Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

तरुणांच्या खुनाची चार संशयिताकडून कबुली

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

स्वप्नील राजन पोवार (वय २२, रा. शुक्रवार पेठ) या चांदी कारागिराचे अपहरण आणि खूनप्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी (ता. ५) चार संशयित आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, मयत स्वप्नील पोवार याच्या वडिलांनी चार संशयितांविरोधात लक्ष्मीपुरी पोलिसात फिर्याद दिली त्यानुसार गुन्हा दाखल केला.

शुक्रवार पेठेतील चांदी कारागीर स्वप्नील पोवार याचे रविवारी (ता. २४) अपहरण झाले होते. आंबा घाट येथे त्याचा गळा आवळून खून केल्यांतर त्याचा मृतदेह पाचशे फूट खोल दरीत फेकला होता. जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल देशमुख यांना गुन्ह्याबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर देशमुख यांनी बुधवारी (ता. ३) गिर्यारोहकांना सोबत घेऊन दरीतून मृतदेह बाहेर काढला होता. चांदी कारागिराचा अपहरण आणि खून झाल्याची घटना उघडकीस येताच शहरात खळबळ निर्माण झाली होती. मृतदेह ओळखण्यात स्वप्नीलच्या वडिलांनाही अपयश आल्याने मृतदेहाचे अवयव डीएनए टेस्टसाठी पाठवले होते. दरम्यान, पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांनी पोलिस निरीक्षक देशमुख यांच्याकडे गुन्ह्याची कबुली दिली. देशमुख यांनी पृथ्वीराज उर्फ बबलू गवळी (वय २४, रा. गणेशनगर, शिंगणापूर रोड), सागर दिनकर सोनवणे (वय २४, जवाहरनगर), नितीन बाबुराव गवळी ३२, रा. जवाहरनगर) आणि साई दरबार उर्फ अनिल आकाराम जाधव (२४, कणेरीवाडी, ता. करवीर) या चार संशयितांना लक्ष्मीपुरी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गडहिंग्लज खुनातील संशयित पती ताब्यात

0
0

म.टा.वृत्तसेवा, गडहिंग्लज

आठवडाभरापूर्वी गडहिंग्लज शहरात झालेल्या खूनप्रकरणातील संशयित आरोपी चंद्रकांत दत्तात्रय राऊत (वय ४८, रा.आझाद रोड, गडहिंग्लज, मूळगाव मांगनूर ता.कागल) याला शुक्रवारी सकाळी गडहिंग्लज गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले. राऊत याला शनिवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

शनिवारी (३० जुलै) पत्नी मंगल राऊत हिचा खून करून चंद्रकांत फरारी झाला होता. राहत्या घरी सकाळी आठच्या सुमारास चंद्रकांत याने पत्नी मंगल हिच्यावर धारदार शस्त्राने वार केले होते. त्यानंतर तो फरारी झाला. सुमारे तासाभरानंतर मंगल यांच्या हत्याची घटना उघडकीस आली होती. मात्र खुनाचे कारण समजू शकले नव्हते. चंद्रकांत फरारी असल्याकारणाने त्यानेच पत्नीचा खून केल्याचा संशय व्यक्त होत होता. दरम्यान गडहिंग्लज पोलिस पथकाने शहरातील विविध भागांसह मुंबई, कागल, इचलकरंजी, आजरा, कोल्हापूर येथे नातेवाईकांकडे त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी सर्व शक्यता गृहीत धरून तपास सुरु ठेवला होता.

शुक्रवारी सकाळी खबऱ्याकडून पोलिसांना चंद्रकात हा निपाणी बसस्थानकात आला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गडहिंग्लज पोलिसांनी शोध मोहीम राबविली. यामध्ये निपाणी बसस्थानक, तवंदी घाट येथील हॉटेल गोवावेस तसेच बेळगाव व गोव्याच्यादिशेने जाणाऱ्या गाड्या तपासल्या. यादरम्यान सकाळी सव्वा आठच्या सुमारास कर्नाटक बसमध्ये चंद्रकांत सापडला.

चंद्रकांत व पत्नी मंगल यांच्यामध्ये पंधरा दिवसांपासून अबोला होता. पती-पत्नीमध्ये नेहमी क्षुल्लक कारणावरून भांडण होत असे. मंगल या वारंवार चंद्रकांत यांच्या आईला वाईट बोलत असत. शनिवारी सकाळी भांडण सुरु असताना मंगल यांनी पुन्हा चंद्रकांत याच्या आईला शिवीगाळ केली. याच रागाच्याभरात चंद्रकांत याने कोयत्याने मंगल यांच्यावर वार केले, अशी कबुली चंद्रकांत याने दिली. त्यात मंगल यांचा जागीच मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अलमट्टीतून २.५ लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग

0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली

'कोयना धरणात शुक्रवारी सायंकाळपर्यंत ८० टीएमसीपेक्षा अधिक झाला आहे. लवकरच पाण्याचा विसर्ग सुरु होईल. अशावेळी आलमट्टी धरणाची पातळी कायम ठेवण्याचा आणि सांगलीत पूर येणार नाही, यासाठी जिल्हा प्रशासन चोवीस तास सतर्क आहे. सांगलीकरांना कसलाही त्रास होणार नाही,' अशा प्रकारचे नियोजन केले असल्याचे जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी सांगितले. गायकवाड म्हणाले, कोयना धरणामध्ये दिवसाला पाच टीएमसी पाण्याचा साठा वाढत आहे. त्यामुळे वीजनिर्मितीसाठी १० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग होणार आहे. कोयना आणि आलमट्टी धरण यंत्रणेशी तसेच, कोल्हापूर, सातारा जिल्हा प्रशासनाशी संपर्कात राहून सतत समन्वय ठेवून आहोत.

आलमट्टी धरणाची पातळी स्थिर राहील, याची दक्षता घेत आहोत. आलमट्टी धरणाची शुक्रवारी सकाळची पातळी सुमारे ५१८.७५ एवढी आहे. शनिवारपर्यंत धरणाचे दरवाजे उघडून साधारणत: दीड लाख क्युसेक पाणी सोडण्यात येत होते. शुक्रवारी सकाळी जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनंतर आलमट्टी धरणामधून सध्या २ लाख ४० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. एक ते दीड मीटरने आलमट्टी धरणाची पातळी खाली ठेवण्याचा प्रयत्न राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौरांच्या जातीच्या दाखल्याची फेरपडताळणी

0
0

म.टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापौर अश्विनी रामाणे यांच्या जातीच्या दाखल्यासंदर्भात पुन्हा एकदा पडताळणी करण्याचे आदेश हायकोर्टाने विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीला दिले. जात प्रमाणपत्र पडताळणी स​मितीने रामाणे यांचा कुणबी जातीचा दाखला अवैध ठरविला होता. हायकोर्टात विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने नोंदविलेले मु्द्दे खोडून काढले. सहा आठवड्यात फेर पडताळणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश ​समितीला मिळाल्याने महापौर रामाणे यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने मे महिन्यात महापौर रामाणे यांचा जातीचा दाखला अवैध ठरविला होता. रामाणे यांनी जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या निर्णयाच्या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल करून त्याला स्थ​गिती मिळवली होती. गेले अडीच महिने हायकोर्टात सुनावणी सुरू होती. महापौरांचे वकील अलिन अंतूरकर व तानाजी मातुगडे यांनी दक्षता कमिटीतील अहवाल विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने ग्राह्य धरला नसल्याचे निदर्शनास आणले. जात पडताळणी समितीने ज्या मुद्याच्या आधारे दाखला अवैध ठरविला होता, ते सर्व मुद्दे खोडून काढले. महापौर रामाणे यांच्या जातीच्या दाखल्याच्या अनुषंगाने ग्राह्य मुद्यांची मांडणी झाली. हायकोर्टाने या बाबी विचारात घेत विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीला रामाणे यांच्या दाखल्याची फेरपडताळणी करावी आ​णि सहा आठवड्यात निर्णय घ्यावा असे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाबू, गुळाला वाढली मागणी

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नुकत्याच सुरू झालेल्या श्रावण महिन्यामुळे बाजारामध्ये उपवासाच्या पदार्थांना मागणी वाढली आहे. श्रावण तसेच नागपंचमीच्या सणामुळे साखर, शाबू, गूळ यांच्याबरोबर हरभरा डाळ, काळा वाटाण्याला मागणी वाढली आहे. त्यामुळे बाजारात थोडी तेजीचे वातावरण आहे. भाज्या मात्र गेल्या आठवड्याच्या तुलनेने स्वस्त झाल्या आहेत. पालेभाज्यांची पेंडी तर पाच रुपयांना झाली आहे.

