Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

महापालिका शाळांतील सुविधा वाढणार

$
0
0

Appasaheb.mali @timesgroup.com

महापालिका शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर शिक्षण मंडळाकडून होणाऱ्या खर्चात यावर्षी तीन हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ​महापालिकेच्या शाळेत सेमी इंग्लिश, ई लर्निंग सुविधा, विद्यार्थ्यांसाठी गणवेश, निवासी शिबिर, आंतरशालेय क्रीडा स्पर्धा अशा विविध शैक्षणिक उपक्रमांसाठी जादा बजेट निश्चित करण्यात आले आहे.

गेल्या शैक्षणिक वर्षात शिक्षणावर होणारा खर्च हा ३७ हजार रुपेय होता. यंदा शैक्षणिक उपक्रम, शिक्षकांचे वेतन व भौतिक सुविधांसाठी मिळून ४२ कोटी ८३ लाख ६८ हजार ४७० रुपये खर्च अपेक्षित आहे. प्रति विद्यार्थ्यावर होणारा सरासरी खर्च ४० हजार रुपये अपेक्षित आहे. शैक्षणिक वर्षात २५ शाळेत ई लर्निग प्रोजेक्टर पुरविण्याचा तसेच चार ठिकाणी सेमी इंग्रजी स्कूल सुरू करण्याचे नियोजन आहे.

महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीतर्फे शहरात ५९ शाळा सुरू आहेत. एकुण विद्यार्थ्यांची संख्या ९ हजार ५५१ आहे. महापालिकेच्या नेहरूनगर, जरगनगर, वीर कक्कय विद्यालय, टेंबलाईवाडी विद्यालय, फुलेवाडी विद्याल. लोणार वसाहत विद्यालय, प्रिन्स शिवाजी विद्यालय येथे सेमी इंग्रजी शिक्षणाची सुविधा आहे. सहा शाळांत ई लर्निंग सुविधा आहे. येत्या शैक्षणिक वर्षात आणखी २५ शाळांत ई लर्निंग प्रोजेक्टर पुरविण्यात येणार आहेत. विविध शाळांत २५ कम्प्युटर देण्यात येतील. सामान्य कुटुंबांतील मुलांसह नोकरदार आणि उच्चभ्रू कुटुंबातील मुलांनाही शाळांकडे आकर्षित करण्यासाठी शिक्षण समिती प्रयत्नशील आहे.

शिक्षण खर्चात तीन हजारांनी वाढ

२०१५-१६ या आर्थिक वर्षामध्ये शिक्षणावर ३६ कोटी ७९ लाख ७ हजार ३०३ रुपये खर्च झाला होता. शिक्षणासाठी खर्ची पडलेली एकूण रक्कम आणि विद्यार्थी संख्या पाहता सरासरी प्रति विद्यार्थ्यावर ३७,००० रुपये खर्च झाला. यावर्षी प्रशासनाने शिक्षणावर होणाऱ्या खर्चासाठी ४२ कोटी ८३ लाख ६८ हजार ४७० रुपयांची तरतूद केली. शिक्षणासाठीचे बजेट आणि विद्यार्थीसंख्या पाहिली तर प्रत्येक विद्यार्थ्यासाठी सरासरी ४० हजार रुपये खर्च होणार आहे. दरम्यान, महापालिका शाळेतील विद्यार्थ्याचे एकत्रित सांस्कृतिक कार्यक्रम, चार दिवस नि​वासी​ शिबिराचे आयोजन होणार आहे. २६ जानेवारी २०१७ रोजी सांस्कृतिक कार्यक्रम होईल. विद्यार्थ्यांसाठी आंतरशालेय क्रीडा स्पर्धा भरविण्यात येणार आहे. शिक्षकांना तज्ज्ञ शिक्षकांमार्फत प्रशिक्षण देण्याचेही नियोजन आहे.

चार सेमी इंग्लिश स्कूल

येत्या जून महिन्यापासून महापालिकेच्या आणखी चार शाळेत सेमी इंग्रजी स्कूल सुरू होतील. यात भाऊसाहेब महागावकर विद्यालय, पद्माराजे विद्यालय, बॅरीस्टर बाळासाहेब खर्डेकर विद्यालय आणि संभाजी विद्यालय, संभाजीनगर येथे सेमी इंग्रजी सुरू करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाला आहे.

मुलांना अधिकाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न असल्याने यंदा पहिलीचा पट निश्चित वाढेल. विद्यार्थ्याना वैयक्तिक मार्गदर्शन केले जाते. सर्व स्तरावर सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. शाळा सक्षम बनत आहेत. कमकुवत शाळांची संख्या मोजकी राहिली आहे. त्यांनाही सक्षम बनवून सर्वच शाळांचा दर्जा उंचाविण्याचे नियोजन आहे.

प्रतिभा सुर्वे, प्रशासनाधिकारी, प्राथमिक शिक्षण समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महिला जिवंत झाली आणि तारांबळ उडाली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीकडे नेत असताना तिरडीवरील महिला जिवंत असल्याचे लक्षात आल्याने कुडित्रे (ता. करवीर) येथे शुक्रवारी खळबळ उडाली. या महिलेला तातडीने सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल करण्यात असून अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. ​वनिता पांडुरंग भास्कर (वय ५५) असे या महिलेचे नाव आहे.

भास्कर यांचा मुलगा अमित याने याबाबत माहिती दिली. अमित आणि त्यांची आई वनिता हे दोघे मोटारसायकलवरून गुरुवारी दुपारी पाचल (ता. राजापूर) या गावी गेले होते. पाचल गावात स्पीडब्रेकवरून मोटारसायकल घसरल्याने वनिता रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाल्या. त्यांना गावातील धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्यांना रत्नागिरी अथवा कोल्हापुरात उपचारासाठी नेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार नातेवाईकांनी वनिता यांना कोल्हापुरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल केले. मात्र त्यांच्या मेंदूला सूज आली होती. शुक्रवारी सकाळपासून त्यांचा रक्तदाबही कमी झाला. नाडी लागत नसल्याने डॉक्टरांच्या सल्लानंतर भास्कर कुटुंबियांनी वनिता यांना घरी नेण्याचा निर्णय घेतला. हॉस्पिटलच्या रुग्णवाहिकेतून कुडित्रे गावात परतत असताना वनिता यांनी, दोनदा मोठे आचके दिले. त्यांच्या शरीराची हालचाल बंद झाल्याचे नातेवाईकांच्या लक्षात आले.

कुडित्रे गावात रुग्णवाहिका आल्यावर गावातील नातेवाईकांनी त्या मृत झाल्याचे असे समजून शोक करण्यास सुरुवात केली. जवळच्या अन्य पाहुण्यांना निरोप देण्यात आले. त्यानंतर अंत्यसंस्काराची तयारी सुरू झाली. वनिता यांना गरम पाण्याने आंघोळ घालून तिरडीवर बांधण्यात आले. अंगावर गुलालही टाकण्यात आला. त्यानंतर अंत्यसंस्कारासाठी त्यांना तिरडीवरून स्मशानभूमीकडे नेत असताना रस्त्यातच तिरडीवर वनिता यांच्या श्वासोश्वासाचा आवाज येऊ लागला. त्यामुळे तिरडी जमिनीवर ठेवण्यात आली. शरीराची हालचाल सुरू झाल्याने वनिता जिवंत असल्याचे लक्षात आल्यावर खळबळ उडाली. त्यांना सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल केले. सध्या अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सीपीआर पोलिस याची नोंद झाली आहे.

