Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

बाटलीबंद पाण्याची उलाढाल कोटीची

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
उन्हाच्या तीव्र झळा, दिवसाआड पाणी पुरवठा आणि सार्वजनिक ठिकाणी स्वच्छ पाणी मिळण्याविषयी असलेली साशंकता यामुळे शहरात बाटलीबंद पाण्याचा खप मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. बाटली बंद पाण्याच्या जिल्ह्यातील १४ अधिकृत प्लँटमध्ये रोज साधारण २८ हजार लिटर पाणी बाटली बंद केले जात असून, महिन्याला साधारण साडे आठ लाख लिटर पाणी कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात पुरविले जात आहे. यावर सुमारे पावणेदोन कोटी रुपये खर्च होत असल्याचे स्पष्ट होत आहे.

बाटलीबंद पाण्याची मागणी जानेवारीपासून सातत्याने वाढते. इतर महिन्यांच्या तुलनेत एप्रिलमध्ये ४० ते ५० टक्क्यांनी या पाण्याची विक्री वाढते. यंदा मे महिन्यात उन्हाचा तडाखा वाढल्याने या महिन्यात बाटलीबंद पाण्याची सर्वाधिक विक्री होत आहे. ऑफिसेस, हॉस्पिटल्स, सभा, समारंभांबरोबरच आता अपार्टमेंटमध्ये या पाण्याला मागणी वाढू लागल्याने कोल्हापुरात हा व्यवसाय कोटींच्या घरात पोहोचला आहे.

रोज २ हजार लिटर पाण्याचे उत्पादन करण्याची क्षमता असलेल्या प्लँटला राज्य सरकारकडून परवाने दिले जातात. या क्षमतेच्या पुढील प्लँट्ससाठी केंद्र सरकारकडून परवाना घ्यावा लागतो. जिल्ह्यात सध्या राज्य सरकारने परवाना दिलेले २ हजार क्षमतेचे १४ प्लँट आहेत. यात उन्हाळ्याच्या दिवसात रोज दोन हजार लिटर पाण्याची निर्मिती होते. एकूण १४ प्लँटमधून रोज २८ हजार लिटर पाण्याचे उत्पादन होते. एक लिटर पाण्याची बाटली सध्या किरकोळ बाजारात, २० रुपये दराने विक्री होते. तर २० लिटरचे मोठे कॅन ४० पासून ६५ रुपये दराने विक्री केले जातात. या दोन्ही बाटल्यांना मोठ्या प्रमाणावर मागणी वाढल्याने यातील उलाढाल पावणे दोन कोटींच्या घरात पोहोचली आहे.

सध्या २० लिटरच्या बाटल्यांना मोठ्या प्रमाणावर मागणी असून, बँका, कापड दुकाने, ऑफिसेस, हॉस्पिटल्स, वकिलांची कार्यालये यासह उच्च मध्यमवर्गीयांची घरे, अपार्टमेंटमध्ये २० लिटरच्या बाटल्या दिसू लागल्या आहेत. सहकुटुंब रेस्टॉरंट्समध्ये गेलेली अनेक कुटुंबे बाटली बंद पाण्यालाच पसंती देत आहेत. लग्नसराई, सभा समारंभ, कार्पोरेट कार्यक्रमांमध्येही २० लिटर पाण्याच्या बाटल्यांना मागणी वाढ असते. त्यामुळे या कार्यक्रमांची संख्या वाढली, तर २० लिटरच्या बाटल्यांची मागणी वाढते. सध्या लग्न समारंभांमध्ये बुफे पद्धतीचे जेवण असल्यास पाण्याची सोय २० लिटरच्या बाटल्यांमधूनच करण्यात येत असल्याचे दिसते.

0000000000000000000000

राज्य सरकारने परवाने दिलेल्या १४ प्लँटमध्ये या दिवसांत रोजची २ हजार लिटर बाटलीबंद पाण्याची निर्मिती होते. उन्हाळ्याबरोबरच पावसाळ्यात नागरिक पाण्याबाबत अधिक काळजी घेत असल्याने त्या दिवसांतही बाटलीबंद पाण्याची मागणी वाढलेली असते.

- एस. एम.देशमुख, सहायक आयुक्त, अन्न, कोल्हापूर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गुडगाव विद्यापीठाने मांडली मर्डर मिस्ट्री

$
0
0
ज्येष्ठ नेते कॉम्रेड, गोविंदराव पानसरे यांच्या खून खटल्याच्या सुनावणीवेळी शुक्रवारी पोलिसांनी गुडगाव विद्यापीठाने तयार केलेला क्राइम सीनचा पुरावा सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांच्यासमोर दिला.

सुनील कदमांच्या ‘स्वीकृत’ला पुन्हा ब्रेक

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

माजी महापौर सुनील कदम यांच्या स्वीकृत नगरसेवकपद नियुक्तीला पुन्हा एकदा ब्रेक लागला. महापालिकेतील सत्तारूढ काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या विरोधातील धार आणखी तीव्र करत स्वीकृत नगरसेवकपदाबाबत शिफारस करणारा ठराव ४१ विरूद्ध ३० मतांनी फेटाळला. कदम यांच्या विरोधातील ठराव आणि राज्य सरकारला या संदर्भात सादर करावयाच्या अंतिम म्हणणे (अभिवेदन)वरून सत्तारूढ आणि विरोधी भारतीय जनता पक्ष, ताराराणी आघाडी सदस्य आमनेसामने उभे ठाकले. दोन्ही बाजूच्या सदस्यांच्या युक्तीवाद आणि प्रतिवाद, महापालिका कायद्याच्या पुस्तकाचा आधार, दाखले आणि उताऱ्यांचे वाचन यामुळे महापालिका सभागृहाला कोर्टाचे स्वरूप लाभले. महापौर अश्विनी रामाणे सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या.

महापालिका सभागृहवाने यापूर्वी दोनदा कदम यांच्या नियुक्तीबाबत फेटाळलेले ठराव राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने निलंबित केले होते. महासभेच्या माहितीसाठी हा ठराव शुक्रवारी सभेपुढे मांडला. 'ठरावप्रश्नी सभागृह जो निर्णय घेईल तो राज्य सरकारला कळविण्यात येईल' असे आयुक्त पी. शिवशंकर यांनी स्पष्ट करत 'स्वीकृत'च्या निर्णयाचा चेंडू सभागृहाच्या कोर्टात टाकला. दोन्ही आघाड्यांनी 'स्वीकृत'नगरसेवकचा मुद्दा प्रतिष्ठेचा बनवल्याने तब्बल दोन तास चर्चा सुरू होती. सत्तारूढ गटाकडून प्रा. जयंत पाटील, सूरमंजिरी लाटकर, शारंगधर देशमुख यांनी जोरदार युक्तीवाद करत कदम यांच्या नगरसेवकपदाला विरोध केला. लाटकर म्हणाल्या, 'कदम यांनी गुन्ह्याची माहिती दडवली. लाचखोरीचा आरोप असणाऱ्या माजी महापौर तृप्ती माळवी यांची पाठराखण करत जनतेच्या भावनेशी खेळ केला.'

यावर भाजप ताराराणी आघाडीच्या सदस्यांनी, सत्ताधारी बहुमताच्या जोरावर बेकायदेशीर कामे करत असल्याचा आरोप केला. ​आघाडीच्या संभाजी जाधव, विजय सूर्यवंशी, अजित ठाणेकर, रुपाराणी निकम यांनी प्रतिवाद केला. किरण शिराळे, किरण नकाते यांनीही यामध्ये सहभाग घेतला. 'दोन्ही आघाड्या 'स्वीकृत'वरून एकमेकांना शह काटशह देत सभागृहाचा वेळ वाया घालवित आहेत. नागरिकांशी निगडीत अनेक प्रश्न प्रलंबित असताना किती दिवस स्वीकृतचे राजकारण करणार ? राजकारण थांबवा आणि शहर विकासावर चर्चा सुरू करा' अशा शब्दांत शिवसेनेचे गटनेते नियाज खान, अभिजीत चव्हाण आणि राहुल चव्हाण यांनी दोन्ही आघाड्यांवर निशाणा साधला. स्वीकृतवरील राजकारणात शिवसेना तटस्थ राहणार असे सांगत मतदान ​प्रक्रियेपासून सेना सदस्य तटस्थ राहिले.

ताराराणीने दुसरा उमेदवार द्यावा

प्रा. जयंत पाटील म्हणाले, 'सुनील कदम यांनी महापालिकेच्या हिताच्या विरूद्ध काम केले आहे. यामुळे त्यांनी स्वीकृत सदस्य म्हणून सभागृहात येण्याचा नैतिक अधिकार नाही. ताराराणी आघाडीने अन्य चांगल्या उमेदवाराची शिफारस करावी, त्याला प्रतिनिधीत्व देण्यास सभागृह बांधील राहील'. काँग्रेस, राष्ट्रवादीकडून याच आशयाचे अभिवेदन (निवेदन) महापौरांना सादर केले. कदम यांच्या विरोधातील हाच ठराव सभागृहाने मंजूर केला. तो आता सरकारकडे पाठविला जाणार आहे.

