Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

विस्कळीत पाणीपुरवठा प्रश्नी आयुक्तांना घेराओ

$
0
0


सोलापूर

उजनी धरणातून सोडलेले पाणी औज बंधाऱ्यात पोहोचल्यानंतरही शहरातील पाणीपुरवठा अद्यापही सुरळीत झालेला नाही. विस्कळीत पाणी पुरवठ्यामुळे नागरीक हैराण झाले आहेत. दर रोज पाणीपुरवठ्यात व्यत्यय येत असल्यामुळे शहरवासियांची झोप उडाली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या भाजप नगरसेवकांनी बुधवारी आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांच्या कार्यालयात ठिय्या मारून विस्कळीत पाणीपुरवठ्याचा जाब विचारला. नगरसेवक सुरेश पाटील, संजय कोळी, अमर पुदाले, पांडुरंग दिड्डी, नरेंद्र काळे, भिमाशंकर म्हेत्रे आदींनी घेराओ घातला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘अन्नसुरक्षां’तर्गत विडी कामगारांना धान्यमुख्यमंत्र्‍यांचे जिल्हाधिकारी मुंढेंना आदेश

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत विडी कामगारांना धान्य पुरवठा करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांना दिले. राज्य सरकार विडी कामगारांना कोणत्याही परिस्थितीत वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाहीही फडणवीस यांनी दिली आहे. दरम्यान, धान्य मिळणार असल्यामुळे पहिल्या टप्प्यात सुमारे ७० हजार विडी कामगारांना दर रोजच्या पोटापाण्याची सोय झाली असून, आता दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच २५ एप्रिलपासून विडी कारखाने सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पालकमंत्री तथा कामगार राज्यमंत्री विजयकुमार देशमुख यांनी बुधवारी माजी आमदार व कामगार नेते नरसय्या आडम, विडी कामगारचे नेते विष्णू कारमपुरी, नारायण जाधव यांच्यासह विडी कामगार महिलांना घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. सोलापुरातील विडी कारखाने बंद असल्यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. काम नसल्यामुळे व काढलेली कर्जे फेडता येत नसल्यामुळे विडी कामगार आत्महत्या करीत आहेत. त्यामुळे सोलापुरातील ७० हजार विडी कामगार व त्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबातील सदस्यांसाठी म्हणून तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी विनंती केली. आडम, कारमपुरी तसेच विडी कामगार महिलांनीही कारखाने सुरू न झाल्यास आमचे जगणे मुश्कील होईल, असे मुख्यमंत्र्‍यांना सांगितले.

अडचणी मोदींच्या कानावर घालणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारी कामानिमित्त मुंबईत आलेले जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांना सोलापुरातील विडी कामगारांसाठी तातडीने अन्नसुरक्षा कायद्याखाली धान्य पुरवठा करण्याचे आदेश दिले. तसेच आपण कोणत्याही परिस्थिती विडी कामगारांना वाऱ्यावर सोडणार नाही. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी सांगितल्याप्रमाणे आपण विडी कामगारांची एकूणच परिस्थिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कानावर घालून मार्ग काढू असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

वीस दिवसांपासून कारखाने बंद

केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने विडी वेस्टनावरील ८० टक्के भागात धोक्याचा इशारा तसेच सूचना सचित्र छापण्याचे आदेश काढले आहेत. या आदेशाचे पालन न केल्यास कारखानदारांना थेट जेलची हवा खावी लागणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात देशभरातील दहा राज्यांतील विडी कारखानदारांनी एक एप्रिलपासून बेमुदत बंद पुकारला आहे. कारखाने बंद पडून २० दिवस झाले आहेत. सोलापुरातील सुमारे ७० हजार विडी कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. हाताला काम नसल्यामुळे हजारो कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला होता.

विडी कामगारांना एक हजार अ‍ॅडव्हान्स?

मंगळवारी सायंकाळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी आपल्या निवासस्थानी सोलापुरातील विडी कारखानदारांना बोलावून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. कारखाने सुरू करण्याची विनंती केली. कारखाने बंद असल्यामुळे कामगारांचे पोटापाण्याचे हाल होत असून, त्यांना एक हजार रुपये अ‍ॅडव्हान्स देण्यास सांगितले. कारखानदारांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

आज पुण्यात होणार बैठक

देशभरात दहा राज्यांमध्ये विडी कारखाने गेल्या वीस दिवसांपासून बंद आहेत. केंद्र सरकार आपल्या निर्णयावर ठाम आहे. कारखानदारही धोका पत्करण्यास तयार नाहीत. या पार्श्वभूमीवर पुढील दिशा ठरविण्यासाठी महाराष्ट्र विडी उद्योग संघाची एक बैठक आज (गुरुवार) पुण्यात होणार आहे. बैठकीत विडी कामगारांना अ‍ॅडव्हान्स देण्याबरोबरच बंद बाबतही चर्चा होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज ठाकरेंची आत्महत्याग्रस्तांना मदत

$
0
0

सोलापूर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसांच्या सोलापूर दौऱ्यावर आले आहेत. बुधवारी सायंकाळी ठाकरे यांच्या हस्ते सोलापुरातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब आणि आत्महत्याग्रस्त विडी कामगार कुटुंबीयांना दहा हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली.

सरकारी विश्रामगृहात सायंकाळी हा कार्यक्रम पार पडला. सोलापूर जिल्ह्यात दुष्काळ, नापिकी व कर्जबाजारीपणामुळे अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शिवाय शहरातील विडी उद्योग बंद असल्यामुळे तीन महिला विडी कामगारांनी आत्महत्या केली आहे. अशा आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांची ठाकरे यांनी भेट घेऊन चर्चा केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शालेय पोषण आहाराचा साठा जप्त

