Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

सांगली जिल्ह्यात अवघे दोन टक्के पाणी

$
0
0

सांगली : सांगली जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांत अवघे दोन टक्के पाणी शिल्लक आहे. चांदोली धरणातील पाण्यातही घट झाली आहे. येत्या काही दिवसांत वळीव पावसाने हात न दिल्यास दुष्काळाची स्थिती आणखी भीषण होण्याची शक्यता आहे.
सध्या १७० गावांत १५६ टँकरद्वारे पाणी दिले जात आहे. दुष्काळाची तीव्रता वाढल्यास पलूस, मिरज तालुके वगळता सर्व तालुक्यांत टँकरने पाणीपुरवठा करावा लागेल. जत तालुक्यांत ७८ गावे आणि ६४० वाड्यांना ८६ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. माडग्याळ येथे चारा छावणी सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे; पण जनावरांची संख्या अद्याप अपेक्षेइतकी वाढलेली नाही असे सांगण्यात आले. खरिपाची ३६३ गावे दुष्काळी म्हणून जाहीर झाली आहेत. जिल्ह्यातील ८४ लघु प्रकल्पातील पाणीसाठा वेगाने कमी होत आहे. पाच मध्यम प्रकल्पांत केवळ २ टक्के इतकाच उपयुत्त पाणीसाठा शिल्लक आहे.
कोयना धरणात १९ टक्के व वारणा (चांदोली) धरणात २२ टक्के पाणीसाठा (टीएमसीमध्ये) शिल्लक आहे. जिल्ह्यातील यंदा उन्हाने अक्षरश: कहर केला असून लोक हतबल झालेले दिसतात. उन्हाळ्याच्या झळा सोसवत नाहीत. सकाळी ११ ते सायंकाळी ५ पर्यंत लोक सहसा घराबाहेर पडत नाहीत, अगदी महत्वाचे कामच असेल तर नाईलाजाने जातात. सांगलीकरांनी आजवर अनेक उन्हाळे पाहिले, पण यंदाचा उन्हाळा सर्वापेक्षा अधिक आहे. अद्याप चांगला उन्हाळी पाऊसही झाला नाही.

टंचाईच्या फेऱ्यात

- १७० गावे आणि ११५० वाड्या
- ३,६१, २०९ लोक
- १५६ टँकर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बालसंरक्षण योजना धोक्यात

$
0
0

Janhavi.Sarate @timesgroup.com

कोल्हापूर ः तीन वर्षांचा करार संपल्यामुळे एकात्मिक बालसंरक्षण योजनेतील कर्मचाऱ्यांना काम बंद करण्याचे तोंडी आदेश देण्यात आले आहेत. त्यात राज्यातील ५८ तर कोल्हापुरातील ३ कामगारांचा समावेश आहे. महिला व बालविकास आयुक्तांनी हे आदेश दिले. त्यामुळे एकात्मिक बालसरंक्षण योजना राबविल्या जाणाऱ्या कार्यालयांना टाळे लागल्यामुळे निराधार बालकांचे भविष्य अंधारात आहे.

केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या सहभागातून २०१०-११ रोजी बालसंरक्षण योजनेची सुरुवात करण्यात आली. ही योजना कंत्राटी पद्धतीने सुरू करण्यात आली आहे. या योजनेतील राज्य आणि जिल्हास्तरावरील सर्व अधिकारी व कर्मचारी कंत्राटी पद्धतीने कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून प्रभावी काम केल्यानंतर केंद्र सरकारकडून आलेली रक्कम या कंत्राटी अधिकाऱ्यांकडून खर्च होते. नियमित कर्मचारी व अधिकाऱ्यांशिवाय ही रक्कम खर्च होत असल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांवर अप्रत्यक्ष अविश्वास दाखवला जात आहे. त्यामुळे त्यांना तांत्रिक बाबी पुढे करून कामावरून कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

गेल्या तीन वर्षांपासून प्रामाणिकपणे काम करणाऱ्या राज्यातील ३५ जिल्ह्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी अशा एकूण १४७ पैकी ५८ कर्मचाऱ्यांची मुदत जानेवारी २०१६ मध्ये संपली आहे. त्यांना एप्रिल महिन्यांपर्यंत मानधनही दिलेले नाही. निरीक्षणगृह कर्मचाऱ्यांचे गेल्या चार महिन्यांचे वेतनही थकले आहे.

या योजनेच्या माध्यमातून जिल्हा बाल संरक्षण समिती, तालुका बालसंरक्षण समित्या, ग्राम बाल संरक्षणस समित्या, जिल्ह्यातील बालकांशी संबंधित कार्य करणाऱ्या विविध यंत्रणेशी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला जातो. या योजनेतून बालविवाह, बालकांवरील लैंगिक अत्याचार, बालकामगार, रस्त्यावर फिरणारी मुले, कुमारीमाता, दत्तक प्रकरण, बेटी बचाओ अभियान, विधी संघर्षग्रस्त बालके, भिक्षेकरी, अनाथ, एक पालक बालके, बेघर अशा बालकांच्या समस्या सोडविण्याचे तसेच पुर्नवसनाचे काम केले जाते. त्यामुळे भविष्यात ही योजना राबविली जाणार की, केवळ कागदावर राहणार, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.

मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार?

योजना सुरु झाल्यानंतर केंद्र सरकारकडून फर्निचरसाठी ३ लाख, कम्प्युटर, वेब कॅमसाठी २ लाख २५ हजार, वर्षाला जागेचे भाडे म्हणून १ लाख ८० हजार, पुनर्वसनासाठी ४ लाख अशा विविध कामासाठी एका जिल्ह्यासाठी निधी दिला गेला. मात्र राज्य सरकारकडून तो ‌जिल्हा बालसंरक्षण योजनेच्या कार्यालयापर्यंत पोहचलाच नाही. एका जिल्ह्यासाठी मोठ्या प्रमाणात आलेली रक्कम पोहचलीच नसेल तर राज्यात हा कोट्यवधींचा गैरव्यवहार होत असल्याचे अधोरेखित होते.

१२ जणांची नेमणूक, भरली ३ पदे

कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यात प्रत्येक ठिकाणी १२ कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र कोल्हापुरात तीन लोकांची नियुक्ती करुन केंद्राकडे १२ जणांची नियुक्ती केल्याचे दाखविण्यात आले असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे जादा कर्मचारी दाखवून निधी लाटण्याचा प्रकार दिसून येतो.

................

या योजनेंतर्गत राज्यात १४७ कर्मचारी काम करत आहेत. त्यांपैकी ५८ कर्मचाऱ्यांना काम थांबविण्याचे तोंडी आदेश आयुक्तांनी दिले आहेत. त्यामुळे कोल्हापुरात गेल्या तीन वर्षांपासून तिघांची मुदत संपल्यामुळे जोपर्यंत मार्गदर्शन येत नाही तोपर्यंत काम थांबविले आहे. त्याचवेळी कार्यक्रम व्यवस्थापकांनी काम सुरु ठेवावे, असे सांगितल्यामुळे संभ्रमावस्था आहे.

शकील शेख, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी, कोल्हापूर

.............

तीन वर्षांपासून स्वतंत्र कार्यालय किंवा साहित्य दिले नाही.

गाइडलाइननुसार नियुक्ती किंवा मानधन नाही.

केंद्राकडून आलेला निधी राज्य सरकारकडून वितरित केला जात नाही.