दुःख... आनंद आ​णि हुरहूर

वनिता यांचे निधन झाल्याचे समजून भास्कर कुटुंबिय दुःखात बुडाले होते. मात्र त्या जिवंत असल्याचे लक्षात आल्यावर कुटुंबियांना आनंद झाला. सीपीआर हॉस्पिटलमध्ये त्यांना पुन्हा अतिदक्षता विभागात हलविम्यात आले. त्यांच्या तब्येतीच्या काळजीने भास्कर कुटुंबायांना अस्वस्थ केल्याचे सीपीआरमध्ये दिसून येत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंबाबाईच्या शालूचा लिलाव पुन्हा तहकूब

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

करवीर निवासिनी श्री अंबाबाईला तिरुपती देवस्थानकडून दसऱ्यासाठी आलेल्या शालूचा लिलाव पुन्हा तहकूब करण्याची वेळ देवस्थान समितीवर आली. गेले चार महिने प्रलंबित असलेली लिलाव प्रक्रिया शुक्रवारी मंदिरात पार पडली. मात्र, शालूला सरकारी अपेक्षित रक्कम न आल्याने लिलाव तहकूब करण्यात आला.

शुक्रवारी दुपारी एक वाजता मंदिरात लिलावाला सुरुवात झाली. अंबाबाईला तिरुपती देवस्थानकडून आलेल्या शालूची मूळ रक्कम ७५ हजार रुपये आहे. मात्र, देवस्थान समितीने शालूचा सरकारी सवाल ४ लाख २० हजार सांगितला. त्यावेळी प्रथम इचलकरंजीचे राम आडके यांनी २५ हजारपासून लिलावास सुरुवात केली. त्यानंतर प्रदीप देसाई यांनी ३० हजार, सुभाष आमासे यांनी ५१ हजार, राजेंद्र बुढे यांनी ५५ हजार, प्रभाकर पाटील यांनी ६६ हजार आणि राजेंद्र बुढे यांनी ७२ हजार रुपयांची अखेरची बोली लावली. मात्र, सरकारी सवाल ४ लाख २० हजार असल्यामुळे अपेक्षित रक्कम न आल्याने चार महिन्यांनी घेतलेला लिलाव पुन्हा तहकूब केला.

गेल्या तीन वर्षांत शालूच्या लिलावामधून जी रक्कम मिळते त्याची सरासरी काढून मूळ बोलीची रक्कम ठरवली जाते. त्या नियमानुसार यावर्षी पाच लाख ४७ हजार इतकी रक्कम मूळ बोली म्हणून निश्चित करण्यात आली होती. मात्र ही मूळ बोली जास्त असल्यामुळे अनेक भाविकांनी बोली लावली नाही. याचबरोबर शालू लिलावासंदर्भात ऑनलाइन जाहिरातही देण्यात आली होती. त्यालाही प्रतिसाद मिळाला नसल्याचे सहसचिव एस. एस. साळवे यांनी सांगितले.

देवस्थान समितीचे व्यवस्थापक धनाजी जाधव, सदस्या संगीता खाडे, प्रमोद पाटील, बी. एन. पाटील, सुदेश देशपांडे आदी उपस्थित होते.

दुसऱ्यांदा घेण्यात आलेल्या लिलावाला अपेक्षित रक्कम न आल्याने लिलाव तहकूब करण्यात आला. यासंदर्भात पुढील निर्णय समितीच्या सभेत घेण्यात येणार आहे. गेल्या तीन वर्षात शालूच्या लिलावामधून जी रक्कम मिळते त्याची सरासरी काढून मूळ बोलीची रक्कम ठरवण्यात आली आहे, यंदाही त्याला मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही.

शुभांगी साठे, सचिव, देवस्थान समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कळंबा तलावात सापडला अडीचशे वर्षांपूर्वीचा पाट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कळंबा तलावात गाळ काढत असताना अडीचशे वर्षापूर्वीचा दगडी पाट आढळून आला आहे. या पाटाव्दारे कात्यायणी डोंगरातील स्वच्छ पाणी थेट अंबाबाई मंदिर परिसरातील हौद व विहिरीत आणले जात होते, अशी माहिती पुढे आली आहे.

गेल्यावर्षी कमी पाऊस पडल्याने कळंबा तलाव पूर्ण क्षमतेने भरला नाही. डिसेंबर २०१५ मध्ये कळंबा तलावाच्या पाण्याची पातळी झपाट्याने कमी झाली. कळंबा तलावाच्या इतिहासात पहिल्यांदाच हा तलाव कोरडा पडला आहे. या कोरड्या पडलेल्या तलावाची खोली वाढवण्यासाठी जलसंपदा विभागाच्यावतीने तलावातील गाळ काढण्याचे काम गेले महिनाभर सुरू केले आहे. शनिवारी गाळ काढत असताना दहा फूट खोलीवर हा दगडी पाट आढळला. ही घटना कळताच नागरिकांनी पाट पाहण्यासाठी गर्दी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिरजेत नववधू तोडणारमंदिराच्या गाभाऱ्याचे कुलूप

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, कुपवाड
मिरज तालुक्यातील टाकळी गावातील चौदा तरुणांनी आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह केले आहेत. परंतु, लग्न करून आलेल्या वधूंना त्या अन्य जातीच्या असल्याने गावातील मंदिर ट्रस्टींनी त्यांना मंदिरात प्रवेश नाकारला आहे. मंगळवारी (दि. १२) सर्व जोडप्यांचा सत्कार करून मंदिराच्या गाभाऱ्याला लावलेले टाळे तोडून त्या नववधू गाभाऱ्यात प्रवेश करतील, असा इशारा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने डॉ. प्रदीप पाटील यांनी दिला. संपूर्ण गाव त्या चौदा तरुणांच्या बाजूने उभा आहे.
मिरज तालुक्यातील टाकळी येथील पुरोगामी जैन संघटना आणि वीर सेवा दलाच्या सहकार्याने अंनिसने आंतरधर्मीय, आंतरजातीय लग्ने करून आदर्श निर्माण करणाऱ्याया जोडप्यांचा १२ एप्रिल रोजी गावात सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमास जिल्हाधिकारी शेखर गायकवाड आणि संस्कृती आणि ज्येष्ठ साहित्यिका तारा भवाळकर उपस्थित राहणार आहेत.
पुरोगामी महाराष्ट्राच्या आणि सरकारच्या धोरणाशी सुसंगत असे हे पाउल उचलणाऱ्या युवा पिढीचा योग्य सन्मान होणे आवश्यक आहे. त्यांना साथ देणाऱ्यांचाही या वेळी सत्कार होणार आहे. या कार्यक्रमाला संपूर्ण गावाचा पाठिंबा आहे. परंतु, गावातील मंदिर ट्रस्टींनी संबधित वधूना गेल्या वर्षभरापासून मंदिर प्रवेश नाकारुन आडमुठी भूमिका घेतली आहे. त्या सर्व वरांना मंदिरात प्रवेश आहे. पण, वधूना नाही. या संदर्भात अंनिसने गावात बैठक घेतली. पण, ते ट्रस्टी बैठकीकडे फिरकले नाहीत. उलट त्या अन्य जातीच्या स्त्रिया मंदिरात प्रवेश करतील म्हणून गाभाऱ्याला टाळे लावले आहेत. भगवान महावीरांनी जाती व्यवस्थेला कधीच थारा दिलेला नाही. त्यामुळे त्यांच्या मंदिरात प्रवेश नाकारणारे महावीरांच्या तत्वज्ञानाचा एक प्रकारे पराभवच करीत आहेत. या बाबतीत जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करण्यात आली आहे. त्यांनी योग्य तो मार्ग काढून त्या महिलांना कायद्यानुसार प्रवेश द्यावा. अन्यथा सत्कार समारंभानंतर त्यापैकी काही वधू मंदिराचे टाळे तोडून मंदिरात प्रवेश करतील. मंदिर प्रवेश महत्वाचा नाही तर जातीय आणि स्त्री-पुरुष भेदाभेद नष्ट करणे हाच अंनिसचा हेतू असल्याचेही डॉ. पाटील यांनी या वेळी स्पष्ट केले. या वेळी पुरोगामी संघटनेचे बाळासाहेब पाटील, अंनिसच्या ज्योती अदाटे, अ‍ॅड. चंद्रकांत शिंदे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वेचे टँकर आज मिरजेत येणार