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा

नागेवाडी (ता. सातारा) येथे शालेय पोषण आहाराचे तांदूळ, मूगडाळ, वाटणा असा ४२ पोती साठा सातारा पोलिसांना मंगळवारी रात्री आठ वाजता जप्त केला. या कारवाईमुळे मोठा शालेय पोषण आहार घोटाळा बाहेर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनीही या घटनेला दुजोरा दिला आहे. नागेवाडी येथील नामदेव अंतू सावंत यांच्या घरात शालेय पोषण आहाराचा साठा असून, तो खुल्या बाजारात विक्रीसाठी ठेवण्यात आला असल्याची माहिती सातारा तालुका पोलिसांना मिळाली. त्यानंतर सपोनि सुनील जाधव यांच्या नेतृत्वाखाली पथकाने नागेवाडी येथे जाऊन खात्री केली. त्यामध्ये तांदूळ ३५, वाटाणा व मूगडाळ सात पोती असल्याचे आढळून आले. महामुलकरवाडी (ता. जावली) येथील संजय वसंत महामुलकर याने कोरेगाव येथील सरस्वती विद्यालय, असा शिक्का असलेला हा शालेय पोषण आहार नागेवाडी येथे आणला होता. हा आहार खुल्या बाजारात विकून त्यातून प्रत्येकाला वाटा देण्यात येणार होता. तत्पूर्वी जागृत नागरिकांच्या दक्षतेमुळे पोलिसांच्या हाती मुद्देमाल लागला. सदर घटनेची माहिती पत्रकारांना समजल्यानंतर कारवाई गतीने सुरू झाली.
सातारा जिल्ह्यात यापूर्वी कोरेगावातीलच एका व्यापाऱ्याच्या साताऱ्यातील गोदामात शालेय पोषण आहार सापडला होता. तत्कालीन जिल्हा पुरवठा अधिकारी शमा पवार-ढोक यांनी स्वत:हून कारवाईत भाग घेतला होता. त्यानंतर अशीच कारवाई झाल्यानंतर कोरेगावातील संबधित शाळा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोयनेच्या वीजनिर्मितीसाठीच्यापाण्यामध्ये १५ टीएमसीची कपातकोयनेच्या वीजनिर्मितीसाठीच्यापाण्यामध्ये १५ टीएमसीची कपात

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, कराड
दुष्काळ व तीव्र पाणीटंचाई यामुळे कोयना धरणातून वीजनिर्मितीसाठी देण्यात येणाऱ्या

पाण्याच्या कोट्यापैकी १५ टीएमसी पाणी कपात करण्यात आली आहे. परिणामी

वीजनिर्मिती कमी होऊन पाणी पिण्यासाठी आणि शेतीसाठी वापरले जाणार आहे.
कोयना धरणात १०५.२५ टीएमसी पाणी साठवण्याची क्षमता आहे. दर वर्षी १ जून ते ३१

मे या कालावधीत पोफळी, कोयना चौथा टप्पा व अलोरे या तीन जलविद्युत

प्रकल्पासाठी ६७.५० टीएमसी पाणी वीजनिर्मितीसाठी दिले जाते. महाराष्ट्र-कर्नाक व आंध्र

प्रदेश राज्यांसाठीच्या पाणीवाटप लवादानुसार हा कोटा वीजनिर्मितीसाठी दिला जातो.

ऑक्टोबरनंतर येथील पूर्वेकडील जिल्ह्यांमध्ये सिंचनासाठी २२ टीएमसी किंवा गरजेनुसार

जादा पाणी सोडण्याची तरतूद आहे. या वर्षी पाऊस कमी पडल्याने कोयनेचे धरण पूर्ण

क्षमतेने भरले नाही. त्यातच दुष्काळ व तीव्र पाणीटंचाईमुळे वीजनिर्मितीच्या पाणी

कोट्यात १५ टीएमसी पाणी कपात करण्यात आली आहे. त्यामुळे पोफळी, चौथा टप्पा व

अलोरे या वीजनिर्मिती केंद्रात सुमारे ६६ कोटी ५० लाख युनिट वीजनिर्मिती कमी होणार

असल्याने सुमारे ४ अब्ज रुपयांचे महसुली उत्पन्नावर पाणी पडणार असून, त्याचा थेट

फटका राज्याच्या तिजोरीवर होणार आहे.
यंदा पाऊस कमी झाल्याने कोयना धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने खाली गेली

आहे. त्यामुळे पूर्वेकडील विभागासाठी कोयना धरणातून सिंचनासाठी सातत्याने पाणी

सोडावे लागले. कोयना धरणाच्या निर्मितीनंतर प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात

सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले. आतापर्यंत धरणातून २७.२० टीएमसी पाणी

सिंचनासाठी सोडण्यात आले असून, धरण पायथा वीजगृहातून या पाण्यावर ११७.६२३

दशलक्ष युनिट इतकी वीज तयार करण्यात आली आहे. कमी पावसामुळे वर्षभरात केवळ

७४.२८ टीएमसी पाणी धरणात जमा झाले होते. त्यातील सिंचनासाठी जादा पाणी

देण्यात आले आहे. आता धरणात केवळ ३२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यावरच

आता ३१ मेपर्यंतचे तांत्रिक वर्ष पूर्ण होईपर्यंत व जून महिन्यात पाऊस पडेपर्यंत

वीजनिर्मिती, शेती व पिण्याच्या पाण्यासह मृत पाणीसाठ्याबाबतही काटेकोर नियोजन

करावे लागणार आहे.
असा झाला कोयनेच्या पाण्याचा वापर
कोयना धरणाची १०५.२५ टीएमसी पाणी साठवण क्षमता
तीन जलविद्युत प्रकल्पांसाठी ६७.५० टीएमसी राखीव
पाणीवाटप लवादानुसार सिंचनासाठी २२ टीएमसी किंवा गरजेनुसार जादा पाणी

सोडण्याची तरतूद.
पाणीटंचाईमुळे वीजनिर्मितीच्या पाणी कोट्यात १५ टीएमसीने कपात
सुमारे ६६ कोटी ५० लाख युनिट वीजनिर्मिती कमी होणार
सुमारे ४ अब्ज रुपयांचे महसुली उत्पन्नावर पाणी पडणार
धरणातून २७.२० टीएमसी पाणी सिंचनासाठी सोडण्यात आले यंदा ७४.२८ टीएमसी पाणी

धरणात जमा झाले होते.
सध्या धरणात केवळ ३२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वॉटर कप’साठी ३७ गावे लागली कामाला

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सातारा
'सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धे' साठी साताऱ्यातील ३७ गावामंधील ग्रामस्थ झपाटून

कामाला लागले आहेत. पाझर तलाव खोदाई, नालाबांध, वनराई बंधाऱ्यातील गाळ

काढण्यासह जलसंधारणाची विविध कामे केली जात आहेत.
सलग ४५ दिवस गावांत श्रमदान करण्याचा निर्धार
पाणी फाउंडेशन संस्थेने केला आहे. महाराष्ट्रातील तीन तालुक्यांमधील एकूण ११९ गावे

सहभागी झाली आहेत. त्यात कोरगाव तालुक्यातील एकूण ३७ गावांचा समावेश आहे.