०००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृष्णा खो‍ऱ्याला कोयनेचा दिलासा

$
0
0

राम जगताप, कराड

कृष्णा खोऱ्यातील शेतकऱ्यांची सिंचनासाठी पाण्याची मागणी पूर्ण होण्याची चिन्हे आहेत. कोयना धरणातील वीजनिर्मितीसाठी राखीव पाण्यात १५ अब्जघनफूट (टीएमसी) कपात केली आहे. तेच पाणी पिण्याबरोबरच सिंचनासाठीही उपलब्ध होणार आहे. कर्नाटकसाठी कोयना धरणातून २३ एप्रिलपासून दोन टीएमसी पाणी सोडण्यात आले. ११ मे रोजी पाणी सोडणे थांबविण्यात आले. सध्या धरणात १८.४४ टीएमसी साठा आहे. मात्र पश्चिमेकडील वीजनिर्मितीच्या साठ्यात १५ टीएमसी कपात केल्याने ते ३१ मेपर्यंत पिण्यासह सिंचनासाठीही वापरता येणार आहे. कोयना व्यवस्थापन विभागाचे उपकार्यकारी अभियंता एम. सी. पठाण यांनी ही माहिती दिली. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

पावसाने दिलेली ओढ व वीजेसह सिंचन व पिण्यासाठी पाण्याची होत असलेली वाढती मागणी यामुळे कोयना धरणातील पाणी पातळीत कमालीची घट झाली आहे. वाढत्या उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेऊन पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन जलसंपदा विभागाने वीजनिर्मितीसाठीच्या पुरवठ्यात पंधरा टीएमसीची कपात केली आहे. ते पाणी आता पिण्यासाठी व सिंचनासाठी वापरता येणार असल्याचे पठाण यांनी सांगितले.

ते म्हणाले, 'धरण व्यवस्थापनाने कर्नाटकसाठी २३ एप्रिल ते ११मेअखेर एकूण २.६३५ टीएमसीचा विसर्ग केला होता. यातील केवळ २ टीएम्सी एवढेच पाणी राजापूर बंधाऱ्यातून कर्नाटकासाठी सोडले होते. मात्र सातारा व सांगली या दोन जिल्ह्यांतील भीषण दुष्काळी स्थितीचा विचार करत धरणाच्या पायथा वीजगृहातून प्रतिदिन २१७८ क्युसेक्स विसर्ग सुरू ठेवला. त्यामुळे दोन जिलह्यातील लोकांची मूलभूत गरज भागविण्याचा धरण व्यवस्थापनाचा प्रयत्न सुरू आहे.'

सध्याची पाणी पातळी ६२५.३४८ मीटर आहे. १०५.२५ टीएमसी पाणीसाठ्यापैकी ६७.५० टीएमसी पाणी पश्चिमेकडील वीजनिर्मितीसाठी वापरले जाते, असे सांगून पठाण म्हणाले, 'उन्हाची तीव्रता वाढत चालल्याने जलसंपदा विभागाने पश्चिमेकडील वीजनिर्मितीसाठीच्या एकूण पाण्यापैकी १५ टीएमसीची कपात केली आहे. हे कपात केलेले पाणी पूर्वेकडील सिंचन व बिगर सिंचनासाठी वापरले जाणार आहे. सातारा,सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील लाभधारकांना त्यामुळे दिलासा मिळेल.'

पाणी वाटपाचे गेल्या १ जूनला सुरू झालेले तांत्रिक वर्ष येत्या ३१ मे रोजी संपत असल्याने धरण व्यवस्थापन विभाग वीज निर्मितीसाठी अद्यापही ३.७४ टीएमसी पाणी देऊ शकतो.

१८.४४ टीएमसी

सध्याचा साठा

५ टीएमसी

मृत साठा

१३.३२

उपयुक्त साठा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमानतळ विस्तारीकरणाला ब्रेक

$
0
0

satish.ghatage@timesgroup.com

सतीश घाटगे, कोल्हापूर

नाइट लँडिंगसाठी मोठ्या धावपट्टीची गरज असल्याचा खुलासा डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनच्या तांत्रिक समितीने केला असल्याने विमानतळ विस्तारीकरणासाठी जमीन हस्तांतरित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला प्रयत्न करावे लागणार आहेत. दहा हेक्टर जमीन हस्तांतरासाठी गडमुडशिंगी ग्रामपंचायतीचे दोन ठराव आवश्यक असल्याने विमानतळ विस्तारीकरणाच्या किल्ल्या गडमुडशिंगीकरांच्या हातात आल्या आहेत. गावकऱ्यांचे मन वळवण्यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासनातील अधिकाऱ्यांना जादा प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यामुळे साहजिकच विस्तारीकरणाला तूर्त ब्रेक लागणार आहे.

वनखात्याच्या अखत्यारीतील दहा हेक्टर जमिनीमुळे विमानतळ विस्तारीकरण रेंगाळले आहे. ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत उजळाईवाडी विमानतळावर नाइट लँडिंगची सोय व्हावी यासाठी राज्य सरकारने तीन महिन्यांपूर्वी प्रयत्न सुरू केले होते. नाइट लँडिंगमुळे छोटी विमाने रात्री उतरण्याची सोय होणार होती. भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाकडे नाइट लँडिंगसाठी राज्य सरकारने पत्रव्यवहार सुरू केला होता. तसेच नाइट लँडिंगच्या सर्व सोयींसाठी सव्वातीन कोटींचा निधी मंजूर केला आहे. प्राधिकरणाच्या परवानगीनंतर नाइट लँडिंगसाठी अत्यावश्यक यंत्रणा उभारण्यात येणार होती. विमानतळ सुरू करण्यासाठी डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनचे लायसन गरज होती. पण नाईट लँडिंगसाठीसाठी मोठी धावपट्टी आवश्यक असल्याचे मत डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिऐशनच्या तांत्रिक समितीने स्पष्ट केल्याने नाईट लँडिंगचा मुद्दा मागे पडला आहे. त्यामुळे जमीन हस्तांतरनासाठी जिल्हा प्रशासनाला पावले उचलावी लागणार आहेत.

गडमुडशिंगीच्या हद्दीत वनखात्याची दहा हेक्टर जमीन आहे. वनखात्याला गडमुडशिंगीच्या जागेऐवजी पर्यायी शाहूवाडीतील जागा देण्याचा प्रस्ताव तयार झाला आहे. दहा हेक्टर जागेसाठी गडमुडशिंगी ग्रामसभेचे दोन प्रस्ताव आवश्यक आहेत. त्यात वनहक्क कायद्याखाली कुणीही तक्रार केलेली नाही, असा एक प्रस्ताव आहे. वनहक्क कायद्याखाली अशी कुणाचीही तक्रार नसल्याने हा ठराव मंजूर होऊ शकतो. तसेच १० हेक्टर जागा देण्यासाठी गडमुडशिंगी ग्रामसभेचा पाठिंबा आवश्यक आहे. हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी प्रशासनाला प्रयत्न करावे लागणार आहेत.

गडमुडशिंगी ग्रामस्थांनी १० हेक्टर जागेचा ठराव मंजूर करून द्यावा यासाठी आमदार अमल महाडिक व जिल्हा प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. यापूर्वी गडमुडशिंगी गावातील जमीन रेल्वे, राष्ट्रीय महामार्गासाठी प्रशासनाने ताब्यात घेतली आहे. तसेच हे गाव पुनर्वसित केले असल्याने पुनर्वसनाची प्रक्रिया प्रशासनाने योग्यरितीने हाताळली नसल्याने ग्रामस्थांकडून जमीन हस्तांतरणास विरोध होण्याची शक्यता आहे. तो होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाने तातडीने पावले उचलण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे.

विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी जमीन आवश्यक आहे. त्यासाठी गडमुडशिंगीचा ठराव आहे. गावकऱ्यांच्या ज्या तक्रारी आहेत त्याचे निरसन करण्याची ग्वाही जिल्हा प्रशासनाने दिली आहे. ठराव झाल्यानंतर प्रक्रिया वेगाने होईल.