श्रावणामध्ये सणांना प्रारंभ होत असल्याने दोन महिन्यापासून शांत असलेल्या बाजारामध्ये उलाढाल सुरू होईल, अशी अपेक्षा होती. पहिल्या आठवड्यात धान्य बाजारातील दरांमध्ये फारसा फरक पडला नसला तरी उलाढालही शांत वाटत आहे. येथूनपुढील सणांसाठी लागणाऱ्या हरभरा डाळीच्या दरात दहा रुपयांनी घट झाली आहे. शाबू, गूळ, काळा वाटाणा, शेंगदाणा यांची मागणी वाढली असून त्यांच्या दरात थोडी वाढ झालेली आहे.

एकीकडे धान्य व किराणा बाजारात थोडे उत्साहाचे वातावरण आहे. दुसरीकडे भाज्यांच्या मार्केटमध्ये दराची घसरण दिसून येत आहे. दरामध्ये दहा ते वीस रुपयांची घसरण झाली आहे. त्यामध्ये दोडका, भेंडी, गवारी या नि​यमित घेतल्या जाणाऱ्या भाज्यांचा समावेश आहे. पालेभाज्यांची पेंडी पाच रुपयांना झाली आहे. कोथंबिरीची आवक मोठ्या प्रमाणावर झाली असून त्यामुळे पेंडीचा आकारही वाढला आहे.

भाज्यांच्या मार्केटमध्ये सध्या ग्राहकांच्यादृष्टीने समाधानाचे वातावरण असले तरी सणांसाठी व उपवासासाठी साऱ्यांचाच भर असलेल्या फळांचे दर मात्र जैसे थे दिसून येतात. फळांच्या बाजारात सफरचंदच मोठ्या प्रमाणावर आहेत. मात्र त्यांचा एक किलो रुपयांचा दर १८० रुपयांपासून पुढे सुरू होत आहे. तेलांच्या दरात या आठवड्यात काही बदल झालेला नाही. मात्र येथूनपुढे काही दर वाढतील अशी अपेक्षा आहे.

बासमती तांदूळ : २८ ते ४४ रु. किलो

ज्वारी: २२ ते २४ रु. किलो

शाळू ‍: २८ ते ३९ रु. किलो

.....

साखर : ३९ रु. किलो

पोहे : ३८ रु. किलो

मैदा : २६ रु. किलो

वरी : ९० रु. किलो

रवा : २८ रु. किलो

शाबू : ६० रु. किलो

आटा : २६ रु. किलो

चहा : २५० रुपयांपासून

....

वांगी : ६० रु.

टोमॅटो : २० रु.

भेंडी : ४० रु.

दोडका : ४० रु.

ढबू मिरची : ६० रु.

फ्लॉवर : २० रु.

गवार : ६० रु.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इचलकरंजीत १५ टवाळखोरांवर कारवाई

0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

महाविद्यालयीन तरुणींच्या छेडछाडीच्या विरोधात शनिवारी खुद्द अप्पर पोलिस अधिक्षक डॉ. दिनेश बारी व पोलिस उपअधिक्षक विनायक नरळे यांनी कारवाई केली. महाविद्यालय परिसरात टवाळखोरी करत रेंगाळणाऱ्या तरुणांना उठाबशा काढावयास लावल्या. दरम्यान, महिला आणि तरुणींच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी 'दक्ष' नामक अॅप सुरू केले आहे. शिवाय १२ तारखेपासून दामिनी पथकही कार्यरत होत आहे. पोलिसांशी झालेल्या थेट संवादात अनेक विद्यार्थीनींनी दररोज होणाऱ्या त्रासाचा पाढाच वाचला.

शाळा सुरू होण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेत तसेच क्लासेसच्या वेळेत काही टवाळखोर तरुण विद्यार्थीनींची छेडछाड करणे, अश्लिल कमेंट करणे, इशारे करणे, गाडीवरून जवळून जात कर्णकर्कश हॉर्न वाजवणे अशा प्रकारांनी त्रास देतात. या संदर्भात तक्रारी प्राप्त झाल्यानंतर मध्यंतरीच्या काळात पोलिसांनी महाविद्यालय व एस.टी.थांबा परिसरात मोहिम राबविली. परंतु ही कारवाई थांबल्याने अशा प्रकारात पुन्हा वाढ होत चालली आहे. याची गांभिर्याने दखल घेत पोलिसांनी शनिवारी पुन्हा मोहीम हाती घेतली. प्रारंभी पोलिस उपअधीक्षक नरळे यांनी दुचाकीवरून साध्या वेशात विविध महाविद्यालय परिसरात फेरफटका मारला. त्यावेळी ज्यांचा महाविद्यालयाशी संबंध नाही असे अनेक टवाळखोर तसेच अन्य महाविद्यालयातील विद्यार्थी एएससी आणि कन्या महविद्यालय परिसरात घुटमळताना आढळून आले. त्यानंतर नरळे यांनी तातडीने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला पाचारण करून धडक मोहीम राबविली. यावेळी वेगवेगळ्या महाविद्यालयातील १० विद्यार्थी परिसरात घुटमळताना दिसल्याने त्यांना पकडून त्यांना उठाबशा काढावयास लावल्या. त्याचबरोबर मध्यवर्ती बसस्थानक परिसरातही बारी आणि नरळे यांनी विद्यार्थीनींशी संवाद साधला असता विद्यार्थीनींनी बसमध्ये घडणाऱ्या प्रकारांचा पाढाच वाचला. त्याठिकाणीही मोहिम राबवत बसमध्ये छेडछाड करणाऱ्या पाच विद्यार्थ्यांना पकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निसर्गाच्या वज्राघातात कांबळेंचे ‘घर’ उद्ध्वस्थ

0
0

म. टा. वृत्तसेवा, हातकणंगले

जोरदार पावसामुळे सावित्री नदीला महापूर आला आणि त्यात महाडचा पूल वाहून गेला. कोण वाहून गेले याचा थांगपत्ताही लागत नव्हता. तेव्हा कळले की एसटी बसचालक श्रीकांत कांबळे बस घेऊन जाताना बेपत्ता झाले. महाड दुर्घटनेतील ओळख पटणारे एकमेव श्रीकांत कांबळे यांचा मृतदेह सावर्डे (ता. हातकणंगले) येथे आला आणि कुटुंबीयांबरोबर अख्ख्या गावाने आक्रोश केला. एकीकडे पतीनिधनाचे दु:ख पचवत बेपत्ता महेंद्रची वाट पाहणारी आई कमल आणि आईचा चरणस्पर्श करून कामावर गेलेले श्रीकांत यांची आई हिराबाई यांचे दु:ख अतीव होतेच, पण ज्या मुसळधार पावसाने या दोघांना वाहून नेले त्याच मुसळधार पावसाने त्यांचे राहते घर पाडून टाकले. कांबळे यांचा मृतदेह सावर्डेच्या वेशीवर आला आणि त्यांच्या घराचा एकेक भाग पडायला लागला.

संकटे कधी एकटी येत नाहीत, येताना ती संकटांची मालिकाच घेऊन येतात. याचा प्रत्यय हातकणंगले तालुक्यातील सावर्डे गावातील येथील कांबळे कुंटुबीयांना आला. मुसळधार पावसाने त्यांचे घर पडायला लागले. शनिवारी पहाटे मुलगा महेंद्र यांच्यावर अंत्यसंस्कार होतात न होतात तोच मुसळधार पावसाने पुन्हा घराचा आणखी काही भाग पडला. त्यामुळे कुटुंबाचा आसराच गेला.

कांबळे पिता पुत्र एसटीबरोबर सावित्री नदीत वाहून गेल्यानंतर सावर्डे गावावर शोककळा पसरली. कांबळे नोकरीनिमित्त कोकणात राहत असले तरी त्यांची वृद्ध आई घरीच राहत होती. दोन दिवसांपूर्वी कांबळेंवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर महेंद्रवरही अंत्यसंस्कार झाले. हे दोन्ही आघात त्यांच्या कुटुंबावर झाले असताना मुसळधार पावसात त्यांचे राहत्या घराची पडझड झाली आहे. घराचा एक भाग कोसळले असून कुटुंबीय भीतीच्या छायेखाली आहे. कांबळे यांचा मृतदेह गावाच्या वेशीवर आला आणि इकडे त्यांचे राहते घर पडू लागले. एकीकडे बाप लेकांच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांच्या आक्रोशाला सीमाच राहिली नाही. कांबळे यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार होताच त्यांचा वाहून गेलेला मुलगा महेंद्र याच्यावरीही पहाटे अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलगा आणि पती गमावल्यानंतर घराची झालेली अवस्था पाहून कमल यांच्या डोळ्यातील अश्रूच आटले आहेत. त्यांच्या मागे लागलेली संकटांची मालिका पाहून अख्खे सावर्डे गाव हळहळत आहे. सध्या कांबळे कुटुंबीय आणि नातेवाईक शेजाऱ्यांच्या घरात राहत आहेत.

