Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

चैत्रांगणाच्या रांगोळीने अंगणे बहरली

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सातारा
चैत्रांगणाच्या सुंदर रांगोळीने सातारा शहरातील अंगणे बहरू लागली आहेत. चैत्र गौरीचे महिन्याभरासाठी घरोघरी आगमन होते. तिच्या स्वागतासाठी घरापुढील अंगण सारवून त्यावर रांगोळी काढली जाते. या वैशिष्ट्यपूर्ण रांगोळीला चैत्रांगण म्हणतात.
चैत्र महिना रखरखत्या उन्हात एक नवा बहार घेऊन येतो. पान गळती होऊन आलेली चैत्रपालवी मनाला सुखावते लाडक्या माहेरवाशि‍णीच्या रुपाने चैत्र गौरीचे महिन्याभरासाठी घरोघरी आगमन होते. पूजेमधील अन्नपूर्णा निराळ्या आसनावर बसवून तिची मनोभावे पूजा केली जाते. तिला गोड नैवेद्य दाखवून नातेवाईक, आप्तेष्ट, आजुबाजूच्या सुवासिनींना हळदीकुंकवासाठी निमंत्रण केले जाते. अन्नपूर्णेला पार्वतीचा अवतार मानले जाते. तिचा वास महिनाभर घरी असतो. त्यामुळे तिच्या स्वागतासाठी घरापुढील अंगण सारवून त्यावर रांगोळी काढली जाते. त्या वैशिष्ट्यपूर्ण रांगोळीला चैत्रांगण म्हणतात.
अशी शुभ चिन्हे
या रांगोळीत पार्वतीच्या रुपाला शोभेल, अशी तिची शस्त्रे, शंख, चक्र, गदा, पद्म. तिचे वाहने, गाय, हत्ती, कासव, नाग, गरूड. सौभाग्याची लेणी, फणी, करंडा, आरसा, मंगळसूत्र व सुवासिनींच्या ओटीचे ताट. तुळशी वृंदावन, स्वस्तिक, आंबा, श्रीफळ, उंबर-पिंपळ वगैरे पूजनीय वृक्ष ही हिंदू संस्कृतीची प्रतीके रांगोळीत काढली जातात यालाच चैत्रांगण म्हटले जाते. रांगोळीत गणपतीही काढला जातो. ही रांगोळी अतिशय सुरेख दिसते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ईशान्य भारताचे बांगलादेशीकरण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'भारताच्या ईशान्येकडील राज्यांमध्ये बांगलादेशी नागरिकांची प्रचंड प्रमाणात घुसखोरी होत असताना मतांच्या राजकारणामुळे त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळेच आसामसारख्या राज्यात चार खासदार असलेला प्रमुख विरोधी पक्ष म्हणून 'एयूडीएम' विधानसभेत दाखल झाला आहे. अशीच स्थिती कायम राहिल्यास ईशान्य भारताचे बांगलादेशीकरण होईल' असे मत निवृत्त ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांनी व्यक्त केले. 'पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये कोणत्याही पक्षाचे सरकार आले तरी, किंगमेकरची भूमिका 'एयूडीएम' पक्ष बजावेल. हे देशासमोर मोठे संकटही आहे' अशी भीती त्यांनी व्यक्त केली. हिंदू व्यासपीठाच्यावतीने डॉ. के. बी. हेडगेवार यांच्या स्मृतीनिमित्त आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते. दसरा चौकातील शाहू स्मारक भवनामध्ये 'बांगलादेशी घुसखोरी : भारताच्या सुरक्षेस सर्वात मोठा धोका' विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सुभाष वोरा होते.

निवृत्त ब्रिगेडिअर महाजन म्हणाले, '१९७१ च्या पारंपरिक युद्धामध्ये अपयश आल्यानंतर पाकिस्तानने अपारंपरिक युद्धाला सुरुवात केली. त्याची थेट झळ सर्वसामान्य नागरिकांना बसू लागली. आयएसआयसारख्या संघटना छोटे-छोटे हल्ले करत नेहमी देशाला रक्तबंबाळ करत आहेत. अंतर्गत हिंसाचारामुळे दरवर्षी दोन ते अडीच हजार लोकांचा बळी जात आहे. या संहाराला मतपेटीचे राजकारण कारणीभूत आहे. पाकिस्तान आणि चीनच्या सीमेवरील कारवायांना रोखण्यात देशाला यश आले आहे. मात्र बांगलादेशी घुसखोरांना रोखण्यात अपशयच आले आहे. भाजप, शिवसेना पक्षाशिवाय याविरोधात कोणीही आवाज उठवत नाही. ममता बॅनर्जी, नीतीशकुमार, लालू प्रसाद यादव, नवीन पटनाईक हे नेते अशा गोष्टींना खतपाणी घालत आहेत.'

निवृत्त ब्रिगेडिअर महाजन म्हणाले, 'पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये सध्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. दोन्ही राज्यात अनुक्रमे ३० व ३२ टक्के बांगलादेशी घुसखोर आहेत. भारतीयांची मतदान करण्याची मानसिकता नसताना घुसखोर शंभर टक्के मतदान करीत आहेत. त्यामुळे इशान्येकडील राज्यांना धोका निर्माण झाला आहे. प्रत्येक राजीकय पक्षांमध्ये वैचारिक मतभेद असू शकतात. मात्र देशाच्या सुरक्षेला प्राधान्य देवून सर्व पक्षांनी संयुक्त कृती आराखडा आखण्याची आवश्यकता आहे.

उदय सांगवडेकर यांनी प्रास्ताविक केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समीर गायकवाडला आज कोर्टात हजर करणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाड याला सुनावणीसाठी सोमवारी (ता. ११) जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे. कोर्टाचे आदेश असतानाही पोलिसांनी पुरेसे पोलिसबळ नसल्याचे सांगून गेल्या दोन सुनावणीसाठी समीरला कोर्टात हजर केले नव्हते. त्यावर गेल्या सुनावणीवेळी कोर्टाने पोलिसांची कानउघडणी केल्याने सोमवारी समीरला कोर्टात हजर केले जाणार आहे. त्याच्यावर आरोपपत्र दाखल करण्याबाबतही महत्त्वाचा युक्तीवाद उद्या होऊ शकतो.

कॉम्रेड पानसरे हत्येतील संशयित आरोपी समीर गायकवाडवर आरोपपत्र दाखल करण्याची तयारी पोलिसांनी केली असली तरी, समाधानकारक तपास नसल्याने आरोपपत्र दाखल करण्याची घाई करू नये, अशी भूमिका कॉम्रेड पानसरे कुटुंबीय आणि त्यांच्या वकिलांनी घेतली होती. याबाबत उच्च न्यायालयात दाखल केलेल्या तीन याचिकांच्या सुनावणीची वाट पाहण्याचीही विनंती पानसरे कुटुंबीयांच्या वकिलांनी जिल्हा अतिरिक्त न्यायाधीशांना केली होती.

न्यायाधीशांनी समीरला कोर्टात हजर करण्याचे आदेश यापूर्वी दोनवेळा देऊनही पोलिसांनी समीरला कोर्टात हजर केले नव्हते, त्यामुळे मागील सुनावणीदरम्यान पोलिसांची कानउघडणीही झाली होती. सोमवारच्या सुनावणीसाठी समीर गायकवाड याला हजर करण्याचे प्रतिज्ञापत्र पोलिसांनी कोर्टात दिले आहे, त्यामुळे सोमवारी समीरला कोर्टात हजर केले जाणार आहे. या सुनावणीत आरोपपत्र दाखल करण्याबाबत महत्त्वाचा युक्तीवाद होणार असल्याने सर्वांचे लक्ष सुनावणीकडे लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

५ लाख लिटर पाणी घेऊन ‘पाणी एक्स्प्रेस’ रवाना

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । मिरज

दुष्काळग्रस्त लातूरला पाणी पुरवठा करण्यासाठी राजस्थानातील कोटा येथून मिरज येथे आणण्यात आलेल्या रेल्वेच्या ५० पैकी १० वॅगन पाण्याने भरून लातूरला रवाना करण्यात आल्या. सोमवारी सकाळी ११ वाजता रवाना करण्यात आलेली 'पाणी एक्स्प्रेस' लातूरला संध्याकाळी आठ वाजेच्या सुमार पोहोचणार असल्याचे सांगण्यात आले.