डॉ. अमित सैनी, जिल्हाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोयना परिसराला भूकंपाचा सौम्य धक्का

$
0
0

म. टा. वृत्तसेवा,कराड

कोयना धरण परिसरात बुधवारी (ता.१८) संध्याकाळी भूकंपाचा सौम्य धक्का बसला. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ४.४ नोंदली गेली. या धक्क्याने सातारा जिल्ह्यासह कोयना धरण परिसर, शिराळा, चिपळूण, संगमेश्वर व खेड तालुके चांगलेच हादरल्याने परिसरात काही काळ घबराट पसरली. मात्र भूकंपामुळे धरणाला कोणताही धोका पोहोचला नसून धरण पूर्णपणे सुरक्षित असल्याचा निर्वाळा कोयना धरण व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता ज्ञानेश्वर बागडे यांनी सायंकाळी दिला आहे.

भूकंपाचा केंद्रबिंदू धरणाच्या दक्षिणेकडे ११.२ किमी अंतरावरील गोशटवाडीपासून आग्नेयेला ६ किलोमीटरवर व धरणापासून १८.८ किलोमीटर अंतरावर होता. भूकंपाची खोली ९ किलोमीटर इतकी होती. सायंकाळच्या सुमारास भूकंप झाल्याने सर्व लोक घराबाहेर पडले. धक्क्यामुळे काहींच्या घरातील भांडी पडली. कोयनेसह पाटण, कराड परिसरात या धक्क्याची तीव्रता जास्त जाणवल्याने अनेक गावांतील लोक चौका-चौकांत जमा झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीटभट्टी मजुरांना कामगारांचा दर्जा द्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वीटभट्टी मजुरांना कामगारांचा दर्जा देण्यात येऊन सरकारच्या सर्व योजनांचा लाभ द्यावा, यांसह अनेक मागण्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या नेतृत्वाखाली वीटभट्टी कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांना यावेळी निवेदन देण्यात आले.

टाउन हॉलमधून आरपीआयचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रा. शहाजी कांबळे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा सुरू झाला. शहरातील प्रमुख मार्गावरून मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. यावेळी रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. वीटभट्टीवरील सर्व मजुर कुटुंबियांचा दारिद्र्य रेषेखालील यादीत समावेश करा. वीटभट्टीवर काम करणाऱ्या मजुरांच्या कुटुंबांचा विमा उतरावा. मजुरांच्या मुलांच्या शिक्षण व आरोग्याची जबाबदारी सरकारने घ्यावी. महिला व लहान मुलांना अंगणवाडीतून पोषण आहार देण्यात यावा. वीटभट्टीची रॉयल्टी माफ करावी. रॉयल्टीतील रक्कमेचा वापर मजूरांच्या मुलांच्या आरोग्य, शिक्षण व निवाऱ्यावर खर्च करावा. वीटभट्टी मालकाकडून एक हजार विटानंतर १०० विटा मोफत असा अलिखित नियम रद्द करून विटांची मजुरी द्यावी अशा मागण्या केल्या. शिष्टमंडळात रूपा वायदंडे, सर्जेराव कांबळे, भागोजी कांबळे, वर्षा कांबळे यांच्यासह कार्यकर्त्यांचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सलग दुसऱ्या दिवशीही चोऱ्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कारंडे मळा परिसरातील एक घर आणि शाहूपुरीच्या दुसऱ्या गल्लीतील कॉम्प्युटर विक्री दुकानातून अज्ञात चोरट्यांनी पावणे तीन लाखंचा मुद्देमाल लंपास केला. शहरात सलग दुसऱ्या दिवशी चोऱ्यांचे सत्र सुरूच राहिल्याने नागरिकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.

कारंडेमळा परिसरातील बाळासाहेब पाटील (वय ५२, रा. कासारीकर हाऊस, सहजीवन परिसर) हे गुरुवारी (ता. १९) सकाळी सातच्या सुमारास सायकलिंगसाठी घराबाहेर गेले. त्यांच्या पत्नीही मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर होत्या. पाटील यांची मुलगी आणि तिच्या दोन मावसबहिणी घरात झोपल्या असता, अज्ञात चोरट्यांनी घरातून सोन्याचा हार, तोडे, मंगळसूत्र, कानातील टॉप्स, अंगठी असा दोन लाख तीस हजारांचा मुद्देमाल लंपास केला. पाटील घरी परतल्यानंतर त्यांना चोरीचा प्रकार लक्षात आला. त्यांनी शाहूपुरी पोलिसात फिर्याद दिली.

दरम्यान, शाहूपुरी दुसऱ्या गल्लीतील अॅक्टिवेक्स कॉम्प्युटर या दुकानाचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी बुधवारी रात्री दोन लॅपटॉपसह ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. दुकानमालक सलीम रसूल महालकरी (वय ३९, रा. मंडलिक गल्ली, मंगळवार पेठ) यांनी शाहूपुरी पोलिसात फिर्याद दाखल केली. तत्पूर्वी बुधवारी टाकाळा परिसरातील पाच ठिकाणी चोरट्यांनी घरफोड्या केल्या होत्या. सलग दुसऱ्या दिवशी चोऱ्यांचे सत्र सुरू राहिल्याने पोलिसांसमोर चोरट्यांना पकडण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेसमध्ये दुफळी कायम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विधानपरिषद निवडणूक आणि जिल्हाध्यक्ष पदावरून काँग्रेसमध्ये सुरू असलेला संघर्ष अजूनही शमलेला नसल्याची प्रचिती गुरूवारी आली. दुष्काळ आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या अनुषंगाने जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांच्या पुढाकाराने मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याकडे माजी खासदार कल्लाप्पाणा आवाडे, आमदार सतेज पाटील, माजी आमदार प्रकाश आवाडे, भरमूआण्णा पाटील, दिनकरराव जाधव आदींनीही पाठ फिरवली. आमदार पाटील गटाचे म्हणून ओळखले जाणारे जिल्हा परिषद सदस्य, महापालिकेच्या महापौर व नगरसेवकही मेळाव्याकडे फिरकले नाहीत.

जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडीवरून आमदार सतेज पाटील, माजी खासदार आवाडे यांच्या विरोधात जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील गट असे चित्र उभे राहिले. विधान परिषदेच्या निवडणुकीतही या नेत्यांतील धुसफूस गाजली. निवडणुकीनंतरही जिल्हा काँग्रेसमधील नेते एकत्र नसल्याचे सामोरे आले आहे. त्यांच्यामध्ये आजही गटातटाचे आणि शह काटशहाचे राजकारण सुरू असल्याची चर्चा कार्यकर्त्यांत आहे. शेतकऱ्यांच्या समस्याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आणि दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना १०० टक्के कर्जमाफी मिळावे यासाठी राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाची दिशा आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी काँग्रेस कमिटीत मेळावा झाला.

जिल्हाध्यक्ष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मेळावा झाला. मेळाव्याला जिल्हाध्यक्ष पाटील यांचे समर्थक मानले जाणारे पदाधिकारी गोकुळच्या संचालकांची उपस्थिती होती. माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे समर्थक, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य असणाऱ्या सदस्यही मेळाव्याला होते. मात्र आमदार सतेज पाटील, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, प्रकाश आवाडे मात्र मेळाव्याला नव्हते. आमदार पाटील यांचे समर्थक म्हणून ओळखल्या जाणारे महापालिका व जिल्हा परिषदेतील सदस्यही मेळावा व जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देताना उपस्थित नव्हते.