महेंद्रवर पहाटे अंत्यविधी

महाड दुर्घटेनेतील चालक कांबळे यांच्याबरोबर त्यांचा मुलगा महेंद्र याचा मृतदेह शुक्रवारी सापडला त्याचा मृतदेह पहाटे तीन वाजता सावर्डे गावी आणून त्याच्यावर अंत्यविधी करण्यात आले. पती पाठोपाठ मुलग्याचा मृतदेह पाहून कमल यांनी फोडलेल्यान टाहोने अनेकांच्या डोळ्यात महापूर आणूला.

घर दुरुस्त करून घेऊ

'आई मी पुढच्या आठवड्यात येतो, घर चांगले करून घेऊया' असे सांगून गेलेल्या चालक कांबळे यांचा मृतदेह पाहून आई हिराबाई ‌हिला भोवळ आली. 'येतो' म्हणणारा माझा मुलगा कसा येईल? असा सवाल करून हिराबाई यांनी टाहो फोडला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गॅस ग्राहकांची होतेय लूट

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

केंद्र सरकारच्या आदेशानुसार गॅस कनेक्शनची तपासणी करण्यात येत असली तरी ही तपासणी केवळ कागदोपत्रीच आहे. मात्र, तपासणीच्या नावाखाली भारत गॅसकडून ग्राहकांकडून ७५ रुपयांची लूट केली जात आहे. सुरक्षिततेच्यादृ्ष्टीने तपासणी आवश्यक असली तरी तपासणी करणारे कर्मचारी कागदोपत्री तपासणी करून पैसे उकळत असल्याबद्दल ग्राहकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

घरगुती गॅस वापरत असताना अपघात वाढले आहेत. वाढत्या अपघातांना अटकाव करण्यासाठी केंद्र सरकारने घरोघरी जाऊन तपासणी करावी, असा आदेश गॅस कंपन्यांना दिला आहे. त्यानुसार भारत गॅस कंपनीने कर्मचारी घरोघरी जाऊन गॅस सिलिंडरची तपासणी करत आहेत.

भारत गॅस कंपनीकडील नऊ वितरण कंपनीकडे अंदाजे एक लाख ग्राहक आहेत. गॅस सिलिंडरच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने दोन वर्षातून एकवेळ मँडेटरी इन्स्पेक्शन करून घेणे बंधनकारक आहे. त्यानुसार कर्मचारी घरोघरी जाऊन योग्य पद्धतीने शेगडी व गॅसची जोडणी केली आहे का? याची पाहणी करतात. गॅस वाहून नेणारी पाइप खराब असेल तर बदलण्याचा सल्लाही दिला जातो. पण काही गॅस कर्मचारी कागदोपत्री तपासणी करत आहेत. अपार्टमेंट अथवा कॉलनीमध्ये एकाद्या ग्राहकाच्या घरात ग्राहकांना एकत्र येण्यास सांगतात. त्याठिकाणी ग्राहकांकडून फॉर्म भरून घेतात. गॅस सिलिंडरची जुजबी तपासणी करून कंपनीच्या नियमाप्रमाणे ७५ रूपयांची मागणी करतात. काही कर्मचारी तपासणीचा फॉर्म कंपनीकडे गेला नाही तर सिलिंडर मिळणार नाही अशी भीती दाखवतात. त्यामुळे गॅस कंपन्यांचे फावत आहे.

==

सुरक्षिततेच्यादृष्टीने गॅस सिलिंडरची तपासणी करणे हे गॅस कंपन्याचे काम आहेत. त्यासाठी ७५ रुपयांची मागणी केली जाते. पण पावती दिली जात नाही. फॉर्मवर सही झाली की काम संपले असे सांगून पळ काढतात. सुरक्षिततेच्यादृष्टीने स्वयंपाक घरात जाऊन तपासणी करण्याची गरज असताना कागदोपत्री तपासणी केली जात आहे.

अॅड एन.के. तिरवडे, रूईकर कॉलनी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पावसाची उघडीप; नद्या पात्राबाहेरच

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गेल्या काही दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसाने शनिवारी काहीसी उसंत घेतली. मात्र, राधानगरी धरण आणि अन्य नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या संततधार पावसामुळे नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी आल्याने वाहतूक बंद झाली.

विसर्गा वाढल्याने पाणी पातळीत वाढ

इचलकरंजी: आठवडाभर दमदार बरसणाऱ्या पावसाने शनिवारी दिवसभर विश्रांती घेतली. पावसाने उसंत घेतली असली तरी धरणातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे. शहरात शनिवारी पडझडीचे सत्र सुरूच होते. पंचगंगा नदीवरील नवीन पुलाला पडलेले भगदाड केवळ खडी व मुरुम टाकून मुजविण्यात आले. दरम्यान, राधानगरी, चांदोली, कोयना या धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्याने पाण्याच्या पातळीत संथ गतीने वाढ होत चालली आहे. राधानगरी धरणाचे सातही दरवाजे उघडल्याने तेथून प्रतिसेकंद १२ हजार, २००० क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पंचगंगा नदीतील पाण्याची पातळी संथ गतीने वाढत चालली आहे. तर चांदोली धरणातून प्रतिसेकंद १२ हजार क्युसेस आणि कोयना धरणातूनही पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने कृष्णा नदीतील पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. त्याचा फुगवटा पंचगंगा नदीला मोठ्या प्रमाणात जाणवतो.

दरम्यान, शहरात पडझडीचे सत्र आजही सुरु राहिले. प्रांत कार्यालयाच्या आवारातील एक झाड मुळासकट उन्मळून पडले. हे झाड पोर्चवर पडल्याने सुदैवाने कसलीही वित्त वा जिवितहानी झाली नाही. तातडीने हे झाड बाजूला करण्मात आले. तर गणेशनगर परिसरात एका घराची पडझड झाली आहे.

नव्या पुलाला भगदाड

कर्नाटक राज्याशी संपर्क जोडणारा पंचगंगा नदीवरील नवीन पुलाच्या शिरदवाडच्या बाजूला भगदाड पडले होते. हे भगदाड शनिवारी केवळ मुरुम आणि खडी टाकून तात्पुरत्या पध्दतीने मुजविण्यात आले आहे. महाडची घटना ताजी असताना प्रशासनाने केवळ जुजबी मलमपट्टी करुन सोपस्कर पूर्ण केले. या पुलावर खबरदारीचा उपाय म्हणून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

०००००

पावसाची उघडीप, पाणी पातळीत वाढ

कृष्णा ३३ फुटांवर, पंचगंगा इशारा पातळीकडे

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

शिरोळ तालु्नयात शनिवारी दुपारनंतर पावसाने उघडीप दिली. मात्र कोयना, वारणा, राधानगरीसह अन्य धरणातून करण्यात येणाऱ्या विसर्गामुळे कृष्णा, पंचगंगा, वारणा, दूधगंगा नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. अंकली येथे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत अडीच फुटांनी वाढ होऊन पातळी ३२.६ फुटांवर पोहोचली. तर नृसिंहवाडी येथे पंचगंगेचे पाणी दोन फूट वाढले.

शनिवारी दुपारनंतर शिरोळ तालुक्यात पावसाचा जोर ओसरला. मात्र कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात संततधार सुरू असल्याने तसेच धरणातील पाण्याचा विसर्ग यामुळे शिरोळ तालुक्यात नद्यांच्या पातळीत वाढ होत आहे. सायंकाळी पाच वाजता अंकली पुलाजवळ कृष्णा नदीची पाणी पातळी ३२.६ फूट होती. तर पंचगंगा नदीची पातळी तेरवाड बंधाऱ्याजवळ ५८ फूट, शिरोळ बंधाऱ्याजवळ ५४.६ फूट, नृसिंहवाडी येथे ५३ फूट होती. राजापूर बंधाऱ्याजवळ कृष्णा नदीची पातळी ४१.६ फुटांवर पोहोचली. शिरोळ तालुक्यात ४२ मिलीमीटर पाऊस झाला.

अलमट्टीतून विसर्ग वाढवा

शिरोळ तालुक्यात कृष्णा, पंचगंगेला पूर आल्याने नृसिंहवाडीचे श्री दत्त मंदिर चार दिवसापुर्वीच पाण्याखाली गेले आहे. नृसिंहवाडीत ११ ऑगस्ट रोजी कन्यागत महापर्वकाळ सोहळा होत आहे. यामुळे अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवावा अशी मागणी आमदार उल्हास पाटील यांनी केली आहे.

शाहूवाडी: तालुक्याच्या पूर्व भागात आज पावसाने अधून-मधून विश्रांती घेतली.

