Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

पार्टीचा आयोजक तहसीलदारच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सीपीआरच्या कैदी वॉर्डमध्ये रंगलेल्या ओल्या पार्टीच्या मागे शहरातील कुख्यात गुंड स्वप्नील तहसीलदार याचाच हात असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. पुण्यातील गुंड गज्या मारणे याच्या टोळीतील कैदी सोमप्रशांत पाटील याच्या अपहरणासाठीच पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. याचा कट गुंड स्वप्नील तहसीलदार यानेच रचल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांकडून या कटाची सखोल चौकशी होणार आहे.

शहरातील कुख्यात गुंड स्वप्नील तहसीलदार यानेच बुधवारी (ता.१५) पोलिसांच्या संगनमताने सीपीआरच्या कैदी वॉर्डमध्ये पार्टीचे आयोजन केले होते. यासाठी आवश्यक ते सर्व साहित्य त्यानेच पुरवले होते. पार्टीत सहभागी झालेले शहरातील पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगारही त्यानेच पाठवले होते. पार्टी रंगात आल्यानंतर तो स्वतःही सीपीआरमधील कैदी वॉर्डच्या टेरेसवर हजर होता. लक्ष्मीपुरी पोलिसांनी छापा टाकताच त्याला काही पोलिसांनीच घटनास्थळावरून सुखरूप सीपीआरबाहेर पोहोचवल्याची जोरदार चर्चा सुरू होती. याबाबत पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांना विचारणा केल्यानंतर त्यांनी, तो गुंड स्वप्नील तहसीलदार असल्याचे स्पष्ट केले, यामुळे तहसीलदार याचे पोलिस, कैदी आणि सीपीआरमधील अधिकाऱ्यांशी असलेले संबंध पुन्हा एकदा पुढे आले आहेत. तहसीलदार याच्यावरील कारवाईसंदर्भात विचारले असता, त्यांनी मोकाची कारवाई केल्याचे सांगून पुढे अधिक बोलणे टाळले.

तहसीलदारला मदत करणारा 'तो' पोलिस कोण?

लक्ष्मीपुरी पोलिसांनी छापा टाकल्यांतर तहसीलदार याला काही पोलिसांनीच सीपीआरबाहेर नेऊन सोडले होते. तहसीलदारला मदत करणारा तो पोलिस कोण? त्याच्यावर काय कारवाई होणार? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे संबंधित पोलिसांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. सोमप्रशांत पाटील कैद्याचे अपहरण करण्यासाठीच पार्टीचे आयोजन केल्याचा प्राथमिक संशय वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी वर्तवला होता. पोलिसांना नशेमध्ये ठेवून पळून जाण्याचे त्यांचे नियोजन होते. कैदी आणि उपस्थित इतर गुंडांपेक्षा बंदोबस्तावरील पोलिसांनीच अधिक मद्यप्राशन केले होते, त्यामुळे हा संशय बळावला होता. कैद्याच्या अपहरण कटाबाबत स्वतंत्र चौकशी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जनता बझारवर दोन दिवसांत प्रशासक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार को ऑप कंझ्युमर्स सोसायटीमध्ये (जनता बझार) अपहार झाल्याच्या तक्रारीनुसार जिल्हा उपनिबंधकांनी प्रशासक नेमण्याबाबत दिलेल्या नोटिशीप्रमाणे मंगळवारी सुनावणी पुर्ण केली. त्यामुळे आता उपनिबंधकांकडून प्रशासक नेमण्याची कारवाई होण्याची अपेक्षा असून दोन दिवसांत त्याबाबतचा आदेश काढला जाण्याची शक्यता आहे.

भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्यावतीने जनता बझारमधील अपहार, बेकायदेशीरपणे केलेले कामकाज याबाबत विभागीय सहनिबंधकांकडे तक्रार दिली होती. जनता बझारवर कलम ८८ नुसार प्रशासक नेमला जावा, यासाठी समितीच्यावतीने उपोषणही केले होते. त्याची दखल घेत विभागीय सहनिबंधकांनी त्याबाबतचे आदेश जिल्हा उपनिबंधकांना दिले. त्यानुसार प्रशासक का नेमू नये याची कारणे दाखवा नोटीस संचालकांना दिली होती. त्याबाबत १० जूनपासून सुनावणी सुरू होती. ही सुनावणी मंगळवारी पुर्ण झाली असून सर्व संचालकांनी आपले मत नोंदवले आहे. संचालकांनी यामध्ये काहीही मत नोंदवले असले तरी यापूर्वी सहकार विभागाने केलेल्या चौकशीतून गैरकारभार झाला असल्याचे समोर आले होते. त्यामुळे जनता बझारवर प्रशासक नियुक्त होणार हे जवळजवळ निश्चित झाले आहे. मात्र सुनावणी पुर्ण केल्या​खेरीज निर्णय देता येत नसल्याने त्याची प्रतीक्षा होती. मंगळवारी सुनावणी पुर्ण झाल्याने बुधवारी किंवा गुरुवारी प्रशासक नियुक्तीचा आदेश ​जिल्हा उपनिबंधकांकडून काढला जाण्याची शक्यता आहे.

जनता बझारने महापालिकेशी केलेल्या कराराचा पोटभाडेकरू नेमून केलेला भंग, पोटभाडेकरुंचे उत्पन्न न दाखवणे, सरकारी लेखापरीक्षकांना राजारामपुरी येथील जमिनीचा व्यवहार व करार झाल्याचे दाखवले होते. पण मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांकडून तसा कोणता व्यवहारच झाला नसल्याचे दिलेले पत्र, शिवाय महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पंचनाम्यात दुसऱ्याच व्यक्ती मिळकतीत व्यवसाय करत असल्याचे नोंदवले आहे. इतर मिळकतीबाबतही असाच व्यवहार झाला असण्याची शक्यता आहे. त्याचे पुरावे जोडल्याने संस्थेवर प्रशासक नेमून कारभाराची चौकशी करण्याची मागणी प्रजासत्ताक सामाजिक संघटनेने केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयटीआय प्रवेशाचा सर्व्हर डाउन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) प्रथम वर्ष अभ्यासक्रमाच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला बुधवारपासून (ता. १५) सुरुवात झाली. मात्र प्रवेशाला सुरुवात झाल्यापासून सर्व्हर डाउनच्या समस्येमुळे अद्याप एकही प्रवेश अर्ज दाखल झालेला नाही. ३० जूनअखेर अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता आहे. राज्यभरात आयटीआय प्रवेशाचा बोजवारा उडाला असताना व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाचे सहसंचालक सी. ए. निनाळे यांनी आयटीआयच्या प्राचार्याना लेखी पत्र पाठवून, प्रवेश प्रक्रिया सुरळीत होईल असे सांगितले आहे. मात्र प्रवेशासाठीची मुदत वाढविण्यात आली नसल्याने आयटीआय प्रशासनामध्येही चांगलीच खळबळ उडाली आहे.

दहावी परीक्षा उत्तीर्ण व अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना हमखास नोकरीचे मिळवून देण्याचा अभ्यासक्रम म्हणून विद्यार्थी आयटीआय अभ्यासक्रमाला पसंती देतात. दहावीच्या निकाल प्रसिद्ध झाल्यानंतर गरजू विद्यार्थ्यांची आयटीआय प्रवेशासाठी गर्दी होते. गेल्या तीन वर्षापासून आयटीआयची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया खासगी संस्थेमार्फत राबविली जात आहे. मात्र dvet.gov.in वेबसाइटवर अर्ज दाखल करण्याचा प्रयत्न केल्यास वेगसाइट ओपन होत नसल्याचा अनुभव दररोज विद्यार्थ्यांना येत आहे. गेल्यावर्षी अशीच समस्या निर्माण झाल्यानंतर एका कंपनीकडून ठेका काढून घेऊन दुसऱ्या कंपनीला दिला होता. मात्र, या कंपनीकडेही ठेका दिल्यानंतर प्रवेश प्रक्रियेचे तीन तेरा वाजले आहेत.

