Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

‘ति’नं घेतला व्यसनमुक्तीचा वसा

$
0
0

Janhavi.Sarate@timesgroup.com

कोल्हापूर : गेल्या ३५ वर्षांपासून दररोज तंबाखूची मशेरी लावण्याच्या सवयीमुळे वयाच्या ७२ व्या वर्षी गंगुबाई घेवडे अन्ननलिकेच्या कॅन्सरने त्रस्त झाल्या. कॅन्सरमुळे झालेला हा त्रास सहनशक्तीच्या पलीकडचा होता. तीन महिन्यांपूर्वी यशस्वी उपचार झाल्यानंतर गंगुबाई यांनी आता गावात व्यसनमुक्तीची चळवळ सुरू केली असून, गावातील काही महिलांनी मशेरी लावणे सोडले आहे. गंगुबाई घेवडे यांची कॅन्सरनंतर गाव व्यसनमुक्त करण्यासाठी उभारलेल्या चळवळीची ही कहाणी इतरांसाठीही विचार करायला लावणारी आहे.

कागलच्या गंगुबाई याचं जीवनच खेड्यात गेलेलं. रोज सकाळी, संध्याकाळी तसेच आजूबाजूच्या महिलांबरोबर गप्पा मारताना तर कधी तलफ आली की, तंबाखूची मशेरी लावण्याची सवय त्यांना वयाच्या ३७ व्या वर्षापासून लागली. मुलगा, सून नेहमीच हे व्यसन सोडण्यासाठी प्रयत्न करत, पण सवय इतकी जडलेली की, ती सोडणे त्यांना कठीण झाले. दररोज मशेरी लावल्यामुळे वयाच्या ७२ व्या वर्षी अचानक अन्न गिळणे अशक्य होऊ लागले. काही दिवसांनंतर तर पाणीही गिळणे कठीण झाले. त्यावेळी डॉक्टरांनी तपासणी केली, काही चाचण्या केल्यानंतर त्यांना अन्ननलिकेचा कॅन्सर झाल्याचे निदान आले. व्यसनामुळे जीवन-मरणाच्या उंबरठ्यावर आणून ठेवल्याचं भान आलं. त्यानंतर सुरू झाले औषधोपचार. आजारामुळे त्यांचं वजन तब्बल पंधरा किलोनं कमी झालं. अखेर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. मात्र, शस्त्रक्रिया करणे जीवाला धोक्याचे होते. डॉ. सूरज पवार यांच्या सल्ल्यानुसार प्रथम किमोथेरपी आणि रेडिओथेरपी करण्यात आली. त्यानंतर ओपन सर्जरी न करता दुर्बिनीच्या माध्यमातून शस्त्रक्रिया करण्यात आली. यामध्ये कॅन्सर झालेली अन्ननलिका काढून नवीन अन्ननलिका बसविण्यात आली. नव्या तंत्रज्ञानाचा वापर करत अवघ्या तीन तासांत ही शस्त्रक्रिया केली.

अवघ्या तीन-चार महिन्यांपूर्वी केलेल्या शस्त्रक्रियेनंतर गंगुबाईंची तब्येत आता सुधारली आहे. त्यांनी गावातील आसपासच्या महिलांना मशेरीची सवय सोडवायला भाग पाडले असून, सध्या त्या आणि त्यांचा मुलगा गावातील महिलांच्या व्यसनमुक्तीसाठी चळवळ उभारत आहेत. मशेरी लावणाऱ्या गावातील महिलांना त्या कॅन्सरमुळे होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक वेदना किती भयंकर असतात ते पटवून देण्याचा प्रयत्न करतात. ह्या आजारापेक्षा हे व्यसन सोडलेले चांगले असे त्या आवर्जून सांगतात.

पवार टेक्निक

अन्ननलिकेच्या कॅन्सरवर आधुनिक व नवीन पद्धतीने दुर्बिनीद्वारे शस्त्रक्रिया करण्यात येत असल्यामुळे त्याचा रुग्णांचा फायदा होत आहे. 'थोरॅकोस्कोपिक इसोफॅजेक्टॉमी इन डॉरसोलॅटरल पोझिशन -द पवार टेक्निक' हे त्यांचे विकसित टेक्निक जगभर मान्यप्राप्त झाले आहे. अन्ननलिकेच्या कॅन्सरवर आधुनिक शस्त्रक्रिया जगात प्रथमच डॉ. सूरज पवार यांनी विकसित केली असून, जगभरात याच पद्धतीने शस्त्रक्रिया होत आहेत.

कॅन्सर झाल्यानंतर खूप त्रास सहन करावा लागला. हा त्रास पाहूनच मुलीसह गल्लीतील अनेक महिलांनी मशेरी लावणे सोडले आहे. प्रत्येकाला हे व्यसन सोडण्यासाठी समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे.

गंगुबाई घेवडे, रुग्ण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गवंड्याच्या मुलाचा यशाचा मजला

$
0
0

yashwant.patil@timesgroup.com

कोल्हापूरः वडील गवंडीकाम करणारे. आर्थिक परिस्थिती बेताची. आज इथे तर उद्या तिथे. मिळेल तिथे काम करत संसाराचा गाडा हाकणारे. पत्नी, दोन मुलांसह चौघांचा संसार सांभाळताना तारेवरची कसरत व्हायची. वडिलांची होणारी परवड पाहून मुलाने मदतीचा हात दिला. शाळा, अभ्यास सुरू असतानाच तो वडिलांबरोबर सुटीच्या दिवशी व शक्य होईल तेव्हा कामाला जाऊ लागला. मात्र, काम करत असतानाही अभ्यासातही कमी पडायचे नाही हा निर्धार करून त्याची वाटचाल सुरू होती. त्याच्या या जिद्दीला आणि कष्टाला यश आले आणि त्याने नुकत्याच जाहीर झालेल्या दहावी परीक्षेच्या निकालात ८४ टक्के गुण मिळवत यशाचा मजला चढला. ही यशोगाथा आहे पाचगाव (ता. करवीर) च्या मगदूम कॉलनी येथील दीपक सुभाष पाटील या गवंड्याच्या मुलाची.

दीपकचे मूळ गाव बेळगाव जिल्ह्यातील रणकुंडये. परिस्थिती बेताची. वडील सुभाष यांचे शिक्षण दहावीपर्यंत. वडिलोपार्जित थोडीशी जमीन, तीही कोरडवाहू. त्यामुळे सुभाष यांनी वीस वर्षांपूर्वी गाव सोडले आणि कोल्हापूर गाठले. शिक्षण अपुरे त्यामुळे सुभाष यांनी गवंड्याच्या हाताखाली काम करत गवंडीकाम शिकून घेतले आणि मजुरीवर काम करू लागले. घरप्रपंच, मुलांचे शिक्षण, गावी आई-वडिलांचे पालनपोषण करताना सुभाष यांना नाकीनऊ यायचे. तरीही त्यांनी मुलांना परिस्थितीची जाणीव होऊ दिली नाही.

दीपकही अभ्यासात हुशार, पण वडिलांची परवड त्याला पाहवत नव्हती. त्यामुळे वडिलांना मदत करावी या उद्देशाने तो दहावीत असताना अधेमधे व दिवाळी व मे महिन्याच्या सुटीत वडिलांबरोबर कामाला जाऊ लागला. काम करत असताना तो अभ्यासाकडे दुर्लक्ष करत नसे. दिवसभर शाळा आणि संध्याकाळी व पहाटे उठून तो अभ्यास करत असे. वडिलांच्या कष्टाचे चिज करायचे असे मनाशी पक्के ठरवून शाळा, अभ्यास आणि शक्य होईल तेव्हा काम करणे असा त्याचा दिनक्रम सुरू होता.

दहावीच्या निकालाचा दिवस उजाडला. दीपक मात्र वडिलांबरोबर गवंडी कामावर गेलेला. तो कामावरूनच नेट कॅफेत निकाल पाहण्यासाठी गेला. निकाल पाहिला तर ८४ टक्के गुण मिळालेले. त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. दीपकने वडिलांना निकालाची वार्ता सांगितली आणि त्यांना गहिवरून आले. इकडे आई कविता यांचीही मुलाच्या निकालाबाबत अस्वस्थता वाढलेली. तेवढ्यात हे बाप-लेक घरी आले आणि मुलाच्या लख्ख यशाची वार्ता समजताच आईने आनंदाश्रूंना वाट मोकळी करून दिली. 'पोरानं आमच्या कष्टाचं चिज केलं,' अशी आपसुक प्रतिक्रिया त्यांच्या तोडून बाहेर पडली.

दीपक लहानपणापासून हुशार. त्यामुळे आई-वडिलांनीही त्याला काही कमी पडू दिले नाही. सातवीपर्यंत तो लक्ष्मीबाई जरगनगर शाळेत तर आठवीनंतर माध्यमिक विद्यालय कळंबा-पाचगाव या शाळेत येथे जाऊ लागला. लहानपणापासून त्याला कष्टाची सवय. त्यामुळे तो अभ्यास सांभाळून वडिलांबरोबर सुटीच्या दिवशी कामाला जात असे. दीपकमधील हुशारी आणि कष्टाची तयारी पाहून जरगनगर येथील एका खासगी क्लासचालकांनी त्याला प्रोत्साहन दिले आणि त्याच्या दहावीच्या क्लासची सोय केली. तेथील शिक्षकांचे मार्गदर्शन तसेच मुख्याध्यापक व्ही. बी. ठाकूर तसेच त्याचे सर्व शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले. दीपकनेही माझ्या यशात मुख्याध्यापक ठाकूर, शहाजी पाटील, शाळेतील सर्व शिक्षक आणि आई-वडिलांचे बहुमोल मार्गदर्शन मिळाल्याचे सांगून त्याने आपल्याला पुढे शिकून वकील व्हायचे असल्याचा मनोदयही व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेटरचे काम करून मिळवले ९० टक्के

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास असेल तर कोणत्याही परिस्थितीत राहणारा विद्यार्थी यशस्वी होतो. बिनखांबी गणेश मंदिर परिसरातील हॉटेल ओशोमध्ये वेटरचे काम करत मिळवलेल्या यशामुळे नितीन बाळू पाटील या विद्यार्थ्याच्या आनंदाला पारावर राहिला. मूळचा खेरीवडे (ता. गगनबावडा) येथील असलेल्या नितीनने दहावीच्या परीक्षेत ९०.४० टक्के गुण मिळविले.

