Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

‘अंधश्रद्धा निर्मूलनासाठी वार्तापत्र उपयुक्त’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे वार्तापत्रात गेल्या २५ वर्षांपासून खंड पडलेला नाही. या वार्तापत्रातून समाजातील अंधश्रद्धा कमी करण्यासाठी मदत झाली आहे', असे प्रतिपादन सहसंपादिका मुक्ता दाभोलकर यांनी केले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र या मासिकाला २५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल रविवारी आयोजित वाचक संवाद कार्यक्रमात त्या बोलत होत्या. शाहू स्मारक भवनात कार्यक्रम झाला.

दाभोळकर म्हणाल्या, 'अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम विविध पातळ्यांवर सुरू आहे. अंधश्रद्धा कमी करण्यासाठी कार्यकर्ते राबवत असलेल्या अनेक उपक्रमांना या पत्रकातून प्रसिद्धी दिली जाते. अलिकडे भांडवलदारांच्या हातात प्रसारमाध्यमे गेली आहेत. त्यामुळे काही खऱ्या बातम्या येत नाहीत. अशावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे वार्तापत्र ठिकून राहणे काळाची गरज आहे.'

व्यवस्थापकीय संपादक राहुल थोरात म्हणाले, 'गावातील बुवा व कार्पोरेट ढोंगी बाबा कशी फसवणूक करतात, हे पुराव्यानिशी आम्ही मासिकात छापले आहे. हे वार्तापत्र चालू नये, यासाठी अब्रुनुकसानीचे ११ खटले सनातन्यांनी दाखल केले. त्यातील ६ खटले आम्ही जिंकले आहेत. सामाजिक बांधिलकीपोटी एकाही खटल्यात आमच्या बाजूने काम करणाऱ्या वकिलांनी पैसे घेतले नाही. आसारामबापू, ब्रम्हाकुमारी यांच्या चुकीच्या गोष्टीही वार्तापत्रात छापल्या आहेत.'

यावेळी सीमा पाटील, सचिन ओतारी, प्रकाश हिरेमठ आदी वाचकांनी विविध सूचना मांडल्या. सामाजिक कार्यकर्ते व्यंकाप्पा भोसले यांच्या हस्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर विशेषांकाचे प्रकाशन झाले.

सहसंपादक राजीव देशपांडे, प. रा. आर्डे आदी उपस्थित होते. उमेश सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले. रमेश वडणगेकर यांनी सूत्रसंचालन केले. कपिल मुळे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ढोलगरवाडीत हजारो सर्पप्रेमींची उपस्थिती

$
0
0

म. टा. वृत्तसेवा चंदगड

ढोलगरवाडी (ता. चंदगड) येथील मामासाहेब लाड विद्यालयात नागपंचमीनिमित्त आयोजित केलेल्या सर्प प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भर पावसातही पर्यटकांनी प्रदर्शन पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. प्रदर्शन पाहण्यासाठी विविध ठिकाणहून हजारोंच्या संख्येने सर्पप्रेमींनी आज ढोलगरावाडीला भेट दिली. चंदगडसह शेजारील आजरा, गडहिंग्लज, कोल्हापूर, बेळगाव, गोवा आणि सावंतवाडी परिसरातील सर्पप्रेमींनी प्रदर्शनाला भेट दिली होती. विषारी व बिनविषारी असे १६० साप प्रदर्शनात ठेवण्यात आले होते. मामासाहेब लाड विद्यालयाचे मुख्याध्यापक एम. एम. कुट्रे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उदघाटन झाले.

सापांबद्दल समाजामध्ये असलेली भिती आणि अंधश्रद्धा दूर करण्याच्या उद्देशाने गेल्या ४९ वर्षांपासून शेतकरी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सर्पमित्र बाबूराव टक्केकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्प प्रदर्शन भरवून सापांविषयी शास्त्रीय माहीती देण्याचे काम करत आहेत. प्रदर्शनावेळी सापांना होणाऱ्या इजा व सापांचे होणारे हाल यामुळे सरकारने सर्प हाताळण्यावर बंदी घातली असल्याचे वनविभागाच्या देखरेखीखाली यंदाचे प्रदर्शन झाले. पाटणे वनक्षेत्रपाल एम. एन. परब, वनपाल डी. जी. पाटील, कार्वेचे वनपाल के. झेड. पावरा, एम. आय. सनदी, तुडयेचे वनपाल एन. एस. धुमाळ यावेळी उपस्थित होते. प्रदर्शनामध्ये ठेवलेल्या सापांची माहीती देण्यासाठी व शिस्तीचे पालन करण्यासाठी विद्यालयातील सुमारे चारशेहून अधिक विद्यार्थी स्वयंसेवक कार्यरत होते. मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतून विद्यार्थी सर्पप्रेमींना माहीती देत होते. विद्यालयाच्या पटांगणात काचेच्या पेट्टीमध्ये नाग, घोणस, फुरसे, मण्यार, चापडी, नानेटी, तस्कर, डुरक्या आदी विविध जातींचे सर्पांची पोस्टर व त्यासोबत लिखित माहीतीचे फलक ठेवले होते. त्यामुळे जवळून साप पाहण्याची व माहीती जाणून घेण्याची संधी अनेकांना मिळाली.

यावेळी विद्यालयाच्या मागील बाजूस असणाऱ्या सर्पोद्यानातील साप पाहण्यासाठी सर्पप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. सकाळी नऊ पासून सायंकाळी सातपर्यंत लोकांची रीघ सुरुच होती. सर्पमित्र बाबूराव टक्केकर हे इच्छुकांना सापांबद्दलची शास्त्रीय माहीती देत होते. प्रदर्शनामध्ये गर्दी होणार त्यामुळे विद्यालयाच्या वतीने सापांचे फोटो व माहीती असलेले डीजीटल फलकही लावून त्याद्वारे माहीती देण्याचे काम सुरु होते. स्लाईड शोद्वारे माहीती दिली जात होती. विविध जातींच्या सापांची माहीती देणारे पुस्तकेही विक्रीसाठी ठेवण्यात आली होती. ढोलगरवाडीला जत्रेचे स्वरुप आले होते. सर्प प्रदर्शन पाहताना कोणाला सापापासून इजा होवू नये. यासाठी माणगाव आरोग्य केंद्रातील कर्मचारी औषधांसह हजर होते. यावेळी विज्ञान प्रदर्शऩ व भित्तीपत्रकांचेही प्रदर्शन भरविण्यात आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापुरात पाणीपातळी स्थिर, धोका कायम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मुसळधार पावसाने रविवारी विश्रांती घेतली, तरी पाणलोट क्षेत्रातील दमदार पाऊस आणि राधानगरी धरणाच्या वीजगृहातून २२०० क्युसेस विसर्ग सुरुच असल्याने पंचगंगेसह सर्व नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी ४४.९ इंचावर स्थिर आहे. मात्र पुराचा धोका कायम आहे. कोयना धरणाचे सहा दरवाजे दोन फुटांनी खुले झाले असून १५ हजार ५५९ क्युसेस विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातील विविध मार्ग बंद असल्याने १०० गावांचा संपर्क तुटला आहे. शहरात २१३ कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले. कोल्हापूर-रत्नागिरी, आणि शिये ते कसबा बावडा मार्ग आजही बंद राहिले. ८ राज्यमार्ग आणि १७ जिल्हामार्गावरील वाहतूक बंद आहे. कोल्हापूर-गगनबावडा राज्य मार्ग सकाळपासून वाहतुकीसाठी खुला झाला.

दरम्यान, चांदोली धरणाचे दरवाजे खुले झाल्याने वारणा नदीला पूर आला आहे. सावर्डे मांगले येथील पूल पाण्याखाली गेल्या ६ गावांचा संपर्क तुटला. पंचगंगा नदीची पाणी पातळी सकाळी दहा वाजता ४४. ८ इंच होती. दिवसभरात ही पातळी केवळ एका फूटाने वाढली. राजाराम बंधाऱ्याची पातळी संथ गतीने वाढत असली तरी शहराला महापुराचा धोका कायम आहे. राधानगरी धरणातून रात्री पाण्याचा विसर्ग वाढविल्यास आणि पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्यास पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात हायअलर्ट जाहीर केला आहे.

शहरातील पूरबाधित ठिकाणी मदत पोहोचण्यासाठी पथके सज्ज झाली आहेत. जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्यासह एनडीआरएफच्या पथकाने शहरातील कळंबा तलावासह नृसिंहवाडीत जाऊन पाहणी केली. महापालिकेची यंत्रणाही कार्यरत झाली आहे. शहरात पंचगंगेचे पाणी जामदार क्लबपर्यंत आले आहे. राधानगरी, कोयना आणि चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग वेगाने सुरू असल्याने नद्याच्या पाणी पात्र वाढले आहे. वारणेतून १८ हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. अतिवृष्टीने जिल्ह्यातील ७५३ गावे बाधित झाली असून ९११२ रहिवाशांना पुराचा फटका बसला आहे. दहा घरांची पूर्णंतः तर १६२८ घरांची अंशतः पडझड झाली आहे. ११ जनावरांचा मृत्यू झाला. पुरामुळे ४.२१ हेक्टर जमीन पाण्याखाली गेली आहे. पुरामुळे जिल्ह्यातील ६९ बंधारे पाण्याखाली आहेत.

