Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

कॉँग्रेस-भाजप नगरसेवक सहलीवरराष्ट्रवादी कॉँग्रेसची झाली कोंडी

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सातारा

लोणंद नगरपंचायतीच्या सत्तास्थापनेच्या डावाने वेगळीच कलाटणी घेतल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अपक्ष नगरसेवक सचिन शेळके काँग्रेसच्या गुहेत शिरल्याने राष्ट्रवादीच्या गोटात शांतता पसरली आहे. अपक्षासह काँग्रेस-भाजपचे नगरसेवक लोणंदच्या बाहेर असले तरी भाजपाने आपली भूमीका गुलदस्त्यात ठेवल्याने राजकारणाला ऐनवेळी कलाटणी मिळू शकते.

लोणंद नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसची सरशी झाली होती. मात्र, त्यांना संपूर्ण बहुमत प्राप्त करता आले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे ८, काँग्रेसचे ६, भाजपाचे २ तर अपक्ष १ उमेदवार निवडून आला आहे. एकूण १७ जागांपैकी सत्तास्थापनेसाठी किमान ९ जागा जिंकणे आवश्यक होते. परंतु, राष्ट्रवादीला ८ जागा मिळाल्यामुळे सत्तास्थापनेसाठी आता त्यांची मदार सचिन शेळके या अपक्षावर राहणार आहे.

अपक्ष सचिन शेळके मूळचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते. जिल्हा परिषद सदस्य आनंदराव शेळके-पाटील यांचे निकटवर्तीय म्हणून सचिन शेळके यांच्याकडे पाहिले जात होते. त्यामुळे राष्ट्रवादीला सत्ता स्थापन करणे सहज शक्य असल्याच्या चर्चा निकालानंतर सुरू होत्या.

मात्र, अपक्ष नगरसेवक संपर्क क्षेत्राच्या बाहेर होते. गुरुवारी त्यांच्या मातोश्री नागीरबाई शेळके यांनी मुलाचे अपहरण झाल्याची फिर्याद दिल्यानंतर पडद्यामागच्या खऱ्या घडामोडी राजकीय पटलावर उमटल्या. माणचे आमदार जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसने ममास्टर प्लॅनिंगम करून अपक्षाला भुरळ घालून राष्ट्रवादीला खिंडीत पकडले आहे. त्यामुळे आता नगराध्यक्षासह सत्ता समीकरणाच्या चाव्या आता आमदार जयकुमार गोरेंनी आपल्या हाती ठेवल्या आहेत. भाजपाने अद्याप स्पष्ट भूमिका घेतलेली दिसत नाही.

अपक्षामया साथीने काँग्रेसने राष्ट्रवादीचा डाव उधळण्याचा प्रयत्न केला असला तरी भाजपाच्या भूमीकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सांगलीचा पाणीपुरवठारविवारीपासून नियमित

$
0
0


सांगली :

सांगलीत कृष्णेच्या पात्रात पुरेसा पाणीसाठा झाला असून, सांगली आणि कुपवाड परिसराचा पाणीपुरवठा रविवारी पहाटेपासून नियमित झाला आहे. काही ठिकांणी जलवाहिनीच्या दुरुस्तीमुळे अपुरा पाणीपुरवठा होत असला तरी त्या ठिकाणी टँकर उपलब्ध करून देवून नागरिकांची गैरसोय दूर केली असल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शितल उपाध्ये यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

कृष्णा नदी कोरडी पडल्याने तीन दिवस सांगलीकरांना पाणी टंचाईला द्यावे लागले. बोअरवेलचा शोध घेत भटकंती करावी लागली. काही भागाला टँकरच्या प्रतीक्षेत दिवस घालवावा लागला. शहराच्या मुख्यभागासह काही ठिकाणी कमी दाबाने अधून-मधून नळाला पाणी येत होते. त्यामुळे पाणी टंचाईची तीव्रता जाणवली नसली तरी सांगलीकरांना पाण्याचे महत्व पटवून देणारा तीन दिवसांचा कालावधी पुरेसा ठरला, असेच म्हणावे लागेल.

कनार्टकला पाणी सोडले

महाराष्ट्र आणि कर्नाटकांमध्ये एकमेकांना पाण्याची देवाण घेवाण करण्याचा निर्णय २१ एप्रिल रोजी सांगलीत बैठकीत घेण्यात आला होता. या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. कृष्णेच्या माध्यमातून कर्नाटकला एक टीएमसी पाणी दिले जात आहे. सांगलीतील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावरुन पाणी खाली पडू लागले आहे. कर्नाटकाला पाणी देण्यासाठीच कृष्णेत जादा पाणी सोडण्यात आल्याचे रविवारी स्पष्ट झाले.

कोयना धरणातून सध्या ४१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. शनिवारपर्यंत धरणातून पाणी सोडण्यात येणार आहे, अशी माहिती कोयना धरण व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विदर्भातील वाघांचे सह्याद्री स्थलांतर शक्यवन्यजीव विभागाचे विभागीय वनाधिकारी मिलींद पंडीतराव यांची माहिती

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, कराड

विदर्भातील ताडोबा, पेंच आणि मेळघाट या व्याघ्र प्रकल्पांमध्ये क्षमतेपेक्षा पट्टेरी वाघांची संख्या जास्त आहे. पश्चिम घाटातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या क्षमतेपेक्षा कमी आहे. त्यामुळे विदर्भातील वाघ सह्याद्रीत आणून सोडणे शक्य आहे, असे मत वन्यजीव विभागाचे विभागीय वनाधिकारी मिलींद पंडीतराव यांनी व्यक्त केले.

जागतिक वसुंधरा दिनानिमित्त सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या येथील विभागीय कार्यालयाच्या वतीने येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मिलींद पंडीतराव म्हणाले, विदर्भात वाघांची संख्या वाढल्याने तेथे वारंवार माणूस आणि वाघांचा संघर्ष होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भविष्यात विदर्भातील वाघ येथील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आणता येतील का, या दृष्टीने जागतिक व्याघ्र परिषदेत चर्चा झाली आहे. या योजनेबाबत सरकारने सकारात्मकता दाखवली गेल्यास विदर्भातील वाघांचे स्थलांतर करणे शक्य होणार आहे.

देशांतर्गतही वाघ स्थलांतरित करण्यावर चर्चा

देशांतर्गतही विविध व्याघ्र प्रकल्पांमधून अन्य प्रकल्पांमध्ये वाघ स्थलांतरित करण्यावर चर्चा झाली. यात महाराष्ट्राचा विचार केल्यास विदर्भातील ताडोबा, पेंच आणि मेळघाट या प्रकल्पांमध्ये वाघांची संख्या क्षमतेपेक्षा जास्त झाली आहे. तेथील वाघ क्षमतेपेक्षा वाघ कमी असणाऱ्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात स्थलांतरित करण्यात यावेत, अशी चर्चा या परिषदेत झाली. त्यावर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालकांशी चर्चा करून सह्याद्रित वाघांचे स्थलांतर शक्य आहे का, याचा प्राथमिक अहवाल सादर करण्याचे आदेश वरिष्ठ पातळीवर देण्यात आले आहेत. मुळात या स्थलांतरणाच्या योजनेची व्यावहारिकता तपासली जाणार आहे. यावर सकारात्मक मत आल्यास भविष्यात सह्याद्रित विदर्भातील वाघांचे स्थलांतर शक्य होणार असल्याचे पंडीतराव यांनी सांगितले.