रंगारी, यांत्रिक, तारतंत्री, यांत्रिक मोटारगाडी, आरेखक यांत्रिकी, आरेखक स्थापत्य, यांत्रिक प्रशितन व वातानुलीकरण, यंत्रकारागीर घर्षक आदी ३४ अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नोकरी व व्यवसायाची हमखास संधी असल्याने या अभ्यासक्रमासाठी विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा ओढा असतो. अशा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी शहरात यावे लागत असल्याने त्यांना प्रवासाचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. अर्ज दाखल करण्याची अखेरची मुदत जवळ येईल, तशी प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये अधिक अस्वस्थता निर्माण झाली आहे. प्रवेश प्रक्रियेला विलंब होत असल्याने व्यवसाय व शिक्षण व प्रशिक्षण विभागाचे सहसंचालक निनाळे यांनी प्रत्येक आयटीआय प्राचार्याना पत्र पाठवले आहे. सर्व्हर डाऊनची समस्या सर्वत्र जाणवत असताना त्यांनी पत्राद्वारे प्रवेश प्रक्रिया दिलेल्या विहित काळात पूर्ण होइल अशी ग्वाही दिली आहे. मात्र, प्रवेशाची मुदत वाढवणार अथवा नाही, याबाबत कोणताही उल्लेख त्यात नाही. त्यामुळे उर्वरीत काळात प्रवेश प्रक्रिया कशी पूर्ण करायची अशा प्रश्न निर्माण झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापुरात मान्सूनची हुलकावणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

चार दिवसांपासून ​जिल्ह्यात ढगाळ वातावरण होत असले तरी पावसाने सुरुवात केलेली नाही. त्यामुळे कोल्हापूरवासियांत चिंतेचे वातावरण आहे. पाऊस केव्हा बरसणार याकडेच साऱ्यांचे डोळे लागले आहेत. जिल्ह्यातील काही धरणांच्या पाणलोटमध्ये मात्र दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्यात काहीच पाऊस नसताना पश्चिमेकडील भागात त्यातही विशेषतः धरण परिसरात होणाऱ्या पावसामुळे आगामी काही दिवसांत इतर ठिकाणीही पाऊस होईल, अशी आशा मात्र अजूनही दिसत आहे. पूर्व भाग मात्र पूर्णपणे कोरडाच आहे.

जून सुरू झाल्यापासून पावसाळ्याचा पाऊस म्हणून अजून जिल्ह्यात पावसाचे आगमन झालेले नाही. गेल्या आठवड्यात काही भागात वळीव पावसाप्रमाणे हजेरी लावली. त्यामुळे अनेक तालुक्यांमधील शेती पाण्याने तुडुंब भरली होती. त्या जोरावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. पण नंतर पावसाने पाठ फिरवली असून ​पश्चिम भागात केवळ शिडकाव्यासारखा पाऊस ​ होत आहे. शेतीबरोबर पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यक असलेल्या धरणांमधील पाणीसाठाही संपत आला आहे. राधानगरी, काळम्मावाडीसारख्या धरणातून अतिशय कमी प्रमाणात पाणी सोडले जात आहे. अशावेळी काही धरणांमधील शिल्लक पाणी सोडून पिण्याच्या पाण्याची गरज भागवली जात आहे. पाटबंधारे विभागानेही पावसाळा सुरू होईल या आशेवर जूनपर्यंत धरणातील पाणी देण्याचे नियोजन केले आहे.

धरणांमधील साठा वाढण्यासाठी धरणांच्या परिसरात जोरदार पावसाची गरज आहे. गेल्या आठवड्यात दोन दिवस ४० मि​लीमीटर इतका पाऊस काही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झाला. पण नंतर तिथेही पावसाचे प्रमाण फारच कमी झाले होते. रविवारपासून मात्र जिल्ह्यात इतरत्र ढगाळ वातावरण तयार झाल्यानंतर काही धरणांच्या पाणलोटमध्ये पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे. हे प्रमाण गेल्या आठवड्याच्या तुलनेने निम्मेच आहे. गगनबावडा तालुक्यातील कुंभी, कोदे तसेच कासारी, पाटगाव या धरणांमध्ये रविवारी १० ते २३ मिलीमीटरपर्यंत पाऊस झाला होता. सोमवारी त्या परिसरात पावसाचे प्रमाण वाढले होते. कोदे, कुंभी, पाटगाव, जांबरे, घटप्रभा या धरणांमध्ये ९ ते १८ मिलीमीटरपर्यंत पाऊस झाला. राधानगरी धरणक्षेत्रात सोमवारपासून पाऊस सुरू झाला आहे ही समाधानाची बाब आहे. मात्र त्याचे प्रमाण फारच कमी आहे. या पावसाने पाणी पातळीत फारसा फरक पडलेला नाही. दोन दिवसांपासून धरण परिसरात सुरू झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात इतर ठिकाणीही पावसाला सुरुवात होईल, ही आशा मात्र कोल्हापूरवासियांना आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आडत्यांच्या बंदमुळे शेतकरी, ग्राहकांचा फायदा

$
0
0

सोलापूर : फळभाज्या नियमनमुक्तीला विरोध करण्यासाठी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील आडत व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत बंदला पहिल्या दिवशी शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. शेतकऱ्यांनी आपला माल बाजार समितीच्या बाहेरील पटांगणात विकून भरघोस कमाई केली.
बंदमुळे बाजार समितीमधील सुमारे सहा ते साडेसहा कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. बाजार समितीमध्ये इंदूर आणि आग्रा येथून बटाटा तर हिमाचल प्रदेश व काश्मीर येथून सफरचंदांची आवक होते. तसेच कर्नाटकसह महाराष्ट्रातील पुणे, नगर, नाशिक आणि अहमदनगर येथून मोठ्या प्रमाणावर कांदा येतो. सांगोला तसेच पंढरपूर परिसरातून डाळिंबाचीसुद्धा मोठी आवक होते. भाजीपाल्याचे १२०० ते १३०० तर फळांचे २०० ते २५० आडते आहेत. शासनाने बाजार समिती कायद्यामधून फळे आणि भाजीपाला वगळण्याचा निर्णय घेतल्यामुळे आडत्यांनी बेमुदत बंदचे हत्यार उपसले आहे.
पालेभाज्या घेऊन आलेल्या शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोरील मैदानात बसून विक्री केली. इतर वेळी मेथीची पेंडी दहा रुपयाला एक दराने विकली जाते; परंतु शेतकऱ्यांनी दहा रुपयांना दोन या भावाने पेंड्या विकल्या. ग्राहकांनीसुद्धा या स्वस्त पालेभाज्यांची वाढीव खरेदी केली. मात्र, या बाजारामुळे वाहतुकीची कोंडी होत असल्यामुळे काही वेळातच हा बाजार उठविण्यात आला.

किरकोळ विक्रेतेही मालामाल

बाजार समितीच्या बाहेरील भागात जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून पालेभाज्या घेऊन आलेल्या शेतकऱ्यांनी स्वत: आपल्या मालाची विक्री केली; परंतु किरकोळ विक्रेत्यांनी शेतकऱ्यांकडून माल घेऊन ग्राहकांना तो विकून काही प्रमाणात नफा कमावला.


सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमाल, तोलार व स्त्री कामगार अशी २ हजार संख्या आहे. हमाल व तोलाई आडते हे यापूर्वी शेतकऱ्यांच्या पट्टीतून वजा करत होते; परंतु नवीन नियमानुसार नेमकी हमाली व तोलाई कोणाकडून घ्यायची याबाबत धोरण ठरलेले नाही. हमाली व तोलाईची जबाबदारी बाजार समितीने स्वीकारावी आणि ती रक्कम माथाडी बोर्डात भरावी. बंदमुळे शेतकरी माल आणू शकत नाहीत. परिणामी हमाल व तोलारांवर बेरोजगारीची संक्रांत ओढवणार आहे.