हॉटेलमध्ये वेटरचे काम करणाऱ्या नितीनने सोमवारी दुपारी मोबाइलवरून दहावीच्या परीक्षेचा निकाल भीत-भीत 'चेक' केला अन्‌ त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्याला मिळालेल्या ९०.४० टक्के गुणांमुळे हॉटेलमधील कामगारांनी जल्लोष केला. नितीन गेल्या तीन महिन्यांपासून हॉटेलमध्ये काम करतो. दररोज आपल्यासोबत काम करणाऱ्या सहकाऱ्याने दहावीच्या परीक्षेत ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविल्याने आनंदाला पारावर उरला नाही. हॉटेलमध्ये दिवसभर वेटरचे काम करणारा नितीन हा शेळोशी (ता. गगनबावडा) येथील माध्यमिक विद्यालय आणि ज्युनीअर कॉलेजचा विद्यार्थी आहे. त्याला घरापासून हायस्कूलचे सुमारे दीड किलोमीटर अंतर पायपीट करून गाठावे लागते. कोणत्याही प्रकारचा खासगी शिकवणीचा वर्ग नाही की स्टडी रुम नाही. त्याने केवळ दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर यश मिळविले.

आई आणि वडील दोघेही शेतकरी आहेत. आई निरक्षर असून वडीलांचे शिक्षण चौथीपर्यंत झाले आहे. कुटुंबातही कोणाचेही पाठबळ नसतानाही हॉटेलमध्ये नोकरी करीत दहावीच्या परीक्षेत यश मिळविले आहे. हॉटेलमध्ये काम करुनच सुमारे दररोज पाच तास अभ्यास केला. नितीनने कोणताही कोचिंग क्लास लावला नव्हता. मुख्याध्यापक वाय. ए. पाटील आणि शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले. नितीन अकरावीसाठी श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसच्या न्यू कॉलेजमध्ये प्रवेश घेणार आहे.

घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे मिळेल ती नोकरी स्वीकारली. याच नोकरीतून कुटुंबालाही हातभार लावण्याचा प्रयत्न केला. मिळेल तेवढ्याच वेळात अभ्यास केला. अजून वेळ मिळाला असता तर आणखी गुण मिळाले असते.

- नितीन पाटील

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘केडीसीसी’ची आता १४ जूनला सुनावणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकांना अपात्रतेबाबत काढलेल्या नोटिशीबाबत सहकारमंत्र्यांकडे झालेल्या सुनावणीचा निर्णय मिळाला नसल्याने सहनिबंधकांकडे गुरुवारी होणारी सुनावणी १४ जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

बरखास्त केलेल्या जिल्हा बँकेतील संचालकांना पुढील निवडणुकीसाठी अपात्र ठरवण्याबाबतच्या नोटीसही जुना अध्यादेश रद्द केल्याने रद्द झाल्या आहेत. राज्य सरकारने नवीन अध्यादेश काढला असेल तर त्याप्रमाणे नवीन नोटीस काढून सुनावणीची प्रक्रिया सुरु करावी, अशी मागणी संचालकांचे वकील लुईस शहा यांनी सहकारमंत्र्यांकडे केलेल्या अपीलामध्ये मांडले होते.

त्यानुसार सहकारमंत्र्यांनी बुधवारी सुनावणी घेतली. मात्र निर्णय दिलेला नाही. गुरुवारच्या सहनिबंधकांच्या सुनावणीपूर्वी निर्णय अपेक्षित होता. पण तो न आल्याने अॅड. शहा यांनी सहनिबंधकांकडे पुढील तारीख देण्याची विनंती केली. त्यानुसार सहनिबंधक धनंजय डोईफोडे यांनी १४ जून ही तारीख सुनावणीसाठी दिली आहे. त्यामुळे आता आगामी काळात नेमका काय निर्णय होईल यावर पुढील प्रक्रियेची भिस्त असेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्लास्टिकने भरले नाले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

प्लास्टिक पिशव्या, बाटल्या, कचरा टाकण्यास सोपे म्हणून सहज जाता जाता गटारी, नाल्यात भिरकावले जाते. हा भिरकावलेला कचरा शहराला वेठीस धरु शकतो हे बुधवारी झालेल्या तासभराच्या पावसात दिसून आले. जयंती तसेच दुधाळी नाल्यात साऱ्या शहरातून वाहून आलेला कचरा पाहून नागरिकांचा बेदरकारपणा तसेच 'असा किती पाऊस पडणार आहे,' म्हणून महापालिका प्रशासनाने दाखवलेली निष्काळजीही स्पष्ट झाली. या साऱ्यांमुळेच घरांमध्ये पाणी घुसून नागरिकांच्या प्रापंचिक साहित्याबरोबरच वाहने, चारचाकी वाहनांना नुकसानीचा जबर फटका सहन करावा लागला आहे.

शहराचा मध्यवस्तीतील बराचसा भाग सखल आहे. तर उपनगर व शहराच्या अन्य भागातून वाहत येणारे नाले या सखल भागातूनच पुढे जातात. या नाल्यांना प्रत्येक भागातील छोट्या मोठ्या गटारी जोडल्या असल्याने नाला ओसंडून वाहू लागला की गटारी, छोटे ओढे मागे तुंबण्यास सुरुवात होते. बुधवारच्या पावसात ही परिस्थिती होतीच. त्याचबरोबर नागरी वस्तीतून येणाऱ्या छोट्या नाल्यांमधून वाहत येणारा प्लास्टिकचा कचरा या मोठ्या नाल्यांच्या तोंडावर येऊन अडकला. राजारामपुरीतील जनता बझारसमोरुन जाणाऱ्या नाल्यात प्लास्टिक बाटल्यांचा खच पडला होता. रस्ता ओलांडून जाण्याच्या नाल्याच्या तोंडावर या अडकल्याने पाणी तुंबून राहिले. हेच पाणी परिसरात पसरले. तिथून वाहत शाहूपुरीतून जात जयंती नाल्यात मिसळणाऱ्या या नाल्यात पाण्याबरोबरच कचऱ्याचे प्रमाण मोठे होते. तिथे असलेल्या झाडांना कचरा अडकून पडला होता. लक्ष्मीपुरीतून येणारे छोटे नालेही कचरा घेऊन जयंतीमध्ये आल्याने लक्ष्मीपुरीतील फोर्ड कॉर्नर, कोंबडी बाजार परिसर पाण्याचे तळे बनले होते. दसरा चौक परिसरातही सखल भागात साठलेल्या पाण्याने दुचाकींना फटका बसला.

पार्वती टॉकीजसमोर असलेल्या नाल्यातही हाच कचरा आल्याने रस्त्यावरील पाणी वाहून जाण्यास अडथळा आला. जिल्हाधिकारी कार्यालयाशेजारी असलेल्या नालाही ओसंडून वाहिला. त्याबरोबरच रस्त्यावरुन आलेल्या मोठ्या पाण्याने स्क्वेअर नाईन या इमारतीचे बेसमेंट गाठले. हा पाण्याचा प्रवाह इतका मोठा होता की काही मिनिटातच बेसमेंट जवळपास चार फूट भरले. त्यामुळे तिथे पार्किंग केलेल्या चारचाकींना फटका बसला. परिख पुल हा तर दक्षिण व उत्तर शहराला जोडणारा एक जवळचा मार्ग आहे. हा सखल म्हणजे खड्डा खोदूनच रस्ता केल्याने तिथे नेहमीच पाण्याचे प्रमाण असते. बुधवारच्या पावसाने हे प्रमाण इतके वाढले की हा खड्डा भरुनच गेला. तेथील पाण्याच्या पातळीमुळे दुचाकी सहज बुडत होती. त्यामुळे रस्ता वाहतुकीला बंदच झाला.

नागाळा पार्कमधील केव्हीझ प्लाझा असो, देवकर पाणंदचा परिसर असो वा शास्त्रीनगर, रंकाळा पदपथाचा परिसर असो. साऱ्याच ठिकाणी गटारी तुंबून बाहेर पडलेले पाणी रस्त्यावर व रस्त्यावरुन घरात शिरले. अनेक घरांची उंची ही रस्त्याबरोबर झाल्याने गटारी तुंबल्यानंतर बाहेर पडलेले पाणी सरळ घरात घुसण्यास काहीच अडथळा आला नाही.

कोठे शिरले पाणी

लक्ष्मीपुरी फोर्ड कॉर्नर

जिल्हाधिकारी कार्यालय परिसर

केव्हीझ पार्क परिसर

नागाळा पार्क कमान

शास्त्रीनगर

देवकर पाणंद

बोंद्रेनगर रिंगरोड

शाहू स्टेडियममधील गाळ्यांमध्ये

राजारामपुरी खाऊ गल्ली

बजाप माजगावकर तालमीशेजारी

कनाननगर परिसर

जिल्हाधिकारी कार्यालय ते महावीर कॉलेज रोड

महापालिकेने केले काय?

मोठा पाऊस झाला तरी त्याचे पाणी वाहून नेण्याची क्षमता नसलेल्या गटारी असल्याने हे पाणी रस्त्यावर येत आहे, घरात शिरत आहे. रस्त्यांवर डांबरीकरणावर डांबरीकरण करणाऱ्या तसेच अनेक गटारी नवनवीन करणाऱ्या नगरसेवक व अधिकाऱ्यांनाही या गटारी मोठ्या करण्याचे केंव्हा सुचले नाही असेच दिसते. गटारींची स्वच्छता झालेली नाही हेही या गटारी तुंबण्यापाठीमागे थेट कारण आहे. त्यामुळे महापालिकेचे केवळ वेळ मारुन नेण्याचे धोरण शहरवासियांनाच त्रासदायक ठरत आहे.

