Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

सावरकर जयंती साजरी

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

स्वातंत्र्यवीर ‌विनायक दामोदर सावरकर यांची १३३ वी जयंती विविध संस्था, पक्ष-संघटनांच्यावतीने साजरी करण्यात आली. त्यानि‌मित्त विविध उपक्रम झाले. अखिल भारत हिंदू महासभा, हिंदू महासभा व आझाद चौक प्ले कॉर्नरच्यावतीने आयोजित कार्यक्रमात हिंदू महासभेचे शहराध्यक्ष मनोहर सोरप यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी दशरथ भोसले, विजय पोळ, सुरेश गुजर, राजू जाधव, विजय गोडकर, प्रसाद जाधव, उदय कोळेकर, अतुल व्हटकर आदी सदस्य उपस्थित होते. कार्यवाह मारुती मिरजकर यांनी मनोगत व्यक्त केले. भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप मेत्राणी यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष संदीप देसाई यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मारुती भागोजी, श्रीकांत घुंटे, नझीर देसाई, हर्षद कुंभोजकर, विवेक कुलकर्णी, विजय आगरवाल, पारस पलिचा, अमित माळी, अक्षय मोरे, बाळासोहब भोसले आदी उपस्थित होते.

हिंदु युवा प्रतिष्ठानच्यया कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते शिखरे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सावरकरांचे स्मारक उभारण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली. नगरसेवक शेखर कुसाळे, किरण नकाते, ईश्वर परमार, शिवाजी जाधव उपस्थित होते. दीपक मगदूम, बाबा वाघापूरकर डॉ. शिवाजी पवार, माजी जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांची भाषणे झाली. संस्थापक-अध्यक्ष अशोक देसाई यांनी प्रास्ताविक केले. ज्ञानदेव पुंगावकर यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उलगडणार संवादातून अनुभवविश्व

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कुणी शून्यातून विश्व निर्माण करते तर कुणी आपली वाट चोखाळताना येणाऱ्या अडथळ्यांचे डोंगर पार करते. विविध क्षेत्रात योगदान देत इतरांसाठी कुणी आदर्श ठरतं तर कुणी जगातून गेल्यानंतरही आठवणींमधून माणसांच्या मनात घर करून राहतं. येत्या आठवड्यात अशाच संवादात्मक कार्यक्रमातून अनुभवविश्व समृद्ध करण्याची संधी कोल्हापूरकरांना मिळणार आहे.

डॉ. डी. वाय. पाटील यांचा जीवनप्रवास

अक्षरदालन आणि निर्धार यांच्यावतीने आयोजित केल्या जाणाऱ्या अक्षरगप्पा या कार्यक्रमात बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांचा जीवनप्रवास ऐकण्याची संधी मिळणार आहे. सोमवार, ता. ३० रोजी सायंकाळी पाच वाजता डॉ. डी. वाय. पाटील यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन केले आहे. कसबा बावडा ते त्रिपुरा असा पाटील असा प्रवास या मुलाखतीच्या माध्यमातून उलगडला जाणार आहे. ११ वर्षे आमदार, शिक्षण संस्थेची स्थापना, अध्यात्मिक सहवास, सामाजिक उपक्रम या सगळ्याचा आढावा डॉ. पाटील या निमित्ताने घेणार आहेत. मंगळवार पेठ येथील कोळेकर तिकटी परिसरातील अक्षरदालनमध्ये हा कार्यक्रम होणार आहे.


कान्होपात्रा यांच्या संगीतमय स्मृती

कोल्हापुरातील नाट्यसंगीत गायिका व अभिनेत्री कान्होपात्रा यांच्या संगीतस्मृती ​चिरंतन राहाव्यात यासाठी स्थापन केलेल्या गानकोकिळा कान्होपात्रा स्मृतिरंगमंचतर्फे कान्होपात्रा नाट्य संगीत आराधना मैफलीचे आयोजन केले आहे. ३० मे रोजी सायंकाळी पाच वाजता दसरा चौक येथील शाहू स्मारक भवन येथे मैफल होणार आहे. यानिमित्त संगीत नाट्यअभिनेत्री मधुवंती दांडेकर यांचा सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी त्यांचे गायनही होणार आहे. मैफलीत वीणा जोशी, रावी कुलकर्णी, नीला नागांवकर, प्रकाश सप्रे, रवींद्र नाईक यांचे गायन होणार आहे. विविध नाटकातील गीते वेशभूषांसहीत गायन केले जाणार आहे. नंदकुमार जोशी, सचिन कचोटे तबला साथ, डॉ. ज. ल. नागावकर ऑर्गनसाथ तर केदार गुळवणी व्हायोलीनवादन साथ करणार आहेत. वर्षा गाडगीळ यांचे नाविन्यपूर्ण शैलीतील निवेदन हे या मैफलीचे वैशिष्ट्य आहे.

जायंटसतर्फे गौरव सोहळा

विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान जायंटस ग्रुप ऑफ कोल्हापूर सिटीतर्फे केला जातो. यंदा उद्योगपती काकासाहेब चितळे, गोकुळचे माजी अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते अरूण नरके यांना जायंटस भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तर जायंटस सेवा गौरव पुरस्कार शिरोळ येथील डॉ. अशोकराव माने यांना प्रदान करण्यात येणार आहे. राहुल हळदे, भरत दैनी, अमृता दैनी आणि नितीन कुलकर्णी यांना समाजप्रबोधन पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आह. तर कुष्ठरूग्ण सेवेत योगदान देणाऱ्या भूपाल शेटे यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. माजी ग्रामविकास मंत्री आण्णासाहेब डांगे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान सोहळा ५ जून रोजी दुपारी ३ वाजता शाहू स्मारक भवन येथे होणार आहे.

व्याख्यानातून समजून घ्या शिवरायांचे व्यवस्थापन

केआयटी इंजिनीयरिंग कॉलेजचे अध्यक्ष आणि प्रिन्सिपल अमरसिंह राणे यांच्या दुसऱ्या स्मृतिदिनी प्रा. भिकाजी लाड यांचे 'शिवरायांचे व्यवस्थापन' या विषयावर व्याख्यान होणार आहे. अध्यक्षस्थानी प्राचार्य य. ना. कदम आहेत. भारतीय इतिहास संकलक समितीच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कै. राणे यांच्या जीवनप्रवासात त्यांच्याशी स्नेहबंधाने जोडलेल्या मित्रपरिवाराचा यावेळी सन्मान करण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या 'आठवणीतील राणेसर,' या संकल्पनेवर आधारित संवादही होणार आहे. राजारामपुरी आठवी गल्ली येथील भारत सहकारी सोसायटी हॉलमध्ये ३१ मे रोजी सायंकाळी पाच वाजता कार्यक्रम होणार आहे.

'पुन्हा स्मृतिगंध'चे प्रकाशन

कोल्हापुरातील यशवंतराव चव्हाण कॉलेजचे मराठी विभागप्रमुख डॉ. जी. पी. माळी यांनी लिहिलेल्या पुन्हा स्मृतिगंध या ग्रंथाचे प्रकाशन रविवार दि. ५ जूनला मंगळवार पेठेतील कोळेकर तिकटी परिसरातील अक्षर दालन येथे सायंकाळी साडेपाच वाजता होणार आहे. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते आणि माजी खासदार निवेदिता माने यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम होणार आहे. यावेळी डॉ. ल. रा. नसिराबादकर या पुस्तकावर भाष्य करणार आहेत. शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ आणि अक्षर दालन यांच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवराज्याभिषेक सोहळ्याला प्रबोधनाची जोड

0
0



कोल्हापूर : रायगडावर दरवर्षी सहा जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होतो. राज्यभरातील शिवभक्त या सोहळ्यास उपस्थित राहतात. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्यावतीने दरवर्षी उपक्रम आयोजित केले जातात. कोल्हापूरचे युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या राज्याभिषेक सोहळ्याची किर्ती दिवसेदिवस वाढत चालली आहे. यंदा शिवराज्याभिषेक सोहळ्याला प्रबोधनाची जोड दिली जात आहे असे युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले.

युवराज संभाजीराजे छत्रपती म्हणाले, 'शिवाजी महाराजांचे चरित्र हे शौर्याचे प्रतिक आहे. महाराष्ट्रात प्रबळ मुघलांना लढा देत महाराजांनी स्वराज्य स्थापन केले. अफजल खानाचा वध, आग्र्याहून झालेली सुटका, पन्हाळागडावरील सुटका अश रोमांचक प्रसंगाबरोबर शिवराज्याभिषेक सोहळा ही अत्यंत महत्वाची घटना घडली होती. शिवाजी महाराजांनी मुघल सत्तेविरुद्ध रयतेचे राज्य स्थापन करणे ही लोकशाही मूल्यांच्यादृष्टीने मोठी घटना होती. आजच्या घडीला हा लोकांचा सोहळा रायगडावर सहा जून रोजी साजरा केला जातो. या सोहळ्यास पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, कोकणासह मराठवाडा, विदर्भातील शिवभक्त रायगडावर मोठ्या संख्येने हजर राहतात. शिवजयंतीवेळी शिवरायांचा फक्त जयजयकार केला जातो. पण शिवाजी महाराजांचे विचार कोणी घेत नाही. हल्ली शिवजयंतीत काही अपप्रवृत्ती घुसल्या आहेत. गुंडांचे डिजिटल फलक लागत आहेत. डॉल्बीच्या तालावर शिवजयंतीला युवा पिढी नाचते आहे असे चित्र सर्रास दिसते. आम्ही मात्र शिवराज्यभिषेक सोहळ्यात या अपप्रवृत्ती शिरून दिलेल्या नाहीत. रायगडावर पारंपरिक वाद्याच्या गजरात शिवराज्यभिषेक सोहळा साजरा होतो. अनेक शहरांत या सोहळ्यानिमित्त कार्यक्रम होत आहेत. त्यातून हा सोहळा लोकोत्सव होऊ लागला आहे.