दीपक गदगे,
सचिव, सोलापूर शहर तोलार कल्याणकारी संघटना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माऊलींची पालखी आज पंढरपूर तालुक्यात

$
0
0

माऊलींची पालखी आज पंढरपूर तालुक्यात

पंढरपूर : खुडूसच्या शिवारात रंगलेले गोल रिंगण, विठ्ठल भेटीसाठी केलेला धावा व लोकरंजनातून भक्तीमार्ग सोपा करणारे भारूड... असे विविध रंग उधळीत पंढरीस निघालेला विठ्ठल भक्तीचा आनंद मेळा सोमवारी श्री अर्धनारी नटेश्‍वर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वेळापूर नगरीत विसावला. उद्या (मंगळवारी) सोहळ्यातील तिसरे गोल रिंगण ठाकूरबुवा येथे झाल्यानंतर पालखी सोहळा पंढरपूर तालुक्यात प्रवेश करेल.
सोमवारी सकाळी ६.३० वाजता माळशिरसहून मार्गस्थ झालेला पालखी सोहळा दुसऱ्या गोल रिंगणासाठी सकाळी ८.३० वाजता खुडूस शिवारात पोहोचला. ढगाळ वातावरणात चोपदारांनी रिंगण लावून घेतले. परंपरेप्रमाणे रिंगणाला सुरुवात झाली. सकाळी ९.३० वाजता माऊलींचा अश्‍व रिंगणासाठी सोडण्यात आला. अश्‍वांनी नेत्रदिपक दौड करून लाखो भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. त्यामागे स्वाराच्या अश्‍वानेही प्रदक्षिणा पूर्ण केली. माऊलीऽ माऊलीऽऽ नामाचा जयघोष करीत रिंगण सोहळा संपला. त्यानंतर वारकऱ्यांचे झिम्मा, फुगडी, हुतुतू हे मैदानी खेळ रंगले. या रिंगण सोहळ्यानंतर सोहळा वेळापूरकडे मार्गस्थ झाला.
खुडूस ग्रामस्थांचे स्वागत स्वीकारून माऊलींचा पालखी सोहळा निमगांव मगराचे (पाटी) येथे पोहोचला. निमगांव, विझोरी, विजयनगर आदी ग्रामपंचायतीच्या वतीने सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. शंकरनगर ग्रामपंचायतीच्या वतीने माऊलींच्या पादुकांची पूजा करण्यात आली. शंकरराव मोहिते सूतगिरणी, शिवामृत दूध उत्पादक सहकारी संघ, इकोबोर्ड इंडस्ट्रिज, पिसेवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने सोहळ्याचे स्वागत करण्यात आले.
वेळापूर येथे प. पू. डॉ. भाईनाथ महाराज कारखानीस उर्फ आनंदमूर्ती यांच्या समाधी मठाजवळील स्वागत स्वीकारल्यानंतर पालखी सोहळ्याने वेळापूर हद्दीत प्रवेश केला. त्यावेळी वेळापूर ग्रामपंचायतीच्यावतीने माऊलींसह लाखो वैष्णवांचे उत्साही स्वागत करण्यात आले.
जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पंढरीस जात असताना वेळापूरनजीक टेकडीवरून त्यांना विठ्ठलाचे दर्शन झाले. त्यामुळे ते येथूनच पंढरपूरपर्यंत धावत सुटले अशी आख्यायिका आहे. वारकरी तुकाराम महाराजांचा अभंग म्हणून येथून धावतात. हा विलोभनीय सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक येथील टेकडीवर गर्दी करतात. सायंकाळी चोपदारांनी अश्‍वानंतर एक एक दिंडी सोडली. त्यावेळी माऊलीऽ माऊलीऽऽ नामाचा जयघोष करीत अबालवृद्ध वैष्णव धावत होते.
सायंकाळी हा सोहळा समाजआरतीनंतर वेळापूर मुक्कामी विसावला. उद्या (मंगळवारी) सकाळी ठाकूरबुवा येथे गोल रिंगण, तोंडले येथे नंदाच्या ओढ्यावर दुपारचा विसावा घेऊन संत ज्ञानदेव, संत सोपानकाका या दोन बंधूंच्या भेटीच्या सोहळ्यानंतर हा सोहळा पंढरपूर तालुक्यात प्रवेश करेल व भंडीशेगाव मुक्कामी पोहोचेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तुकोबांच्या पालखीचे माळीनगरात पहिले उभे रिंगण

$
0
0

पंढरपूर : जगद्गुरू संत तुकोबांच्या पालखीचे संत गहिनीनाथांची नगरी माळीनगरात पहिले उभे रिंगण पार पडले. तुकोबा...तुकोबाचा अखंड गजर, विठुरायाच्या दर्शनाची आस आणि गळ्यात वीणा, हातात टाळ घेऊन पळणारे वारकरी अशा वातावरणात हे रिंगण पार पडले. तोफांची सलामी देत माळीनगरात पालखीचे स्वागत करण्यात आले. पालखीचा रात्रीचा मुक्काम बोरगाव येेथे होता.
भक्तिसागरात चिंब भिजलेल्या भोळ्या-भाबड्या वारकऱ्यांसमवेत विठुरायाकडे निघालेल्या श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा माळीनगरात येत असताना येथील दि माॅडेल विविधांगी प्रशालेचे लहान मुला-मुलींच्या बालवारकऱ्यांची दिंडीही या पालखी सोहळ्यात सहभागी झाली होती.भक्तीरसपूर्ण आणि विठ्ठलमय वातावरणात पालखी सोहळा पुढे सरकत माळीनगर रोडवरील श्रीहरीनगर येथे येऊन थांबला.
पताकाधारकवारकरी,तुळशीधारक महिला,विणेकरी,पकवाजवादक,टाळकरी,रस्त्याच्या दोन्ही बाजूला रांगाकरून भजन व टाळ मृदंगाच्या गजरात दंग झाले होते. अश्वांच्या पूजेनंतर संत तुकाराम महाराज संस्थानच्या बाभूळकरांच्या अश्वाने उभ्या रिंगणात प्रथम फेरी मारली. नंतर (कै.) प्रतापसिंह मोहिते-पाटील यांचा अश्व शूर याच्यावर घोडेस्वार हातात पताका घेवून स्वार झाला. अतिशय वेगाने धावणाऱ्या या अश्वाने तुकोबांच्या पादुकांचे दर्शन घेवून दोन फेऱ्या पूर्ण केल्या. आसमंत व्यापून टाकणारा टाळ मृदंगाचा निनाद, तुकोबा तुकोबा नामाचा अखंड गजर, अन् मनी विठुरायाच्या भेटीची आस अशा भक्तिपूर्ण वातावरणात उभ्या रिंगणातील अश्वांची नेत्रदीपक दौड हृदयात साठवीत माळीनगर येथे लाखो भाविकांनी उभ्या रिंगणाचा मनमुराद आनंद लुटला. यानंतर लगेचच अश्वांच्या पाऊल खुणांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची झुंबड उडाली होती.
रिंगण सोहळा संपल्यानंतर माॅडेल हायस्कूलच्या मैदानावरील ओपन थिएटर मध्ये पालखी सोहळा विसवला. सासवड माळी शुगर फॅक्टरीचे संचालक मोहन लांडे व त्यांच्या पत्नी संध्या लांडे यांच्या हस्ते तुकाराम महाराजांच्या पादूकांची षोडशोपचारपूजा व महाअभिषेक करण्यात आला. दुपारी १२ वाजता तुकाराम महाराज पालखी सोहळा बोरगावच्या दिशेने रात्रीच्या मुक्कामासाठी मार्गस्थ झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माउली भंडीशेगावात, तुकोबाराय पिराची कुरोलीतबंधू आणि संत भेटीनंतर पालखी सोहळे पंढरपूर तालुक्यात

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर

विठ्ठल नामाचा अखंड गजर करीत आषाढी वारीसाठी पंढरीस निघालेला वैष्णवांचा मेळा मंगळवारी पंढरपूर तालुक्यात दाखल झाला. आता प्रत्येक वारकऱ्याला ओढा लागली आहे, ती विठुरायाच्या नगरीत जाण्याची. दोन मुक्कामांवर पंढरी आल्याने वारकऱ्यांमध्ये एक नवऊर्जा संचारली आहे. मंगळवारी पालखी सोहळ्याचा दिवस बंधू आणि संत भेटीचा होता. टप्पा येथे संत ज्ञानदेव व सोपानदेव यांच्या बंधूभेटीच्या सोहळ्यानंतर पंढरपूर तालुक्यात संतांच्या पालखी सोहळ्यांचे मोठ्या उत्साही व भक्तिमय वातावरणात स्वागत झाले. संत ज्ञानदेव व संत सोपानदेव यांचा पालखी सोहळा भंडीशेगाव मुक्कामी; तर संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पिराची कुरोली मुक्कामी पोहोचला. बुधवारी संतांचे पालखी सोहळे शेवटच्या वाखरी मुक्कामासाठी मार्गस्थ होतील.