पश्चिम भागात तुलनेत पावसाचा जोर कायम राहिल्याने कडवी नदीची तर चांदोली धरणातून विक्रमी २१ हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग वारणा नदीपात्रात होत असल्याने या नदीची पाणीपातळी सरसरी दहा फुटाने वाढली आहे. चांदोली धरण क्षेत्रात आजही संततधार पाऊस कोसळत असल्यामुळे आणि धरणातून होणाऱ्या पाण्याच्या विक्रमी विसर्गामुळे सांगली-कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवरील नदीलगतच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. दरम्यान शुक्रवारी रात्रभर झालेल्या धुंवाधार पावसाच्या प्रभावामुळे भोसलेवाडी नजीक कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय मार्गावर नदीचे पाणी आल्याने शनिवारी सकाळी ११ वाजेपर्यंत या मार्गावरील सर्व वाहतूक बंद राहिली. तालुक्यातील कडवी, कासारी, पोटभूगी, व वारणा या सर्व नद्यांचा परिसर पुराने वेढला आहे. जवळी-घोळसवडे या धनगरवाड्यांना जोडणारा साकव गुरुवार पासून पुराच्या पाण्याखाली आहे. अचानक वाढलेल्या वारणा नदीच्या पाण्यामुळे सरूड-सांगाव आंतर जिल्हामार्गावरील वाहतूकही शनिवारी दुपारनंतर बंद झाली आहे.

०००००

म्हसवे बंधारा दुसऱ्यांदा पाण्याखाली

गारगोटी: आज दिवसभर मुसळधार पाऊस सुरू असून वेदगंगा नदी पात्राबाहेर आले असून मिणचे खोऱ्यातील प्रमुख वाहतुकीचा मार्ग असलेला म्हसवे बंधारा दुसऱ्यांदा पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद झाली. या भागातील लोकांना महालवाडी किंवा कूर मार्गे लांबच्या अंतराने ये-जा करावी लागत आहे.

भुदरगड तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर अधिक असून पाटगाव धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस झाला. वेदगंगा नदी पात्राबाहेर आल्याने शेजारील शेतात पाणी साचले आहे.

पन्हाळ्यात जनजीवन विस्कळीत

पन्हाळा : पावसाने तालुक्यात कासारी, कुंभी, धामणी, जांभळी या नद्यांसह सर्वत्र बंधारे भरून वाहत आहे. अनेक मार्गावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. गडावर रविवार पेठ्तील तीन दरवाजा येथून जाणारा रस्ता खचल्याने हा रस्ता सकाळपासून बंद ठेवला. या रस्त्यावर मधोमध मोठी भेग पडल्याने प्रशासनाने याठिकाणी भेट देवून रस्त्यावरील ये-जा बंद ठेवली.

चंदगडला पावसाचा जोर ओसरला

चदगड: तालुक्यात सर्वत्र आज दिवसभर पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. मात्र अधून-मधून मोठ-मोठ्या सरी कोसळत होत्या. त्यामुळे आजही पुरस्थिती जैसे थे आहे. आज सकाळी आठ वाजता झालेल्या २४ तासांत तालुक्यामध्ये सरासरी ६८.६६ मिलीमीटर तर आतापर्यंत १३४१.१६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. अतिवृष्टीमुळे पाच घरांची पडझड होवून ६५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.सर्वांधिक पाऊस चंदगड सर्कलमध्ये ११३ मिलीमीटर झाला आहे. कोवाड येथे सर्वांत कमी 15 मि. मी. झाला आहे.

चंदगड तालुक्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी झांबरे प्रकल्पातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे पूरस्थिती जैसे थे आहे. दिवसभर कोनेवाडी, गवसे, भोगोली, हिंडगाव बंधारे पाण्याखाली राहिले. चंदगड-हेरे मार्गावरील चंदगड पूलही अद्याप पाण्याखाली असल्यामुळे या मार्गावरील गोव्याला जाणारी वाहतूक पाटणे फाटामार्गे वळविण्यात आली आहे.

हेरवाडमध्ये घराची भिंत कोसळल्याने एक ठार

हेरवाड (ता.शिरोळ) येथे घराची भिंत कोसळल्याने पांडूरंग धोंडिबा माने (वय ५१) हे ठार झाले. शनिवारी सकाळी ही दुर्घटना घडली. या घटनेची नोंद कुरूंदवाड पोलिसांत झाली आहे.

माने यांच्या घराची भिंत सकाळी अचानक कोसळली. यावेळी पांडूरंग माने हे घरात झोपले होते. अंगावर भिंत कोसळल्याने ते ठार झाले. या घटनेची वर्दी मुलगा दत्ता माने यांनी पोलिसांना दिली. यानंतर कुरूंदवाड पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. दरम्यान या घटनेचे वृत्त समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीज अभियंत्याचा दमदाटीमुळे राजीनामा

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर महापालिकेतील काही नगरसेवक आणि त्यांच्या नातेवाईकांची प्रशासकीय कामाकाजातील वाढता हस्तक्षेप वादग्रस्त ठरला आहे. नगरसेवकांच्या अरेरावीला कंटाळून सहाय्यक उपायुक्तांनी नोकरीला रामराम ठोकल्याचा प्रकार ताजा असतानाच शिवाजी पेठेतील नगरसेविकेच्या मुलाच्या दमदाटीला वैतागून सहायक वीज अभियंता अमित दळवी यांनी राजीनामा दिला आहे. या प्रकाराने नगरसेवकांच्या नातेवाईकांचा महापालिकेतील हस्तक्षेप पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

दळवी ठोक मानधनावर नोकरीत होते. शिवाजी पेठेतील नगरसेविकेच्या मुलाने महापालिका चौकातच दळवी यांना अडविले. प्रभागातील वीज कामाची पूर्तता केली नसल्याच्या कारणावरून दमदाटी केली. त्यावेळी दळवी यांनी लाइट विभागाकडे कर्मचारी कमी आहेत, प्रत्येक ​प्रभागातील कामाची दुरूस्ती करायची असते. यामुळे विलंब झाल्याचे सांगितले. तरीही संतापून दळवी यांना शिवीगाळ व दमदाटी केली. हा प्रकार सुरू असताना महापालिकेतील शहर बांधकाम विभागाशी निगडीत अधिकाऱ्याने यामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्या अधिकाऱ्यालाही यावेळी शिवीगाळ झाल्याचे वृत्त आहे. दमदाटी करणारा हा तरूण कार्यकर्ता माजी नगरसेवक आहे. यंदा प्रभागातील आरक्षण बदलल्यामुळे त्यांच्या आई महापालिकेत प्रतिनिधीत्व करत आहे. या दमदाटीला कंटाळून दळवी यांनी राजीनामा दिला. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचा मोबाइल स्वीच ऑफ असल्याने संपर्क होऊ शकला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोकणचा संपर्क तुटला

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सावित्री नदी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शिवाजी पुलावरील वाहतूक बंद ठेवली आहे. परिणामी आसपासच्या गावांतील नागरिकांची पायपीट वाढली आहे. आरोग्य सुविधा, भाजीपाला विक्रेते, लहान सहान व्यवसाय करणारे व नोकरदारांना कोल्हापूर गाठण्यासाठी मोठा फेरा पूर्ण करावा लागत आहे. वडगणे, आंबेवाडी येथील नागरिक आठ-दहा किलोमीटरचे अंतर पास केले की, कोल्हापुरात प्रवेश करायचे. मात्र, आता त्यांना शिये भुये, तावडे हॉटेल ते कोल्हापूर असा उलटा प्रवास करण्यासाठी २७ किलोमीटरपर्यंत फेरा करावा लागत आहे. पूर्वीच्या दहा रुपये खर्चाऐवजी आता त्याच प्रवासाकरिता ५० रुपये मोजावे लागत आहेत.

वडणगे, आंबेवाडी, प्रयाग चिखली येथील हजारो नागरिक रोज हॉस्पिटल, शिक्षण, नोकरी, भाजीपाला व्यवसाय, नोकरीसाठी कोल्हापूरला ये-जा करतात. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून शिवाजी पुलावरील वाहतूक पूर्णतः बंद केल्याने स्थानिक नागरिकांची गोची झाली आहे. शिवाजी पुलाकडील पेट्रोल पंप ते पोवार पाणंदमार्गे वडणगेकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी पसरले आहे. वडणगे येथील नागरिक आंबेवाडीमार्गे पेट्रोल पंपापर्यंत येतात. तेथून चालत तोरस्कर चौक, गंगावेशपर्यंत पायपीट करावी लागते.