======

नाला मुजवला

नागाळा पार्क येथील अॅड. राजेंद्र चव्हाण यांच्या घराजवळ मोठी गटार आली आहे. ही गटार जिल्हा परिषदेचा रस्ता ओलांडून खाली केव्हीझ पार्कच्या दिशेने जायला हवी होती. त्यासाठी रस्त्याखालून गटार केली आहे. पण, ती मुजवण्यात आली आहे. त्यामुळे या गटारीत येणारे पाणी वाहून जात नाही. या परिसरातील सहा बंगल्यांमध्ये व तीन मोठ्या सोसायटींमध्ये पाणी घुसते. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या आयआरबीने केलेल्या रस्त्यावरील गटारीला ही गटार जोडली आहे. पण आयआरबीची गटार उंच व ही गटार खाली असल्याने पाणी तुंबून राहते. गेल्या पाच वर्षांपासून हा प्रकार सुरू असून पाण्यामुळे वाहनांच्या नुकसानीतून लाखो रुपयांचा फटका येथील रहिवाशांना बसत आहे. खुद्द आयुक्तांनी या परिसराला भेट देऊनही काही कार्यवाही झालेली नाही.

सचिन शानभाग, रहिवाशी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता लढाई रस्त्यावर अन सभागृहातही

$
0
0

Gurubal.Mali@ timesgroup.com

कोल्हापूर : 'शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गेले अनेक वर्षे मी लढत आहे. जे निर्णय घेतात, त्यांच्यापर्यंत शेतकऱ्यांच्या भावना पोहोचाव्यात यासाठी आतापर्यंत रस्त्यावरची लढाई सुरू होती, आता यापुढे शेतकऱ्यांच्या प्रत्येक उत्पादनास किमान आधारभूत​ किंमत मिळावी यासाठी रस्त्याबरोबरच सभागृहातही लढा सुरू राहील', अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष, आमदार सदाभाऊ खोत यांनी 'मटा'शी बोलताना मांडली.

आमदार सदाभाऊ खोत म्हणाले, 'अजिबात नाही. ही लढाई कायमच सुरू राहील. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधी बाकावर बसून अनेक नेत्यांनी चळवळ कायम ठेवली होती. सत्तेत राहूनही खासदार राजू शेटृटी, वामनराव चटप, पाशा पटेल यांनी आंदोलन थांबवले नाही. मी सत्तेच्या बाकावर बसत असलो तरी चळवळ कायम राहील. पहिल्यापासूनच मी 'नाही रे ' वर्गाचे नेतृत्व करत आहे. आपली लढाई कायमच 'आहे रे' वर्गाविरोधी आहे. ही परंपरा कधीच खंडित करणार नाही. मग सत्ता असो व नसो. चळवळ हा संघटनेचा आत्मा आहे. त्यातून आत्मा निघाला की श्वास बंद पडेल. हा श्वास बंद पडू नये यासाठी आपली चळवळ कायमच राहणार आहे. उलट या चळवळीला आता अधिक व्यापक रूप मिळेल. विधानपरिषदेचे सदस्यत्व मिळाल्याने सभागृहात अनेक प्रश्न मांडण्याची संधी मिळणार आहे. तेथे प्रश्न मांडायला मला कोण अडवणार नाही. निर्णय घ्यायचा की नाही याबाबत सरकार ठरवेल पण शेतकऱ्यांचे प्रश्न निर्णय घेणाऱ्यापर्यंत पोहचवू ते पटवून देण्यासाठी चांगले व्यासपीठ आपल्याला मिळाले आहे.'

आमदार सदाभाऊ खोत म्हणाले, 'आघाडी सरकार चर्चेलाच बोलवत नव्हते. प्रचंड आंदोलन केल्यानंतर त्या सरकारला जाग यायची. आता मात्र तशी परिस्थिती राहिली नाही. महायुतीच्या सरकारचा चर्चेला दरवाजा सतत उघडा असतो. साखर आयुक्त कार्यालयास धडक मारली की महायुती सरकार तातडीने दखल घेते. सहा हजार कोटींसाठी आघाडी सरकारच्या काळात दोन शेतकऱ्यांचा बळी गेला. पण, यावेळी एका मोर्चानंतर सरकारने सहा हजार कोटींची मदत केली. एफआरपी न दिल्यास गाळप परवाना रद्द करण्यासारखी गंभीर कारवाई करण्याचा निर्णय सरकारने घेतला. हा धाडसी निर्णय आहे. महायुती सरकार शेतकऱ्यांच्या बाबती​त सकारात्मक आहे. सहकार चळवळ मोडायला आम्ही खुळे नाही. कारण, सहकार चळवळ टिकली तरच शेतकरी टिकणार आहे. त्यांच्या उत्पादनाला चांगला भाव मिळणार आहे. त्यामुळे सहकार चळवळ टिकलीच पाहिजे हे आमचे मत आहे. हीच आमची भूमिका आहे. उलट ज्यांनी असा आमच्यावर असा आरोप केला, तेच कारखाने बंद पाडत सहकार चळवळ मोडित काढत आहेत. अशा कारखान्याचे संचालकमंडळ बरखास्त करून तेथे प्रशासक नेमले पाहिजेत. ही चळवळ वाढण्यासाठी आम्ही संघटनेची ताकद वाढवणार आहोत. स्वाभिमानी शेतकरी संघटना ही राजकारण विरहित संघटना आहे. पण राजकारण अस्तित्व दाखवल्याशिवाय कोणतेही प्रश्न सुटत नाहीत. त्यामुळे चळवळीच्या माध्यमातून संघटनेची ताकद वाढवत राहणार आहे. मंत्रिपद मिळाल्यानंतर याला व्यापक रूप येणार आहे.'

आमदार सदाभाऊ खोत म्हणाले, 'हा आरोप चुकीचा आहे. राज्यातील प्रत्येक भागातील पीकाबाबत आमचे आंदोलन सुरू आहे. भात, कापूस, संत्री, दूध, भाजीपाला, तंबाखू यांसह सर्व प्रश्नावर आंदोलन करत शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिले जात आहे. सर्व शेतीमालास आधारभूत किंमत मिळावी यासाठीच आमचा लढा आहे. यापुढेही हा लढा अधिक व्यापक करण्याचा आपला प्रयत्न राहील. अन्य बाबींबाबतची आमची आंदोलनेही सुरूच आहेत. त्याकडे दुर्लक्ष झालेले नाही. केंद्रात आणि राज्यात अनेक घटक पक्षांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. प्रत्येक घटक पक्षाची विचारधारा वेगळी आहे.पण किमान समान कार्यक्रम धोरणानुसार एकत्र येण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. समान कार्यक्रम हाच अजेंढा आहे. ज्या दिवशी हिंदुत्ववाद हा अजेंडा पुढे येईल, त्यादिवशी घटकपक्ष नक्कीच वेगळा विचार करतील.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिल्डर्स असोसिएशनची आज राज्यस्तरीय बैठक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बांधकाम व्यावसायिकांना भेडसावणाऱ्या ज्वलंत प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी उद्या (१० जून) कोल्हापुरात राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती कोल्हापूर सेंटरचे चेअरमन प्रताप कोंडेकर यांनी दिली.

बैठकीला राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश पाटील प्रमुख पाहुणे असतील. राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. राजीव कृष्णानी, ट्रस्टी शंकरभाई देसाई, विजय देवी यांची प्रमुख उपस्थिती व राज्य चेअरमन सुरेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती असेल.

हॉटेल सयाजी येथे दुपारी बारा वाजता होणाऱ्या या राज्यस्तरीय बैठकीबाबत माहिती देताना कोंडेकर म्हणाले, 'रॉयल्टी, सर्व्हिस टॅक्स या प्रमुख विषयांबरोबर संघटनेशी संबंधित इतर विषयांवर प्रामुख्याने चर्चा होईल. बैठक राज्यस्तरीय असली तरी देशभरातील प्रतिनिधी यावेळी उपस्थित राहणार आहेत. नाशिक येथील बैठकीतील ठरावांना मंजुरी देण्याबरोबरच व्यवसायाशी संबंधित प्रमुख प्रश्नांवर चर्चा होईल. यात जिल्हा परिषदेशी संबंधित विषय, टेंडरची वाढीव किंमत, एक राज्य एक नोंदणी पद्धत, वाळूचा तुटवडा आणि पर्याय, गौण खनिज रॉयल्टी, सेवाकर अशा विषयांवर चर्चा होणार आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एज्युफेस्टचे दालन शनिवारी खुले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दहावी, बारावी,पदवी व पदवीनंतर विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी दरवर्षी महाराष्ट्र टाइम्सच्यावतीने 'टाइम्स एज्युफेस्ट'चे आयोजन केले जाते. प्रतिवर्षापासून यावर्षीही करिअरबाबत जागृत असलेल्या पालक व विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन 'टाइम्स एज्युफेस्ट २०१६' शैक्षणिक प्रदर्शनाच्या माध्यमातून उपलब्ध करुन दिले आहे. ११ जून ते १३ जूनपर्यंत होत असलेल्या एज्युफेस्टमध्ये शैक्षणिक विश्वातील विविध अभ्यासक्रम, संधी व करिअर दालनाचा खजिना यानिमित्ताने पुन्हा एकदा उलगडणार आहे.

शनिवार (ता.११) पासून कमला कॉलेज परिसरातील डॉ. व्ही. टी. पाटील सभागृहात 'महाराष्ट्र टाइम्स' आणि 'टाइम्स ऑफ इंडिया'च्यावतीने होणाऱ्या चाटे ग्रुप ऑफ एज्युकेशन प्रस्तुत 'टाइम्स एज्युफेस्ट २०१६' प्रदर्शनाला अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजीचे सहप्रायोजक आहेत. १३ जूनपर्यंत सकाळी दहा ते रात्री आठपर्यंत सुरू राहणाऱ्या प्रदर्शनामध्ये उच्च शिक्षणातील संधी व करिअरमधील नवनवीन वाटा एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. शनिवारी सकाळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमनार यांच्या हस्ते एज्युफेस्टचे उद‍्घाटन होणार आहे. चाटे शिक्षण समूहाचे विभागीय संचालक प्रा. भारत खराटे, आष्टा येथील संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अॅड. चिमण डांगे हे यावेळी उपस्थित राहतील.