युवराज संभाजीराजे छत्रपती म्हणाले, 'गेली दहा वर्षे शिवराज्यभिषेक सोहळा साजरा होतो. सोहळ्यात जल्लोष असतो. शिवरायांचा जयजयकारही केला जातो. यंदापासून आम्ही शिवराज्यभिषेक सोहळ्यातील जल्लोषाला प्रबोधनाची जोड देत आहोत. हा प्रबोधन उत्सव व्हावा यासाठी हिवरे बाजार येथील पोपटराव पवार यांचे व्याख्यान रायगडावर आयोजित केले आहे. सोहळ्याला आलेल्या शिवभक्तांनी विचार घेऊन जावेत हा आमचा उद्देश आहे. सध्या महाराष्ट्र दुष्काळात होरपळत आहेत. त्यासाठी मार्गदर्शन करणारे पवार यांचे हे व्याख्यान होईल. शिवकालीन पाणी साठवण योजना, शिवाजी महाराजांची जलनीती, राजर्षी शाहू महाराजांनी दुष्काळावेळी रयतेची घेतलेली काळजी, पाण्याचे महत्व व त्यादृष्टीने केलेल्या योजना, महापुरुषांविषयक विचारमंथन असे रायगडावरील यावर्षीच्या कार्यक्रमाचे स्वरूप असेल. आगामी काळात अशाच पद्धतीने दरवर्षी कार्यक्रम असेल. शिवकालीन गडकोट हे महाराष्ट्राचे वैभव आहे. ते जपण्याकडे केंद्र आणि राज्य सरकारचे दुर्लक्ष होत आहे. यापूर्वीच्या राज्याभिषेक सोहळ्यात आम्ही केंद्र आणि राज्य सरकारला इशारे दिले. पण त्याचा काही उपयोग झालेला दिसत नाही. गडकोटांच्या संवर्धनासाठी लोक रस्त्यांवर उतरणार नाहीत. सलग आंदोलन करणार नाहीत. आम्ही सरकारला इशारा देण्याऐवजी नवीन मार्ग चोखाळला. दिल्लीतील सांस्कृतिक मंत्रालयाच्या सचिव व जागतिक वारसास्थळ समितीच्या शिखा जैन यांची भेट घेतली. त्यांना महाराष्ट्रातील गडकोटांविषयी माहिती दिली. त्यांनी राज्यातील किल्ले पाहण्याचे कबूल केले. नुकतेच काही गडकोटांची पाहणी केली. आता पुढील कार्यवाही होईल. संवर्धनासाठी प्रयत्न होतील.'

युवराज संभाजीराजे छत्रपती म्हणाले, 'शिखा जैन यांनी महाराष्ट्रात येण्याचे कबूल केले. त्यांनंतर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांची भेट घेतली. गडकोटांचे संवर्धन होण्यासाठी युनोस्काच्या यादीत महाराष्ट्रातील किल्ल्यांची नोंद झाली पाहिजे हे त्यांना समजावून दिले. यापूर्वी राजस्थानमधील ज्या किल्ल्यांचा समावेश जागतिक वारसास्थळात झाला आहे, त्याचे प्रस्ताव डॉ. शिखा जैन यांनी केले होते हे निदर्शनास आणले. त्यानुसार गेल्या आठवड्यात पन्हाळा, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, रायगड, शिवनेरी, राजगड, तोरणा, मुरुड जंजिरा या किल्ल्यांची तावडे यांच्यासह मी, शिखा जैन आणि त्यांच्या समितीने काही ठिकाणी हेलिकॉप्टरने हवाई पाहणी केली. पाहणीनंतर युनोस्कोकडे प्रस्ताव पाठवले जातील. त्यासाठी राज्य सरकार पुढाकार घेणार आहे. राजर्षी शाहू महाराजांनी शिवनेरी व रायगड किल्ल्यांच्या जीर्णोद्धारांसाठी १०० वर्षांपूर्वी आर्थिक मदत केली होती. सिंधुदर्ग हे शिवाजी मंदिराला शाहू महाराजांनी सभामंडप बांधला आहे. आता शाहू महाराजांच्या विचाराचा वारस म्हणून मला गडकोर्ट संवर्धनासाठी काम करण्याची संधी मिळत आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा करून राजस्थानप्रमाणे महाराष्ट्रातील पाच किल्ले जागतिक वारसास्थळात नोंद व्हावी, प्रायोगिक तत्त्वावर त्यांचे संवर्धन व्हावे म्हणून प्रयत्न करणार आहे. त्यामुळे परदेशातील पर्यटक या गडकोटांकडे आकर्षित होतील. त्यानंतर सर्व गडकोटांचे संवर्धन विविध माध्यमातून केले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पारंपरिक वाद्यांच्या गजरात अहिल्यादेवींना अभिवादन

0
0
पारंपरिक वाद्यांचा गजर, प्रबोधनात्मक फलक, भंडाऱ्याची उधळण आणि वालूक नृत्य सादर करत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त मिरवणूक काढण्यात आली.

वाहतूक कोंडीचा रंकाळा

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहराच्या पर्यटनाचा केंद्रबिंदू असलेला रंकाळा तलाव आणि चौपाटीवर पर्यटकांची नेहमी वर्दळ असते. मात्र पर्यटकांना त्यांची वाहने लावण्यासाठी जागाच उपलब्ध नसल्याने रंकाळ्याभोवती पार्किंग स्पॉट तयार झाले आहेत. वाहनांचे अस्ताव्यस्त पार्किंग, अरूंद रस्ते, वाढलेले अतिक्रमण आणि खाद्यपदार्थांच्या गाड्यांचे विस्कळीत नियोजन यामुळे दिवसेंदिवस ही कोंडी वाढतच आहे. महापालिका प्रशासनाने तातडीने दखल घेऊन पर्यटक वाहनांसाठी पार्किंगची सुविधा उपलब्ध करून अतिक्रमणे हटवण्याची गरज आहे. अन्यथा वाहतूक कोंडीने रंकाळा परिसरात येणाऱ्या पर्यटनाचा श्वास गुदमरण्याची शक्यता आहे.

रखडलेला रस्ता

सुटीच्या दिवसात रंकाळ्यावर स्थानिकांसह पर्यटकांची अक्षरशः रीघ लागलेली असते. त्यामुळे चौपाटी आणि पदपथ उद्यानावर गर्दी असते. पदपथ उद्यानात जाणाऱ्या पर्यटकांसाठीही डी मार्टसमोरून जाणे सोईचे असल्याने या ठिकाणच्या चिंचोळ्या जागेत दुचाकी पार्क केल्या जातात. चारचाकीसाठी स्वतंत्र पार्किंग नसल्याने वाहनधारक थेट रस्त्याच्या दुतर्फा वाहने पार्क करतात. सुट्यामुळे जाऊळाचा गणपती ते डी मार्टपर्यंत दुतर्फा वाहने पार्क केली जातात. मुळात रस्ता अरुंद आहे. आयआरबी कंपनीसह महापालिकेनेही या मार्गावरील अतिक्रमणांकडे दुर्लक्ष केले आहे. अलिकडे तर काही दुकानधारकांनीही थेट रस्त्यावर अतिक्रमण करून जागा व्यापली आहे. यामुळे अगदीच चिंचोळ्या रस्त्यावरून वाहतूक सुरू असते. दोन अवजड वाहने आली तरी अपघाताची भीती असते. यातच रंकाळा चौपाटीवर जाणारे स्थानिक नागरिक आणि पर्यटक रस्त्याकडेला वाहने पार्क करतात. अंबाई टॅँककडून वाहतूक सुरू असल्याने परिसरातील नागरिकांनाही त्रास सहन करावा लागत आहे.

खाद्यपदार्थांच्या गाड्यांची गर्दी

रंकाळ्यावरील वाढत्या पर्यटनाचा लाभ उठवण्यासाठी परिसरात खाद्यपदार्थांच्या गाड्यांची संख्या वाढली. टॉवरच्या दोन्ही बाजूला गाड्या आणि दुकाने आहेत. पुढे डी मार्टसमोर चौपाटीवर खाद्य पदार्थांच्या गाड्यांसह आईस्कीम विक्रेतेही असतात. अंबाई टँकच्या बाजूच्या उद्यानाकडेही काही गाड्या आहेत. रस्त्याला लागूनच असलेल्या या गाड्यांमुळे या ठिकाणी थांबणारे लोक रस्त्यावर वाहने लावतात. त्यांना कसलीच शिस्त नसते. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. खाद्यपदार्थांच्या गाड्यांसमोर वाहने पार्क करण्यास मज्जाव केल्याशिवाय रस्त्यावरील वाहतूक सुरळीत होणार नाही.

डी मार्टला येणाऱ्यांचे पार्किंगही रस्त्यावर

रंकाळ्याच्या अगदी समोर असलेल्या डी मार्टमध्ये खरेदीसाठी गर्दी असते. रंकाळ्यावर फिरण्यासाठी येणारे पर्यटकही डी मार्टमध्ये जातात. मात्र त्यांची वाहने रस्त्यावरच असतात. खरेदीसाठी आलेले बहुतांश लोक रस्त्याकडेलाच वाहने पार्क करतात. त्यामुळे वाहतूक कोंडीत भरच पडते. डी मार्टमध्ये जाणाऱ्या प्रत्येकाचे वाहन डी मार्टच्या खासगी जागेत लावल्यास रस्त्यावरील पार्किंगला आळा बसेल. गेली दोन-तीन वर्षे डी मार्टची वाहने रस्त्यावरच होती. त्यामुळे किमान गर्दीच्या काळात खरेदीसाठी येणाऱ्या लोकांची वाहने रस्त्यावर राहू नयेत, याची खबरदारी डी मार्ट प्रशासनाने घेणे गरजेचे आहे.

वाहतूक पोलिसांचा अभाव

सुट्यांच्या काळात रंकाळ्याभोवती गर्दी असते. याची कल्पना महापालिका प्रशासन, पोलिस आणि वाहूतक नियंत्रण शाखेलाही आहे. शनिवारी आणि रविवारी संध्याकाळी पाच ते नऊ या वेळेत प्रचंड गर्दी असते. त्यामुळे चौपाटी परिसरात वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहतूक पोलिसांची गरज आहे. वाहतूक नियंत्रण शाखेकडे मनुष्यबळाची कमतरता असल्याचे कारण पुढे करून हा मुद्दा टाळला जातो. पण परिसरात होणारे किरकोळ अपघात आणि वाहतूक कोंडींचा विचार करून रोज दुपारपासून ते रात्री नऊपर्यंत पाच ते सहा वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे गरजेचे आहे. पोलिसांमुळे वाहतूक सुरळीत राहील. त्याचबरोबर रस्त्यावरील अस्ताव्यस्त पार्किंगलाही आळा बसेल.