स्पर्धा जिंकण्यासाठी संबधित गावातील ग्रामस्थांनी चंग बांधला आहे.
अशी आहे स्पर्धा आणि निकष
२० एप्रिलपासून सुरु झालेली सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा सलग ४५ दिवस चालणार

आहे. यातील प्रथम विजेत्या गावाला ५० लाख, द्वितीय क्रमांकाला ३० लाख व तृतीय

क्रमांकाला २० लाखांचे बक्षीस मिळणार आहे.
वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या गावांसाठी एकूण शंभर गुणांचे निकष लावण्यात

येणार आहेत. यामध्ये श्रमदानास ५० गुण, मशिनने केलेल्या कामास २५ गुण,

लोकसहभाग १० गुण, जलजागृती प्रयत्न १० गुण व नावीन्यपूर्ण उपक्रमास ५ असे

निकष लावण्यात येणार आहेत. या स्पर्धेत राज्यातील एकूण ११९ गावे सहभागी झाली

आहेत. त्यात कोरगाव तालुक्यातील एकूण ३७ गावे आहेत. यानुसार ज्या गावांना

अधिक गुण मिळणार ते गाव या स्पर्धेतील विजेता ठरणार आहे, अशी माहिती या

स्पर्धेचे प्रमुख संयोजक सामाजिक कार्यकर्ते डॉ. अविनाश पोळ यांनी 'मटा'ला दिली.
आमीर-सचिन आणि अंबानींची पाणी फाउंडेशन
महाराष्ट्रातील दुष्काळ हटविण्यासाठी अभिनेते आमीर खान, मुकेश अंबानी व सचिन

तेंडुलकर यांनी पाणी फाउंडेशनची स्थापना केली आहे. केवळ सरकारी मदतीवर किंवा

निसर्गावर अवलंबून न राहता लोकसहभाग आणि श्रमदानाच्या माध्यमातून जनजागृती

व जलजागृती करण्याचे काम संस्थेमार्फत केले जात आहे.
कोरेगावमध्ये जलसंधारणाच्या कामांना वेग
कायम दुष्काळी भाग, अशी ओळख असलेल्या कोरेगाव तालुक्याच्या अनेक गावांत

वनराई बंधारे, पाझर तलावांचा गाळ काढणे, वृक्ष लागवडीसाठी खड्डे काढणे,

गायरानासाठी पसिर स्वच्छता, लागवड केलल्या सीताफळ रोपांसाठी पाणी अडवण्याचे

काम, नाला बांध बनवणे आदी कामे सुरू केली आहेत. न्हावी, वेळू , हिवरे, जायगाव,

पळशी यासह उत्तर भागातील बिचुकले आदी गावांत हा उपक्रम मोठ्या उत्साहात सुरु

झाला आहे. अभिनेते चिन्मय उदगीरकर आणि तेजपाल वाघ यांनी पळशी गावात येउन

ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. तसेच या कामासाठी एकूण एक लाखांची मदत घोषीत

केली.
'ना राजकारण, ना पक्ष, जलसाक्षरता आमचे लक्ष्य'
बिचुकले गावाने काळाची पावले ओळखून ना राजकारण, ना पक्ष, जलसाक्षरता व

ग्रामविकास हे आमचे लक्ष्य, असा नारा देत गेल्या तीन वर्षांपासून गावचा परिसरात

जलसंधारण, ग्रामस्वछता व दुष्काळनिवारणाच्या कामास प्राधान्य दिले आहे. या

उपक्रमासाठी समाजसेवक डॉ. अविनाश पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली श्रमदान ग्रुप, या

नावाने संस्था स्थापन केली आहे. या ग्रुपच्या माध्यमातून गावातील शेकडो युवक,

ग्रामस्थ कामाला लागले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कासचा पाणीसाठा दहा फुटांवर२५ जूनपर्यंत पाणी पुरण्याचा अंदाज

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सातारा
सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास तलावाचा पाणीसाठा साडेदहा फुटांवर येऊन

पोहचला आहे. वाढत्या उन्हाचा फटका कास तलावाला बसत असून, पाण्याचे झपाट्याने

बाष्पीभवन होत आहे. त्यामुळे पाणीसाठ्याची उंची दर रोज अडीच ते पावणेतीन इंचाने

कमी होत आहे. तरीही 'डेड स्टॉक' आणि साताऱ्याचे पाणी नियोजन लक्षात घेता

पाणीसाठा साधारण २५ जूनपर्यंत पुरेल, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाच्या सूत्रांनी

दिली.
अर्धा टीएमसीपेक्षा कमी पाणी साठवण क्षमता असणारा ब्रिटिशकालीन कास तलाव

सातारा शहराची लाइफलाइन आहे. दोन ते तीन मोठे पाऊस झाल्यावर बशी सारखा

खोलगट तळ असणारा तलाव तत्काळ भरतो. आणि वर्षभर सातारकरांची तहान

भागवतो. सध्या कास तलावाचा पाणीसाठा साडेदहा फुटांवर आला असून, गतवर्षी हा

पाणी साठा आठ फुटांवर होता. रोजच्या साडेआठ लाख लीटर पाणी उपशाने एक ते

सव्वा फूट पाणीपातळी कमी होत आहे. त्यात वाढते तापमान कास तलावासाठी

अडचणीचे ठरत आहे. उन्हाचा हा तडाखा २९ मार्चपासून जास्तच जाणवू लागला आहे.

त्यामुळे कास तलावात होणाऱ्या बाष्पीभवनाचा वेगही वाढला आहे. त्यामुळे गेल्या तीन

आठवड्यात पाणी उपशाच्या तुलनेत उष्णतेने पाणीपातळी दीड फुटाने खालावली आहे.
२३ टक्के पाण्याची गळती
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने शहरात निळ्या पाइपची बावीस हजार कनेक्शन दिल्याचे

लेखी पत्र पालिकेला दिले आहे. मात्र, सुमारे तेरा हजार कनेक्शनची पालिकेच्या रेकॉर्डला

नोंदच नाही. त्यामुळे काही लाख लीटर पाण्याचा फुकट वापर होतो आहे. याचा

आजतागायत गांभीर्याने विचार झालेला नाही. पाणीपुरवठा विभागाने याचा सविस्तर

अहवाल मुख्याधिकारी अभिजित बापट यांना सादर केला आहे. मात्र, त्या पत्राबाबत

आजवर काहीच कारवाई झालेली दिसत नाही. तब्बल तेवीस टक्के पाण्याची गळती होत

असून, ही गळती डोकेदुखीचा विषय बनला आहे. बोगदा परिसरातील ऐतिहासिक

हौदाच्या नळाची गळती चोवीस तास सुरू असते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाविक अंबाबाईच्या दारात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

चैत्र यात्रेनिमि‌त्त जोतिबाचे दर्शन घेऊन शुक्रवारी परतीला लावलेल्या भाविकांची करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी गर्दी झाली. सकाळपासूनच अंबाबाईच्या दर्शनासाठी मंदिरात यात्रेकरुंच्या रांगा लागल्या. या यात्रेकरुंसाठी खास महाप्रसादाचेही वाटप करण्यात आले.