बहुमताच्या जोरावर मूलभूत अधिकार पायदळी

भाजपचे विजय सूर्यवंशी म्हणाले, 'कदम यांनी लाचखोरीचे कोणतेही समर्थन केले नाही. त्यांच्यावर कुठल्याही स्वरूपाचा गुन्हा दाखल नाही. निव्वळ बहुमताच्या जोरावर त्यांच्या स्वीकृत नगरसेवकपदाच्या नियुक्तीची शिफारस बेकायदेशीरपणे अमान्य करण्यात येत आहे. कदम यांना सदस्य होण्यासाठी दिलेले मूलभूत अधिकार बहुमताच्या जोरावर पायदळी तुडविले जात आहेत, हे लोकशाहीच्या दृष्टीने घातक आहे. महासभेने नमूद केलेली कारणे चुकीची व घटनाबाह्य आहेत. कदम यांची ताराराणी आघाडीच्या संख्याबळानुसार स्वीकृत सदस्य नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण करावी.' भाजप, ताराराणी आघाडीकडून असे निवेदन महापौरांना दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंतरजातीय विवाहाला पाचपट अनुदान : बडोले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'जातीअंतासाठी राज्यात आंतरजातीय विवाह सोहळ्यांचे आयोजन केले जाईल. अशा दांपत्यांना अडीच लाख रुपयांचे प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे. त्यांच्या अपत्यालाही नोकरीसाठी आरक्षण देण्याचा विचार सुरु असल्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी शुक्रवारी येथे जाहीर केले. भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती जमाती जिल्हा निवड आणि कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. दसरा चौकातील राजर्षी शाहू स्मारक भवनाच्या मिनी हॉलमध्ये मेळावा झाला.

सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले म्हणाले, 'काँग्रेस सरकारने अनुसूचित जाती आणि जमातीसाठी केलेल्या योजना तळागाळापर्यंत पोहोचल्या नाहीत. केवळ दलित मतदारांचा निवडणुकीपुरता वापर केला. याउलट भाजप सरकारने मागासवर्गीय समाजासाठी अनेक योजना राबविल्या. भविष्यात काही योजना राबविल्या जाणार आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने जातीयवाद पेरण्याचे काम केले.'

मंत्री बडोले म्हणाले, 'जातीअंतासाठी आतंरजातीय विवाह करणाऱ्या दांपत्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान दिले जाते. या अनुदानात केंद्र सरकारकडून वाढ करण्यात येणार आहे. या दांपत्यांना अडीच लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. नवबौद्धांच्या प्रश्नही मार्गी लावले जातील. ३६ जात समिती पदांना मान्यता मिळाली असल्याने जात पडताळणीची प्रक्रिया सुलभ होणार आहे. दलित उद्योजकांना प्रशिक्षण दिले जाईल.'

आमदार सुरेश हाळवणकर म्हणाले, 'काँग्रेसने दलितांची मते केवळ निवडणूकीसाठी वापरली. निवडून आल्यानंतर दलितांना नियोजनबद्धपणे बाहेर काढण्याची काँग्रेसची परंपरा आहे. ही चाल ओळखून दलितांनी भाजपला पाठिंबा दिला. त्यामुळे काँग्रेसला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेण्याची नैतिक जबाबदारी नाही.'

यावेळी कार्यकर्त्यांनी जिल्ह्यातील विविध प्रश्न मांडले. भाजपचे जिल्हा संघटन मंत्री बाबा देसाई, जिल्हाध्यक्ष प्रशांत धनवडे आदी उपस्थित होते. वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष हिंदुराव शेळके यांनी स्वागत केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'मुस्लिमांवर परकेपण लादण्याचा प्रयत्न'

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'मुस्लिम समाज याच मातीतला आहे. मात्र, संशयाचे वातावरण निर्माण करून त्याच्यावर परकेपण लादण्यात आले आहे. कधी आत तर कधी बाहेर अशा अनुभवातून तो जगतो. त्यामुळंच इतरांच्या नजरेतून निसटलेले वास्तव तो बघू शकतो. ही वेगळी नजरच त्याचे सामर्थ्य आहे आणि ते साहित्यातून प्रकट होत समाजमनाचा ठाव घेत आहे,' असे मत ज्येष्ठ नाटककार आणि मु‌स्लिम मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष शफाअत खान यांनी व्यक्त केले.

मुस्लिम बोर्डिंगच्या वतीने कोल्हापुरात आयोजित मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाचे उद्‍घाटन बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज होते.

आपल्या आसपास वावरणाऱ्या मुस्लिमांच्या मनातील व्यथा-वेदना आणि घालमेल समजून घेण्यासाठी त्यांचे साहित्य वाचले पाहिजे, असे सांगून खान म्हणाले, 'मुस्लिमांबाबत असलेले गैरसमज हा एक दरी निर्माण करण्यासाठी निमित्त ठरणारा घटक आहे. हीच दरी भविष्यात मुस्लिम लेखकांच्या मराठी साहित्याच्या माध्यमातून कमी होण्याची आश्वासक पहाट उगवत आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन भावंडांचा कालव्यात बुडून मृत्यू

$
0
0

म टा. वृत्तसेवा, सातारा
सदरबझार म्हाडा कॉलनी येथून वाहणाऱ्या कण्हेर उजवा कालव्यात बुडून तीन सख्ख्या बहीण भावंडांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी दुपारी घडली. या तिन्ही भावंडांना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने पाण्याच्या प्रवाहात बुडून त्यांना जीव गमवावा लागला. या घटनेने परिसरावर शोककळा पसरली.
लक्ष्मी शंकर पत्तार (वय ११), उमाश्री शंकर पत्तार (वय ९), संतोष शंकर पत्तार (वय ८ रा. जुना कत्तलखाना सदर बझार ; मूळ रा. पडघानूर, जि. विजापूर, कर्नाटक) अशी मयत भावंडांची नावे आहेत. या भावडांना जिल्हा रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २० वर्षांपासून लक्ष्मी टेकडी येथे राहणारे शंकर पत्तार व रेणुका हे दाम्पत्य बिगारी काम करतात. मयत उमाश्री व लक्ष्मी हे पडघानूर येथे गावाला आजी आजोबांकडे राहात होते. तर, संतोष आई वडिलांकडे राहात होता. थोरला मुलगा मंजुनाथ हाही बिगारी काम करतो. या मुलांना सांभाळण्यासाठी रेणुका यांची आई गावावरून आली होती. रेणुका यांची आई चौघा मुलांची काळजी घेत होत्या. मुले रोज कालव्याकडे जात होती आणि त्यांच्यासोबत आजीही जात होती. मात्र, शनिवारी दुपारी मुले इथेच खेळत असतील म्हणून त्या घरातच थांबल्या होत्या. शनिवारी दुपारी लक्ष्मी, उमाश्री व संतोष हे धुणे धुण्यासाठी म्हणून कण्हेरच्या उजव्या कालव्यात गेले होते. त्यानंतर ते तिघे पोहण्यासाठी कालव्यात उतरले असता पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने खोल पाण्यात तिघे बुडाले. काठावरील कपडे व कपडे धुण्याच्या ब्रशवरून ही माहिती मिळाली. दरम्यान, सातारा शहर पोलिसांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले. या शोध मोहिमेत पट्टीचे पोहणारे काही जण पाण्यात उतरून मृतदेह बाहेर काढले.

होत्याचे नव्हते झाले...

उमाश्री लक्ष्मी संतोष ही चारही मुले कष्टाळू व अभ्यासात हुशार होती. आई वडील घरात नसताना सर्वजण घरची कामे करत असत. शंकर व रेणुका यांना दुपारी ही घटना कळताच त्यांना जबर मानसिक धक्का बसला. दुपारी साडेचार वाजता शंकर यांना मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, तेव्हा पोटचे तिन्ही गोळे मृतावस्थेत बघून शंकर याचे अवसानच गळाले. क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले होते. रुग्णालयाच्या बाहेर शंकर व रेणुका या दाम्पत्याला ओक्साबोक्शी रडताना पाहून अनेकांचा जीव गलबलला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीबीएसई बारावीत मुली अव्वल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने (सीबीएसई) मार्चमध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल शनिवारी दुपारी संकेतस्थळावर जाहीर झाला. विद्यार्थ्यांच्या करिअरला नवे वळण देणाऱ्या या निकालामध्ये अपेक्षेप्रमाणे मुलींनी बाजी मारली. कोल्हापूर पब्लिक स्कूलच्या पूर्वप्रभा पाटीलने सायन्समध्ये सर्वाधिक ९३ टक्के, तर कॉमर्समध्ये श्रुती शहाने ९५.०४ टक्के गुण मिळवले.

शनिवारी निकाल प्रसिद्ध झाला असला, तरी प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना गुणपत्रिकेसाठी चार दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

कोल्हापूर शहरात प्रामुख्याने कोल्हापूर पब्लिक स्कूल, शांतिनिकेतन स्कूल व कागल येथील जवाहर नवोदय विद्यालयाचा समावेश होता. शनिवारी जाहीर झालेल्या निकालात कोल्हापूर पब्लिक स्कूलचा कॉमर्स शाखेचा १००, तर सायन्स शाखेचा ९९ टक्के निकाल लागला. शांतिनिकेतन स्कूलने कॉमर्स शाखेच्या १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. जवाहर नवोदय विद्यालयाचा सायन्सचा निकाल १०० टक्के लागला.

कोल्हापूर पब्लिक स्कूलच्या कॉमर्स शाखेचा निकाल १०० टक्के निकाल लागला असून, यामध्ये श्रुती शहाने ९५.०४ टक्के गुण मिळवत अव्वल, तर सीमरन शहाने ८६.०६ टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक पटकावला. सायन्स शाखेत पूर्वप्रभा पाटीलने ९३ टक्के गुणांसह अव्वल, तर ओमकार ढेकळेने ८१.२ टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक मिळवला. श्रुती शहाने इंग्रजी विषयात १०० पैकी १०० गुण मिळवले, तर पूर्वप्रभा पाटीलने फिजिक्स विषयात १०० पैकी ९५ गुण मिळवले. यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष किशोर तावडे, संस्थापिका शोभा तावडे, प्राचार्या शुभांगी पवार, योगिनी कुलकर्णी, ज्योती कोडोलीकर, अंजली मेळवंकी व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील अॅकॅडमीच्या शांतिनिकेतन स्कूलनेही शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. स्कूलच्या कॉमर्स शाखेचे १९ पैकी १९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. वेंगावेट्टी सहिता व रिया वाच्छानी उच्च श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यांना संस्थेचे चेअरमन डॉ. संजय पाटील, संचालिका राजश्री काकडे, मुख्याध्यापिका जयश्री जाधव, उपप्राचार्या मनीषा पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

कागल येथील जवाहर नवोदय विद्यालयानेही शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे.

