Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

स्वाइन फ्लूने एकाचा बळी

$
0
0
बागलाण तालुक्यातील अंबासन, नामपूर, किकवारी येथे डेंग्यूचे पेशंट आढळले असतानाच गुरुवारी निताणे येथे स्वाइन फ्लूने एकाचा बळी घेतला. या घटनेने सटाणावासीयांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.

फ्लेवर्ड सोडा डिस्पेन्सर फाउंटनची कोल्हापुरात निर्मिती

$
0
0
शीतपेयांच्या क्षेत्रात उपयोगी असणारे ३६ वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये असलेले डिस्पेन्सर सोडा फाउंटन व डिजिटल सोडा फाउंटन हे नवीन मशीन येथील सोळंकी अँड सन्स रेफ्रिजरेशनने बनविले आहे.

शिंदेविरोधातील अविश्वास ठराव जनतेची दिशाभूल

$
0
0
गडहिंग्लज येथील आप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अॅड. श्रीपतराव शिंदे यांच्या विरोधात दाखल झालेला अविश्वास ठराव म्हणजे शासन आणि जनतेची दिशाभूल करीत वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न आहे, असा टोला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजेंद्र गड्ड्यानावर यांनी हाणला.

बाजार समिती बरखास्त करा

$
0
0
‘महाराष्ट्र पणन मंडळाच्या कार्यकारी संचालकांनी दिलेल्या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करून कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ तत्काळ बरखास्त करावे,’ अशी मागणी संचालक नंदकुमार वळंजू यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

पिनॅकल सातारा हिल मॅरेथॉनची तयारी अंतिम टप्प्यात

$
0
0
सातारा मॅरेथॉन असोसिएशनने रविवारी एक सप्टेंबर रोजी आयोजित केलेल्या पिनॅकल सातारा हिल मॅरेथॉन स्पर्धेला देशातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. पुणे, मुंबई, हैदराबाद, चेन्नई, दिल्ली, अहमदाबाद येथून सुमारे अडीच हजारहून अधिक स्पर्धकांनी नाव नोंदणी केली आहे.

महापौर श्रावण मॅरेथॉन स्पर्धा रविवारी

$
0
0
‘कोल्हापूर शहर अॅमॅच्युअर अॅथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने रविवारी एक सप्टेंबर रोजी राज्यस्तरीय महापौर श्रावण मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे,’ अशी माहिती समितीचे अध्यक्ष प्रा. अशोक गाडगीळ यांनी दिली. ‘पाणी म्हणजे जीवन, पाणी वाचवा’ हे स्पर्धेचे घोषवाक्य आहे.

मंदीला देशांतर्गत घटकही जबाबदार

$
0
0
जगभरातील बाजारातील मंदीचे भारतावर परिणाम होतच आहेत. पण भारतातील स्थानिक घटकांमुळेही आर्थिक मंदीची तीव्रता वाढली असल्याचे मत मेनन बेअरिंग्जचे व्यवस्थापकीय संचालक सचिन मेनन यांनी व्यक्त केले. मेनन पिस्टन्स लिमिटेडच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.

सौर, पवन उर्जेवरील कार विकसित

$
0
0
सौर व पवन उर्जेवर चालणारी चार चाकी वाहन निर्मितीचे तंत्रज्ञान शिवाजी विद्यापीठाच्या उर्जा तंत्रज्ञान विभागाने विकसित केले आहे. विद्यापीठाच्या मुख्य इमारती समोर शुक्रवारी या वाहनाचे प्रात्याक्षिक सादर करण्यात आले.

आमदार पाटील यांचा संनियंत्रण समितीस विरोध

$
0
0
तासगाव-पलूस सहकारी साखर कारखान्यातील यंत्रसामग्रीची तपासणी करण्यास आलेल्या संनियंत्रण समितीस गणपती संघाच्या आमदार संजय काका पाटील यांनी विरोध दर्शविल्याने बराच वेळ ताटकळून ही समिती आली तशी परत गेली.

खंडपीठासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र

$
0
0
मुंबई हायकोर्टाचे खंडपीठ कोल्हापूर येथे व्हावे, ही मागणी घेऊन न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त झालेल्या वकिलांनी शुक्रवारी मुख्यमंत्री आणि हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांना पत्र पाठविण्याची मोहीम राबविली.