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, मिरज
राजस्थानमधील कोटा येथून निघालेले रेल्वेचे टँकर आज (रविवार) मिरजेत दाखल होत आहेत. रविवार सायंकाळपासून टँकरमध्ये पाणी भरण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. टँकर भरताच लातूरला पाणी रवाना होईल, अशी माहिती भाजप नेते मकरंद देशपांडे यांनी दिली आहे. रेल्वेच्या नियोजनासाठी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी मिरजेत दाखल झाले आहेत.
दरम्यान, जिल्हा प्रशासनाने शनिवारी रेल्वेच्या जलशुद्धीकरण केंद्रापासून रेल्वे यार्डापर्यंतच्या सुमारे अडीच किलोमीटर लांबीच्या जलवाहिनीच्या कामास सुरुवात केली. या वेळी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी, रेल्वेचे स्थानक अधीक्षक व्ही. एस. रमेश, मकरंद देशपांडे उपस्थित होते.
सुमारे १ कोटी ८० लाख रुपये खर्चून रेल्वेच्या टँकरमध्ये पाणी भरण्यासाठी आवश्यक असणारी जलवाहिनी टाकली जात आहे. रेल्वेचे पुणे विभागीय व्यवस्थापक व वरिष्ठ परिचालन व्यवस्थापक मिरजेत दाखल झाले असून, लातूरला रेल्वे पाठविण्याबाबत नियोजन सुरू आहे. रविवारी पहाटे अथवा सकाळी लवकर मिरज रेल्वे स्थानकात रेल्वेचे टँकर दाखल होतील. जलवाहिनीचे काम पूर्ण होईपर्यंत रेल्वे स्थानकातील पहिल्या तीन फलाटांवर असलेल्या जलवाहिन्यांमधून टँकर भरण्याचे काम रविवापासूनच सुरू होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औषध घोटाळ्याचाआकडा खूप मोठाधनंजय मुंडे यांचा दावा

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर
'फडणवीस सरकारचा नुकताच बाहेर आलेला औषध घोटाळा २९७ कोटींहून खूप मोठा आहे. जूनमध्ये चिक्की घोटाळ्याच्या वेळीच हा औषध घोटाळा आम्ही बाहेर काढला होता. पुरावे सादर करूनही मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांना क्लीन चिट दिली होती. आता मात्र, संबधितांवर कारवाई केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही,' असा इशारा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे यांनी दिला आहे.
अधिवेशन सुरू असल्याने जास्त बोलत येत नाही. गरज नसणारी औषधे खरेदी केली गेली. जी आवश्यक आहेत, ती खूप चढ्या भावाने घेण्यात आली आहेत. या खरेदीत मंत्र्यांनी आदेश दिले की, अधिकाऱ्यांनी खरेदी केले याचे सर्व पुरावे अधिवेशनात सादर केले जाणार आहेत, असेही मुंढे म्हणाले.
डोक्यात सत्तेची मस्ती
विधिमंडळात तारांकित प्रश्न विचारण्याच्या मुद्द्यावर खुद्द एका मंत्र्यानेच सदस्याला धमकी दिल्याचे प्रकरण ताजे आहे. कॉँग्रेस आमदार अग्रवाल यांना थेट पत्रकार परिषदेत जावून मारहाण करण्याचा प्रकार निंदनीय आहे. भाजप कार्यकर्त्यांच्या डोक्यात सत्तेची मस्ती गेली आहे. मुख्यमंत्र्यांनी अशा मनोवृत्तीला वेळीच आवर न घातल्यास राज्यातील जनता भाजपला पायाखाली घेतल्याशिवाय राहणार नाही, असेही मुंढे म्हणाले.
दारू, बियर शीतपेयाचे कारखाने बंद करा
सध्या राज्यावर जलसंकट आहे. सरकारने ही परिस्थिती सुरुवातीपासून गाभीर्याने घेतलेली नाही. अशा टंचाईच्या काळात मराठवाड्यातील सर्व दारूचे, बियर आणि शीतपेयाचे कारखाने बंद करावेत. त्यांना देण्यात येणारे पाणी सामान्यांसाठी वापरावे. आयपीएलचे सामने मराठवाड्यात खेळवले जात नाहीत. त्यासाठी लागणारे पाणी जर मराठवाड्याला देणार असाल तरच सामने बंद करा. मात्र, उगाच आयपीएलच्या सामन्याचा मुद्दा काढून मूळ पाणीटंचाईचा मुद्दा बाजूला करू नका, असेही मुंडे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोलापूरसाठी उजनी धरणातूनभीमा नदीत पाणी सोडले

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सोलापूर
सोलापूरसाठी उजनी धरणातून भीमा नदीत सहा हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. उजनी धरण सध्या वजा ३२ टक्के पाणीसाठा आहे. सोडलेले पाणी १८ एप्रिल रोजी औज बंधाऱ्याच पोहोचणार आहे.
सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या औज बंधाऱ्यातील पाणी पातळी खालावली आहे. केवळ चार दिवस पुरेल इतकाच पाणीसाठी शिल्लक होता. शहरावर जलसंकट येऊ नये म्हणून जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांची मुंबईत मागील आठवड्यात पाणी सोडण्याबाबत बैठक झाली होती त्यानुसार साडेचार ते पाच टीएमसी पाणी सोडण्याचे ठरले होते. त्यानुसार सहा हजार क्युसेकने उजनी धरणातून पाणी सोडले जात आहे.
औज, चिंचपूर भरून घेणार
औज बंधारा साडेचार मीटरने भरून घेण्यात येणार आहे. चिंचपूर बंधाराही भरून घेण्यात येणार आहे. सोडण्यात आलेले पाणी भीमा नदीपात्रातील एकूण १९ बंधारे पार करून औज बंधाऱ्यात पोहोचणार आहे. शहरासाठी यंदाच्या उन्हाळ्यात उजनीतून सोडण्यात येणारे हे शेवटचेच आवर्तन आहे.
एनटीपीसीकडून निराशा
सोलापूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी एनटीपीसीच्या जलवाहिनीचा पर्याय मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुचविला होता. मार्चअखेर जलवाहिनीचे काम पूर्ण करण्याचे आदेशही देण्यात आले होते. परंतु, तांत्रिक अडचणींमुळे मार्चपर्यंत पाणी मिळाले नाही. शिवाय एनटीपीसीच्या अधिकाऱ्यांनी नवीन जलवाहिनीमधून पाणीपुरवठा करण्याबाबत हात वर केल्यामुळे या उन्हाळ्यात एनटीपीसीच्या जलवाहिनीतून पाणीपुरवठा होणे शक्य नाही.
सोळा ठिकाणी गळती सुरूच
उजनी-सोलापूर या शंभर किलोमीटर लांबीच्या जलवाहिनीला एकूण २६ ठिकाणी गळती लागली आहे. सुमारे दोन दशलक्ष लीटर पाणी वाया जात आहे. या सर्व गळत्या दुरुस्तीचे काम महापालिकेने युद्धपातळीवर हाती घेतले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एकात्मवादी भूमिकानिर्माण होणे जरुरीचेप्रा. शमसुद्दीन तांबोळींना महर्षी शिंदे पुरस्कार प्रदान