शिवाजी पूलावर बंदी

पुराचे पाणी पाहण्यासाठी गेले दोन दिवस नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मात्र रविवारी सकाळी पोलिसांनी हौशी नागरिकांना शिवाजी पुलाकडे जाण्यासाठी बंदी केली. काही युवक या पूल परिसरात रेंगाळत होते. त्यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेऊन समज दिली. कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर रेडेडोह फुटला. या मार्गावरून केर्ली कडून शिवाजी पुलाकडे दुचाकीस्वारांना पोलिसांनी समज दिली. काही जण पुराच्या पाण्यातून जाण्याचा प्रयत्न करीत होते. त्यांनाही पोलिसांनी बाजूला केले.

दरड कोसळली

पारगड (ता. चंदगड) रोडवरील नामखोल गावाजवळ दुपारी दीड वाजण्याच्या सुमारात दरड कोसळली. त्यामुळे या मार्गावरील चारचाकी वाहनांना वाहतूक बंद करण्यात आली. चंदगड, वाघोली, इसापूर, अंकोल, पारगड, दोडामार्गवरील वाहतूक बंद झाली. हा रस्ता उत्तर गोव्यातील नागरिक बेळगावकडे जाण्यासाठी वापरतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोयनेचे सहाही दरवाजे उघडले

$
0
0

राम जगताप, कराड

कोयना धरणात २० हजार क्युसेक वेगाने पाण्याची आवक होत आहे. धरणात ८६.१८ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी रविवारी दुपारी १ वाजून ५० मिनिटांनी धरणाचे सहाही वक्र दरवाजे तीन फुटांनी उचलून कोयना नदीपात्रात १५ हजार ६०० क्युसेक पाणी सोडण्यात आले. शनिवारपासून पायथा विद्युतगृहातून २ हजार १०० क्युसेक प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग सुरू असून, एकूण १७ हजार ७०० क्युसेक पाण्याचा विसर्ग धरणातून होत आहे.

कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील कोयना, नवजा, महाबळेश्वर, प्रतापगड, सोनाट, बामणोली, काठी, वळवण, कारगाव या ठिकाणी मुसळधार पर्जन्यवृष्टी होत आहे. मोठ्या विसर्गामुळे पाटण तालुक्यातील कोयना व केरा नदीला पूर आला आहे. कराडच्यापुढे कृष्णा नदीलाही पूर आल्याने पाणी नदीपात्राबाहेर गेले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने कृष्णा व कोयना काठांवरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

प्रथम कोयना धरणाच्या पहिल्या व सहाव्या क्रमांकाच्या दरवाजांतून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यांनतर तिसऱ्या व चौथ्या आणि सर्वात शेवटी दुसऱ्या व पाचव्या क्रमांकाच्या वक्र दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. कोयना धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी ज्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे, त्या प्रमाणात कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याचे धोरण कोयना धरण व्यवस्थापन विभागाने स्वीकारले आहे.

१५ ऑगस्टपर्यंत कोयना धरणातील ९५ टीएमसीपर्यंत पाणीसाठा नियंत्रित केला जाणार आहे. पावसाचे प्रमाण कमी-जास्त पाहून वेळो-वेळी कमी-जास्त प्रमाणात पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात येईल.

वैशाली नारकर, अधीक्षक अभियंता, कोयना प्रकल्प

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाचगणी घाटात दरड कोसळली

$
0
0

सातारा

पाचगणी-काटवली घाटात दरडी पडण्याचे सत्र कायम सुरूच आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहेत. आज पहाटे शिंदेवाडी बसस्थानकाजवळ मोठी दरड कोसळून रस्त्यावर आली त्यामुळे मोठ्या वाहनांना वाहतुकीसाठी अडचण निर्माण झाली आहे. ही दरड तातडीने काढावी, अशी मागणी या परिसरातील प्रवाशी, वाहनचालक व नागरिकांनी केली आहे.

पाचगणी परिसरात संततधार कोसळणाऱ्या पावसाने थैमान घातले आहे. कुडाळी नदीला पूर आला आहे. सोमवारी पहाटे काटवली-पाचगणी घाटात पुन्हा शिंदेवाडीजवळ दरड कोसळल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. अर्ध्या रस्त्यात दगड व मुरूम आल्याने मोठ्या वाहनांना मोठी कसरत करावी लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या दरडी तातडीने काढून घेणे गरजेचे आहे. पंरतु, याकडे हा विभाग दुर्लक्षच करताना दिसत आहे. डोंगराकडील भागाच्या बाजूला असणारी गटर न काढल्याने अशा प्रकारच्या घटनांना सामोरे जावे लागत आहे. पावासाळ्यापूर्वी नियोजनात अशा धोकदायक दरडी काढुन घेणे गरजेचे होते. पंरतु, याकडे सबंधित विभाग लक्ष देत नसल्याने ऐन पावसाळ्यात अशा घटनांना सामोरे जावे लागत आहे. सकाळी घाटातून पाचगणीकडे जाणाऱ्या गाड्या मात्र रस्त्याच्या बाजूने जात होत्या. त्याचबरोबर शिंदेवाडी ते रूईघरला जाणाऱ्या रस्त्यावर रात्री एक मोठा वृक्ष उन्मळून पडल्याने रूईघरहून पाचगणकडे जाणारी सर्व वाहतुक बंद होती.

दरम्यान, रांजणी (ता.जावली) या धरणग्रस्त गावासाठी जाणारा रिंग रोड खचल्याने तो वाहतुकीसाठी बंद झाला आहे. पाचगणी व कुडाळला जाण्यासाठी असणाऱ्या रिंगरोडला या दोन ठिकाणी मोठमोठ्या भेगा पडल्याने धोकादायक झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साताऱ्यात यंदाही पारंपरिक वाद्ये अन् कृत्रिम तळी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा

गणेशोत्सवाच्या कालावधीत ढोल-ताशा, झांझपथक अशा पारंपरिक वाद्यांना पोलिसांनी अडवणूक करू नये, ऐतिहासिक साताऱ्याची संस्कृती जपण्यासाठी सर्वच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे तयार असल्याची घोषणा शहरातील गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी झालेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत केली. सामाजिक एकोपा वाढावा, उत्सवाचे पावित्र्य राहावे, या हेतूने पोलिस प्रशासनही सज्ज असल्याची घोषणा माहिती निरीक्षक बी. आर. पाटील यांनी केली.

पोलिस करमणूक केंद्रातील अलंकार हॉलमध्ये ही बैठक पार पडली. उपविभागीय पोलिस अधिकारी खंडेराव धरणे, पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील, तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण, सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी शंकर गोरे, पोलिस निरीक्षक चंद्रकांत बेदरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

बैठकीत प्रकाश मंडळाचे श्रीकांत शेटे, शिवसेनेचे नरेंद्र पाटील, सप्ततारा मंडळाचे राजू गोडसे, भाजपचे शहराध्यक्ष सुनील काळेकर आदींनी आपली मते मांडली. गणेशमूर्तींच्या उंचीचा मुद्दा श्रीकांत शेटे यांनी उपस्थित केला. मूर्तींची उंची जास्त आणि शहरातील वीज वाहिन्या दहा ते बारा फूट उंचीवर अशी परिस्थिती असल्याने अनेकदा धोकादायक परिस्थिती निर्माण होत असते. त्यामुळए मूर्तींच्या उंचीवर निर्बंध घालावे लागतील. उत्सवातील विविध परवान्यांसाठी 'एक खिडकी' योजना तत्काळ सुरू व्हावी तसेच मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना उत्सव काळात इतर कामे असल्याने परवाने कमी वेळात मिळावेत, असे मुद्दे शेटे यांनी मांडले.

गणेशमूर्ती विसर्जनासाठी पालिकेने कृत्रिम तळी तयार केली आहेत. राधिका रस्त्यावर जिल्हा परिषदेची ही तळ्याची जागा नगरपालिकेच्या ताब्यात मिळण्यासाठी प्रयत्न केले जावेत. या तळ्यासाठी जिल्हा नियोजनकडून निधी मिळावा, गणेशोत्सवाच्या काळात बसस्थानक परिसरातील गर्दी वाढते. या परिसरात नव्याने बसस्थानक तयार केले गेले असले तरी ते विक्रेत्यांनी बळकावले आहेत. या मार्गावरून रोज दोन हजार विद्यार्थी बाहेरगावाहून सातार्यात शिकायला येत असतात, त्यांना चालण्यासाठी फूटपाथही नाही, त्यामुळे प्रशासनाने ही अतिक्रमणे पहिल्यांदा काढून घ्यावीत. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना बक्षिसे द्यावीत, अशी मागणीही करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाऊस मंदावला; कोयनेचा विसर्ग कायम

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड

कराड व पाटण तालुक्यांसह कोयना धरण पाणलोट क्षेत्रातही सोमवारी दिवसभरात पावसाचा जोर कमी झाला. धरणाच्या शिवसागर जलाशयातील पाण्याची आवकही थोड्या फार प्रमाणात घटली आहे. सध्या ३२ हजार २४१ क्युसेक पाण्याची आवक होत असून, ८७.१५ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. कोयनेचे सहा वक्र दरवाजे तीन फुटांवर स्थिर ठेवण्यात आले आहेत. एकूण १८३४० क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात होत आहे.