जोतिबा यात्रेनिमित्त आलेले आंध्र-कर्नाटकांतील भाविकांसह मुंबई, पुण्याच्या भाविकांची संख्या लक्षणीय होती. जोतिबा यात्रेसाठी पाच ते सहा लाख भाविक गुरुवारी दाखल झाले होते. परगावाहून आलेल्या भाविकांनी रात्री श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. काहींनी शुक्रवारी सकाळपासूनच दर्शनरांगेमध्ये गर्दी केली. शुक्रवारी पालखी सोहळ्याबरोबर रथोत्सावासाठीही यात्रेकरु मंदिर परिसरात थांबले होते.

महाप्रसादाचे वाटप

जोतिबाचे दर्शन घेऊन श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी श्री अन्नछत्राच्यावतीने रामाचा पार येथे पीठल-भाकरीचे वाटप करण्यात आले. सचिव शुभांगी साठे यांच्या हस्ते प्रसादाचे वाटप करण्यात आले. यामध्ये चार हजाराहून अधिक भाविकांनी लाभ घेतला. मुख्य दर्शन मार्गाजवळ गांधीनगर येथे ओम शांती फ्रेंड सर्कलच्यावतीने भाविकांना शिरा, भात, आमटी प्रसादाचे वाटप करण्यात आले. पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था करण्यात आली होती.

लाडूऐवजी महाप्रसाद

अंबाबाईच्या दर्शनानंतर परगावचे तसेच परराज्यातील भाविकांकडून देवीच्या लाडूप्रसादाची मागणी होत आहे. मात्र सध्या देवस्थानतर्फे लाडूप्रसाद वादाच्या भोवऱ्यात असल्यामुळे श्री महालक्ष्मी अन्नछत्र व काही संस्थांच्यावतीने देण्यात आलेल्या महाप्रसाद आधार ठरला.

पार्किंग हवे

दिवसेंदिवस अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची संख्या वाढत आहे. भाविकांच्या वाहनांसाठी बिंदू चौकात एकमेव पार्किंगची व्यवस्था आहे. त्यामुळे मंदिर परिसरात वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण होत आहे. मंदिर परिसरातील अतिक्रमणे, महाद्वार रोडवरील फेरीवाल्यांची वाढती संख्या, रिक्षा, पर्यटकांची वाहने यामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘सिटीझन रिपोर्टर अॅप’ सुविधांचे स्वागत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

घटनेच्या ठिकाणावरुन थेट बातमी पाठवण्याची सुविधा 'महाराष्ट्र टाइम्स सिटीझन रिपोर्टर अॅप' मधून उपलब्ध झाली आहे. यामुळे खरोखरच एखाद्या समस्येची मांडणी करण्याबरोबरच त्याची सोडवणूक करण्यासाठी सुलभ झाली आहे, अशा प्रतिक्रिया ​'सिटीझन रिपोर्टर'नी व्यक्त केल्या.

या आठवड्यामध्ये विशेष बातमी दिलेल्या ओंकार परमणे, अक्षय गुरव यांना तर सय्यद पटेल यांच्यावतीने परझाना पटेल व नुजबा पटेल या 'सिटीझन रिपोर्टर'ना 'महाराष्ट्र टाइम्स' चे मुख्य प्रतिनिधी गुरुबाळ माळी यांच्या हस्ते विशेष प्रमाणपत्र देण्यात आले. या उपक्रमाने सामान्यांना 'महाराष्ट्र टाइम्स' ने बळ दिले आहे, अशा भावनाही 'सिटीझन रिपोर्टर' नी व्यक्त केल्या.

एखादी घटना पूर्वीपेक्षा अधिक वेगाने पाठवणे सोपे झाले आहे. त्याचा परिणामही होत असून नागरिकांना समस्या सोडवण्याचा आनंद मिळत आहे. 'महाराष्ट्र टाइम्स' ने राबवलेला हा उपक्रम खरोखरच महत्वाचा आहे.

- अक्षय गुरव, कोल्हापूर

अनेक समस्या सुटणे गरजेचे आहे, असे वाटत असते. त्यासाठी एखाद्या यंत्रणेकडे तगादा लावता येतो. पण त्यासाठीचा वेळ व श्रम खर्च करण्यापेक्षा 'महाराष्ट्र टाइम्स'च्या या उपक्रमातून सहजपणे एखादी समस्या मांडणे सोपे झाले आहे. शहरवासियांसाठी हा एक प्रकारचा दिलासाच आहे.

- ओंकार परमणे, कोल्हापूर

समाजात अनेक घटना घडत असतात. त्यांच्यामधून विविध समस्या जन्माला येत असतात. त्याकडे फार कुणी लक्ष देत नाही. त्या समस्येचे भयानक स्वरुप समोर आले की नागरिकांची धावाधाव सुरू होते. प्रशासन त्यासाठी उपाय योजण्यास सुरूवात करते. अशा समस्या वेळीच प्रशासनासमोर आणण्यासाठी 'सिटीझन रिपोर्टर' सारखे अॅप 'महाराष्ट्र टाइम्स' ने शहरवासियांच्या हातात दिले आहे. या उपक्रमाला शहरवासियांनी भरभरुन प्रतिसाद दिला असून उपनगरासारख्या भागातील समस्याही ठळकपणे मांडू लागले आहेत. यामुळे शहराच्या विकासाच्यादृष्टीने शहरवासियांकडूनच हातभार लावला जात आहे. ा जिथे असाल तिथून ती समस्या फोटोसह पाठवता येते. त्याचा फायदा शहरवासियांनाच होत आहे. हा उपक्रम आधार देणारा आहे, अशा भावना व्यक्त झाल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोबाइल चोरून अवधूतने काढले उट्टे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दहा महिन्यांपूर्वी रुममधून स्वतःचा मोबाइल आणि एक हजार रुपये चोरीला गेल्याचा राग एकोणीस वर्षीय अवधूतला आला. इतर मुले चैनीत जगतात, पण आपण धड जगूही शकत नाही याचा राग त्याला आला आणि तो अट्टल घरफोड्या बनला अशी माहिती पोलिसांच्या तपासात उघड झाली आहे. दर आठवड्याला अवधूत नवीन मोबाइल विकत घेत होता. विकत घेतलेला मोबाइल कमी किंमतीत एक्स्चेंज करायचा. प्रत्येक आठवड्याला तीन ते चार हजार रुपये जादा देऊन दुसरा नवीन मोबाइल खरेदी करत होता. एका मुलगा महागडे मोबाइल दर आठवड्याला कसा बदलतो याची शंका विक्रेत्यांना आली आणि तेथेच अवधूत ईश्वर पाटीलचे बिंग फुटले.