वडणगे येथील संतोष भोसले म्हणाले, 'वाहतूक बंदमुळे आता वडणगे, निगवे, जठारवाडी, शिये भुये, तावडे हॉटेलमार्गे कोल्हापूरपर्यंत प्रवास करावा लागतो. एरव्ही गंगावेश ते वडणगेपर्यंत दहा रुपये प्रवास खर्च व्हायचा, आता पर्यायी मार्गासाठी ५० रुपये खर्च करावे लागतात. २७ किलोमीटरचा प्रवास करावा लागतो.' संदीप देवणे हे मेडिकल चालवितात. पोवार पाणंद मार्गावर पाणी आल्याने आंबेवाडीमार्गे पेट्रोल पंपापर्यंत आणि तेथून शिवाजी पुलापर्यंत पायी असा वळसा घालून प्रवास करावा लागत आहे. प्रशासनाने दुचाकी वाहनांना पुलावरून वाहतुकीस परवानगी द्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

भराव टाकून बांधकाम

शिवाजी पुलाकडील क्षेत्र शेतीचे आहे. नदीला पूर आला की या भागात पाणी पसरते. पोवार मळा पाणंद ते वडणगे रस्त्यावरही पाणी पसरते. पुराच्या कालावधीत हा रस्ता बंद असतो. पंचगंगा नदीपात्रातील पाणी शेतात पसरून पिके पाण्याखाली आली आहेत. गेल्या काही वर्षात या भागात मोठ्या प्रमाणात बांधकामे झाली आहेत. पेट्रोलपंप, मंगल कार्यालय, हॉटेल, धाबा, गॅरेज सुरू करताना मोठ्या प्रमाणात भराव टाकला आहे. भराव टाकून पाण्याचा निचरा होण्याची जागा संपुष्टात आणली आहे. वडगणे रोड, आंबेवाडी येथे हे चित्र नजरेस पडते. पोवार मळा पाणंद मार्ग ते वडणगे रोडवर ठिकठिकाणी अपार्टमेंट, बंगले उभे राहत आहेत. खासगी मालकीच्या जागेत भराव टाकून बांधकामे सुरू आहेत. शिवाजी पूल ते वडणगे फाट्यापर्यंतच्या गॅरेजभोवती, शेतात पाणी पसरले आहे. प्रयाग चिखली रोडवरही भराव टाकून बांधकामे सुरू आहेत.

दुरवस्था शिवाजी पुलाची

सावित्री नदी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पंचगंगा नदीच्या पुलाच्या असुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पुलाच्या भिंतीवर झाडेझुडपे उगवली असून दगड निखळण्याच्या अवस्थेत आहेत. भिंतींना तडे गेले आहेत. त्यामुळे एकंदरीत पूल धोकादायक बनल्याने प्रशासनाने पूल वाहतुकीस बंद केला आहे.

शिवाजी पूल वाहतुकीला बंद केल्यामुळे आसपासच्या गावांतील नागरिकांची गैरसोय होत आहे. प्रशासनाने नव्या पुलाचे काम तत्काळ मार्गी लावावे. आंबेवाडी, वडणगे, प्रयाग चिखली गावांसाठी पर्यायी मार्ग हा खर्चिक व गैरसोयीचा आहे. शिवाजी पुलावरून अवजड वाहतूक बंद ठेवावी. मात्र, दुचाकी, चारचाकी वाहंनाना प्रवेश द्यावा. -व्ही. बी. पाटील, उद्योगपती

चिखलीच्या पर्यायी मार्गावरही पाणी

प्रयाग चिखली, आंबेवाडी, शिवाजी पूल ते कोल्हापूर हा नियमित मार्ग बंद झाला आहे. शिवाजी पुलाकडील पेट्रोल पंपापर्यंत दुचाकी घेऊन यायचे, तेथून चालत कोल्हापूरपर्यंत यावे लागते. रिक्षासाठी पैसे मोजणे सामान्यांना परवडत नाही. शिवाजी पुलावरील वाहतूक बंद आहे. त्याला प्रयाग चिखली, वरणगे पाडळी, खुपिरे, साबळेवाडी, बालिंगा असा पर्यायी मार्ग आहे. पर्यायी मार्गावरही काही ठिकाणी पाणी आल्याने सुरळीत वाहतूक नसल्याचे कुंडलिक चव्हाण व रोहित पाटील यांनी निदर्शनास आणले. सनी कराडे या दुकानदारानेही पूल वाहतुकीसाठी बंद केल्याने नागरिकांच्या गैरसोयीत भर पडल्याचे सांगितले.

नागरिकांना काय वाटते...

>अवजड वाहनांना वाहतुकीस मनाई करावी >दुचाकी व चारचाकी वाहनासाठी वाहतूक सुरू ठेवावी >पेट्रोल पंप ते नदी पलीकडील गावांसाठी बसवाहतूक सुरू ठेवावी >गावातील भाजीपाला विक्रीसाठी बाहेर पाठविण्यात अडचणी >मेथी, कोथिंबीरच्या पेंडीची कमी दराने विक्रीमुळे नुकसान

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचगंगेने धोका पातळी ओलांडली

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आठवडाभरापासून झोडपून काढणाऱ्या पावसाने शनिवारी दिवसभर शहर परिसरात उघडीप दिली असली तरी धरणांतून सुरू असलेल्या विसर्गामुळे पंचगंगा नदीने सायंकाळी ४३ फुटाची धोका पातळी ओलांडली. त्याचबरोबर वारणा धरणातील विसर्ग वाढवण्यात आल्याने महापुराचा धोका आणखी वाढला आहे. पाऊस व सुरू असलेल्या पडझडीमुळे जिल्हा प्रशासनाने हाय अलर्ट जारी केला आहे. एनडीआरएफची २० जवानांची टीम बोटीसह रात्री दाखल झाली. पावसामुळे पन्हाळ्यावरुन संजीवन कॉलेजकडे जाणारा खचला. पंचगंगेच्या महापुराचे पाणी नागरी वस्तीत शिरायला सुरुवात झाली असून पातळी आणखी वाढल्यास मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करावे लागणार आहे. दरम्यान, हेरवाड (ता. शिरोळ) मध्ये भिंत कोसळून पांडुरंग धोंडीबा माने हे ठार झाले.

पुरामुळे जिल्ह्यातील ७१४ गावांना फटका बसला आहे. आठ हजारावर नागरिकांना त्याच्या झळा बसत आहेत. दहा घरे पूर्ण कोसळली असून १३७५ नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत आठ तालुक्यांत अतिवृष्टी झाली आहे. रत्नागिरी, गगनबावडाबरोबर २४ राज्य व प्रमुख जिल्हा मार्ग बंद झाले आहेत. ८२ बंधारे पाण्याखाली आहेत. शुक्रवारी रात्री राजारामपुरीत कोसळलेल्या भिंतीखाली सापडून आठजण जखमी झाले. तर अंबाबाई मंदिराजवळील शुक्रवारी कोसळलेल्या घराजवळील गिरीगोसावी यांचे धोकादायक बांधकाम शनिवारी उतरवण्यात आले. पन्हाळ्यावर सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे संजीवनी कॉलेजकडे जाणारा रस्ता दुपारी खचला.

पंचगंगेचा पूर वाढण्यास कारणीभूत असलेल्या राधानगरी धरणाचे सातही स्वयंचलित दरवाजे सकाळी सात वाजेपर्यंत सुरु होते. २०११ नंतर प्रथमच सातही दरवाजे उघडले होते. अकरा वाजता त्यातील दोन दरवाजे बंद झाले असले तरी उर्वरित पाच दरवाजे सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरू होते. त्यातून १२ हजार क्युसेक्स विसर्ग सुरू होता. मात्र कासारी, कुंभी धरणातूनही विसर्ग सुरू असल्याने पंचगंगेने सायंकाळी सहा वाजता ४३ फुटाची धोका पातळी गाठली.

शहरात पाऊस सुरू नसला तरी धरण क्षेत्रात जोरदार सुरू असल्याने शहर परिसरातील पुराची पातळी वाढतच चालली होती. महाडच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली. पण वाढत चाललेल्या पुरामुळे आंबेवाडी ते केर्ली दरम्यान रेडेडोहचे पाणी रस्त्यावर आले. कसबा बावडा ते शिये दरम्यानच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी आल्याने हा रस्ताही बंद झाला. पंचगंगेजवळ जामदार क्लबच्याही पुढे पुराचे पाणी आले.

लक्ष्मीपुरीतील सुतारवाडा, शुक्रवार पेठ, रमणमळा तसेच कदमवाडी परिसरात पाणी दाखल झाले आहे. सुतारवाड्यातील काही कुटुंबांना शुक्रवारीच हलवले असून पातळी वाढतच राहिली तर आणखी काही कुटुंबाना स्थलांतरीत करण्याची सज्जता महापालिकेने ठेवली आहे. वारणा धरणातूनही २१ हजार क्युसेक्सपर्यंत पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्याने कृष्णा नदीचा पूर वाढणार आहे. यामुळे पंचगंगेचे पाणी लवकर ओसरण्याची शक्यता कमी आहे. त्याचा मोठा फटका शिरोळ तालुक्याला बसणार आहे.

शिवाजी पुलाचे स्ट्रक्चरल ऑडीट नाही

शिवाजी पुलावरील वाहतूक बंद केली असली तरी या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडीट झाले की नाही याबाबतची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडे उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेचे दिलीप देसाई यांनी माहितीच्या अधिकाराखाली उपलब्ध केलेल्या माहितीत ही बाब स्पष्ट झाली आहे. रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील पंचगंगा नदीवरील शिवाजी पूल १३७ वर्षाचा आहे. महाडच्या दुर्घटनेनंतर शिवाजी पुलाच्या सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. राजाराम बंधाऱ्याने ३९ फूट इशारा पातळी गाठल्यावर जिल्हा प्रशासनाने शिवाजी पुलावरील वाहतूक बंद केली आहे. या पार्श्वभूमीवर गुरूवारी दिलीप देसाई यांनी पुलासंदर्भात माहिती मागितली होती. पुलाच्या आयुष्यमानासंबंधित ब्रिटीश सरकार अथवा त्यांच्या संबधित कंपनीने केंद्र व राज्य सरकारकडे कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार कार्यालयाकडे उपलब्ध नसल्याची माहितीही दिली आहे. पुलाचा भक्कमपणा सिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेले स्ट्रक्चरल ऑडीट झाल्याची कागदपत्रे मिळत नसल्याचे महत्वाचे पत्र राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उप अभियंता बी.बी. माने यांनी पत्र दिले आहे.