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सातारा
'माणूसपण आणि विधायक सामर्थ्य व शक्तींना पुढे नेण्याचे काम महर्षी विठ्ठल रामजी शिंदे व रा. ना. चव्हाणांनी केले. हे दोन मानदंड संपूर्ण देशात सकलजन समन्वयक भूमिका देणारे मानदंड ठरले आहेत. सनातनवादी विद्वानांना झोडण्याचे काम वाईत झाले. अगदी भटा-ब्राह्मणांच्या विरोधातही रा. नां. चे लेखन होते. आज एकात्मवादी भूमिका निर्माण होणे जरुरीचे आहे,' असे मत डॉ. श्रीपाल सबनीस यांनी काढले.
वाई येथील रा. ना. चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार कृतीशील विचारवंत आणि विधायक कार्यकर्ता प्रा. शमसुद्दीन तांबोळी यांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांचे हस्ते व सामाजिक कार्यकर्तें डॉ. बाबा आढाव यांचे अध्यक्षतेखाली प्रदान करण्यात आला. शाल, पुष्पगुमछ, सन्मानचिन्ह, असे या पुरस्काराचे स्वरुप होते. या वेळी सबनीस बोलत होते. संभाजीराव पाटणे, डॉ. नागनाथ कोतापल्ले, डॉ. अरुण शिंदे, प्रा. अभयकुमार साळुंखे, प्रा. डॉ. सुनीलकुमार कुरणे आदी उपस्थित होते.
प्रा. शमसुद्दीन तांबोळी म्हणाले, 'मी वैयक्तिक नव्हे तर मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे वतीने हा पुरस्कार स्वीकारत आहे. हा विचार पुढे नेण्याचा पाईक आहे. हमीद दलवाईंनी सुरू केलेल्या चळवळीला आता मूर्त स्वरूप येत आहे. लवकरच आम्ही मंडळाचा सुवर्णमहोत्सव साजरा करीत आहोत. १९७०पासून आम्ही अनेक जण मुस्लिम समाजातील वाईट प्रथा, तसेच रुढी बंद करण्यासाठी झटत आहोत. मात्र त्याला अपेक्षित असे यश येत नाही. आज समाजात ओवेसी सारखी मानसिकता वाढत आहे. भारत माता की जय म्हणणार नाही, असे म्हणाणारा एकही भारतीय मुस्लिम नाही. कारण ही घोषणा देणे म्हणजे सांस्कृतिक आणि सामजिक वातावरणाचा संबध असणारी गोष्ट आहे. जय म्हणण्यासाठी सक्ती नसावी आणि अशी जबरदस्ती असणारी मानसिकताही आम्हाला मान्य नाही. मरतानाही मुस्लिम हा जय म्हणणाराच आहे. केवळ अशा घोषणा देऊन वाद वाढविला जात आहे. आज मिळालेला पुरस्कार हा मी विचारांचा गौरव समजतो. मुस्लिमांमधील कालबाह्य परंपरा दूर करण्यासाठी आम्ही काही जण धडपडत आहोत. चेहरा बदलताना पर्यायी उपक्रम देत आहोत. बकरी ईदला कुर्बानी टाळून रक्तदान करीत आहोत. आज होणाऱ्या दंगली या जातीय व धार्मिक विषमतेमधून होत आहेत. आजची मुल्लाची जबान ही अल्लाची जबान नाही. रमझान महिन्यात दहा कोटी लोक कुराण पठण करूनही इस्लामचा खरा अर्थ जाणू शकत नाहीत याचे वाईट वाटते. यासाठी विवेकवादी दृष्टीकोन व उपाय महत्त्वाचा आहे. संविधान हाच भारतीयांचा धर्म असेल, आणि आत्मचिकित्सा केली तरच समाज सुधारू शकतो.'
या कार्यक्रमात रमेश चव्हाण संपादित मराठी साहित्य, समाज आणि संस्कृती या रा. ना. चव्हाण यांच्या लेख संकलनाच्या प्रथम आवृत्तीचे प्रकाशन डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या हस्ते झाले. डॉ. सुनीलकुमार कुरणे यांच्या रा. ना. चव्हाण यांचे सामाजिक व राजकीय विचार या पीएचडी. प्रबंधाचे ग्रंथरूपातील प्रकाशन प्रा. अभयकुमार साळुंखे यांच्या हस्ते झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळाशी एकत्र सामना करू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळात होरपळत आहे, अशा बिकट परिस्थितीत सत्ताधारी आणि विरोधक यांनी जोपर्यंत महाराष्ट्रातील दुष्काळ हटत नाही तोपर्यंत एकत्र मिळून निर्णय घेतले पाहिजेत,' असे आवाहन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. हमीदवाडा (ता. कागल) येथील सदाशिवराव मंडलिक सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर दिवंगत लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांच्या पूर्णाकृती पुतळा अनावरण व प्रेरणास्थळाच्या उद्घाटनप्रसंगी आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज होते. यावेळी ठाकरे यांच्या हस्ते कळ दाबून पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.

ठाकरे म्हणाले, 'शेतकऱ्याला स्वास्थ्य देणारी आजी-माजी मंडळी व्यासपीठावर आहेत. मग शेतकऱ्यांच्या अपेक्षा का पूर्ण होऊ शकत नाहीत. शेतकरी अजूनही अस्वस्थच आहे. ज्यावेळी निसर्ग कोपतो त्यावेळी जनतेला खरी आशा असते ती सरकारकडूनच, म्हणूनच दुष्काळ परिस्थितीत माझे सरकार स्वस्थ बसलेय असे मी म्हणत नाही. मात्र, अशा परिस्थितीत तुम्ही-आम्ही काय केले असे म्हणत बसण्यापेक्षा सर्वांनी मिळूनच काम केले पाहिजे. व्यक्ती जिवंत असतांना त्याचे मोठपण कळत नाही, पण अनुभवसंपन्न कर्तत्वान माणूस जेव्हा निघून जातो त्यावेळी त्याचे मोल कळते. वेळप्रसंगी नेत्यालाही खडेबोल सुनावण्याची क्षमता मंडलिकांमध्ये होती. मंडलिकांनी संजयची जबाबदारी माझ्या खांद्यावर दिली आहे. ती विश्वासघात न करता मी पाळणार आहे.'

खासदार राजू शेट्टी म्हणाले, 'साखर उद्योगाला शिस्त, शेतकऱ्याला न्याय आणि साखर कारखानदारीही टिकली पाहिजे यासाठी दिवंगत मंडलिक नेहमी आग्रही राहिले. जे जुन्या सरकारला जमले नाही, ते आताच्या सरकाने करून दाखवत ४०लाख टन साखर निर्यात केली व अनुदानही दिले. राज्यात ऊस किती आहे. त्यापासून साखर किती मिळणार हे सगळ्यांना माहीत असते. मग एका महिन्यात १९०० रुपये असणारा साखरेचा दर तीन महिन्यात ३८०० रुपये होतो, हे गणित अजूनही कळालेले नाही. यासाठी चंद्रकांतदादांनी साखरेच्या साठेबाजांच्या मुसक्या आवळाव्यात.'