मिरजेतून लातूरला पाणी नेण्यासाठी राजस्थानातील कोटा येथून आलेले रेल्वेचे ५० वॅगन रविवारी मिरजेत दाखल झाले. रेल्वेच्या वॅगनमध्ये पाणी भरण्यासाठी टाकण्यात येत असलेली पाइपलाइन शुक्रवारी पूर्ण होणार आहे. तोपर्यंत न थांबता प्रशासनाकडून रेल्वेच्या प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर टँकर भरण्याचे काम सुरू करण्यात आले दुपारी दोनपासून दहा वॅगनमध्ये प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर पाणी भरण्याचे काम सुरू झाले. एक वॅगन भरण्यास सुमारे सहा तासांचा वेळ लागला. अखेर सोमवारी पहाटेपर्यंत दहा वाघिण्यांमध्ये मिळून पाच लाख लिटर पाणी भरण्यात आले. १० वॅगन भरल्यानंतर पाणी एक्स्प्रेस मिरजेहून लातूरला रवाना करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रत्येक वॅगनची क्षमता ५४ हजार लिटर आहे. मात्र, प्रत्येक वॅगनमध्ये ५० हजार लिटर पाणी भरण्यात आले आहे. अन्य ४० वॅगन्स यार्डमध्ये उभ्या करण्यात आल्या आहेत.

मिरज जंक्शनवर रेल्वेच्या जलशुद्धीकरण केंद्रापासून यार्डापर्यंत नवीन जलवाहिनी टाकण्यासाठी चर काढण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी १ कोटी, ८५ लाख रुपये खर्च येणार आहे. हे काम शुक्रवारी पूर्ण होणार आहे. त्यानंतर पूर्ण क्षमतेने पाणी उपलब्ध होईल, असे सांगण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंबाबाई मंदिर गाभाऱ्यात महिलांचा प्रवेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मागील काही दिवसांपासून अंबाबाई मंदिरातील गाभाऱ्यात महिलांना प्रवेश मिळावा यासाठी सुरू असलेला वाद सोमवारी संपुष्टात आला. सायंकाळी साडेपाच वाजता आठ ते नऊ महिलांनी गाभाऱ्यात जावून अंबाबाईचे दर्शन घेतले. शनी शिंगणापूर, त्र्यंबकेश्वरनंतर अंबाबाई मंदिररातील महिलांच्या गाभारा प्रवेशावरून गेले काही दिवस वाद सुरू होता. याविरोधात भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी गाभारा प्रवेशाचे आंदोलन पुकारले होते. त्यापूर्वीच मंदिरातील गाभाऱ्यात प्रवेश करुन कोल्हापूरच्या पुरोगामीत्वावर शिक्कामोर्तब करत गाभाऱ्यातील महिला प्रवेश वादावर पडदा टाकला आहे. अंबाबाईच्या दर्शनानंतर महिलांनी 'स्त्री-पुरुष समानतेचा विजय असो' आदी घोषणा देवून जल्लोष साजरा केला.

गेल्या काही दिवसांपासून शनी शिंगणापूरच्या चौथऱ्यावरील महिलांच्या प्रवेशावरुन राज्यात विविध मतप्रवाह निर्माण झाले होते. न्यायायलयाच्या निर्देषानुसार महिलांना चौथऱ्यावर प्रवेश मिळाल्यानंतर राज्यातील इतर मंदिरांच्या गाभाऱ्या प्रवेश मिळवण्यासाठी आंदोलनाने जोर पकडला होता. त्याचे लोण कोल्हापूरातही पोहोचले होते. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी बुध‍वारी कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्याचा इशारा दिला होता. मंदिर प्रवेश विरोधी समितीने देसाई यांना प्रवेश करु देणार नसल्याचे प्रसिद्धी पत्रक दिले होते. त्यानंतरही अवनीच्या संस्थापिका अनुराधा भोसले यांनी काही महिलांसह गाभाऱ्यात प्रवेश करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. भोसले यांना प्रवेशापासून मज्जाव केल्यानंतर सुवर्णा तळेकर यांच्या नेतृत्वाखालील समता समितीने समोवारी गाभाऱ्यात प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केला होता.

शहरातील शांतता अबाधित राखण्यासाठी सर्वपक्षीय बैठकीचे मिरजक तिकटी येथील विठ्ठळ मंदिरात आयोजन केले होते. मात्र बैठकीत कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड वादावादी झाल्यानंतर कोणत्याही निर्णयाविना बैठक पार पाडली होती. त्यानंतर समता समितीच्या कार्यकर्त्यांची कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात बैठक सुरू होती. गाभाऱ्यातील प्रवेश करण्यावर एकमत झाल्यानंतर जुना राजावाडा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अनिल देशमुख यांच्या दालनामध्ये सर्वपक्षीय, श्रीपुजक व समता समितीच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. बैठकीत अनेक वादग्रस्त मुद्यावर चर्चा झाली, मात्र सर्व मुद्यांना बगल देत महिलांना गाभाऱ्यात प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंडा सेलमध्ये वेड लागेल- समीर गायकवाड

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । कोल्हापूर

अंडा सेलमध्ये राहून वेड लागायची वेळ आली असल्याचे सांगत इतर कैद्यांशी बोलण्याची परवानगी द्यावी अशी मागणी कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाड याने न्यायालयात केली. पानसरे हत्या प्रकरणाची सुनावणी येथील जिल्हा सत्र न्यायालयात सुरू आहे. सोमवारी सुनावणी दरम्यान गायकवाडने अर्जाद्वारे ही मागणी केली.

आज झालेल्या सुनावणी दरम्यान विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी युक्तिवाद मांडला. उच्च न्यायालयाच्या नियंत्रणाखाली या हल्ल्याचा तपास सुरु आहे. यामध्ये सध्या प्रगती होत आहे, शिवाय साध्य स्थितीत समीरवर आरोप निश्चित होतील, असे पुरावे हाती नाहीत त्यामुळे त्याच्यावर दोषरोप निश्चित करू नये अशी मागणी निंबाळकर यांनी केली.

सध्या दखल करण्यात आलेले आरोपपत्र अपूर्ण असल्याचे सांगत उच्च न्यायालयात तपासाचा अहवाल सादर केल्यानंतर त्यावर निर्णय घेण्याची निंबाळकर यांची विनंती न्यायालयाने मान्य केली. या प्रकरणाची पुढील सुनावणी २९ एप्रिल रोजी होणार आहे.