१२ हजार राधानगरीतून विसर्ग

२६ हजार पाचशे चांदोली धरणातून विसर्ग

६ हजार क्युसेक्स कोयना धरणातून आजपासून विसर्ग


पाणी पातळी (फुटांत)

राजाराम बंधारा ४३.६

नृसिंहवाडी ५३.९

अंकली ३३.५३



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शुशीलकुमार शिंदे, शरद पवारांनाकसा सोडेन

0
0


म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर

'आपल्या राजकीय कारकिर्दीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि कॉँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या विरोधात निवडणूक लढविल्यावर काय होते, ते आपण भोगले आहे. त्यामुळे आता मी त्यांना कसे सोडेन,' असा थेट इशारा सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी पंढरपूर येथील भाजप कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना दिला.

सुभाष देशमुख म्हणाले, 'माढा लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या विरोधात तर सोलापूरमधून शिंदे यांच्या विरोधात निवडणूक लढविली होती. यानंतर माझ्या बाबत सुडाचे राजकारण झाले. त्यानंतर होणारा सर्व त्रास भोगला, मग आता मी कसा त्यांना सोडेन. '

जिल्ह्यातील सहकार सम्राटांकडून भाजप कार्यकर्त्यांना सुडाची वागणूक मिळाली, तर मी त्यांना बघून घेईन. सहकारातील पूर्वीच्या मंडळींनी बट्ट्याबोळ केल्यानेच मुख्यमंत्र्यांनी आपल्याला ही जबाबदारी दिली आहे. सहकाराला समृद्धीकडे नेण्यास त्यांनी सांगितले आहे, असेही ते म्हणाले. ज्यांनी गैरप्रकार केले आहेत त्यांच्यावर कडक कारवाईचे संकेतही देशमुख यांनी या वेळी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाईत गारुड्यांवर कारवाई

0
0

सातारा

वाई येथील गंगापुरी भागात नागाला दूध पाजण्यासाठी दोन गारुडी महिलांकडून पैसे घेत असल्याची माहिती मिळताच काही सर्पमित्र तत्काळ घटनास्थळी धावले. त्यांनी बंदिस्त टोपली उघडून त्यात जीवंत नाग असल्याची खात्री करून वन विभागाला माहिती दिली.

नागाला चावण्यासाठी तोंड उघडता येऊ नये, म्हणून त्याचे तोंड दोन्ही बाजूने शिवण्यात आले होते. हा विकृत प्रकार पाहून सर्पमित्रांनी कायद्यावर बोट ठेवून आक्रमक भूमिका घेतली. त्यांच्या तक्रारी नंतर नागासह गारुड्यांची वन विभागाच्या कार्यालयात रवानगी झाली. या प्रकरणी गारुड्यांवर कारवाई करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाईचा महागणपती पाण्यात

0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा

सातारा शहरात संततधार पाऊस सुरू आहे. महाबळेश्वरात मुसळधार पाऊस कायम असून, १०७ मिमी पाऊस झाला आहे. वाईच्या महागणती मंदिरात दोन फूट पाणी साचून आहे. दरम्यान, पावसामुळे भिंत कोसळून लीलावती वामन जरग (५०) ही महिला ठार झाल्याची घटना विसापूर (ता. खटाव) घडली आहे. या घटनेत तिचा पती वामन केरू जरग (वय ५५) गंभीर जखमी झाला आहे. पावसामुळे भिंत पडून ढिगाऱ्याखाली ते सापडले होते.

तीन वर्षांनंतर प्रथमच कृष्णामाई दुथडी भरून वाहू लागली आहे. सातारा जिल्ह्यातील सात धरणांमधून जवळपास पाऊण लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने साताऱ्याच्या स्मशानभूमीतही पाणी शिरले आहे. वाईचे महागपती मंदिर दोन फूट पाण्यात असून, मंदिरासमोरील पूलही पाण्याखाली गेला आहे. यामुळे वाई शहरातील सर्व वाहतूक जुन्या ब्रिटिशकालीन पुलावरून सुरू आहे. धोम-बलकवडी धरणातून दहा हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले असून, कृष्णा नदीतील सर्व जलपर्णीही वाहून गेली आहे.

दरम्यान, सातारा शहर परिसरात सरीवर सरी येणे सुरुच असून, या पावसाने थंडी आणि गारठ्यात प्रचंड वाढ झाली आहे. शहरात आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे.

१६० गावांत हाय अलर्ट

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात धुवाँधार पाऊस सुरूच असून, जिल्ह्यातील कोयना, धोम, कण्हेर, उरमोडी, तारळी, वीर, मोरणा-गुरेघर या धरणांतून मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात आहे. त्यामुळे सर्वच नद्यांच्या काठावर पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या १६० गावांमध्ये हाय अलर्ट जारी केला आहे. महाबळेश्वर तसेच फलटण तालुक्यातील काही गावांमधील सुमारे ८० नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सैन्यात नोकरीच्या आमिषाने फसगत

0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

सैन्य दलात नोकरीचे आमिष दाखवून अठरा ते वीस तरूणांकडून सुमारे ऐंशी लाखाहून अधिक रूपये घेऊन एका ठकसेनाने पोबारा केला आहे. तरूणांकडून प्रत्येकी साडेचार लाख रूपये घेवूनच या ठकसेनाने नियुक्तीपत्र दिले आहे. या ठकसेनाचे नाव विठ्ठल नायकर (निवृत्त आर्मी कॅप्टन सुभेदार) असल्याचे तरूणांकडून सांगण्यात आले. त्याच्या जाळ्यात पुरते अडकल्याने तरूणांनी गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्याचा दरवाजा ठोठावला आहे. पोलिसांनी तरूणांचा अर्ज घेऊन चौकशी सुरू केली आहे. फसवणूक झालेले तरूण महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागातील आहेत.

फसगत झालेल्या तरूणांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उजळाईवाडी (ता.करवीर) येथे नायकर याने आर्मी कोचिंग अॅकॅडमीची स्थापना केली आहे. अॅकॅडमीच्या आकर्षक छपाई केलेल्या माहिती पत्रकाद्वारे तरूणांना भुरळ घातली. या माहिती पत्रकात इंडियन आर्मी, बी.एस.एफ., सी.आर.पी.एफ., सी.आय.एस.एफ.,आय.टी.बी.पी.,टि.ए.(आर्मी), पोलिस, एम.एस.आर.पी.,पोलिस के.एस.आर.पी., इंडिएन नेव्ही, एअर फोर्स, एस.एस.सी.,एस.एस.बी., रेल्वे डिपार्टमेंट आदी ठिकाणी प्रशिक्षण देवून नोकर भरती केली जाईल. अॅकॅडमीमध्ये प्रवेश घेतलेल्या तरूणांना सर्व सोयी देण्यात येतील. संपूर्ण भारतात कोठेही भरती असल्यास तेथे पाठविण्याची व्यवस्था केली जाईल, असे म्हटले होते. अशा आकर्षक जाहिरातबाजीला कित्येक तरूण बळी पडले आहेत.

उजळाईवाडी येथील कार्यालयात नायकर यांच्याबरोबर त्यांचे मेव्हुणे मंजुनाथ हे कार्यालयीन कामकाज पाहात होते. जबलपुर इंडियन आर्मी स्टेशन येथील हॉल तिकीट(अॅडमिट कार्ड) देवून तरूणांना परिक्षेस बसविले होते. ही परीक्षा १९ मे २०१६ रोजी झाली. त्यानंतर महाराष्ट्र, कर्नाटक सीमाभागातील अठरा ते वीस तरूणांना फोन करून तुमचे नियुक्तीपत्र आले आहे, ते घेऊन जाण्याबाबत फोनवरून त्यांच्याशी संपर्क साधला. हे नियुक्ती पत्र उजळाईवाडी येथील कार्यालयातून घेऊन जाण्याविषयी सांगण्यात आले. यावेळी साडेचार लाख रूपये देऊन नियुक्तीपत्र घेऊन जाण्याबाबत नायकर यांनी सांगितले. अनेकांनी कर्ज काढून ही रक्कम दिली व नियुक्ती पत्र घेतले. संबंधित पत्र घेवून नायकर हे सर्व तरूणांना घेवून जबलपूर इंडियन आर्मी येथे पोहचले. तिथे गेटमधून तरूणांना आत सोडून नायकर पसार झाले. आत गेल्यानंतर तेथील अधिकाऱ्यांनी चौकशी केली. आपण का आला आहात, असे विचारले. तरूणांनी हातातील नियुक्ती पत्र अधिकाऱ्यांच्या हातात ठेवले. अधिकाऱ्यांनी पत्र पाहताच फसगत झाली असल्याचे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पारगडचा संपर्क तुटला

0
0

म.टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गेले चार दिवस सुरू असलेल्या पावसाने रविवारी थोडी उसंत घेतली. मात्र धरणातील विसर्गामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.चंदगड तालुक्यातील नामखोलजवळ दरड कोसळल्याने पारगड व चंदगडचा संपर्क तुटला आहे. तर इचलकरंजीत पंचगंगेने इशारा पातळी ओलांडली आहे.