जागतिक व्याघ्र परिषद

जागतिक व्याघ्र परिषद वर्षातून एकदा भरते

वाघांच्या संवर्धनावर परिषदेत भर

जगात वाघ असणारे देश १४

जगात आजअखेर ३ हजार ९००

यापैकी भारतात २३०० वाघ

रशिया, नेपाळ, बांगलादेशमध्ये वाघांची संख्या जास्त उर्वरित देशांमध्ये वाघ नामशेष होण्याच्या मार्गावर

व्हिएतनाम, कंबोडिया, म्यानमार या देशांमध्ये वाघांची संख्या कमी असून, या देशांना भारत वाघ देणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माझा खासदार निधीफक्त जलसंधारणासाठीशरद पवार यांचे प्रतिपादन

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सातारा

'केंद्र व राज्य सरकारने सत्तेचा उपयोग शेतीसाठी करावा. ग्राहक व उत्पादकांचा विचार करून शेतीमालाचा रास्त दर ठरविला गेला पाहिजे. माझा खासदार निधी सभा मंडपासाठी मिळणार नाही. या निधीचा उपयोग फक्त बंधारे, ओढे-नाले उभारण्यासाठी आणि त्यातून सर्वसामान्य माणूस उभा करण्यासाठीच होईल,' असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार यांनी केले

पळशी (ता. खंडाळा) येथे लक्ष्मणराव भरगुडे-पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त आणि विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार मकरंद पाटील होते.

पवार म्हणाले, लक्ष्मणराव भरगुडे यांनी समाजसेवेचे व्रत घेऊन काम केल्याने तालुक्यातील दुष्काळाचा कलंक पुसण्यास मदत झाली. त्यांचा हा वसा त्यांचे पुत्र नितीन भरगुडे-पाटील सक्षमपणे चालवीत आहेत. दुष्काळी खंडाळा तालुका, हा तालुक्यावरील ठपका पुसण्याचे काम रामराजेंनी केले आहे. त्याबद्दल त्यांचा होत असलेला सन्मान निश्चितच उल्लेखनीय आहे.

रामराजे म्हणाले, केंद्र सरकारमार्फत शरद पवार यांच्या मदतीतूनच जिल्ह्यातील सर्व जलप्रकल्प मार्गी लागले. त्यामुळे जल प्रकल्पाच्या गौरवास खरेतर तेच पात्र आहेत. धोम-बलकवडी प्रकल्पाचे उर्वरित काम वर्षभरात मार्गी लागेल.

या वेळी आमदार मकरंद पाटील, शशिकांत शिंदे यांचे मनोगत झाले. प्रारंभी विकास सेवा सोसायटीच्या नूतन कार्यालयाचे व पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारतीचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले. विठ्ठल माने यांनी सूत्रसंचालन केले तर रमेश भरगुडे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळग्रस्तांना जैन बांधवांची मदत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

शिरोळ तालुक्यातील हरोली, दानोळी, कुरूंदवाड, अकिवाट येथील जैन समाजबांधवांनी सामाजिक बांधिलकी जपत नाम फाउंडेशनला मदतीचा हात दिला. भगवान महावीर जयंती साधेपणाने साजरी करून एक लाख ५७ हजार रुपयांचा निधी अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

यंदा महाराष्ट्रात दुष्काळाच्या झळा जाणवत आहेत. तीव्र पाणी टंचाईचे चटके नागरिकांना बसत आहेत. यामुळे हरोली, दानोळी येथील जैन समाज बांधवांनी भगवान महावीर जयंती साधेपणाने साजरी केली. तसेच अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाउंडेशनला निधी देण्यात आला. दानोळी व हरोलीतून प्रत्येकी ५१ हजार, अकिवाट येथून ३० हजार तर कुरुंदवाडच्या जैन बांधवांनी २५ हजार रूपये निधी दिला.

कोल्हापुरात निधी संकलन तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या नातेवाईकांना मदत वाटप असा संयुक्त कार्यक्रम केशवराव भोसले नाट्यगृहात झाला. यावेळी धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी कुरुंदवाडचे रावसाहेब पाटील, दानोळीचे आमगोंडा आनंदा, चवगोंडा सकाप्पा, पायगोंडा मोटके, अॅड. पराज, युवराज पाटील, कुमार आनंदा, विद्याधर वजोबा, हरोलीचे श्रीपाल नकाते, श्रीधर चौगुले, राजगोंडा पाटील, भरत चौगुले, भीमगोंडा पाटील, गुंडू चौगुले, प्रशांत चौगुले, स्वप्नील पाटील, शांतीनाथ पाटील, अॅड.रावसो चौगुले, भाऊसो पाटील, अमर पाटील, कांतीनाथ सायबाण, शांतीनाथ कुडचे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नेते मोघमात, कार्यकर्ते संभ्रमात

$
0
0

रमेश चव्हाण, आजरा

आजरा कारखाना निवडणुकीतील अर्ज भरण्यास सुरुवात झाल्यानंतरही अद्याप एकाही गटाची भूमिका जाहीर झाली नाही. तर राष्ट्रवादीच्या विष्णूपंत केसरकर वगळता एकाही गटाने अद्याप जाहीर वक्तव्य केले नाही. तालुक्यातील पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी गळ्यात गळे घालण्याच्या तयारीत आहेत तर जिल्हा बँकेचे संचालक अशोक चराटी यांनी मेळाव्यांचा धडाका लावून आमदार हसन मुश्रीफ यांना लक्ष्य केले आहे. असे सगळे वातावरण तापले असले तरी गटातटाच्या नेत्यांवर विश्वास नसल्याने आणि मोघम टीका करून महत्त्व वाढविण्यात मग्न असल्याने कार्यकर्ते संभ्रमात आहेत.

सद्यस्थितीत तालुक्यातील राष्ट्रवादीसोबत आमदार सतेज पाटील गट असल्याचे तर जिल्हा बँकेचे संचालक अशोक चराटी, 'गोकुळ'चे संचालक रवींद्र आपटे, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शिवसेना एका बाजूला राहिले आहेत. कारखान्याचे माजी अध्यक्ष जयवंतराव शिंपी, विष्णू केसरकर आणि प्रा. सुनील शिंत्रे यांच्या भूमिका अजूनही निश्चित नाहीत. चराटी गटाने राष्ट्रवादीच्या विरोधात नेते-कार्यकर्त्यांची मोट बांधायला सुरुवात केली. तालुक्याच्या राजकारणाच्या अस्मितेला चुचकारत त्यांनी आमदार हसन मुश्रीफ यांना स्थानिक पातळीवर लूडबूड न करण्याचा इशारा दिला होता. राजकारणाचा निर्णय घेण्यास नेते-मंडळी घेण्यास समर्थ असल्याचा त्यांचा दावा आहे. या पार्श्वभूमीवर 'हमारे अंगने मे तुम्हारा क्या काम है', असे गाणेच त्यांनी उत्तूर मेळाव्यात म्हटले होते. मुश्रीफांचा शब्द प्रमाण मानून कारभार करणाऱ्या संचालकांना 'मग खुर्चीवर बसताच कशाला,' असा सवाल 'स्वाभिमानी'नेही केला आहे. सध्या बिनविरोधच्या चर्चेला सुरुवात झाली. पण चराटी गटाबरोबर स्वाभ‌िमानी, शिवसेना व रवींद्र आपटे गट असल्याने जागावाटपावेळी कसरत करावी लागणार आहे.