डॉ. पंतगराव कदम म्हणाले, 'महाराष्ट्रात दुष्काळाची वाईट स्थिती असताना शिवसेना त्यांच्यापरीने लढत आहे. परंतु सरकार काय हालताना दिसत नाही. यासाठी दुष्काळ गांभीर्याने घेऊन निर्णय घ्यावेत. सहकारमंत्र्यांचा प्रशासक नेमण्याचा धडाका सुरू आहे. परंतु राजू शेट्टी जर त्यांचे सरकार चांगले चालले आहे असे म्हणत असतील तर उपस्थितांमधील एकानेही त्यांच्या विधानावर टाळी का वाजवली

नाही?'

यावेळी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, ज्येष्ठ पत्रकार प्रतापसिंह जाधव यांचीही भाषणे झाली.

कार्यक्रमास आमदार हसन मुश्रीफ, राजेश शिरसागर, सुरेश हाळवणकर, चंद्रदीप नरके, सुजित मिणचेकर, संध्यादेवी कुपेकर, समरजितसिंह घाटगे, संजय घाटगे, सतेज पाटील, प्रकाश आबिटकर, सत्यजित पाटील, कल्लाप्पाआण्णा आवाडे, जिल्हा परिषद अध्यक्ष विमल पाटील, महापौर अश्विनी रामाणे, निवेदता माने, संजय पवार, विजय देवणे, बजरंग देसाई, काकासाहेब पाटील, सुभाष जोशी, सभापती श्रीकांत लोहार, उत्तम कांबळे आदी प्रमुख उपस्थित होते. प्रा. संजय मंडलिक यांनी स्वागत केले. बाबगोंडा पाटील यांनी आभार

मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रा. संजय मंडलिकांना खासदार करू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'मी कोणत्याही पक्षाचा नाही. गतनिवडणुकीत आम्ही तुम्हाला मदत केली नाही. पण यावेळी मात्र तुम्हाला मदत करणार, तुम्हाला खासदार करणार,' अशी ग्वाही बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांनी प्रा. संजय मंडलिक यांना दिली. पाटील यांच्या ग्वाहीनंतर व्यासपीठावरील उपस्थित त्यांचे पुत्र आमदार सतेज पाटील यांनी खळखळून हासत दाद दिली. मेळाव्यातील प्रमुख नेत्यांच्या भाषणाचा सूर मंडलिकांच्या खासदारकीच्या निवडणुकीवर फिरला.

लोकसभा निवडणुकीत सतेज पाटील यांनी त्यांचे राजकीय विरोधक धनंजय महाडिक यांना मदत केली होती, तर विधानसभा निवडणुकीत सतेज पाटील विरोधातील महाडिक गट, विधान परिषदेच्या निवडणुकीत पुन्हा पाटील व महाडिक गट एकमेकांच्या पुढे ठाकले होते. या पार्श्वभूमीर डी.वाय. पाटील यांनी थेट संजय मंडलिक यांना पाठिंबा दिल्याने लोकसभा निवडणुकीच्या पाठिंब्याची चर्चा सुरू झाली आहे.

प्रास्ताविकात प्रा. संजय मंडलिक यांनी दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिकांच्या आठवणींना उजाळा दिला. निवडणुकीत पक्षीय अभिनिवेश असावा, पण निवडणूक संपल्यानंतर जिल्ह्याचे सर्वपक्षीय नेते एकत्र आले पाहिजेत, अशी मंडलिकांची भूमिका होती, असे सांगून त्यांनी भाषणात हसन मुश्रीफ यांचाही विशेष उल्लेख केला. खासदार राजू शेट्टी यांनी २०१४ च्या निवडणुकीत गोपीनाथ मुंडे व उद्धव ठाकरे यांनी सदाशिवराव मंडलिकांकडे संजय मंडलिकांना निवडणूक लढवण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी विनंती केली होती. त्यांनी ती विनंती मान्य केली होती, पण आमचे गणित अवघ्या थोडक्या मतांनी चुकले अशी खंत व्यक्त केली.

आमदार पतंगराव कदम म्हणाले, 'लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या 'तुमचे ते तुमचे, आमचे ते आमचे' या भूमिकेमुळे मंडलिक काँग्रेसचे सहयोगी सदस्य असताना शेवटच्या काळात अन्याय केला. मंडलिक व मुश्रीफ या गुरू-शिष्यातील वाद प्रामाणिकपणाचे मिटवण्याचाही प्रयत्न केला, पण मला यश आले नाही. '

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही २०१९ मध्ये खासदार होणारे संजय मंडलिक असा उल्लेख केला. ठाकरे म्हणाले, 'संजय मंडलिकांना खासदार करण्यात कार्यकर्त्यांचे थोडे प्रेम कमी पडले. सदाशिवराव मंडलिक कधी पराभवाने खचून गेले नाहीत त्याप्रमाणे संजय मंडलिकही खचून जाणार नाहीत. त्यांची जबाबदारी आपण घेतली आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माओवादी चळवळीला सध्या जोर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'जेएनयूमध्ये चांगले प्राध्यापक व विद्यार्थी आहेत. मात्र, काही विद्यार्थी आणि प्राध्यापक अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या जोरावर देशविरोधी भूमिका घेत आहेत. राजद्रोही भूमिका घेतली जात असल्याने नक्षलवादी, माओवादी चळवळींना जोर चढत असून त्यातून 'हेट इंडिया ब्रिगेड' उघड झाली आहे. वाढणारी वृत्ती धोकादायक असून देश जोडण्याचा रामसेतू बांधून देशाला पुढे घेऊन जायचे आहे. देशद्रोही कारवाया करणारे किरकोळ आहेत, आपण लाख असल्याने संघर्ष अटळ आहे,' असे मत अॅड. मोनिका अरोरा यांनी व्यक्त केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. के. बी. हेडगेवार स्मृती व्याख्यानमालेत 'जेएनयू वास्तव' या विषयावर पहिले पुष्प गुंफताना त्या बोलत होत्या. शाहू स्मारक भवन येथे झालेल्या व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते सुभाष वोरा होते.

अॅड. अरोरा म्हणाल्या, 'जेएनयूमध्ये इतिहासाच्या अभ्यासक्रमातून रामायणाची विकृत मांडणी केली जात होती. यावेळी न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाने शैक्षणिक क्षेत्रात हस्तक्षेप करणार नसल्याचे सांगितले होते. मात्र, अॅकॅडमीक कौन्सिलमध्ये भूमिका मांडून अभ्यासक्रमात हा विषय हद्दपार केल्यानंतर अभिव्यक्ती स्वातंत्र्य संकटात असल्याचा डांगोरा पिटला होता. २०१० पासून जेएनयूमध्ये सातत्याने अशा कारवाया घडत आहेत.

अफझल गुरू, मुकबूल भट्ट यांच्या स्मृतिदिन साजरा करताना त्यांची न्यायिक हत्या झाल्याचे फोस्टर झळकवले होते. प्रशासनाने अशी पोस्टरवर कारवाई केल्यानंतर अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली विद्यार्थ्यांनी कार्यक्रम केले. यावेळी दिलेल्या भारतविरोधी

घोषणांचे सात व्हिडीओ चित्रणामध्ये स्पष्ट दिसत आहे.'