दरम्यान, समीर गायकवाड याने सुनावणीसाठी हजर राहण्याची विनंती न्यायालयाला केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झेडपी पदाधिकारीनिवडीला सांगलीत वेग

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, कुपवाड
सांगली जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षांसह चार सभापतींच्या निवडीसाठी चर्चेच्या फेऱ्यांना रविवारपासून सुरुवात झाली आहे. माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी या बाबत जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांशी चर्चा केली. जिल्हा परिषद अध्यक्षांच्या 'वसंत'बंगल्यावर रविवारी रात्री उशिरापर्यंत ही चर्चा सुरू होती. केवळ प्राथमिक चर्चा केली. १२ एप्रिल रोजी अंतिम बैठक घेण्यात येणार आहे. नावांची यादी १३ एप्रिल रोजीच जाहीर होईल, अशी माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांनी दिले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिंदे, आमदार सुमन पाटील, आटपाडीचे माजी आमदार राजेंद्र देशमुख, माजी मंत्री अजितराव घोरपडे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील, महाकांली कारखान्याचे अध्यक्ष विजय सगरे, मानसिंग नाईक यांचे चिरंजीव विराज नाईक, स्मिता पाटील यांच्यासह प्रमुख नेते, जिल्हा परिषदेचे आजी-माजी पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. पहिल्या टप्यात तालुका पातळीवर नेत्यांची मते व भूमिका या बाबत चर्चा करण्यात येत आहे. घोरपडे यांनी स्वतंत्रपणे जिल्हाध्यक्ष शिंदे यांच्याशी बंद खोलीत बराच वेळ चर्चा केली.
आटपाडीचे नेते राजेंद्र देशमुख यांनी जयंत पाटील यांच्याकडे आपले मत मांडले. या शिवाय आमदार सुमन पाटील, विजय सगरे यांच्याशीही पाटील यांनी चर्चा केली. शिवसेना आमदार अनिल बाबर दुपारीच बैठकीसाठी आले होते. त्यांनी जिल्हाध्यक्ष शिंदे यांच्याशी चर्चा केली. मात्र, जयंत पाटील बराच वेळ न आल्याने ते निघून गेले.
भाजप नेत्यांची दांडी
जिल्हा परिषद पदाधिकारी निवडी संदर्भात आयोजित बैठकीस भाजप नेत्यांनी दांडी मारली होती. खासदार संजय पाटील, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, आमदार विलासराव जगताप या प्रमुख भाजप नेत्यांनी या बैठकीकडे पाठ फिरवली. त्यामुळे भाजपच्या भूमिकेबाबत उलट-सुलट चर्चा सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाढीव साखरदराचा शेतकऱ्यांना लाभ द्यास्वाभिमानीचे नेते सदाभाऊ खोत यांची मागणी

$
0
0

वाढीव साखरदराचा शेतकऱ्यांना लाभ द्या
स्वाभिमानीचे नेते सदाभाऊ खोत यांची मागणी
म. टा. वृत्तसेवा, कुपवाड
'ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एफआरपीची रक्कम त्वरीत देण्याबरोबरच वाढीव साखर दराचा लाभही दिला पाहिजे. असे न करणाऱ्या कारखान्यांवर फौजदारी दाखल करण्याचे पाऊल सरकारने उचलले पाहिजे. असे झाले नाही आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्यास पालकमंत्र्यांना कोल्हापुरात किंवा सांगलीत एक मे रोजीच्या ध्वजारोहण करण्यास तीव्र विरोध करू,' असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी दिला. १७ एप्रिल रोजी खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत सांगलीत शेतकरी मेळावा घेणार येणार आहे, असेही खोत म्हणाले.
मिरजेतून लातूरला पाणी देण्याच्या निर्णयाचे स्वागत करून खोत म्हणाले, 'सांगली जिल्ह्यातील सधन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तालुक्यांनाही पाणीटंचाईची झळ बसू लागली आहे. कायम दुष्काळी पट्टातर होरपळूनच निघत आहे. पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करताना त्यामध्ये जनावरांना लागणाऱ्या पाण्याचा विचार केला जात नाही. ऊस पीक सोडले तर दुसरा चारा नाही. लोकांची मागणी नाही आणि छावणी चालकांचा पुर्वानुभव बरोबर नसल्याचे कारण पुढे करून चाऱ्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जात आहे. शेतकरी छावणी चालवू शकत नसल्याने सरकारनेच स्वतःच छावण्या सुरू कराव्यात. डाळींब, द्राक्ष या सारख्या फळबागा जगविणेही गरजेचे आहे. बागांना पाणी देणे जमत नसेल तर सरकारने पाणी अनुदान द्यावे. कर्ज वसुलीत सवलत द्यावी. दुष्काळ आणि कर्जाला वैतागलेला पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरीही आत्महत्या करायला लागला आहे. सरकारने वेळीच योग्य ती खबदारी घेतली नाही तर आत्महत्येचे लोण वाढण्याची भिती आहे. पालकमंत्र्यांनी बँक अधिकाऱ्यांची बैठक बोलवून मार्ग काढावा. शेतकरी मेल्यानंतर एक लाख रुपये देण्यापेक्षा आमच्या शेतकऱ्यांचा लाखमोलाचा जीव वाचला पाहिजे.'
ईडीकडून चौकशी करा
सहकारी साखर कारखाने बंद पाडून कवडीमोल भावाने कोणी विकले आणि कोणी घेतले याची ईडीमार्फत चौकशी करावी, अशी आमची मागणी आहे. सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी अशा प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, या आश्वासनांची पूर्तता होताना दिसत नाही. यंदाचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच काही कारखान्यांनी २३००-२४०० दर गृहीत धरून आगोदरच साखर विक्रीचे करार केले आहेत. त्यामुळे आता ३७०० वर साखर गेली. या फरकाला जबाबदार कोण? याचीही चौकशी झाली पाहिजे. सरकारने दोन कारखान्यांमधील अंतराची अट काढून टाकली तर दरासाठी आंदोलन करण्याची वेळच येणार नाही. परंतु, सरकारी अनुदानाचा बाऊ करून अंतराची कायम ठेवण्याचा घाट घातला जात असल्याचा दावाही खोत यांनी यावेळी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाणी एक्स्प्रेस अखेर लातूरला

$
0
0

दहा टँकर पाठवले; आणखी दहा टँकर भरण्याची प्रक्रिया सुरू

म. टा. वृत्तसेवा, मिरज

मिरजेतून पाणी घेऊन लातूरला जाणाऱ्या रेल्वेची चाचणी म्हणून दहा टँकरची पहिली रेल्वे गाडी सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास लातूरकडे रवाना झाली. रात्री उशिरा पाणी एक्स्प्रेस लातूर येथे पोहोचेल, असा अंदाज रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. सोमवारी दहा टँकरमधून पाच लाख लिटर पाणी पाठविण्यात आले आहे. आणखी दहा टँकर भरण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. ते मंगळवारी लातूरकडे रवाना करण्यात येण्याची शक्यता आहे.

रविवारी रेल्वेचे टँकर मिरजेत दाखल झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाकील यंत्रणेचा वापर करून युद्धपातळीवर टँकर भरण्याचे काम सुरु करण्यात आले. कमी क्षमतेच्या जलवाहिनीद्वारे पाणी भरण्यास वेळ लागत असल्याने ही रेल्वेगाडी बुधवारी लातूरला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, रेल्वेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिवसरात्र टँकर भरण्यासाठी प्रयत्न करून अखेर लातूरकरांची तहान भागविण्यासाठी सोमवारी पहिली गाडी रवाना केली. पूर्ण क्षमतेने रेल्वे भरून पाठविण्यासाठीची यंत्रणा उभी राहण्यासाठी आणखी चार दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे रेल्वेगाडीचे दहा टँकरमध्ये विभाजन करून ते भरून पाठविण्यात आले.

नव्या जलवाहिनीचे काम पूर्ण होईपर्यंत अशा पद्धतीने दहा टँकरच्या रेल्वे पाठविण्यात येणार आहेत. सुरुवातीस दहा टँकरची रेल्वे पाठविल्याने पूर्ण क्षमतेने रवाना करण्यात येणाऱ्या रेल्वेचे रंगीत तालिमही झाली आहे. यामुळे मार्गावर धावताना येणाऱ्या अडचणी, लागणारा वेळ, लातूरमध्ये पाणी भरून घेण्याची व्यवस्था आदींचा अंदाज येणार आहे. या नुसार रेल्वेचे वेळापत्रक व इतर बाबी निश्चित करण्यास रेल्वे प्रशासनास मदत होणार आहे.

