Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

पाच श्रीपूजकांसह सात जणांवर गुन्हे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्यातील प्रवेशावेळी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांच्यासह इतर महिलांना बुधवारी (ता. १३) मारहाण आणि धक्काबुक्की करणाऱ्या सातजणांवर शनिवारी (ता. १६) जुना राजवाडा पोलिसांनी गुन्हे दाखल केले. यामध्ये पाच श्रीपूजकांसह इतर दोघांचा समावेश आहे. गुन्हे दाखल केलेल्यांमध्ये केदार मुनीश्वर, श्रीश मुनीश्वर, चैतन्य अष्टेकर, मयूर मुनीश्वर, निखिल शानभाग या श्रीपूजकांसह किसन कल्याणकर आणि जयकुमार शिंदे या दोघांचा समावेश आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये देसाई यांना मारहाण केल्याचे स्पष्ट दिसून आले आहे.

दरम्यान, या प्रकरणाचा तपास करणारे तपास अधिकारी डॉ. दिनेश बारी यांचा अहवाल अद्याप आलेला नाही. पोलिसांनीच स्वतःहून फिर्यादी होऊन गुन्हे दाखल केले आहेत. लवकरच या प्रकरणातील संशयितांची चौकशी होणार आहे.

भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांना अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश देण्यावरून बुधवारी (ता. १३) मंदिरात मोठा गोंधळ उडाला होता. देसाई यांना रोखून मारहाण करण्याबरोबरच अश्लील शिवीगाळही करण्यात आली होती. याबाबत पोलिसांनी तातडीने पावले उचलत संबंधितांवर गुन्हे दाखल केले. गाभारा प्रवेशासाठी विरोध करणे, हळदी-कुंकू आणि शाई फेकणे, जीवितास धोका निर्माण करणे, बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांना धक्काबुक्की करून कामात अडथळा निर्माण करणे असे आरोप संबंधितांवर लावले आहेत. पोलिस उपनिरीक्षक अमित मस्के यांनी याबाबतची फिर्याद दाखल केली.

तृप्ती देसाई यांनी साडी परिधान करूनच गाभाऱ्यात प्रवेश करावा, असा आग्रह श्रीपूजकांसह काही संघटनांच्या कार्यकर्त्यांनी धरला होता. देसाई या पोलिस बंदोबस्तात गाभारा प्रवेश करताना श्रीपूजकांसह काहीजणांनी त्यांना प्रवेश करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी त्यांना धक्काबुक्की करून मारहाण झाली. तसेच त्यांच्यावर तिखटही फेकण्यात आले. काहीजणांनी बंदोबस्तास असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न केला होता. या सर्व गदारोळात देसाई बेशुद्ध पडल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले होते.

महिलांना मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश देण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने देऊनही प्रवेश करणाऱ्या महिलांना मारहाण झाल्याने पोलिसांनी स्वतःहून संबंधितांवर गुन्हे दाखल करून कारवाई करावी, असा आग्रह देसाई यांनी धरला होता. पोलिसांनी कारवाई न केल्यास स्वतः गुन्हे दाखल करण्याबरोबरच मंत्रालयासमोर उपोषणाचा इशाराही दिला होता. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. बारी यांची नियुक्ती केली होती. बारी यांच्याकडून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे. दरम्यान, जुना राजवाडा पोलिसांनी घटनेचे गाभीर्य लक्षात घेऊन तातडीने शनिवारी सकाळीच संशयितांवर गुन्हे दाखल केले.


दोषींवर कडक कारवाई

तपास अधिकारी बारी यांच्याकडून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे. हा अहवाल लवकरच मिळेल. या प्रकरणाची गंभीर दखल पोलिस प्रशासनाने घेतली आहे. दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


संकेश्वरजवळ अपघातात चार ठार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा,कागल

पुणे-बेंगळुरु महामार्गावर संकेश्वरन​जीक कारची ट्रकला पाठीमागून जोराची धडक बसून झालेल्या अपघातात चारजण ठार झाले तर चारजण जखमी झाले. अपघातातील सर्वजण पणजी (गोवा) येथील असून ते अक्कलकोट येथे स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी जात होते. मृतांमध्ये मत्स्यगंधा धनंजय नॉर्वेकर (वय- ३५), धनंजय नॉर्वेकर ( ४२) हे दाम्पत्य आणि संतोष शगुन नाईक (वय-३८) व चालक गिरीश गुरुदास साळगावकर (वय ४५) यांचा समावेश आहे. अपघाताची नोंद संकेश्वर पोलिसांत झाली आहे.

शनिवारी पहाटे चारच्या सुमारास इर्टिगा कारमधून नाईक आणि नॉर्वेकर कुटुंबीय अक्कलकोट येथे निघाले होते. सकाळी सव्वासातच्या सुमारास त्यांची कार निपाणी आणि संकेश्वरच्या दरम्यान हिटणी फाट्यावर आल्यावर कारने बेळगावहून पुण्याकडे जाणाऱ्या आयशर ट्रकला मागून जोराची धडक दिली. यामध्ये चौघेजण ठार झाले. शगुन आनंदा नाईक (वय- ६७) व त्यांची पत्नी सुनंदा शगुन नाईक (६५),मुलगा संदीप (३३) आणि वर्षा धनंजय नॉर्वेकर (५) हे चौघेजण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर संकेश्वरच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मृतातील गंभीर जखमी धनंजय यांचा बेळगावला उपचारासाठी नेताना वाटेतच मृत्यू झाला.

मृत मत्सगंधा नॉर्वेकर आणि जखमी सुनंदा नाईक या दोघी मैत्रिणी असून पणजीमधील इ.एस.आय.रुगणालयात एकत्र काम करत होत्या. रुग्णालयातच त्यांची मैत्री झाली होती. त्यामुळेच कुटुंबियांसहित सर्वजण देवदर्शनाला निघाले होते. घटनास्थळी अतिरिक्त जिल्हा पोलिस प्रमुख रवींद्र गडादे यांनी भेट दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सत्तेत वाटा न दिल्यास काट काढू’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने सत्तेत दहा टक्के वाटा देण्याचे लेखी आश्वासन दिले होते. असा गौप्यस्फोट करत निकालानंतर शिवसेनेला सत्तेत सहभागी करुन घ्यावे लागले. त्यामुळे सत्तेतील वाटा कमी झाला. तरीही पक्षाला पाच टक्के वाटा मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. 'सत्तेत मिळाला नाही वाटा तर, आगामी निवडणुकीत काढू काटा,' असा इशारा रिपाइंचे नेते खासदार रामदास आठवले यांनी नेहमीच्या स्टाइलमध्ये भाजपला दिला. समता रथ शनिवारी कोल्हापुरात आला. त्यावेळी आयोजित कार्यक्रमादरम्यान घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात येण्यासाठी आग्रह करत आहेत, मात्र ते दिल्लीत जाणार असतील तर स्वतः राज्यात परत येण्यास इच्छूक असल्याचे सांगत थेट आपल्या नेहमीच्या शैलीत मुख्यमंत्रीपदाचीच मागणी केली.