पाण्याची आवक कमी झाली असली तरी कोयना धरणातील पाणीपातळी स्थिर ठेवण्यासाठी सहाही वक्र दरवाजांतून १६२४० व पायथा विद्युतगृहातून २१०० असे एकूण १८३४० क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात होत आहे. धरणातील पाणीपातळी २१४९ फूट ५ इंच म्हणजेच उंची ६५५.१४२ मीटर इतकी झाली आहे. रविवारी सायंकाळी पाचपासून सोमवारी सायंकाळी पाचपर्यंत संपलेल्या चोवीस तासांत कोयनानगर येथे ७४, नवजा ५८ आणि महाबळेश्वरमध्ये ६८ मिलीमीटर पाऊस झाला आहे.

विसर्ग कमी होण्याची शक्यता

सध्या कोयना पाणलोट क्षेत्रातील पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे पाण्याची आवक काही प्रमाणात कमी झाल्याने व धरण व्यवस्थापनाला ९५ टीएमसीपर्यंत पाणीसाठा नियंत्रित करावा लागणार असल्याने एक ते दीड फुटाने दरवाजे कमी करण्याची शक्यता आहे.

नद्या अद्याप दुथडी

कोयना धरणातून नदीपात्रात सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे संगमनगर (धक्का) येथील जुना पूल अद्याप पाण्याखाली आहे. पाटण येथील कोयना नदीवरील मुळगाव पुलाला लागून पाणी वाहत आहे. पाटण येथील केरा नदी दुथडी भरून वाहत असल्याने केरा-कोयना नदीच्या संगमामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीतही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे निसरे नावडी येथील फरशीपूल अद्याप पाण्याखालीच आहे. कोयना नदीकाठच्या शिवारातील पिके पाण्याखाली गेली असून, या पिकांचे नुकसान होण्याची भिती शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे.

६० गावांना धोक्याचा इशारा

पावसाच्या हलक्या सरी व विविध धबधब्यांतून वाहणारे पाण्याचे प्रवाह आणि धरणांतून होणारा विसर्गामुळे पाटणसह कराड तालुक्यांतील अनेक गावांना पूरस्थितीचा फटका बसण्याची शक्यता आहे. संभाव्य पूरस्थिती गृहित धरून प्रशासनाने या दोन्ही तालुक्यांतील नदीकाठच्या सुमारे ६० गावांवर लक्ष केंद्रीत करीत या गावांना धोक्याचा इशारा दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छेडछाडीविरोधात निर्भया दक्ष

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

स्त्रियांची छेडछाड रोखण्यासाठी विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या निर्भया पथकाचे उद्‍घाटन सोमवारी (ता. ८) राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या हस्ते झाले. कायदे कडक आहेत, मात्र त्याची अंमलबजावणीही तितकीच कठोर केली तर महिला सुरक्षित राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. निर्भया पथकाच्या माध्यमातून संरक्षणासह समुदपदेशनाचेही काम होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

महिला आणि मुलींच्या छेडछाडीचे वाढते प्रकार रोखण्यासाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी निर्भया पथकांची संकल्पना मांडली. हैदराबाद येथील शी टीमच्या धर्तीवर महिलांच्या छेडछाडीचे गुन्हे रोखण्यासह विशेष पथकाची निर्मिती करण्यात आली आहे. यासाठी महिला पोलिसांचे एक पथक हैदराबाद येथे प्रशिक्षण घेऊन आले असून, त्यांनी निर्भया पथकातील इतरांनाही प्रशिक्षण दिले आहे. गुन्हे रोखण्यासह महिलांची सुरक्षा वाढवण्यासाठी हे पथक छुप्या पद्धतीने काम करणार आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह आमदार राजेश क्षीरसागर, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांच्या प्रमुख उपस्थितीती अलंकार हॉल येथे सोमवारी निर्भया पथकाचे उद्‍घाटन झाले. यावेळी बोलताना रहाटकर यांनी निर्भया पथकामागील संकल्पनेचे कौतुक करीत हा उपक्रम संपूर्ण देशासाठी मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बोलताना, 'राजर्षी शाहू महाराजांची परंपरा लाभलेल्या कोल्हापूर जिल्ह्याला फार काळ निर्भया पथकाची गरज भासू नये', अशी अपेक्षा व्यक्त केली. महिलांची छेडछाड करणाऱ्यांचे चित्रीकरण त्यांच्या नातेवाईकांना दाखवण्याची व्यवस्था या पथकाने केली आहे, त्यामुळे गुन्ह्यांवर नियंत्रण राहील असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. नांगरे-पाटील यांनी निर्भया पथकाची कार्यपद्धती स्पष्ट केली. या पथकाची ओळख गोपनीय ठेवली जाणार असून, तक्रारदार महिलांचीही ओळख गोपनीय ठेवण्यात येणार आहे. संबंधित दोषींवर पोलिसच गुन्हे दाखल करणार आहेत, त्याचबरोबर गुन्हे करणाऱ्यांची मानसिकता बदलवण्यासाठीही पोलिस प्रशासने काम करेल, असे त्यांनी सांगितले. यावेळी महापौर अश्विनी रामाणे, आमदार राजेश क्षीरसागर, कोल्हापूर

परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, मधुरिमा राजे छत्रपती, अतिरिक्त पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा उपस्थित होते.

चौकट - फेसबूक पेज ओपन

महिलांना तक्रारी देणे सोयीचे व्हावे यासाठी सोशल मीडियाचाही वापर केला जात आहे. निर्भया पथकाचे फेसबूक पेज ओपन केले असून, या पेजवरही महिला तक्रारी नोंदवू शकतात. महिलांची छेडछाड होणारी सार्वजनिक ठिकाणे, संशयित याविषयी माहिती देण्याचे आवाहन पोलिस अधिकाऱ्यांनी केले आहे. ज्या महिलांना पोलिसांपर्यंत पोहोचता येणार नाही, त्यांच्यासाठी सोशल मीडियाची मदत होणार आहे. यासाठी ट्विटर अकौंटही तयार केले आहे.

चौकट - जिल्ह्यात दहा पथके तैनात

जिल्ह्यात दहा निर्भया पथके तैनात करण्यात आली आहेत. एक महिला पीएसआय, तीन महिला पोलिस कॉन्स्टेबल आणि एक पुरुष कॉन्स्टेबलचा समावेश या पथकात केला आहे. दर दोन ते तीन महिन्यांनी पथकातील सदस्य बदलतील. जिल्ह्यातील एज्युकेशन हब असलेल्या ठिकाणी पथके तैनात केली असून, लवकरच याचे फायदेही जाणवतील, असा विश्वास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

चौकट -

पथकाशी संपर्कासाठी व्हॉट्स अॅप क्रमांक - ९५५२३२८३८३, ७२१८०३८५८५

ईमेलआयडी

cr.kop@mahapolice.gov.in,

व्टिटर आयडी

http://twitter.com/nirbhaya_team,

फेसबुक आयडी

www.facebook.com/nirbhayateamkolhapur

संपर्क नियंत्रण कक्ष - ०२३१-२६६२३३३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हुतात्मा बिंदू कुलकर्णींचा स्मृ‌‌त‌िद‌िन कधी?

$
0
0

Bhimgonda.Desai@timesgroup.com

कोल्हापूर : स्वातंत्र्यलढ्यात तरुण वयात प्राणाची आहुती दिलेल्या बिंदू नारायण कुलकर्णी यांचा १६ ऑगस्ट रोजी स्मृतिदिन साजरा करावा, अशी एक दशकाहून अधिक काळच्या मागणी महापालिकेने बेदखल केली आहे.

क्रांत‌िदिनाच्या निमित्ताने प्रत्येक वर्षी कोल्हापूर जिल्हा स्वातंत्र्य सैनिक संघटनेतर्फे तत्काल‌िन महापौर, अधिकारी यांना निवेदन देऊन महापालिकेतर्फे बिंदू कुलकर्णी यांचा हुतात्मा दिन साजरा करावा, अशी मागणी करीत असतात. परंतु, मागणीच्या निवेदनास केराची टोपली दाखवली आहे.

बिंदूच्या हुतात्म्याचे ठिकाण म्हणून शहराच्या मध्यवस्तीमधील चौकास 'बिंदू चौक' असे नाव दिले आहे. तरीही त्यांचा स्मृतिदिन महापालिकेतर्फे साजरा होत नाही. ‌बिंदू कुलकर्णी यांचे मूळ गाव गडहिंग्लज तालुक्यातीत मुत्नाळ. ते भक्त‌िसेवा विद्यापीठ शाळेत शिक्षण घेतानाच स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले. त्यावेळी भारत छोडे चळवळ गत‌िमान झाली होती. बिंदू चौकात १६ ऑगस्ट, १९४२ रोजी ब्रिटीशाविरुद्धची स्वातंत्र्यासाठी एका सभेचे आयोजन केले होते. ती सभा ब्रिट‌िशांनी उधळून लावण्यासाठी बेछूट लाठीहल्ला केला. त्यामध्ये अवघे १७ वर्षांचे असलेले बिंदू कुलकर्णी हुतात्मा झाले. त्यांचे स्मरण कायम राहवे, यासाठी पुर्वी मिरची बजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि हुतात्मा झालेल्या चौकास बिंदू असे नाव‌ दिले. यामुळेच बिंदू चौकास ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले.