सायन्स शाखेचे ३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, ११ विद्यार्थ्यांनी उच्चश्रेणी प्राप्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाचवी मुलगीच झाल्याने तिला ढकलले मृत्युच्या दाढी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

स्वतःच्या नवजात मुलीला टाकून देणाऱ्या निर्दयी माता-पित्याला लक्ष्मीपुरी पोलिसांनी शनिवारी अटक केली. रशिद जब्बार सय्यद (वय ४०) आणि त्याची पत्नी हसिना (वय ३८, रा. सदर बाजार) अशी त्यांची नावे आहेत. सहा अपत्यांमध्ये पाचवी मुलगीच झाल्याने त्यांनी तिला टाकून दिल्याची कबुली दिली. हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेने अनेकांचे मन द्रवले. गुरूवारी (ता. १९) पहाटे शुक्रवार पेठेतील ऋणमुक्तेश्वर मंडई परिसरात अर्भक टाकले होते. दरम्यान, मुलीची प्रकृती खालावली आहे. तिच्यावर सीपीआरच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

रशिद सय्यद महाद्वार रोड परिसरात बेल्ट विक्री करतो. रशिद आणि हसिनाचा वीस वर्षांपू्र्वी विवाह झाला आहे. त्यांना सहा आपत्ये झाली आहेत. पहिल्या मुलीचे २ मे रोजी लग्न झाले. दुसरी मुलगी दहावीत शिकते. तिसरा मुलगा सातवीत आहे. चौथी मुलगी पहिलीत, तर पाचवी मुलगी तीन वर्षांची आहे. बुधवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास हसिनाची डिलिव्हरी झाली. मुलगी आल्याने या दोघांनी तिला सोडून द्यायचे ठरवले. पहाटे पाचच्या सुमारास अर्भकाला कापडात गुंडाळून प्लास्टिक कॅरीबॅगमध्ये घेऊन हे दोघे मित्राच्या रिक्षातून शुक्रवार पेठेतील ऋणमुक्तेश्वर भाजी मंडईत गेले. ते‌थे हसिनाचा सख्खा भाऊ सलीम इस्माइल शेख राहतो. त्याच्या घराबाहेरील कट्ट्यावर अर्भक ठेवून दोघे निघून गेल्याची कबुली या दाम्पत्याने पोलिसांसमोर दिली. भाऊ मुलीला सांभाळेल या भावनेने त्याच्या दारात सोडल्याचे हसिनाने पोलिसांना सांगितले.

अर्भक टाकल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने परिसरातील रुग्णालयांत नोंद असलेल्या डिलिव्हरी पेशंटची माहिती मिळवली. १६५ महिलांची माहिती घेऊन संबंधित महिलांच्या घरी जाऊन डिलिव्हरी झाल्याची आणि बाळ असल्याची खात्री केली. मात्र यातून नवजात मुलीच्या पालकांची काहीच माहिती पोलिसांना मिळाली नाही. अखेर सदर बाजार परिसरात एका महिलेची डिलिव्हरी झाल्याचे आणि बाळ दिसत नसल्याची माहिती अजित वाडेकर या पोलिस कर्मचाऱ्याला मिळाली. अधिक चौकशी केल्यानंतर रशिद आणि हसिना यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे सखोल चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी दोघांवर कलम ३१७ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. मुलीच्या जिवास धोका निर्माण झाल्यास सदोष मनुष्यवधाचा गुन्हाही दाखल करणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी दिली.


बाळ तीन तासांत मृत्यूच्या दाढेत

हसिनालेने कुठल्याच रुग्णालयात उपचार घेतले नव्हते. मध्यरात्री दीडच्या सुमारास डिलिव्हरी झाल्यानंतर तिने बाळाची नाळ कापली आणि अवघ्या तीन तासात त्याला मृत्यूच्या दाढेत सोडले. कोणत्याच रुग्णालयात महिलेची नोंद नसल्याने तपास करणे अवघड होते. मात्र कॉन्स्टेबल अजित वाडेकर यांनी गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळवत निर्दयी माता-पित्याचा छडा लावला.


मुलीला सांभाळण्याची तयारी

स्वतःच्याच मुलीला मरणाच्या दारात सोडणाऱ्या माता-पित्यास पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांना मायेचा पाझर फुटला. मुलीला साभाळण्याची तयारी त्यांनी पोलिसांकडे दर्शवली. तिला आपल्या ताब्यात देण्याची मागणीही केली. मात्र याबाबतचे सर्वाधिकार बाल कल्याण विभागास असल्याने त्यांच्याकडून निर्णय आल्यानंतरच पुढील कार्यवाही केली जाईल, असे गोडसे यांनी सांगितले.


मुलीची प्रकृती खालावली

तीन दिवसापासून आईचे दूध न मिळालेल्या मुलीची प्रकृती खालावल्याने तिला सीपीआरच्या अतिदक्षता विभागात दाखल केले आहे. शुगर कमी झाली असून, रक्ताभिसरणही कमी प्रमाणात होत आहे. नाळेच्या जखमेचे इन्फेक्शन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
'नकोशी'मुळे 'ती' वाऱ्यावर

शुक्रवार पेठेतील ऋणमुक्तेश्वर भाजी मंडई परिसरात गुरुवारी (१९ मे) पहाटे सापडलेल्या त्या नवजात बालिकेच्या पालकांचा शोध घेण्याचे आव्हान लक्ष्मीपुरी पोलिसांनी दोन दिवसांत पूर्ण केले. पोलिसांनी यासाठी परिसरातील रुग्णालयांमध्ये नोंद असलेल्या १६५ महिलांचा तपास करूनही निर्दयी पालकांचा शोध लागला नव्हता. अखेर गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार पोलिस सदर बाजारातील त्या पालकांपर्यंत पोहोचले. पोलिसांनी कल्पकतेने तपास केल्यानेच दोन दिवसांत आरोपीला पकडण्यात यश आले आणि सोडलेली बालिका 'नकोशी' असल्याचेही स्पष्ट झाले.

गुरुवारी पहाटे सहाच्या सुमारास ऋणमुक्तेश्वर भाजी मंडई परिसरातील सलीम इस्माईल शेख यांच्या घराच्या कट्ट्यावर एक नवजात बाळ असल्याची माहिती लक्ष्मीपुरी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन ते नवजात बाळ मुलगी असल्याचे समजले. पोलिसांनी तातडीने बालिकेला उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले. बालिकेला योग्य उपचार मिळवून दिल्यानंतर पोलिसांसमोर खरे आव्हान होते ते तिच्या पालकांपर्यंत पोहोचण्याचे. पोलिसांनी तातडीने तपासासाठी विविध पथके तयार करून शहरातील विविध रुग्णालयांमध्ये जाऊन या महिन्याभरात प्रसूती झालेल्या महिलांची माहिती गोळा केली. संबंधित १६५ महिलांच्या घरी जाऊन त्यांची प्रसूती झाली आहे की नाही, याची खात्री करून बाळाची माहिती घेतली.

१६५ महिलांच्या भल्या मोठ्या यादीतूनही पोलिसांना उपयुक्त माहिती मिळाली नाही. त्यामुळे पोलिसांनी ज्या घराजवळ बाळ सापडले त्या घराचे मालक सलीम शेख यांच्याकडेही पोलिसांनी कसून चौकशी केली. अखेर पोलिस कॉन्स्टेबल अजित वाडेकर यांना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार नवजात बालिकेला निर्दयीरीत्या सोडून जाणारे ते पालक सदर बाजार परिसरातील असल्याची माहिती मिळाली. वाडेकर यांनी तातडीने याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. सहायक पोलिस निरीक्षक मनीषा गभाले यांनी तपासाची सूत्रे घेऊन तातडीने सदर बाजार येथे संशयिताच्या घरी जाऊन चौकशी केली. अधिक तपासात हसीना रशीद सय्यद या महिलेनेच पाचवी मुलगी झाल्याच्या नैराश्यातून पती रशीदसह पोटच्या गोळ्याला सोडून दिल्याचे स्पष्ट झाले.

मध्यरात्री दीडच्या सुमारास प्रसूती झाल्यानंतर हसीनाने स्वतःच्या नवजात मुलीची नाळ कापली. बाळाला सोडून देण्यासाठी हसीनाने आपल्या माहेरची निवड केली. ऋणमुक्तेश्वर भाजी मंडई परिसरात राहत असलेला आपला भाऊ सलीम शेख यांच्या घराच्या बाहेर बाळाला ठेवून हसीना व रशीद काहीच घडले नसल्याच्या आविर्भावात निघून गेले. हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर पाचवी मुलगीच झाल्याच्या नैराश्येतून मुलीला सोडल्याची कबुली रशीद व हसीनाने पोलिसांना दिली. तपासकामी अजित वाडेकर, मनीषा गभाले आणि सुभाष सरवडेकर यांचे काम महत्त्वाचे ठरले.



रुग्णालयात नोंदच नाही

सर्वसाधारणपणे प्रसूती होणारी महिला रुग्णालयात नाव नोंद करून डॉक्टरांकडून औषधोपचार घेत असते. हसीना सय्यद हिने मात्र कोणत्याच रुग्णालयात नाव नोंदवलेले नव्हते, त्यामुळे तिचा शोध घेण्याचे पोलिसांसमोर आव्हान होते. पोलिसांनी तांत्रिक पद्धतीने तपास करूनही अपेक्षित माहिती उपलब्ध न झाल्याने पारंपरिक पद्धतीने केलेल्या तपासातून संशयितांची माहिती मिळाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मुस्लिमांवर परकेपण लादण्याचा प्रयत्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'मुस्लिम समाज याच मातीतला आहे. मात्र संशयाचे वातावरण निर्माण करून त्याच्यावर परकेपण लादण्यात आले आहे. कधी आत तर कधी बाहेर अशा अनुभवातून तो जगतो, अशी खंत व्यक्त करून इतरांच्या नजरेतून निसटलेले वास्तव तो बघू शकतो. ही वेगळी नजरच त्याचे सामर्थ्य आहे आणि ते साहित्यातून प्रकट होत समाजमनाचा ठाव घेत आहे,' असे मत ज्येष्ठ नाटककार आणि मु‌स्लिम मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष शफाअत खान यांनी व्यक्त केले.