पार्किंग आणि वाहतुकीसाठी पर्याय उपलब्ध

रंकाळा परिसरातील वाहतूक कोंडीला अस्ताव्यस्त पार्किंग आणि राधानगरी मार्गाचे रखडलेले काम या बाबी कारणीभूत आहेत. गेल्या आठ ते नऊ वर्षांपासून रखडलेले टॉवर ते संध्यामठ कॉर्नरपर्यंतचे काम पूर्ण होणे गरजेचे आहे. शिवाय अंबाई टँकमार्गे होणारी अवजड वाहतूक बंद करून फुलेवाडी रिंगरोड ते आपटेनगर पुढे गारगोटी रोड, हॉकी स्टेडियमार्गे वळवता येऊ शकते. पार्किंगसाठी खराडे कॉलेज, दुधाळी मैदान आणि दत्त मंगल कार्यालयामागील खुल्या जागेचा वापर होऊ शकतो. महापालिका प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी पार्किंगचे पर्याय उपलब्ध केल्यास रस्त्यांच्या दुतर्फा वाहने लागणार नाहीत. त्याचबरोबर वाहतूकही सुरळीत सुरू राहील. महापालिका प्रशासनाने शहरात काही ठिकाणी बहुमजली पार्किंग इमारती निर्माण करण्याचे नियोजन केले आहे. रंकाळा परिसरात तातडीने बहुमजली पार्किंग इमारत निर्माण केल्यास याचा फायदा महापालिकेलाही होऊ शकतो. त्याचबरोबर रंकाळा पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना पर्यटनाचा आनंद घेता येईल.

०००००००००

रंकाळा परिसरात होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रंकाळा टॉवरपासून पुढे जाणाऱ्या रस्त्याचे काम होणे गरजेचे आहे. आम्ही महापालिकेकडे पाठपुरावा करीत आहोत. वाहनांच्या पार्किंगसाठीही परिसरातील शाळा, महाविद्यालयांनी सहकार्य केल्यास त्या जागा वापरता येतील. तूर्तास वाहतूक नियंत्रित करण्यासाठी कर्मचाऱ्यांची संख्या वाढवता येईल.

आर. आर. पाटील, वाहतूक पोलिस निरीक्षक

रंकाळा परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे स्थानिक नागरिकांची अडचण निर्माण झाली आहे. अंबाई टँक परिसरातून एखादा पेशंट शहरात आणायचा असेल तरीही मोठी कसरत करावी लागते. अवजड वाहनांच्या वाहतुकीने रस्ते धोकादायक बनले आहेतच. आता घरांसमोरही पार्किंग असते. त्यामुळे घरातून बाहेर पडणेही मुश्कील बनले आहे.

रोहन पाटील, नागरिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसचिव रणदिवे राजीनाम्याच्या पवित्र्यात

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेतील आघाडीच्या राजकारणातून वाढता दबाव आणि काही नगरसेवकांची अरेरावीमुळे प्रशासन अस्वस्थ बनले आहे. महापाकिलेच्या सत्तेच्या साठमारीत प्रामाणिक अधिकाऱ्यांना काम करणे कठीण बनत चालले असून काही नगरसेवक व पदाधिकाऱ्यांच्या दबावाच्या राजकारणाला कंटाळून नगरसचिव उमेश रणदिवे यांनी पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. रणदिवे यांनी शनिवारी आयुक्त पी. शिवशंकर यांची भेट घेऊन स्वेच्छानिवृत्ती घेणार असल्याचे सांगितले. स्वेच्छानिवृत्ती संदर्भात सोमवारी ते रितसर महापालिकेला कळविणार असल्याचे वृत्त आहे.. त्यांच्या राजीनाम्याच्या वृत्ताने महापालिकेतील काही नगरसेवकांच्या दादागिरीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. नियमबाह्य कामासाठी अनेकदा अधिकाऱ्यांवर दबाव टाकला जातो. काही कर्मचाऱ्यांना मारहाणीचे प्रकारही घडले आहेत. आता एका अधिकाऱ्यानेच या साऱ्या प्रकाराला वैतागून नोकरीचा राजीनामा देण्याचा पवित्रा घेतल्याने प्रशासनातील अस्वस्थता वाढली आहे. दुसरीकडे रणदिवे यांनी राजीनामा देऊ नये, प्रशासनाला प्रामाणिक अधिकाऱ्यांची आवश्यकता आहे असे सांगून त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न काही अधिकारी व समाजातील जाणत्या नागरिकांनी केला. आयुक्तांनी, शनिवारी झालेल्या चर्चेत रणदिवे यांना स्वेच्छानिवृत्ती घेऊ नये, असे सांगितल्याचे वृत्त आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विकासाला नाही, विस्तारीकरणाला विरोध

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर शहराच्या विकासाला विरोध नाही. पण विकासाच्या नावाखाली शहराच्या विस्तारीकरणाला ठाम विरोध राहिल. पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण, पाणी अशा सुविधा शहरवासियांना उपलब्ध करून देण्यात कोल्हापूर महापालिका अपयशी ठरली आहे. शहराचा विकास न साधू शकणारे ग्रामीण भागाचा विकास काय साधणार? असा सवाल करत हद्दवाढीच्या विरोधातील लढा निकराने लढण्याचा निर्धार हद्दवाढ विरोधी कृती समितीच्या बैठकीत करण्यात आला. कृती समितीचे पदाधिकारी पाच ते सात जून या कालावधीत संबंधित गावात जाऊन नागरिकांना भेटणार आहेत. त्यांच्याकडून सूचना घेतल्या जाणार आहेत.

कृती समितीचे अध्यक्ष माजी आमदार संपतराव पवार पाटील यांच्या अध्यक्षतखाली सर्किट हाऊस येथे बैठक झाली. हद्दवाढी संदर्भात नगरविकास विभागाची सचिव स्तरावरील समिती नऊ आणि दहा जून रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर संबंधित १८ गावांचा हद्दवाढीला असलेला विरोध, त्या संदर्भातील अहवाल, समिती सदस्यांपुढे बाजू कुणी मांडायची या संदर्भात बैठकीत चर्चा झाली. गावांनी ग्रामसभा घेऊन हद्दवाढीला विरोध केला आहे. ग्रामसभेचे ठराव अहवालासोबत जोडले जातील.

माजी आमदार पवार म्हणाले, 'कोल्हापूर महापालिका शहराच्या संपूर्ण विकासासाठी सार्वजनिक व्यवस्था उभी करण्यास अपयशी ठरली. रंकाळा तलाव, पंचगंगा नदी प्रदूषण, अंबाबाई मंदिर विकास आराखडा, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आ वासून उभा आहे. वर्षानुवर्षे या प्रश्नांची चर्चाच सुरू आहे. आरोग्य आ​णि शिक्षणाची हेळसांड सुरू आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषदेनेही विरोध केला आहे. हद्दवाढीच्या विरोधात येथून पुढेही निकराने लढू.'

चर्चेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे भगवान काटे, नारायण पोवार, महेश चव्हाण, बी. ए. पाटील, भगवान पळसे आदींनी सहभाग घेतला. दीपक तिवले, सुभाष सोनुले, बाबूराव पाटील, शंकरराव पाटील, शिवाजी समुद्रे सचिन चौगुले आदी उपस्थित होते.

नरके, महाडिक गैरहजर

बैठकीदरम्यान, आमदार सुजित मिणचेकर यांनीही कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. मात्र आमदार चंद्रदीप नरके, अमल महाडिक हे बैठकीला अनुपस्थित होते. पूर्व नियो​जित कार्यक्रमामुळे बैठकीला हजर राहू शकत नसल्याचे त्यांनी संयोजकांना कळविल्याचे सांगण्यात आले.

शेतकऱ्यांच्या त्यागाचा विसर

नाथाजी पोवार म्हणाले, 'हद्दवाढीमुळे विकासाचे दालन सुरू होईल असा खोटा प्रचार सुरू आहे. महापालिकेकडे निधी नाही. आराखडा नाही. हे कसला विकास साधणार ? १४ व्या वित्त आयोगामुळे ग्रामपंचायतींना प्रचंड निधी मिळाला. गावांचा विकास होत आहे. मुळात आसपासच्या गावातील शेतकऱ्यांनी शिवाजी विद्यापीठ, एमआयडीसी, विमानतळ, महापालिकेच्या पाणी पुरवठ्याच्या जलशुद्धीकरण केंद्र व पंपिंग स्टेशनसाठी जमिनी​ दिल्या. मात्र शेतकऱ्यांच्या त्यागाचा सगळ्यांना विसर पडला आहे. प्रत्येक गावात पशुधन, कृषीक्षेत्र असून हद्दवाढीमुळे त्याला धोका निर्माण होणार आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाविकांचे दान कुणाच्या पारड्यात ?

0
0

देवस्थानच्या ‌तिजोरीत अवघे १८ कोटी, तर ठेवी ६५ कोटींच्या

Janhavi.Sarate@timesgroup.com

कोल्हापूर : साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेले, करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर, दख्खनचा राजा जोतिबा यासह कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, ठाणे या जिल्ह्यांतील तब्बल तीन हजारांहून अधिक मंदिरांचे व्यवस्थापन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडे आहे. तीन हजारांहून अधिक मंदिरे असली तरी मंदिरांमधून देवस्थान समितीकडे जमा होणारे दान मात्र अत्यल्प आहे.

श्री अंबाबाई मंदिरासह इतर मंदिरांतील देणगीतून देवस्थान समितीच्या तिजोरीत १८ कोटी ३३ लाख ६० हजार ४० इतकीच रक्कम जमा आहे. तर ६५ कोटींच्या ठेवी देवस्थान समितीकडे आहेत. पण चांदीच्या उंबऱ्याआतील रक्कम नक्कीच भुवया उंचावणारी असण्याची शक्यता आहे. वस्तुतः मंदिरांची संख्या, भाविकांची एकूण वर्दळ, दातृत्व पाहता हा निधी अधिक असण्याची शक्यता आहे.

करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरात एकूण १७ दानपेट्या आहेत. त्यामध्ये जमा होणारा आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अखत्यारित असलेल्या ३०६७ मंदिरातील उत्पन्नातून देवस्थान समितीकडून विविध खर्च केला जातो. भाविकांच्या संख्येबरोबरच देवस्थान समितीच्या उत्पन्नातही वाढ झाली आहे. मंदिरांमध्ये ठेवण्यात येणाऱ्या दानपेटी, भाविकांकडून येणारी देणगी, अभिषेकासाठी जमा होणारी रक्कम, पूजाविधीसाठी ठेवण्यात आलेल्या ठेवी, शिल्लक रक्कमांच्या मुदत ठेवींवरील व्याज, महाप्रसादासाठी जमा होणारी रक्कम, मंदिरांच्या आवारातील दुकानांचे भाडे अशा विविध माध्यमातून देवस्थान समितीला आर्थिक उत्पन्न मिळते. भाविकांकडून जमा होणारी रक्कम प्रत्यक्षात अधिक आहे. भाविकांकडून दिले जाणारे सर्व दान सुरळीत दानपेट्यांमध्ये येतेच असे नाही. उंबऱ्याच्या आतील आणि बाहेरील असा वाद सर्वच मंदिरांमध्ये आहे. मंदिरातील दानपेटीऐवजी देवीच्या समोर ठेवले जाणारे ताट, त्यात पडणारी दक्षिणा हा प्रकार फक्त अंबाबाई मंदिर किंवा जोतिबा मंदिरातच पहायला मिळतो असे नाही. सर्वच मंदिरांमध्ये कमी-अधिक प्रमाणात हीच स्थिती आहे.

दानाची विभागणी कशाला ?

देवस्थान समितीच्या अखत्यारित येणाऱ्या विविध मंदिरात भाविकांकडून मिळणारे दोन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे येणे अपेक्षित आहे. त्याची उंबऱ्याच्या आत आणि बाहेर अशी विभागणी होण्यापेक्षा देवस्थान समितीकडे पैसे आल्यास त्याचा वापर सोयी-सुविधांसह विकासकामांसाठी वापरता येणे शक्य आहे. देवस्थान समितीकडे जमा होणारा निधी लोकोपयोगी कामांसाठी वापरणे शक्य आहे. यापूर्वी २००१ मध्ये देवस्थान समितीने असा उपक्रम राबविला होता. यंदा जमा झालेल्या रक्कमेतील ५० लाखांचा निधी दुष्काळग्रस्तांना देण्यात आला आहे.

असा होतो खर्च

देवस्थान समितीचा होणारा खर्च हा वर्षाकाठी १० कोटींच्या आसपास आहे. यात देवीच्या दैनंदिन पूजा, नैवेद्य यावर होणारा खर्च, याशिवाय नोकर पगार, महापालिकेचे विविध कर, वीजबील, किराणा माल, सुरक्षा रक्षकांचा पगार, यंत्रणेच्या देखभालीवर खर्च, वकील फी, फोन बिल, प्रसिद्धी, पोस्टेज, मंडप व्यवस्था, रंगकाम अशा बाबींवर होतो. याचा खर्च देवस्थान समितीला करावा लागतो. मात्र, देवस्थान समितीकडील येणारे उत्पन्न अधिक आहे. त्यामुळे उर्वरित रक्कम दरवर्षी ठेव स्वरुपात ठेवली जाते.

देवस्थान समितीकडे जमा रक्कम कोटीत दिसत असली तरी अन्य खर्च समितीच्यावतीने केले जातात. मंदिराच्या अंतर्गत सुविधांसाठीही भक्तांकडून जमा झालेल्या रक्कमेचा वापर केला जातो. यंदा ५० लाखांचा निधी दुष्काळग्रस्तांना दिला आहे.

- शुभांगी साठे, सचिव, देवस्थान समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पहिल्याच दिवशी मिळणार पाठ्यपुस्तकेपंधरा जूनपासून शाळेची घंटा वाजणार

0
0


म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

सर्व शिक्षा अभियानांतर्गत प्राथमिक शिक्षण विभागातील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके देण्यात येणार आहेत. त्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. जिल्ह्यातील ९० टक्के शाळांमध्ये पुस्तक वाटपाचे काम पूर्ण झाले आहे.

सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषद, नगर परिषद, खासगी अनुदानित शाळा तसेच माध्यमिक शाळांमधील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे ४ लाख ५५ हजार ९३० एवढी आहे. त्यापैकी ४ हजारांहून अधिक शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी सुमारे २५ लाख ३७ हजार ४५० एवढ्या पुस्तकांची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी २२ लाख ८३ हजार ४ इतकी पुस्तके प्राप्त झाली आहे. आठवडाभरात ९० टक्के शाळांमध्ये २२ लाख ८३ हजार इतकी पुस्तके पोहोच करण्यात आली आहेत. उर्वरीत अडीच लाख पुस्तके महिनाअखेरपर्यंत सर्व शाळांना पोहोच करण्यात येणार आहेत.

दरम्यान, १५ जूनपासून शाळेची घंटा वाजणार असून, त्याच दिवशी शाळांनी विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तकांचा बंच देणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी सर्वच शाळांमध्ये पहिल्या दिवशी पुस्तक देण्याची प्रक्रिया पूर्णत्वास आली आहे

असे आहे तालुकानिहाय नियोजन

१५ जूनपासून जिल्ह्यातील शाळा सुरू होणार आहेत. त्यासाठी १ ते ८वीच्या विद्यार्थ्यांना वाटप करावयाच्या पुस्तकांची उपलब्धता तालुका स्तरावर पूर्णत्वास आली आहे. त्यानुसार अक्कलकोट १ लाख ६३ हजार ३२८, माढा २ लाख १० हजार ६०७, मंगळवेढा १ लाख ६२ हजार ३८३, करमाळा १ लाख ७४ हजार २१, माळशिरस ३ लाख ७६ हजार २७, सांगोला २ लाख ३० हजार १८७, मोहोळ १ लाख ९२ हजार ९७४, बार्शी २ लाख १० हजार २४, पंढरपूर २ लाख ९२ हजार ७११, उत्तर सोलापूर १ लाख ८८ हजार ५६१ आणि दक्षिण सोलापूर तालुक्यासाठी १ लाख ९८ हजार ४६४ इतकी पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाआरोग्य शिबीरात२५ हजारांहून अधिक रुग्णांची तपासणी

0
0


म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

भारतीय जनता पार्टी सोलापूर जिल्हा आणि आमदार सुभाष देशमुख यांच्या माध्यमातून निलम नगर येथील लोकमंगल जीवक हॉस्पिटलच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या मोफत महाआरोग्य शिबीरात मंगळवारी रुग्णांची महागर्दी झाली होती. २५ हजारांहून अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली. मोफत औषधोपचार देण्याबरोबरच अनेक रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्याचेही ठरले. शहरासह ग्रामीण भागातील गावागावात ट्रक, टेम्पो, सिटीबस आणि अ‍ॅम्बुलन्समधून हजारो रुग्ण शिबीरस्थळी आले होते.

महाशिबीराच्या माध्यमातून जास्तीत जास्त रुग्णांना मोफत आरोग्य सेवेचा लाभ मिळावा म्हणून आमदार सुभाष देशमुख यांनी या शिबीराची शहर आणि जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली होती. लोकमंगल जीवक हॉस्पिटलच्या सात एकर जागेवर मंडप घालून शिबीराची तयारी केली होती.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षप्रमुख ओमप्रकाश शेटे यांच्या हस्ते शिबीराचे उद्घाटन करण्ङ्मात आले. मुंबईच्या जे. जे. हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी शिबीराचा प्रारंभ केला.

आमदार सुभाष देशमुख, छत्रपती शिवाजी सर्वोपचार हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार आदी उपस्थित होते.

नेत्र तपासणी, हृदयरोग, बालरोग, स्त्रीरोग, अस्थिरोग, दंतरोग, जनरल सर्जरी, कान, नाक, घसा, कर्करोग, गुप्तरोग, त्वचा रोग आदींसाठी स्वतंत्र विभागाची व्यवस्था करण्यात आली होती. या शिबीरामध्ये संजय दिगंबर वाघमारे यांनी देहदानाचा फॉर्म भरला. शिबीरासाठी आलेले रुग्ण आणि त्यांच्या सोबत आलेल्यांसाठीसुद्धा मोफत भोजनाची सोय करण्यात आली होती.

...
पैशाविना कोणताही गरीब रुग्ण वंचित राहू नये म्हणून राज्य सरकारमार्फत प्रयत्न सुरू आहेत. अनेक रुग्णांना सरकारने मदतीचा हात दिला आहे. आमदार सुभाष देशमुख यांनी आयोजित केलेल्या शिबीरामध्ये ज्या रुग्णांवर मोठी व अडचणीची असणारी शस्त्रक्रिया करावयाची आहे. अशा रुग्णांवर पुणे आणि मुंबईमध्ये शस्त्रक्रिया करण्यात येतील तसेच हृदयरोगाबाबतच्या रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधीतून सर्वतोपरी मदत करण्यात येणार आहे.

ओमप्रकाश शेटे, कक्षप्रमुख, मुख्यमंत्री सहायता निधी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नमामि प्राधिकरण स्थापणारमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

0
0

म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर

'चंद्रभागा नदी निर्मल, अविरत वाहती राहिली पाहिजे यासाठी नमामि प्राधिकरण स्थापन करण्यात येईल, ' अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. नमामी चंद्रभागा अभियानासंदर्भात पंढरपूर येथील सिंहगड कॉलेज येथे आयोजित केलेल्या नमामी चंद्रभागा परिषदेत मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री बोलत होते. या परिषदेस जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह राणा, वित्त व नियेाजन मंत्री सुधीर मुनगंटीवार, सहकार व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, पालकमंत्री विजय देशमुख उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, 'नद्यांचे पावित्र्य अबाधित राखण्यासाठी राज्य सरकारने नमामिगंगेच्या धर्तीवर नमामि चंद्रभागा हे अभियान राबविण्याचे ठरविले आहे. याची सुरुवात नमामी चंद्रभागा या अभियानाने होत असून, नमामी चंद्रभागा अभियान राबविताना मुळ तत्वज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन नदी निर्मल व अविरत ठेवण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. यासाठी प्राधिकरण स्थापन्यात येऊन या प्राधिकरणामार्फत मुळ आराखडा व जलतज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन अद्यावत आराखडा तयार केला जाईल. हे काम पूर्ण करण्यासाठी कालावधी निश्चित करुन त्यानुसार काम करण्यात येणार आहे. तसेच भीमा नदीच्या उगमापासून संगामापर्यंत शुद्धीकरणाची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. भीमा नदीपात्रात मिळसणाऱ्या उपनद्या आणि ओढा-नाल्यांचीही दुरुस्ती करण्यास प्राधान्य दिले जाईल.'

