Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

एमआयडीसीच्या पाणीपुरवठ्यात१८ तासांची कपात

$
0
0


सोलापूर

सोलापूर शहराला सहा दिवसांआड पाणीपुरवठा होत असताना २४ तास पाणी घेणाऱ्या चिंचोळी एमआयडीसीच्या पाण्यात गुरुवारपासून १८ तास पाणी कपात करण्याचा निर्णय पालिका आयुक्तांनी घेतला आहे. मागील आठवड्यात चिंचोली एमआयडीसी ५ एमएलडी ऐवजी २४ एमएलडी पाण्याचा उपसा करीत असल्याचे समोर आले होते. त्यानंतर मंगळवारी पालिका आयुक्तांनी प्रतिनिधींशी चर्चा केली. २० एप्रिलनंतर एक बैठक आयोजित केली जाणार असून, पाण्याचे प्रमाण मोजणे, मीटर बसवणे, पाण्याचा दर हटवणे या मुद्द्यावंर चर्चा केली जाणार आहे. या चर्चेवेळी पाटबंधारे खात्याचे अधिकारीही उपस्थित राहतील. सध्या औज बंधारा, कोरडा पडला असून, चारीद्वारे पाणी जॅकवेलपर्यंत आणून पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न केला जात आहे. बंधाऱ्यातून मागील आठवड्यात ७५ एमएलडी पाणी उपसा केला जायचा, मागील दोन दिवसांत ५८ एमएलडीवर आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मंदिर प्रवेशावरुन संघर्ष

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

श्री अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भूमाता बिग्रेडच्या संस्थापक, अध्यक्षा तृप्ती देसाई यांच्या विजयी रॅलीला ​हिंदुत्ववादी संघटना व अंबाबाई भाविक प्रतिरॅली काढून प्रत्युत्तर देणार आहेत. यामुळे संघर्षाची चिन्हे आहेत. सोमवारी गाभारा दर्शनाचा पायंडा पाडला असताना देसाई विजयी रॅली काढून स्टंट करत आहेत, असा आरोप भाविकांनी केला आहे. दरम्यान हिंदुत्वावादी संघटना व अंबाबाई भाविकांच्या रॅलीला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. पोलिसांनी जमावबंदीचा आदेश लागू केला आहे. देसाई बुधवारी दुपारी चार वाजता कोल्हापुरात येणार आहेत.

मंदिराच्या गाभारा प्रश्नांवर गेले पंधरा दिवस शहर ढवळून निघाले आहे. सामाजिक कार्यकर्त्या अनुराधा भोसले यांच्यासह महिला गाभाऱ्यात प्रवेश घेण्यासाठी गेल्या असता त्यांना प्रवेश रोखला होता. दरम्यान देसाई १३ एप्रिलला दर्शन घेण्यासाठी येत असल्याचे जिल्हा प्रशासनाला कळवले होते. या पार्श्वभूमीवर सोमवारी येथील विठ्ठल मंदिरात बैठक आयोजित केली होती. यावेळी दोन गटांत आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या होत्या. गाभाऱ्यात स्त्री-पुरूष भेदभाव मानता येणार नाही, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केल्याने सायंकाळी सोमवारी दोन्ही गटांनी प्रवेशाचा निर्णय सामोपाचाराने घेतला.

सोमवारी सायंकाळी सात महिलांनी गाभाऱ्यात दर्शन घेऊन पायंडा पाडला. त्याचे सर्वत्र स्वागत होत आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी देसाई यांच्या नेतृत्वाखाली भूमाता ब्रिगेडच्या महिला ताराराणी चौकातून रॅली काढणार आहे. रॅलीनेच त्या गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेणार आहेत. दरम्यान, हा प्रश्न सामोपचाराने घेतला असताना देसाई रॅली काढून कसला विजयोत्सव साजरा करणार आहेत? असा सवाल भाविकांकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात हिंदूत्ववादी कार्यकर्ते व अंबाबाई भाविकांनी प्रतिरॅली काढण्यासाठी परवानगी मागितली आहे. याला शहर पोलिस उप अधीक्षक भारतकुमार राणे यांनी परवानगी नाकारली. देसाई यांनी विजयी रॅली काढल्यास त्याला विरोध करण्यासाठी ताराराणी चौकातूनच रॅली काढली जाईल, असा इशारा निवास साळोखे, रामभाऊ चव्हाण, महेश उरसाल यांनी दिला आहे.


भूमाता बिग्रेडच्या महिला कार्यकर्त्या ताराराणी पुतळ्याला अभिवादन करून अंबाबाई दर्शनाला जाणार आहेत. आम्ही महिला एकत्रित जाणार आहोत. ही रॅली नाही. त्यासाठी पोलिसांच्या परवानगीची आवश्यकता नाही.

तृप्ती देसाई, अध्यक्ष, भूमाता

दर्शनासाठी विशिष्ट वेळ....

गाभाऱ्यामध्ये कायद्याने स्त्री पुरूष समानता तत्व लागू करण्यासाठी अंबाबाई मंदिरातील गाभाऱ्यात दिवसातून विशिष्ट वेळेत दर्शन देण्यासंबधी जिल्हा प्रशासन अनुकूल आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अमित सैनी यांनी पत्रकारांशी बोलताना देणार आहे. दरम्यान भूमाता ब्रिगेडचा संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई गाभाऱ्यात विजय रॅलीने दर्शन घेणार असल्याने मंदिर परिसरात तंग झाले आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलिस अधिकाऱ्यांच्यात रात्री उशिरापर्यंत बैठका सुरू होत्या.

सोमवारी कोल्हापुरातील महिलांसाठी अंबाबाईचा गाभारा खुला करण्यात आल्यावर सात महिलांनी दर्शन घेतले. या घटनेनंतर यापुढे मंदिरातील गाभाऱ्यात कोणत्याही प्रकारचा स्त्री पुरूष भेदभाव पाळता येणार नाही असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मंदिरात दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या महिलांना ड्रेसकोड असावा याबाबत माहिती नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. सोमवारी महिलांनी दर्शन घेतले असल्याने तृप्ती देसाई यांना दर्शनासाठी कोणतीही आडकाठी होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

महिला भाविकांच्या आग्रहावरून गाभाऱ्यात दर्शनासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. गाभाऱ्यातील स्त्री पुरूष समानतेच्या तत्वाला श्रीपूजकांनी संमती दर्शवली आहे. मंदिरातील आर्द्रता, मौल्यवान दागिन्यांची सुरक्षितता व होणारी गर्दी लक्षात घेऊन महिलांना दर्शनासाठी विशिष्ट वेळ ठेवण्याबाबत जिल्हा प्रशासन विचार करत आहे. ही वेळ सकाळच्या सत्रात ठेवायची की सायंकाळच्या सत्रात ठेवायची याबाबत श्रीपूजक, पोलिस प्रशासनांशी चर्चा करून निश्चित केली जाणार आहे. महिला दर्शनाबाबत कोल्हापुरची प्रतिमा चांगली रहावी. चुकीचा संदेश जाऊ नये याबाबत प्रशासन प्रयत्नशील आहे.

दरम्यान तृप्ती देसाई यांच्या गाभाऱ्यातील दर्शनाच्यावेळी कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती उद्भवू नये म्हणून मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी सैनी, पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे व श्रीपूजक प्रतिनिधींशी स्वतंत्रपणे चर्चा केली. देसाई या विजयी रॅलीने कोल्हापुरात येणार असल्याने गाभारा प्रवेश विरोधी कृती समितीने विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यादृष्टीने मंगळवारी रात्री कृती समिती, हिंदू जनजागरण समिती, बजरंग दलाचे कार्यकर्ते जुना राजवाडा पोलिस ठाण्यात पोलिस कर्मचाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी थांबले होते.


तृप्ती देसाई यांच्या ड्रेसकोडमध्ये वादंग

अंबाबाई दर्शनासाठी तृप्ती देसाई यांच्याशी जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल देशमुख यांच्याशी संपर्क साधला. देवीच्या दर्शनासाठी साडी परिधान करून येण्याची विनंती केली. पण दर्शनासाठी आपण ड्रेसकोड पाळणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आम्ही भाविक म्हणून दर्शनासाठी येणार आहे. अतिशय पवित्र मनाने दर्शन घेणार आहे. त्यामुळे साडी हा ड्रेसकोड न पाळता सलवार कमीज या भारतीय वेषात येणार असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. मी जीन्स घालून आले असते तर अडवू शकता पण मी भारतीय पेहरावात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महिलांना सकाळची वेळ?