मुस्लिम बोर्डिंगच्यावतीने कोल्हापुरात आयोजित मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाचे उद्‍घाटन बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज होते.

आपल्या आसपास वावरणाऱ्या मुस्लिमांच्या मनातील व्यथा-वेदना आणि घालमेल समजून घेण्यासाठी त्यांचे साहित्य वाचले पाहिजे, असे सांगून खान म्हणाले, 'मुस्लिमांबाबत असलेले गैरसमज हा एक दरी निर्माण करण्यासाठी निमित्त ठरणारा घटक आहे. हीच दरी भविष्यात मुस्लिम लेखकांच्या मराठी साहित्याच्या माध्यमातून कमी होण्याची आश्वासक पहाट उगवत आहे.'

समाजातील बदल अनेकांच्या प्रयत्नांनी होत असतो असे सांगून खान म्हणाले, 'मुस्लिम साहित्यिक, लेखकांनी साहित्य प्रवाह बळकट केला आहे. भारतीय मुसलमान हा मनाने मराठी असल्याची प्रचिती अनेकदा येते. घरी दखनी भाषेत बोलणाऱ्या अनेक मुस्लिम लेखकांनी लेखनासाठी मराठी भाषा निवडली आहे. भाषेचे अपुरेपण त्याला जाचत राहते तेव्हा तो भाषेच्या भिंती ओलांडतो, धर्माच्या रेषा पुसून टाकतो, कारण त्याला अभिव्यक्त व्हायचे असते.'

'मुस्लिम समाज शिक्षणापासून लांब आहे. त्याचा परिणाम त्याच्या विचारांवर होत आहे. मात्र त्याला खूप बोलायचे आहे. जीवनानुभव सांगायचे आहेत. विशेष म्हणजे मुस्लिम लेखकांचे मराठी साहित्य ही त्यांच्या जगण्यातील आर्त साद आहे. या समाजातील महिलांचे भावविश्व आजही मुके आहे. तरीही ते साहित्यातून व्यक्त व्हावे यासाठी ही चळवळ प्रवाही राहण्याची गरज आहे. सुफी साहि​त्यिकांनी समतेची, सलोख्याची परंपरा सांगितली आहे. साहित्यातून जेव्हा एखादा लेखक समाजातील विषमतेला विरोध करून समतेची भूमिका मांडू पाहतो तेव्हा तो सुफीच असतो. जातीधर्मापलिकडे जाऊन माणसाच्या दु:खाला आपले मानतात ते सुफी असतात. लेखक तरी दुसरे काय करतो? ते नेहमी समाजातील व्यथा, वेदना, उपेक्षितपणा यावर लिहितात, त्यासंदर्भात समाजमनाची मशागत करतात. नव्या युगातील सुफी म्हणून लेखक अतिशय चांगली जबाबदारी पेलू शकतात. मुस्लिम मराठी साहित्यातही अशा सुफींची गरज आहे, जेणेकरून समाजात ​गैरसमजातून, संशयातून वाढत असलेली विषमता, गढूळ मते दूर होतील,' अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महालक्ष्मी बँकेसाठी आज मतदान

$
0
0

महालक्ष्मी बँकेसाठी आज मतदान

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महालक्ष्मी सहकारी बँकेच्या पंचवर्षिक निवडणुकीच्या १७ जागांसाठी रविवारी (ता. २२) जिल्ह्यातील ३१, तर पुणे येथे एका मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. महालक्ष्मी सत्तारूढ जुने पॅनेल विरुद्ध महालक्ष्मी पॅनेल अशी सरळ लढत होत आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीतून सभासदांसमोर आपली भूमिका मांडली होती. एकूण २३ हजार ७०० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

महालक्ष्मी बँकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर सत्तारुढ विरुद्ध विरोधक अशी लढत होईल अशी अपेक्षा होती. मात्र, यामधून भालचंद्र आष्टेकर यांनी सवतासुभा मांडत सत्तारुढ गटाला जोरदार आव्हान दिले. दोन्ही गटांकडून एकास एक लढत देण्याची राजकीय खेळी यशस्वी ठरली आहे. त्यामुळे गेले दोन आठवडे वेगवेगळ्या पद्धतीने पॅनेलप्रमुख आपली भूमिका मांडत होते. शनिवारी रात्री उशिरापर्यंत सभासदांचे मतपरिवर्तन करण्याचे काम सुरू होते. पॅनेलप्रमुख गुप्त प्रचारात व्यस्त असतानाच, निवडणूक यंत्रणेनेही मतदानाची जय्यत तयारी केली आहे. कोल्हापूर येथील २९, नृसिंहवाडी २ व पुणे येथील एका मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. यासाठी २५० कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. सोमवारी सकाळी रमणमळा येथील शासकीय बहुद्देशीय सभागृहात मतमोजणी होणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी सुनील धायगुडे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तिढा सरकारी ‘अवैध’ बांधकामांचा !

$
0
0

जनभावना किंवा समाजाची गरज लक्षात घेऊन प्रकल्प आखले जातात. त्यांची अंमलबजावणी सुरू होते. मात्र, आराखड्यात प्रकल्पातील धोके, त्रुटी लक्षात विचारात घेतल्या जात नाहीत. अनेकदा त्या दुर्लक्षिल्या जातात. मग प्रकल्प रखडतो. सरकारी यंत्रणेकडून राबविला जात असूनही तो 'अवैध' ठरतो. कोल्हापुरातील शिवाजी पूल, इएसआयसी हॉस्पिटल, सिंधुदुर्गला जोडणारा शिवडाव-सोनवडे घाटरस्ता ही प्रातिनिधिक उदाहरणे. त्यांच्या उत्तरदायित्त्वाचा विचार व्हावला हवा.

०००

महेश पाटील

०००

समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी, विकासासाठी प्रकल्पांची गरज असते. त्यांची आखणी सरकारी स्तरावर होते. अंमलबजावणीही 'सरकार' नावाची यंत्रणाच करते. एखादा प्रस्ताव बनवायचा. त्याची मंजुरी प्राथमिक घ्यायची. सरकारकडून त्यासाठी निधी मंजूर करून घ्यायचा. मग निविदा काढून कामाची वर्कऑर्डरही द्यायची. काम सुरू झाल्यावर किंवा निम्मे काम झाल्यावर मग लक्षात येते की, हे काम आपल्याशिवाय अन्य दुसऱ्या विभागाशीही संबंधित आहे आणि त्यांच्याकडून परवानगी घ्यायची शिल्लक राहिलीय. अनेकदा असे होते की, लक्षात आलेले धोके, त्रुटी दुर्लक्षिल्या जातात. एखादे काम दामटून नेण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, 'चलता है...' ही प्रवृत्ती सर्वत्र लागू होतेच असे नाही. त्यातून प्रकल्प रखडतात.

खरेतर प्रकल्प, योजनांच्या अंमलबजावणीत वेळ आणि पैसा वाया जाऊ नये म्हणून प्राथमिक परवानगी घेऊन काम सुरू करायचे. नंतर उर्वरित परवानग्या मिळवायच्या अशी उदात्त भावना ठेवून सरकारने काही प्रमाणात मुभा दिली. मात्र, लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांच्या 'खाबुगिरी'च्या राजकारणात ही कामे सरकारी 'बेकायदेशीर' बांधकामे म्हणून गणली जातात. राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभाग आणि अन्य सरकारी यंत्रणांनी तात्कालिक वैयक्तिक हितसंबंधातून असे घोळ प्रत्येक जिल्ह्यात घातले आहेत.

वानगीदाखल कोल्हापूर जिल्ह्यातील प्रस्तुत तीन प्रकल्पांची उदाहरणे पाहता येतील. कोल्हापूर जिल्ह्याला गोव्याशी, मुख्यत्त्वे सिंधुदुर्ग जिल्ह्याशी जोडणारा भुदरगड तालुक्यातून जाणारा शिवडाव - सोनवडे घाटरस्ता गेली आठ वर्षे रखडला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी, शिवडाव जिल्हाहद्द घाटरस्ता (राज्यमार्ग क्रमांक १२० चे बांधकाम) याचे भूमिपूजन ५ फेब्रुवारी २००९ रोजी केले. तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आणि पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. तत्कालीन मंत्री नारायण राणे, विद्यमान आमदार हसन मुश्रीफ यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, सार्वजनिक बांधकाम विभागाचे तत्कालीन अधीक्षक अभियंता डी. जी. मळेकर, कार्यकारी अभियंता एम. बी. वाघमारे यांच्या उपस्थितीत हा भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला होता. शिवडाव - सोनवडे घाटरस्त्यामुळे गोव्याचे अंतर ४५ किलोमीटरने कमी होणार आहे. मुळात या घाटरस्त्याला १९९५-२०००च्या शिवसेना-भाजप युती सरकारने मंजुरी दिली. घाट रस्त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १७.२३ हेक्टर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील ८.५० हेक्टर अशी दोन्ही मिळून २५.७६ हेक्टर जमीन आरक्षित केली गेली. भूमिपूजनानंतर टप्प्याटप्प्याने या घाटरस्त्याचे काम पूर्ण होत गेले. मात्र, मधल्या वनजमिनीचा प्रश्न न सुटल्याने घाट प्रलंबित राहिला. घाटाचे कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग अशा दोन्ही बाजूंनी काम झाल्यावर मग वनविभागाच्या ताब्यातील जमिनीची परवानगी मिळणार नसल्याचा साक्षात्कार झाला. मग कोल्हापूर व सिंधुदुर्ग वनविभागामार्फत नागपूरच्या प्रधान कार्यालयाकडे प्रस्ताव सादर झाला. वनसंरक्षण विभागाने हा प्रस्ताव स्थळनिरीक्षण समितीकडे पाठवून येथील वन्यजिवांची माहिती घेतली होती. मात्र, घाट रस्त्यासाठीचे आरक्षित क्षेत्र हे राधानगरी अभयारण्यापासून १० किलोमीटरच्या आतील बफर झोनमधील असल्याचे आणि या क्षेत्रात वाघ, बिबट्या, सांबर, गवा, आदी प्रमुख प्राण्यांचा वावर असल्याचे सिद्ध झाले. वन्यजिवांकडून भ्रमणमार्ग म्हणून वापर होत असलेल्या या क्षेत्रातून रस्ता झाल्यास वन्यजिवांचे आयुष्यच धोक्यात येऊ शकते असा अहवाल दिला गेला. त्यामुळे हा रस्ता अडचणीत सापडला. तो आजतागायत तसाच आहे. केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या दारात जाऊनही रस्त्याची बिकट वाट सुटलेली नाही.