मंगळवारी संत ज्ञानदेवांच्या पालखी सोहळ्यात पहाटे सोहळाप्रमुखांच्या हस्ते माउलींची विधीवत पूजा झाली. पूजेनंतर सकाळी साडेसहा वाजता हा सोहळा भंडीशेगाव मुक्कामासाठी मार्गस्थ झाला. सकाळी नऊ वाजता न्याहरी, रिंगण व विश्रांतीसाठी हा सोहळा ठाकूरबुवा येथे पोहोचला. पुरंदावडे व खुडूस येथील नेत्रदीपक दौडीनंतर मंगळवारी ठाकुरबुवा येथेही अश्‍वांनी नेत्रदीपक दौड करून वैष्णवांच्या डोळ्याचे पारणे फेडले. रिंगण सोहळ्यानंतर अश्‍वांच्या टापाखालील माती भाळी लावण्यासाठी महिला व पुरुष भाविकांनी एकच गर्दी केली. त्यानंतर दिंड्या दिंड्यामध्ये हुतूतू, हमामा, फुगडी आदी खेळ रंगले. चोपदारांनी उडीच्या कार्यक्रमासाठी दिंड्यांना निमंत्रण दिले. एक एक दिंडी टाळ, मृद्ंगाचा गजर करीत माउलींच्या पालखीकडेने गोलाकार बसू लागली. सर्व टाळकऱ्यांनी ज्ञानोबा-तुकारामांचा गजर केला. त्याला मृद्ंग वादकांनी साथ दिली. आसमंत व्यापून टाकणारा नादब्रह्मचा सोहळा सुरू झाला आणि पाहता पाहता हजारो वारकरी या नादब्रह्ममध्ये रंगून गेले.

सकाळी दहा वाजता माउलींची पालखी ठाकूरबुवा मंदिरात आणण्यात आली. माउलींच्या पादुका ठाकूरबुवांच्या समाधीवर ठेवण्यात आल्या. तेथे विधीवत पूजा करण्यात आली आणि सकाळी साडेदहा वाजता हा सोहळा तोंडलेकडे मार्गस्थ झाला. या ठिकाणी दुपारचा नैवेद्य व विश्रांतीसाठी सोहळा विसावला.

दुपारी संत सोपानदेव, संत तुकाराम व त्यापाठोपाठ संत ज्ञानराजांचा पालखी सोहळा टप्पाकडे मार्गस्थ झाला. टप्पा येथे पालखी सोहळे येताच संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याने पंढरपूर तालुक्यात प्रवेश करून पिराची कुरोली मुक्कामाकडे मार्गस्थ झाला. त्यानंतर संत ज्ञानराजांचा पालखी सोहळा टप्पा येथे सीमेवर येताच पाठीमागून सासवडवरून निघालेला संत सोपानदेवांचा सोहळा माउलींच्या पालखी सोहळ्याजवळ आला. येथे सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, सोहळा प्रमुख डॉ. अजित कुलकर्णी, विश्‍वस्त योगेश देसाई यांनी सोपानदेवांचे सोहळाप्रमुख श्रीकांत महाराज गोसावी यांना श्रीफळ भेट दिले. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल असा जयघोष झाला आणि टाळ, मृदुंगाच्या गजरात बंधू भेटीचा सोहळा येथे रंगला.

संतांच्या पालख्यांचे पंढरपूर तालुक्यात प्रवेश

पंढरपूर तालुक्याच्या सिमेवर संत ज्ञानदेव, संत तुकाराम, संत सोपानदेव, संत चौरंगीनाथ, चांगा वटेश्‍वर, गुलाबबाबा, संतनाथ महाराज, गवार शेठ लिंगायत वाणी (तुकाराम महाराजांचे टाळकरी), संत गोरोबा काका, जगनाडे महाराज आदी संतांच्या पालख्यांचे टप्पा येथे पंढरपूर प्रशासनाने सोहळ्याचे स्वागत केले. बुधवारी संतांचे पालखी सोहळे शेवटच्या वाखरी मुक्कामासाठी मार्गस्थ होतील.

वाखरी रिंगण तळ तयार

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील अखेरचे आणि सर्वात मोठे म्हणून प्रसिद्ध असलेल्या वाखरीच्या रिंगण तळाचे मजबुतीकरण पूर्ण झाले आहे. या ठिकाणी अखेरचे रिंगण होणार आहे. पंढरपूरपासून केवळ पाच किलोमीटर अंतरावर संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम या दोन्ही पालखी सोहळ्याचा अखेरचा मुक्काम असतो. पालखी ठेवायच्या कट्ट्यावर आतापासूनच भाविकांनी दर्शनाला गर्दी केली आहे. बुधवारी वखारीत सुमारे दहा लाखांचा जनसागर विसावणार आहे. प्रशासनाने वखारी पालखी तळालाची स्वच्छता आणि मजबुतीकरणाचे काम पूर्ण केले आहे. मोठ्या प्रमाणात दिव्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

उजनीचे पाणी चंद्रभागेत पोहोचले

आषाढी यात्रेसाठी राज्यभरातून येणाऱ्या लाखो भाविकांच्या स्नानासाठी उजनी धरणातून सोडलेले पाणी मंगळवारी पहाटे चंद्रभागेत पोहोचले. नदी दुथडी भरून वाहत असून, हजारो भाविक चंद्रभागेच्या स्नानाचा आनंद घेत आहेत. यंदा पहिल्यांदाच चंद्रभागा कोरडी करून यातील पाणकणासे आणि शेवाळ प्रशासनाने काढून चंद्रभागा पात्र स्वच्छ केले होते. आता उजनी धरणातून सोडलेले पाणी पोचल्याने चंद्रभागा दुथडी भरून वाहू लागली आहे. उजनी धरणातून सहा हजार क्युसेकने विसर्ग सुरू होता.

संत मुक्ताबाईंची पालखी पंढरीत

आषाढी यात्रेसाठी संत मुक्ताबाई यांचा पालखी सोहळा मंगळवारी दुपारी पंढरपूरमध्ये दाखल झाला. आदिशक्ती मुक्ताबाई यांच्या समाधीस्थळावरून आलेला या पालखी सोहळ्याने गेल्या ३४ दिवसांत जवळपास ७५० किलोमीटरचे अंतर पायी कापले आहे. संत मुक्ताबाई या संत ज्ञानेश्वरांच्या लहान भगिनी, मुक्ताई नगर येथून या पालखी सोहळ्याचे दहा जून रोजी प्रस्थान झाले होते. संत मुक्ताबाईंच्या सोहळ्यात ९०० महिला आणि ६०० पुरुष भाविक सामील झाले आहेत. मराठवाडा, विदर्भ, खान्देश आणि मध्यप्रदेशातून या सोहळ्यात मोठ्या प्रमाणात भाविक सामील झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लाखो वैष्णवांसह पालखी सोहळे वाखरीतपंढरीत पाच लाख भाविक; अवघी पंढरी विठूनामाने दुमदुमली

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर

आसमंत व्यापून टाकणारा टाळ मृद्ंगाचा गजर, माउली..,माउली..,नामाचा अखंड जयघोष करीत सर्वात मोठे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाखरीच्या उभ्या व गोल रिंगणात अश्‍वांनी नेत्रदीपक दौड करून लाखो वैष्णवांच्या डोळ्याचे पारणे फेडले. उडीच्या खेळानंतर हा सोहळा वाखरीकडे मार्गस्थ झाला. संत ज्ञानदेव, संत तुकाराम, संत सोपानकाका यांच्यासह भागवत धर्माची पताका उंचावत सुमारे लाखो वैष्णवांसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले संतांचे पालखी सोहळे बुधवारी सायंकाळी वाखरी मुक्कामी विसावले. या रिंगण सोहळ्यासाठी पंढरपूरमध्ये दाखल झालेले शेकडो भाविक नयनरम्य रिंगण सोहळा पाहण्यासाठी वाखरी येथे पोचले होते. दरम्यान नवमीच्या सायंकाळी पांढरी नगरीत पाच लाखापेक्षा जास्त भाविकांनी गर्दी केली असून, अवघी पंढरी नगरी विठूनामाचा जयघोषाने दुमदुमून गेली आहे.

भंडीशेगांव मुक्कामी पहाटे सोहळा प्रमुख अॅड. अजित कुलकर्णी यांच्या हस्ते माउलींची विधीवत पूजा करण्यात आली. दिवसभर माउलींच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. कांदेनवमीच्या निमित्ताने पालखी तळावर कांदेनवमी साजरी करण्यात आली. दुपारचे भोजन घेऊन हा सोहळा शेवटच्या वाखरी मुक्कामाकडे मार्गस्थ झाला.