एकाचवेळी दोन कार्यक्रम

काँग्रेस कमिटीत मेळावा सुरू असताना महापालिका आणि सतेज डी. पाटील फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रेन वॉटर हार्वेस्टींग कार्यशाळा केशवराव भोसले नाट्यगृह येथे सुरू होती. आमदार पाटील, महापौर, नगरसेवक हे सगळे कार्यशाळेला हजर होते. यामुळे या गटाचे समर्थक काँग्रेसच्या कार्यक्रमाला आले नसल्याची चर्चा होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


समीरवर आरोप निश्चिती शक्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येतील खटल्याची सुनावणी शुक्रवारी (ता. २०) जिल्हा कोर्टात होणार आहे. संशयित आरोपी समीर गायकवाड याच्यावर आरोप निश्चितीच्या प्रक्रियेला सुरूवात होण्याची शक्यता आहे. जिल्हा कोर्टासह हायकोर्ट आणि सुप्रिम कोर्टानेही आरोप निश्चितीबाबत हिरवा कंदिल दिल्याने आरोप निश्चितीच्या प्रक्रियेस सुरूवात होण्याची शक्यता आहे, तर तपास अधिकारी एस. चैतन्य यांच्या बदलीनंतर नवीन तपास अधिकाऱ्यांची अद्यापही नियुक्ती झालेली नाही.

पानसरे हत्येतील संशयित आरोपी समीर गायकवाड याच्यावर आरोप निश्चितीची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश जिल्हा कोर्टाने दिले होते. मात्र यातील हायकोर्टाचे मॉनिटरिंग आणि अपूर्ण तपासामुळे आरोप निश्चितीची घाई होऊ नये, असा अर्ज पानसरे कुटुंबीयांनी सुप्रिम कोर्टात दाखल केला होता. हायकोर्टासह सुप्रिम कोर्टाने आरोप निश्चितीसाठी हिरवा कंदिल दिल्याने शुक्रवारी जिल्हा कोर्टातील सुनावणीदरम्यान आरोप निश्चितीच्या प्रक्रियेला सुरूवात होऊ शकते. दरम्यान, तपास अधिकारी एस. चैतन्य यांची धुळे जिल्हा पोलिस अधीक्षकपदी बदली झाल्याने ते धुळे येथे रुजू झाले आहेत. तपास अधिकाऱ्यांचे पद अद्यापही रिक्त असल्याने पोलिसांसमोर अडचण निर्माण झाली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी गुरुवारी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली.

चर्चा संशयितांच्या अटकेची

दरम्यान, दोन संशयितांना कर्नाटक पोलिसांनी ताब्यात घेतल्याची चर्चा गुरूवारी दिवसभर सुरू होती. याबाबत पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे याच्याशी संपर्क साधला असता, 'अजूनपर्यंत कोणत्याही संशयिताला ताब्यात घेतलेले नाही. तपास योग्य दिशेने सुरू आहे. कोल्हापूर आणि कर्नाटक पोलिस आणि एटीएस यांच्याकडून एकत्रित तपास सुरू आहे. तपास यंत्रणांमध्ये समन्वय आहे. या संवेदनशील प्रकरणात कोणीही अफवा पसरवू नयेत', असे आवाहन देशपांडे यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बॅडमिंटन कोर्ट वाचवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कपिलतीर्थ मार्केटमधील बॅडमिंटन कोर्टची जागा श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टला देऊ नये. नगरसेवकांनी खेळाडूंच्या हिताचा विचार करून बॅडमिंटन कोर्टची जागा अन्नछत्रला देण्याचा डाव हाणून पाडा आणि कोर्ट वाचवावा अशी साद बॅडमिंटन कोर्ट बचाव समितीने केली आहे. शुक्रवारी महापालिकेची सर्वसाधारण सभा होणार असून यामध्ये बॅडमिंटन कोर्टची जागा अन्नछत्रला देण्याचा ठराव मंजुरीसाठी मांडला आहे.

महापालिकेने यापूर्वी कपिलतीर्थ मार्केटमधील हॉलची निम्मी जागा अन्नछत्रासाठी दिली आहे. अन्नछत्राचा बॅडमिंटन कोर्टसाठी अट्टाहास का ? अशी विचारणा कोर्ट बचाव कृती समितीचे संभाजी साळुंखे, महेश उरसाल, प्रकाश सरनाईक, प्रसाद जाधव, सुनील पाटील यांनी केली आहे. महापालिका आणि अन्नछत्र यांच्यामध्ये झालेल्या यापूर्वीच्या करार आणि अटीचा संस्थेने भंग केला आहे. महापालिकेने वापरावयास दिलेल्या जागापेक्षा अधिक जागा अन्नछत्र संस्थेने वापरला आहे. इमारतीतील स्वच्छतागृह व संडासगृह पाडून त्या जागेवर संस्थेचे कार्यालय थाटले आहे. कपिलतीर्थ मार्केट येथे विना परवाना चप्पल स्टँड उभे करून भाविकांकडून पैसे वसूल केले जात आहेत. श्री महालक्ष्मी धर्मशाळेजवळ विना परवाना खोदकाम केले आहे. मोफत अन्नछत्राच्या नावाखाली महापालिकेची जागा स्वमालकीची असल्याप्रमाणे वापर सुरू आहे. आयुक्तांनी या प्रकरणी लक्ष घालून संस्थेच्या बेकायदेशीर कामाची चौकशी करावी अशी मागणी कृती समितीने केली आहे.

महापालिकेने दिलेल्या जागेतच अन्नछत्र सुरू आहे. जादा जागा वापरली जात नाही. कुणीही मोघम आरोप करू नयेत. महापालिकेशी झालेल्या नियमांचा कुठेही भंग केला नाही. भक्तांच्या सोयीसाठी पार्किंगच्या ठिकाणी चप्पल स्टँड उभारले आहे. भाविकाकडून पैसे घेतले जात नाहीत. स्वच्छतागृह व शौचालय विनावापरा पडून होते.

- राजू मेवेकरी, संस्थापक अध्यक्ष, अन्नछत्र सेवा ट्रस्ट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जेटिंग मशिन खरेदीत अफरातफरीची चर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या वर्कशॉप विभागातील अनागोंदी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. जे​टिंग मशिन खरेदीत अधिकाऱ्यांनी अफरातफार केली आहे. अ​धिकाऱ्यांनी संगनमत करून ढपला पाडल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे. वर्कशॉपमधील अधिकाऱ्यांचे कामकाज आ​णि वाहनांची देखभाल, दुरूस्ती नेहमीच वादग्रस्त ठरले आहे.

कचरा कंटेनर खरेदी, कंटेनरची दुरूस्ती, स्पेअर पार्टची खरेदी, महापालिकेच्या वाहनांची वर्कशॉपमध्ये दुरूस्ती न करता बाहेर पाठविणे यावरून या विभागातील अधिकाऱ्यांच्या कामकाजाला आक्षेप घेण्यात आले होते. स्पेअर पार्ट खरेदी आ​णि वाहनांच्या देखभाल दुरूसीत प्रत्येक ठिकाणी टक्केवारी घेतली जात आहे. कंटेनर खरेदी इतकाच कंटेनर दुरूस्तीचा खर्च विभागातील अधिकाऱ्यांनी दाखविला होता. मर्जीतील ठेकेदार नेमून महापालिकेची आर्थिक लूट सुरू आहे. वाहनांच्या दुरुस्तीवर लाखो रुपये खर्च दाखविले जात आहेत.