कोल्हापुरातील ऐतिहासिक शिवाजी पुलाला पर्याय म्हणून बांधल्या गेलेल्या पुलाचे प्रकरण तर यापेक्षा भयावह आहे. शहराच्या इतिहासाचा, प्राचीन परंपरेचा अमोघ ठेवा असलेल्या शाहूकालीन हौदाचे यात विद्रूपीकरण झाले. कोल्हापूर-रत्नागिरी या अत्यंत वर्दळीच्या या मार्गावरील पुलासाठी केंद्र सरकारच्या वार्षिक योजना आराखड्याअंतर्गत महाराष्ट्रासाठी मंजूर झालेल्या निधीतून १३ कोटी ५ लाख रुपये मंजूर झाले होते. दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या कार्यकाळात याला मंजुरी मिळाली. सध्याचा शिवाजी पूल १८७४-७८ या कालखंडात राजश्री-रामचंद्र महादेव आणि कंपनीने बांधला. ब्रिटिश राजवटीत मेजर वॉल्टर मार्डन डुकाट-रॉयल इंजिनीअर्सनी पूल उभारला. १४० हून अधिक वर्षे पूर्ण झालेल्या या पुलास पर्याय गरजेचा होताच. मात्र, त्यासाठी इतिहासाची अज्ञानातून आणि बेफिकीरीने केलेली मोडतोड अक्षम्य ठरते. नव्या पुलासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने आराखडा बनवला. एक मोठे विकासकाम केल्याचे जाहीर करत तत्कालीन खासदार, आमदारांसह विद्यमानांनी स्वतःचा उदोउदो करून घेतला. बांधकाम सुरू झाले. मात्र, निम्म्याहून अधिक म्हणजे ८० टक्के काम पूर्ण झाल्यावर पुलाचे कोल्हापूर शहराशी जोडणारे जे टोक आहे, ती जमीन केंद्रीय पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारित असल्याचे उघड झाले. यातील अशास्त्रीय कामाला पर्यावरण चळवळीतील कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला. मात्र, त्यांनाच टार्गेट करत शहर विकासाच्या नावाखाली झुंडशाहीने ऐतिहासिक हौदाचे विद्रूपीकरण केले. शहराच्या प्रथम नागरिकांपासून सर्वच पक्षांच्या सहभागाने शहराच्या इतिहासाच्या, राष्ट्रीय संस्कृतीच्या पाऊलखुणा नष्ट करण्याचा प्रयत्न झाला. 'कथित' जनभावना लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनापासून ते पोलिस, महानगरपालिकेपर्यंतच्या यंत्रणेपर्यंत कोणत्याच पातळीवर जमावाच्या झुंडशाहीवर कारवाई झाली नाही. आपली चूक लवपण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पर्यायी पूल का रखडला? याचे खरे कारण जनतेसमोर कधीच आणले नाही. झाडे किंवा हौदाऐवजी खरा अडथळा केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारितील जमिनीचा आहे. विनापरवाना त्यांच्या मालकीच्या जागेवर पूल बांधता येणार नाही हे स्पष्ट करण्याऐवजी दिशाभूल केली गेली. पूल होणे ही काळाची गरज आहे. तो झालाच पाहिजे. मात्र, बांधकामातील संभाव्य अडचणी जाणून त्यांच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न करण्याऐवजी चलता है... मिळेल की परवानगी अशा भावनेतून लोकप्रतिनिधी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने खेळ आता अंगलट आला आहे.

कोल्हापूर इएसआयसी हॉस्पिटल हे आणखी एक वेगळेच प्रकरण. ताराबाई पार्क परिसरात राज्य बिमा निगमचे हॉस्पिटल १९९७ मध्ये बांधण्यात आले. मात्र, हे हॉस्पिटल ज्या जमिनीवर बांधले गेले, ती जमीनच या कारणासाठी वापरण्यास परवानगीच नव्हती. परवानगी नसताना भली मोठी इमारत उभारली गेली. ठेकेदाराला कामाचे पैसेही दिले गेले. मात्र, त्यानंतर तो गायबच झाला. खासदार धनंजय महाडिक यांच्या म्हणण्यानुसार, इमारतीच्या कम्प्लिशन सर्टिफिकेटअभावी पुढील प्रक्रिया शक्य नाही. दिल्लीच्या राष्ट्रीय विमा निगमच्या स्तरावरच यासंदर्भात तोडगा निघणे शक्य आहे. लवकरच संयुक्त बैठक घेण्याचे प्रयत्न सर्व स्तरावर सुरू असल्याचे खासदार महाडिक सांगतात. मात्र, उत्तरप्रदेशच्या ज्या कंत्राटदाराने या प्रकल्पाचे काम केले, तो आजही गायब आहे. त्याने प्रकल्पाचे कम्प्लिशन सर्टिफिकेट महापालिकेकडून घेतलेले नाही. त्यामुळे साधारणतः चार कोटींची गुंतवणूक वापराविना पडून आहे. मार्च २०१५मध्ये राज्य बिमा निगमच्या या हॉस्पिटलच्या इमारतीची पाहणी दिल्लीतील बिमा निगमच्या अधिकाऱ्यांनी केली. कोल्हापुरात हॉस्पिटल सुरू करण्याच्या दृष्टीने इमारतीच्या स्थितीची पाहणी केली गेली. अर्थात याचा निर्णय केंद्रीय बिमा निगमच्या केंद्रीय सचिव स्तरावर होईल. दुसरीकडे महापालिकेकडून बांधकाम पूर्णत्वाचा दाखला न मिळाल्याने पुढे काय होणार हा प्रश्नच आहे. मात्र, एखादा कंत्राटदार पळून जातो, त्याचा शोधही लागत नाही हा प्रकार संबंधितांचे 'साटेलोटे' असल्याशिवाय शक्य नाही. अर्थात याचे उत्तरदायित्त्वही निश्चित करायला हवे. तरच काही प्रमाणात नुकसानीचा सोक्षमोक्ष लागू शकेल.

........

'क्षुद्र' राजकारण, वैयक्तिक लाभही कारणीभूत

रखडलेला पर्यायी पूल, शिवडाव-सोनवडे घाटरस्ता, इएसआयसी हॉस्पिटल या तिन्ही बाबतीत खाबुगिरी, सरकारी यंत्रणेची बेफिकिरी याबरोबरच स्थानिक राजकारण, अनास्था, खाबुगिरी तसेच क्षुद्र राजकारणही कारणीभूत आहे. कोल्हापूर महापालिकेत सत्तेवर असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने अशाच क्षुद्र राजकारणातून पर्यायी पुलाची परवानगी रखडल्यामुळे बांधकाम विभागाला राज्य सरकारकडे दाद मागावी लागली. मात्र, मुळात पुरातत्त्व विभाग संवर्धित जागांविषयी अतिशय जागरूक असतो. कोल्हापुरात संवर्धित स्मारक नसलेल्या हेरिटेज साइटवर बांधकामाला परवानगी दिली तर तसा पायंडा पडेल या भीतीने राज्य सरकारनेही परवानगी नाकारली. त्यामुळे केंद्र सरकारच्या दारी जाण्याची वेळ कोल्हापूरकरांवर आली आहे. शिवडाव-सोनवडे घाटरस्त्याच्या प्रकरणात तर तेथील जमीनमालकांचे वैयक्तिक हितसंबंध एवढाच मुद्दा आहे. या रस्त्याची 'इकॉनॉमिकल व्हाएब्लिटी' नसल्याचे अधिकारी खासगीत सांगतात. चार-दोन लोकांच्या लाभांसाठी रस्ता करायला जाऊन पैसे वाया घालवले गेले. तेही परवानगीच्या घोळात अडकून पडले आहेत. इएसआय इमारतीच्या बांधकामाचे प्रकरण तर अनाकलनीय आहे. एकोणीस वर्षांनीही जर स्टाफ मंजूर होणार नसेल, हॉस्पिटल सुरू होणार नसेल तर बांधकाम केलेच कशाला? हॉस्पिटल सुरू होणे किंवा न होण्यामागचे राजकारण याची उत्तरेही महत्त्वाची आहेत.

Mahesh.Patil@

timesgroup.com

००००घ्‍०००००००००००००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कदमवाडीत भरदिवसा ७३ हजारांची घरफोडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेले चोऱ्यांचे सत्र अजूनही सुरूच आहे. कदमवाडी रोड येथे अज्ञात चोरट्यांनी श्री कॉम्प्लेक्समध्ये फ्लॅट फोडून रोख रकमेसह ७३ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला. या घटनेची नोंद शाहूपुरी पोलिस ठाण्यात झाली असून, पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत. भरदिवसा झालेल्या घरफोडीमुळे परिसरातील नागरिकांनी धास्ती घेतली आहे.