शिंत्रे, रेडेकरांची कुचंबणा
काँग्रेसचा रेडेकर गट की शिवसेना यामध्ये प्रा. सुनील शिंत्रेंची कुचंबणा झाली आहे. मागील विधानसभा निवडणुकीला शब्द दिल्याप्रमाणे शिंपींच्या पुनर्वसनाचा पैरा राष्ट्रवादीच्या नेत्यांना फेडायचा आहे. यासाठी शिंपींसोबतच राष्ट्रवादी पॅनेल करण्याचा मुश्रीफांचा आग्रह असला एका चर्चेदरम्यान तिढा सुटत नसल्याने शिंपी संतापाने चर्चा थांबवूनच, 'तुमच्याशी जमणे शक्य नाही' असे ऐकवून निघून गेल्याचे सांगण्यात येते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांगली झेडपी बांधणार पाण्याच्या टाक्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली

सांगली जिल्हा परिषदेने स्वीय निधीतून तरतूद केलेल्या पन्नास लाख रुपयांच्या निधीतून दुष्काळी भागात लोकांना पिण्याचे पाणी साठवण्यासाठी सिमेंटच्या टाक्या बांधण्याचा निर्णय घेण्यात सोमवारी घेण्यात आला. पन्नास लाखांमध्ये २४० टाक्या बांधण्यात येणार आहेत. त्यामुळे टँकरच्या फेऱ्या वेळेत होण्यास मदत होणार आहे.

सांगली जिल्ह्यात सध्या १२४ टँकर सुरू आहेत. या टँकरच्या एकूण ३६६ खेपा पूर्ण करायच्या आहेत. मात्र, टँकर एकदा भरून गेला की तो रिकामा होण्यास बराच विलंब लागतो. याचा परिणाम पुढील खेपांवर होतो. त्यामुळे टँकर तत्काळ रिकामे होऊन जावेत यासाठी पाणी भरून घेण्यासाठी टाक्यांची आवश्यकता होती. त्यामुळेच जिल्हा परिषदेने दुष्काळी भागासाठी तरतूद केलेल्या निधीतून टाक्या बांधण्याचा निर्णय घेतला आहे.

पन्नास लाखांमध्ये दोन हजार लिटरच्या एकूण २४० टाक्या बांधल्या जाणार आहेत. यामध्ये पाणी भरल्यानंतर संबधित परिसरातील शंभर व्यक्तींची सोय होणार आहे.

टाक्यांची तालुकानिहाय संख्या अशी

जत ५०, खानापूर ४०, तासगाव ४०, आटपाडी २०, कवठेमहाकांळ २० या शिवाय टँकर सुरू असणाऱ्या इतर तालुक्यांमध्येही काही टाक्या बांधल्या जाणार आहेत. ज्या जागेत या टाक्या ठेवण्यात येणार आहेत. त्या जागा मालकाचे संमतीपत्रही घेतले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृष्णा-वारणेतून पाणी उपसा बंदी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली

कृष्णा व वारणा नद्यांमधून शेतीसाठी होणाऱ्या पाणी उपसावर रविवार, २४ एप्रिलपासून २९ एप्रिल, शुक्रवारपर्यंत बंदी घलण्यात आली आहे. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य मिळावे, यासाठी जलसंपदा विभागाने बी बंदी घातली आहे.

दरम्यान, जलसंपदा विभागाने साखर कारखाने, धडक योजनांची पाहणी करून पाणी उपसा बंद झाल्याची खात्री करून घेतली आहे. शेतकऱ्यांसह संस्थांनी आमच्या उपसा बंदी आवाहनाला प्रतिसाद दिल्याचे सहायक उपअभियंता आर. एल. कोळी यांनी सांगितले.

या नद्यांबाबत १७ दिवसांतूनच पाच दिवस उपसाबंदीचा आदेश काढण्यात आला आहे. कोयना व चांदोली धरणांत पाणीसाठा कमी आहे. त्यातच कर्नाटकला पाणी देण्यात आले आहे. ताकारी, टेंभू आणि म्हैसाळसाठी उपसा सुरू आहे. नदीकाठच्या धडक योजनांसह साखर कारखान्यांनी काटकसरीने पाणी वापरावे, असा निर्णय खात्याने घेतला आहे. पाणी व्यवस्थापन समितीच्या बैठकीत या बाबतचे नियोजन करण्यात आले आहे. तशी अंमलबजावणीही सुरू झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महाराष्ट्रातून कर्नाटकला पाणी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

कृष्णा नदी कोरडी पडल्याने कर्नाटक सीमेलगतच्या गावांत भीषण पाणी टंचाई निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर सोमवारी सायंकाळी कृष्णा नदीवरील राजापूर बंधार्यातून १.६८ एमसीएफटी पाणी सोडण्यात आले. कर्नाटकला १ टीएमसी पाणी देण्यात येणार आहे.

शिरोळ तालुक्यातील राजापूर हा कृष्णा नदीवरील महाराष्ट्रातील शेवटचा बंधारा आहे. या बंधाऱ्यात बरगे घालून पाणी अडविण्यात आले असून या पाण्याचा लाभ परिसरातील २६ गावांना होतो. राजापूर बंधाऱ्यापुढे कृष्णा नदीचे पात्र कोरडे पडले आहे. परिणामी कर्नाटकातील सीमाभागातील गावांत भीषण पाणी टंचाई निर्माण झाली होती. यडूर, चंदूर, कल्लोळ, मांजरी, ऐनापुरे, कित्तूर, उगार यासह अन्य गावात टंचाईची झळ बसली आहे. यामुळे कृष्णेतून पाणी सोडावे, अशी मागणी कर्नाटकने महाराष्ट्र सरकारकडे दीड महिन्यांपूर्वी केली होती.

