्रारी विद्यापीठाकडे दाखल होत. त्यामुळे अनेकदा विद्यापीठाला बदनामीला सामोरे जावे लागत होते. अशा समस्यांतून मार्ग काढण्यासाठी समिती स्थापना करण्यात आली. समितीने विद्यापीठाला अहवाल सादर करून परीक्षांसाठी विद्यापीठाचीच सर्व संगणक प्रणाली वापरण्याचा सूचना केली. त्यानुसार ऑक्टोबर २०१५ आणि मार्च २०१६ पासून प्रथम वर्षाच्या परीक्षा घेण्यात आल्या. विद्यापीठाने घेतलेल्या परीक्षांमध्ये त्रूटी नसल्याने सर्वच परीक्षा विद्यापीठाच्या संगणक प्रणालीमार्फत घेण्याचे नियोजन केले आहे.

एमकेसीएलकडून डाटा हस्तांतर करण्यासह कुशल मनुष्यबळ पुरविण्यात येईल. आयटी विभाग सक्षम करण्यासाठी विद्यापीठ निधीची तरतुद करणार आहे.
एमकेसीएलकडून परीक्षा प्रणाली टप्प्याटप्प्याने हस्तांतर करण्याची शिफारस नियुक्त समितीने केली होती. त्यानुसार ऑक्टोबर २०१५ व मार्च २०१६ प्रथम वर्षाच्या परीक्षा विद्यापीठाने घेतल्या. आता सर्वच परीक्षा विद्यापीठाने घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची सुरुवात पहिल्या सेमिस्टरपासून होईल.

- डॉ. डी. आर. मोरे, बीसीयूडी

एमकेसीएलकडून परीक्षा प्रणाली घेण्यासाठी सर्व डाटा संकलीत करण्याचे काम सुरू आहे. परीक्षा विभागाकडून नियमित घेतल्या जाणाऱ्या परीक्षांसह अन्य सर्व परीक्षांची जबाबदारी विद्यापीठाकडे येईल. त्यासाठी कृती आराखडा तयार केला आहे. यासाठी परीक्षा विभाग सज्ज झाला आहे.

- महेश काकडे, परीक्षा नियंत्रक, शिवाजी विद्यापीठ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

श्रींच्या मूर्तीस पर्वकाळ स्नान

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

तीर्थक्षेत्र नृसिंहवाडी येथे शुक्लतीर्थावर शुक्रवारी सकाळी सूर्योदयाला मंगलमय वातावरणात श्रींच्या उत्सवमूर्तीस कन्यागत महापर्वकाल स्नान घालण्यात आले. यावेळी 'दिगंबरा... दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा', श्री गुरुदेव दत्त जयघोषाने घाट परिसर दुमदुमला. कृष्णाकाठी हजारो भाविकांनी स्नानासाठी गर्दी केली होती. या सोहळ्यावेळी शिरोळच्या जयभवानी तोफेची सलामी देण्यात आली. दत्त देवस्थान परिसरात हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टीही करण्यात आली.

गुरूवारी दुपारी नारायणस्वामी मंदिरापासून श्रीं च्या पालखी मिरवणुकीस सुरूवात झाली होती. ही पालखी गावातील मुख्य सभामंडप, पेठ भाग, ग्रामपंचायत, मरगुबाई मंदिर, या प्रमुख मार्गावरून ओतवाडी मार्गे शुक्लतीर्थावर नेण्यात आली. यावेळी घरोघरी सुहासिनीनी श्रींचे औक्षण केले. तसेच भाविकांनी पालखीवर पुष्पवृष्टी केली. टाळ मृदुंगासह पारंपारिक वाद्यांमया निनादात पालखी मिरवणूक रात्री शुक्लतीर्थावर आली. कृष्णानदीकाठी शुक्लतीर्थावर भव्य मंडप उभारण्यात आला होता. तसेच फुलांच्या माळांनी परिसर सजविण्यात आला होता. मंडपातील औदुंबराच्या झाडाजवळ श्रींची पालखी भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आली.सकाळी सूर्योदयाला ६ वाजून २० मिनिटांनी शुक्लतीर्थावर भक्तीमय वातावरणात श्रीं च्या उत्सवमूर्तीचे पर्वकालस्नान झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>