अंबाबाई मंदिर प्रवेशांवरुन तृप्ती देसाई यांना झालेली मारहाण समर्थनीय नाही. ज्यांनी समतेचा संदेश देत दीनदलित समाजासाठी नेहमीच पुढाकार घेतला त्या राजर्षी शाहू महाराजांच्या नगरीत महिलेला झालेली मारहाण दुर्दैवी आहे, असे आठवले म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोलापुरातील लघुप्रकल्प, बंधारे ठणठणीत

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील ५१ लघुप्रकल्प, ८४ कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांनी तळ गाठला आहे. केवळ दहा बंधाऱ्यांमध्ये पाणी असून, त्यांनीही तळ गाठला आहे. ५१ पैकी केवळ २ प्रकल्पांत अत्यल्प पाणीसाठा उपलब्ध आहे. तो कडक उन्हामुळे काही दिवसात संपणार आहे. शहरापेक्षा ग्रामीण भागातील जनतेला पाण्यासाठी अधिक पायपीट करावी लागत आहे.
सोलापूर शहरातील जनतेला आठ दिवसांतून एकदा पाणी येत असल्यामुळे शहरवासीय हैराण आहेत. परंतु ग्रामीण भागातील नागरिकांची अवस्था या पैक्षाही भीषण आहे. लघुप्रकल्प आणि बंधारे कोरडे ठाक पडले असल्यामुळे ग्रामीण भागावर पाणीटंचाईचे सावट पसरले आहे.
शहरापेक्षा ग्रामीण भागात जनावरांचीही संख्याही मोठी असल्यामुळे पाणीटंचाईचा सर्वाधिक फटका पशुपालकांना बसत आहे. सुमारे ७० हजार लोकांना १७ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असला तरी हा पाणीपुरवठा अत्यल्प असल्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे.
उजनी धरणावरच भिस्त असलेल्या या जिल्ह्यावर कधी नव्हे एवढे मोठे जलसंकट कोसळले आहे. सरकार आपल्यापरीने प्रयत्न करीत असले तरी निसर्गाची कसलीच साथ नसल्यामुळे सरकारनेही दुष्काळासमोर हात टेकल्याचे चित्र आहे. जिल्हा मागील तीन वर्षे चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे.
ग्रामीण भागातील सर्वच तालुक्यांमध्ये पाण्याची भीषण टंचाई आहे. जिल्हा प्रशासनाने टँकर पुरविण्यासाठी हात आखडता घेतल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चैत्री एकादशीसाठीतीन लाख भाविक दाखल

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर
चैत्री यात्रेसाठी तीन लाखांपेक्षा जास्त भाविक शहरात दाखल झाले आहे. पंढरी नागरी हरिनामाच्या जयघोषाने दुमदुमून गेली आहे. रविवारी चैत्री अर्थात कामदा एकादशीनिनित्त पहाटे विठुरायाची सरकारी महापूजा मंदिर समितीचे अध्यक्ष तुकाराम मुंढे आणि पत्नी अर्चना यांच्या हस्ते पार पडली. कोल्हापूर जिल्ह्यातील नंदगावचे भाविक तायाप्पा सुबराव कांबळे व त्यांच्या पत्नी आक्काबाई यांना सरकारी महापूजेत सहभागी होण्याचा मान मिळाला.
चैत्री यात्रेसाठी राज्यभरातून भाविक दाखल झाले असून, रविवारी पहाटेपासून चंद्रभागा स्नान आणि दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. विठुरायाच्या विठुरायाच्या दर्शनाची रांग मंदिरापासून तीन किलोमीटर अंतरावरील गोपाळपूर पत्राशेडपर्यंत गेली आहे. व्हीआयपी दर्शन मंदिर पूर्णपणे बंद केल्याने भाविकांना झटपट दर्शन मिळत आहे. सध्या पंढरपूरमध्येही ४२ ते ४३ अशं सेल्शिअस इतक्या विक्रमी तापमानाची नोंद होत असूनही वारकऱ्यांमध्ये उत्साह दिसत आहे. मंदिर समितीने दर्शन रांगेवर निवारा केल्याने निदान दर्शन रांगेतील भाविकांना या उन्हाचा त्रास जाणवत नाही.
विठुरायाची मूर्ती हम्पी येथे नेल्यानंतर संत भानुदास महाराज यांनी आजच्या दिवशी परत पंढरपूर येथे आणून तिची पुनर्स्थापना केली होती. एकादशीनिमित्त देवाला पुरणपोळीचा महानैवेद्य दाखविला जातो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माढ्यात भाजप, मोहोळमध्ये सेनामाळशिरस त्रिशंकू; राष्ट्रवादीचा दारूण पराभव

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सोलापूर/पंढरपूर
सोलापूर जिल्ह्यातील माढा नगरपंचायतीत भाजप, मोहोळमध्ये शिवसेना आणि माळशिरसमध्ये भाजपशी संबधित स्थानिक गटांना दहा जागांवर यश मिळाले आहे. जिल्ह्यातील नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेसचा दारूण पराभव झाला आहे.
माढ्यात भाजप प्रणीत साठे गटाने सतरा पैकी अकरा जागा जिंकत राष्ट्रवादीकडून सत्ता खेचून आणली. राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे गटाला चार जागांवर समाधान मानावे लागले. कॉँग्रेसला केवळ एक आणि एका जागा अपक्षाला मिळाली. या निकालानंतर भाजपा आणि साठे गटाच्या कार्यकर्त्यांनी माढा शहरात मोठा जल्लोष केला.
माळशिरसमध्ये भाजपमधील गटबाजीमुळे कोणत्याच आघाडीला पूर्ण बहुमत मिळाले नाही. भाजप समर्थक तुकाराम देशमुख गटाला पाच आणि संजिवनी पाटील गटाला पाच आणि राष्ट्रवादीच्या मिलिंद कुलकर्णी गटाला चार जागा मिळाल्या. अपक्षांना तीन जागांवर विजय मिळला. अध्यक्षपद राखीव असून, राखीव जागेवर संजिवनी पाटील गटाचा उमेदवार विजयी झाल्याने अध्यक्षपद पाटील गटालाच मिळणार आहे.
मोहोळमध्ये शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि स्थानिक गटांमध्ये चुरस होती. शिवसेनेला सर्वाधिक सहा, राष्ट्रवादीला चार, भाजपला दोन आणि अपक्षांना तीन जागी यश मिळाले.
राष्ट्रवादीचा दारूण पराभव
सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉँग्रेसची ताकद चांगली असूनही नगरपंचायत निवडणुकीत त्यांना समाधानकारक यश मिळाले नाही. राष्ट्रवादीचा दारूण पराभव झाला आहे. मोहोळमध्ये राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील, माढ्यात आमदार बबनराव शिंदे आणि माळशिरसमध्ये खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्या गटाला म्हणजेच राष्ट्रवादी कॉँग्रेसला मोठा फटका बसला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उजनीचे पाणी औज बंधाऱ्यातसोलापूरला पाच दिवसांआड पाणीपुरवठा होणार

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

उजनी धरणातून सोलापूरसाठी सोडण्यात आलेले पाणी मंगळवारी अठरा दिवसांनंतर औज बंधाऱ्यात पोहोचले. औज बंधारा साडेचार मीटरने भरण्यासाठी बुधवार सायंकाळपर्यंतचा वेळ लागणार आहे. बंधाऱ्यात पाणी पोहोचल्यामुळे सोलापूर शहरावरील जलसंकट पुढील दोन ते तीन महिन्यांसाठी दूर झाले आहे. मात्र, सोलापूरकरांना आता तीन ऐवजी पूर्वीप्रमाणे पाच दिवसांआडच पाणी मिळणार आहे.