दुष्काळी मराठवाड्याला मिरजेतून रेल्वेद्वारे पाणी देण्याचा निर्णय सरकारने मागील आठवड्यात घेतला होता. तांत्रिक अडचणींमुळे हा प्रयोग यशस्वी होणार का, याबाबतही शंका व्यक्त करण्यात येत होती. मिरजेत उभारण्यात येणाऱ्या नव्या यंत्रणेला वेळ लागत असल्याने लातूरला पाणी देण्यास विलंब होणार असल्याचीही चर्चाही सुरू झाली होती. मात्र, आता सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. पाण्याची रेल्वे सोमवारी सकाळी अकरा वाजता लातूरकडे रवाना झाली. भाजपचे ज्येष्ठ नेते मकरंद देशपांडे यांनी रेल्वेला हिरवा झेंडा दाखविला.

ठळक बाबी

एकूण ५० टँकरची गाडी गाडीची विभागणी दहा टँकरमध्ये सध्याचे नियोजन एक दिवसाआड पाठविण्याचे दहा टँकरची क्षमता पाच ‌लाख लिटर प्रत्येक टँकरची क्षमता ५४ हजार लिटर रेल्वेचे अधिकारी-कर्मचारी २४ तास ऑन ड्युटी

भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे हा निर्णय घेतला आहे. महसूल विभाग, जीवन प्राधिकरण, रेल्वे प्रशासन या सर्वांच्या अथक प्रयत्नांमुळे सोमवारी पहिली रेल्वे रवाना करण्यात यश आले. पुढील निर्णय तांत्रिक अडचणी दूर करून घेण्यात येईल. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर येत्या दोन तीन दिवसांत नव्या जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर पूर्ण क्षमतेने रेल्वे भरून लातूरकडे पाठविण्यात येईल.

- जिल्हाधिकारी शेखर गायकवाड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टेरी टॉवेलवरीलव्हॅट मागे

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सोलापूर
सन २०१६-१७च्या अर्थसंकल्पात टेरी टॉवेलवर लावण्यात आलेला ५.५ टक्के व्हॅट कर मागे घेत असल्याची घोषणा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी विधानसभेत केली. त्यामुळे सोलापुरातील १२ हजार लूमधारकांना दिलासा मिळाला आहे. वस्त्रोद्योग राज्यमंत्री विजयकुमार देशमुख यांनी काही दिवसांपूर्वीच अर्थमंत्र्‍यांना भेटून व्हॅट कर मागे घेण्याची मागणी केली होती.
शहरात सुमारे १२ हजार पॉवर लूमच्या माध्यमातून टॉवेलचे उत्पादन घेतले जाते. त्यातून शहरातील सुमारे ८० हजार बेरोजगारांना रोजगार मिळत आहे. शहरात उत्पादित होणाऱ्या टॉवेलपैकी ९० टक्के उत्पादन हे टेरी टॉवेलचे आहे. टेरी टॉवेल केवळ हॉटेलमध्ये वापरले जात असल्याचा उल्लेख अर्थसंकल्पीय भाषणामध्ये करून साडेपाच टक्के व्हॅट कर लावण्यात आला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्मार्ट सिटीबरोबरस्मार्ट व्हिलेज आवश्यक’

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, कराड
आज जगासमोर पर्यावरणीय समस्यांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यासाठी पर्यावरणपूरक तंत्रज्ञान निर्माण करण्याची गरज आहे. देशातील सर्वाधिक शहरीकरण महाराष्ट्रात झाल्याने शेती व्यवसाय धोक्यात येत आहे. शेती व्यवसाय व त्याच्या पर्यावरणपूरक व्यवसायाला उत्तेजन देणे गरजेचे आहे. सरकारचे स्मार्ट सिटी बरोबरच स्मार्ट व्हिलेज निर्मिती, असे धोरण राबविणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या भूगोल शिक्षण संघाचे अध्यक्ष डॉ. के. सी. रम्होत्रा यांनी केले.
कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठ भूगोल शिक्षक संघ व कराडच्या महिला महाविद्यालयाच्या वतीने मंगळवारी 'औद्योगिकीकरण, शहरीकरण आणि पर्यावरण समस्या'या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. रम्होत्रा बोलत होते. अध्यक्षस्थानी बाळासाहेब कुलकर्णी होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकसहभागातून नागाळे तळ्यातील गाळ काढण्याचे काम सुरु

$
0
0

लोकसहभागातून नागाळे तळ्यातील गाळ काढण्याचे काम सुरु
सातारा
औंध ग्रामस्थांनी पाणीटंचाईवर मात करण्यासाठी गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर लोकसहभाग आणि लोक वर्गणीतून ऐतिहासिक नागाळे तळ्यातील गाळ काढण्यास सुरूवात केली आहे. ४३ वर्षांनतर काढण्यास सुरुवात झाली आहे. नागाळे तळ्याबरोबरच तेलकी तलावाच्या दुरुस्तीच्या कामासही सुरुवात केली आहे.
मागील काही वर्षांमध्ये औंध गावाचा पिण्याच्या पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. तर शेती पाण्याची ससेहोलपट अनेक दशकांपासून सुरू आहे. यंदा दुष्काळाने कहरच केल्याने नागरीक महिलांची पाण्यासाठी मोठी होरपळ, पायपीट सुरू आहे. निसर्गाच्या या प्रकोपावर कायम स्वरुपी तोडगा काढण्यासाठी ग्रामस्थांनी लोकसहभाग, लोकवर्गणी व जलयुक्त शिवारच्या माध्यमातून पाणी टंचाईवर मात करण्यासाठी एकजुटीची वज्रमूठ आवळली असून, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर गाळ काढण्यास सुरुवात झाली आहे. तळ्याचा परिसराची स्वच्छता, डागडुजी केली जात आहे. मागील चार दिवसांपासून तळ्यातील गाळ उचलण्याचे काम शेतकऱ्यांनी स्वःखर्चातून सुरु केले आहे. सुमारे ६५० फूट लांब व ३२५ फूट रुंद असलेल्या तळ्याचा गाळ १९७२च्या दुष्काळामध्ये ग्रामस्थांनी काढला होता. तब्बल ४३ वर्षानंतर पुन्हा हा गाळ काढला जात आहे. नियमित दोन जेसीबी व वीस ट्रॅक्टरच्या मदतीने गाळ काढला जात आहे. मागील चार दिवसांमध्ये ८५० ट्रॉली गाळ उचलण्यात आला आहे. तळ्यामध्ये अजून सुमारे पाच हजार ट्रॉली गाळ निघेल, अशी शक्यता आहे. दरम्यान, नागाळे तळ्याबरोबरच येथील तेलकी तलावाच्या दुरुस्तीच्या कामास सोमवारपासून प्रारंभ करण्यात आला आहे.
......
माणमधील शाळांनी
पटसंख्येइतकी झाडे लावावीत
माण तालु्क्यातील पाण्याचा दुष्काळ कायमचा हटविण्यासाठी झाड लावण्याची व जगविण्याची जबाबदारी घेतली पाहिजे. त्याचबरोबर प्रत्येक शाळेने त्यांच्या पटाइतकी झाडे लावली पाहिजेत, असे मत जलसंधारण व रोजगार हमी सचिव प्रभाकर देशमुख यांनी व्यक्त केले आहे.
लोधवडे (ता. माण) येथील प्राथमिक शाळेतील मुलांना मार्गदर्शन करताना देशमुख बोलत होते. देशमुख म्हणाले, माण तालुक्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पावसाची गरज असून, मुबलक पाऊस पाडण्यासाठी झाडांची गरज आहे. झाडे लावणे व ती वाढविणे व जतन करणे ही सामाजिक बांधिलकी समजून झाडे लावली पाहिजेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उष्म्याचा कहर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गेल्या आठवड्यापासून वाढत चाललेले तापमान सोमवारी ३९.६ अंशावर पोहचले. तप्त झळांमुळे सोमवारचा दिवस कोल्हापूरवासियांसाठी प्रचंड उष्म्याचा ठरला. या उन्हाळ्यात तापमान प्रथमच ३९.६ अंशावर पोहचले आहे. २ एप्रिलला ३९.४ अंशावर तापमान होते.