वर्कशॉपमधील अधिकाऱ्यांच्या कामकाजावरून गटनेत्यांकडे काहींनी तक्रारी केल्या आहेत. आयुक्त, अतिरिक्त आयुक्त यांच्याकडे या विभागातील कामकाजाबद्दल तक्रारी करण्यात आल्या होत्या. महापालिकेच्या सभागृहातही या प्रश्नी जोरदार चर्चा झाली होती. मात्र वर्कशॉपमधील काही अधिकाऱ्यांवर वरिष्ठांची इतकी मेहेरनजर का? अशी प्रश्न सदस्य उपस्थित करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवजात मुलगी सोडली कॅरीबॅगमधून कट्ट्यावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गुरूवारी (ता. १९) सकाळी सातच्या सुमारास शुक्रवार पेठेतील भाजी मंडई परिसरात नवजात अर्भक आढळले. नागरिकांनी दिलेल्या माहितीनंतर लक्ष्मीपुरी पोलिसांनी तातडीने नवजात मुलीस उपचारासाठी सीपीआर रुग्णालात दाखल करण्यात आले. तिला सोडून जाणाऱ्याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

शुक्र‍वार पेठेतील भाजी मंडई परिसरात सलिम इस्माइल शेख यांचे घर आहे. गुरुवारी पहाटे त्यांच्या घराबाहेरील कट्ट्यावर अज्ञाताने स्त्री जातीचे अर्भक कापडात गुंडाळून प्लास्टिकच्या कॅरीबॅगमध्ये ठेवले होते. सकाळी साडेसहाच्या सुमारास सलिम यांची आई जमिला शेख यांना अर्भक आढळल्यानंतर त्यांनी घरातील इतरांना याची माहिती दिली. अर्भकाच्या रडण्याच्या आवाजाने परिसरातील लोक जमा झाले. नागरिकांनी याबाबत लक्ष्मीपुरी पोलिसांना कळवल्यानंतर पोलिसांनी तातडीने धाव घेऊन नवजात अर्भकास उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले. मुलीचे वजन अडीच किलो असून, जन्मल्यानंतर काही तासातच सोडून दिल्याचा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला. याबाबत बालकल्याण समितीलाही माहिती दिल्याचे पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ठेच लागली तरी झेप घ्या...

$
0
0

Aunradha.Kadam
@timesgroup.com

आयुष्यात बारावीसारख्या महत्त्वाच्या वळणावर अपयशाची ठेच लागली. नैराश्याने ग्रासलेल्या मनाने काहीकाळ खच खाल्ली. पण आई वडील आणि भाऊ यांनी पुन्हा नव्याने प्रयत्न कर, या शब्दातून दिलेला आधार त्याला उभारी घेण्याचे बळ ठरला. बारावी पास होत लॉ ची ड्रिगी मिळवली. अभ्यासाचे तंत्र आणि गोडी यांची नस सापडली आणि काही वर्षापूर्वी अपयशाने कोमेजलेल्या डोळ्यांत यूपीएससीसारख्या स्पर्धा परीक्षेचं शिखर गाठण्याचं स्वप्न आकाराला आलं. एक अपयशाची ठेच ते केंद्रीय प्रशासकीय सेवेच्या परिघात घेतलेली झेप हा प्रवास शीतल वाली या मध्यमवर्गीय कुटुंबातील एका मुलाचं आयुष्य घडवणारा ठरला. समाजाकडे पाहण्याची दृष्टी आणि समाजासाठी काम करण्याची जाणीव मला या परीक्षेच्या निमित्ताने झाली, अशा शब्दांत शीतल यूपीएससीच्या यशानंतर त्याच्या प्रवासाला जबाबदारीचा आयाम देतो. नापास झालेल्या मुलांचे खच्चीकरण करून त्यांच्या शिकण्याच्या प्रवासाला खीळ घालू नका, असे सांगत शीतल समाजातील अतिमहत्त्वाकांक्षी पालकांनाही चिमटा काढतो. ठेच लागली तरी झेप घ्या, या एका वाक्यात शीतलने खूप काही सांगितले.

०००००

मला हेच करायचे होते

मराठी माध्यमात शालेय शिक्षण, बारावीत गणित हुकलं आणि नापास झाल्याचा शेरा, त्यानंतर ऑक्टोबर वारी करून पास होत पुढे लॉ चा टफ अभ्यासक्रम झेलत मिळवलेली पदवी अशा नेहमीच्या चौकटीतच ‌शैक्षणिक प्रवास सुरू असताना मला यूपीएससीच करायचं आहे पक्कं होतं. अर्थात त्यासाठी जे कष्ट घ्यायचे आहेत ते मलाच याचीही खूणगाठ मी बांधली. आजपासून सहा वर्षांपूर्वी २०१०ला अभ्यासाला सुरुवात केली. स्पर्धा परीक्षा म्हणजे दिवसाचे आठ-दहा तास अभ्यास, शरीराचा आणि मनाचाही व्यायाम याची तयारी आलीच. त्यासाठी नियोजन केले. अनुभव काहीच नव्हता. स्पर्धा परीक्षा द्यायची आहे हे घरी सां‌गितलं आणि नेहमीप्रमाणे पाठिंबा मिळाला. स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास करायचा तर दिल्लीत क्लासेस चांगले आहेत, त्यामुळे दिल्ली गाठली. तिथे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलांना गाठलं. चांगल्या क्लासची माहिती मिळवली. क्लासचालकांना भेटलो. या यंत्रणेची काही तरी माहिती हवी आणि अभ्यासातील नेमकेपणा यावा यासाठीच हा क्लासप्रपंच मांडला. त्यावेळी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे एकेका मार्काने हुकणाऱ्या रँकसाठी धडपडणाऱ्या या स्पर्धा परीक्षेसाठी एकत्र आलेल्या मुलांमध्ये सहकार्याची भावना किती ओतप्रोत भरली आहे. जे आपल्याला माहिती आहे ते दुसऱ्याला सांगण्यासाठी इथे नेहमीच खुलेपणा आहे. अभ्यास करूनही माझे अ‌जून काहीच झाले नाही म्हणत वर्गात पहिले येणारे स्कॉरल म‌ित्र आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. त्यामुळेच हरतऱ्हेची मदत करण्यासाठी पुढे असलेल्या दिल्लीतल्या मुलांकडून, इतरांना मदत करण्याचा धडा गिरवला. दरम्यान, सलग सहा वर्षांत कधी पूर्व परीक्षेपर्यंत जायचो, तर कधी मुख्य परीक्षेपर्यंत. एक वर्ष मुलाखतीपर्यंत जाऊन आलो, पण यश आले नाही. गेल्यावर्षी पास झालो, पण रँक वाढावी यासाठी यावर्षी प्रयत्न केला. करून दाखवायचेच ही जिद्द होतीच. त्याचे फळ मिळाले.

चुकांमधून शिकत गेलो

सहा वर्षांत परीक्षा देत होतो, पण पूर्व, मुख्य आणि मुलाखत अशा तीन टप्प्यांत एकावेळी काही तरी चुकायचे. परीक्षा झाली की विचार करताना कुठे चुकलं हे लक्षात यायचे. शिवाय परीक्षा आणि अभ्यास हे इतकं ‌भिनलेलं की, या परीक्षेतील माझा निकाल काय असेल हे ताडण्याचाही एक अनुभव आला. मग त्याच अनुभवाचा वापर चुकांच्या मूल्यमापनासाठी करायचे ठरवले. प्रश्नपत्रिका संच चाळला. मुलाखतीतील प्रश्नांची दिलेली उत्तरे आठवली. सगळ्याचा एक चार्ट बनवला. पूर्वपरीक्षा क्रॅक केली, त्यावर्षी मुलाखतीत मागे पडलो होतो. त्याची कारणं शोधली. हाती येणाऱ्या कारणांचाच अभ्यास केला. जीएसमध्ये रँक वाढायला या पद्धतीचा इतका उपयोग झाला की, हा केवळ अभ्यास किंवा परीक्षेची तयारी नव्हती तर यातून मी यशाच्या अधिक जवळ जात होतो.