उपलब्ध पाण्याचे संवर्धन होणार

राज्यातील उपलब्ध पाण्याचे संवर्धन करण्याचे महत्वाचे काम राज्य सरकारने हाती घेतले आहे. केवळ धरणातून पाण्याचे संवर्धन करुन न थांबता नैसर्गिक स्त्रोतांचे संवर्धन करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. या कार्यक्रमातून चांगला रोड मॅप तयार होऊन हे काम निश्चित कालावधीत पूर्ण होण्यास मदत होणार असल्याचेही फडणवीस म्हणाले.

जनतेचा कार्यक्रम व्हावा

नमामी चंद्रभागा हा कार्यक्रम सरकारच्या माध्यमातून जनतेचा कार्यक्रम व्हावा, अशी अपेक्षा अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी केली. राज्यातील नद्यांचे पाणी शुद्ध असणे तसेच नदीमध्ये दूषित पाणी मिसळू नये यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. चंद्रभागा नदी हा वारकऱ्यांचा श्रद्धेचा विषय आहे. त्यामुळेच अभियानाची सुरुवात पंढरपूर येथून करण्यात आली आहे. अभियानाची माहिती सर्वांना व्हावी यासाठी नमामी चंद्रभागा ही वेबसाइट तयार करण्यात येणार असल्याचेही अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले. तसेच नजीकच्या काळात या संदर्भात विकास परिषद आयोजित करण्यात येईल असेही ते म्हणाले.

...........

कोट

नदीला पुनर्जिवित करण्याचे आतापर्यंत न झालेले काम सरकारने हाती घेतले आहे. नदीकडे केवळ पाण्याचे स्त्रोत म्हणून न पाहात अध्यात्मिक स्त्रोत म्हणून पाहून काम केल्यास नमामी चंद्रभागा अभियान राबविण्यास कोणतीही समस्या उद्भवणार नाही. या उपक्रमात लोकांची जबाबदारी महत्वाची आहे. वारकऱ्यांनी आपली जबाबदारी पार पाडावी.

राजेंद्रसिंह राणा, जलतज्ज्ञ

..............

आषाढी यात्रेचे

अनुदान पाच कोटींवर

आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर यापूर्वी भाविकांच्या सुविधाकरीता दोन कोटी रुपयांचे अनुदान राज्य सरकारच्या वतीने पंढरपूर नगरपालिकेला देण्यात येत होते. यामध्ये भरीव वाढ करून हे अनुदान पाच कोटी रुपये इतके करण्यात येईल, अशी महत्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत येणारी कामे टाईम बॉण्ड (निर्धारित वेळ) आखून पूर्ण करण्याला प्राधान्य देणार आहे. पंढरपूर शहराला सर्वोत्तम दर्जाचे तीर्थक्षेत्र करण्यासाठी सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करील.

रखडलेल्या सिंचन योजना पूर्ण करणार

शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचवावे यासाठी राज्यातील रखडलेल्या उपसा सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी आणि दुरूस्तीसाठी केंद्राकडे दहा हजार कोटी रुपयांच्या पॅकेजचा प्रस्ताव सादर केला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्व योजना पूर्ण करणार आहे. यंदाच्या वर्षी राज्यातील शेतकऱ्यांना पीक विमा संरक्षणापोटी सुमारे ४ हजार ६०० कोटी इतके रुपये देण्यात आले आहेत. दोन वर्षांत राज्यातील ४ लाख हेक्टर इतके क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी प्रयत्नशील आहे.

..........

बेदाण्याला व्हॅटमुक्ती

शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी नाबार्डकडून ३ हजार कोटी रुपयांचे कर्ज घेण्यात आले आहे. २ वर्षात ४ लाख हेक्टर क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. यापुढे बेदाण्याला व्हॅटमधून कायमची सुट दिल्याची घोषणाही या वेळी फडणवीस यांनी केली.

.............

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाबळेश्वरात पर्यटकांची गर्दी

0
0

म. टा. प्रतिनिधी, सातारा

राज्यात उन्हाची तीव्रता कायम असताना महाबळेश्वर येथे मात्र, पर्यटक थंड हवेची मजा लुटत आहेत. शहरात सायंकाळनंतर दाट धुके पसरत आहे. त्यामुळे या वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी महाबळेश्वर व पाचगणीत पर्यटक मोठ्या संख्येने आले आहेत.

उन्हाळी सुटीचा हंगाम अखेरच्या टप्प्यात आल्याने महाबळेश्वर येथील बाजारपेठ व सर्वच प्रेक्षणीय स्थळे गर्दीने फुलून गेली आहेत. गेले दोन दिवस महाबळेश्वर-पाचगणी या मुख्य मार्गावर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती. विविध राज्यांमधून विशेषत: गुजरातमधून येणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिक आहे. हॉटेल व बंगले हाउसफुल झाल्याने पर्यटकांना भिलार, वाई या ठिकाणी मुक्काम करावा लागत आहे. बाजारपेठेते खरेदी-विक्रीतून दररोज कोट्यवधींची उलाढाल होत आहे.

वेण्णा तलावावर झुंबड

महाबळेश्वरमधील वेण्णा तलावावर झुंबड उडाली असून, गेल्या चार दिवसांमध्ये सुमारे तब्बल दहा लाख रुपये शुल्क जमा झाले आहे. नौकाविहार करण्यासाठी बोटींची संख्या कमी पडत आहे. या ठिकाणी नगरपालिकेचे २६ कर्मचारी कार्यरत असून, ४० कर्मचारी टेंडरवर काम करीत आहेत. येथे रोइंग बोटींची संख्या ४० आणि ५० पॅडल बोटी असून, १० बोटी बंद अवस्थेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उन्हाळी मशागती रखडल्या

0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड

सातारा तालुक्याच्या पश्चिमेकडील जावली आणि वाई तालुक्यात अवकाळी पाऊस झाला नाही. परिणामी, मे महिना संपला असला, तरी यंदा पेरणीपूर्व मशागतीची कामे सुरू झालेली नाहीत. मशागत रखडल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. कडक उन्हाळ्यामुळे जमिनीला भेगा पडल्या असून, एक-दोन पाऊस झाल्याशिवाय पेरणीपूर्व मशागतीची कामे करता येणार नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

पावसाळी हंगामात अत्यंत कमी पाऊस झाल्यामुळे जमिनीतील ओल फार काळ टिकू शकली नाही. पाण्याचे नैसर्गिक स्रोत लवकर आटल्याने पश्चिम भागात गेल्या कित्येक वर्षात पहिल्यांदाच पाणी टंचाईचा जनतेला सामना करावा लागत आहे. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुद्धा गंभीर बनला आहे. पाणी नसल्याने अनेकांनी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यातच जनावरांना बाजार दाखविला. पाणीटंचाई आणि चारा टंचाईमुळे पशूधन धोक्यात आले असल्याने शेतकऱ्यांची सर्व बाजुंनी कोंडी झाली आहे.

सातारा तालुक्यातील परळी, कास, निनाम, पाडळी या भागात मे महिन्याच्या अखेरीस पेरणीपूर्व मशागतीची कामे अंतिम टप्प्यात असतात. यंदा मान्सूनपूर्व पाऊस न झाल्याने पेरणीपूर्व मशागतीची कामे रखडली आहेत.

माण-खटावला दिलासा

कोरेगाव, खटाव; तसेच माण तालुक्यात दोन ते तीन वेळा अवकाळी पाऊस झाल्याने या भागातील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. पावसामुळे तलावांमध्ये पाणीसाठा झाल्याने जनावरांच्या; तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बऱ्यापैकी सुटला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपघातात तीन जण ठार

0
0

म. टा. वृत्तसेवा, इस्लामपूर

नेर्ले (ता. वाळवा) येथे हॉटेल दत्त भुवननजीक कराडच्या दिशेने निघालेल्या अ‍ॅक्टिव्हा दुचाकीवरील तिघा युवकांना कंटेनर (क्र. आर. जे. १४ जी. जी. ७०७९) ने पाठीमागून दिलेल्या जोरदार धडकेत तीन जण ठार झाले. मंगळवारी रात्री बाराच्या सुमारास हा अपघात झाला. हे तिघेजण तांदूळवाडी (ता. वाळवा) येथे जेवायला आले होते. जेवण अटोपून ते परत कृष्णा कारखान्याकडे जात असताना हा अपघात झाला.

भगीरथ महादेव कुंभार (रा. खुबी) हा युवक अमर शामराव कांबळे व विठ्ठल कुमार मंडले या दोघाजणांना घेवून जेवायला आला होता. दरम्यान मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास भगीरथ कुंभार हा नेर्ले येथील मामांच्याकडे येवून गेला होता. महामार्गावर त्यांच्या गाडीला अपघात झाल्यानंतर कंटेनरच्या धडकेने अमर कांबळे व विठ्ठल मंडले हे दोघे गाडीवरुन खाली पडले. त्यांच्या अंगावरुन कंटेनर गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर भगीरथ कुंभार हा दुचाकी गाडीसह कंटेनरच्या पुढील बाजूस बंपर व चाकाच्या मध्ये अडकल्याने अर्धा किलोमीटर फरपटत गेला. कंटेनरचालक अपघातानंतर गाडीसह पळून जाण्याच्या पवित्र्यात होता. मात्र, दुचाकी बंपरमध्ये अडकल्याने तो पळून जावू शकला नाही. अर्धा किलोमीटर पुढे गेल्यानंतर तो कंटेनर महामार्गावरच सोडून देत पसार झाला. याची माहिती कासेगाव पोलिस व परिसरातील लोकांना समजल्यावर पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेतली. या वेळी भगीरथ कुंभार हा गंभीर जखमी होता. तो बोलत होता. त्याला तत्काळ कराड येथील कृष्णा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अमर व विठ्ठल यांच्या मृतदेहांचे पंचनामे करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कासेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवण्यात आले. आज सकाळी या बाबतची माहिती मृतांच्या नातेवाईकांना मिळाल्यानंतर त्यांनी कासेगाव येथे धाव घेतली. तर भगीरथ कुंभार याच्यावर कराड येथील सरकारी रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली. अमर कांबळे हा कृष्णा कारखान्यात कामगार होता. त्याचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले आहे. विठ्ठल मंडले हा मुळचा बेरडमाची (ता. वाळवा) येथील असून, तो शेती करत होता. त्याच्या पश्चात पत्नी, दोन वर्षांचा मुलगा, पाच वर्षांची मुलगी असा परिवार आहे. भगीरथ कुंभार हा महाविद्यालयीन युवक होता. तो जुळेवाडी (ता. कराड) येथे शिकत होता. अपघाताच्या ठिकाणाला पोलिस उपाधीक्षक वैशाली शिंदे यांनी भेट दिली. कासेगावचे सहायक पोलिस निरीक्षक नंदकुमार मोरे, कुरळपचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन कांबळे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वालचंद’च्या चौकशीची मागणी‘वालचंद बचाओ’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

0
0


म. टा. वृत्तसेवा, सांगली

सांगलीतील वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मालकीच्या वादाने आता महाराष्ट्र टेक्नीकल एज्युकेशन सोसायटीच्या मालकीवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. वालचंद बचावोच्या बुधवारच्या सांगलीतील मेळाव्यात सोसायटीच्या मालकीचाच वाद न्यायालयात असेल तर सरकारने महाविद्यालयावर प्रशासक मंडळाची नियुक्त करून महाविद्यालय वाचवावे. हायकोर्टाच्या सेवानिवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त करून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली.

वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी या नात्याने उद्योजक दीपक शिंदे-म्हैसाळकर यांनी वालचंद बचाओच्या दिलेल्या हाकेला उत्स्फूर्त प्रतिसाद बुधवारी मिळाला. सांगलीतील राजमती भवनमध्ये झालेल्या मेळाव्याला माजी विद्यार्थी, हितचिंतक मोठ्या संख्येन उपस्थित राहिले. माजी विद्यार्थी परिवाराचे माजी अध्यक्ष प्रोफेसर हेमंत अभ्यंकर (पुणे) यांच्या अध्यक्षतेखालील या मेळाव्याला ज्येष्ठ उद्योजिका प्रभाताई कुलकर्णी, वालचंदच्या स्थानिक नियंत्रण समितीचे माजी सदस्य माजी महापौर सुरेश पाटील, माजी आमदार प्रा. शरद पाटील, सांगली अर्बन बँकेचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र टेक्नीकल एज्युकेशन सोसायटीचे सदस्य गणेश गाडगीळ, सहकारातील जेष्ठ बापूसाहेब पुजारी आदी उपस्थित होते.

या वेळी बोलताना शिंदे-म्हैसाळकर म्हणाले, वालचंदच्या बाबतीत दोन्ही बाजूनी चुका झाल्याचे समोर येत आहे. सत्तर वर्षे सुरळीत चाललेल्या या महाविद्यालयाच्या बाबतीत गेल्या सहा वर्षांपासून सदस्य म्हणून सोसायटीकडे आलेल्यांनी दहशत निर्माण केल्याने टोकाला निघाला आहे. यामुळे महाविद्यालयाच्या नावलौकीकाला बाधा येत आहे. सरकारने जीआर काढून नियुक्त केलेल्या व्यक्तीला दहशत माजवून पदमुक्त करणे, हे निंदणीय आहे. व्यक्तिगत पातळीवर आमचे कोणीही शत्रू नाही. पदवी विक्री करणाऱ्या काही महाविद्यालयांच्या यादीत हे महाविद्यालय बसवले जावू नये. यासाठीच हे अभियान आहे. सोसायटी कोणाची यावर एकदा न्यायालयाच्या पातळीवरुन शिक्का मोर्तब झाले की, सर्व वाद संपुष्टात येतील.

सुरेश पाटील यांनी या प्रकरणात राजकारण बाजूला ठेवून सरकारने लक्ष घालावे, अशी तर प्रभाताई कुलकर्णी यांनी महविद्यालयावर प्रशासक नियुक्त करण्याची मागणी केली. माजी आमदार पाटील यांनी सोसायटी आणि वालचंद ट्रस्ट यांच्या कार्यकक्षांचा खुलासा झालेला नाही. त्यांनी त्यांनी कार्यकक्षा ओलांडल्यात का? याचा खुलासा करावा, अशी मागणी केली. प्रोफेसर अभ्यंकर यांनी कायदा हातात घेऊन व्यवस्था बदलणे बरोबर नाही. जी सद्य स्थिती आहे ती जैसे थे ठेवून निःपक्षपातीपणे कार्य करणारे प्रशासक मंडळ नियुक्त करुन महाविद्यालयाचे वातावरण बिघडणार नाही, याची वेळीच दखल घेण्याची मागणी केली. या विषयावर पुण्यातील अभियंत्यांचाही मेळावा घेण्याची तयारी त्यांनी दर्शविली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दाभोलकर तपासात पानसरे हत्येचे धागेदोरे?

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने बुधवारी पुणे आणि पनवेल येथे दोन तरुणांच्या घरांवर छापे टाकले. हे दोन्ही कार्यकर्ते सनातन संस्था आणि हिंदू जनजागरण समितीचे आहेत. कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी सनातनच्या साधकाला अटक केल्यानंतर पुन्हा याच संस्थांच्या कार्यकर्त्यांची चौकशी होत असल्याने सनातनसह हिंदुत्ववादी संस्थांवरील संशयाचे मळभ आणखी वाढले आहे, तर या तपासातून पानसरे हत्येचेही धागेदोरे मिळण्याची शक्यता पानसरे कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.

डॉ. दाभोलकर यांच्या हत्येनंतर दीर्घकाळ तपास करूनही पोलिसांच्या हाती फारसे काही लागले नव्हते. कॉ. पानसरे यांच्या हत्येनंतर या दोन्ही हत्यांमागे समान विचारांच्या शक्ती कार्यरत असल्याची शक्यता वर्तवली जात होती. यानंतर डॉ. एम. एम. कलबुर्गी यांची कर्नाटकात हत्या झाल्यानंतर सीबीआयने तिन्ही हत्यांमध्ये साम्य असल्याचे निष्कर्ष काढले होते. या पार्श्वभूमीवर सीबीआयने बुधवारी (१ जून) पुणे येथील सारंग आकोलकर आणि पनवेल येथील डॉ. वीरेंद्रसिंह तावडे या दोघांच्या घरावर छापे टाकले. या कारवाईत घरातील काही वस्तू सीबीआयने ताब्यात घेतल्या आहेत. याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांच्याशी संपर्क साधला असता, 'सीबीआयकडून झालेल्या छापेमारीच्या कारवाईबाबत अजून काहीच माहिती मिळालेली नाही. तपासाच्या अनुषंगाने सीबीआयने काही माहिती मागितल्यास आम्ही नक्कीच सहकार्य करू, कॉम्रेड पानसरे हत्या तपास आणि सीबीआयच्या कारवाईबाबत कोल्हापूर पोलिसांना अद्यापर्यंत अधिकृत अशी कोणतीच माहिती मिळालेली नाही', अशी माहिती त्यांनी दिली. सीबीआयने केलेल्या छापेमारीबाबत मेघा पानसरे यांच्याशी बातचित केल्यानंतर त्यांनी या कारवाईचे स्वागत केले.

सनातन संस्थेने मात्र सीबीआयची कारवाई ही पू्र्वनियोजित षङयंत्र असल्याचा आरोप केला आहे. आपचे नेते आशीष खेतान यांचे ट्विट आणि सीबीआयच्या छाप्यांचा संबंध तपासावा अशी मागणी करीत पुण्यातील आकोलकर यांच्या घरात सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी घरफोडी केल्याचा आरोप सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी केला आहे. सीबीआयच्या विरोधात पोलिस आयुक्तालयात घरफोडीचा गुन्हा दाखल केल्याचेही त्यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

०००००००

आम्ही यापूर्वीच हिंदुत्ववादी संघटनांवर संशय व्यक्त केला होता. सीबीआयने ही कारवाई आधीच करणे अपेक्षित होते. उशिरा का होईना सीबीआयने कामाला सुरुवात केली. या कारवाईतून हिंदुत्ववादी संघटनांचा हिंसक चेहरा समोर येईल. पुणे आणि पनवेलमधील कारवाईत पानसरे हत्येचे धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे एसआयटी आणि सीबीआयने संयुक्त कारवाई करावी.

मेघा पानसरे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गांधीनगरच्या दोघांचा मृत्यू

0
0

म. टा. वृत्तसेवा, इस्लामपूर

पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर इटकरे (ता. वाळवा) येथे झालेल्या अपघातात दोघेजण ठार, तर चारजण जखमी झाले. मृत आणि जखमी गांधीनगर येथील आहेत. जखमींवर येथील राजारामबापू हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. रामचंद्र गुरुनवल वाघवा (वय ६५) आणि भावना मनोज वाघवा (३५, दोघे रा. गांधीनगर) यांचा मृत्यू झाला आहे. चालक मनोज रामचंद्र वाघवा (३६), महेक मनोज वाघवा (११), मोहीत मनोज वाघवा (७), मनोज यांची भाची अश्विनी (१५, सर्व रा. गांधीनगर) जखमी झाले आहेत. मृत आणि जखमी एकाच कुटुंबातील आहेत. कुत्र्याला वाचविण्याच्या प्रयत्नात भरधाव मोटार थांबविण्याचा प्रयत्न केला असता कार फरफटत जाऊन उड्डाणपुलावरुन उलटून हा अपघात झाला.

इटकरे फाट्यावर झालेल्या अपघातातील वाघवा कुटुंब गांधीनगरहून उरळीकांचन (पुणे) येथे देवदर्शनासाठी निघाले होते. त्यावेळी राष्ट्रीय महामार्गावर इटकरे फाटा येथे अचानक आडवे आलेल्या कुत्र्याला वाचविण्याच्या प्रयत्नात मनोज वाघवा यांनी भरधाव वेगातच मारुती स्वीफ्ट (क्र. एम. एच. ०८ आर. ५६७८)ला ब्रेक लावला. यावेळी गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी शंभर फूट फरफटत जाऊन संरक्षक कठडा तोडून उड्डाणपुलावरुन २० फूट खाली रस्त्यावर कोसळली. कोसळल्यानंतरही गाडी दोनदा उलटली. यात चालक मनोज (वय, ३६) जखमी झाले. त्यांच्या बाजूच्या सीटवर बसलेले त्यांचे वडील रामचंद्र गुरुनवमल वाघवा (वय, ६५) व मागे बसलेल्या भावना मनोज वाघवा (वय, ३५) जागीच ठार झाले. त्यांचा मुलगा मोहित (११) व मुलगी महेक (७) हे किरकोळ जखमी झाले. त्यांची भाची अश्विनी (वय १५) ही गंभीर जखमी आहे.