दरम्यान, गेल्या सोमवारी मुख्यमंत्र्यांनी कर्नाटकला पाणी सोडण्याचे आदेश दिले. यानंतर गुरूवारी सांगलीत महाराष्ट्र व कर्नाटकच्या पाटबंधारे विभागाच्या मुख्य अभियंत्यांची बैठक झाली. यानंतर सोमवारी सायंकाळी पाच वाजता राजापूर बंधाऱ्यातून विसर्ग सुरू करण्यात आला. बंधाऱ्याच्या २३ गाळ्यांचे बरगे एक फुटाने उचलण्यात आले असून १.६८ एमसीएफटी विसर्ग सुरू आहे. हा विसर्ग आठ दिवस सुरू राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापुरात गुरूवारपासून तीन दिवस पाणी संकट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नवीन वाशी नाका आणि अयोध्या कॉलनी, फुलेवाडी रिंगरोड येथील पाइपलाइन दुरूस्तीचे काम गुरूवारपासून (ता.२८) हाती घेण्यात येणार आहे. दोन ठिकाणी मुख्य पाइपलाइन जोडणी करण्यात येणार असल्याने २८ ते ३० एप्रिलदरम्यान ए, बी व इ वॉर्डात पुरवठा बंद राहील. पाइपलाइन दुरूस्तीचे काम दोन दिवस पूर्ण करण्याचे नियोजन केले असून ३० एप्रिलला कमी दाबाने पुरवठा होईल, असे पाणी पुरवठा विभागाने कळविले आहे. शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, राजारामपुरी, शिवाजी पार्कसह आसपासच्या उपनगरांना फटका बसणार आहे. पुईखडी व कळंबा जलशुद्धीकरण केंद्राद्वारे होणारा पुरवठा बंद असणार आहे.

नवीन वाशी नाका ते दुर्वांकर सभागृह मार्गावर जुन्या पाइपलाइनला पर्यायी पाइपलाइन टाकली आहे. फुलेवाडी येथे ५०० मीटर लांबीची पाइपलाइन कार्यान्वित केली जाणार आहे. १००० मिलीमीटर व्यासाची डीआयपाइप आहे. शिंगणापूर योजनेवरील ११०० मिलीमीटर व्यासाच्या पाइपला गळती असल्याने नवी लाइन टाकण्याचे नियोजन आहे. गेले पंधरा दिवस क्रॉस कनेक्शन जोडणीसाठी आवश्यक कामे करण्यात येत आहेत.

या भागातील पुरवठा बंद राहणार

ए, बी व इ वॉर्ड, संलग्नित उपनगरे, तसेच यावर आधारित ग्रामीण भागातील नळ कनेक्शनधारकांना फटका बसणार आहे. साळोखेनगर टाकी परिसर, आपटेनगर परिसर, महाराष्ट्र नगर, बापूरामनगर, दादू चौगुलेनगर व लगतचा परिसर, जरगनगर, रामानंदनगर, रायगड कॉलनी, पोवार कॉलनी व लगतचा परिसर, संभाजीनगर, एलआयसी कॉलनी, देवकर पाणंद, साळोखे पार्क, जवाहरनगर, वायपी पोवारनगर परिसराचा पाणी पुरवठा बंद असणार आहे. शिवाजी पेठ (काही भाग), मंगळवार पेठ (काही भाग) तसेच इ वॉर्डातील शाहूपुरीतील (काही भाग), कावळा नाका, बापट कॅम्प, शिवाजी पार्क, न्यू शाहूपुरी, सदरबाजार, महाडिक वसाहत, मुक्तसैनिक वसाहत, टाकाळा, संपूर्ण राजारामपुरी परिसर, शाहू ​मिल परिसर, उद्यमनगर या भागांनाही पाणी पुरवठा होणार नाही. ३० एप्रिल रोजी काही भागांना अपुरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होईल.


२६ टँकरची उपलब्धता

पाइपलाइन दुरूस्तीच्या कालावधीत नागरिकांच्या सोयीसाठी खासगी टँकर भाड्याने घेतल्याचे जलअभियंता मनीष पवार यांनी सांगितले. महापालिकेचे ६ आणि खासगी २० टँकरद्वारे संबंधित भागात पुरवठा करण्याचे नियोजन आहे. खासगी टँकरची क्षमता प्रत्येकी दहा हजार लिटर आहे. कसबा बावडा जलशुद्धीकरण केंद्र व बालिंग जलशुद्धीकरण केंद्र येथून पाणी उपसा करून ते संबंधित भागांना पाणी पुरवठा केला जाईल, असे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांची हायकोर्टात याचिका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्यात पुजाऱ्यांशिवाय इतरांना प्रवेश मिळू नये आणि देवस्थान समितीकडून काही भाविकांना मंदिरात व्हीआयपी प्रवेश देण्यात येत असल्याच्या विरोधात गजानन मुनीश्वर आणि इतरांनी याचिका दाखल केली होती. यावर जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली, तर सोमवारी (ता. २५) दिवाणी न्यायाधीश प्रेमकुमार शर्मा यांच्याकडे झालेल्या सुनावणीत आणखी सहाजणांनी म्हणणे मांडण्यासाठी अर्ज सादर केले. पुढील सुनावणी २९ एप्रिलला होणार आहे.

मुनीश्वर आणि शिवकुमार शिंदे यांनी गाभाऱ्यातील प्रवेशाच्या वादावरून दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला होता. याप्रकरणी सोमवारी (ता. २५) झालेल्या सुनावणीत जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने बाजू मांडताना सरकारी वकिलांनी संबंधित याचिकेत जिल्हाधिकाऱ्यांना हजर राहण्यास दिलेल्या नोटिसीबाबत हायकोर्टात याचिका दाखल केल्याचे सांगितले. माजी नगरसेवक निशिकांत मेथे आणि चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष आनंद माने यांनीही या दाव्यात मत मांडण्यास संधी मिळावी असा अर्ज केला असून, सुप्रिम कोर्टाच्या आदेशानुसार पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील धर्तीवर अंबाबाई मंदिरातही व्यवस्था सुरू करावी अशी मागणी केली आहे. पारंपरिक श्रीपूजकांची सेवा खंडित करून सुप्रिम कोर्टाच्या आदेशानुसार पूजा-आर्चा करण्याचे आदेश द्यावेत अशी मांडणी केली. अॅड. राजेंद्र किंकर, आर. ए. मेहता, किशोर नाझरे आणि बी. आर. पाटील यांनीही दाव्यात मत माडण्याची संधी मिळावी, असा अर्ज सादर केला आहे. यावर पुढील सुनावणी २९ एप्रिलला घेण्याचा निर्णय न्यायाधीश प्रेमकुमार शर्मा यांनी दिला.

सुनावणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून निवासी उपजिल्हाधिकारी शंकर बर्गे उपस्थित होते. पोलिस अधीक्षकांकडून स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक दिनकर मोहिते, तर प्रतिवादी इंद्रजित सावंत क्षत्रीय मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे वसंतराव मुळीक, दिलीप पाटील, प्रताप वरुटे-नाईक यांच्यासह प्रजासत्ताक संघटनेचे दिलीप देसाई आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तेल गेले अन् तूपही गेले

$
0
0

Raviraj.gaikwad@

timesgroup.com

मुळात अल्पभूधारक शेतकरी. टाटा कंपनीचा प्रकल्प उभा राहणार, तेथे नोकरीही मिळणार. या आशेने जमीन प्रकल्पाला दिली. प्रकल्प दुसऱ्या राज्यात गेला. त्यामुळे जमिनीचे पैसेही अर्धवट मिळाले, तर प्रकल्प झाला नाही म्हणून जमीनही परत मिळाली नाही. प्रकल्पाच्या कारखान्याचे अर्धवट बांधकाम तसेच पडून आहे. कारखान्याभोवती पोलिसांचा पहारा असल्याने जमीन डोळ्यापुढे असूनही ती कसता येत नाही. त्यामुळे तेलही गेले अन् तूपही गेले, अशी अवस्था सिंगूरमधील शेतकऱ्यांची झाली आहे.