स्वातंत्र्य सैनिक संघटना, जिल्हा सर्वोदय मंडळ, भक्ती सेवा विद्यापीठ, उत्तराधिकारी संघटना, दलितमित्र बापूसाहेब पाटील ग्रंथालय, आनंदवन बचत गट, आनंदी महिला जागृती यांच्यातर्फे या चौकात आठ ते दहा वर्षांपासून प्रत्येक वर्षी १६ ऑगस्ट रोजी बिंदू कुलकर्णी यांचा हुतात्मा दिन साजरा केला जातो. पथनाट्य, व्याख्यान असे विविध उपक्रम आयोजित करून त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला जातो. देशप्रेमापोटी अतिशय संवदेनशीलपणे सामाजिक संस्था, संघटना स्वतःहून स्मृतिदिन साजरा करता असताना महापालिका केवळ बघ्याची भूमिका घेते, ही संतापजनक बाब असल्याचे स्वातंत्र्य सैनिकांचे मत आहे. पद, प्रतिष्ठा, खुर्चीसाठी लाखो रूपयांची उधळपट्टी करणाऱ्या महापालिकेच्या कारभाऱ्यांना स्वातंत्र्यासाठी प्राणाचे बलिदान दिलेले ‌बिंदू कुलकर्णी यांचा स्मृतिदिन साजरा करण्याची सुबुध्दी सूचत नाही काय असा सवालही उपस्थित होत आहे.


मागणी काय?

१६ ऑगस्ट हा दिवस महापालिकेने बिंदू कुलकर्णी यांचा हुतात्मा दिन म्हणून साजरा करावा, नव्या पिढीच्या महितीसाठी त्यांच्या कार्याची माहितीचा फलक लावावा, अशी मागणी संघटनेची आहे. महापालिका सभेत ठराव करून स्मृतिदिन साजरा करण्याची विनंती दहा वर्षातील बहुतांशी पदाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन देण्यासाठी गेल्यानंतर तोंडासमोर सर्वच पदाधिकारी आश्वासन देतात. मात्र प्रत्यक्षात अंमलबजावणी केली जात नाही.

स्वातंत्र्याचे अग्रदूत हुतात्मे

करवीरय्या सिद्दय्या स्वामी, शंकरराव कृष्णाजी इंगळे (कापशी, ता. कागल), तुकाराम रामजी भारमल (कलनाकवाडी, ता. भुदरगड), मल्लाप्पा बाबाजी चौगुले, हरीबा कृष्णा बेनाडे (चिखली, ता. कागल), बळवंत लक्ष्मण जबडे (जत्राट, ता. चिक्कोडी- कर्नाटक), नरसू परसू परीट (अक्कोळ, ता. चिक्कोडी), कल्लाप्पा कृष्णा मुत्नाळे, शंकर पांगिरे (निपाणी, ता. चिक्कोडी).

०००००

बिंदू नारायण कुलकर्णी यांचा हुतात्मा दिन १६ ऑगस्ट रोजी महापालिकने साजरा करावा, अशी मागणी अनेक वर्षापासून संघटना करत आहे. मात्र त्याची दखल घेतली जात नाही. यंदाही या मागणीचे निवेदन दिले आहे.

सुंदरराव देसाई, सचिव, स्वातंत्र्य सैनिक संघटना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हद्दवाढीबाबत पुन्हा बैठक होणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूरच्या हद्दवाढीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे या आठवड्यात हद्दवाढ समर्थक तसेच विरोधक अशा दोन्ही बाजूकडील प्रमुख नेत्यांशी मुख्यमंत्र्यांची बैठक होणार आहे. यातून ​विरोधकांची सहमती मिळवण्यात मुख्यमंत्री यशस्वी होतात की ही प्रक्रिया रखडते हे स्पष्ट होणार आहे.

पावसाळी अधिवेशनात हद्दवाढीचा निर्णय घेण्याच्यादृष्टीने अधिसूचनेवर मुख्यमंत्र्यांची केवळ स्वाक्षरी होण्याचीच औपचारिकता बाकी होती. पण त्याचवेळी प्रस्तावाला विरोध करणाऱ्या आमदार अमल महाडिक, चंद्रदीप नरके, डॉ. सुजीत मिणचेकर यांनी जोरदार ताकद लावून ही अधिसूचना प्रसिद्ध होऊ दिली नाही. यामुळे शेवटच्या टप्प्यात आलेल्या हद्दवाढीच्या प्रक्रियेला पुन्हा खो बसला होता.

यावरुन दोन्ही बाजूने मोठी आंदोलने झाली. तसेच आमदार राजेश क्षीरसागर यांनी विधानसभेच्या दारात सुरू केलेल्या उपोषणामुळे मुख्यमंत्र्यांनी अधिवेशन काळातच तातडीने दोन्ही बाजूकडील प्रमुख नेत्यांची बैठक बोलवली. त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी काही निर्णय न देता दोन्ही बाजूकडील प्रमुख नेत्यांना पुन्हा स्वतंत्रपणे भेटून चर्चा करण्याचे आश्वासन दिले होते. अधिवेशन झाल्यानंतर तातडीने ही प्रक्रिया केली जाईल, असे सांगण्यात आले होते.

त्यानुसार या आठवड्यात दोन्हीबाजूच्या नेत्यांशी मुख्यमंत्र्यांची चर्चा अपेक्षित होती. सोमवारी दिवसभर मंगळवारी मुख्यमंत्री यांची दोन्ही बाजूकडील नेत्यांशी बैठक होणार असल्याची चर्चा होती. पण त्याबाबतचे काहीच निरोप नसल्याचे लोकप्रतिनिधींकडून सांगण्यात आले. मात्र ही प्रक्रिया आठवड्यातच होईल, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. त्यामुळे या आठवड्यात हद्दवाढ समर्थक आमदार तसेच काही प्रमुखांशी तर त्यानंतर विरोधक आमदारांसोबत मुख्यमंत्री चर्चा करतील, याची शक्यता आहे. या बैठकीतून मुख्यमंत्री विरोधकांचा विरोध मावळण्यास यशस्वी होतात का याकडे कोल्हापूरचे लक्ष लागून राहिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहकार कायद्याला आव्हान देणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सहकारी संस्थांमध्ये भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारप्रकरणी दोषी ठरणाऱ्या संचालकांना दहा वर्षे सहकारी संस्थांची निवडणूक लढवण्यास बंदी घालणारे विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आले आहे. पण पूर्वलक्षी प्रभावाने असे विधेयक मंजूर करता येत नाही. त्यामुळे दोषी नसलेल्या संचालकांनाही निवडणूक बंदीला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे अनेक संस्थांचे संचालक मंडळ अडचणीत येणार असल्याने या विधेयकाला कोर्टात आव्हान देणार असल्याचे माजी मंत्री व जिल्हा बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी पत्रकार बैठकीत सांगितले. माजी सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी 'सूर जुळले' असल्याची अपरोधिक टिपणीही त्यांनी केली.

पाटील यांनी सहकार शुद्धीकरणाचा विडा उचलला होता. सहकार मंत्रीपदावरुन महसूल मंत्रीपदी बढती दिल्यानंतर विधेयकाबाबत विचारले असता, मुश्रीफ म्हणाले, 'विधानसभेत याबाबत गुरुवारी चर्चा सुरू असताना विधेयकामुळे निर्माण होणाऱ्या अडचणीबाबत सविस्तर मांडणी केली. या मांडणीला माजी मंत्री एकनाथ खडसे यांनीही समर्थन देत सहकाराला या नवीन विधेयकाचा फटका बसणार असल्याचे सांगितले.

महापालिकेत लक्ष घालणार

एकाच पावसात शहरातील रस्त्याच्या झालेल्या दुरवस्थेबाबत मुश्रीफ म्हणाले की, विधान परिषद निवडणुकीत व्यस्त असल्याने आमदार सतेज पाटील व आपले महापालिकेकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे पंधरा दिवसांनंतर महापालिकेच्या कारभारात लक्ष घालू. चुकीच्या कारभाराचे कोणतेही समर्थन दिले जाणार नाही. लोकसंख्येचा निकष पूर्ण करण्यासाठी शहराची हद्दवाढ मेरीटनुसार आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

०००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राचीन दर्जा टिकवण्यास मदत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. हरकतीही मागविण्यात आल्या आहेत. हरकती न आल्यास तीन ते चार महिन्यात मंदिर राज्य संरक्षित करण्याची प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. अंबाबाई मंदिर राज्य संरक्षित झाल्यास प्राचीन दर्जा टिकून राहणार आहे.

महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुरातन वास्तूशास्त्रविषयक स्थळे, अवशेष अधिनियमानुसारर २० जुलैला अंबाबाई मंदिर प्राचीन आणि ऐतिहासिक स्मारक निर्देशित करण्यात आले आहे. मंदिर पुरातन असून केवळ स्मारक यादीत समावेश नसल्यामुळे भाविकांच्या सोयी-सुविधांच्या नावाखाली अनेक अनावश्यक बदल करण्यात आले. यामुळे हेमाडपंथी बांधकामाच्या मूळ सौंदर्याला धक्का लागू लागला. मंदिराच्या डागडुजीसाठी पुरातत्व विभाग मान्यता देत नसल्याची कारणेही दिली जात होती. त्यामुळे विकासात अडथळा निर्माण होत होता. मंदिर राज्य संर‌क्षित झाले तरी महापालिका, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आणि पुरातत्व विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नातून मंदिराचा प्राचीन दर्जा टिकविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. मंदिरातील आर्द्रता कमी करण्याबरोबरच शिळा संवर्धनासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत१

अंबाबाई मंदिर परिसर राज्य संरक्षित स्मारक करण्यासाठी राज्य सरकारने २० मार्च १९९७ ला प्राथमिक अधिसूचना काढली होती. ६ फेब्रुवारी १९९७ ला प्रसिद्ध झालेल्या गॅझेटमध्ये ही सविस्तर माहिती नमूद केली होती. अधिसूचनेनंतर चार महिन्यांच्या कालावधीत अंतिम अधिसूचना काढून मंदिराला राज्य संरक्षित वास्तूचा दर्जा देण्याची आवश्यकता होती. मात्र १९ वर्षे झाली तरीही हा प्रश्न प्रलंबित होता.