यूपीएससीच का निवडलं

आधी एमप‌ीएससी देऊन बघू, पास होऊन पोस्ट घेऊ आणि त्यानंतर यूपीएससीकडे वळू असा विचार करणारे मित्र माझ्याही आसपास होते, पण माझा निर्धार ठाम होता. मला असं वाटतं की, हे खूप बहुआयामी क्षेत्र आहे. माझे आई-वडीलही सरकारी नोकरदार आहेत. अशा प्रकारच्या कामातून समाजाशी जोडण्याची संधी मिळते. यूपीएससीमुळे शहरात, निमशहारात, खेड्यापाड्यात काम करण्याची संधी आहे. अधिकार देणारं हे क्षेत्र आहे. आपल्या एका सहीमुळे कुणाचे तरी आयुष्य सुकर करण्याचा आनंद या क्षेत्रातील सेवेत आहे असे मला वाटते. व्यक्ती म्हणून मला राजकारणी, संघटना, समाजसेवक यांचे विचार आवडू शकतात, पटू शकतात. मात्र, निर्णय घेताना मात्र माझ्यात तटस्थपणे सारासार विचार करण्याची क्षमता असलीच पाहिजे. आणि हेच मला करायचे आहे. त्यामुळे माझ्यासाठी ही वाट माझीच आहे असे वाटते. भविष्यात महाराष्ट्रात काम करण्याची इच्छा आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांबाबत विश्वासार्हता असणे ही देशाची ताकद आहे. त्याचा एक भाग बनून मला सेवा करायची आहे.

यूपीएससी सोपी आहे...

यूपीएसी एमपीएससीपेक्षा अवघड आहे, हा मोठा गैरसमज आहे. यूपीएससीचा अभ्यासक्रमात नेमकेपणा आहे. पाठांतरापेक्षा एखाद्या गोष्टीच्या तार्किक मताला येथे महत्त्व आहे. एखाद्या विषयावरे तुमचे मत किती लॉजिकल आहे आणि समोरच्या व्यक्तीला ठामपणे पटवून देऊ शकता याला महत्त्व आहे. इंग्रजीचाही बाऊ केला जातो, पण माझे इंग्रजीही जेमतेम आहे. पण थिंकिंग पॉवर कशी आहे यावर तुमचं मूल्यमापन होत असतं. संकल्पना समजून घेता आली पाहिजे. तुलनात्मक मांडणी करण्याचे कौशल्य सशक्त असले पाहिजे. शिवाय आपल्या बायोडाटावर आधारित आपली मुलाखत होत असते. त्यामुळे आपण स्वतःला ओळखणं या प्रवासात खूप गरजेचे असते. प्रत्येक मुद्यावर तुमचे मत हवे आणि ते मांडण्याचा आत्मविश्वास असेल तर यूपीएससी परीक्षा अवघड नाही. मात्र, अजूनही याबाबत जागृती नाही. मुलांच्या मनातील न्यूनगंडाची जागा आत्मविश्वासाने घेतली तर यश दूर नाही. मराठी मुलांमध्ये खूप टॅलंट आहे. त्यांच्या मनातून स्पर्धा परीक्षांची भीती गेली तर या क्षेत्रात मराठी नावांची यादी वाढेल. सीबीएससी अभ्यासक्रमावर ही परीक्षा असल्यामुळे दडपण येणे स्वाभाविक आहे.

इंटरनेटमुळे माहितीचा खजिना

या परीक्षेसाठी नॅशनल न्यूज पेपर, पुस्तके आणि स्वतः काढलेल्या नोट्स यावर मी अभ्यास केला. मात्र, या सगळ्या माध्यमांमध्ये मला इंटरनेटची सर्वांत जास्त मदत झाली. माहितीचा खजिना आहे यामध्ये. फक्त त्यातून नेमके काय घ्यायचे याचे तंत्र जाणून घेतले. नाहीतर वेळ वाया जाऊ शकतो. केवळ सर्चिंग नव्हे तर परीक्षेतील प्रश्नांच्या अनुषंगाने काय हवे यांचा नेमका शोध मला उपयोगी ठरला.

हाच तो यू टर्न

सहा वर्षाच्या प्रयत्नांनंतर यंदा माझा हा शेवटचा प्रयत्न होता. हातात लॉची पदवी होती, वकिली करणार हा पर्याय होताच, पण कसून अभ्यास केला. चुका सुधारत पुढे आलो. प्रशासकीय सेवेचा ध्यास घेत एकेक पायरी चढत गेलो. यावेळी हरलो तर लढण्याचीही संधी नव्हती. जे येतं ते मांडलं. आत्म‌विश्वासाची कास सोडली नाही. हा माझा अखेरचा प्रयत्न असला तरी यूपीएससी परीक्षा पास होत आयुष्याला नव्याने सामोरे जाण्याची सुरुवात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कूनलिकांमुळे जमिनीची चाळण

$
0
0

Uddhav.Godase

@timesgroup.com

कोल्हापूर ः गेल्यावर्षी झालेल्या कमी पावसामुळे जलस्रोत आटल्याने कोल्हापूर जिल्ह्याला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. जमिनीवरील पाणीसाठे आटल्यानंतर भूगर्भातील पाणी उपसण्यासाठी शहरासह जिल्ह्यात दररोज वीसहून अधिक कूपनलिका खोदल्या जात आहेत. मागणीसोबत कूपनलिका खोदाईच्या दरातही वाढ झाल्याने दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. सरकार दरबारी कूपनलिकांची काहीच नोंद नसल्याने केवळ पाणीउपसा गतीने होत आहे, तर पाण्याच्या पुनर्भरणाकडे मात्र दुर्लक्ष होत आहे.

'पाणी म्हणजे जीवन' या उक्तीचा अर्थ कोल्हापूरकरांना आता खऱ्या अर्थाने समजत आहे. गेल्या वर्षात अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील जलाशय पूर्णक्षमतेने भरले नाहीत. धरणांमधील पाणी झपाट्याने कमी झाल्याने शेतीसाठी उपसाबंदी लागू करावी लागली. कधी नव्हे ते शहरात दिवसाआड पाण्याचे नियोजन करावे लागले. पाणी वापरावर मर्यादा आल्याने शहरासह जिल्ह्यातही अनेकांनी कूपनलिकांचा मार्ग अवलंबणे सुरू केले आहे. गेल्या दोन महिन्यांत जिल्ह्यात तब्बल सातशेहून अधिक कूपनलिका खोदल्या आहेत. मे महिन्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढल्याने कूपनलिका खोदण्याचे प्रमाणही वाढले आहे. विशेष म्हणजे लोकांची वाढती मागणी पाहून कूपनलिका मशिनच्या मालकांनीही दर वाढविल्याने पाण्यासाठी मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. बहुतांश कूपनलिकांची मशिन कर्नाटक आणि तमिळनाडू राज्यातील असून कूपनलिका मशिनमालक दररोज लाखोंची कमाई करीत आहेत. यातून मोटर, केबल, पाइप्स यांच्याही विक्रीत मोठी वाढ झाली आहे. टंचाईच्या काळात पाणी मिळेल, या आशेने दररोज कूपनलिका खोदल्या जात आहेत. कूपनलिकांची नोंद कोणत्याच सरकारी यंत्रणेकडे नसल्याने भूगर्भातून नेमके किती पाणी उपसले जाते याबाबत सरकारी यंत्रणा अनभिज्ञ आहे.

सध्या सर्वाधिक कूपनलिकांची मागणी पाचगाव, जरगनगर, कळंबा, फुलेवाडी, उचगाव, सरनोबतवाडी, उजळाईवाडी, गोकुळ शिरगाव, कणेरी या परिसरात आहे. गेल्या चार महिन्यांत जमिनीतील पाण्याची पातळी ०.६५ मीटरने खालावली आहे. याचा सर्वाधिक फटका, पाचगाव आणि कणेरी परिसरात बसत आहे. पाचगावमध्ये अपवाद वगळता कूपनलिकांची खोदाई सरासरी पाचशे फुटांपर्यंत खोल आहे. कणेरी परिसरातही हीच स्थिती आहे. इतर ठिकाणी सरासरी तीनशे फूट खोदाई करावी लागत आहे. या परिसरात गेल्या दीड ते दोन वर्षांत केवळ दोनशे ते तीनशे फुटांवर पुरेसे पाणी मिळत होते असा अनुभव आहे. मात्र, सध्या भूजल पातळी घटल्याने कूपनलिकांची खोदाई वाढवावी लागत आहे. यामुळे प्रतिशंभर फुटांमागे दहा ते बारा हजार रुपयांचा अतिरिक्त खर्चही सोसावा लागत आहे. सध्या जिल्ह्यात दहाहून अधिक कूपनलिका मशिन कार्यरत असून, दररोज किमान वीस कूपनलिका खोदल्या जातात. मागणी करणाऱ्यांची यादी दिवसेंदिवस वाढत आहे. शेतीसाठीही पाण्याची तीव्र टंचाई सुरू असल्याने जिल्ह्यात पहिल्यांदाच शेतीसाठी कूपनलिका खुदाईला मागणी वाढली आहे.