हुगळी जिल्ह्यातील सिंगूर हे गाव २००८ मध्ये टाटांच्या प्रकल्पाच्या विरोधात झालेल्या तीव्र आंदोलनामुळे देशातच नव्हे, तर जगभरात चर्चेत आले. गोळीबार आणि हिंसाचाराच्या घटनेनंतर टाटांनी सिंगूरचा प्रकल्प गुंडाळून गुजरातला हलविला. तेथील प्रकल्पात तयार झालेली नॅनो गाडी रस्त्यांवर धावू लागली. मात्र, सिंगूरमधल्या परिस्थितीत आठ वर्षांत किंचितही बदल झालेला नाही.

कोलकाता-दुर्गापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २ च्या बाजूला असलेल्या प्रकल्पात जमीन गेलेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला. बेराबेरी रोहिदास पाडा. या गावापासून चालत अवघ्या दोन मिनिटांच्या अंतरावर टाटांच्या गुंडाळलेल्या प्रकल्पाची भिंत लागते. याच पाड्यातील अशोक रोहिदास (बंगाली उच्चार रुईदास) या शेतकऱ्याची अर्धा एकर जमीन प्रकल्पात गेली. त्याला ९५ हजार रुपयेच मोबदला मिळाला. उर्वरित रक्कम प्रकल्प गुंडाळला गेल्याने मिळाली नाही. सध्या भाजीच्या टेम्पोवर ड्रायव्हर म्हणून काम करणारे अशोक हतबल आहेत.

मदन रोहिदास केवळ नववी शिकलेल्या तरुणाच्या कुटुंबाच्या जमिनीचा एक तुकडा प्रकल्पात गेला. मोबदला म्हणून ९० हजार मिळाले. मदन सध्या मजुरीचे काम करतो. गौर रोहिदास हा बीएच्या दुसऱ्या वर्षापर्यंत शिकला आहे. त्याचे कुटुंबही अल्पभूधारक. त्याची तर सगळी जमीन प्रकल्पात गेली. सध्या तो बिल्डिंग पेंटिंग करणाऱ्या कंत्राटदाराकडे मजुरीवर काम करतो. टाटाचा प्रकल्प गेला असला, तरी अजूनही परिसरात कारखाने उभे रहावेत, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत होते.

अनुदान सत्ताधाऱ्यांच्या घशात?

प्रकल्पात जमीन गेलेल्या कुटुंबांना महिन्याला दोन हजार रुपये आणि १६ किलो तांदूळ देण्याची तृणमूल सरकारची योजना आहे. मात्र, तृणमूलचा झेंडा हातात घेणाऱ्यांनाच या अनुदानाचा लाभ मिळतो, असा आरोप सिंगूरमधील शेतकऱ्यांनी केला. 'आम्ही सुरुवातीपासून कम्युनिस्ट पक्षाचे असल्याने सरकार आमच्याकडे दुर्लक्ष करते आणि ज्यांच्या जमिनी प्रकल्पात गेलेल्या नाहीत, अशांच्या पदरात अनुदान टाकते,' असा आरोप शेतकरी करत होते.


सिंगूरची लढत लक्षवेधी

सिंगूर विधानसभा मतदारसंघ २००१ पासून तृणमूल काँग्रेसच्या रवींद्रनाथ भट्टाचार्य यांच्याकडे आहे. सध्या ते मंत्रिमंडळातही आहेत. ममता बॅनर्जी यांनी सत्तेत आल्यानंतर सिंगूरकडे फारसे लक्ष दिलेले नाही. टाटांच्या प्रकल्पाला दिलेल्या ९९७.२३ एकर जागेपैकी किमान ६०० एकर जागेवर दुसरी एखादी कंपनी सुरू करण्याचे आश्वासन ममतादीदींनी २०११च्या निवडणुकीत दिले होते. मात्र, गेल्या पाच वर्षांत त्याचा एकही कागद पुढे सरकलेला नाही. यंदाच्या निवडणुकीत सिंगूरमध्ये माकपने रवीन देव यांना रिंगणात उतरविले आहे. ही लढत रंगतदार असल्याचे स्थानिक सांगत होते.

====
ममता बॅनर्जी आणि काही कथित बुद्धीवाद्यांनी प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांचे कान भरले. आज परिसरातील अनेक तरुण मुले मुंबई, सूरत, हैदराबाद येथे सोनारकाम करण्यासाठी स्थलांतरीत झाली आहेत. प्रकल्प झाला, असता तर या तरुणांना त्यांच्या गावातच रोजगार मिळाला असता.

- डॉ. उदयन दास, प्रकल्पासाठी पुढाकार घेतलेले कार्यकर्ते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जयसिंगपुरात मनोरुग्णाचा धुमाकूळ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

जयसिंगपूर शहरात रविवारी मध्यरात्री मनोरुग्ण इसमाने धुमाकूळ घातला. लक्ष्मीरोड लगतच्या रुग्णालयावर तसेच रस्त्याकडेला उभ्या असलेल्या वाहनांवर दगडफेक केली. रात्री एक वाजता घडलेल्या या घटनेने शहरवासियांची झोप उडविली. नागरिकांच्या अंगावरही धावून जाण्याचा प्रकार घडला. अखेर दोन तासांच्या प्रयत्नानंतर नागरिकांनी या मनोरूग्णास पकडून धुलाई केली. तसेच सांगलीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

रविवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून हा मनोरुग्ण शहरात फिरत होता. रात्री एक वाजण्याच्या सुमारास त्याने लक्ष्मी रोड लगत असणाऱ्या एका हॉस्प‌िटलवर दगड फेकण्यास सुरुवात केली. यावेळी नागरिक जमल्याने हा मनोरुग्ण दुसऱ्या हॉस्पिटलसमोर आला. याठिकाणी त्याने दगडफेक केल्याने दरवाजाच्या काचा फुटल्या. अकराव्या गल्लीत रस्त्याकडेला उभ्या असणाऱ्या सुमो गाडीवरही दगडफेक करून काच फोडली. तर एका घरावर चढून कौले काढण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान या घटनेमुळे परिसरातील नागरिक जमले. त्यांनी या मनोरुग्णास रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र तो नागरिकांच्या अंगावर दगड घेवून धावला. रात्री सुमारे दोन तास हा गोंधळ सुरू होता. नागरिकांनी पकडून त्याची धुलाई केली. पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. हा मनोरुग्ण धामणी येथील असून त्यास सांगलीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीचोरी रोखण्यासाठी सशस्त्र बंदोबस्त