मंदिर राज्य संरक्षित झाल्यास पुरातत्व विभागाकडून मंदिरात सध्या सुरु असलेल्या पूजा -अर्चा, दर्शनांची वेळ यात कोणतेही बदल करण्याचा अधिकारी पुरातत्व विभागाला नसेल.

========

२० सप्टेंबरपर्यंत कोणत्याही हरकती न आल्यास तीन ते चार महिन्यात श्री अंबाबाई मंदिर राज्य संरक्षित होण्याची प्रक्रिया पूर्ण होऊ शकते. मंदिर राज्य संरक्षित झाल्यास मंदिराचा प्राचीन दर्जा टिकून ठेवता येऊ शकतो. तसेच शिळा संवर्धनासाठी टप्याटप्याने निधी उपलब्ध करुन त्यावर उपाययोजना करणे शक्य होणार आहे.

विलास वहाणे, सहायक संचालक, पुरातत्व विभाग
=====

मंदिर राज्य संरक्षित झाल्यास

मं‌दिराच्या कामांसाठी भरपूर निधी

शिळा संवर्धन केले जाणार

ऑईल पेंटसारखे प्रकार थांबणार

लोखंडी रेलिंग काढून टाकण्यात येणार

वास्तूसौंदर्य पाहण्यासाठी अभ्यासक आणि पर्यटकांचा ओघ वाढेल.

सुविधा पुरविताना त्यांची तपासणी पुरातत्त्व विभागाकडून

अनधिकृत बांधकाम हटविले जाईल

मंदिरातील संगमरवरी फरशा, लोखंडी दरवाजे काढण्याची शक्यता

००००००००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अमित कुरणेला अटक; बारा दिवसांची कोठडी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मिरज

बलात्कार पीडित विवाहिता स्वाती अमर कुडचे हिच्या आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी अमित अण्णासाहेब कुरणे (२७), वडील अण्णासाहेब तमण्णा कुरणे (६०) आणि आई सुनीता तमण्णा कुरणे (६० रा. तिघे शिवाजीनगर) यांना अटक केली. शनिवारी रात्री विवाहितेने कुरणे मळा कुरणे यांच्याच बंगल्यात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. अटक केलेल्या आरोपींची धिंड काढण्याच्या मागणीसाठी विविध राजकीय व सामाजिक महिला संघटनांनी पोलिस ठाण्यात गोंधळ घातला. पोलिस राजकीय दबावातून धिंड काढत नसल्याचा आरोप राष्ट्रवादी, शिवसेना आणि मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी केला. दरम्यान तिन्ही आरोपींना मिरज कोर्टासमोर उभे केले असता, कोर्टाने बारा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.


स्वातीने ६ जुलै रोजी अमितच्या विरोधात शहर पोलिसांत बलात्काराची फिर्याद दिली होती. फिर्याद दिल्यानंतरही अमितने स्वातीला पुन्हा फूस लावून तिला कृष्णाघाट येथील आपल्या फॉर्म हाउसवर ठेवले होते. मात्र, तेथेही अमितच्या आई-वडिलांकडून तिचा छळ सुरूच होता. कुरणे कुटुंबीयांनी स्वातीवर घर सोडून जाण्यासाठी त्याला धमकीही दिली होती. मात्र, स्वातीने स्पष्ट नकार दिल्याने अमितची आई सुनीता कुरणे हिने शनिवारी सायंकाळी स्वातीच्या विरोधात महात्मा गांधी चौक पोलिसांत खंडणीची तक्रार दिली होती. त्याच रात्री स्वातीने कुरणे मळ्यातील बंगल्यातील स्वयंपाक घरात गळफास लावून आत्महत्या केली होती. कुरणे कुटुंबीयांच्या जाचाला कंटाळून स्वातीने आत्महत्या केल्याने रविवारी सकाळी तिचे नातेवाईक आणि महिला संघटनांनी शहर पोलिसांत धाव घेऊन आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी केली होती. पोलिसांनी रविवारी रात्री अमितचे वडील अण्णासाहेब कुरणे आणि आई सुनीता कुरणे यांना अटक केल्यानंतर स्वातीवर अंत्यसंस्कार करण्यात आला.

महिला पदाधिकाऱ्यांचा गोंधळ

आरोपींना कोर्टात उभे करणार असल्याचे कळताच नगरसेविका संगिता हारगे, अभिजित हारगे, मनसे महिला जिल्हाध्यक्षा अ‍ॅड. स्वाती शिंदे, अ‍ॅड. प्रविणा हेटकाळे, राष्ट्रवादीच्या राधिका हारगे, शिवसेनेच्या सुवर्णा मोहिते, सुनीता मोरे, शोभा अडसूळ यांच्यासह शहरातील विविध सामाजिक आणि राजकीय महिला संघटनांच्या कार्यकर्त्यांनी शहर पोलिसांत गर्दी केली. त्यांनी आरोपींना धिंड काढत कोर्टात नेण्याची मागणी केली. मात्र, पोलिसांनी मागणी नाकारल्याने महिला संतप्त झाल्या. त्यांनी शहर पोलिस ठाण्यातच गोंधळ घातला. आरोपींच्या विरोधात जोरदार घोषणा बाजी केली. या झटापटीत मनसेच्या स्वाती शिंदे यांनी आरोपी अमितच्या कानशिलात लगावल्या. त्यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांची धावपळ झाली.


पीआय सुवर्णा पत्की निलंबित


बलात्कार पीडितेवर खंडणीचा गुन्हा दाखल केल्याप्रकरणी मिरजेतील महात्मा गांधी चौकीच्या पोलिस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्यावर सोमवारी निलंबनाची कारवाई करण्यात आली. नजीकच्या पोलिस ठाण्यात आपल्यावर बलात्कार झाल्याची फिर्याद देणाऱ्या महिलेच्या बाबतीत संवेदनशीलता न दाखविता, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना कोणतीही माहिती न देता उलट त्या महिलेवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्याची घाई पत्की यांनी केल्याने ही कारवाई करण्यात येत असल्याचे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी सांगलीत पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

मिरजेतील बलात्कार पीडित महिलेने संशयिताच्या घरात आपल्यावर अत्याचार करणाऱ्या संशयिताचे नाव भिंतीवर लिहून ठेवून आत्महत्या केल्याने सर्वत्र खळबळ माजली. अत्याचाराची सीमा ओलांडणाऱ्या या घटनेला पोलिसही तितकेच जबाबदार असल्याचे समोर येताच संतापाची तीव्रता वाढली. कोल्हापुरात महिला, मुलींवरील अत्याचाराच्या घटनांना आवर घालण्यासाठी कार्यरत होत असलेल्या निर्भया पथकाच्या शुभारंभासाठी आलेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर याही सांगलीकडे धावल्या.

रहाटकर म्हणाल्या, 'मिरजेतील पीडितेवरील बलात्काराचे आणि नंतर तिच्यावर अगदी असंवेदनशीलतेने खंडणीचा गुन्हा दाखल करण्याचे प्रकरण चीड आणणारे आहे. पीडितेच्या बाबतीत जे काही घडले ते दुःखदायी आहे. अत्यंत वाईट पद्धतीने तिला त्रास दिला गेला. वास्तविक पोलिसांनी तिच्या तक्रारीची दखल घेऊन वेळीच तिला न्याय आणि आधार द्यायला हवा होता. परंतु, महात्मा गांधी पोलिस चौकीच्या पोलिस निरीक्षक सुवर्णा पत्की या एक महिला असतानाही त्यांना त्या महिलेची दया आली नाही. पत्की यांनी पीडितेवरच खंडणीचा गुन्हा दाखल केला. रक्षकही आपल्या बाजूने नसल्याने त्या बिचारीला आत्महत्या करावी लागली. तिचा हाकनाक बळी गेला, ही साधीसुधी घटना नाही. नजीकच्या पोलिस ठाण्यात पीडितेने बलात्काराची फिर्याद देऊन न्याय मागितला आहे. तिच्यावरच खंडणीचा आरोप होतो, ती बलात्कार पीडित आहे. हे माहित असतानाही वरिष्ठ अधिकाऱ्यांना कोणतीही कल्पना न देता सुवर्णा पत्की यांनी खंडणीसारखा गंभीर गुन्हा दाखल करून निष्काळजीपणा दाखविला आहे. त्यामुळे त्यांचे निलंबन करून त्यांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या संदर्भात राज्याचे पोलिस महासंचालक, विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्याशी आपण सविस्तर चर्चा केली आहे.'