पोलिसांनी पालखी मार्गावरील वाहतूक सुरळीत केल्याने दुपारी अडीच वाजता हा सोहळा बाजीराव विहीर येथे उभ्या रिंगणासाठी पोहोचला. रिंगण सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. या गर्दीतच पोलिसांच्या मदतीने चोपदारांनी रस्त्यावरच उभे रिंगण लावून घेतले. दुपारी पावणे तीन वाजता अश्‍व धावण्यासाठी सोडण्यात आले. पुढे स्वाराचा अश्‍व तर मागे माउलीचा अश्‍व धावत होता. आकाशात ढगांनी गर्दी केली होती. पावसाळी वातावरण तयार झाले होते. अशा ढगाळ वातावरणात टाळ मृद्ंगाच्या गजरात माउली...माउली... नामाचा अखंड जयघोष चालू होता. अश्‍वांनी धावत जाऊन माउलींना एक प्रदक्षणा पूर्ण केली. त्यानंतर पुन्हा रथाजवळ येवून माउलींचे दर्शन घेतले. नारळ, प्रसाद घेवून हे दोन्ही अश्‍व पुन्हा पंढरीच्या दिशेने धावत गेले. यावेळी पुंडलिक वरदा, हरी विठ्ठल.., असा जयघोष वैष्णवांनी केला. उभ्या रिंगणाचा सोहळा संपल्यानंतर गोल रिंगणासाठी हा सोहळा रस्त्यालगतच्या मैदानात पोहोचला.

तुकोबारायांचे उभे रिंगण

संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा चार वाजता बाजीराव विहिरीजवळ पोहोचला. उभ्या रिंगणासाठी चोपदारांनी अश्‍व सोडले. अश्‍वांनी लाखो वैष्णवांच्या साक्षीने तुकोबारायांना प्रदक्षिणा घालून एक रिंगण पूर्ण केले. तुकाराम, तुकाराम असा जयघोष करीत हा सोहळा वाखरी मुक्कामासाठी मार्गस्थ झाला.

आज पालख्या पंढरीत

आज, गुरुवारी संत नामदेव महाराजांचा पालखी सोहळा पांडुरंगाचे निमंत्रण घेऊन सर्व संतांना पंढरीत नेण्यासाठी वाखरीत दाखल होईल. त्यानंतर संत ज्ञानदेव, संत तुकाराम, संत सोपानदेव, संत निवृत्तीनाथ, संत मुक्ताई, संत एकनाथ आदी पालखी सोहळे दुपारी एक वाजता तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले संत चौरंगीनाथ (केडगाव), संत चांगा वटेश्‍वर (नेवासे), संत गजानन महाराज, संत गुलाबबाबा, योगीराज संतराज महाराज, गवार शेठ लिंगायत वाणी (तुकाराम महाराजांचे टाळकरी), संत गोरोबा काका, संत जगनाडे महाराज, संताजीबाबा इस्लामपूर, संत वाल्मिकी, हरे राम हरे कृष्ण, संत नरहरी महाराज नेवासे, सद्गुरू कानिफनाथ महाराज, आनंदाश्रम स्वामी, संत डोंगरबाबा, संत गोंदवलेकर महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आदींचे पालखी सोहळे सकाळी पंढरपूरकडे विठ्ठलाच्या भेटीसाठी मार्गस्थ होणार आहेत. विसावा पादुका येथे संत ज्ञानदेव व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील शेवटचे उभे रिंगण होणार आहे. त्यानंतर आरती होईल. माउलींच्या पादुका या श्रीमंत उर्जीतसिंह शितोळे सरकार यांच्या गळ्यात दिल्या जातील व त्या पंढरपुरातील ज्ञानेश्‍वर मंदिरात नेल्या जातील.

विठुरायाच्या दर्शन रांगेत दोन लाख भाविक

आषाढी यात्रेसाठी पंढरीत दाखल झालेल्या भाविकांनी सध्या विठुरायाच्या दर्शन रांगेत मोठी गर्दी केली आहे. दर्शन रांगेत सुमारे दोन लाख भाविक उभे आहेत. बुधवारी, नवमी दिवशी देवाच्या पायावर डोके ठेवायला बारा तासाचा वेळ लागत आहे. एवढा वेळ रांगेत उभारूनही देवाच्या पायावर डोके ठेवताच सगळा शीण, थकवा दूर होऊन आत्मिक समाधान मिळाल्याच्या प्रतिक्रिया भाविकांनी व्यक्त केल्या. संत ज्ञानेश्वर माउलीसह सर्वच मनाच्या पालख्या अंतिम मुक्कामाला पोचल्या असताना मोठ्या संख्येनी भाविक शहरात दाखल झाल्याने विठुरायाच्या पदस्पर्श दर्शन रांगेत जवळपास दोन लाख भाविक दाखल झाले आहेत. ही दर्शन रांग सध्या गोपाळपूर येथील ९ व्या पत्राशेडमध्ये पोचली असून, चंद्रभागेच्या तीरावरून सात माजली दर्शन मंडपातून मंदिरात पोचायला भाविकांना बारा तासांचा अवधी लागत आहे. यंदा रांगेतील नेहमीच्या घुसखोरीच्या जागेचे सर्व चोर मार्ग बंद केल्याने घुसखोरी बंद झाली आहे. नव्याने उभ्या केलेल्या स्कायवॉकमुळे रांगही झटपट पुढे सरकत आहे.

अशी आहे दर्शन रांग

मंदिरापासून सात किलोमीटरपर्यंत दर्शन रांगेची व्यवस्था

संपूर्ण दर्शन रांगेवर पावसापासून संरक्षणासाठी आच्छादन

रांगेत भाविकांना पिण्यास मिनरल वॉटरची व्यवस्था

रांगेत स्पिकरवर अभंग आणि भक्तीगीते

दर्शन रांगेतून स्वच्छतागृहात जाणाऱ्यांना पास देण्याची सोय

सुरक्षा यंत्रणा सतर्क, आरोग्य सुविधा उपलब्ध.

कर्नाटकच्या विठ्ठल भक्तांकडून भोजन

विठुरायाच्या दर्शन रांगेतील कोणताही भाविक उपाशी पोटी विठुरायाच्या दर्शनास जाऊ नये यासाठी कर्नाटकमधील विठ्ठल भक्त दानेश्वर महाराज रोज जवळपास एक लाखापेक्षा जास्त भाविकांना पोटभर भोजन देत आहेत. गेल्या पाच दिवसांपासून सुरू झालेल्या येथील चुली आता आषाढी यात्रा संपल्यावरच शांत होणार आहेत. बागलकोट जिल्ह्यातील बंडीगणीमठ येथील चक्रवर्ती दानेश्वर महाराज विठ्ठल भक्त आहेत. मात्र आषाढी यात्रेतील लाखो भाविकांना त्यांचा परिचय गेल्या वर्षापासून झाला आहे. वारकऱ्यांसाठी त्यांनी मोफत भोजन व्यवस्था सुरू केली आहे. गोपाळपूर येथील दर्शन रांगेत असलेल्या प्रत्येक भाविकाला दिवसाच्या २४ तासांत एकदा तरी पोटभर खाऊ घालून दर्शनासाठी पाठविण्याचे नियोजन दानेश्वर महाराज आणि त्यांचे अनुयायी करीत आहेत. मठाच्या २२० एकर सुपीक जमिनीत पिकलेला प्रत्येक धान्याचा दाणा भाविकांच्या मुखात घालायचे वेड, त्यांना आहे. शेतात पिकणारे गहू, तांदूळ, डाळी, भाजीपालासह सर्व धान्य महाराज वारकऱ्यांना अन्नदान करून संपविता. कर्नाटकात त्यांचा मोठा अनुयायी वर्ग असून, त्यांच्या मठात जमा झालेली दक्षिण आणि देणग्यांचा वापर देखील याच कामासाठी केला जातो. मराठीच गंधही नसलेल्या दानेश्वर यांना भक्तीची भाषा चांगली अवगत झाली आहे.

सुवासिनींची ओटी भरून मानाचे जेवण

यंदा प्रत्येक सुवासिनीला भोजनापूर्वी चोळीखंण देऊन ओटी भरून त्यांना मानाने भोजन दिले जात आहे. भाविकांना दर्शन रांगेत विठ्ठल भेटल्याचा आनंद होत असतो. दर्शन रांगेशिवाय गोपाळपूरकडे निघालेल्या प्रत्येक भाविकालाही भोजन दिले जात आहे. रोज लाखभर भाविकांना भोजन देण्याची व्यवस्था देखील अतिशय सुसज्ज आहे. काही वाहनात चुलीसाठी लाकूडफाटा, तर काही वाहनात धान्याची पोती, तेलाचे डबे आणि रोज भोजनासाठी लागणारे साहित्य भरून ठेवले आहे.