मोबाइल विक्रेत्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी पाळत ठेऊन खातरजमा केली. नंतर त्याला पकडल्याचे निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी सांगितले.

अवधूतने यंदा बारावीची परीक्षा दिली आहे. तो सीईटीच्या परीक्षेची तयारीही करतो आहे. कॉलेजच्या शिक्षणासाठी कोल्हापुरात रहायला आल्यावरही त्याचे वर्तन चांगले होते. मात्र दहा महिन्यांपूर्वी त्याच्या रुममधून आई-वडिलांनी दिलेले एक हजार रुपये, भावाने विकत घेऊन दिलेला मोबाइल चोरीला गेला. त्यामुळे त्याला प्रचंड राग आला. त्याच्या खिशात पैसे नव्हते. बाकीचे विद्यार्थी महागडे कपडे घालतात, महागडे मोबाइल घेतात. पण आपल्याकडे काहीच नाही याची लाज वाटू लागली. आपणही चोरी केली पाहिजे असे ठरवून त्याने एकत्र राहत असलेल्या मुलांच्या खोलीतील दोन मोबाइल चोरले. ओएलएक्सवर बनावट अकाउंटवरून दोन मोबाइल ३२०० रुपयाला विकले.

ओएलएक्सवर बनावट अकाउंट

अवधुत चोरीतील मोबाइल व लॅपटॉप त्याने ओएलएक्सवर प्रत्येक वेळी खोटे अकाउंट व ई-मेल आयडी तयार करून विकले. नंतर तो मोबाइलचे सीमकार्ड नष्ट करत होता अशी माहिती पोलिसांच्या तपासात पुढे आली आहे. त्याने महागडे मोबाइल घेतले. ब्रँडेड कपडे वापरू लागला. मोटारसायकल हवी म्हणून सावंतवाडीतून त्याने मोपेड चोरली. चोरी केलेल्या पाकिटातील कृष्णात सिताराम बाचणकर यांचे लायसन गोव्यात देऊन यामाहा कंपनीची 'आर १५' बाइक चोरून आणली. बनावट नंबरप्लेट वापरून तो बाईक फिरवत होता. रात्र बंद फ्लॅट व घरात शिरून त्याने मिळतील त्या वस्तू चोरल्या.

अवधूतच्या सीईटीचे प्रयत्न

'अवधूतला चोरीचा पश्चाताप झाला होता. आपण चुकीचे करतोय अशी त्याची भावना झाली होती. तो पोलिसांकडे जाणार होता. पण धाडस होत नव्हते. त्याच्या मेडिकलसाठी सीईटी परीक्षेसाठी पोलिस प्रयत्न करतील असे पोलिस अधीक्षक देशपांडे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाच टोळ्यांना ‘मोक्का’ची तयारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर परिक्षेत्रातील १८ गुन्हेगारी टोळ्यांमधील १५७ गुंडांना मोक्का (संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) लावण्यास विशेष पोलिस महानिरीक्षक संजयकुमार वर्मा यांनी मंजुरी दिल्याने कोल्हापूर शहरातील पाच टोळ्यांना लगाम बसणार आहे. यामध्ये गुंड स्वप्नील तहसीलदार (एसटी गँग), कवाळे गँग यासह झोपडपट्ट्यांमधील काही गुंडांचाही समावेश आहे. या कारवाईमुळे कायदा-सुव्यवस्था राखण्यास मदत होईल.

जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन महिन्यात वाढलेल्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था राखण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले होते. दिवसाढवळ्या होणाऱ्या मारामाऱ्या, दोन गटातील राड्यातून होणारे तलवार हल्ले, खेळाच्या कारणातून होणारी सशस्त्र मारामारी या घटनांमुळे पोलिसांचा वचक आहे की नाही?, अशा प्रश्न उपस्थित केला जात होता. अशा घटनांना पायबंद घालण्यासाठी यापूर्वीच तीसहून अधिक गुंडांवर मोका लावण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र राजकीय हस्तक्षेप, प्रस्तावातील त्रुटी यामुळे ते प्रस्ताव मंजूर होऊ शकले नव्हते.

दोन महिन्यांपूर्वी जिल्हा पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन विधीतज्ज्ञांच्या सहायाने नव्याने प्रस्ताव करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार एसटी गँग, राजारामपुरीतील वास्कर गँग, रमणमळा येथील गायकवाड गँग यासह काही झोपडपट्ट्यांमधील गुंडांवरही मोका कारवाईचे प्रस्ताव तयार केले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिल्डरला ५२ लाखांचा दंड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

समावेशक आरक्षणांतर्गत व्यापारी संकुल विकसित करताना महापालिकेला बांधून द्यावयाच्या इमारतीचे बांधकाम मुदतीत पूर्ण करून न दिल्यामुळे आशापुरम डेव्हलपर्सचे अमृतलाल शहा यांना ५२ लाख ६५ हजार ६६६ रुपये दंड करण्यात आला. दंडात्मक कारवाईनंतर महिना उलटला तरी अद्याप बांधकाम व्यावसायिकाने दंडाची रक्कमही भरलेली नाही. त्यामुळे शहा यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी महिला व बालकल्याण समिती सभापती वृषाली कदम आणि नगरसेवक भूपाल शेटे यांनी पत्रकार परिषदेत केली.

नगरसेवक शेटे म्हणाले, 'महापालिकेने हॉकी स्टेडियम शेजारील रिसनं ७०९ जागा समावेशक आरक्षणमधील जागा विकसित करण्यासाठी दिली. ही जागा विकसित करताना बांधकाम व्यावसायिक शहा यांनी महापालिकेला ९०८ चौरस मीटर एवढे क्षेत्र दुकानगाळे, ऑफीससाठी बांधकाम करायचे होते. करारानुसार १४ मार्च २०१५पर्यंत महापालिकेला द्यायच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण करणे आवश्यक होते. मात्र महापालिकेच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण केलेले नाही. उलट शहा यांनी स्वतःचे रोबंगले, फ्लॅट विकसित करून विक्री केली.'