आर्द्रता, दागिन्यांची सुरक्षितता व गर्दी लक्षात घेऊन महिलांना दर्शनासाठी सकाळची वेळ निश्चित होण्याची शक्यता आहे. सकाळी वातावरण थंड असल्याने आर्द्रता कमी असते. सकाळी देवीला मौल्यवान दागिने नसल्याने सुरक्षिततेचा प्रश्नही मागे पडणार आहे. सकाळी गर्दी कमी असल्याने चेंगराचेंगरीचा होण्याची शक्यता कमी आहे. आरती, अभिषेक, विधी यांचा विचार करून सकाळची वेळ निश्चित होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साडी नेसूनच मंदिरात जा, पोलिसांची अट

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । कोल्हापूर

शनिशिंगणापूरनंतर कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्यासाठी निघालेल्या भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई यांना पोलिसांनी साडी नेसूनच मंदिरात येण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.

तृप्ती देसाई यांनी पोलिसांची सूचना सपशेल धुडकावली आहे. मंदिरात जाण्यासाठी कोणत्याही प्रकारचा ड्रेस कोड निश्चित करण्यात आलेला नाही. त्यामुळे साडी नेसली नाही म्हणून कुणीही मला मंदिरात प्रवेश नाकारू शकत नाही. मी कोणते कपडे घालावेत आणि कोणते घालू नयेत, हे सांगण्याचा अधिकार दुसऱ्या कुणालाही असू शकत नाही. मी पंजाबी ड्रेस घालून मंदिरात जाणार आहे. त्याला कुणीही आक्षेप घेऊ शकत नाही, असे देसाई यांनी निक्षून सांगितले. पोलिसांकडून आम्हाला मंदिर प्रवेशाची परवानगी मिळालेली नाही पण, त्याने कोणताही फरक पडत नाही. आम्ही ठरल्याप्रमाणे मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन महालक्ष्मीचे दर्शन घेणार आहोत, असेही देसाई यांनी नमूद केले.

पोलीस निरीक्षकांनी केला फोन

जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल देशमुख यांचा मंगळवारी मला फोन आला होता. बुधवारी मंदिरात जाताना साडी नेसून जावे, असे त्यांनी आपणास सांगितले पण मंदिर प्रवेशाच्या नियमानुसार अशी कोणतीही अट घातली जाऊ शकत नाही, असे आपण त्यांना सांगितल्याचे देसाई यांनी नमूद केले तर याबात देशमुख यांनीही आपले स्पष्टीकरण दिले आहे. देसाई यांना साडी नेसून मंदिरात जाण्यास सांगितल्याचे त्यांनी मान्य केले. मंदिरातील पुजारी ड्रेस कोडचे पालन करत असतात. मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी ते आवश्यकही आहे. त्याप्रमाणे महिलांनीही मंदिरात साडी नेसून यावे ही अपेक्षा असते. सोमवारी तीन महिला साडी नेसून न आल्याने त्यांना मंदिरात प्रवेश नाकारण्यात आला होता. त्यामुळेच मंदिराच्या पंरपरेची आम्ही देसाई यांना कल्पना दिली. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, हा एकमेव उद्देश त्यामागे आहे, असे देशमुख यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, भूमाता ब्रिगेडच्या महिलांनी तृप्ती देसाई यांच्या नेतृत्वाखालील आज शहरातील ताराराणी चौकातून रॅली काढून महालक्ष्मीचं दर्शन घेण्याचा निर्धार केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूरात तृप्ती देसाईंना भाविकांकडून मारहाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भाविकांच्या प्रचंड विरोधाला न जुमानता भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी अंबाबाई गाभाऱ्यात घुसून प्रवेश केला. दर्शनानंतर भाविकांनी त्यांचा तीव्र निषेध करत धक्काबुक्की करत मारहाण केली. त्यांच्या अंगावर हळदी कुंकू फेकले. पोलिस बंदोबस्तात देसाई यांना प्रवेश करण्यासाठी पाठीशी घालणाऱ्या जिल्हा प्रशासनाचा महिला भाविक व श्रीपूजकांनी तीव्र शब्दात निषेध केला. देसाई यांच्या गाभारा प्रवेश दर्शनामुळे अंबाबाई मंदिर व शहराला पोलिस छावणीचे रूप प्राप्त झाले होते. धक्काबुक्कीत जखमी झालेल्या देसाई यांना खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल करण्यात आले आहे.

शनि शिंगणापूर दर्शनानंतर विजयी रॅली काढून अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्याचे पत्र देसाई यांनी यापूर्वीच जिल्हा प्रशासन व पोलिसांना दिले होते. देसाई यांच्या गाभारा प्रवेशाला महिला भाविक, हिंदूत्ववादी संघटनांनी विरोध करण्याचा इशारा दिला होता. देसाई यांच्या गाभारा प्रवेशापूर्वी स्थानिक महिलांना गाभाऱ्यात दर्शन प्रवेश देऊन स्त्री पुरूष भेदभाव पाळला जात नसल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे देसाई यांनी अंबाबाई गाभाऱ्यात प्रवेश करण्यास येऊ नये असा इशारा अंबाबाई भाविकांनी यांनी दिला होता. पण देसाई यांनी विजयी रॅली काढून दर्शन घेणारच असे स्पष्ट केल्याने गेले दोन दिवश शहरातील वातावरण तंग होते.

पोलिस प्रशासनाने त्यांना साडी परिधान करून अंबाबाई दर्शन घेण्याची विनंती केली होती पण त्यांनी भारतीय वेशभूषेत दर्शन घेणार असे सांगितले होते. त्यानंतर बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास पुण्याहून देसाई कोल्हापुरात मोटारीने कोल्हापूरकडे रवाना झाल्या. अंबाबाई मंदिराकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर बंदोबस्त ठेवण्यात आला होता. देसाई यांना रोखण्यासाठी भाविक अंबाबाई मंदिरात जमू लागले. महिलांनी मंदिराच्या प्रवेश मार्गात अडथळे उभे केले होते. कोणत्याही परिस्थिती देसाई यांना प्रवेश दिला जाणार नाही असे स्पष्ट केले. पाच वाजता त्यांचे कोल्हापुरात मोटारीने आगमन झाले. त्यांच्या समवेत ५० हून अधिक कार्यकर्ते उपस्थित होते. पोलिसांनी त्यांना रूईकर कॉलनीजवळील लिशा हॉटेलजवळ रोखले. जमावबंदीचा आदेश असल्याने रॅली काढता येणार नाही असे पोलिसांनी स्पष्ट केले. पण देसाई रॅली काढण्याच्या निर्णयावर ठाम होत्या. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन अलंकार हॉल येथे नेण्यात आले.

अलंकार हॉल येथे शहर पोलिस उप अधीक्षक भारतकुमार राणे यांनी देसाई यांच्याशी चर्चा केली. केवळ जमावबंदी आदेश असल्याने चार महिलांनी देवीच्या दर्शनासाठी जावे असे स्पष्ट केले. पोलिसांची अट मान्य केली. त्यानंतर कडक पोलिस बंदोबस्तास देसाई यांना अंबाबाई मंदिरात आणले. महिला पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कडे करून त्यांना गाभाऱ्यात आणले. यावेळी उपस्थित महिला भाविकांनी त्यांच्या निषेधाच्या घोषणा देऊन त्यांना बाहेर काढा. त्यांना ओत सोडू नका अशा घोषणा दिल्या. दीपा पाटील, वैशाली महाडिक यांच्यासह महिला त्याच्या अंगावर धाऊन गेल्या पोलिसांनी त्यांना रोखले. श्री पूजक अॅड केदार मुनिश्वर यांनी देसाई यांना गाभाऱ्यात प्रवेश करता येणार नाही असे सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे असे कागदपत्रे दाखवून स्पष्ट केले. पण गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेण्याला रोखता येणार नाही असे देसाई यांनी स्पष्ट केले. त्यानंतर देसाई संगमरवरी पायरीजवळी स्टीलच्या बाकड्यावर बसल्या. त्यांना रोखण्यासाठी श्रीपूजक व त्यांच्या कुटुंबातील महिलांनी कडे केले होते. महिला भाविकांनी देसाई यांनी निषेधाच्या घोषणा सुरू केल्या. सुमारे अर्धा तास हा गोंधळ सुरू होता. पोलिसांची मोठी दमछाक झाली होती. अखेर करवीर प्रातांधिकारी प्रशांत पाटील व करवीर तहसिलदार योगेश खरमाटे यांनी देसाई यांचा प्रवेश रोखता येणार नाही असे श्रीपूजकांना स्पष्ट केले. त्यानंतर महिला पोलिस कर्मचाऱ्यांच्या सरंक्षणात श्रीपूजकांचे कडे तोडून गाभाऱ्यात घुसल्या. गर्भकुडीत त्या जाऊ नयेत यासाठी श्रीपूजकांचा आटापिटा सुरू होता. गाभाऱ्यात दर्शन घेऊन पोलिस बंदोबस्तात देसाई यांना बाहेर काढताना चिडलेल्या श्रीपूजक व महिलांनी शिव्यांची लाखोली वाहिली. त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. त्यांच्या अंगावर हळदी कुंकू फेकण्यात आले. पोलिस बंदोबस्तात देसाई यांनी मंदिराच्या आवारातून सुरक्षित बाहेर काढल्यानंतर गाभारा प्रवेशाचे नाट्य तब्बल चार तासानंतर संपुष्टात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अॅड. शिंदेंना गोडसाखर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गडहिंग्लज