भक्तिवेदांतमध्ये उपचार

पालखी सोहळ्यासोबत पायी चालून थकलेल्या भाविकांना पुन्हा दर्शन रांगेत उभे राहिल्यावर थकवा जाणवत असल्याने या ठिकाणी हरे राम हरे कृष्णच्या वतीने सुरू केलेल्या भक्तिवेदांत या रुग्णालयात मोठ्या प्रमाणात भाविकांवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. यात्रेसाठी सुरू केलेल्या या तात्पुरत्या रुग्णालयाचे वैशिष्ट म्हणजे या ठिकाणी मोठ्या हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. अनेक तज्ज्ञ डॉक्टरांची टीम २४ तास उपलब्ध करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आजि दिनु कौतुकाचा, सोहळा आषाढीचा

$
0
0

पंढरपूर :
आजि दिनु कौतुकाचा,
सोहळा आषाढीचा

अशी भावना मनात जपत राज्याच्या कानाकोपऱ्यांतून सुमारे दहा लाख भाविक पंढरी नगरीत दाखल झाले आहेत. शुक्रवारी पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची सरकारी पूजा होणार आहे. गेले पंधरा दिवस आळंदी, देहूसह, पैठण, मुक्ताईनगर, शेगाव आदी ठिकाणांसह विविध भागांतून विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने चालत आलेल्या वारकऱ्यांचे श्रम शुक्रवारी आषाढी एकादशीदिवशी विठ्ठल दर्शनाने सार्थकी लागतील.
गुरुवारी सायंकाळी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्यासह सर्व संतांच्या पालख्यांनी पंढरीत प्रवेश केल्याने शहरात भाविकांचा महासागर उसळला. पालख्यांच्या स्वागतासाठी भाविक रस्त्याच्या दुतर्फा उभे होते. दुपारी एक वाजता श्री संत नामदेव महाराज हे पांडुरंगाचे निमंत्रण घेऊन वाखरीत दाखल झाले. त्यानंतर या मानाच्या पालख्या पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाल्या. वाखरी ते पंढरपूर हा भक्तीमार्ग टाळ, मृदुंगांच्या गजरात व हरिनााच्या जयघोषात दुमदुमुन गेला. काही दिंड्यांमध्ये खेळही झाले.
संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा सायंकाळी पाच वाजता इसबावी येथे पोहोचला. तेथे उभे रिंगण झाले. सोहळ्यातील अखेरचे रिंगण वारकऱ्यांच्या डोळ्याचे पारणे फेडणारे ठरले. संत ज्ञानराजांचा पालखी सोहळा वाखरी मुक्कामानंतर ओढा पार करून पुरंदरे मळ्याजवळ पोहोचला. येथे माऊलींची पालखी मुख्य रथातून उतरवून ती पारंपरिक प्रथेनुसार भाटे याच्या रथात ठेवण्यात आली. त्यानंतर वडार समाजातील भाविकांनी हा रथ ओढत इसबावी येथील पादुका मंदिरापर्यंत आणला. भाविकांनी खारीक, बुक्याची मुक्तपणे उधळून करीत माउलींच्या पादुकांचे दर्शन घेतले. तेथे उभे रिंगण झाले. आरतीनंतर सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळफकर यांनी ज्ञानराजांच्या पादुका ऊर्जितसिंह शितोळे सरकार यांच्या हातात दिल्या. त्या घेऊन ते विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरीकडे मार्गस्थ झाले.



मंत्रिमंडळ पंढरीत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सपत्नीक गुरुवारीच पंढरपुरात दाखल झाले. त्यांच्या समवेत कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर , माजी मंत्री एकनाथ खडसे, पाणीपुरवठा मंत्री बबन लोणीकर, सदाभाऊ खोत आदी मंत्रीही आले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्य कृषी प्रदर्शनाचे उद््घाटन करण्यात आले. भाविकांना परत जाताना शेतीतील अद्यावत उपकरणे उपलब्ध व्हावीत, या हेतूने हे प्रदर्शन भरविल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'बा विठ्ठला, महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होऊ दे'

$
0
0

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पांडुरंगाला साकडे

मटा ऑनलाइन वृत्त । पंढरपूर

राज्यावरचे अवर्षणाचं संकट दूर कर, राज्यातला शेतकरी सुखी होऊन हे राज्य सुजलाम् सुफलाम् व्हावे असे, साकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे पांडुरंग चरणी घातले.

पंढरपूर येथे आज आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री फडणवीस व पत्नी अमृता फडणवीस यांच्याहस्ते शासकीय महापूजा संपन्न झाली. त्यानंतर आयोजित सत्कार समारंभात मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्री पुढे म्हणाले, राज्यातील शेतकरी सुखी झाला तर राज्य सुखी होईल. भागवत धर्म-वारकरी संप्रदायाने महाराष्ट्राला एक वेगळी सांस्कृतिक ओळख निर्माण करून दिली. या परंपरेने ऊर्जा, संस्कार व समता मानवी जीवनाला बहाल केल्या. प्रत्येक आषाढी ही निर्मल वारी व्हावी यासाठी राज्य शासनातर्फे सर्वोतोपरी प्रयत्न केले जातील, असे सांगून बा! विठ्ठला राज्यात भरपूर पाऊस पडू दे, अशी आळवणी मुख्यमंत्र्यांनी केली.

यावेळी अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मौजे फुंदे टाकळी येथील मानाचे वारकरी हरिभाऊ फुंदे व त्यांच्या पत्नी सुनिता फुंदे यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच एस.टी. महामंडळातर्फे त्यांना वर्षभर मोफत प्रवासाचा पास प्रदान करण्यात आला.

यावेळी कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, पशुसंवर्धन, मत्स्य व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर, सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख, पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम्, मंदिर समितीचे सभापती तथा जिल्हाधिकारी रणजीत कुमार आदींची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी संत निवृत्तीनाथांच्या जीवन कार्यावर सचिन परब व श्रीरंग गायकवाड लिखित रिंगण नावाच्या वार्षिक विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​संत निवृत्तीनाथांवरील विशेषांकाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त। पंढरपूर

संत परंपरेचा समाजिक आणि सांस्कृतिक मागोवा घेणाऱ्या 'रिंगण'च्या संत निवृत्तीनाथ विशेषांकाचं प्रकाशन पंढरपूरच्या श्रीविठ्ठल मंदिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं.

या विशेषांकात डॉ. सदानंद मोरे, डॉ. रावसाहेब कसबे, अभय टिळक, श्यामसुंदर मिरजकर यांच्यासह अनेक मान्यवर लेखक-पत्रकारांचे लेख आहेत.

महाराष्ट्राला घडवणाऱ्या ज्ञानेश्वर माउलींना घडवणारी 'महा'माऊली, ज्ञानेश्वरीची मूळ प्रेरणा, नाथ आणि वारकरी विचारांना जोडणारे समन्वयक,संत चळवळीने घडवलेल्या क्रांतीचे आधारवड, अशा निवृत्तीनाथांच्या अनेक पैलूंची मांडणी करण्याचा प्रयत्न या अंकात करण्यात आला आहे.

या विशेषांकाचे संपादन पत्रकार सचिन परब आणि श्रीरंग गायकवाड यांनी केलं असून चित्रकार भास्कर हांडे यांनी या अंकाचं मुखपृष्ठ रेखाटलं आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळाचे संकट दूर करमुख्यमंत्र्याचे पांडुरंगाला साकडे

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर

'राज्यावरचे दुष्काळाच संकट दूर कर, राज्यातील शेतकऱ्यांना सुखी करून महाराष्ट्र सुजलाम सुफलाम कर,' असे साकडे विठ्ठलाच्या चरणी घातल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांना सांगितले. विठ्ठल-रखुमाईच्या सरकारी महापूजनेनंतर मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्र्‍यांबरोबर महापूजेला बसण्याचा मान अहमदनगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातील फुंदे टाकळी गावचे वारकरी हरिभाऊ फुंदे व त्यांच्या पत्नी सुनीता फुंदे यांना मिळाला. सुमारे दहा लाख भाविकांच्या उपस्थितीत आषाढी एकादशीचा महासोहळा पार पडला.

