Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

एसपीएन डिजिटलचे प्रोत्साहन

$
0
0
‘ज्या हेतूने सार्वजनिक गणेशोत्सवाला प्रारंभ झाला. तो हेतू साध्य करण्यासाठी गणेशोत्सव मंडळांना एसपीएन डिजिटल केबल नेटवर्कने समाजप्रबोधनाचा विचार मांडण्यासाठी प्रोत्साहित केले,’ असे प्रतिपादन अभिनेते अरुण नलावडे यांनी केले. ‘एसपीएन गणेशोत्सव स्पर्धा २०१२’च्या बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते.

कोल्हापूर खंडपीठासाठी आज सांगली बंद

$
0
0
कोल्हापूर येथे मुंबई हायकोर्टाचे खंडपीठ व्हावे, या मागणीसाठी न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकून आंदोलनात उतरलेल्या सांगलीतील वकीलांनी सोमवारी पाचव्या दिवशी शहरातून पदयात्रा काढून जनतेला या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले.

‘डॉ. दाभोलकरांच्या हत्येचा तपास CBI कडे द्या’

$
0
0
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी सोमवारी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. तसेच, ‘डॉ. दाभोलकर हे धर्माच्या नव्हे ; तर अंधश्रद्धेच्या विरोधात होते.

ईबीसीसाठी उत्पन्न मर्यादा वाढवा

$
0
0
आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी (ईबीसी) उत्पन्नाच्या मर्यांदेत महागाई निर्देशांकानुसार तातडीने वाढ करावी, मुलींच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा प्रशासनाने योग्य भूमिका घ्यावी यांसह अन्य मागण्यांसाठी ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनने शिक्षण उपसंचालक कार्यालयावर मोर्चा काढला.

उत्सवात तरुणाईने विधायकता आणावी

$
0
0
गणरायाच्या आगमनाला अवघा आठवडा शिल्लक राहिला आहे. घरोघरी आणि सार्वजनिक मंडळात गणेशोत्सवासाठी धामधूम सुरू आहे. गणेशोत्सव कसा साजरा करावा, याबद्दल मत मतांतरे व्यक्त केली जात असली तरी या उत्सवात सर्वात जास्त सहभागी होते ती तरुणाई.

मुख्यमंत्री समर्थक गटाची सरशी

$
0
0
मलकापूर नगरपंचायतीच्या निवडणुकीत मुख्यमंत्री समर्थक काँग्रेस आघाडीने सर्वच्या सर्व १७ जागांवर विजय मिळवला असून, आमदार उंडाळकर समर्थक पॅनेलला एकाही जागेवर विजय मिळवता आल्याने या गटाचा पुरता धुव्वा उडाला आहे.

एलआयसीच्या विमा सप्ताहास प्रारंभ

$
0
0
एल. आय. सी ५८ वर्षात पदार्पण करत असून त्यानिमित्त १ ते ७ सप्टेंबर कालावधीत विमा सप्ताह म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची माहिती व‌रिष्ठ मंडळ प्रबंधक राज नाईक यांनी पत्रकार बैठकीत दिली.

संशोधनातील ऱ्हस्वदृष्टी व उच्चशिक्षणातील घसरण

$
0
0
हजारो जातींनी भरलेल्या या देशामध्ये नुसत्या कुंभाराच्या चौदा पोटजाती आहेत. अगदी महार जातीत देखील साडेतेरा पोटजाती आहेत आणि या साऱ्या पोटजाती स्वत:ला श्रेष्ठ आणि इतरांना कनिष्ठ मानतात. बेटी व्यवहार तर सोडून द्या पण त्यांच्यामध्ये रोटी व्यवहारही होत नाहीत.

महालक्ष्मीला भाविकाकडून ६५ तोळे सोन्याचा हार

$
0
0
बंगळुरूचे उद्योगपती मेघा पाटी राजगोपाल रेड्डी यांनी करवीर निवासिनी महालक्ष्मीच्या चरणी ६५० ग्रॅमचा १६ पदरी सोन्याचा चंद्रहार अर्पण केला. रेड्डी कर्नाटकातील यळ्ळूर येथील असून ते महालक्ष्मीचे भक्त आहेत.