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सोलापूर
उजनी धरणातील पाण्याने भरून घेतलेल्या चिंचपूर बंधाऱ्यातून पाण्याची चोरी होऊ नये म्हणून सशस्त्र पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे, अशी माहितीही आयुक्त काळम-पाटील यांनी दिली. शहराला चार दिवसांआड पाणीपुरवठा सुरू झाला आहे. मात्र, उपलब्ध पाण्याचा वापर नागरिकांनी काटकसरीने करावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
दरम्यान, पाणीचोरी रोखण्यासाठी एकीकडे चिंचपूर बंधाऱ्यावर सशस्त्र पोलिस बंदोवस्त ठेवण्यात आला आहे. मात्र, दुसरीकडे बंधाऱ्याला मोठी गळती लागली आहे. त्याकडे प्रशासनाचे लक्ष नाही. गेटमधून मोठ्या प्रमाणात पाणी खालच्या दिशेने वाहून जात आहे. बंधाऱ्याच्या गेटमधून पाण्याला मोठी गळती लागली आहे. साडेपाच कोटी रुपये मोजून विकत घेतलेले पाणी पाटबंधारे विभाग आणि महापालिका यांच्या निष्काळजीपणामुळे वाहून जात आहे. मागील वेळीही देखील अशा प्रकारे बंधाऱ्यातील पाणी वाहून गेले होते. या घटनेची दखल घेऊन तातडीने गळती थांबवावी, अशी सूचना नगरसेवकांनी पाणीपुरवठा विभागाला केली आहे.
सोलापूरला चार दिवसांआड पाणी
सोलापूर शहराला आजपासून चार दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. औज व चिंचपूर हे दोन्ही बंधारे भरले आहेत. त्यामुळे येत्या दोन दिवसांत नियोजन करून चार दिवसांआड पाणीपुरवठा केला जाणार आहे. गेल्या आठवड्यात शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव सुरू होता. त्यामुळे काही भागाला अधिक पाणीपुरवठा करावा लागला. शहराचा विस्कळीत झालेला पाणीपुरवठा पूर्ववत होण्याला आणखी दोन दिवस लागणार आहेत.
हद्दवाढ भागात पाणीबाणी
औज बंधारा कोरडा पडल्यानंतर शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. काही भागाला पाच दिवसांआड तर काही भागाला सहा दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात आला होता. हद्दवाढ भागातील उपनगरांना दहा दिवसांतून एकदा पाणी मिळाले होते. या पाणीटंचाईचे पडसाद महापालिका सर्वसाधारण सभेत उमटले. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी प्रशासनावर टीकेची झोड उठविली. नियोजन नसल्यामुळे शहराला पाच दिवसांआड पाणीपुरवठा करण्याची नामुष्की महापालिकेवर आली असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया अनेक नगरसेवकांनी व्यक्त केल्या होत्या. सभागृहाच्या भावना लक्षात घेऊन शहराला चार दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचे आदेश महापौरांनी दिले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उजनी धरणावर सीसीटीव्ही कॅमेरे

$
0
0


सोलापूर
उपमहापौर प्रवीण डोंगरे यांच्या कल्पनेतून उजनी धरणावरील पंप हाउस आणि कर्मचाऱ्यांवर करडी नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेर लावण्यात आले आहेत. त्यामुळे उजनी धरणावर नेमके काय चालले आहे याची माहिती महापालिका कार्यालयात बसून समजणार आहे.
उजनी धरणातील पाण्याची पातळी समजावी म्हणून शहराला पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या उजनी पंपहाउस आणि परिसरात हे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. उजनी पंपहाउस आणि दुबार पंपिंग परिसरामध्ये प्रायोगिक तत्वावर दोन कॅमेरे लावण्यात आले आहेत. या पीटीझेड आणि आयपी कॅमेऱ्यांमुळे सुमारे दोन किलोमीटर परिसरातील माहिती महापालिकेत बसून इंटरनेटद्वारे मिळणार आहे. त्यामुळे आता आयुक्तांना व पदाधिकाऱ्यांना वारंवार उजनी धरणावर जाण्याची गरज भासणार नाही.
पंप किती चालू आहेत, अधिकारी आणि कर्मचारी काय काम करतात तसेच काही अडथळा निर्माण झाला असेल तर तो तत्काळ दूर करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मदत होणार आहे.
हिप्परगा तलाव कोरडा ठाक
सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणारा सोलापूर-तुळजापूर रस्त्यावरील हिप्परगा तलाव कोरडा ठाक पडला आहे. परिसरातील गावात राहणाऱ्या नागरिकांना व जनावरांना पाण्याची टंचाई भासू लागली आहे. तलावातील ओलाव्यामुळे आलेला हिरवा चारा खाण्यासाठी जनावरे तलावात फिरत आहेत. जॅकवेलसुद्धा उघडे पडले आहेत. शिवाय पाणीच संपून गेल्यामुळे जलचर प्राणी मृत्यूमुखी पडले आहेत. छोट्या खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यात आपले खाद्य शोधण्यासाठी बगळ्यांची गर्दी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वन विभागाच्या तपासणीनाक्यांवर शून्य कारवाई