विठ्ठल मंदिरात शुक्रवारी पहाटे दोन वाजून वीस मिनिटांनी मुख्यमंत्री फडणवीस मंदिरात पोहोचले. अग्नि, तेज, वायू, ऊर्जा, जल यांचे पूजन करून मुख्यमंत्र्यांसमवेत मानाचे वारकरी फुंदे यांनी सपत्नीक विठ्ठलाला अभिषेक केला. महापूजेनंतर विठूरायाला तलम रेशमी भरजरी गुलाबी अंगरखा, जरीकाठाचे पिवळे धोतर, अंगावर जरीचे उपरणे, मस्तकी सोन्याचा मुकुट तसेच गळ्यात तुळशीमाळा, पुष्पहार, कपाळाला चंदन टिळा व बुक्का लावण्यात आला. विठ्ठलाच्या महापूजेनंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रुक्मिणी मातेची महापूजा करण्यात आली. पौराणिक महत्त्व असणाऱ्या गरूड खांबाला मिठी मारून आपल्या मनातील संकल्प व्यक्त केला.

या वेळी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, पशुसंवर्धन, मत्स्य व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर, सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख, पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम्, मंदिर समितीचे सभापती तथा जिल्हाधिकारी रणजित कुमार, आमदार सुरेश खाडे आदी उपस्थित होते.

वर्षभर मोफत प्रवास

अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मौजे फुंदे टाकळी येथील मानाचे वारकरी हरिभाऊ फुंदे व त्यांच्या पत्नी सुनीता फुंदे यांचा फडणवीस दाम्पत्याच्या यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच एसटी महामंडळातर्फे त्यांना वर्षभर मोफत प्रवासाचा पास प्रदान करण्यात आला. संत निवृत्तीनाथांच्या जीवन कार्यावर सचिन परब व श्रीरंग गायकवाड लिखित रिंगण नावाच्या वार्षिक विशेषांकाचेही प्रकाशन करण्यात आले.

दहा लाख वैष्णवांचा मेळा

आषाढी यात्रेसाठी पंढरीस आलेल्या सर्व संतांच्या पालख्यांनी व सुमारे दहा लाख वारकऱ्यांनी पंढरी नगरी दुमदुमुन गेली. चंद्रभागेत स्नान करून वारकऱ्यांनी विठ्ठलाच्या दर्शनासाठी दूरवर रांगा लावल्या. संत ज्ञानदेवांच्या पादुकांना सकाळी आठ वाजता सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर यांनी चंद्रभागेत स्नान घातले. तेथून त्या दर्शनासाठी मंदिरात आणण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोयना धरणात २४ टीएमसी पाणी

$
0
0

कराड : येथील कोयना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कमी झाला असला तरीही कमी अधिक पावसामुळे शिवसागर जलाशयातील पाण्याची आवक सुरूच आहे. कोयना धरणात गुरुवारी सायंकाळी २३.६५ टीएमसी पाणीसाठा होता. कराड व पाटण परिसरात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे येथील कोयना तर पाटणमधील केरा या दोनही नद्यांना पूर आला असून त्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत.
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या पावसाचा गुरुवारी जोर कमी झाला होता. त्यामुळे सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोयना येथे ८, नवजा १२ व महाबळेश्वर येथे १४ मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे.
पाटणसह परिसरात दिवसभर पावसाची संततधार सुरूच असून, एक जूनपासून आजपर्यंत नवजा व महाबळेश्वर येथील पावसाने एक हजार मिलिमीटरचा टप्पा पार केला आहे. या पावसामुळे धरणांतर्गत विभागातील छोट्या नद्या, ओढे, नाले, धबधब्यातून धरणातील पाण्याची आवक झाली आहे. गुरुवारी दिवसभर पावसाने बऱ्यापैकी उसंत दिली. येथील शेतकऱ्यांच्या पेरणीची कामे पूर्ण झाली असली तरी पडत असलेल्या पावसामुळे पेरणीनंतरची कोळपणी आणि भांगलण अशी कामे ठप्प झाली होती.आज पावसाने थोडी उसंत दिल्याने ही कामे सुरू झाली आहेत.मात्र काहींच्या शेतामध्ये गुडघागुडघाभर पाणी साचले असल्याने कोळपणी व भांगलणीच्या कामात अडचणी निर्माण होत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जवानाचा कवायतीदरम्यान मृत्यू

$
0
0

सातारा

जम्मू येथे सैन्यदलात कवायत करीत असताना सातारा तालुक्यातील कामथी येथील जवान लक्ष्मण शिवाजी चव्हाण (वय ३४) यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. ही वार्ता समजताच गावात शोककळा पसरली. त्यांचे पार्थिव गावी आणण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. जवान लक्ष्मण चव्हाण हे २००४मध्ये भोपाळ येथून सैन्यात दाखल झाले. त्यांनी आजवर अमृतसर, श्रीनगर, हैदराबाद आणि जम्मू येथे कर्तव्य बजावले. ते १६२ ईएमई फिल्ड वर्कशॉप नाईक पदावर कार्यरत होते. ही घटना बुधवारी (दि. ६) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. लक्ष्मण चव्हाण यांचे प्राथमिक शिक्षण कामथी येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये, तर उच्च शिक्षण सातारा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयात झाले. २००६ मध्ये त्यांचा विवाह झाला असून, त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, पुतणे असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


माउली बरड मुक्कामी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा

वाट पाहे बाहे निढळी ठेवुनियां हात।

पंढरीचे वाटे दृष्टी लागलेसें चित्त।।

या संत तुकोबारायांच्या अभंगाप्रमाणे विठ्ठल भेटीच्या ओढीने पंढरीस निघालेला श्री संत ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा सातारा जिल्ह्यातील शेवटच्या बरड मुक्कामी सायंकाळी दाखल झाला. टाळ, मृदुंगाच्या गजरात व हरीनामाच्या जयघोषात अखंडपणे वाटचाल करीत वारकरी पंढरीच्या ओढीने निघाले आहेत.

पहाटेच्या नगाऱ्याने वारकऱ्यांना जाग आली. पहाटे पालखी सोहळा प्रमुख डॉ. अजित कुलकर्णी यांच्या हस्ते माउलींची पूजा व अभिषेक घालण्यात आला. माउलींच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. एका दिवसांच्या विश्रांतीनंतर सकाळी साडेसहा वाजता हा सोहळा बरड मुक्कामासाठी मार्गस्थ झाला.

सकाळी सव्वा नऊ वाजता सोहळा विडणी हद्दीत पोहोचला. ग्रामस्थांनी माउलींसह सोहळ्याचे उत्साही स्वागत केले. त्यानंतर सोहळा सकाळच्या न्याहरीसाठी विडणी येथे विसावला. शेतामध्ये वारकऱ्यांनी सकाळची न्याहरी उरकली. सकाळची न्याहरी उरकून दुपारच्या भोजन व विश्रांतीसाठी हा सोहळा पिंपरदकडे मार्गस्थ झाला. दुपारी बारा वाजता पिंपरद येथे पोहोचल्यानंतर सोहळ्याने दुपारचे भोजन व विश्रांती घेतली. भोजनानंतर हा सोहळा दुपारी दोन वाजता निंबळक फाटाकडे मार्गस्थ झाला. निंबळक फाटा येथील विसाव्यानंतर सोहळा सायंकाळी साडेपाच वाजता बरड येथील पालखी तळावर पोहोचला. समाजआरतीनंतर हा सोहळा बरड येथे विसावला.

आज सोलापूर जिल्ह्यात प्रवेश

आळंदीहून निघालेला संतश्रेष्ठ श्री ज्ञानराजांचा पालखी सोहळा आपल्या वैभवी लवाजम्यासह आज, शनिवारी सकाळी अकरा वाजता धर्मपुरी येथे सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करेल. सोलापूर जिल्हा प्रशासनाने या सोहळ्याच्या स्वागताची जय्यत तयारी केली केली आहे.