जमिनीतून पाणी उपसण्यासाठी जशी चढाओढ आहे, तशी पाण्याचे पुनर्भरण करण्यासाठी मात्र अजिबात दिसत नाही. येणाऱ्या पावसाळ्यात अधिकाधिक पाणी जमिनीत जिरवण्यासाठी पुनर्भरण करणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. यासाठी घरावरील पाणी एकत्रित करून ते परिसरातील कूपनलिका किंवा शोषखड्ड्यांमध्ये सोडणे गरजेचे आहे.

कूपनलिकांची नोंदच नाही

नव्याने कूपनलिका खोदणाऱ्यांना कोणतीही परवानगी घ्यावी लागत नाही, त्याचबरोबर याच्या काटेकोर नोंदीही सरकार दप्तरी नाहीत. महसूल विभागाकडून पीकपाणी नोंदीदरम्यान काही कूपनलिका रेकॉर्डवर येतात; पण शहरात याच्या नोंदी नाहीत. कूपनलिकांची नेमकी संख्या समजली तर त्यातून दररोज होणारा पाण्याचा उपसा नेमका किती आहे हेही समजेल.

कूपनलिका खोदाईचे दर वाढले

वाढत्या मागणीमुळे कूपनलिका खोदाईचेही दर वाढले आहेत. सध्या प्रतिफूट ६० ते ६५ रुपये दराची आकारणी सुरू आहे. जून ते फेब्रुवारीदरम्यान हाच दर प्रतिफूट ५० ते ५५ रुपये होता. एक मशिन दररोज किमान तीन कूपनलिका खोदते. यातून कूपनलिका मशिनमालकांची मोठी आर्थिक उलाढालही सुरू आहे.


टंचाईसदृश भागात दोनशे फुटांपेक्षा खाली कूपनलिका खोदाईस राज्य सरकारने मनाई केली आहे. या निकषामध्ये कोल्हापूर जिल्हा बसत नसल्याने काही ठिकाणी दोनशे फुटांपेक्षा अधिक खोलीवर खोदाई होत आहे. सध्याची पाण्याची गरज भागविण्यासाठी खोदलेल्या कूपनलिका पुनर्भरणासाठी उपयोगी पडतील, यासाठी प्रयत्न करण्याचा विचार आहे.

योगेश खरमाटे, तहसीलदार, करवीर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोलापुरात ३३ गावांना ३० टँकरने पाणीपुरवठा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर
तहानेने व्याकूळ झालेल्या जिल्ह्यातील नागरिकांना आता पावसाळ्याच्या तोंडावर टँकर मिळण्यास सुरुवात झाली असून, सध्या जिल्ह्यातील विविध गावांमध्ये ३० टँकर सुरू करण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत चालली असून, मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई भासत आहे. विहिरी, बोअर आटल्याने नागरिकांवर पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करण्याची वेळ आली. परंतु, आतापर्यंत जिल्ह्यात दुष्काळ नसल्याचे सांगत प्रशासनाने टँकर सुरू करण्यास आढेवेढे घेतले. प्रशासनाच्या या आडमुठ्या कारभारामुळे अनेक सामाजिक संघटना व दानशूर टंचाईग्रस्तांच्या मदतीला धावून आले. कुणी टँकर दिले तर कुणी स्वत:च्या विहिरी, बोअर नागरिकांना खुल्या करून दिल्या. मात्र, एवढ्यावरच जनतेची तहान भागली नाही. त्यामुळे प्रशासनाने आता कुठे एकेका गावात टँकर देण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारअखेर जिल्ह्यात ३० टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कोयना परिसरात पुन्हा भूकंपांचा धक्का

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड
येथील कोयना धरण परिसराला शनिवारी सायंकाळी पाच वाजता ३.५ रिश्टर स्केलचा सौम्य धक्का बसला. बुधवारी सायंकाळी ४.४ रिश्टर स्केलचा धक्का बसल्यानंतर चार दिवसांत २ ते ३ रिश्टर स्केलच्या भूकंपाचे पाच धक्के बसल्याची नोंद कोयनानगर येथील भूकंपमापन केंद्रात नोंदवले गेले आहे. भूकंपाच्या मालिकेमुळे परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
शनिवारी बसलेल्या भूकंपाचा केंद्रबिंदु कोयना धरणाच्या दक्षिणेकडे ११.२ किलोमीटरवर असलेल्या गोषटवाडी गावापासून आग्नेयेला सहा किलोमीटर अंतरावर व कोयना धरणापासून १८.८ किलोमीटर अंतरावर होता. या भूकंपाची खोली १० किलोमीटर इतकी होती.
या भूकंपाच्या धक्क्यामुळे सातारा जिल्ह्यासह कोयणा धरण परिसर, शिराळा, चिपळूण, संगमेश्वर व खेड तालुके चांगलेच हादरल्याने परिसरात काही काळ घबराट पसरली होती. सुदैवाने भूकंपामुळे कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नाही. तसेच, कोयना धरणाला कोणताही धोका पोचला नसून धरण पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती कोयना धरण व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता ज्ञानेश्वर बागडे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अहिल्यादेवी होळकर रथयात्रेल प्रारंभ

$
0
0

कोल्हापूर ः राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने ३१ मे रोजी अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त शाहूनगरी ते मुंबापुरी अशा विचार रथयात्रेचे आयोजन केले आहे. शुक्रवारी अ‌हिल्यादेवी होळकर विचार रथ यात्रेला दसरा चौक येथून प्रारंभ झला. राष्ट्रीय समाज पक्षाचे केंद्रीय सचिव दशरथ राऊत यांच्या प्रेरणेने शाहूनगरी ते मुंबापुरी अ‌हिल्यादेवी होळकर विचार रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. रथयात्रा ३१ मे रोजी मुंबईतील आझाद मैदानावर पोहोचणार आहे. यावेळी डॉ. बाळासाहेब कामण्णा, जिल्हाध्यक्ष डॉ. संदेश कचरे, शहराध्यक्ष रतन बाणदार, शुभांगी चितारी, सागर साळोखे, श्रीकांत पालखे, सुशील मेडगे, प्रशांत मुरगुडे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहिष्णू-असहिष्णू भेद एकात्मतेसाठी घातक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'सहिष्णू-असहिष्णू असा भेद निर्माण करून तो प्रगतीसाठी आवश्यक असल्याचे भासविले जात आहे. मात्र, राष्ट्रीय एकात्मतेसाठी हे घातक आहे. सध्या मोकळेपणाने बोलणे कमी झाले असून, याला केवळ राजकीय परिस्थिती कारणीभूत नसून, सामाजिक परिस्थितीही तितकीच जबाबदार आहे,' असे मत मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक शफाअत खान यांनी व्यक्त केले.

साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला केशवराव भोसले नाट्यगृह येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, 'देशात असहिष्णुता खूपच जुनी आहे. मात्र, सध्या त्याचे उदात्तीकरण केले जात आहे. विशेष म्हणजे प्रगतीसाठी हे आवश्यकच आहे, असा भास निर्माण केला जात आहे. सध्या मोठ्या साहित्य संमेलनांपेक्षा छोट्या साहित्य संमेलनांची खूप गरज आहे. अशा संमेलनांतून वाचक, साहित्यिक संवाद साधू शकतील. यापूर्वी साहित्यातून मुस्लिमांचे समकालीन प्रश्न मांडले गेले नाहीत. आता मुस्लिम साहित्याची नोंद घेतली जात आहे. त्यामुळे लेखकांनी स्वांत सुखाय लिहिण्यात धन्यता न मानता आता पुढे आले पाहिजे.'

'मी मुस्लिम आहे, मी मराठी साहित्यिक आहे, या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, हे समजून घ्यायला हवे. माझ्या मुस्लिम असण्याने साहित्यात वेगळेपण काय जाणवते? त्यामुळे साहित्यात नेमकी काय भर पडते याची चिकित्सा होणे गरजेचे आहे,' असेही खान म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवराज्याभिषेक सोहळ्यात दुष्काळाविषयी जनजागृती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'किल्ले रायगडावर ६ जून रोजी होत असलेला शिवछत्रपतींचा राज्याभिषेक सोहळा लोकोत्सव म्हणून साजरा होत आहे. राज्यात दुष्काळाच्या झळा असल्याने दुष्काळाची जनजागृती करणारा सोहळा साजरा करावा. जलतज्ज्ञ, पर्यावरण अभ्यासकांच्या मार्गदर्शनाने विचारांचा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करावा', असे आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी केले. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे रायगडावर ५ आणि ६ जून रोजी होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या नियोजनासाठी जुना राजवाडा येथील श्री तुळजाभवानी मंदिरात शुक्रवारी आयोजित बैठकीत ते बोलत होते.

सोहळ्यानिमित्त गडावर राखले जाणारे पावित्र्य, स्थानिकांचा सहभाग, आरोग्याच्या उपाययोजना, गर्दीमुळे होणाऱ्या दुर्घटना रोखण्यासाठी सूचना केल्या. या सोहळ्यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून श्री महालक्ष्मी अन्नछत्र ट्रस्टचे राजू मेवेकरी यांनी १ हजार किलो तांदूळ देण्याची घोषणा केली. नगरसेविका हसीना फरास, नगरसेवक महेश सावंत, संदीप कवाळे यांनी एक महिन्याचे वेतन घोषणा केली. बैठकीस इतिहास संशोधक डॉ. रमेश जाधव, इंद्रजित सावंत, समितीचे कार्याध्यक्ष फत्तेसिंह सावंत, हेमंत साळोखे, विनायक फाळके, उदय घोरपडे, संजय पोवार, राम यादव, प्रसन्न मोहिते यांच्यासह कोल्हापूर, पुणे, नगर येथील विविध संस्था संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते.

जागतिक वारसा स्थळात समावेशासाठी प्रयत्न

संभाजीराजे म्हणाले, जागतिक वारसा स्थळात राज्यातील गडकोट किल्ल्यांचा समावेश होण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत. सरकारने हालचाली सुरु केल्या असून या यादीत राजस्थानातील ७ किल्ल्यांचा समावेश आहे. त्यामुळे त्यांना मिळणारा निधी मोठा असेल. महाराष्ट्रातील गडकोटासाठी जागतिक वारसा समितीच्या सदस्या शिखा जैन यांच्याशी चर्चा झाली आहे. त्या २४ मे पासून राज्याच्या दौऱ्यावर येत आहेत. पन्हाळा, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, शिवनेरी, रायगड या किल्यांची पाहणी करतील. दुर्ग अभ्यासक आणि इतिहासप्रेमींची समवेत बैठक घेणार आहेत. सांस्कृतिक मंत्री विनोद तावडेही दौऱ्यात असतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वर्कशॉपमध्ये तीन कोटींचा घोटाळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वर्कशॉपमधील अनागोंदी कारभार आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची शुक्रवारी सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी चिरफाड केली. वर्कशॉप अधीक्षक एम. डी. सावंत यांच्यावर थेट भ्रष्टाचाराचा आरोप करत, गेल्या तीन वर्षात त्यांनी तीन कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप नगरसेवक भूपाल शेटे यांनी केला. सावंत यांच्या मनमानी कारभाराचा सर्वच सदस्यांनी पंचनामा करत त्यांना निलंबित करण्याची मागणी केली. नगरसेवकांच्या संतप्त भावना पाहून आयुक्त पी. शिवशंकर यांनी, सावंत यांच्या कामकाजाची चौकशी करण्याची घोषणा करत बदलीही करण्याची ग्वाही दिली. महापौर अश्विनी रामाणे सभेच्या अध्यक्षस्थनी होत्या.

कंटेनर खरेदी, घंटागाडी दुरूस्ती, महापालिकेच्या वाहनांची दुरूस्ती यावरून सावंत यांच्यावर टक्केवारीसह ढपला पाडल्याचा आरोप थेट नगरसेवकांनी केला. नगरसेवक भूपाल शेटे यांनी सावंत यांच्या कामकाजाचा पंचनामा केला. ते म्हणाले, 'सावंत यांच्या तीन वर्षाच्या कालावधीतील सुमारे तीन कोटी रुपयांचा हिशोब लागत नाही. लेखापरीक्षण अहवालातही वर्कशॉपवरून ताशेरे ओढले आहेत.' नगरसेविका मेहजबीन सुभेदार यांनीही 'सावंत यांच्यासह भ्रष्टाचारी ​अधिकाऱ्यांना आताच रोखा, अन्यथा एक दिवस ते महापालिका विकून टाकतील. हे अधिकारी महिन्याला दोन ते अडीच लाख रुपये वरकमाई करीत आहेत' असा आरोप केला. नगरसेवक शारंगधर देशमुख, अभिजीत चव्हाण, अजित ठाणेकर, सत्यजित कदम, महेश सावंत, राजू दिंडोर्ले, मोहन सालपे, संतोष गायकवाड यांनी सावंत यांच्या विषयीच्या तक्रारींचा पाढा वाचला.

राजारामपुरीतील अतिक्रमणांवरून आयुक्त भडकले

नगरसेवक विलास वास्कर यांनी, 'खरे मंगल कार्यालयसमोरील मोकळ्या सव्वाएकर जागेवर अतिक्रमण झाले आहे. अ​धिकारी झोपा काढत आहेत का?' अशी विचारणा करत आयुक्तांसमोर त्याचे पुरावे सादर केले. आयुक्त शिवशंकर यांनी, 'तक्रार करा, कारवाई करतो' असे उत्तर दिले. वाद वाढत गेल्याने आयुक्त चांगलेच भडकले. राहुल चव्हाण यांनी, पार्वती टॉकीजसमोरील ओढ्यावरील अतिक्रमणांचे फोटो सादर केले. 'नाले, ओढ्यावर बेकायदेशीर बांधकामाला अ​धिकाऱ्यांनी परवाना दिला आहे का?, मग आम्ही जयंती नाल्यावर बंगला बांधतो' असा टोला लगावला. तौफिक मुल्लाणी, उमा इंगळे, स्वाती यवलुजे, दीपा मगदूम, अर्जुन माने यांनी अतिक्रमणांच्या मुद्यावरून प्रशासनाला घेरले. मार्केटमधील दुकानगाळ्यांच्या मुदतवाढ हस्तांतरणाचा ठरावप्रश्नी पुढील सभेत निर्णय घेण्याचे ठरले. नगरसेविका उमा बनछोडे यांनी गाळेधारकांच्या मिळकतीचा मुद्दा मांडत रेडीरेकनरप्रमाणे आकारणी केल्यास ते परवाडणारे नसल्याचे सांगितले. यासंदर्भात लेखी सूचना केल्यावर प्रशासनाने निर्णय घ्यावा अशी सूचना प्रा. जयंत पाटील यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images