त्या पुढे म्हणाल्या, '२२ दिवसांच्या तुरुंगवासानंतर कन्हैय्या बाहेर आल्यानंतर त्यांचे वर्तन भगतसिंगांसारखे होते. मात्र न्यायालयाने २२ पानी जामीन निकालामध्ये न्यायालयाने कठोर ताशेरे ओढले आहेत. 'जीव धोक्यात घालून सैनिक प्राणपणे सीमेवर तैनात असतात, त्यामुळेच जेएनयूमध्ये घोषणा देऊ शकता असे ताशेरे ओढल्याचे अॅड. अरोरा यांनी सांगितले.

सूत्रसंचालन सीमा मकोटे यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्य सरकार नालायक : उद्धव ठाकरे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'जनतेने ज्या आशेने आणि अपेक्षेने केंद्रातील आणि राज्यातील सरकार बदलले, त्या आशा आणि अपेक्षा फोल ठरल्या आहेत. जनतेला पुन्हा आधीच्याच सरकारची आठवण येत असेल, तर आपण नालायक आहोत. याशिवाय दुसरा शब्द मला सुचत नाही. जनतेची भावना मी बोलतो आहे,' या शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी मोदी आणि फडणवीस सरकारांवर हल्लाबोल केला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी शुक्रवारी मुंबईच्या सभेत राज्य सरकारचा समाचार घेतला होता. गेले काही दिवस काँग्रेससह घटक पक्षही सरकारवर टीका करीत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रात आणि राज्यात सत्तेत भागीदार असलेल्या शिवसेनाही सरकारवर हल्ला करीत असते. उद्धव ठाकरे यांनी शनिवारी पुन्हा एकदा हल्ला चढवून भाजपला लक्ष्य केले.

कागल तालुक्यातील हमीदवाडा साखर कारखाना कार्यस्थळावर संस्थापक, खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या पुतळ्याचे अनावरण ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी आयोजित सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती होते.

'सरकार शिवसेनेचे आहे असे म्हणत असाल, तर माझ्या सरकारमध्ये कुणी अस्वस्थ असता कामा नये,' अशी अपेक्षा व्यक्त करून ठाकरे म्हणाले, 'मी सरकारच्या कामांवर लक्ष ठेवणारच. डोक्यावर सरकारने छप्पर उभारावे ही शेतकऱ्यांची भावना वावगी नाही. तो अस्वस्थ आहे. खासदार मंडलिक एकटे असताना ते दूधगंगेचे पाणी वेदगंगेत आणू शकले, मग आपण सारे एकवटलो तर शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या पूर्ण करू शकतो. मी नुसती आदळआपट करत नाही. शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. आम्ही काय सोडवले, तुम्ही काय सोडवले याचा विचार करण्याची ही वेळ नाही. राबराब राबणारा शेतकरी भीक मागत नाही. दरोडखोरी करत नाही तर तो कष्टाचे पैसे मागतो आहे. निसर्ग कोपतो तेव्हा त्याची आशा सरकारवर असते. राजर्षी शाहू महाराजांनी दुष्काळात गावोगावी घोड्यावरून भेट देऊन जागेवर शेतकऱ्यांना मदत देण्याचे आदेश दिले. शाहू महाराजांची परंपरा लाभलेला या महाराष्ट्रात दुष्काळ पडला असताना सरकार स्वस्थ बसले आहे, असे कुणीही म्हणत नाही. पण, सर्वांनी मिळून दुष्काळाचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.'

'दुष्काळ हटवा'

'आम्ही कुठे कमी पडलो. तुम्ही कुठे कमी पडलात, याची चर्चा न करता विरोधाची दरी कमी करून दुष्काळ हटवण्यासाठी एकत्रित प्रयत्न केले पाहिजे. तुमचे अधिकार काय होते, आमचे अधिकार काय होते, याची चर्चा करून जनतेचे समाधान होणार नाही. सराफ बाजार बंद असल्याने त्यावर अवलंबून असलेल्या लाखो कामगारांच्या चुली बंद आहेत. शेतकऱ्यांच्या चुलीबरोबर त्यांच्याही चुली पेटल्या तर ते सरकारला दुवा देतील,' असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

'हा उद्धव यांचा बाणा'

भाजपचे नेते, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील हे देखील या कार्यक्रमात उपस्थित होते. उद्धव यांच्या भाषणाआधी त्यांनी भाषण केले. 'सरकार जिथे चुकते तिथे उद्धव ठाकरे आम्हाला सांगतात. हा त्यांचा बाणा आहे. सरकारमध्ये त्यांचे स्थान मोठे आहे,' असा आदरार्थी उल्लेख त्यांनी केला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांगलीत अडीच लाख जनता तहानलेली

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, मिरज
सांगली जिल्ह्यातील ९६ गावे आणि ७७९ वाड्यावस्त्यांवरील सुमारे अडीच लाख नागरिकांना सरकारी टँकरवर आपली तहान भागवावी लागत आहे. उन्हाच्या वाढत्या चटक्यांमुळे टंचाईग्रस्त नागरिकांची संख्या साडेतीन लाख लाखांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील दोन महिने दुष्काळी पट्ट्यातील तालुक्यांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावण्याची शक्यता आहे.
मिरज पूर्वभाग, तासगाव, जत, कवठे महांकाळ, खानापूर, कडेगाव, आटपाडी भागाला भीषण दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. ताकारी, म्हैसाळ, आणि टेंभू उपसा सिंचन योजनांच्या आवर्तनामुळे मिरज पूर्वभागासह तासगाव, खानापूर, कडेगाव आणि कवठेमहांकाळ या तालुक्यांमधील पाणीटंचाईवर चांगली मात करता आली आहे. मात्र, उर्वरित गावांसह जत तालुक्याला आजही भीषण दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत आहे. गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या बहुतेक विहिरी आणि कुपनलिका कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे दुष्काळी टप्प्यातील तालुक्यातून टँकरच्या मागणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. पिण्याच्या पाण्याची सर्वांधिक टंताई जत तालुक्यात आहे.
११४ टँकरच्या ३०५ खेपा
पाण्याच्या पाण्याच्या मागणीत दिवसेंदिवस वाढच होत चालली आहे. सध्या जिल्ह्यातील ९६ गावे आणि ७७९ वाड्यावस्त्यांवरील २ लाख ४४ हजार ६८० नागरिकांना ११४ टँकरच्या माध्यमातून ३०५ खेपांद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या शिवाय जिल्हा प्रशासनाने टंचाईग्रस्त, गावातील १०४ विहिरी आणि कूपनलिकांचे अधिग्रहण केले आहे.
जतमध्ये होरपळ
जत तालुक्यातील रब्बी आणि खरीप हंगामातील सर्वच गावांतील पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी आहे. त्यामुळे संपूर्ण तालुकाच दुष्काळग्रस्त आहे. तालुक्यातील ५८ गावे आणि ५२८ वाड्यावस्त्यांवरील १ लाख ६९ हजार ५०७ नागरीक टंचाईग्रस्त आहेत. जिल्हा प्रशासनाने पाण्याची मागणी नोंदविल्यानंतर २४ तासांत टँकर सुरू करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. ७९ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू आहे. तरीही वेळेत पाणी न मिळाल्याने पाणीप्रश्नाबाबत जत तालु्नयातील नागरीकांतून प्रशासन आणि लोकप्रतिनिधीबाबत नाराजी आहे. तासगाव तालुक्यातील २२ गावांतील ३१ हजार लोकसंख्येला टँकरने पाणीपुरवठा होत आहे. खानापूर तालुक्यातील सात गावे, कवठेमहांकाळ तालुक्यातील तीन गावे टंचाईग्रस्त आहेत. या
म्हैसाळच्या पाण्याचे नियोजन नाही
२० फेबु्रवारीला म्हैसाळ योजनेचे बटन दाबून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पंप सुरू केले. पण, या दीड महिन्यात नेमकेपणाने पाणी सोडण्याचे नियोजन झाले नाही. शेतकऱ्यांनी पाणीपट्टी व वीजबिले भरावे. पाणी मागणी नोंदणी करावी तरच पाणी सोडणार, अशी प्रशासनाची ठाम भूमिका आहे. विद्युत पुरवठा खंडीत होणे, यांत्रिक बिघाडामुळे पंप अनेकदा बंद करावे लागत आहेत. पाण्याचे पाट फोडणे, अडवलेले पाणी चोरून वापरणे, यासाठी पाटबंधारे विभागाने कारवाईचे पाऊल उचलले आहे. पाण्यावरून बेडग, आरग, मालगाव परिसरात मारामारीचे प्रकार होऊन पोलिसापर्यंत प्रकरणे गेली आहेत.
............
सुमारे १४ लाख जनावरे जगविण्याचे आव्हान
जिल्ह्यात सुमारे १४ लाख लहान मोठी जनावरे आहेत. त्यांच्या चाऱ्याचा आणि पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. जनावरांना जगविण्याचे मोठे आव्हान शेतकऱ्यांपुढे आहे. ओला आणि सुका चारा नसल्याने जनावरांना काय खायला घालायचे हा मोठा प्रश्न आहे. पुढील दोन महिन्यांत चाऱ्याचा प्रश्न आणखी गंभीर होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लातूरकरांना मिरजेतून पाणी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मिरज कुपवाड ​ मिरजेतून लातूरला पाणी नेण्यासाठी राजस्थानातील कोटा येथून आलेले रेल्वेचे ५० टँकर रविवारी मिरजेत दाखल झाले. दुपारी दोनपासून दहा टँकरमध्ये प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर पाणी भरण्याचे काम सुरू झाले आहे. एक टँकर भरण्यास सुमारे सहा तासांचा वेळ लागत आहे. किमान २५ टँकर भरल्यानंतर मिरजेतून लातूरला मंगळवारी रात्री किंवा बुधवारी सकाळी रेल्वे रवाना होण्याची शक्यता आहे, अशी माहिती भाजपचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक मकरंद देशपाडे यांनी दिली आहे.