हरळी (ता. गडहिंग्लज) येथील कै. आप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे माजी आमदार अॅड. श्रीपतराव शिंदे (जनता दल) यांची तर उपाध्यक्षपदी संग्राम नलवडे (काँग्रेस) यांची निवड झाली. कारखाना कार्यस्थळावर झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत निवडणूक निर्णय अधिकारी संजय पवार व सहाय्यक निवडणूक अधिकारी हनुमंतराव पाटील यांच्या उपस्थितीत निवड झाली. निवडीनंतर फटाक्यांच्या आतषबाजीत व गुलालाच्या उधळून कार्यकर्त्यांनी विजयोत्सव साजरा केला. यावेळी तणावपूर्ण वातावरणामुळे पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

'गोडसाखर'साठी आमदार हसन मुश्रीफ, संध्यादेवी कुपेकर, सतेज पाटील, अॅड. श्रीपतराव शिंदे व संग्रामसिंह नलवडे यांची शेतकरी विकास आघाडी, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, डॉ. प्रकाश शहापूरकर व प्रकाश चव्हाण यांची 'काळभैरी शेतकरी विकास आघाडी' व स्वाभिमानी शेतकरी संघटना अशी तिरंगी लढत झाली. यामध्ये शेतकरी आघाडीने १९ पैकी ११ जागा मिळवीत वर्चस्व सिद्ध केले तर काळभैरी आघाडीला आठ जागांवर समाधान मानावे लागले.

सकाळपासूनच कारखाना कार्यस्थळावर कार्यकर्त्यांनी गर्दी केली. अटीतटीची निवडणूक पाहता मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सभागृह परिसरात कोणालाही फिरकू देण्यात आले नाही. वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला होता. बारा वाजून पन्नास मिनिटांनी अॅड.शिंदे, अमर चव्हाण, सतीश पाटील यांच्यासह आठ संचालक तर संग्राम नलवडे यांच्यासोबत तीन संचालक सभेसाठी हजर झाले. पाठोपाठ डॉ. प्रकाश शहापूरकर सात संचालकांसह दाखल झाले.

निवडणूक निर्णय अधिकारी पवार यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी एक वाजता निवड प्रक्रिया सुरू झाली. अॅड. शिंदे व डॉ. प्रकाश शहापूरकर यांनी अध्यक्षपदासाठी तर संग्रामसिंह नलवडे व प्रकाश चव्हाण यांनी उपाध्यक्षपदासाठी अर्ज भरले. शिंदे यांना सतीश पाटील सूचक व विद्याधर गुरबे अनुमोदन तर डॉ. शहापूरकर यांना अनंत कुलकर्णी सूचक व सदानंद हत्तरकी यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदासाठी नलवडे यांना अमर चव्हाण व प्रकाश पताडे यांनी तर चव्हाण यांना क्रांतीदेवी कुराडे व किरण पाटील यांनी अनुमोदन दिले.

छाननीनंतर मतदान घेण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी गुप्त पद्धतीने मतदान घेण्यात आले. व्यासपीठावर अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या अशा दोन बॉक्स ठेवण्यात आले. अध्यक्षपदासाठी पांढरी तर उपाध्यक्षपदासाठी गुलाबी चिठ्ठी ठेवण्यात आली. मतदानानंतर लगेच मतमोजणी झाली. दुपारी अडीच वाजता शिंदे व नलवडे यांच्या नावाची अधिकृत घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी पवार यांनी केली.

आमदार हसन मुश्रीफ यांनी अध्यक्षपदासाठी शिंदे यांच्या नावाची घोषणा याआधीच केली होती. मात्र उपाध्यक्षपदासाठी गेल्या चार दिवसात अनेक नावांची चर्चा होती. आघाडी नेत्यांनी नलवडे यांना संधी दिली.

डॉ. शहापूरकर रंगले गुलालात

अध्यक्षपदांसाठी अॅड. शिंदे यांचे नाव ठरले होते. मात्र तरीही अधीकृत घोषणा झाली नव्हती. अध्यक्षपदासाठी शिंदे यांच्या नावाची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी शिंदे यांना खांद्यावरून अध्यक्षपदाच्या खुर्चीत बसविले. तर काही कार्यकर्त्यांनी उत्साहाच्या भरात डॉ. शहापूरकर यांनाच गुलालाने रंगविले.

नेमप्लेट हटवली

प्रकाश चव्हाण यांनी त्यांच्या समर्थक संचालकांनी आणलेल्या अविश्वास ठरावामुळे अॅड. शिंदे यांना कारखाना अध्यक्षपद सोडावे लागले होते. त्यामुळे शिंदे समर्थकांमध्ये प्रकाश चव्हाण यांच्याबद्दल प्रचंड राग होता. आज निवडीदरम्यान कार्यकर्त्यांचा चव्हाण यांच्यावरचा रोष प्रकर्षाने जाणवला. अध्यक्षपदाची घोषणा होताच काही उत्साही कार्यकर्त्यांनी प्रकाश चव्हाण यांच्या नावाची पाटी काढून टाकली.

डॉ.शहापूरकर यांचा निरुत्साह

डॉ. प्रकाश शहापूरकर मतमोजणी दिवशी संपूर्ण दिवस मतमोजणी ठिकाणी आलेच नव्हते. तर आज अध्यक्षपद निवडीसाठी कारखाना स्थळावर आले. मात्र निवड होताच तत्काळ ते निघूनही गेले.

महाआघाडीत फूट

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अथक प्रयत्नाने साकारलेल्या महाआघाडीत फूट पडल्याचे चित्र स्पष्ट झाले. निवडणुकीत कालभैरी आघाडीला आठ जागांवर समाधान मानावे लागले. यामध्ये डॉ. शहापूरकर गटाचे ४ प्रकाश चव्हाण ३ आणि सदानंद हत्तरकी यांचा समावेश आहे. भाजपा आणि शिवसेनेची एकही जागा आली नाही. परिणामी आज निवडीदरम्यान भाजपा आणि शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित नव्हते.

नलवडेंना अध्यक्षपदाची ऑफर

संग्रामसिंह नलवडे यांना महाआघाडीकडून थेट अध्यक्षपदाची ऑफर देण्यात आली. त्यासाठी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी डॉ. डी. वाय. पाटील तसेच आमदार सतेज पाटील यांना साकडे घातले होते. मात्र प्रस्ताव नाकारण्यात आला. राष्ट्रवादीच्या संचालकांमध्येही फूट पडण्याचा प्रयत्न झाला. मात्र त्यात यश आले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्याची दुसरी गाडी रवानारेल्वेच्या पाच विभागांना बक्षीस