चर्चा टोलची आणि सुरक्षा दलाची

$
0
0
पोलिस दलावरील बंदोबस्ताचा ताण कमी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची स्थापना राज्य सरकारने २०१० साली केली होती. गणेशोत्सव, ईद, नवरात्रोत्सव, विविध यात्रा आणि उत्सव अशा काळात आणि सरकारी आस्थापने व व्यक्तिगत सुरक्षेसाठी पोलिसांऐवजी या सुरक्षा महामंडळाचा पर्यायी वापर करण्याचा उद्देश यामागे होता.

कोट्यवधींचे व्यवहार थंडावले

$
0
0
मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात व्हावे या मागणसाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा सोमवारी पाचवा दिवस होता. रविवार वगळता गेले चार दिवस न्यायालयीन कामकाज बंद राहिल्याने व्यवहारांवर मोठा परिणाम झाला आहे. आंदोलनामुळे स्टॅम्प विक्रेते, पक्षकार आणि नोटरी करणाऱ्यांची पंचाईत झाली आहे.

रस्त्याच्या कामाच्या चौकशीची मागणी

$
0
0
कोल्हापूर - रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील निकृष्ठ व खराब रस्त्याच्या कामाची चौकशी करण्याची मागणी भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.

छेडछाडप्रकरणी पाचजणांना अटक

$
0
0
पिंपळगाव खुर्द येथे दहावीत शिकणाऱ्या मुलीची छेड काढणा‍ऱ्या चार तरुणांना कागल पोलिसांनी ताब्यात घेतले.

सुळेच्या पिक-अप शेडला ‘उतरती कळा’

$
0
0
चंदगड-हेरे मार्गावर सुळे (ता. चंदगड) फाट्यानजीक आठ महिन्यांपूर्वी बांधण्यात आलेल्या पिक-अपशेडचे बांधकाम निष्कृष्ट दर्जाचे झाले आहे. हे शेड जमिनीत खचल्याने अक्षरश: त्याला उतरती कळा लागली आहे.

पदकांचा मानकरी उपेक्षित

$
0
0
केरळमधील प्रतिकूल हवामानाशी झुंज देत राष्ट्रीय स्पर्धेत दोन कांस्य पदकाची कमाई करणाऱ्या हवालदार नरसिंग कांबळेला प‌ोलिस प्रशासनाने वाऱ्यावर सोडले आहे.

‘तांबाळे’च्या हंगामाची अनिश्चितता

$
0
0
भुदरगड तालुक्यातील एकमेव औद्योगिक प्रकल्प म्हणून ओळखला जाणारा तांबाळे येथील इंदिरा गांधी महिला सहकारी कारखाना यावर्षीच्या हंगामात सुरू होणार की, अन्य कारखाने चालवायला घेणार याबाबत अद्यापही अनभिज्ञता आहे.

‘आधार’साठी शाहूवाडीत धावपळ

$
0
0
शाहूवाडी तालुक्यात आधार कार्ड काढण्याची मोहीम बंद पडल्याने तालुक्यातल्या नागरिकांना ‘आधार’ च मिळेना झालाय.

खंडपीठासाठी रॅली

$
0
0
‘मुंबई हायकोर्टाचे खंडपीठ कोल्हापुरात झालेच पाहिजे’ या मागणीसाठी गुरुवापासून आंदोलन सुरू आहे. दरम्यान गडहिंग्लज तालुका बार असोसिएशनच्या वतीने आज शहरातील मुख्यमार्गावरून मोटरसायकल रॅली काढण्यात आली.

नुकसानभरपाई न दिल्यास बेमुदत उपोषण

$
0
0
कानूर खुर्द (ता. चंदगड) येथील धनगरवाड्यावरील २०१२ मध्ये अचानक मृत झालेल्या ज्ञात रोगाने मृत्यू झालेल्या २३ जनावरांची नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

लालबावटा कामगार युनियनची निदर्शने

$
0
0
येथील संजय फौंड्रीमधील कामगारांना गेल्या चार महिन्याचा थकित पगार मिळण्यासाठी लालबावटा जनरल कामगार युनियनच्या वतीने सरकारी कामगार अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने केली.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images