रेल्वेच्या टँकरमध्ये पाणी भरण्यासाठी टाकण्यात येत असलेली पाइपलाइन शुक्रवारी पूर्ण होणार आहे. तोपर्यंत न थांबता प्रशासनाने रेल्वेच्या प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर टँकर भरण्याचे काम सुरू केले आहे. मात्र, पाणी भरण्याच्या रेल्वेच्या पाइप लहान असल्यामुळे टँकर भरण्यास वेळ लागत आहे. रविवारी रात्री नऊ वाजेपर्यंत पाच टँकर भरले होते. या गतीने किमान २५ टँकर मंगळवारी रात्रीपर्यंत भरले जातील. त्यानंतर विशेष रेल्वे लातूरला रवाना होईल, असे देशपांडे म्हणाले.

दरम्यान, मिरजेतून लातूरला लवकरात लवकर पाणी देण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि रेल्वे प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. प्रत्येक टँकरची क्षमता ५४ हजार लिटर आहे. मात्र, प्रत्येक वॅगनमध्ये ५० हजार लिटर पाणी भरण्यात येणार आहे. अन्य ४० वॅगन्स यार्डमध्ये उभ्या करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, मिरज जंक्शनवर रेल्वेच्या जलशुद्धीकरण केंद्रापासून यार्डापर्यंत नवीन जलवाहिनी टाकण्यासाठी चर काढण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी १ कोटी, ८५ लाख रुपये खर्च येणार आहे. हे काम शुक्रवारी पूर्ण होणार आहे. त्यानंतर पूर्ण क्षमतेने पाणी उपलब्ध होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पोलिसांच्या ताब्यातूनआरोपीचे पलायनएमआयडीसी पोलिस ठाण्यातील घटना

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सोलापूर
घरफोडीच्या गुन्ह्यात अटक केलेला आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला आहे. नव्या वास्तूत स्थलांतरीत झालेल्या एमआयडीसी पोलिस ठाण्यात ही घटना घडली आहे. हरी मुरलीधर काळे (वय २४, रा. पारधी वस्ती, कुंभारी, ता. दक्षिण सोलापूर) असे पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे.
शहरातील बऱ्याच घरफोडीच्या गुन्ह्यात त्याचा समावेश असल्याची खात्री झाल्यानंतर एमआयडीसी पोलिस ठाण्यातील सहायक निरीक्षक चंद्रकांत वांबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हरी काळेला शुक्रवारी रात्री शिताफीने अटक केली होती. पुढील तपासासाठी त्याला एमआयडीसी पोलिस ठाण्यात आणण्यात आले होते. त्यानंतर सहायक निरीक्षक वांबळे यांनी आरोपीला रात्रपाळीतील पोलिस नाईक नीलेश पाटील यांच्याकडे सुपूर्द केले होते. पाटील यांनी आरोपीला पहिल्या मजल्यावरील खोलीत ठेवले होते. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास पाटील यांना जाग आली, तेव्हा हरी काळे गायब झाल्याचे दिसून आले. या संदर्भात सहायक निरीक्षक वांबळे यांनी एमआयडीसी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औज बंधाऱ्यातचर मारून पाणी उपसा

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सोलापूर
सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणारा औज बंधारा कोरडा ठणठणीत पडला आहे. पंप हाउसपर्यंत चर मारून पाणी उपसा करण्यात येत आहे. उपसा करण्यात येणारे पाणी किती दिवस पुरणार, असा प्रश्न पालिका प्रशासनाला पडला आहे.
उजनीतून सोडण्यात येणारे पाणी औज बंधाऱ्यात येण्यास किमान दहा दिवस लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाण्याची आणीबाणी निर्माण झाली आहे. औज बंधारा कोरडा ठणठणीत पडल्याने चर मारून पाणी घेण्याची वेळ पालिका प्रशासनावर आली आहे. वास्तविक पाहता यापूर्वी सोडलेल्या पाण्याने औज आणि चिंचपूर बंधारे पूर्ण क्षमतेने भरले नव्हते. चिंचपूर बंधाऱ्यात तीन मीटर पाणीसाठा असताना पाणी बंद करण्यात आले. त्यामुळे जलसंकट निर्माण झाले आहे. पंपगृहापर्यंत पाणी आणण्यासाठी प्रभारी सावर्जनिक आरोग्य अभियंता संजय धनशेट्टी यांनी जेसीबी आणि कर्मचाऱ्यांना घेऊन चर मारून पंपगृहापर्यंत पाणी आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. जोपर्यंत उजनी धरणातून सोडलेले पाणी औज बंधाऱ्यात येत नाही. तोपर्यंत शहरावर भीषण जलसंकटाचे सावट राहणार आहे. दोन्ही बंधारे पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर उजनीतील पाण्याचा प्रवाह बंद करावा, अन्यथा पुढील दोन महिने पाण्याचा पुरवठा कसा करायचा, असा प्रश्न पालिका प्रशासनासमोर उभा राहणार आहे.
......
दहा दिवसांची प्रतीक्षा
उजनी धरणातून शनिवारी सायंकाळपासून सोलापूर शहरासाठी भीमा नदीत पाणी सोडण्यात येत आहे. सहा हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हे पाणी आठ दिवसांत औज बंधाऱ्यात पोहोचणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, पाण्याचा प्रवाह पाहता दहा दिवसांपेक्षा जास्त कालावधी लागण्याची शक्यता आहे. धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याने फक्त ३० किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला आहे. टाकळी गावाजवळ पाणी पोहचले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादीचे नेते डोंगरेंवरप्राणघातक हल्ला; प्रकृती गंभीर