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, मिरज

मिरजेतून लातूरला पाणी घेऊन दुसरी रेल्वे बुधवारी सकाळी रवाना झाली. रेल्वेच्या विशेष पथकाने अथक प्रयत्न करून दोन दिवसांच्या अंतराने पाण्याच्या दोन रेल्वे यशस्वीरित्या रवाना केल्याबद्दल रेल्वेच्या पुणे विभागाकडून रेल्वे प्रशासनाच्या विविध विभागांना प्रत्येकी पाच हजारांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.सोमवार सकाळी अकरा वाजता पहिली पाण्याची रेल्वे लातूरला रवाना झाल्यानंतर बुधवारी दुसरी रेल्वे रवाना करण्यात आली. बुधवारी सकाळी अकराच्या दरम्यान स्थानक अधीक्षक व्ही. एस. रमेश, भाजप नेते मकरंद देशपांडे व यार्ड अधीक्षक विनोद कुलकर्णी यांच्या उपस्थितीत रेल्वे रवाना झाली.दुसरी रेल्वेही दहा टँकरची असून, पाच लाख लिटर पाणी लातूरला पाठविण्यात आले आहे. सोमवारनंतर मंगळवारी लगेच दुसरी रेल्वे पाठविण्याचे नियोजन रेल्वेने केले होते. मात्र, जलवाहिनीला गळती लागल्याने मंगळवारी रेल्वे जाऊ शकली नाही. तांत्रिक अडचणींवर मात करीत रेल्वेच्या विविध विभागांच्या ६० कर्मचाऱ्यांनी दिवसरात्र काम करून दोन रेल्वे पाठविल्या. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या या कामगिरीबद्दल पुणे विभागीय कार्यालयातर्फे मंडल रेल्वे प्रबंधक बी. के. दादाभोय यांनी रेल्वे प्रशासनाच्या मिरजेतील पाच विभागांना प्रत्येकी पाच हजारांचे बक्षीस जाहीर केले आहे. यात ऑपरेटिंग, अभियांत्रिकी, सीएनडब्ल्यू, इलेक्ट्रिकल, कमर्शियल आदी विभागांचा समावेश आहे.

पन्नास टँकरची आणखी एक रेल्वे येणार
मिरजेतून लातूरला पाणी देण्यासाठी आणखी एक पन्नास टँकरची रेल्वे राजस्थानमधील कोटा येथून मिरजेकडे रवाना झाली आहे. दोन दिवसांत दुसरी पन्नास टँकरची रेल्वेही मिरजेत दाखल होईल. त्यामुळे शंभर टँकरद्वारे लातूरला पाणी देण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झेडपी पदाधिकाऱ्यांच्यासांगलीत बिनविरोध निवडी

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, कुपवाड

सांगली जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी रणजित जगदीश पाटील (कामेरी ता. वाळवा), सभापतिपदी संजिवकुमार आबासाहेब सावंत (जत), भाऊसाहेब शामराव पाटील (कवठेमहाकांळ ), महिला व बालकल्याण समिती सभापतिपदी सुनंदा रमेश पाटील (जत) आणि समाजकल्याण सभापतिपदी कुसुम नाना मोटे (आटपाडी) यांच्या बुधवारी बिनविरोध निवडी करण्यात आल्या.

जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुमत असतानाही काँग्रेसने सर्वच पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने काय होणार, अशी चर्चा रंगली होती. मात्र, सर्वांनीच माघार घेतल्याने बिनविरोधचा मार्ग मोकळा झाला. तानाजी यमगर व फिरोज शेख यांना अखेरच्या क्षणापर्यंत झुलवत ठेवत ऐनवेळी बाजूला करण्यात आल्याचे निवडीनंतर स्पष्ट झाले. त्यामुळे आमदार अनिल बाबर व माजी मंत्री अजितराव घोरपडे गटात चांगलीच नाराजी पसरली आहे. राजकीय समतोल साधत पाच पदांसाठी नावे निश्चित करताना राष्ट्रवादीची चांगलीच दमछाक झाली. कवठे महाकांळमधून तानाजी यमगर यांचे नाव जवळपास निश्चित होते. मात्र, आमदार सुमन पाटील, स्मिता पाटील यांच्यासह आर. आर. पाटील समर्थकांनी विरोध केल्याने यमगर यांना डावलून भाऊसाहेब पाटील यांना संधी देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांचा मंदिर प्रवेश

$
0
0

मिरज :

मिरज तालुक्यातील टाकळी येथे आंतरजातीय व आंतरधर्मिय विवाह केलेल्या बारा जोडप्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मंदिर प्रवेश केला. आंतरजातीय व आंतरधर्मिय विवाह केल्याने ग्रामस्थांनी या जोडप्यांना मंदिर प्रवेश नाकारला होता. अंनिसने या बाबत आक्रमक भूमिका घेत मंदिर प्रवेशासाठी आंदोलनाचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात कार्यक्रम पार पडला. या नंतर जोडप्यांनी मंदिर प्रवेश केला. यावेळी ज्येष्ठ लेखिका तारा भावाळकर, अॅड. चिमन लोकूर, प्रा. प्र. रा. आर्डे, युवक क्रांती दलाचे संदिप बर्वे, अनिसचे डॉ. प्रदिप पाटील आदी उपस्थित होते.

टाकळी येथील जैन समाजातील बारा तरुणांनी आंतरजातीय व आंतरधर्मिय विवाह केला आहे. या तरुणांनी विवाह केलेल्या मुली जैन समाजातील नसल्याने त्यांना येथील मंदिरात प्रवेश देण्यात येत नव्हता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तृप्ती देसाईंना मारहाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भाविकांच्या प्रचंड विरोधाला न जुनानता भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी अंबाबाई गाभाऱ्यात घुसून प्रवेश केला. दर्शनानंतर भाविकांनी त्यांचा तीव्र निषेध करत धक्काबुक्की केली, त्यांना मारहाणही करण्यात आली. त्यांच्या अंगावर कुंकवातून तिखट फेकण्यात आले. देसाई यांना प्रवेश करण्यासाठी पाठीशी घालत असल्याचा आरोप करीत जिल्हा प्रशासनाचा महिला भाविक व श्रीपूजकांनी तीव्र शब्दांत निषेध केला. देसाई यांच्या गाभारा प्रवेशातून दर्शनामुळे अंबाबाई मंदिराला पोलिस छावणीचे स्वरुप आले होते. मारहाण आणि धक्काबुक्की झाल्याने देसाई बेशुद्ध पडल्या. त्यांना रुईकर कॉलनीतील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. पंधरा मिनिटानंतर त्या शुद्धीवर आल्या. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

श्री अंबाबाई दर्शनासाठी देसाई यांनी साडी परिधान करुन यावे, अशी विनंती पोलिस प्रशासनाने केली होती. पण, त्यांनी भारतीय वेशात दर्शन घेणार असल्याचे सांगितले होते. बुधवारी त्या पुण्याहून मोटारीने कोल्हापूरकडे रवाना झाल्या. सकाळपासून भाविकांत संताप असल्याने मंदिराकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर बंदोबस्त होता. देसाई यांना रोखण्यासाठी मंदिर परिसरात भक्त मंडळाचे कार्यकर्ते जमले होते. महिलांनी मंदिराच्या प्रवेशमार्गात अडथळे उभारले होते. कोणत्याही परिस्थितीत देसाईंना प्रवेश दिला जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. पाच वाजता त्यांचे कोल्हापुरात मोटारीने आगमन झाले. त्यांच्यासमवेत ५० हून अधिक कार्यकर्ते उपस्थित होते. पोलिसांनी त्यांना लिशां हॉटेलजवळ रोखले. जमावबंदीचा आदेश असल्याने रॅली काढता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. पण देसाई निर्णयावर ठाम होत्या. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन अलंकार हॉल येथे नेण्यात आले.