पारगडचा संपर्क तुटला

चंदगड

चंदगड-पारगड मार्गावर नामखोल जवळ दरड कोसळल्याने पारगड व इसापूरचा संपर्क तुटला आहे. शनिवारी रात्री ही घटना घडली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेनंतर आपत्ती व्यवस्थापनच्या टीमने घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहीती मिळताच प्रांताधिकारी संगीता चौगुले यांनी घटनास्थळी भेट दिली. पोकलॅनच्या सहाय्याने मार्गातील माती व दगड काढण्याचा प्रयत्न सुरु आहे.

चंदगड तालुक्यातील पारगड परिसरात मोठ्या प्रमाणात जंगल भाग असल्यामुळे दरवर्षी चार हजार मिलीमीटर पाऊस पडतो. पाऊस व धुक्याचा या भागात नेहमी खेळ सुरु असतो. पारगडकडे जाणारा रस्ता हा डोंगराचा भागातून जात असल्यामुळे अनेक ठिकाणी धोकादायक स्थितीत आहे. या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने ही दरड कोसळली आहे. गेले चार दिवस तालुक्यात पावसाची संततधार सुरुच असून या भागात इतर तालुक्याच्या तुलनेत दुप्पट पाऊस पडतो. शनिवारी रात्री घडलेल्या घटनेमुळे मोठ्या प्रमाणात दगड व चिखलाचे साम्राज्य रस्त्यावर पसरले आहे. घटना घडल्यानंतर सकाळी प्रांताधिकारी संगीता चौगुले, चंदगडचे नायब तहसिलदार आर. टी. झाजरी यांनी घटनास्थळी भेट देवून रस्ता वाहतुकीला खुला करण्याच्या दृष्टीने उपयोजना केल्या. आपत्ती व्यवस्थापन टीम व सार्वजनिक बांधकाम विभाग विभागाच्या सहकार्याने प्रारंभी जेसीबीच्या सहाय्याने माती व दगड हटविण्याचा प्रयत्न झाला. हे प्रयत्न कमी पडत असल्यामुळे शेवटी पोकलॅनच्या सहाय्याने कोसळलेली दरड हटविण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. मात्र या परिसरात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. आपत्ती व्यवस्थापनमध्ये मंडळ अधिकारी पी. एस. खरात, राजेश तोतवाड, राजेश अक्कुलवाड यांनी मदतकार्य केले. यावेळी बांधकाम विभागाचे शाखा अभियंत्ता श्री. संकपाळ, सरपंच विद्याधर बाणे, पोलिस पाटील घटनास्थळी उपस्थित होते. सायंकाळ झाल्याने काम बंद केले असून सोमवारी सकाळी दोन पोकलँडच्या सहाय्याने पुन्हा काम सुरु करण्यात येणार असल्याचे आपत्ती विभागाने सांगितले.

.........

पंचगंगेने इशारा पातळी ओलांडली

इचलकरंजी

सलग दोन दिवस पावसाने उघडीप दिली असली तरी राधानगरी चांदोली आणि कोयना धरणातून होणाऱ्या मोठ्या प्रमाणात पाण्याच्या विसर्गामुळे इचलकरंजीतील पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडून धोक्याच्या दिशेने आपली वाटचाल कायम ठेवली आहे. प्रशासनाने नदी काठावरील पूरबाधित नागरिकांना स्थलांतरित करण्यास सुरुवात केली आहे.

गेल्या आठवडयापासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने धरणे तुडूंब भरली आहेत. सर्वच धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्याने इचलकरंजीत पंचगंगा नदीला दुसऱ्यांदा पूर आला आहे. पुराचे पाणी नदी काठावरील शेतात पसरले असून परिसर पाण्याने व्यापला आहे. येथील पंचगंगा नदीची इशारा पातळी ६८ फूट असून धोका पातळी ७१ फूट आहे. रविवारी पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलंडल्याने प्रशासनाने नागरिकांचे स्थलांतर करण्यास प्रारंभ केला. दरम्यान, नदीकाठी आपतकालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनाने यंत्रणा सज्ज ठेवली आहे.

....

राशिवडेत घराची भिंत कोसळली

राधानगरी

राशिवडे (ता.राधानगरी) येथील चांदे रोडवरील आंब्याचा हाळ वसाहतीमधील दयानंद भिकाजी कांबळे यांच्या राहत्या घराची भिंत मुसळधार पावसामुळे पहाटे तीनच्या दरम्यान कोसळली. यामध्ये तिजोरीसह प्रापंचिक साहीत्याचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. भिंत बाहेरील बाजूस पडल्याने जीवितहानी टळली. कांबळे यांचे चांदे रोडवर घर आहे. रविवारी पहाटे तीनच्या सुमारास संततधार पाऊस व सुसाट सुटलेल्या वाऱ्यामुळे घराची भिंत बाहेरील बाजूस कोसळली. स्वयंपाकघरामधील कौटुंबिक साहीत्यासह तिजोरी, कपडे, भांडी असे मिळून सुमारे अडीच लाखाचे नुकसान झाले.

....

गडहिंग्लजला उघडीप

गडहिंग्लज

गडहिंग्लज शहर व परिसरात रविवार सकाळपासून पावसाने उघडीप दिली. मात्र चित्री-आंबोली व आजरा परिसरातील मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे हिरण्यकेशी नदी दुथडी भरून वाहत आहे. तालुक्यातील नांगनूर, जरळी, निलजी व ऐनापूर बंधारे पाण्याखाली आले असून या मार्गावरील वाहतूक बंद आहे.

गडहिंग्लज तालुक्यात आज दिवसभरात ११ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून आजअखेर ४४०० म्हणजेच सरासरी ६२८ पावसाची नोंद झाली आहे. चित्री परिसरात शनिवारी दिवसभरात १०४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून चित्री मध्यम प्रकल्पात ४४.५५२ दलघमी म्हणजेच ८३ टक्के पाणीसाठा झाला. दरम्यान शनिवारी दिवसभरात तालुक्यात नेसरी विभागात सर्वाधिक म्हणजे ३७ मिलीमीटर तर नूल विभागात सर्वात कमी पाउस झाला. तालुक्यातील सर्व सात लघु पाठबंधारे तलावात चांगला पाणीसाठ झाला असून नरेवाडी बंधारा शंभर टक्के भरला आहे. तर करंबळी तलावात सर्वाधिक कमी म्हणजेच ३७ टक्के पाणीसाठा आहे.


वेदगंगेवरील बंधारे पाण्याखालीच

कागल

गेले चार-पाच दिवस सुरु असलेल्या मुसळधार पावसाने रविवारी उसंत घेतली. परंतु नदीच्या पाणी पातळीत फारसा बदल झालेला नाही. रविवारीही तालुक्यातील वेदगंगा नदीवरील बंधारे पाण्याखालीच राहीले. बानगे येथील मोठ्या पुलावर नसले तरी बाजूच्या रस्त्यावर पाणी आल्याने या मार्गावरीलही वाहतूक ठप्प झाली. अजूनही तालुक्यातील वेदगंगा,दुधगंगा आणि चिकोत्रा नदीकाठची शेकडो एकर पिके पाण्याखालीच राहीली. रविवारी कागल शहरात ९ मिमी,मुरगूड १० मिमी,बिद्री ३३ मिमी,सिध्दनेर्ली ७ मिमी,केनवडे ९.४ मिमी,कापशी १६ मिमी आणि खडकेवाडा १४ मिमी पावसाची नोंद झाली. तालुक्यात एकून ६७ घरांची पडझड झाल्याची नोंद आहे. तर चार लाख ७९ हजार ५५० रुपयांचे नुकसान झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राखीने गुंफला नवनिर्मितीचा धागा

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बहिण भावाच्या निर्व्याज्ज नात्याला दरवर्षी दृढ करणाऱ्या राखीच्या धाग्यासोबत शनिवारी नवनिर्मितीच्या आनंदाचेही धागे गुंफण्यात आले. 'महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब' आणि हॉटेल के ट्री यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या 'राखी बनवा' कार्यशाळेच्या निमित्ताने स्वत: राखी बनवल्याचे समाधान महिलांनी अनुभवले. राखी आर्टिस्ट राधिका पाटील यांनी या कार्यशाळेत राख्या बनवण्याबरोबरच राखीनिर्मितीचा लघुउद्योग करण्याची इच्छा असलेल्या महिलांनाही मार्गदर्शन केले. ​शिवाजी पार्क येथील हॉटेल के ट्री येथे ही कार्यशाळा झाली.