आत्महत्या करण्यापूर्वी आपल्यावर बलात्कार झाल्याची फिर्याद देण्यासाठी संबधित पीडितेला मिरजेच्या शहर पोलिस ठाण्यात अनेक हेलफाटे घालावे लागल्याचेही समोर आले आहे. त्या बाबत पोलिस अधीक्षक शिंदे यांच्यांकडे राहटकर यांनी खुलासा मागितला आहे. त्यावर तत्काळ कार्यवाही करीत शिंदे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

विशेष वकील देणार : रहाटकर

रक्षकांनी रक्षकाचेच काम केले पाहिजे. केवळ महिलाच नाहीतर कोणीही सर्वसामान्य व्यक्ती आपल्यावरील अन्याय झाल्याची कैफीयत घेऊन आली तर पोलिसांकडून निष्काळजीपणा होता कामा नये. निष्काळजीपणा झाल्याचे समोर येताच कारवाई अटळ असल्याचे सांगून रहाटकर म्हणाल्या, मिरजेतील प्रकरणात हवे त्या प्रकारचे सहकार्य करण्यास महिला आयोग कटिबद्ध आहे. जलद न्यायालयात हा खटला सुनावणीला घेऊन विशेष वकिलांची नियुक्ती करून आरोपींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी, यासाठी आमचे प्रयत्न राहतील.

फौजदार बनसोडेच्या बडतर्फीचा प्रस्ताव

गडचिरोलीतून सांगलीत बदली झालेला आणि उस्मानाबादमध्ये पिस्तूलचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी अटकेत असलेला फौजदार प्रेम बनसोडे याला निलंबित करण्यात आले आहे. बदलीनंतर सांगलीत हजर होताच सुट्टी घेऊन उस्मानाबादला गेलेल्या बनसोडेचा गुन्हा समोर येताच त्याला पोलिस कोठडीत धाडले आहे. घटनेतील ३११ कलमानुसार त्याच्यावर बडतर्फीचा प्रस्ताव तयार करुन तो गृहखात्याकडे पाठविण्यात आला आहे.

मसूचीवाडी प्रकरणी सरपंचाकडून निष्काळजी

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील मसूचीवाडी प्रकरण मध्यंतरी राज्यभर गाजले. छेडछाडीला वैतागून गावातील मुलींनी कॉलेजला जाणे बंद केले होते. या बाबत त्या गावात येऊन तुम्ही दिलेल्या आदेशांचे पालन झाले का? असा सवाल पत्रकारांनी करताच रहाटकर म्हणाल्या, त्या गावातील मुलींसाठी बसेस सुरू करण्याचे आदेश दिले होते. मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अन्यही काही उपाययोजना सुचविल्या होत्या. त्याची अंमलबजावणी झाली की नाही, याची माहिती देण्यासाठी सरपंचाना सांगितले होते. परंतु, त्यांनी काहीच कळविले नाही. त्या ठिकाणी बस सुरू झाली आहे. त्या प्रकरणात अद्यापही चौथा आरोपी गजाआड झालेला नसल्याबाबतही राहटकर यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांना त्वरीत कारवाईच्या सूचना दिल्या.

सलमान खानला तीन नोटीसा

प्रसिद्ध अभिनेता सलमान खान याने महिलांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यांबाबत महिला आयोगाकडे कोणी तक्रार दिली नाही, म्हणून आयोग गप्प बसले नाही. त्या वक्तव्यांबाबत सलमानला तीन नोटीसा बजावल्या आहेत. त्यांने दिलेले उत्तरही खूप मोठे आहे. त्याचा अभ्यास सुरू आहे. मुद्दा महिलांच्या सन्मानाबद्दलचा असल्याने त्याबाबत योग्य ती कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही रहाटकर यांनी दिली.

निर्भया पेटीचा उपक्रम राबणार

सरकारी आणि खासगी कार्यालयांमध्ये, व्यवसायाच्या ठिकाणी दहापेक्षा अधिक महिला असतील तर त्या ठिकाणी लैंगिक शोषणाबाबतच्या तक्रारीचे निवारण, वेळ प्रसंगी संबधितांवर शिक्षेची कारवाई करण्यासाठी विशाखा समिती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परंतु, कार्यपद्धतीच माहित नसल्याने समित्यांचे काम ठप्प आहे. त्या सर्वाना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शाळा, कॉलेजांत 'निर्भया पेटी' हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये लिखित तक्रारी टाकता येतील. त्याची दखल पोलिसांकडून घेऊन त्वरीत कार्यवाही करण्यात येईल.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉल्बीवाल्यांचे कोर्टाचे हेलपाटे

$
0
0

Uddhav.Godase@timesgroup.com

कोल्हापूर: आवाज मर्यादेचा भंग करणाऱ्या डॉल्बीविरोधात करवाई करण्याचे आदेश थेट उच्च न्यायालयाने दिल्याने पोलिसांनी डॉल्बीविरोधात कारवाईची मोहीमच उघडली आहे. कोल्हापूर जिल्हा पोलिसांनी गेल्या दीड वर्षांत शंभर मंडळांवर ध्वनीप्रदूषण कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे गुन्हे दाखल केले आहेत, तर एक कोटींहून अधिक रकमेची डॉल्बी साऊंड सीस्टिम जप्त केली. गुन्हे दाखल केलेल्या मंडळांचे कोर्टात हेलपाटे सुरू आहेत, तर शंभरहून अधिक जणांवर दंडात्मक कारवाईदेखील केली आहे.

डॉल्बीच्या दणदणाटामुळे ध्वनी प्रदूषणासह नागरिकांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होत आहेत. कोल्हापुरात तर डॉल्बीच्या मोठ्या आ‍वाजामुळे गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावरील जुन्या इमारतीही कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. डॉल्बीच्या आवाजाने हृदयविकारासह कानाचेही विकार जडले आहेत. पोलिसांनी गणेश मंडळांना अनेकदा सूचना देऊनही गणेशोत्सवासह विविध कार्यक्रमातही डॉल्बीचा आवाज वाढवला आहे. पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान करणाऱ्या दोनशेहून अधिक सार्वजनिक मंडळांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. पर्यावरण व ध्वन‌ीप्रदूण कायद्याअंतर्गत पाचशेहून अधिक जणांना पोलिसांनी कोर्टात खेचले आहे. यातील ११० जणांच्या विरोधात जिल्हा व सत्र न्यायालयाने दंडात्मक कारवाई केली, त्याचबरोबर त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्रही लिहून घेतले आहे. जप्त केलेली एक कोटींहून अधिक रकमेची डॉल्बी साऊंड सिस्ट‌‌िम कोर्टाच्या आदेशानंतर संबंधितांकडे परत केली, मात्र पुन्हा आवाज मर्यादेचा भंग करणार नाही, असे प्रतिज्ञापत्र त्यांच्याकडून लिहून घेतले आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी केवळ गणेशोत्सव मंडळांवर कारवाई केलेली नाही, तर मोहरम्, शिवजयंती, आंबेडकर जयंती आणि लग्नाच्या वरातीतील डॉल्बीवरही कारवाई केली आहे. कोर्टात दाखल केलेल्या खटल्यांमुळे डॉल्बीच्या तालावर ठेका धरणाऱ्यांनाच आता कोर्टात हेलपाटे घालावे लागत आहेत.

यंदाचा गणेशोत्सव पूर्णपणे डॉल्बीमुक्त साजरा करण्याचा निर्धार पोलिसांनी केला आहे. गणेश मंडळांना विश्वासात घेऊन डॉल्बीचे घातक परिणाम समजावून सांगण्याचे काम सध्या शहरातील सर्वच पोलिस ठाण्यांकडून सुरू आहे. डॉक्टरांच्या मदतीने परिसरातील गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचे उद्बोधन सुरू आहे. ज्येष्ठ नागरिक मंडळे आणि काही सामाजिक संस्थाचीही मदत घेतली जात आहे. विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी वापरणाऱ्या मंडळांना पत्र पाठवून डॉल्बी वापरू नये, अशी सूचना देण्यात येणार आहे. पोलिसांच्या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या सर्व मंडळांवर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी दिले आहेत, त्यामुळे यंदा कोणत्याही मंडळाची गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

राजारामपुरीत नो डॉल्बी

राजारामपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अमृत देशमुख यांनी नुकतीच परिसरातील गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. डॉल्बी लावून आवाज मर्यादेचा भंग करणाऱ्या मंडळांवर कडक कारवाई करणार असल्याचा इशाराच बैठकीदरम्यान देण्यात आला. गणेश आगमनापासून ते विसर्जनापर्यंत मंडळांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. यासाठी परिसरातील ज्येष्ठ नागरिकांचीही मदत घेतली जाणार आहे.

सन २०१५ गणेशोत्सवातील गुन्हे

शाहूपुरी ९ मंडळे

राजवाडा ३७ मंडळे

राजारामपुरी १६ मंडळे

मोहरममधील गुन्हे

राजवाडा ५ मंडळे

नवरात्रोत्सवातील गुन्हे

राजवाडा १० मंडळे

विवाहादरम्यानचे गुन्हे

राजवाडा ३ मंडळे

सन २०१६

शिवजयंती मिरवणुकीतील गुन्हे

शाहूपुरी २ मंडळे

राजारामपुरी १ मंडळ

राजवाडा १ मंडळ

आंबेडकर जयंती

शाहूपुरी १ मंडळ

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती

शाहूपुरी १ मंडळ

राजा संभाजी महानाट्यादरम्यान

राजवाडा: १ मंडळ

निर्गत प्रकरणे: ६

जप्त मुद्देमाल : अंदाजे एक कोटी रुपये किमतीचा

०००

डॉल्बीच्या विरोधात विशेष पोलिस महानिरीक्षकांनी कडक भूमिका घेतली आहे. आवाज मर्यादेचा भंग करणाऱ्या सर्वच मंडळांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. मंडळांवर कारवाई करण्याची वेळ येऊ नये, यासाठी मंडळांचे प्रबोधन करण्याचे काम सध्या सुरू आहे.