अलंकार हॉल येथे शहर पोलिस उप अधीक्षक भारतकुमार राणे यांनी देसाई यांच्याशी चर्चा केली. केवळ जमावबंदी आदेश असल्याने चार महिलांनी देवीच्या दर्शनासाठी जावे, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी ही अट मान्य केली. त्यानंतर कडक बंदोबस्तास देसाई यांना अंबाबाई मंदिरात आणले. महिला पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कडे करून त्यांना गाभाऱ्यात आणले. यावेळी उपस्थित महिला भाविकांनी त्यांच्या निषेधाच्या घोषणा देऊन त्यांना बाहेर काढा. त्यांना ओत सोडू नका अशा घोषणा दिल्या. दीपा पाटील, वैशाली महाडिक यांच्यासह महिला त्याच्या अंगावर धावून जाताना पोलिसांनी त्यांना रोखले. श्रीपूजक अॅड. केदार मुनिश्वर यांनी देसाई यांना गाभाऱ्यात प्रवेश करता येणार नाही, असा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे असे सांगत कागदपत्रे दाखवली. पण, गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेण्याला रोखता येणार नाही, असे देसाई यांनी स्पष्ट केले. त्यानंतर देसाई बाकड्यावर बसल्या. त्यांना रोखण्यासाठी श्रीपूजक व त्यांच्या कुटुंबातील महिलांनी कडे केले. सुमारे अर्धा तास हा गोंधळ सुरू होता. पोलिसांची मोठी दमछाक झाली होती. अखेर करवीर प्रांताधिकारी प्रशांत पाटील व तहसीलदार योगेश खरमाटे यांनी देसाई यांचा प्रवेश रोखता येणार नाही, असे श्रीपूजकांना बजावले. त्यानंतर महिला पोलिस कर्मचाऱ्यांच्या सरंक्षणात श्रीपूजकांचे कडे तोडून देसाई गाभाऱ्यात घुसल्या. त्या गर्भकुडीत जाऊ नयेत यासाठी श्रीपूजकांचा आटापिटा सुरू होता. गाभाऱ्यात दर्शन घेऊन पोलिस बंदोबस्तात देसाई यांना बाहेर काढताना चिडलेल्या श्रीपूजक व महिलांनी शिव्यांची लाखोली वाहिली. धक्काबुक्की केली. त्यांच्या अंगावर हळदी-कुंकू फेकण्यात आले. बंदोबस्तात देसाई यांनी मंदिराच्या आवारातून सुरक्षित बाहेर काढले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंबेडकरांच्या मानवी मूल्यांची नोंद साहित्यात नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'मूकनायक आणि बहिष्कृत भारत या पाक्षिकांमधून ८० वर्षापूर्वी पुरोगामी विचार मांडणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानवी मूल्यांची दखल मराठी लेखकांनी घेतली नाही' अशी खंत ज्येष्ठ पत्रकार अरूण खोरे यांनी व्यक्त केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे शाहू स्मारक भवन येथे आयोजित कार्यक्रमात 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि आयडिया ऑफ इंडिया' या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉ. अशोक चौसाळकर होते.

खोरे म्हणाले, 'डॉ. आंबेडकर यांना आपल्या देशातील अस्पृश्यतेची समस्या, दु:ख समजले, त्या माणसाला समजून घेण्यात आपण कमी पडलो. परदेशातील लेखकांनी त्यांच्या कार्याची दखल घेतली मात्र आपल्या साहित्यात त्यांच्याविषयी फार लेखन झाले नाही. यंदाची त्यांची जयंती साजरी करण्याचा निर्णय संयुक्त राष्ट्र संघाने घेतला. त्यांच्या मार्गात अनेक अडचणी आल्या तरीही त्यांनी लेखणीतून विचार मांडण्याचे काम अविरत सुरू ठेवले. अमेरिकेतील ​वास्तव्यात त्यांना अनेक गुरू भेटले, त्यांच्या लेखनाचा,अनुभवाचा प्रभाव डॉ. बाबासाहेब यांच्यावर पडला, त्यातून विचारांना ठामपणा येण्यासाठी त्यांनी स्वतःला घडवले.'

यावेळी ट्रस्टचे सचिव विवेक आगवणे, प्रशासन अधिकारी राजदीप सुर्वे, शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख रणधीर शिंदे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पक्ष्यांसाठी अन्न-पाण्याची सोय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

उन्हाच्या तप्त झळांनी नागरिकांची लाही लाही होत असताना छोट्या पक्ष्यांच्या होणाऱ्या अवस्थेचा विचार केला तरी मन सुन्न होऊ शकते. अनेक संवेदनशील नागरिक घरांच्या परिसरात पक्ष्यांसाठी अन्न व पाण्याचे भांडे ठेवून आपापल्या परीने काम करत आहेत. पण अजूनही पक्ष्यांना अन्न व पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यांची ही भटकंती थांबवण्यासाठी 'महाराष्ट्र टाइम्स' ने 'सावली फाउंडेशन' च्या सहकार्याने विविध भागात पक्ष्यांसाठी अन्न व पाण्याची भांडी ठेवण्याचे नियोजन केले आहे. जिथे पक्ष्यांना गरज आहे, अशा ठिकाणी ही भांडी ठेवली जाणार आहेत. यासाठी मातीची, प्लास्टिकची भांडी देऊन या 'पक्षी वाचवा' अभियानातील एक महत्वाचा भाग होण्याची संधी 'महाराष्ट्र टाइम्स' ने उपलब्ध करुन दिली आहे.

यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने अनेक पाणवठे उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच आटले आहेत. तर शहर परिसरात इमारतींमुळे पक्ष्यांसाठीचे ​पाण्याचे स्त्रोत कमी झाले आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स' ने पाण्याच्या या दुर्भिक्षाची जाणीव सर्वात प्रथम नागरिकांना करुन देऊन 'पक्षी वाचवा' अभियान राबवण्यास सुरुवात केली. पक्ष्यांच्या अन्न व पाण्यासाठी आपापल्या घरांच्या परिसरात सोय करणाऱ्या नागरिकांच्या प्रयत्नांना सचित्र प्रसिद्धी देऊन समाजामध्ये याबाबतची जाणीव जागृती वाढवण्यासाठी प्रयत्न केला. त्यानुसार अनेक नागरिक, तरुणांचे ग्रुप, संघटना यांनी पुढाकार घेत पक्ष्यांच्या अन्न व पाण्याची सोय करुन दिली. अनेकांनी तर ज्या ठिकाणी नागरी वस्ती नाही, अशा ठिकाणीही पाण्याची व अन्नाची भांडी ठेवली. त्यामध्ये दररोज पाणी व अन्न ठेवण्याची जबाबदारीही घेतली. अशा प्रकारे शेकडो हात पक्ष्यांसाठी एकवटले असताना आणखी काही ठिकाणी ही सोय करण्याची गरज भासत होती.

त्याचाच विचार करुन 'महाराष्ट्र टाइम्स' ने 'सावली फाउंडेशन' च्या सहकार्याने अशा विविध भागात अन्न व पाण्याची भांडी ठेवण्याचे नियोजन केले आहे. अनेक ठिकाणी ही भांडी ठेवण्याबरोबरच त्यामध्ये नियमित पाणी व अन्न ठेवण्याचे काम 'सावली' चे कार्यकर्ते करणार आहेत. यासाठी मोठ्या प्रमाणावर भांडी लागणार असून ज्यांना या उपक्रमात सहभागी व्हायचे आहे. त्यांनी माती, प्लास्टिक असो कोणतीही भांडी असोत, ती 'महाराष्ट्र टाइम्स' च्या कार्यालयात आणून द्यायची आहेत. ती भांडी पक्ष्यांसाठी अत्यावश्यक असलेल्या ठिकाणी तातडीने बसवण्यात येणार आहेत. पक्षीप्रेमींनी नागाळा पार्कच्या कमानीजवळील गुलमोहर रेसिडन्सीमधील 'महाराष्ट्र टाइम्स' च्या कार्यालयात ही भांडी जमा करावी लागणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मैनुद्दीनच्या सासूची पोलिसांकडून चौकशी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मैनुद्दीन उर्फ मोहिद्दीन मुल्ला याने वारणानगर येथील वारणा शिक्षण संस्थेच्या इमारतीतून केलेल्या चोरीप्रकरणी पोलिसांनी गुरुवारी (ता. १४) मैनुद्दीनची सासू नानीबाई शमुएल भोरे यांची चौकशी केली. मैनुद्दीनकडून बुलेट घेणारा पोलिस कॉन्स्टेबल इरफान नदाफ आणि त्याचा भाऊ साजिद नदाफ यालाही पोलिसांनी चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. शनिवारी या दोघांची चौकशी होईल.

वारणानगर येथील वारणा शिक्षण संस्थेच्या इमारतीतील तीन कोटी सात लाख रुपयांची रक्कम लंपास करणाऱ्या मैनुद्दीनने दोन बुलेटची खरेदी केली होती. यातील एक बुलेट त्याची सासू नानीबाई शमुएल भोरे (वय ६५, रा. बेथेलहेमनगर, मीरज) यांच्या नावे खरेदी केली होती, त्यामुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी नानीबाई भोरे यांना चौकशीसाठी बोलवले होते.

गुरुवारी पोलिस मुख्यालयात झालेल्या चौकशीत भोरे यांनी आपला बुलेट खरेदीशी काहीच संबंध नसल्याचे पोलिसांना सांगितले. 'आजारी असल्याने मी घरीच असते. मैनुद्दीनशी फारसा संबंध येत नाही. तो बऱ्याचदा बाहेरच असतो. अधूनमधून घरी येतो आणि पुन्हा बाहेर जातो, त्यामुळे त्याच्याशी बोलणेही होत नाही. त्याने केलेली बुलेटखरेदी मला विचारून केलेली नाही, त्यामुळे माझा याच्याशी काहीही संबंध नाही', असे सांगत नानीबाई भोरे यांनी हात झटकण्याचा प्रयत्न केला.