भाऊबहिणीच्या नात्याचे बंध दृढ करणारा रक्षाबंधन हा सण श्रावणाची ओळख. पंधरा दिवसावर आलेल्या रक्षाबंधनसाठी खास राखीची खरेदी हा प्रत्येक बहिणीसाठी आवडता सोहळा. बाजारातील लाखो राख्यांमधून भावासाठी राखी निवडताना बहिणीच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद असतो. पण हीच राखी जर बहिणीने स्वत:च्या हातांनी बनवली तर त्या राखीमध्ये भावनेचे धागे गुंफले जातात आणि तो आनंद दि्वीगुणित होतो. असा अनोखा आनंद 'महाराष्ट्र टाइम्स'च्या 'कल्चर क्लब'च्या सदस्यांना मिळाला.

गोंड्यापासून चमकणाऱ्या खड्यांपर्यंत विविध प्रकारच्या राख्यांनी सध्या बाजारपेठ सजली आहे. मात्र रेडिमेडच्या जमान्यातही निर्मितीतून मिळणारा आनंद शोधणाऱ्या महिलांना राखी बनवत नवनिर्मितीची अनुभूती मिळाली. अशा कलासक्त आणि निर्मितीचे कौशल्य हवेहवेसे वाटणाऱ्यांना मटा कल्चरक्लबच्या व्यासपीठावर राख्या बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. या कार्यशाळेत १५ प्रकारच्या विविध राख्या कशा बनवायच्या हे शिकवण्यात आले. तसेच पाच राख्यांचे साहित्य देण्यात आले, ज्याद्वारे सहभागी महिला घरी राख्या तयार करू शकतात. राखीसाठी कापडी फुले, मणी, मोती, धागे, बेगडी कागद अशा साहित्याला एकत्रितरित्या कलात्मकपद्धतीने कसे गुंफायचे याची माहिती या कार्यशाळेत देण्यात आली.

कार्यशाळेत शिकवण्यात आलेल्या पाच राख्यांसाठी आवश्यक असलेले साहित्य सहभागी महिलांना देण्यात आले. विशिष्ट साहित्याचा वापर करून वेगवेगळ्या प्रकारे राखी कशी बनवता येईल, याविषयी माहिती देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणातील माहितीच्या आधारे राखी बनवण्याचा लघुद्योग करण्याची इच्छा असलेल्या महिलांनाही मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

राखीपौर्णिमा हा आपला सांस्कृतिक उत्सव आहे. यानिमित्ताने कलात्मकताही जपता येते हा दृष्टिकोन या कार्यशाळेच्या आयोजनातील महत्त्वाचा भाग होता. राख्या बनवताना कल्पकता वापरून निर्मितीचा आनंद मिळतो. महाराष्ट्र टाइम्सच्यावतीने या कार्यशाळेतून काही महिलांनी राख्या बनवण्याचा उद्योग सुरू केला तरी या उपक्रमाचे सार्थक होईल असे वाटते.

- राधिका पाटील, मार्गदर्शिका

आजपर्यंत बाजारातून राखी आणत होते. पण स्वत: राखी बनवण्यात किती आनंद असतो हे या कार्यशाळेतून कळाले. आपण बनवलेली राखी ही भावनाच खूप बोलकी आहे. मोती, मणी, धागे, टिकल्या अशा साहित्यासोबत केवळ कल्पकता वापरून आपल्यातील कलाकाराचे भान आले.
- ऐश्वर्या सूर्यवंशी, सहभागी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाघापूर येथील यात्रेला लाखो भाविकांची उपस्थिती

0
0

म. टा. वृत्तसेवा,गारगोटी

महाराष्ट्र कर्नाटकासह लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या नागदैवत श्री. जोतिर्लिंग देवाची यात्रा वाघापूर (ता.भुदरगड) येथे मोठ्या उत्साही व भावपूर्ण वातावरणात झाली. रविवारी दिवसभर लाखो भाविकांनी नागदेवताचे दर्शन झाले. पावसाची उघडीप असल्याने भाविकांची रात्री उशीरापर्यंत गर्दी केली होती. यात्रेनिमित्ताने गावात लाखो रुपयांची उलाढाल झाली.

वाघापूर येथे नागदैवत श्री.जोतिर्लिंग देवाचे जागृत देवस्थान आहे. 'साप मारू नका, तो शेतकरी व पर्यावरणाचा मित्र आहे' असा संदेश देवस्थान समितीतर्फे दिला जातो. या देवस्थानला अनेक वर्षाची परंपरा असल्याने भाविकांची अपार श्रध्दा आहे. यामुळे येथे मोठ्या प्रमाणात नागपंचमीचा सण साजरा केला जातो.

रविवारी पहाटे आमदार प्रकाश आबिटकर व विजयालक्ष्मी आबिटकर यांच्या शुभहस्ते सपत्निक अभिषेक, महापूजा, काकडआरती करण्यात आली. देवस्थानतर्फे आमदार आबिटकर यांचा सत्कार करण्यात आला. सकाळी पावणे नऊच्या सुमारास वाद्यांच्या गजरात कुंभारवाड्यात मानाचा 'चिखली नागोबा' मंदिरात आणण्यात आला.दिवसभर भाविकांनी मोठ्या भक्ती भावाने नागदेवाला दुध व लाह्यांचा प्रसाद वाहिला. जिल्ह्यातील विविध आगारातून जादा बसेस सोडण्यात आल्या. यात्रेतील मुख्य रस्त्याच्या दुतर्फा विविध विक्रेते, स्टॉलधारकांची व्यवस्था करण्यात आली होती.

जोतिर्लिंग सहज सेवा ट्रस्टतर्फे अन्नछत्र उपक्रम राबविण्यात आला. त्याचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. स्थानिक देवस्थान आणि गावातील विविध पदाधिकारी, तरुण मंडळीनी यात्रा सुरळीत पार पडण्यासाठी पर्यंत केले. श्री.बाळूमामा मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटलने प्राथमिक शाळेत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते.पोलिस निरिक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाजणार आज अनप्लग्ड गाणी

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिक्षणाच्या वाटा प्रत्येकाच्या वेगळ्या... नोकरी व्यवसायाच्या दिशाही निराळ्या... पण त्यांच्यातील एका समानधाग्याने त्यांना एकत्र गुंफलं आहे आणि ते म्हणजे संगीताचं वेड. नव्या युगाच्या वाद्यांच्या तारा छेडत आणि ताल पकडत अकराजणांचा चमू एकत्र आला आणि त्यांच्यासोबत सहस्त्रम् रॉक बँडचेही सूर जुळले. आज सोमवारी सायंकाळी साडेसात वाजता शाहू स्मारक भवन येथे या सहस्त्रम् रॉक बँडची मैफल रंगणार आहेत. नवे सूर, नवे बीटस् अशा प्रयोगांमधून अनप्लड गाण्यांची बरसात ऐन श्रावणात नक्कीच श्रवणीय ठरेल.

विशाल सुतार, अभिजित सुतार, शुभम सुतार, स्वप्नील सुतार, प्रेमजित सुतार, अच्युत सुतार, रोहन कुलकर्णी, अनुराग कोकितकर, निहाल अहमद, अरमान शिकलगार आणि वैभव सुतार अशी ही सहस्त्रम इलेव्हन्सची टीम आहे. विशाल, शुभम यांच्याकडे बँडचा सूर अर्थात गायनाची जबाबदारी आहे. तर अनुराग, निहाल, अरमान, वैभव ही चौकट गिटारच्या वेगवेगळ्या स्वरांवर मुशाफिरी करते. स्वप्नील साउंड आर्टिस्ट आहे तर प्रेम​जित तबल्यावर साथ देतो तर रोहन ड्रम्समास्टर आहे. अच्युत मंचावरची प्रकाशयोजना पाहतो. या टीममधला अभिजित हटके आहे. तो एकाचवेळी कीबोर्ड, व्हायोलीन, गिटार अशा सगळ्यांवर काम करतो.

या बँडचे वैशिष्ट्य असे आहे की आजपर्यंत अनेकदा ऐकलेली गाणी नव्या ढंगात पेश केली जाणार आहेत. ज्यामध्ये सूफी हा काळजात घुसणारा फ्लेवर बँडमध्ये आहे. पॉप साँग ऐकता येणार आहेत. हिंदी सिनेमातील बॉलिवूड स्टाइल गाण्यांची नवी रेंजही या मंचावर आहे. रॉक ऑन करणारी गाणी तर सहस्त्रमचा बाज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images