सोलापूर शहराला दहा लाख लोकसंख्येसाठी औज बंधारा, उजनी आणि हिप्परगा तलाव या तीन ठिकाणांहून पाणी पिण्यासाठी घेण्यात येत होते. परंतु गेल्या अनेक महिन्यांपासून हिप्परगा तलाव कोरडा पडला आहे. त्यामुळे उजनी आणि औज बंधारा या दोन ठिकाणाहूनच सोलापूरला पाणीपुरवठा करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी उजनी धरणातून औजमध्ये सोडण्यात आलेले पाणी संपल्यानंतर पुन्हा शहरावर जलसंकट ओढवले होते.

पाण्याचा अठरा दिवसांचा प्रवास

औज बंधाऱ्याने तळ गाठल्यानंतर संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या भेटीनंतर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी उजनीतून पाणी सोडण्याचे आदेश दिले होते. धरणातून पाच हजार क्युसेकने भीमा नदीद्वारे सोलापूरसाठी पाणी सोडण्यात आले होते. नदीमधील खड्डे आणि वाळू उपशामुळे तब्बल १८ दिवसांनी औज बंधाऱ्यात पोहोचले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अमीर खान यांचीसाताऱ्यातील बैठक वादात‘वॉटर कप’ स्पर्धेसाठी सातारा रोड व वेलंग गावांची निवड

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सातारा
अभिनेते आणि पाणी फाउंडेशनचे आयोजक अमीर खान यांनी रविवारी साताऱ्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. 'सत्यमेव जयते वॉटर कप' स्पर्धेसाठी सातारा रोड व वेलंग या गावांची निवड करण्यात आली. मात्र, ही बैठक वादात सापडली आहे. बैठकीसाठी लोकप्रतिनिधी आणि प्रसार माध्यमांना प्रवेश देण्यात आला नव्हता. शिवाय दिवसभर भर उन्हात सुमारे दीडशे पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना बंदोबस्त तैनात ठेवावा लागला.
'सत्यमेव जयते वॉटर कप' स्पर्धेसाठी अमीर खान यांनी प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची रविवारी बैठक घेतली. बैठकीला साताऱ्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह काही सामाजिक कार्यकर्ते व कृषी आणि महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. बैठकीला सातारा जिल्ह्यातील एकाही लोकप्रतिनिधीला निमंत्रण नसल्यामुळे लोकप्रतिनिधींनीही नाराजी व्यक्त केली. शिवाय बैठकीला उपस्थित असणाऱ्यांना मोबाइलही बंद करण्यास सांगितले होते.
शशिकांत शिंदे यांची नाराजी
सातारा रोड व वेलंग या कोरेगाव मतदारसंघातील गावांची या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. कोरेगावचे आमदार व माजी पालकमंत्री शशिकांत शिंदे यांच्याशी या बाबत संपर्क साधला असता ते म्हणाले, 'बैठकीला लोकप्रतिनिधींना निमंत्रण दिले असते, तर सहभाग घेता आला असता. चर्चा करता आली असती. पण, असे घडले नाही. प्रत्येकाची सामाजिक काम करण्याची पद्धत वेगळी असते. आता सेलिब्रिटींनी दुष्काळ निवारणाच्या कामात लक्ष घातले आहे. त्यामुळे दुष्काळ कमी होईल का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चाफळचा रथोत्सव साजरा

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, कराड
बोल बजरंग बली की जय..,सत् सीता रामचंद्र की जय..,प्रभू रामचंद्र की जय..,च्या जयघोषात गुलाल-खोबऱ्यांची उधळण करीत हजारो भाविक-भक्तांच्या उपस्थितीत व सासन काठ्यांच्या साक्षीने चाफळचा श्रीराम रथोत्सव रविवारी सुर्योदयाबरोबर अभूतपूर्व वातावरणात साजरा करण्यात आला.
गुलालाने माखलेल्या युवक-युवतींनी परस्परांना गुलाल लावत आपला आनंद व्दिगुणीत केला.
समर्थ रामदास स्वामींनी सन १६४८पासून सुरू केलेला श्रीरामनवमी उत्सव आजही अखंडितपणे तीर्थक्षेत्र चाफळ येथे सुरू आहे. यंदा ३६९वा रामनवमी उत्सव होता. चैत्र शुद्ध प्रतिपदा ते एकादशी असा दहा दिवसांचा उत्सव साजरा करण्यात आला.
नवमी, दशमी, एकादशी हे उत्सवाचे मुख्य तीन दिवस मानले जातात. चैत्र शुद्ध एकादशीला श्रीराम नवमी उत्सवाची सांगता होते. रविवारी पहाटे काकड आरती होऊन समर्थ वंशज गादीचे अधिकारी दुर्गाप्रसाद स्वामी यांच्या हस्ते श्रीरामाची महापूजा करण्यात आली. पहाटे पाच वाजता कीर्तनास प्रारंभ झाला. श्रीरामाची पट्टाभिषिक्त मूर्ती वाजत-गाजत पालखीतून दिवट्या, मशालीसह मंदिर प्रदक्षिणा घालून सवाद्य चांदीच्या पालखीमधून रथाकडे आणण्यात आली. या वेळी समर्थाचे वंशज दुर्गाप्रसाद स्वामी यांच्या हस्ते रथाच्या चारी चाकांवर नारळ फोडण्यात आले. त्यानंतर अधिकारी स्वामींच्या हस्ते चाफळसह भागातील बारा बलुतेदार व मानकरी यांचा मानाचे नारळ देऊन त्यांचा गौरव करण्यात आल्यानंतर सत् सीताराम की जय..,च्या जयघोषात रथ ओढायला सुरुवात झाली. रथासमोर चांदीची पालखी, सुवासिक फुलांच्या माळा, मानाच्या सासनकाठ्या, सजवलेले घोडे, शेकडो दिवट्या, समर्थाचे वंशज, उत्सवाचे मानकरी आणि हजारो भक्त प्रभू रामाचा जयजयकार करीत रथ ओढत होते. मंदिरपासून निघालेला रथोत्सव सकाळी सुर्योदयावेळी कालेश्वरी मारूती मंदिर, महारूद्र स्वामींच्या समाधी मंदिर बसस्थानकाजवळ पोहचल्यानंतर तेथून परत पुन्हा मंदिराच्या पायथ्यापर्यंत आणण्यात आला. संपूर्ण रथ नवसाचे नारळ व नोटांनी झाकोळलेला होता. रथोत्सवासाठी चाफळसह परीसरातील भाविकांनी पहाटेपासूनच लावली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोणंद नगरपंचायतीतराष्ट्रवादीची सरशी

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सातारा
लोणंद नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची सरशी झाली. मात्र,

त्यांना पूर्ण बहुमत मिळविता आले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे ८, काँग्रेसचे ६, भाजपाचे २