मैनुद्दीनने खरेदी केलेली दुसरी बुलेट मिरजेतील पोलिस कॉन्स्टेबल इरफान नदाफ याला दिली होती. ती बुलेट इरफानचा भाऊ साजिद नदाफ याच्या नावे खरेदी केली होती. त्यामुळे पोलिसांनी इरफान आणि साजिद नदाफ या दोघांनाही शनिवारी (ता. १६) चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस दिली आहे. मिरजमधील आणखी एका पोलिस कॉन्स्टेबलला फ्लॅट खरेदीसाठी पैसे दिल्याचेही मैनुद्दीनने चौकशीत सांगितले आहे. सांगली जिल्हा पोलिस अधीक्षकांनी याप्रकरणी संबंधित दोन्ही कॉन्स्टेबलची चौकशी करून तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असून, अजून चौकशी पूर्ण झालेली नाही. मैनुद्दीनशी आर्थिक व्यवहार करणाऱ्या पोलिस कॉन्स्टेबलकडून महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थॅलेसेमियाग्रस्त बहिणींचा संघर्ष

$
0
0



janhavi.sarate @ timesgroup.com

कोल्हापूर ः मिरजमधील हॉटेल कामगार नरेश सचदेव यांच्या दोन मुलींचा थॅलेसेमियाशी संघर्ष सुरू आहे. पाच वर्षाची वैष्णवी आणि अवघ्या दोन वर्षाची तिची बहिण अनुष्का यांची परिस्थितीमुळे जणू आयुष्याशीच लढाई सुरू आहे. आर्थिक स्थिती बेताची असल्याने गेले वर्षभर मुलींच्या शस्त्रक्रियेसाठी पैसे जमवण्यासाठी दाहीदिशा भटकंती सुरू आहे. दुसरीकडे सरकारी यंत्रणेच्या उदासिनतेमुळे या बहिणींना दर ‌तीन आठवड्याला दोन रक्तदाते शोधण्यासाठी सचदेव यांचा संघर्ष नित्याचा झाला आहे.

नरेश सचदेव यांची घरची परिस्थिती हालाखीची असल्यामुळे ते सात हजार रुपये पगारावर एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करतात. मोठ्या मुलीच्या जन्मानंतर तिला थॅलेसेमियाचा आजार असल्याचे निदान झाले. त्यानंतर छोट्या मुलीलाही थॅलेसेमियाचे निदान झाल्यावर सचदेव दाम्पत्य अवाक् झाले. मुलींवर उपचारासाठी तेव्हापासून त्यांची धडपड सुरू झाली. वैष्णवी आणि अनुष्काचा जीव वाचविण्यासाठी बोनमॅरो प्रत्योरोपण शस्त्रक्रिया करावी लागेल असे डॉक्टरांनी सांगितले आहे. या शस्त्रक्रियेसाठी एका पेशंटला सुमारे तीस लाख रुपयांचा खर्च येतो. दोन मुलींवर उपचारासाठी सचदेव यांना सुमारे ६० लाख रुपयांची आवश्यकता आहे. या दोघींवर मिरजेतील वॉन्लेस मिशन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

सरकारने थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांना मोफत रक्तपुरवठा करण्याची सुविधा दिल्याचे जाहीर केले आहे. मात्र आजही अनेकांना रक्तदाता अथवा पैसे मोजल्याशिवाय रक्त मिळत नसल्याचे वास्तव आहे. हाच अनुभव सचदेव यांनाही आला. या मुलींवर उपचारासाठी समाजातील दानशूरांनी आर्थिक हातभार लावणे गरजेचे आहे. मदतीसाठी भारतीय स्टेट बँकेच्या मिरज शाखेतील खाते क्रमांक ३४७२१००३८४० वर निधी जमा करावा. अधिक माहितीसाठी नरेश सचदेव यांच्याशी संपर्क साधावा.

रक्तासाठी धावपळ

सरकारने थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांना मोफत रक्तपुरवठा जाहीर केला असले तरी प्रत्यक्षात अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वैष्णवी आणि अनुष्का या दोघींना दर तीन आठवड्यांना रक्त द्यावे लागते. मात्र ब्लड बँकेमध्ये सचदेव यांना रक्तदाता आणण्याची अट घातली जाते. काहीवेळा रक्तासाठी त्यांना सुमारे १० हजार रुपयांपर्यंतही खर्च आला आहे.

सरकारकडून ब्लडसाठी कार्ड मिळाले. मात्र त्याचा फायदा होत नाही. दर तीन आठवड्यांनी नवे दोन रक्तदाते दिल्याशिवाय ब्लडबँकेतून रक्त मिळत नाही. आतापर्यंत पावणेतीन लाख रुपयांची मदत जमा झाली. मुलींसाठी बोनमॅरो प्रत्योरोपण शस्त्रक्रिया आवश्यक आहे. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

- नरेश सचदेव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शांतता समितीच्या बैठकीत कोल्हापूर बंदची हाक

$
0
0

कोल्हापूर ः जिल्हाधिकारी सैनी आणि पोलिस प्रशासनाच्या निषेधार्थ कोल्हापूर बंदची हाक देण्याचा निर्णय श्री महालक्ष्मी देवस्थान शांतता समितीच्या बैठकीत घेण्यात आला. या संदर्भात येत्या दोन-तीन दिवसांत पुन्हा बैठक घेऊन बंदचा दिवस निश्चित ठरविला जाईल, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. विठ्ठल मंदिरातील हिंदू एकता कार्यालयाच्या प्रांगणात ही बैठक झाली. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी बुधवारी (ता.१३) मंदिरात केलेल्या प्रवेशावेळी पोलिस प्रशासनाने त्यांना अकारण संरक्षण दिले. तसेच देसाई यांना विरोध करणाऱ्या स्थानिक भाविक महिलांना पोलिसांनी अपमानास्पद वागणूक दिली, असा आरोप करत बैठकीला उपस्थित सर्वांनीच पोलिस प्रशासन आणि जिल्हाधिकाऱ्यांचा निषेध केला. ज्येष्ठ नेते निवासराव साळोखे म्हणाले, 'मंदिरात स्त्री-पुरुष भेदभाव कधीच नव्हता. नसलेला प्रश्न उभारण्याचा देसाई यांचा खटाटोप होता. जिथे अन्याय होत नाही, तिथे न्याय मागण्याचा प्रश्नच नाही. गाभारा प्रवेशाचा कायदा आणि उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो. मात्र, मंदिरातील मूर्तीचे संवर्धनही तितकेच महत्त्वाचे आहे. रासायनिक प्रक्रिया केल्यानंतर गाभाऱ्यात जास्त लोकांनी जाऊ नये, असा तज्ज्ञांचा सल्ला आहे. या शास्त्रीय कारणांचाही विचार व्हायला हवा.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औद्योगिक वसाहतींत २५ टक्के पाणी कपात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पंचगंगा नदीची पातळी कमी होत असताना जिल्ह्यातील साखर कारखाने बंद होत आहेत. या कारखान्यांतील दूषित पाण्यामुळे पंचगंगा प्रदूषित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाने संबंधितांवर कडक कारवाईची भूमिका घ्यावी, असा आदेश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला. तसेच जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीच्या पाणी पुरवठ्यात २५ टक्के पाणी कपात करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पाणी टंचाईवर उपाययोजनेसाठी गुरूवारी बैठक घेतली. जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, जिल्हा परिषद सीइओ अविनाश सुभेदार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

इचलकरंजी पाणी पुरवठा योजनेच्या त्रुटी दूर केल्या असून शहराला कृष्णा नदीतून सातत्याने पुरवठा होण्याबाबत नियोजन केले आहे, असे सांगून पालकमंत्री म्हणाले की, औद्योगिक वसाहतीने पाणी कपातीसाठी स्वतःच पुढाकार घेतला आहे. शेतीसाठी उपसा बंदी असल्याने टंचाईची परिस्थिती लक्षात घेऊन औद्योगिक वसाहतींच्या पाणीपुरवठ्यात २५ टक्के कपात केली आहे. उपसाबंदी असतानाही पाणी खेचणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश वीज मंडळाला दिले आहे. जिल्ह्यातील मोठे प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण केले जातील. जिल्हा परिषदेला १४ व्या वित्त आयोगातून ६२ कोटीचा निधी आला आहे. या निधीतील २० कोटीचा निधी पाणी टंचाईवर मात करण्यासाठी वापरण्यात येणार आहे. जलयुक्त शिवार योजनेतील ८९ गावात काम सुरू असून प्रत्येक कामांचे क्रॉस चेकींग तज्ज्ञांच्याकडून सुरू आहे.