प्रदर्शनात दहावी, बारावी, पदवी आणि पदवीनंतरच्या विद्यार्थ्यांना विविध तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करतील. स्पर्धा परीक्षेत राज्यात पहिला क्रमांक मिळविलेले विद्यार्थी, दहावी, बारावीनंतरचे करिअर, अभियांत्रिकी क्षेत्रातील संधी आणि करिअर, जेईई मेन्स आणि अॅडव्हान्स, उच्च शिक्षणातील संधी, बँकिंग क्षेत्रातील करिअर, इंजिनीअरिंगमधील प्रवेश परीक्षा आदी विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. शेकडो कोर्सेस आणि करिअरच्या अनेक संधीतून अचूक पर्याय निवडीसाठी 'टाइम्स एज्युफेस्ट' सुरू आहे.

विद्यार्थ्यांना मिळालेले गुण, आवड आणि त्या क्षेत्रात उपलब्ध असलेल्या संधीची माहिती 'टाइम्स एज्युफेस्ट'मधून दिली जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे. 'टाइम्स एज्युफेस्ट २०१६' या तीन दिवसांच्या प्रदर्शनात विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाची निवड, नोकरी आणि स्वयंरोजगाराच्या संधीची माहिती मिळणार आहे.

माहितीसाठी संपर्क

प्रदर्शनात कोल्हापूर, सांगली येथील नामांकित शैक्षणिक संस्था सहभागी होणार आहेत. यामध्ये विविध संस्थांच्या अभ्यासक्रमांचे माहितीयुक्त स्टॉल्स असतील. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच एज्युफेस्ट प्रदर्शन होत असल्याने विद्यार्थी व पालकांसाठी सुवर्णसंधीचे दालन खुले होणार आहे. प्रदर्शनाच्या अधिक माहितीसाठी ९६८९८८६६३० या मोबाइल क्रमांकांवर संपर्क साधावा.

एज्युफेस्टमध्ये सहभागी शैक्षणिक संस्था

डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, संजीवन इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट, संजय घोडावत इन्स्टिट्यूट, विजेता अकादमी, चाटे ग्रुप ऑफ एज्युकेशन, न्यू पॉलिटेक्निक, डी. वाय. पाटील कॉलेज ऑप इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी, वाय. डी. माने इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी, व्हीएसएम इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी, डॉ. बापुजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, डीकेटीई सोसायटी टेक्सटाइल अँड इंजिनीअरिंग इन्स्टिट्यूट, तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी, शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, ओम सायन्स अॅकॅडमी, केआयटी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग, राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, के. एल. एस. इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट एज्युकेशन अँड रिसर्च, संत गजानन महाराज एज्युकेशन ग्रुप, कॉलेज ऑफ फायर इंजिनीअरिंग अँड सेप्टी मॅनेजमेंट, धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट व बँक ऑफ इंडिया, अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स.

एज्युफेस्टमध्ये

११ जून ( शनिवार)

सकाळी ११ वाजता - उद‍्घाटन

दुपारी ११.१५ वाजता यूपीएसएसी उत्तीर्ण विद्यार्थी शीतल वाली यांचे अनुभव कथन

दुपारी १२ वाजता - प्रा. शैलेंद्रकुमार हिवरेकर, अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी,

विषय ः अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेतील बदल

दुपारी २ वाजता - प्रा. भारत खराटे,चाटे समूहाचे विभागीय संचालक, विषय ः ध्येय कसे साध्य कराल (१० वी उत्तीर्ण आणि ११ सायन्स प्रवेशित)

दुपारी ३ वाजता - १० वी गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ

सायंकाळी ४ वाजता - वक्ते - भूषण देशमुख



१२ जून (रविवार)

सकाळी ११ वाजता - प्रा. शशिकांत कापसे, महावीर कॉलेज, विषय - १० वी, १२ वीपरीक्षेतील यशाचा कानमंत्र

दुपारी १२ वाजता - प्राचार्य विराट गिरी, संजय घोडावत पॉलिटेक्निक, विषय ः योग्य करिअर निवडताना

दुपारी १ वाजता - प्रा. रवी निकम, प्रा. अनुप कुलकर्णी (केआयटी कॉलेज), विषय ः पर्यावरण आणि जैवतंत्रज्ञानातील संधी

सायंकाळी ४ वाजता - प्रा. जयंत पाटील, संचालक विजेता अकादमी, विषय - नोकरीसाठी गरजेचे आहे प्रशिक्षण

सायंकाळी ५ वाजता - प्राचार्य एस. व्ही. आणेकर, तात्यासाहेब कोरे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी, विषय - अभियांत्रिकी शिक्षण का आणि कसे?

सायंकाळी ६ वाजता - प्रा. पी. एन. भोसले, शिवाजी विद्यापीठ, प्लेसमेंट सेल अधिकारी, विषय - करिअरच्या संधी



१३ जून (सोमवार)

सकाळी ११ वाजता - संपतराव गायकवाड, सेवानिवृत्त सहाय्यक शिक्षण संचालक, विषय - अॅप्टीड्यूड टेस्ट

दुपारी १२ वाजता - उद्योगपती मोहनराव मुल्हेरकर, विषय - उद्यमशील व्हा



दहावी गुणवंताचा सत्कार

एज्युफेस्टच्या ठिकाणी ११ जून रोजी दुपारी २ वाजता दहावीत ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळ‍विलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित केला आहे. गुणंवत विद्यार्थ्यांनी येताना सोबत मार्कलिस्ट आणणे आवश्यक आहे. या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार होईल. यासाठी नावनोंदणी आवश्यक असून मोबाइल क्रमांक ९३२६६१४४३६ वर संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बालवाडी शिक्षिका, सेविका पगाराविना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिका शाळांची पटसंख्या वाढीसाठी बालवाडी हे महत्त्वाचे केंद्र असले तरी बालवाडी चालविणाऱ्या शिक्षिका, सेविका गेल्या सात वर्षापासून पगाराविना राबत आहेत. दरमहा ठराविक मानधन लागू करावे यासाठी त्यांनी महापालिका, प्राथमिक शिक्षण समितीच्या कार्यालयात हेलपाटे मारले. मात्र त्यांच्या मागण्यांकडे महापालिका अधिकाऱ्यांनीही लक्ष दिले नाही. शिक्षण समितीनेही त्यांच्यासाठी काही तरतूद केली नाही. पगारासाठी बालवाडी शिक्षिका, सेविकांची बालवाडी ते महापालिका पायपीट सुरू आहे.

महापालिकेच्या शहरात एकूण ६४ शाळा आहेत. ६४ शाळांपैकी ५४ ठिकाणी बालवाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. प्रत्येक बालवाडीला एक शिक्षिका व एक मदतनीस असे १०८ महिला कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांनी बालवाडी शिक्षिका अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. बहुतांश शिक्षिका पदवीधर आहेत. बालवाडी शिक्षिका व सेविकांना दरमहा ठराविक मानधन अथवा पगार नाही. बालवाडीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून मिळणारी मिळणारी फी हेच त्यांच्या उत्पन्नाचे साधन आहे. दरमहा प्रत्येक विद्यार्थ्याकडून २० रुपये फी आकारणी केली जाते. मात्र, सगळेच विद्यार्थी फी देत नाहीत. पदरमोड करून अनेकजण बालवाड्या चालवित आहेत असे महापालिका बालवाडी शिक्षिका सेविका संघाच्या कविता चव्हाण यांनी सांगितले.

क्षिका संघाच्या अध्यक्षा कविता चव्हाण, प्रियांका चौगुले, सुलोचना चव्हाण, कल्पना पाटील, अनिता पाटील यांच्यासह अन्य बालवाडी शिक्षिका, सेविकांनी आयुक्त पी. शिवशंकर, उपायुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर व्यथा मांडल्या. यावेळी सुनीता पाटील, मिना लाड, धनश्री सुर्यवंशी, पूजा साळोखे, मनीषा गावडे, गायत्री प्रभावळे, रुपाली पाटील, रेखा सूर्यवंशी आदी उप​स्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काळ उशाला घेऊनच रात्र जागली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

धो-धो कोसळणाऱ्या पावसाचे बंगल्याभोवतीच्या जागेत साठत गेलेले पाणी. तासभर पडलेल्या पाण्याचा दाब वाढत जाऊन शेवटी दहा फुटांहून अधिक उंच असलेली काँक्रीटच्या भिंतीचा मोठा भाग आवाज करत मोडून पडला. सुदैवाने कुणी नसलेल्या ठिकाणी पडलेल्या भिंतीने जीवितहानी झाली नाही. पण, उर्वरित भिंतीला पडलेल्या भेगांना लागतच्या भारमल व ओतारी कुटुंबियांची मात्र रात्रभर झोप उडाली. जमिनीत मुरलेले पाणी प्राण कधी कंठाशी आणेल याचा नेम नसल्याने या कुटुंबांनी अगदी काळ उशाला ठेवूनच रात्र काढली.

चंबुखडी टेकडीजवळ वसलेले गणेशनगर ही मध्यमवर्गीयांची वस्ती. ​शिंगणापूर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील या वस्तीमध्ये छोटी छोटी घरे आहेत. वस्तीत एका छोट्या टेकडीवर शिवाजी यादव यांचा बंगला आहे. त्यांनी बंगल्याच्या हद्दीवर संरक्षक भिंत बांधली. दहा फुटांहून अधिक उंचीची काँक्रीटची भिंत आहे. सहा महिन्यांपूर्वी बांधलेली ही भिंत भक्कम दिसत होती. भिंतीलगतच सतीश भारमल यांचे घर आहे. त्यांच्याशेजारी अभिलाश चव्हाण हे घर बांधत होते. या बांधकामानंतर ओतारी कुटुंबियांचे घर आहे. बुधवारच्या जोराच्या पावसाने यादव यांच्या बंगला परिसरात साठलेल्या पाण्याचा दाब या भिंतीवर पडला. यू आकाराच्या भिंतीचा काही भाग सायंकाळी मोठा आवाज करत कोसळला. तर भारमल यांच्या घराजवळील भिंतीतील बांधकामाचा एक पिलर अधांतरी लोंबकळत राहिला. ओतारी यांच्या घरामागीलही भिंतीचा भाग पडला असल्याने त्याचा मुरुम घरापर्यंत पसरला.