आणि १ अपक्ष उमेदवार निवडून आले. १७ सदस्यांच्या नगरपंचायतीत

सत्तास्थापनेसाठी ९ जागा जिंकणे आवश्यक होते. राष्ट्रवादीला आठ जागा मिळाल्यामुळे

त्यांना अपक्षांची मदत घ्यावी लागणार आहे.
सोमवारी सकाळी दहा वाजल्यापासून खंडाळा पंचायत समितीच्या सभागृहात मतमोजणी

सुरू झाली. सर्वत्र तणावपूर्व शांतता होती व निकालाबाबत नागरिकांची उत्सुकता शिगेला

पोहोचली होती. दुपारी एक वाजेपर्यंत सर्व निकाल जाहीर झाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयी उमेदवार असे, हणमंत विनायकराव शेळके, कृष्णाबाई भिकू

रासकर, मेघा आप्पासो शेळके, स्नेहलता आनंदराव शेळके पाटील, कुसुम विश्वास

शिरतोडे, लिलाबाई विलास जाधव, योगेश उत्तम क्षिरसागर व दिपाली रवींद्र क्षिरसागर.
राष्ट्रीय काँग्रेसचे विजयी उमेदवार असे, विकास लुमाजी केदारी, शैलजा बाबासाहेब

खरात, हेमलता रमेश कर्णवर, राजेंद्र सिताराम डोईफोडे, स्वाती शरद भंडलकर,

पुरुषोत्तम बाबुराव हिंगमिरे.
भाजपाचे किरण चंद्रकांत पवार व लक्ष्मण सोपानराव शेळके हे दोन उमेदवार विजयी

झाले. तर प्रभाग क्र. तीनमधून अपक्ष सचिन नानासो शेळके हे विजयी झाले.
प्रभाग क्रमांक तेरामधून उभे राहिलेले राष्ट्रवादीचे नेते आनंदराव शेळके पाटील आणि

प्रभाग क्रमांक १६मधून उभे ठाकलेले काँग्रेसचे नेते बाळासाहेब बागवान यांना पराभवाचा

सामना करावा लागला.
सत्तास्थापनेसाठी राष्ट्रवादीची मदार आता अपक्ष सचिन शेळके यांच्यावर अवलंबून

असून, सचिन शेळके आता कोणता निर्णय घेतात, याची उत्सुकता लोणंदसह

जिल्ह्यातील नागरिकांना लागून राहिली आहे.
राष्ट्रवादीने जि. प. सदस्य आनंदराव शेळके-पाटील यांच्या नेतृत्वाखाली तर काँग्रेसने

अॅड. बाळासाहेब बागवान यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली. प्रचारामध्ये भाजपानेही

चांगलेच रान तापवले होते. परंतु, प्रत्यक्षात मात्र त्यांना केवळ दोनच जागा जिंकता

आल्या. राष्ट्रवादीने १७ पैकी १६ जागांवर, काँग्रेसने सर्वच्या सर्व १७ जागांवर तर

भाजपाने १४ जागांवर निवडणूक लढविली होती.
दरम्यान, रविवारी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मतदान केंद्राबाहेरील लक्ष्मी रोड व

खाटिक गल्ली, गांधी चौक परिसरात भाजप व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार

धुमश्चक्री झाली होती. कार्यकर्त्यांनी केलेल्या दगडफेकीत काही वाहनांच्या काचा फुटल्या

होत्या तर काही कार्यकर्ते जखमी झाले होते. त्यामुळे पोलिसांनी जोरदार लाठीमार करून

जमाव पांगविला होता. रात्री उशिरापर्यंत लोणंदमध्ये तणावपूर्व शांतता होती.
लोणंद नगरपंचायतीसाठी रविवारी ७५.९३ टक्के मतदान झाले होते. १७ जागांसाठी १५

हजार ३३६ मतदारांपैकी ११ हजार ६४५ मतदारांनी मतदान केले. प्रभाग क्र. एकमध्ये

८७.५७ टक्के सर्वात जास्त मतदान झाले होते. सर्वात कमी मतदान प्रभाग क्र. दोनमध्ये

६७.३८ टक्के झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जोरदार पावसाचीसाताऱ्यात हजेरी

$
0
0


सातारा

सातारा शहर आणि परिसरात मंगळवारी रात्री जोरदार पावसाने हजेरी लावली. रात्री आठ वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत पाऊस पडत होता. पाऊस सुरू होताच वीज गेल्याने नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागला.

साताऱ्यात मंगळवारी दिवसभर पारा ४० अंशांवर होता. मागील आठ दिवसांपासून पारा ४०अंशांच्या आसपास जातो आहे. दिवसभर वीजेचा लपंडाव सुरू होता. त्यामुळे उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले होते. आकाशात दिवसभर ढगांची दाटी होती. रात्री उकाडा वाढून पावसाला सुरूवात झाली. हा पाऊस शेतीच्या उन्हाळी मशागतींना फायद्याचा ठरणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रकल्प ठिकठाक, सल्लागारच मालामाल

$
0
0

Appasaheb.Mali@ timesgroup.com

कोल्हापूर : महापालिकेत अभियंता आहेत, राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देऊन नियुक्या झालेले अधिकारी आहेत. तंत्रज्ञ आहेत, पर्यावरण अभियंत्यांपासून नगररचना विभागाशी निगडीत अभियंते आहेत. त्यांच्याकडे वर्षानुवर्षे कामाचा अनुभव आहे. मात्र प्रकल्प म्हटला की सल्लागार कंपन्या आणि त्यांच्या नेमणुका करायच्या. नवनवीन कंपन्या शोधून त्यांच्यामार्फत केलेल्या डीपीआरलाच अव्वाच्या सव्वा दर मोजायचा असा प्रकार रुळला आहे. डीपीआर बनविण्यापासून कामावर नियंत्रण ठेवण्यापर्यंतची सारी भिस्त या सल्लागारांवर ठेवून अधिकारी नामानिराळे राहू लागलेत. कंपन्यांना सल्लागार शुल्काच्या नावाखाली कोट्यावधी रुपयांच्या फी ची खैरात केली जात आहे. एकदा प्रकल्पाचा मुहूर्त झाला की सल्लागार कंपन्या नामानिराळ्या होत असल्याचे समोर येत असूनही दुर्लक्ष केले जाते. यामागे मोठे अर्थकारण दडल्याचे बोलले जाते.

युनिटीला दोन कोटींची फी, डीपीआरबाबत आक्षेप

थेट पाइपलाइन योजनेसाठी पुण्यातील युनिटी कंपनीची सल्लागार कंपनी म्हणून नियुक्ती झाली. कंपनीला रितसर दोन कोटी रुपये शुल्क ठरले. सल्लागार कंपनीकडे डीपीआर बनविताना देखभाल आणि नियंत्रणाची जबाबदारी आहे. मात्र, महापालिकेच्या सभागृहाने कंपनीच्या कामकाजाबद्दल आक्षेप नों​दविले. सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी पाइपलाइनलचा डीपीआर म्हणजे 'कॉपी पेस्ट' असल्याचा आरोप केला. मात्र प्रशासनाने सल्लागार कंपनीवर कसलीच कारवाई केली नाही. युनिटी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी महापालिका कार्यालयात बसून डीपीआर बनविला, रस्त्यांची वस्तुस्थिती पाहिली नाही अशी टीका झाली. महापालिकेच्या काही प्रकल्पांत आराखडे बनविताना सल्लागार कंपन्यांनी महापालिका यंत्रणेचा वापर केला. डाटा महापालिकेकडून घ्यायचा, यंत्रणा वापरायची आणि त्या माध्यमातून उपलब्ध माहितीच्या आधारे आराखडा तयार करायचा अशी सल्लागार कंपन्यांच्या कामाची पद्धत बनली आहे. केएमटीच्या नवीन बसेस, थेट पाइपलाइन योजना अशा आराखड्यावेळी अशा प्रकारच्या कामकाजावरून चर्चा झाली.