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सोलापूर
सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी कॉँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि जिल्हा दूध संघाचे संचालक मनोहर डोंगरे यांच्यावर त्यांच्या शेटफळ गावात सोमवारी सकाळी नऊ वाजता प्राणघातक हल्ला करण्यात आला. सोलापूरच्या अश्विनी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. मंगळवारी एअर अ‍ॅम्ब्युलन्सने त्यांना मुंबईतील लिलावती हॉस्पिटलमध्ये हलविण्यात येणार आहे. राजकीय वैमनस्यातूनच डोंगरे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला असावा, असा अंदाज आहे.
मनोहर डोंगरे सकाळी गावातील सिद्धेश्वर मंदिराकडे दर्शनासाठी निघाले असताना तेथे दबा धरून बसलेल्या ८ ते १० जणांनी अचानक डोंगरे यांच्यावर तलवार आणि प्राणघातक शस्त्राने हल्ला केला. तोंड, मान ,पाय आणि हातावर तलवारीचे जबर घाव बसले आहेत. हाताची तीन बोटे तुटली आहेत. हल्लेखोर तेथून पसार झाले आहेत. प्राणघातक हल्ल्यामुळे डोंगरे बेशुद्ध पडून जमिनीवर कोसळले. शरीरातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव सुरू असल्यामुळे त्यांना सोलापूरच्या अश्विनी हॉस्पिटलमध्ये हलविले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दुपारी शस्त्रक्रियाही करण्यात आली आहे. सर्वांगावर वार झाल्यामुळे आणि रक्तस्त्राव थांबत नसल्यामुळे प्रकृती चिंताजन बनत आहे. डॉक्टरांनी डोंगरे यांच्या नातेवाईकांशी चर्चा करून तातडीने लिलावती हॉस्पिटलमध्ये हलविण्यास सांगितले आहे. त्यासाठी एअर अ‍ॅम्ब्युलन्स तयार ठेवण्यात आली आहे. परंतु, रात्री विमान उड्डानाची व्यवस्था नसल्यामुळे मंगळवारी सकाळी त्यांना मुंबईला हलविले जाईल.
शेटफळमधील स्थानिक राजकारण करीत असताना डोंगरे आणि विरोधकांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून धूसफूस सुरू आहे. वादावादी आणि हाणामाऱ्यांसारखे प्रकारही घडले आहेत. डोंगरे यांच्यासह त्यांच्या मुलावर विरोधकांवर हल्ला केल्याप्रकरणी यापूर्वी तक्रारी दाखल झाल्या आहेत. तेव्हापासूनच शेटफळमध्ये राजकीय वैमनस्य असून गावात तणाव आहे. राजकीय वैमनस्यातूनच डोंगरे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला असावा, असा अंदाज आहे.
शेटफळ गावात तणाव वाढला
हल्ला झाल्याचे समजताच डोंगरे यांचे राजकीय प्रभाव क्षेत्र असलेल्या शेटफळसह मोडनिंब, टेंभुर्णी आणि मोहोळमधील त्यांच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. शेटफळ गावातील नागरिकांनी संशयितांच्या घरांवर दगडफेक करून रास्ता रोखून धरला. त्यामुळे सोलापूर-पुणे मार्गावरील वाहतूक विस्कळीत होऊन रस्ता जाम झाला होता. पोलिसांनी रस्ता मोकळा करून दिला. शेटफळ गावात तणाव आहे. गावात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. हल्लेखोरांच्या तपासासाठी पथके तैनात करण्यात आली आहेत.
दरम्यान, डोंगरे मागील दहा वर्षे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम पहात होते. पक्षाध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी आमदार राजन पाटील यांचे ते खास विश्वासू आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोलापुरातील ऊसक्षेत्र २५ टक्क्याने कमी होणार

$
0
0


सोलापूर
सोलापूर जिल्ह्यात पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे यंदाच्या हंगामात उसाची नवीन लागवड होऊ शकली नाही. दुष्काळाचा थेट परिणाम ऊस लागवडीवर झाला आहे. सन २०१६-१७च्या गळीत हंगामामध्ये २५ टक्के उसाची कमतरता भासणार आहे. लागवड न झाल्यामुळे शेतकऱ्यांना सुमारे पाच हजार कोटी रुपयांचा फटका बसणार आहे.
सर्वाधिक ऊस पिकविणारा जिल्हा म्हणून सोलापूर प्रसिद्ध आहे. या भागात एकूण उत्पादनाच्या १८.६२ टक्के ऊस पिकतो. मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यात ४.९२, परभणी २.०१, बीड ३.२३, लातूर ४.८४ तर जालना, नांदेड, हिंगोली भागात ८ टक्के ऊस पिकतो. या भागात पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे २०१५ मध्ये उसाची लागवडच झालेली नाही. त्यामुळे २५ टक्के ऊस कमी झाला आहे. २०१६-१७च्या हंगामात दोन कोटी टनांहून अधिक ऊस उत्पादनात घट होईल. त्याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पाच हजार कोटी रुपयांवर पाणी सोडावे लागणार आहे. केवळ शेतकरीच नव्हे तर साखर कारखानदारांनाही याचा मोठा फटका बसणार आहे. उसतोड कामगार व कारखान्यातील हंगामी कामगारांनाही आर्थिक नुकसान सोसावे लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्याच्या गाडीला क्रॉसिंगचा अडथळा

$
0
0


पंढरपूर
मिरजेतून निघालेली रेल्वे पंढरपूरला तब्बल सहा तासानंतर पोचली. अनेक ठिकाणी

क्रॉसिंगसाठी गाडीचा बराचसा वेळ गेला. त्यामुळे लातूरला पोहोचण्यास मध्यरात्र

होण्याची शक्यता आहे. मिरज सोडल्यानंतर लगेचच अरग येथे दीड तास गाडीला थांबावे

लागले. सांगोल्यात एक तास क्रॉसिंगसाठी थांबविण्यात आल्यावर दुपारी साडेपाच वाजता

ही गाडी पंढरपूर स्थानकावर आली. येथे मनसेच्या वतीने गाडीचे जंगी स्वागत करण्यात

आले. गाडीला पंढरपूर स्थानकावर क्रॉसिंगसाठी थांबविण्यात आल्याने संध्याकाळी

सातच्या दरम्यान तिचा कुर्डूवाडीकडील प्रवास सुरू झाला. कुर्डूवाडी जंक्शन असल्याने या

ठिकाणी तिला लगेच लाइन मोकळी मिळणे अवघड असून, त्यानंतर बार्शी येथून गाडी

उस्मानाबाद मार्गे लातूरकडे रवाना होईल. मध्यरात्रीनंतर गाडी लातूरला पोहोचेल. रेल्वे

प्रशासन विना थांबा गाडीचा प्रवास असल्याचे सांगत आहे. मात्र, गाडी रात्री उशिरा कशी

पोहोचेल याचीच अप्रत्यक्ष खबरदारी अधिकारी घेत असल्याचे दिसते आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>