भारमल यांच्या घराची भिंत आणि ही अर्धवट भिंत लगतच असल्याने उर्वरीत भागाचे काय होणार हे रात्री अंधारात समजत नव्हते. पिलर लोंबकळत असल्याने धास्ती होती. सतीश भारमल यांना तर रात्रभर झोपच लागली नाही. छोटा आवाज आला तरी घाबरायला व्हायचे अशा अवस्थेत रात्र काढल्याचे सांगितले. दीड वर्षापूर्वीच त्यांनी नवीन घर बांधल्याने त्यांना या घटनेचा मोठा धक्का बसला आहे. ओतारी यांच्या घरापर्यंत मातीचा ढिगारा पसरला आहे. भिंतीच्या उंचीइतके अंतर असल्याने त्यांच्या घराला फटका बसला नाही. मात्र त्यापुढील भिंत लोंबळकत पडल्याने हे कुटूंबही धास्तावले.

यादव यांनी डिसेंबरमध्ये संरक्षक भिंत बांधली होती. त्यासाठी सुमारे दहा लाख खर्च करून आवश्यक ती दक्षता घेतल्याचे त्यांनी सांगितले. मात्र पाण्याच्या दाबामुळे झालेल्या प्रकाराने तेही हतबल झाले. पडलेल्या भिंतीने जिवीतहानी झाली नसल्याने ते सुदैवी मानततात. या प्रकाराचा ग्रामपंचायतीने पंचनामा केला आहे.

चव्हाण यांचा योग?

शनिवार पेठेत अभिलाश चव्हाण यांचे तीन मजली जुने घर होते. त्यांच्याशेजारी अपार्टमेंटच्या बांधकामासाठी खोदाई करण्यात आली होती. खोदाईमुळे शेजारील चव्हाण यांचे तीन मजली घर एखाद्या पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे जमीनदोस्त झाले होते. वेळीच माहिती मिळाल्याने चव्हाण कुटुंबिय बाहेर पडले. त्यानंतर दोन महिन्यांपूर्वी चव्हाण यांनी गणेशनगर येथे बांधकाम सुरू केले. आता येथील या बांधकामाची, योगायोगाची चर्चा तिथे सुरू होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सदाभाऊ खोत यांना कृषी राज्यमंत्रिपद?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी​, कोल्हापूर

पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी राज्य मंत्रीमंडाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. या विस्तारात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार सदाभाऊ खोत यांना कृषी किंवा ग्रामविकासचे राज्यमंत्रिपद मिळणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. याबाबत सर्व घटक पक्षांच्या नेत्यांशी नुकतीच चर्चा झाली​. या चर्चेत स्वाभिमानीसह सर्व घटक पक्षांना सत्तेत सहभागी करून घेण्याचा शब्द पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी दिल्याने महादेव जानकर यांचाही मंत्रिपदाचा मार्ग मोकळा झाला आहे.

भूखंड घोटाळ्यासह अनेक आरोप झाल्याने एकनाथ खडसे यांनी राजीनामा दिला. यामुळे त्यांच्याकडे असलेली खाते इतरांना देण्याबरोबरच मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे सध्या वाहत आहे. यात घटक पक्षाना संधी मिळणार आहे. याचाच भाग म्हणून घटक पक्षाच्या नेत्यांशी भाजपचे अध्यक्ष शहा, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केली. यासाठी दोन बैठका झाल्या. विधानसभेत दिलेला शब्द पाळू, अशी ग्वाही यावेळी देण्यात आली. पुढील आठवड्यात भाजप कार्यकारिणीची बैठक व अधिवेशन होणार आहे. त्यामुळे सर्व नेते त्या गडबडीत आहेत. त्यानंतर पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. या अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार आहे.

खोत यांना कृषी, ग्रामविकास किंवा जलसंधारण यापैकी एक खाते मिळण्याची शक्यता आहे. त्यांनी आपल्याला रस असणारे खाती दिल्यास काम करता येईल, अशी विनंती केली आहे. त्यामुळे ही विनंती मान्य होण्याची शक्यता आहे. सर्व घटक पक्षाना समान संधी देण्याचा शब्द भाजपने दिला आहे. यामुळे खोत यांच्यासह जानकर यांचाही मंत्रिमंडळातील सहभाग निश्चित मानला जात आहे.


कृषी, ग्रामविकास अथवा जलसंधारण यामध्ये आपल्याला रस आहे. त्यामुळे जेथे काम करता येईल, असे खाते मिळावे अशी विनंती केली आहे. सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी समन्वयाची चांगली भूमिका पार पाडल्याने विधान परिषदेचे सदस्यत्व मिळाले. मंत्रिपदही नक्की मिळेल, अशी अपेक्षा आहे.

- सदाभाऊ खोत, आमदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिर्याणीवरून राडा, राष्ट्रवादीच्या गटांत धुमश्चक्री

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली

सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात बिर्याणीच्या जेवणावरून गुरुवारी दुपारी दोन गटात जोरदार धुमश्चक्री झाली. सरपणाची लाकडे आणि खुर्च्यांनी एकमेकांवर हल्ला करण्यात आला. नाट्य मंदिरातील मुख्य दरवाजाच्या भल्यामोठ्या काचेचा चक्काचूर केला. या धुमश्चक्रीत तिघेजण जखमी झाले. त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी सुरू असल्याचे समजताच माजी मंत्री जयंत पाटील यांना कार्यकर्त्यांनी पर्यायी मार्गाने नाट्यगृहातून बाहेर काढले.

सांगली विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगलीतील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात मेळाव्याचे आयोजन केले होते. मेळाव्यात पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर केल्या जाणार होत्या. त्यामुळे स्थानिक नेते, कार्यकर्ते आपल्या समर्थकांसह मेळाव्यास उपस्थित होते. मेळाव्याचा कालावधी लांबला होता. कार्यकर्त्यांचे लक्ष नाट्यगृहाच्या बाहेर असलेल्या जेवणाच्या ठिकाणाकडे होते. माजी मंत्री जयंत पाटील यांचे भाषणही अंतिम टप्प्यात असतानाच काही तरुणांनी जेवणासाठी गर्दी केली. या वेळी जेवण देण्या-घेण्यावरून वाद झाला. बाहेर वाद सुरू असल्याची कुणकुण नाट्यगृहातील काही कार्यकर्त्यांना लागली. त्यानंतर ते कार्यकर्तेही बाहेर आले. तोपर्यंत खुर्च्यांचा आणि जेवणासाठी असलेल्या पत्रावळ्यांचा चुराडा झालेला होता. तरुणांच्या गटाने तिघांना जबरदस्त मारहाण केली. या हाणामारीत नाट्यगृहाच्या प्रवेशद्वाराच्या काचांचा चुरा झाला होता.

हा प्रकार सुरू असताना जयंत पाटील नाट्यगृहात होते. त्यानंतर पाटील यांना महापालिकेच्या एक नंबर शाळेच्या दिशेने असणाऱ्या दरवाजातून बाहेर काढण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘की मॅन’च्या सतर्कतेमुळेहुसेन सागर एक्स्प्रेसचा अपघात टळला

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

'की मॅन'च्या सतर्कतेमुळे मुंबई-हैदराबाद हुसेन सागर एक्स्प्रेसचा भीषण अपघात टळला. रुळ तुटल्याचे समजताच 'की मॅन'ने लाल झेंडा दाखवून तत्काळ रेल्वे थांबविली. ही घटना शुक्रवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास दुधणी रेल्वे स्टेशनजवळ घडली.

मुंबई-हैदराबाद हुसेन सागर एक्स्प्रेस पहाटे सहा वाजता सोलापूर रेल्वे स्थानकावर आली. सोलापूरपासून ७० किलोमीटर अंतरावर असलेल्या दुधणी रेल्वे स्टेशनपर्यंत हुसेन सागर एक्स्प्रेस कमी वेगाने जाते. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास दुधणी रेल्वे स्टेशन सोडत असताना पहिले तीन डबे तडे गेलेल्या रेल्वे रुळावरुन पास झाले. चौथा डबा जात असताना तेथे की मॅन म्हणून ड्युटी बजावत असलेल्या बी. चंद्रकांत यांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी तातडीने गार्डला लाल झेंडा दाखवून धोक्याचा इशारा दिला आणि गार्डने तातडीने वॉकी टॉकीवरुन चालकाला सांगून तत्काळ गाडी थांबविली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

दरम्यान, सकाळचे सात वाजले असल्यामुळे आणि बरेच प्रवासी झोपेत असल्यामुळे गाडी का आणि कशासाठी थांबली आहे. हे समजले नाही. तब्बल तासभर गाडी थांबल्यामुळे प्रवाशांनी खाली उतरुन पाहिल्यानंतर घटनेची माहिती मिळाली अन् भितीने अनेकांचे चेहरे पडले. रेल्वेचा तडा गेलेला रुळ पाहण्यासाठी टीसी तसेच गाडीचा चालक, गार्ड तसेच प्रवाशांनीसुद्धा मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. त्यानंतर तासाभरात तडे गेलेला रुळ जोडण्यात आला आणि सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास हुसेन सागर एक्स्प्रेस हैदराबादकडे रवाना झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

३५ ग्रामसेवक निलंबीत, चार जणांवर फौजदारी,१९७ जणांची विभागीय चौकशीगौण खनिजप्रकरणी सोलापूर सीईओंची कारवाई

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

गौण खनिज मिळकतीमधून ग्रामपंचायतींना मिळणाऱ्या निधीमध्ये अनियमितता आढळून आल्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी ३५ ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई केली आहे. चार जणांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले असून, १९७ जणांची विभागीय चौकशी सुरू केली आहे. गौण खनिज निधीतून भ्रष्टाचार प्रकरणी सोलापूर जिल्हा परिषदेंतर्गत झालेली आतापर्यंतच्या इतिहासातील ही सर्वांत मोठी कारवाई आहे. या कारवाईने ग्रामसेवकांचे धाबे दणाणले आहेत.