कत्तलखाना कागदावरच

कोल्हापुरात अत्याधुनिक कत्तलखाना उभारणीसाठी एका सल्लागार कंपनीची नियुक्ती झाली. कंपनीला तीस लाख रुपये फी देण्यात आली. कंपनीला पैसे मिळाले. पण कत्तलखान्याचे काम अजूनही झाले नाही. सल्लागार कंपन्यावर जबाबदारी सोपविल्यामुळे बहुतांश अधिकारी नामानिराळे राहतात याचे हे उदाहरण. प्रकल्प अंमलबजावणीला विलंब झाला, त्रुटी निर्माण झाल्या तर सल्लागार कंपन्याकडे अंगुलीनिर्देश करत जबाबदारी झटकण्याची प्रवृत्ती वाढीस लागत असल्याचे सामोरे येत आहे. शहरातील विविध प्रकल्पांत सल्लागार कंपनी आणि अधिकाऱ्यांत संगनमत असल्याचा आरोप होत आहे. या दोन्ही घटकांच्या मिलीभगतमुळे कामे मुदतीत पूर्ण होण्याबरोबरच, दर्जाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

सल्लागारांचा अहवालच गुंडाळला

नगरोत्थान योजनेंतर्गत १०८ कोटी रुपयांची विकास कामे प्रस्तावित होती. या योजनेसाठी सल्लागार कंपनीची नियुक्ती झाली. सल्लागार कंपनीने कंत्राटदाराच्या कामातील त्रुटी दाखविल्या. कामाच्या दर्जाविषयी प्रश्नचिन्ह उभे केले. कंपनीच्या अहवालानुसार ठेकेदार कंपनीला सूचना करणे अत्यावश्यक होते. पण येथे उलटा प्रकार घडला. ठेकेदार, कारभारी आणि अ​धिकारी एकत्र आले. त्यांनी एकमेकांचे हितसंबंध जोपासत सल्लागार कंपनीचा अहवाल बासनाता गुंडाळून ठेवला. रस्ते विकास प्रकल्पात सोविल कंपनीची नियुक्ती करण्यात आली होती. कंपनीचा रस्ते विकास प्रकल्पासंदर्भातील अहवाल नेहमीच वादग्रस्त ठरला. 'सोविल'कंपनीला सल्लागार फी म्हणून मात्र कोट्यवधी रुपये पडले. कोल्हापूरकर मात्र रस्ते विकास प्रकल्पातील कामाचा दर्जा, टोल रद्द आणि आता देखभाल दुरूस्तीसाठी संघर्ष करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रकल्पाचा ‘सल्ला’च मोलाचा

$
0
0

Appasaheb.Mali @timesgroup.com

कोल्हापूर : महापालिकेत अभियंता आहेत, राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देऊन नियुक्या झालेले अधिकारी आहेत. तंत्रज्ञ आहेत, पर्यावरण अभियंत्यांपासून नगररचना विभागाशी निगडीत अभियंते आहेत. त्यांच्याकडे वर्षानुवर्षे कामाचा अनुभव आहे. मात्र प्रकल्प म्हटला की सल्लागार कंपन्या आणि त्यांच्या नेमणुका करायच्या. नवनवीन कंपन्या शोधून त्यांच्यामार्फत केलेल्या डीपीआरलाच अव्वाच्या सव्वा दर मोजायचा असा प्रकार रुळला आहे. डीपीआर बनविण्यापासून कामावर नियंत्रण ठेवण्यापर्यंतची सारी भिस्त या सल्लागारांवर ठेवून अधिकारी नामानिराळे राहू लागलेत. कंपन्यांना सल्लागार शुल्काच्या नावाखाली कोट्यावधी रुपयांच्या फी ची खैरात केली जात आहे. एकदा प्रकल्पाचा मुहूर्त झाला की सल्लागार कंपन्या नामानिराळ्या होत असल्याचे समोर येत असूनही दुर्लक्ष केले जाते. यामागे मोठे अर्थकारण दडल्याचे बोलले जाते.

कत्तलखाना कागदावरच

कोल्हापुरात अत्याधुनिक कत्तलखाना उभारणीसाठी एका सल्लागार कंपनीची नियुक्ती झाली. कंपनीला तीस लाख रुपये फी देण्यात आली. कंपनीला पैसे मिळाले. पण कत्तलखान्याचे काम अजूनही झाले नाही. सल्लागार कंपन्यावर जबाबदारी सोपविल्यामुळे बहुतांश अधिकारी नामानिराळे राहतात याचे हे उदाहरण. प्रकल्प अंमलबजावणीला विलंब झाला, त्रुटी निर्माण झाल्या तर सल्लागार कंपन्याकडे अंगुलीनिर्देश करत जबाबदारी झटकण्याची प्रवृत्ती वाढीस लागत असल्याचे सामोरे येत आहे. शहरातील विविध प्रकल्पांत सल्लागार कंपनी आणि अधिकाऱ्यांत संगनमत असल्याचा आरोप होत आहे. या दोन्ही घटकांच्या मिलीभगतमुळे कामे मुदतीत पूर्ण होण्याबरोबरच, दर्जाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

सल्लागारांचा अहवालच गुंडाळला

नगरोत्थान योजनेंतर्गत १०८ कोटी रुपयांची विकास कामे प्रस्तावित होती. या योजनेसाठी सल्लागार कंपनीची नियुक्ती झाली. सल्लागार कंपनीने कंत्राटदाराच्या कामातील त्रुटी दाखविल्या. कामाच्या दर्जाविषयी प्रश्नचिन्ह उभे केले. कंपनीच्या अहवालानुसार ठेकेदार कंपनीला सूचना करणे अत्यावश्यक होते. पण येथे उलटा प्रकार घडला. ठेकेदार, कारभारी आणि अ​धिकारी एकत्र आले. त्यांनी एकमेकांचे हितसंबंध जोपासत सल्लागार कंपनीचा अहवाल बासनाता गुंडाळून ठेवला. रस्ते विकास प्रकल्पात सोविल कंपनीची नियुक्ती करण्यात आली होती. कंपनीचा रस्ते विकास प्रकल्पासंदर्भातील अहवाल नेहमीच वादग्रस्त ठरला. 'सोविल'कंपनीला सल्लागार फी म्हणून मात्र कोट्यवधी रुपये पडले. कोल्हापूरकर मात्र रस्ते विकास प्रकल्पातील कामाचा दर्जा, टोल रद्द आणि आता देखभाल दुरूस्तीसाठी संघर्ष करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नागरी बँकांच्या सक्षमतेचे प्रयत्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'नागरी सहकारी बँकांसमोर खासगी आणि व्यावसायिक बँकांचे आव्हान आहे. त्यांच्या स्पर्धेत टिकायचे असेल तर पारं​परिक पद्धत बदलून नव्या पद्धती अंगीकारण्याची गरज आहे. जो आर्थिक व तांत्रिकदृष्ट्या सक्षम असेल, तोच बँकिंगमध्ये टिकेल', असे प्रतिपादन रिझर्व्ह बँकेच्या मुंबई क्षेत्रीय विभागाच्या मुख्य महाव्यवस्थापक सुमा वर्मा यांनी केले. राज्यातील नागरी बँकांच्या समस्या तसेच आव्हानांबाबत रिझर्व्ह बँक, सहकार विभाग, नागरी बँक अशा घटकांना एकत्रित आणण्यासाठी दी महाराष्ट्र अर्बन को ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशनच्यावतीने आयोजित राज्यव्यापी सहकार परिषदेच्या उदघाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.

फेडरेशनचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, नागूपर विभागाच्या क्षेत्रीय संचालक ज्योतिका जिवानी, सहकार परिषदेचे शेखर चरेगावकर सहकार परिषदेचे शेखर चरेगावकर,राष्ट्रीय अर्बन बँक महासंघाचे अध्यक्ष ज्योतिंद्र मेहता, कोल्हापूर नागरी बँक असोसिएशनचे निपुण कोरे उपस्थित होते.

नागरी बँकांच्या कामकाजाच्या पद्धतीबाबत बोलताना वर्मा म्हणाल्या, '३१ मार्च झाला की ताळेबंदाबरोबरच लेखापरीक्षण करुन महिन्याच्या आत प्रकाशित करण्याची गरज आहे. व्यवहारात पारदर्शीपणा अवलंबलाच पाहिजे. सध्या नागरी बँकांसमोर खासगी, व्यावसायिक बँकांचे आव्हान आहे. त्यांच्या स्पर्धात्मक आव्हानाला तोंड देण्यासाठी नियमांची कडक अंमलबजावणी तसेच कामकाजात पाठीमागे राहून चालणार नाही. जी बँक आर्थिकदृष्ट्या व तांत्रिकदृष्ट्या सक्षम असेल तीच टिकेल.'

रिझर्व्ह बँकेच्या नागपूर विभागाच्या क्षेत्रीय संचालक ज्योतिका जिवानी यांनी बँकांच्या तांत्रिक सक्षमतेबाबत मार्गदर्शन केले. जिवानी म्हणाल्या, 'छोट्या बँक तंत्रज्ञानाच्या टप्प्यावर मागे पडतात. जर स्पर्धेला उतरायचे असेल तर लोकांना सोईस्कर होणारे तंत्रज्ञान स्वीकारले पाहिजे. तंत्रज्ञानावर होणारा खर्च हा खर्च म्हणून न पाहता एक भांडवल म्हणून पाहण्याची गरज आहे. यातून बँकेला निश्चितच फायदा होत असतो.'

परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी सहकारातील बदलांबाबत मते मांडली. दिवसभरात ज्योतिंद्र मेहता यांनी नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राला सक्षम बनवणे या विषयावर निपूण कोरे यांनी, वसुलीमध्ये येणाऱ्या अडचणी या विषयावर आणि रिझर्व्ह बँकेची मार्गदर्शक तत्वे, आदेशांबाबत डॉ. अजित कुमार यांनी मार्गदर्शन केले. सायबर क्राइमबाबत सुनील बक्षी यांनी मार्गदर्शन केले. फेडरेशनच्या सचिव सायली भोईर, किरण कर्नाड उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वतंत्र संरक्षण कायद्याची मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'कडक नियम, तंत्रज्ञान, व्यावसायिकता अशा विविध पातळीवरील परिस्थितीतून तावून सुलाखून नागरी सहकारी बँकांनी परिस्थिती भक्कम केली आहे. पण काही बँकांच्या कामकाजाचा इतर ठिकाणच्या बँकांमधील प्रामाणिक संचालकांना फटका बसू नये. यासाठी त्यांच्याकरिता स्वतंत्र संरक्षण कायदा असावा, अशी रिझर्व्ह बँकेकडे मागणी करण्यात येत आहे,' असे दि महाराष्ट्र अर्बन को ऑप​रेटिव्ह बँक्स फेडरेशनचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी सांगितले. दि महाराष्ट्र अर्बन को ऑप​रेटिव्ह बँक्स फेडरेशनच्या सहकार परिषदेवेळी झालेल्या पत्रकार परिषदेत 'त्याचबरोबर एकच शाखा असलेल्या युनिट बँकांच्या कोअर बँकिंगसाठी आता रिझर्व्ह बँकेकडून प्रत्येक बँकेसाठी पाच लाख रुपये दिले जाणार आहेत', अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

अध्यक्ष अनास्कर म्हणाले, 'अर्बन बँका खासगी क्षेत्रात वर्ग करणे तसेच ठेव विमा संरक्षण महामंडळासाठी ज्या बँक अशक्त असतील त्यांना जास्त प्रिमीअम व सशक्त बँकांना कमी प्रिमीअम हे धोरण रिझर्व्ह बँकेने अवलंबले होते. त्याला फेडरेशनच्या माध्यमातून विरोध केला आहे.'

अनास्कर म्हणाले, 'रिझर्व्ह बँक व नागरी बँकांमध्ये असलेली दरी दूर करण्याबरोबरच सुसंवाद साधण्यासाठी या परिषदांचे आयोजन केले जात आहे. रिझर्व्ह बँकेकडून अनेक निकष कडक केले जात आहेत. त्या निकषांप्रमाणे बँकांनी वाटचाल चालवली आहे. त्यामुळेच बँक सुधारत आहेत. एनपीएबाबत ५०८ पैकी केवळ १५ बँकांवर निर्बंध आहेत. व्यावसायिकता आत्मसात केली जात आहे. ३४४ बँकांनी कोअर बँकिंग केले आहे. अशा साऱ्या कठीण परिस्थितीतून या बँक सामान्यांना मदत करण्यास अग्रक्रमावर आहेत. समाजात जोपर्यंत बँकिंगबाबत जागरुकता निर्माण होत नाही. तोपर्यंत नागरी बँक सक्षम होणार नाहीत, अशी स्थिती आहे.'

यावेळी फेडरेशनचे उपाध्यक्ष रमाकांत खेतान व किरण कर्नाड आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महामंडळ प्रचाराला वेग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पोस्टरबाजी, पत्रके, पॅनेलचा जाहीरनामा, आश्वासने अजेंड्यांची माहिती, व्यक्तीगत भेटीगाठी, मेळावे, बैठका आणि सोशल मिडियाद्वारे ऑनलाइन सुरू असलेल्या पोस्टसचा धडका अशा माध्यमातून अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीसाठी प्रचाराला वेग आला आहे.

मतदानासाठी अवघे चार दिवस राहिल्याने पॅनेलप्रमुखांसह अपक्ष उमेदवारांनीही पायाला ​भिंगरी बांधली आहे. रविवारी २४ रोजी मतदान तर मंगळवारी २६ रोजी मतमोजणी आणि निकाल आहे.

चित्रपट महामंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. संचालक मंडळातील १४ जागांसाठी कोल्हापूर, पुणे व मुंबई येथील १२१ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. तर ३ हजार ९१२ सभासद मतदानासाठी पात्र आहेत.