अपघाताची माहिती समजताच इटकरे येथील युवक व नागरिकांनी महामार्गाकडे धाव घेतली. गाडीची चारी चाके वर झाली होती. गाडीचा चक्काचूर झाला होता. युवकांनी उलटलेली गाडी सरळ केली. गाडीचे दरवाजे उघडत नव्हते. दरवाजे उघडण्याचा खटाटोप अर्धा तास सुरू होता. अखेर टिकावाने दरवाजे तोडून जखमी व मृतांना बाहेर काढण्यात आले. गाडीत रक्ताचे थारोळे साचले होते. साहित्य अपघातस्थळावर विखुरले होते. अपघाताची माहिती समजताच रुग्णवाहिका व कुरळप पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवले. जखमींना इस्लामपूर येथील राजारामबापू पाटील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महागाईच्या झळा आणखी तीव्र

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नागरिकांच्या सोयीसाठी देण्यात येणाऱ्या जवळपास सर्व सेवा बुधवार, एक जूनपासून महाग झाल्या आहेत. सेवा करातील अर्धा टक्का वाढीबरोबरच जादाचा सेस जोडला गेल्याने आधीच महागाईच्या झळांनी त्रस्त झालेल्या सर्वसामान्यांना महागाईचा फटका सहन करावा लागणार आहे. एकीकडे लोकांच्या सेवेसाठी नवनवीन योजनांची घोषणा करायची आणि दुसरीकडे सेवा दिल्या जातात म्हणून त्यांच्या करात वाढ करायची, हा सरकारचा उद्योग नागरिकांना पटत नसल्याची स्थिती आहे. सरकार कर गोळा करत असले तरी त्यातून काय केले याची विचारणा आता नागरिकांकडून होऊ लागली आहे.

पर्यटन, हॉटेलिंग, मेडिक्लेम-इन्शुरन्स, इतकेच नव्हे तर मोबाइल फोन आणि इंटरनेट बिल या बाबींमध्ये सर्वसामान्यांना करवाढीचा दणका सुरू झाला आहे. केंद्र सरकारने लागू केलेल्या अर्धा टक्का कृषी कल्याण उपकरामुळे देशभरातील सर्व सेवांवर १५ टक्के दराने सेवाकराची आकारणी सुरू झाली. त्यामुळे महागाईत आणखी भर पडली आहे.

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अंदाजपत्रक मांडताना सध्याच्या सेवाकरात अर्धा टक्का कृषी कल्याण अधिभार (सेस) प्रस्तावित केला होता. त्या तरतुदीची अंमलबजावणी एक जूनपासून सुरू झाली. पूर्वी १२.३६ टक्के असलेला सेवाकर गेल्यावर्षीच्या अंदाजपत्रकात स्वच्छ भारत अधिभारामुळे १४.५० टक्क्यांवर गेला. त्या पाठोपाठ आता अर्धा टक्का कृषी कल्याण अधिभाराचा समावेश झाल्याने १५ टक्के दराने सेवाकर भरावा लागणार आहे. त्याची वसुली सर्वसामान्य नागरिकांच्याच खिशातून होणार आहे. त्यामुळे फोन-मोबाइल किंवा इंटरनेटची बिले, पाणी-विजेचे बिल, केबल-डीटीएचच्या बिलात वाढ होणार आहे. तसेच डेबिट-क्रेडिट कार्डांद्वारे होणाऱ्या व्यवहारांवरही हा अधिभार लागू होणार असल्याने सामान्यांच्या खिशाला चाट बसणार आहे. याशिवाय मेडिक्लेम आणि इन्शुरन्सचा हप्ताही वाढणार आहे. बँकिंग, वित्तपुरवठा (फायनान्स), जाहिरात किंवा सल्लागारांच्या सेवाही १ जूनपासून महाग झाल्या.

रेल्वे, विमान प्रवास महागला

सेवाकर वाढीचा फटका रेल्वे, एसटीबरोबरच विमानसेवेलाही बसणार आहे. सर्व प्रकारच्या विमानांच्या तिकिटातही त्यामुळे वाढ होणार आहे. ३१ मेपर्यंत आरक्षित केलेल्या, मात्र एक जूननंतर प्रवास करावयाच्या तिकिटांवर वाढीव सेवाकर आकारण्यात येणार नाही. १ जूनपासून काढल्या गेलेल्या तिकिटांवर संबंधित विमान कंपन्यांकडून नवीन दराप्रमाणे कर आकारणी सुरू झाली आहे. यामुळे प्रवासही महाग झाला आहे. चालू वर्षात सादर केलेल्या रेल्वे अर्थसंकल्पात तिकीट दरात वाढ न केल्याच्या आनंदाला ग्रहण लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. केंद्र सरकारने सेवा करात कृषी कल्याण अधिभाराच्या माध्यमातून अर्धा टक्का वाढ करण्याचा निर्णय घेतल्याने रेल्वेच्या प्रथम श्रेणी आणि वातानुकूलित डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरवाढीचा सामना करावा लागणार आहे.

वाढलेल्या सेवाकरामुळे पर्यटन महाग होणार आहे. या क्षेत्रात सेवाकरासाठी असलेली ७५ टक्क्यांची सवलत आता ६० टक्क्यांवर आणण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटन संस्थांच्या सेवा, रेल्वे-विमान तिकिटांचे बुकिंग अशा सर्वच सेवा महागणार असून, त्याचा भुर्दंड पर्यटकांना बसणार आहे. त्याबरोबरच हॉटेल-रेस्टॉरंट्स आणि लॉजिंगच्या दरातही यामुळे मोठी वाढ होणार आहे. रेल्वे मालवाहतूक, वातानुकूलित बसच्या भाड्यातही वाढ होणार आहे. तसेच डेबिट किंवा क्रेडिट कार्डांद्वारे बिले भरणे, एटीएम अशा सेवाही या वाढीमुळे महागणार आहेत.


या सेवा महागणार...

n इन्शुरन्स-बँकिंग सेवा महाग

n मनोरंजनाच्या सेवाही महाग

n मोबाइल, लाइट बिलात वाढ

n पर्यटन, हॉटेलिंग आणि पार्लरच्या खर्चात वाढ

n लग्नाचेही बजेट वाढण्याची शक्यता

n चित्रपटगृहात पाहण्यात येणाऱ्या चित्रपटांवर १५ टक्के दराने सेवाकर लावल्याने तिकिटाचे दर वाढले.

n लग्नसमारंभ : हल्ली विवाहसमारंभांसाठी वेडिंग प्लॅनरची सेवा घेतली जाते. ही सेवाही महागण्याची शक्यता आहे. बॅक्वेट हॉल, केटरिंग, बँडबाजा आणि हॉटेलसारख्या सेवांसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार आहे.


प्रथम श्रेणी रेल्वे प्रवास महागणार

केंद्र सरकारने पूर्वीच्या १४ टक्के सेवाकरामध्ये १५ नोव्हेंबर २०१५पासून अर्धा टक्का स्वच्छ भारत अधिभार आकारण्यास सुरुवात केली. त्यामुळे सेवाकर १४.५० टक्क्यांवर पोहोचला. आता १ जूनपासून त्यामध्ये आणखी अर्धा टक्का कृषी कल्याण अधिभाराचा समावेश केला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना विविध सेवांवर १५ टक्के दराने सेवाकर अदा करावा लागणार आहे. यासंबंधीचे परिपत्रक रेल्वे मंत्रालयाने सर्व विभागांना पाठविले आहे. त्यामुळे या वाढीचा फटका रेल्वेच्या प्रवाशांनाही बसणार आहे. रेल्वेच्या प्रथम श्रेणी व वातानुकूलित डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरवाढीचा फटका सहन करावा लागणार आहे. रेल्वेच्या एकूण प्रवाशांपैकी प्रथम श्रेणी व वातानुकूलित डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे प्रमाण ३० टक्के आहे.


सेवाकराबाबत गोंधळ

सेवाकराबाबत केलेल्या या तरतुदींची अंमलबजावणी पूर्वलक्षी प्रभावाने होत असल्यामुळे काहीसा गोंधळ उडाला आहे. १ जूनपासून या वाढीव अधिभाराची वसुली सुरू झाली. मात्र, एक जूनपूर्वी संबंधित बिले तयार झाली असतील आणि त्याचा भरणा एक जूननंतर केला, तरी त्यावर अर्धा टक्का अधिभार वसूल करण्यात येणार आहे. सेवाकर लागू होणाऱ्या मोठ्या व्यवहारांमध्ये ही रक्कम मोठी ठरते, त्यामुळे याबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

कृषी कर शेतकरी कल्याणासाठी

सेवाकरात अर्धा टक्का कृषी कल्याण कराची भर पडली आहे. कराच्या माध्यमातून जमा होणारी रक्कम केंद्र सरकारतर्फे शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी वापरली जाणार आहे. हा अर्धा टक्का कर थेट ग्राहकांकडून वसूल केला जाणार असल्यामुळे त्याचा निश्चितच परिणाम जाणवेल. डिजिटल मार्केटिंगसह मोबाइल टॉवर्सच्या भाड्यावरही हा कर लागू असल्याने त्यावर मोठा परिणाम जाणवेल. व्यापाऱ्यांना किंवा अन्य व्यावसायिकांना कृषी कल्याण कराचा सेट ऑफ घेता येऊ शकेल.

रेल्वेचे एसी भाडे

रेल्वेच्या प्रथम श्रेणीच्या तिकिटांवर सध्या ४.५ टक्के सेवाकर आहे. तो ५ टक्के होईल. म्हणजे १००० रुपयांच्या तिकिटावर १५ रुपये वाढ होईल. औरंगाबादहून अजमेरला जाण्यासाठी एसीसाठी १,४९० रुपये व ५३ रुपये सेवाकर लावला जायचा. तो आता १,४९० व सेवाकर ६० ते ६५ रुपये होईल. औरंगाबादहून तिरुपतीला जाण्यासाठी एसी गाडीच्या तिकिटाला १,३३५ रुपये व ६५ रुपये सेवाकर असायचा. तो आता १,३३५ रुपये तिकीटदर व ७० ते ७५ रुपये सेवाकर भरावा लागेल.