प्रदीप देशपांडे, पोलिस अधीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महपौर, नगरसेवकांच्या मानधनवाढीसाठी हालचाली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापौर हा शहराचा प्रथम नागरिक, पण त्यांना प्रशासकीय अधिकार फार नाहीत. मानधनही नगरसेवकाइतकेच मिळते. महापौरपदाकडून शहरवासियांच्या असणाऱ्या अपेक्षा विचारात घेता त्यांच्या मानधनात वाढ अपेक्षित आहे. महाराष्ट्र महापौर परिषदेच्या मागणीनुसार राज्य सरकारच्या नगरविकास विभागाकडून आगामी काळात महापौर व नगरसेवकांच्या मानधनात वाढ प्रस्तावित आहे. नगरविकास विभागाने राज्यातील महापालिकाकडून महापौर व नगरसेवकांच्या मानधन वाढीसंदर्भात अभिप्राय मागविले आहेत.

महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नाचा विचार करून मानधन वाढ संभव आहे. राज्यातील विशेषत: ड वर्ग महापालिकेतील महापौर व नगरसेवकांना एकसारखे मानधन मिळते. जकात आ​णि एलबीटी बंद झाल्यामुळे महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक बनली आहे. दुसरीकडे महापालिका अधिनियमानुसार महापौर व नगरसेवकांना सध्या ७७०० रुपये मानधन आहे.

महापौरांच्या मानधनात वाढ करावी आणि जादा अधिकार बहाल करावेत, अशी महाराष्ट्र महापौर परिषदेने मागणी केली आहे. महाराष्ट्र महापौर परिषदेची मार्च २०१६ मध्ये मुंबईत बैठक झाली होती. राज्यभरातील महापौरांनी या बैठकीत मानधन व अधिकारात वाढ करण्याचा ठराव केला होता. राज्य सरकारकडे रितसर मागणी केली आहे. महापौरांना २५ हजार रुपये व नगरसेवकांना १५ हजार रुपये मानधन मिळावे या महाराष्ट्र महापौर परिषदेच्या ठरावानुसार नगरविकास विभागाने हालचाली सुरू केल्या आहेत. नगरविकास विभागाने महापालिकांना पत्र पाठवून मानधन वाढीच्या अनुषंगाने अभिप्राय मागविले आहेत.


राज्य सरकारच्या नगरविकास विभागाचे पत्र मिळाले आहे. महापालिकेच्या आर्थिक स्थितीचा अभ्यास करून राज्य सरकारला मानधन वाढीबाबतचा अभिप्राय कळविला जाईल.'

आयुक्त पी. शिवशंकर


महाराष्ट्र महापौर परिषदेचे अन्य ठराव

मार्च २०१६ मध्ये मुंबईत झालेल्या बैठकीतील ठराव

महापौरांना प्रशासकीय कामकाजातील अधिकार असावेत

महापौरांना दरमहा २५ हजार रुपये मानधन मिळावे

नगरसेवकांना १५ हजार मानधन करावे

महापौरांना लाल दिव्याची गाडी, पेन्शन मिळावी

महापालिकेच्या अनुदानात दुप्पटीने वाढ करावी

महापौरांच्या निधनानंतर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार व्हावेत


नगरसेवकांना मानधन अत्यल्प आहे. प्रभागातील कामकाज, समस्यांच्या सोडवणुकीसाठी नगरसेवक प्रसंगी स्वत: खर्च करतात. प्रभागातील कामकाजाचा आढावा, देखरेख ठेवण्यासाठी सगळ्याच नगरसेवकांनी पीएची नेमणुक केली आहे. सध्या मिळणाऱ्या मानधनात वाढ अत्यावश्यक आहे.

महेश सावंत, नगरसेवक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कोयनेतून विसर्ग सुरूच; पूरस्थिती कायम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सोमवारी दिवसभर पावसाने विश्रांती घेतली त्यामुळे पंचगंगा नदीची पातळी दोन फुटाने कमी झाली. पाणी पातळी स्थिर असली तरी सोमवारी दुपारपासून राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे खुले झाले. त्यामुळे पाणी इतरत्र पसरू लागले आहे. अजूनही ५८ बंधारे पाण्याखाली असून ८ राज्यमार्ग आणि १३ प्रमुख जिल्हा मार्ग बंद आहेत. वारणेतून विसर्ग सुरू झाल्याने महामार्गावरील कणेगांव (ता. वाळवा) येथील जुन्या पुलावरील वाहतूक बंद करून नव्या पुलावरून वाहतूक सुरू करण्यात आली. शिवाजी पूल बंद असल्याने कोल्हापूरहून रत्नागिरीकडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्गे वळविली आहे. पुलाची शिरोली येथील सर्व्हिस रोडवर पाणी आले असून धोकादायक वाहतूक सुरू आहे.

सोमवारी पावसाने काहिशी विश्रांती घेतली. कडकडीत ऊन आणि दुपारनंतर ढगाळ वातावरण राहिले. सायंकाळी पाचनंतर हलक्या सरी कोसळल्या. सोमवारी राधानगरी धरणक्षेत्रात १०५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. दमदार पाऊस झाल्याने दोन स्वयंचलित दरवाजे खुले झाले. त्यासह कोयना आणि चांदोली धरणाचे दरवाजे खुले असल्याने विसर्ग सुरू आहे. राधानगरीचे सर्वच दरवाजे रविवारी बंद झाले होते. सोमवारी पुन्हा दुपारनंतर या धरणाचा तीन आणि सहा क्रमाकांचा दरवाजा खुला झाल्याने ५०५६ क्युसेस विसर्ग सुरू झाला. राधानगरीतून विसर्ग वाढला असला तरी अलमट्टीतून विसर्ग वाढविला आहे. त्यामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता नाही.

पावसाचा जोर कमी झाला असला तरी पंचगंगेची धोका पातळी कायम आहे. रविवारी पंचगंगेची पाणी पातळी ४५ फूट होती. सोमवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत ही पाणी पातळी ४३.६ इंच होती. राधानगरी, कोयना, चांदोली धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झाल्याने अलमट्टीतून १ लाख ६० हजार क्युसेस विसर्ग सुरू होता. सोमवारपासून हा विसर्ग १ लाख ७४ हजार क्युसेस सुरु केला आहे.

रविवारी दुपारी पारगड (ता. चंदगड) रोडवरील नामखोल गावाजवळ कोसळलेली दरड काढल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्ववत सूरू झाली आहे. कोल्हापूर ते गगनबावडा, शिये ते कसबा बावडा मार्गावरील वाहतूकही सुरू झाली. भुईबावड्यात दरड कोसळल्याने खारेपाटणकडील वाहतूक बंद आहे. करुळ घाटात कोसळलेली दरड काढल्याने या कोकणातील वाहतूक पूर्ववत झाली आहे. अतिवृष्टीमुळे ७७३ गावे बाधित झाली असून ९६६६ लोकांना फटका बसला आहे. अशंत १० घरांची पडझड झाली असून १६५९ घरांची पूर्णतः पडझड झाली आहे. ११ जनावरांचा मृत्यू झाला असून १७८८ रहिवाशांचे स्थलांतर झाले आहे. एनडीआरएफचे पथकही कार्यरत असून पूरबाधित गावांत दहा बोटी तैनात केल्या आहेत.

पुलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटची पद्धत वेगळी आहे. तीत बदल करण्यासाठी तज्ज्ञांची कार्यशाळा घेण्यात येणार आहे. राज्यात २३०० पूल असून या पुलांच्या नवीन उभारणीसाठी २३ हजार कोटी खर्च होणार आहे. काही ठिकाणी नवीन पूल तर काही ठिकाणी पुलाची डागडुज्जी केली जाणार आहे. त्यासाठी डिसेंबरच्या पुरवणी बिलात तरतूद केली जाणार आहे.

चंद्रकांत पाटील, पालकमंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ड्रायव्हरवर रोखली चोरट्याने रिव्हॉल्वर;एसटीतील सराफाला लुटण्याचा प्रयत्न

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

ड्रायव्हरच्या कानशिलावर रिव्हॉल्वर रोखून एसटीमधून प्रवास करणाऱ्या सराफावर चाकूहल्ला करून त्याच्याकडील दागिने लुटण्याचा प्रयत्न मंगळवारी फसला. अक्कलकोट-हैद्रा एसटीमध्ये चालत्या गाडीतच नाविंदगी फाट्याजवळ सकाळी अकरा वाजता हा थरार घडला. चोरट्यांनी केलेल्या हल्ल्यात सराफ जखमी झाला असून, चोरटे दुचाकीवरुन फरार झाले.या घटनेमुळे प्रवाशांमध्ये खळबळ उडाली.

एमएच १४ बीटी ०६९० ही एसटी महामंडळाची बस अक्कलकोटहून हैद्राला निघाली होती. सकाळी सव्वा दहाच्या सुमारास अक्कलकोटमधून बस सुटली. या बसमध्ये एकूण ३८ प्रवासी होते. चालक म्हणून श्रीमंत मादप्पा दिवटे आणि वाहक म्हणून अकबर इब्राहीम तडमोर ड्युटी बजावत होते. बसमधून अक्कलकोटमधील खासबाग येथे राहणारे आणि हैद्रा येथे सोन्या-चांदीचे दुकान चालविणारे सराफ वसंत सुभाष वाघमारे प्रवास करीत होते. बस निघाली आणि नाविंदगी फाटा काही अंतरावर असतानाच बसमध्ये बसलेल्या तीन प्रवाशांना वाहकांनी प्रवासाचे ठिकाण आल्याची सूचना केली.