शहरात चोऱ्यांचे सत्र सुरूच असून, चोरटे बंद घरांना लक्ष्य करीत आहेत. सुटीनिमित्त लोक शहराबाहेर जात असल्याने बंद घरांची पाळत करून घरफोड्या करण्याचे प्रमाण वाढले आहे. शासकीय मुद्रणालयात नोकरीस असलेले सुनील कृष्णा गुरव (वय ४४, रा. ४८४, श्री कॉम्प्लेक्स, हिंदुराव घाटगे कॉलनी, कदमवाडी रोड) हे पत्नी आणि दोन मुलांसह वरील पत्त्यावर राहतात. बुधवारी (ता. १८) गुरव यांची पत्नी आणि दोन्ही मुले सुटीनिमित्त हरळी (ता. गडहिंग्लज) या मूळ गावी गेले होते. गुरव सकाळी साडेदहा वाजता घराला कुलूप लावून कामास गेले. संध्याकाळी सहाच्या सुमारास घरी परत आल्यानंतर त्यांना फ्लॅटच्या दरवाजावरील लोखंडी ग्रीलचे कुलूप तोडल्याचे तसेच आतील लाकडी दरवाजा उचकटल्याचे आढळले. अज्ञात चोरट्यांनी कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त विस्कटले होते. कपाटातील मंगळसूत्र, सोन्याची चेन, अंगठी, कानातील टॉप्स, रिंगा यांसह १५ हजार रुपये रोख असा एकूण ७३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास झाल्याचे त्यांना लक्षात आले. गुरव यांनी शनिवारी (ता. २१) शाहूपुरी पोलिसांत फिर्याद दाखल केली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून, चोरट्यांचा शोध सुरू आहे. गेल्या आठवड्याभरात शहरात चोऱ्यांचे सत्र सुरूच असून, भरदिवसा घरफोड्या होत असल्याने नागरिकांनी याची धास्ती घेतली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नकोशी’मुळे ‘ती’ वाऱ्यावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शुक्रवार पेठेतील ऋणमुक्तेश्वर भाजी मंडई परिसरात गुरुवारी (१९ मे) पहाटे सापडलेल्या त्या नवजात बालिकेच्या पालकांचा शोध घेण्याचे आव्हान लक्ष्मीपुरी पोलिसांनी दोन दिवसांत पूर्ण केले. पोलिसांनी यासाठी परिसरातील रुग्णालयांमध्ये नोंद असलेल्या १६५ महिलांचा तपास करूनही निर्दयी पालकांचा शोध लागला नव्हता. अखेर गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार पोलिस सदर बाजारातील त्या पालकांपर्यंत पोहोचले. पोलिसांनी कल्पकतेने तपास केल्यानेच दोन दिवसांत आरोपीला पकडण्यात यश आले आणि सोडलेली बालिका 'नकोशी' असल्याचेही स्पष्ट झाले.

गुरुवारी पहाटे सहाच्या सुमारास शुक्रवार पेठेतील ऋणमुक्तेश्वर भाजी मंडई परिसरातील सलीम इस्माईल शेख यांच्या घराच्या कट्ट्यावर एक नवजात बाळ असल्याची माहिती लक्ष्मीपुरी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन ते नवजात बाळ मुलगी असल्याचे समजले. पोलिसांनी तातडीने बालिकेला उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले. बालिकेला योग्य उपचार मिळवून दिल्यानंतर पोलिसांसमोर खरे आव्हान होते ते तिच्या पालकांपर्यंत पोहोचण्याचे. पोलिसांनी तातडीने तपासासाठी विविध पथके तयार करून शहरातील विविध रुग्णालयांमध्ये जाऊन या महिन्याभरात प्रसूती झालेल्या महिलांची माहिती गोळा केली. संबंधित १६५ महिलांच्या घरी जाऊन त्यांची प्रसूती झाली आहे की नाही, याची खात्री करून बाळाची माहिती घेतली.

१६५ महिलांच्या भल्या मोठ्या यादीतूनही पोलिसांना उपयुक्त माहिती मिळाली नाही. त्यामुळे पोलिसांनी ज्या घराजवळ बाळ सापडले त्या घराचे मालक सलीम शेख यांच्याकडेही पोलिसांनी कसून चौकशी केली. अखेर पोलिस कॉन्स्टेबल अजित वाडेकर यांना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार नवजात बालिकेला निर्दयीरीत्या सोडून जाणारे ते पालक सदर बाजार परिसरातील असल्याची माहिती मिळाली. वाडेकर यांनी तातडीने याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. सहायक पोलिस निरीक्षक मनीषा गभाले यांनी तपासाची सूत्रे घेऊन तातडीने सदर बाजार येथे संशयिताच्या घरी जाऊन चौकशी केली. अधिक तपासात हसीना रशीद सय्यद या महिलेनेच पाचवी मुलगी झाल्याच्या नैराश्यातून पती रशीदसह पोटच्या गोळ्याला सोडून दिल्याचे स्पष्ट झाले.

मध्यरात्री दीडच्या सुमारास प्रसूती झाल्यानंतर हसीनाने स्वतःच्या नवजात मुलीची नाळ कापली. बाळाला सोडून देण्यासाठी हसीनाने आपल्या माहेरची निवड केली. ऋणमुक्तेश्वर भाजी मंडई परिसरात राहत असलेला आपला भाऊ सलीम शेख यांच्या घराच्या बाहेर बाळाला ठेवून हसीना व रशीद काहीच घडले नसल्याच्या आविर्भावात निघून गेले. हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर पाचवी मुलगीच झाल्याच्या नैराश्येतून नवजात मुलीला सोडल्याची कबुली रशीद व हसीनाने पोलिसांना दिली. या तपासात कॉन्स्टेबल अजित वाडेकर, सहायक पोलिस निरीक्षक मनीषा गभाले आणि सुभाष सरवडेकर यांचे काम महत्त्वाचे ठरले.

रुग्णालयात नोंदच नाही

सर्वसाधारणपणे प्रसूती होणारी महिला रुग्णालयात नाव नोंद करून डॉक्टरांकडून औषधोपचार घेत असते. हसीना सय्यद हिने मात्र कोणत्याच रुग्णालयात नाव नोंदवलेले नव्हते, त्यामुळे तिचा शोध घेण्याचे पोलिसांसमोर आव्हान होते. पोलिसांनी तांत्रिक पद्धतीने तपास करूनही अपेक्षित माहिती उपलब्ध न झाल्याने पारंपरिक पद्धतीने केलेल्या तपासातून संशयितांची माहिती मिळाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गजापूरची विवाहिता दोन मुलांसह बेपत्ता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शाहूवाडी तालुक्यातील गजापूर येथील सुमैया शौकत बोबडे ही विवाहिता आपल्या दोन मुलांसह दसरा चौक येथून बेपत्ता झाली आहे. याबाबत सुमैयाचे वडील उस्मान प्रभूलकर यांनी लक्ष्मीपुरी पोलिसांत फिर्याद दिली.

सुमैय्या बोबडे मुले रेहान आणि असद यांना घेऊन वडील उस्मान प्रभूलकर यांच्यासोबत बुधवारी (ता. १८) दसरा चौक येथे कामानिमित्त आल्या होत्या. दुपारी एकच्या सुमारास त्या वडील उस्मान यांना, मुलांना सरबत पाजून येते असे सांगून निघून गेल्या. बराच वेळ झाला तरी सुमैया परत न आल्याने उस्मान यांनी त्यांचा शोध घेतला. मात्र, त्या सापडल्या नाहीत. नातेवाइकांकडे शोध घेऊनही त्या सापडल्या नाहीत. अंगाने सडपातळ, रंगाने गोऱ्या, चेहरा उभट, अंगात पांढरा कुर्ता आणि गुलाबी रंगाचा सलवार, गुलाबी रंगाची ओढणी असा पेहराव आहे. सुमैय्या यांच्याकडे १० तोळे दागिने आणि रोख ४० हजार रुपये आहेत. या वर्णनाची महिला कोणाला आढळून आल्यास लक्ष्मीपुरी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेसने टॉयलेटला दिले ऋषी कपूर यांचे नाव!

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । सोलापूर

देशातील अनेक ठिकाणं आणि राष्ट्रीय मालमत्तांना आधीच्या काँग्रेस सरकारांकडून गांधी, नेहरू यांची नावे देण्यात आल्याचे नमूद करत त्याला जोरदार आक्षेप घेणारे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर हे सध्या काँग्रेसच्या निशाण्यावर असून सोलापुरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी चक्क एका सार्वजनिक शौचालयाला ऋषी कपूर यांचे नाव देऊन आपला निषेध नोंदवला आहे.

'सगळीकडे गांधी-नेहरूंची नावे द्यायला बापाचा माल समजलात का?', असा सवाल ऋषी कपूर यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला होता. या ट्विटमुळे मोठं वादळ उठलं होतं. ऋषी कपूर यांच्या म्हणण्याचं अनेकांनी समर्थन केलं तसा त्याला तीव्र विरोधही झाला. काँग्रेसने कपूर यांच्यावर पलटवार करताना कुठल्या वास्तूला कोणतं नाव असावं वा असू नये हे सांगणारे ऋषी कपूर कोण?, असा सवाल केला होता. ऋषी कपूर यांच्यासारखे काही लोक भाजप सरकारच्या 'गुड बुक'मध्ये स्थान मिळवण्यासाठीच हा सगळा खटाटोप करत आहेत. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांचं योगदान फार मोठं आहे. देशासाठी त्यांनी बलिदान दिलं आहे. त्यामुळे त्यांच्या नावास कुणाचाही आक्षेप असण्यांचं कारण नाही, असे काँग्रेस नेते पी. सी. चाको यांनी सुनावले होते. त्याचबरोबर देशाच्या विविध भागात काँग्रेस कार्यकर्त्यांनी ऋषी कपूर यांच्याविरोधात निदर्शनही केली होती. ऋषी कपूर यांच्या वांद्रे येथील निवासस्थानाबाहेरही कार्यकर्त्यांनी हिंसक आदोनल केले. अशीच निदर्शने आज सोलापुरात करुन युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चक्क शहरातील एका सार्वजनिक शौचालयाचं थेट 'ऋषी कपूर सार्वजनिक शौचालय' असं नामकरण करुन आपला निषेध नोंदवला.

युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष बाबा करगुळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. गांधी कुटुंबाबाबत अनुदार उद्गार काढल्याने निषेध म्हणून आम्ही हे आंदोलन केले आहे, असे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


संघर्ष करणार की विकासकामे

$
0
0

कोल्हापूर

थेट पाइपलाइन योजनेचे काम संथगतीने सुरू आहे, कचऱ्यापासून वीज निर्मितीची प्रकल्प कागदापुरताच सिमीत राहिला आहे. रंकाळा तलावाच्या प्रदूषणमुक्तीवरून कोर्टाने महापालिकेला फटकारले आहे. भरीव उत्पन्नाअभावी महापालिका आर्थिक दृष्ट्या कमकुवत बनली आहे. महापालिकेच्या तिजोरीत गंगाजळी नसल्याने पायाभूत सुविधावर परिणाम होत आहे, अशी प्रतिकूल परिस्थिती असताना प्रशासन आणि सत्ताधारी यांनी हातात हात घालून कामकाज करण्याची आवश्यकता असताना कोल्हापूर महापालिकेत मात्र या दोन्ही घटकांत छत्तीसचा आकडा आहे. हे दोन्ही घटक संघर्षातच जास्त शक्ती खर्च करत आहेत.

प्रशासन आणि सत्ताधारी यांनी प्रगल्भपणा न दाखविता प्रत्येक ठिकाणी एकमेकांच्या अडवणुकीचे धोरण स्वीकारल्यामुळे महापालिकेचा तारू भरकटू लागला आहे. अशा प्रसंगी महापालिकेचे नेतृत्व करणाऱ्या नेते मंडळीची जबाबदारी वाढली असताना, दोन्ही घटकांना एकत्र आणून सुवर्णमध्य साधणे गरजेचे असताना ही मंडळीही राजकारण करण्यातच धन्यता मानत आहेत. आमदार सतेज पाटील आणि आमदार हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेचा कारभार सुरू आहे. काँग्रेस आघाडीच्या कालावधीत कोट्यवधी रुपयांचा निधी आला. मोठे प्रकल्प शहरात आले. पाइपलाइन योजनेच्या कामाला सुरूवात झाली, नगरोत्थानमधून रस्त्याची कामे झाली.नाट्यगृहाला नवा लूक मिळाला. या साऱ्या जमेच्या बाजू आहेत.

शहरवासियांनी पुन्हा एकदा त्यांच्या हाती महापालिकेची सूत्रे सोपविताना अपेक्षाही उंचावल्या आहेत. गेल्या दीड वर्षात राज्यात सत्तांतर झाले आणि त्याचे पडसाद महापालिकेत उमटू लागले. महापालिकेचे वरिष्ठ अ​धिकारी विशेषतः आयुक्त हे राज्य सरकारचे प्रतिनिधी असल्याचा आ​णि ते सत्ताधाऱ्यांचे अडवणुकीचे धोरण राबवत असल्याचा काँग्रेस, राष्ट्रवादीचा आक्षेप आहे. वास्तविक महापालिकेत आतापर्यंत काँग्रेस, राष्ट्रवादीने एकहाती सत्ता राबवली. आता भारतीय जनता पक्ष, ताराराणी आघाडीच्या माध्यमातून प्रबळ विरोधी पक्ष अस्तित्वात आल्याने सत्ताधाऱ्यांच्या 'हम करे सो कायदा' या प्रवृत्तीला चाप बसला ही वस्तुस्थिती आहे.

प्रशासन, सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील राजकीय संघर्षात जनतेला इंटरेस्ट नाही. पायाभूत सुविधांची सोडवणूक, शुद्ध व मुबलक पाणी, कचऱ्यापासून वीज निर्मिती, रोजगार, बांधकाम विषयकपोषक धोरण अशा माफक अपेक्षा आहेत. पाइपलाइन योजनेचे काम केवळ २५ टक्के झाले आहे. फेब्रुवारी २०१७ पर्यंत योजना पूर्ण करण्याचा कालावधी होता. मुदतीत योजना पूर्ण झाली नाही, प्रकल्पाचा खर्च वाढला तर त्याची जबाबदारी कोण स्वीकारणार आहेत ? प्रकल्पाचा वाढीव खर्चाची तरतूद कशी करणार ? शहरातील पार्किंगची समस्या मोठी आहे. सुटीच्या दिवशी शहर तासाभरात ठप्प होते.

शहरातील कचऱ्याचा प्रश्न मोठा आहे. २०० टनाच्या आसपास कचरा निर्माण होत आहे. कचरा टाकायला जागा नाही. कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्पाच्या नुसत्या घोषणा होतात. महिलांसाठी स्वच्छतागृहावरून तर कोल्हापूरची अब्रू राज्यभर चव्हाट्यावर येत आहे. महिला भाविक, पर्यटकांसाठी अद्ययावत स्वच्छतागृह नाही. कोल्हापुरात महिला महापौर होऊनही महिला भाविक, पर्यटकांची स्वच्छतागृहाअभावी कुचंबणा होत आहे. महापालिका शाळांची दुरवस्था आहे. हे प्रश्न भेडसावत असताना नगरसेवक आणि प्रशासन, 'आरक्षण व भू संपादन'चा मुद्दा प्रतिष्ठेचा करत आहेत. प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांतील संघर्षाची दरी मिटण्याऐवजी दिवसेंदिवस रुंदावत असल्याने शहराच्या विकासाचा बट्ट्याबोळ होणार हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज उरली नाही.


... तरच कोंडी फुटेल

माजी महापौर सुनील कदम यांच्या स्वीकृत नगरसेवक होण्याने अथवा नाकारल्याने शहराच्या दैनंदिन कामकाजात काडीचाही फरक पडणार नाही. मात्र कदम सभागृहाच्या 'आत की बाहेर' यावरून महापालिका सभागृहात दिवसभर काथ्याकूट होतो, यावरून सभागृह कुणाच्या हातचे बाहुले बनले आहे ? असा प्रश्न पडतो. कदम यांच्या समर्थकांनी व विरोधकांनी त्यांच्या 'स्वीकृत'साठीची कायदेशीर लढाई स्वखर्चाने लढावे, महापालिकेला त्यामध्ये ओढून जनतेचा पैसा खर्च करू नये. आर्थिक उत्पन्नाअभावी महापालिका कमकुवत झाली असताना उत्पन्न वाढीसाठी कठोर निर्णयांची गरज आहे. महापालिकेच्या गाळ्यांची भाडेवाढ, मुदतवाढ करणे गरजेचे आहे. मध्यवस्तीतील पूर्वीपासून गाळ्यांना २०० ते ४०० रुपयेपर्यंत भाडे आहे. याचाही नगरसेवकांनी विचार करावा. पक्षीय राजकारणामुळे विचारांची मती कुंठीत होऊ नये. प्रत्येकवेळी सोयीचे राजकारण, ठराविक लोकांचे हितसंबंध जोपासून शहराचे किती दिवस नुकसान करायचे ? याचा विचार झाला तरच ही कोंडी फुटणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘भाजपचे सरकार कार्यकाळ पूर्ण करेल’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गारगोटी

'शिवसेनेने सरकारचा पाठिंबा काढून घेतला तरी पर्यायी व्यवस्था मी व मुख्यमंत्र्यांनी केली असल्यामुळे भाजपचे सरकार पाच वर्षांचा काळ पूर्ण करेल. आमदार हसन मुश्रीफ यांच्या आरोपांना आगामी विधानसभेच्या निवडणुकीत उत्तर मिळेल,' असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

गारगोटी (ता. भुदरगड) येथील श्री इंजुबाई सांस्कृतिक सभागृहात आयोजित भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गोकुळ दूध संघाचे संचालक बाबा देसाई होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, 'जिल्ह्यातील अनेक जागांवर भाजपचे आमदार निवडून आणणार आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे. कोणी कितीही वल्गना केल्या तरी भाजपचे सरकार पाच वर्षांचा काळ पूर्ण करेल. भाजपच्या कार्यकर्त्यांनी स्वबळावर निवडणुकीसाठी तयार राहावे. सरकारच्या विविध योजना आम्ही राबवत असून, कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन लोकांमध्ये त्यांचा प्रसार करावा. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आपल्यासोबत आणखी एक मजबूत मित्र येणार असल्यामुळे कार्यकर्त्यांनी एकसंधपणे निवडणुकांना सामोरे जावे.'

'गोकुळ'चे संचालक बाबा देसाई म्हणाले, 'मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या भगीरथ प्रयत्नामुळेच भाजपचे यश

जिल्ह्यात दिसू लागले आहे. आमदार मुश्रीफ कितीही आरडाओरडा करू देत, भाजप पूर्ण जिल्ह्यातील गावागावांत आणि घराघरांत पोहोचणार आहे.'