विमा हप्ता

विमा हप्त्यासाठी ०.५० टक्के जास्तीची रक्कम मोजावी लागेल. एलआयसीच्या पहिल्या वर्षीच्या हप्त्यावर ३ टक्के, दुसऱ्या वर्षीच्या हप्त्यावर १.५ टक्के सेवाकर होता. आता पहिल्या वर्षीच्या हप्त्यावर ४ टक्के आणि दुसऱ्या वर्षी २.२५ टक्के कर द्यावा लागेल. याचा अर्थ एक हजार रुपये विमा हप्ता असल्यास, पूर्वी १ हजार ३० रुपये भरावे लागायचे. आता १ हजार ४० ते ४५ रुपये भरावे लागतील.

हॉटेलिंग

हॉटेलमध्ये जेवणावर १०.५ टक्के सेवाकर लागेल. आधी व्हॅट आणि हॉटेलच्या सेवा अधिभारासह तुमचे एकूण बिल १०५० रुपये झाले असेल, तर १०५५ रुपये मोजावे लागत होते. आता १,००० रुपयांच्या बिलावर १०६५ रुपये मोजावे लागतील.

मोबाइल इंटरनेट

मोबाइलच्या बिलांवर आधी १४.०५ टक्के सेवाकर होता. तो आता १५ टक्के होईल. समजा, एका माणसाचे बिल १,००० रुपये असेल, तर ११४५ रुपये द्यावे लागत होते. आता १५ टक्के करामुळे ११५० रुपये द्यावे लागतील. हेच मोबाइल इंटरनेटचे बिल समजा १,००० रुपये येत असेल, तर १,१४५ रुपये द्यावे लागत होते. ते आता ११५० रुपयांपर्यंत द्यावे लागेल.

करमणूक

तिकिटांचे भाव वाढणार असल्यामुळे चित्रपट पाहणे महाग होईल. सिनेमा पाहण्यासाठी समजा एका तिकिटासाठी सर्व करांसह २०० रुपये मोजावे लागत असतील, तर आता २१० रुपये होऊ शकतात.

ब्यूटी पार्लर

ब्यूटी पार्लर-सलूनमध्ये मसाज, फेशियल, स्पा सर्वकाही महाग होईल. ही सेवा सुमारे १२.५ टक्क्यांनी महागणार आहे. समजा, आधी ५०० रुपये मसाजसाठी लागत असतील, तर आता ५६५ रुपये लागतील. इतर सुविधांवर जे चार्ज असतील, त्यात सुमारे १२ टक्के वाढ होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दत्तक बालकांसाठी वेटिंग

0
0

Janhavi.Sarate@timesgroup.com

कोल्हापूर ः मूल होत नसल्यामुळे किंवा एक मूल झाल्यानंतर दुसरे मूल दत्तक घेण्यासाठी देशात ३०११ तर परदेशातील ६६६ बालकांसाठी वेटिंग असल्याचे वास्तव सेंट्रल अॅडोप्शन रिसोर्स अथॉरिटीच्या (कारा) वेबसाइटवरुन पुढे आले आहे. २०१५ पासून बालक दत्तक देण्याची प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली आहे. येथील बालकल्याण संकुलातून गेल्या तीन वर्षांत २९ मुली दत्तक देण्यात आल्या आहेत.

अनाथ आणि गरजू बालकांना हक्कांचे घर मिळावे, यासाठी सेंट्रल अडॉप्शन रिसोर्स अथॉरिटीने (कारा) ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन करण्याचा निर्णय घेतला. ऑगस्ट २०१५ पासून ही दत्तक प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली. १ जानेवारी ते २३ नोव्हेंबर २०१५ पर्यंत राज्यातील एक हजार ४२२ पालक वेटिंगवर होते. गेल्या वर्षाच्या तुलनेत हे प्रमाण दुपटीहून जास्त आहे. 'कारा'च्या आकडेवारीनुसार गेल्या काही वर्षांत मूल दत्तक घेण्याचे प्रमाण कमी झालेले आहे.

महाराष्ट्र राज्य दत्तकविधान संस्थेच्या माहितीनुसार (सारा) गेल्या पाच वर्षांत देशभरातील एकूण २४ हजारावर मुलांना हक्काचे पालक मिळाले आहेत. त्यातील २१ हजार ८९५ मुले आपल्याच देशातील कुटुंबांत तर २ हजार १७० मुले परदेशांतील कुटुंबांत दत्तक गेली आहेत. देशातील अन्य कोणत्याही राज्यापेक्षा महाराष्ट्रात सर्वाधिक, म्हणजे २ हजार ६४० मुलींना दत्तक घेतले आहे. कोल्हापूरसह राज्यात मुलांपेक्षा मुली दत्तक घेण्याची मानसिकता रुजली आहे.

=====
गेल्या वर्षीपासून दत्तक बालक देण्याची प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आल्यामुळे सध्या संस्थेकडे कोणते अर्ज येत नाहीत. ते थेट ऑनलाइन रजिस्टर होतात. एखाद्या पालकांनी या संस्थेतून बालक दत्तक घेण्याची इच्छा दर्शविल्यानंतर 'कारा'कडून कळविले जाते. त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाते. बालसंकुलात मुलांबरोबर मुली दत्तक घेण्याचे प्रमाण चांगले आहे.

पद्मजा तिवले, सदस्य, बालकल्याण समिती.
===

बालक दत्तक घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

दत्तक बालकांसाठी ऑनलाइन फॉर्म भरल्यानंतर पाच कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करावी लागतात. यामध्ये पॅनकार्ड किंवा पासपोर्ट, गेल्या वर्षातील उत्पन्नाचा दाखला, मतदान ओळखपत्र किंवा आधार कार्ड, पालकांचे विवाह नोंदणी प्रमाणपत्र, पालकांच्या मालमत्तेचा पुरावा.

ऑनलाइन रजिस्ट्रेशन

काही दिवसांपूर्वी दत्तक बालक हवे असेल तर त्या संस्थेकडे अर्ज केला जात असे. त्यानंतर कागदपत्रे पाहून इतर गोष्टींची पूर्तता केल्यानंतर बालक दत्तक देण्याची पद्धत होती. मात्र सध्या महाराष्ट्र बालक दत्तक देण्याची प्रक्रिया ऑनलाइन केली आहे. ज्या पालकांना बालक दत्तक घ्यायचे आहे त्यांना www.cara.nic.in या वेबसाइटवर अर्ज भरावा लागतो. आवश्यक ती माहिती भरल्यानंतर कागदपत्रे अपलोड करावी लागतात. अर्ज रजिस्टर झाल्यानंतर त्यांना जवळच्या संस्थेत त्यांना हवे असेल तसे बालक उपलब्ध असल्यास त्याची माहिती दिली जाते. बालक घेण्याचे निश्चित होणार असेल तर संस्थेतर्फे पालकांच्या घरी भेट देऊन अधिक माहिती घेतली जाते. दत्तक प्रक्रिया होण्यासाठी सहा महिने वेटिंग करावे लागते.

अशी आहे दत्तक बालकांसाठी आलेले अर्ज

साल भारत परदेश

२०१०-११ ५६९३ ६२८

२०११-१२ ५९६४ ६२३

२०१२-१३ ४९६४ ३०८

२०१३-१४ ३९२४ ४३०

२०१४-१५ ३९८८ ३७४

२०१५-१६ ३०११ ६६६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कळंब्यातील गाळ काढण्याची मोहीम गतिमान

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कळंबा तलावातील गाळ काढण्याच्या कामास गती मिळाली असून अडीच लाख घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. पाटबंधारे विभाग, महापालिका तसेच लोकसहभागातून गाळ एक्स्कॅव्हेटर व लोडर, डंपर आदी यंत्र सामुग्रीद्वारे गाळ काढण्याच्या कामाला गती मिळाली आहे. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जलसंपदा विभाग, महापालिका, कळंबा ग्रामपंचायत यांच्या पुढाकारातून लोकसहभागाद्वारे गाळ काढण्याची मोहीम मार्चपासून सुरु करण्यात आली.

पाऊस सुरू होईपर्यंत गाळ काढण्याची मोहीम गतिमान करण्याची सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली होती. शेतकऱ्यांनी कळंबा तलावातील गाळ उचलून शेतीस न्यावा, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. पालकमंत्र्यांच्या आवाहनास प्रतिसाद देऊन कळंबा आणि परिसरातील शेतकऱ्यांनी कळंबा तलावातील गाळ उचलून नेण्यास पुढाकर घेतला असून लांब लांबून शेतकरी ट्रक, ट्रॅक्टर, डंपर अशा वाहनातून गाळ उचलून शेतीसाठी वापरत आहेत. गाळ काढण्याच्या कामास उत्स्फूर्त लोकसहभाग मिळाला आहे.

तलावातील गाळ काढण्याच्या कामासाठी शासकीय यंत्रणेबरोबर उत्स्फूर्त लोकसहभाग लाभला असून अनेक शेतकरी गाळ उचलण्यासाठी पुढे आले आहेत. पाटबंधारे विभागाच्यावतीने आतापर्यंत १ लाख ३० हजार घनमीटर गाळ काढण्यात आला असून लोकसहभागातून १ लाख २० हजार घन मीटर गाळ काढण्यात आला आहे. यासाठी पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून ७ एक्स्कॅव्हेटर, १ लोडर आणि २ डोझर सध्या गाळ काढीत असून लोकसहभागातूनही खाजगी ५ एक्स्कॅव्हेटर, ६ जेसीपी, १० ते १५ डंपर आणि ट्रॅक्टर, ट्रक अशा यंत्रसामुग्रीद्वारे गाळ काढण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे.

पाऊस पडेपर्यंत मोहीम सुरु

पाऊस सुरू होईपर्यंत मोहीम सुरू ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. सैनी यांनी सोमवारी गाळ काढण्याच्या कामाची पाहणी केली. नियोजनाची माहिती घेतली..यापुढेही परिसरातील शेतकऱ्यांनी गाळ शेतीसाठी मोठ्या प्रमाणात घेऊन जावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. सैनी यांनी केले. त्यांच्या समवेत पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता जे.व्ही.खाडे, कार्यकारी अभियंता पी.बी. भोसले, उपअभियंता संग्राम पाटील आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images