गेल्या पाच वर्षात महामंडळ विविध कारणांनी गाजले. या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकीतील उमेदवार, पॅनेल याबाबत सभासदांमध्ये जोरदार चर्चा आहे. मुंबईतील पॅनेलप्रमुखांच्या बैठकांना आणि मेळाव्यांना कोल्हापुरात उधाण आले आहे. प्रत्येक मतदार सभासदांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांनी कंबर कसली असून महामंडळाच्या मावळत्या संचालक मंडळाच्या कारभारावर ताशेरे ओढण्यात प्रत्येक उमेदवार आघाडीवर आहे. विशेष म्हणजे नऊ पॅनेलमध्ये माजी तीन संचालकांनी आपली वेगळी पॅनेल तयार केल्यामुळे निवडणुकीत चांगलीच रंगत आली आहे.

अधिकाधिक मतदानाची टक्केवारी कोल्हापुरात असल्यामुळे कोल्हापूर केंद्रांअंतर्गत येणाऱ्या मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांनी फिल्डिंग लावली आहे. प्रचाराच्या मुद्द्यांमध्ये चित्रनगरी, जयप्रभा स्टुडियो यांचा शासनदरबारी पाठपुरावा, वृद्ध कलावंताच्या मानधनाचा प्रश्न, कामगारांच्या घरकुल योजनेचा प्रस्ताव, आरोग्य विमा, महामंडळाच्या उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न यांचा प्रकर्षाने समावेश असल्याचे प्रचारामध्ये दिसून येत आहे. प्रचाराचा कालावधी कमी असल्याने येत्या दोन दिवसांत याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आणखी एका कासवाला जीवदान

$
0
0

कोल्हापूर : कळंबा तलावातील शिल्लक पाण्यात असलेल्या कासवांपैकी सोमवारी रात्री आणखी एक कासव सापडले. हे कासव तब्बल २२ किलो वजनाचे असून शोध मोहिमेतील हे सर्वात मोठे कासव आहे. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी हे कासव वैद्यकीय तपासणी व पंचनाम्यानंतर रंकाळा तलावात सोडले.

कळंबा तलावात शनिवारी वनविभाग व अग्निशमन दलाने संयुक्तरित्या शोध मोहिम चालवली. रविवारी एक कासव सापडले. त्याचे वजन आठ किलो होते. सोमवारी रात्री शोध मोहिम व गस्त घालण्यात येत असताना त्या पाण्यातून आणखी एक मोठे कासव बाहेर आले. हे सर्वात मोठे कासव होते. त्याला पकडल्यानंतर वैद्यकीय तपासणी केली. कासवाची लांबी ६६ सेंटीमीटर, रुंदी ५४ सेंटीमीटर आहे. वनक्षेत्रपाल ए. बी. निंबाळकर, वनपाल पी. डी.बोडके, वनरक्षक आर. के. देसा, राजू उलपे, गजानन मगदूम, भगवान चौगुले, सुरेश कांबळे यांनी मोहीम राबवली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आवाडे गटाचे दबावाचे राजकारण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाने पुन्हा एकदा हुलकावणी दिल्याने जिल्हयातील आवाडे गटात तीव्र नाराजी आहे. यातूनच माजी मंत्री कल्लाप्पाणा आवाडे व माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी पक्षाला घटस्फोट देण्याचा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला आहे. पण, सध्यस्थितीत दुसरा कोणताच पर्याय नसल्याने आणि बंडखोरी हा आवाडेंचा स्वभाव नसल्याने आवाडे गटाची सध्याची भूमिका म्हणजे दबावाचे राजकारण असल्याची चर्चा आहे. पक्षाच्या नव्या पदाधिकारी नियुक्तीने जिल्ह्यात गटबाजीच्या राजकारणाला पुन्हा खतपाणी मिळाले आहे.

जिल्हा काँग्रेसचे पी. एन. पाटील हे सतरा वर्षे अध्यक्ष आहेत. मुदत संपल्याने त्यांना पक्षाने राज्य सरचिटणीस म्हणून बढती दिली.त्यामुळे आवाडे यांच्या जिल्हाध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झाला होता. पण आवाडेंना अनेकांनी विरोध केल्याने प्रभारी म्हणून या पदाची जबाबदारी पुन्हा एकदा पी.एन. यांच्याकडेच दिली. यामुळे मात्र आवाडे गट नाराज झाला आहे. पी.एन. यांना पद देताना पक्षाने सतेज पाटील यांनाही कार्यकारी समिती आणि कोल्हापूर लोकसभेचे पालक म्हणून संधी दिली आहे. आवाडे यांना मात्र पक्षाने काहीच ​न दिल्याने हा गट नाराज झाला आहे.

गेले चाळीस वर्षे आवाडे गट काँग्रसमध्ये आहे. या काळात या गटाने जिल्हयात ताकद वाढवण्याऐवजी हातकणंगले आणि शिरोळ या दोन तालुक्यातच अधिक लक्ष घातल्याने या गटाची जिल्हयात ताकद नाही. या उलट पी.एन. पाटील यांच्यासह अनेक विरोधक मात्र आहेत. यामुळे यापूर्वी अनेकदा आवाडे काँग्रस सोडणार म्हणून बातम्या आल्या. मध्यंतरी तर त्यांचा राष्ट्रवादी प्रवेश निश्चीत झाल्याचे बोलले जात होते. मात्र तसे काहीच झाले नाही. पक्षाने अन्याय केला म्हणून आवाडे गटाने अनेकदा बंडखोरीचा इशारा दिला. मात्र बंडखोरी करण्याचे धाडस त्यांनी कधीच केले नाही. तो आवाडे पितापुत्रांचा स्वभावच नाही.

जिल्हाध्यक्ष निवडणुकीत कल्लाप्पाणा आवाडे यांचा पराभव झाला. संजय घाटगे निवडून आले. तेव्हा आवाडे पक्ष सोडणार असे वातावरण झाले होते. लोकसभा निवडणुकीत आवाडे राष्ट्रवादीचा झेंडा हातात घेणार अशी चर्चा होती. पण यातील काहीच झाले नाही. राष्ट्रवादीत त्यांचे विरोधक जास्त आहेत. भाजपचे आमदार सुरेश हाळवणकर इचलकरंजीत प्रबळ असल्याने भाजपमध्ये जाणे अशक्य आहे. शिवसेना आणि आवाडे हे गणित न जमणारे आहे. स्वाभिमानी संघटनेत ते जाऊच शकत नाहीत. त्यापेक्षा काँग्रेसमध्ये राहून दबावाचे राजकारण करणे त्यांच्या सोयीचे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जीवन-शिक्षण’ची आयएसओवर मोहर

$
0
0

दीपक मांगले, गडहिंग्लज

गडहिंग्लज तालुक्याच्या पश्चिम भागातील कौलगे (ता.गडहिंग्लज) येथील जीवन-शिक्षण विद्यामंदिर प्रशालेने शैक्षणिक क्षेत्रात उंच भरारी घेत तालुका स्तरावर नावलौकिक मिळविला. उत्कृष्ट ज्ञानरचनावाद शिक्षणपद्धत, प्रशस्त आणि सुंदर इमारत, अनुभवी अध्यापक वर्ग या सगळ्यांच्या सहकार्याने जीवन-शिक्षण विद्यामंदिरने आयएसओ मानांकन मिळविले आहे.