सन २०१३-१४ मध्ये सोलापूर जिल्ह्याला गौण खनिज अंतर्गत ७६ कोटी २६ लाखाचे अनुदान तहसीलदारांमार्फत पंचायत समितींना प्राप्त झाले होते. हे अनुदान गटविकास अधिकारी यांच्या मार्फत ग्रामपंचायतींना वितरीत करण्यात आले होते. हा निधी ग्रामपंचायतीच्या स्व-उत्पन्नाचा भाग असून, त्याचा वापर ग्रामनिधी म्हणूनच करण्यात येतो. जिल्हा परिषदेचे सदस्य संजय पाटील यांनी ७ मे २०१५ रोजी २००२ ते २०१३ कालावधीतील वसुलीच्या आधारे गौण खनिज मिळकतीतून ग्र्राम पंचायतींना मिळणाऱ्या निधीमध्ये अनियमितता झाल्याबाबतचा तक्रार अर्ज दिला होता.

दरम्यान, संजय पाटील यांच्या तक्रारी अर्जाच्या अनुशंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांच्या आदेशानुसार गौण खनिज अंतर्गत ५ लाखांपेक्षा जास्त अनुदान वितरीत करणाऱ्या ३३५ ग्रामपंचायतींची जिल्हास्तरीय त्रिसदस्यीय समितीमार्फत तपासणी करण्यात आली. गठीत करण्यात आलेल्या समितीने तपासणीमध्ये ग्रामपंचायतींना स्थळ भेटी देऊन गौण खनिज अंतर्गत प्राप्त झालेल्या अनुदानातून हाती घेण्यात आलेली कामे तांत्रिक मंजुरी, प्रशासकीय मंजुरी, मुल्यांकने, कामाची गुणवत्ता, कामाचे अभिलेखे व कामांचे अर्थ विभागाशी निगडीत सर्व अभिलेखांची तपासणी करून अहवाल सादर केला. सदरच्या तपासणीमध्ये २३९ ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक व सरपंच सेवक यांनी तांत्रिक व प्रशासकीय मान्यतेविना अनुदान खर्च केल्याचे, खरेदी करताना वित्तीय नियमांचे पालन केले नसल्याचे तसेच लेखे अद्ययावत न ठेवल्याचे आणि खर्च करताना रोख व सेल्फ रक्कम दिल्याचे, कॅशबुक व प्रमाणके अद्ययावत नसल्याचे आणि मूल्याकंनापेक्षा जास्त खर्च केल्याचे तपासात आढळून आले आहे.

अशी झाली कारवाई

गौण खनिज अनियमितता करणाऱ्या २३२ दोषी ग्रामपंचायतींच्या सरपंच व ग्रामसेवकांना कारणे दाखवा नोटीसा, ६ ङ्केब्रुवारी २०१६ रोजी बजावण्यात आल्या होत्या. त्या बाबतचे खुलासे गटविकास अधिकाऱ्यांच्या मार्फत मागविण्यात आले होते. त्या खुलाशावरुन ३३५ ग्रामपंचायतींची सखोल तपासणी करून त्यापैकी २३२ ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी दोषी आढळले. दोषी ग्रामपंचायतींपैकी ३५ ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांवर मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी निलंबनाची कारवाई केली. चार ग्रामसेवकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू केली असून, १९७ ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांची विभागीय चौकशी लावण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रांताधिकाऱ्यांनी प्राणघातक हल्ला केला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड

वडोली भिकेश्वर (ता. कराड) येथील वाळू ठिय्यांवर प्रांताधिकाऱ्यांनी गुरुवारी ठिय्यांवरील लोकांना हातात दांडके घेऊन मारहाण केली. सचिन पवार या तरुणांवर प्राणघातक हल्ला करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना जिल्ह्याला काळीमा फासणारी असून, या घटनेच्या निषेधार्थ आज, शनिवारी नागरिकांनी कराड बंद ठेवावे, असे आवाहन खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे. प्रांताधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करून त्यांच्यावर प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करावा, अन्यथा भविष्यात होणाऱ्या घटनांना जिल्हा प्रशासनच जबाबदार राहील, असा गर्भित इशाराही खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला आहे.

वडोली भिकेश्वर येथील वाळू ठिय्यांवर प्रांताधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईसंदर्भात शुक्रवारी साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी कराडला भेट दिली. या भेटीत त्यांनी ठिय्यावर गंभीर जखमी झालेल्या सचिन पवार याची कृष्णा हॉस्पिटलमध्ये भेट घेऊन त्याच्या प्रकृतीची चौकशी केली. त्यानंतर त्यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाला भेट दिली.

पत्रकारांशी बोलताना भोसले म्हणाले, सातारा जिल्ह्याने नेहमीच महाराष्ट्राला व देशाला दिशा देण्याचे काम केले आहे. परंतु, वडोली भिकेश्वर येथील वाळू ठिय्यावर गुरुवारी कराड प्रांताधिकाऱ्यांच्या हातून जिल्ह्याला काळींमा फासणारी घटना घडली आहे. सैराट होऊन प्रांतांनी ही कारवाई केली आहे. वास्तविक प्रांताधिकाऱ्यांनी जनतेच्या हितासाठी व त्यांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी सैराट होणे अपेक्षित आहे. न्यायदंडाधिकारी असणाऱ्या प्रांताधिकाऱ्यांनी हातात दांडके घेऊन ठिय्यांवरील लोकांना मारहाण केली. सचिन पवार (३५, रा. कराड) यांच्यावर प्राणघातक हल्ला केला आहे. या हल्ल्यात सचिनच्या डोक्याला टाके पडले आहेत. सुर्दैवाने या हल्ल्यांतून तो थोडक्यात बचावला आहे. या घटनेचा लोकप्रतिनिधी या नात्याने आपण तीव्र निषेध करीत आहे.

प्रांताधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा

प्रांताधिकाऱ्यांनी कायद्याच्या चाकोरीत राहून कारवाई करायला पाहिजे होती. कायदा हातात घेतल्यामुळे प्रांताधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होऊन प्राणघातक हल्ल्यांची कलमे लागू झाली पाहिजेत. या बाबत सचिन पवार याने तसा जबाबही दिला आहे. त्यांच्यावर कोणताही दबाव नाही, असे सांगून प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्याकडून कोणाची पिळवणूक, कोणावर अन्याय व मनमानी कारभार चालत असेल तर आपणाकडून न्याय मिळवून देण्याचे काम केले जाईल. जनतेवरील अन्याय कदापि खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

वाळू तस्करांवर

मोकांतर्गत कारवाई-प्रांत

विचार

स्थानिक लोकांच्या तक्रारीनुसारच वडोली भिकेश्वर (ता. कराड) येथील बेकायदा वाळू ठिय्यांवर कारवाई केली आहे. या ठियावर कारवाई करीत असताना कोणताही कायदा हातात घ्यायचा प्रश्नच उद्भवत नाही. या वाळू उपशामागे मोठी यंत्रणा कार्यरत असून, वेळप्रसंगी संबंधितांवर मोकांतर्गत कारवाई करावी लागेल, असा इशारा प्रांताधिकारी किशोर पवार यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिला.

उदयनराजे भोसले यांनी येथे येवून प्रांताधिकाऱ्यांनी कारवाई करतेवेळी तेथील लोकांना मारहाण केल्याचा तर सचिन पवार या युवकावर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप केला होता, त्या बाबत प्रशासनाची भूमिका स्पष्ट करताना ते म्हणाले, वडोली भिकेश्वर येथील कृष्णा नदीच्या पात्रातून वाळूची बेसुमार लुट होत असल्याची तक्रार स्थानिक ग्रामस्थांनी दिली होती. त्यानुसार गुरुवारी वडोली भिकेश्वर येथील वाळू ठिय्यांवर कारवाई करीत बेकायदा वाळूचे वाफे उद्ध्वस्त केले होते. या कारवाईचे छायाचित्रण करण्यात आले आहे.

अशी झाली कारवाई

कारवाईत ३५ ट्रक व डंपर, ३2 यांत्रीक बोटी, २ जेसीबी, ६ पोकलॅड जप्त करण्यात आलेले आहेत. या ठिय्यांवर एकूण ७४ रिकामे डंपर व ट्रक आढळून आले आहेत. या कारवाईत १2 सर्कल, तळबीड पोलिस ठाण्याच्या स. पो. नि. विद्या जाधव व त्यांचे कर्मचारी, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी असे एकूण ४० कर्मचारी सहभागी झाले होते. कारवाईत उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी २२ वाहनांना मेमो काढले आहेत. या ठिय्यांवर एकूण ४२ वाफ्यांतून मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा केला जात होता. सुमारे ८५० ब्रासपर्यंत वाळू उपसा झाला आहे. या पूर्वी तीन वेळा या ठिय्यांवर कारवाई झाली होती. परंतु 'येरे माझ्या मांगल्या'या उक्तिप्रमाणे पुन्हा वाळू सम्राटांनी वाळू उपसा करण्यास सुरूवात केली होती. ग्रामस्थांच्या तक्रारीवरून व दमदाटी करून वाळू उत्खनन होत असल्याची बाब समोर आल्यानंतर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला. या प्रकरणातील संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया तळबीड पोलिसात सुरू आहे. सुधीर विलास साळुंखे (रा.वडोली भिकेश्वर) याने वाळू लिलावात भाग घेतला होता. परंतु, त्याला अधिकृत ताबा दिला नव्हता. त्याने या ठिय्यांवर प्रशासनाची संमती न घेता वाळू उपसा सुरू ठेवला होता. त्यामुळे या अनधिकृत ठिय्यांवर कारवाई करणे प्रशासनाला भाग पडले.