यंत्रमागांच्या आधुनिकीकरणासाठी प्रतिमाग १५ हजार

$
0
0
विकेंद्रित क्षेत्रातील यंत्रमागाच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकारकडून प्रतिमाग १५ हजार रुपयांच्या अनुदानास मंजुरी मिळाली असून, सरकारने ‘टफ्स’ योजनेचे पुनरुज्जीवन केल्याची माहिती माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांनी दिली.

'अंनिस'च्या कार्यकर्त्यांना संरक्षण देऊ

$
0
0
डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्यासोबत काम करणाऱ्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी शासनाकडे यादी द्यावी, त्यानुसार त्यांना संरक्षण देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन मदत व पुनर्वसनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी दिले.

एक नोव्हेंबरपासून थेट सबसिडी

$
0
0
‘डायरेक्ट कॅश ट्रान्सफर’ योजनेतंर्गत कोल्हापूरमध्ये १ नोव्हेंबरपासून घरगुती सिलिंडरवरील सबसिडीची रक्कम ग्राहकांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. त्यासाठी आधार कार्ड नोंदणीबरोबरच त्याच्याशी राष्ट्रीयकृत बँकांमधील संलग्न खाते आवश्यक आहे.

सल्या चेप्यावर गोळीबार

$
0
0
महाराष्ट्र केसरी पै. संजय पाटील यांच्या खून प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी सलीम मोहम्मद शेख उर्फ सल्या चेप्या (४३) याच्यावर शुक्रवारी सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास अतिरिक्त जिल्हा व सेशन्स कोर्टाच्या आवारात सहा अज्ञात इसमांनी गोळीबार केला.

ना हरकत दाखल्याने दुकानदारी

$
0
0
अडीचशे चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्रावरील इमारत बांधकामाला परवानगी देताना नव्याने दहा ‘ना हरकत दाखले’ घेण्याचे प्रशासनाने घातलेले बंधन चुकीचे आहे. त्यातून नव्याने दुकानदारी सुरू झाली आहे, असा आरोप स्थायी समितीच्या बैठकीत करण्यात आला. अध्यक्षस्थानी सभापती रमेश पोवार होते.

खंडपीठ न दिल्यास जिल्हा बंद!

$
0
0
मुंबई हायकोर्टाचे खंडपीठ कोल्हापुरात स्थापन करण्याबाबत येत्या काही दिवसांत राज्य सरकारने निर्णय न घेतल्यास पाच सप्टेंबरला कोल्हापूर जिल्हा बंद पुकारण्याचा इशारा जिल्हा बार असोसिएशनने दिला आहे. खंडपीठाच्या मागणीसाठी पाच जिल्ह्यांतील वकिलांनी २९ ऑगस्टपासून आंदोलन पुकारले आहे.

चोरून गुटखा विक्रीवर कारवाई

$
0
0
‘गुटखा व सुगंधीत सुपारीवर बंदी घातल्याने राज्यातील सुमारे दोन कोटी लोंकावर उपासमारीची वेळ आली आहे. देशी तंबाखूवर बंदी घालण्यापेक्षा सिगारेट व दारू उत्पादन करणाऱ्या परदेशी कंपन्यांवर बंदी घाला.

भिंतीतून जप्त केला सोन्या-चांदीचा खजिना

$
0
0
भोगावती-परिते येथील कागल को-ऑपरेटिव्ह बँकेतील दरोड्याप्रकरणी अटक केलेल्या टोळीकडून सतरा किलो चांदीचे दागिने, वीस तोळे सोन्याचे दागिने असा सुमारे १९ लाख ३९ हजार १७५ रुपये किमंतीचा मुद्देमाल करवीर पोलिसांनी जप्त केले.

किरकोळ वादातून मोतीबाग तालमीवर दगडफेक

$
0
0
बिंदू चौकातील पार्किंगचे पैसे देण्यावरून दोन पैलवानांचा तेथील कर्मचाऱ्यांशी शनिवारी रात्री वाद झाला. त्यातून कर्मचाऱ्यास बेदम मारहाण करण्यात आली.

खंडपीठाचा प्रश्न कॅबिनेटमध्ये?

$
0
0
‘सहा जिल्ह्यांसाठीच्या कोल्हापूर खंडपीठाच्या मागणीसाठी आंदोलन सुरु असल्याने हा प्रश्न महत्वाचा आहे’ असे सांगत उद्योग मंत्री नारायण राणे यांनी हा प्रश्न कॅबिनेटच्या बैठकीत उपस्थित करण्याची ग्वाही बार असोसिएशनच्या शिष्टमंडळाला शनिवारी सायंकाळी कणकवलीत दिली.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images