कौलगे येथे ५ मे, १९४७ मध्ये सुमारे तीन एकर जागेत प्रशस्त अशा दहा खोल्याची शाळा उभारण्यात आली. शाळेत सध्या ११७ विद्यार्थी शिक्षण घेत असून सहा सहाय्यक शिक्षक आहेत. प्रशस्त खुले मैदान, अंतरंग व बोलका व्हरांडा, स्टेज, ऑक्सिजन पार्कसह सुंदर बगीचा व तितकाच नीटनेटकेपणा पाहणाऱ्यांला आकर्षित करतो.

शाळेच्या वाचनालयात सुमारे ९०० पुस्तके आहेत. शाळेत इ-लर्निंगची सुविधा असून सहा संगणक असलेला अद्यावत कक्ष आहे. यासाठी ग्रामस्थ प्रताप डोंगरे यांच्या सहकार्यातून शाळेने प्रोजेक्टर घेतला असून चौथी ते सातवी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना इथे संगणक प्रशिक्षण दिले जाते. शाळेचे चार विद्यार्थी प्रज्ञा शोध परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळविले आहे. शैक्षणिक गुणवत्तेबरोबर खेळातही मुलांनी यश संपादन केले आहे. तालुका स्तरावर लांब उडी, गोळा फेक, मुला-मुलींच्या खो-खो संघाने उल्लेखनीय कामगिरी बजाविली आहे. तसेच क्रीडा प्रबोधिनीमध्ये या शाळेचा ओंकार चव्हाण याची निवड झाली आहे.

शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्यांनीही शाळेच्या व्यवस्थापनात उल्लेखनीय कामगिरी बजावली असून प्रत्येक महिन्याला सभेचे आयोजन केले जाते. सभे दरम्यान शाळेला आवश्यक गोष्टींची पाहणी केली जाते. तत्परतेने ती पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो. संपूर्ण तालुक्याला ज्ञानरचनावाद संकल्पनेने एक वेगळी ओळख दिली आहे. कौलगे शाळेतही ज्ञानरचनावाद संकल्पनेवर आधारित शिक्षण दिले जाते. आजअखेर सावतवाडी, शिरोळ, हतकणंगले, सिंधुदुर्ग, पन्हाळा, शाहूवाडी, कागल येथून अभ्यासकांनी भेट दिली आहे.

शाळेच्या विकासासाठी शाळेने लोकवर्गणीतून सुमारे १ लाख, ८५ हजार रुपये गोळा केले. याच माध्यमातून शाळेच्या नूतनीकारण झाले. सरपंच शिवाजी जाधव, उपसरपंच प्रभावती कांबळे, शिक्षणप्रेमी व माजी सरपंच रामचंद्र पवार, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य सागर पवार, दत्तात्रय मटकर, धनाजी शिंदे यांच्यासह मुंबई, पुणे येथे स्थायिक झालेल्या ग्रामस्थांनी विशेष सहकार्य केले आहे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंब्याला ‘डाग’ केमिकलचा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

फळांचा राजा आंब्याची चव चाखण्यासाठी खवय्ये तयार आहेत. मात्र, काही व्यापाऱ्यांकडून आंबा रासायनिक पद्धतीने पिकविला जात आहे. त्यामुळे अनेकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या प्रकारावर कारवाई करण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासन विभाग मूग गिळून गप्प आहे.

आंबा पिकविण्यासाठी विक्रेत्यांकडून रासायनिक पदार्थाचा (कॅल्शियम काबाईड) उपयोग केला जात असल्याचे दिसून येत आहे. त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. सध्या बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे आंबे विक्रीसाठी आले आहेत. आंब्याची चव घ्यायची, एवढीच माहिती ग्राहकांना आहे. नेमका आंबा कोणत्या प्रकारचा आहे, हे ग्राहकांना ओळखत नाही. बाजारात रत्नागिरी, हापूस, देवगड हापूस, केशर, बेगमपल्ली अशी आंब्याची नावे घेऊन व्यापाऱ्यांकडून विक्री सुरू आहे. सुमारे ४०० रुपयांपासून एक हजार रुपयापर्यंत आंब्याच्या पेटीचे दर आहेत. ग्राहकांना कमी किमतीत आंबा देण्यासाठी काही व्यापाऱ्यांनी शक्कल लढविली आहे. कच्चा माल स्वस्तात आणून त्यात रासायनिक औषधांचा वापर केला जातो. हा आंबा ग्राहकांच्या माथी मारला जात आहे. या रासायानिक पदार्थाचा उपयोग केलेली फळे आरोग्यास अपायकारक ठरत आहेत. बाजारपेठेत रत्नागिरी, आंध्रप्रदेश, कर्नाटक भागातून आंबा मोठ्याप्रमाणात विक्रीला आला आहे. साधारणात रोज ५० ते ६० ट्रक माल येतो. बाजारात हापूस आंबा मोठ्या प्रमाणात विक्रीला आला आहे. या प्रकाराकडे अन्न व औषधी प्रशासन विभाग आणि महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.

फळाविषयी जागरूक राहा

रासायानिक पदार्थांचा वापर करून विक्री केलेली फळे शरीराला घातक आहेत. त्याचा परिणाम पोटाच्या आतड्यावर आणि किडनीवर होत असतो. मुळात फळांमध्ये जी जीवनसत्त्वे असतात ती रासायनिक पदार्थामुळे नष्ट होऊन जातात. त्यामुळे अशा फळांमधून जीवनसत्त्वे काहीच मिळत नाहीत. उलट शरीरावर त्याचा परिणाम होत असतो. विशेषत: लहान मुलांच्या किडनी आणि आतड्यावर त्याचा जास्त परिणाम होतो. वेगवेगळी फळे रायानिक औषधांमध्ये साठवून ठेवली जातात. ती पाण्यात टाकल्यानंतर फॉस्फरिक अॅसिड वायू तयार होतो. त्यामुळे हाडे ठिसूळ होत असल्याने पालकांनी फळांविषयी जागृत राहावे, असा सल्ला डॉ. संदेश कचरे यांनी दिला.

'फळे पिकविण्यासाठी रासायनिक औषधांचा उपयोग केला जातो. तो लहान मुलांसाठी अतिशय घातक आहे. या रासायनिक औषधांपासून अॅसिटीलीन नावाचा वायू तयार होत असून त्याचा परिणाम मेंदूवर होत असतो. लवकर पिकवलेली फळे खाल्ली तर ताप येणे, मळमळ करणे, उलट्या, जुलाब यांचा त्रास होतो.'

डॉ. मोहन पाटील, बालरोगतज्ज्ञ

'नैसर्गिक आंबा पिकविण्यासाठी २० ते २१ दिवसांचा अवधी लागतो. आंबा लवकर पिकविण्यासाठी व्यापारी कृत्रिमरीत्या आंबा पिकविण्यासाठी कॅल्शियम कार्बाइडचा वापर करून आंबे पिकवितात. या तंत्रामुळे आंब्याचा केवळ रंग बदलतो. हिरवा आंबा पिवळा होतो. मात्र, त्याची चव बदलत नाही. या प्रकारावर अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून कारवाई अपेक्षित आहे.'

संदीप पाटील, ग्राहक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>