प्राणघातक हल्ल्याचा बनाव

वडोली भिकेश्वर येथे गुरुवारी सकाळपासून प्रत्यक्षात कारवाई करण्यास सुरूवात केली. सायंकाळी पाचच्या सुमारास सचिन पवार हा तेथे आला होता. त्यावेळी तो रक्तबंबाळ झाला असल्याचे आमच्या निदर्शनास आले. आम्ही त्याला आमच्या गाडीतून उंब्रज येथे व तेथून १०८ नंबरच्या अॅब्युलन्समधून येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. तो स्वत:हून उभ्या राहिलेल्या डंपरला धडकला होता. याला वेगळे राजकीय वळण देऊन पुढे कोणतीही कारवाई होऊ नये म्हणून, दबाव तंत्राचा वापर सुरू आहे. यामागे वेगळी यंत्रणा कार्यरत आहे. या कारवाईत कायदा हातात घ्यायचा प्रश्नच येत नाही. प्रत्यक्ष ठिय्यांवर काम करणारे लोक वेगळेच असतात, यामागे भली मोठी यंत्रणा कार्यरत आहे. त्यांच्यावर प्रशासनाला मोकांतर्गत कारवाई करावी लागेल, असेही प्रांताधिकारी किशोर पवार म्हणाले. दरम्यान, अशा ठिय्यांवर आजवर कागदोपत्री कारवाई केली होती. पण, प्रत्यक्ष कारवाई करणे अवघड जाते. ही कारवाई करीत असताना आमच्याही जीवाला धोकाही पोहोचू शकतो. आम्ही ही कारवाई जीवावर उदार होऊन करतो, असेही प्रांत म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जिल्हा परिषद अध्यक्षपद खुले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव झाल्याने येत्या सहा महिन्यानंतर होणाऱ्या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण होणार आहे. अध्यक्षपद खुले झाल्याने इच्छुकांनी जंगी तयारी सुरू केली आहे. जिल्हा परिषदेच्या सभागृहाची मुदत मार्च २०१७ मध्ये संपत आहे. सर्वसाधारण प्रवर्गासाठी अध्यक्षपद खुले झाल्याने नेत्यांच्या वारसदारांनी मोर्चेबांधणीची सुरुवात केली आहे. अनेक वर्षे अध्यक्षपदाच्या प्रतिक्षेत असणारे नेते आणि त्यांचे वारसदार या निवडणुकीत ताकदीने उतरण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, सांगलीचे अध्यक्षपदही सर्वसाधारण गटासाठी राखीव झाले आहे. सध्या जि.प.मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे.

राज्यातील २६ जिल्हा परिषेदच्या अध्यक्षपदाची आरक्षणाची सोडत शुक्रवारी मुंबईत काढण्यात आली. त्यात कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदाचे आरक्षण सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले झाले. जिल्हा परिषदेत काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शाहूवाडी विकास आघाडी यांची सत्ता आहे. अध्यक्षपद पहिल्या अडीच वर्षांसाठी खुल्या प्रवर्गासाठी होते. त्यावेळी काँग्रेसचे संजय मंडलिक यांना संधी मिळाली. उपाध्यक्षपदी हिंदुराव चौगले यांची निवड झाली. त्यानंतर राजकीय घडामोडींना वेगळे वळण लागले. लोकसभेच्या निवडणुकीवेळी मंडलिक यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने अध्यक्षपदाचा राजीनामा घेण्यात आला. त्यानंतर उमेश आपटे यांना अध्यक्षपदाची संधी मिळाली.

दुसऱ्या अडीच वर्षांसाठी अध्यक्षपद सर्वसाधारण महिला गटासाठी खुले झाले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. एन. पाटील यांच्या समर्थक विमल पाटील यांना अध्यक्षपद आणि आमदार सतेज पाटील सर्मथक शशिकांत खोत यांना उपाध्यक्षपदपदाची संधी मिळाली. मिनी विधानसभा समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेत अनेकांना पदांची अपेक्षा होती. मतदारसंघात मिळालेल्या मतांच्या जोरावर पक्षनेत्यांकडे पदाचा आग्रह धरण्यात आला. मात्र काहींचे मनसुबे उधळले. तालुकानिहाय राजकीय संदर्भ बदलत गेले. आता आरक्षण जाहीर झाल्याने अनेक वर्षांपासून अध्यक्ष आणि उपाध्यक्ष होण्यासाठी इच्छुकांनी फिल्डिंग लावली आहे.

०००

इच्छुकांची भाऊगर्दी

नेत्यांच्या वारसदारांनी अध्यक्षपदाच्या शर्यतीची तयारी सुरू केली आहे. त्यात अरुण इंगवले, धैर्यशील माने, नावीद मुश्रीफ, रणजीत पाटील, राहुल देसाई, संग्राम कुपेकर, बाळासाहेब खाडे, अंबरिश घाटगे, योगेंद्र गायकवाड, अप्पी पाटील, महेश पाटील, अर्जुन आबिटकर, शशिकांत खोत, हिंदुराव पाटील, अमरसिंह पाटील आदींचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘टाइम्स एज्युफेस्ट’ आजपासून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दहावी, बारावी, पदवी व पदवीनंतर विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी शनिवारपासून (ता. ११ जून) 'महाराष्ट्र टाइम्स'च्यावतीने आयोजित 'टाइम्स एज्युफेस्ट'चे उदघाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमनार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. चाटे शिक्षण समूहाचे विभागीय संचालक प्रा. भारत खराटे, आष्टा येथील संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अॅड. चिमण डांगे हे यावेळी उपस्थित राहतील.

११ जून ते १३ जूनपर्यंत एज्युफेस्ट असेल. शनिवारपासून (ता.११) कमला कॉलेज परिसरातील डॉ. व्ही. टी. पाटील सभागृहात 'महाराष्ट्र टाइम्स' आणि 'टाइम्स ऑफ इंडिया'च्यावतीने होणाऱ्या चाटे ग्रुप ऑफ एज्युकेशन प्रस्तुत 'टाइम्स एज्युफेस्ट २०१६' प्रदर्शनाला अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी सहप्रायोजक आहेत. १३ जूनपर्यंत सकाळी दहा ते रात्री आठपर्यंत प्रदर्शन सुरू राहील. कोर्सेस आणि करिअरच्या अचूक निवडीसाठी 'एज्युफेस्ट' महत्त्वाचे आहे.

गुणवंतांचा 'मटा'तर्फे सत्कार

एज्युफेस्टच्या ठिकाणी ११ जून रोजी दुपारी दोन वाजता दहावीत ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा होईल. 'महाराष्ट्र टाइम्स व चाटे शिक्षण समुहा'ने याचे आयोजन केले आहे. गुणंवत विद्यार्थ्यांनी सोबत मार्कलिस्ट आणणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार होईल. सत्कार समारंभास विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन मटा च्या वतीने करण्यात आले आहे.



गणवेश सिनेमाची टीम येणार भेटीला

'गणवेष' या आगामी सिनेमातील कलाकारांची टीम प्रदर्शनाला भेट देणार आहे. यावेळी सिनेमातील कलाकार किशोर कदम, गीतकार गुरू ठाकूर, स्मिता तांबे आणि नागेश भोसले उपस्थित राहणार आहेत. हा सिनेमा वेगळ्याच पठडीतला असून सामाजिक दंभावर प्रहार करणारा आहे. यावेळी अभिनेते किशोर कदम हे चित्रपट व्यावसायातील संधी या विषयावर आपली भूमिका मांडणार आहेत. कला क्षेत्रातील संधी याबाबत या सर्वाशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे.



एज्युफेस्टमध्ये

११ जून ( शनिवार)

सकाळी ११ वाजता : उद्घाटन

दुपारी १२ वा. : प्रा. शैलेंद्रकुमार हिवरेकर, अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी, विषय ः अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेतील बदल

दुपारी २ वाजता : प्रा. भारत खराटे,चाटे समूहाचे विभागीय संचालक, विषय ः ध्येय कसे साध्य कराल (१० वी उत्तीर्ण आणि ११ सायन्स प्रवेशित

दुपारी २ वाजता : १० वी गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ, सायंकाळी ४ वाजता - वक्ते - भूषण देशमुख

१२ जून (रविवार)

सकाळी ११ वाजता : प्रा. शशिकांत कापसे, महावीर कॉलेज, विषय - १० वी, १२ वी परीक्षेतील यशाचा कानमंत्र

दुपारी १२ वाजता : प्राचार्य विराट गिरी, संजय घोडावत पॉलिटेक्निक, विषय ः योग्य करिअर निवडताना

दुपारी १ वाजता : प्रा. रवी निकम, प्रा. अनुप कुलकर्णी (केआयटी कॉलेज), विषय ः पर्यावरण आणि जैवतंत्रज्ञानातील संधी

सायंकाळी ४ वाजता : प्रा. जयंत पाटील, संचालक विजेता अकादमी, विषय - नोकरीसाठी गरजेचे आहे प्रशिक्षण

सायंकाळी ५ वाजता : प्राचार्य एस. व्ही. आणेकर, तात्यासाहेब कोरे इंजिनीअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी, विषय - अभियांत्रिकी शिक्षण का आणि कसे?

सायंकाळी ६ वाजता : प्रा. पी. एन. भोसले, शिवाजी विद्यापीठ, प्लेसमेंट सेल अधिकारी, विषय - करिअरच्या संधी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाल्यांवरील अतिक्रमणे हटविणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरातील प्रमुख नाल्यांवरील अतिक्रमणावरून स्थायी समिती सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. नाले सफाईच्या कामाचा ताकतुंबा सुरू असून पवडी व आरोग्य विभाग एकमेकावर जबाबदारी ढकलत असल्याचा आरोपच सदस्यांनी केला.