पाणी गळती निवारणासाठी बैठकीवे आदेश

महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनेतील पाइपलाइनमधून मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. गळती निवारण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची लवकर बैठक आयोजित करावी, असे आदेश पालकमंत्री पाटील यांनी दिले.

विमानतळावर दोन महिन्यांत नाइट लँडिंग

उजळाईवाडी विमानतळावर दोन महिन्यात नाइट लँडिगची सोय उपलब्ध होईल, असा विश्वास पालकमंत्री पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. ही सोय झाल्यानंतर छोटी विमाने रात्री उतरण्याची सोय होणार आहे. विमानतळ भारतीय विमान पतन प्राधिकरणाकडे आहे. नाइट लॅडिंगसाठी राज्य सरकारने पत्रव्यवहार सुरू केला असून सर्व सोयींसाठी सव्वातीन कोटीचा निधी मंजूर केला आहे. प्राधिकरणच्या परवानगीनंतर नाइट लँडिंगसाठी अत्यावश्यक यंत्रणा उभारण्यात येतील. निविदा प्रक्रियेनुसार विमानसेवा सुरू होईल.

विमानतळ विस्तार करण्याचे काम भारतीय विमान पतन प्राधिकरणाकडे आहे. विमानतळांसाठी साडेबारा एकर जमिन संपादित असून त्यासाठी वनखात्याची परवानगी आवश्यक आहे. ही जमीन गडमुडशिंगीच्या अखत्यारित येते. या ग्रामपंचातीयने संपादनासाठी अद्याप ठराव दिलेला नाही. त्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे पाटील म्हणाले.

११३ गावात पाणी टंचाई

असून १५ जूनपर्यंत पाणी पुरवठ्याचे नियोजन

२८ गावात बोअर मारण्याचे काम सुरू

बोअरची मागणी करणाऱ्या ग्रामपंचायतीना तातडीने निधी

१९ खासगी विहिरी ताब्यात

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘मला ठार मारण्याचा कट’ : तृप्ती देसाई

$
0
0

कोल्हापूर : 'उच्च न्यायालयाचा आदेश धुडकावून लावत मला जीवे मारण्याचा प्रयत्न करणारे श्रीपूजक आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी स्वतःहून कारवाई करावी, अन्यथा मंत्रालयासमोर उपोषण करू,' असा इशारा भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी 'मटा'शी बोलताना दिला.

देसाई म्हणाल्या,' कोल्हापूर ही पुरोगामी विचारांची पायाभरणी करणारे, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे शहर असूनही येथे मोठ्या प्रमाणात विरोध होणे बिलकूल अपेक्षित नव्हते. मी स्वतःही कोल्हापूर जिल्ह्यातील रणरागिणी आहे. रितसर पोलिस प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाला पूर्वकल्पना देऊन देवीच्या दर्शनाला आले होते. पोलिसांनी आमच्यासाठी संचारबंदीचे कलम लागू केले. मात्र मंदिरात उपस्थित असलेल्या अन्य हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांना हे कलम का लागू केले नाही? ही पोलिसांची भूमिका आश्चर्यकारक होती. कोल्हापुरातील महिला संघटनांनीही मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केला होता. त्यामुळे सर्व महिला एकत्र गाभारा प्रवेश करतील अशी अपेक्षा होती. माझ्यासह भूमाता ब्रिगेडच्या फक्त चार महिलांना पोलिसांनी गाभारा प्रवेशाची परवानगी दिली. इतर महिलांना एका हॉलमध्ये बसवून ठेवले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेणुका शुगर्सच्या ‘सहवीज’ला आग

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

येथील देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्यातील रेणुका शुगर्सच्या सहवीज निर्मिती प्रकल्पाला गुरुवारी सायंकाळी लागलेल्या भीषण आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले. अग्निशामक दलाचे जवान उश‌िरापर्यंत आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत होते. ही आग कशामुळे लागली याचे नेमके कारण मात्र स्पष्ट झालेले नाही.

देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखाना रेणुका शुगर्स यांच्याकडे भाडेतत्वावर देण्यात आलेला आहे. याठिकाणी असलेला सहवीज प्रकल्प हा रेणुका शुगर्स यांनी सुरु केलेला आहे. पाच दिवसांपूर्वी कारखान्याचा गळीत हंगाम संपल्यामुळे बंद करण्यात आला आहे. तर दोन दिवसापूर्वी सहवीज निर्मिती प्रकल्पही बंद करण्यात आला आहे. प्रकल्प बंद असला तरी अद्याप बगॅसचा साठा शिल्लक आहे. सायंकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास बगॅस यार्डातून धूर येत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर अचानकपणे बगॅस साठविण्यात येत असलेल्या ठिकाणी आग लागली. बगॅस वाहून नेणारे प्रत्येकी दहा लाख रुपये किंमतीचे दोन रबरी बेल्ट या आगीत पूर्णत: वितळून गेले. आगीवर नियंत्रण आणण्यासाठी पंचगंगा सहकारी साखर कारखाना, कोल्हापूर महानगरपालिका, इचलकरंजी व जयसिंगपूर नगरपालिकेचे बंब घटनास्थळी दाखल झाले होते. तीन तासाहून अधिक काळ आगीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न सुरू होते.

ही आग नेमकी कशामुळे लागली याबाबतची माहिती रात्री उशीरापर्यंत समजू शकली नाही. हा वीज निर्मिती प्रकल्प उघड्यावरच असल्याने बगॅस वाहून नेणारे बेल्ट कडक उन्हामुळे गरम होऊन कदाचित बगॅसने पेट घेतला असण्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. रात्री उशीरापर्यंत आग विझवण्यासाठी जवान शर्थीचे प्रयत्न करीत होते. यावेळी रेणुका शुगर्सचे अधिकारी, कर्मचारी उर्वरित बगॅस बाजूला करण्यासाठी धडपडत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तृप्ती देसाईंच्या मारहाणीची चौकशी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अंबाबाई मंदिर गाभारा प्रवेशाच्या उडालेला गोंधळ आणि भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई यांना झालेली मारहाणीच्या सीसीटीव्हीचे फुटेजची काटेकर तपासणी करण्यासाठी पोलिस प्रशासनाने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. फुटेज तपासून दोषींवर कडक कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांना दिली. दरम्यान मारहाणीत जखमी झालेल्या देसाई गुरूवारी दुपारी पुण्याला रवाना झाल्या असून मला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर पोलिसांनी स्वतःहून गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी केली आहे. देसाई यांना मारहाण झाल्याच्या प्रकरणाचे तसेच बुधवारी झालेल्या एकूण प्रकाराच्या चौकशीचे आदेश जिल्हाधिकरी डॉ. अमित सैनी यांनी दिले आहेत.

दरम्यान, महिलांना गाभाऱ्यात प्रवेश देण्याला सरकारचे प्रोत्साहन राहील. ज्यांना मंदिर प्रवेशाबाबतचा हायकोर्टाचा निर्णय मान्य नसेल त्यांनी खुशाल सुप्रिम कोर्टात जावे, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. दुसऱ्या बाजूला जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षकांच्या निषेधार्थ महालक्ष्मी देवस्थान शांतता समितीने कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. तर गाभारा प्रवेश वादंगावर दाखल करण्यात आलेल्या श्रीपूजकांच्या याचिकेवर जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांनी शनिवारी (१६ एप्रिल) कोर्टात हजर रहावे, असे आदेश दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) प्रेमकुमार शर्मा यांनी दिला आहे.

बुधवारी गाभारा प्रवेशाच्यावेळी देसाई यांना केलेल्या मारहाणीची जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली आहे. मंदिरातील सीसीटीव्हीचे फुटेज बुधवारी मध्यरात्रीपासून तपासायला सुरूवात केले. रात्री उशिरापर्यंत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अधिकारी व कर्मचारी फुटेज जमा करत होते. देसाई यांना मारहाणीसंबंधी पोलिसांना सबळ पुरावे मिळाले आहेत. पण गाभारा प्रवेशावेळी घडलेल्या फुटेजच्या तपासणीसाठी अतिरिक्त पोलिस अधीक्षक अथवा पोलिस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. फुटेजचा अहवाल आल्यानंतर दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. गुरूवारी सर्व अधिकारी आंबेडकर जयंतीच्या बंदोबस्तात गुंतले असल्याने शुक्रवारी फुटेजची तपासणी होणार आहे.