यावेळी तालुकाध्यक्ष नाथाजी पाटील, श्री मौनी विद्यापीठाचे सदस्य अलकेश कांदळकर, प्राचार्य धनाजी मोरस्कर, विनायक परुळेकर, रामचंद्र पाटील, आदींनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी संतोष पाटील, नामदेव चौगले, संतोष पाटील, नामदेव चौगले, शहराध्यक्ष राहुल चौगले,रणजित आडके, ए. डी. कांबळे, सुनिल पाटील, संग्राम शिगावकर, आदी उपस्थित होते. सुशांत मगदूम यांनी सूत्रसंचालन केले. एच. आर. पाटील यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कळशीभर पाण्यासाठी दाहीदिशा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा शाहूवाडी

विहिरीत खोलवर नजर टाकली तरी पाणी नाही, कूपनलिकाही कोरड्या ठाक... पाझर तलावही आटत चाललेत. कळशीभर पाण्यासाठी मैलोनमैल प्रवास करणाऱ्या महिला, लहान मुले, चारा-पाण्याच्या शोधात रानोमाळ दूरवर भटकणारी जनावरे हे वास्तव चित्र आहे शाहूवाडी तालुक्यातील दुष्काळाची दाहकता दर्शविणारे. कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गाला लागून असलेल्या चार पाच किलोमीटर परिसरात वास्तव्य कारून राहिलेल्या काही गावांमध्ये नजर टाकल्यास ही दाहकता समोर येते. त्यामध्ये भाडळे, खुटाळवाडी, सुपात्रे, परखंदळे, सावर्डे, सोनवडे, बांबवडे, गोगवे, तळपवाड, मुटकळवाडी, आदी गावे दुष्काळाच्या फेऱ्यात पूर्णपणे गुरफटलेली आहेत. येथे पिण्याच्या पाण्याबरोबर जनावरे व शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

खुटाळवाडी येथे असणाऱ्या पाझर तलावाची पाणीपातळी खालावल्याने तलावाला लागून असलेल्या विहिरीचे पाणी आटले आहे. या विहिरीत होणाऱ्या पाणीसाठ्यावर गावाला आठवड्यातून एकवेळ पाणीपुरवठा सुरू आहे. तोही तोकडा ठरतोय. गावाला जिल्हा परिषद पेयजल योजनेतून एक कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर असून, या योजनेचा पहिला टप्पा ठेकेदाराने पूर्णही केला आहे. परंतु त्याचे बिल अद्याप या ठेकेदारला मिळालेले नाही. परिणामी ही योजना ग्रामस्थांसाठी मृगजळ ठरली आहे.

या गावाला लागूनच काही अंतरावरील सुपात्रे गावात पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले आहे. येथील कूपनलिका जमिनीतील पाणीपातळी खोलवर गेल्याने कोरड्या पडल्या आहेत. पाणी मिळेल त्या दिशेने भटकंती करून येथील जनता आपली तहान भागवत आहे, तर भाडळे येथील गावतलाव व विहीर पाण्याअभावी कोरडी पडली आहेत. सध्या कडवी नदीतून शेतीसाठी उचललेल्या पाण्यावर या गावाला आपली तहान भागवावी लागत आहे.

भाडळे, खुटाळवाडी, सुपात्रे, डोणोली तसेच पन्हाळा तालुक्यातील आवळी या महामार्गालगतच्या गावांतील जनावरांसाठी व महिलांना कपडे धुण्यासाठी खुटाळवाडीचा पाझर तलाव वरदान ठरतोय. पण तोही आटत चालला आहे.

पाणीटंचाईसंदर्भात गोगवे गावास भेट दिली असता येथे पाण्याचे दुर्भिक्ष जाणवले. येथे असणाऱ्या सुमारे आठ-दहा विहिरी पूर्णपणे आटल्या आहेत. त्यामुळे येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी दाहीदिशा भटकावे लागत आहे. येथील उसाची शेती पूर्ण वाळून गेली आहे. सायकलवरून पाणी आणण्यासाठी चाललेल्या गृहस्थास पाणीटंचाईसंदर्भात छेडले असता पहिल्यांदाच अशी परिस्थिति उद्भवल्याचे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नकोशी’ चीहोणार डीएनए टेस्ट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शुक्रवार पेठेतील ऋणमुक्तेश्वर भाजी मंडई परिसरात गुरूवारी (ता. १९) सापडलेल्या नवजात मुलीच्या निर्दयी माता-पित्याचा शोध पोलिसांनी घेतला आहे. या दोघांनीही मुलगी सोडल्याची कबुली दिली असली तरीही, नवजात मुलीसह तिच्या माता-पित्याची डीएनए टेस्ट करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. लवकरच या तिघांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी मुंबईला पाठवण्यात येणार आहेत.

सहा अपत्यांमध्ये पाचवी मुलगी झाल्याने गरिबीमध्ये तिचा सांभळ करणे कठीण हेईल या भीतीने सदर बाजार येथील हसिना आणि तिचा पती रशिद सय्यद या दोघांनी पोटच्या नवजात मुलीला सोडून दिल्याची कबुली पोलिसांत दिली. या दोघांनाही पोलिसांनी अटक करून शनिवारी (ता. २१) जिल्हा व सत्र न्यायालयासमोर हजर केल्यानंतर त्यांना जामीन मंजूर झाला आहे. सय्यद दाम्पत्याने गुन्ह्याची कबुली देत ती मुलगी आपलीच असल्याचे सांगितले असले तरीही, या तिघांचे नाते स्पष्ट करण्यासाठी पोलिसांनी तिघांच्याही रक्ताची डीएनए टेस्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच या तिघांच्या रक्ताचे नमुने मुंबई येथील प्रयोगशाळेत पाठवले जाणार आहेत. डीएनए टेस्टच्या अहवालानंतर पोलिसांना कोर्टात सय्यद दाम्पत्यानेच नवजात मुलीला मृत्यूच्या दाढेत सोडल्याचे सिद्ध करण्यास मदत होणार आहे.

दरम्यान, हसिना आणि रशिद सय्यद या दोघांना जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. नवजात मुलीची प्रकृती खालावल्याने तिला 'बालकल्याण' चे कर्मचारी आणि सीपीआर प्रशासनाने अतिदक्षता विभागात हलवले होते. रक्तदाब कमी झाल्याने आणि इन्फेक्शनमुळे तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार करावे लागले. रविवारी तिच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे सीपीआरमधील डॉक्टरांनी सांगितले. जामिन मिळाल्यानंतर हसिना सय्यद ही मुलीला भेटण्यासाठी सीपीआर रुग्णालात गेली होती, मात्र मुलीचे इन्फेक्शन वाढण्याच्या भीतीने डॉक्टरांनी तिला जास्तवेळ आईकडे सापवले नाही. सध्या सीपीआरमधील डॉक्टर्स, नर्स आणि 'बालकल्याण'मधील महिला कर्मचारी तिच्या प्रकृतीची काळजी घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वर्कशॉप’मधील खाबुगिरी जोरात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या वाहनांची देखभाल आणि दुरूस्तीचा सारा भार हा वर्कशॉपवर आहे. मात्र या विभागातील खाबूगिरीमुळे महापालिकाच पंक्चर होण्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. वाहनांची देखभाल, दुरूस्तीच्या कामापेक्षा या विभागातील अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार, टक्केवारी आणि अव्वाच्या सव्वा दराने केली जाणारी खरेदी यामुळे हा​ विभाग चर्चेत आहे. या विभागातील अधिकाऱ्यांच्या कामकाजाचे कारमाने आता उजेडात येऊ लागली आहेत. प्रशासनाकडून कानाडोळा होत असल्यामुळे जनतेच्या पैशाची मात्र लूट सुरू झाली आहे. महापालिका सभागृहाने वर्कशॉपमधील तीन कोटीच्या व्यवहाराचा हिशोब लागत नसल्याचे सांगत या विभागातील खाबूगिरी चव्हाट्यावर आणली आहे.

दुरूस्ती करूनही ट्रॅक्टर जाग्यावरच

केएमसीकडे जवळपास १५३ वाहने आहेत. मात्र त्यापैकी ४० वाहने बंद अवस्थेत आहेत. वर्कशॉपमध्ये अनुभवी कर्मचारी वर्ग आहे. मात्र येथील अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे तांत्रिक विभागातील कर्मचारी टायर विभागात आ​णि टायर विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या दुरूस्ती विभागात झाल्या आहेत. यामुळे वाहनांची देखभाल दुरूस्तीची कामे सक्षमपणे होत नाहीत. वर्कशॉपमध्ये २५ वर्षापूर्वीचा एक ट्रॅक्टर आहे. हा स्क्रॅप ट्रॅक्टर दुरूस्त करण्याची आवश्यकत नव्हती. मात्र एका अधिकाऱ्याने स्क्रॅपमध्येही अर्थ शोधला आणि ट्रॅक्टर दुरूस्तीची टूम काढली. दहा ते बारा हजार रुपयेची दुरूस्ती करून त्याचे बिल ५० हजार रुपयापर्यंत दाखविले. दुरूस्त करून आणल्यानंतर ट्रॅक्टर आठ दिवसातच तो बंद पडला. या विभागातर्फे सायकल रिक्षा खरेदी करण्यात आली. १२ हजार रुपये सायकल रिक्षा खरेदीचा प्रस्ताव आणि त्यावर दुरूस्तीचा खर्च सात हजार रुपये इतका दाखवला आहे. फक्त सायकल रंगवून दुरूस्तीचे लेबल चिकटवण्यात आले.

खाबूगिरीला चाप कधी ?

अनेकदा आवश्यक नसलेले स्पेअर पार्टस मर्जीतल्या दुकानदारांकडून तयार करून घेतले जातात. बूम गाडीचा गिअर चालू स्थितीत असतानाही, ६५ हजार रुपये खर्च दाखवून नवीन विकत घेतला. टायर रिमोल्डींग, स्पेअर पार्टस खरेदीच्या निविदेतही खाडाखोड करून मर्जीतल्या ठेकेदारकडून खरेदी व्हावी यासाठी आटापिटा केला. खरेदी, दुरूस्ती अशा प्रत्येक कामात टक्केवारशिवाय कामे होत नाहीत. कचरा कंटनेर आणि खरेदी वादग्रस्त ठरली आहे. खरेदी इतकाच दुरूस्तीचा खर्च असा अजब प्रताप या विभागाने केला आहे. आयुक्तांनी या विभागातील अनागोंदी कारभाराची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. प्रशासनाकडून वर्कशॉपमधील खाबूगिरीला चाप बसला तर महापालिकेचा पैसा वाचणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images