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, कराड
गुहागर-विजापूर राज्यमार्गालगत पाटण तालुक्यातील कोयना आणि कराडजवळील विजयनगर येथे वन विभागाचा चेकनाका आहे. पण सध्या हा नाका असून अडचण, नसून खोळंबा अशा स्थितीत आहे. चेकनाक्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. नाक्यांवर रोटेशन पद्धतीने दोन कर्मचारी ड्युटी बजावत असल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात बहुतांशवेळा चेकनाक्याला भलामोठा टाळा लागलेला असतो.
कोकणातील रत्नागिरी, चिपळूणसह अन्य ठिकाणांहून लाकूड आणि वन्य साधन सामुग्रीची मोठ्या प्रमाणात वाहतूक केली जाते. नरक्या, चंदनासह सागवान व अन्य लाकडांनी भरलेल्या ट्रक व कंटेनरची गुहागर-पंढरपूर राज्यमार्गावर वर्दळ असते. अवैधरीत्या होणारी ही वाहतूक रोखण्यासाठी वन विभागाने जानेवारी २०१२मध्ये या राज्यमार्गालगत पाटण तालुक्यातील कोयना तर कराड तालुक्यातील विजयनगर येथे तपासणी नाका उभारला आहे. त्या ठिकाणी काही कर्मचाऱ्यांची नेमणूकही करण्यात आली आहे. मात्र, गेल्या तीन वर्षांत या तपासणी नाक्यावरील कर्मचाऱ्यांना अवैध लाकडाविरोधात एकही कारवाई करता आलेली नाही. जानेवारी २०१२ ते आजअखेर या कार्यालयाच्या खात्यावर एकाही कारवाईची नोंद नाही.
रोटेशन पद्धतीने ड्युटी
तपासणी नाक्यांवरील कर्मचाऱ्यांना रोटेशन पद्धतीने ड्युटी असते. या ड्युटीच्या कालावधीत संबंधित कर्मचाऱ्याने राज्यमार्गावरून होणारी अवैध लाकूड वाहतूक रोखणे व लाकूड घेऊन जाणाऱ्या वाहनांकडील परवान्याची तपासणी करणे. त्यावर तपासणीचा सही. शिक्का मारणे गरजेचे असते. मात्र, बहुतांशवेळा कार्यालयच बंद असल्याने लाकूड वाहतूक करणारी वाहने बिनदिक्कतपणे मार्गस्थ होत असतात. संबंधित कर्मचाऱ्यांपैकी एकही कर्मचारी कधी रस्त्यावर उभे राहून लाकूड वाहतुकीच्या वाहनांची तपासणी करताना दिसत नाही. कर्मचारी उपस्थित असला तरी तो कार्यालयामध्येच ठाण मांडून असतो. त्यामुळे कोणतीही कारवाई होत नाही.
कराड-पाटण मार्गावरील पळवाटा
गुहागर-विजापूर राज्यमार्गाला पाटण-कराडदरम्यान अनेक रस्ते जोडले गेले आहेत. मार्गावरील मल्हार पेठजवळील निसरे फाट्यापासून वाहनधारकाला ऊरूल मार्गे उंब्रजकडे जाता येते. म्होप्रेनजीक असलेल्या फाट्यावरून गेल्यानंतर चाफळ फाट्यावर व तेथून पुढे उंब्रजला जाता येते. तेथून महामार्गाने पुण्याकडे जाणे शक्य होते. तांबवे फाट्यावरून किरपे, येणकेमार्गे कराड-ढेबेवाडी मार्गाने मलकापूर येथे महामार्गावर निघणे शक्य असल्याने तेथून पुढे कोल्हापूरकडे जाणे शक्य होते. अवैध लाकूड वाहतूक करणारी वाहने या मार्गांचा वापर करून महामार्गापर्यंत पोहोचतात. त्यामुळे विजयनगर येथे असलेल्या तपासणी नाक्यापर्यंत वाहने पोहोचतच नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळी हातांना लष्कराचे बळनेर तलावाची खोली वाढविण्यासाठी जवानांचा सहभाग

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सातारा
दुष्काळाशी दोन हात करत असलेल्या सातारा जिल्ह्यातील गावकऱ्यांना लष्कराचे बळ मिळाले आहे. खटाव तालुक्यातील ब्रिटिशकालीन नेर तलावातील गाळ काढण्यासाठी हे जवान लष्कराच्या डोजरसह सोमवारपासून (ता. २५) गावकऱ्यांबरोबर सहभागी झाले आहेत. आग ओकणाऱ्या शस्त्रांऐवजी कुदळ, फावडे घेऊन गणवेशातील जवान परिसरात चर्चेचा विषय ठरले आहेत.
सातारा जिल्ह्यातील माण, खटाव हे तीव्र दुष्काळी तालुके आहेत. या तालुक्यांतील बहुतेक तलावांनी दोन महिन्यांपूर्वीच तळ गाठला आहे. या तालुक्यांमध्ये शासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणावर दुष्काळ निवारणाची कामे सुरू आहेत. नेर तलावातून खटाव तालुक्यातील बहुतेक गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र, १८७२ ला तलावाची निर्मिती झाल्यापासून आतापर्यंत कधीही या तलावातील गाळ काढण्यात आला नव्हता. परिणामी तलावाची साठवण क्षमता कमी झाली आहे. सध्याची दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन एकत्र आलेल्या आजी, माजी सैनिकांनी या तलावातील गाळ काढून तलावाची साठवण क्षमता वाढवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांच्या हस्ते गाळ काढण्याच्या कामाचा प्रारंभ करण्यात आला. जय जवान जय किसान प्रतिष्ठान, ग्रीन थंब यांच्या माध्यमातून लष्कराच्या बाँम्बे सॅपर्स विभागाचा एक डोजर, नायक दर्शन खान, लान्स नायक गुरुजित सिंग, हवालदार सचिन गायकवाड हे नेर येथील तलावातील गाळ काढण्यासाठी दाखल झाले. या भागातील बहुतेक गावांतील घरटी एक तरुण सैन्य दलात आहे. त्यामुळे या कामात लष्कारातील जवानांनसोबतच निवृत्त जवान आणि युवा वर्गाचाही लक्षणीय सहभाग आहे. जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांच्यासोबतच जय जवान जय किसान प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश गोडसे, ग्रीनथंबचे सुरेश पाटील, पत्रकार सुजित आंबेकर यांनी हे काम मार्गी लागण्यासाठी समन्वक म्हणून जबाबदारी उचलली आहे.
....
या कामामध्ये ग्रामस्थांनीही सहभागी व्हावे. शेतकऱ्यांनी या तलावातून काढण्यात येणारा गाळ विनामूल्य आपल्या स्वत:च्या वाहनातून घेऊन जावा.
अश्विन मुद्गल, जिल्हाधिकारी
..
'या गावातून, परिसरातून मोठ्या प्रमाणात जवान सैन्यात दाखल झाले. आज हे जवान निवृत्त झाले आहेत. शेतकऱ्यांसाठी नेर तलावातील गाळ काढण्याचे काम आम्ही हाती घेतले आहे. ही देशसेवाच आहे.'
सुरेश गोडसे,
अध्यक्ष, जय जवान जय किसान प्रतिष्ठान

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. देसाईंना धमकीचा फोन कॉलही स्थानिकच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लेखक व पत्रकार डॉ. सुभाष देसाई यांना आलेले धमकीचे पत्र शहरातील महाद्वार रोड परिसरातील पोस्टातून आल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाल्यानंतर फोनकॉलवरून आलेली धमकीही स्थानिकच असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी फोन कॉलचे डिटेल्स मिळवले असून, प्राथमिक तपासात 'तो' फोन क्रमांक स्थानिक असल्याची खात्री पटली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा लवकरच उलगडा होण्याची शक्यता आहे.

डॉ. सुभाष देसाई यांना १९ एप्रिलला आलेले धमकीचे पत्र शहरातील महाद्वार रोड परिसरातून आल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. नंतर आलेला धमकीचा फोन कॉलही स्थानिक असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले. पोलिसांनी फोन कॉलचे डिटेल्स मिळवले असून फोन क्रमांकाचाही उलगडा झाला आहे. संबंधित फोन क्रमांक स्थानिक असल्याने पोलिसांनी संशयिताचा शोध सुरू केला आहे. फोन करणारा संशयित सापडल्यास पत्राचाही उलगडा होईल. पोलिसांकडून संशयिताची शोध मोहीम सुरू आहे. लवकरच संशयिताला ताब्यात घेण्यात यश येईल, अशी माहिती पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आम्ही कोल्हापुरी...झाडे घरोघरी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

निसर्गाशी नाते सांगत, हरित कोल्हापूर ही संकल्पना मूर्त रूपात साकारण्याठी शहरातील प्रत्येक प्रभागात १०० झाडांची लागवड केली जाणार आहे. विशेष म्हणजे लोकसहभागातून कोल्हापुरात हिरवाई फुलविण्याचा संकल्प केला आहे. महापालिकेकडून प्रत्येक व्यक्तीला रोपे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. लोकांनी त्या रोपांची निगा राखावयची आहे. 'आम्ही कोल्हापुरी...झाडे घरोघरी' या संकल्पनेनुसार पर्यावरणपूरक उपक्रम हाती घेण्यात आला आहे. १२ जूनला एकाच दिवशी शहरात आठ हजार रोपांची लागवड केली जाणार आहे.