दरम्यान, देसाई यांच्या गाभारा प्रवेशावर भाविकांच्यात उलटसुलट प्रतिक्रिया सुरू होत्या. देसाई यांच्या दर्शनासाठी पोलिस प्रशासनाने मंदिर वेठीस धरले. जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांनी देसाई यांना पाठीशी घातल्याबद्दल त्यांचा निषेध करून कोल्हापूर बंदचा इशारा अंबाबाई देवस्थान शांतता समितीने दिला. समितीची गुरुवारी बैठक झाली. बैठकीला निवासराव साळोखे, रामभाऊ चव्हाण, भाजपचे नगरसेवक अजित ठाणेकर, श्रीपूजक केदार मुनिश्वर, दीपा पाटील यांच्यासह भाविक उपस्थित होते.

मंत्रालयासमोर उपोषणाचा इशारा

मारहाणीत जखमी झालेल्या तृप्ती देसाई यांना गुरूवारी दुपारी खासगी हॉस्पिटलमधून डिसचार्ज मिळाला. डिसचार्ज मिळाल्यानंतर देसाई यांनी उच्च न्यायालयाचा आदेश धुडकावून लावत जीवे मारण्याचा प्रयत्न करणारे श्रीपूजक आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी स्वतःहून कारवाई करावी, अन्यथा मंत्रालयासमोर उपोषण करू, असा इशारा दिला आहे. दोन दिवसांत पोलिसांनी कारवाई न केल्यास स्वतः कोल्हापुरात येऊन फिर्याद देईन, असा इशाराही त्यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीटंचाईने सोलापूरकर हैरानउजनीचे पाणी मंगळवारी औजमध्ये

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर
सोलापूर शहरातील नागरिक गेल्या आठ दिवसांपासून भीषण पाणीटंचाईचा सामना करीत आहेत. औज बंधाऱ्यातील पाणी पूर्णपणे संपल्यामुळे शहरावर मोठे जलसंकट निर्माण झाले आहे. उजनी धरणातून भीमानदीद्वारे सोडण्यात आलेले पाणी मंगळवारी औजमध्ये पोहोचणार आहे. तोपर्यंत शहरवासियांची तहान भागविताना महापालिकेला मोठी कसरत करावी लागणार आहे. महापालिकेकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून, टँकर येताच नागरिकांच्या मोठी गर्दी होत आहे.
सोलापूर शहराची लोकसंख्या दहा लाखांवर गेली आहे. शहराला उजनी, औज आणि हिप्परगा तलावातून पाणीपुरवठा करण्यात येत होता. परंतु, हिप्परगा तलावातील पाणी बऱ्याच दिवसांपूर्वी संपले आहे. त्यामुळे परिसरातील नागरीकांनासुद्धा उजनीतूनच येणाऱ्या पाण्याचा वापर करावा लागत आहे. औज बंधाऱ्यामधून शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. औजही कोरड पडला आहे. शिल्लक असलेले पाणी चार जेसीबीने चर खोदून उपसा केंद्रापर्यंत आणण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू झाले आहे. त्यामुळे एकीकडे महापालिकेला शहरवासियांना पाणीपुरवठा करताना दमछाक करावी लागत आहे. तर दुसरीकडे ऐन सणासुदीच्या काळातच पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे शहरातील सुमारे दहा लाख नागरिकांची तारांबळ उडत आहे.
उजनीचे पाणी ७२ किलोमीटर दूर
उजनी धरणातून सहा हजार क्युसेकने सोडण्यात आलेले पाणी औजंपासून अद्याप ७२ किलोमीटर दूर आहे. औजमध्ये पाणी पोहोचण्यास मंगळवारचा दिवस उजाडणार आहे. कडक उन्हामुळे व नद्या व बंधारे कोरडे पडल्याने पाणी वेगाने पुढे सरकण्यात अडचणी येत आहेत. पाणी मोठ्या प्रमाणावर जमिनीमध्ये झिरपत आहे.
जनावरांचे पाण्याविना हाल
सोलापूर शहरामध्ये गाई-म्हशी तसेच अन्य जनावरांचा आकडा लाखोंच्या घरात आहे. जिथे माणसालाच पिण्यास पाणी नाही तिथे जनावरांचे तर हाल पहावत नाहीत. हात पंपाचे पाणीसुद्धा खोलवर गेले असल्यामुळे नागरीक व जनावरांना घशाला कोरड पडली आहे. ऐन सणातच पाणी नसल्याने स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या महापालिकेची मोठी डोकेदुखी होऊन बसली आहे. शहरात रिक्षा, दुचाकी तसेच चारचाकी वाहने, बैलगाडी, हातगाड्यांवरून मिळेल त्या ठिकाणाहून पाणी नेले जात आहे. टँकरच्या पाण्यासाठी झुंबड उडत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘महिंद’च्या पाण्यानेढेबेवाडी जलयुक्त

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, कराड
नाईकबा यात्रेच्या पार्श्वभूमीवर महिंद धरणातून टंचाईग्रस्त ढेबेवाडी विभागाला पाणी सोडल्याने ढेबेवाडी परिसरातील पाणीटंचाई दूर झाली आहे. पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागातील उत्तर वांग नदीचे पात्र कोरडे ठणठणीत पडले होते.
उत्तर वांग नदीवर महिंद येथे धरण असूनही या नदीकाठच्या गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. या धरणाच्या लाभ क्षेत्राच्या खालील नदीकाठच्या गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींनी तळ गाठला होता. नदीपात्रात ठणठणाट, विहिरींत पाणी नाही इतर पाणीस्त्रोत आटले असल्याने विभागातील बनपुरी, जानुगडेवाडी, शितपवाडी, मंद्रुळकोळे, मंद्रुळकोळे खुर्द, साबळेवाडी, ढेबेवाडी परिसरात तीव्र पाणीटंचाई जाणवत होती. पाण्यासाठी दाहीदिशा पायपीट करावी लागत होती. मात्र नाईकबा यात्रेच्या पार्श्वभूमीवर महिंद धरणातून पाणी सोडण्यात आल्याने नदीपात्रात पाणी खळखळू लागल्याने काही दिवस तरी या नदीकाठच्या गावांचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे.
ढेबेवाडी विभागात सणबूर खोऱ्यामध्ये उत्तर वांग नदीवर धरण बांधण्यात आले आहे. याच धरणाच्या पाण्यावर या नदीकाठच्या गावांचा पाण्याचा प्रश्न निकाली काढण्यात आला होता.
धरणात साचला गाळ
मागील काही वर्षामध्ये महिंद धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचून त्याची पाणी साठवण क्षमता कमी झाली आहे. त्यातच भर म्हणून गेट गळतीतून प्रचंड पाणी वाया जात आहे. यासाठी प्रशासनाकडून कोणतेही प्रयत्न झालेले नाहीत. त्यामुळे या धरणाच्या पाणीसाठ्यात घट झाली आहे. या वर्षी अत्यल्प पर्जन्यामुळे संपूर्ण ढेबेवाडी विभागात डोंगर पठारावर भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. महिंद धरणातील पाणीसाठा जपून वापरण्याचे आदेशही प्रशासनाने दिले आहेत. डिसेंबर महिन्यामध्ये उत्तर वांग नदीचे पात्र कोरडे पडले. महिंद धरणातून काहीवेळा अत्यल्प पाणी सोडण्यात आले. हे पाणी लाभ क्षेत्र असलेल्या बनपुरी गावापर्यंतच पोहोचताच बंद करण्यात आल्याने इतर गावे आणि वाड्यावस्त्यांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत होती. या गावांच्या पाणीपुरवठ्याच्या विहिरी या नदीकाठी आहेत. मात्र नदीपात्रातच पाण्याचा खडखडाट असल्याने विहिरींच्या पाणी पातळीने तळ गाठला होता. नळपाणी पुरवठा योजना नावालाच उरल्या होत्या. गावातील लोकांना इतर ठिकाणाहून वाहणारे पाणी आणावे लागत होते. धरण उशाला असूनही येथील लोकांची पाण्यासाठी ससेहोलपट झाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images