नाल्यांवरील अन​धिकृत बांधकामावरील कारवाईवरून सदस्य संतप्त बनल्याने प्रशासनाने नाल्यावरील अतिक्रमणे २४ तासाची नोटीस देऊन काढण्यात येतील. तसेच या बांधकाम प्रकरणी कनिष्ठ अभियंत्यांना जबाबदार धरून कारवाईचे संकेतही प्रशासनाने दिले. स्थायी समिती सभापती मुरलीधर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

नाल्यावरील बांधकामावरून बांधकाम विभागाच्या अनागोंदी कारभाराचा पंचनामा केला.पहिल्याच पावसाने शहरातील रस्त्यावर पाणी पसरून, नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागले. नगरसेवक निलेश देसाई, अजित ठाणेकर, सत्यजित कदम, सूरमंजिरी लाटकर, निलोफर आजरेकर यांनी शहरातील नाले सफाईचा बोजवारा उडाल्याचे सांगितले. भोई गल्लीत पाणी तुंबल्याचे उदाहरण देत शहरातील अन्य ठिकाणाकडे लक्ष वेधले. परवाने रद्द करत नाल्यावरील बांधकामे तत्काळ काढून टाकावीत अशा सूचना केल्या. नाल्यांची साफसफाई केली जाईल असे उत्तर प्रशासनाने दिले. चार आरसी वाहने बंद असून नवीन आरसी वाहने, कंटेनर व सायकल रिक्षा खरेदीसाठी प्रस्ताव ठेवू. जेट मशिन दुरूस्तीचे काम सुरू असल्याचे सांगितले.

चर्चेत सदस्या दिपा मगदूम, मनीषा कुंभार, उमा इंगळे, मेहजबीन सुभेदार यांनी सहभाग घेतला.

रुपाराणी निकम यांनी एसएससी बोर्ड ते आरकेनगर पर्यंतच्या रस्त्याचे काम रखडले आहे. रस्ता ४० फुटाचा असताना काही ठिकाणी ३० फुटाचा केला असल्याचे निदर्शनास आणले. त्यावर प्रशासनाने याप्रकरणी शांतीनाथ रोडवेज कंपनीला ब्लॅकलिस्ट केले आहे. आरईइन्फ्रा कंपनीवर दंडात्मक कारवाई केली असल्याचे उत्तर प्रशासनाने दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांसाठी उद्यापासून उद‍्बोधनवर्ग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अकरावीसाठी राबवण्यात येणाऱ्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेसंदर्भात शिक्षण उपसंचालक कार्यालय आणि महाराष्ट्र टाइम्स प्लॅनेट कॅम्पसतर्फे अकरावीत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उद‍्बोधन वर्ग होणार आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून अकरावीसाठी ऑनलाइन प्रवेश अर्ज कसा भरायचा, कॉलेजपसंती प्राधान्य क्रम कसा निश्चित करायचा यासह गुणवत्ता यादीनुसार प्रवेश कसा घ्यायचा याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यावर्षीच्या उदबोधन वर्गाला १२ जूनपासून सुरूवात होणार असून याचा लाभ दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसह पालकांना घेता येणार आहे.

केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या (कॅप) निकषानुसार यंदा शहरातील ३२ ज्युनिअर कॉलेजांमध्ये शाखानिहाय प्रवेशाची संख्या निश्चित केली आहे. १३ हजार ४०० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे नियोजन आहे. प्रवेश प्रक्रियेचे मुख्य केंद्र राजाराम कॉलेज असेल. अर्ज संकलन, वितरण व तक्रार निवारण केंद्र जाहीर ककरण्यात आली आहेत. १२ जूनपासून माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे उद्बोधन वर्ग होतील. शिक्षण उपसंचालक कार्यालयात नुकतीच केंद्रीय प्रवेश प‌्रक्रिया समितीची बैठक झाली. यावेळी अकरावी प्रवेश प्रक्रियेचे नियोजन करण्यात आले. शिक्षण उपसंचालक तथा अकरावी केंद्रीय प्रवेश समितीचे अध्यक्ष मकरंद गोंधळी, कार्याध्यक्ष प्राचार्य वसंत हेळवी, सचिव ए. एम. रणदिवे, प्रा. आर. ए. हिरकुडे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वळणे उठताहेत जिवावार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा शाहूवाडी

कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील वाढत्या अपघातांमुळे या रस्त्यावरील धोकादायक चक्री वळणे, अरुंद पूल (मोऱ्या), अपूर्ण बाजूपट्ट्या, धोकादायक वाटलेले वृक्ष याचबरोबर रस्ते सुरक्षा विभागाचे होत असलेले अक्षम्य दुर्लक्ष या बाबी पुन्हा ऐरणीवर आल्या आहेत. तशा त्या अधून मधून घडणाऱ्या छोट्या-मोठ्या घटनेतून चर्चेत राहतातच. पण यावेळी मागील आठवडाभराच्या कालखंडात शाहूवाडीतून जाणाऱ्या या महामार्गावरील तीन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या भीषण अपघाताने नऊ जणांचा बळी गेल्यानंतर धोकादायक वळणे आणि अरुंद रस्त्यांचा विषय चर्चेत आला आहे.

कोल्हापुरातून बाहेर पडतानाच शिवाजी पुलावर होणारी वाहनांची गर्दी ही या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पुढील प्रवासात येणाऱ्या अडचणींचा जणू सूचक इशाराच देते. वाघबीळ घाट वगळता वीसएक वळणांचा अडथळा पार करून शाहूवाडीच्या प्रवेशद्वारात (भाडळे खिंड) पोहोचलेल्या वाहनांसह प्रवाशांचे स्वागत एका भल्या मोठ्या वळणानेच होते. यात पुढे भाडळे खिंडीतील उतारावरील दोन चक्राकार वळणे, खुटाळवाडी-डोणोली दरम्यानचा वळणरस्ता, बांबवडेतील पिशवी व सरूड फाटा, कारखाना फाटा ते बांबवडे गावतलाव, गोगवेनजीक अरुंद पूल, पाटणे फाटा, बाजागेवाडी ते सावे-बहिरेवाडी दरम्यानची तीन तीव्र वळणे, बहिरेवाडी ते जुळेवाडी खिंडीतील अरुंद व धोकादायक वळण, अल्फोन्सा स्कूल, करंजोशी, शाहूवाडी पूल, शिराळे फाटा, पंचायत समिती, येळाणे, मलकापूर ग्रामीण रुग्णालय, भोसलेवाडी ते खोतवाडी फाटा, निळे, वालूर, धोपेश्वर फाटा, वारूळ, चांदोली, केर्ली, दिग्विजय हॉटेल ते तळवडे आणि त्यापुढे नागमोडी वळणाचा आंबा घाट. असा सुमारे चाळीस किलोमीटर लांबीचा हा शाहूवाडीतील अधिक 'वळण'दार महामार्ग साक्षात मृत्यूलाच निमंत्रण देणारा ठरू पाहतोय.

प्रत्येकालाच पुढे जाण्याची घाई झाल्याचे निदर्शनास येणाऱ्या या महामार्गावरील भाडळे खिंडीच्या उतारवळणावरील डाव्या बाजूचे तसेच जुळेवाडी खिंडीतील 'व्ही' वळणावरील दोन्ही बाजूंचे लोखंडी ग्रील केंव्हाच तुटलेले आहेत. तळवडे नजीकच्या अपघाती वळणावरील रस्त्याकडेला लोंबकळणारे लोखंडी ग्रील तर येथे वारंवार घडणाऱ्या अपघातांची भीषणताच स्पष्ट करतात. तर रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या झाडांमधून कोसळणारा पाऊस महामार्गाची अल्पावधीत दुरवस्था करून सोडतो. त्यामुळे वाहनधारकांनी वेगावर नियंत्रण ठेवून मार्गाक्रम करणे अपेक्षित असताना बेफिकीरीने वाहने चालविली जाताहेत. अलिकडच्या काही वर्षात या महामार्गावरून धावणाऱ्या वाहनांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. भरीत भर अवजड वाहतूक, बॉक्साइटची बेलगाम वाहतूक, मुंबईकडे कोकण मार्गे धावणाऱ्या ट्रॅव्हल्स व माणसागणिक वाढणाऱ्या दुचाकींमुळे या रस्त्यावरील वर्दळ वाढली आहे.

काही वळणावरील अरुंद रस्त्यांचे लाखो रुपये खर्चून रुंदीकरण झालेही आहे. तरीही रुंदीकरणाचा प्रश्न लोंबकळत राहिला आहेच. बाजूपट्ट्यांचीही तीच परिस्थिती आहे. अनेक वळणांवर रस्ते सुरक्षा विभागाने उभ्या केलेल्या लोखंडी ग्रीलने बऱ्याच ठिकाणी मान टाकली आहे. ज्या-त्या विभागाने या गोष्टींकडे जाणीवपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे. अपघाताला कारण ठरणारी झाडे संबंधित विभागाने हटवायला हवीत. पो‌लिस प्रशासनाने वाहतुकीच्या नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे करायला हवी. मार्गदर्शक फलकांची उभारणीही तितकीच महत्त्वाची ठरते. या सर्व अनुकूल बाबींच्या पूर्ततेसाठी महामार्ग विभागाने सकारात्मकता दर्शविल्यास महामार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी होऊ शकते. त्यासाठी प्रवाशी नागरिकांनीही नियमांशी बांधिलकी राखायला हवी, हे जरी खरे असले तरी आंब्यासारख्या ठिकाणी सक्षम सरकारी रुग्णालयाबरोबरच पोलिस पथकाची गरज तितकीच अधोरेखित होताना दिसते आहे. जी आजच्या घडीला येथे अस्तित्वात नाही.

नागरिकांचा मोठा आधार

कोल्हापूर-रत्नागिरी या महामार्गावरील विशेष करून मलकापूर, आंबा- विशाळगड घाट परिसरात होणारे अपघात आणि अपघातग्रस्त यांना मदतीचा हात देणारे अनेक देवदूत एकत्रितपणे झटताना दिसतात. मग दरीतून जखमिंबरोबरच मृतदेह बाहेर काढतानाचे प्रसंग असो, जखमींना तातडीची वैद्यकीय मदत असो अथवा मृतदेहाची उत्तरीय तपासणी असो, त्यासाठी लागणारे वाहन व तत्सम यंत्रणाच परिसरातील या धाडसी युवकांनी उभी केली आहे. त्यातून अनेकांचे प्राणही वाचले आहेत. श्रीराम गवरे, अमोल महाजन, प्रमोद माळी, शिराज शेख, सीताराम चव्हाण, राजेंद्र लाड, कृष्णा दळवी, विजय भिंगार्डे, निलेश कामेरकर, सुनील वायकूळ, मारुती पाटील आदी युवकांनी संकटसमयी नेहमीच पुढाकार घेत मदत केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images