मार्चच्या अखेरपासून तापमानाची वाढ सुरू झाली आहे. सातत्याने ३५ अंशावर असलेले तापमान पावसाळी वातावरणानंतर थोडे कमी झाले होते. पण गेल्या आठवडाभरात तापमान वाढतच चालले आहे. गुढीपाडव्यादिवशी शुक्रवारी ३८ अंशांवर तापमान गेले. त्यानंतर दोन दिवस तापमानामध्ये कमालीचा कोरडापणा जाणवत होता. सूर्यप्रकाश भाजून काढत असल्याने दुपारी रस्त्यावरील वर्दळ अतिशय कमी होती. रात्रीही किमान तापमान २३ अंशावर राहिल्याने वातावरण गरमच होते.

रविवारी ३७.४ अंशावर असलेल्या कमाल तापमानात सोमवारी तब्बल दोन अंशांनी वाढ झाल्याने वातावरण प्रचंड तापलेले जाणवत होते. दुपारी बाराच्या दरम्यानच रस्त्यावर तप्त झळा जाणवत होत्या. डोक्यावर टोपी अथवा स्कार्फ गुंडाळलेला नसल्यास घराबाहेर पडणेही मुश्किल झाले होते. त्यामुळे रस्त्यावरील वर्दळ अतिशय कमी झाल्याची जाणवत होती​. सायंकाळी वातावरणात थोडा फरक पडला. पण वातावरणातील उष्मा कायम होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीसजणांचा देहदानाचा संकल्प

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जग सोडून गेल्यानंतरही आपल्या शरीराचा एखादा अवयव गरजूंच्या कामी यावा आणि त्यांना जीवदान मिळावे, या उदात्त हेतूने कोल्हापुरातील वीस जणांनी, रविवारी उत्स्फूर्तपणे देहदानाचा संकल्प केला. स्व. अनिल तेंडुलकर फाउंडेशनच्या वतीने अवयव दान चळवळीची सुरुवात करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात उपस्थितांपैकी वीस जणांनी देहदानाचे फॉर्म भरून आपल्यातील सामाजिक भान दाखविले.

महाराष्ट्रात अवयव दान चळवळ मोठ्या प्रमाणावर रुजत आहे. मात्र, कोल्हापुरात त्याबाबत नागरिकांना फारशी माहिती नाही. त्यामुळे येथे त्याला फारसा प्रतिसादही मिळत नाही. त्यामुळे स्व. अनिल तेंडुलकर फाउंडेशनने अवयव दान चळवळीला बळ देण्यासाठी येथे एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. राजारामपुरीतील सूर्या कॉन्फरन्स हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमाला सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनी गर्दी केली होती.

कार्यक्रमात मुंबईतील अवयव दान मोहिमेचे समन्वयक अनिरुद्ध कुलकर्णी व पुण्याच्या श्रीमती आरती गोखले यांनी अवयव दान प्रक्रियेची माहिती दिली. अध्यक्षस्थानी निवृत्त न्यायमूर्ती उर्मिला जोशी होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला 'फिर जिंदगी' ही माहितीपर फिल्म दाखविण्यात आली. त्यानंतर कुलकर्णी व गोखले यांनी अवयव दानासंदर्भातील उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले.

पद्मा हेरवाडेंचे कौतुक

कार्यक्रमात अनिरुद्ध कुलकर्णी आणि आरती गोखले उपस्थितांना अवयवदानाच्या प्रक्रियेची माहिती सांगत असतानाच प्रेक्षकांमधून पद्मा हेरवाडे उत्स्फूर्तपणे पुढे आल्या आणि त्यांनी आपण तीन महिन्यांपूर्वीच आपल्या धाकट्या भावाला किडनी दान केल्याची माहिती सभागृहात दिली. त्यावेळी उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात हेरवाडे यांचे कौतुक केले. संयोजकांनीही अवयवदानाचा प्रचार करणारे साहित्य हेरवाडे यांच्या हस्ते कोल्हापुरातील हॉस्पिटल्सच्या प्रतिनिधींना दिले.

कोण करू शकते?

- दोन ते ८५ वयोगटातील कोणीही व्यक्ती अवयव दान करू शकते

- ब्रेन डेड व्यक्तीचे नातेवाइक त्यांच्या अवयव दाना संदर्भात निर्णय घेऊन शकतात

- ठराविक चाचण्यांनंतर डॉक्टरांनी पेशंटला ब्रेन स्ट्रिम डेड घोषित केल्यानंतरच संबंधिताचे अवयव दान शक्य

- घरात मृत्यू झाल्यानंतरही डोळे आणि त्वचा दान करणे शक्य

- रक्तगट जुळत असल्याच कुटुंबातील व्यक्तीला किडनी दान करणे शक्य (एका किडनीवरही माणूस जगू शकतो)

- आजार नसलेलाच व्यक्ती अवयव दान करू शकतो

कोल्हापुरात कोठे सुविधा?

- छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय

- अॅपल सरस्वती हॉस्पिटल

- अॅस्टर आधार (येत्या काही दिवसांत सुविधा होणार)

- झेडटीसीसी या समन्वय संस्थेचे पुण्यात विभागीय कार्यालय असून,

http://www.ztccpune.com या वेबसाइटवर याची माहिती आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उघडले अंबेचे दार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गेल्या काही दिवसांपासून अंबाबाई मंदिरातील गाभाऱ्यात महिलांना प्रवेश मिळण्यासाठी सुरू असलेला वाद सोमवारी संपुष्टात आला. सायंकाळी साडेपाच वाजता नऊ ते दहा महिलांनी गाभाऱ्यात जाऊन अंबाबाईचे दर्शन घेतले. शनी शिंगणापूर, त्र्यंबकेश्वरनंतर अंबाबाई मंदिरातील महिलांच्या गाभारा प्रवेशावरून गेले काही दिवस वाद सुरू होता. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनीही गाभारा प्रवेशाचे आंदोलन पुकारले होते. त्यापूर्वीच मंदिरातील गाभाऱ्यात प्रवेश देण्यात आला. गाभाऱ्यात प्रवेश झाल्यानंतर महिलांनी 'स्त्री-पुरुष समानतेचा विजय असो,' अशा घोषणा देत जल्लोष केला.

हायकोर्टाच्या निर्देशानुसार महिलांना शनी ‌शिंगणापुरातील चौथऱ्यावर प्रवेश मिळाल्यानंतर राज्यातील इतर मंदिरांच्या गाभाऱ्यात प्रवेश मिळवण्यासाठी आंदोलनाने जोर पकडला होता. कोल्हापुरातील मंदिरातील प्रवेशासंबंधीही आंदोलन पुकारले होते. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी बुध‍वारी (ता. १३) अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्याचा इशारा दिला होता. मंदिर प्रवेशविरोधी समितीने देसाई यांना प्रवेश करु देणार नसल्याचे जाहीर केले होते. त्यानंतरही अवनिच्या संस्थापिका अनुराधा भोसले यांनी काही महिलांसह गाभाऱ्यात प्रवेश करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. भोसले यांना प्रवेशापासून मज्जाव केल्यानंतर सुवर्णा तळेकर यांच्या नेतृत्वाखालील समता समितीने सोमवारी गाभाऱ्यात प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केला होता.