सभापती कदम, नगरसेवक शेटे म्हणाले, 'बांधकाम व्यावसायिकाने ​नियमांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आणून त्यांच्यावर कारवाईची मागणी आम्ही केली. तक्रारीनंतर आयुक्तांसह अन्य अधिकाऱ्यांनी त्याची पाहणी केली. शहा यांनी कराराचा भंग केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक धनंजय खोत यांनी २८ मार्च २०१६ रोजी दंडात्मक कारवाईचा आदेश काढला. सहाय्यक संचालकांनी आदेश काढूनही शहा यांनी दंड भरलेला नाही.'

खरेदी विक्रीला मनाई

'महापालिका प्रशासनाने, दुय्यम निबंधक करवीर क्रमांक एक, दोन, तीन व चार या कार्यालयांना पत्र पाठवून या मिळकतीमधील सदनिका, दुकागनगाळे खरेदी-विक्रीस मनाई केली आहे' असे नगरसेवक शेटे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कळंबा’त सापडले आणखी एक कासव

$
0
0

'कळंबा'त सापडले आणखी एक कासव

कोल्हापूर : कळंबा तलावात आठवडाभरापासून सुरू असलेल्या शोध मोहिमेतून शुक्रवारी आणखी एक कासव सापडले. आतापर्यंत तीन मोठी कासव शोध मोहिमेतून सापडली असून या साऱ्यांना रंकाळा तलावात सोडण्यात आले आहे.

कळंबा तलावात यापूर्वी २२ किलो वजनाचे कासव सापडले होते. शुक्रवारीही २२ किलो ३०० ग्रॅम वजनाचे कासव सापडले. दरम्यान, यापूर्वी सापडलेल्या कासवापेक्षा हे कासव मोठे आहे. वनक्षेत्रपाल ए. बी. निंबाळकर, वनरक्षक आर. के. देसा, राजू उलपे, वनमजूर गजानन मगदूम, भगवान चौगुले, सुरेश कांबळे, उत्तम जाधव यांच्या पथकाने ही मोहिम राबवली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अंबे’च्या जयघोषात रथोत्सव उत्साहात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ढोल-ताशाच्या गजर, फुलांचा गालिचा, आकर्षक रांगोळ्या आणि भक्तांचा उदं गं अंबे उदं नावाच्या जयघोषात शुक्रवारी रात्री मंगलमय वातावरणारात करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या रथोत्सवाला सुरुवात झाली. सायंकाळी साडेनऊ वाजता सुरू झालेला हा सोहळा मध्यरात्रीपर्यंत रंगला.

चांदीच्या रथातून उत्सवमूर्तीवर पुष्पवृष्टी केली जात होती. डोळे दिपवणारा लेझर किरणांचा शो आणि आकर्षक आतषबाजीने संपूर्ण करवीरनगरी भक्तीरसात रमून गेले होते. शहरासह जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो भाविकांनी हा सोहळा डोळ्यात साठवून ठेवला. जोतिबाच्या चैत्र यात्रेच्या दुसऱ्यादिवशी अंबाबाईचा रथोत्सव साजरा केला जातो.

शु६ वाजल्यापासून मिरवणुक मार्गावर फुलांचा गालिशा व रांगोळी काढण्यासाठी सेवेकरी आले होते. सायंकाळी सायंकाळी ५ वाजता रथ मंदिराच्या पूर्वेकडील दरवाजासमोर आणून रथाची सजावट करण्यात आली. गुजरीत उभारण्यात आलेली अंबाबाई देवीची आकर्षक प्रतिकृती, केलेली सजावट, आतषबाजी यंदाचे आकर्षण ठरले. गुजरी मित्रमंडळाने देहू आळंदीच्या समर्थ ग्रुपचे रंगावली कलाकार आणले होते. महाद्वार चौक, महाद्वार रोड, गुजरी कॉर्नर, गुजरी, भाउसिंगजी रोड, भवानी मंडप, गुरुमहाराज वाडा, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिरमार्गे रथोत्सव मिरवणुकीची सांगता अंबाबाई मंदिरात झाली.

अंबाबाईच्या रथाचे पूजन सचिन व शुभांगी साठे, राजेंद्र देशमुख, प्रमोद पाटील, संगीता खाडे, धनाजी जाधव यांच्या उपस्थितीत झाले. खासदार धनंजय महाडिक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. शाहू गर्जना पथकाने भवानी मंडपात तर बालगोपाल तालमीजवळ महालक्ष्मी प्रतिष्ठान ढोल-ताशा पथकाने सलामी दिली. महालक्ष्मी आरती व अध्यापन सेवा संस्थेच्यावतीने उपस्थितांना लाडूचे वाटप करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तृप्ती देसाई यांचाही जबाब नोंदविणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अंबाबाई मंदिर प्रवेशाच्यावेळी भाविक आणि पुजाऱ्यांनी केलेल्या मारहाणीत जखमी झालेल्या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांचा जबाब घेण्यात येणार आहे. पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.

तृप्ती देसाई यांना अंबाबाई मंदिरातील गाभाऱ्यात प्रवेश करताना श्रीपूजकांसह भाविकांनी मारहाण केली होती. पोलिसांनी याप्रकरणी अॅड. केदार मुनिश्वर, श्रीश मुनिश्वर, अशिष अष्टेकर, मयूर मुनिश्वर, अशिष अष्टेकर, मयूर मुनिश्वर, निखिल शानभाग, किसन कल्याणकर, जयकुमार शिंदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. या प्रकरणाच्या तपासासाठी गडहिंग्लज विभागाचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक दिनेश बारी यांची नियुक्ती केली आहे. गाभाऱ्यात आणि मंदिरात घडलेल्या घटनांची तपासणी सीसीटीव्ही फुटेजवरून करण्यात आली आहे. हल्ल्यावेळी उपस्थित पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांचे जबाब घेण्यात येत आहेत. देसाई यांचाही जबाब होईल. जबाब कोल्हापुरात घेणार की अन्य ठिकाणी हे तपास अधिकारी ठरवतील असे देशपांडे यांनी सांगितले. गुन्ह्याचा सखोल तपास करून कोर्टात वेळेत आरोपपत्र दाखल होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आता शिवसेनेचे ‘पॅचवर्क’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या प्रभाग समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत पक्षादेश डावलल्याप्रकरणी कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागलेल्या शिवसेनेच्या नगरसेवकांना नेत्यांनी एकीकडे कानपिचक्या दिल्या. गटनेत्याच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी शिवसेना पदाधिकाऱ्यांवर टीका सुरू झाल्यानंतर वरिष्ठ नेत्यांनी नगरसेवकांना विविध कार्यक्रमात सामावून घेत प्रकरण मिटवण्याच्या दिशेने पावले टाकली. गटनेते नियाज खान यांनीही घरावरील हल्ल्याप्रकरणी पोलिसात फिर्याद दिलेली नाही. तर दुसरीकडे पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत स्वतः फिर्याद देऊन कायदेशीर कारवाई करतील असे जिल्हा पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी स्पष्ट केले.