दरम्यान, वाहकाने सूचना करताच बसमधील तिघे प्रवासी चोरटे उठून उभे राहिले आणि त्यांनी आपल्या जवळील चटणी पावडर एसटीमधील सर्व प्रवाशांच्या डोळ्यात फेकली मात्र, सराफ वाघमारे यांना चोरटे असल्याची कुणकूण लागली आणि त्यांनी आपले डोळे काही क्षणापुरते बंद केले. प्रवासी इकडे डोळे चोळत असताना व गोंधळून गेले असतानाच तीनही चोरट्यांनी सराफ वाघमारे यांच्या दिशेने कूच केले आणि त्यांच्यावर चाकूने हल्ला करीत त्यांच्याजवळील दागिन्यांची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. परंतु, वाघमारे यांनी चोरट्यांसोबत झटापट केली, वाघमारे बॅग सोडत नसल्याचे लक्षात आल्यानंतर एका चोरट्याने त्यांच्यावर हल्ला केला. हातावर वार झाल्यामुळे वाघमारे रक्तबंबाळ झाले.

बसमध्ये हा चोरटे आणि प्रवासी यांच्यातील थरार पाहिल्यानंतर एसटीचे ड्रायव्हर श्रीमंत दिवटे यांनी बस न थांबविता ती तशीच पुढे नेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिघापैकी एका चोरट्याने दिवटे यांच्या कानाजवळ रिव्हॉल्वर रोखली आणि गाडी थांबविण्याचा आदेश दिला. दिवटे यांनी बस थांबविली आरडा-ओरडा पाहून रस्त्यावरून जाणारे लोक प्रवाशांच्या मदतीसाठी धावले. चोरट्यांनी मात्र, गोंधळात दुचाकीवरुन नाविंदगी गावातून शावळकडे पोबारा केला.

घटनेची माहिती मिळताच अक्कलकोट दक्षिणचे पोलिस निरीक्षक शिवाजी सोनवने आपल्या पथकासह तत्काळ दाखल झाले. जखमी सराफ वाघमारे यांना धीर दिला.

सराफाकडे पंधरा हजाराची चांदी

दररोज हैद्रा येथे आपल्या दुकानात जाऊन सोने चांदीचा व्यवसाय करणाऱ्या सरफ वाघमारे यांच्याकडे असलेल्या बॅगेत सोने-चांदीचे मोठे घबाड असेल म्हणून चोरट्यांनी प्लॅन केला होता. मात्र, तो फसला. वाघमारे यांच्याकडे असलेल्या बॅगमध्ये किती दागिने आहेत, याची चौकशी केली असता बॅगमध्ये पंधरा हजार रुपये किमतीची चांदी मिळून आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साताऱ्यात रिमझिम

$
0
0

साताऱ्यात रिमझिम

सातारा:

साताऱ्यात रिमझिम पाऊस पडत आहे. मागील आठवड्या पेक्षा सध्या पावसाचा जोर कमी झाला आहे. दरम्यान उरमोडी धरणातून सोडण्यात येणारे पाणी वाढल्याने वळसे गावच्या परिसरातील दक्षिण बाजूचा रस्ता पाण्याखाली गेल्याने या गावापासून दक्षिणेकडे असणाऱ्या अनेक गावे आणि छोट्या वाड्यावस्त्यांचा संपर्क तुटला आहे.

महाबळेश्वरातील पर्यटन प्रभावित

ऑर्थरसीट, एल्फिस्टन, सावित्री, लिंगमळा धबधबा, लॉडविक, वेण्णा लेक नौकाविहार हे पाच पॉइंट मुसळधार पावसामुळे पर्यटकांसाठी बंद केल्याचा परिणाम पर्यटकांच्या संख्येवर झाला आहे. पर्यटकांची संख्या खूपच कमी झाली आहे. महाबळेश्वरात यंदा मुसळधार पाऊस झाला आहे. गेल्या आठ दिवसांमध्ये तब्बल १६०० मिमी पावसाची नोंद झाली आहे. पावसाचे प्रमाण पाहता व पर्यटकांची सुरक्षितता लक्षात घेता स्थानिक प्रशासनाच्या वतीने येथील पाच पॉइंट काही दिवसांकरिता बंद करण्यात आले आहेत.

दहा टीएमसी पाणी गेले वाहून

सातारा जिल्ह्यातील सर्व मोठे तसेच मध्यम पाणी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरत आले आहेत. बहुतांश धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणे ओव्हर फ्लो झाल्यामुळे तसेच पूर परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी धरणांतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसांत सुमारे दहा टीएमसी पाणी नदीतून वाहून गेले आहे. जिल्ह्यात पुरेसा पाऊस पडूनही दुष्काळी तालुक्याला मात्र, या वाहून जाणाऱ्या पाण्याचा उपयोग होत नसल्याने आगामी काळात या बाबत नियोजन करावे लागणार आहे. सध्या वीर, तारळी, उरमोडी, मोरणा-गुरेघर, कण्हेर, धोम धरणातून विसर्ग सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोयनेत पावसाचा जोर वाढला

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, कराड

पाटण तालुक्यासह कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कोयना, नवजा व महाबळेश्वर परिसरात रात्रीपासून पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. नवजा येथे गेल्या चोवीस तासांमध्ये तब्बल २२४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. शिवसागर जलाशयात सध्या ३६ हजार २११ क्युसेक्स प्रतिसेकंद पाण्याची आवक होत असून, ८८.३३ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे.

दरम्यान, रविवारी दुपारी उचललेले कोयना धरणाचे सहाही वक्र दरवाजे धरणातील पाण्याची आवक वाढल्याने सलग तिसऱ्या दिवशी मंगळवारीही तीन फुटांवर कायम ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे धरणाच्या सहा वक्र दरवाजांतून १६ हजार ६५३ व पायथा विद्युतगृहातून २ हजार १०० असे एकूण १८ हजार ७५३ क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात होत आहे. त्यामुळे रविवारीपासून धरणाच्या सहा वक्र दरवाजांतून १.९८ टीएमसी व शनिवारीपासून पायथा वीजगृहातून ०.४६ असे एकूण २.४४ टीएमसी पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात आला आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे गेल्या दोन दिवसांत पाटण तालुक्यात १५ घरांची पडझड झाली असून, पंचनामे करण्याची काम सुरू असल्याचे महसूल विभागाकडून सांगण्यात आले.

सोमवारी सायंकाळी पाचपासून मंगळवारी सायंकाळी पाचपर्यंत चोवीस तासांत कोयनानगर येथे १२०, नवजा २२४ महाबळेश्वर ११९ मिमी पावसाची नोंद पर्जन्यमापकावर झाली आहे.

नद्या दुथडी; संगमनगर पूल पाण्याखाली

कोयना धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी कोयना नदीत सोडण्यात येत असल्याने अद्याप संगमनगर (धक्का) येथील जुना पूल व निसरेतील फरशीपूल सलग तिसऱ्या दिवशी पाण्याखालीच आहे. पाटण येथील कोयना नदीवरील मूळगाव पुलाला लागून पाणी वाहत आहे. कोयना विभागातील कोयना, केरा, काफना, काजळी, वांग, मोरणा, उत्तरमांड, तारळी या नद्या दुथडी वाहत आहेत. शिवारात पुराचे पाणी शिरल्याने व सलग तिसऱ्या दिवशी कोयनाकाठची शेती पाण्याखाली असल्याने पिके कुजण्याची शक्यता असून, शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे.

पुरात बुडून एकाचा मृत्यू

कोयना विभागातील नाणेल येथील तुकाराम कृष्णा जाधव (वय ५५) यांचा गौरीचा नावाच्या ओढ्याला आलेल्या पुराच्या पाण्यातून जात असताना बुडून मृत्यू झाला. या बाबतची नोंद कोयना पोलिसात झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नरसिंगराव पाटील यांचे मुंबईत निधन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा चंदगड

चंदगडचे माजी आमदार, दौलत सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष, नरसिंगराव गुरुनाथ पाटील यांचे मंगळवारी सकाळी ११ वाजता मुंबईत हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ८२ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात महेश, राजेश व निलेश अशी, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

तालुक्यातील विकासाचा, सहकारातील व शैक्षणिक क्षेत्रातील एक लढवया नेता हरपल्याने चंदगड तालुक्यावर शोककळा पसरली. बुधवारी (ता. १० ऑगस्ट) पहाटे नऊ वाजता बेळगाव येथे त्यांचे पार्थिव आणले जाणार आहे. अकरा वाजता त्यांच्या जन्मगावी, म्हाळेवाडी येथे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. दुपारी बारा वाजता यशवंतनगर येथे त्यांच्यावर अंत्यविधी होतील.

सरपंच ते पंचायत समिती सभापती, आमदारपदासह राज्य साखर संघ, नॅशनल हेवी, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह दौलत कारखाना आणि चंदगड तालुका संघ अशा संस्थांचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते. चंदगड मतदारसंघाचे त्यांनी बराच काळ प्रतिनिधीत्व केले. नवमहाराष्ट्र शिक्षण संस्थेचे संस्थापकही होते. दौलतच्या राजकारणानंतर त्यांच्या यशाला उतरती कळा लागली. त्यांच्या निधनाची माहिती समजताच चंदगड शहरासह तालुक्यातील कोवाड व अन्य बाजारपेठा बंद ठेवून त्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images