या पार्श्वभूमीवर शांतता अबाधित राखण्यासाठी सोमवारी मिरजकर तिकटी येथील विठ्ठल मंदिरात सर्वपक्षीय बैठक आयोजित केली होती. मात्र प्रवेशासंबंधी कार्यकर्त्यांतच दोन गट पडून प्रचंड वादावादी झाली आणि कोणत्याही निर्णयाविना बैठक पार पाडली होती. त्यानंतर समता समितीच्या कार्यकर्त्यांची कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात बैठक सुरू होती. गाभाऱ्यात प्रवेश करण्यावर एकमत झाल्यानंतर जुना राजावाडा पोलिस स्टेशनचे निरीक्षक अनिल देशमुख यांच्या दालनात सर्वपक्षीय, श्रीपूजक व समता समितीच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. बैठकीत महिलांना गाभाऱ्यात प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला. निर्णयानंतर पोलिस निरीक्षक देशमुख यांच्यासह सर्व महिला मंदिरात दाखल झाल्या. महिला प्रवेश आंदोलन असल्याने मंदिर परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. शनी मंदिराकडील दरवाजामधून सर्व महिलांनी मंदिरात प्रवेश केला. खणानारळाच्या ओटीसह सर्व महिलांना सायंकाळी साडेपाच वाजात गाभाऱ्यात जाऊन अंबाबाईचे दर्शन घेतले. दर्शन घेवून बाहेर आल्यानंतर महिलांनी 'पुरोगामी विचारांचा विजय असो', 'स्त्री-पुरुष समानतेचा विजय असो', 'सावित्रीबाई फुलेंचा विजय असो, 'संविधानाचा विजय असो' आदी घोषणा देवून जल्लोष साजरा केला.

बैठकीवेळी निवासराव साळोखे, बाबा पार्टे, रामभाऊ चव्हाण, सुरेश जरग, वैशाली महाडिक, श्रीकांत भोसले, चंद्रकांत यादव, महेश उरसाल, श्रीपूजक अजित ठाणेकर, माधव मुनीश्वर, केदार मुनीश्वर, मंदार मुनीश्वर, सतीशचंद्र कांबळे, मुकुंद कदम आदी उपस्थित होते.

यांनी केला गाभाऱ्यात प्रवेश

सुवर्णा तळेकर, डॉ.अरुणा माळी, सीमा पाटील, डॉ. मीनल जाधव, स्नेहल कांबळे, मीना चव्हाण, रुपाली कदम, आरती रेडेकर, दीपा पाटील, सुनीता मोरे.


महिलांना मंदिरात प्रवेश देऊन हायकोर्टाच्या निर्णयाचे पालन करण्यात आले आहे. श्रीपूजकांनी सकारात्मक निर्णय घेतला आहे. स्त्री पुरूष भेदभाव पाळला गेला नाही. कायदा व सुवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून मंगळवारी पुन्हा प्रवेशप्रकियेशी संबंधित घटकांची बैठक घेतली जाईल.

डॉ. अमित सैनी, जिल्हाधिकारी


'जिल्हाधिकारी धर्मद्रोही '

अंबाबाई मंदिराची धर्मपरंपरा मोडून गर्भकुडीत महिलांना प्रवेश देण्याच्या घटनेचा हिंदू जनजागृती समितीने तीव्र शब्दांत निषेध केला आहे. मंदिराचे विश्वस्त असलेले जिल्हाधिकारी डॉ.अमित सैनी यांच्यामुळे प्रवेश झाला आहे. जिल्हाधिकारी हेच धर्मद्रोही असल्याचा आरोप समितीचे राज्य संघटक सुनील घनवट यांनी प्रसिद्धी पत्रकात केला आहे. प्रवेशाचा निर्णय पूर्वीच झाला होता. हिंदुत्ववादी, सामाजिक आणि पुरोगामी संघटनांची झालेली बैठक केवळ 'फार्स' होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रभावाखीलच जुना राजावाडा पोलिसांना प्रवेशाचा निर्णय घेतल्याचचे पत्रकात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जलयुक्त शिवार अभियानाचा सांगलीत धडाका