गोल रिंगणाच्या जागेत बदल

सदाशिवनगर येथील माउलींच्या पहिल्या गोल रिंगणाच्या जागेत बदल करण्यात आला आहे. येथील शंकरराव मोहिते-पाटील कारखानास्थळावर यापूर्वी रिंगण होत होते. मात्र, ती जागा अपुरी पडत होती. त्यामुळे कारखानास्थळापासून पुढे पाचशे मीटर अंतरावर रिंगण आयोजित करण्याचा निर्णय समाज आरतीनंतर झालेल्या पालखी विश्वस्तांच्या बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती पालखी सोहळा प्रमुख डॉ. अजित कुलकर्णी यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोयनेत धुवाँधार२४ तासांत ४.६१ टीएमसीने वाढ

$
0
0


कराड :

कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह पाटण व कराड तालुक्यांत दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर धुवाँधार पावसाला सुरूवात झाली आहे. गेल्या २४ तासांमध्ये कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयाच्या पाणीसाठ्यात तब्बल ४.६१ टीएमसीने वाढ झाली आहे. गेल्या नऊ तासांमध्ये कोयना पाणलोट क्षेत्रामध्ये १३५ मिलीमीटर व नवजा येथे १४६ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. सध्या शिवसागर जलाशयामध्ये ३०.२७ टीएमसी इतका पाणीसाठा झाला असून, २८ हजार ८६ क्युसेक वेगाने पाण्याची आवक होत आहे.

दरम्यान, कोयना पाणलोट परिसरात पडत असलेल्या संततधार जोरदार पावसामुळे कोयना नदीला पूर आला असून, संगमनगर (धक्का) येथील जुना पूल पाण्याखाली गेला आहे. संततधार पावसामुळे डोंगरपठारावरील गावांमध्ये गारठ्याने हुडहुडी भरली आहे.

पाटण बसस्थानकात पाणीच पाणी

पाटण शहरामध्ये गेल्या चोवीस तासांत जोरदार वाऱ्यासह संततधार पावसाची बरसात सुरू असल्याने पाटणच्या नवीन बसस्थानकात पाणीच पाणी झाले होते. रात्रीच्यावेळी मुसळधार पावसासह घोंगावणाऱ्या वाऱ्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सातारा जिल्ह्यात जनजीवन विस्कळित

$
0
0



सातारा : जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असून या परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. एकीकडे कास-बामणोली परिसरात शेतकऱ्यांची भात लागणीची झुंबड उडाली असून दुसरीकडे या परिसरातील पावसाळी निसर्ग अनुभवण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक कास परिसरात दाखल झाले आहेत. कास पठारावर दाट धुक्यात मुसळधार पावसात तरुणाई चिंब भिजताना व नाचतानाही दिसत आहे. कास पठारासह वजराई, भांबवली धबधबा व बामणोली बोटींग या पर्यटन स्थळीही पर्यटक गर्दी करू लागले आहेत.
सातारा पोलिसांची पीसीआर व्हॅन ही पारांबे फाट्यापर्यंतच येत असल्याने धुडघुस घालाणार्या युवकांवर कोणाचेही नियंत्रण असल्याचे दिसत नाही. कास पठार व कास तलावापुढे बामणोली, भांबवली- वजराई धबधबा परिसरात काही ठिकाणी बेधुंद झालेले युवक दिसतात. याचा सहकुटुंब फिरायला आलेल्या पर्यटकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्याकरीता सांबरवाडीजवळच सर्व वाहनांची तपासणी होणे गरजेचे आहे.
कास पठारापासून कास गावापर्यंत रस्त्याच्या बाजूचे नाल्यांचे खोदकाम न केल्याने संपूर्ण परिसरात पडणाऱ्या पावसाचे पाणी हे पूर्ण रस्त्यातच येत असल्याने चारचाकींसह दुचाकी वाहनचालकांना कसरत करत वाहने चालवावी लागत आहेत. कास तलाव हा पहिल्याच पावसात पूर्ण भरल्याने दुथडी भरुन वाहत आहे. परिसरात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे कास-बामणोली पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे बामणोली भागात जाणारी वाहतूक अधून मधून ठप्प होत आहे. दरम्यान संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयाच्या पाणी पातळीत वेगाने वाढ होत आहे. जिल्ह्यात आज पहाटे आणि काल दिवसभरात एकूण ६०८ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत एकूण सरासरी ५५.३ मिमी पाऊस झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सातारा जिल्हा परिषदेचे सुभाष नरळे अध्यक्ष

$
0
0



सातारा : सातारा जिल्हा परिषेदच्या अध्यक्षपदी माण तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुभाष नरळे यांची निवड झाली. ते माजी आमदार सदाशिवराव पोळ यांचे समर्थक आहेत. नरळे यांच्या निवडीनंतर फटाक्याची आतिषबाजी व गुलालाची उधळण करत राष्ट्रवादी समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला.
सोमवारी सकाळी सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षनिवासस्थानी राष्ट्रवादीच्या सर्व सदस्यांच्या झालेल्या बैठकीत ही निवड झाली. बैठकीला विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आमदार प्रभाकर घार्गे, माजी खासदार लक्ष्मणराव पाटील आदींच्या उपस्थितीत सुभाष नरळे यांमया नावावर शिक्कामोर्तब झाले. सोमवारी निवडणुकीवेळी सुभाष नरळे यांनी राष्ट्रवादीमच्या वतीने तर राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने महादेव कोंडीराम पोफळे, यांनी अर्ज दाखल केला होता. पोफळे यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे नरळे यांची बिनविरोध निवड झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोयनेत ४४ टीएमसी पाणीसाठा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड

कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह पाटण तालुक्यात बुधवारी पावसाचा जोर कमी झाला. बुधवारी दिवसभर पावसाने उघडीप दिली होती. पावसाचा जोर कमी झाल्याने नद्यांच्या पाणीपातळीतही घट झाली आहे. त्यामुळे संगमनगर (धक्का) येथील जुना पूल पुन्हा वाहतुकीस खुला झाला आहे. शिवसागर जलाशयातील पाण्याची आवकही कमी झाली आहे. तरीही बुधवारी कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयात ५२ हजार ७७३ क्युसेक वेगाने पाण्याची आवक होत आहे. सायंकाळी पाच वाजता शिवसागर जलाशयात ४४ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

दरम्यान, मोरणा विभागाला वरदायिणी ठरणारे व १.३० टीएमसी पाणीसाठवण क्षमता असणारे मोरणा-गुरेघर धरण पूर्ण क्षमतेने ओसांडून वाहू लागले आहे. कुंभार्ली घाटामध्ये मंगळवारी पडलेली दरड मंगळवारी रात्री उशिरा काढल्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरू झाली.

बुधवारी १३ रोजी सकाळी आठ ते सायंकाळी पाचवाजेपर्यंत कोयनानगर येथे ४२, नवजा ४६, महाबळेश्वर २१ मिलीमीटर पाऊस पडला असून, शिवसागर जलाशयाची पाणीपातळी २१०० फूट झाली आहे.

पाटण तालुक्यातील पावसाचे प्रमाण कमी झाल्याने संगमनगर (धक्का), उरूल, ठोमसे, कडवे, मोरगिरीसह पाण्याखाली गेलेल्या सर्व साकव पुलांवरील पाणी कमी झाल्याने वाहतूक पूर्ववत सुरू झाली आहे. त्यामुळे जनजीवन पूर्वपदावर आले आहे. तसेच मोरणा विभागातील मोरणा-गुरेघर धरण पूर्ण क्षमतेने भरून ओसांडून वाहू लागल्याने मोरणा नदीच्या पाणीपातळीतही चांगलीच वाढ झाली आहे. गेल्या चार दिवसांपासून कराड व पाटण तालुक्यात पडत असलेल्या पावसामुळे अनेक शेतांमध्ये पाणी साचल्याने पिके पाण्याखाली गेली आहेत.

२० घरे, १८ दुकानांमध्ये पाणी शिरले

गेल्या चार दिवसांपासून पडलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील रुक्मिणी पार्क परिसरातील २० घरांसह, कोल्हापूर नाका, उपजिल्हा रुग्णालय परिसरातील १८हून अधिक दुकान गाळ्यांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी गटारे तुंबून पाणी रस्त्यावर आले. पोपटभाई पंप परिसरात रस्त्यावर पाणी आल्याने दोन तास वाहतूक ठप्प झाली होती.

तेरा गावे पूर्णपणे अंधारात

कोयना धरण जलाशयाच्या काठावरील तेरा गावांत गेल्या पंधरा दिवसांपासून वीजपुरवठा खंडित आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर व बफर झोनमध्ये ही गावे असून, सभोवताली घनदाट जंगल व सततचा पाऊस यामुळे येथील जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images