महापौर अश्विनी रामाणे, आमदार सतेज पाटील आणि आयुक्त पी. शिवशंकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पर्यावरणवादी संस्था, स्वयंसेवी संस्था आणि महापालिका पदाधिकारी-​अधिकाऱ्यांची मंगळवारी बैठक झाली. महाराणी ताराराणी गार्डन येथील महापालिकेच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत प्रत्येक प्रभागात रोपांच्या लागवडीचा कृती कार्यक्रम ठरला.

आमदार पाटील व महापालिकेच्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी वनस्पतीतज्ज्ञ प्राचार्य मधुकर बाचूळकर, डॉ. एस. आर. यादव, पर्यावरणवादी कार्यकर्ते उदय गायकवाड, अनिल चौगुले, सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक तानाजी पाटील, सुहास साळोखे यांच्यासोबत चर्चा करून शहरात लागवड करण्यात येणाऱ्या रोपांची निश्चिती करण्यात आली. यामध्ये कडूनिंब, बहावा, कदंब, शिसव, शिरीष, आवळा, बकूळ, जांभूळ, करंबळ, झारूळ, टेंभुर्णी, कवट या झाडांचा समावेश आहे.

नागरिकांनी पाच मेपर्यंत विभागीय कार्यालयात नावनोंदणी करावी

एका नागरिकाला तीन झाडे मोफत मिळणार

११ जून रोजी रोपांचे वितरण

१२ जून रोजी संपूर्ण शहरभर रोपांची लागवड


कोट...

'चौदाव्या वित्त आयोगातून शहरातील वृक्षलागवड आणि संवर्धनासाठी निधी मंजूर झाला आहे. सुमारे तीन लाख रुपये खर्चून रोपे विकत घेतली जाणार आहेत. नागरिकांनी मागणी केल्यानुसार त्यांना ज्या त्या जातीची रोपे दिली जातील.'

पी. शिवशंकर, आयुक्त

कोट...

'लोकसहभातून वृक्षलागवडीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. नागरिकांना रोपे दिल्यानंतर लागवड आणि त्यांची निगा राखण्याची जबाबदारी संबंधितांची आहे. या उपक्रमासाठी शिवाजी विद्यापीठ एक हजार रोपे भेट स्वरूपात देणार आहे. नर्सरी, सेवाभावी संस्थांनी झाडे भेट देऊन 'आम्ही कोल्हापुरी... झाडे घरोघरी' संकल्पनेला हातभार लावावा.' सतेज पाटील, आमदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

११६१ कर्मचाऱ्यांकडून वेतनवाढ वसुली ?

$
0
0

Maruti.Patil@ timesgroup.com

कोल्हापूर : दोनवेळा मुदतवाढ दे‍ऊनही एमएस-सीआयटी परीक्षा उत्तीर्ण न झाल्याने जिल्हा परिषदेच्या एक हजार १६१ कर्मचाऱ्यांवर वेतनवाढ वसुलीची टांगती तलवार आहे. आणखी दोन दिवसांत पन्हाळा तालुक्यातील माहिती संकलीत झाल्यानंतर यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत वेतनवाढ वसुलीचे आदेश निघण्याची शक्यता असल्याने जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. सामान्य प्रशासन विभागाने गेल्या पंधरा दिवसापासून याची माहिती संकलीत केली आहे. यामध्ये सर्वाधिक एमएस-सीआयटी अनुत्तीर्ण कर्मचाऱ्यांमध्ये शिक्षकांचा समावेश असल्याचे खात्रीलायक माहिती मिळाली आहे. मात्र वेतनवाढ वसुलीचे आदेश निघण्यापूर्वीच काही कर्मचारी संघटनांनी न्यायालयात धाव घेण्याची तयारी केली आहे.

गतीमान प्रशासन, पेपरलेस कार्यालय आणि कर्मचाऱ्यांमध्ये संगणकीय ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी सरकारी सेवेतील 'अ, ब, क' श्रेणी कर्मचाऱ्यांना एमएस-सीआयटी प्रमाणपत्र २००७ पासून अनिवार्य केले होते. संगणकीय परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी कर्मचाऱ्यांना दैनंदिन कामकाजामध्ये सुटही देण्यात आली होती. दोनवेळा मुदतवाढहती देण्यात आली होती. मात्र मुदतवाढ देवूनही कर्मचाऱ्यांनी संगणक अहर्ता प्राप्त केली नसल्याचे सेवानिवृत्तीचा प्रस्ताव आल्यानंतर स्पष्ट झाले आहे. अशी अहर्ता प्राप्त नसलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती संकलीत करण्यास सामान्य प्रशासनाने पंधरा दिवसापासून सुरुवात केली होती. सरकारची अधिसूचना निघाल्यापासून ज्या कर्मचाऱ्यांने ५० वर्षे वयोमर्यादा पूर्ण केली आहे, अशा कर्मचाऱ्यांना सूट मिळणार होती. तसा प्रस्तावही त्यांना सामान्य प्रशासनाकडे पाठवावा लागणार होता. मात्र अशा प्रस्ताव न पाठवलेल्या व ५० वर्षे पूर्ण होऊपर्यंत त्यांना मिळालेली वेतनवाढ परत घेण्याची अधिसुचनेमध्ये तरतूद केली होती.

त्यानुसार तालुकानिहाय सामान्य प्रशासनाने माहिती संकलित केली आहे. १२ पैकी ११ तालुक्यांतील कर्मचाऱ्यांची माहिती संकलित केली असून यामध्ये सर्वाधिक कर्मचारी हातकणंगले तालुक्यातील असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा सर्व कर्मचाऱ्यांची अधिसुचनेनुसार वेतनवाढ वसूल करावी लागणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या अपात्र कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. सामान्य प्रशासन विभागाकडून अशा अहर्ता नसलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती घेण्याचे काम सुरू झाल्यानंतर त्वरीतच कर्मचारी संघटनांनी न्यायालयात धाव घेण्याची तयारी केली आहे.

आधीच न्यायलयात धाव

गेल्या पंधरा दिवसांपासून सामान्य प्रशासन विभागाकडून एमएससीआयटी अनुत्तीर्ण असलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती संकलीत करण्याचे काम सुरू होते. अनुत्तीर्ण कर्मचाऱ्यांकडून सरकारच्या निर्देशानुसार वेतनवाढ वसुलीचे आदेश निघणार असल्याचे शक्यतेने माहिती संकलीत होण्यापूर्वीच काही कर्मचाऱ्यांनी संघटनांनी न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये आरोग्य विभागाच्या संघटनांचा समावेश असल्याने आश्चर्यच व्यक्त केले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images