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, कुपवाड
सांगली जिल्ह्यातील कायम दुष्काळी तालुक्यातील भूगर्भातील पाण्याची खालावलेली पातळी वाढविण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानाला मेपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. या अभियानात जिल्ह्यातील १४१ गावांचा समावेश असून, त्यापैकी ७५ गावांत शंभर टक्के, २० गावात एैंशी तर ५० गावांत पन्नास टक्क्यांपेक्षा अधिकचे काम झालेले आहे. या कामांमुळे पहिल्या वर्षी ३४ हजार ६८५ टीएमसी इतक्या पाण्याची साठवण होणार आहे. ठिबक पद्धतीने सिंचन केल्यास पाणीसाठ्याचा ६७ हजार ५८० हेक्टर क्षेत्राला लाभ होणार आहे, अशी माहिती जिल्हा कृषी अधिकारी उमेश पाटील यांनी दिली.
महाराष्ट्रातल्या काही भागाला वारंवार दुष्काळाला सामोरे जावे लागते. १९७२च्या भीषण दुष्काळाच्या आठवणी ताज्या करणाऱ्या सध्याच्या दुष्काळाचे चटके सहन करण्यापलिकडे आहेत. १९७२च्या दुष्काळाची तीव्रता मोठी होती. परंतु, पाण्याची टंचाई नव्हती. अन्नधान्याच्या कमतरतेने जनतेचे प्रचंड हाल केले होते. त्यानंतरचा प्रत्येक दुष्काळ पाणीटंचाईची तीव्रता वाढवतच गेला आहे. दिवसेंदिवस भूजलाची पातळी खालावतच जात असल्याने उन्हाच्या झळा वाढू लागताच पाणी-पाणी म्हणायची वेळ येते. याची दखल घेऊन पाणी आडवा पाणी जिरवा, चा मंत्र पुढे आला. तरीही पाणी समस्या कायम राहिली.
अशी आहेत जलयुक्त शिवारमधील कामे
भाजप-सेना सरकारने जलयुक्त शिवार अभियानाची घोषणा केली. दुष्काळावर मात करण्याच्या दिशेने हे पाऊल उचलल्याने सांगत सरकारने आभियाना आराखडा समोर ठेवला. नदी, नाले, ओढ्यांचे पुनरुज्जीवन, माती नाला बांध, सलग समतल चर, कपार्टमेंट बंडिंग, अनघड दगडी बांध, नाला बांध दुरुस्ती, सिमेंट बंधारे, नाला खोलीकरण, सरळीकरण, रुंदीकरण, पाझर तलावातील गाळ काढणे आदी कामांना गती देण्यात आली आहे.
तालुकानिहाय लाभार्थी गावे
सतत पाणीटंचाई, टँकरने पाणी देण्याची वेळ, अतिशोषित पाणलोट क्षेत्र, पन्नास पैशांपेक्षा कमी आणेवारी आणि केंद्र सरकारच्या पाणलोट विकास (वसुंधरा) योजनेत समाविष्ट असलेल्या गावांना जलयुक्त शिवार अभियानात प्राधान्यक्रम देण्याचा निकष निश्चित करण्यात आला. जिल्ह्यातील सात तालुक्यातील १४१ गावांचा समावेश झाला. यामध्ये आटपाडी -३०, जत-४२, कडेगाव-९, तासगाव-२४, खानापूर-१५, मिरज-१३ आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील ८ गावांचा समावेश आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या आग्रहाखातर आणखी दहा गावांचा समावेशही या अभियानात झाला आहे. परंतु त्यासाठी अद्याप निधी आलेला नाही.
१४३ कोटी खर्चाचे नियोजन
शिवारफेरी करून या गावांची निवड केल्यानंतर १४३ कोटी ७० लाख रुपये खर्चाचा आराखडा तयार करण्यात आला. जिल्हा कृषी विभाग, लघुसिंचन, छोटेबंधारे, वनविभाग आणि भूजल सर्व्हेक्षण विकास यंत्रणा आदींच्या माध्यमातून जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. मार्चअखेर एकूण ३ हजार ४४६ कामे पूर्ण झाली असून, ३४० कामे प्रगतीपथावर आहेत. या योजनेला लोकसहभागाचे मोठे पाठबळ मिळाले आहे. तब्बल ४८ किलोमीटरपर्यंतची सुमारे तीन कोटी एकोणपन्नास लाख रुपये खर्चाची कामे आणि ६९ किलोमीटरपर्यतचा गाळ काढण्याचे काम केवळ लोकसहभातून झाले आहे. तर दोन दोन कोटी सहा लाख रुपये खर्चून सरकारी यंत्रणांनी २१ किलोमीटरपर्यंतची कामे पूर्ण केली आहेत.
जत तालुक्यात भरीव कामे
जलयुक्त शिवार अभियानात सर्वाधिक गावे ४२ इतकी एकट्या जत तालुक्यातील असून या तालुक्याला नेहमीच भयावह दुष्काळाचा सामना करावा लागतो आहे. या तालुक्यातील बारा गावातील कामे शंभर टक्के पूर्ण झाली आहेत. तेरा गावांत पन्नास टक्के. अकरा गावांत अवघे तीस टक्केच काम झाले आहे. आटपाडी तालुक्यातील तीस पैकी आठरा गावांतील जलयुक्त शिवार अभियानाची कामे पूर्ण झाली आहेत. आठ गावांत एैशी टक्के काम झाले आहे. तासगाव तालुक्यातील २४ पैकी १३ गावांतील कामे पूर्ण झाली आहेत. खानापूर तालुक्यातील १५पैकी सहा तर कवठेमहांकाळ तालुक्यातील आठ पैकी सहा गावांतील कामे पूर्ण झाली आहेत. कडेगाव तालुक्यांतील सर्वच म्हणजे नऊही गावातील कामे शंभर टक्के झाली आहेत. मिरज तालुक्यातील तेरापैकी अकरा गावांतील कामे पूर्ण झाली आहेत.
६९ शेततळे प्रस्तावित
सांगली जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत ६९ शेततळे प्रस्तावित आहेत. त्यापैकी ५६ पूर्ण झाली आहेत. १३ प्रगतीपथावर आहेत. यासाठी आतापर्यंत ९५ लाख रुपयांचा खर्च झाला आहे. जत तालुक्यातील २७ पैकी१४, आटपाडी १ पैकी १, मिरज तालुक्यातील ४० पैकी ४०, तासगाव तालुक्यातील १ शेततळी पूर्ण झाली आहेत.
१०१ कोटी निधी उपल्बध
जलयुक्त शिवार अभियानातील १४१ गावातील कामांचा १४३ कोटी ७ लाख खर्चाचा आराखडा असून, १०१ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. आतापर्यंत ४६ कोटी १४ लाख रुपये खर्च झाले असून, उर्वरित निधी खर्चासाठी मेपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. जिल्हा प्रशासनाने स्वतः आणि लोकसहभागातून जलयुक्त शिवार आभियानाला चांगली गती दिली आहे. त्याचे परिणाम मध्यंतरी झालेल्या पावसातील पाणी साठ्यांमुळे बघायला मिळाले. अग्रणी पुनरुज्जीवनामुळे लगतच्या विहिरी चार्ज झाल्याचे दृष्टीस पडले आहे.
.....
जलयुक्त शिवारमधून जिल्ह्यात चांगली कामे झाली आहेत. त्याचा परिणाम पावसाळ्यानंतर दिसून येईल. अग्रणी पुनरुज्जीवनासारखा अभिनव उपक्रम राबवविला आहे. आता केवळ चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे.
शेखर गायकवाड, जिल्हाधिकारी सांगली

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सराईत चोरटा अटकेत

$
0
0


इस्लामपूर
वाळवा, शिराळा आणि कराड तालुक्यातील पोलिसांना गुंगारा देत गेल्या अनेक दिवसांपासून घरफोड्या करणारा दीपक महादेव थोरात (वय २९, मूळ रा. वाकुर्डे बुद्रूक, ता. शिराळा, सध्या रा. मसूर, ता. कराड) याला सोमवारी इस्लामपूर पोलिसांनी शिताफीने अटक केली.
इस्लामपूर शहरात आणि परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून घरफोड्यांच्या अनेक घटना घडल्या होत्या. वारंवार होणाऱ्या या प्रकारामुळे नागरीक त्रासले होते. पोलिसांच्याकडे काही फिर्यादी दाखल झाल्या होत्या. त्यामुळे पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली इस्लामपूर पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पथकाने सराईत गुन्हेगार दीपक थोरात याला सापळा रचून ताब्यात घेतले. त्याने इस्लामपूर शहर व परिसरात १५ ते २० ठिकाणी चोऱ्या केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. कराड पोलिसही त्याच्या शोधात होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा बँकेला ८३ कोटींचा नफाठेवी चार हजार कोटींवर; दिलीप पाटील

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, कुपवाड
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला संपलेल्या अर्थिक वर्षात तब्बल ८३ कोटी ७२ लाखांचा विक्रमी नफा झाला आहे. ठेवींमध्ये १८.६१ टक्के वाढ झाली असून, ४ हजार २७६ कोटी १२ लाख रुपयांच्या ठेवी झाल्या असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी मंगळवारी पत्रकारांना दिली. बँकेच्या यशात कर्मचाऱ्यांचा मोठा वाटा आहे. याचा लाभ त्यांनाही जरूर देऊ, अशी ग्वाही अध्यक्षांनी दिली आहे.
प्रशासकांच्या कारभारानंतर सांगली जिल्हा बँकेत कार्यरत झालेल्या संचालक मंडळाचे नेतृत्व करताना अध्यक्ष पाटील यांनी बँकेच्या प्रगतीला गती दिली आहे. बँकेची आर्थिक घडी चांगलीच सुधारली आहे. काटेकोर व कडक नियोजनामुळे बँकेचा कारभार चांगलाच सुधारल्याचे दिसत आहे. ३१ मार्च २०१६ अखेर बँकेच्या स्थितीबाबत पाटील यांनी सविस्तर माहीती दिली. बँकेच्या भागभांडवलात ५.३३ टक्के वाढ झाली असून, भागभांडवल ११४७८.५८ झाले आहे. ठेवीमध्ये १८.६१ टक्के वाढ झाली असून, ठेवी ४ हजार २८६ कोटी झाल्या आहेत. ठेवीचे ९५ टक्के टार्गेट पूर्ण केले आहे. विद्यमान संचालक मंडळाच्या कालावधित १ हजार ६९ कोटी १२ लाखांच्या ठेवी वाढल्या आहेत. बँकेने ठेवी गोळा करीत असताना बँकेच्या हितासाठी लो-कॉस्ट ठेवीच वाढाव्यात यासाठी प्रयत्न केलेले दिसत आहे. लो-कॉस्टच्या ठेवी ५२.२२ टक्के इतक्या झाल्या आहेत.
बँकेची सूत्रे हाती घेताच जिल्हा बँकेबाबत मार्केटमध्ये चांगले वातावरण निर्माण व्हावे, चांगला ग्राहक बँकेशी जोडला जावा यासाठीचे प्रयत्न, तालुका पातळीवरील ग्राहक मेळावा, मुख्य कार्यालयात तसेच सर्व शाखांमध्ये लावलेली शिस्त यामुळेच बँकेस चांगला नफा मिळवता आला असल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केले.
या वर्षी बँकेस ८३.७२ कोटींचा नफा झाला आहे. यापैकी बरीचशी रक्कम आयकर खात्याकडे जमा करावी लागणार आहे. मिळालेल्या नफ्यातून कर्मचाऱ्यांना पगार वाढ, बोनस देणे यासह विविध तरतूदी करण्यात येणार आहेत.
अशी आबे बॅँकेची स्थिती
कर्जे वाटप ४९५ कोटी.
गुंतवणूक २१.०४ टक्के वाढ
१२४७ कोटी ८७ लाखांवरून १५१० कोटी ४५ लाख गुंतवणूक
बाहेरील कर्जात ९० कोटी ९५ लाखांनी वाढ
एकूण एनपीए प्रमाण ७.६२ टक्क्यांवरून आदर्शच्या जवळ ५.१४ टक्क्यांवर
बँकेची मुख्य शाखा वगळता उर्वरित सर्व २१७ शाखा नफ्यात