गटनेते नियाज खान, अभिजीत चव्हाण, ​राहुल चव्हाण, नगरसेविका प्रतिज्ञा निल्ले आदींनी सर्किट हाऊस येथे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांची भेट घेतली. महापालिकेत शिवसेनेच्या नगरसेवकांवर होणारा अन्याय, निधी वाटपातील दुजाभाव या गोष्टी संपर्कप्रमुखांच्या निदर्शनास आणल्या. मात्र संपर्कप्रमुखांनी, महापालिकेच्या प्रभाग समितीच्या निवडणुकीत नगरसेवकांनी पक्षादेश डावलल्याप्रकरणी चांगल्याच कानपिचक्या दिल्याचे वृत्त आहे. नगरसेवकांच्या तक्रारी ऐकून घेत त्यांची सोडवणूक केली जाईल असे संपर्कप्रमुखांनी सांगितले. शिवाय गरज भासल्यास पक्षप्रमुख उद्ध्व ठाकरे यांच्याशी भेट घडवून आणण्यात येईल असेही नगरसेवकांना सांगण्यात आले.

आमदार राजेश क्षीरसागर यांनी बुधवारी महापालिकेत येऊन नगरसेवकांना दमबाजी केली होती. जिल्हाप्रमुख संजय पवार आणि इतर पदा​धिकाऱ्यांनी गुरूवारी रात्री गटनेते नियाज खान यांच्या घरावर हल्ला केला होता. भगिनी महोत्सवाच्या पूर्वसंध्येला काल रात्री आमदार क्षीरसागर यांनी सेनेच्या चारही नगरसेवकांची भेट घेऊन समजूत काढली. याप्रश्नी मंत्री दिवाकर रावते, संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर यांची भेट घडवून आणण्याचे आश्वासन दिले होते.

शुक्रवारी आमदार क्षीरसागर यांच्यातर्फे आयोजित भगिनी महोत्सवाला शुक्रवारी सुरूवात झाली. या कार्यक्रमाच्या उदघाटन सोहळ्याला चारही नगरसेवक उपस्थित होते. कार्यक्रमात संपर्कप्रमुखांनी पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांच्या विरोधात कारवाईचा इशारा दिला. मात्र या कार्यक्रमादरम्यान नगरसेवकांशी चर्चा करत सबुरीचा सल्ला दिला. मात्र परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी या प्रकरणी भाष्य करण्याचे टाळले.

पोलिस फिर्यादी होतील

दरम्यान, खान यांनी फिर्याद न दिल्यास पोलिस स्वतः फिर्याद देणार असून कायदेशीर कारवाई करतील, असे अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोलापूरच्या सरकारीहॉस्पिटलमध्ये औषधांचा तुटवडा

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा सरकारी हॉस्पिटलमध्ये मागील चार महिन्यांपासून जैविक आणि वेदनाशामक औषधांचा कमालीचा तुटवडा भासत आहे. पेशंटवर तात्पुरता उपचार केला जात आहे. औषधांअभावी पुढील उपचार थांबवावे लागत आहेत. औषधे उपलब्ध नसल्यामुळे निवासी डॉक्टरांवर मात्र पेशंटचा रोष दिवसेंदिवस वाढू लागला आहे.

पेशंटचा वाढता भार

हॉस्पिटलमध्ये दर रोज पेशंट आणि डॉक्टरांमध्ये औषधांवरून वाद होत आहेत. सरकारकडे औषधांची वेळोवेळी मागणी करून सुद्धा त्यांच्याकडून काहीच कार्यवाही होतना दिसत नाही. हॉस्पिटल डॉ. वैशंपायन स्मृती सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न असून, येथे ७३३ खाटांची सोय आहे. महाराष्ट्रासह कर्नाटकातूनही येणाऱ्या बाह्य रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दररोज १२०० ते १५०० रुग्ण बाह्यरुग्ण सेवेचा लाभ घेतात. तसेच दर रोज साधारणपणे १०० ते १५० अंतर रुग्ण म्हणून दाखल होत असतात. दर रोज दहा ते पंधरा मोठ्या व लहान २० ते २५ शस्त्रक्रिया केल्या जातात. शिवाय १५ ते २० सर्वसाधारण प्रसूती दररोज होतात. ५ ते १० कुटुंब नियोजन शस्त्रक्रियाही करण्यात येतात. या शिवाय सरासरी २ ते अडीच हजार रक्त व लघवी संबंधित तपासण्या होतात. गरीब पेशंट येत असल्याने त्यांच्यावर पूर्ण उपचार करण्याची गरज असते. पण, औषधांच्या अभावामुळे ते शक्य होताना दिसत नाही. डॉ. राजाराम पोवार यांनी अधिष्ठाता म्हणून पदभार घेतल्यापासून हॉस्पिटलमध्ये चांगले उपचार मिळत आहेत. पण, औषधांच्या कमतरतेमुळे त्यांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे.
......

दर रोज एक हजारांहून अधिक पेशंट येतात. त्यांना सेवा देण्यात निवासी डॉक्टर कुठेही कमी पडत नाहीत. परंतु, मागील चार महिन्यांपासून औषधे उपलब्ध नसल्यामुळे डॉक्टर आणि पेशंटमधील वादाच्या घटना वाढल्या आहेत.
डॉ. कैलाश कागणे, अध्यक्ष, मार्ड संघटना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोलापूर इफेड्रीन प्रकरणआरोपींच्या पोलिस

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

मोहोळ तालुक्यातील चिंचोळी एमआयडीसी येथील एव्हॉन सायन्सेस लिमिटेड कंपनीत धाडी टाकून गेल्या दहा दिवसांत ठाणे पोलिसांनी २३ टन इफेड्रीन या अंमली पदार्थाचा साठा जप्त केला आहे. दरम्यान, या प्रकरणातील आरोपी सागर पवळे, मयूर सुखदरे, धानेश्वर स्वामी, राजेंद्र डिमरी यांची पोलिस कोठडी सोमवारी संपणार होती. ठाणे कोर्टाने त्यांच्या पोलिस कोठडीत तीन दिवसांची वाढ केली आहे.

राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या चिंचाळी एमआयडीसीमधील एव्हॉन कंपनीत पकडलेल्या २३ टन ड्रग्जच्या कागदपत्रांची तपासणी सुरू झाली आहे. १२ एप्रिल रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास ठाण्यात दोन स्विप्ट कारमधून इफेड्रीन हा अंमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला होता. या प्रकरणी सागर पोवळे आणि मयूर सुखदरे या रायगड जिल्ह्यातील दोघांना अटक केली होती. त्यांच्याविरुद्ध वर्तक नगर पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला. दोघा आरोपींनी सोलापुरातील धानेश्वर स्वामी आपणांस इफेड्रीन पुरवत असल्याचे पोलिसांना सांगितले होते. त्यानुसार पोलिसांनी सोलापुरातून धानेश्वर स्वामी याला ताब्यात घेऊन त्याच्याकडील साडेपाच किलो इफेड्रीन जप्त केले होते. त्यानंतर ठाणे पोलिसांनी चिंचोळीतील एव्हॉन कंपनीवर छापा टाकून इफेड्रीन व सुडे इफेड्रीन या अंमली पदार्थाचा २ हजार कोटींचा साडेनऊ टन साठा जप्त केला होता. त्यानंतर कंपनीचा वरीष्ठ उत्पादन व्यवस्थापक राजेंद्र डिमरी याला ताब्यात घेतले. त्यांनी कंपनीच्या शेडमध्ये ठेवलेली २.६०० टन अल्कनील अनहायड्रेड हा अंमली पदार्थ जप्त केला आणि त्यानंतर पुन्हा शनिवारी १०.९०० टन हा सुमारे २०० कोटीचा इफेड्रीनचा साठा जप्त केला.

पुनित शर्माच्या शोधासाठी पथके

सोलापुरातून परदेशात इफेड्रीन सप्लाय करणारा पुनित शर्मा याच्या शोधासाठी ठाणे पोलिसांची पथके ठिकठिकाणी रवाना झाली आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा म्होरक्या गुजरातमधील अहमदाबादचे भाजपाचे माजी आमदार भावसिंग राठोड यांचा मुलगा किशोर राठोड याचा सहभाग असल्याचे उघड झाल्यानंतर त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींना फरार घोषीत करण्याच्या हालचाली

चिंचोळी एमआयडीसीतील एव्हॉन कंपनीचे संचालक अजित कामत, राजेश कैमल आणि मनोज जैन यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित पुनित शर्माला ठाणे पोलिसांनी फरार घोषीत केले आहे. या प्रकरणाशी संबंधित असलेले जयमूर्ती आणि किशोर राठोड या दोघांनाही फरार घोषीत करण्याबाबत वरीष्ठ पातळीवरुन हालचाली सुरू झाल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणेश कुलकर्णी खून खटलासबळ पुराव्याअभावीपाचही आरोपी निर्दोष

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

उपळाई खुर्द (ता. माढा) येथील उपसरपंच गणेश कुलकर्णी यांच्या खुनाच्या आरोपातून पाच आरोपींची सबळ पुराव्याअभावी अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस. डी. अग्रवाल यांनी निर्दोष मुक्तता केली. राजकीय वैमनस्यतून कुलकर्णी यांचा १४ नोव्हेंबर २०११ रोजी खून झाला होता.

संदीप पाटील, संतोष कदम, सिद्धेश्वर पाटील, रामलिंग हराळे (सर्व. रा. उपळाई) आणि प्रवीण तांबे अशी मुक्त करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या निर्णयाविरोधात हायकोर्टात अपील करणार असल्याचे कुलकर्णी कुटुंबीयांनी सांगितले. या प्रकरणी संशयाची सुई माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांच्याकडेही होती. राजकीय पार्श्वभूमी असल्याने पोलिसांनी कोर्ट परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. न्यायाधीशांनी आरोपींना दोषमुक्त केल्यानंतर काही काळ कोर्टाच्या आवारात तणाव निर्माण झाला होता. मात्र, पोलिसांनी योग्य खबरदारी घेतल्याने अनुचित प्रकार घडला नाही.

न्यायदेवतेवर माझा पूर्ण विश्वास आहे. आरोपींना शिक्षा होईल अशी आम्हाला अपेक्षा होती; परंतु तसे झाले नाही. मी मागे हटणार नाही. या निकालाविरोधात हायकोर्टात दाद मागणार आहे, असे गणेश कुलकर्णी यांच्या पत्नी ज्योती यांनी सांगितले. गणेश कुलकर्णी कृषिभूषण पुरस्काराने सन्मानित होते.

या खटल्यात सरकारतर्फे विशेष सरकारी वकील म्हणून अरविंद अंदोरे, फिर्यादीतर्फे अ‍ॅड. अब्बास काझी, आरोपीतर्फे अ‍ॅड. धैर्यशील पाटील, अ‍ॅड. भारत कट्टे, अ‍ॅड. मिलिंद थोबडे यांनी काम पाहिले.

काय आहे प्रकरण?

कुलकर्णी यांनी गावच्या निवडणुकीत सक्रिय होते. गावातील सरपंच निवडीत पाटील गटातील एकाने कुलकर्णी गटाला गुप्त मतदान केल्यामुळे पाटील गटाची ४० वर्षाची सत्ता संपुष्टात आली होती. त्याचा राग मनात धरून कुलकर्णी यांचा खून करण्यात आल्याचा युक्तिवाद सरकारच्या वतीने करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहीद तुषार घाडगेअनंतात विलीन

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, कराड

राजस्थानमधील बिकानेर येथे स्फोटात वीरमरण आलेले डिस्कळ (ता. खटाव) येथील जवान तुषार तानाजी घाडगे यांच्या पार्थीवावर हजारोंच्या उपस्थितीत शोकाकुल वातावरणात डिस्कळ येथे शनिवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. तुषार यांचे बंधू पुरुषोत्तम यांनी मुखाग्नी दिला. या वेळी उपस्थित हजारो नागरिकांच्या डोळ्यांच्या कडा पाणवल्या.

सोळा वर्षांपूर्वी भारतीय लष्करात नाईक पदावर भरती झालेले जवान तुषार तानाजी घाडगे राजस्थानातील बिकानेर येथे मेकॅनिकल इन्फन्ट्री रेजिमेंटमध्ये गेल्या पाच वर्षांपासून कार्यरत होते. दहा दिवसांपूर्वी तांत्रिक काम करीत असताना टँकचा स्फोट झाला होता. या स्फोटात काहीजण जखमी झाले होते. गंभीर जखमी अवस्थेतील तुषार घाडगे यांना तातडीने नवी दिल्ली येथील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथेच शुक्रवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात वडील,आई,पत्नी,मुलगा,मुलगी असा परिवार आहे.

दुपारी साडेबारा वाजता फुलांनी सजवलेल्या ट्रॉलीतून जवान तुषार यांच्या पार्थिवाची मिरवणूक काढण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live


Latest Images