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लातूरकरांच्या ‘फिडबॅक’नेकष्टाचे चीज झाल्याची भावना

$
0
0

लातूरकरांच्या 'फिडबॅक'ने
कष्टाचे चीज झाल्याची भावना
कुपवाड : तहानेने व्याकुळलेल्या लातूरकरांना मिरजेहून पाण्याची रेल्वे धावत आल्याने

जितका आनंद झाला असेल तितकाच किंबहुना त्याहून अधिक आनंद मिरजेतून

पाण्याची रेल्वे लवकरात लवकर रवाना करण्यासाठी धडपडणाऱ्यांना झाला आहे. पाणी

घेऊन धावत आलेली रेल्वे येताच लातूरकरांनी दिलेल्या 'फिडबॅक'ने पाण्याची रेल्वे रवाना

करण्यासाठी धडपडणाऱ्यांनी कष्टाचे चीज झाल्याची भावना व्यक्त केली आहे. खुद्द

जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी या फिडबॅकचा एका कार्यक्रमात आवर्जुन उल्लेख

केला.
डॉ. आंबेडकर यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त आयोजित पत्रकारांसाठीच्या कार्यशाळेत

बोलताना गायकवाड म्हणाले, 'लातूरला पाण्याची रेल्वे पोहचल्यानंतर फिडबॅक आला.

पाण्याच्या टँकरची वाट बघतांना मोठ्या रांगा लागतात. त्यातून एकाला एक घागर

मिळवता येणार. तेवढ्याने कुटुंबाची गरज भागणार नाही. म्हणून प्रत्येक कुटुंबातली चार

चार, पाच पाच माणसं घागर हातात घेऊन रांगेत वेगवेगळ्या क्रमांकावर थांबतात. त्या

प्रत्येकाच्या वाट्याला एक घागर आली की चार घागरी त्या कुटुंबाला मिळणार. त्यामुळे

पूर्ण कुटुंबच एक घागर पाणी मिळविण्यासाठी आठ-आठ तास धडपडत असते. त्यातही

वर्ग पडले आहेत. मध्यम वर्ग टँकर चालकाच्या हातावर दोनशे रुपये टेकवतो आणि

पाण्याची गरज भागवतो. त्याच्या वरचा म्हणजे व्यापारी, अर्थिक सुबत्ता असलेला वर्ग

पाचशेपासून आठशे रुपयांपर्यंत पैसे द्यायला तयार असतो. त्यामुळे पाणी या

गोष्टीबद्दल कशी विषमता निर्माण झाली आहे, हे समोर येते. अशा प्रकारच्या फिडबॅक

देणाऱ्या अनेकांच्या बोलण्यातून लातूरकरांची पाण्यासाठी किती ओढाताण होते हे लक्षात

येते. पाण्यासाठी एक-एक किलोमीटरपर्यंत रांगा लावून ताटकळावे लागते. अशा

परिस्थितीत मिरजेतून आम्ही पाण्याची रेल्वे पाठविली. ती लातूरकरांना दिसताच त्यांनी

आमचे आभार मानायला सुरुवात केली. पण, त्यांनी आभार मानण्यापेक्षा पाणी

मिळाल्यानंतर समाधानाची भावना जास्त आनंददायी होती. '

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्याची दुसरी गाडी आज रवाना होणार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मिरज

मिरजेतून लातूरला पाणी घेऊन जाण्यासाठी मंगळवारी दुसरे दहा टँकर भरण्यास सुरुवात करण्यात आली आहे. बुधवारी ही रेल्वे लातूरकड रवाना होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी दिली. नव्या जलवाहिनीचे काम गतीने सुरू असून, हे काम शुक्रवारी पूर्ण होईल, अशी माहिती कंत्राटदार शशांक जाधव यांनी दिली. सोमवारी दुपारपासून दुसऱ्या दहा टॅँकरमध्ये पाणी भरण्यास सुरुवात करण्यात आली होती. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे मंगळवारी दहा टँकर पूर्ण भरू शकले नाहीत. मंगळवारी पाणी भरणे सुरू असल्याने बुधवारी दुसरी रेल्वे लातूरला रवाना होईल. रेल्वे प्रशानाकडून युद्ध पातळीवर काम सुरू आहे.

जलवाहिनीचे काम शुक्रवारी पूर्ण होणार

जलवाहिनीच्या कामासाठी नव्या पाइप मिरजेत दाखल झाल्या आहेत. जलवाहिनीसाठी दोन रेल्वे लाइन क्रॉस कराव्या लगाणार आहेत. यापैकी कोल्हापूर रेल्वे लाइन सोमवारी रात्री क्रॉस करण्यात आली. जलवाहिनीसाठी जळगाव येथून पाइप मागविण्यात आल्या आहेत. पाइपचा पुरवठा करणाऱ्या जैन इरिगेशन कंपनीने या कामासाठी तातडीने आवश्यक पाइप उपलब्ध करून दिल्या आहेत, अशी माहिती मकरंद देशपांडे यांनी दिली आहे.

जलवाहिनीस गळती

सोमवारी दुपारी टँकर भरण्याचे काम सुरू करण्यात आले. मात्र, पाण्याच्या जास्त दाबामुळे तिसऱ्या फलाटावर असलेली जलवाहिनी फुटली. जलवाहिनीस गळती लागल्याने पाण्याचा दाब कमी झाला. यामुळे रेल्वे भरण्यास विलंब होऊ लागला. सोमवारी स्थानकात आणलेली दहा टँकरची रेल्वे पुन्हा यार्डात नेण्यात आली. गळतीची दुरुस्ती करून पुन्हा मंगळवारी दुपारी टँकर भरण्यास प्रारंभ करण्यात आला. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत पाणी भरल्यानंतर बुधवारी रेल्वे लातूरला रवाना होईल.

हैदरखान विहिरीची स्वच्छता

रेल्वेत भरण्यात येणारे पाणी मिरजेतील ऐतिहासिक हैदरखान विहिरीत साठविण्यात येणार आहे. यासाठी विहिरीची स्वच्छता करण्यात येत आहे. विहिरीतील पाणी उपसा करून जुने पाणी बाहेर काढले जाणार आहे. त्यानंतर शुद्धीकरण केलेले पाणी सोडण्यात येणार आहे. जीवन प्राधिकरणने विहिरीतील पाण्याचे नमुने घेतले असून, ते तपासणीसाठी पाठविले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images